Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६७४)
आदिष्ट सन्निधानेन विलोक्य प्रकृतिं गतम् । सुखावती तदुद्देशादपनीय कुमारकम् ॥ १०१ स्थानेऽन्यस्मिन्व्यधादेनं तत्राप्यम्बुनि मुद्रया । स्वरूपं कामरूपिण्या प्रेक्षमाणं यदृच्छया ।। १०२ दृष्ट्वा हरिवरस्तस्मान्नीत्वा कोपात्स पापभाक् । निचिक्षेप महाकालगुहायां विहितायकम् ॥ १०३ वसंस्तत्र महाकालस्तं गृहीतुमुपागतः । तस्य पुण्यप्रभावेन सोऽप्यकिञ्चित्करो गतः ॥ १०४ तत्र शय्यातले सुप्त्वा शुचौ मृदुनि विस्तृते । परेद्युनिर्गतं तस्याः सुप्रयुक्तैः परीक्षितुम् ॥ १०५ आदिष्टपुरुषं भृत्यैर्ज्ञात्वाभ्येत्य निवेदितम् । गृहीत्वा स्थविराकारं कोपपावकदीपितः ॥ १०६ तं वीक्ष्य धूमवेगाख्यः खगश्चन्द्रपुराद्बहिः । श्मशानमध्ये पाषाणनिशातविविधायुधैः ।। १०७ न्यगृह्णात्तानि चास्यासन् पतन्ति कुसुमानि वा । परोऽपि खेचरस्तत्र नरेशोऽतिबलाह्वयः ॥ १०८ स्वदेव्यां चित्रसेनायां भृत्ये दुष्टतरे सति । तं निहत्यादहत्तस्मिन्धूमवेगो निघाय तम् ॥ १०९ कुमारं चागमत्तत्र महौषधजशक्तितः । निराकृतज्वलद्वह्निशक्तिस्तस्मात्स निर्गतः ॥ ११०
महापुराण
( ४७-१०१
त्यावेळी त्यांच्या अन्तःकरणाचा व्याकुलपणा व्यक्त होत होता. त्याच जिनमंदिरात शिवकुमार नामक राजपुत्र उभा होता व त्याचे तोंड वाकडे झाले होते. पण श्रीपालकुमाराचे तेथे आगमन झाल्यामुळे त्याच्या सान्निध्याने त्याचे तोंड सरळ झाले. त्यावेळी सुखावतीने त्या स्थानापासून त्या मुलाला अन्यस्थानी नेले ॥ १०१ ॥
कामरूपिणीमुद्रेच्या द्वारे आपले रूप तो श्रीपाल पाण्यामध्ये बघत असता तेथे हरिवराला तो दिसला. कोपाने तप्त होऊन पापी अशा त्याने पुण्ययुक्त अशा त्याला महाकाल नामक गुहेत टाकले ॥ १०२ ॥
त्या गुहेत राहणारा महाकाल त्याला पकडण्यासाठी आला पण त्याच्या पुण्यप्रभावाने तो त्याला मारण्यास असमर्थ होऊन तेथून तो निघून गेला ॥ १०३ ॥
Jain Education International
त्या गुहेत स्वच्छ, मऊ व विस्तृत अशा शय्येवर झोपून दुसरे दिवशी तो तेथून बाहेर पडला. जरी त्या श्रीपालाला वृद्धाचे रूप प्राप्त झाले होते तरी त्याला ओळखण्यासाठी त्याची परीक्षा करण्यासाठी ठेवलेल्या नोकरानी येऊन त्याला ओळखले व त्याविषयी त्यानी धूमवेगला निवेदन केले. तेव्हा तो धूमवेग कोपरूपी अग्नीने प्रज्वलित झाला आणि चन्द्रपुराच्या बाहेर श्मशानात पाषाणावर घासून ज्याना धार दिली आहे अशा अनेक तीक्ष्ण आयुधानी त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण ती आयुधे याच्यावर फुलासारखी पडली. त्या आयुधापासून त्याला तिळमात्रही इजा झाली नाही. या कथेशी सम्बन्ध असलेली दुसरी कथा येथे अशी आहे - अतिबल नांवाचा दुसरा एक विद्याधरराजा होता. त्याच्या राणीचे नांव चित्रसेना होते. तिच्याविषयी एका नोकराने काही दुष्टपणा केला होता. त्यामुळे त्याला राजाने ठार मारून त्याला जाळले. तेव्हा धूमवेगाने त्याच्या चितेवर श्रीपाल कुमाराला ठेवले व आपण तेथून निघून गेला पण तेथे महौषधीच्या सामर्थ्याने त्या अग्नीचे सामर्थ्य नष्ट झाले आणि तो तेथून निघून गेला ।। १०४-११० ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org