Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६२)
महापुराण
(२५-२३३
मोक्षाधिरोहनिःश्रेणीभूतच्छत्रत्रयोद्धरः । यशःक्षीरोदफेनाभसितचामरवीजितः ॥ २३३ ध्वनन्मधुरगम्भीर धीरदिव्यमहाध्वनिः । भानुकोटि प्रतिस्पद्धि प्रभावलयभास्वरः ॥ २३४ मरुत्प्रहतगम्भीरदन्ध्वनदुन्दुभिः प्रभुः। सुरोत्करकरोन्मुक्तपुष्पवर्षाचितक्रमः ॥ २३५ मेरुशङ्गसमुत्तुङ्गासिंहविष्टरनायकः । सच्छायसफलाशोकप्रकटीकृतचेष्टितः ॥ २३६ धूलीसालवृतास्थानजगतीपरिमण्डलः । मानस्तम्भनिरुद्धान्यकुदृष्टिमदविभ्रमः ॥ २३७ स्वच्छाम्भःखातिकाभ्यर्णव्रततीवनवेष्टिताम् । सभाभूमिमलङकुर्वन्नपूर्वविभवोदयाम् ॥ २३८ समग्रगोपुरोदः प्राकारवलयस्त्रिभिः । परार्ध्यरचनोपेतैराविष्कृतमहोदयः ॥ २३९ अशोकादिवनश्रेणीकृतच्छायसभावनिः । स्रग्वस्त्रादिध्वजोल्लाससमाहूतजगज्जनः ॥ २४० कल्पवृक्षवनच्छायाविश्रान्तामरपूजितः । प्रासादरुद्धभूमिष्ठकिन्नरोद्गीतसद्यशाः ॥ २४१
मुक्तिस्थानावर चढून जाण्यासाठी जणु पाय-याप्रमाणे दिसत असलेल्या तीन छत्रानी युक्त असलेल्या प्रभूवर यशरूपी क्षीरसमुद्राच्या फेसाप्रमाणे भासत असलेला शुभ्र चामरसमूह वारला जाऊ लागला व त्या चामरांनी प्रभु शोभू लागले ॥ २३३ ॥
गोड, गम्भीर व कापरेपणाने रहित व दिव्य असा महाध्वनि प्रभूपासून निघत होता. कोटिसूर्याच्या कान्तीशी स्पर्धा करणा-या भामण्डलाने प्रभु कान्तिसम्पन्न दिसत होते ।। २३४ ॥
देवांनी वाजविलेले व वारंवार गंभीर ध्वनि करणारे अशा नगान्यांनी ज्यांचे समवसरण शोभत आहे असे व देवसमूहाच्या हातांनी वर्षिलेल्या पुष्पसमूहांनी प्रभूचे दोन पाय शोभत होते ।। २३५ ॥
. मेरूच्या शिखराप्रमाणे उंच सिंहासनावर प्रभु आदिनाथ बसले होते. उत्तम सावलीने व फलानी युक्त अशा अशोक वृक्षाने प्रभूची लोकहित करणारी कार्य व्यक्त केली होती ॥२३६।।
प्रभूचे समवसरण जे मण्डलाकार होते ते धूलीसाल नामक तटाने सर्व बाजूनी घेरलेले होते. प्रभुंनी मानस्तंभांच्याद्वारे अन्ध-कुदृष्टि जनांच्या मदाचा विलास नाहीसा केला होता॥२३७।।
स्वच्छ पाण्याने भरलेल्या खंदकाच्या सभोवती लतावनांनी जिला वेढलेले आहे व अपूर्व वैभवाने जिला सौन्दर्य प्राप्त झाले आहे अशा सभाभूमीला प्रभुंनी अलंकृत केले होते ॥ २३८ ।।
__उंच शिखरांनी युक्त अशा वेशीच्या दरवाज्यांनी युक्त तीन तट समवसरणाच्या सभोवती होते व अत्युत्कृष्ट रचनेने युक्त असल्यामुळे भगवंताचा महान् उत्कर्ष त्यांनी व्यक्त केला होता ।। २३९ ।।
____ अशोकवन, आम्रवनादिक चार वनपंक्तींनी प्रभूच्या सभास्थानाला दाट छायायुक्त बनविले होते व मालाध्वज, वस्त्रध्वज आदिक दहा प्रकारच्या ध्वजपंक्तीच्या उल्हासानी जणु सर्व जगतातील लोकांना प्रभु बोलावित आहेत की काय असे वाटत होते ।। २४० ॥
__कल्पवृक्षांच्या वनाच्या सावलीत विश्रांत झालेल्या देवाकडून पूजिले गेलेले व प्रासादावरील गच्चीवर बसलेले किन्नर देवाकडून ज्यांचे यश गायिले गेले आहे अशा प्रभूनी विहार केला असा संबंध येथे जाणावा ॥ २४१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org