Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Catalog link: https://jainqq.org/explore/001729/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ श्री शांतिसागर दि. जैन ग्रंथ प्रकाशन समिति, फलटण 1848 श्रीमज्जिनसेनाचार्य विरचित महापुराण ( उत्तरार्ध) ( भाग २ रा) 1G RGENTPare / i अनुवाद पं. जिनदासशास्त्री फडकुले (न्यायतीर्थ महामहिमोपाध्याय, सोलापूर ) प्रकाशक श्री शांतिसागर दि. जैन जिनवाणी जीर्णोद्धार संस्था ( ग्रंथ प्रकाशन समिति ) फलटण, (जि. सातारा-महाराष्ट्र) वीर संवत २५०८ इ. सन १९८२ मूल्य-स्वाध्याय Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ श्री शांतिसागर दि. जैन ग्रंथ प्रकाशन समिति, फलटण वीर संवत २५०८ श्रीमद् जिनसेनाचार्य विरचित महापुराण ( उत्तरार्ध ) ( भाग २ रा ) अनुवादक श्री. पं. जिनदास शास्त्री फडकुले ( भ्यायतीर्थ, महा महिमोपाध्याय, सोलापूर ) प्रकाशक श्री शांतिसागर दि. जैन जिनवाणी जीर्णोद्धार संस्था ( ग्रंथ प्रकाशन समिति ) फलटण, ( जि. सातारा महाराष्ट्र ) मूल्य - स्वाध्याय इ. सन १९८२ Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक प. पू. चा. च. आचार्य १०८ श्री शांतिसागर दि. जैन जिनवाणी जीर्णोद्धार संस्था फलटण प्रथम आवृत्ति प्रति ६०० मुद्रक कुमुदचंद्र फुलचंद शाह मे. सन्मति मुद्रणालय, १६६, शुक्रवार पेठ, सोलापूर - २. Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ श्री १०८ चा. च. आचार्य शांतिसागर दि. जैन जिनवाणी जीर्णोद्धार संस्था संक्षिप्त परिचय या संस्थेचा शुभ संकल्प वि. सं. २००० मध्ये श्री सिद्ध क्षेत्र कुंथलगिरि येथे पर्युषण पर्वाच्या मंगल प्रसंगी झाला. संस्थेची नियमावली व घटना बनविण्यात येऊन सं. २००१ मध्ये बारामती येथे संस्था ट्रस्ट करण्यात आली. ___ संस्थेचा मुख्य उद्देश प्राचीन जैन सिद्धांत ग्रंथांचा जीर्णोद्धार करून जैन साहित्य प्रकाशन करणे व त्याचा प्रचार करणे हा ठेवण्यात आला. धर्मसंस्कृतीचे रक्षण व प्रभावनेचे प्रमुख अंग प्राचीन जैन साहित्य सुरक्षित ठेवणे, त्याचे प्रकाशन करणे, हे जाणून मूडबिद्री येथे मूल जैन सिद्धांत ग्रंथ धवला-जय धवला-महाधवला ताडपत्र ग्रंथ फार जीर्ण अवस्थेत पडले आहेत. त्यांचा जीर्णोद्धार करणे, त्यांचे प्रकाशन करण्याविषयी पूज्य श्री शांतिसागर महाराजांचे अंतःकरणात स्फूर्ति जागृत झाली. त्यावेळी क्षेत्रावर उपस्थित असलेले श्री १०५ भट्टारक जिनसेन मठाधीश, कोल्हापूर, श्री ध. दानवीर संघपति शेठ गेंदनमलजी मुंबई, श्री गुरुभक्त शेठ चंदुलाल ज्योतिचंद शहा सराफ, बारामती, दानवीर श्री रामचंद्र धनजी दावडा नातेपुते, यांचे समोर महाराजानी ग्रंथाचा जीर्णोद्धाराचा प्रश्न ठेवला. ____ आचार्य श्रीच्या आदेशानुसार प्रेरित होऊन सर्वानी त्या कार्याची पूर्ति करण्याचा संकल्प केला. सर्वानी मिळून १ लाख रु. दान देण्याची स्वीकृति दिली. प्राचीन ग्रंथाना ताम्रपत्रावर टंकोत्कीर्ण करून सुरक्षित ठेवण्याचे कार्य श्री १०८ समंतभद्र महाराज यांच्या सूचनेवरून श्री वालचंद देवचंद शहा मुंबई याना संस्थेचे मंत्री बनवून त्यांचेवर सोपविण्यात आले. या ग्रंथाचे संपादन संशोधन प्रकाशन कार्यात जवळ जवळ ३०,००० रु. खर्च आला. तसेच धवला ग्रंथांचे ताम्रपटावर अंकित करण्यात रु. २१०० खर्च आला. या ग्रंथाचे फोटो प्रिंट घेण्यात ११००० खर्च आला. या प्राचीन जिनवाणी जीर्णोद्धार संस्थेचे स्थायी सभासद वर्गणी रु. १००० ठेवली आहे. दानी-उदार सज्जनानी स्थायी सदस्य रूपाने आपले शुभ नांव नोंद करून जिनवाणीची प्रभावना करावी. ___ या संस्थेद्वारा प्रकाशित ग्रंथ विनामूल्य जैन मंदीर-पाठशाळा-त्यागी गण-विद्वान गण याना भेट रूपाने देण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. आतापर्यंत या संस्थाद्वारा खालील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ दातार १) रलकरंड श्रावकाचार २) समयसार ( आत्मख्याति) ३) सर्वार्थसिद्धि मूलाचार ५) उत्तरपुराण ६) अनगार धर्मामृत ७) सागार धर्मामृत ८) धवला ( सूत्रार्थ ) ९) जय धवला ( सूत्रार्थ ) १०) कुंदकुंद भारती श्री. गंगाराम कामचंद फलटण श्री. हिराचंद केवलचंद दोशी फलटण श्री. शिवलाल माणिकचंद कोठारी श्री. गुलाबचंद जीवनचंद गांधी श्री. जीवराज खुशालचंद गांधी श्री. चंदूलाल कस्तूरचंद शहा श्री. पद्मप्पा धरणाप्पा वैद्य निमगाव श्री. हिराचंद तलकचंद बारामती श्री. बाबूराव भरमाप्पा सेनापुरे संस्थेमार्फत ११) अष्ट पार १२) महापुराण भाग १ ( मराठी ) १३) महावीर उपदेश परंपरा १४) श्रावकाचार संग्रह भाग १ हिंदी १५) भाग २ १६) " भाग ३ , " भाग ४ , भाग ५ १९) लघु तत्त्व स्फोट २०) महापुराण भाग २ ( मराठी ) १७) १८) प्रकाशक मंत्री श्री. वा. दे. शहा Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ * स्व. चा. च. आचार्य श्री शांतिसागर महाराज * En Education Intefnational Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ विषयानुक्रमणिका पृष्ठ १०९ पर्व २५ वे पर्व २८ वे ( श्लोक १ ते २९० ) पृष्ठ (श्लोक १ ते २२१) १२ चक्ररत्न व दंडरत्नाचे वर्णन १ भगवान वृषभनाथाची दिव्यध्वनि १३ पूर्व दिशेकडे प्रयाण ११६ ऐकून भरतेश्वराचे नगराकडे प्रयाण १ । १४ लवण समुद्र वर्णन १२८ १५ लवण समुद्रावरून प्रयाण पूर्व दिशेचा २ सौधर्मइंद्राने केलेली भगवंताची स्तुति १४ अधिपति मागधदेव याने चक्रवर्तीचे ३ जिनसहस्रनाम स्तुति स्वागत केले ४ भरतेश्वराची भ. वृषभदेवाला पर्व २९ वे विहार करण्याची विनंती ( श्लोक १ ते १६९) ५ भ. वृषभदेवाचा समवसरण विहार ६९ | १६ दक्षिण दिशेकडे प्रयाण, दक्षिण दिशेचा अधिपति व्यंतरदेवाला वश केले १६५ पर्व २६ वे पर्व ३० वे (श्लोक १ ते १५०) (श्लोक १ ते १२९) ६ भरतेश्वरास चक्ररत्नाची व १७ पश्चिम दिशेकडे प्रयाण १७० पुत्ररत्नाची प्राप्ति ७० १८ पर्वत नद्या वर्णन १७७ १९ पश्चिम समद्रावरून प्रयाण १०० ७ भरतचक्रवर्तीचे दिग्विजयासाठी प्रयाण ८५ २० पश्चिम दिशेचा अधिपति ८ गंगा नदी वर्णन प्रभासदेवाला वश केले १८२ पर्व २७ वे पर्व ३१ वे ( श्लोक १ ते १५९) ( श्लोक १ ते १५२) २१ उत्तर दिशेकडे प्रयाण १८७ ९ सारथीचे गंगानदी व वनशोभा वर्णन ९९ | २२ विजया पर्वताचा अधिपति, विजया देवाकडून स्वागत १० शरद् ऋतूचे वर्णन १०४ १९६ २३ दंडरत्नाने विजया पर्वताच्या ११ चक्रवर्तीच्या सैन्य शिबिराचे वर्णन १०८ ।। गुहा द्वाराचे उद्घाटन २०२ Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ (२) पर्व ३२ वे ( श्लोक १ ते १९९) २४ काकिणी रत्न प्रकाशात गुहाद्वार प्रवेश २०५ २५ स्थपति रत्नाच्या द्वारे उ. मग्नजला व निमग्नजला नदीवरून जाण्यासाठी सेतु (पूल) रचला २०९ २६ उत्तर देशाकडे प्रयाण २७ चिलात व आवर्त राजाबरोबर युद्ध २०९ २८ चर्म रत्नाच्याद्वारे सेनेचे रक्षण २२२ २९ पाच म्लेंछ खंडावर विजय २२६ पर्व ३६ वे ( श्लोक १ ते २१२) पृष्ठ ३९ भरत-बाहुबली युद्ध ४० बाहुबलीचे वैराग्य ३३९ ४१ बाहुबलीस केवलज्ञान व निर्वाण प्राप्ति ३४३ ३२८ २०७ पर्व ३७ वे ( श्लोक १ ते २०५) ४२ भरतचक्रवर्तीचे वैभव वर्णन ३६९ पर्व ३३ वे (श्लोक १ ते २०२) ३० दिग्विजयानंतर अयोध्या नगरीकडे प्रयाण ३१ कैलास पर्वतावर आगमन ३२ समवसरण वर्णन ३३ भगवान् ऋषभदेवाची स्तुति पर्व ३८ वे ( श्लोक १ ते ३१३) ४३ भरतचक्रवर्तीचे इच्छापूर्तिदान । ३७२ ४४ अणुव्रती श्रावकाना ब्रह्मसूत्र देऊन ब्राह्मण संज्ञा दिली ३७५ ४५ गर्भान्वय क्रिया ( षोडश संस्कार ____ नामकर्म-उपनयन आदि संस्कार ) ४०३ २२८ २३५ २४१ २५३ पर्व ३९ वे ( श्लोक १ ते २११) ४६ दीक्षान्वय क्रिया ४७ कर्मन्वयक्रिया ४१३ ४२९ पर्व ३४ वे ( श्लोक १ ते २२३) ३४ अयोध्या नगरीत आगमन ३५ चक्ररत्नाची नगरद्वारामध्ये गति बंद झाली व त्याचे कारण ३६ बाहुबली सोडून इतर बंधूंचे भगवान् वृषभ देवाजवळ दीक्षा ग्रहण ४६० पर्व ३५ वे ( श्लोक १ ते २४९) ३७ बाहुबलीकडे राजदूत पाठविणे ३८ बाहुबलीचे प्रत्युत्तर पर्व ४० वे ( श्लोक १ ते २२३) |' ४८ षोडश संस्कार क्रियामंत्र) २८१ पर्व ४१ वे ( श्लोक १ ते १५८) ४९ भरतचक्रवर्तीचे स्वप्न २९३ देवाजवळ जाऊन स्वप्नफल ३१५ । व त्याचे उत्तर ४६५ ४८०. Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ पर्व ४२ ( श्लोक १ ते २०८ ) वे ५१ राजनीति व वर्णाश्रमधर्म ( आचार्य गुणधर यांची रचना ) पर्व ४४ वे ( श्लोक १ ते ३६७ ) ५४ अर्ककीर्ति व जयकुमारचे युद्ध पृष्ठ पर्व ४३ वे ( श्लोक १ ते ३४० ) ५२ समवसरणात राजा श्रेणिकने गणधरास केलेले प्रश्न व त्यांची उत्तरे ५१७ ५३ जयकुमार सुलोचना चरित्रवर्णन ५५० ५०६ ५९८ ( ३ ) पर्व ४५ वे ( श्लोक १ ते २१९ ) ५५ अकंपनाकडून अर्ककीर्तीचे सांत्वन ५६ जयकुमार-सुलोचना प्रेम भेट ५७ जयकुमार भरतचक्रवर्ती भेट ५८ जयकुमारवरील उपसर्ग ५९ जयकुमारचे हस्तिनापूरला आगमन ६० जयकुमार - सुलोचना सुखोपभोग ६१ अकंपन राजाचे वैराग्य व निर्वाण पर्व ४६ वे ( श्लोक १ ते ३६९ ) ६२ जयकुमार व सुलोचना पूर्वभव वर्णन ६६४ पर्व ४७ वे ( श्लोक १ ते ४०३ ) ६३ श्रीपाल चक्रवर्तीचे वर्णन ६४ श्रीपाल चक्रवर्तीचे दीक्षाग्रहण व निर्वाण पृष्ठ ६०७ ६११ ६१४ ६१८ ६१९ ६२० ६२५ ६८८ ६८८ ६५ जयकुमारचे दीक्षाग्रहण व गणधरपद ६९२ ६६ आदिनाथ भगवंताचा उपदेश निर्वाण ७०० ६७ भरतचक्रवर्तीचे दीक्षाग्रहण व निर्वाण ७०८ Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ ॥श्रीवीतरागाय नमः ॥ श्रीजिनसेनाचार्यविरचित श्रीमहापुराण उत्तरार्ध पंचविसावें पर्व गते भरतराजर्षी दिव्यभाषोपसंहृतौ । निवातस्तिमितं वाधिमिवानाविष्कृतध्वनिम् ॥ १ धर्माम्बुवर्षसंसिक्तजगज्जनवनवुमम् । प्रावृधनमिवोद्वान्तवृष्टिमुत्सृष्टनिःस्वनम् ॥ २ कल्पद्रुममिवाभीष्टफलविश्राणनोद्यतम् । स्वपादाभ्यर्णविधान्तत्रिजगज्जनमूजितम् ॥ ३ . विवस्वन्तमिवोबूतमोहान्धतमसोवयम् । नवकेवललब्धीद्धकरोत्करविराजितम् ॥४ महाकरमिवोद्भूतगणरत्नोच्चयाचितम् । भगवन्तं जगत्कान्तमचिन्त्यानन्तवैभवम् ॥ ५ वृतं श्रमणसङघेन चतुर्षा भेवमीयुषा । चतुर्विधवनाभोगपरिष्कृतमिवाद्रिपम् ॥ ६ प्रातिहार्याष्टकोपेतमिद्धकल्याणपञ्चकम् । चतुस्त्रिशदतीशेषैरिद्धि त्रिजगत्प्रभुम् ॥ ७ प्रपश्यन्विकसनेत्रसहनः प्रीतमानसः । सौधर्मेन्द्रः स्तुति कर्तुमचारेभे समाहितः॥८ वायु बंद झाला म्हणजे समुद्राची गर्जना बंद होऊन तो जसा शांत होतो तसे राजर्षि भरत प्रभूच्या सभेतून आपल्या घरी गेल्यावर प्रभूचा दिव्यध्वनि बंद झाला ॥ १॥ ___ जसे पावसाळ्यातील मेघ वृष्टि करून शब्दरहित होतात तसे आदिभगवंतरूपी मेघाने धर्मजलाने जगातील भव्यजनरूपी वनवृक्षांना स्नान घालून मौन धारण केले ॥ २॥ आदिभगवान् कल्पवृक्षाप्रमाणे भक्तांना इच्छित फल देण्यास उद्युक्त असतात. आपल्या चरणाजवळ येऊन ज्यांनी विश्रान्ति घेतली आहे अशा त्रिलोकातील जनांना ते उन्नत अवस्थेप्रत नेतात. सूर्य जसा अंधकाराची उदयावस्था नाहीशी करतो तसे भगवंतांनी मोहरूपी अंधाराची उत्पत्ति नष्ट केली होती. नऊ प्रकारच्या लब्धिरूपी किरणसमूहानी ते शोभत होते. (परमावगाढसम्यक्त्व, यथाख्यातचारित्र, अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, क्षायिकदान, लाभ, म. १ Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ २) ( २५-९ स्तोष्ये त्वां परमं ज्योतिर्गुणरत्नमहाकरम् । मतिप्रकर्षहीनोऽपि केवलं भक्तिचोदितः ॥ ९ त्वामभिष्टुतां भक्त्या विशिष्टाः फलसंपदः । स्वयमाविर्भवन्तीति निश्चित्य त्वां जिन स्तुवे ॥ १० स्तुतिः पुण्यगुणोत्कीर्तिः स्तोता भव्यः प्रसन्नधीः । निष्ठितार्थो भवान् स्तुत्यः फलं नैःश्रेयसं सुखम् ।। इत्याकलय्य मनसा तुष्टृषं मां फलार्थिनम् । विभो प्रसन्नया दृष्ट्या त्वं पुनीहि सनातन ॥ १२ मामुदाकुरुते भक्तिस्त्वद्गुणैः परिचोदिता । ततः स्तुतिपथे तेऽस्मिन्लग्नः संविग्नमानसः ॥ १३ महापुराण भोग, उपभोग व अनन्तवीर्य या नऊ लब्धि घातिकर्माच्या क्षयामुळे केवलीना प्राप्त होतात ) मोठी खाण जशी रत्नांच्या संचयाने भरलेली असते तसे आदिभगवान् उत्पन्न झालेल्या अनन्तज्ञानादिक गुणरत्नांनी भरलेले होते. आदिभगवान् अचिन्त्य अनंत गुणांच्या वैभवाने युक्त होते व ते जगाचे अधिपति होते. चार प्रकारच्या श्रमणसंघाने ते घेरलेले होते ( मुनि, ऋषि, यति आणि अनगार ). त्यामुळे ते भद्रशाल, सौमनस, नंदनवन व पांडुकवन अशा चार वनानी घेरलेल्या मेरूप्रमाणे भासत होते. अशोकवृक्ष, पुष्पवृष्टि, दिव्यध्वनि, चौसष्ट चामरे, इत्यादि आठ प्रातिहार्यांनी युक्त होते व गर्भ, जन्मादि पंचकल्याणानी ते शोभत होते. तसेच जन्माचे दहा अतिशय, केवलज्ञानाचे दहा अतिशय व देवकृत चौदा अतिशय अशा चौतीस अतिशयांनी प्रभु युक्त होते. त्यामुळे ते त्रैलोक्यपति होते. अशा त्या प्रभूना ज्याचे हजार नेत्र विकसित झाले आहेत व ज्याचे अन्तःकरण आनंदाने भरले आहे अशा सौधर्म इन्द्राने पाहिले व एकाग्रचित्त होऊन त्याने त्यांची स्तुति करण्यास प्रारम्भ केला ॥ ३-८ ॥ हे आदिभगवन्ता, आपण उत्कृष्ट केवलज्ञानरूपी ज्योतीने युक्त आहात व गुणरूपी रत्नांची मोठी खाण आहात. हे नाथ, माझ्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकर्ष झालेला नाही तथापि केवळ मी भक्तीने प्रेरित होऊन आपली स्तुति करणार आहे ॥ ९॥ हे जिनराज, जे भक्तीने आपली स्तुति करतात त्यांना विशिष्ट फळें, विशिष्ट संपदा इन्द्रपद, चक्रवर्तीपद आदिक वैभवे प्राप्त होतात. या संपदा आपण होऊन प्रकट होतात मिळतात असे निश्चयाने समजून मी आपली स्तुति करीत आहे ॥ १० ॥ हे जिनदेवा, पवित्र गुणांचे वर्णन करणे त्याला स्तुति म्हणतात. ती करणारा तो भव्य स्तोता होय. तो प्रसन्न बुद्धीचा होतो. कर्मक्षयरूपी कार्य आपण केले आहे म्हणून आपण स्तुत्य आहात व या स्तुतीचे फल निर्वाण-मोक्ष सुखाची प्राप्ति होणे हें आहे ।। ११ ।। असे मनाने मी जाणतो व फलाची इच्छा करणाऱ्या स्तुति करून फल इच्छिणान्या मला हे प्रभो, अनादिनिधन आपण आहा. मला प्रसन्न दृष्टीने पाहून पवित्र करा ।। १२ ।। आपल्या गुणांनी प्रेरिलेली भक्ति मला स्तुति करण्याच्या कार्यात प्रोत्साहन देत आहे. ऐहिक फलाविषयी मी निःस्पृह होऊन आपल्या स्तुतिमार्गांत प्रवृत्त झालो आहे ।। १३ ।। Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२०) महापुराण त्वयि भक्तिः कृताल्पापि महती फलसम्पदम् । पम्फुलीति विभो कल्पक्ष्माजसेवेव देहिनाम् ॥ तवारिजयमाचष्टे वपुरस्पृष्टकैतवम् । दोषावेशविकारोहि रागिणां भूषणादयः ॥ १५ निर्भूषमपि कान्तं ते वपुर्भुवनभूषणम् । दीप्तं हि भूषणं नैव भूषणान्तरमीक्षते ॥ १६ न मूनि कबरीबन्धो न शेखरपरिग्रहः । न किरीटादिभारस्ते तथापि रुचिरं शिरः ॥ १७ न मुखे भ्रकुटीन्यासो न दष्टो दशनच्छदः । नास्त्रे व्यापारितो हस्तस्तथापि त्वमरीनहन् ॥१८ त्वया नाताम्रिते नेत्रे नीलोत्पलदलायते । मोहारिविजये देव प्रभुशक्तिस्तवाद्भुता ॥ १९ अनपाङ्गावलोकं ते जिनेन्द्र नयनद्वयम् । मदनारिजयं वक्ति व्यक्तं नः सौम्यवीक्षितम् ॥ २० ........... . हे जिनदेवा, तुझ्या ठिकाणी अल्प देखील मी भक्ति केली तरीही ती मोठ्या फलसंपत्तीला वारंवार देते. जशी कल्पवृक्षाची अल्पशी सेवा केली तरीही प्राण्यांना ती मोठे फल देते ।। १४ ।। हे प्रभो, अलंकाराना आपल्या शरीराने स्पर्श केलेला नाही असे आपले शरीर अर्थात् अलंकारादि उपाधीनी रहित आपले शरीर आपण कामादिशत्रूवर विजय मिळविलेला आहे असे आम्हास सांगत आहे. हे देवा, आभूषण-अलंकारादिक पदार्थ रागी लोकांचे दोष प्रकट करणारे विकार आहेत. अर्थात् रागी द्वेषी आदिक मनुष्यच अलंकार आपल्या शरीरावर धारण करून त्याला सजवित असतात. परंतु आपण राग, द्वेष आदिक अन्तरंग शत्रूवर विजय मिळविलेला आहे. म्हणून आपणास भूषणांनी देह सजवावा असे बिलकुल वाटत नाही ॥१५।। ___ सगळ्या जगाला आपले शरीर भूषित करीत आहे असे आपले शरीर अलंकाररहित असूनही सुन्दर आहे. बरोबर आहे की, जो अलंकार अतिशय उज्ज्वल आहे त्याला अन्य अलंकाराची अपेक्षा नसते ॥ १६ ॥ हे प्रभो, आपल्या मस्तकावर सुन्दर केशरचना नाही व आपण मस्तकावर तुराही धारण केला नाही किंवा किरीटादिकांचाही आपण स्वीकार केलेला नाही तथापि आपले मस्तक सुंदर दिसत आहे ।। १७ ।। हे प्रभो, आपल्या मुखावर क्रोध उत्पन्न झाला नाही व क्रोधाने भुवया वर चढल्या नाहीत. आपण दातांनी ओठही चावला नाही किंवा आपला हात शस्त्र घेण्यासाठी तिकडे वळलाही नाही तरीही आपण शत्रूना ठार केले आहे ॥ १८ ॥ हे प्रभो, निळया कमळाच्या पाकळीप्रमाणे दीर्घ असे आपले दोन डोळे मोहशत्रूला जिंकतेवेळी बिलकुल लाल झाले नाहीत. हे देवा, आपल्या ठिकाणी अद्भुत सामर्थ्य आहे असे दिसते ॥ १९ ॥ हे जिनेन्द्रा, आपले दोन डोळे कटाक्ष फेकून पाहत नाहीत व आपल्या डोळ्यांचे जे शान्त अवलोकन आहे ते आम्हाला मदनशत्रु आपण जिंकला आहे असे स्पष्ट सांगत आहेत ॥ २० ॥ Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२५-२१ त्ववृशोरमला दीप्तिरास्पृशन्ती शिरः पुनः । पुनाति पुण्यधारेव जगतामेकपावनी ॥ २१ तवेवमाननं धत्ते प्रफुल्लकमलश्रियम् । स्वकान्तिज्योत्स्नया विश्वमाक्रामच्छरदिन्दुवत् ॥ २२ अनाट्टहासहुङ्कारमदष्टोष्ठपुटं मुखम् । जिनाख्याति सुमेषोभ्यस्तावकों वीतरागताम् ॥ २३ त्वन्मुखादुद्यता दीप्तिः पावनीव सरस्वती । विषन्वती तमो भाति जिन बालातपद्युतिः ॥२४ त्वन्मुखाम्बुरुहालग्ना सुराणां नयनावली । भातीयमलिमालेव तदामोवानुपातिनी ॥ २५ मकरन्दमिवापीय त्वद्वक्त्राब्जोद्गतं वचः । अनाशितभवं भव्यभ्रमरा यान्त्यमी मुदम् ॥ २६ एकतोऽभिमुखोऽपि त्वं लक्ष्यसे विश्वतोमुखः । तपोगुणस्य माहात्म्यमिदं नूनं तवाद्भुतं ॥ २७ विश्वदिक्कं विसर्पन्ति तावका वागभीषवः । तिरश्चामपि हृद्ध्वान्तमुद्धन्वन्तो जिनांशुमन् ॥ हे प्रभो, आमच्या मस्तकाला स्पर्श करणारी व जगाला सर्वथा पावन करणारी, आपल्या दोन डोळ्यांची निर्मल अशी कान्ति पुण्यधारेप्रमाणे आम्हाला पवित्र करीत आहे ।। २१ ॥ शरत् कालांतील चन्द्र जसा आपल्या कान्तियुक्त चांदण्याने सगळ्या जगाला व्यापतो तसे फुललेल्या कमलाच्या शोभेला आपले मुख धारण करीत असून आपल्या कान्तिरूपी चांदण्यानी सर्व जगाला त्याने व्यापून टाकिले आहे ॥ २२ ॥ हे प्रभो, आपल्या मुखातून अट्टाहास व हुंकार कधी बाहेर पडला नाही व आपण आपल्या दातांनी कधी ओठ चावला नाही. असे आपले मुख विद्वज्जनांना आपल्या ठिकाणचा वीतरागपणा सांगत आहे ॥ २३ ॥ हे जिनदेवा, आपल्या मुखापासून उत्पन्न झालेली व सर्व जगाला पावन करणारी जणु ही सरस्वती अज्ञानान्धकाराचा नाश करणारी असल्यामुळे प्रातःकालच्या सूर्यकान्तीप्रमाणे वाटत आहे ॥ २४ ॥ हे प्रभो, आपल्या मुखकमलावर खिळलेली ही देवांच्या डोळ्यांची पंक्ति त्यातील सुगंध सेवन करण्यासाठी आलेली जणु भुंग्यांची पंक्ति आहे असे वाटत आहे ।। २५ ॥ हे प्रभो, आपल्या मुखकमलातून बाहेर पडणारे भाषण जणु मकरन्द आहे व तो हे भव्यजनरूपी भुंगे यथेच्छ पिऊन अतृप्तियुक्त अशा आनन्दाला प्राप्त होत आहेत ।। २६ ॥ हे जिनेश्वरा, आपण एकाच बाजूला तोंड करून बसले असताही चोहीकडे आपणास मुखें आहेत असे आम्हास वाटते. हे खरोखर आपल्या तपोगुणाचे आश्चर्यकारक माहात्म्य आहे ॥ २७ ॥ __ हे जिनसूर्या, तुझे वचनरूपी किरण सर्व दिशाना व्यापीत आहेत आणि पशूच्या देखील हृदयांतील अज्ञानान्धकाराला ते नाहीसा करीत आहेत ॥ २८ ॥ Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-३६) तव वागमृतं पीत्वा वयमद्यामराः स्फुटम् । पीयूषमिदमिष्टं नो देव सर्वरुजाहरम् ॥ २९ जिनेन्द्र तव वक्त्राब्जं प्रक्षरद्वचनामृतम् । भव्यानां प्राणनं भाति धर्मस्यैव निधानकम् ॥ ३० मुखेन्दु मण्डलाद्देव तव वाक्किरणा इमे । विनिर्यान्तो हतध्वान्ताः सभामाह्लादयन्त्यलम् ॥ ३१ चित्रं वाचां विचित्राणामक्रमः प्रभवः प्रभोः । अथवा तीर्थकृत्वस्य देव वैभवमीदृशम् ॥ ३२ अस्वेदमलमाभाति सुगन्धि शुभलक्षणम् । सुसंस्थानमरक्तासृग्वपुर्वज्रस्थिरं तव ॥ ३३ सौरूप्यं नयनाह्लादि सौभाग्यं चित्तरञ्जनम् । सुवाक्त्वं जगदानन्दि तवासाधारणा गुणाः ॥ अमेयमपि ते वीर्यं मितं देहे प्रभान्विते । स्वरूपेऽपि दर्पणे बिम्बं माति स्ताम्बेरमं ननु ॥ ३५ त्वदास्थान स्थितोद्देशं परितः शतयोजनम् । सुलभाशनपानादि त्वन्महिम्नोपजायते ॥ ३६ महापुराण हे जिननाथा, तुझे वचनामृत पिऊन आज खरोखर आम्ही अमर झालो. हे आपले वचनामृत आम्हाला खरोखर फार आवडले आहे आणि सर्व जन्मजरामरणादि रोग नाहीसे करणारे आहे ।। २९॥ हे जिनेन्द्र, ज्यातून वचनामृत स्रवत आहे व जे धर्माचा जणु निधान - खजिना आहे असें आपले मुखकमल भव्यांना जणु जीवनाप्रमाणे आनंदित करणारे आहे ॥ ३० ॥ हे जिनदेवा, आपल्या मुखचन्द्रमण्डलापासून हे वचनरूपी किरण बाहेर पडतात व ते अज्ञानान्धकाराचा नाश करतात. समवसरणसभेतील सर्व प्राण्यांना अतिशय आनन्दित करितात ॥ ३१ ॥ हे जिनदेवा, आपल्या वाणीचा ओघ एकसारखा चालू होतो व त्यात क्रमाने अमुक बोलावयाचे असा संकल्प आधी केलेला नसतो. अर्थात् इच्छापूर्वक बोलणे - उपदेश आपला नसतो. हे प्रभो, आपल्या तीर्थंकरनाम कर्माचे वैभव असे अनिर्वचनीय आहे ।। ३२ ।। आपले शरीर धामरहित आणि मलरहित आहे. ते सुगन्धी व शुभ लक्षणांनी युक्त आहे. ते शरीर चतुरस्रसंस्थानाचे असते. त्याच्या सर्व अवयवांची रचना अतिशय प्रमाणबद्ध असते. हे देवा, हे आपले शरीर तांबड्या रक्ताने रहित व वज्रर्षभनाराच संहनाने युक्त आणि स्थिर - दृढ मजबूत असते ।। ३३ ।। आपले सुंदर रूप डोळयांना आनन्द देणारे असते. आपले सौभाग्य मनास अनुरक्त करणारे असते. आपले उत्तम वक्तृत्व जगाला आनन्दित करणारे असते. हे प्रभो, आपले गुण असाधारण आहेत ॥ ३४ ॥ हे जिननाथा, आपल्या कान्तिसम्पन्न शरीरात अप्रमाण असेही बल-सामर्थ्य मावले आहे. बरोबरच आहे कीं, लहानशा दर्पणात देखील हत्तीचे फार मोठे शरीरप्रतिबिम्ब मावत असतेच की ।। ३५ ॥ जेथे आपले समवसरण आले आहे त्या प्रदेशाच्या सभोवती शंभर योजनात आपल्या माहात्म्याने अन्न-पानादिकांची प्राप्ति अतिशय सुलभतेने होते. अर्थात् दुष्काळ बिलकुल नसतो ।। ३६ ।। Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ ६) ( २५-३७ गगनानुगतं यानं तवासीद्भुवमस्पृशत् । देवासुरभरं सोढुमक्षमा घरणीति नु ॥ ३७ क्रूरैरपि मृगैस्त्रैिर्हन्यन्ते जातु नाङ्गिनः । सद्धर्मदेशनोद्युक्ते त्वयि सज्जीवनौषधौ ॥ ३८ न भुक्तिः क्षीणमोहस्य तवात्यन्तसुखोदयात् । क्षुत्क्लेशबाधितो जन्तुः कवलाहारभुग्भवेत् ॥३९ असद्योदयाद्भुक्ति त्वयि यो योजयेदधीः । सोहानिलप्रतीकारे तस्यान्वेष्यं जरद्धृतम् ॥ ४० असद्वेद्यविषं घातिविध्वंसध्वस्तशक्तिकम् । त्वय्यकिञ्चित्करं मन्त्रशक्त्येवापबलं विषम् ॥ ४१ असद्योदय घातिसहकारिव्यपायतः । त्वय्यकिञ्चित्करो नाथ सामग्रया हि फलोदयः ॥४२ नेतयो नोपसर्गाश्च प्रभवन्ति त्वयीशितः । जगतां पालके हेलाक्षालितांहः कलङ्कके ॥ ४३ त्वय्यनन्तसुखोत्सर्पत्केवलामललोचने । चातुरास्यमिदं युक्तं नष्टघातिचतुष्टये ॥ ४४ महापुराण हे जिनदेवा, आपले गमन पृथ्वीला जमिनीला स्पर्श न करता आकाशांतून होत असते. पृथ्वी देवांच्या व असुरांच्या ओझ्याला सहन न करणारी जणु असते ? ।। ३७ ।। हे प्रभो, आपला सद्धर्माचा उपदेश संजीवनी औषधाप्रमाणे असल्यामुळे क्रूर व हिंसक अशा प्राण्याकडूनही प्राणी कधीहि बिलकुल हिंसिले जात नाहींत ॥ ३८ ॥ आपण मोहकर्माचा नाश पूर्णपणे केल्यामुळे आपणास अत्यन्त अनन्तसुखाची प्राप्ति झाली आहे. म्हणून आपण आहार घेत नाही. बरोबरच आहे कीं, जेव्हा भुकेच्या क्लेशाने प्राणी पीडित होतो त्यावेळी तो अन्नाचे घास खात असतो, आहार घेत असतो ।। ३९ ॥ हे जिनेन्द्रा, असातावेदनीय कर्माच्या उदयामुळे आपण आहार घेता असे जो मूर्ख म्हणतो त्याला मोहरूपी वाताचा झटका आला आहे. त्याचा तो झटका घालविण्यास जुने तूप हे औषध हुडकले पाहिजे. पण असद्वेदनीय कर्मविष घातिकर्माचा नाश झाल्यामुळे शक्तिहीन झाले आहे. असले शक्तिहीन असमर्थ असातावेदनीय हे प्रभो, आपल्या ठिकाणी क्षुधेचे दुःख उत्पन्न करण्यास असमर्थ आहे. जसे मंत्राच्या सामर्थ्याने ज्याचे सामर्थ्य नष्ट झाले आहे असे विष आपले प्राणनाशकार्य करू शकत नाही तसे असातावेदनीय कर्म केवलीच्या ठिकाणी क्षुधा उत्पन्न करू शकत नाही. असे घातिकर्म नष्ट झाल्यामुळे तो असातावेदनीय कर्मांचा उदय प्रभो, आपल्या ठिकाणी क्षुधारूपकार्य उत्पन्न करण्यास असमर्थ आहे. कारणांची सर्व सामग्री मिळाली म्हणजे फल उत्पन्न होते, कार्य उत्पन्न होते ।। ४०-४२ ।। हे ईशा, आपण जगाचे रक्षक आहा व आपण सहजरीतीने पातकरूपी कलंक धुऊन टाकला आहे. म्हणून आपण विहार करीत असता अतिवृष्टि होणे, बिलकुल वृष्टि न होणे वगैरे भीतींची कारणे आणि देवकृत पीडा, मनुष्यकृत पीडा, क्रूरपशुकृत पीडा, वगैरे उपद्रवांचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी निरुपयोगी होते. अर्थात् हे उपसर्गादिक आपण विहार करीत असता बिलकुल होत नाहीत ॥ ४३ ॥ हे प्रभो, आपल्या केवलज्ञानरूपी नेत्राने अनंत रूपे धारण केली आहेत. अर्थात् आपले केवलज्ञान अनंत ज्ञेयांना जाणून चोहोकडे पसरले आहे. तथापि आपली चार घातिकर्मे नष्ट झाल्यामुळे आपणास चातुरास्य- चार मुखे होणे असणे योग्यच आहे ।। ४४ ।। Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-५१) महापुराण सर्वविद्येश्वरो योगी चतुरास्यस्त्वमक्षरः । सर्वतोऽक्षिमयं ज्योतिस्तवातो भास्यधीशितः ॥ ४५ अच्छायत्वमनुन्मेषनिमेषत्वं च ते वपुः । धत्ते तेजोमयं दिव्यं परमौदारिफाह्वयम् ॥ ४६ बिभ्राणोऽप्यध्यधिछत्रमच्छायाङ्गस्त्वमीक्षसे। महतां चेष्टितं चित्रमथवौजस्तवेदशम् ॥ ४७ निमेषापायधीराक्षं तव वक्त्राब्जमीक्षितुम् । त्वय्येव नयनस्पन्दो नूनं देवश्च संहृतः ॥ ४८ नख केशमितावस्था तवाविःकुरुते विभोः । रसादिविलयं देहे विशुद्धस्फटिकामले ॥ ४९ इत्युदारैर्गुणैरेभिस्त्वमनन्यत्रभाविभिः । स्वयमेत्य वृतो नूनमदृष्टशरणान्तरः॥ ५० अप्यमी रूपसौन्दर्यकान्तिदीप्त्यादयो गुणाः । स्पृहणीयाः सुरेन्द्राणां तव हेयाः किलाद्भुतम् ॥ ............. हे प्रभो, आपण सर्व विद्यांचे स्वामी आहात. योगी व चतुर्मुख आहात व अक्षरअविनाशी आहात व आपली आत्ममय केवलज्ञानरूपी ज्योति चोहोकडे पसरली आहे. म्हणून आपण फार शोभत आहात ॥ ४५ ॥ __ हे प्रभो, आपल्या शरीराला परमौदारिक हे नांव आहे व तें दिव्य तेजोमय आहे, तें छायारहित आहे आणि डोळ्यांच्या पापण्याची उघड-झाप त्यात होत नाही. असे शरीर आपण धारण केले आहे ।। ४६ ।। हे प्रभो, आपल्या मस्तकावर छत्र असूनही त्याची सावली आपल्या शरीरावर पडत नाही. म्हणून अच्छायाङ्ग-सावलीरहित शरीराचे आपण आहात. बरोबरच आहे महात्मा पुरुषांचे चरित्र आश्चर्यकारक असते अथवा आपले तेजच त्या प्रकारचे विलक्षण आहे ॥ ४७ ॥ हे जिनराज, पापण्यांची उघड-झाप होत नसल्यामुळे आपले मुख निश्चल डोळ्यांनी फार शोभत आहे. ते पाहण्यासाठीच खरोखर देवांनी आपल्या ठिकाणीच डोळ्यांची उघड-झाप बंद केली असावी असे वाटते ।। ४८॥ हे प्रभो, आपल्या नखांची व केशांची जी परिमित अवस्था आहे तिने निर्मल स्फटिकाप्रमाणे स्वच्छ अशा आपल्या देहात रसरक्तमांसादिक सात धातूंचा अभाव झाला आहे हे व्यक्त केले आहे ॥ ४९ ॥ येथपर्यंत वणिलेले महागुण अन्य ठिकाणी आढळून येत नाहीत. यांना अन्यत्र स्थान न मिळाल्यामुळे ते गुण आपण होऊन आपल्याकडे आले व त्यांनी आपणास वरले आहे, आपला आश्रय घेतला आहे ।। ५० ।। हे जिननाथा, हे रूप, सौंदर्य, कान्ति, तेजस्वीपणा हे गुण सुरेन्द्राना देखील प्रिय असून त्यांना आपण त्याज्य मानीत आहात याचे आम्हाला मोठे आश्चर्य वाटत आहे ॥ ५१ ॥ Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २५-५२ गुणिनस्त्वामुपासीना निर्धूतगुणबन्धनाः । त्वया सारूप्यमायान्ति स्वामिच्छन्दन्तु शिक्षितुम् ॥ अथ मन्दानिलोद्धूतचलच्छारवाकरोत्करः । श्रीमानशोकवृक्षस्ते नृत्यतीवात्तसंमदः ॥ ५३ चलत्क्षीरोदवीचीभिः स्पर्धाङ्कर्तुमिवाभितः । चामरौघाः पतन्ति त्वां मरुद्भिर्लीलया घृताः ॥५४ मुक्तालम्बनविभ्राजि भ्राजते विधुनिर्मलम् । छत्रत्रयं तवोन्भुक्तप्ररोहमिव खाङ्गणे ।। ५५ सिरूढं विभातीवं तव विष्टरमुच्चकैः । रत्नांशुभिर्भवत्स्पर्शान्मुक्तहर्षाङकुरैरिव ॥ ५६ स्वनन्ति मधुरध्वानाः सुरदुन्दुभिकोटयः । घोषयन्त्य इवापूर्य रोदसी त्वज्जयोत्सवम् ॥ ५७ तव दिव्यवन धीरमनुकर्तुमिवोद्यताः । ध्वनन्ति सुरतूर्याणां कोटयोऽर्द्धत्रयोदश ॥ ५८ ॥ सुरैरियं नभोरङ्गात्पौष्पी वृष्टिवितन्यते । तुष्टया स्वर्गलक्ष्म्येव चोदितैः कल्पशाखिभिः ॥ ५९ तव देहप्रभोत्सर्पः समाक्रामन्नभोऽभितः । शश्वत्प्रभातमास्थानीजनानां जनयत्ययम् ॥ ६० ८) महापुराण हे प्रभो, अन्य सर्व गुणरूपी बंधनाचा त्याग करून केवळ आपलीच उपासना करणारे गुणी लोक आपल्यासारखेच रूप प्राप्त करून घेत आहेत व हे योग्यच आहे की, स्वामीलागुरूला अनुसरून चालणे हे शिष्यांचे-सेवकांचे कर्तव्य आहे ।। ५२ । हे जिनदेवा, मंदवान्यांनी हालविल्यामुळे चंचल झालेल्या फांद्यारूपी हातांच्या समूहांनी हा सुंदर अशोकवृक्ष आनंदाने जणु नृत्य करीत आहे असा दिसत आहे ।। ५३ ।। देवांनी लीलेने हातात घेतलेले हे चामरांचे समूह क्षीरसमुद्राच्या चंचल लहरीबरोबर जणु स्पर्धा करण्यासाठी आपणावर चोहोकडून वारले जात आहेत ॥ ५४ ॥ हे भगवंता, मोत्यांच्या झालरींनी शोभणारे व चन्द्राप्रमाणे शुभ्र असे आपले छत्रत्रय आकाशरूपी अंगणात जणु त्याला अंकुर उत्पन्न झाले आहेत असे शोभत आहे ।। ५५ ।। हे जिनराज, सिंहांनी धारण केलेले हे आपले सिंहासन वर पसरलेल्या रत्नांच्या किरणांनी व्याप्त झाल्यामुळे आपल्या स्पर्शाने जणु त्याला हर्षाङकुर फुटले आहेत असे दिसत आहे ॥ ५६ ॥ हे जिननाथा, ज्यांचा अवाज मधुर आहे असे कोट्यवधि देवनगारे तुझ्या जयोत्सवाचा घोष करून जणु आकाश व पृथ्वी यांना भरून टाकीत आहेत असे वाटते ।। ५७ ।। हे जिनप्रभो, देवांची साडेबारा कोटि नगारे आदिक वाद्ये आपल्या गंभीर दिव्यध्वनीचे अनुकरण करण्यासाठी जणु उद्युक्त होऊन वाजत आहेत असे वाटते ।। ५८ ।। आकाशरूपी रंगभूमीपासून देव जी पुष्पवृष्टि करीत आहेत ती आम्हाला अशी वाटत आहे की, जणु आनंदित झालेल्या स्वर्गलक्ष्मीने प्रेरिलेले कल्पवृक्षच ती पुष्पवृष्टि करीत आहेत ।। ५९ ।। हे भगवंता, तुझ्या देहाच्या पसरलेल्या कांतीने सर्व आकाश चोहीकडून व्याप्त झालेले आहे. त्यामुळे आपल्या समवसरणसभेत बसलेल्या लोकांना तो कांतिसमूह नेहमी प्रभातकालची शोभा उत्पन्न करीत आहे असे वाटते ॥ ६० ॥ Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-६७) महापुराण नखांशवस्तवाताम्राः प्रसरन्ति दिशास्वमी । त्वदघ्रिकल्पवृक्षापात्प्ररोहा इव निःसृताः ॥६१ शिरःसु नःस्पृशन्त्येते प्रसादस्येव तेंऽशकाः । त्वत्पादनखशीतांशुकराः प्रह्लादिताखिलाः ॥ ६२ त्वत्पादाम्बुरुहच्छायासरसोमवगाहते । दिव्यश्रीकलहंसीयं नखरोचिर्मणालिकाम् ॥ ६३ मोहारिमर्दनालग्नशोणिताच्छटामिव । तलच्छायामिदं धत्ते त्वत्पादाम्बुरुहद्वयम् ॥ ६४ त्वत्पादनखभानीरसरसि प्रतिविम्बिताः। सुराङगनाननच्छयास्तन्वते पङकजश्रियम् ॥ ६५ स्वयम्भुवे नमस्तुभ्यमुत्पाद्यात्मानमात्मनि । स्वात्मनैव तथोद्भूतवृत्तयेऽचिन्त्यवृत्तये ॥ ६६ नमस्ते जगतां पत्ये लक्ष्मीभत्रे नमोऽस्तु ते । विदांवर नमस्तुभ्यं नमस्ते वदतां वर ॥ ६७ हे जिनप्रभो, आपल्या नखांचे तांबूस असे हे किरण या सर्व दिशात पसरत आहेत व ते आपल्या पायरूपी कल्पवृक्षाच्या अग्रापासून बाहेर पडलेले जणु अंकुर सर्वत्र पसरत आहेत असे वाटते ॥ ६१ ।। हे भगवंता, ज्यांनी सर्वाना आनंदित केले आहे अशी आपल्या पायांची नखे हेच कोणी चन्द्राचे किरण ते जणु आपल्या प्रसन्नतेचे-प्रसादाचे जणु काही अंशच-अंकुरच आहेत असे वाटते, ते आमच्या मस्तकाला स्पर्श करीत आहेत ।। ६२ ।। हे भगवंता, ही दिव्य लक्ष्मीरूपी मनोहर हंसी नखांच्या कान्तिरूपी कमलाचे जे दांडे त्यांनी शोभणारी जी आपल्या चरणकमलाची छायारूपी सरसी (सरोवर) त्यात अवगाहन-प्रवेश करीत आहे ॥ ६३ ॥ हे जिननाथा, आपली दोन चरणकमले ज्या तळव्याच्या कान्तीला धारण करीत आहेत ती कान्ति जणु मोह-शत्रूचे मर्दन करीत असता चिकटलेल्या रक्ताच्या ओलसर छटांना जणु धारण करीत आहे असे वाटते ।। ६४ ॥ आपल्या पायांच्या नखांची जी कान्ति हीच जणु सरोवर आहे व त्यात प्रतिबिम्बित झालेल्या ज्या देवांगनांच्या मुखांच्या छाया या जणु कमलांची शोभा तिला चोहीकडे पसरित आहेत ।। ६५ ॥ हे प्रभो, आपण आपल्या आत्म्यात आपल्याद्वारेच आपणास उत्पन्न केले आहे व अशा रीतीने आपण स्वयंभू झालेले आहात. म्हणून तसे बनलेल्या आपणास अर्थात् स्वयंभूस आमचा नमस्कार असो. आपण स्वयंभू कसे बनला याचे वर्णन आमच्या चिन्तनाच्या बाहेर आहे म्हणून आपणास आमचा नमस्कार असो ॥ ६६ ।। । जगाचा पति असलेल्या आपणास आमचा नमस्कार असो. आपण अन्तरंग अनन्त चतुष्टयरूपी लक्ष्मीचे पति आहात म्हणून आपणास नमस्कार असो. हे विद्वच्छष्ठा, आपणास आमचे वन्दन असो व आपण श्रेष्ठ वक्ते आहात म्हणून आपणास नमस्कार असो ॥ ६७ ॥ म.२ Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ १०) महापुराण (२५-६० कामशत्रुहणं देवमामनन्ति मनीषिणः । त्वामानमत्सुरेण्मौलिभामालाभ्यचितक्रमम् ॥ ६८ ध्यानद्रुघणनिभिन्नघनघातिमहातरुः । अनन्तभवसन्तानजयावासीवनन्तजित् ॥ ६९ त्रैलोक्यनिर्जयावाप्तदुर्दर्पमतिदुर्जयम् । मृत्युराजं विजित्यासीज्जिनमृत्युञ्जयो भवान् ॥ ७० विधुताशेषसंसारबन्धनो भव्यबान्धवः । त्रिपुरारिस्त्वमेवासि जन्ममृत्युजरान्तकृत् ॥ ७१ त्रिकालविषयाशेषतत्त्वभेदात्रिघोत्थितम् । केवलाख्यं दषच्चक्षुस्त्रिनेत्रोऽसि त्वमोशितः ॥ ७२ त्वामन्धकान्तकं प्राहुर्मोहान्धासुरमर्दनात् । अब ते नारयो यस्मादर्धनारीश्वरोऽस्यतः ॥७३ शिवः शिवपदाध्यासादुरितारिहरो हरः । शङकरः कृतशं लोके शम्भवस्त्वं भवन्सुखे ॥७४ हे भगवंता, आपणास विद्वान् लोक कामशत्रूचा नाश करणारा देव आहात असे मानतात. आपण नमस्कार करणान्या देवेन्द्रांच्या किरीटांच्या कान्तिरूपी मालांनी आपले चरण पूजले जातात असे आहात ॥ ६८ ॥ __ध्यानरूपी मोठी धारदार जी कुन्हाड तिने धन-चिवट असा जो घातिकर्मरूपी वृक्ष तो समूळ छेदून टाकला आहे. असे आपले स्वरूप आहे व आपण अनन्त जी संसाराची परम्परा तिचा नाश केल्यामुळे अर्थात् तिला जिंकल्यामुळे आपण अनन्तजित् आहात ।। ६९ ।। सगळ्या त्रैलोक्याला जिंकल्यामुळे ज्याला अतिशय दुष्ट गर्व प्राप्त झालेला जो आहे व त्यामुळे जो जिंकण्यास अतिशय कठिण आहे, अशा मृत्युराजाला जिंकून हे जिनदेवा, आपण खरोखर मृत्युञ्जय झालेले आहात ॥ ७० ॥ . हे प्रभो, आपण संसारात जखडून टाकणारी जी बंधने-मिथ्यात्व, अविरति, प्रमाद, कषाय आदिक ती तोडून टाकली आहेत व आपण रत्नत्रयप्राप्तियोग्य अशा भव्यांचे बंधुहितकर्ते आहात. आपण जन्म, मरण व जरा-वृद्धावस्था यांचा नाश केला म्हणून आपण त्रिपुरारि आहात ॥ ७१ ॥ भूत, भविष्य, वर्तमान या तीन कालांना विषय झालेल्या संपूर्ण जीवादिक तत्त्वांच्या भेदामुळे तीन प्रकाराने प्रकट झालेले जे केवलज्ञान हाच जो डोळा तो हे ईशा आपण धारण केला आहे म्हणून आपण त्रिनेत्र' आहात. तीनही कालाच्या समस्त जीवादिक विषयांना आपला केवलज्ञानरूपी डोळा जाणतो म्हणून आपण त्रिनेत्र आहात ।। ७२ ।। हे प्रभो, मोहरूपी अंधासुराचा आपण नाश केला म्हणून आपणास अन्धकान्तक म्हणतात. व हे प्रभो, अष्ट कर्मशत्रुपैकी अर्धे म्हणजे चार ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अन्तराय हे घातिकर्मरूपी शत्रु आपण नष्ट केले व ईश्वरपणा-त्रैलोक्य स्वामित्व मिळविले म्हणून आपणास अर्ध न-अरि ईश्वर-अर्थात् अर्धनारीश्वर म्हणतात ।। ७३ ।। हे आदिप्रभो, आपण शिवपदात-मोक्षपदात निवास करता म्हणून आपणास शिव म्हणतात. आपण दुरितारि-पापरूपी शत्रूचा नाश केल्यामुळे 'हर' आहात. जगात कृतशं आपण शान्ति उत्पन्न केली म्हणून शंकर आहात व सुखामध्ये उत्पन्न झालेले आहात म्हणून आपण शंभव आहात ।। ७४ ॥ Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-८०) महापुराण (११ वृषभोऽसि जगज्ज्येष्ठः पुरुः पुरुगुणोदयः । नाभेयो नाभिसम्भूतेरिक्ष्वाकुकुलनन्दनः ॥ ७५ त्वमेकः पुरुषस्कन्धस्त्वं वे लोकस्य लोचने । त्वं त्रिधा बुद्धसन्मार्गस्त्रिज्ञस्त्रिज्ञानधारकः ॥ ७६ चतुःशरणमाङ्गल्यमूर्तिस्त्वं चतुरस्रधीः । पञ्चब्रह्ममयो देव पावनस्त्वं पुनीहि माम् ॥ ७७ स्वर्गावतरणे तुभ्यं सद्योजातात्मने नमः । जन्माभिषेकवामाय वामदेव नमोऽस्तु ते ॥ ७८ सुनिष्क्रान्तावघोराय पदं परममीयुषे । केवलज्ञानसंसिद्धावीशानाय नमोऽस्तु ते ॥ ७९ पुरस्तत्पुरुषत्वेन विमुक्तिपदभागिने । नमस्तात्पुरुषावस्थां भाविनी तेऽद्य बिभ्रते ॥ ८० हे प्रभो, आपण जगात सर्वात ज्येष्ठ-श्रेष्ठ आहात म्हणून आपणास 'वृषभ' म्हणतात. आपल्या ठिकाणी उत्तम गुणांचा उदय झाला आहे म्हणून आपणास 'पुरु' म्हणतात, आपण नाभिराजापासून उत्पन्न झालेले आहात म्हणून आपणास 'नाभेय' म्हणतात व इक्ष्वाकुकुलात उत्पन्न झाल्यामुळे आपण इक्ष्वाकुकुलनंदन आहात ॥ ७५ ।। ___आपण सर्व पुरुषात श्रेष्ठ आहात, मुख्य आहात, म्हणून आपण एक आहात. आपण लोकांना दोन डोळयाप्रमाणे आहात म्हणून आपणाला दोन नेत्र म्हणतात. आपण तीन प्रकारचा मोक्षमार्ग जाणला आहे म्हणून आपण त्रिज्ञ आहात. सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान आणि सम्यक्चारित्र यांना मोक्षमार्ग म्हणून जाणता म्हणून आपण 'त्रिज्ञ' आहात. तसेच भूत-भविष्यत् व वर्तमान कालसंबंधी तीन प्रकारचे ज्ञान धारण करीत आहात म्हणूनही आपण त्रिज्ञ आहात. अरहन्त, सिद्ध, साधु आणि केवलज्ञानीनी सांगितलेला धर्म हे चार शरण व मंगल म्हटले जातात. हे प्रभो, आपण या चारांची मूर्ति आहात व आपण चतुरस्रधी अर्थात् चार बाजूच्या चोहोंकडच्या सर्व वस्तूंना जाणता म्हणून चतुरस्रधी आहात व आपण पंच परमेष्ठिस्वरूप आहात म्हणून आपण पंच ब्रह्ममय आहात. हे देवा, आपण पावन-पवित्र आहात म्हणून आपण मला पवित्र करा ॥ ७६-७७ ॥ हे प्रभो, स्वर्गातून अवतरून जेव्हां मातेच्या गर्भात आपण आला त्यावेळी आपणास सद्योजात हे नांव प्राप्त झाले म्हणून आपणास आमचा नमस्कार असो व जेव्हां आपला जन्माभिषेक झाला तेव्हां आपण फारच वाम- सुंदर दिसू लागला. म्हणून आपणास वामदेव हे नांव प्राप्त झाले. म्हणून आपणास नमस्कार असो ॥ ७८ ॥ जेव्हां आपण दीक्षेच्या वेळी घराचा त्याग केला अर्थात् आपण दीक्षा घेतली त्यावेळी आपण अघोरपदाला-शान्तस्वरूपाला प्राप्त झाला. म्हणून आपणास आमचे वंदन असो व केवलज्ञानाची आपणास प्राप्ति झाली तेव्हां आपण ईशान- त्रिलोकाधिपति झाला म्हणून ईशान अशा आपणास नमस्कार असो ।। ७९ ।। यानंतर आपण पुढे शुद्धआत्मस्वरूपाच्या द्वारे मोक्षाला जाल-मुक्तपद धारण कराल तेव्हां आगामी कालाच्या अपेक्षेने आपण होणा-या पुरुषावस्थेला आज धारण केले असे समजून आम्ही 'पुरुषनामधारक' अशा आपणास वंदन करतो ॥ ८० ।। Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२५-८१ ज्ञानावरणनि सान्नमस्तेऽनन्तचक्षुषे । दर्शनावरणोच्छेदान्नमस्ते विश्वदृश्वने ॥ ८१ नमो दर्शनमोहघ्ने क्षायिकामलवृष्टये । नमश्चारित्रमोहघ्ने विरागाय महौजसे ॥ ८२ नमस्तेऽनन्तवीर्याय नमोऽनन्तसुखात्मने । नमस्तेऽनन्तलोकाय लोकालोकावलोकिने ॥ ८३ नमस्तेऽनन्तदानाय नमस्तेऽनन्तलब्धये । नमस्तेऽनन्तभोगाय नमोऽनन्तोपभोगिने ॥ ८४ नमः परमयोगाय नमस्तुभ्यमयोनये । नमः परमभूताय नमस्ते परमर्द्धये ॥ ८५ नमः परमविद्याय नमः परमतच्छिदे । नमः परमतत्त्वाय नमस्ते परमात्मने ॥ ८६ नमः परमरूपाय नमः परमतेजसे । नमः परममार्गाय नमस्ते परमेष्ठिने ॥ ८७ . ज्ञानावरण कर्माचा आपण नाश केला व त्यामुळे आपण अनन्तचक्षु-अनन्तज्ञानी झाला म्हणून आपणास नमस्कार असो व दर्शनावरण कर्माचा आपण नाश केला त्यामुळे आपण विश्वदृश्वा- सर्व जगाला पाहणारे झालेले आहात म्हणून विश्वदृश्वा नामधारक अशा आपणास नमस्कार असो ॥ ८१ ॥ हे आदिभगवंता, आपण दर्शनमोहकर्माचा नाश करून निर्मल क्षायिक सम्यग्दर्शन प्राप्त करून घेतले यास्तव आपणास मी नमस्कार करतो. हे प्रभो, आपण चारित्रमोहाचा नाश करून वीतराग आणि महातेजस्वी झाला म्हणून माझे आपणास वंदन आहे ।। ८२ ॥ हे प्रभो, अनंतवीर्यधारक व अनंतसुखी अशा आपणास माझी वंदना आहे. आपण अनंतज्ञानप्रकाशाने युक्त आहात म्हणून माझे वंदन व लोक आणि अलोकाला आपण पाहता म्हणून मी आपणास वंदितो ।। ८३ ॥ आपण अनंत अभयदान देता म्हणून आपणास वंदन आहे व आपणास अनन्तलाभ प्रतिक्षणी होतो म्हणून आपणास मी नमितो. आपणास अनन्तभोगप्राप्ति झाली म्हणून मी वंदन करतो व अनंत उपभोग पदार्थ प्राप्त होतात. म्हणून मी नमस्कार करतो ॥ ८४ ॥ हे आदिजिनेशा, आपण उत्तम ध्यानी आहात म्हणून आपणास वंदितो आणि आपण अयोनि अर्थात् योनिभ्रमणाने रहित आहा यास्तव आपणास मी वंदन करतो. आपण अत्यन्त पवित्र आहात म्हणून आपणास माझी वंदना व आपण परमऋषि आहात म्हणून आपणास वंदन ।। ८५ ॥ हे प्रभो, आपणास उत्कृष्ट विद्या-केवलज्ञान प्राप्त झाले आहे म्हणून आपणास वंदना, आपण अन्य एकान्तवादी मतांचे खंडन केले आहे यास्तव आपणास नमन करतो. हे प्रभो, आपण उत्कृष्ट शुद्ध जीवतत्व आहात व आपण परमात्मा आहात म्हणून आपणास नमस्कार ॥८६॥ हे प्रभो, आपण उत्तमरूप धारक आहा, परमतेजस्वी आहा, उत्तम मोक्षाची प्राप्ति करून देणारे जे रत्नत्रय हाच उत्तममार्ग तेच रत्नत्रय आपले स्वरूप आहे व आपण परमेष्ठिस्वरूप आहात. म्हणून आपणास मी नमस्कार करतो ।। ८७ ।। Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-९५) महापुराण (१३ परमं भेजुषे धाम परमज्योतिषे नमः । नमः पारेतमःप्राप्तधाम्ने परतरात्मने ॥८८ नमः क्षीणकलडकाय क्षीणबन्ध नमोऽस्तु ते । नमस्ते क्षीणमोहाय क्षीणदोषास्तु ते नमः ॥८९ नमः सुगतये तुभ्यं शोभनां गतिमीयुषे । नमस्तेऽतीन्द्रियज्ञानसुखायानिन्द्रियात्मने ॥ ९० कायबन्धननिर्मोक्षादकायाय नमोऽस्तु ते । नमस्तुभ्यमयोगाय योगिनामधियोगिने ॥ ९१ अवेदाय नमस्तुभ्यमकषायाय ते नमः । नमः परमयोगीन्द्रवन्दिताङघ्रिद्वयाय ते ॥ ९२ नमः परमविज्ञान, नमः परमसंयम । नमः परमदृग्दृष्टपरमार्थाय तायिने ॥ ९३ नमस्तुभ्यमलेश्याय शुद्धलेश्यांशकस्पृशे । नमो भव्यतरावस्थाव्यतीताय विमोक्षिणे ॥ ९४ संज्ञयसंज्ञिद्वयावस्थाव्यतिरिक्तामलात्मने । नमस्ते वीतसंज्ञाय नमः क्षायिकदृष्टये ॥ ९५ हे प्रभो, आपण उत्कृष्टधाम अर्थात् मुक्तिस्थानाला सेवन करणारे आहात व आपण परमज्योतिःस्वरूप आहात. आपले ज्ञानरूपी तेज अंधकाराच्या पलीकडे आहे व आपण उत्कृष्ट आत्मस्वरूपाचे धारक आहात. यास्तव आपणास मी नमस्कार करतो ।। ८८ ॥ हे प्रभो, आपला कर्मकलंक सर्व नाश पावला आहे. म्हणून आपणास नमस्कार. आपले कर्मबंधन क्षीण झाले आहे. म्हणून आपणास नमन असो. आपले मोहकर्म सर्व क्षीण-नष्ट झाले आहे व आपण क्षुधातृषादि अठरा दोषांचा नाश केला आहे म्हणून आपणास नमन असो ।।८९।। हे प्रभो, आपण मुक्तिरूपी उत्तम गतीला प्राप्त करून घेणार आहात. म्हणून सुगतियुक्त अशा आपणास नमस्कार असो. आपले ज्ञान व सुख अतीन्द्रिय आहे व आपला आत्मा अतीन्द्रिय आहे. म्हणून आपणास नमस्कार ॥ ९० ॥ आपले शरीररूपी बन्धन नष्ट झाल्यामुळे आपण अकाय आहात. म्हणून आपणास नमस्कार असो. हे प्रभो, आपण अयोग-योगरहित आहात व योगि-मुनिजनात श्रेष्ठ योगी आहात. म्हणून आपणास वंदन ॥ ९१ __ आपण वेदरहित-स्त्रीवेदादिरहित व अकषाय-कषायरहित आहा. म्हणून आपणास नमस्कार. महायोगीश्वराकडून आपले दोन पाय वंदिले जातात. म्हणून आपणास नमस्कार ॥ ९२॥ उत्कृष्ट ज्ञानसंपन्न अशा आपणास नमस्कार. उत्कृष्ट यथाख्यातचारित्रसंपन्न अशा आपणास नमस्कार. हे भगवन् उत्कृष्ट दर्शनाने केवलदर्शनाने परमार्थाला आपण पाहिले आहे व आपण तायी - सर्वांचे रक्षक आहात ।। ९३ ।। हे भगवंता आपण लेश्यारहित पण आपण शुद्ध लेश्येच्या अंशाना स्पर्श करणारे आहात. हे प्रभो आपण भव्य व अभव्य या दोन्ही अवस्थांनी रहित आहा व मोक्षाने युक्त आहात म्हणून आपणास नमन आहे ।। ९४ ।। हे प्रभो, आपण संज्ञी व असंज्ञी या दोन्ही अवस्थांनी रहित व निर्मल आत्मा आहात म्हणून आपणास नमस्कार. आपण संज्ञारहित आहा व क्षायिक सम्यग्दर्शनयुक्त आहात. म्हणून आपणास नमस्कार मी करतो ।। ९५ ॥ Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ १४) महापुराण (२५-९६ अनाहाराय तप्ताय नमः परमभाजुषे । व्यतीताशेषदोषाय भवाग्धेः पारमीयुषे ॥ ९६ अजराय नमस्तुभ्यं नमस्ते स्तादजन्मने । अमृत्यवे नमस्तुभ्यमचलायाक्षरात्मने ॥९७ अलमास्तां गुणस्तोत्रमनन्तास्तावका गुणाः । त्वां नामस्मृतिमात्रेण पर्युपासिसिषाम्यहम् ॥९८ प्रसिद्धाष्टसहस्रद्धलक्षणं त्वां गिरां पतिम् । नाम्नामष्टसहस्रेण तोष्टुमोऽभीष्टसिद्धये ॥ ९९ श्रीमान् स्वयम्भूर्वृषभः शम्भवः शम्भुरास्मभूः । स्वयम्प्रभः प्रभुर्भोक्ता विश्वभूरपुनर्भवः॥१०० विश्वात्मा विश्वलोकेशो विश्वतश्चक्षुरक्षरः । विश्वविद्विश्वविद्यशो विश्वयोनिरनश्वरः॥१०१ आपण आहाररहित असूनही तृप्त आहात व उत्तम कान्तीने सेविलेले आहात. म्हणून आपणास नमस्कार मी करतो. आपण संपूर्ण दोषांनी रहित आहात व संसारसमुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याला पोहोचलेले आहात. म्हणून आपणास नमस्कार असो ।। ९६ ।। हे प्रभो, आपण अजर वृद्धावस्थेनें रहित आहा म्हणून आपणास नमस्कार. आपण जन्मरहित आहात म्हणून नमस्कार व मृत्युरहित असल्यामुळे नमस्कार. आपण कालत्रयीही निश्चल व अविनाशी आहात म्हणून आपणास नमस्कार आहे ॥ ९७ ॥ हे भगवंता, तुझ्या गुणांची स्तुति करणे पुरे. कारण तुझे गुण अनन्त आहेत. आता फक्त आम्ही तुझ्या नांवाचे स्मरण करूनच तुझी उपासना करण्याची इच्छा करीत आहेत ॥९८।। हे प्रभो, आपली तेजस्वी एक हजार आठ लक्षणे अतिशय प्रसिद्ध आहेत व आपण सर्व वचनांचे स्वामी आहात. आमच्या इष्टसिद्धिसाठी आम्ही आपली एक हजार आठ नांवानी स्तुति करतो ॥ ९९ ।। श्रीमान्-पुण्यवान् पुरुषांचा जी आश्रय करिते ती श्री होय. अर्थात् संपत्तीला श्री म्हणतात. ती श्री अंतरंग श्री व बहिरंग श्री अशी दोन प्रकारची आहे. अंतरंगश्री-केवलज्ञान, केवलदर्शन, अनन्तसुख व अनन्तशक्ति जिला अनन्त चतुष्टय म्हणतात. बहिरंग श्री समवसरण व अशोकवृक्षादि आठ प्रातिहार्ये. या दोन श्रीनी आपला आश्रय घेतला आहे. म्हणून आपण श्रीमान् आहात ॥१॥ स्वयम्भू- आपण स्वतःच उत्पन्न झालेले आहात. अर्थात् गुरूच्या उपदेशावाचून आपण देह, भोग व संसार यापासून स्वतःच विरक्त झालेले आहात ।। २ ।। वृषभ- वृष-धर्म त्याने आपण शोभता म्हणून आपण वृषभ आहात. अहिंसास्वरूप धर्माने आपण शोभता म्हणून वृषभ ।। ३ ।। शम्भव- आपणास अनन्त सुखाची प्राप्ति झाली आहे म्हणून आपण शम्भव आहात. आपणापासून असंख्य जीवांना सुखाची प्राप्ति होते म्हणून आपण शंभव आहात किंवा सं-उत्तम लोककल्याणासाठी भव आपला जन्म आहे ॥ ४ ।। शम्भु- परमानन्दरूप सुखाची प्राप्ति आपण भव्य जीवांना करून देता म्हणून आपण शम्भु आहात ॥ ५॥ आत्मभू- आपण आपल्याद्वारेच उत्कृष्ट अवस्था प्राप्त करून घेतली आहे. अथवा योगिराज आपल्यामध्ये आपला साक्षात्कार आपल्याद्वारे करून घेतात म्हणून आपण आत्मभू आहात ॥६॥ स्वयम्प्रभ- आपण आपल्याद्वारेच स्वतःला प्रकाशमान करता म्हणून आपण स्वयम्प्रभ आहात ॥ ७॥ प्रभु- आपण समर्थ अथवा सर्वांचे प्रभु आहात ।। ८ ।। Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१०२) महापुराण विश्वदृश्वा विभुर्धाता विश्वेशो विश्वलोचनः । विश्वव्यापी विषिर्वेधाः शाश्वतो विश्वतोमुखः॥ भोक्ता- आपण अनन्तसुखाचा नेहमी उपभोग घेता म्हणून भोक्ता ।। ९॥ विश्वभू-केवलज्ञानाने सर्व जगाला व्याप्त केले आहे म्हणून विश्वभू किंवा ध्यानादिकाच्याद्वारे सर्व ठिकाणी आपण योग्यांना प्रकट होता ॥ १० ॥ __ अपुनर्भव- आपण आता पुनः येऊन जन्म धारण करणार नाहीत म्हणून अपुनर्भव आहात ।। ११॥ विश्वात्मा- विश्वांत जगांत असलेल्या सर्व प्राणिसमूहाला विश्व म्हणतात. अर्थात सर्व प्राणी ज्याला आपल्या आत्म्यासारखे वाटतात तो जिनेश्वर विश्वात्मा होय. जसे आठव्यात असलेल्या धान्याला आठवा म्हणतात तसे विश्वात असलेल्या प्राण्यांना विश्व येथे म्हटले आहे. ते योग्यच आहे अथवा विश्व म्हणजे केवलज्ञान ते आत्मा स्वरूप ज्याचे आहे तो जिनेश्वर विश्वात्मा होय ॥ १२ ॥ विश्वलोकेश- जिनेश्वर त्रैलोक्यात असलेल्या सर्व प्राण्याचे प्रभु आहेत ॥ १३ ॥ विश्वतश्चक्षु- सगळ्या जगात ज्याचा केवलदर्शनरूपी चक्षु आहे डोळा आहे- तो जिनेश्वर विश्वचक्षु होय ॥ १४ ॥ केवलदर्शनरूपी डोळ्याने सर्व जगाला पाहणारे जिनेश्वर विश्वचक्षु आहेत ।। १५ ।। अक्षर- जो क्षरण पावत नाही-नाश पावत नाही तो अक्षर होय. अथवा अक्ष म्हणजे इन्द्रिये, त्याना राति म्हणजे मनासह वश करणारे जिनेश्वर आहेत म्हणून त्याना अक्षर म्हणावे ।। १६ ॥ विश्ववित्जीवादि सहा द्रव्यानी भरलेल्या जगाला जाणणारे जिनेश्वर विश्ववित् आहेत ।। १७ ॥ विश्वविद्येश- केवलज्ञानाला विश्वविद्या म्हणतात. अशा विद्येचे आदिप्रभु ईश- स्वामी आहेत. अथवा श्रुतज्ञानाला विश्वविद्या म्हणतात. तिला जाणणारे जे श्रुतकेवली व गणधरकेवली त्याचे प्रभु आदिजिन ईश-स्वामी आहेत. अथवा विश्वविद्या म्हणजे जैनमतसिद्धान्त व इतर मतांचे सिद्धान्त त्याना विश्वविद्या म्हणतात. त्याचे भगवान् ईश स्वामी आहेत ॥१८॥ विश्वयोनि- सर्व पदार्थांचे उत्पत्तिस्थान किंवा कारण जो आहे तो ॥ १९ ।। अनश्वर- केन्हाही नाश न पावणारा ॥ २० ॥ विश्वदृश्वा आदिभगवंतानी आपल्या ज्ञानरूपी डोळ्याने जगाला पाहिले म्हणून ते विश्वदृश्वा आहेत ॥ २१ ॥ विभु:- विशेषरीतीने मंगल करणारा, जनतेला समृद्ध करणारा, समवसरणसभेत प्रभुत्वाने वास करणारा, केवलज्ञानाने चराचर जाणणारा, जगाला संपत्ति देणारा, वैराग्य झाल्यावर जगाला मी तारीन असा अभिप्राय मनात धारण करणारा, जगताला तारण्यासाठी उत्पन्न झालेला व एका समयात सर्व जगाला जाणणारा तो विभु होय ॥ २२ ॥ धाता-चतुर्गतीत पडलेल्या जीवाला वर काढून मोक्षस्थानी स्थापन करणारा अथवा दयाळूपणाने सूक्ष्म, बादर पर्याप्त, अपर्याप्त, एकेन्द्रिय जीवापासून पंचेन्द्रिय जीवापर्यन्त सर्व जंतूंचे रक्षण करणारा ॥ २३ ॥ विश्वेश:- त्रैलोक्याचा स्वामी ॥ २४ ॥ विश्वलोचनः-सर्व त्रैलोक्यातील प्राण्याना सुखाचा मार्ग दाखविणारा असल्यामुळे डोळयासारखा असलेला ॥ २५ ॥ विश्वव्यापी- केवलज्ञानाने लोकालोकास व्यापणारा अथवा लोकपूरण समुद्धात जेव्हा होतो त्यावेळी प्रभूच्या आत्म्याचे प्रदेश सर्व जगताला व्यापतात. यास्तव या दृष्टीनेही प्रभूचे विश्वव्यापितत्व आहे ॥ २६ ॥ विधि- निर्दोष मोक्षमार्गाची रचना आपण Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ १६) महापुराण (२५-१०३ विश्वकर्मा जगज्ज्येष्ठो विश्वमूतिजिनेश्वरः। विश्वदृग्विश्वभूतेशो विश्वज्योतिरनीश्वर ॥ १०३ जिनो जिष्णुरमेयात्मा विश्वरीशो जगत्पतिः। अनतजिदचिन्त्यात्मा भव्यबन्धुरबन्धन ॥१०४ केली म्हणून आपण विधि आहात ॥ २७ ॥ वेधा- धर्मसृष्टि उत्पन्न केली म्हणून प्रभु वेधा आहेत ॥ २८ ॥ शाश्वत- निरंतर असणारा ॥ २९ ॥ विश्वतोमुख- विश्वत: चारीही दिशांत मुख धारण करणारे. केवलज्ञानयुक्त भगवंताला सर्व जीव आपआपल्या समुख पाहतात असा या शब्दाचा भाव आहे. अत्यंत निर्मलता असल्यामुळे भगवान् चार मुखाचे वाटतात. अथवा विश्वतोमुख पाण्याला म्हणतात. त्याचा मल नाहीसा करण्याचा स्वभाव आहे. तोच स्वभाव भगवंताचाही आहे. कारण ते असंख्य जन्माच्या पातकाचे क्षालन करतात. विषयसुखाची तहान नाहीशी करतात व त्याचा भाव अतिशय प्रसन्न-निर्मल असतो. अथवा विश्व-संसार त्याचा तस्यति-नाश करणारे मुख भगवंताचे आहे. भगवंताच्या मुखदर्शनाने जीव पुनः संसारात उत्पन्न होत नाहीत. विश्वकर्मा- सर्व कर्मे कष्टदायक आहेत असे मत ज्यांचे आहे असे प्रभु विश्वकर्मा म्हटले गेले आहेत. अथवा विश्व-देवविशेष ज्याची सेवा करितात असे प्रभु विश्वकर्मा आहेत. अथवा असि, मषि, कृषि आदिक सहा कर्मानी उपजीविका करावी असे प्रजेला प्रभूनी राज्य पालन करीत असता सांगितले होते म्हणून ते विश्वकर्मा होत ॥ ३० ।। जगज्ज्येष्ठ- त्रैलोक्यात असलेल्या प्राण्यात प्रभु सर्वश्रेष्ठ आहेत, महान् आहेत व ज्येष्ठ आहेत ॥ ३१॥ विश्वमूर्ति- सर्व विश्व-जगत् ज्याच्या मूर्तीमध्ये-शरीरात आहे असा अथवा सर्व जगताची आकृति ज्यांच्या ज्ञानात झळकत आहे असे प्रभु विश्वमूर्ति होत ॥ ३२॥ जिनेश्वर:- भयंकर भवरूपी वनात अतिशय संकट उत्पन्न करणा-या कर्मशत्रूना जो जिकतो, जो त्यांचा क्षय करतो तो जिन होय. एकदेशाने किंवा पूर्णपणे कर्मशत्रूना ज्यांनी जिंकिले आहे ते जिन होत. सम्यग्दृष्टि, श्रावक, प्रमत्तसंयत, अप्रमत्त, अपूर्वकरण अनिवृत्तिकरण, सूक्ष्मसाम्पराय, उपशान्तकषाय व क्षीणकषाय अशा गुणस्थानातले जे जीव त्यांना जिन म्हणतात. अशा जिनांचे प्रभु स्वामी आहेत. म्हणून त्यांना जिनेश्वर म्हणावे ।। ३३ ॥ विश्वदृक्- सर्वविश्वाला पाहणारे प्रभु विश्वदृक् होत ।। ३४ ॥ विश्वभूतेश- सर्वभूतांचाप्राणिमात्रांचा ईश स्वामी अथवा संपूर्ण भूतांचा व्यन्तरविशेषांचा स्वामी असे प्रभु आहेत अथवा विश्वभूः म्हणजे त्रैलोक्य व त्याची ता म्हणजे लक्ष्मी तिचे जिनेश्वर ईश आहेत, स्वामी आहेत ।। ३५ ॥ विश्वज्योति- सर्व लोकात व अलोकात केवलज्ञानरूपी ज्योति-डोळा ज्यांचा पसरला आहे असे जिनेश्वर ।। ३६ ॥ अनीश्वर- ज्यांच्याहून दुसरा ईश्वर नाही असे जिनेश्वर ते अनीश्वर होत. हे प्रभो आपला कोणी स्वामी नाही, आपण सर्वाचे स्वामी आहात ॥ ३७॥ जिनप्रभूनी कर्मरिपूंना जिंकले अर्थात् कामक्रोधादिदोषांना जिंकून अनन्ताज्ञानादि गुणांनी युक्त झाले ते जिन ॥ ३८॥ जिष्णु- प्रभु जयति म्हणजे सर्वोत्कर्षयुक्त आहेत म्हणून ते जिष्णु होत ॥ ३९ ॥ अमेयात्मा- अमर्याद व लोकालोकाला व्यापणारा आत्मा ज्याचा अशा जिनाला अमेयात्मा म्हणतात ॥ ४० ॥ विश्वरीश- विश्वरी-पृथ्वी तिचा स्वामी अर्थात् Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ २५- १०६ ) युगादिपुरुषो ब्रह्मा पञ्चब्रह्ममयः शिवः । परः परतरः सूक्ष्मः परमेष्ठी सनातनः ॥ १०५ स्वयंज्योतिरजोऽजन्मा ब्रह्मयोनिरयोनिजः । मोहारिविजयी जेता धर्मचक्री दयाध्वजः ॥ १०६ लोकत्रयपति ।। ४१ ।। जगत्पति- त्रैलोक्याचे स्वामी || ४२ || अनन्तजित् - ज्याला अन्त नाही अशा संसाराला प्रभूंनी जिंकले म्हणून अनन्तजित् अथवा अनन्त - अलोकाकाशाला जित्-प्रभूनी जिंकले -केवलज्ञानाने ज्यानी अलोकाकाशाच्या पाराला जिंकले अथवा अनन्त-विष्णूला व शेषनागाला प्रभूनी जिंकले म्हणून ते अनन्तजित्. मोक्षाला अनन्त म्हणतात. त्याला प्रभूनी जिंकले, त्याची प्राप्ति करून घेतली ।। ४३ ।। अचिन्त्यात्मा - वचन आणि मनाला प्रभूचे स्वरूप-आत्मा विषय होत नाही. म्हणून ते अचिन्त्यस्वरूपाचे आहेत ॥ ४४ ॥ भव्यबन्धु - भव्यरत्नत्रयाला योग्य असलेल्या जीवावर बंधु-उपकार करणारे प्रभु आहेत ।। ४५ ।। अबन्धन - प्रभूना कर्मबंधन नसल्यामुळे ते अबन्धन आहेत. अथवा मोह, ज्ञानावरण दर्शनावरण, आणि अन्तराय या कर्मबंधनांनी रहित प्रभु अबन्धन आहेत ।। ४६ ।। महापुराण युगादिपुरुष - युगाच्या आरंभी असलेला पुरुष ।। ४७ ।। ब्रह्मा - केवलज्ञानादिक गुण ज्याच्या ठिकाणी पूर्ण वाढले आहेत असा ॥ ४८ ॥ पञ्चब्रह्ममय - मति, श्रुत, अवधि, मन:पर्यय व केवलज्ञान या पाच ज्ञानानी परिपूर्ण असलेला. केवलज्ञानात मत्यादिक चार ज्ञाने अन्तर्भूत करून पंचब्रह्ममय भगवान् आहेत. अथवा अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय व साघु या पंचपरमेष्ठींच्या गुणानी युक्त असल्यामुळे आदिभगवान् पंचब्रह्ममय आहेत ।। ४९ ।। शिव- परमानन्दाचे स्थान अशा मोक्षात निवास करणारा ॥ ५० ॥ पर- जो लोकाना रक्षितो, गुणानी पूर्ण करतो व मुक्तिपदात स्थापन करितो तो पर होय ॥ ५१ ॥ परतर- पर असे जे सिद्ध परमेष्ठी त्यापेक्षाही धर्माचा उपदेश देण्याने श्रेष्ठ असलेला ।। ५२ ।। सूक्ष्म- ज्याचे स्वरूप केवलज्ञानाने जाणता येते असा ।। ५३ ।। परमेष्ठी - इन्द्र, धरणेन्द्रादिकांना वन्द्य अशा पदात असणारा ॥ ५४ ॥ सनातन - नेहमी आपल्या शुद्धस्वरूपात विराजमान झालेला ।। ५५ । ( १७ स्वयंज्योति - भगवंताचा आत्माच चक्षुः नेत्र स्वरूपाचा आहे. सर्व पदार्थाना प्रकाशित करतो म्हणून तो सूर्य स्वरूपाचा आहे ।। ५६ ।। अज - चतुर्गतीमध्ये आता तो उत्पन्न होणार नाही म्हणून अज आहे ॥ ५७ ॥ अजन्मा - ज्याचा आता गर्भात कधीही वास होणार नाही ।। ५८ ।। ब्रह्मयोनि - भगवान् ब्रह्माचे म्हणजे तपाचे, ज्ञानाचे आत्म्याचे, चारित्राचे व मोक्षाचे उत्पत्तिस्थान आहेत. म्हणून त्याना ब्रह्मयोनि म्हणतात ।। ५९ ।। अयोनिज - भगवान् पंचम गतिरूप मोक्षात उत्पन्न होतात व ती पंचमगति आत्म्याचे अत्यंत शुद्ध स्वरूप आहे. म्हणून ते अयोनिज होत ॥ ६० ।। मोहारि - मोहनीयकर्माचा भगवान् शत्रु आहेत. म्हणून त्याना मोहारि हे नांव आहे ।। ६१ ।। विजयी - भगवंतानीं मोहादिकर्माना जिंकून विशिष्ट जय मिळविला व त्या विजयाने त्यानी मुक्तिपुरीत प्रवेश केला ।। ६२ ।। जेता - सर्वापेक्षा उत्कर्षाने अधिक असणे हा प्रभूंचा स्वभावच आहे. म्हणून ते यथार्थ जेता आहेत ।। ६३ ।। धर्मचक्री - जेव्हां म. ३ Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ १८) महापुराण (२५-१०७ प्रशान्तारिरनन्तात्मा योगी योगीश्वराचितः । ब्रह्मविद्ब्रह्मतत्त्वज्ञो ब्रह्मोद्याविद्यतीश्वरः ।। १०७ शुद्धो बुद्धः प्रबुद्धात्मा सिद्धार्थः सिद्धशासनः। सिद्धसिद्धान्तविद्ध्येयःसिद्धसाध्यो जगद्धितः ॥१०८ भगवान् पृथ्वीवर असलेल्या भव्यजीवाना उपदेश करण्याकरिता विहार करतात तेव्हां प्रभूचे धर्मचक्र भव्यांच्या सेनेच्या पुढे आकाशातून जात असते. म्हणून प्रभु धर्मचक्री आहेत ।। ६४ ।। दयाध्वज- दया ही प्रभूची ध्वजा आहे. अथवा दयेच्या मार्गात प्रभु योग्याना प्रत्यक्ष होतात म्हणून ते दयाध्वज आहेत ॥ ६५ ।। प्रशान्तारि- ज्यांचे कर्म शत्रु उपशान्त झाले, नाश पावले असे प्रभु प्रशान्तारि होत ॥६६॥ अनन्तात्मा- अनन्त अशा केवलज्ञानाने युक्त असा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु अनन्तात्मा या नावाने संबोधले जातात ॥६७॥ योगी- आपल्या आत्मस्वरूपाकडे आपल्या मनाला प्रभूनी एकाग्र केले. म्हणून ते योगी आहेत. अथवा तत्त्वज्ञानाकडे आपल्या मनाचा उपयोग ज्यानी लावला आहे असे प्रभु योगी होत ।। ६८॥ योगीश्वराचित- यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधि हे आठ योग ज्याना आहेत ते योगी होत. त्यांचे ईश्वर जे स्वामी गणधरदेवादिक त्यानी ज्याची पूजा केली आहे असे भगवान् योगीश्वराचित--पूजित आहेत ।। ६९ ॥ ब्रह्मवित्- ब्रह्म-आत्मा त्याच्या स्वरूपाला भगवान् जाणतात म्हणून ते ब्रह्मवित् आहेत ॥ ७० ॥ ब्रह्मतत्त्वज्ञ- ब्रह्म-आत्मा, ज्ञान, दया, कामनिग्रह याचे स्वरूप उत्तम जाणणारे प्रभु ब्रह्मवित् आहेत ।। ७१ ।। ब्रह्मोद्यावित्- ब्रह्माविषयीच्या अर्थात् केवलज्ञानरूपी आत्मविद्येच्या कथांना प्रभु जाणतात म्हणून ते ब्रह्मोद्यावित् आहेत ॥ ७२ ॥ यतीश्वर- जे रत्नत्रयात यत्न करतात ते साधु यति होत. अशा यतींचे जिनेश्वर स्वामी आहेत म्हणून ते यतीश्वर होत ।। ७३ ॥ __ शुद्ध- क्रोधादिकषायानी रहित ॥ ७४ । बुद्ध- केवलज्ञानरूप बुद्धि ज्यांना आहे असे भगवान् बुद्ध होत ।। ७५ ॥ प्रबुद्धात्मा- केवलज्ञानाने सहित आत्मा-जीव ज्यांचा आहे असे भगवान् प्रबुद्धात्मा होत ।। ७६ ॥ सिद्धार्थ- धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ज्याना सिद्ध झाले आहेत असे प्रभु सिद्धार्थ होत. अथवा सिद्ध पर्यायाशिवाय प्रभूचे दुसरे कोणतेही प्रयोजन नसते अथवा सिद्ध म्हणजे विद्वान् त्यांचे प्रसिद्ध अर्थ जीवादिक सात तत्त्वे व पापपुण्ये मिळून नऊ पदार्थ हे प्रभूपासून विद्वानाना सिद्ध झाले ॥७७॥ सिद्धशासन- ज्याचे शासन नित्य व प्रसिद्ध असे झाले आहे ॥७८ ॥ सिद्धसिद्धान्तविद्- परिपूर्ण, लोकालोक स्वरूप प्रकाशक-प्रतिपादक द्वादशांगरूप शास्त्राला प्रभु जाणतात म्हणून ते सिद्ध सिद्धान्तवित् आहेत ॥ ७९ ॥ ध्येय- वर्णी व योगी यांच्याकडून प्रभु ध्येय-आराध्य आहेत ॥ ८० ॥ सिद्धसाध्य- हे भगवन्ता आपली सर्व साध्ये सिद्ध झाली आहेत. अथवा सिद्धनामक देवानी आपण आराधण्यास योग्य आहात ॥८१॥ जगद्धित- आपण सर्व जगाचे हित करणारे आहात ।। ८२॥ Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-११०) महापुराण (१९ सहिष्णुरच्युतोऽनन्तःप्रभविष्णुर्भवोद्भवः । प्रभूष्णुरजरोऽयज्यो भ्राजिष्णु|श्वरोऽव्ययः॥१०९ विभावसुरसम्भूष्णुः स्वयम्भूष्णुः पुरातनः । परमात्मा परञ्ज्योतिस्त्रिजगत्परमेश्वरः ॥ ११० सहिष्णु- भगवान् क्षमाशील आहेत, क्षमा गुणाचे भाण्डार आहेत ।। ८३ ॥ अच्युत- ते आपल्या स्वरूपापासून च्युत होत नाहीत. ते परमात्मनिष्ठ असतात ॥ ८४ ।। अनन्त- त्यांचा कधीच नाश होत नाही. म्हणूत ते अनन्त आहेत ॥ ८५ ।। प्रभविष्णुअनन्तशक्तीमुळे ते समर्थ आहेत ॥८६ ॥ भवोद्भव- द्रव्यसंसार, क्षेत्रसंसार, कालसंसार, भावसंसार 'व भवसंसार या पाच प्रकारच्या संसारापासून आपला जन्म रहित झाला आहे अथवा या संसारात आपला जन्म सर्वोत्कृष्ट आहे ।। ८७ ॥ प्रभूष्णु- इन्द्र, धरणेन्द्र, नरेन्द्र, चन्द्र, गणीन्द्र-गणधर इत्यादिकावर आपले प्रभुत्व आहे म्हणून आपण प्रभूष्णु आहात।।८८।। अजर-हे प्रभो, आपण वृद्धपणाने रहित आहा म्हणून अजर आहात ।। ८९॥ अयज्य-हे प्रभो, आपले स्वरूप कोणाकडून जाणणे शक्य नसल्यामुळे आपण कोणाकडून पूजिले जाणे शक्य नाही ॥ ९०॥ भ्राजिष्णु- कोटयवधि चन्द्रसूर्यापेक्षाही आपण अधिक कान्ति धारण करीत आहा ॥ ९१॥ धीश्वर- आपण केवलज्ञानरूपी बुद्धीचे स्वामी आहा ॥ ९२ ।। अव्यय- द्रव्याथिकनयाने आपला नाश होत नाही म्हणून आपण अव्यय आहा. अथवा सिद्धपर्याय प्राप्त झाल्यावर आपला नाश होत नाही किंवा आपल्या प्रदेशात वाढ किंवा कमतरता नाही म्हणून आपण अव्यय आहा ॥ ९३ ॥ विभावसु- कर्मरूपी लाकडे भस्म करण्यास आपण विभावसु-अग्निस्वरूपाचे आहात. मोहान्धकार नष्ट करण्यास आपण विभावसु सूर्यासारखे आहात. लोकांच्या नेत्रावर आपण अमृताची वृष्टि करणारे असल्यामुळे चंद्रासारखे आहात. ज्ञानावरणादि कर्मसृष्टीचा आपण प्रलय नाश केला म्हणून आपण रुद्रासारखे आहात. आत्मा व कर्मबन्धन याना आपण वेगळे करण्यास भेदज्ञानरूप आहात. विभा- आपले विशिष्ट तेज हेच आपले वसु, धन आहे. अर्थात् केवलज्ञानरूपी धनाचे आपण धारक आहात. अथवा विशिष्ट जी कान्ति तिने युक्त अशी वसुरत्ने-सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्ररूपी रत्ने आपण धारण करीत आहात म्हणून आपण विभावसु आहात. घातिकर्माच्या क्षयामुळे प्राप्त झालेल्या तेजाने आपण वसुनामक देवांना विभा--कान्तिरहित केले आहे. अथवा विशिष्ट भा-कान्तीचे जिने अवन--पालन केले आहे अशी ज्याची माता आहे असे आपण आहा म्हणून आपण विभावसु आहात. अथवा विभाव रागद्वेष मोहादि परिणामाना स्यति आपण नष्ट करता म्हणून आपण विभावसु आहात ।। ९४ ॥ असम्भूष्णु- आपण आता पुनः संसारात उत्पन्न होणार नाहीत म्हणून असम्भूष्णु आहात ॥ ९५ ॥ स्वयम्भूष्णु- स्वतः आपण होऊन उत्पन्न झालेले आहात ।। ९६ ॥ पुरातन-पुरा-पूर्वी युगाच्या आरंभी आपला जन्म झाला आहे म्हणून आपण पुरातन आहात ॥ ९७॥ परमात्मा- परमउत्कृष्ट केवलज्ञानी आत्मा ज्यांचा आहे असे आपण आहात ॥ ९८ ॥ परञ्ज्योति- आपले ज्योति ज्ञानरूपी नेत्र उत्कृष्ट आहे म्हणून आपण परञ्ज्योति आहात, आलोकान्त नेत्ररूप Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ २०) महापुराण (२५-१११ दिव्यभाषापतिदिव्यः पूतवाक्प्तशासनः । पूतात्मा परमज्योतिधर्माध्यक्षो वमीश्वरः ॥ १११ श्रीपतिर्भगवानहन्नरजा विरजाः शुचिः । तीर्थकृत्केवलीशानः पूजार्हः स्नातकोऽमलः ॥ ११२ आहात ।। ९९ ॥ त्रिजगत्परमेश्वर- आपण त्रैलोक्याचे उत्कृष्ट ईश्वर स्वामी आहात. अथवा त्रैलोक्याची जी परा उत्कृष्ट मा लक्ष्मी तिचे आपण ईश्वर आहात ।। १००॥ दिव्यभाषापति- प्रभुंच्या मुखातून जी भाषा निघते तिला दिव्यभाषा म्हणतात. प्रभु अठरा महाभाषा व सातशे क्षुल्लक भाषा यांचे स्वामी आहेत ।। १॥ दिव्य- भगवान् सर्वार्थसिद्धीहून येथे जन्मले म्हणून ते दिव्य आहेत ॥२॥ पूतवाक्- भगवंताची भाषा पवित्र असते, व ती अनर्थक, श्रुतिकटु इत्यादि दोषांनी रहित असते ॥ ३ ।। पूतशासन- भगवंताचे मत पूर्वापर विरोधरहित आणि हितकारक अर्थात् पवित्र आहे ॥ ४॥ पूतात्मा- भगवंताचा आत्मा पवित्र अर्थात् कर्मकलंकरहित असतो. भगवान् पवित्र स्वभावाचे असतात. अथवा पू: म्हणजे पवित्र करणारे सिद्ध परमेष्ठी त्यांची ता म्हणजे अनन्त चतुष्टयरूपी जी लक्ष्मी तिने युक्त आहे. आत्मा ज्यांचा असे जे प्रभु जिनेश्वर ते पूतात्मा होत ॥ ५ ॥ परमज्योति- परम उत्कृष्ट केवलज्ञानरूपी ज्योतीने भगवान् युक्त आहेत ॥ ६ ॥ धर्माध्यक्ष- प्रभु धर्म म्हणजे चारित्र त्याचे अध्यक्ष-अधिकारी आहेत व ते धर्माचा ध्वंस नाश कोणालाही करू देत नाहीत. अथवा धर्माधौ--धर्मचिन्तनात प्रभूची इन्द्रिये, ज्ञान व आत्मा नेहमी तत्पर असतात म्हणून ते धर्माध्यक्ष आहेत ॥ ७॥ दमी श्वर- दमप्रशम-क्रोधादिकषायांचा अभाव व इन्द्रियनिग्रह याला दम म्हणतात. हा दम ज्यांच्यात आहे असे साधु ते दमी होत व त्यांचे प्रभु ईश्वर स्वामी आहेत ॥८ __ श्रीपति- भगवान् अभ्युदयलक्ष्मी-विशाल राज्य, ऐश्वर्य, भोगाचे पदार्थ इत्यादिक संपत्ति व अनन्तज्ञान सुख शक्त्यादि गुणांची प्राप्ति ही निःश्रेयस-मोक्षलक्ष्मी या दोन लक्ष्मींचे स्वामी आहेत ।।९॥ भगवान्-- अनंतज्ञान, अशोकवृक्षादि आठ प्रातिहार्ये, वैराग्य, महातपश्चरण, मोक्ष यांना भग म्हणतात हे ज्यांना प्राप्त झाले आहेत असे प्रभु आदिजिनेश भगवान् होत ॥१०॥ अर्हन्- इन्द्रादिकांनी केलेल्या व इतर हरिहरादिकातून आढळून न येणाऱ्या पूजेला प्रभु प्राप्त झाले म्हणून ते अर्हन होत. अथवा अकाराने मोहनीय कर्म रज, शब्दाने ज्ञानावरण व दर्शनावरण कर्म, व रहस शब्दाने अन्तराय कर्म या चार घातिकर्मांचे प्रभूनी हनन नाश केला म्हणून प्रभु अर्हन या योग्य नावाचे धारक बनले. या चार कर्मांचा नाश करून इन्द्रादिकाकडून अर्हणाला पूजनाला प्राप्त झाले म्हणून जिनेश्वराना अर्हन् म्हणतात ॥ ११॥ अरजा- प्रभु ज्यांनी रजस् ज्ञानावरण व दर्शनावरण ही दोन कर्मे नष्ट केली असे आहेत ॥ १२॥ विरजा- ज्यांची वरील दोन कर्मे नाहीतशी झाली असे प्रभू विरजा झाले आहेत ॥ १३ ॥ शुचि- प्रभु निर्मल आहेत, पवित्र आहेत. अथवा अत्युत्कृष्ट ब्रह्मचर्याचे प्रभूनी पालन केले व माझा आत्मा शुद्ध आहे आत्मस्वरूपज्ञ व पवित्र तीर्थ आहे. अशा निर्मल भावनारूप जलाने त्यांनी आपले अन्तरंग शरीर शुद्ध केले म्हणून ते शुचि-परमपवित्र झाले आहेत. अथवा आठ कर्मरूपी लाकडे त्यांनी जाळून टाकली म्हणून ते शुचि अग्निस्वरूप आहेत. अथवा जन्मापासून ते मलमूत्ररहित आहेत Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-११३) महापुराण (२१ अनन्तदीप्तिर्ज्ञानात्मा स्वयम्बुद्धः प्रजापतिः । मुक्तः शक्तो निराबाधो निष्कलो भुवनेश्वरः ॥११३ .................................. म्हणून शुचि आहेत. अथवा पापमल धुऊन टाकण्यास समर्थ अशी जी निर्लोभवृत्ति हीच जणु पाणी त्याने ते स्नान करीत असत म्हणून ते शुचि आहेत ॥ १४॥ तीर्थकृत्- ज्याने संसारसमुद्र तरून जाता येतो त्याला तीर्थ म्हणतात. तें तीर्थ म्हणजे आचारांग, सूत्रकृतांगादि द्वादशांगशास्त्रे होत. त्या तीर्थाची रचना भगवंतानी केली म्हणून भगवान् तीर्थकृत् आहेत ॥ १५ ॥ केवलीमोहादि चार घातिकर्माचा क्षय करून प्रभु केवलज्ञान संपन्न झाले म्हणून ते केवली आहेत ॥१६॥ ईशान- प्रभु अहमिन्द्रांचेही स्वामी आहेत म्हणून ईशान होत ॥ १७ ॥ पूजाह- प्रभु पूजित होण्या ग्यास अर्ह योग्य असल्यामुळे पूजार्ह हे नाव त्याना आहे. नित्यमहपूजा, चतुर्मुखपूजा, कल्पवृक्षपूजा, अष्टान्हिक पूजा इत्यादिक पूजांनी प्रभु पूज्य आहेत ॥ १८॥ स्नातक- स्नात स्नान केलेला अर्थात् द्रव्य कर्मे, ज्ञानावरणादि चार घाति कर्मे, रागद्वेष मोहादि भावकर्मे या कर्माना सहायक असे जे आहारादिक पदार्थ ज्यांना नोकर्म म्हणतात यांनी रहित असल्यामुळे स्नात पवित्र झाला आहे. क-आत्मा ज्यांचा असे प्रभु स्नातक होत अर्थात् केवलज्ञानी प्रभूला स्नातक म्हणावे ॥ १९॥ अमल- रस, रक्त, मांस, मेद, अस्थि-हाडे, मज्जा, शुक्रवीर्य असे सात धातु व विष्ठा, मूत्र, कर्णमल, नेत्रमल, अश्रु येणे, घाम येणे इत्यादि मलांनी रहित प्रभु असल्यामुळे त्यांचे अमल हे नाव योग्य आहे ।। २० ।। अनंतदीप्ति- अपरिमित केवलज्ञानरूप तेज ज्यांचे असे. अथवा ज्यांच्या शरीरकान्तीचा नाश होत नाही असे किंवा अनन्त-अविनाशी अशा मुक्तिस्थानी ज्यांच्या गुणांची कांति आहे असे ॥२१॥ ज्ञानात्मा- प्रभु ज्ञानस्वभावाचे असल्यामुळे ते ज्ञानात्मा आहेत ॥ २२ ।। स्वयम्बुद्ध- गुरुवाचून बुद्ध म्हणजे संसार, देह, भोगापासून प्रभु विरक्त झाले ॥२३।। प्रजापति- त्रैलोक्यातील लोकाचे प्रभु स्वामी आहेत. अथवा प्रजा, भरत, बाहुबली, ब्राह्मी, सुंदरी आदिकांचे जिन आदिनाथ पिता होते म्हणूनही त्यांना प्रजापति म्हणावे. त्यांनी आपल्या मुलाना व मुलीना नानाप्रकारच्या शास्त्रांची माहिती दिली ॥ २४ ॥ मुक्त- भगवान् मिथ्यात्वादिक बंधकारणापासून सर्वथा मुक्त झाले आहेत म्हणून ते मुक्त आहेत ॥ २५ ॥ शक्त-प्रभु क्षुधा तृषादि बावीस परिषहांना सहन करण्यास समर्थ होते. म्हणून त्यांचे शक्त हे नाव योग्य आहे ।। २६ ।। निराबाध- कष्टापासून मुक्त झाले म्हणून प्रभु निराबाध होते ॥२७॥ निष्कल- प्रभु कालापासून रहित अविनाशी आहेत. अथवा ज्यांच्याठिकाणी सर्व प्रकारचे विज्ञान निश्चित असे आहे. अथवा प्रभु कामविकाराचे शत्रु असल्यामुळे ते निष्कल रेतरहित आहेत किंवा कवलाहार रहित असल्यामुळे ते अजीर्णाने रहित आहेत. प्रभु रत्नवृष्टिसमयी निष्क-हेम सुवर्ण ग्रहण करतात म्हणून त्यांना निष्कल म्हणावे. अथवा पंचाश्चर्य वृष्टिसमयी प्रभु दात्याला निष्क-सुवर्ण देतात म्हणून ते निष्कल आहेत. अथवा राज्यसमयी प्रभु निष्क-हजार पदरांचा पदकासहित हार गळ्यात घालीत होते म्हणून ते निष्कल नावाने शोभतात ।। २८ ॥ भुवनेश्वर- प्रभु त्रैलोक्याचे स्वामी असल्यामुळे भुवनेश्वर आहेत ।। २९ ।। Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ २२) महापुराण (२५-११४ निरञ्जनो जगज्ज्योतिनिरुक्तोक्तिनिरामयः । अचलस्थितिरक्षोभ्यः कूटस्थः स्थाणुरक्षयः ॥११४ अग्रणी मणीर्नेता प्रणेता न्यायशास्त्रकृत् । शास्ता धर्मपतिर्षर्यो धर्मात्मा धर्मतीर्थकृत् ॥ ११५ वृषध्वजो वृषाधीशो वृषकेतुर्वृषायुधः । वृषो वृषपतिर्भर्ता वृषभाङ्को वृषोद्भवः ॥ ११६ निरञ्जन- अञ्जन कर्ममलकलङ्क निघून गेल्यामुळे प्रभु निरञ्जन झाले. अर्थात् ते भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्म यांनी रहित झाले आहेत ॥ ३०॥ जगज्ज्योति- सगळ्या लोकात व अलोकातही केवलदर्शन नामक डोळा ज्यांचा पहात असल्यामुळे प्रभु जगज्ज्योति आहेत ॥३१॥ निरुक्तोक्ति- निरुक्त- निश्चययुक्त उक्ति- पूर्वापरविरोधदोषरहित वचन प्रभु बोलतात म्हणून ते निरुक्तोक्ति आहेत ॥ ३२ ।। निरामय- नाहीसा झाला आहे आमय रोग ज्यांचा असे प्रभु रोगरहित आहेत ॥ ३३ ॥ अचलस्थिति- अनंतकाल गेला तरी प्रभु स्वस्थानातच मुक्तीमध्ये स्थिर राहतात ।। ३४ ॥ अक्षोभ्य- प्रभूना चारित्रापासून ढळविणे कोणालाही शक्य नाही म्हणून प्रभु अक्षोभ्य आहेत. अथवा अक्षेण म्हणजे केवलज्ञानाने उभ्यतेप्रभु पूर्णतेस प्राप्त झाले आहेत म्हणून ते अक्षोभ्य आहेत ।। ३५॥ कूटस्थ- कूटे त्रैलोक्याच्या शिखराग्रावर-मोक्षस्थानी प्रभु विराजमान झाले आहेत. म्हणून ते कूटस्थ किंवा ते प्रभु आपल्या केवलज्ञानापासून च्युत होत नाहीत व नवीन कांही वेगळा स्वभाव उत्पन्न होत नाही तर त्यांचे केवलज्ञान स्थिर व एक स्वभावाचे राहते ।। ३६ ।। स्थाणु- जगाचा प्रलय झाला तरी ते स्थिर राहतात ॥ ३७ ।। अक्षय- प्रभु अक्षय आहेत. अथवा अक्ष-इन्द्रिये ज्याकडे प्रभु कधीही जात नाहीत अर्थात् ते नेहमी केवलज्ञान स्वभावातच राहतात ।। ३८ ॥ अग्रणी- जो आपणास त्रैलोक्यावर नेतो अर्थात् जो त्रैलोक्यात श्रेष्ठ होतो अशा त्या प्रभूला अग्रणी म्हणतात ।। ३९ ।। ग्रामणी- मोक्षपदाकडे नेणारा किंवा सिद्धसमूहाला नेणारा अर्थात् सिद्धश्रेष्ठ ॥ ४० ॥ नेता- प्रभूनी जिनधर्माला जगापुढे आणले. म्हणून ते नेता आहेत ॥ ४१ ॥ प्रणेता- सष्टीला-जगाला सन्मार्ग दाखविणारा ॥ ४२ ॥ न्यायशास्त्रकृत- पूर्वापर विरोधरहित अशा आगमाला उत्पन्न करणारे-रचणारे प्रभ ॥ ४३ ।। शास्ता-धर्म व अधर्माचे स्वरूप सांगणारे प्रभु जिनेश्वर हे शास्ता खरे गुरु होत ॥ ४४ ॥ धर्मपति- चारित्र, रत्नत्रय, क्षमादिक दहा धर्म, जीवांचे रक्षण करणे किंवा वस्तूंचा स्वभाव यांना धर्म म्हणतात. यांचा जो प्रभु त्याला अर्थात् जिनेन्द्राला धर्मपति म्हणावे ॥ ४५ ॥ धर्म्य- हितकर धर्माचरण करणारा ॥ ४६ ॥ धर्मात्मा- उत्तम क्षमादिदशधर्म हाच आत्मस्वभाव मानून तसे वागणारा ।। ४७ ॥ धर्मतीर्थकृत रत्नत्रय- सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र हे संसारसागर तरून जाण्याचा उपाय असल्यामुळे त्यास धर्मतीर्थ म्हणतात. त्याचा उपदेश प्रभुंनी भव्यांना केला म्हणून ते धर्मतीर्थकर होत ॥ ४८ ।। वृषध्वज- ज्यांच्या पताकेवर बैलाचे चिह्न आहे अशा प्रभूना वृषभध्वज म्हणतात ॥ ४९ ।। वृषाधीश- अहिंसाधर्माचे प्रभु स्वामी आहेत. म्हणून ते वृषाधीश होत ॥ ५० ॥ वृषकेतु- पुण्य हे ज्यांचे चिन्ह आहे असे प्रभु वृषकेतु होत ॥ ५१ ॥ वृषायुध- धर्म हा कर्म Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-११८) महापुराण हिरण्यनाभिर्भूतात्मा भूतभृद्भूतभावनः । प्रभवो विभवो भास्वान्भवो भावो भवान्तकः ॥ ११७ हिरण्यगर्भः श्रीगर्भः प्रभूतविभवोऽभवः । स्वयम्प्रभुः प्रभूतात्मा भूतनाथो जगत्पतिः ॥ ११८ शत्रु नाश करण्यास ज्यांचे शस्त्र आहे असे प्रभु वृषायुध नांवाने संबोधले जातात ॥ ५२ ।। वृष- प्रभुंनी धर्मामृताची वृष्टि केली म्हणून ते वृष म्हटले गेले ॥ ५३ ॥ वृषपति- भगवान् अहिंसाधर्माचे अधिपति स्वामी आहेत ॥ ५४ ॥ भर्ता- भव्यजनांना जो उत्तमस्थानी- स्वर्ग, मोक्ष अशा उत्तमस्थानी ठेवतो व केवलज्ञानादिगुणांनी त्यांना पुष्ट करतो, पोसतो अशा आदिजिनाला भर्ता म्हणतात ॥ ५५ ॥ वृषभाङ्क- बैल हे लाञ्छन-ओळखण्याचे चिन्ह ज्यांना ते प्रभु वृषभाङ्क होत ।। ५६ ।। वृषोद्भव- वृष म्हणजे पुण्य त्याची उद्भव-उत्पत्ति ज्यांच्यापासून होते अशा प्रभूना वृषोद्भव म्हणतात. अथवा वृषभदर्शनाने ज्यांचा जन्म झाला त्या प्रभूना वृषोद्भव म्हणतात. आदिभगवंतांच्या मातेला-मरुदेवीला शेवटी बैलाचे स्वप्न पडले व भगवान् मातेच्या गर्भात आले ॥ ५७ ॥ हिरण्यनाभि- सुवर्णाप्रमाणे सुंदर नाभि-बेम्बी आपली आहे म्हणून हे प्रभो, आपणास हिरण्यनाभि असे विद्वान् म्हणतात ॥ ५८ ॥ भूतात्मा- सत्य असे लोकालोकाचे स्वरूप जाणणारा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु भूतात्मा होत अथवा भूत सर्व प्राण्यांना जाणणारा आत्मा असे प्रभु आहेत ।। ५९॥ भूतभृद्- भूत-प्राणी व देव विशेष यांचे पालन करणारा ॥ ६०॥ भूतभावन- सत्य असे चिन्तन करणारा किंवा दर्शनविशुद्धयादि सोळा भावनांचे चिन्तन ज्यांनी केले अशा प्रभूना भूतभावन म्हणतात ॥ ६१ ।। प्रभव- ज्याच्यापासून इक्ष्वाक्वादि वंशांची उत्पत्ति झाली आहे. अथवा प्रभव-उत्कृष्ट भव जन्म ज्यांचा आहे असे ।। ६२ ॥ विभव- ज्यांचा भवसंसार विनष्ट झाला आहे असे प्रभु विभव होत अथवा विशिष्ट भव, जन्म ज्यांचा आहे असे ।। ६३ ॥ भास्वान्- भा-केवलज्ञानरूपी दीप्ति ज्यांना प्राप्त झाली आहे असे ।। ६४ ॥ भव-- भव्य प्रण्यांच्या हृदयात प्रभु नेहमी राहतात. म्हणून ते भव होत ॥६५।। भाव- जे महामुनीच्याही मनात राहतात अशा प्रभुंना भाव म्हणतात ।। ६६॥ भवान्तक- भक्तांच्या संसाराचा नाश करणारे असल्यामुळे प्रभु भवान्तक आहेत ॥ ६७ ।। हिरण्यगर्भ- प्रभु जेव्हां मातेच्या गर्भात होते तेव्हां देवांनी नऊ महिनेपर्यंत मातेच्या अंगणात सुवर्णरत्नाची वृष्टि केली. म्हणून हिरण्यगर्भ हे नांव सार्थ होय. तसेच गर्भात येण्याच्या आधीपासूनही देव रत्नवृष्टि करीत होते. अथवा हि- निश्चयाने रण्यो- रण करण्यास साधुउत्तम आहे गर्भ ज्याचा असे प्रभु होते. भगवंताचा पिता जेव्हां भगवान् गर्भात होते तेव्हां त्याच्याशी कोणीही राजा लढू शकला नाही. म्हणून हिरण्यगर्भ या अन्वर्थ नांवाचे भगवान् होते ।। ६८ ॥ श्रीगर्भ- श्री शब्दाने श्री- ह्री, धृति, कीर्ति, बुद्धि, लक्ष्मी, शान्ति आणि पुष्टि या दिक्कुमारी देवतांचे ग्रहण होते. प्रभु मातेच्या गर्भात आले तेव्हांपासून या देवतांनी मातेची सेवा केली. म्हणून श्रीआदिक देवींनी गर्भात आलेले जिन भक्तीने सेविले गेले यास्तव या जिनप्रभूचे श्रीगर्भ हे नांव प्रसिद्ध झाले ।। ६९ ॥ प्रभूतविभव- ज्यांचे वैभव फार मोठे आहे असे Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ २४) महापुराण (२५-११९ सर्वादिः सर्ववृक्सार्वः सर्वज्ञः सर्वदर्शनः । सर्वात्मा सर्वलोकेशः सर्ववित् सर्वलोकजित् ॥११९ सुगतिः सुश्रुतः सुश्रुत् सुवाकसूरिबहुश्रुतः । विश्रुतो विश्वतः पादो विश्वशीर्षः शुचिश्रवाः ॥ १२० प्रभु होते ॥ ७० ॥ अभव- ज्यांना संसार नाही असे प्रभु-याच जन्मात मुक्त होणार असल्यामुळे ते अभव या सार्थ नांवाने शोभत होते ॥ ७१ ।। स्वयम्प्रभु- भगवान् स्वतःच प्रभु समर्थ आहेत. कोणाच्या साहाय्याने त्यांना प्रभुत्व आले नाही ॥ ७२ ।। प्रभूतात्मा-हे प्रभो, आपला आत्मा सिद्धस्वरूपाला प्राप्त झाला आहे. हे प्रभु भावीकालात सिद्ध होणार असल्यामुळे उपचाराने सिद्ध झाले असे म्हटले आहे ॥ ७३ ।। भूतनाथ- भूत- सर्व प्राण्यांचे जिनेश्वर नाथ आहेत. म्हणून त्यांना भूतनाथ म्हणता येते व प्रभु देवविशेषांचेही नाथ आहेत. अथवा भूत--होऊन गेलेल्या प्राण्यांचे प्रभु स्वामी आहेत व उपलक्षणाने वर्तमानकालीन व भविष्यकालीनांचेही ते स्वामी आहेत ॥ ७४ ॥ जगत्प्रभु- जगाचे म्हणजे त्रैलोक्याचेही जिनेश्वर प्रभु स्वामी आहेत ॥ ७५ ॥ सर्वादि- सर्व जगाची उत्पत्ति होण्याला आदिकारण भगवान् असल्यामुळे ते सर्वादि आहेत ।। ७६ ।। सर्वदृक्- सर्व प्रमाणांनी सर्व पदार्थांना पाहणारे असल्यामुळे ते सर्वदृक् आहेत ॥ ७७ ।। सार्व- एकेन्द्रियापासून पंचेन्द्रियापर्यंत सर्व मिथ्यादृष्टि, सम्यग्दृष्टि आदिक प्राण्यांचे हित करणारे भगवान् सार्व आहेत. सर्व प्राणिवर्गाला हिताचा उपदेश करीत असल्यामुळे सार्व होत ।। ७८ ॥ सर्वज्ञ- सर्व त्रैलोक्यातील व भूत-भविष्यत्-वर्तमानकालातील द्रव्य पर्यायांनीसहित अनन्तानन्त वस्तूना व अलोकाकाशाला प्रभु जाणतात म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणतात ॥ ७९ ॥ सर्वदर्शन- सर्व- संपूर्ण दर्शन क्षायिकसम्यक्त्व प्रभुंना असल्यामुळे ते सर्वदर्शन आहेत किंवा जी जगात सर्वदर्शने--सर्वमते आहेत त्या सर्वांचा स्याद्वादाने समन्वय करणारे प्रभु सर्वदर्शन होत ।। ८० ।। सर्वात्मा- सर्व अतति जानाति इति सर्व पदार्थांना जाणतात. म्हणून प्रभु सर्वात्मा अथवा सर्व प्राणिसमूहाला समान पाहतात म्हणून सर्वात्मा. ॥ ८१॥ सर्वलोकेश- सर्वलोकात-त्रैलोक्यात असलेल्या प्राण्यांचे प्रभु ईश स्वामी आहेत ।। ८२॥ सर्ववित्- सर्व वस्तूंना जाणतात ते सर्ववित् आहेत ।। ८३ ॥ सर्वलोकजित्- सर्व लोकांना अर्थात् पाच प्रकारच्या संसारपरिभ्रमणांना जिंकल्यामुळे प्रभु सर्वलोकजित् आहेत ।। ४४ ॥ सुगति: - उत्तम गति जिला मुक्ति म्हणतात, जिला पाचवीगति असे नांव आहे तिचे प्रभु आदीश्वर स्वामी आहेत ।। ८५ ।। सुश्रुत- उत्तम निर्दोष अबाधित जीवादि पदार्थस्वरूप प्रतिपादन करणारे शास्त्र प्रभूनी रचले आहे. म्हणून ते सुश्रुत होत. अथवा प्रभु जगात अतिशय विख्यात आहेत. म्हणूनही त्यांना सुश्रुत म्हणतात ।। ८६ ।। सुश्रुत्- सुंदरश्रवण-ऐकणे ज्यांचे आहे अर्थात् सर्व जीवांच्या प्रार्थना जे ऐकतात असे प्रभु सुश्रुत आहेत ॥ ८७ ॥ सुवाक्स्यादस्ति, स्यान्नास्ति इत्यादि सात प्रकारांनी गुणद्रव्य पर्यायांचे वर्णन करणारी अशी निर्दोष भाषा बोलणारे प्रभु सुवाक् या नांवाला धारण करतात ।। ८८ ।। सूरि- ज्यांच्यापासून आत्महित करणारी बुद्धि-ज्ञान उत्पन्न होते असे प्रभु सूरि मानले जातात ।। ८९ ॥ बहुश्रुत Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१२९) महापुराण सहस्रशीर्षः क्षेत्रज्ञः सहस्राक्षः सहस्रपात् । भूतभव्यभवद्भर्ता विश्वविद्यामहेश्वरः ॥ १२१ इति दिव्यादिशतम् ॥७ स्थविष्ठः स्थविरो ज्येष्ठः प्रष्ठः प्रेष्ठो वरिष्ठधीः । स्थेष्ठो गरिष्ठो बंहिष्ठः श्रेष्ठोऽणिष्ठो गरिष्ठगीः ॥ १२२ ज्यांच्या ठिकाणी विशाल द्वादशाङ्गज्ञान आहे त्या भगवंतांना बहुश्रुत म्हणतात ॥ ९० ॥ विश्रुत- ज्यांचे ज्ञान व्यापक असल्याची प्रसिद्धि चोहोकडे झाली आहे असे जिनदेव विश्रुत नांवाने प्रसिद्ध होतात ।। ९१॥ विश्वतःपाद- अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक या तीन लोकात ज्यांच्या केवलज्ञानाचे किरण पसरले आहेत असे भगवान् विश्वतःपाद या नांवाने संबोधित होतात ॥ ९२ ॥ विश्वशीर्ष- त्रैलोक्याचा अग्रभाग हे ज्यांचे निवासस्थान आहे असे प्रभु विश्वशीर्ष म्हटले जातात ।। ९३ ॥ शुचिश्रवा- ज्यांचे कान पवित्र आहेत असे प्रभु शुचिश्रवा या नांवाने शोभतात ॥ ९४ ॥ सहस्रशीर्ष- ज्याला अनन्त मस्तके आहेत असे, म्हणजे अनन्तमुखी अनंतज्ञानी प्रभूला सहस्रशीर्ष म्हणतात ।। ९५ ।। क्षेत्रज्ञ- अधो, मध्य व ऊर्ध्वलोकरूपी क्षेत्र व अलोकाकाशाला प्रभु जाणतात म्हणून ते क्षेत्रज्ञ होत ।। ९६ ॥ सहस्राक्ष- अनन्त पदार्थांचे ज्ञान असलेले प्रभु सहस्राक्ष होत ॥ ९७ ॥ सहस्रपात्- ज्यांना हजार पाय आहेत ते सहस्रपात् अर्थात् प्रभूना हजार पाय आहेत असे नांव आहे. त्याचा अभिप्राय त्यांना अनन्तवीर्य आहे असा समजावा ।। ९८ ॥ भूतभव्यभवद्भर्ता- भूतकालीन, भविष्यकालीन व भवत्- वर्तमानकालीन अशा जगताचे आदिप्रभु भर्ता-स्वामी आहेत ॥ ९९ ॥ विश्वविद्यामहेश्वर- विश्वविद्या म्हणजे केवलज्ञान त्याचे प्रभु आदिजिन महास्वामी आहेत ।। १०० ॥ स्थविष्ठ- उत्कृष्ट गुणांच्या अपेक्षेने प्रभु अतिशय स्थूल आहेत म्हणून त्यांना स्थविष्ठ म्हणतात ॥ १ ॥ स्थविर- ज्ञानादिगुणांनी वृद्ध असल्यामुळे प्रभु स्थविर आहेत ॥ २ ॥ ज्येष्ठ- त्रैलोक्यात प्रभु अतिशय उत्तम असल्यामुळे ते ज्येष्ठ आहेत ॥ ३॥ प्रष्ठ- सर्वांचे पुढारी असल्यामुळे त्यांना प्रष्ठ म्हणतात ॥ ४ ॥ प्रेष्ठ- सर्वांना प्रभु अतिशय प्रिय आहेत म्हणून ते प्रेष्ठ होत ॥ ५ ॥ वरिष्ठधी- प्रभूची बुद्धि अतिशय श्रेष्ठ आहे म्हणून ते वरिष्ठधी आहेत ॥ ६ ॥ स्थेष्ठ- प्रभु अत्यन्त स्थिर असल्यामुळे ते स्थेष्ठ आहेत ।। ७ ॥ गरिष्ठ- ते अत्यन्त गुरु आहेत म्हणून त्यांना गरिष्ठ म्हणतात ॥८॥ बंहिष्ठ- गुणांच्या अपेक्षेने ते फारा मोठे आहेत म्हणून त्यांना बंहिष्ठ म्हणतात ॥ ९ ॥ श्रेष्ठ- प्रभु अतिशय प्रशस्त-उत्तम असल्यामुळे श्रेष्ठ आहेत ।। १०॥ अणिष्ठ- प्रभूचे स्वरूप अतिशय सूक्ष्म असल्यामुळे ते अणिष्ठ आहेत ॥ ११॥ गरिष्ठगी- प्रभुंची वाणी अतिशय गौरवयुक्त आहे म्हणून ते गरिष्ठगी आहेत. त्यांची वाणी जगत्पूज्य आहे ॥ १२ ॥ म.४ Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२५-१२३ विश्ममुट् विश्वसूट विश्वेट विश्वभुग्विश्वनायकः । विश्वाशीविश्वरूपात्मा विश्वजिढि जितान्तकः ॥ १२३ विभवो विभयो वीरो विशोको विजरोऽजरन् ।। विरागो विरतोऽसङ्गो विविक्तो वीतमत्सरः ॥ १२४ विश्वमुट- प्रभु चतुर्गति- नरक-पशु-मनुष्य-देव या चार गतीमध्ये होणान्या भ्रमणाला दूर करतात ।। १३ ।। विश्वसृट्- सर्व जगताची व्यवस्था लावणारे प्रभु विश्वसृट् आहेत ।।१४।। विश्वेट- त्रैलोक्याचे स्वामी ॥ १५ ॥ विश्वभुक्-जगताचे भुक्-पालन करणारे आहेत ।। १६ ।। विश्वनायक-- भगवान् त्रैलोक्याचे स्वामी आहेत व ते विश्वाला शुभ कार्यात प्रवृत्त करतात ।।१७ विश्वाशी-- सर्व विश्वावर विश्वासयुक्त अथवा केवलज्ञानाने विश्वात व्यापून राहणारा ॥१८॥ विश्वरूपात्मा-- ज्यामध्ये प्राणी प्रवेश करतात-परिभ्रमण करतात अशा जगाला विश्व म्हणतात. त्या विश्वाच्या स्वरूपाचा आत्मा विश्वाकार आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु विश्वरूपात्मा होत. अर्थात् लोकपूरण समुद्घाताचे वेळी प्रभूचा आत्मा सर्व विश्वाला व्यापतो. म्हणून त्यांना विश्वरूपात्मा म्हटले आहे अथवा जीयादिक पदार्थ प्रभंच्या केवलज्ञानात शिरले आहेत म्हणन केवलज्ञान विश्व आहे त्या विश्वरूपाचा धारक प्रभूचा आत्मा असल्यामुळे प्रभु विश्वरूपात्मा आहेत ॥ १९॥ विश्वजित्-- संसाराला जिंकल्यामुळे प्रभु विश्वजित् आहेत ॥ २० ॥ विजितान्तक- प्रभुंनी अन्तकाला-मृत्यूला पूर्णपणे जिंकले आहे म्हणून ते विजितान्तक होत. अथवा प्रभु परमपदाला पोहोचल्यामुळे ते विजितान्तक झाले आहेत ॥२१॥ विभव-प्रभूची भवतीर्थकरावस्था ही विशिष्ट असते, सर्वश्रेष्ठ व आदरणीय असते म्हणून त्यांना विभव म्हणतात. अथवा विभव-विगत-नष्ट झाला आहे. भव-संसार ज्यांचा असे प्रभु असतात. अथवा विभाव असाही पाठ आहे. वि-विशिष्ट भाव-परिणाम-शद्धोपयोग ज्यांचा असे प्रभ आहेत. अथवा वि-विशिष्ट-भा-कान्ति तिचे अवति प्रभु रक्षण करतात म्हणून त्यांना विभाव असेही नांव आहे ॥ २२ ॥ विभय- ज्यांची विशिष्ट कान्ति आहे अशा व्यक्तीना विभ म्हणतात. त्यांचा प्रभु यान्ति पराभव करतात. म्हणून जिनेश्वर विभय आहेत, अर्थात् महाकान्तिसम्पन्न आहेत. अथवा प्रभु सात भयांनीरहित आहेत ( इहलोकभय, परलोकभय, वेदनाभय, आकस्मिकभय, अत्राणभय, अगुप्तिभय, अशरणभय ) ॥ २३ ॥ वीर- वि-विशिष्ट-ई लक्ष्मीला-मुक्तीलक्ष्मीला राति जे भक्ताला देतात ते प्रभु वीर होत. 'अथवा कर्मशत्रूला जे वीराप्रमाणे जिंकतात ते प्रभु वीर होत ।। २४ ॥ विशोक- शोकरहित असल्यामुळे प्रभूना विशोक म्हणतात. अथवा विशिष्ट शं सुखयुक्त क: आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु विशोक अनन्तसुखी आहेत ॥ २५॥ विजर- विनष्ट झाली आहे जरा वृद्धावस्था ज्यांची ते प्रभु विजर होत. अथवा वि-विशिष्ट जरो वृद्ध असलेला. पुराणपुरुष हा अभिप्राय ।। २६ ॥ अजरन्- अ-अतिशय वृद्ध अथवा जो वृद्ध होणार नाही असा प्रभु ॥ २७ ॥ विराग- रागरहित--निरिच्छ ।। २८ ॥ विरत-- विनष्ट झाले आहे रत-- भवसुख ज्यांचे असे अर्थात् विरक्त ॥ २९ ॥ असङ्ग- परिग्रहरहित ॥ ३० ॥ विविक्तसर्व विषयापासून विरक्त झालेला ॥ ३१ ॥ वीतमत्सर- दुसऱ्याचे शुभ पाहून जळफळणे तो मत्सर होय. प्रभु मत्सररहित आहेत. म्हणून ते वीतमत्सर होत ॥ ३२ ॥ Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१२७) महापुराण (२७ विनेयजनताबन्धुविलीनाशेषकल्मषः। वियोगो योगविद्विद्वान् विधाता सुविधिः सुधीः ॥ १२५ क्षान्तिभाक् पृथिवीमूर्तिः शान्तिभाक् सलिलात्मकः । वायुमूतिरसंगात्मा वह्निमूर्तिरधर्मधक् ॥ १२६ सुयज्वा यजमानात्मा सुत्वा सुत्रामपूजितः । ऋत्विग्यज्ञपतिर्यज्यो यज्ञाङ्गममृतं हविः ॥ १२७ विनेयजनताबन्धु- गुरुकडून जे शिकविले जातात त्यांना विनेय-शिष्य म्हणतात. अर्थात् भव्यजनांच्या समूहाचे प्रभु बंधु आहेत ॥ ३३ ॥ विलीनाशेषकल्मष- संपूर्ण पापांचा नाश केल्यामुळे प्रभु विलीनाशेषकल्मष या नावाला धारण करीत आहेत ॥ ३४ ॥ वियोगमुक्ति स्त्रीबरोबर प्रभूचा विशेष योग संबंध झाला असल्यामुळे हे नाव प्रभूना योग्य आहे ॥३५॥ योगवित्- प्राणायामादि आठ योगाना प्रभु जाणतात म्हणून ते योगवित् आहेत ॥ ३६ ।। विद्वान्- प्रभु ज्ञानसंपन्न आहेत ।। ३७ ।। विधाता- व्यवहारापेक्षेने प्रभु लोकांना जिनपूजादिकार्यात तत्पर करतात ।। ३८॥ सुविधि- शोभन निरतिचार चारित्राचे पालन करणारे आहेत ॥ ३९ ॥ सुधी- प्रभु उत्तम आत्मचिंतन करतात ॥ ४०॥ क्षान्तिभाक्- प्रभु क्षमाशील आहेत ॥४१॥ पृथिवीमूर्ति-पृथ्वी ही ज्यांची मूर्ति शरीर आहे असे प्रभु. हे त्यांचे नांव सहनशीलत्वामुळे किंवा सर्वत्र ज्ञानाच्या व्यापकत्वामुळे आहे ॥४२।। शान्तिभाक्- शान्तिधारणामुळे प्रभु शान्तिभाक् या नांवाने शोभतात ।। ४३ ॥ सलिलात्मकप्रभु मृदुपणामुळे, स्वच्छतेमुळे, कर्ममल नाहीसा केला असल्यामुळे व तृष्णा-आशानाशकत्वामुळे जलात्मक आहेत असे वणिले जातात ॥ ४४ ॥ वायुमूर्ति- प्रभु वायुमूर्ति आहेत. अर्थात् ते जगताचे प्राणरूप आहेत. त्यांची गति रोकता येत नाही असे ते आहेत ॥ ४५ ॥ असङ्गात्माअसंग अपरिग्रह सर्व बाह्याभ्यंतरपरिग्रहांच्या अभावाने त्यांचा आत्मा युक्त आहे. अर्थात् ते अपरिग्रहस्वरूपी आहेत ।। ४६ ।। वह्निमूर्ति- अग्निस्वरूपी आहेत व त्यामुळे ते वह्निमूर्ति आहेत ॥ ४७ ॥ अधर्मधक- अधर्म हिंसादि लक्षण जे पाप स्वतःचे व इतरांचे ते प्रभ भस्म करून टाकतात ।। ४८ ॥ सुयज्वा- कर्मरूपी सामग्रीचा होम करणारे प्रभु सुयज्वा होत ।। ४९॥ यजमानात्माआपल्या अनंतज्ञानादि गुणांची आराधना करणाऱ्या प्रभूना यजमानात्मा म्हणतात ।। ५० ।। सुत्वा- आत्मसुखरूप सागरात स्नान करणारे प्रभु सुत्वा होत ॥ ५१ ॥ सुत्रामपूजित- सुत्रामइन्द्राकडून पूजितः पूजा केली गेलेल्या प्रभूला सुत्रामपूजित म्हणतात ।। ५२ ।। ऋत्विग् ज्ञानादि गुणांची पूजा करणारामध्ये मुख्य आचार्य ॥ ५३॥ यज्ञपति- आत्मयज्ञाचा स्वामी ।। ५४ ।। यज्य- इन्द्राकडून पूज्य झालेला ।। ५५ ॥ यज्ञाङ्गम्-पूजन करण्याचे साधन-सामग्री असलेले प्रभु यज्ञाङ्ग होत ॥ ५६ ॥ अमृतं- प्रभु मरणरहित आहेत. म्हणून ते अमृत आहेत. संसारभोगाची तृष्णा नष्ट करणारे असल्यामुळे प्रभु अमृत आहेत ॥ ५७ ॥ हवि- आपल्या ज्ञानरूपी यज्ञात प्रभुंनी आपल्या अशुद्धीची हवि दिली अर्थात् अशुद्धतारूपी समिधा दग्ध केली ॥५८॥ Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ २८) महापुराण (२५-१२९ व्योममतिरमात्मा निर्लेपो निर्मलोऽचलः । सोममूतिः सुसौम्यात्मा सूर्यमूतिर्महाप्रभः ॥ १२८ मन्त्रविन्मन्त्रकृन्मन्त्री मन्त्रमूतिरनन्तगः । स्वतन्त्रस्तन्त्रकृत्स्वन्तः कृतान्तान्तः कृतान्तकृत् ॥१२९ व्योममूर्ति- हे प्रभो, आपण आकाशाप्रमाणे निर्मलमूर्ति आहात अथवा लोकाकाश अलोकाकाशाप्रमाणे केवलज्ञानाने सर्वत्र व्यापून राहिलेले आहात ।। ५९ ।। अमूर्तात्मा- अमूर्तात्मा म्हणजे आकाशाप्रमाणे अमूर्तस्वरूपाचे आहात ।। ६० ।। निर्लेप- आपण कर्ममलकलंकाने रहित आहात. अथवा निर्गतःलेपआहारो अस्य- आपणास आहार नाही, अनन्तसुखी आहात. म्हणून भुकेची बाधा आपणास नाही. कवलाहारग्रहण आपणास नाही ।। ६१ ।। निर्मल- विष्ठा मूत्रादिकांनी रहित असे शरीर प्रभूचे असते अथवा मल म्हणजे पापकर्मे त्यांनी प्रभु रहित झाल्यामुळे ते निर्मल आहेत. अथवा निर्गता मा लक्ष्मीर्धनं येभ्यस्ते निर्मा निर्ग्रन्थमुनयः- धनाचा ज्यांनी त्याग केला आहे असे निर्ग्रन्थ मुनि त्यांना निर्मा म्हणतात. तान् लाति स्वीकरोति त्यांचा प्रभुंनी स्वीकार केला आहे म्हणून त्यांना निर्मल म्हणतात ।। ६२ ।। अचल- सर्वदा निश्चयाने स्थिर असणारा ।। ६३ ॥ सोमति- प्रभ चंद्राप्रमाणे शान्त आहेत. म्हणन ते सोममति आहेत ।। ६४ ॥ सुसौम्यात्मा- प्रभु सौम्यस्वभावाचे क्रूरतारहित आहेत । ६५ ।। सूर्यमूर्तिप्रभुंचा देह सूर्याप्रमाणे कान्तिमान् आहे म्हणून ते सूर्यमूर्ति आहेत ।। ६६ ।। महाप्रभ- प्रभु अपरिमित कान्तीचे धारक आहेत. केवलज्ञानरूपी तेजाचे धारक आहेत ।। ६७ ॥ ___ मन्त्रवित्- देवत्वादिकांची सिद्धि करून देणाऱ्या मंत्रांना प्रभु जाणतात. म्हणून ते मन्त्रज्ञ आहेत ॥ ६८ ॥ मन्त्रकृत्- मंत्र-प्रथमानुयोग, करणानुयोग, चरणानुयोग व द्रव्यानुयोग अशा शास्त्रांची रचना करणारे प्रभु आहेत. म्हणून ते मन्त्रकृत् समजावेत ।। ६९ ॥ मन्त्रीमंकाराचा अर्थ मन आहे व त्रकाराने मनाचे रक्षण करणे हा अर्थ सिद्ध होतो. मनाचा उपयोग आत्मचिन्तनाकडे प्रभु करतात. म्हणून ते मन्त्री आहेत ॥ ७० ॥ मात्रमूर्ति- णमो अरिहंताणं' हा सप्ताक्षरी मंत्र अरिहंताचा वाचक आहे. प्रभु मन्त्रस्वरूपी आहेत. म्हणून ते मन्त्ररूपी मन्त्रमूर्ति आहेत. अथवा मंत्र म्हणजे स्तुति. भगवन्ताची स्तुति करणारे भक्त भगवंतांना प्रत्यक्ष पाहतात म्हणून भगवान् मन्त्रमूर्ति आहेत ॥ ७१ ॥ अनन्तग- अनन्त-म्हणजे मोक्ष व आकाश, भगवान् आकाशातून विहार करतात व सर्व कर्माचा क्षय करून मोक्षाला जातात म्हणून ते 'अनन्तग' आहेत ॥७२॥ स्वतन्त्र- स्व-आत्मा आणि तन्त्र-शरीर आत्मा हाच त्यांचे शरीर आहे म्हणून प्रभूना स्वतन्त्र म्हणावे किंवा स्व-आत्मा हेच तन्त्र अवश्य कर्तव्य आहे किंवा आत्मा हेच ज्याचे इहलोक व परलोकरूपी द्वयर्थ- दोन अर्थ- प्राप्त करून घेणेचे साधन आहे अथवा स्व-आत्मा हाच तंत्र सिद्धान्त ज्यांचा आहे असे प्रभु आहेत ।। ७३ ॥ तन्त्रकृत्तंत्र शास्त्रं तन्त्र म्हणजे शास्त्र त्याची रचना करणारे प्रभु तंत्रकृत् आहेत ॥ ७४ ॥ स्वन्तज्याचा अन्त शेवट सु-सुंदर आहे असे प्रभु आहेत. अर्थात् सुन्दर शेवट म्हणजे मोक्षप्राप्ति ज्यांना होते असे प्रभु स्वन्त आहेत ।। ७५ ॥ कृतान्तान्त- कृतान्त म्हणजे सिद्धान्त त्याचा शेवट प्रभुंनी प्राप्त करून घेतला म्हणून ते कृतान्तान्त आहेत ॥ ७६ ॥ कृतान्तकृत्- कृतान्तपुण्यकृत्य ते करणारे प्रभु कृतान्तकृत् आहेत ।। ७७ ।। Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१३१) महापुराण (२९ कृती कृतार्थः सत्कृत्यः कृतकृत्यः कृतक्रतुः । नित्यो मृत्युञ्जयोऽमृत्युस्मृतात्मामृतोद्भवः ॥१३० ब्रह्मनिष्ठः परब्रह्म ब्रह्मात्मा ब्रह्मसम्भवः । महाब्रह्मपतिब्रह्मैट् महाब्रह्मपदेश्वरः ॥ १३१ कृती- निदानदोषाने रहित पुण्य-ज्यांनी उपाजिले आहे असे प्रभु कृती होत. अथवा कृती- विद्वान् अनन्तज्ञानादिचतुष्टयाने युक्त असे प्रभु कृती होत ।। ७८ ॥ कृतार्थ- धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ज्यांनी सिद्ध केले आहेत असे प्रभु कृतार्थ होत ।। ७९ ॥ सत्कृत्य- ज्यांनी प्रजापालनकृत्य उत्तम रीतीने केले आहे असे प्रभु सत्कृत्य होत ॥ ८० ।। कृतकृत्य:- ज्यानी आत्मकार्य केले आहे ते कृतकृत्य होत. अथवा केले आहे, कृत्य पुण्यकार्य ज्यांनी असे प्रभु कृतकृत्य होत ।। ८१ ॥ कृतऋतु- केली आहे ऋतुः पूजा इन्द्रादिकांनी ज्यांची असे प्रभु कृतऋतु आहेत ।। ८२ ।। नित्य- नेहमी प्रभूचे अस्तित्व राहतेच म्हणून ते नित्य आहेत ।। ८३ ।। मृत्युञ्जय- प्रभुंनी मृत्यूला जिंकून मोक्ष प्राप्त करून घेतला म्हणून ते मृत्युञ्जय आहेत ।। ८४ ।। अमृत्यु-प्रभूना मरण नसल्यामुळे ते अमृत्यु-मृत्युरहित आहेत ।। ८५।। अमृतात्मा- मरणरहित आत्मस्वरूप असल्यामुळे प्रभु अमृतात्मा आहेत ।। ८६ ।। अमृतोद्भवजेथे मरण नाही असे स्थान-मोक्ष आहे व तो मोक्ष भव्यांना ज्यांच्यापासून मिळतो अशा प्रभूना अमृतोद्भव म्हणतात. अथवा मृत-मरण व उद्भव-जन्म हे दोन्ही प्रभूस नसल्यामुळे प्रभु अमृतोद्भव आहेत ॥ ८७॥ ब्रह्मनिष्ठ- ब्रह्म-केवलज्ञान त्यांत जे पूर्णपणे राहतात असे प्रभु ब्रह्मनिष्ठ आहेत ॥८८॥ परं ब्रह्म-परं उत्कृष्ट असे ब्रह्म-केवलज्ञान हेच प्रभूचे स्वरूप आहे ।। ८९ ॥ ब्रह्मात्माकेवलज्ञानादिक गुण ज्यांचे ठिकाणी वाढतात त्याला ब्रह्म म्हणतात. प्रभूचा आत्मा वरील गुणांनी युक्त आहे म्हणून त्याना ब्रह्मात्मा म्हणतात ॥ ९० ॥ ब्रह्मसम्भव- चारित्र, ज्ञान व मोक्ष यांना ब्रह्म म्हणतात व यांची उत्पत्ति व जगात प्रसिद्धि प्रभूपासून झाली म्हणून प्रभूला ब्रह्मसंभव हे नांव आहे ।। ९१ ॥ महाब्रह्मपति- मतिज्ञानापासून मनःपर्यय ज्ञानापर्यन्त चार ज्ञानांना ब्रह्म म्हणतात व पाचवे केवलज्ञान हे महाब्रह्म आहे अशा महाब्रह्म केवलज्ञानाचे प्रभु स्वामी आहेत म्हणून त्यांना महाब्रह्मपति म्हणतात. अथवा सिद्धपरमेष्ठी हे महाब्रह्म आहेत कारण तीर्थकर दीक्षेच्यावेळी नमः सिद्धेभ्यः म्हणून दीक्षा घेतात. यास्तव सिद्धपरमेष्ठी ज्यांचे स्वामी आहेत असे प्रभु महाब्रह्मपति समजावेत. अथवा गणधर, लौकान्तिक देव व अहमिन्द्र यांना महाब्रह्म म्हणावे त्यांचे हे आदिजिनेश्वर पति आहेत म्हणून ते महाब्रह्मपति होत ॥ ९२॥ ब्रह्मेट ब्रह्म- म्हणजे ज्ञान, चारित्र व मोक्ष त्यांचे आदिजिन ईदं- स्वामी आहेत म्हणून प्रभूना ब्रह्मेट म्हणतात ।। ९३ ॥ महाब्रह्मपदेश्वर- महाब्रह्म म्हणजे गणधरादिक ते प्रभूच्या चरणांचा आश्रय घेतात म्हणून प्रभू त्या गणधरादिकाचे प्रभू आहेत. अथवा महाब्रह्मपद म्हणजे समवसरण त्याचे प्रभु ईश्वर स्वामी आहेत म्हणून प्रभूस महाब्रह्मपदेश्वर म्हणतात ॥ ९४ ॥ Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०) महापुराण सुप्रसन्नः प्रसन्नात्मा ज्ञानधर्मदमप्रभुः । प्रशमात्मा प्रशान्तात्मा पुराणपुरुषोत्तमः ॥ १३२ ४ महाशोकादिशतक महाशोकध्वजोऽशोकः कः स्रष्टा पद्मविष्टरः । पद्मशः पद्मसम्भूतिः पद्मनाभिरनुत्तरः ।। १३३ ( २५-१३२ सुप्रसन्न - प्रभु अतिशय प्रसन्नमुख असतात म्हणून त्यांना सुप्रसन्न म्हटले आहे ।। ९५ ।। प्रसन्नात्मा - प्रसन्न -निर्मल आत्मा - स्वभाव ज्यांचा आहे असे प्रभु प्रसन्नात्मा होत, निर्मल आत्मा होत ।। ९६ ।। ज्ञानधर्मदमप्रभु - ज्ञान - केवलज्ञान - धर्म - दया हे स्वरूप ज्याचे तो धर्म व दमतपश्चरणाचे क्लेश सहन करणे या ज्ञानधर्मदमांचे जिनेश्वर प्रभु आहेत ।। ९७ ।। प्रशमात्माकामक्रोध आदि विकारांचा अभाव असणे त्यास प्रशम म्हणतात. तो प्रथम आत्मा - स्वभाव ज्यांचा आहे असे प्रभु प्रशमात्मा होत ॥ ९८ ॥ प्रशान्तात्मा - घाति-कर्माचा क्षय झाला म्हणजे प्रशान्ति उत्पन्न होते. अशा प्रशान्तीने युक्त भगवान् झाले म्हणून त्यांना प्रशान्तात्मा म्हणतात ॥ ९९ ॥ पुराणपुरुषोत्तम - जो प्रभु आदिजिन प्राचीन व त्रैसष्टलक्षण - पुरुषात उत्तम आहे व प्रसिद्ध आहे म्हणून त्याला पुराणपुरुषोत्तम म्हणतात. अथवा पुरे - परमोदारिक शरीरात अनिति - मोक्षाला जाईपर्यन्त जीवति निवास करतो असा जो तो पुराण होय. पुराण असा जो पुरुषोत्तम आत्मा तो पुराणपुरुषोत्तम होय. अर्थात् जीवन्मुक्त आदिजिनेशाला पुराणपुरुषोत्तम म्हणतात. याप्रमाणे स्थविष्ठादिशतक संपले ।। १०० ॥ महाशोकध्वज- मोठा अशोक वृक्ष हा ज्यांचा ध्वज - चिह्न आहे असे प्रभु महाशोकध्वज या नांवाने संबोधले जातात ।। १ ।। अशोक- शोक पुत्र - मित्र व पत्नी इत्यादिकाविषयी शोक ज्यांना कधीही झाला नाही असे प्रभु अशोक या अन्वर्थक नावाने युक्त आहेत ॥ २ ॥ कः- पुण्याचे वर्णन करणारे प्रभू कः या नावाने ओळखले जातात ॥ ३ ॥ स्रष्टा- जे पापी लोक निंदा करतात त्यांना नरकगतीत व पशुगतीत प्रभु उत्पन्न करतात. मध्यस्थ लोक स्तुति व निंदा करीत नाहीत, त्यांना प्रभु मानव-गतीत उत्पन्न करतात. जे स्तुति व पूजन करतात त्याना प्रभु देव-गतीत उत्पन्न करतात आणि जे प्रभूचे ध्यान करतात त्याना प्रभु मुक्तावस्था देतात ।। ४ ।। पद्मविष्टर - प्रभु समवसरणात सहस्रदलकमलाकृति सिंहासनावर बसतात त्यामुळे त्यांना पद्मविष्टर हे नांव आहे. ते कमल एक योजन प्रमाणाचे असते व त्याला सोन्याच्या हजार पाकळ्या असतात ॥ ५ ॥ प्रमेश प्रभु पद्मनामक निधीचे स्वामी आहेत म्हणून त्यांना पद्मेश म्हणतात ।। ६ ।। पद्मसम्भूति- कमलांची उत्पत्ति ज्यांच्यापासून होते अशा प्रभूना पद्मसंभूति हे नाव आहे. अशा कमलावरून प्रभूचा विहार धर्मोपदेशासाठी होत असतो ।। ७ ।। पद्मनाभ - प्रभूची बेंबी कमलाप्रमाणे सुन्दर असते म्हणून त्यांना पद्मनाभि म्हणतात ।। ८ ।। अनुत्तर - प्रभुपेक्षा श्रेष्ठ कोणीच असत नाही म्हणून प्रभु अनुत्तर- सर्वापेक्षा उत्कृष्ट असतात ।। ९ ।। Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१३६) महापुराण पद्मयोनिर्जगद्योनिरित्यः स्तुत्यः स्तुतीश्वरः । स्तवना) हृषीकेशो जितजेयः कृतक्रियः ॥ १३४ गणाधिपो गणज्येष्ठो गुण्यः पुण्यो गणाग्रणीः । गुणाकरो गुणाम्भोधिर्गुणशो गुणनायकः ॥१३५ गुणादरी गुणोच्छेदी निर्गुणः पुण्यगीर्गुणः । शरण्यः पुण्यवाक्पूतो वरेण्यः पुण्यनायकः ॥ १३६ पद्मयोनि: पद्मा-लक्ष्मीची उत्पत्ति प्रभुपासून झाली म्हणून प्रभु पद्मयोनि आहेत ॥१०॥ जगत्योनि- धर्मरूप प्रभु जगताच्या उत्पत्तीचे कारण आहेत म्हणून त्यांना जगयोनि म्हणता येते ।। ११ ।। इत्य- प्रभूचे स्वरूप ज्ञानाने जाणले जाते म्हणून ते इत्य आहेत. ( इ धातूचा अर्थ जाणे असा आहे व जे गत्यर्थ धातु ते ज्ञानार्थकही मानले जातात ) ॥ १२ ॥ स्तुत्य- प्रभु स्तुतीस पात्र आहेत म्हणून ते स्तुत्य आहेत ।। १३ ॥ स्तुतीश्वर- प्रभु स्तुतीचे ईश्वर आहेत अथवा ज्यांची स्तुति करण्यास इन्द्रादिक समर्थ होतात असे प्रभु आहेत ॥ १४ ॥ स्तवनाहप्रभु स्तुतीला योग्य आहेत कारण ते गुणवान् व दोषरहित आहेत ॥ १५॥ हृषीकेश- हृषीकइन्द्रियाना ईश वश करणारे अर्थात् जितेन्द्रिय प्रभु आहेत ॥१६॥ जितजेय- प्रभूनी जिंकण्यास योग्य अशा कामक्रोधादिकांना जिकले आहे म्हणन ते जितजेय होत ।। १७ ॥ कृतक्रियप्रभूनी घातिकर्माचा नाश करण्याची क्रिया पूर्ण समाप्त केली म्हणून ते कृतकृत्य झाले ।। १८॥ गणाधिप- बारा प्रकारचा जो संघ त्याचे प्रभु अधिप स्वामी आहेत ॥ १९ ॥ ज्येष्ठ-बारागणामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ प्रभु आहेत ।। २० ॥ गुण्य- गुण प्राप्त करून घेणाराचे हित करणारे अथवा चौयाऐंशी लक्ष गुणात जे तत्पर आहेत असे ॥ २१ ॥ पुण्य- प्रभु गुणादिकांनी शोभतात म्हणून ते पुण्य आहेत ॥ २२॥ गणाग्रणी- बारागणामध्ये प्रभु प्रधान मुख्य आहेत ॥ २३ ॥ गुणाकर- प्रभु केवलज्ञानादि गुणांचे उत्पत्तिस्थान आहेत व चौ-याऐंशी लक्ष गुणांचे उत्पत्तिस्थान आहेत. अथवा प्रभु अरिहंत अवस्थाधारक असल्यामुळे अरिहन्ताच्या शेहेचाळीस गुणांचे धारक आहेत ।। २४ ।। गुणाम्भोधि- प्रभु चौयाऐंशी लक्ष गुणांचे सागर आहेत ॥ २५ ॥ गुणज्ञ- गुणांना जाणणारे आहेत ।। २६ ॥ गणनायक- प्रभु बारागणांचे नायक स्वामी आहेत ॥ २७ ॥ गुणादरी- सत्वादि गुणांचे ठिकाणी प्रभु प्रेम करतात म्हणून ते गुणादरी होत ॥२८॥ गुणोच्छेदी- गुणांचा-इन्द्रियांचा उच्छेद नाश करणारे अथवा गुणांचा क्रोध, राग द्वेषादिकांचा नाश करणारे असे प्रभु ॥ २९॥ निर्गुण- निश्चित केवलज्ञानादि गुण ज्यांच्या ठिकाणी आहेत असे अथवा ज्यांच्यापासून राग, द्वेष, मोह, क्रोधादिक अशुद्ध गुण निघून गेले आहेत असे अथवा निर्गुण म्हणजे तन्तु ज्याच्यापासून निघून गेले आहेत अर्थात् वस्त्ररहित असे प्रभु आहेत अथवा निर् म्हणजे खालच्या अवस्थेत असलेले जे भव्य जीव त्याना गुणयुक्त करणारे प्रभु आहेत. अर्थात् आपली भक्ति करणा-या भव्य जीवाना आपल्यासारखे गुणयुक्त प्रभु करतात ॥ ३० ॥ पुण्यगी-प्रभूची वाणी पवित्र करणारी आहे म्हणून प्रभु पुण्यगी आहेत ।। ३१॥ गुण- सर्व भव्य समूहात प्रभु गुणश्रेष्ठ आहेत ।। ३२ ॥ शरण्य- भगवान् संसारदुःख नष्ट करणारे आहेत म्हणून ते शरण्य-रक्षण करणारे- भय नाहीसे करणारे आहेत ॥ ३३ ॥ पुण्यवाक्- भगवान् Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२) महापुराण (२५-१३९ अगण्यः पुण्यधीगण्यः पुण्यकृत्पुण्यशासनः । धर्मारामो गुणग्रामः पुण्यापुण्यनिरोधकः ॥ १३७ पापापेतो विपापात्मा विपाप्मा वीतकल्मषः। निर्द्वन्द्वो निर्मदः शान्तो निर्मोही निरुपद्रवः ॥१३८ निनिमेषो निराहारो निष्कियो निरुपप्लवः । निष्कलङको निरस्तैना निर्धूतागो निरास्त्रवः ॥ १३९ ............................ पुण्यकर्माचे कथन करणारे आहेत अर्थात् सवैद्यकर्म, शुभायु, शुभनाम आणि उच्चगोत्र या पुण्य कर्माचे स्वरूप सांगणारे आहेत ।। ३४ ॥ पूत- प्रभु पूत पवित्र झालेले आहेत ॥ ३५ ॥ वरेण्य- प्रभु मुक्तिलक्ष्मीला वरणारे आहेत ॥ ३६॥ पुण्यनायक- पुण्यकार्याचे स्वामी आहेत ॥ ३७ ।। ___अगण्य- आदिप्रभु ज्यांचे गुण मोजण्यास अशक्य आहेत असे आहेत ॥ ३८ ॥ पुण्यधी- पुण्याने युक्त बुद्धि असल्यामुळे प्रभु पुण्यधी आहेत ।। ३९ ।। गण्य- बारा प्रकारच्या गणाचे हित करणारे ॥ ४० ॥ पुण्यकृत्- पुण्य केले असल्यामुळे प्रभु पुण्यकृत् आहेत ॥ ४१ ॥ पुण्यशासन-प्रभूचे शासन भक्तांना पुण्यवान् बनविणारे आहे ॥ ४२ ॥ धर्माराम- जो नरकात पडणा-या प्राण्याला धारण करितो त्याला धर्म म्हणतात. प्रभु अशा धर्माचा बगीचा आहेत ।। ४३।। गुणग्राम- प्रभु मूलगुण अठ्ठावीस व उत्तरगुण चौयाऐंशी लाख यांना धारण करतात म्हणून ते गुणग्राम-गुणांचा समूह धारण करतात असे म्हटले जाते ।। ४४ ॥ पुण्यापुण्यनिरोधक- भगवान् पुण्य व अपुण्य-पाप या दोहोंचाही निरोध करतात, संवर करतात. जेव्हा ते संवर करतात तेव्हा त्याच्या ठिकाणी पुण्य येत नाही व पापही येत नाही ॥ ४५ ॥ पापापेत- पापरहित ।। ४६॥ विपापात्मा- पापरहित आत्मा ज्यांचा आहे असे प्रभ विपापात्मा होत ॥४७॥ विपाप्मा- नष्ट झाले आहे पाप ज्याचे असे प्रभ विपाप्मा- पापरहित आहेत ॥ ४८ ॥ वीतकल्मष- ज्यांचे पाप नष्ट झाले आहे असे ॥ ४९ ॥ निर्द्वन्द्व- प्रभु कलह रहित असल्यामुळे ते निर्द्वन्द्व आहेत ॥ ५० ॥ निर्मद- आठ प्रकारच्या गर्वानी रहित असे आहेत ।। ५१ ॥ शान्त- उपशम धारण केलेले ।। ५२ ॥ निर्मोह- निघून गेलेले आहे अज्ञान ज्यापासून असे प्रभु निर्मोह झाले ॥ ५३ ।। निरुपद्रव-प्रभूनी मुळापासून उपद्रवाचा अर्थात उपसर्गाचा नाश केला आहे ॥ ५४॥ निनिमेष- प्रभूच्या दोन डोळ्यांच्या पापण्या खाली वर होत नसल्यामुळे ते निनिमेष अर्थात् दिव्य नेत्रयुक्त आहेत ॥ ५५ ॥ निराहार- प्रभु कवलाहार घेत नाहीत अर्थात् ते अनन्त सुखी असल्यामळे जेवत नाहीत ।। ५६ ॥ निष्क्रिय- भगवान क्रिया-प्रतिक्रमणादिक क्रिया करीत नाहीत. कारण ते प्रमादरहित असल्यामुळे हिंसादिकदोषरहित आहेत ॥ ५७ ।। निरुपप्लव- भगवान् उपद्रव-उपसर्गादिक बाधांनी रहित असल्यामुळे दुःखरहित आहेत ॥५८॥ निष्कलङक- ते अपवादरहित आहेत ।। ५९ ॥ निरस्तैना- प्रभु पापरहित आहेत ॥ ६० ।। निर्धताग- ते अपराधरहित आहेत ।। ६१ ॥ निरास्रव- आत्म्यात नवीन कर्मे येण्याची जी मिथ्यात्व, अविरति, प्रमाद व कषाय कारणे त्यांनी रहित आहेत. म्हणून कर्माच्या आगमनाने रहित आहेत, निरास्रव आहेत ।। ६२ ।। Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१४२ ) विशाल विपुलज्योतिरतुलोऽचिन्त्य वैभवः । सुसंवृतः सुगुप्तात्मा सुभुत्सुनयतत्त्ववित् ॥ १४० एकविद्यो महाविद्यो मुनिः परिवृढः पतिः । धीशो विद्यानिधिः साक्षी विनेता विहतान्तकः ॥ १४१ पिता पितामहः पाता पवित्रः पावनो गतिः । त्राता भिषग्वरो वर्यो वरदः परमः पुमान् ॥ १४२ महापुराण ( ३३ विशाल - वि - विशिष्टशा- शांतीला लाति प्रभु धारण करतात म्हणून ते विशाल आहेत ।। ६३ ।। विपुलज्योति- विपुल- लोकालोकव्यापक असे ज्योति - केवलज्ञान ज्यांचे आहे ते प्रभु विपुलज्योति होत ॥ ६४ ॥ अतुल- ज्यांच्या गुणांची तुलना करणे शक्य नाही, ज्यांच्या गुणांना माप नाही असे प्रभु अतुल आहेत ।। ६५ ।। अचिन्त्यवैभव - प्रभूंच्या ऐश्वर्याचा थांग आमच्या मनाला लागत नाही असे प्रभु आहेत ॥ ६६ ॥ सुसंवृत- अतिशय संवराने युक्त प्रभु आहेत. कर्मांचे आस्रव - आगमन त्यांच्या ठायी होत नाही असे प्रभु आहेत ॥ ६७ ॥ सुगुप्तात्मा - अतिशय गुप्त व कर्मास्रवांचा प्रवेश ज्यात होत नाही व जो टाकीने खोदल्याप्रमाणे शुद्ध ज्ञापक स्वभावाला धारण करीत आहे असा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु सुगुप्तात्मा होत. मनोगुप्ति, वचनगुप्ति व कायगुप्तींनी युक्त प्रभूंचा आत्मा आहे. म्हणून त्यांना सुगुप्तात्मा म्हणतात ।। ६८ ।। सुभुत् - उत्तमरीतीने आत्महितकर उपदेश देणारे प्रभूंना सुभुत् म्हणतात ॥ ६९ ॥ सुनयतत्त्ववित्- नैगम, संग्रह, व्यवहार आदिक नयांनी जीवादिक तत्त्वांचे स्वरूप प्रभु जिनेश्वरांनी जाणले म्हणून ते सुनयतत्त्ववित् आहेत ।। ७० ।। एक विद्य- मुख्य केवलज्ञानरूपी विद्या प्रभूंनी धारण केली आहे ॥ ७१ ॥ महाविद्यप्रभूंची ही केवलज्ञानरूपी विद्या फार मोठी आहे. म्हणून ते महाविद्य आहेत ।। ७२ ।। मुनिमन्यते - प्रत्यक्ष प्रमाणाने सर्व चराचर जगताला प्रभु जाणतात म्हणून ते मुनि आहेत ॥ ७३ ॥ परिवृढ - चोहोबाजूंनी वाढलेले ज्ञानादि गुणांनी पूर्ण झालेले ॥ ७४ ॥ पति- पातीति पतिःसंसारदुःखापासून प्राणिसमूहाचे रक्षण प्रभु करतात. म्हणून ते पति आहेत. अथवा विषयकषायापासून त्यांनी आपल्या आत्म्याचे रक्षण केले म्हणून ते पति आहेत ।। ७५ ।। धीश - प्रभु बुद्धींचे स्वामी आहेत ॥ ७६ ॥ विद्यानिधि - ते स्वसमय- जैनमत व परसमय - अन्यमताच्या विद्यांचे निधि आहेत ७७ ।। साक्षी - त्रैलोक्याला प्रभु करतलरेखेप्रमाणे प्रत्यक्ष जाणतात म्हणून ते साक्षी आहेत ॥ ७८ ॥ विनेता - स्वधर्माचे आत्मधर्माचे शिक्षण जिनेश देतात. म्हणून ते विनेता ।। ७९ ।। विहतान्तक- त्यांनी अन्तकाचा मृत्यूचा नाश केला म्हणून वितान्तक आहेत ॥ ८० ॥ पिता - हे आदिजिना आपण दुर्गतीमध्ये भक्तांना पडू देत नाही व त्यांचे आपण रक्षण करता म्हणून पिता आहात ॥ ८१ ॥ पितामह - आपण सर्वांचे उत्पादक आहात म्हणून पितामह आहा ॥ ८२ ॥ पाता - आपण दुःखापासून रक्षण करता यास्तव आपण पाता आहा ॥ ८३ ॥ पवित्र - आपण भक्तांना पवित्र करता ।। ८४ ॥ पावन - आपण जगताला पवित्र करता म्हणून पावन आहात ॥ ८५ ॥ गति - आपण ज्ञानस्वरूप आहा अथवा सर्वांचे दुःख नाहीसे करण्यास समर्थ आहात. सर्वाना आपण शरण- रक्षक आहा ॥ ८६ ॥ त्राता - आपण म. ५ Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४) महापुराण (२५-१४३ कविः पुराणपुरुषो, वर्षीयान् ऋषभः पुरुः । प्रतिष्ठाप्रभवो हेतुर्भुवनैकपितामहः ॥ १४३ श्रीवृक्षलक्षणः श्लक्ष्णो लक्षण्यः शुभलक्षणः । निरक्षः पुण्डरीकाक्षः पुष्कलः पुष्करेक्षणः ॥१४४ रक्षण करता म्हणून त्राता ॥ ८७ ।। भिषग्वर- आपण वैद्यात श्रेष्ठ आहात. जन्मापासून रोगपीडित प्राण्यांनी आपले नामस्मरण केले तरीही त्यांच्या रोगांचा नाश करता. कुष्ठी रोग्यांचे शरीर सोन्याप्रमाणे करता. जन्मजरामरणांना मुळापासून उपटून टाकता. म्हणून आपण श्रेष्ठ वैद्य आहात ।। ८८ ।। वर्य- मक्तिलक्ष्मीने आपण वरण्यास योग्य आहात. अथवा सेवेसाठी आलेल्या देवेन्द्रादिकाकडून आपण आदराने वेढले जाता. अथवा आपण मुख्य असल्यामुळे आपणास वर्य म्हणतात ॥ ८९ ॥ वरद- अभीष्ट अशा स्वर्गमोक्षाला आपण देता म्हणून वरद आहात ।। ९० ॥ परम- भक्तांच्या मनाला आवडणारे पदार्थ आपण देता, धनादिक आपण देता म्हणून परम आहात ।। ९१ ॥ पुमान् पले अनसरण करणाऱ्या त्रैलोक्यात असलेल्या भक्तजनसमूहाला आपण पवित्र करता म्हणून पुमान् आहात ।। ९२ ।। कवि-धर्माधर्माचे स्वरूप आपण सांगता म्हणून कवि आहात ।। ९३ ।। पुराणपुरुषअतिशय प्राचीन असे आपण पुरुष आत्मा आहात ॥ ९४ ॥ वर्षीयान्- आपण प्राचीन असल्यामुळे अतिशय वृद्ध आहात ।। ९५ ।। ऋषभ- ऋषति जगज्जानातीति भातिच आपण सर्व जगाला जाणता व त्यामुळे शोभता म्हणून ऋषभ आहात ।। ९६ ॥ पुरु- आपण सर्वांचे पालन करता म्हणून आपण पुरु-मोठे महान् आहा ।। ९७ ।। प्रतिष्ठाप्रभव- आपल्याठिकाणी स्थैर्याची उत्पत्ति झाली आहे. अर्थात् आपले शुद्धस्वरूप नेहमीच स्थिर राहणारे आहे ॥ ९८ ।। हेतुहि गतौ हिनोति जानातीति हेतु - आपण सर्व जगाला जाणता म्हणून हेतु आहात ॥ ९ ॥ भुवनैकपितामह- आपण त्रैलोक्यातील सर्व भव्यलोकांचे पितामह-आजोबा आहा ॥ १०० ॥ श्रीवृक्षलक्षण- अशोकवृक्ष हे प्रभूचे लक्षण आहे. कारण समवसरणात अशोकवृक्षाच्या खाली जिनदेव विराजमान झालेले असतात व त्यांना दूरूनच पाहून भव्यलोक प्रभूना ओळखतात म्हणून भगवंतांना श्रीवृक्षलक्षण म्हणतात ॥ १॥ श्लक्ष्ण- अनन्तज्ञानादि-लक्ष्मीने आलिंगिलेले प्रभु श्लक्ष्ण या नांवाने शोभतात ।। २॥ लक्षण्य- आठ महाव्याकरणात प्रभु कुशल असतात. म्हणून ते लक्षण्य आहेत ।। ३ ।। शुभलक्षण- भगवंतांच्या हातावर व पायावर श्रीवृक्ष, शंख, कमळ, स्वस्तिक वगैरे १०८ शुभ लक्षणे असतात. म्हणून शुभलक्षण हे त्यांना अन्वर्थक नांव आहे ।। ४ ॥ निरक्ष- ज्यांना इन्द्रियापासून ज्ञान होत नाही असे अर्थात् आत्म्यात प्रकट झालेल्या केवलज्ञानाने प्रभु सर्व चराचरांना जाणतात ॥ ५॥ पुण्डरीकाक्षपुण्डरीक- कमलाप्रमाणे डोळे ज्यांचे आहेत असे प्रभु पुण्डरीकाक्ष होत ॥ ६ ॥ पुष्कल- प्रभु गुणांनी पूर्ण व श्रेष्ठ असल्यामुळे त्यांचे पुष्कल हे नांव आहे ॥ ७॥ पुष्करेक्षण- पुष्करकमलाप्रमाणे ईक्षण डोळे ज्यांचे आहेत असे प्रभु पुष्करेक्षण होत ॥ ८ ।। Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१४७) महापुराण (३५ सिद्धिदः सिद्धसङ्कल्पः सिद्धात्मा सिद्धसाधनः । बुद्धबोध्यो महाबोधिर्वर्धमानो महद्धिकः ॥१४५ वेदाङ्गो वेदविद्वंद्यो जातरूपो विदांवरः । वेदवेद्यः स्वसंवेद्यो विवेदो वदतांवरः॥ १४६ अनादिनिधनो, व्यक्तो, व्यक्तवाग्व्यक्तशासनः । युगादिकृयुगाधारो युगादिर्जगदाविजः ॥१४७ सिद्धिद- सिद्धि- आत्म्याच्या अनंतज्ञानादि गुणांची परिपूर्णता भक्तांना देतात म्हणून प्रभु सिद्धिद आहेत ॥ ९॥ सिद्धसङ्कल्प- सर्वसंकल्प सिद्ध झाल्यामुळे ते सिद्धसङ्कल्प आहेत ।। १०॥ सिद्धात्मा- जिनदेवाचा आत्मा सिद्धस्वरूपाला प्राप्त झाला. म्हणून ते सिद्धात्मा ॥ ११ ।। सिद्धसाधन- सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र ही सिद्धीची-मोक्षाची साधने आपणास पूर्ण प्राप्त झाली आहेत. म्हणून आपण सिद्धसाधन आहात ॥१२।। बुद्धबोध्योप्रभूनी जाणण्यास योग्य अशी आत्मादिकांची स्वरूपं जाणली आहेत. म्हणून ते बुद्धबोध्य आहेत ॥ १३ ॥ महाबोधि- वैराग्य व रत्नत्रय प्राप्तीला बोधि म्हणतात. हे दोन ज्यांना फार मोठे प्राप्त झाले आहेत असे प्रभु महाबोधि होत ॥ १४ ॥ वर्धमान- ज्यांच्याठिकाणी अव- सर्व बाजूंनी ज्ञान व पूजा हे वृद्धिंगत झाले आहेत असे प्रभु वर्धमान होत ।। १५ ॥ महद्धिकमोठमोठ्या बुद्धि, तप, विक्रिया आदिक ऋद्धींना प्रभूनी धारण केले आहे. म्हणून ते महद्धिक होत ॥ १६ ॥ वेदाङ्ग- शिक्षा, कल्प, व्याकरण, छन्द, ज्योतिष आणि निरुक्त ही वेदांची सहा अंगे वैदिक मानतात. जैनमतात वेद म्हणजे ज्ञान व तन्मय- अंग म्हणजे आत्मा ज्यांचा असे जे जिनेश्वर त्यांना वेदाङ्ग म्हणावे. अथवा वेद म्हणजे केवलज्ञान त्याची भव्यांना प्राप्ति होण्यास अंग उपाय तो जिनेश्वरापासून मिळतो. म्हणून जिनेश्वराला वेदाङ्ग म्हणतात ॥ १७ ॥ वेदवित्- स्त्रीवेद, पुरुषवेद व नपुंसकवेद या तीन वेदांचे स्वरूप जिनेन्द्र जाणतात म्हणून ते वेदवित् आहेत. पुरुषसेवनाची अभिलाषा होणे तो स्त्रीवेद, स्त्रीसेवनाची अभिलाषा तो पुरुषवेद व उभयांची अभिलाषा होणे तो नपुंसकवेद. अथवा शरीरापासून आत्मा भिन्न आहे असे ज्याने जाणता येते त्याला वेद म्हणतात. अर्थात् भेदज्ञानाला वेद म्हणतात. ते भेदज्ञान ज्यांनी जाणले आहे त्या जिनपतीला वेदवित् म्हणावे ॥ १८ ॥ वेद्य- जिनदेव नित्यज्ञानात नियुक्त आहेत, ज्ञानमय आहेत किंवा योगिजनाकडून नेहमी ते जाणण्यास योग्य आहेत ॥ १९ ॥ जातरूपजन्मसमयाचे रूप ज्यांचे आहे असे अर्थात् नग्नरूप प्रभूचे आहे ॥ २० ॥ विदांवरविद्वज्जनात श्रेष्ठ ॥ २१॥ वेदवेद्य- जिनदेव वेदाने-ज्ञानाने वेद्य- जाणण्यास योग्य आहेत ॥ २२ ॥ स्वसंवेद्य- आत्म्याच्याद्वारे उत्तमरीतीने जिनेश्वर जाणले जातात. इन्द्रियज्ञानाने जिनेश्वरांचे बाह्य शरीर जाणले जाईल. पण आत्मज्ञानाने जिनेश्वर जाणले जातात ॥ २३ ॥ विवेद- विशिष्ट ज्ञानी-केवलज्ञानी ॥ २४ ॥ वदतांवर- वदतां- तार्किक लोकामध्ये वरःश्रेष्ठ प्रभु आहेत ॥ २५ ॥ अनादिनिधन- प्रभूना आदि-जन्म व निधन-मरण हे नाहीत. म्हणून ते अनादिनिधन आहेत. अथवा अनस्य-जीवितस्य आदिः जन्म तत्पर्यन्तं- जीविताचा आदिभाग म्हणजे जन्म, Page #47 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६) महापुराण (२५-१४८ अतीन्द्रोऽतीन्द्रियोधीन्द्रो महेन्द्रोऽतीन्द्रियार्थदृक् । अनिन्द्रियोऽहमिन्द्रार्यो महेन्द्रमहितो महान् ॥ उद्भवः कारणं कर्ता पारगो भवतारकः । अगायो गहनं गुह्यं पराद्धः परमेश्वरः ॥ १४९ अनन्तद्धिरमेद्धिरचियद्धिः समग्रधीः । प्राग्यः प्राग्रहरोऽभ्यनः प्रत्यग्रोऽग्योऽग्रिमोऽग्रजः ॥ १५० त्या जन्मापर्यन्त नि अतिशयेन धनं लक्ष्मीर्यस्य स अनादिनिधनः । नि म्हणजे अतिशय लक्ष्मी ज्यांच्याजवळ राहिली असे जिनेश्वर हे अनादिनिधन आहेत. भगवम्त समवसरणात राहून देखिल नवनिधिरूपलक्ष्मीने त्यांना सोडले नाही म्हणून ते अनादिनिधन आहेत ॥ २६ ।। व्यक्त- त्यांचे स्वरूप प्रकट आहे. अथवा ते अर्थाना-जीवादिकपदार्थांना व्यक्त करतात. म्हणून व्यक्त आहेत ।। २७ ।। व्यक्तवाक्- सर्व प्राण्यांना समजेल अशी स्पष्ट भाषा प्रभूची असते. ते स्पष्टार्थवादी असतात ।। २८ ।। व्यक्तशासन- व्यक्त-निर्मल-विरोधरहित प्रभूचे शासन-मत आहे ।। २९ ॥ युगादिकृत्- कृतयुगाचा प्रारंभ आदिभगवंतांनी केला म्हणून ते युगादिकृत् आहेत. आषाढकृष्णप्रतिपदेच्या दिवशी आदिभगवंतांनी कृतयुगाचा आरंभ केला व ते सर्व प्रजांचे स्वामी झाले ।। ३० ॥ युगाधार- भगवान् कृतयुगाचे मूलाधार आहेत ।। ३१ ।। युगादि- भगवान् कृतयुगाच्या आरंभी झाले म्हणून ते युगादि आहेत ।। ३२ ॥ जगदादिजजगातील प्राण्यांच्या आधी प्रभु जन्मले म्हणून ते जगदादिज आहेत ॥ ३३ ॥ अतीन्द्र- हे प्रभो, आपण आपल्या अतिशय प्रभावाने इन्द्राला उल्लंघिले असल्यामुळे त्याचे स्वामी झालेले आहात ॥ ३४ ।। अतीन्द्रिय- आपण इन्द्रियांना ओलांडले आहे. अर्थात् इन्द्रियज्ञानाने रहित आहात, केवलज्ञानी आहात ॥ ३५ ॥ धीन्द्र- धिया- केवलज्ञानाने आपण इन्द्र- परमात्मा झालेले आहात ।। ३६ ॥ महेन्द्र- आपण महान् इन्द्र आहात ।। ३७ ।। अतीन्द्रियार्थदृक्- आपण अतीन्द्रियार्थज्ञानाने-केवलज्ञानाने सर्व चराचरांना पाहता, जाणता ।। ३८ ॥ अनिन्द्रिय- आपणास स्पर्शनादिक पाच इन्द्रिये नाहीत. अर्थात् भावेन्द्रिये नाहीत. पण नामकर्माने उत्पन्न झालेल्या आकृतिरूप द्रव्येन्द्रियांनी युक्त आपण आहात ॥ ३९ ॥ अहमिन्द्राज़- नवग्रैवेयक, नवानुदिश आणि पंचानुत्तर येथील अहमिन्द्राकडून आपण पूजनीय झालेले आहात ॥ ४० ॥ महेन्द्रमहित- बत्तीस इन्द्रांनी आपण पूजिले आहात. भवनवासि दहा इन्द्र, व्यन्तरांचे आठ इन्द्र, ज्योतिरिन्द्र, चन्द्र व सूर्य हे दोन व स्वर्गीय बारा इन्द्र अशा बत्तीस इन्द्रांनी आपण पूजिले जाता ।। ४१ ।। महान्- महतीति महान्- अर्थात् आपण महान् सर्वपूज्य आहात ॥ ४२ ॥ उद्भव- उत्प्रधान-मुख्य श्रेष्ठ भव:जन्म- प्रभुंचा जन्म सर्वश्रेष्ठ आहे किंवा उत्उद्गतः भवः संसारः यस्य- ज्यांचा भवसंसार नष्ट झाला आहे असे ।। ४३ ।। कारणं- आपण मोक्षप्राप्तीला कारण आहात म्हणून आपणास कारण म्हणतात ।। ४४ ।। कर्ता- शुद्धभावांचे शुद्धोपयोगाचे आपण कर्ते आहात ।। ४५ ।। पारग- संसाराच्या पाराला अन्ताला आपण पोहोचलेले आहात ॥ ४६ ॥ भवतारक- पाच प्रकारच्या संसारापासून आपण भव्यांना तारता म्हणून भवतारक आहात ॥ ४७ ।। अगाह्यो- भगवंताच्या पार जाणे आम्हाला शक्य नाही Page #48 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१५३) महापुराण महातपा महातेजा महोदर्को महोदयः । महायशा महाधामा महासत्वो महाभूतिः ।। १५१ महाधैर्यो महावीर्यो महासम्पन्महाबलः । महाशक्तिर्महाज्योतिर्महाभूतिर्महाधुतिः ॥ १५२ महामतिर्महानीतिर्महाक्षान्तिर्महादयः । महाप्राज्ञो महाभागो महानन्दो महाकविः ॥ १५३ म्हणून भगवन्त अगाह्य आहेत ॥ ४८ ॥ गहनं- भगवंतांचे स्वरूपाचे अवगाहन योगीही करू शकत नाहीत. त्यांनाही ते अलक्ष्य स्वरूपाचे वाटतात ।। ४९ ।। गुह्यम्- योग्यांनाही प्रभूचे रहस्य उकलत नाही म्हणून ते गुह्य आहेत ॥ ५० ॥ परार्द्ध- प्रभु उत्कृष्ट अनन्तज्ञानादि गुणांनी समृद्ध आहेत ।। ५१ ॥ परमेश्वर- परमा उत्कृष्ट अशी जी मोक्षलक्ष्मी तिचे आदिभगवान् ईश्वर स्वामी आहेत ।। ५२ ।। अनन्तद्धि-अमेद्धि-अचिन्त्यद्धि- हे भगवंता, आपल्या ऋद्धि अनन्त आहेत, न मापता येणा-या आहेत आणि अचिन्त्य आहेत म्हणून आपण अनन्तद्धियुक्त अमेद्धियुक्त आणि अचिद्धियुक्त आहात ।। ५३-५४-५५ ॥ समग्रधी- हे प्रभो, आपले ज्ञान पूर्णावस्थेस पावले आहे अर्थात् आपले केवलज्ञान जितक्या मेयवस्तु जाणण्यास योग्य आहेत त्या सर्वांना पूर्ण जाणत आहे ।। ५६ ।। प्राग्य- आपण सर्वश्रेष्ठ मुख्य आहात म्हणून प्राग्य आहात ।। ५७ ॥ प्राग्रहरउत्कृष्ट असा श्रेष्ठपणा आपणच धारण करीत आहात म्हणून प्राग्रहर आहात ।। ५८ ॥ अभ्यनलोकांचा पुढारीपणा आपण लोकाभिमुख होऊन धारण केला आहे ॥ ५९ ।। प्रत्यग्र- आपण सर्व लोकात विलक्षण नवीनपणा धारण करीत आहात म्हणून प्रत्यग्र आहात ।। ६० ॥ अग्न्य- आपण सर्वांचे स्वामी आहात म्हणून आपणास अग्य म्हणतात ।। ६१ ।। अग्रिम- आपण सर्वांचे पुढारी आहात ॥ ६२ ॥ अग्रज- सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे आपण अग्रज आहात ॥ ६३ ॥ महातपा- अनशनादि बारा प्रकारचे महातप आपण केले म्हणून आपण महातपयुक्त आहात ॥ ६४ ।। महातेजा- मोठे तेज-पुण्य आपले आहे म्हणून आपण महातेज अ महोदर्क- सर्व कर्मांचा नाश होऊन आपणास पुढे मोक्षरूपमहाफलांची प्राप्ति होणार आहे म्हणून आपण महोदर्क आहात ॥ ६६ ॥ महोदय- आपल्या ठिकाणी महान तीर्थकरनामकर्माचा उदय होऊन गणधर व सामान्य केवलीपेक्षाही महान् लोकवन्द्यता आली आहे म्हणून आपण महोदय आहात. अथवा आपल्या ठिकाणी उत्-उत्कृष्ट अयः अत्यंत शुभ दैवाचा उदय झाला आहे. अथवा महान्- केव्हाही ज्याचा अस्त होणार नाही असा कर्मक्षयाने उत्पन्न झाला आहे. केवलज्ञानाचा उदय ज्यांचे ठिकाणी असे प्रभु महोदय आहेत. अथवा मह- तेज व दयाप्राणिमात्राविषयी करुणा ज्यांचे ठिकाणी असे प्रभु महोदय आहेत ॥६७ ॥ महायशा- प्रभूच्या पुण्ययुक्त गुणांची प्रशंसा कीर्ति चोहोकडे पसरली म्हणून प्रभु महायशोयुक्त आहेत ।। ६८ ।। महाघामा- फार मोठे ज्यांचे तेज आहे असे प्रभु महाधामा आहेत ॥ ६९ ॥ महासत्त्व- ज्यांचे चित्तबल मोठे आहे असे प्रभु महासत्त्व आहेत ।। ७० ।। महाधृति- मोठा धृति- संतोष धारण करणारे प्रभु महाधतियुक्त आहेत ।। ७१ ।। महाधैर्य- मोठे धैर्य ज्यांच्या ठिकाणी आहे, भय उत्पन्न झाले असताही व्याकुलता प्रभुंच्या चित्तात उत्पन्न होत नाही ॥७२॥ महावीर्य- फार मोठा तेजस्वीपणा प्रभूमध्ये आहे म्हणून ते महावीर्यवान् वणिले जातात ।। ७३ ॥ महासम्पत् Page #49 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८) महापुराण (२५-१५४ महामहा, महाकोतिर्महाकान्तिर्महावपुः । महादानो महाज्ञानो महायोगो महागुणः ॥ १५४ महामहपतिः प्राप्तमहाकल्याणपञ्चकः । महाप्रभुमहाप्रातिहार्याधीशो महेश्वरः ॥ १५५ महामुनिमहाध्यानी महामौनी महादमः । महाक्षमो महाशीलो महायज्ञो महामखः ॥ १५६ मोठी संपदा- समवसरणादिसंपत्ति ज्यांना प्राप्त झाली आहे असे ते प्रभु महासम्पदेने युक्त आहेत ।। ७४ ॥ महाबल- सर्व पदार्थांना जाणणारे केवलज्ञानरूपी बल प्रभूना प्राप्त झाले आहे. अथवा फार मोठे शरीरसामर्थ्य व निर्भयपणा यांनी युक्त प्रभु महाबलयुक्त आहेत ।।७५।। महाशक्ति- ज्यांच्या ठिकाणी फार मोठा उत्साह आहे असे प्रभु महाशक्तियुक्त होत ।। ७६ ।। महाज्योति- महा-मोठा ज्योतिः केवलज्ञानरूपी डोळा ज्यांना आहे असे प्रभु महाज्योति होत ॥ ७७ ।। महाभूति- मोठी भूति-सम्पत्ति ज्यांना प्राप्त झाली आहे असे प्रभु महाभूतियुक्त होत ॥७८ ॥ महाद्युति- मोठी कांति-शोभा ज्यांच्या ठिकाणी आहे असे प्रभु महाद्युतीचे धारक होत ।। ७९ ॥ महामति- मोठी बद्धि ज्यांची आहे असे प्रभु ।। ८० ॥ महानीति- महान्यायाचे पालन करणारे व त्याचे वर्णन करणारे ॥ ८१ ॥ महाक्षान्ति- फार मोठी क्षमा धारण करणारे ॥८२।। महादय- ज्यांच्या ठिकाणी प्राणिरक्षण करणारी मोठी दया आहे असे ॥८३॥ महाप्राज्ञ-मोठी प्रज्ञा-बुद्धिविशेष ज्यांच्या ठिकाणी आहे असे प्रभु महान् विवेकशील आहेत ॥८४॥ महाभाग- ज्यांना राजे मोठा करभाग देत असत असे अथवा ज्यांची महापूजा करून भक्त सेवा करतात असे ।। ८५ ॥ महानन्द- मोठा आनन्द-अनन्तसुख ज्यांना प्राप्त झाले आहे असे. अथवा महेन- ज्यांच्या चरणांची पूजा करण्याने भव्यांना आनंद प्राप्त होतो म्हणून प्रभु महानन्द आहेत ।। ८६ ॥ महाकवि- प्रभु सर्वश्रेष्ठ कवि आहेत म्हणून ते महाकवि होत ॥ ८७ ॥ महामहा- महा-मोठे महा-सतेज ज्यांचे आहे असे प्रभु महामहा होत ।। ८८ ॥ महाकोतिज्यांची मोठी कीर्ति आहे असे प्रभु महाकीर्तियुक्त होत ॥ ८९ ॥ महाकान्ति- ज्यांच्या शरीरात फार मोठी कान्ति शोभा आहे असे प्रभु ।। ९० ॥ महावपु- ज्यांचे शरीर महा-फार प्रशस्त आकृतीचे आहे असे प्रभु ॥ ९१ ।। महादान- ज्यांचे दान मोठे आहे अथवा ज्यांचे प्राणिरक्षण फार मोठे आहे ॥ ९२ ।। महाज्ञान- ज्यांचे ज्ञान-केवलज्ञान जगाला जाणणारे असल्यामुळे फार मोठे आहे ॥ ९३ ।। महायोग- ज्यांचा योग चित्ताला स्वस्वरूपात स्थिर करणारा फार मोठा आहे असे ॥ ९४ ॥ महागुण- फार मोठे अनन्तज्ञान, दर्शन, सुखशक्ति आदिक गुण ज्यांचे ठिकाणी आहेत असे प्रभु महागुणयुक्त आहेत ॥ ९५ ॥ महामहपतिफार मोठ्या पूजेचे-मेरुपर्वतावरील इन्द्रकृत महाभिषेकाचे प्रभु स्वामी आहेत ।। ९६ ॥ प्राप्तमहाकल्याणपञ्चक- गर्भावतार, जन्माभिषेक, दीक्षा घेणे, केवलज्ञानप्राप्ति व मोक्ष या पाच महाकल्याणांची प्राप्ति झाली. त्यामुळे प्राप्तमहाकल्याणपञ्चक या नांवाचे प्रभु धारक झाले ।। ९७ ॥ महाप्रभु- आदिजिनेश्वर हे महाप्रभु महास्वामी आहेत ॥ ९८॥ महाप्रातिहार्याधीश- महाऐश्वर्यरूप अशोकवृक्षादिक आठ पदार्थांचे प्रभु स्वामी आहेत ॥ ९९ ।। Page #50 -------------------------------------------------------------------------- ________________ २५- १५८) महाव्रतपतिर्मह्यो महाकान्तिधरोऽधिपः । महामैत्रीमयोऽमेयो महोपायो महोमयः ।। १५७ महाकारुणिको मन्ता महामन्त्री महायतिः । महानादो महाघोषो महेज्यो महसां पतिः ॥ १५८ महापुराण महेश्वर- फार मोठ्या योग्यतेचे जे गणधर, इन्द्रादिक त्यांचे प्रभु ईश्वर स्वामी आहेत म्हणून ते महेश्वर आहेत ॥। १०० ।। ( ३९ महामुनि - प्रभु महामुनि अर्थात् प्रत्यक्षज्ञानी आहेत ॥ १ ॥ महाध्यानी- धर्मध्यान व शुक्लध्यान या दोन ध्यानांना महाध्यान म्हणतात. त्या दोन ध्यानानीच त्यानी केवलज्ञान प्राप्त केले आहे म्हणून ते महाध्यानी आहेत ॥ २ ॥ महामोनी - भगवान् आदि जिनेश्वर महामोन धारक होते. त्यांनी एक हजार वर्षेपर्यन्त मौनानेच छद्मस्थावस्थेत विहार केला. इतकी वर्षे कोणी मौन धारण केले नव्हते || ३ || महादम- प्रभु मोठे तपः क्लेश सहिष्णु होते म्हणून ते महादमधारक होत. किंवा प्रभु महादान देण्यात लक्ष्मीचा त्यानी व्यय केला म्हणून महादमी होते ।। ४ ।। महाक्षम- प्रभूच्या ठिकाणी इतरात आढळून न येणारी अपूर्व क्षमा होती म्हणून ते महाक्षमावान् होते ।। ५ ।। महाशील - अहिंसादि पाच व्रतांचे रक्षण करण्यास उपाय असलेल्या अठरा हजार शीलांचे प्रभु पालक होते म्हणून ते महाशीलवान् साधु होते ।। ६ ।। महायज्ञ - ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अन्तराय या चार घातिकर्मरूपी समिधांचे ज्यात हवन केले जात आहे असा मोठा ज्ञानयज्ञ ज्यांचा आहे असे प्रभु महायज्ञकारी होत. अथवा ज्यांचे पूजन इन्द्रध रणेन्द्रादिकांनी केले असल्यामुळे व चन्दनादिक अनेक सामग्रीनी युक्त असल्यामुळे फार मोठे आहे असे प्रभु महायज्ञ नामाने शोभतात. अथवा केवलज्ञानरूपी महायज्ञ ज्यांचा आहे असे ।। ७ ।। महामख - पूज्य आहे मख - महायज्ञ ज्यांचा असे प्रभु महामख नावाने शोभतात ॥ ८ ॥ महाव्रतपति- अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, सर्वपरिग्रहांचा त्याग-नग्नता आणि रात्रि भोजन वर्जन या महाव्रतांचे पालक प्रभु महाव्रतपति होत ॥। ९ ॥ मह्य - महाव्रताचे पालक असल्यामुळे प्रभु मह्य-पूज्य आहेत ॥ १० ॥ महाकान्तिधरइतरात--इन्द्रादिकात न आढळणारी कान्ति शोभा प्रभूमध्ये आहे म्हणून ते महाकान्तिधर आहेत ।। ११ ।। अधिप- अधिकं पाति- सर्व जीवांचे अधिक रक्षण प्रभु करतात म्हणून ते अधिप आहेत अथवा अधिकं पिबति-लोकालोकं केवलज्ञानेन व्याप्नोति- लोक व अलोकाला ते पितात म्हणजे केवलज्ञानाने लोकालोकांना जाणतात ।। १२ ।। महामैत्रीमय - जगातील सर्व जीवांचे जीवन सुखमय असो अशा बुद्धीने प्रभु पूर्ण भरलेले आहेत म्हणून ते महामंत्रीमय होत ||१३|| अमेय - कोणत्याही परिमाणाने प्रभु आम्हा कडून मोजले जात नाहीत म्हणून ते अमेय आहेत ||१४|| महोपाय - सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान, सम्यक्चारित्र व तप हे मोक्षप्राप्तीचे महान् उपाय आहेत असे प्रभूंनी सांगितले म्हणून ते महोपाय आहेत ।। १५ ।। महोमय - मह - उत्सवाचे प्रभु मय बंधु आहेत. अथवा महसा ज्ञानेन निर्वृत्तः - ज्ञानाने पूर्ण प्रभु झाले म्हणून ते महोमय आहेत ।। १६ ।। Page #51 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०) महापुराण (२५-१५९ मवाध्वरधरो पर्यो महौदार्यो महिष्ठवाक् । महात्मा महसां धाम महषिर्महितोदयः ॥ १५९ महाफ्लेशाङकुशः शूरो महाभूतपतिर्गुरुः । महापराक्रमोऽनन्तो महाक्रोधरिपुर्वशी ॥ १६० महाभवाब्धिसन्तारी महामोहाद्रिसूदनः । महागुणाकरः क्षान्तो महायोगीश्वरः शमी ॥ १६१ महाकारुणिक- सर्वजीवाविषयी महादयाळ ।। १७ । मन्ता- मनुते जानातीति सर्व चराचरांना जाणणारे प्रभु मन्ता होत ॥ १८॥ महामन्त्र- ज्यांचा गुप्तवाद फार मोठा आहे. अशा प्रभुंना महामन्त्र असे म्हणतात ॥ १९ ॥ महायति- जे रत्नत्रय निरतिचारपणे धारण करण्याचा यत्न करतात अशा साधूंना यति म्हणतात. प्रभु ते रत्नत्रय महायत्नाने पावले म्हणून प्रभु महायति आहेत ।। २० ॥ महानाद- महान् नादो ध्वनिर्यस्य-महागंभीर दिव्यध्वनीने प्रभु युक्त आहेत ॥ २१ ॥ महाघोष- प्रभुंचा दिव्यध्वनि एक योजनप्रमित असतो म्हणून प्रभु महाघोषवान् आहेत ॥ २२ ॥ महेज्य- इन्द्रादिकाकडून प्रभूची फार मोठी पूजा केली जाते म्हणन प्रभंना महेज्य म्हणतात ।। २३ ।। महसां पति-प्रभ अतिशय मोठया तेजांचे पति-स्वामी आहेत ।। २४ ॥ महाध्वरधर- प्रभु फार मोठ्या तपोयज्ञाला धारण करणारे आहेत ॥ २५ ॥ धुर्य-धर्माचे जू मानेवर धारण करणारे.-धुर्य हे नाव प्रभंचे आहे ।। २६ ।। महौदार्य- मोठी दानशक्ति धारण करणारे भगवान् निर्ग्रन्थ असूनही इच्छेपेक्षाही अधिक फल देतात ।। २७ ।। महिष्ठवाक्- अत्यन्त पूज्य आदरणीय अशा वाणीला प्रभुंनी धारण केले आहे ।। २८ ॥ महात्मा- केवलज्ञानरूपी नेत्रांनी लोकालोकाला ज्यांचा आत्मा पाहतो असे प्रभु महात्मा नावाला यथार्थ धारण करतात ॥ २९ ॥ महसां धाम-प्रभु फार मोठ्या तेजाचे आश्रयस्थान आहेत ॥ ३० ॥ महर्षि- महान् अनेक केवलज्ञानादिक ऋद्धिसमूहाला प्रभु धारण करतात म्हणून त्यांचे महर्षि हे नांव आहे. औषद्धि, बुद्धिऋद्धि, विक्रिद्धि, अक्षीणमहानसद्धि, आकाशगमनद्धि, केवलज्ञानद्धि या ऋद्धीचे प्रभु धारक आहेत ॥ ३१॥ महितोदय- ज्यांच्या ठिकाणी असलेला तीर्थकरनामकर्माचा उदय जनतेकडून पूजिला जातो म्हणून प्रभु महितोदय आहेत ।। ३२ ॥ महाक्लेशाङकुश- महान् तप, संयम, परीषह सहनादिक जे क्लेश हेच जणु मनरूपी मत्तगजेन्द्राला उन्मार्गापासून परावृत्त करण्यास अङकुशासारखे आहेत. अशा प्रभूना महाक्लेशाङकुश म्हणतात ।। ३३ ॥ शूर- प्रभु कर्मक्षय करण्यास समर्थ आहेत म्हणून ते शूर आहेत ।। ३४ ।। महाभूतपति- गणधर, चक्रवर्ती वगैरेना महाभूत म्हणतात. त्यांचे जिनेश्वर पति-स्वामी आहेत ॥ ३५ ॥ गुरु- प्रभु धर्माचा उपदेश करतात म्हणून ते गुरु आहेत ॥३६॥ महापराक्रम- फार मोठा पराक्रम प्रभूच्या ठिकाणी आहे अर्थात् केवलज्ञानाने सर्व वस्तूंचे पृथक्करण करणेरूप पराक्रम प्रभु करतात ।। ३७ ॥ अनन्त- प्रभुंना कधीही नाश नसल्यामुळे ते अनन्त आहेत ॥ ३८ ॥ महाक्रोधरिपु- अतिशय मोठया क्रोधाचे भगवान् रिपु-शत्रु आहेत ॥ ३९ ॥ वशी वश- प्रभुत्व ज्यांचे ठिकाणी आहे ते प्रभु वशी होत ॥ ४० ।। महाभवाब्धिसंतारि- भव-संसार हाच अब्धि समुद्र आहे, या संसारसमुद्रात जिनप्रभु आम्हाला तारतात म्हणून ते महासमुद्रसन्तारि आहेत ।। ४१ ॥ महामोहाद्रिसूदन- फार मोठा असा जो मोहरूपी Page #52 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१६३) महापुराण (४१ महाध्यानपतितिमहाधर्मो महाव्रतः । महाकारिहात्मज्ञो महादेवो महेशिता ॥ १६२ सर्वक्लेशापहः साधुः सर्वदोषहरो हरः । असडाख्येयोऽप्रमेयात्मा शमात्मा प्रशमाकरः ॥ १६३ अद्रि-पर्वत त्याला सूदनः प्रभुंनी नष्ट केले म्हणून महामोहाद्रिसूदन या नावाला यथार्थ धारण करीत आहेत ॥ ४२ ।। महागुणाकर- सम्यक्त्व, ज्ञान, दर्शन, वीर्य, सूक्ष्म, अवगाहन, अगुरुलघु व अव्याबाधता वगैरे गुणांचे भगवान् उत्पत्तिस्थान आहेत म्हणून ते महागुणाकर आहेत ।। ४३।। क्षान्त- जिनप्रभूनी सर्वपरीषहादिकांना सहन केले म्हणून ते क्षान्त आहेत ।। ४४ ।। महायोगीश्वर- महायोगी जे गणधरादिक त्यांचे हे आदिजिनेश प्रभु- स्वामी आहेत ।। ४५ । शमी- शमः सर्व कर्मांचा क्षय ज्यांना आहे ते प्रभु शमी होत. अथवा समी-शान्तिपरिणामांना धारण करणारे प्रभु शमी व समी आहेत ।। ४६ ।। ___महाध्यानपति- आदिजिनेश्वर परमशुक्लध्यानाचे स्वामी- प्रभु आहेत ॥ ४७ ।। ध्यातमहाधर्म- ज्यांनी पूर्वभवापासून चालत आलेल्या श्रावककुलांतील महाधर्माचे अहिंसादिधर्माचे चिन्तन केले आहे ।। ४८ ।। महाव्रत- अहिंसादिक पाच महावतांनी युक्त असे प्रभु महाव्रतवान् आहेत ॥ ४९ ॥ महाकर्मारिहा- महाकर्मे मोहनीयादिक हीच शत्रु त्यांना प्रभूनी ठार मारले म्हणून प्रभु महाकर्मारिहा आहेत ॥ ५० ॥ आत्मज्ञ- ज्यांना आत्म-जीवतत्त्वाचे ज्ञान झाले आहे असे प्रभु आत्मज्ञ होत ।। ५१॥ महादेव- महान् अशा इन्द्रादिकांनी प्रभु आराध्य आहेत. म्हणून ते महादेव आहेत ।। ५२ ॥ महेशिता- अनन्तज्ञानादिक अन्तरङगवैभव व बहिरंगसमवसरणादिवैभव यांचे प्रभु-स्वामी आहेत ।। ५३ ॥ सर्वक्लेशापह- संपूर्ण शारीरिक, मानसिक व आगन्तुक अशा क्लेशांचा-दुःखांचा प्रभुंनी नाश केला आहे. अथवा सर्वभक्तजनांच्या नारकादिकदुःखांचाही प्रभु नाश करतात म्हणून ते सर्व क्लेशापह आहेत ॥ ५४ ।। साधु- प्रभुंनी रत्नत्रयरूपी साध्य सिद्ध करून घेतले म्हणून ते साधु होत ॥ ५५ ॥ सर्वदोषहर- सर्व-भूक, तहान, वृद्धावस्था, रोग जन्म मरणादिक संपूर्ण दोषांचा प्रभूनी नाश केला म्हणून ते सर्वदोषहर आहेत ॥ ५६ ॥ हर- जीवांच्या अनन्तजन्मांच्या पापांचा नाश प्रभु करतात म्हणून ते हर आहेत. अथवा 'ह' म्हणजे हर्ष- अनन्तसुख तें राति-देतात अथवा प्राप्त करून घेतात म्हणून प्रभु हर आहेत. अथवा राज्यावस्थेत 'हं' सहस्र पदरांचा हार प्रभु गळ्यात घालीत असत किंवा देत असत. अथवा 'ह' म्हणजे हिंसा तिला प्रभु 'र' अग्निसारखे दाहक म्हणूनही हर हे नाव प्रभूचे यथार्थ आहे ।। ५७ ॥ असङख्येय- प्रभूच्या गुणांची गणना करता येत नाही म्हणून ते असंख्येय आहेत ।। ५८ ।। अप्रमेयात्मा- ज्यांची गणना करता येत नाही असे प्रभु आहेत. एका सिद्धात्म्याच्या प्रदेशात अनन्त सिद्ध राहतात ॥ ५९ ॥ शमात्मा- कर्मक्षयाने युक्त आहे आत्मा ज्यांचा अशा प्रभूना शमात्मा म्हणतात ।। ६०॥ प्रशमाकर- प्रकृष्ट शम म्हणजे प्रशम अर्थात् उत्तम क्षमा. त्या क्षमेची आकर-खाण प्रभु उत्तम क्षमेची खाण असल्यामुळे ते प्रशमाकर आहेत ॥ ६१ ।। Page #53 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२) महापुराण सर्वयोगीश्वरोऽचिन्त्यः श्रुतात्मा विष्टरश्रवाः । दान्तात्मा दमतीर्थेशी योगात्मा ज्ञानसर्वगः ॥ १६४ प्रधानमात्मा प्रकृतिः परमः परमोदयः । प्रक्षीणबन्धः कामारिः क्षेमकृत्क्षेमशासनः ॥ १६५ प्रणवः प्रणयः प्राणः प्राणदः प्रणतेश्वरः । प्रमाणं प्रणिधिर्वक्षो दक्षिणोऽध्वर्युरध्वरः ॥ १६६ ( २५- १६४ सर्वयोगीश्वर - जिनदेव सर्वगणधरादिक योग्यांचे ईश्वर स्वामी आहेत ॥ ६२॥ अचिन्त्य - आमच्या मनाला विषय न होणारे प्रभु अचिन्त्य आहेत ॥ ६३ ॥ श्रुतात्मा श्रुत म्हणजे द्वादशाङ्गाचे ज्ञान तेच आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु श्रुतात्मा होत. अर्थात् प्रभु ज्ञानमय आहेत ।। ६४ ।। विष्टरश्रवा - विष्टर आसनाप्रमाणे श्रवा कान असल्यामुळे प्रभु विष्टरश्रवा आहेत. अथवा विष्टरावरून म्हणजे सिंहासनावरून स्रवति धर्मामृत धर्मामृताचा प्रवाह चालू करणारे अर्थात् सिंहासनावर बसून धर्मोपदेश प्रभु देतात म्हणून विष्टरश्रवा हे त्यांचे नाव आहे ।। ६५ ।। दान्तात्मा - तपश्चरणाचे क्लेश सहन करणारा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु दान्तात्मा होत. अथवा द-अभयदान देणे हा ज्यांचा अन्तःस्वभाव अन्तःकरणाचा स्वभाव आहे असे प्रभु दान्तात्मा आहेत ।। ६६ ।। दमतीर्थेश - दमतीर्थ इंद्रियाच्या निग्रहाचे वर्णन करणाऱ्या शास्त्राला दमतीर्थ म्हणतात त्याचे ईश-प्रभु स्वामी आहेत ॥ ६७ ॥ योगात्मा - योग पूर्वी न प्राप्त झालेले केवलज्ञानादिक गुण प्राप्त होणे त्याला योग म्हणतात. त्याने प्रभूचा आत्मा युक्त झात्यामुळे ते योगात्मा झाले ॥ ६८ ॥ ज्ञानसवंग- केवलज्ञानाने सर्व लोकालोकाला प्रभु जाणतात म्हणून ते सर्वलोकग आहेत ॥ ६९ ॥ प्रधान- एकाग्रतेने आत्मा आपल्या स्वरूपात प्रभूंनी स्थिर केला आहे म्हणून प्रभु प्रधान आहेत. उत्कृष्ट शुक्लध्यानाला प्रधान म्हणतात व त्या ध्यानाच्या संबंधाने भगवंत देखील प्रधान आहेत ॥ ७० ॥ आत्मा - अतति सततं गच्छति लोकालोकस्वरूपं जानातीति आत्मा जो सतत जातो म्हणजे लोकालोकाचे स्वरूप जाणतो त्यास आत्मा म्हणतात. भगवान् नेहमी लोकालोक स्वरूप जाणतात म्हणून त्यांना आत्मा म्हणतात ।। ७१ ।। प्रकृति - प्रकृष्टा - उत्कृष्ट अर्थात् त्रैलोक्याचे हित करणारी जी कृति-तीर्थप्रवर्तन ते भगवंत करतात म्हणून भगवंताना प्रकृति म्हटले आहे. अथवा तीर्थंकरप्रकृतीने युक्त असलेल्या भगवंतानाही प्रकृति म्हटले आहे. अथवा प्रकृति म्हणजे स्वभाव. धर्मोपदेश देण्याचा जो स्वभाव त्याने युक्त असल्यामुळे भगवंतानाही प्रकृति म्हटले आहे ।। ७२ ।। परमः परा- उत्कृष्ट मा-लक्ष्मी ज्यांची आहे ते प्रभु परम होत ॥ ७३ ॥ परमोदय- परम उत्कृष्ट उदय-अभ्युदय ज्यांचा आहे असे प्रभु परमोदय होत ॥ ७४ ॥ प्रक्षीणबंध - ज्यांचा कर्मबन्ध अत्यन्त क्षीण झाला आहे असे प्रभु प्रक्षीणबन्ध होत ॥ ७५ ॥ कामारि - सर्व इन्द्रियांना प्रीति आह्लाद उत्पन्न करणारा जो काम-मदन त्याचे भगवान् शत्रु आहेत म्हणून त्यांना कामारि म्हणतात ।। ७६ ।। क्षेमकृत् - भव्यजनांचे मंगल करणारे भगवान् क्षेमकृत् आहेत ॥७७॥ क्षेमशासन- भगवंताचा शासन-उपदेश हा क्षेम करणारा आहे ।। ७८ ।। प्रणव- भगवान् ॐकारस्वरूपी आहेत व हा ॐकार उत्कृष्ट स्तुतिस्वरूप आहे. प्रत्येक धर्मकार्याच्या प्रारंभी ॐ काराचे स्मरण करावे ।। ७९ ।। प्रणय- भगवान् सर्वावर प्रेम करतात म्हणून ते प्रणयरूप आहेत ॥ ८० ॥ प्राण- जगाला जिवंत ठेवणारे असल्यामुळे प्रभु प्राण आहेत ।। ८१ ।। प्राणद- सर्वजीवांचे रक्षण करणारे प्रभु प्राणद आहेत ॥। ८२ ।। Page #54 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१६८) महापुराण आनन्दो नन्दनो नन्दो वन्द्योऽनिन्द्योऽभिनन्दनः । कामहा कामदः काम्यः कामधेनुररिञ्जयः॥१६७ असंस्कृतत्सुसंस्कारोऽप्राकृतो वैकृतान्तकृत् । अन्तकृत्कान्तगुः कान्तश्चिन्तामणिरभीष्टदः ॥१६८ प्रणतेश्वर- नम्र अशा भव्यजीवांचे स्वामी असल्यामुळे त्यांना प्रणतेश्वर म्हणतात ॥ ८३ ॥ प्रमाणं- केवलज्ञानरूपी प्रमाणाने प्रभु युक्त आहेत ॥ ८४ ।। प्रणिधि- योगी प्रभूना आपल्या हृदयात गुप्त ठेवतात म्हणून त्यांना प्रणिधि म्हणतात ।। ८५ ।। दक्ष-प्रभु समर्थ व कौशल्ययुक्त असल्यामुळे दक्ष आहेत ॥ ८६ ॥ दक्षिण- सरलस्वभावी असल्यामुळे प्रभु दक्षिण आहेत ।।८७॥ अध्वर्यु- ज्ञानरूपयज्ञ करणाऱ्या प्रभूना अध्वर्यु म्हणतात ॥ ८८ ॥ अध्वर- निर्दोष मार्गाने जाणारे प्रभु अध्वर या नावाने शोभतात ।। ८९ ॥ आनन्द- प्रभु सर्वबाजूनी आनंदयुक्त आहेत ।।९०।। नन्दन- भक्तांच्या सुखादिकांची प्रभु वृद्धि करतात म्हणून ते नन्दन आहेत ।।९१॥ नन्द- नं ज्ञानं ददातीति नन्दः प्रभु भक्ताना आत्महिताचे ज्ञानदान देतात म्हणून ते नन्द होत ॥९२।। वन्द्य-प्रभु देवेन्द्रादिकाकडून वन्द्य व स्तुत्य आहेत ।। ९३ ।। अनिन्द्य- प्रभु भूक, तहान वगैरे अठरा दोषांनी रहित असल्यामुळे ते निन्द्य नाहीत अर्थात् ते प्रशंसनीय आहेत ॥ ९४ ॥ अभिनन्दन-प्रभु आपल्या सौंदर्यादिगुणांनी प्रजाना आनंदित करतात. अथवा प्रभूच्या सभेत भयरहित अशी अशोकवन, सप्तपर्णवनादि चार वने आहेत म्हणून ते अभिनंदन आहेत ।। ९५॥ कामहा- प्रभुंनी कन्दर्पाचा - मदनाचा नाश केला म्हणून ते कामहा आहेत ॥ ९६ ।। . कामद- भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून ते कामद आहेत ॥ ९७ ॥ काम्य- अत्यन्त मनोहर किंवा सर्वांना आवडणारे असे प्रभु काम्य होत ।। ९८॥ कामधेनु- भक्तांच्या इच्छा नेहमी पूर्ण करीत असल्यामुळे प्रभु कामधेनु आहेत ॥ ९९ ।। अरिजय- अठ्ठावीस भेदांच्या मोहशत्रूना प्रभूनी जिंकले म्हणून ते अरिञ्जय आहेत ॥ १०० ।। . ७ अथ असंस्कृताविशतम् । असंस्कृतसुसंस्कार- स्वाभाविक संस्कारयुक्त असे प्रभु अथवा ज्यांना अपूर्व लाभ झाला आहे असे ।। १॥ अप्राकृत- असंस्कृत असूनही प्राकृत नसलेले असे. जिनेश्वर वयाच्या आठवे वर्षी आपण होऊन मूलगुणांना धारण करतात ।। २॥ वैकृतान्तकृत्- विकृतीपासून उत्पन्न झालेल्या रोगांचा प्रभूनी नाश केला आहे ।। ३ ।। अन्तकृत्- भगवंतानी संसाराचा नाश केला आहे म्हणून ते अन्तकृत् आहेत. अथवा अन्त-मरणाचा अन्त-नाश प्रभुंनी केला आहे किंवा अन्त म्हणजे मोक्षाचा समीपपणा त्यांनी केला आहे. अथवा अन्त म्हणजे आत्म्याच्या शुद्धस्वरूपाला त्यांनी प्राप्त करून घेतले आहे. अथवा व्यवहाराचा अन्त करून निश्चयाचा स्वीकार केला आहे असे प्रभु. अथवा मुक्तीच्या अन्ती एके बाजूला प्रभु राहतात ॥ ४ ॥ कान्तगु- कान्ता सुन्दर-गुः वाणी ज्यांची आहे असे प्रभु ॥ ५॥ कान्त- शोभायुक्त असे कान्त आहेत ।। ६॥ चिन्तामणि- चिन्तामणिप्रमाणे इच्छित फल देणारे प्रभु ॥ ७ ॥ अभीष्टदमनाने इच्छिलेले देणारे असे प्रभु ॥ ८ ॥ Page #55 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४) महापुराण (२५-१६९ अजितोजितकामारिरमितोऽमितशासनः । जितक्रोधो जितामित्रो जितक्लेशो जितान्तकः ॥ १६९ जिनेन्द्रः परमानन्दो मुनीन्द्रो दुन्दुभिस्वनः । महेन्द्रवन्धो योगीन्द्रो यतीन्द्रो नाभिनन्दनः ॥ १७० नाभेयो नाभिजोऽजातः सुव्रतो मनुरुत्तमः । अभेद्योऽनत्ययोऽनाश्वानधिकोऽधिगुरुः सुगीः ॥ १७१ अजित- कामक्रोधादि शāनी न जिंकलेले ।। ९॥ जितकामारि- कामशत्रूला ज्यांनी जिंकले आहे असे प्रभु ॥ १० ॥ अमित- ज्यांचे परिमाण करता येत नाही असे प्रभु अमित आहेत ॥ ११॥ अमितशासन- प्रभूचे मत अगणित आहे विशाल आहे ॥ १२ ॥ जितक्रोधक्रोधाला जिंकल्यामुळे प्रभु क्रोधरहित झाले ।। १३ ।। जितामित्र- प्रभूनी शत्रूना जिंकले. अर्थात् ते सर्व प्रिय झाले ॥ १४ ॥ जितक्लेश- दुःखांना जिंकले म्हणून प्रभु अनन्तसुखी झाले ॥ १५ ॥ जितान्तक- प्रभुंनी यमाला जिकले व ते मृत्युरहित झाले ।। १६ ।। जिनेन्द्र- कर्मरूपी शāना ज्यांनी जिंकले त्यांना जिन म्हणतात. त्यांचे प्रभु इन्द्र-स्वामी आहेत ।। १७ ॥ परमानन्द- परम-उत्कृष्ट आनन्द अनन्तसुख ज्यांना प्राप्त झाले आहे असे प्रभु परमानन्द होत ॥ १८।। मुनीन्द्र- मुनींचे-प्रत्यक्ष ज्ञानी जे अवधि, मनःपर्याय व केवलज्ञानी साधु त्यांचे प्रभु इन्द्र-स्वामी आहेत ॥ १९ ॥ दुन्दुभिस्वन- जयनगान्याप्रमाणे प्रभुंचा दिव्यध्वनि असल्यामुळे त्याना दुन्दुभिस्वन हे नाव आहे ॥ २०॥ महेन्द्रवन्ध- प्रभुंना देवेंद्र वन्दन करतात म्हणून ते महेन्द्रवन्ध आहेत ॥ २१॥ योगीन्द्र-प्रभु योगी-ध्यानीमुनींचे स्वामी आहेत ।। २२ ॥ यतीन्द्र- निष्कषाय-कषायरहित अशा साधूंचे प्रभु स्वामी आहेत ॥ २३ ॥ नाभिनन्दन- भगवान् आदिनाथ नाभिराजाला आनंद देणारे पुत्र आहेत ॥ २४ ॥ नाभेय- नाभिराजाचे अपत्य भगवान् आदिजिन आहेत ॥ २५ ।। नाभिज- चौदावे कुलकर अशा नाभिराजापासून उत्पन्न झाले म्हणून नाभिज होत ॥ २६ ॥ अजात- द्रव्याथिकनयाने प्रभु जन्मरहित म्हणून अजात आहेत ॥ २७ ॥ सुव्रत- अहिंसादि पाच महाव्रते व रात्रिभोजन त्याग हे सहावे अणुव्रत ही ज्यांची उत्तम व्रते आहेत असे प्रभु सुव्रत आहेत ।। २८॥ मनु- जीवादितत्त्वांचा निर्दोष विचार करणारे प्रभु मनु होत ॥ २९ ॥ उत्तम- प्रभु उत्तम उत्कृष्ट आहेत ।। ३०॥ अभेद्य- कोणाकडून प्रभु भेदले जात नाहीत म्हणून अभेद्य ॥ ३१॥ अनत्यय- अत्यय-विनाश ज्यांचा नाही असे प्रभु अनत्ययअविनाशी आहेत ॥ ३२ ॥ अनाश्वान्- केवलज्ञान झाल्यावर प्रभुनी आहार घेतला नाही म्हणून ते अनाश्वान् आहेत. अथवा जुगार खेळणारे व चोर यांच्यावर विश्वास न ठेवणारा, नित्य अशा मोक्षमार्गात तत्पर राहणारा व सर्व प्राणिमात्र ज्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याला अनाश्वान् म्हणतात व या लक्षणाने युक्त प्रभु अनाश्वान् आहेत ॥ ३३ ॥ अधिक- अधि-उत्कृष्ट-कः आत्मा भगवंताचा आत्मा उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना अधिक म्हणतात ॥ ३४ ॥ अधिगुरु- प्रभु श्रेष्ठ गुरु आहेत ॥३५।। सुगी- अतिशय उत्तम वाणी दिव्यध्वनि युक्त प्रभूना सुगी: म्हणतात ॥३६।। Page #56 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१७४) महापुराण (४५ सुमेधा विक्रमी स्वामी दुराधर्षो निरुत्सुकः । विशिष्टः शिष्टभुक् शिष्टः प्रत्ययः कामनोऽनघः॥१७२ क्षेमी क्षेमरोऽक्षय्यः क्षेमधर्मपतिः क्षमी । अग्राह्यो ज्ञाननिग्राह्यो ध्यानगम्यो निरुत्तरः ॥ १७३ सुकृती धातुरिज्याहः सुनयश्चतुराननः । श्रीनिवासश्चतुर्वक्त्रश्चतुरास्यश्चतुर्मुखः ॥ १७४ सुमेधा- ज्यांची सुमेधा-सुबुद्धि आत्मस्वरूपात तत्पर असते असे प्रभु ॥ ३७॥ विक्रमी-प्रभ सर्वापेक्षा अतिशय तेजस्वी व कर्मनाश करण्यात अतिशय शूर असे आहेत ॥ ३८॥ स्वामी- सु-अतिशय निर्दोषपद्धतीने अमति प्रभु वस्तुस्वरूपाकडे आत्मस्वरूपाकडे जातात म्हणजे जाणतात म्हणून ते स्वामी आहेत किंवा स्व-आत्मा तो ज्यांनी प्राप्त करून घेतला आहे त्याचे यथार्थ स्वरूप जाणले आहे असे ।। ३९ ॥ दुराधर्ष- ज्यांचा केव्हाही अपमान तिरस्कार करणे शक्य नाही असे प्रभु दुराधर्ष आहेत ।। ४० ॥ निरुत्सुक- उत्कण्ठारहित, रागद्वेष रहित ॥४१॥ विशिष्ट- प्रभु विशिष्ट-उत्तम आहेत ।। ४२ ।। . शिष्टभुक्- शिष्ट-साधु-मुनि यांचे भुक् प्रभु पालन-रक्षण करतात म्हणून ते शिष्टभुक् आहेत किंवा शिष्टभुत् साधूंना सज्जनांना प्रभु जाणतात म्हणून ते शिष्टभुत् आहेत ॥४३॥ शिष्ट- सदाचारसंपन्न ॥ ४४ ।। प्रत्यय- प्रभु प्रत्यय- आत्मज्ञानी आहेत व इतराना आत्म्याची ओळख करून देतात ॥ ४५ ॥ कामन- प्रभु अत्यंत सुंदर आहेत ॥ ४६ ।। अनघ- प्रभु पापरहित आहेत ॥ ४७ ॥ क्षेमी-क्षेम- मोक्ष तो ज्यांना प्राप्त झाला आहे असे प्रभु क्षेमी होत ॥ ४८ ॥ क्षेमकर- प्रभु भव्यांचे कल्याण करतात म्हणून ते क्षेमकर ।। ४९ ।। अक्षय्य- ज्यांचा कधीही नाश होत नाही असे ।। ५०॥ क्षेमधर्मपति- जीवांचे मंगल-कल्याण करणारा असा जो धर्म त्याचे पति स्वामी प्रभु आहेत ॥ ५१॥ क्षमी- प्रभु अन्तरायकर्माच्या नाशामुळे क्षम-अनन्त शक्ति संपन्न झाले म्हणून क्षमी ।। ५२॥ अग्राह्य- जे परस्त्रीलम्पट आहेत, कुलजाति गर्वोद्धत आहेत, मधमांस, मद्यसेवनात आसक्त आहेत असे लोक भगवंताला मानीत नाहीत म्हणून प्रभु त्यांच्याद्वारे अग्राह्य आहेत ।। ५३ ॥ ज्ञाननिग्राह्य- ज्ञानाने-केवलज्ञानाने निश्चयाने प्रभूचे स्वरूप जाणले जाते म्हणून ते ज्ञाननिग्राह्य आहेत ॥ ५४ ॥ ध्यानगम्य- ध्यानाने चित्ताच्या एकाग्रतेने प्रभु गम्य जाणले जातात म्हणून ते ध्यानगम्य आहेत ॥ ५५ ॥ निरुत्तर- प्रभु अतिशय उत्कृष्ट आहेत म्हणून त्याना निरुत्तर म्हणतात अथवा संसारसागरातून तरून जातात म्हणन प्रभ निरुत्तर आहेत ॥५६॥ सुकृती- ज्यापासून शुभ फल प्राप्त होते असे कार्य ते सुकृत होय. अर्थात् पुण्याला सुकृत म्हणतात ते प्रभुजवळ आहे म्हणून ते सुकृती ।। ५७ ।। धातु- प्रभु शब्दाचे उत्पादक आहेत म्हणून ते धातु आहेत ।। ५८ ।। इज्याह- प्रभु आमच्याकडून पूजण्यास योग्य आहेत म्हणून ते इज्याह आहेत ।। ५९ ।। सुनय- वस्तूच्या एक एक धर्माचे वर्णन करणारे व अन्यधर्माचा निषेध न करता त्याला गौण करणारे असे जे वस्तूच्या एका अंशाचे ज्ञान त्यास सुनय म्हणतात व असे नय प्रभुंनी सांगितले आहेत म्हणून प्रभु सुनय होत ।। ६० ।। चतुरानन- समवसरणात भक्तांना प्रभु चारमुखाचे दिसतात म्हणून ते चतुरानन होत ॥ ६१ ।। श्रीनिवास- सर्व श्रींचे शोभांचे-सौन्दर्यांचे प्रभु निवास-वसतिस्थान आहेत म्हणून ते श्रीनिवास ॥ ६२॥ चतुर्वक्त्र- ॥ ६३ ॥ चतुरास्य- ॥ ६४ ॥ चतुर्मुख- चार घातिकर्माचा नाश Page #57 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६) महापुराण (२५-१७५ सत्यात्मा सत्यविज्ञानं सत्यवाक् सत्यशासनः । सत्याशीः सत्यसन्धानः सत्यः सत्यपरायणः ॥ १७५ स्थेयान्स्थवीयान्नदीयान्दवीयान्दूरदर्शनः । अणोरणीयाननणुर्गुरुराधो गरीयसाम् ॥ १७६ सदायोगः सदाभोगः सदातृप्तः सदाशिवः । सदागतिः सदासौख्यः सदाविद्यः सदोदयः ॥ १७७ ...... झाल्यामुळे भगवंताचे शरीर अतिशय निर्मल होते. भगवंताच्या शरीराला परमौदारिक म्हणतात व निर्मलतेमुळे प्रत्येक दिशेला भगवंताचे मुख दिसते म्हणून त्यांना चतुर्वक्त्र, चतुरास्य आणि चतुर्मुख म्हणतात ॥ ६५ ।। सत्यात्मा- भव्यजीवांचे कल्याण करणारा आहे आत्मा ज्यांचा असे प्रभु सत्यात्मा आहेत ॥६६॥ सत्यविज्ञानं- सत्य-सफल आहे विज्ञान ज्यांचे असे भगवन्त सत्यविज्ञान होत ।। ६७।। सत्यवाक- प्रभची वाणी सफल असल्यामळे ते सत्यवाक सत्यवचनी आहेत॥