Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

Previous | Next

Page 698
________________ ४७-२४१) घिगिदं चसाम्राज्यं कुलालस्येव जीवितम् । भुक्तिश्चक्रं परिभ्राम्य मृदुत्पन्नफलाप्तितः ॥ २३५ आयुर्वायुरयं मेघो भोगो भङ्गी हि सङ्गमः । वपुः पापस्य दुष्पात्रं विद्युल्लोला विभूतयः ॥ २३६ मार्गविभ्रंशहेतुत्वात् यौवनं गहनं वनम् । या रतिविषयेष्वेषा गवेषयति साऽरतिम् ॥ २३७ सर्वमेतत्सुखाय स्याद्यावन्मतिविपर्ययः । प्रगुणायां मतौ सत्यां किं तत्त्याज्यमतः परम् ॥ २३८ चित्तद्रुमस्य चेवृद्धिरभिलाषविषाङ्कुरैः । कथं दुःखफलानि स्युःसम्भोगविटपेषु न ।। २३९ भुक्त भोगो दशाङ्गोऽपि यथेष्टं सुचिरं मया । मात्रामात्रेऽपि नात्रासीस्तृप्तिस्तृष्णाविघातिनी ॥२४० अस्तु वस्तु समस्तं च सङ्कल्पविषयीकृतम् । इष्टमेव तथाप्यस्मान्नास्ति व्यस्तापिनिर्वृतिः ॥ २४१ महापुराण (६८७ हे चक्रवर्तीचे साम्राज्य जणु कुंभाराच्या जीवनाप्रमाणे आहे. कुंभार जसे आपले चाक फिरवून मातीपासून बनविलेले घागर वगैरे पदार्थ ते विकून आपली उपजीविका करितो तसे हा चक्रवर्ती देखिल चक्र फिरवून दिग्विजय करून मातीपासून म्हणजे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या भोगोपभोगाच्या पदार्थानी आपले जीवन जगतो म्हणून या चक्रवर्तीच्या साम्राज्याला धिक्कार असो ।। २३५ ।। हे आयुष्य वान्यासारखे आहे, चंचल आहे. भोग मेघासारखे आहेत. तेही नाशवंत आहेत. संगम- स्त्री पुत्रादिकांचा सहवास हा भंगी म्हणजे नाशवंत आहे व वपु - म्हणजे शरीर हे दुष्पात्र आहे म्हणजे घाणेरडे भांडे आहे व विभूतयः - संपत्ती विजेप्रमाणे चंचल आहेत ॥ २३६॥ हे तारुण्य दाट जंगलाप्रमाणे आहे. कारण जंगल जसे रस्ता चुकण्याला कारण होते तसे हे तारुण्य जीवाला सदाचाराच्या मार्गापासून भ्रष्ट करिते व जी पंचेन्द्रियाना आवडणाऱ्या पदार्थात रति प्रेम आहे ते प्रेम पुढे अरतीला अप्रीतीला हुडकते अर्थात् अप्रीतीला उत्पन्न करिते. तेच तेच पदार्थ भोगणे कंटाळवाणे होते ॥ २३७ ॥ हे सर्व राज्यादिक पदार्थ सुखदायक वाटतात पण ते केव्हा ? व कोठपर्यन्त ? तर याचे उत्तर असे आहे - जोपर्यंन्त आपली बुद्धि भ्रान्त आहे तोपर्यन्त. पण बुद्धि जेव्हा भ्रमरहित होते तेव्हा या पदार्थापेक्षा त्याज्य पदार्थ जगात दुसरा कोणताच नाही असे वाटू लागते ॥ २३८ ॥ या मनरूपी वृक्षाची जी वाढ झाली आहे ती नाना प्रकारच्या इच्छारूप विषाङकुरानी झाली आहे. यास्तव यांच्या भोगरूपी डहाळ्या दुःखरूपी फलांनी कां बरे लकडणार नाहीत ? ।। २३९ ॥ मी दहा प्रकारचे भोग दीर्घकालपर्यन्त यथेष्ट भोगले आहेत तथापि तृष्णेचा नाश करणारी तृप्ति मला तिळभरही प्राप्त णाली नाही. अतिशय अल्पकालातही मला तृप्तीचा अनुभव आला नाही ॥ २४० ॥ Jain Education International ज्या ज्या वस्तु मला प्राप्त व्हाव्यात म्हणून मनात मी संकल्प केला होता त्या त्या इष्ट वस्तु मला प्राप्त झाल्या तरी पण त्यापासून मला थोडासा देखिल संतोष प्राप्त झाला नाही ।। २४१ ।। For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 696 697 698 699 700 701 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720