Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
७०८)
महापुराण
योऽभूत्पञ्चदशो विभुः कुलघृतां तीर्थेशिनां चाग्रिमः । वृष्टो येन मनुष्यजीवनविधिर्मुक्तेश्च मार्गो महान् ॥ बोधो रोधविमुक्तवृत्तिरखिलो यस्योदयाद्यन्तिमः । स श्रीमान् जनकोsखिलावनिपतेराद्यः स दद्याच्छ्रियम् ॥ ४०१ साक्षात्कृत प्रथित सप्तपदार्थसार्थः । सद्धर्मतीर्थपथपालनमूल हेतुः ॥ भव्यात्मनां भवभूतां स्वपदार्थसिद्धि मिक्ष्वाकु वंशवृषभो वृषभो विदध्यात् ॥ ४०२ यो नाभेस्तनयोऽपि विश्वविदुषां पूज्यः स्वयम्भूरिति । त्यक्ताशेषपरिग्रहोऽपि सुधियां स्वामीति यः शब्द्यते ॥ मध्यस्थोऽपि विनेयसत्त्वसमितेरेवोपकारी मतो । निर्दानोऽपि बुधैरुपास्यचरणो यः सोऽस्तु वः शान्तये ॥ ४०३
( ४७-४०१
इत्यार्षे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे प्रथमतीर्थंकरचक्रधरपुराणे सप्तचत्वारिंशत्तमं पर्व परिसमाप्तम् ॥ ४७ ॥
श्रीमदभगवान् हे कुलकरामध्ये १५ वे कुलकर झाले आणि सर्व तीर्थंकरात पहिले तीर्थंकर झाले. यानी मनुष्यांच्या जीवनाचे उपाय पाहिले व लोकाना सांगितले आणि मुक्तीचा महान् मार्ग लोकाना सांगितला. ज्ञानावरणादिकर्मांच्या नाशाने प्रतिबंधरहित असे या प्रभूला शेवटचे ज्ञान - केवलज्ञान उत्पन्न झाले व हे आदिभगवान् सर्व राजांचा स्वामी जो भरत त्याचे लक्ष्मीसंपन्न जनक -पिता होते. ते तुम्हा सर्वांना लक्ष्मीप्रदान करोत ॥। ४०१ ॥
ज्यानी जीवादिक सात पदार्थांचा समूह आपल्या केवलज्ञानाने पाहिला आहे, आत्मकल्याणाचा जो उत्तम जिनधर्मरूपी तीर्थ-मार्ग त्याचे रक्षण करण्यास जे मूलकारण आहेत, भव्य अशा संसारी जीवांना आत्मा व परपुद्गलादिक तत्वे याची सिद्धि करून देणारे जे सम्यग्ज्ञान त्याच्या सिद्धीला त्यानी प्राप्त करून दिले आहे. ते इक्ष्वाकुवंशात श्रेष्ठ असलेले श्रीवृषभनाथ भव्याना परमार्थसिद्धि करून देवोत ॥ ४०२ ॥
जे नाभिराजाचे पुत्र असूनही स्वयम्भू आहेत अर्थात् स्वतःच उत्पन्न झाले आहेत व जगातील सर्व विद्वानाना पूज्य आहेत, प्रभूनी सर्व परिग्रहांचा त्याग केला होता तरीही जे उत्तम बुद्धिवंताचे स्वामी म्हणून म्हटले जात असत, मध्यस्थ- रागद्वेषरहित असूनही जे भव्य शिष्यसमूहावर उपकार करणारे मानले जात असत व दान देणारे नसूनही विद्वान लोक त्यांच्या चरणाची उपासना करीत असत ते आदिभगवान् तुमच्या शान्तिसुखाला कारण होवोत ॥। ४०३ ।।
Jain Education International
याप्रमाणे भगवद्गुणभद्राचार्यांनी रचलेल्या आर्षत्रिषष्टिलक्षण श्रीमहापुराण संग्रहाच्या मराठी भाषानुवादांतील प्रथम तीर्थंकर श्रीवृषभनाथ आणि प्रथम चक्रवर्ती श्रीभरत यांचे वर्णन करणारे हें सत्तेचाळीसावें पर्व समाप्त झाले.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org