________________
४७-३८१)
महापुराण
(७०३
कथमपि चरमाडागासङगमाच्छुद्धबुद्धेः । सकलमलविलोपापावितात्मस्वरूपाः ॥ निरुपमसुखसारं चक्रवतिस्तदीयं । पदमचिरतरेण प्राप्नमो नाप्यमन्यैः ॥ ३७८ भवतु सुहृदां मृत्यौ-शोकः शुभाशुभकर्मभिः । भवति हि स चेत्तेषामस्मिन्पुनर्जननावहः ॥ विनिहतभवे प्रायें तस्मिन्स्वयं समुपागते । कथमयमहो धीमान्कुर्याच्छुचं यदि नो रिपुः ॥ ३७९ अष्टापि दुष्टरिपवोऽस्य समूलतूलम् । नष्टा गुणैर्गुरुभिरष्टभिरेष जुष्टः॥ किं नष्टमत्र निधिनाथ जहीहि मोहम् । सन्धेहि शोकविजयाय धियं विशुद्धाम् ॥ ३८० देहच्युतौ यदि गुरोर्गुरुशोचसि त्वम् । तं भस्मसात्कृतिमवाप्य विवृद्धरागाः ॥ प्राग्जन्मनोऽपि परिकर्मकृतोऽस्य कस्मादानन्दनृत्तमधिकं विदधुर्घनाथाः ॥ ३८१
श्रीवृषभसेन गणधर भरताला पुनः असे म्हणाले- हे भरता, या संसाररूपी संकटात या संसारी प्राण्याला इष्टपदार्थाशी व अनिष्ट पदार्थाशी अकस्मात् संयोग होतो व वियोग होतो पण शेवटी वियोगच आहे व सर्व संसारीजीवाला हा नियम लागू पडतो. हे तू सर्व जाणत असूनही कां बरे मनात खिन्नता धारण केली आहेस ? भगवंतानी ज्ञानावरणादिक आठही कर्माचा नाश केला व अनुपम अशा मोक्षसुखाला त्यानी मिळविले आहे. ही आनन्दाची गोष्ट घडली आहे मग तू यात विषाद का मानीत आहेस ? ॥ ३७८ ॥
हे भरतेश्वरा, आपण देखिल सगळे शेवटचे शरीर धारण करणारे आहोत. आपणाला निर्मल बुद्धीची- केवलज्ञानाची प्राप्ति होणार आहे व संपूर्ण कर्ममल नाहीसा होऊन आपणास आत्म्याचे स्वरूप श्रीजिनेन्द्राच्या संगतीमुळे प्राप्त होणार आहे. हे चक्रवतिन्, भगवंताला जे उपमारहित सुखाचे सार प्राप्त झाले आहे ते फार लौकरच आपणासही प्राप्त होणार आहे व हे सुख मंदलोकाना-मूर्खाना प्राप्त होणार नाही ।। ३७९ ॥
हे भरता, आपले जे मित्र असतात त्यांचे मरण झाले असता शोक होणे साहजिक आहे. कारण त्यांचा तो मृत्यु शुभाशुभ कर्मानो झालेला असतो व पुनः या संसारात त्याना
तो मृत्यु कारण होतो म्हणून त्याबद्दल शोक करणे योग्य आहे पण जो मृत्य संसाराचा नाश करणारा असतो अशा मत्यची अर्थात मोक्षाची आपणास प्राप्ति व्हावी म्हणून नेहमी आपण प्रार्थना केली पाहिजे. असा मृत्यु प्राप्त झाला आहे तो त्याना आपण होऊन प्राप्त झाला आहे म्हणून तू बुद्धिमान् आहेस. का शोक करितोस ? अशा उत्सवाच्या प्रसंगी शोक करणे योग्य नाही. जो शत्रु असतो त्याला आपल्या शत्रूला चांगले मरण आलेले सहन होत नाही. आपल्या शत्रूचा उत्कर्ष सहन होत नाही. यास्तव पिताजीना मोक्ष प्राप्त झाल्यामुळे तू शोक करू नकोस. तू हर्ष मान ।। ३८० ।।
हे निधिनाथा भरता, या आदिभगवंताचे आठही ज्ञानावरणादि दुष्ट शत्रु मुळापासून पूर्ण नष्ट झाले आहेत आणि हे प्रभु अनन्तज्ञानादिक जे आठ महागुण त्यानी आता नेहमीच युक्त झाले आहेत. यास्तव त्यांचे यात काहीही नुकसान झाले नाही म्हणून तू मोह सोडून दे व शोकावर विजय मिळविण्यासाठी आपल्याशी निर्मल बुद्धीला जोड ॥ ३८१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org