Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 718
________________ ४७-४००) महापुराण (७०७ परिचितयतिहंसो धर्मवष्टि निषिञ्चन् । नास कृतनिवेशो निर्मलस्तुङ्गवत्तिः॥ फलमविकलमय्यं भव्यसस्येषु कुर्वन् । व्यहरदखिलदेशान् शारदो वा स मेषः ॥ ३९७ विहृत्य सुचिरं विनेयजनतोपकृत्स्वायुषो । मुहूर्तपरिमास्थितौ विहितसक्रियो विच्युतौ ॥ तनुत्रितयबन्धनस्य गुणसारमूर्तिः स्फुरन् । जगत्रयशिखामणिः सुखनिधिः स्वधाम्नि स्थितः॥३९८ सर्वेऽपि ते वृषभसेनमुनीशमुख्याः । सख्यं गताः सकलजन्तुषु शान्तचित्ताः॥ कालक्रमेण यमशीलगुणाभिपूर्णाः । निर्वाणमापुरमितं गुणिनो गणीन्द्राः ॥ ३९९ यो नेतेव पृथु जघान दुरिताराति चतुःसाधनो । येनाप्तं कनकाश्मनेव विमलं रूपं स्वभाभास्वरम् ॥ आभेजुश्चरणौ सरोजजयिनौ यस्यालिनो वामरास्तं त्रैलोक्यगुरुं पुरुं श्रितवतां श्रेयांसि वः स क्रियात्॥ ___ संयम पाळणारे यतिरूपी हंस ज्याच्या परिचयाचे आहेत, जो धर्मवृष्टि करून आकाशात निवास करीत आहे, जो निर्मल आणि उत्तम स्वभावाचा अर्थात् उच्चस्थानी विराजमान आहे, भव्यरूपी साळीमध्ये मोक्षरूपी पूर्ण व उत्तम फल उत्पन्न करणारा, असा भरतकेवलीजिन शरत्कालच्या मेघाप्रमाणे सर्व देशात विहार करीत असे ॥ ३९७ ॥ दीर्घ कालपर्यंत विहार करून भव्य शिष्यावर उपकार करणाऱ्या त्या भरतकेवलीने जेव्हां अन्तर्मुहूर्त आयुष्य बाकी उरले तेव्हां योगनिरोध केला. त्यामुळे औदारिक, तेजस व कार्मण या तीन शरीरांचे बंधन नाहीसे झाले. सम्यक्त्वादि गुणांचा सार हेच ज्याचे शरीर आहे असा प्रकाशमान, त्रैलोक्याचा चूडामणि व सुखांचा साठा होऊन तो मुक्तिस्थानी विराजमान झाला ।। ३९८ ॥ सर्व प्राणिसमूहात ज्यांची मित्रता आहे व जे शांतचित्ताचे आहेत, वृषभसेन गणधर ज्यात श्रेष्ठ आहेत असे ते सगळे गुणयुक्त श्रेष्ठ गणधर कालक्रमाने महाव्रते, अठरा हजार शील, वगैरे गुणानी सर्वथा पूर्ण झाले व ज्याला अन्त नाही अशा मोक्षाला प्राप्त झाले ।। ३९९॥ ज्यानी सम्यग्दर्शनाराधना, सम्यग्ज्ञानाराधना, सम्यक्चरित्राराधना आणि सम्यक्तपआराधना या चार आराधनारूपी सैन्य घेऊन सेनापतीप्रमाणे महान् पापरूपी शत्रूला ठार मारले. सुवर्णपाषाण, अग्नि आदिक अनेक साधनानी आपले मलिनस्वरूप टाकून शुद्ध व चमकणारे स्वरूप धारण करितो तसे ज्यानी शुद्ध व केवलज्ञानस्वरूप मिळविले आहे. कमळाच्या शोभेला जिंकणारे ज्याचे चरण भुंग्याप्रमाणे सर्व देव आदराने सेवितात. जे त्रैलोक्याचे गुरु आहेत, अशा आदिभगवंतांचा आश्रय घेणान्या म्हणजे त्यानी उपदेशिलेल्या मार्गाने वागणाऱ्या अशा तुम्हा भक्तांची ते सर्व प्रकाराची कल्याणे करोत ॥ ४०० ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 716 717 718 719 720