६८॥ सत्यशासन- प्रभूचे मत मोक्षफलाला देते म्हणन ते सत्यशासन आहेत ॥ ६९ ।। सत्याशीभगवंताचा आशीर्वाद दात्याला सत्य सफल होतो म्हणून ते सत्याशी: आहेत. इतर मुनिही दात्याला आशीर्वाद देतात व तो दात्याच्या लाभान्तराय कर्मामळे सफल होत नाही पण जन्मान्तरी तो सफल होतो. पण भगवन्ताचा आशीर्वाद इहलोकी व परलोकीही सफल होतोच म्हणून भगवान् सत्याशी आहेत ॥ ७० ॥ सत्यसन्धान- भगवान् सत्यप्रतिज्ञ आहेत ।। ७१ ॥ सत्य- प्रभु नेहमी सत्यस्वरूपी आहेत ॥७२।। सत्यपरायण- प्रभु नेहमी सत्यातच तत्पर राहतात ॥ ७३ ।। स्थेयान्- अतिशयेन स्थिरः स्थेयान्-अत्यन्त स्थिर ।। ७४ । स्थवीयान्- प्रभु गुणांनी अतिशय मोठे-गुणांनी फार विशाल ।। ७५ ॥ नेदीयान्- अतिशय जवळ असलेल्या भक्ताला नेहमी जवळ वाटणारा ।। ७६ ॥ दवीयान्- अभक्तापासून अतिशय दूर ॥ ७७ ॥ दूरदर्शनभक्ताला दूरूनही दिसणारा ।। ७८ ।। अणोः अपि अणीयान्- अणुपेक्षाही लहान अर्थात् ज्यांचे स्वरूप अणुपेक्षाही जाणण्यास कठिण आहे असे. अल्पज्ञान्यांना ज्यांचे स्वरूप जाणणे शक्य नाही असे. पुद्गलाणु हा अवधि, मनःपर्ययज्ञान्यांनी जाणला जातो. पण भगवंताचे सूक्ष्म स्वरूप त्या ज्ञानांनीही जाणणे कठिण आहे ।। ७९ ॥ अनणु- भगवंत स्वरूपाने अनंत गुणांनी अनणु-अणुरूप नाहीत ते महान् आहेत ।। ८०॥ गुरु- प्रभु मोठे आहेत ।। ८१ ॥ गरीयसां आद्य- सर्व गणधरादिक महापुरुषामध्ये आद्यः पहिले आहेत ।। ८२।। सदायोग- ज्याचा अलब्ध लाभ झाला आहे असे परमशुक्लध्यान ज्यांना सदैव आहे असे प्रभु ॥ ८३ ॥ सदाभोग- नेहमी शुद्ध परमात्मस्वरूपात एकरूपाने लीन झाल्यामुळे परमानन्दरूप अमृताचा सदा प्रभु भोग घेतात, अनुभवतात. अथवा ज्यांचा मनोयोग नेहमी समीचीन-अतिशय शुद्ध असतो ।। ८४ ॥ सदातृप्त- नेहमी प्रभु तृप्तच असतात. सदाअक्षुधितजेवलेल्या मनुष्याप्रमाणे नेहमी तप्त असतात ॥८५ ।। सदाशिव- नेहमी प्रभ कल्याणस्वरूपाचेच असतात ।। ८६ ।। सदागति- नेहमी प्रभु गति-ज्ञानस्वरूपीच असतात ।। ८७ ॥ सदासौख्यनेहमी परमानन्दातच लीन असतात ।। ८८ ।। सदाविद्य- नेहमी केवलज्ञानरूपच असतात ॥ ८९ ॥ सदोदय- प्रभु सदा उदययुक्तच असतात. त्यांचा अस्त कधीही होत नाही. अथवा यांचे सदा नेहमी उत्उत्कृष्ट-अयः शुभकारक दैव असते ॥ ९० ॥ Page #58 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१८०) महापुराण सुघोषः सुमुखः सौम्यः सुखदः सुहितः सुहृत् । सुगुप्तो गुप्तिभृद्गोप्ता लोकाध्यक्षो वमीश्वरः ॥१७८ बृहन्वहस्पतिर्वाग्मी वाचस्पतिरुदारधीः । मनीषी धिषणो धीमान् शेमुषीशो गिरांपतिः ॥ १७९ नेकरूपो नयोत्तुङ्गो नैकात्मा नकधर्मकृत् । अविशेयोऽप्रतर्यात्मा कृतज्ञः कृतलक्षणः ॥ १८० सुघोष- सु-अतिशय स्पष्ट असा घोष-योजनपर्यंत पसरणारा दिव्यध्वनि ज्यांचा आहे असे प्रभु सुघोष होत ।। ९१ ॥ सुमुख- उत्तम शोभणारे-वीतरागतायुक्त मख ज्यांचे आहे असे ।। ९२ ॥ सौम्य- करतारहित मुख ज्यांचे आहे असे प्रभु सौम्य होत ।। ९३ ॥ सुखदआसक्तीच्या अभावी मनात जो संतोष उत्पन्न होतो त्याला सुख म्हणतात. असे सुख प्रभपासून भक्तांना मिळते म्हणून ते सुखद आहेत ॥ ९४ ।। सुहित- ज्यांच्या ठिकाणचा पुण्योदय उत्तम हित करणारा आहे. अर्थात् निदानरहित पुण्य आत्महितच करणारे असते. प्रभु निनिदानाने पुण्ययुक्तच असतात ॥ ९५ ॥ सुहृत्- ज्यांचे मन शोभन -निर्मल आहे असे ।। ९६ ॥ सुगुप्त- ज्यांचे स्वरूप गुप्त आहे, गूढ आहे. मिथ्यात्वीजनाना न समजणारे असे ते प्रभु सुगुप्त होत ।। ९७ ॥ गुप्तिभृत्- मन, वचन व शरीराच्या शुभाशुभ प्रवृत्तीचा निग्रह करणे ती गुप्ति होय. रत्नत्रयाचे रक्षण करणे ही गुप्ति होय. रत्नत्रयाचे जी रक्षण करते, पालन करते ती गुप्ति होय. या गुप्तीला प्रभूनी धारण केले आहे म्हणून प्रभु गुप्तिभृत् आहेत ।। ९८ ।। गोप्ता- आत्म्याचे जे रक्षण करतात. त्याचा अधःपात होऊ देत नाहीत असे जिनदेव गोप्ता होत ॥ ९९ ॥ लोकाध्यक्ष- लोकांना-प्रजांना अध्यक्षः प्रत्यक्ष झालेले अथवा त्रैलोक्याला प्रत्यक्ष पाहणारे प्रभु लोकाध्यक्ष आहेत ॥१००।। दमेश्वर- दम तपश्चरणाचे दुःख सहन करणे तो दम होय. प्रभु त्या दमाचे ईश्वर स्वामी आहेत म्हणून त्यांना दमेश्वर म्हणतात ॥ १०१॥ ८ बृहवाविशतम् बृहबृहस्पति- भगवंत हे सर्व देवामध्ये मोठे अर्थात् वृद्ध बृहस्पति आहेत ॥१॥ वाग्मीभगवंताची वाणी अतिशय प्रशस्त आहे. त्यामुळे ते उत्तम वाग्मी वक्ते आहेत ॥२॥ वाचस्पति- दिव्यध्वनीचे स्वामी आहेत ॥ ३ ॥ उदारधी- त्याग व विक्रम या गुणानी सहित भगवंताची बुद्धि असल्यामुळे ते उदारबुद्धियुक्त आहेत ॥ ४॥ मनीषी- मननात्मक बुद्धीचे धारक ।। ५ ।। धिषण- भगवंत प्रगल्भ बुद्धीचे धारक आहेत म्हणून त्यांना धिषण म्हणतात ।।६।। धीमान्- प्रभु बुद्धिमान् आहेत ॥७॥ शेमुषीश- शे म्हणजे मोह त्याला मुष लुटणारी जी बुद्धि तिचे प्रभु ईश स्वामी आहेत ।। ८ । गिरांपति- प्रभु वाणीचे-द्वादशांग सरस्वतीचे पति-प्रभु आहेत ॥ ९॥ नैकरूप- अनेक रूपे धारण करीत असल्यामुळे प्रभूना नैकरूप म्हणतात ॥ १०॥ नयोत्तुङ्ग- नेगमसङग्रहादि सात नय किंवा स्यादस्ति, स्यान्नास्ति इत्यादि सात भंग याच्या द्वारे भगवान् वस्तुस्वरूप सांगत असल्यामुळे ते अतिशय उंच आहेत ।। ११ ।। नैकात्मा- भगवान् अशरीर- पुनः शरीर धारण करीत नाहीत व ते असंख्यात जीवप्रदेशानी युक्त आहेत ।। १२॥ नकधर्मकृत्- यतिधर्म व साधुधर्म असे द्विविध धर्म सांगितले म्हणून त्यांनी अनेक धर्माचे कथन केले आहे ।। १३ ।। अविज्ञेय- भगवंताचे स्वरूप आम्ही जाणणे अशक्य आहे म्हणून ते अविज्ञेय आहेत ।। १४ ॥ अप्रतात्मा- भगवंताचे स्वरूपाचा तर्क आम्हाला करता Page #59 -------------------------------------------------------------------------- ________________ ४८) महापुराण ज्ञानगर्भो दयागर्भो रत्नगर्भः प्रभास्वरः । पद्मगर्भो जगद्गर्भो हेमगर्भः सुदर्शनः ।। १८१ लक्ष्मीवांस्त्रिदशाध्यक्षो द्रढीयानिन ईशिता । मनोहरो मनोज्ञाङ्गो धीरो गम्भीरशासनः ॥ १८२ धर्मयूपो दयायागो धर्मने मिर्मुनीश्वरः । धर्मचक्रायुधो देवः कर्महा धर्मघोषणः ॥ १८३ अमोघवागमोघाज्ञो निर्ममोऽमोघशासनः । सुरूपः सुभगस्त्यागी समयज्ञः समाहितः ॥ १८४ येत नाही असे ते आहेत ।। १५ ।। कृतज्ञ - कृतयुगाचे स्वरूप भगवंतानी जाणले आहे म्हणून कृतज्ञ आहेत ।। १६ ।। कृतलक्षण- भगवान् श्रीवृक्ष, शंख, कमल, स्वस्तिक, अङकुश, तोरण आदिक लक्षणानी युक्त आहेत म्हणून त्यांना कृतलक्षण म्हणतात ॥ १७ ॥ ( २५-१८१ ज्ञानगर्भ- मातेच्या उदरात गर्भात भगवंत मति, श्रुत आणि अवधि या तीन ज्ञानानी सहित होते म्हणून ते ज्ञानगर्भ आहेत ।। १८ ।। दयागर्भ- जीवावर दया करणे हा गुण प्रभु मातेच्या गर्भात असताना त्यांच्या ठिकाणी आहे म्हणून ते दयागर्भ ।। १९ ।। रत्नगर्भमातेच्या गर्भात असताना मातेच्या अंगणात रत्नवृष्टि होत होती म्हणून प्रभु रत्नगर्भ होते ||२०|| प्रभास्वर - प्रभूंचे शरीर अतिशय तेजस्वी होते म्हणून ते प्रभास्वर ।। २१ ।। पद्मगर्भ- मातेच्या गर्भात असतानाच प्रभु लक्ष्मीसम्पन्न होते ॥ २२ ॥ जगद्गर्भ- त्रैलोक्य प्रभूंच्या गर्भात असल्यामुळे ते जगद्गर्भ होत. त्रैलोक्याचे ज्ञान मातृगर्भात असतानाही प्रभूंना होते ॥ २३ ॥ हेमगर्भ- मातेच्या उदरात असताना सुवर्णवृष्टि होत असल्यामुळे प्रभु हेमगर्भ होते ॥ २४ ॥ सुदर्शन - प्रभूंचे दर्शन सुखाने, अनायासाने होते म्हणून ते सुदर्शन होत ।। २५ ।। लक्ष्मीवान्अनन्तज्ञानादि स्वरूपी लक्ष्मी प्रभुजवळ आहे म्हणून ते लक्ष्मीवान् ।। २६ ।। त्रिदशाध्यक्षत्रिदशांना देवांना अध्यक्ष- प्रत्यक्ष होणारे प्रभु ॥ २७ ॥ द्रढीयान्- प्रभु अतिशय दृढ असतात ।। २८ ।। इन - ध्यानाच्या सामर्थ्याने योगी आपल्या हृदयकमलामध्ये प्रभूला आणतात म्हणून प्रभु इन होत ।। २९ ।। ईशिता - ईष्टे - ऐश्वर्यवान् प्रभु झाले म्हणून ते ईशिता आहेत ॥ ३० ॥ मनोहर - भव्यांच्या मनाला हरण करतात म्हणून प्रभु मनोहर ॥ ३१ ॥ मनोज्ञांग- मनोज्ञसुंदर अंग - शरीर ज्यांचे असे प्रभु मनोज्ञाङ्ग आहेत ॥ ३२ ॥ धीर - आपल्या ध्येयाकडे बुद्धीला प्रेरणारे प्रभु धीर होत. अथवा भव्यांना बुद्धि देणारे म्हणून प्रभु धीर आहेत ।। ३३ ।। गम्भीरशासन - ज्यांचे मत गंभीर अगाध आहे. अर्थात् ज्यांचे मताच्या तळाला आम्ही स्पर्श करू शकत नाही असे प्रभु गंभीरशासन होत ॥ ३४ ॥ धर्मयूप- धर्माचा दयेचा स्तम्भः प्रभु जणु दयेचा यज्ञस्तम्भ आहेत ।। ३५ ।। दयायागसगुण असोत अथवा निर्गुण असोत सर्व प्राणिमात्रावर दया करणे हेच पूजन ज्यांचे आहे असे प्रभु दयायाग होत ॥ ३६ ॥ धर्मनेमि - धर्मरथाच्या चक्राला प्रभु नेमि धावेप्रमाणे आहेत ||३७|| मुनीश्वर - जे प्रत्यक्ष ज्ञानी आहेत अशा मुनींचे भगवान् ईश्वर-प्रभु-स्वामी आहेत ॥ ३८ ॥ धर्मचक्रायुध - धर्म हाच पापशत्रूचा नाश करणारे चक्र आहे. अर्थात् धर्मचक्र हे आयुध ज्यांचे आहे असे प्रभु धर्मचक्रायुध होत ।। ३९ ।। देव - दीव्यति क्रीडति परमानन्दपदे इति देवः प्रभु नेहमी परमानन्दपदात क्रीडा करतात म्हणून ते देव होत ॥ ४० ॥ कर्महा - शुभाशुभ कर्माचा Page #60 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१८६) सुस्थितः स्वास्थ्यभाक् स्वस्थो नीरजस्को निरुद्धवः । अलेपो निष्कलङ्कात्मा वीतरागो गतस्पृहः ॥ १८५ वश्येन्द्रियो विमुक्तात्मा निःसपत्नो जितेन्द्रियः । प्रशान्तोऽनन्तधामर्षिर्मङ्गलं मलहानयः ॥ १८६ महापुराण प्रभूंनी नाश केला म्हणून त्यांना कर्महा म्हणतात ॥ ४१ ॥ धर्मघोषण- अहिंसा सत्यादिक धर्मरूपी नगारा ज्यांचा आहे असे प्रभु धर्मघोषण म्हटले जातात ।। ४२ ।। अमोघवाक्- अमोघ - सफल वाक्-वाणी ज्यांची असे प्रभु अमोघवाक् आहेत ।। ४३ ।। अमोघाज्ञ - सफल आज्ञा ज्यांची असे प्रभु अमोघाज्ञ आहेत ॥ ४४ ॥ निर्मम - ममताभाव भगवंतापासून निघून गेल्यामुळे भगवान् निर्मम आहेत ।। ४५ ।। अमोघशासन - ज्यांचा उपदेश, ज्यांचे कथन अमोघ -सफल आहे ते प्रभु अमोघशासन होत ।। ४६ ।। सुरूप- ज्यांचे रूप-सौन्दर्य उत्तम आहे असे प्रभु सुरूप होत ।। ४७ ।। सुभग- सु-उत्तम भग-ज्ञान, महात्म्य आणि सौन्दर्य ज्यांचे आहे असे प्रभु सुभग होत ॥। ४८ ।। त्यागी - त्याग म्हणजे दान ते आहारदान, अभयदान व ज्ञानदान असे तीन प्रकारचे आहे असा त्याग असे दान ज्यांचे आहे असे ते प्रभु त्यागी होत ।। ४९ ।। समयज्ञसमय-काल व सिद्धान्त जे जाणतात ते प्रभु समयज्ञ होत ।। ५० ।। समाहित- समाधानाला प्राप्त झालेले प्रभु समाहित होत. अथवा मनाची एकाग्रता ठेवणारे प्रभु समाहित होत ॥ ५१ ॥ (४९ सुस्थित- उत्तम रीतीने क्लेशरहित होऊन राहिलेले भगवान् सुस्थित आहेत. अर्थात् सुखी आहेत ।। ५२ ।। स्वास्थ्यभाक् - मनाला स्वतःमध्ये स्थिर करणे ते स्वास्थ्य होय. त्या स्वास्थ्याचा आश्रय केलेले भगवान् स्वास्थ्यभाक् आहेत ।। ५३ । स्वस्थ - प्रभु नेहमी आत्मस्वरूपात राहतात म्हणून ते स्वस्थ आहेत ।। ५४ ।। नीरजस्क- ज्ञानावरण व दर्शनावरण या दोन कर्माना रज म्हणतात. ही दोन कर्मे ज्यांची नष्ट झाली आहेत असे प्रभु नीरजस्क आहेत ।। ५५ ।। निरुद्धव- उद्धव-यज्ञ. त्या यज्ञापासून प्रभु वेगळे झाले आहेत म्हणून ते निरुद्धव. प्राणियज्ञापासून सर्वथा वेगळे असे प्रभु आहेत ।। ५६ ।। अलेप- पापकर्म मलाच्या लेपाने रहित असे प्रभु ।। ५७ ।। निष्कलङ्कात्मा - अपवाद म्हणजे कलङ्क त्या कलंकापासून प्रभूंचा आत्मा वेगळा झाल्यामुळे प्रभु निष्कलङ्कात्मा आहेत ।। ५८ ।। वीतराग- ज्यांचा रागभाव नष्ट झाला आहे असे प्रभु वीतराग होत ।। ५९ ।। गतस्पृह- स्पृहा इच्छा ती प्रभूंची नष्ट झाली म्हणून ते गतस्पृह झाले, निरिच्छ झाले ।। ६० ।। वश्येन्द्रिय- स्पर्शनादिक पाच इन्द्रिये प्रभूंच्या स्वाधीन असल्यामुळे ते वश्येन्द्रिय आहेत ।। ६१ ।। विमुक्तात्मा- प्रभूंचा आत्मा संसारातून सुटला आहे म्हणून ते विमुक्तात्मा आहेत ।। ६२ ।। निःसपत्न- ज्यांचा शत्रु-मोहादिक कर्मशत्रु नष्ट झाला आहे असे ते भगवान् निःसपत्न होत ॥ ६३ ॥ जितेन्द्रिय- प्रभूंनी स्पर्शरसादिक विषयापासून आपल्या इन्द्रियांना स्पर्शन, जीभ, नाक, डोळे आणि कान यांना पराङ्मुख केले म्हणून ते जितेन्द्रिय झाले आहेत त्यांना जितेन्द्रिय म्हणावे ॥ ६४ ॥ प्रशान्त - प्रभु प्रशान्त रागद्वेषमोहरहित झाले म्हणून ते प्रशान्त होत अथवा प्र म्हणजे अतिशय श-सुख व ते अन्ते म्हणजे जवळ ज्यांच्या आहे असे प्रभु प्रशान्त होत । ६५ ।। अनन्तधामर्षि - अनन्तधाम म्हणजे केवलज्ञान. त्याने युक्त असे ऋषि जे प्रभु त्यांना अनन्तधामर्षि म्हणतात ।। ६६ ।। मंगलं - म. ७ Page #61 -------------------------------------------------------------------------- ________________ ५०) महापुराण ( २५-१८७ अनीदृगुपमाभूतो दिष्टिर्देवमगोचरः । अमूर्तो मूर्तिमानेको नैको नानैकतस्त्वदृक् ॥ १८७ अध्यात्मगम्योऽगम्यात्मा योगविद्योगिवन्दितः । सर्वश्रगः सदाभावी त्रिकालविषयार्थदृक् ॥ १८८ मङ्ग म्हणजे सुख त्याला जे लाति म्हणजे देते त्याला मङ्गल म्हणावे. अर्थात् प्रभु आदिजिनेंद्र भक्तांना सुख देतात म्हणून मङ्गल आहेत. किंवा मम् पापं गालयति इति मङ्गलम् । मम् म्हणजे पाप त्याचा भगवन्त गालयति नाश करतात म्हणून ते मङ्गल आहेत. अथवा मङ्ग म्हणजे सुपुण्य ते भगवन्त भक्तांना देतात म्हणून त्याना मङ्गल म्हणावे ।। ६७ ।। मलहा - मल म्हणजे पाप ते आदिजिनेन्द्रांनी नाहीसे केले म्हणून त्यांना मलहा म्हणतात ॥ ६८ ।। अनय- अय म्हणजे शुभाशुभ दैव ज्याला कर्म असेही नाव आहे. ज्याला पाप-पुण्य असेही म्हणतात त्याने रहित आदिभगवन्त आहेत म्हणून त्यांना अनय म्हणतात ।। ६९ । एक- आदिजिनेश्वर एक अनीदृक्- ईदृक्- हा पदार्थ याच्यासारखा दिसतो हा अर्थ ईदृक् शब्दाचा आहे. हे आदिप्रभु अमुकासारखे दिसतात. अशारीतीने आदिप्रभूंचे कोणाची तरी उपमा देऊन वर्णन करता येत नसल्यामुळे आदिप्रभु उपमारहित आहेत म्हणून ते अनीदृक् आहेत, उपमारहित आहेत ।। ७० ।। उपमाभूतो- हे प्रभो, आपण सर्व चांगल्या पदार्थांचे वर्णन करताना उपमाभूत आहात. अर्थात् इतराचे वर्णन करताना तो इतर पदार्थ प्रभूसारखा आहे असे म्हटले जाते ॥ ७१ ॥ दिष्टि - हे प्रभो, आपण शुभाशुभ फलाचे वर्णन करता म्हणून आपणास दिष्टि असे म्हणतात ।। ७२ ।। दैवम्- आपण निंदक आणि स्तुति करणारे अशा उभयांना क्रमाने देवअशुभ देव व शुभ दैव असे आहात ।। ७३ ।। अगोचर- गोचर इन्द्रियांचा विषय होणे. पण आपण अगोचर-इन्द्रियांचा विषय न होणारे असे आहात ।। ७४ ।। अमूर्त - स्पर्शरसादिक गुणांनी युक्त वस्तूला मूर्त म्हणतात. आपणामध्ये स्पर्श, रस, गन्धादिक नसल्यामुळे आपण अमूर्त आहात. अर्थात् इन्द्रियांनी न जाणलेले असे आहात ।। ७५ ।। मूर्तिमान् - म्हणजे आपण मूर्तीत स्थापले जाता म्हणून आपणास मूर्तिमान् म्हणतात ।। ७६ ।। आहेत म्हणजे त्यांना कोणाच्या साहाय्याची अपेक्षा नसते ।। ७७ ।। अर्थात् अनन्तशुद्धगुणधारक आहेत. अथवा न विद्यते रुद्रः के आत्मनि यस्य स नैकः- आदिप्रभूच्या आत्म्यांत रुद्र नहीं म्हणून ते नेक आहेत, अत्यन्त शान्त आहेत ।। ७८ ।। नानैकतत्त्वदृक्- भगवन्त आत्म्याला सोडून अनेक तत्त्वांना पाहत नाहीत. म्हणजे आत्मव्यतिरिक्त तत्त्वात पुद्गलादि तत्त्वात ते आसक्त होत नाहीत म्हणून ते नानैकतत्त्वदृक् आहेत ॥ ७९ ॥ अध्यात्मगम्यमिथ्यात्वादिक सर्व विकल्पसमूह सोडून शुद्ध आत्म्यात जे लीन होतात अशा महात्म्याकडून भगवान् जाणले जातात म्हणून भगवान् अध्यात्मगम्य आहेत ।। ८० ।। अगम्यात्मा- भगवंताचा आत्मा पापी लोकाकडून जाणला जात नाही, ते भगवंताचे स्वरूप जाणत नाहीत म्हणून प्रभु अगम्यात्मा आहेत ।। ८१ ।। योगवित् - जे प्राप्त झाले नाही ते प्राप्त होणे याला योग म्हणतात. त्याचे स्वरूप भगवान् जाणतात म्हणून भगवान् योगवित् आहेत ॥ ८२ ॥ योगिवन्दितध्यानाची सामग्री ज्यांना प्राप्त झाली आहे अशा महामुनिद्वारे भगवान् वन्दनीय आहेत, वन्दिले जातात म्हणून योगिवन्दित आहेत ॥ ८३ ॥ सर्वत्रग- भगवान् लोक व अलोकास व्यापतात नैक - प्रभु एक नाहीत. Page #62 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१९१) महापुराण शङ्करः शंवदो दान्तो दमी क्षान्तिपरायणः । अधिपः परमानन्दः परात्मज्ञः परात्परः ॥ १८९ त्रिजगद्वल्लभोऽभ्यर्च्य स्त्रिजगन्मङ्गलोदयः । त्रिजगत्पतिपूज्याघ्रस्त्रिलोकाग्रशिखामणिः ॥ १९० त्रिकालदर्शी लोकेशो लोकधाता दृढव्रतः । सर्वलोकातिगः पूज्यः सर्वलोकैकसारथिः ॥ १९१ म्हणजे केवलज्ञानाने सर्व लोकालोकास जाणतात. यास्तव ते सर्वत्रग आहेत ॥ ८४ ॥ सदाभावी- सर्वं कालात प्रभु राहतात म्हणून सदाभावी आहेत ।। ८५ ।। त्रिकालविषयार्थदृक्भूतकाल, वर्तमानकाल व भविष्यकाल या तीनही कालातील संपूर्ण पदार्थांना त्यांच्या गुणपर्यायासह प्रभु पाहतात म्हणून ते त्रिकालविषयार्थदृक् आहेत ।। ८६ ।। (५१ शङ्कर- शं-अनन्त आनन्दस्वरूप असे जे सुख ते उत्पन्न करणारे अशा आदिजिनेन्द्राला शंकर म्हणतात ।। ८ ।। शंवद - प्रभूंनी सर्व प्राण्यांना सुख कसे प्राप्त करून घ्यावे हे सांगितले म्हणून ते शंवद आहेत ॥ ८८ ॥ दान्त- तपश्चरणाचे क्लेश सहन करून प्रभूंनी इन्द्रिये ताब्यात ठेवली म्हणून ते दान्त आहेत ।। ८९ ।। दमी - इन्द्रियनिग्रह प्रभूंनी केला म्हणून ते दमी होत ।। ९० ।। क्षान्तिपरायण - क्षमाघारणात नेहमी तत्पर म्हणून प्रभु क्षान्तिपरायण आहेत ।। ९१ ॥ अधिप- सर्व जीवाचे अधिक रक्षण करतात म्हणून ते अधिप आहेत. अथवा त्रैलोक्याला व अलोकाकाशाला केवलज्ञानाने पितात म्हणजे व्यापतात म्हणून त्यांना अधिप म्हणावे ।। ९२ ।। परमानन्द - ज्यांना उत्कृष्ट आनन्द प्राप्त झाला आहे असे प्रभु परमानन्द या सार्थनामाचे धारक आहेत ।। ९३ ।। परात्मज्ञ - उत्कृष्ट केवलज्ञानाने युक्त जो आत्मा त्याला परात्मा म्हणतात अथवा परे - एकेन्द्रिय जीवापासून पंचेन्द्रिय जीवापर्यंत जे प्राणी आहेत ते निश्चयनयाने निजसमान - म्हणजे परमात्म्यासमान आहेत असे जाणणारे प्रभु परात्मज्ञ आहेत ।। ९४ ।। परात्पर - अन्य प्राण्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे प्रभु परात्परः अथवा प्रभु सर्वकाली नेहमी राहणारे आहेत अथवा प्रभु श्रेष्ठापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून ते परात्पर आहेत ।। ९५ ।। त्रिजगद्वल्लभ- त्रैलोक्यात असलेल्या सर्व प्राण्यांना प्रभु अतिशय आवडतात ।। ९६ ।। अभ्यर्च्य - प्रभु सर्व इन्द्रादिकांनी पूजेला योग्य आहेत ।। ९७ ।। त्रिजगन्मङ्गलोदय - त्रैलोक्यात असलेल्या सर्वं भव्यांना पंचकल्याणांची उदयप्राप्ति प्रभूपासून होते म्हणून प्रभु त्रिजगन्मङ्गलोदय आहेत ।। ९८ ।। त्रिजगत्पतिपूज्याघ्रि - त्रैलोक्याचे पति जे इन्द्र, धरणेन्द्र व चक्रवर्ती यांच्याकडून पूजण्यास योग्य आहेत चरण ज्यांचे असे प्रभु ।। ९९ ।। त्रिलोकाग्रशिखामणि- त्रैलोक्याच्या अग्रभागावर - मुक्तीच्या स्थानी प्रभु शिखामणीप्रमाणे शोभतात म्हणून ते त्रिलोकाग्रशिखामणि आहेत असे समजावे ।। १०० ।। त्रिकालदर्शी - भूत, भविष्यत् व वर्तमानकालातील पदार्थांना पाहणारे भगवान् त्रिकालदर्शी होत ।। १ ।। लोकेश - त्रैलोक्यात असलेल्या सर्व प्राण्यांचे ईश स्वामी भगवान् लोकेश म्हटले जातात ।। २ ।। लोकधाता - जगातील सर्व प्राण्यांचे पालन करणारे प्रभु लोकधाता होत || ३ || दृढव्रत- भगवंताची दीक्षा व व्रतपालन दृढ असल्यामुळे ते दृढव्रत आहेत ।। ४ ।। सर्वलोकातिग- त्रैलोक्यातील सर्व प्राणिसमूहांना आपल्या श्रेष्ठ आचरणाने Page #63 -------------------------------------------------------------------------- ________________ ५२) महापुराण (२५-१९२ पुराणः पुरुषः पूर्वः कृतपूर्वाङ्गविस्तरः । आदिदेवः पुराणाद्यः पुरुदेवोऽधिदेवता ॥ १९२ अथ त्रिकालदर्यादिशतकम् । युगमुख्यो युगज्येष्ठो युगादिस्थितिदेशकः । कल्याणवर्णः कल्याणः कल्यः कल्याणलक्षणः ॥ १९३ कल्याणप्रकृतिर्दीप्तकल्याणात्मा विकल्मषः । विकलङ्कः कलातीतः कलिलघ्नः कलाधरः ॥ १९४ उल्लंघून सर्वश्रेष्ठता प्रभुंनी प्राप्त करून घेतली आहे म्हणून ते सर्वलोकातिग झाले. सर्व लोकांचे पुढारी बनले ॥ ५ ॥ पूज्य- सर्वांनी आराधण्यास योग्य असलेले ॥ ६ ॥ सर्वलोकैकसारथिप्रभु सर्वजगाचे नेते असल्यामुळे ते सर्व लोकात एक मुख्य-सारथी-नेता झाले आहेत ॥ ७ ॥ पुराण- परमौदारिक अशा आपल्या शरीरात प्रभु मोक्षाला जाईपर्यन्त राहतात म्हणून ते पुराण आहेत ॥ ८॥ पुरुष- सर्व जगताला आपल्या ध्यानाने व्यापून टाकणारे प्रभ परुष होत. अथवा पुरु- इन्द्रादिकांनी पूजनीय अशा पदात प्रभु राहतात म्हणून प्रभु पुरुष होत ॥ ९ ।। पूर्व- प्रभु अत्यन्त प्राचीन असल्यामुळे त्यांना पूर्व म्हणतात. म्हणजे ते सर्व जगात आद्य आहेत ॥ १० ॥ कृतपूर्वाङ्गविस्तर- भगवंतांनी पूर्वापासून अचलापर्यन्त एकोणतीस संख्यांचा विस्तार सांगितल्यामुळे ते कृतपूर्वाङगविस्तर या नावाला प्राप्त झाले अथवा प्रभुंनी उत्पादपूर्व, अग्रायणीपूर्व आदिक चौदा पूर्वांचा विस्तार रचला आहे म्हणून ते कृतपूर्वांङगविस्तर आहेत. अर्थात् प्रभुंनी सर्वशास्त्राचा विस्तार सांगितला आहे ॥ ११॥ आदिदेव- सर्व प्रण्यांना जे आदिकारण आहेत असे प्रभु आदिदेव होत अथवा जगत्सृष्टीच्या पूर्वीही प्रभु स्वतःच्या ज्ञानरूपतेजाने-नेत्राने दीप्तियुक्त तेजस्वी आहेत ॥ १२ ॥ पुराणाद्य- महापुराणाच्या आरम्भापूर्वी प्रभु जन्मले म्हणून ते पुराणाद्य होत ।। १३ ।। पुरुदेव- पुरु म्हणजे मोठे अर्थात् इन्द्रादिकांनाही पूज्य असे देवपद प्रभूना प्राप्त झाले आहे म्हणून ते पुरुदेव आहेत ॥ १४ ॥ अधिदेवताइन्द्रादिकाकडून अतिशय आदराने पूजले गेलेले प्रभु अधि-मुख्य श्रेष्ठ देव आहेत ॥ १५ ।। युगमुख्य- कृतयुगांत आदिभगवान् मुख्य युगप्रधान झाले म्हणून ते युगमुख्य आहेत ॥ १६ ।। युगज्येष्ठ- कृतयुगामध्ये प्रभु ज्येष्ठ-वृद्ध व अतिशय प्रशंसनीय झाले आहेत ।। १७॥ युगादिस्थितिदेशक- कृतयुगाच्या प्रारम्भी आदिप्रभूनी क्षत्रिय, वैश्य व शूद्रांना जीवनाचे असि, मषि व कृष्यादि उपाय सांगितले म्हणून ते युगादिस्थितिदेशक होते ॥ १८ ॥ कल्याणवर्णकल्याणाप्रमाणे-सोन्याप्रमाणे प्रभूचे शरीर पीतवर्णाचे होते म्हणून त्यांना कल्याणवर्ण हे नाम आहे ॥ १९ ॥ कल्याण- कल्य-नीरोगीपणा, त्याने अनिति-भगवान् जगतात म्हणून ते कल्याण आहेत ॥ २० ॥ कल्य- कल्याण करण्यामध्ये कुशल असलेले श्रीजिन कल्य होत ॥ २१ ॥ कल्याणलक्षण- कल्याणमंगल हे चिह्न ज्यांचे आहे असे प्रभु कल्याणलक्षण आहेत ।। २२ ॥ कल्याणप्रकृति- कल्याण करणारी पुण्य प्रकृति ज्यांची आहे अर्थात् कल्याण करण्याचा स्वभाव ज्यांचा आहे असे भगवंत आदिजिन कल्याणप्रकृति होत ॥ २३ ॥ दीप्तकल्याणात्मा- दीप्तकल्याण देदीप्यमान असे पुण्य हा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु आहेत अर्थात् भगवन्त पुण्यात्मा आहेत ।। २४ ॥ विकल्मष- विगत नष्ट झालेले आहे कल्मष पाप ज्यांचे असे प्रभु विकल्मष Page #64 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-१९७) महापुराण देवदेवो जगन्नाथो जगबन्धर्जगद्विभुः । जगद्धितषी लोकज्ञः सर्वगो जगदग्रजः ॥ १९५ चराचरगुरुर्गोप्यो गूढात्मा गूढगोचरः । सद्योजातः प्रकाशात्मा ज्वलज्ज्वलनसप्रभः ॥ १९६ मादित्यवर्णो भर्माभः सुप्रभः कनकप्रभः । सुवर्णवर्णो रुक्माभः सूर्यकोटिसमप्रभः ॥ १९७ आहेत, पापरहित आहेत ।। २५ ॥ विकलङ्क- विगत-नष्ट झाला आहे कलङ्क-अपवाद ज्यांच्यापासून असे प्रभु विकलङ्क-निष्कलङ्क आहेत ।। २६ ॥ कलातीत- कला-शरीर ते प्रभूचे अतीतरहित झाले आहे अर्थात् शरीरबंधाने रहित असे प्रभु कलातीत आहेत ॥ २७ ॥ कलिलन्नकलिल-पपांचा नः नाश करणारे प्रभु कलिलघ्न होत ।। २८ ॥ कलाधर- बहात्तर कला धारण करणारे प्रभु कलाधर होत ।। २९ ॥ देवदेव- देवानां इन्द्रादीनां- देवः प्रभुः इन्द्रादिक देव ज्यांची आराधना करतात असे आदिप्रभु देवदेव आहेत. अथवा देव म्हणजे राजे त्यांचेही भगवान् देव आहेत म्हणजे राजाधिराज आहेत. अथवा देव- मेघकुमार देवांना प्रभु-भगवन्त देव आहेत म्हणजे परमाराध्य आहेत ॥३०॥ जगन्नाथ- आदिभगवान त्रिलोकस्वामी आहेत म्हणून ते जगन्नाथ आहेत ।। ३१ ॥ जगद्वन्धुभगवान् त्रैलोक्याचे बन्धु, हितकर्ते आहेत ॥ ३२ ॥ जगद्विभु- जगताचे-त्रैलोक्याचे भगवान् विभु स्वामी आहेत ॥ ३३ ॥ जगद्धितैषी- जगतातील प्राण्यांच्या हिताची इच्छा करणारे ॥ ३४ ॥ लोकज्ञ- अनन्तानन्तरूप आकाशाच्या बहुमध्यभागी घनोदधिवात, घनवात आणि तनुवात या तीन वातवलयांनी वेष्टित व अनादिनिधन अकृत्रिम, निश्चल आणि असंख्यात प्रदेशांचे हे त्रैलोक्य आहे त्याचे स्वरूप भगवान् जाणतात म्हणून ते लोकज्ञ आहेत ॥ ३५ ॥ सर्वग- सर्व पदार्थाकडे भगवान् जातात म्हणजे सर्व पदार्थाना जाणतात म्हणून ते सर्वग आहेत ।। ३६ ॥ जगदग्रज- जगतांचे अग्र म्हणजे त्रैलोक्यशिखर त्यावर जे उत्पन्न झालेले, विराजमान झालेले प्रभु जगदग्रज आहेत ।। ३७ ॥ चराचरगुरु- चर त्रसादि प्राणी व अचर स्थावर अशा प्राण्यांचा-मनुष्यादि प्राण्यांचा व अमनुष्यादि प्राण्यांचा गुरु प्रभु आहेत शास्ता आहेत त्यांच्या स्वरूपाचे कथन करणारे आहेत ॥ ३८ ॥ गोप्य- अतिशय सावधानपणाने हृदयात भक्तांनी सुरक्षित राखले जातात म्हणून प्रभु गोप्य आहेत ॥ ३९ ॥ गूढात्मा- गूढ स्वरूपाचे धारक प्रभु गूढात्मा आहेत ॥ ४० ॥ गूढगोचर- ज्यांची इन्द्रिये गूढ आहेत, गुप्त आहेत असे प्रभु गूढगोचर होत ।। ४१ ॥ सद्योजात- स्वर्गातून उतरून मातेच्या गर्भात उत्पन्न झाल्यामुळे प्रभु सद्योजात आहेत ।। ४२ ।। प्रकाशात्मा- प्रभुंचा आत्मा ज्ञानप्रकाशाने युक्त आहे ॥ ४३ ।। ज्वलज्ज्वलनसप्रभ- ज्वालायुक्त अग्नीप्रमाणे कान्ति ज्यांची आहे असे प्रभु ज्वलज्ज्वलनसप्रभ या नावाने शोभतात ॥ ४४॥ ___ आदित्यर्ण- सूर्याप्रमाणे वर्ण-कान्ति प्रभूची आहे म्हणून ते आदित्यवर्ण आहेत ॥४५।। भर्माभ- भर्म-सुवर्णाची कान्ति प्रभूला आहे म्हणून ते भर्माभ आहेत ॥ ४६ ॥ सुप्रभ-सुशोभायुक्त, कोटिचन्द्र व कोटि सूर्याप्रमाणे प्रभा असूनही डोळ्यांना प्रिय वाटणारी कान्ति ज्याची आहे असे प्रभु सुप्रभ होत ॥ ४७ ॥ कनकप्रभ- कनक-सोन्याप्रमाणे कान्ति प्रभूची Page #65 -------------------------------------------------------------------------- ________________ ५४) महापुराण (२५-१९८ तपनीयनिभस्तुङ्गो बालार्काभोऽनलप्रभः । सन्ध्याभ्रबभ्रुहेमाभस्तप्तचामीकरच्छविः ॥ १९८ निष्टप्तकनकच्छायः कनत्काञ्चनसन्निभः । हिरण्यवर्णः स्वर्णाभः शातकुम्भनिभप्रभः॥ १९९ युम्नाभो जातरूपाभो तप्तजाम्बूनवद्युतिः । सुधौतकलाधौतश्रीः प्रदीप्तो हाटकद्युतिः ॥ २०० शिष्टेष्टः पुष्टिदः पुष्ट: स्पष्टः स्पष्टाक्षरः क्षमः। शत्रुघ्नोऽप्रतिघोऽमोघः प्रशास्ता शासिता स्वभूः ॥ २०१ असल्यामुळे ते कनकप्रभ होत ।। ४८ ।। सुवर्णवर्ण- सोन्याप्रमाणे प्रभंचा वर्ण असल्यामुळे त्यांचे सुवर्णवर्ण हे नाव आहे ॥ ४९ ॥ रुक्माभ- रुक्म-सोने, त्याप्रमाणे त्यांची कान्ति असल्यामुळे प्रभु रुक्माभ आहेत ॥५०॥ सूर्यकोटिसमप्रभ- कोटिसूर्याप्रमाणे प्रभूची कान्ति असल्यामुळे ते सूर्यकोटिसमप्रभ आहेत ।। ५१॥ तपनीयनिभ- प्रभु तापविलेल्या सोन्याप्रमाणे आहेत ।। ५२ ।। तुङ्ग- उन्नत अर्थात् विशिष्ट फल देणारे प्रभु आहेत ।। ५३ ॥ बालार्काभ- बालसूर्याप्रमाणे प्रभूची प्रभा आहे म्हणून ते बालार्काभ आहेत ।। ५४ ॥ अनलप्रभ- अग्नीची कान्ति जशी असते तशी कान्ति असल्यामुळे प्रभु अनलप्रभ आहेत व त्यामुळे ते कर्मशत्रूचा नाश करणारे झाले ॥ ५५ ।। सन्ध्याभ्रबभ्रु- विप्रब्राह्मण उत्तम जे ध्यान करतात त्यास सन्ध्या हे नाव आहे. सर्व दिशा मिळवितो म्हणून, सर्व दिशा व्यापतो म्हणून मेघाला अभ्र म्हणतात. शोभा धारण करतो म्हणून बभ्रु-सन्ध्येच्या ढगाप्रमाणे पिंगट कान्तीचे प्रभु असल्यामुळे त्यांना सन्ध्याभ्रबभ्र हे नाव आहे ॥ ५६ ॥ हेमाभ- सोन्याप्रमाणे कान्तीचे धारक प्रभु हेमाभ आहेत ॥ ५७ ॥ तप्तचामीकरच्छवि- तापविलेल्या सोन्याप्रमाणे कान्ति ज्यांची आहे असे प्रभु तप्तचामीकरच्छवि होत ।। ५८ ॥ निष्टप्तकनकच्छाय- तापविलेल्या सोन्याप्रमाणे अङ्गशोभा ज्यांची आहे असे प्रभू ।। ५९ ॥ कनत्काञ्चनसंनिभ- चमकणान्या सुवर्णासारखे प्रभु आहेत ।। ६० ॥ हिरण्यवर्ण-- सोन्याप्रमाणे वर्ण ज्यांचा आहे असे प्रभु ॥ ६१ ॥ स्वर्णाभ-- सोन्यासारखी कान्ति धारण करणारे प्रभु ॥ ६२॥ शातकुम्भनिभप्रभ-- शतकुम्भ नामक पर्वतावर उत्पन्न झालेल्या सोन्याला शातकुम्भ म्हणतात. त्याप्रमाणे प्रभु शरीरकान्ति धारण करीत आहेत ।। ६३ ॥ द्युम्नाभसोन्याप्रमाणे आभा कान्ति ज्यांची असे भगवंत द्युम्नाभ होत ॥ ६४ ॥ जातरूपाभ-- जातरूपसोने त्याप्रमाणे आभा कान्ति असलेले प्रभु ॥ ६५ ।। तप्तजाम्बूनदद्युति- अग्नितप्त सोन्याप्रमाणे द्युति-कान्ति ज्यांची आहे असे प्रभु ॥ ६६ ॥ सुधौतकलधौतश्री- निर्मल अशा चान्दीप्रमाणे श्री-शोभेला धारण करणारे ॥ ६७ ॥ प्रदीप्त- अतिशय कान्तिसंपन्न ॥ ६८ ।। हाटकद्युति-- हाटक-सोने, त्याप्रमाणे कान्ति ज्यांची आहे असे प्रभु आहेत ।। ६९ ॥ शिष्टेष्ट-- इन्द्र, चक्रवर्ति, गणधरादि ज्या आदरणीय व्यक्ति त्यांच्याकडून प्रभु आदरिले गेले, पूजिले गेले आहेत ॥ ७० ॥ पुष्टिद-- प्रभु भक्तांचे पोषण करणारे आहेत म्हणून पुष्टिद आहेत ।। ७१ ॥ पुष्ट- पूर्वी सिद्ध झालेल्या महात्म्याप्रमाणे भगवान् अनन्त ज्ञानदर्शन सुखवीर्य आदिक गुणांनी पुष्ट-बलवान् झालेले आहेत ॥ ७२ ॥ स्पष्ट- प्रभूचे Page #66 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२०३) महापुराण शान्तिनिष्ठो मुनिज्येष्ठः शिवतातिः शिवप्रदः । शान्तिदः शान्तिकृच्छान्तिः कान्तिमान कामितप्रदः ॥ २०२ धियां निधिरधिष्ठानमप्रतिष्ठः प्रतिष्ठितः। सुस्थिरः स्थावरः स्थास्नुः प्रथीयान्प्रथितः पृथुः ॥२०३ अनन्तज्ञानादि गुण पूर्ण प्रकट झाले आहेत म्हणून स्पष्ट आहेत ॥७३॥ स्पष्टाक्षर- ज्यांचे वर्ण स्पष्ट व कान आणि मनाला प्रिय असे आहेत ते प्रभु स्पष्टाक्षर होत ॥ ७४ ॥ क्षम- प्रभु परीषह सहन करण्यास समर्थ म्हणून त्यांना क्षम म्हणता ।। ७५ ॥ शत्रुघ्न- चार घातिकर्मांचा नाश केल्यामुळे प्रभु शत्रुघ्न आहेत ॥ ७६ ॥ अप्रतिघ- प्रतिघ-क्रोध. तो प्रभुंना नसल्यामुळे ते अप्रतिघ आहेत ।। ७७ ।। अमोघ-- प्रभु आत्मध्यानाने केवलज्ञान प्राप्त करून सफल झाले त्यांचा प्रयत्न मोघ-विफल झाला नाही ॥ ७८ ॥ प्रशास्ता-- विनेयवरान्-उत्तम मुनिशिष्यांना प्रभुंनी धर्म शिकविला म्हणून प्रभु प्रशास्ता आहेत ॥ ७९ ॥ शासिता-- प्रभु शासिता भव्यांचे रक्षक आहेत ।। ८० ॥ स्वभू-- स्वतःच स्वतःच्याद्वारे प्रभु उत्पन्न झाले म्हणून ते स्वभू आहेत अर्थात् स्वतःच स्वस्वरूपाच्या चिन्तनाने प्रभुनी जाणण्याला योग्य अशा आत्म्याचे स्वरूप जाणले म्हणून प्रभु स्वभू झाले ॥ ८१ ॥ शान्तिनिष्ठ-- शान्ति-कामक्रोधादिकांचा अभाव होणे ती शान्ति होय. निष्ठा-- त्या शान्तीत अतिशय स्थिर राहणे ती शान्तिनिष्ठा होय अर्थात् यथाख्यात चारित्रात शान्तिनिष्ठा असते. ते यथाख्यातचारित्र भगवंतांना प्राप्त झाले म्हणून ते शान्तिनिष्ठ होते ।। ८२ ।। मुनिज्येष्ठ- मुनिगणामध्ये प्रभु अतिशय श्रेष्ठ व प्रशंसनीय म्हणून मुनिज्येष्ठ ॥ ८३ ।। शिवताति- शिव-निर्वाणाची तातिः चिन्ता ज्यांना असे प्रभु शिवताति होत अथवा शिवं करोति इति शिवताति-- मोक्षप्राप्ति प्रभु भक्तांना करून देतात म्हणून प्रभु शिवताति होत ॥ ८४ ॥ शिवप्रद-- शिवं परमकल्याणं प्रददाति इति शिवप्रदः अत्युत्कृष्ट कल्याणाची प्राप्ति प्रभु भक्तांना करून देतात म्हणून ते शिवप्रद होत ॥ ८५ ॥ शान्तिदकामक्रोधादिकांचा अभावरूप शान्ति प्रभु भक्तांना देतात ॥ ८६ ॥ शान्तिकृत्- शान्ति-क्षुद्र उपद्रवांचा विनाश प्रभु कृत् करतात म्हणून ते शान्तिकृत् आहेत ।। ८७॥ शान्ति- प्रभूनी सर्व कर्माचा क्षय केला म्हणून ते शान्ति झाले ॥ ८८ ॥ कान्तिमान्- कान्ति-शोभा. ती प्रभूजवळ नेहमी आहे म्हणून ते कान्तिमान् ॥ ८९ ॥ कामितप्रद- कामितं वाञ्छित प्रभु देतात म्हणून ते कामितप्रद आहेत ।। ९० ॥ श्रियां निधि- प्रभु केवलज्ञानलक्ष्मीचे निधि-स्थान आहेत ॥ ९१ ॥ अधिष्ठानम् धर्माचा पाया असे प्रभु अधिष्ठान होत ॥ ९२ ॥ अप्रतिष्ठ- अन्यांच्याद्वारे प्रतिष्ठा ज्यांनी करून घेतली नाही असे प्रभु अप्रतिष्ठ होत ॥ ९३ ॥ प्रतिष्ठित- प्रभु केवलज्ञानादि गुणांच्या स्थैर्याने स्थैर्ययुक्त झाले आहेत ॥ ९४ ।। सुस्थिर- योगांचा निरोध झाल्यावर उभे राहून किंवा पद्मासनाने प्रभु निश्चल झाले म्हणून सुस्थिर होत ॥ ९५ ।। स्थावर- विहाररहित असल्यामुळे प्रभु स्थावर होत ।। ९६ ।। स्थास्तु- अचल असल्यामुळे प्रभु स्थास्नु होत ॥ ९७ ।। प्रथीयान्अत्यन्त मोठे विशाल होण्याने प्रभु प्रथीयान् ।। ९८ ॥ प्रथित- जगत्प्रसिद्ध झाल्यामुळे प्रभूना प्रथित हे नाव आहे ॥ ९९ ।। पृथु- ज्ञानादि गणांनी महान् असल्यामुळे प्रभु पृथु आहेत ।। १०० ।। Page #67 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण दिग्वासादिशतकम् । दिग्वासा वातरशनो निर्ग्रन्थेशो दिगम्बरः । निष्किञ्चनो निराशंसो ज्ञानचक्षुरमोमुहः ॥ २०४ तेजोराशिरनन्तौजा ज्ञानाब्धिः शीलसागरः । तेजोमयोऽमितज्योतिर्ज्योतिर्मूतिस्तमोऽपहः ॥ २०५ जगच्चूडामणिर्दीप्तः शंवान्विघ्नविनायकः । कलिघ्नः कर्मशत्रुघ्नो लोकालोकप्रकाशकः ॥ २०६ अनिन्द्रालुरतन्द्रालुर्जागरूकः प्रमामयः । लक्ष्मीपतिर्जगज्ज्योतिर्धर्मराजः प्रजाहितः || २०७ ५६) ( २५- २०४ दिग्वासा - दहा दिशा हेच वस्त्र ज्यांचे आहे असे प्रभु दिग्वासा होत अर्थात् पूर्ण नग्न होत ।। १ ।। वातरशन - वारा हाच ज्यांचा कडदोरा आहे असे भगवन्त वातरशन होत ॥ २ ॥ निर्ग्रन्थेश - घरदार वस्त्र आदि बाह्य दहा प्रकारचे परिग्रह व अन्तरङ्ग चौदा प्रकारचे परिग्रह या चोवीस परिग्रहांनी रहित अशा नग्न जैन साधूंचे भगवान् स्वामी आहेत || ३ || दिगम्बरपूर्वादिक दिशा हीच वस्त्रे प्रभूंनी धारण केली आहेत ॥ ४ ॥ निष्किञ्चन - ज्यांच्यापासून धन निघून गेले आहे असे अर्थात् सर्व परिग्रहत्यागी प्रभु निर्ग्रन्थाचार्य झाले ॥ ५ ॥ निराशंस - सर्व प्रकारच्या इच्छा ज्यांच्यापासून दूर गेल्या आहेत ते प्रभु निराशंस-आशारहित होत ॥ ६ ॥ ज्ञानचक्षु- मति, श्रुत, अवधि, मन:पर्यय व केवल ही पाच ज्ञाने चक्षु डोळा ज्याना आहे ते प्रभु ज्ञानचक्षु होत || ७ || अमोमुह - आदिभगवान् अत्यन्त मोहरहित झाल्यामुळे ते अमोमुह-पूर्ण निर्मोह झाले आहेत ।। ८ ।। तेजोराशि- पुष्कळ सूर्यसमूहाच्या तेजांच्या राशीप्रमाणे ज्याचा तेजःसमूह आहे असे प्रभु तेजोराशि आहेत ।। ९ ।। अनन्तौजा- अनन्त असे ओज- प्रकाश, बल, ज्यांच्या ठिकाणी आहे असे प्रभु आहेत ।। १० ।। ज्ञानाब्धि- प्रभु ज्ञानाचे - केवलज्ञानाचे सागर आहेत ।। ११ ।। शीलसागर -- अठरा हजार शीलांचे पालन प्रभु करीत असल्यामुळे ते त्यांचे समुद्र आहे || १२ || तेजोमय-- प्रभु तेजांनी पूर्ण आहेत ॥ १३ ॥ अमितज्योति-- प्रभु अमर्याद ज्योतिःस्वरूप आहेत ॥ १४ ॥ ज्योतिर्मूर्ति-- प्रभु जणु तेजाची मूर्ति आकृति धारण करून अवतरलेले आहेत ।। १५ ।। तमोऽपह-- तम-अन्धकाराचा अपहन्ति नाश करणारे आहेत. ।। १६ ।। जगच्चूडामणि- प्रभु आदिनाथ त्रैलोक्याला शोभविणारे जणु चुडामणि आहेत ॥ १७॥ दीप्त - ते कान्तिसम्पन्न आहेत || १८ || शंवान् -- शं सुख त्याने युक्त अर्थात् प्रभु अनन्तसुखयुक्त आहेत ।। १९ ।। विघ्नविनायक दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य-शक्ति यांची प्राप्ति न होऊ देणारे अशा अन्तराय कर्माला विघ्न म्हणतात. त्या विघ्नाचा विनायक-नाश करणारे प्रभु विघ्नविनायक होत ॥ २० ॥ कलिघ्न -- कलि-संग्राम-युद्ध त्याला घ्न- नष्ट करणारे प्रभु कलिघ्न होत ।। २१ ।। कर्मशत्रुघ्न- कर्मरूपी शत्रूला मारणारे प्रभु आहेत ॥ २२ ॥ लोकालोकप्रकाशक - भगवन्त लोक व अलोकाचे प्रकाशन करतात, व त्याचे वर्णन करून सांगतात ।। २३ ।। अनिद्रालु - प्रभु निद्रालु झोप न घेणारे सतत जागृत राहणारे आहेत ॥२४॥ अतन्द्रालु-- तन्द्रा आळस, तन्द्रालु म्हणजे आळशी - अतन्द्रालुः आळसाने रहित असे प्रभु तन्द्रालु होते ।। २५ ।। जागरूक - प्रभु आत्मस्वरूपात नेहमी जागे असतात म्हणून ते जागरूक आहेत ।। २६ ।। प्रमामय -- प्रभु प्रमामय -ज्ञानमय आहेत ॥ २७ ॥ लक्ष्मीपति-- प्रभु बाह्याभ्यन्तर लक्ष्मीचे पति आहेत ।। २८ || जगज्ज्योति- प्रभु सर्व जगाला ज्योतिरङग Page #68 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२१०) महापुराण (५७ अनिद्रालुरतन्द्रालुर्जागरूकः प्रमामयः । लक्ष्मीपतिर्जगज्ज्योतिधर्मराजः प्रजाहितः ॥ २०७ मुमुक्षर्बन्धमोक्षज्ञो जिताक्षो जितमन्मथः । प्रशान्तरसशैलूषो भव्यपेटकनायकः ॥ २०८ मूलकर्ताखिलज्योतिर्मलघ्नो मूलकारणः। आप्तो वागीश्वरः श्रेयाञ्च्छायसोक्तिनिरुक्तवाक् ॥२०९ प्रवक्ता वचसामीशो मारजिद्विश्वभाववित् । सुतनुस्तनुनिर्मुक्तः सुगतो हतदुर्णयः ॥ २१० कल्पवृक्षासारखे आहेत. सूर्यचन्द्राप्रमाणे सर्ववस्तुद्योतक आहेत ॥ २९ ॥ धर्मराज- धर्मअहिंसा हे धर्माचे लक्षण आहे. तसेच चारित्र, रत्नत्रय, उत्तमक्षमादिक यांचे आदिभगवान् राजा आहेत ॥ ३० ॥ प्रजाहित-- त्रैलोक्यस्थित सर्व लोकाचे हितकर्ते भगवान् आहेत ॥ ३१ ॥ ममा-- घातिकर्मे व अघातिकर्मे यांनी जे रहित झाले आहेत असे प्रभु मुमुक्षु होत ॥ ३२ ।। बन्धमोक्षज्ञ-- बन्ध आणि मोक्ष यांचे स्वरूप जाणणारे प्रभु बन्धमोक्षज्ञ होत ॥ ३३ ॥ जिताक्ष- ज्यांनी सर्व इंद्रिये जिंकली आहेत ते जिताक्ष ।। ३४ ॥ जितमन्मथ तन्यशक्तीचे मंथन करणान्या मन्मथाला-मदनाला प्रभुंनी जिंकले म्हणन ते • जितमन्मथ आहेत ।। ३५ ।। प्रशान्तरसशैलूष-- अतिशय शान्त असा जो नववा रस त्यात तन्मय झालेले भगवान् त्या रसाचे नटाचार्य आहेत ॥ ३६ ।। भव्यपेटकनायक- रत्नत्रययोग्य अशा भव्यांच्या समूहाचे प्रभु नायक-स्वामी आहेत ॥ ३७ ।। मूलकर्ता-- धर्माचे प्रथमतः स्वरूप सांगून त्याची प्रतिष्ठा करणारे। प्रभु मूल कर्ता आहेत ॥ ३८ ॥ अखिलज्योति-- सर्व जगात केवलज्ञानदर्शनरूप डोळा हा प्रभूचा आहे म्हणून ते अखिलज्योति होत ॥ ३९ ॥ मलघ्नतपाचे मल माया, मिथ्यात्व निदान हे आहेत. त्यांचा नाश प्रभूनी केला म्हणून ते मलघ्न आहेत ।। ४० ॥ मूलकारणम्-धर्माच्या अंकुराला अथवा धर्माच्या उत्पत्तीला किंवा सृष्टीला मूलकारण हे प्रभु आहेत ।। ४१ ।। आप्त-- क्षुधादिक अठरा दोषांनी रहित होऊन केवलज्ञानी जे झाले आहेत ते प्रभु आप्त होत ॥ ४२ ॥ वागीश्वर- प्रभु दिव्यध्वनीचे स्वामी आहेत ॥ ४३ ॥ श्रेयान्-- अतिशय उत्कृष्ट कल्याणस्वरूपी प्रभु आहेत ॥ ४४ ॥ श्रायसोक्ति-- मोक्षप्राप्तीला कारण अशी भगवन्ताची उक्ति-वाणी उपदेश आहे म्हणून ते श्रायसोक्ति आहेत ।। ४५ ।। निरुक्तवाक्-- निरुक्त निश्चित वस्तुस्वरूप दाखविणारे प्रभूचे वचन आहे म्हणून ते निरुक्तवाक् आहेत ।। ४६ ॥ प्रवक्ता-- अतिशय उत्कृष्ट वक्ता ।। ४७ ।। वचसामीश-- प्रभु वाणींचे स्वामी आहेत ।। ४८ ॥ मारजित्-- प्रभूनी मदनाला जिंकले म्हणून ते मारजित् आहेत ।। ४९ ॥ विश्वभाववित्-- त्रैलोक्यातील सर्व जीवांचे मनातील अभिप्राय प्रभु जाणतात म्हणून ते विश्वभावजित् आहेत ॥ ५० ॥ सुतनुः सु-- शोभन-सुन्दर तनु शरीर आहे ज्यांचे असे प्रभु सुतनु होत ।। ५१ ॥ तनुनिर्मुक्त-- प्रभु तनूने-शरीराने निर्मुक्त रहित आहेत अर्थात् सिद्धावस्थेत ते शरीररहित असतात ॥ ५२ ।। सुगत-- प्रभूचे गमनविहार करणे सुन्दर आहे म्हणून ते सुगत अथवा सु-अतिशय उत्तम गतं-केवलज्ञान प्रभूचे आहे म्हणून ते सुगत अथवा सुगा-म्हणजे पुढे जाणारी ता-लक्ष्मी ज्यांची आहे असे प्रभु सुगत होत ।। ५३ ॥ हतदुर्णय-- सर्वथानित्यच, म. ८ Page #69 -------------------------------------------------------------------------- ________________ ५८) महापुराण (२५-२११ श्रीशः श्रीश्रितपादाब्जो वीतभीरभयङ्करः । उत्सन्नदोषो निर्विघ्नो निश्चलो लोकवत्सलः ॥२११ लोकोत्तरो लोकपतिर्लोकचक्षुरपारधीः । धीरधीर्वृद्धसन्मार्गः शुद्धः सूनृतपूतवाक् ॥ २१२ प्रज्ञापारमितः प्राज्ञो यतिनियमितेन्द्रियः । भदन्तो भद्रकृद्भद्रः कल्पवृक्षो वरप्रदः ॥ २१३ ............... सर्वथा अनित्यच, सर्वथा एकच सर्वथा अनेकच असे वस्तुस्वरूप सांगणारे जे सर्वथा एकान्त नय ते दुर्णय होत-त्यांचा प्रभूनी हत: नाश केला म्हणून प्रभु हतदुर्णय होत ॥ ५४ ॥ श्रीश-- श्रीदेवीचे प्रभु ईश-स्वामी आहेत ॥ ५५ ॥ श्रीश्रितपादाब्ज- श्रीदेवतेने आश्रयिले आहेत पदकमल ज्यांचे असे प्रभु श्री-श्रितपादाब्ज होत ।। ५६ ॥ वीतभी-- वीता नष्ट झाली आहे भी-भीति ज्यांची असे प्रभ वीतभी होत ।। ५७ ॥ अभयंकर-- प्रभ भक्तभय दूर करणारे आहेत म्हणून अभयंकर ॥ ५८ ।। उत्सन्नदोष-- उत्सन्न-नष्ट केले आहेत कामक्रोधादिक दोष ज्यांनी असे प्रभु उत्सन्नदोष होत ।। ५५ ॥ निर्विघ्न-- निर्-नष्ट झालेले आहे विघ्न अन्तरायकर्म ज्यांचे असे प्रभु निर्विघ्न होत ॥६०॥ निश्चल-- नष्ट झालेला आहे चल कंप ज्यापासून किंवा ज्याचा असे प्रभु निश्चल होत. अर्थात् सदा स्थिर आहेत ॥ ६१ ॥ लोकवत्सल-- प्रभु लोकाविषयी प्रेमळ असल्यामुळे ते लोकवत्सल होत ॥ ६२ ।। लोकोत्तर-- त्रैलोक्यात असलेल्या प्राणिसमूहात प्रभु उत्तर-उत्कृष्ट आहेत म्हणून ते लोकोत्तर आहेत ।। ६३ ।। लोकपति-- आदिभगवान् त्रैलोक्यातील सर्व लोकांचे स्वामी आहेत ।। ६४ ॥ लोकचक्षु-- लोक म्हणजे सर्व प्राणिसमूह त्यांना भगवान् डोळ्याप्रमाणे आहेत अथवा लोके-लोकात व अलोकात भगवान् चक्षु-केवलज्ञान व केवलदर्शन या दोन डोळ्यांनी युक्त आहेत ॥ ६५ ॥ अपारधी-- सर्व कर्मे नष्ट झाल्यानंतर अपार अशा सिद्धक्षेत्रात ज्यांची बुद्धि तत्पर झाली आहे असे प्रभु अपारधी होत ॥ ६६ ॥ धीरधी-- धीरा-धैर्ययुक्त व कम्परहित अशा बुद्धीने प्रभु युक्त आहेत ॥ ६७ ।। बुद्धसन्मार्ग-- सतां-अतीतकाली जे निर्वाणसागर आदि तीर्थंकर होऊन गेले त्या सत्पुरुषांचा मार्ग रत्नत्रयरूप मोक्षमार्ग तो प्रभु आदिजिनानी जाणला आहे म्हणून ते बुद्धसन्मार्ग आहेत ॥ ६८ ॥ शुद्ध-- प्रभु शुद्ध-कर्मकलंकरहित आहेत. अर्थात् शुद्ध या नांवाने शोभत आहेत ॥ ६९ ॥ सूनृतपूतवाक्-- सत्याने पूत-पवित्र वाक्-वाणी ज्यांची आहे असे प्रभु सूनृतपूतवाक् आहेत ॥ ७० ॥ प्रज्ञापारमित-- जीवादि वस्तूंचा ऊहापोह करणारी अशा बुद्धीच्या दुसऱ्या किनाऱ्याला प्रभु पोचलेले आहेत म्हणून ते प्रज्ञापारमित आहेत ॥७१।। प्राज्ञ-- त्रिकालाला विषय झालेले जे जीवादि पदार्थ त्यांचे ज्ञान प्रभूला आहे म्हणून ते प्राज्ञ होत ॥ ७२ ।। यति- रत्नत्रयात प्रभु यत्न करतात म्हणून यति आहेत ॥ ७३ । नियमितेन्द्रिय-- प्रभुंनी आपले डोले आदिक इन्द्रिये नियन्त्रित केली आहेत-स्वाधीन ठेविली आहेत ॥ ७४ ॥ भदन्त-- इन्द्र, नरेन्द्र, धरणेन्द्रादिकांना प्रभु पूजनीय आहेत म्हणून ते भदन्त आहेत ।। ७५ ॥ भद्रकृत्- ज्यांनी भद्र-कल्याण केले आहे, जीवांचे कल्याण केले व करीत राहतात असे आदिजिनेन्द्र भद्रकृत् होत ।। ७६ ॥ भद्र-- प्रभु कल्याणस्वरूप आहेत ॥ ७७ ॥ कल्पवृक्ष-- कल्पध्यान-चिन्तन केले असता फळ देणारा वृक्ष असे प्रभु आहेत ॥ ७८ ॥ वरप्रद-- वर-अभीष्ट असे स्वर्ग व मोक्ष प्रभु भक्तांना देतात म्हणून ते वरप्रद आहेत ॥ ७९ ॥ Page #70 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२१७) महापुराण समुन्मूलितकर्मारिः कर्मकाष्ठाशुशुक्षणिः । कर्मण्यः कर्मठः प्राशुहेयादेयविचक्षणः ॥ २१४ अनन्तशक्तिरच्छेद्यस्त्रिपुरारिस्त्रिलोचनः । त्रिनेत्रस्त्र्यम्बकस्त्र्यक्षः केवलज्ञानवीक्षणः ॥ २१५ समन्तभद्रः शान्तारिर्धर्माचार्यो दयानिधिः । सूक्ष्मदर्शी जितानङ्गः कृपालुधर्मदेशकः ।। २१६ शुभंयुः सुखसाद्भूतः पुण्यराशिरनामयः । धर्मपालो जगत्पालो धर्मसाम्राज्यनायकः ॥ २१७ समुन्मूलितकर्मारि-- मुळापासून कर्मरिपु प्रभुंनी उपटून टाकले म्हणून ते त्या नांवाने युक्त आहेत।। ८०।। कर्मकाष्ठाशुशुक्षणि--प्रभु कर्मरूपी लाकडांना जाळणारे जणु अग्नि आहेत ॥८१॥ कर्मण्य--प्रभु आत्मोद्धारक उपदेश करण्यात कुशल आहेत म्हणून त्यांना कर्मण्य म्हणतात ॥ ८२ । कर्मठ-- सर्वदा कर्म करण्यात जीवांना हितकारक अशा रत्नत्रयात प्रवृत्त करण्यास शूर ।। ८३।। प्रांशु-- सर्वापेक्षा उन्नत-तीर्थंकरपदाने सर्वोत्कृष्ट ॥ ८४ ॥ हेयादेयविचक्षण-- प्रभु ग्रहण करण्याचे पदार्थ कोणते व त्यागण्याचे पदार्थ कोणते हे जाणण्यात चतुर आहेत ।। ८५ ॥ अनन्तशक्ति-- अनन्तशक्ति युक्त असल्यामुळे प्रभु अनन्त सामर्थ्यवान आहेत ।। ८६ ।। अच्छेद्य-- ज्यांचे छेदनभेदन करणे शक्य नाही असे प्रभु आहेत ।। ८७ ।। त्रिपुरारि-- जन्म जरा व मरण या तीन नगरांचा नाश करणारे प्रभु त्रिपुरारि आहेत ।। ८८ ।। त्रिलोचन-- तीन कालांना विषय होणान्चा पदार्थाना पाहणारे दोन डोळे-केवलज्ञान व केवलदर्शन हे ज्यांना आहेत असे प्रभु त्रिलोचन होत ॥ ८९ ॥ त्रिनेत्र-- सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यकचारित्र हे तीन डोळे ज्याना आहेत असे प्रभु त्रिनेत्र आहेत ।। ९० ॥ त्र्यम्बक-- प्रभु त्रिलोकाचे अम्बक पिता आहेत म्हणून त्याना त्र्यम्बक हे नाव आहे ॥ ९१ ॥ त्र्यक्ष-- ज्या प्रभूच्या आत्म्याला तीन अवयवसम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र हे आहेत म्हणून त्यांना त्र्यक्ष म्हणतात ॥ ९२ ॥ केवलज्ञानवीक्षण-- प्रभूना केवलज्ञान हा विशष्ट डोळा आहे यास्तव त्यांना केवलज्ञानवीक्षण म्हणतात ।। ९३ ॥ ___समन्तभद्र-- सर्व बाजूंनी कल्याणच ज्यांचे आहे असे प्रभु समन्तभद्र होत अथवा ज्यांचे सर्व स्वभाव शुभच आहेत असे प्रभु समन्तभद्र होत ।। ९४ ।। शान्तारि-- सर्व शत्रु शान्त झाले आहेत ज्यांचे असे प्रभु शान्तारि आहेत ॥ ९५ ।। धर्माचार्य-- प्रभु उत्तम क्षमादि दशलक्षण धर्माचे आचार्य आहेत गुरु आहेत ॥ ९६ ।। दयानिधि-- प्रभु करुणेचे दयेचे निधि-निवासस्थान आहेत ॥ ९७ ॥ सूक्ष्मदर्शी-- अतिशय सूक्ष्म पदार्थाला पाहण्याचा शील-स्वभाव ज्यांचा आहे असे प्रभु आहेत ॥ ९८ ।। जितानङ्ग-- मदनाला जिंकले म्हणून प्रभु जितानङ्ग आहेत ॥ ९९ ॥ कृपालु-- प्रभूच्या ठिकाणी दया आहे म्हणून ते कृपालु आहेत ।। १०० ।। धर्मदेशक-- प्रभु धर्माचा उपदेश करतात म्हणून ते धर्मदेशक आहेत ॥१०१॥ शुभंयु- शुभ कर्माच्या उदयाने पूर्ण भरलेले प्रभु शुभंयु होत ॥१०२।। सुखसाद्भूत- अनन्तसुखमय प्रभु झाले त्यामुळे ते सुखसाद्भूतः या नांवाने युक्त झाले. अथवा मातेच्या गर्भातून सुखाने उत्पन्न झालेले ।। १०३ ।। पुण्यराशि-- शुभ, आयु, शुभनाम, शुभगोत्र व सद्वैदनीय कर्म या पुण्य कर्माच्या राशींनी युक्त असे प्रभु पुण्यराशि होत ॥ १०४ ॥ अनामय-- आमय-मानसिक व शारीरिक रोग याने रहित प्रभ असल्यामळे ते अनामय आहेत ।। १०५ ॥ धर्मपाल-- उत्तम क्षमादि दशधर्माचे प्रभु पालन करतात म्हणून Page #71 -------------------------------------------------------------------------- ________________ ६०) महापुराण (२५-२१८ धाम्नां पते तवामूनि नामान्यागमकोविदः । समुच्चितान्यनुध्यायन्पुमान्पूतस्मृतिर्भवेत् ॥ २१८ गोचरोऽपि गिरामासां त्वमवाग्गोचरी मतः । स्तोता तथाप्यसन्दिग्धं त्वत्तोऽभीष्टफलं भजेत् ॥ त्वमतोऽसि जगद्वन्धुस्त्वमतोऽसि जगद्भिषक् । त्वमतोऽसि जगद्धाता त्वमतोऽसि जगद्धितः॥ त्वेमकं जगताञ्ज्योतिस्त्वं द्विरूपोपयोगभाक् । त्वं त्रिरूपैकमुक्त्यङ्गः स्वोत्थानन्तचतुष्टयः ॥ २२१ ञ्चब्रह्मतत्त्वात्मा पञ्चकल्याणनायकः। षड्भेदभावतत्त्वज्ञस्त्व सप्तनयसङग्रहः ॥ २२२ दिव्याष्टगणमूर्तिस्त्वं नवकेवललब्धिकः । दशावतारनिर्धार्यो मां पाहि परमेश्वर ॥ २२३ ते धर्मपाल आहेत ॥ १०६ ।। जगत्पाल- जगताच्या मनाचे रक्षण करणारे प्रभु जगत्पाल आहेत ॥१०७॥ धर्मसाम्राज्यनायक-- धर्मरूप सर्व साम्राज्याचे प्रभु नायक-स्वामी आहेत ॥१०८॥ हे महातेजस्वी जिनेश्वरा, आगमाच्या जाणत्या विद्वानांनी तुझी ही नांवे वेचून काढलेली आहेत. या नांवाचे वारंवार चिन्तन करणारा भक्त पुरुष ज्याची स्मृति पवित्र झाली आहे असा होईल ।। २१८ ।। हे प्रभो, या हजार नामशब्दांचा जरी आपण विषय झालेले आहात तरी आपण आमच्या वाणीचा विषय झालेले नाहीत. कारण आपले यथार्थ वर्णन करणे कोणालाही शक्य नाही तरी पण आपली स्तुति करणारा भक्त आपणापासून निःसंशय इच्छित फलाला मिळवील ।। २१९ ॥ हे प्रभो, आपण जगाचे बन्धु-हितकर्ते आहा. तसेच आपण जगताच्या मानसिक व शारीरिक पीडा नाहीशा करणारे जगद्वैद्य आहात. हे प्रभो, आपण जगाचे पोषण करणारे व जगाचे हितकर्ते आहात ॥ २२० ॥ हे प्रभो, आपण या त्रैलोक्याला प्रकाशित करणारे मुख्य तेज आहात. आपण केवलज्ञान व केवलदर्शन या दोन उपयोगांनी पूर्ण झालेले आहात. सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र या रत्नत्रयाचे संमेलनरूप एक मुक्तीचे अङ्ग आहात व आपल्या आत्म्यापासून अनन्त चतुष्टय ( अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तसुख व अनन्तशक्ति ) उत्पन्न झाले आहे ।। २२१ ॥ हे प्रभो, आपण पञ्चपरमेष्ठिस्वरूपाचे आहात, ( अर्हत्, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधु) आणि आपण पञ्चकल्याणाचे स्वामी आहात. हे भगवन्ता, आपण सहा प्रकारच्या द्रव्यांचे स्वरूप जाणत आहात (जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश व काल ). हे आदिभगवंता, आपण नेगमादि सात नयांचा संग्रहस्वरूप आहात (नैगम, संग्रह, व्यवहार, ऋजुसूत्र, शब्द, समाभिरूढ व एवंभूत ) ॥ २२२ ॥ - हे प्रभो, आपण सम्यक्त्वादि आठ दिव्य गुणांची मूर्ति आहात ( सम्यक्त्व, केवलज्ञान, केवलदर्शन, वीर्य, सूक्ष्मत्व, अगुरुलघु, अव्याबाधता, अवगाहन). आपण नऊ केवललब्धींनी विराजमान आहात. (क्षायिक सम्यग्दर्शन, क्षायिकज्ञान-केवलज्ञान, यथाख्यातचारित्र, दान, लाभ, भोग, उपभोग वीर्य व केवलदर्शन ) व महाबलादि दहा जन्मानी आपण निश्चयाने जाणण्यास योग्य आहात यास्तव हे परमेश्वरा, आपण माझे रक्षण करा ॥ २२३ ॥ Page #72 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२३२) महापुराण (६१ युष्मन्नामावलीदुब्धविलसत्स्तोत्रमालया। भवन्तं वरिवस्यामः प्रसीदानुगृहाण नः ॥ २२४ इदं स्तोत्रमनुस्मृत्य पूतो भवति भाक्तिकः । यः सम्पाठं पठत्येनं स स्यात्कल्याणभाजनम् ॥ २२५ ततः सदेदं पुण्यार्थी पुमान् पठतु पुण्यधीः । पौरुहूती श्रियं प्राप्तुं परमामभिलाषुकः ॥ २२६ स्तुत्वेति मघवा देवं चराचरजगद्गुरुम् । ततस्तीर्थविहारस्य व्यधात्प्रस्तावनामिमाम् ॥ २२७ इन्द्राने स्तुति करून नन्तर तीर्थविहाराची पुढील प्रस्तावना केली ।। २२७ भगवन्भव्यसस्यानां पापावग्रहशोषिणाम् । धर्मामतप्रसेकेन त्वमेधि शरणं विभो ॥ २२८ भव्यसार्थाधिप प्रोद्ययाध्वजविराजित । धर्मचक्रमिदं सज्जं त्वज्जयोद्योगसाधनम् ॥ २२९ निय मोहपृतनां मुक्तिमार्गोपरोधिनीम् । तवोपदेष्टुं सन्मार्ग कालोऽयं समुपस्थितः ॥ २३० इति प्रबुद्धतत्त्वस्य स्वयम्भर्तुजिगीषतः । पुनरुक्ततरा वाचः प्रादुरासन्शतक्रतोः ॥ २३१ अथ त्रिभुवनक्षोभी तीर्थकृत्पुण्यसारथिः । भव्याब्जानुग्रहं कर्तुंमुत्तस्थे जिनभानुमान् ॥ २३२ हे प्रभो, आपल्या एक हजार आठ गुण पंक्तीनी गुंफलेली व शोभणारी अशा स्तुतिमालेने आम्ही आपली पूजा करतो. हे प्रभो, आपण आम्हावर प्रसन्न व्हा, आम्हावर आपला अनुग्रह करा ॥ २२४ ॥ हे स्तोत्र चांगले स्मरून भक्ति करणारा भव्यजीव पवित्र होतो. या उत्तम स्तोत्रपाठाला जो म्हणतो तो पंचकल्याणाचे पात्र होतो ॥ २२५ ॥ म्हणून इंद्राची लक्ष्मी प्राप्त करून घेण्याची अतिशय अभिलाषा करणारा पुण्यार्थीपुण्ययुक्त बुद्धीचा मानव हे स्तोत्र नेहमी म्हणो, नेहमी या स्तोत्राचे पठन करो ॥ २२६ ।। याप्रमाणे इन्द्राने चराचरजगाचे गुरु अशा भगवंताची स्तुति करून नन्तर तीर्थविहाराची पुढील प्रस्तावना केली हे भगवन्ता, पापरूपी अवर्षणाने शुष्क झालेल्या भव्यजीवरूपी धान्याना धर्मामृताची वृष्टि करून आपण वृद्धिंगत करा. हे विभो, आम्ही आपणास शरण आलो आहोत ॥ २२८॥ उभारलेल्या दयारूपी ध्वजाने शोभत असलेल्या भव्यजीवांचा राजा अशा हे जिनेश्वरा, आपणास जगद्विजयाच्या कार्यात साधन असलेले हे धर्मचक्र सज्ज आहे ॥ २२९ ॥ मोक्षमार्गात आड येणाऱ्या मोहाच्या सेनेला जिंकून जगाला सन्मार्ग दाखविण्याची वेळ आता प्राप्त झाली आहे ॥ २३० ।। ज्यांना जीवादिक तत्त्वांचे ज्ञान झाले आहे व स्वयं विजयाची इच्छा धारण करणाऱ्या भगवंताना हे इंद्राचे भाषण पुनरुक्तिप्रमाणे झाले ।। २३१ ।। यानन्तर त्रैलोक्यात क्षोभ उत्पन्न करणारे, तीर्थंकरपुण्यकर्मरूपी सारथी ज्यांना प्राप्त झाला आहे असे जिनेश्वररूपी सूर्य भव्यकमलावर अनुग्रह करण्यासाठी उद्युक्त झाले. अर्थात् विहार करण्यासाठी उठून उभे राहिले ॥ २३२ ।। Page #73 -------------------------------------------------------------------------- ________________ ६२) महापुराण (२५-२३३ मोक्षाधिरोहनिःश्रेणीभूतच्छत्रत्रयोद्धरः । यशःक्षीरोदफेनाभसितचामरवीजितः ॥ २३३ ध्वनन्मधुरगम्भीर धीरदिव्यमहाध्वनिः । भानुकोटि प्रतिस्पद्धि प्रभावलयभास्वरः ॥ २३४ मरुत्प्रहतगम्भीरदन्ध्वनदुन्दुभिः प्रभुः। सुरोत्करकरोन्मुक्तपुष्पवर्षाचितक्रमः ॥ २३५ मेरुशङ्गसमुत्तुङ्गासिंहविष्टरनायकः । सच्छायसफलाशोकप्रकटीकृतचेष्टितः ॥ २३६ धूलीसालवृतास्थानजगतीपरिमण्डलः । मानस्तम्भनिरुद्धान्यकुदृष्टिमदविभ्रमः ॥ २३७ स्वच्छाम्भःखातिकाभ्यर्णव्रततीवनवेष्टिताम् । सभाभूमिमलङकुर्वन्नपूर्वविभवोदयाम् ॥ २३८ समग्रगोपुरोदः प्राकारवलयस्त्रिभिः । परार्ध्यरचनोपेतैराविष्कृतमहोदयः ॥ २३९ अशोकादिवनश्रेणीकृतच्छायसभावनिः । स्रग्वस्त्रादिध्वजोल्लाससमाहूतजगज्जनः ॥ २४० कल्पवृक्षवनच्छायाविश्रान्तामरपूजितः । प्रासादरुद्धभूमिष्ठकिन्नरोद्गीतसद्यशाः ॥ २४१ मुक्तिस्थानावर चढून जाण्यासाठी जणु पाय-याप्रमाणे दिसत असलेल्या तीन छत्रानी युक्त असलेल्या प्रभूवर यशरूपी क्षीरसमुद्राच्या फेसाप्रमाणे भासत असलेला शुभ्र चामरसमूह वारला जाऊ लागला व त्या चामरांनी प्रभु शोभू लागले ॥ २३३ ॥ गोड, गम्भीर व कापरेपणाने रहित व दिव्य असा महाध्वनि प्रभूपासून निघत होता. कोटिसूर्याच्या कान्तीशी स्पर्धा करणा-या भामण्डलाने प्रभु कान्तिसम्पन्न दिसत होते ।। २३४ ॥ देवांनी वाजविलेले व वारंवार गंभीर ध्वनि करणारे अशा नगान्यांनी ज्यांचे समवसरण शोभत आहे असे व देवसमूहाच्या हातांनी वर्षिलेल्या पुष्पसमूहांनी प्रभूचे दोन पाय शोभत होते ।। २३५ ॥ . मेरूच्या शिखराप्रमाणे उंच सिंहासनावर प्रभु आदिनाथ बसले होते. उत्तम सावलीने व फलानी युक्त अशा अशोक वृक्षाने प्रभूची लोकहित करणारी कार्य व्यक्त केली होती ॥२३६।। प्रभूचे समवसरण जे मण्डलाकार होते ते धूलीसाल नामक तटाने सर्व बाजूनी घेरलेले होते. प्रभुंनी मानस्तंभांच्याद्वारे अन्ध-कुदृष्टि जनांच्या मदाचा विलास नाहीसा केला होता॥२३७।। स्वच्छ पाण्याने भरलेल्या खंदकाच्या सभोवती लतावनांनी जिला वेढलेले आहे व अपूर्व वैभवाने जिला सौन्दर्य प्राप्त झाले आहे अशा सभाभूमीला प्रभुंनी अलंकृत केले होते ॥ २३८ ।। __उंच शिखरांनी युक्त अशा वेशीच्या दरवाज्यांनी युक्त तीन तट समवसरणाच्या सभोवती होते व अत्युत्कृष्ट रचनेने युक्त असल्यामुळे भगवंताचा महान् उत्कर्ष त्यांनी व्यक्त केला होता ।। २३९ ।। ____ अशोकवन, आम्रवनादिक चार वनपंक्तींनी प्रभूच्या सभास्थानाला दाट छायायुक्त बनविले होते व मालाध्वज, वस्त्रध्वज आदिक दहा प्रकारच्या ध्वजपंक्तीच्या उल्हासानी जणु सर्व जगतातील लोकांना प्रभु बोलावित आहेत की काय असे वाटत होते ।। २४० ॥ __कल्पवृक्षांच्या वनाच्या सावलीत विश्रांत झालेल्या देवाकडून पूजिले गेलेले व प्रासादावरील गच्चीवर बसलेले किन्नर देवाकडून ज्यांचे यश गायिले गेले आहे अशा प्रभूनी विहार केला असा संबंध येथे जाणावा ॥ २४१ ॥ Page #74 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२५०) ज्वलन्महोदयस्तूप प्रकटीकृतवैभवः । नाट्यशालाद्वयेर्द्धाद्धिसंवद्धितजनोत्सवः ॥ २४२ धूपामोदित दिग्भागमहागन्धकुटीश्वरः । त्रिविष्टपणतिप्राज्यपूजार्हः परमेश्वरः ॥ २४३ त्रिजगद्वल्लभः श्रीमान् भगवानादिपुरुषः । प्रचक्रे विजयोद्योगं धर्मचक्राधिनायकः ॥ २४४ ततो भगवदुद्योगसमये समुपेयुषि । प्रचेलुः प्रचलन्मौलिकोटयः सुरकोटयः ॥ २४५ तदा सम्भ्रान्तनाकीन्द्रतिरोटोच्चलिता ध्रुवम् । जगन्नोराजयामासुर्मणयो दिग्जये विभोः ॥ २४६ जयेत्युच्चैगिरो देवाः प्रोर्णुवाना नभोऽङ्गणम् । दिशां मुखानि तेजोभिद्यतयन्तः प्रतस्थिरे ॥ २४७ जिनोद्योग महावात्याक्षुभिता देवनायकाः । चतुर्णिकायाश्चत्वारो महाब्धय इवाभवन् ।। २४८ प्रतस्थे भगवानित्यमनुयातः सुरासुरैः । अनिच्छापूर्विकां वृत्तिमास्कन्दन्भानुमानिव ॥ २४९ अर्धमागधिकाकार भाषापरिणताखिलः । त्रिजगज्जनता मंत्री सम्पादनगुणाद्भुतः ।। २५० महापुराण ज्यांचा प्रकाश चोहोकडे पसरला आहे अशा स्तूपांनी भगवंतानी आपले वैभव प्रकट केले होते. दोन नाट्यशालांच्या वाढलेल्या वैभवाच्या द्वारे प्रभूंनी सर्व लोकांचा आनन्द वाढविला होता || २४२ ।। (६३ धूपांच्या योगाने जिच्यातील दिशांचे सर्व भाग सुगन्धित झाले आहेत अशा महागन्ध कुटीचे जे स्वामी आहेत व स्वर्गपति इन्द्राकडून केल्या जाणाऱ्या महापूजेला जे योग्य आहेत असे आदिजिनेश्वर विहारासाठी उद्युक्त झाले ।। २४३ ।। त्रैलोक्याला अतिशय प्रिय, बाह्याभ्यन्तरलक्ष्मीसम्पन्न, धर्मचक्राचे श्रेष्ठ स्वामी भगवान् आदिपुरुष वृषभ जिनेश्वर हे विजयोद्योगासाठी निघाले ।। २४४ ॥ प्रभूंच्या विजयोद्योगाचा समय जवळ आला असता ज्यांच्या किरीटाचे अग्रभाग आनंदाने डुलत आहेत असे कोट्यवधि देव त्यानंतर निघाले || २४५ ।। त्यावेळी अर्थात् प्रभूंच्या दिग्जयाच्या समयी हर्षाने गडबडलेल्या सुरेंद्राच्या मुकुटातून विचलित झालेले मणि असे वाटू लागले की जणु ते जगताला ओवाळीत आहेत ।। २४६ ।। जय होवो, जय होवो असे मोठ्याने बोलणाऱ्या देवांनी आकाशरूपी अंगणास व्यापून टाकले व सर्वदिशांची मुखे आपल्या तेजानी उज्ज्वल करीत ते प्रस्थान करू लागले ।। २४७ ।। भवनवासी, व्यन्तर, ज्योतिष्क आणि स्वर्गवासी असे चार प्रकारचे देव व त्यांचे मुख्य स्वामी इन्द्र हे श्रीजिनेन्द्राच्या विजयोद्योगरूपी वावटळीने जणु चार समुद्राप्रमाणे अगदी क्षुब्ध झाले || २४८ ॥ याप्रमाणे सर्व देव व दैत्य ज्यांना अनुसरले आहेत असे ते भगवान् इच्छा नसताही सूर्याप्रमाणे विहार करू लागले ।। २४९॥ प्रभूनी अर्धमागधी भाषारूप सर्वभाषांना बनविले व त्रैलोक्यातील सर्व जनतेमध्ये मैत्रीभाव निर्माण केला. असे अद्भूत गुण प्रभूमध्ये होते ।। २५० ॥ Page #75 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४) महापुराण (२५-२५१ स्वसन्निधानसम्फुल्लफलिताङकुरितद्रुमः । आदर्शमण्डलाकारपरिवर्तितभूतलः ॥ २५१ सुगन्धिशिशिरोऽनुच्चरनुयायो समीरणः । अकस्माज्जनतानन्दसम्पादिपरमोदयः ॥ २५२ मरूत्कुमारसम्मृष्टयोजनान्तररम्यभूः । स्तनितासरसंसिक्तगन्धाम्बुर्विरजोऽवनिः ॥ २५३ मृदुस्पर्शसुखाम्भोजविन्यस्तपदपडाकजः । शालिव्रीह्यादिसम्पन्नवसुधासूचितागमः ॥ २५४ शरत्सरोवरस्पद्धिव्योमोदाहृतसन्निधिः । ककुवन्तरवैमल्यसन्दर्शितसमागमः ॥ २५५ धुसत्परम्पराह्वानध्वानरुद्धहरिन्मुखः । सहस्रारस्फुरद्धर्मचक्ररत्नपुरःसरः ॥ २५६ पुरस्कृताष्टमाङगल्यध्वजमालातताम्बरः । सुरासुरानुयातोऽभाद्विजिहीर्षुस्तदा विभुः ॥ २५७ तदा मधुरगम्भीरो जजम्भे दुन्दुभिध्वनिः । नभः समन्तादापूर्य क्षुभ्यदब्धिस्वनोपमः ॥ २५८ प्रभु जेव्हां ज्या देशाजवळ विहार करीत असत तेव्हा त्या प्रदेशात सर्व वृक्ष पुष्पांनी फलांनी व अंकुरांनी युक्त होत होते. आणि तेथील सर्व भूप्रदेश दर्पणाप्रमाणे निर्मल होत असे. ॥ २५१ ॥ __ वारा हा प्रभूला अनुसरून मंदपणे वाहू लागला. त्यामुळे तो सुगंधी व थंड असा होऊन जनतेला अकस्मात् आनन्द देणारा झाला ।। २५२ ॥ जिकडे प्रभूचा विहार होत असे तिकडे एक-योजनपर्यन्तचा भूप्रदेश वायुकुमार देवाकडून झाडून स्वच्छ केला जात असे व स्तनितकुमार देवानी त्या भूप्रदेशावर सुगन्धित जल शिंपडून तो प्रदेश धुराळयाने रहित केला जात असे ॥ २५३ ॥ प्रभु ज्यापासून मृदु स्पर्श सुख मिळते अशा कमलावर आपले चरण कमल ठेवून विहार करीत होते व पृथ्वीवर बारीक साळी व मोठ्या साळी आदिक धान्यांचे अमाप पीक येऊन येथे श्रीजिनप्रभूचे आगमन होईल असे सूचित होत असे ।। २५४ ।। शरत्काली सरोवर अतिशय निर्मळ असते. जणु त्याच्याशी आकाशाने स्पर्धा केली व प्रभूचे आगमन जवळ आले आहे असे व्यक्त केले. पूर्वादिक दिशात जी अतिशय निर्मलता उत्पन्न झाली तिनेही प्रभूचा समागम झाल्याचे दाखवून दिले. अर्थात् प्रभूचा विहार जेथे जेथे झाला तेथे तेथे आकाश व पूर्वादिक दिशा अत्यन्त स्वच्छ झाल्या ॥ २५५ ॥ जेथे जेथे प्रभूचा विहार झाला तेथे तेथे देवांच्या समूहाने सर्वाना प्रभूचे आगमन झाले आहे त्यांचा उपदेश ऐकावयास या या असे आमन्त्रण दिले व त्यांच्या आमन्त्रणानी सर्व दिशा शब्दमय झाल्या व ज्याला हजार आरे आहेत असे चमकणारे धर्मचक्ररत्न पुढे चालत होते व भगवान् जिनेन्द्र त्याला अनुसरून विहार करीत होते ।। २५६ ॥ प्रभूच्या पुढे अष्टमंगल दर्पण, चामर वगैरे अष्टमंगलेही चालली होती. ध्वज व मालांनी आकाश व्याप्त झाले होते. त्यावेळी प्रभु धर्मोपदेशासाठी विहार करू लागले आणि त्यांच्यामागून सुर व असुर चार प्रकारचे देव चालू लागले ॥ २५७ ॥ तेव्हां मधुर आणि गम्भीर असे नगान्यांचे ध्वनि होऊ लागले. ते नगान्यांचे ध्वनि खवळलेल्या समुद्राच्या गर्जनेप्रमाणे होते व त्यानी सर्व आकाश व्यापलेले होते ॥ २५८ ॥ Page #76 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२६७) महापुराण ववषः सुमनोवृष्टिमापूरितनभोऽङगणम् । सुरा भव्यद्विरेफाणां सौमनस्यविधायिनीम् ॥ २५९ समन्ततः स्फुरन्तिस्म पालिकेतनकोटयः । आह्वातुमिव भव्यौघानेतैतेति मरुद्धताः ॥ २६० तर्जयन्निव कर्मारीनूर्जस्वी रुद्ध दिडमुखः । ढङ्कार एव ढक्कानामभूत्प्रतिपदं विभोः ॥ २६१ नभोरङगे नटन्तिस्म प्रोल्लसद्भपताकिकाः । सुराङगना बिलुम्पन्त्यः स्वदेहप्रभया दिशः ॥ २६२ विबुधाः पेठुरुत्साहात्किन्नरा मधुरं जगुः । वीणावादनमातेनुर्गन्धर्वाः सहखेचरैः ॥ २६३ प्रभामयमिवाशेषं जगत्कर्तुं समुद्यताः । प्रतस्थिरे सुराधीशाः ज्वलन्मुकुटकोटयः ॥ २६४ दिशः प्रसेदुरुन्मुक्तधूमिकाः प्रमदादिव । बभ्राजे धृतवैमल्यमनभ्रं वर्त्म वार्मुचाम् ॥ २६५ परिनिष्पन्नशाल्यादिसस्यसम्पन्मही तदा । उद्भूतहर्षरोमाञ्चा स्वामिलाभादिवाभवत् ॥ २६६ बभुः सुरभयो वाताः स्वधुनीशीकरस्पृशः । आकीर्णपङकजरजःपटबासपटावृताः ॥ २६७ सर्व भव्यजीवरूपी भुंग्यांच्या मनाला आनंदित करणारी पुष्पवृष्टि सर्व आकाशरूपी अंगणाला व्यापून देवांनी केली ।। २५९ ।।। त्यावेळी सर्व दिशात कोटयवधि ध्वज सर्व बाजूंनी वान्यांनी हलून फडफडत होते व ते भव्यांना प्रभूच्या दर्शनासाठी या या असे जणु आमंत्रण देत होते ॥ २६० ॥ ज्यांने सर्व दिशा व्यापल्या आहेत व जो कर्मरूपी शत्रूचा जणु तिरस्कार करीत आहेत असा फार तीव्र ढक्का नामक वाद्यांचा ढक्कारशब्द प्रभूच्या प्रत्येक पावलाला होऊ लागला ।। २६१ ।। ज्या आपल्या भुवयारूपी पताका वारंवार हालवीत आहेत व आपल्या देहाच्या कान्तींनी दिशांना लुप्त करीत आहेत, अशा देवाङगना आकाशरूपी रंगभूमीवर नृत्य करीत होत्या ॥ २६२ ।। देव श्री जिनाच्या गुणांची स्तुति करू लागले. किन्नरदेव उत्साहाने मधुर गाणे गाऊ लागले व गन्धर्वदेव विद्याधराबरोबर वीणावादन करू लागले ॥ २६३ ।। ज्यांच्या मुकुटांची शिखरे सगळ्या जगाला जणु कान्तिमय करण्यास उद्युक्त झाली आहेत असे देवेन्द्र प्रभूच्या मागून प्रयाण करू लागले ।। २६४ ।। दिशा प्रसन्न झाल्या, उज्ज्वल दिसू लागल्या. त्यांनी जणु आनंदाने धुक्याचा-धुरकटपणाचा त्याग केला. मेघांचा मार्ग असलेल्या आकाशाने मेघरहित होऊन निर्मलपणा धारण केला व ते सुंदर दिसू लागले ।। २६५ ॥ त्यावेळी पिकून तयार झालेल्या साळी वगैरे धान्यांच्या सम्पत्तीने पृथ्वी समृद्ध झाली. मला माझ्या स्वामीची प्राप्ति झाली म्हणून जणु जिच्या अंगावर हर्षाने रोमांच उभे राहिले आहेत अशी ती दिसू लागली ।। २६६ ।। गंगानदीच्या तुषारांना स्पर्श करणारे सुगंधित वारे कमलातील परागांनी भरून गेल्यामुळे पिवळी वस्त्रे पांघरल्याप्रमाणे शोभू लागले ॥ २६७ ।। म.९ Page #77 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२५-२६८ मही समतला रेजे संमुखीनतलोज्ज्वला । सुरैर्गन्धाम्बुभिः सिक्ता स्नातेव विरजाः सती ॥२६८ अकालकुसुमोद्भदं दर्शयन्ति स्म पादपाः । ऋतुभिः सममागत्य संरुद्धा साध्वसादिव ॥ २६९ सुभिक्षं क्षेममारोग्यं गव्यूतीनां चतुःशती । भेजे भूजिनमाहात्म्यादजातप्राणिहिंसना ॥ २७० अकस्मात्प्राणिनो भेजुः प्रमदस्य परम्पराम् । तेनुः पारस्परी मैत्री बन्धुभूयमिवाश्रिताः ॥ २७१ मकरन्दरजोवर्षि प्रत्यग्नोद्भिन्नकेसरम् । विचित्ररत्ननिर्माणकणिकं विलसद्दलम् ॥ २७२ भगवच्चरणन्यासप्रदेशेऽधिनभस्तलम् । मृदुस्पर्शमुदारश्रि पङकजं हममुद्बभौ ॥ २७३ पृष्टतश्च पुरश्चास्य पनाः सप्त विकासिनः । प्रादुर्बभूवुरुद्गन्धिसान्द्रकिञ्जल्करेणवः ॥ २७४ तथान्यान्यपि पद्मानि तत्पर्यन्तेषु रेजिरे । लक्ष्म्यावसथसौधानि सञ्चारीणीव खाङगणे ॥ २७५ त्यावेळी पृथ्वी देखील दर्पणतलाप्रमाणे उज्ज्वल झाली व देवांनी सुगंधी पाण्याची तिच्यावर वृष्टी केल्यामुळे ती धुराळयाने रहित झाली. त्यामुळे ती स्नान केलेल्या सतीप्रमाणे शोभू लागली ॥ २६८॥ वृक्षांनी देखील अकाली आपल्या ठिकाणी फुलांची उत्पत्ति दाखविली. अर्थात् वृक्षावर योग्य समयावाचून फुलें आली होती. जणु सर्व ऋतूंनी भयाने त्या वृक्षांना आलिंगन दिले ॥ २६९ ॥ जिनेश्वराच्या माहात्म्याने जिच्यात प्राणिहिंसा झाली नाही अशा या भूमीने चारशे गव्यूतीपर्यन्त सुभिक्ष, आरोग्य व कल्याण धारण केले ॥ २७० ।। __ अकस्मात्-अवेळी सर्व प्राणी अतिशय आनन्दित झाले व परस्परांचे बन्धु झाल्याप्रमाणे एकमेकांचे मित्र झाले ॥ २७१ ॥ ज्याच्यातून मकरन्द व पराग बाहेर पडत आहे अर्थात् सारखा गळत आहे. ज्याच्यांतून ताजे केसर दररोज उत्पन्न होत आहेत, ज्याची कणिका अनेक रंगाच्या रत्नांनी निर्माण पावली आहे व जे पाकळयानी शोभत आहे ॥ २७२ ॥ ज्याचा कोमल स्पर्श आहे, जे अतिशय सुंदर आहे असे सुवर्णकमल आकाशात प्रभू जेथे पाऊल टाकतात तेथे अर्थात् प्रभुचरणाखाली उत्पन्न होत असे ।। २७३ ॥ ज्यातून दाट केसर व पराग उत्पन्न होत आहेत, अशी प्रफुल्ल सात कमले प्रभूच्या पाठीमागे व पुढे उत्पन्न होत असत व ती सगळी ज्यातून सुगंध बाहेर पसरत आहे अशी होती ॥ २७४ ।। ___ तसेच अन्य कमलें देखील प्रभूच्या मागे पुढे चारी दिशात शोभत होती. ती सगळी कमलें लक्ष्मीच्या राहण्याचे जणु सौध-प्रासाद आहेत व आकाशाङगणात जणु संचार करणारी आहेत ॥ २७५ ॥ Page #78 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२८४) महापुराण (६७ हेमाम्भोजमयी श्रेणीमलिश्रेणीभिरन्विताम् । सुरा व्यरचयन्नेनां सुरराजनिदेशतः ॥ २७६ रेजे राजीवराजी सा जिनपत्पङकजोन्मुखी । आदित्सुरिव तत्कान्तिमतिरेकादधः लुताम् ॥ २७७ ततिविहारपद्मानां जिनस्योपाङघ्रि सा बभौ । नभःसरसि सम्फुल्ला त्रिःपञ्चककृतिप्रमा ॥२७८ तदा हेमाम्बुजैर्योम समन्तादाततं बभौ । सरोवरमिवोत्फुल्लपङकजं जिनदिग्जये ॥ २७९ प्रमोदमयमातन्वन्निति विश्वं जगत्पतिः । विजहार महीं कृत्स्नां प्रीणयन्स्ववचोऽमृतैः ॥ २८० मिथ्यान्धकारघटनां विघटय्य वचोंशुभिः । जगदुद्द्योतयामास जिनार्को जनतातिहत् ॥ २८१ यतो विजहें भगवान्हेमाब्जन्यस्तसङक्रमः । धर्मामृताम्बुसंवस्ततो भव्या धुति दधुः ॥ २८२ जिने घन इवाभ्यर्णे धर्मवर्ष प्रवर्षति । जगत्सुखप्रवाहेण पुप्लुवे धृतनिर्वृति ॥ २८३ धर्मवारि जिनाम्मोदात् पायं पायं कृतस्पृहाः । चिरं धृततृषो दध्रुस्तदानीं भव्यचातकाः ॥ २८४ ही सुवर्णकमलांची पंक्ति भुंग्यांनी शोभत होती. इन्द्राच्या आज्ञेने ही कमलपंक्ति सेवकदेवाकडून रचिली जात असे ॥ २७६ ।। जिनेश्वराच्या चरणकमलांच्या संमुख ही कमलांची पंक्ति शोभू लागली. प्रभूच्या पायांची कान्ति अधिक होऊन जी खाली गळत होती जणु तिला ग्रहण करण्यासाठी ती कमलें तेथे आली आहेत असे वाटत असे ॥ २७७ ॥ आकाशारूपी सरोवरात फुललेली व जिनचरणकमलाच्या संमुख असलेली ही विहारकमलांची पंक्ति २२५ होती व फार शोभत होती ।। २७८ ।। सर्व बाजूंनी सुवर्णकमलांनी व्याप्त झालेले आकाश जिनेश्वराच्या दिग्विजयाच्या वेळी ज्यातील कमले फुललेली आहेत अशा सरोवराप्रमाणे दिसत होते ॥ २७९ ॥ याप्रमाणे सर्व जगाला आनन्दमय करणारे त्रैलक्यनाथ आदिजिनेन्द्र आपल्या वचनामृतानी सगळ्या पृथ्वीला हर्षयुक्त करून तिच्यावर विहार करू लागले ।। २८० ॥ लोकांचे दुःख हरण करणाऱ्या या जिनसूर्याने आपल्या वचनरूपी किरणांनी मिथ्यान्धकाराच्या समूहाला नष्ट केले व त्याने सर्व जगाला प्रकाशित केले ।। २४१ ॥ सुवर्णकमलावर पावले ठेवणाऱ्या भगवंताने जिकडे जिकडे विहार केला तिकडे तिकडे त्यांनी धर्मरूपी अमृतजलाची वृष्टि केली व त्यामुळे भव्याना मोठा सन्तोष वाटला ।। २८२ ।। श्रीजिनेश्वर मेघाप्रमाणे जवळ येऊन धर्मवृष्टि करीत असता ज्याला आनन्द वाटत आहे असे जग सुखाच्या प्रवाहात पोहू लागले ।। २८३ ॥ त्यावेळी अतिशय धर्मरूपी जलाची इच्छा करणारे भव्यजीवरूपी चातक आदिभगवन्तरूपी मेघापासून प्राप्त झालेले धर्मरूपी पाणी पुनः पुनः प्याले, तेव्हां त्यांची तहान भागली कारण ते फार दिवसापासून तृषित होते आणि आता कायमचे सन्तुष्ट झाले ॥ २८४ ॥ Page #79 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८) महापुराण इन्थं चराचरगुरुर्जगदुज्जिहीर्षुः । संसारखञ्जन निमग्नमभग्नवृत्तिः ॥ - देवासुरैरनुगतो विजहार पृथ्वीं । हेमान्जगर्भविनिवेशितपादपद्मः ।। २८५ तीव्राजव जव दवानलदह्यमानमाह्लादयन्भुवनकाननमस्ततापः ॥ धर्मामृताम्बुपृषतैः परिषिच्य देवो रेजे घनागम इवोदितदिव्यनादः ॥ २८६ ॥ काशीमवन्ति कुरुकोसलसुह्मपुण्ड्रान् । चेद्यंगवङ्गमगधान्ध्रक लिङगमद्रान् ॥ पाञ्चालमालवदशार्णविदर्भदेशान् । सन्मार्गदेशनपरो विजहार धीरः ॥ २८७ ॥ देवः प्रशान्तचरितः शनकैविहृत्य । देशान्बहूनिति विबोधितभव्यसत्त्वः ॥ भेजे जगत्त्रयविवीध्रमुच्चैः कैलासमात्मयशसोऽनुकृति दधानम् ॥ २८८ तस्याग्रे सुरनिर्मिते सुरुचिरे श्रीमत्सभामण्ड पूर्वोक्ताखिलवर्णनापरिगते स्वर्गश्रियं तन्वति ॥ श्रीमान् द्वादशभिर्गणैः परिवृतो भक्त्यानतैः सादरैः । आसामास विभुजिनः प्रविलसत्सत्प्रातिहार्याष्टकः ।। २८९ ( २५-२८५ संसाररूपी मोठ्या गारीत-मोठ्या खोल खड्यात बुडालेल्या जगाला वर काढण्याची इच्छा करणारे व त्या कार्यात अखंड प्रवृत्त झालेले, देव व असुर ज्यांना अनुसरत आहेत व जे सोन्याच्या कमलांच्या मध्यभागी पाऊले टाकून चालतात, जे चर अचर जीवांचे गुरु आहेत असे आदिभगवंत धर्मोपदेश देत पृथ्वीवर विहार करू लागले ।। २८५ ॥ तीव्र असा जो संसाररूपी वनाग्नि त्यामध्ये जळत असलेल्या या जगरूपी अरण्याला पाहून त्याला दिव्य वाणीरूपी गर्जना करणारे व धर्मामृतजलाच्या वृष्टीने त्याला सिंचित करणारे प्रभु पावसाळयाप्रमाणे शोभले ।। २८६ ॥ सन्मार्ग असलेल्या जिनधर्माचा उपदेश देण्यासाठी वीर आदिभगवंतांनी काशी, अवन्ति, कुरु, कोसल, सुह्म, चेदि, अंग, वङ्ग, मगध, आन्ध्र, कलिङ्ग, भद्र, पांचाल, मालव, दशार्ण, विदर्भ आदि अनेक देशात विहार केला ।। २८७ ।। ज्यानी भव्यप्राण्याना उपदेश दिला आहे, ज्याची वृत्ति शान्त आहे व जे त्रैलोक्यगुरु आहेत अशा प्रभूनी हळु हळु अनेक देशात विहार केला. यानन्तर जगत्त्रयाचे गुरु असे भगवान् चन्द्राप्रमाणे निर्मल अशा आपल्या शुभ्र यशाचे अनुकरण करणाऱ्या कैलासपर्वताला प्राप्त झाले ॥ २८८ ॥ त्या कैलासाच्या शिखरावर देवानी अतिशय सुंदर, पूर्वी वर्णिलेल्या सर्व वर्णनांनी युक्त व स्वर्गांची शोभा धारण करणारा असा समवसरणसभामंडप रचला व भक्तीने नम्र, आदरयुक्त अशा बारा गणानी श्रीमान् आदिभगवान् वेष्टित होऊन विराजमान झाले, त्यावेळी प्रभु उत्तम आठ प्रातिहार्यांनी शोभत होते ॥ २८९ ॥ Page #80 -------------------------------------------------------------------------- ________________ २५-२९०) महापुराण तं देवं त्रिदशाधिपचितपदं घातिक्षयानन्तर- । प्रोत्थानन्तचतुष्टयं जिनमिनं भव्याब्जिनीनामिनम् ॥ मानस्तम्भ विलोकनानतजगन्मान्यं त्रिलोकी पतिम् । प्राप्ताचिक्यबहिविभूतिमनघं भक्त्या प्रवन्दामहे ॥ २९० इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षण महापुराण सप्रहे भगवद्विहारवर्णनं नाम पञ्चविंशतितमं पर्व ॥ २५ ॥ देवांच्या अधिपांनी म्हणजे इन्द्रानी ज्यांचे चरण पूजिले आहेत, घातिकर्माचा क्षय झाल्यानन्तर ज्यांना अनन्तचतुष्टयाची प्राप्ति झाली आहे, जे भव्य जीवरूपी कमलिनींना प्रफुल्ल करण्यास सूर्य आहेत, मानस्तम्भाचे दर्शन झाल्यानंतर नम्र झालेल्या जगताने ज्यांना मान दिला आहे, जे त्रिलोकपति आहेत, ज्यांना अचिन्त्य असे बाह्य वैभव प्राप्त झाले आहे, जे पापरहित आहेत अशा प्रभु आदिजिनाला आम्ही भक्तीने वन्दन करतो ।। २९० ।। याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यविरचित आर्ष, त्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहात भगवंताच्या विहाराचे वर्णन करणारे पंचविसावे पर्व समाप्त झाले. ( ६९ Page #81 -------------------------------------------------------------------------- ________________ षड्विंशतितम पर्व अथ चक्रधरः पूजां चक्रस्य विधिवद्वयधात् । सुतोत्पत्तिमपि श्रीमानभ्यनन्दवनुक्रमात् ॥१ ना दरिद्रीजनः कश्चिद्विभोस्तस्मिन्महोत्सवे । दारिद्रयमथिलाभे तु जातं विश्वाशितं भवे ॥२ चतुष्केषु च रथ्यासु पुरस्यान्तर्बहिः पुरम् । पुजीकृतानि रत्नानि तदाथिभ्यो ददौ नपः ॥३ अभिचारक्रियेवासीच्चक्रपूजास्य विद्विषाम् । जगतः शान्तिकर्मेव जातकर्माप्यभूत्तदा ॥४ ततोऽस्य दिग्जयोद्योगसमये शरदापतत् । जयलक्ष्मीरिवामुष्य प्रसन्ना विमलाम्बरा ॥ ५ अलका इव संरेजुरस्या मधुकरवजाः । सप्तच्छदप्रसूनोत्थरजोभूषितविग्रहाः ॥६ प्रसन्नमभवत्तीयं सरसां सरितामपि । कवीनामिव सत्काव्यं जनानां चित्तरञ्जनम् ॥७ सिवच्छदावली रेजे सम्पतन्ती समन्ततः । स्थूलमुक्तावलीबद्धकण्ठिकेव शरछियः॥८ सरोजलमभूत्कान्तं सरोजरजसा ततम् । सुवर्णरजसार्णिमिव कुट्टिमभूतलम् ॥ ९ __ यानन्तर चक्रवर्ती भरताने चक्राची विधिपूर्वक पूजा केली. लक्ष्मीसम्पन्न या भरताने नंतर आपल्याला पुत्र झाल्याबद्दल आनन्दही प्रकट केला ॥१॥ भरताने चक्रप्राप्ति व पुत्रजन्म झाला म्हणून जो महोत्सव केला त्यात याचकाच्या लाभात दारिद्रय उत्पन्न झाले अर्थात् याचकांना भरतापासून पुष्कळ धनप्राप्ति झाल्यामुळे कोणी याचक राहिलाच नाही. सर्व जन अतिशय तृप्त झाले ॥