Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६८८)
(४७-२४२
किल स्त्रीभ्यः सुखावाप्तिः पौरुषं किमतः परम् । दैन्यमात्मनि सम्भाव्यं सौख्यं स्यां परमः पुमान् ॥ इति श्रीपालचक्रेशः सन्त्यजन्वक्रतां धियः । अक्रमेणाखिलं त्यक्तुं सचक्रं मतिमातनोत् ॥ २४३ ततः सुखावतीपुत्रं वरपालाभिधानकम् । कृताभिषेकमारोप्य समुत्तुङ्गं निजासनम् ।। २४४ जयवत्यादिभिः स्वाभिर्देवीभिर्धरणीश्वरैः । वसुपालादिभिश्चामा संयमं प्रत्यपद्यत ।। २४५ स बाह्यमन्तरङ्गं च तपस्तप्त्वा यथाविधि । क्षपकश्रेणिमारुह्य मासेन हतमोहकः ॥ २४६ यथाख्यातमवाप्योरुचारित्रं निष्कषायकम् । ध्यायन्द्वितीयशुक्लेन वीचाररहितात्मना ॥ २४७ घातिकर्मत्रयं हत्वा सम्प्राप्तनवकेवलः । स योगस्थानमाक्रम्य वियोगो वीतकल्मषः ॥ २४८ शरीर त्रितया पायादाविष्कृतगुणोत्करः । अनन्तं शान्तमप्राप्तमवाप्तः सुखमुत्तमम् ॥ २४९ तस्य राश्यश्च ताः सर्वा विधाय विविधं तपः । स्वर्गलोके स्वयोग्योरुविमानेष्वभवन्सुराः ॥ २५०
महापुराण
स्त्रियापासून सुखाची प्राप्ति करून घेणे याला पौरुष म्हणावयाचे तर ते पौरुष नसून फार मोठी दीनताच आहे यास्तव आपल्या आत्म्यातच खन्या सुखाचा निश्चय करणारा तोच पुरुष होय व अशा पुरुषत्वाचा मी स्वामी होऊ शकेन ।। २४२ ॥
याप्रमाणे श्रीपालचक्रवर्तीने चिन्तन करून आपल्या बुद्धीतील वक्रता काढून टाकली व आपल्या चक्ररत्नासह सर्वराज्याचा एकदम त्याग करण्याकडे त्याने आपल्या बुद्धीला लाविले || २४३ ॥
यानंतर श्रीपाल राजाने सुखावतीच्या नरपाल नामक पुत्राला राज्याभिषेक करून अतिशय उंच अशा आपल्या आसनावर बसविले ।। २४४ ॥
यानन्तर जयवती आदिक आपल्या राण्या आणि वसुपालादिक अनेक राजे यांच्यासह श्रीपाल चक्रवर्तीने मुनिसंयमाचा स्वीकार केला ।। २४५ ।।
त्या श्रीपाल मुनीश्वराने एक महिनापर्यन्त विधिपूर्वक बाह्यतप व अभ्यन्तरतप केले.. यानन्तर क्षपकश्रेणीवर आरोहण करून सर्व मोहनीय कर्म नष्ट केले. त्यामुळे कषायरहित असे यथाख्यातचारित्र प्राप्त झाले. विचाररहित दुसऱ्या शुक्लध्यानाने ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अन्तराय या तीन घातिकर्माचा नाश केला व त्यामुळे त्याला नऊ केवललब्धींची प्राप्ति झाली. ( अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तदान लाभ- भोग-उपभोग-वीर्य, क्षायिकसम्यक्त्व क्षायिक चारित्र ) यानंतर तेरावे सयोगकेवली गुणस्थानानन्तर योगरहित अशा चौदाव्या अयोगकेवली गुणस्थानात ते आले. यामुळे अघातिकर्मे नाम, गोत्र, वेदनीय व आयु या चार अघातिकर्माचा नाश केला. औदारिकशरीर, कार्मणशरीर व तैजसशरीर या तीन शरीरांचा नाश झाल्यामुळे सर्व आत्म्याच्या गुणांचा समूह प्राप्त झाला व अन्तरहित अविनाशी उत्तम व शान्त असे पूर्वी न प्राप्त झालेले सुख त्यास प्राप्त झाले ।। २४६-२४९ ॥
या श्रीपालचक्रीच्या सर्व राण्यानी नाना प्रकारचे तप केले व त्या स्वर्गलोकातील स्वतःला योग्य अशा मोठ्या विमानात देव झाल्या ।। २५० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org