________________
आद्यखण्ड-समाप्ति.
वृषभाय नमोऽशेषस्थितिप्रभवहेतवे । त्रिकालगोचरानन्तप्रमेयाक्रान्तमूर्तये ॥१ नमः सकलकल्याणपथनिर्माणहेतवे । आदिदेवाय संसारसागरोत्तारसेतवे ॥२ जयन्ति जितमृत्यवो विपुलवीर्यभाजो जिनाः । जगत्प्रमदहेतवो विपदमन्दकन्दच्छिदः॥ सुरासुरशिरस्सु संस्फुरितरागरत्नावली-विलम्बिकिरणोत्करारुणितचारुपादद्वयाः ॥३ कृतिमहाकवेर्भगवतः श्रीजिनसेनाचार्यस्येति । धर्मोऽत्र मुक्तिपदमत्र कवित्वमत्र । तीर्थशिनश्चरितमत्र महापुराणे॥ यद्वा कवीन्द्रजिनसेनमुखारविन्दनिर्यद्वचांसि न हरन्ति मनांसि केषाम् ॥ ४
इत्या भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते महापुराणे आद्यं खण्डं समाप्तिमगमत् ॥
------------......
समाप्तीचे मंगल
जे संपूर्ण लोकमर्यादांच्या उत्पत्तीला कारण आहेत, ज्यांची केवलज्ञानरूपी मूर्ति त्रिकालाला विषय होणाऱ्या अनन्त पदार्थानी व्याप्त झाली आहे, जे सर्वजीवांचे कल्याण करणाऱ्या मार्गाच्या निर्माणाला कारण आहेत अर्थात् सर्वजीवांचे कल्याण होण्याचा उपाय ज्यानी सांगितला आहे व जे संसारसमुद्राच्या पलीकडे जाण्यास पुलासारखे आहेत, त्या वृषभ जिनेन्द्राला मी वारंवार नमस्कार करतो ।। १-२ ॥
ज्यांनी मृत्यूला जिंकले आहे, ज्यांनी विपुल वीर्य-अनन्तशक्तीला धारण केले आहे, जे त्रैलोक्याला उत्कृष्ट आनंद प्राप्त करून देण्यास कारण आहेत, जे विपत्तींच्या मोठ्या गड्डयाला मुळासकट उपटून टाकतात, देवांच्या व दैत्यांच्या मस्तकावरील चमकणाऱ्या पद्मरागमण्यांच्या पंक्तीच्या किरणसमूहानी ज्यांचे सुंदर दोन पाय लालभडक झाले आहेत असे जिनेश्वर जगात सदा जयवन्त आहेत ॥ ३ ॥
हे महापुराण महाकवि भगवान् जिनसेनाचार्याची कृति- रचना आहे. या महापुराणात जिनधर्म आहे, अर्थात् जिनधर्माचे निरूपण आहे, यात मोक्षाच्या स्वरूपाचे वर्णन आहे व सुंदर कवित्व आहे. या पुराणात तीर्थेश आदिभगवंताचे चरित्र आहे. म्हणून कवीन्द्र जिनसेनाचार्यांच्या मुखकमलातून निघणारी वचने कोणा विद्वानांची मने हरण करणार नाहीत बरे ? ॥ ४ ॥
याप्रमाणे भगवान् जिनसेनाचार्यविरचित आर्षमहापुराणातील आद्यखण्ड समाप्त झाला
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org