Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७-७५)
महापुराण
खगाद्रेः पूर्वदिग्भागे नीलाद्रेरपि पश्चिमे । सुसीमाख्योऽक्तिदेशोऽत्र महानगरमप्यदः ॥ ६५ तद्भूतवनमेतत्त्वं सम्यक् चित्तेऽवधारय । अस्मिन्नेताः शिलाः सप्त परस्परघृताः कृताः ॥ ६६ येनासौ चक्रवर्तित्वं प्राप्तेत्यादेश ईदृशः । इति तद्वचनादेव तास्तथा कृतवांस्तदा ॥ ६७ दृष्ट्वा तत्साहसं वक्तुं सोऽगमन्नगरेशितुः । कुमारोऽपि विनिर्गत्य ततो निविण्णचेतसा ॥ ६८ काञ्चिज्जरावतीं कुत्स्यशरीरां कस्यचित्तरोः । अधःस्थितामधोभागे विषयं पुष्कलावतीम् ॥ ६९ वद प्रयाति कापन्था इत्यप्राक्षीप्रियंवदः । विनागमनमार्गेण प्रयातुं नैव शक्यते ॥७० स गव्यूतिशतोत्सेधविजयार्धगिरेरपि । परस्मिन्नित्यसावाह तदाकर्ण्य नृपात्मजः ॥ ७१ ब्रूहि तत्प्रापणोपायमिति तां प्रत्यभाषत । इह जम्बूमति द्वीपे विषयो वत्सकावती ॥ ७२ तत्खेचरगिरौ राजपुरे खेचरचक्रिणः । देवी धरणिकम्पस्य सुप्रभावा प्रभाकरी ॥ ७३ तयोरहं तनूजास्मि विख्याताख्या सुखावती । त्रिप्रकारोरुविद्यानां पारगान्येरागताम् ॥ ७४ विषये वत्सकावत्यां विजयाप्रमहीतले । अकम्पनसुतां पिप्पलाख्यां प्राणसमां सखीम् ॥ ७५
"-.--.-...-...
या विजयार्द्धपर्वताच्या पूर्वदिशेच्या विभागात व नीलपर्वताच्या पश्चिमदिशेकडे सुसीमा नांवाचा देश आहे व त्यात हे महानगर आहे व त्या नगराचे हे भूतवन आहे असे मनात दृढ करून ठेव. या भूतवनात या सात शिला पडल्या आहेत. त्या एकीवर दुसरी, दुसरीवर तिसरी अशा क्रमाने जो ठेवील त्याला चक्रवर्तित्व प्राप्त होईल अशी सर्वज्ञदेवाची आज्ञा आहे. हे त्याचे वचन ऐकून या कुमाराने त्या शिला क्रमाने एकीवर दुसरी अशारीतीने स्थापिल्या ॥ ६५-६७ ।।
त्या कुमाराचे हे साहस पाहून तो विद्याधर महानगराच्या राजाला हे वृत्त सांगण्यास गेला व कुमारही खिन्नमनाने तेथून निघाला. एका झाडाच्या खाली जिचे शरीर कुरूप आहे व जी म्हातारी आहे अशी एक स्त्री बसली होती. तिला प्रिय भाषण करणाऱ्या कुमाराने असे विचारले- पुष्कलावती देशाकडे कोणता मार्ग जातो सांग. कारण जाण्याच्या मार्गावाचून जाणे, प्रवास करणे शक्य नसते. तेव्हा ती स्त्री म्हणाली, तो मार्ग दोनशे कोस उंच अशा विजयार्धपर्वताच्या पलीकडे आहे. ते तिचे भाषण ऐकून कुमार पुनः म्हणाला, तेथे पोहचण्याचा उपाय कोणता तो सांग. तेव्हा ती सांगू लागली, "या जंबूद्वीपामध्ये वत्सकावती नांवाचा देश आहे. त्यातील विजयार्धपर्वतावर राजपुरशहरात विद्याधरचक्रवर्ती धरणिकम्पाची पट्टराणी जणु चन्द्राची चन्द्रिका आहे अशी सुन्दर प्रभावती नांवाची आहे ॥ ६८-७३ ॥
___ त्या दोघांची मी कन्या आहे. सुखावती नांवाने मी प्रसिद्ध आहे. जातिविद्या, कुलविद्या आणि सिद्धविद्या अशा ज्या मोठ्या तीन विद्या त्या मला पूर्ण अवगत झाल्या आहेत. एके दिवशी मी वत्सकावती देशातील विजया पर्वताच्या पृथ्वीतलावर अकम्पनराजाची कन्या जिचे पिप्पला असे नांव आहे तिच्याकडे मी गेले होते. ती माझी प्राणाप्रमाणे आवडती मैत्रीण आहे ॥ ७४-७५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org