Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६७२)
महापुराण
(४७-७६
ममाभिवीक्षितुं तत्र चित्रमालोक्य कम्बलम् । कथयायं कुतस्त्यस्ते तन्वीति प्रश्नतो मम ॥ ७६ जगाद सापि मामेष प्रापादेशवशादिति । कम्बलप्राप्तितस्तद्वन्तं समाध्याय विह्वलाम् ॥ ७७ एतां तस्याः सखीकृत्वा समन्वेष्टुं समागता । काञ्चनाख्यपुरानाम्ना मदनादिवती तदा ॥ ७८ दृष्ट्वा तत्कम्बलस्यान्ते निबद्धां रत्नमुद्रिकाम् । तत्र श्रीपालनामाक्षराणि चादेशसंस्मृतेः ॥ ७९ अकायसायकोद्भिन्नहृदयाभूदहं ततः । कथं वैद्याधरं लोकमिमं श्रीपालनामभत् ॥ ८० समागतः स इत्येतन्निश्चेतुं पुण्डरीकिणीम् । उपगत्य जिनागारे वन्दित्वा समुपस्थिता ॥ ८१ त्वत्प्रवासकथां सर्वां तव मातुः प्रजल्पनात् । विदित्वा विस्तरेण त्वामानेष्यामीति निश्चयात् ॥८२ आगच्छन्ती भवद्वार्ता विद्युद्वेगामुखोद्गताम् । अवगत्य त्वया सार्द्ध योजयिष्यामि ते प्रियम् ॥ ८३ न विवाहो विधातव्य इत्याश्वास्य भवत्प्रियाम् । विनिर्गत्य ततोऽभ्येत्य सिद्धकूटजिनालयम् ॥ ८४ अभिवन्द्यागतास्म्येहि मयामा पुण्डरीकिणीम् । मातरं भ्रातां चान्यां स्त्वबन्धुंश्च समीक्षितुम् ॥ ८५ यदीच्छास्ति तवेत्याह सा तच्छुत्वा पुनः कुतः । त्वमेव जरती जातेत्यब्रवीत्स सुखावतीम् ॥८६ कुमारवचनाकर्णनेन वार्धक्यमागतम् । भवतश्च न किं वेत्सीत्यपहस्य तयोदितम् ॥ ८७
मी तेथे एक विचित्र कम्बल (शाल ) पाहिले व हे विचित्र कम्बल हे कृशाङ्गी तुला कोठून बरे मिळाले मला सांग असा प्रश्न मी केला ॥ ७६ ॥
तेव्हा ती देखिल मला असे म्हणाली. मला माझ्या आज्ञेनेच हे कम्बल मिळाले आहे. पण याची प्राप्ति झाल्यापासून ज्याचे ते कंबळ आहे त्याचे चिन्तन करणारी ती माझी सखी व्याकुळ झाली आहे असे तिच्या मैत्रिणीने ऐकले, तेव्हा तिची सखी मदनावती कांचनपुराहून तिला पाहण्यासाठी आली ।। ७७-७८ ।।
त्या कंबलाच्या पदराला रत्नाची आंगठी बांधलेली आहे हे मला दिसले आणि तिच्यावर श्रीपालाच्या नांवाची अक्षरे दिसली व मला गुरूच्या आज्ञेचे स्मरण झाले व ज्याला शरीर नाही अशा मदनाच्या बाणानी त्यावेळी माझे हृदय विद्ध झाले ॥ ७९ ॥
व हा श्रीपाल नामधारक पुरुष या विद्याधराच्या देशात कसा आला याचा निश्चय करण्याकरिता मी पुण्डरीकिणी नगरात जाऊन जिनमंदिरात तेथे जिनेश्वरास वंदन केल्यानंतर तेथे थोडा वेळ मी बसल्ये. यानंतर हे श्रीपाला तुझ्या मातेने तुझ्या प्रवासाची सर्व कथा तिने मला सांगितली. ती विस्ताराने जाणून घेऊन तिला आणीन असा निश्चय मी केला. त्या निश्चयाला अनुसरून मी येत होते मार्गात मला विद्युद्वेगेच्या मुखातून आपली सर्व कथा ऐकावयास मिळाली. मी प्रियकराबरोबर तुझी भेट करवीन. तू विवाह करू नकोस असे आपल्या भावी प्रियेला मी विश्वास देऊन समाधान केले. त्यानंतर मी तेथून निघून सिद्धकूट जिनमंदिरात आल्ये व जिनवंदन करून मी आल्ये व त्याला म्हणाले की, माता, भाऊ आणि इतर बंधुजनाना भेटण्याची तुमची इच्छा असेल तर पुण्डरीकिणीपुरीकडे चला. हे सर्व ऐकून मी सुखावतीला विचारिले की, तू इतकी म्हातारी कशी झालीस ? हे कुमाराचे वचन ऐकून मी म्हणाले की, आपणासही तो म्हातारपणा आलेला आहे हे आपण जाणत नाही काय ? असे थट्टा करून ती म्हणाली ॥ ८०-८७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org