२॥ भरतराजाने नगराच्या अनेक चौकात, रस्त्यावर, नगराच्या आत व नगराच्या बाहेर रत्नांचे ढीग करून ठेवले व ते त्याने याचकाना दिले ॥ ३॥ ___ भरताने जी चक्रपूजा केली ती शबूंना जणु जारण - मारणाप्रमाणे वाटली व पुत्र जन्माचे जे जातकर्म केले ते जगताला शान्ति देणारे कार्य झाले ॥ ४ ॥ यानन्तर दिग्विजय करण्यासाठी जी तयारी केली त्यावेळी शरदऋतूचे आगमन झाले. तेव्हां जय लक्ष्मीप्रमाणे शरल्लक्ष्मी प्रसन्न व निर्मल आकाशाने युक्त झाली. अर्थात् स्वच्छ वस्त्राला धारण करणारी व निर्मल दिसणारी अशी या राजाची जयश्रीच की काय असे वाटले. म्हणजे तेव्हां शरदऋतूला प्रारंभ झाला ॥५॥ त्यावेळी सात्त्विणीच्या फुलातील परागांनी शोभत असलेले भुंग्याचे समूह शरल्लक्ष्मीच्या कुरळ्या केशाप्रमाणे शोभू लागले ।। ६ ॥ त्यावेळी कवीचे उत्तम काव्य जसे लोकांच्या मनाला रमविते तसे सरोवरांचे व नद्यांचे पाणी प्रसन्न झाले ॥ ७॥ जलाशयावर पाणी पिण्यासाठी चोहोकडून येणारा शुभ्रवर्णाचा हंसांचा समूह मोठमोठ्या मोत्यांनी गुंफलेला शरल्लक्ष्मीच्या गळ्यातील जणु हारच असा शोभू लागला ॥८॥ कमलातील परागांनी व्याप्त झालेले सरोवराचे पाणी सोन्याची धूळ ज्यावर पसरली आहे अशा घट्ट तयार केलेल्या जमिनीप्रमाणे सुंदर दिसू लागले ॥ ९॥ Page #82 -------------------------------------------------------------------------- ________________ • २६-१८) महापुराण सरः सरोजरजसा परितः स्थगितोदकम् । कादम्बजायाः सम्प्रेक्ष्य मुमुहुः स्थलशङकया ॥ १० कञ्जकिंजल्कपुञ्जन पिञ्जरा षट्पदावली । सौवर्णमणिटुब्धेव शरद: कण्ठिका बभौ ॥ ११ सरोजलं समासेदुर्मुखराः सितपक्षिणः । वदान्यकुलमुद्भूतसौगन्ध्यमिव बन्दिनः ॥ १२ . नदीनां पुलिनाग्यासन शुचीनि शरदागमे । हंसाना रचितानीव शयनानि सितांशकैः ॥ १३ सरांसि ससरोजानि सोत्पला वप्रभूमयः । सहससैकता नद्यौ जहश्चेतांसि कामिनाम् ॥ १४ प्रसन्नसलिला रेजुः सरस्यः सहसारसाः । कूजितः कलहंसानां जितनपुरसिञ्जनः ॥ १५ नीलोत्पलेक्षणा रेजे शरच्छीः पङ्कजानना । व्यक्तमाभाषमाणेव कलहंसीकलस्वनैः ॥ १६ पक्वशालिभुवो नम्रकणिशाः पिञ्जरश्रियः । स्नाता हरिद्रयेवासन् शरत्कालप्रियागमे ॥ १७ मन्दसाना मदं भेजुः सहसाना मदं जहुः । शरल्लक्ष्मी समालोक्य शुद्धयशुद्धयोरयं निजः॥ १८ कमलाच्या परागांनी सर्व बाजूनी ज्याचे पाणी निश्चल झाले आहे असे सरोवर पाहून हंसीणींना ही जमीन आहे असा भ्रम उत्पन्न झाला ॥ १० ।। कमलांच्या परागसमूहांनी पिवळसर झालेली भुंग्यांची पंक्ति सोन्याच्या मण्यांनी गुंफलेली शरदऋतूची जणु कंठी आहे अशी शोभली ॥ ११ ॥ जसे भाट लोक ज्यांची कीर्ति चोहोकडे पसरली आहे अशा दानशूर मनुष्याच्या घराकडे त्याची कीर्ति गात येतात तसे आनंदाने शब्द करणारे हंसपक्षी ज्यातील कमलांचा सुगंध पसरला आहे अशा सरोवराकडे आले ॥ १२ ॥ शरदऋतु आला त्यावेळी नद्यांची वाळवंटे शुभ्र दिसू लागली जणु ती पांढऱ्या वस्त्रांनी बनविलेले हंस पक्षाचे बिछाने आहेत असे वाटत होते ॥ १३ ॥ कमलांनी गजबजलेली सरोवरे, स्थलकमलांनी (जमिनीवर उत्पन्न होणा-या कमलांनी) युक्त अशा शेतातील जमिनी व हंसांनीसहित असे वाळूचे प्रदेश-वाळवंटे ही कामी लोकांच्या अन्तःकरणास हरण करू लागली ।। १४ ।। ज्यांचे पाणी निर्मल झाले आहे अशी व सारसपक्षांनी सहित असलेली सरोवरे पैंजणाच्या आवाजाना जिकणाऱ्या सारस पक्षांच्या शब्दानी शोभू लागली ॥ १५ ॥ निळी कमळे हेच जिचे डोळे आहेत, शुभ्र कमळे हेच जिचे मुख आहे अशी शादरलक्ष्मी हंसिणीचे जे मधुर शब्द त्यांनी जणु स्पष्ट भाषण करीत आहे असे वाटते ॥ १६ ॥ साळी धान्याचे लोंबे ज्यांच्यावर नम्र झाले आहेत, पिंगट शोभा ज्या धारण करीत आहेत अशा पिकलेल्या साळीच्या जमिनी शरत्कालरूपी प्रिय पति आल्यावेळी हळदीने जणु त्यानी स्नान केले आहे अशा शोभू लागल्या ॥ १७ ॥ ___ मंदसान-हंसपक्षी शरदऋतूची शोभा लक्ष्मी पाहून सगर्व झाले- हर्षयुक्त झाले. पण सहसान-मोर हे त्यावेळी गर्व रहित झाले, खिन्न झाले. तेव्हां हा त्याच्या शुद्धि-अशुद्धीचा स्वभाव Page #83 -------------------------------------------------------------------------- ________________ ७२) महापुराण (२६-१९. कलहंसा हसन्तीव विरुतः स्म शिखण्डिनः । अहोजलप्रिया यूयमिति निर्मलमूर्तयः ।। १९ चित्रवर्णा धनाबद्धरुचयो गिरिसंश्रयाः । समं शतमखेष्वासर्बहिणः स्वोन्नति जहुः ॥ २० बन्धकैरिन्द्रगोपश्रीन तेने बनराजिषु । शरल्लक्षम्येव निष्ठ्यूतस्ताम्बूलरसबिन्दुभिः ॥ २१ विकासं बन्धुजीवेषु शरदाविर्भवन्त्यधात् । सतीच सुप्रसन्नात्मा विपङ्का विशदाम्बरा ॥ २२ आहे. हंसाला शरदऋतूची स्वच्छता आवडली हा त्याचा शुद्धिगुण स्वभाव आहे. पण मोराला पावसाळयाची अस्वच्छता आवडत होती म्हणून तो या शरत्काली हर्षित झाला नाही. मोराचा अशुद्धता हा स्वभाव आहे म्हणून त्याला शरत्कालची स्वच्छता आवडली नाही ॥ १८ ॥ निर्मल शुभ्र शरीरधारी हंस आपल्या शब्दानी जणु मोराना हसू लागले. हे मोरानो, तुम्ही जलप्रिय आहात. तुम्हाला पाणी आवडते असे म्हणून ते हंस मोराना हसू लागले. येथे ड व ल चा अभेद मानून तुम्ही जडप्रिय आहात असाही शब्द मानता येतो व त्याचा अर्थ मूर्ख आवडतात असा होतो. वर्षाऋतु लोकांना दुःखद असल्यामुळे तो तुम्हाला प्रिय आहे असा जडप्रिय शब्दाचा अर्थ झाला. असा अर्थ घेऊन हंसानी मोराची थट्टा केली आहे ॥ १९ ॥ __ ज्यांचे पिसारे अनेक रंगाचे आहेत, वर्षाऋतुमुळे ज्यांच्या देहावर घन-पुष्कळ आबद्ध रुचि-कान्ति उत्पन्न झाली आहे. रुचि शब्दाचा अर्थ कान्ति असा येथे आहे. गिरिसंश्रयाः पर्वताचा आश्रय घेणारे- पर्वतावर राहणारे असे जे मोर त्यांनी आपल्याप्रमाणे सादृश्य ज्यात आहे अशा इंद्रधनुष्याप्रमाणे आपल्या उन्नतीचा त्याग केला. इन्द्रधनुष्ये देखिल चित्रवर्ण अनेक रंगानी युक्त असतात, घनाबद्धरुचयः मेघामध्ये त्यांची कान्ति खुलून दिसते व ते गिरिसंश्रयाः पर्वतावरील मेघांचा आश्रय घेतात. परन्तु शरदऋतूमध्ये ते मेघ नसल्यामुळे इन्द्रधनुष्येही नसतात. म्हणून इन्द्रधनुष्याप्रमाणे मोरांनीही आपल्या उन्नतीचा त्याग केला. अर्थात् मोराचा तजेला शरद्ऋतूमध्ये कमी झाला ॥ २० ॥ शरल्लक्ष्मीने थुकलेल्या तांबूलाचे बिन्दूच की काय अशा लाल रंगाच्या बन्धक पुष्पांनीजास्वंदीच्या फुलांनी अरण्यात इंद्रगोप नामक लाल रंगाच्या किड्यांची शोभा उत्पन्न केली नाही काय? सारांश इंद्रगोप किडे ज्यांना गेचवे म्हणतात ते लाल रंगाचे असतात. ते पावसाळ्यात जंगलात पुष्कळ उत्पन्न होतात. त्या गेचव्यांच्या पुंजक्याप्रमाणे लाल असलेल्या जास्वंदीच्या फुलांनी या शरदऋतूत वनात शोभा उत्पन्न केली नाही काय? अर्थात् या पुष्पांनी शरदऋतूत वनात फार शोभा उत्पन्न केली ।। २१ ॥ विशदाम्बरा- निर्मल वस्त्रे नेसलेली, विपङ्का-पापरहित-पुण्यवती व सुप्रसन्नात्माप्रसन्न अन्तःकरणाची सती स्त्री जशी बन्धुजीवेषु-आप्तलोकात विकास आनन्द हर्ष उत्पन्न करते तशी शरदऋतूची शोभा उत्पन्न झाली व ती शोभा पतिव्रता स्त्रीप्रमाणे सुप्रसन्नता उत्पन्न करणारी झाली. ती शरच्छोभा विपङ्का-चिखलरहित होती, विशदाम्बरा-निर्मल आकाशाने युक्त होती व तिने बन्धुजीवेषु विकासं अधात्-जास्वंदीच्या फुलामध्ये प्रफुल्लपणा उत्पन्न केला ॥ २२ ॥ Page #84 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-३०) हंसस्वरानका काशकणिशोज्ज्वलचामरा । पुण्डरीकातपत्रासीद्दिग्जयेच्छेव सा शरत् ॥ २३ विशां प्रसाधनायाधाद्बाणासनपरिच्छदम् । शरत्कालो जिगीषोहि श्लाघ्यो बाणासनग्रहः ॥ २४ घनावली कृशा पाण्डुरासीदाशा विमुञ्चती । घनागमवियोगोत्थचिन्तयेवाकुलीकृता ॥ २५ नभः सतारमारेजे विहसत्कुमुदाकरम् । कुमुद्वतीवनं चाभाज्जयत्तारकितं नभः ॥ २६ तारकाकुमुदाकीर्णे नभःसरसि निर्मले । हंसायतेस्म शीतांशुविक्षिप्तकरपक्षतिः ॥ २७ नभोगृहाङ्गणे तेनुः श्रियं पुष्पोपहारजाम् । तारका दिग्वधूहारतारमुक्ताफलत्विषः ॥ २८ बभुर्नभोम्बुधौ ताराः स्फुरन्मुक्ताफलामलाः । करका इव मेघौघैनिहिता हिमशीतलाः ॥ २९ ज्योत्स्नासलिलसम्भूता इव बुबुदपङक्तयः । तारका रुचिमातेनुविप्रकीर्णा नभोऽङ्गणे ॥ ३० महापुराण हंसांचे शब्द हेच ज्याचे नगारे आहेत, काश नावाच्या गवताचे जे उज्ज्वल - शुभ्र तुरे हेच ज्याचे चामर आहेत, शुभ्र कमले ज्याचे छत्र आहे असा शरद् ऋतु जणु दिग्विजय करण्याची इच्छा करीत आहे असा भासला ।। २३ ।। (७३ शरत्कालाने दिशांना भूषविण्याकरिता बाण नावाची फुले व असन नावाच्या फुलांचा समूह धारण केला होता. बरोबरच आहे की जो जयेच्छु असतो त्याने शत्रूला वश करण्यासाठी बाणासन-बाण ज्याने दूर फेकले जातात अशा वस्तूंचा अर्थात् धनुष्यांचा स्वीकार करणे योग्यच आहे ॥ २४ ॥ त्यावेळी सर्व दिशांचा त्याग करणारी पक्षी संगमाशेचा त्याग करणारी अशी मेघपंक्ति रोड व पांढरी झाली. धनागम- पावसाळयाच्या वियोगाने उत्पन्न झालेल्या चितेने जणु ती व्याकुळ झाली होती ॥ २५ ॥ तारकांनी सहित असे आकाश रात्री विकसित होणाऱ्या कमलसमूहाला जणु हसत आहे असे शोभत होते व कमलवनाने युक्त असे सरोवर तारकांनी युक्त असलेल्या आकाशाला जणु जिंकित आहे असे शोभत होते ॥ २६ ॥ निर्मल आकाशरूपी सरोवर तारकारूपी पांढऱ्या कमलांनी व्याप्त झाले होते व त्यात ज्याने आपले पंख पसरले आहेत अशा हंसाप्रमाणे चन्द्र शोभत होता ॥ २७ ॥ दिशारूपी स्त्रियांच्या हारातील जणु तेजस्वी मोत्यांची कान्ति धारण करणाऱ्या तारकांनी आकाशरूपी घराच्या अंगणात जणु पसरलेल्या पुष्पसमूहाच्या शोभेला वाढविले ||२८|| आकाशरूपी समुद्रात चमकणान्या मोत्याप्रमाणे स्वच्छ शुभ्र असा तारांचा समूह मेघांच्या समूहाने इकडे तिकडे टाकलेल्या बर्फाप्रमाणे थंडगार अशा जणु गारा आहेत असा भासू लागला ॥ २९ ॥ आकाशरूपी अंगणात चोहोकडे पसरलेला तारकांचा समूह चन्द्रकिरणरूपी पाण्याचे जणु बुडबुडे आहेत असा शोभू लागला ।। ३० ।। म. १० Page #85 -------------------------------------------------------------------------- ________________ ७४) महापुराण (२६-३१ तनुभूतपयोवेणीनद्यः परिकृशा दधुः । वियुक्ता घनकालेन विरहिण्य इवाङ्गनाः ॥ ३१ अनुद्धता गभीरत्वं भेजुः स्वच्छजलांशुकाः । सरिस्त्रियो घनापायाद्वैधव्यमिव संश्रिताः ॥३२ विगङ्गना घनापायप्रकाशीभूतमूर्तयः । व्यापहासीमिवातेनुः प्रसन्ना हंसमण्डनात् ॥ ३३ कूजितःकलहंसानां निजिता इव तत्यजुः । केकायितानि शिखिनः सर्वः कालबलाबली ॥ ३४ ज्योत्स्नादुकूलवसना लसन्नक्षत्रमालिका । बन्धुजीवाधरा रेजे निर्मला शरदङ्गाना ॥ ३५ ज्योत्स्ना कीति मिवातन्वन्विधुर्गगनमण्डले । शरल्लक्ष्मी समासाद्य सुराजेवायुतत्तराम् ॥ ३६ बन्धुजीवेषु विन्यस्तरागा बाणकृतद्युतिः । हंसीसखीवृता रेजे नवोढेव शरवधः ॥ ३७ वर्षाकालाशी ज्यांचा वियोग झाला आहे व म्हणून ज्या कृश झाल्या आहेत अशा नद्यांनी विरहिणी स्त्रियाप्रमाणे स्वल्पजलप्रवाहरूपी वेणीला धारण केले ॥ ३१ ।। वर्षाकालाचा नाश झाल्यामुळे जणु विधवा झाल्या अशा नद्या याच कोणी वर्षाकालाच्या स्त्रिया, स्वच्छ पाणी हेच शुभ्र वस्त्र ते त्यांनी धारण केले व उद्धतपणा त्यागून त्या शान्त झाल्या. तात्पर्य हे की, नद्यांच्या लाटा खळबळाट वगैरे बंद झाला व पाणी शान्तपणे वाहू लागले ।। ३२ ।। मेधांचे आवरण दूर झाल्यामुळे ज्यांचे स्वरूप स्पष्ट दिसत आहे अशा दिशारूपी स्त्रिया हंसरूपी अलंकार धारण करून प्रसन्न झाल्या व जणु त्या हसु लागल्या ।। ३३ ।। कलहंसाच्या मधुर शब्दांनी जणु जिंकले गेलेल्या अशा मोरांनी आपल्या केकाध्वनीचा त्याग केला व हे योग्यच झाले. कारण जगात सर्व प्राणी कालाच्या सामर्थ्याने बलवान् होतात असे आढळून येते ॥ ३४ ।। स्वच्छ चांदणे हेच जिनें रेशमी वस्त्र धारण केले आहे, चमकणाऱ्या नक्षत्रांची माला जिने कंठात धारण केली आहे व दुपारची पुष्पेरूपी लाल ओठ जिचे आहेत व जी अतिशय निर्मल आहे अशी शरत्स्त्री फारच शोभत आहे ॥ ३५ ॥ आकाशात आपल्या प्रकाशरूपी कीर्तीला खूप पसरणारा असा चन्द्र शरल्लक्ष्मीला मिळवून उत्तम राजाप्रमाणे फार शोभू लागला ।। ३६ ।। जसे नवविवाहित स्त्री आपले भाऊ वगैरे आप्त नातलगावर प्रेम करते, तसे ही शरत् । स्त्री बन्धुजीव अर्थात् दुपारच्या फुलावर राग प्रेम करते अर्थात् लालपणा धारण करते. नवविवाहित स्त्री बाणजातीच्या फुलांनी कान्तियुक्त दिसते तशी ही शरदङ्गना बाणनामक फुलांनी फार खुलून दिसत आहे. नवविवाहतास्त्री जशी मैत्रीणींनी घेरलेली शोभते तशी ही शरदङ्गना हंसीरूपी मैत्रिणीनी घेरलेली शोभू लागली ।। ३७ ॥ Page #86 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-४५) महापुराण (७५ स्वयं घौतमभाव व्योम स्वयं प्रक्षालितः शशी । स्वयं प्रसादिता नद्यः स्वयंसम्माजिता दिशः ॥ ३८ शरल्लक्ष्मीमुखालोकदर्पणे शशिमण्डले । प्रजादृशो बृति भेजुरसंमृष्टसमुज्ज्वले ॥ ३९ वनराजीस्ततामौदाः कुसुमाभरणोज्ज्वलाः । मधुव्रता भवन्तिस्म कृतकोलाहलस्वनाः ॥ ४० तन्व्यो वनलता रेजुर्विकासिकुसुमस्मिताः । सालका इव गन्धान्धविलोला लिकुलाकुलाः ॥ ४१ दर्पोद्धुराःखुरोत्खात भुवस्ता स्त्रीकृतेक्षणाः । वृषाः प्रतिवृषालोककुपिताः प्रतिसस्वनुः ॥ ४२ अपाकिरन्त शृङ्गाग्रैर्वृषभा षीरनिःस्वनाः । वनस्थलीं स्थलाम्भोजमृणालशकलाचिताम् ॥ ४३ वृषाः ककुदसंलग्नमृदः कुमुदपाण्डुराः । व्यक्ताङ्कस्य मृगाङ्कस्य लक्ष्मीमबिभरुस्तदा ॥ ४४ क्षीरप्लवमयीं कृत्स्नामातन्वाना वनस्थलीम् । प्रस्नुवाना वनान्तेषु प्रसस्रुर्गोमतल्लिकाः ॥ ४५ त्यावेळी आकाश स्वतः धुतल्याप्रमाणे निर्मल झाले, चन्द्र स्वतः पाण्याने धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाला. नद्या आपण होऊनच निर्मल झाल्या व दिशा स्वतःच न झाडताही स्वच्छ झाल्या ।। ३८ । चन्द्राचे मण्डळ शरद्ऋतृची जी लक्ष्मी तिचे मुख पाहण्यास दर्पणाप्रमाणे झाले. प्रजांचे नेत्र पुसल्यावाचून अतिशय उज्ज्वल झालेल्या चन्द्राच्या ठिकाणी अतिशय प्रेमयुक्त झाले || ३९॥ शरत्कालाचे आगमन झाले असता वनपंक्ति ज्यांचा सुगंध पसरला आहे अशा झाल्या व पुष्परूपी अलंकारांनी त्या उज्ज्वल-सुंदर दिसू लागल्या आणि भुंगे वारंवार गुंजारव करू लागले || ४० ॥ कृश पण सुंदर अशा लता विकसित झालेली फुले हेच ज्याचे मंद हास्य आहे अशा शोभू लागल्या आणि सुगन्धाने अतिशय घुन्द झालेल्या चंचल भुंग्यानी व्याप्त झाल्यामुळे त्या सुन्दर केशांनी युक्त असल्याप्रमाणे शोभू लागल्या ॥ ४१ ॥ त्या शरदऋतूच्या काली बैल उन्मत्त झाले. आपल्या पायाच्या अग्रभागांनी जमीन उकरू लागले. त्यांचे डोळे लाल झाले व आपल्या विरुद्ध दुसन्या बैलाला पाहून ते रागावून डरकाळी फोडू लागले ।। ४२ ।। ज्यांचे शब्द गंभीर आहेत असे ते बैल आपल्या शिंगांच्या अग्रभागांनी भूकमलांच्या आतील तन्तूनी व्यापलेल्या वनातील भूमीला उकरू लागले ॥ ४३ ॥ त्या शरऋतुसमयी ज्यांच्या वशिंडाला माती लागली आहे व जे कमलाप्रमाणे शुभ्र आहेत असे बैल ज्यातील निळे लांछन स्पष्ट दिसत आहे, अशा चन्द्राच्या शोभेला धारण करू लागले ।। ४४ ।। ज्यांच्या स्तनातून दूध आपोआप गळत असल्यामुळे ज्या सर्व वनप्रदेशांना दुधाच्या प्रवाहाने युक्त करीत आहेत अशा पुष्कळ उत्तम गाई त्या प्रदेशात इकडे तिकडे जाऊ लागल्या 1184 11 Page #87 -------------------------------------------------------------------------- ________________ ७६) महापुराण (२६-४६ कुण्डोध्न्योऽमृतपिण्डेन घटिता इव निर्मलाः । गोगृष्टयो वनान्तेषु शरच्छ्यि इवाभवन् ॥ ४६ हम्भारवभृतो वत्सानापिप्यन्प्रकृतस्वनान् । पीनापीनाः पयस्विन्यःपयःपीयूषमुत्सुकान् ॥ ४७ क्षीरस्यतो निजान्वत्सान् हुम्भागम्भीर निःस्वनाः । धेनुष्यःपाययन्ति स्म गोपैरपि नियन्त्रिताः॥ प्राप्रिया जलदा जाताःशिखिनामप्रियास्तदा । रिक्ता जलधनापायादहो कष्टा दरिद्रता ॥ ४९ व्यापहासीमिवातेनुगिरयःपुष्पितैर्दुमैः । व्यात्युक्षीमिव तन्वानाः स्फुरनिरसीकरैः॥५० प्रवृद्धवयसो रेजुः कलमा भृशमानताः । परिणामात्प्रपुष्यन्तो जरन्तःपुरुषा इव ॥ ५१ विरेजुरमलाः पुष्पर्मदालिपटलाततैः । इन्द्रनीलकृतान्तयें:सौवर्णैरिव भूषणः ॥ ५२ घनावरणनिर्मुक्ता दधुराशा दृशां मुदम् । नटिका इव नेपथ्यगृहाव्रङ्गमुपागताः ॥ ५३ अमृता कुण्डाप्रमाणे मोठ्या कासा ज्यांच्या आहेत व अतिशय शुभ्र असल्यामुळे जणु या पिण्डांनी ज्या बनविल्या आहेत असे वाटते व ज्या एकदा प्रसत झाल्या आहेत अशा कित्येक गाई शरत्कालच्या लक्ष्मीप्रमाणे वनाच्या मध्यभागी शोभत होत्या ॥ ४६ ॥ ज्यांची कास मोठी आहे व ज्या पुष्कळ दूध देतात अशा गायींनी दूध पिण्याविषयी उत्सुक झालेल्या व हंभा हंभा असा वारंवार शब्द जे करीत आहेत अशा आपल्या वासरांना दूधरूपी अमृत पाजले ॥ ४७ ॥ ज्यांना गवळ्यांनी बांधले आहे व ज्या वारंवार हुंभा हुंभा असा गंभीर शब्द करीत आहेत अशा गायी गवळयांनी प्रतिबंध केला असताही दूध पिण्याची इच्छा करणान्या अशा आपल्या वासरांना अमृतासारखे दूध पाजीत होत्या ।। ४८ ॥ पूर्वी जे मेघ मोरांना प्रिय झाले होते तेच आता जलरूपी धनाचा अभावामुळे मोरांना अप्रिय वाटू लागले. यावरून दरिद्रता ही कष्टदायक आहे हे सिद्ध झालें ॥ ४९ ॥ __वाहणाऱ्या झ-याचे जे वर उडणारे जलबिंदु त्यांनी हे पर्वत जणु एकमेकावर जल फेकीत आहेत काय असे वाटे व फुललेल्या झाडांनी हे पर्वत एकमेकांना पाहून जणु हसत आहेत असे वाटत असे ।। ५० ॥ ज्यांची वाढ होऊन पुष्कळ दिवस झाले होते अशा कलम जातीच्या साळी अतिशय पिकल्या होत्या व पक्वावस्थेस पोहोचल्यामुळे पुष्ट झाल्या होत्या. त्यामुळे त्या वृद्ध पुरुषाप्रमाणे शोभत होत्या ॥ ५१ ॥ असाणा नावाचे वृक्ष उन्मत्त भुंग्यांच्या समूहाने व्याप्त झालेल्या आपल्या पुष्पांनी इन्द्रनीलमणि बसविले आहेत अशा सोन्याच्या अलंकारांनी जणु शोभत आहेत असे वाटत होते ॥ ५२॥ र आलेल्या नटी जशा लोकांच्या नेत्रांना आनंदित करतात तसे मेघांच्या आवरणातून मुक्त झालेल्या दिशानी लोकांच्या नेत्रांना आनंदित केले ॥ ५३ ।। पडद्या Page #88 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-६१) (७७ आदधुर्धनवृन्दानि मुक्तासाराणि भूधराः । सदशानीव वासांसि निष्प्रवाणीनि सानुभिः ।। ५४ पवनाधोरणारूढा मुर्जीमूत दन्तिनः । सान्तर्गर्जा निकुञ्जेषु सासारमदसीकराः ।। ५५ शुकावली प्रवालाभचञ्चस्तेने दिवि श्रियम् । हरिन्मणिपिनद्धेव तोरणाली समप्रभा ॥ ५६ चेतांसि तरणाङ्गोपजीविनामुद्धतात्मनाम् । पुंसां च्युताधिकाराणामिव दैन्यमुपागमन् ॥ ५७ प्रतापी भुवनस्यैकं चक्षुनित्य महोदयः । भास्वानाक्रान्ततेजस्वी बभासे भरतेशवत् ॥ ५८ इति प्रस्पष्टचन्द्रांशु प्रहासे शरदागमे । चक्रे दिग्विजयोद्योगं चक्री चकपुरःसरम् ।। ५९ प्रस्थानभेर्यो गम्भीरप्रध्वानाः प्रहतास्तदा । श्रुता बर्हिभिरुद्ग्रीवर्धनाडम्बरशङ्किभिः ।। ६० धृतमङ्गलनेपथ्यो बभारोरःस्थलं प्रभुः । शरल्लक्ष्म्येव सम्भक्तं सहारहरिचन्दनम् ॥ ६१ महापुराण ज्यातील पाणी नाहीसे झाले आहे अशा मेघांना पर्वतानी आपल्या शिखरांच्या द्वारे उत्तम दशायुक्त नवीन वस्त्राप्रमाणे धारण केले ॥ ५४ ॥ वारारूपी महात ज्यांच्यावर आरूढ ज्ञाला आहे व जे आतल्या आत गर्जना करीत आहेत व जलबिंदुरूपी मदजलाचे बिंदूंची वृष्टि करणारे असे मेघरूपी हत्ती लतागृहात भ्रमण करू लागले ।। ५५ ॥ प्रवाळ - पोवळयासारख्या लाल चोचींच्या राघूंच्या पंक्तीने पाचेच्या कोंदणात बसविलेल्या पद्मरागमण्याच्या तोरणासारखी शोभा आकाशात उत्पन्न केली ।। ५६ ।। पाण्यातून तरून जाण्याला उपयोगी पडणाऱ्या नावावर उपजीविका करणारे कठोर अन्तःकरणाच्या नावाडी लोकांची अन्तःकरणे जे अधिकार च्युत झाले आहेत अशा कामगार लोकाप्रमाणे दीन झाली ॥ ५७ ॥ प्रखर उन्हाने संताप देणारा, सर्व जगाला जणु मुख्य नेत्र डोळा असलेला, नेहमी ज्याचा महान् उदय असतो असा व सर्व तेजस्वी पदार्थावर आक्रमण करणारा असा सूर्य महापराक्रमी, सर्व प्रजांना सन्मार्ग दाखविणारा असल्यामुळे जणु त्यांना डोळ्याप्रमाणे असलेला व प्रतिदिवशी ज्यांचे तेज वाढत आहे असा व तेजस्वी लोकावर आक्रमण करणाऱ्या भरतचक्रवर्तीप्रमाणे शोभला ।। ५८ ।। अतिशय निर्मल चन्द्राच्या किरणांनी जणु जो खूप हासत आहे अशा शरद् ऋतूचे आगमन झाले असता, भरतचक्रवर्तीने आपल्या चक्ररत्नाला पुढे करून दिग्विजयोद्योगाला सुरुवात केली ।। ५९॥ दिग्विजयाला प्रस्थान करण्यासाठी ज्यांची गंभीर गर्जना आहे असे नगारे वाजविले गेले. ही मेघांची गर्जना होत असावी अशी शंका ज्याना वाटत होती अशा मोरांनी आपली मान उंच करून ती ऐकली ॥ ६० ॥ मंगलकारक अलंकार व वस्त्रे ज्याने धारण केली आहेत अशा त्या प्रभु भरताचे वक्षःस्थल पुष्पांचे हार व चन्दनाच्या उटीने युक्त असल्यामुळे तें शरत्कालाच्या शोभेने युक्त असल्याप्रमाणे शोभत होते ।। ६१ ।। Page #89 -------------------------------------------------------------------------- ________________ ५८) महापुराण (२६-६२ न्योत्स्नाम्मन्ये दुकूले च श्लक्ष्णे परिदधौ नपः । शरच्छियोपनीते वा मृदुनी दिव्यवाससी॥ ६२ नाजानुलम्बिना ब्रह्मसूत्रेण विबभौ विभुः । हेमाद्रिरिव गङ्गाम्बप्रवाहेण तटस्पृशा ॥ ६३ किरीटोदप्रमूर्षासौ कर्णाभ्यां कुण्डले दधौ । चन्द्रार्कमण्डले वक्तुमिवायाते जयोत्सवम् ॥ ६४ वक्षःस्थलेऽस्य रुरुचे रुचिरः कौस्तुभो मणिः । जयलक्ष्मीसमुद्वाहमङ्गलाशंसि दीपवत् ॥ ६५ विधुबिम्बप्रतिस्पद्धि दधेऽस्यातपवारणम् । तन्निभेनैन्दवं बिम्बमागत्येव सिषेविषु ॥ ६६ तवस्य रुचिमातेने धृतमातपवारणम् चूडारत्नांशुभिभिन्नं सारुणांशिवव पङ्कजम् ॥ ६७ स्वर्धनीसीकरस्पद्धि चामराणां कदम्बकम् । दुधुवुर्वारनार्योऽस्य दिक्कन्या इव संसताः ॥ ६८ ततः स्थपतिरत्नेन निर्ममे स्यन्दनो महान् । सुवर्णमणिचित्रांगमेरुकुञ्जश्रियं हसन् ॥ ६९ चक्ररत्नप्रतिस्पद्धिचऋद्वितयसङ्गतः । वज्राक्षघटितो रेजे रथोऽस्येव मनोरथः ॥७० शरललक्ष्मीने जण स्वतः दिलेली व मदस्पर्शाची, बारीक व चंद्रकिरणाप्रमाणे शभ्र अशी दोन दिव्य वस्त्रे (नेसावयाचे व पांघरावयाचे) भरत राजाने धारण केली होती॥६२॥ त्या भरतराजाने गुडघ्यापर्यंत लोंबणारे ब्रह्मसूत्र जानवे धारण केले होते. त्यामळे दोन्ही तटांना स्पर्श करणान्या गंगेच्या प्रवाहाने हिमालय जसा शोभत होता तसा तो शोभू लागला ।। ६३ ।। किरीटाने ज्याचे मस्तक उंच भासत आहे अशा त्या भरतराजाने आपल्या दोन कानात जणु दिग्विजयाच्या आनन्दाला सांगण्याकरिता आलेले जणू चंद्र सूर्य अशी दोन कुण्डले धारण केली होती॥ ६४ ॥ ___ या भरत प्रभूच्या वक्षःस्थलावर सुंदर प्रकाशमान् कौस्तुभमणि शोभत होता तो विजयलक्ष्मीबरोबर होणान्या विवाहमंगलाला सुचविणान्या दिव्याप्रमाणेच शोभत होता ॥६५॥ __ आपल्या शुभ्र- कान्तीने व गोलाकाराने चन्द्राच्या बिम्बाशी स्पर्धा करणारे व छत्राच्या मिषाने जणु चन्द्रबिंब सेवा करण्याकरिता आले की काय असे छत्र सेवकानी भरतराजाच्या मस्तकावर धारण केले ।। ६६ ।। भरतराजाच्या मस्तकावर धारण केलेले छत्र त्याच्या ( राजाच्या ) मुकुटावरील माणिकांच्या लाल किरणानी युक्त झाल्यामुळे अरुणोदयकालच्या लाल रंगाच्या सूर्यकिरणानी युक्त प्रफुल्लित कमलाप्रमाणे शोभू लागले ।। ६७ ।। भरतराजाच्या दोन बाजूंचा आश्रय घेऊन दिक्कन्याप्रमाणे सुंदर अशा वारांगना अंगानदीच्या शुभ्र जलकणाशी स्पर्धा करणारा चामरांचा समूह त्याच्यावर वारू लागल्या ।।६८॥ यानंतर सोने आणि रत्ने यांनी चित्रविचित्र दिसणाऱ्या मेरुपर्वताच्या कुंजाच्या शोभेला हसणारा असा मोठा रथ स्थपतिरत्नाने-कलासंपन्न उत्तम सुताराने बनविला ॥ ६९ ।। चक्ररत्नाशी स्पर्धा करणाऱ्या आपल्या दोन चाकानी युक्त असलेला व वज्राच्या मजबूत कण्याने युक्त असा या भरताचा रथ जणु त्याचा स्वतःचा मनोरथ असा भासू लागला ।। ७०॥ Page #90 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-७९) महापुराण कामगैर्वायुरहोभिःकुमुदोज्ज्वलकान्तिभिः । यशोवितानसङ्काशैः स रथोऽयोजि वाजिभिः ॥ ७१ स तं स्यन्दनमारुक्षाक्तसारथ्यधिष्ठितम् । नितम्बदेशमद्रीशः सुरराडिव चक्रराट् ॥ ७२ ततःप्रास्थानिकैःपुण्यनिर्घोषैरभिनन्दितः । प्रतस्थे दिग्जयोद्युक्तः कृतप्रस्थानमङ्गलः ॥ ७३ तदा नभोऽङ्गणं कृत्स्नं जयघोषैररुध्यत । नपाङ्गणं च संरुद्धमभवत्सैन्यनायकैः ।। ७४ महामुकुटबद्धास्तं परिवःसमन्ततः । दूरात्प्रणतमूर्धानः सुरराजमिवामराः ॥ ७५ प्रचचाल बलं विष्वगारुद्धपुरवीथिकम । महायोधमयी वृष्टिरपूर्वेवाभक्त्तदा ॥ ७६ पुरः पादातमाश्वीयं रथकटया च हास्तिकम् । क्रमानिरीयुरावेष्टय सपताकं रथं प्रभोः॥७७ रथ्या रथाश्वसङ्घट्टादुत्थितेहेमरेणुभिः । बलक्षोदाक्षमा व्योम समुत्पेतुरिव स्वयम् ॥ ७८ रौक्मैरजोभिराकीणं तदा रेजे नभोऽजिरम् । स्पष्टं बालातपेनेव पटवासेन चाततम् ॥ ७९ ....................... त्या रथाला जे घोडे जोडले होते ते स्वेच्छेने जाणारे, वायुप्रमाणे वेगशाली, शुभ्र कमलाप्रमाणे उज्ज्वल कान्तीचे व भरतराजाचे यशाचे जणु छत असे होते ॥ ७१ ।। जसा इन्द्र मेरुपर्वताच्या कड्यावर चढतो त्याप्रमाणे तो चक्रवर्ती, सारथी ज्यावर पुढे बसला आहे अशा त्या रथावर आरोहण करून बसला ।। ७२ ।। यानन्तर प्रस्थान करावयाच्या वेळी पुण्यघोषणांनी म्हणजे तुझा जय होवो इत्यादि मंगल शब्दानी ज्याने अभिनन्दन केले आहे व गमनकाली आरती ओवाळून मंगल ज्याचे केले आहे अशा त्या भरतराजाने दिग्जयासाठी उद्युक्त होऊन प्रयाण केले ॥ ७३ ।। त्यावेळी सर्व आकाशरूपी अंगण जयघोषांनी भरून गेले व सैन्याच्या मोठ्या अधिकारी लोकांनी राजवाड्याचे अंगण भरून गेले ।। ७४ ॥ जसे देव इन्द्राला दूरून मस्तक नम्र करून व त्याला चोहोकडून घेरून उभे राहतात तसे मोठ्या मुकुटाना धारण करणारे व दूरून नमस्कार करण्याकरिता मस्तक नम्र करणारे राजे भरतराजाच्या सभोवती उभे राहिले ।। ७५ ॥ ___ नगरातील सर्व रस्ते ज्याने व्यापले आहेत असे ते सैन्य ज्यावेळी दिग्विजयास निघाले तेव्हां बघणाऱ्यांना असे वाटू लागले की, ही महावीरयोद्धयांची आकाशातून अपूर्व वृष्टि झाली की काय ? ॥ ७६ ॥ सर्वांच्या पुढे पायदळ, त्यानंतर घोडेस्वार, त्यामागे रथसमूह अशा क्रमाने भरतराजाच्या ध्वजसहित रथाला वेढून ते सैन्य प्रयाण करू लागले ।। ७७ ।। ___ रथ व घोड्याच्या वेगाने जाण्याने व त्यांच्या संघर्षणाने आकाशात जी सुवर्णधूळ उडाली त्यामुळे असे वाटले की, हे रस्ते सैन्याचे संघर्षण सहन न झाल्यामुळे आकाशात उडून चालले आहेत ॥ ७८॥ त्यावेळी आकाशाङ्गण सुवर्णाच्या धुळीनी भरून गेल्यामुळे सकाळच्या कोमल उन्हाने जणु ते व्याप्त झाले आहे. अथवा सुगंधी चूर्णानी ते व्यापले आहे असे शोभ लागले ॥ ७९ ॥ Page #91 -------------------------------------------------------------------------- ________________ ८०) महापुराण (२६-८० अनशनर्जनर्मुक्ता विरेजःपुरवीथयः । कल्लोलरिव वेलोत्थर्महाब्धेस्तीरभूमयः॥८० पुराङ्गनाभिरुन्मुक्ताः सुमनोऽञ्जलयोऽपतन् । सौधवातायनस्थाभिर्दृष्टिपातैःसमं प्रभो ॥ ८१ जयेश बिजयिन् विश्व विजयस्व दिशो दश । पुण्याशिषां शतरित्थं पौराःप्रभुमपूजयन् ॥ ८२ सम्राट् पश्यन्नयोध्यायाःपराम्भूति तदातनीम् । शनैःप्रतोली सम्प्रापद्रत्नतोरणभासुराम् ॥ ८३ पुरोबहिःपुरःपश्चात् समञ्च विभुनामुना । ददृशे दृष्टिपर्यन्तमसङख्यमिव तलम् ॥ ८४ जगतःप्रसवागारादिव तस्मात्पुराबलम् । निरियाय निरुच्छवासं शनैरारुद्धगोपुरम् ॥ ८५ किमिदं प्रलयक्षोभात्क्षुभितं वारिधेर्जलम् । किमुत त्रिजगत्सर्गः प्रत्यग्रोऽयं विजृम्भते ॥ ८६ इत्याशडक्य नभोभाग्भिः सूरैः साश्चर्यमीक्षितम् । प्रससार बलं विष्वक्पुरानिय चक्रिषः ॥ ८७ ततः प्राची दिशं जेतुं कृतोद्योगो विशाम्पतिः। प्रययौ प्राङमुखो भूत्वा चक्ररत्नमनुव्रजन् ॥८८ चक्रमस्य ज्वलद्ध्योम्नि प्रयाति स्म पुरो विभोः। सुरैः परिवृतं विष्वक् भास्वबिम्बप्रभास्वरम्॥८९ जेव्हा नगरातील रस्ते हळू हळू सैन्यांनी रहित झाले तेव्हां ते लाटा येण्याचे बंद झाल्यानंतर महासागराचे तीरप्रदेश जसे शोभतात तसे शोभू लागले ।। ८० ॥ मोठमोठ्या वाड्याच्या खिडक्यात बसलेल्या अशा नगरस्त्रियानी आपल्या नजरा बरोबर पुष्पांच्या ओंजळी भरतराजावर फेकल्या ।। ८१ ।। 'हे विजयशाली राजा तूं जगाला जिंक, दहा दिशांना तूं जिंक' याप्रमाणे नागरिक लोकांनी शेकडो कल्याणदायक आशीर्वादांनी भरतराजाचा आदर केला ।। ८२ ।। ___त्यावेळी सम्राट भरत अयोध्येचे ते उत्कृष्ट वैभव पाहत पाहात सावकाश रत्नांच्या तोरणानी चमकणान्या वेशीजवळ आला ॥ ८३ ।। भरतराजाने नगराच्या बाहेर प्रयाण केल्यावर आपल्यापुढे, आपल्यामागे व आपल्याबरोबर दृष्टि जेथपर्यन्त पोहोचते तेथपर्यन्त पाहिले तेव्हां आपले सैन्य जणु असंख्य आहे असे त्याला दिसले ॥ ८४ ।। वेशीत दाटी झाल्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्यासही ज्यास कष्ट वाटत होते असे ते सैन्य जगाचे जणु उत्पत्तिस्थान अशा त्या नगरातून हळूहळू बाहेर निघू लागले ॥ ८५-८६।। प्रलयकालचा क्षोभ झाल्यामुळे जणु क्षुब्ध झालेले हे समुद्राचे पाणी आहे काय ? किंवा जगत्त्रयाची ही नवीन उत्पत्ति होऊन ती वाढत आहे काय ? असा मनात संशय घेऊन आकाशात आलेल्या देवांनी ज्याला आश्चर्यचकित होऊन पाहिले आहे असे ते चक्रवर्ती भरताचे सैन्य नगरातून बाहेर निघून चोहोकडे पसरले ।। ८७ ।। यानंतर पूर्व दिशेला जिंकण्यासाठी ज्याने उद्योग केला आहे, चक्ररत्नाला अनुसरून व पूर्व दिशेकडे ज्याने मुख केले आहे अशा भरतराजाने पूर्व दिशेकडे प्रयाण केले ॥ ८८ ।। देवांनी वेढलेले व चोहीकडे सूर्यबिंबाप्रमाणे प्रकाशयुक्त असे ज्वालायुक्त चक्ररत्न या भरताच्यापुढे आकाशातून प्रयाण करीत होते ।। ८९ ।। Page #92 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-९८) महापुराण चक्रानुयायि तद्भजे निधीनामोशितुर्बलम् । गुरोरिच्छानुवतिष्णु मुनीनामिव मण्डलम् ॥ ९० वण्डरत्नं पुरोधाय सेनानीरग्रणीरभूत् । स्थपुटानि समीकुर्वन्स्थलदुर्गाण्ययत्नतः ॥ ९१ अग्रण्यदण्ड रत्नेन पथि राजपथीकृते । यथेष्टं प्रययौ सैन्यं क्वचिदप्यस्खलद्गति ॥ ९२ ततोऽध्वनि विशामीशः सोऽपश्यच्छारदीं श्रियम् । दिशां प्रसाधनों कीर्तिमात्मीयामिव निर्मलाम् ॥ सरांसि कमलामोदमुद्वमन्ति शरच्छ्यिः । मुखायितानि सम्प्रेक्ष्य सोऽभ्यनन्ददधीशिता ॥ ९४ स हंसान्सरसा तीरेष्वपश्यत्कृतशिञ्जनान् । मृणालपीथसम्पुष्टान् शरदःपुत्रकानिव ॥ ९५ चञ्च्या मृणालमुद्धृत्य हंसो हंस्यै समर्पयन् । राजहंसस्य हृद्यस्य महतीं धृतिमादधे ॥ ९६ सध्रीची वीचिसंरुद्धामपश्यन्परितः सरः । कोकः कोकूयमानोऽस्य मनसः प्रीतिमातनोत् ॥ ९७ हंसयूनान्जफिञ्जल्करजःपिञ्जरितां निजाम् । वधू विधूतां सोऽपश्यच्चक्रवाको विशङ्ककया ॥ ९८ गुरूजींच्या इच्छेला अनुसरून वागणारा मुनिसमूह जसा त्याना अनुसरतो तसे नवनिधींचा स्वामी असलेल्या भरतराजाचे सैन्य त्या चक्रास अनुसरून प्रयाण करू लागले ॥९॥ दण्डरत्नाला पुढे करून सेनापति पुढे जात होता व सर्व उंच सखल असे दुर्गम वनप्रदेश प्रयत्नावाचून त्याने सम केले ॥ ९१ ॥ पुढे चाललेल्या दण्डरत्नाने वनातले मार्ग राजमार्गाप्रमाणे केले. त्यामुळे सर्व सैन्य न अडखळणान्या गतीने स्वेच्छेने गमन करू लागले ।। ९२ ॥ यानंतर प्रजेचा स्वामी अशा भरतराजाने मार्गात शरत्कालच्या शोभेला पाहिले. ती पाहताना सर्व दिशाना अलंकृत करणारी व निर्मल अशी आपली कीर्ति आहे काय असे त्याला वाटले ।। ९३ ।। कमलांचा सुगन्ध चोहोंकडे पसरणारी व शरदलक्ष्मीची जणु मुखे आहेत की काय अशी सरोवरे पाहून भरतराजा फार आनन्दित झाला ।। ९४ ।। __ सरोवराच्या काठी मधुर शब्द करणारे व कमलाच्या देठातील तन्तुरूपी लोणी खाऊन पुष्ट झालेले जणु शरदलक्ष्मीची बालके अशा हंसाना भरतराजाने पाहिले ॥ ९५ ।। एका सरोवरातील राजहंस पक्षी आपल्या प्रियहंसीला आपल्या चोचीने कमलाचे तन्तु देत होता हे दृश्य पाहून या भरतराजाच्या मनाला फार आनंद वाटला ।। ९६ ॥ चक्रवाक पक्ष्याला सरोवराच्या लाटानी आच्छादित झालेली आपली प्रिय सोबतीण दिसली नाही म्हणून तो सरोवराच्या भोवती दीन शब्द करीत फिरू लागला. हे पाहून चक्रवर्तीच्या मनाला गंमत वाटली ।। ९७ ॥ कमलांच्या परागाच्या धुळीने एक हंसी पिवळी बनली होती तिला पाहून तिच्या प्रिय हंसाला ही चक्रवाकीच आहे का अशी शंका वाटली व त्याने तिचा त्याग केला हे भरतराजाने पाहिले व त्याला आश्चर्य वाटले ॥ ९८ ॥ म.११ Page #93 -------------------------------------------------------------------------- ________________ ८२) महापुराण (२६-९९ तरङ्गर्धवलीभूतविग्रहां कोककामिनीम् । व्यामोहादनुधावन्तं स जरखंसमैक्षत ॥ ९९ नदीपुलिनदेशेषु हंससारसहारिषु शयनेष्विव तस्यासीद्धृतिः शुचिमसीमसु ॥ १०० रोषोलताशि खोत्सृष्टपुष्पप्रकरशोभिनीः । सरित्तीरभुवोऽवर्शज्जलोच्छवासतरङगिताः ॥ १०१ लतालयेषु रम्येषु रतिरस्य प्रपश्यतः । स्वयङ्ग लत्प्रसूनौघरचितप्रस्तरेष्वभूत् ॥ १०२ क्वचिल्लतागृहान्तस्थचन्द्रकान्तशिलाश्रितान् । स्वयशोगानसंसक्तान्किन्नरान्प्रभुरेक्षत ॥ १०३ क्वचिल्लताप्रसूनेषु विलीनमधुपावलीः । विलोक्य स्रस्तकेशीनां सस्मार प्रिययोषिताम् ॥ १०४ सुमनोवर्षमातेनुः प्रीत्येवास्याधिमूर्धजम् । पवनाधूतशाखाग्राः प्रफुल्ला मार्गशाखिनः ॥ १०५ सच्छायान्सफलांस्तुङ्गान्सर्वसम्भोग्यसम्पदः । मार्गदुमान्समद्राक्षीत्स नृपाननुकुर्वतः ॥ १०६ तरंगानी जिचे शरीर पांढरे झाले आहे अशा चक्रवाकीला ही हंसी आहे असे मानून मोहाने-भ्रमाने एक वृद्ध हंस तिच्याकडे धावत जात आहे असे राजाने पाहिले ।। ९९ ।। ज्यांचा सीमाप्रदेश अतिशय शुचि-स्वच्छ आहे, जे हंस व सारस पक्ष्यानी मनोहर वाटतात असे नद्यांचे वाळवंटप्रदेश भरतराजाला शय्येप्रमाणे वाटले व त्याच्या मनाला फार आनंद झाला ।। १०० ।। किना-यावरील वेलींच्या शेंड्यातून गळालेल्या पुष्पसमूहानी शोभणान्या व पाण्याच्या उसळण्याने तरंगयुक्त झालेल्या अशा नद्यांच्या तटप्रदेशाना भरतचक्रवर्तीने पाहिले ।। १०१॥ आपोआप गळत असलेल्या फुलांच्या समूहाने जेथे शय्या तयार झाल्या आहेत अशा रम्य लतागृहाकडे पाहणाऱ्या भरतराजाच्या मनात प्रेम उत्पन्न झाले ।। १०२ ॥ कोठे कोठे लतागृहाच्या आतच चन्द्रकान्तशिलातलावर बसून स्वतःचे म्हणजे भरतराजाच्या यशोगानात गढून गेलेल्या किन्नरांना भरताने पाहिले ॥ १०३ ॥ कोठे कोठे वेलींच्या फुलामध्ये गुंग झालेल्या भुंग्यांच्या पंक्तीला पाहून ज्यांचे केशांची रचना ढिली होऊन खाली लोंबत आहे अशा आपल्या प्रियस्त्रियांचे भरताला स्मरण झाले ॥ १०४॥ __ वाऱ्याने ज्यांच्या फांद्यांचे शेंडे हालत आहेत असे मार्गावरचे प्रफुल्ल वृक्ष जणु प्रीतीने या भरतराजाच्या मस्तकावर पुष्पवृष्टि करू लागले ॥ १०५ ॥ जसे राजे सच्छाय- उत्तम छायेने-कान्तीने युक्त असतात तसे मार्गस्थ वृक्ष ही सच्छाय उत्तम दाट सावलीने युक्त असतात. जसे राजे सफल असतात अनेक प्रकारच्या धन प्राप्तीने युक्त असतात तसे वृक्ष तुङ्ग-उंच व सफल होते. राजाची संपत्ती सर्वांना उपभोगयोग्य असते तसे मार्गस्थ वृक्षांची पाने, फुले व फळांची संपत्ति सर्वभोग्य होती. त्यामुळे राजाचे अनुकरण करणा-या त्या वृक्षाना भरतराजाने मोठ्या आदराने पाहिले ॥ १०६ ॥ Page #94 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-११४) महापुराण (८३ सरस्तीरभुवोऽपश्यत्सरोजरजसातताः । सुवर्णरजसा शङ्कामध्वन्यहृदि तन्वतीः ।। १०७ बलरेणभिरारुद्ध दोषामन्ये नभस्यसौ । करुणां रुदती वीक्ष्य चक्रे चक्राह्वकामिनीम् ॥ १०८ गवां गणानथापश्यद्गोष्पवारण्यचारिणः । क्षीरमेघानिवाजलं क्षरत्क्षीरप्लुतान्तिकान् ॥ १०९ सौरभेयान्स शृङगानसमुत्खातस्थलाम्बुजान् । मृणालानि यशांसीव किरतोऽपश्यदुन्मदान् ॥ ११० वात्सकं क्षीरसम्पोषादिव निर्मलविग्रहम् । सोऽपश्यच्चापलस्येव परां कोटि कृतोत्प्लुतम् ॥ १११ स पक्वकणिशानम्रकलमक्षेत्रमैक्षत । नौद्धत्यं फलयोगीति नृणां वक्तुमिवोद्यतम् ॥ ११२ वप्रान्तर्भुवमाघ्रातुमिवोत्पलमिवानतान् । स कैवार्येषु कलमान् वीक्ष्यानन्दं परं ययौ ॥ ११३ फलानतान्स्तम्बकरीन् सोऽपश्यद्वप्रभूमिषु । स्वजन्महेतून्केदारान् नमस्यत इवादरात् ॥ ११४ -----.............................. सरोवराचे तीरभूमिप्रदेश कमलांच्या परागधुळीने आच्छादित झाले होते त्यामुळे ते वाटसरूंच्या मनात सोन्याच्या धुळीनी व्याप्त झाले आहेत अशी शंका उत्पन्न करीत असत. अशा सरोवराच्या तीरभूमीना भरतराजाने पाहिले ।। १०७ ॥ सैन्याच्या धुराळयाने आकाश जेव्हां व्याप्त झाले तेव्हा दिवसा देखील अंधकाराने ते व्याप्त झाले. त्यामुळे चक्रवाक पक्ष्याची मादी रडू लागली. कारण आता आपल्या पतीचा वियोग होईल असे तिला वाटले. ते तिचे रडणे पाहून भरतराजाच्या मनात करुणा उत्पन्न झाली ॥१०८॥ यानंतर काही पुढे गमन करून गाई जेथे चरतात अशी कुरणे लागली. तेथे गायींचे समूह भरतराजाने पाहिले. गळणान्या दुधांनी तेथील जमीन भरून गेली होती. त्यामुळे तो गाईंचा समूह दुधाचे जणु मेघ आहेत असे राजाला वाटले ।। १०९ ।। आपल्या शिंगांच्या अग्रानी स्थलकमलाना उपडून त्यातील कमलतन्तूंना जणु जे यशाप्रमाणे भासत आहेत त्यांना इकडे तिकडे फेकणा-या पसरणान्या उन्मत्त बैलाना भरतराजाने पाहिले ॥ ११० ॥ भरतराजाने गायींच्या वासरांचा समूह पाहिला. शुभ्र अशा दुधाने ज्यांचे चांगले पोषण झाले असल्यामुळे तो अतिशय शुभ्र वर्णाचा दिसत होता. व तो समूह उडया मारीत असल्यामुळे जणु चपलपणाच्या पराकोटीला प्राप्त झाला होता ॥ १११ ।। यानंतर भरतभूपाने ज्यांची कणसे पिकली आहेत व त्यामुळे जे नम्र झाले आहे असे कलम नांवाच्या साळींचे शेत पाहिले जणु ते उद्धतपणा हा उत्तम फल देणारा नसतो असे लोकाना सांगत आहे की काय असे वाटत होते ॥ ११२ ॥ शेतात उत्पन्न झालेल्या कमलांचा वास घेण्यासाठी जणु नम्र झाले आहेत अशा कलम जातीच्या साळीच्या रोपाना पाहून भरतराजाला फार आनंद वाटला ॥ ११३ ॥ लोंब्यानी लकडून गेल्यामुळे शेतातील जमिनीला जिने आपणास जन्म दिला आहे तिला जणु आदराने नमस्कार करीत आहेत अशा भाताच्या शेताना भरतराजाने पाहिले॥११४॥ Page #95 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२६-११५ आपीतपयसः प्राज्यक्षीरा लोकोपकारिणीः । पयस्विनीरिवापश्यत्प्रसृताः शालिसम्पदः ॥ ११५ अवतंसितनालाब्जाः कञ्जरेणुश्रितस्तनीः । इक्षुदण्डभृतोऽपश्यच्छालीञ्छोत्कुर्वतीः स्त्रियः ॥ ११६ हारिगीतस्वनाकृष्टर्वेष्टिता हंसमण्डलैः । शालिगोप्यो दृशोरस्य मुदं तेनुर्वषटिकाः ॥ ११७ कृताध्वगोपरोधानि गीतानि दधतीः सतीः । न्यस्तावतंसाः कणिशैः शालिगोपीर्ददर्श सः ॥ ११८ सुगन्धिमुखनिःश्वासाभ्रमरैराकुलीकृताः । मनोऽस्य जन्हुः शालीनां पालिकाः कुलबालिकाः।।११९ उपाध्वं प्रकृतक्षेत्रान्क्षेत्रिणः परिषावतः । बलोपरोधरायस्तानक्षतासौ सकौतुकम् ॥ १२० उपशल्यभुवोऽब्राक्षीनिगमानभितो विभुः । केदारलावैराकीर्णा भ्राम्यद्भिः स कृषीवलैः ॥ १२१ सोऽपश्यनिगमोपान्ते पथः संस्त्यानकर्दमान् । प्रव्यक्तगोरवुरक्षोदस्थपुटानतिसङ्कटान् ॥ १२२ ज्यानी पुष्कळ पाणी प्राशन केले आहे व ज्या पुष्कळ दूध देतात व त्यामुळे ज्या लोकावर जणु उपकार करीत आहेत अशा गाईच्या समूहाप्रमाणे पुष्कळ पाणी पिऊन ज्या पुष्ट झाल्या आहेत व उत्तम दुधासारखा पांढरा चीक ज्यातून निघत आहे व जगाला पुष्ट करून त्यावर ज्या उपकार करीत आहेत अशा साळीच्या संपत्तीना भरताने पाहिले ।। ११५ ।। ज्यानी देठासहित कमल कानावर ठेवून आपले कान भूषविले आहेत, ज्यांच्या स्तनावर कमलपराग पसरला आहे, ज्यानी आपल्या हातात काठी म्हणून ऊस घेतले आहेत व ज्या साळीधान्याचे पक्ष्यापासून रक्षण करण्यासाठी छोत्कार शब्द करीत आहेत अशा शेतकन्याच्या स्त्रियांना भरतराजाने पाहिले ।। ११६ ॥ कर्णमधुर गाण्याच्या स्वराने आकृष्ट झालेल्या हंसपक्ष्यानी घेरलेल्या साळीचे रक्षण करणाऱ्या तरुण स्त्रियानी भरतराजाच्या नेत्राना आनंदित केले॥ ११७ ॥ __ ज्यानी मधुरस्वराने वाटसरांच्या गमनाला प्रतिबन्ध केला आहे अशी मधुर गाणी म्हणणाऱ्या व साळीचे लोंबे ज्यानी आपल्या कानावर भूषण म्हणून ठेवले आहेत अशा सती शेतकऱ्यांच्या स्त्रियांना भरतराजाने पाहिले ॥ ११८ ।। सुगंधयुक्त मुखाच्या श्वासामुळे भुंग्यानी ज्याना वारंवार घाबरे केले आहे, व ज्या साळीचे रक्षण करीत आहेत अशा कुलीन मुलीना भरतराजाने पाहिले ॥ ११९ ॥ मार्गाला लागूनच ज्यानी शेते पेरलेली आहेत असे शेतकरी लोक सैन्यातील लोक आपल्या शेतातून जाऊ नयेत म्हणून चोहोकडे धावत आहेत पण जबरदस्तीने सैन्य शेतातून जाऊ लागले म्हणून जे खिन्न झाले अशा त्याना भरतराजाने कौतुकाने पाहिले ।। १२० ॥ मोठ्या नगराच्या सीमेजवळ शेतकऱ्याच्या पुष्कळ वाड्या होत्या. त्या वाडीमध्ये इकडून तिकडून फिरणारे व धान्याची कापणी करणारे अशा शेतकऱ्यानी भरतराजाला पाहिले ॥१२१॥ वाडीजवळचे मार्ग ज्यातील चिखल वाळून गेला आहे असे होते व त्यात गायींच्या पावलांचे ठसे उमटले होते व ते मार्ग उंच सखल असल्यामुळे अगदी अवघड होते, अरूंद होते. अशा मार्गाना भरतेश्वराने पाहिले ।। १२२ ।। Page #96 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-१३०) महापुराण निगमान्परितोऽपश्यद्ग्राममुख्यान्महाबलान् । वयस्तिरोजनैः सेव्यान्महारामतरूनपि ॥ १२३ ग्रामान्कुक्कुटसंपात्यान्सोत्यगादृतिभिर्वृतान । कोशातकोलतापुष्पस्थगिताभिरितोऽमुतः ॥ १२४ कुटीपरिसरेण्वस्य धृतिरासीत्प्रपश्यतः । फलपुष्पानता वल्लीः प्रसवाढचाः सतीरपि ॥ १२५ योषितो निष्कमालाभिर्वलयश्च विभूषिताः । पश्यतोऽस्य मनो जहुमीणाः संश्रितावृतीः॥१२६ हैयङ्गवीनकलशर्वनामपि निहित्रकैः । ग्रामेषु फलभेदैश्च तमद्राक्षुर्महत्तराः ॥ १२७ ततो विदूरमुल्लङघ्य सोऽध्वानं पृतनावृतः । गङ्गामुपासदद्वीरः प्रयाणैः कतिधैरपि ॥ १२८ हिमवद्विधृतां पूज्यां सतीमासिन्धुगामिनीम् । शुचिप्रवाहामाकल्पवृत्ति कीतिमिवात्मनः ॥ १२९ शफरीप्रेक्षणामुद्यत्तरङ्गभ्रूविनर्तनाम् । वनराजीबृहच्छारीपरिषानां वधूमिव ॥ १३० या वाड्यांच्या सभोवती गावातील महाबलवान् आणि मुख्य अशा लोकाना राजाने पाहिले व पक्षी, पशु आणि माणसे ज्यांचा उपभोग घेत आहेत अशी बगीच्यातील मोठ्या वृक्षानाही पाहिले ॥ १२३ ॥ काही गावे कोंबडा उडून पलिकडे जाईल इतकी लहान होती व त्याच्या सभोवती पुष्पानी युक्त अशा पडवळांच्या वेलीनी आच्छादित अशी कुंपणे होती. अशा गावाना ओलांडून भरतचक्रीने पुढे प्रयाण केले ।। १२४ ।। . प्रत्येक झोपडीच्या सभोवती फलानी व फुलानी लकडलेल्या वेली होत्या व झोपडीत पुत्रवतीसती स्त्रिया राहत होत्या या सर्वांना पाहून भरतराजाला आनंद वाटला ॥ १२५ ।। ज्यांच्या गळ्यात सोन्याच्या माळा आहेत व हातात कांकणे आहेत व कुंपणाजवळ ज्या उभ्या राहिल्या आहेत अशा स्त्रियानी पाहणान्या राजाचे मन हरण केले ॥ १२६ ।। प्रत्येक गावात जे मुख्य पाटील वगैरे अधिकारी होते त्यानी लोण्याच्या अनेक घागरी व दह्याची भांडी व नाना प्रकारची फळे यांचे नजराणे भरतराजाला अर्पण केले व त्याचे दर्शन त्यानी घेतले ।। १२७ ॥ यानंतर आपल्या सैन्यासह त्या वीर भरतराजाने काही दिवस प्रयाण करून लांब असलेल्या त्या मार्गाला उल्लंघिले व तो गंगानदीच्या जवळ येऊन पोहोचला ॥ १२८ ॥ भरतचक्रवर्तीला गंगानदी ही स्वतःच्या कीर्तिप्रमाणे वाटली. भरतेश्वराची कीर्ति हिमवान् पर्वताने धारण केली होती व ती लवण समुद्रापर्यंत पोहोचली होती. ती त्याची कीर्ति सतीप्रमाणे पूज्य होती व निर्मल आणि कल्पान्त कालापर्यन्त टिकणारी होती. ही गंगानदी ही हिमवान् पर्वताने धारण केलेली व सतीप्रमाणे पूज्य व लवणसमुद्रापर्यन्त गेलेली आहे. हिचा प्रवाह शुचि-निर्मल आहे व कल्पान्तकालापर्यन्त टिकणारा आहे ।। १२९ ॥ जिचे नेत्र माशाप्रमाणे आहेत व उसळलेल्या तरङ्गाप्रमाणे जी आपल्या भुवया नाचविते, वनपंक्तिप्रमाणे हिरवी साडी जी नेसली आहे अशा स्त्रीप्रमाणे ही गंगानदी आहे. कारण हीही मत्स्यरूपी डोळ्यानी युक्त आहे. उसळणारे जे तरंग हेच भुवयांचे नर्तन ते या नदीने Page #97 -------------------------------------------------------------------------- ________________ ८६) महापुराण (२६-१३१ विस्तीर्णैर्जनसम्भोग्यैः कूजवंसालिमेखलैः । तरङ्गवसनैःकान्तःपुलिनर्जघनरिव ॥ १३१ लोलोमिहस्तनिघृतपक्षिमालाकलस्वनः । किमप्यालपितुं यत्नं तन्वती वा तटद्रुमैः ।। १३२ क्षतीर्वनेभदन्तानां रोधोजघनवतिनीः । रुन्धतीमधिभीत्येव लसदुर्मिदुकलकः ॥ १३३ रोमराजीमिवानीलां वनराजी विवृण्वतीम् । तिष्ठमानामिवावर्तव्यक्तनाभिमुदन्वते ॥ १३४ विलोलवीचिसट्टादुत्थितां पतगावलिम् । पताकामिव बिभ्राणां लब्धां सर्वापगाजयात् ॥ १३५ समांसमीनां पर्याप्तपयसं धीरनिःस्वनम् । जगतां पावनी मान्यां हसन्तीं गोमचचिकाम् ॥ १३६ गुरुप्रवाहप्रसृतां तीर्थकामैरुपासिताम् । गम्भीरशब्दसम्भूति जैनी श्रुतिमिवामलाम् ॥ १३७ धारण केले आहे व हिच्या दोन्ही किनाऱ्यावर जी वनपंक्ति आहे तीच हिचे नेसण्याचे व पांघरण्याचे वस्त्र असल्यामुळे ही गंगानदी स्त्रीप्रमाणे भासत आहे ।। १३० ।। . ही गंगानदी विस्तीर्ण वाळवंटरूपी जघन-ढुंगणाला धारण करिते व ते सर्वजनभोग्य झालेले आहे. ते तिचे ढुंगण शब्द करणाऱ्या हंसरूपी कमरपट्टयानी शोभत आहे. चंचल जे तरंग हेच हिचे-गंगानदीचे हात आहेत व या हातानी हुसकून लावलेले म्हणजे वर उडविलेलें जे पक्षी त्यांच्या मधुर शब्दानी जणु ही आपल्या तटावर असलेल्या झाडाबरोबर बोलण्याचा काही प्रयत्न करीत आहे अशी भासत आहे ।। १३१-१३२ ॥ रानटी हत्तीनी आपल्या दातानी जे हिच्या तटरूपी ढुंगणावर नखक्षते केली आहेत ती आपला पति जो समुद्र त्याला दिसू नयेत म्हणून जणु त्याच्या भीतीने ही गंगानदीरूपी स्त्री शोभणाऱ्या लाटारूपी रेशमी वस्त्रानी जणु झाकित आहे अशी भरतराजाला दिसली ।। १३३ ॥ गंगानदीच्या तटावर जी वनपंक्ति होती ती जणु तिच्या पोटावर नीलवर्णाची रोमराजी आहे व ती जणु आपल्या समुद्ररूपी पतीला दाखवित आहे व जे पाण्याचे भोवरे तिच्या ठिकाणी उत्पन्न होत आहेत हेच जणु या गंगानदीरूपी स्त्रीची बेंबी आहे व ती आपल्या समुद्ररूपी पतीला व्यक्त करून दाखवित आहे अशी शोभते ॥ १३४ ।। चंचल लाटांच्या धक्क्यामुळे वर उडालेली जी पक्ष्यांची पंक्ति हीच जणु पताका जी या गंगानदीने सर्व नद्यांना जिंकून मिळविली आहे व तिला हिने धारण केले आहे असे भरतराजाला वाटले ॥ १३५ ॥ प्रत्येक वर्षी जिच्यात खूप पाणी येते व जी गंभीरध्वनि करते. जी जगाला पावन करते व जगताला आदरणीय आहे अशी ही गंगानदी जणु उत्तम गायीला हसत आहे. कारण ती ही प्रत्येक वर्षी प्रसवते, पुष्कळ दूध देते, धीरगंभीर असा हंभा हंभा शब्द करते व ती जगताला पावन करते मान्य आहे ।। १३६ ।। ही गंगानदी मोठ्या प्रवाहाने फोफावली आहे. जे हिला तीर्थ समजतात ते हिची सेवा-उपासना करतात. गंभीर शब्दाची उत्पत्ति हिच्यापासून होते अर्थात् ही गंभीर गर्जना करते अशी असल्यामुळे जिनेश्वराच्या मुखातून निघालेल्या श्रुतिप्रमाणे दिसते. कारण Page #98 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-१४२) महापुराण राजहंसः कृतोपास्यामलडध्यां विवृतायतिम । जयलक्ष्मीमिव स्फीतामात्मीयामब्धिगायनीम् ॥ विलसत्पनसम्भूतां जनतानन्ददायिनीम् । जगद्धोग्यामिवात्मीयां श्रियमायतिशालिनीम् ॥ १३९ विजयार्द्धतटाक्रान्तिकृतश्लाघ्यां सुरंहसम् । अभग्नप्रसरां दिव्यां निजामिव पताकिनीम् ॥ १४० व्यालोलोमिकरास्पष्टः स्वतीरवनपाद पैः । दद्धिरडकुरोद्धेदमाश्रितां कामुकरिव ॥ १४१ रोधोलतालयासीनान्स्वेच्छया सुरदम्पतीन् हसन्तीमिव सुस्वानः सीकरोत्थैविसारिभिः ॥ १४२ जिनश्रुति ही गुरुपरंपरेने चालत आलेली आहे, संसारसमुद्रातून तरून जाण्याची इच्छा करणारे भक्त हिची उपासना करतात व अतिशय निर्मल निर्दोष पूर्वापर दोषरहित आहे आणि गंभीर व खोल शब्दार्थाची उत्पत्ति हिच्यापासून झाली आहे ॥ १३७ ।। ही गंगानदी नेहमी राजहंसपक्ष्यानी सेविली जाते, व अलंध्य आहे व फार दीर्घविस्ताराची आहे व समुद्राला जाऊन मिळाली असल्यामुळे भरतेश्वराच्या जयलक्ष्मीप्रमाणे आहे. कारण तीही राजहंसानी-श्रेष्ठ राजानी उपासिली जाते, तिचे कोणी उल्लंघन करू शकत नाहीत, तिचा शेवट हितकर आहे, ती विस्तृत व लवणसमुद्रापर्यन्त पोहोचलेली आहे ।।१३८॥ ही गंगानदी पद्मसरोवरातून उगम पावली आहे. जनतेला आनंद देणारी आहे व जगभोग्य आहे म्हणून भरतराजाच्या जयलक्ष्मीप्रमाणे आहे. कारण ती जयलक्ष्मी श्रेष्ठराजसमूहाकडून उपासिली जात आहे. शोभणान्या पद्मनिधीपासून तिची उत्पत्ति झाली आहे व या जयलक्ष्मीचा भावीकाल फार उत्कर्षाचा आहे. याचप्रमाणे ही गंगानदी जयलक्ष्मीप्रमाणे विस्तृत आहे. ही गंगानदी भरताच्या राजलक्ष्मीप्रमाणे आहे. भरतलक्ष्मी पद्मसंभूता पद्मनिधीपासून उत्पन्न झाली व ही नदी पद्मसरोवरापासून निघाली आहे. राज्यलक्ष्मी जयभोग्य व भावी उत्कर्षाने शोभत होती व ही नदोही जगभोग्य व लांबीने दीर्घपणाने शोभत आहे ॥ १३९ ॥ अथवा ही गंगानदी भरतराजाच्या सेनेप्रमाणे आहे. कारण भरतनृपतीच्या सेनेने विजयार्द्धपर्वताच्या तटाला आक्रमन प्रशंसा मिळविली आहे. तशी या नदीने देखिल विजयार्द्ध पर्वताच्या तटाला आक्रमून प्रशंसा मिळविली आहे. दोघीही वेगवान् होत्या व त्यांचा प्रसार कोणाकडून अडविला जात नसे. सेना व गंगानदी दोघीही दिव्य आहेत ।। १४० ।। अतिशय चंचल अशा तरंगरूप हातानी जेव्हा गंगानदीने आपल्या किना-यावर असलेल्या वनवृक्षाना स्पर्श केला तेव्हा त्या वृक्षातून अंकुर उत्पन्न झाले. तेव्हा जणु कामुक अशा वृक्षानी तिचा आश्रय घेतला आहे अशी ती भरतराजाला वाटली ।। १४१ ।। तटावर असलेल्या लतागृहात स्वच्छंदाने बसलेल्या देवदेवाङ्गनाना जलकणापासून उत्पन्न झालेले व चोहोंकडे पसरणारे अशा मधुर शब्दानी जणु ती हसत आहे त्याची थट्टा करीत आहे असे वाटत होते ।। १४२ ॥ Page #99 -------------------------------------------------------------------------- ________________ ८८) महापुराण (२६-१४३ किन्नराणां कलक्वाणः सगानरुपवीणितः । सेव्यपर्यन्तभूभागलतामण्डपमण्डनाम् ॥ १४३ हारिभिः किन्नरोद्गीतैराहूता हरिणाङ्गनाः । दधती तीरकच्छेषु प्रसारितगलद्गलाः ॥ १४४ हौःससारसारावैः पुलिनैदिव्ययोषिताम् । नितम्बानि सकाञ्चीनि हसन्तीमिव विस्तृतः ॥१४५ चतुर्दशभिरन्वीतां सहस्ररब्धियोषिताम् । सध्रीचीनामिवोद्वीचिबाहूनां परिरम्भणे ॥ १४६ इत्याविष्कृतसंशोभा जान्हवीमैक्षत प्रभुः । हिमवगिरिणाम्भोधेःप्रहितामिव कण्ठिकाम् ॥ १४७ मालिनीवृत्त शरदुपहितकान्ति प्रान्तकान्तारराजीविरचितपरिधानां सैकतारोहरम्याम् । युवतिमिव गभीरावर्तनाभि प्रपश्यन् प्रमदमतुलमूहे क्षमापतिः स्वःस्रवन्तीम् ॥ १४८ सरसिजमकरन्दोद्गन्धिराधूतरोधोद्गमकिसलयमन्दान्दोलनादूढमान्द्यः । असकृदमरसिन्धोराधुनानस्तरङ्गान् अहृतनृपवधूनामध्वखेदं समीरः ॥ १४९ ............. किन्नरदेवांचे मधुरशब्द व गाण्याला अनुसरून वीणावादन यांनी युक्त जो किनान्याचा भूभाग त्यावरील लतामण्डपानी गंगानदी फार सुंदर वाटत होती ॥ १४३ ।। किन्नरांच्या मनोहर अशा गाण्यानी बोलावल्या गेलेल्या हरिणी तटाच्या प्रदेशावर आपला गळा पसरून व ढिला करून बसल्या होत्या. अशा हरिणीना धारण करणारी ती मंगानदी शोभत होती ।। १४४ ।। ज्यावर सारसपक्षी मनोहर शब्द करीत आहेत अशा आपल्या विस्तृत वाळवंटानी ही गंगानदी कमरपट्टयानी युक्त अशा दिव्यांगनाच्या ढुंगणाना जणु हसत आहे असे प्रेक्षकाना वाटत असे ।। १४५ ।। ज्यानी आलिंगन करण्यासाठी आपले उसळलेल्या तरंगरूपी बाहूना वर केले आहे अशा मैत्रिणीसारख्या ज्या चौदा हजार सहाय्यक नद्या त्यांनी ती गंगानदी शोभत होती ।।१४६।। याप्रमाणे जिने आपली शोभा प्रकट केली आहे अशा त्या गंगानदीला भरतेश्वराने पाहिले. हिमवान् पर्वताने जणु लवणसमुद्राला ही गंगानदीरूपी कंठी पाठविली आहे अशा तिला भरतराजाने पाहिले ।। १४७ ।। जिच्या ठिकाणी शरदऋतूने उज्ज्वल कान्ति उत्पन्न केली आहे, जिच्या दोन्ही तटावर असलेली जी वनपंक्ति तीच जिचे नेसण्याचे वस्त्र आहे, वाळवंटरूपी नितम्बाने जी सुंदर दिसते, जिच्यातील गंभीर जे भोवरे हीच जिची खोल बेंबी आहे, अशा स्वर्गनदीला- गंगानदीला स्त्रीप्रमाणे पाहणाऱ्या पृथ्वीपति भरताला अतुल- अतिशय आनंद वाटला ।। १४८ ॥ कमलातील मकरन्दाने सुगंधित झालेला व किनाऱ्यावरील वनाची कोवळी पाने मंदपणाने हालवित असल्यामुळे ज्याने मंदपणा धारण केला आहे घ वारंवार गंगानदीच्या तरङ्गांना जो हालवीत आहे, अशा त्या वान्याने राजस्त्रियांच्या मार्गश्रमाला दूर केले ॥१४९।। Page #100 -------------------------------------------------------------------------- ________________ २६-१५०) महापुराण ___(८९ तामाकान्तहरिन्मखां कृतरजोधूति जगत्पावनीम् । आसेव्यां द्विजकुञ्जरैरविरतं सन्तापविच्छेदिनीम् ॥ जैनी कोतिमिवाततामपमलां शधज्जनानन्दिनीम् । निध्यायन्विबुधापगां निषिपतिः प्रीति परामासक्त् ॥ १५० इत्याचे भगज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसग्रहे भरतराज ___दिग्विजयोद्योगवर्णनं नाम षड्विंशतितम पर्व ॥ २६ ॥ जी सर्व दिशात पसरली आहे, जिने धूळ नाहीशी केली आहे, जी जगाला पवित्र करते, पक्षी व हत्ती जिचे सतत सेवन करतात, जी सन्तापाचा नाश करते, जी जिनेश्वराची मलरहित अशी जणु कीर्ति आहे, जी सन्ताप नाहीसा करीत आहे व नेहमी जनांना आनंदित करीत आहे, अशा देवगंगेला आदराने पाहून निधिपति भरताला अतिशय आनंद वाटला ॥१५०॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीतत्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहात भरताच्या दिग्विजयाच्या उद्योगाचे वर्णन करणारे हे सव्वीसावे पर्व समाप्त झाले. म.१२ Page #101 -------------------------------------------------------------------------- ________________ सप्तविंश पर्व अथ व्यापारयामास दृशं तत्र विशाम्पतिः । प्रसन्नःसलिलः पाद्यं वितरन्न्यामिवात्मनः ॥ १ व्यापारितदृशं तत्र प्रभुमालोक्य सारथिः । प्राप्तावसरमित्यूचे वचश्चेतोऽनुरञ्जनम् ॥ २ इयमाह्लादिताशेषभुवना देवनिम्नगा। रजो विधुन्वती भाति भारतीव स्वयम्भुवः ॥ ३ पुनातीयं हिमाद्रि च सागरं च महानदी । प्रसूतौ च प्रवेशे च गम्भीरा निर्मलाशया ॥४ इमां वनगजाः प्राप्य निर्वान्त्येते मदश्च्युतः । मुनीन्द्रा इव साद्विद्यां गम्भीरां तापविच्छिक्ष्म् ॥ ५ इतःपिवन्ति वन्येभाःपयोऽस्याः कृतनिःस्वनाः । इतोऽमी पूरयन्त्येनां मुक्तासाराः शरद्घनाः ॥ ६ अस्याः प्रवाहमम्भोधिर्धत्ते गाम्भीर्ययोगतः। असोढं विजयान तुडगेनाप्यचलात्मना ॥ ७ अस्याः पयःप्रवाहेण नूनमन्धिवितृड्भवेत् । क्षारेण पयसा स्वेन दह्यमानान्तराशयः॥८ ---------------- जणु आपणास पाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी देत आहे की काय अशा गंगेकडे भरतेश्वराने आपली दृष्टि वळविली. आपल्या प्रभूने भागीरथी नदीकडे दृष्टि वळविली हे पाहून त्याच्या मनाला हर्षयुक्त करणारे समयोचित भाषण पुढे वणिल्याप्रमाणे सारथ्याने केले ॥ १-२॥ हे प्रभो, सर्व जगताला आनंदित करणारी ही देवनदी भागीरथी रजाला-धुराळ्याला व मनातील पापाला नष्ट करणान्या भगवान् ऋषभदेवाच्या वाणीप्रमाणे शोभत आहे. गंभीर नि जलाशयानी-डोहांनी भरलेली ही महानदी गंगा आपले जन्मस्थान अशा हिमालयपर्वताला व आपले प्रवेशस्थान अशा लवणसमुद्राला पवित्र करीत आहे ॥ ३-४ ॥ जसे संसारतापाला नष्ट करणाऱ्या गंभीर उत्तम अध्यात्मविद्येची प्राप्ति करून घेऊन मुनीन्द्र शान्ति मिळवितात, सुखी होतात तसे ज्यांच्या गंडस्थलातून मद गळत आहे असे हे वनगज या नदीला प्राप्त करून अर्थात् हिच्यात प्रवेश करून सुखी होतात ॥ ५ ॥ या नदीच्या एका बाजूला येऊन मोठ्याने शब्द करणारे वनगज या महानदीचे पाणी पितात व एका बाजूला गर्जना करणारे व जलवृष्टि करणारे हे शरत्कालचे मेघ या गंगानदीला पाण्यांनी भरीत आहेत ॥ ६॥ हा विजयार्घ पर्वत तुंग-उंच आहे व अचल अतिशय निश्चल आहे तथापि तो तिचा प्रवाह धारण करण्यास असमर्थ झाला पण लवणसमुद्र अतिशय गंभीर व खोल आहे त्यामुळे त्याने हिचा प्रवाह धारण केला आहे ॥ ७ ॥ स्वतःच्या क्षार पाण्याने ज्याच्या पोटात दाह उत्पन्न झाला आहे असा हा लवणसमुद्र खरोखर हिच्या पाण्याच्या प्रवाहाने तहानेने रहित झाला असेल ॥ ८ ॥ Page #102 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-१५) पद्महदाद्धिमवतः प्रसन्नादिव मानसात् । प्रसूता पप्रथे पृथ्व्यां शुद्धजन्माहि पूज्यते ॥ ९ व्योमापगामिमां प्राहुवियतः पतितां क्षितौ । गङगादेवीगृहं विष्वगाप्लाव्य स्वजलप्लवैः ॥ १० बिर्भात हिमवानां शशाङ्ककरनिर्मलाम् । आसिन्धोः प्रसृतां कीर्तिमिव स्वां लोकपावनीम् ॥ ११ वनराजीद्वयेनेयं बिर्भात तटवर्तना । बाससोरिव युग्मेन विनीलेन धृतश्रिया ।। १२ स्वताश्रयिणीं धत्ते हंसमालां कलस्वनाम् । काञ्चीमिवेयमम्भोजरजः पिञ्जरविग्रहाम् ॥ १३ नदीसखीरियं स्वच्छमृणालशकलामलाः । सम्बिर्भात स्वसात्कृत्य सख्यं इलाध्यं हि तादृशाम् ॥ १४ राजहंसैरियं सेव्या लक्ष्मीरिव विभाति ते । तन्वती जगतः प्रीतिमलध्यमहिमा परैः ।। १५ महापुराण पद्मसरोवर हैं जणु हिमवान् पर्वताचे प्रसन्न मन आहे व त्यापासून ही नदी उत्पन्न शाली असल्यामुळे या पृथ्वीत तिची फार प्रसिद्धी झाली आहे. बरोबरच आहे की, ज्याचे जन्म शुद्ध वंशात झालेले असते तो सर्वत्र पूज्य होतो ।। ९ ।। ( ९१ ही गंगा आकाशातून पृथ्वीवर आली म्हणून हिला व्योमापगा - आकाशनदी असे म्हणतात व हिने आपल्या जलप्रवाहानी गंगादेवीचे गृह-प्रासाद सर्व बाजूनी भिजवून सोडलें आहे ।। १० ।। लवणसागरापर्यन्त पसरलेली, लोकाना पवित्र करणारी व चन्द्राच्या किरणाप्रमाणे निर्मल अशी ही गंगानदी जणु आपली कीर्ति आहे असे समजून तिला हा हिमवान् पर्वत धारण करित आहे ॥। ११ ॥ आपल्या दोन्ही बाजूच्या तटावर असलेल्या ज्या दोन वनपंक्ति त्याना जणु शोभिवंत व नील वर्णाची दोन वस्त्रे म्हणून ही नदी धारण करीत आहे ।। १२ ।। आपल्या तटाचा जिने आश्रय घेतला आहे, कमलांच्या परागानी पिवळसर जिचे शरीर झाले आहे व जी मधुर शब्द करीत आहे अशा हंसपंक्तीला ही गंगानदी जणु आपल्या कमरपट्ट्याप्रमाणे धारण करित आहे ॥ १३ ॥ ही गंगानदी कमलाच्या दांडयातील शुभ्र तन्तूप्रमाणे निर्मल अशा आपल्या नदीरूपी मैत्रिणीना आपल्यामध्ये विलीन करून त्याना धारण करीत आहे. हे योग्यच आहे कारण अशा मोठ्या व्यक्तीचे सख्य प्रशंसनीयच असते ।। १४ ।। हे प्रभो, आपली लक्ष्मी जशी राजहंसानी-श्रेष्ठ राजानी सेव्य-उपभोग्य होण्यास योग्य आहे व जगाला संतुष्ट करणारी, प्रीतियुक्त आहे व जिचा मोठेपणा दुसऱ्याकडून उल्लंघिला जात नाही अशी आहे. त्याप्रमाणे ही नदीही राजहंसपक्षानी सेवनीय आहे, जगाच्या संतोषाला कारण आहे व हिचा मोठेपणा कोणाला उल्लंघिता येणार नाही अशी आहे ।। १५ ।। Page #103 -------------------------------------------------------------------------- ________________ ९२) महापुराण (२७-१६ नववेदीमियं धत्ते समुत्तुङ्गां हिरण्मयीम् । आज्ञामिव तवालध्यां नभोमार्गविलअघिनीम् ॥ १६ इतः प्रसीद देवेमां शरल्लक्ष्मीं विलोकय । वनराजिषु संख्ढां सरित्सु सरसीषु च ॥ १७ इमे सप्तच्छदाः पौष्पं विकिरन्ति रजोऽभितः । पटवासभिवामोदसंवासितहरिन्मुखम् ॥ १८ कुसुमबाणस्य बाणैरिव विकासिभिः । हियते कामिनां चेतो रम्यं हारि न कस्य वा ॥ १९ विकसन्ति सरोजानि सरःसु सममुत्पलैः । विकासिलोचनानीय ववनानि शरच्छ्रियः ॥ २० पङ्कजेषु निलीयन्ते भ्रमरा गन्धलोलुपाः । कामिनीमुखपद्मेषु कामुका इव काहलाः ॥ २१ मनोजशरपुङ्खाभैः पक्षेमंकरा इमे । विचरन्त्यग्जिनीखण्डे मकरन्दरसोत्सुकाः ॥ २२ रूषिताः कञ्जकिञ्जल्कैराभान्त्येते मधुव्रताः । सुवर्णकपिशेरङ्गः कामाग्नेरिव मुर्मुराः ॥ २३ स्थलेषु स्थलपद्मिन्योविक सत्यश्चकासति । शरच्छ्रियो जिगीषन्त्यो दृष्यशाला इवोत्थिताः ॥ २४ जी अतिशय उंच आहे, जी सोन्याची बनलेली आहे, जिने आकाशमार्गाला उल्लंघिले आहे, पण जिला आपल्या आज्ञेप्रमाणे कोणी उल्लंघू शकत नाही अशा वनवेदिकेला या नदीने धारण केले आहे ।। १६ ।। हे राजेश्वरा, आपण प्रसन्न व्हा व येथील वनात नद्यांचे स्थानी व सरोवरात शरदऋतूने जी शोभा उत्पन्न केली आहे तिचे अवलोकन करा ।। १७ ।। हीं सात्विणीची झाडे आपल्या पुष्पांचा पराग सभोवती पसरतात त्यामुळे वस्त्राला सुगन्धित करणाऱ्या चूर्णाप्रमाणे सर्व दिशांची मुखे सुगन्धित झाली आहेत ॥। १८ ।। मदनाचे जणु बाण आहेत अशी बाणवृक्षांची जी विकसित फुले त्यानी कामी स्त्री-पुरुषांची मने हरण केली आहेत. बरोबरच आहे की, रम्य पदार्थ कोणाच्या मनाला आवडत नाही बरे ? ॥ १९ ॥ जणु शरत्कालाच्या लक्ष्मीची ही प्रफुल्ल डोळयानी शोभणारी तोंडे आहेत अशी सरोवरात उत्पन्न झालेली ही नीलकमलाबरोवर दिनविकासि कमले प्रफुल्ल झाली आहेत. हे प्रभो, आपण त्याना पाहा ॥ २० ॥ अस्पष्ट शब्द उच्चारणारे कामुक पुरुष जसे कामी स्त्रियांच्या मुखकमलावर आसक्त होतात तसे सुगन्धात लुब्ध झालेले भुंगे या कमलसमूहात आसक्त झाले आहेत ।। २१ ।। मदनाच्या बाणाच्या मागच्या भागाला लावलेल्या पंखाप्रमाणे ज्यांचे पंख आहेत असे भुंगे कमलिनींच्या समूहातील मकरन्दपानाविषयी उत्सुक होऊन त्यावर भ्रमण करीत आहेत ॥ २२ ॥ कमलातील केसरानी सर्व बाजूनी माखले गेलेले हे भुंगे सोन्याप्रमाणे पिवळे झालेल्या आपल्या अंगानी मदनाग्नीच्या ठिणग्याप्रमाणे भासत आहेत ॥ २३ ॥ जमिनीवर उत्पन्न झालेल्या व विकसलेल्या या स्थलकमलिनी जगाला जिंकण्याची अभिलाषा धरणाऱ्या शरद्लक्ष्मीचे उभारलेले जणु तंबू आहेत अशा शोभतात ।। २४ ।। Page #104 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-३२) महापुराण (९३ स्थलाब्जशङ्किनी हंसी सरस्यब्जरजस्तते। संहृत्य पक्षविक्षेपं विशन्तीयं निमज्जति ॥ २५ हंसोऽयं निजशावाय चञ्चवोद्धृत्य लसविसम् । पीथबुद्धचा ददात्यस्मै शशाङ्ककरकोमलम् ॥२६ कृतयत्नं प्लवन्तेऽमी राजहंसाः सरोजले । सरोजिनीरजःकीर्णे धूतपक्षाःशनैःशनैः ॥ २७ चक्रवाकी सरस्तीरे तरङ्ग स्थगिताममूम् । अपश्यन्करर्ण रौति चक्राह्वः साश्रुलोचनः ॥ २८ मभ्येति वरटाशकी धार्तराष्ट्रः कृतस्वनः । सरस्तरङ्गशुभ्राङ्की कोककान्तामनिच्छतीम् ॥ २९ अनुगंगातट भाति साप्तपर्णमिदं वनम् । सुमनोरेणुभियोम्नि वितानश्रियमादधत् ॥ ३० मन्दाकिनीतरङगोत्थपवनोऽध्वश्रमं हरन् । शनैःस्पृशति नोऽङगानि रोधोवनविधूननः ॥ ३१ आतिथ्यमिव नस्तन्वन् हृतगडगाम्बुशीकरैः । अभ्येति पवमानोऽयं वनवीथीविधूनयन् ॥ ३२ सरोवरात चोहोकडे कमलांचा पराग पसरला होता. त्यामुळे हंसिणीला हे जमिनीवरचे कमल आहे अशी शंका आली. म्हणून तिने आपले पसरलेले पंख आखडून घेतले व त्या कमलाकडे जात असता ती बुडत आहे. हे विभो, आपण ते दृश्य पहा ॥ २५ ।। हा हंस चन्द्राच्या किरणाप्रमाणे मृदु असे सुंदर कमलतन्तु चोचीने काढून हे पाजण्यास योग्य आहेत असे समजून आपल्या पिलाला देत आहे ।। २६ ॥ हे राजहंस कमलपरागानी व्याप्त झालेल्या या सरोवरांतील पाण्यांत हळूहळू आपले पंख हालवून यत्नपूर्वक पोहत आहेत ।। २७ ।। तरङ्गानी आच्छादिलेल्या आपल्या चक्रवाकीला सरोवराच्या तटावर न पाहिल्यामुळे ज्याचे नेत्र अश्रूनी डबडबलेले आहेत असा चक्रवाकपक्षी करुणा उत्पन्न होईल असे रडत आहे ॥ २८ ॥ हा काळ्या चोचीचा आणि काळ्या पायांचा संभोगेच्छु हंसपक्षी शब्द करीत, सरोवराच्या तरंगानी जिचे अंग शुभ्र दिसत आहे अशा चक्रवाकीला ही हंसी आहे असे समजून तिच्या मागून जात आहे पण ती त्याला इच्छित नाही ।। २९ ।। गंगेच्या किना-याला अनुसरून हे सातविणीच्या झाडांचे वन शोभत आहे. याने आपल्या फुलांच्या परागांनी आकाशात छताची शोभा उत्पन्न केली आहे ॥ ३० ॥ मंदाकिनीच्या तरंगापासून उत्पन्न झालेला हा वायु तिच्या तटावरील वनाला हालवित आहे व आमच्या मार्गाच्या श्रमाला नाहीसे करण्यासाठी आमच्या अंगाना मंदमंद झुळकीने स्पर्श करीत आहे ॥ ३१ ।। वनपंक्तीला हालविणारा हा वारा आणलेल्या गंगानदीच्या जलबिन्दूनी आमचा अतिथिसत्कार करण्यासाठी येत आहे ।। ३२ ।। Page #105 -------------------------------------------------------------------------- ________________ ९४) महापुराण (२७-३३ अगोष्पदमिदं देव देवैवरध्युषितं वनम् । लतालयविभात्यतैः कुसुमप्रस्तराञ्चितैः ॥ ३३ मन्दारवनवीथीनां सान्द्रच्छाया:समाश्रिताः । चन्द्रकान्तशिलास्वेते रंरम्यन्ते नभासदः ॥ ३४ नहो तटवनस्यास्य रामणीयकमद्भुतम् । अवधूतनिजानासा हि रंस्यन्तेऽत्र तत्सुराः॥ ३५ मनोभवनिवेशस्य लक्ष्मीरत्र वितन्यते । सुरदम्पतिभिः स्वरमारब्धरतिविभ्रमैः ।। ३६ इयं निधुवनासक्ताः सुरस्त्रीरतिकाहलाः । हमन्तीव तरङगोत्यैः शीकरैरमरापगा॥ ३७ इतः किन्नरसङगीतमितः सिद्धोपवीणितम् । इतो विद्याधरीनत्तमितस्तद्गतिविभ्रमः ॥ ३८ नृत्तमप्सरसां पश्यन् शण्वंस्तद्गीतनिःस्वनम् । वाजिवक्त्रोऽयमुद्ग्रीवः सममास्ते स्वकान्तया ।। ३९ निष्पर्यायं वनेऽमुष्मिनतुवर्गो विवर्धते । परस्परमिव द्रष्टुमुत्सुफायितमानसः ॥ ४० हे प्रभो, देव जेथे नेहमी येऊन निवास करतात व वनगायी वगैरे प्राण्यांचा जेथे प्रवेश होत नाही अशा उंच ठिकाणी हे वन आहे. जेथे फुलांच्या शय्या आहेत अशा लतागृहानी हे वन शोभत आहे ।। ३३ ।। ___मंदारवृक्षांच्या वनपंक्तीच्या दाट छायांच्याखाली चन्द्रकान्त शिलावर हे देव बसून वारंवार क्रीडा करून सुखोपभोग घेत आहेत ।। ३४ ।। हे प्रभो, या तटावरील वनाचे सौन्दर्य अतिशय आश्चर्य उत्पन्न करीत आहे अर्थात् अवर्णनीय आहे. कारण येथे आपले निवासस्थान सोडून देव येथे येऊन खूप क्रीडा करीत असतात ।। ३५ ।। ज्यानी आपल्या इच्छेला अनुसरून रतिक्रीडा प्रारंभिली आहे, अशा देवानी व देवाङ्गनानी येथे कामदेवाच्या घराची शोभा वाढविली आहे. तात्पर्य-देवदेवीच्या स्वच्छंद रतिक्रीडा पाहून असे वाटते की जणु हे कामदेवाचेच घर आहे ॥ ३६ ॥ ही गंगानदी आपल्या तरंगापासून उत्पन्न झालेल्या व वर उडणाऱ्या जलबिंदूनी संभोग करण्यात असमर्थ होऊन दीनपणाने अस्पष्ट शब्द करणान्या देवांगनाना जणु हसत आहे अशी दिसते ।। ३७ ।। ___ एकीकडे किन्नरदेवाचे गाणे, वादन व नृत्य चालू आहे व एका बाजूला सिद्धजातीच्या देवांचे वीणावादन चाल आहे. एकीकडे विद्याधर स्त्रियांचे नत्याचा कार्यक्रम चालला एका बाजूला विद्याधरस्त्रिया विलासपूर्वक विहार करीत आहेत ॥ ३८ ॥ ज्याचे मुख घोड्यासारखे आहे असा हा किन्नरदेव आपल्या पत्नीसह आपला कंठ उंच करून अप्सरांचे नृत्य व त्यांच्या गायनाचे शब्द ऐकत बसला आहे ॥ ३९ ॥ या वनात एकमेकाना पाहण्यासाठी ज्याचे मन उत्सुक झाले आहे असे वसन्तादिक सहाऋतु निष्पर्याय एकदम वाढू लागले. सहाही ऋतूंची शोभा वनाला प्राप्त झाली आहे ॥४०॥ Page #106 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-४९) महापुराण अशोकतरुरत्रायं तनुते पुष्पमञ्जरीम् । लाक्षारक्तैः खगस्त्रीणां चरणैरभिताडितः ॥ ४१ पुस्कोकिलानामालापमुखरीकृतदिङमुखः । चूतोऽयं मञ्जरीपत्ते मदनस्येव तारकाः ॥४२ चम्पका विकसन्त्यत्र कुसुमती वितन्वति । प्रदीपानिव पुष्पौघान् दधतोऽमी मनोभुवः ॥ ४३ सहकारेष्वमी मत्ता विरुवन्ति मधुव्रताः । विजिगीषोरनङ्गस्य काहला इव पूरिताः ॥ ४ कोकिलानकनिःस्वानरलिज्यारवजम्भितैः । अभिषेणयतीवात्र मनोभूर्भुवनत्रयम् ॥ ४५ निचुलःसहकारेण विकसन्नत्र माधवीम् । तनोति लक्ष्मीमणामहो प्रावृश्रिया समम् ॥ ४६ माधवीस्तबकेष्वत्र माधवोऽद्य विजृम्भते । वनलक्ष्मीप्रहासस्य लीलां तन्वत्सु विश्वतः ॥ ४७ वासन्त्यो विकसन्त्येता वसन्तर्तुस्मितश्रियम् । तन्वानाः कुसुमामोवैराकुलीकृतषट्पदाः ॥ ४८ मल्लिकाविततामोदैविलोलीकृतषट्पदः । पादपेषु पदं धत्ते शुचिः पुण्यशुचिस्मितः ॥ ४९ विद्याधरस्त्रियांच्या लाखेच्या रंगाने लाल झालेल्या पायानी ताडला गेलेला अशोक वृक्ष या वनांत पुष्पांच्या मोहराने लकडून जात आहे हे प्रभो, आपण पाहा ।। ४१ ।। पुरुषकोकिलांच्या कुहुकुहु शब्दानी दाही दिशा शब्दयुक्त करणारा हा आम्रवृक्ष मदनाच्या डोळ्यातील जणु तारका आहेत अशा मोहराना धारण करीत आहे ॥ ४२ ॥ वसन्त ऋतु वृद्धिंगत होत असता हे चम्पकवृक्ष जणु मदनाचे दिवे आहेत अशा पुष्पसमूहाना धारण करीत आहेत ॥ ४३ ।। हे मत्त झालेले भुंगे आम्रवृक्षावर गुंजारव करीत आहेत व त्यांचा तो गुंजारव त्रैलोक्याला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या मदनाच्या जणु वाजविल्या जाणाऱ्या तुताऱ्या आहेत ।। ४४ ॥ कोकिलांचे शब्द हेच जणु नगान्यांचे शब्द व भुंग्यांचे गुंजारव हेच जणु धनुष्याच्या दोरीचे टङ्कार हे खूप वृद्धिंगत झाल्यामुळे जणु मदन त्रैलोक्याचेवर हल्ला करण्यास उद्युक्त झाला आहे असे वाटते ॥ ४५ ॥ __आम्रवृक्षाबरोबर विकास पावणारा हा विचूल नामक वृक्ष वर्षाऋतूच्या लक्ष्मी-शोभेबरोबर माधवी लक्ष्मीला वसंतऋतूच्या शोभेला पूर्णपणे वाढवित आहे. अहो, हे आश्चर्यकारक दिसते ॥ ४६ ॥ ह्या वनात वनलक्ष्मीच्या मोठ्या हसण्याच्या शोभेला- लीलेला वाढविणाऱ्या माधवीलतांच्या पुष्पगुच्छामध्ये आज वसन्त ऋतु वाढत आहे ॥ ४७ ।। वसन्तऋतूच्या हास्यशोभेला वाढविणा-या अशा या माधवीलता प्रफुल्लित झाल्या आहेत व त्यानी आपल्या पुष्पांच्या सुगन्धानी भुंग्याना फार लुब्ध केले आहे ।। ४८ ॥ मोगयाच्या फुलांचे वास चोहीकडे पसरून त्यानी भुंग्याना अतिशय लुब्ध केले व याप्रमाणे ग्रीष्मऋतु ज्याने शुचि-निर्मल हास्य धारण केले आहे तो सर्व वृक्षावर आपले स्थान ठेवता झाला ॥ ४९ ॥ Page #107 -------------------------------------------------------------------------- ________________ ९६) महापुराण (२७-५० कदम्बामोवसुरभिः केतकोधूलिधूसरः । तपात्ययानिलो देव नित्यमत्र विज़म्भते ॥ ५० माद्यन्ति कोकिलाः शश्वत्सममत्र शिखण्डिभिः । कलहंसीकलस्वानः संमूच्छितविकूजिताः ॥ ५१ कूजन्ति कोकिला मत्ताःकेकायन्ते कलापिनः । उभयस्यास्य वर्गस्य हंसाः प्रत्यालपन्त्यमी ॥ ५२ इतोऽमी किन्नरीगीतमनुकूजन्ति षट्पदाः । सिद्धोपवीणितान्येष निन्हुतेऽन्यभूतस्वनः ॥५३ जितनूपुरझङ्कारमितो हंसविकूजितम् । इतश्च खेचरीनृत्यमनुनृत्यच्छिखावलम् ॥ ५४ इतश्च सैकतोत्सङ्गे सुप्तान्हंसानसशावकान् । प्रातःप्रबोधयत्युच्चैः खेचरीनपुरारवः ॥ ५५ इतश्च रचितानल्पपुष्पतल्पमनोहराः । चन्द्रकान्तशिलागर्भाः सुरैर्भोग्या लतालयाः ॥ ५६ इतीदं वनमत्यन्तरमणीयैः परिच्छवैः । स्वर्गाद्यानगतां प्रीति जनयेत्स्वःसवां सदा ॥ ५७ बहिस्तटवनादेतदृश्यते काननं महत् । नानाद्रुमलतागुल्मवीरुद्भिरतिदुर्गमम् ॥ ५८ __ कदम्बपुष्पांनी सुगंधित आणि केवड्यांच्या परागांनी धूसर असा ग्रीष्मऋतु निघून गेल्यानंतर हे प्रभो, येथे वायु नेहमी वाढत आहे ।। ५० ।। येथे एका वेळी मोराबरोबर कोकिल देखिल नेहमी उन्मत्त होतात. अर्थात् वर्षाऋतूत देखिल कोकिल येथे शब्द करतात व हंसिणीच्या मधुर शब्दाबरोबर आपल्या शब्दाचे ते मिश्रण करीत आहेत ॥ ५१ ॥ याठिकाणी मत्त झालेले कोकिल शब्द करतात तसेच मोरही आपली केकावाणी नेहमी बोलत आहेत, येथे दोन्ही वर्गाचे अर्थात् हंसपक्षी कोकिलांच्या व मोरांच्या मागून शब्द करीत आहेत ॥ ५२ ॥ या वनाच्या एका स्थानी भुंगे किन्नरीच्या गाण्याला अनुसरून आपला गुंजारव करीत बाहेत व हे कोकिलांचे शब्द ( कुहुकुहु शब्द ) सिद्धजातीच्या देवांच्या वीणांच्या संकाराला लुप्त करीत आहेत ।। ५३ ॥ इकडे पैंजणांच्या झंकाराला जिंकणारे असे हंसांचे शब्द होत आहेत व इकडे मोरपक्षी ज्यांच्या नृत्यांचे अनुकरण करीत असतात असे विद्याधरी स्त्रियांचे नृत्य चालले आहे ।। ५४ ।। इकडे वाळवंटात आपल्या बालकाबरोबर झोपलेल्या हंसाना अप्सरांच्या पैंजणांचा होणारा मोठा आवाज प्रातःकाळी जागे करून उठवीत आहे ।। ५५ ॥ वनाच्या या बाजूला पुष्कळ फुलानी ज्यावर शय्यांची रचना केली आहे अशा चन्द्रकान्तशिलानी युक्त असलेली व देव ज्यांचा उपभोग घेतात अशी लतागृहे आहेत ।। ५६ ॥ याप्रमाणे हे वन अत्यन्त सुंदर अशा अनेक भोगयोग्यसामग्रीनी स्वर्गीय देवांच्या मनात नेहमी स्वर्गातील उद्यानाविषयींची प्रीति येथे उत्पन्न करीत आहे असे मला वाटत बाहे ।। ५७ ॥ । हे राजन, या गंगानदीच्या तीराच्या वनापासून पलिकडचे वन मोठे आहे व त्यात अनेक झाडे, वेली, झुडपे व बारीक वेली असल्यामुळे ते प्रवेश करण्यास अशक्य दिसते ॥५८॥ Page #108 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-६७) महापुराण दृष्टीनामप्यगम्येऽस्मिन् वने मृगकदम्बकम् । नानाजातीयमुभ्रान्तं सैन्यक्षोभात्प्रधावति ॥ ५९ इदमस्माबलक्षोभादुत्रस्तमृगसङकुलम् । वनमाकुलितप्राणमिवाभात्यन्धकारितम् ॥ ६० गजयूथमितःकच्छादन्धकारमिवाभितः । विश्लिष्टं बलसङक्षोभादपसर्पत्यतिद्रुतम् ॥ ६१ शनैःप्रयाति सजिघ्रन्दिशः प्रोत्क्षिप्तपुष्करः । समहाहिरिवादीन्द्रो भद्रोऽयं गजयूथपः ॥ ६२ महाहिरयमायाम मिमान इव भूरुहाम् । श्वसन्नागच्छते कच्छादूर्वीकृतशरीरकः ॥ ६३ शयुपोता निकुञ्जस्मिन्युजीभूताःश्वसन्त्यमी । वनस्येवान्त्रसन्तानाश्चमूक्षोभाद्विनिःसृताः ॥ ६४ अयमेकचरःप्रोथसमुत्खातान्तिकस्थलः । रुणद्धि वर्त्म सैन्यस्य वराहस्तीवरोषणः ॥ ६५ सैनिकरयमारुतः पाषाणलकुटादिभिः । आकुलीकुरुते सैन्यं गण्डो गण्ड इव स्फुटम् ॥ ६६ प्राणा इव वनावस्माद्विनिष्कामन्ति सन्तताः । सिंहा बद्धदवज्वाला धुन्वानाः केशरच्छटाः ॥ ६७ ज्यात दृष्टींचाही प्रवेश होत नाही अशा या दाट वनामध्ये अनेक जातींच्या पशंचा समूह आहे व तो सैन्याच्या शब्दानी क्षुब्ध होऊन इकडे तिकडे पळत आहे ॥ ५९॥ ___आमच्या सैन्याने केलेल्या उपद्रवामुळे हा हरिणांचा समूह अगदी भयाने त्रासलेला आहे. त्यामुळे चोहीकडे अंधकाराने भरलेले हे वन ज्याचे प्राण व्याकुळ झाले आहेत असे दिसत आहे ॥६०॥ या इकडच्या पाणथळ प्रदेशातून आमच्या सैन्याच्या उपद्रवाने वेगळा वेगळा झालेला हा हत्तींचा अंधाराप्रमाणे असलेला कळप अतिशय वेगाने चोहीकडे पळू लागला आहे ॥ ६१ ॥ मोठ्या सर्पाने युक्त असलेला जणु हा मोठा मेरुपर्वत आहे असा भासणारा हत्तीच्या कळपाला नायक असलेला ज्याने आपल्या सोंडेचा अग्रभाग वारंवार उंच केलेला आहे, असा हा भद्रजातीचा हत्ती हळूहळू दिशांचा वास घेत घेत जात आहे ।। ६२ ॥ जणु वृक्षांची लांबी मोजतो आहे असा हा मोठा सर्प आपले शरीर उंच करून व फूत्कार करीत पाणथळ प्रदेशाहून इकडे येत आहे ॥ ६३ ॥ ___ या लतागृहात एके ठिकाणी गोळा झालेली ही अजगरांची पिले सैन्याच्या क्षोभाने बाहेर पडलेली जणु या वनाची आतडी आहेत अशी भासत आहेत व फूत्कार करीत आहेत ॥६४॥ जो खूप रागावला आहे आणि आपल्या नाकाने ज्याने जवळची जमीन खोदलेली आहे व एकटाच फिरणारा असा हा रानटी डुकर सैन्याचा मार्ग आडवून उभा राहिला आहे. हे प्रभो, आपण त्याला बघा ।। ६५ ॥ जणु पर्वताचा मोठा पाषाण भासणारा हा गेंडा पाषाण व लाकडे यानी सैनिकानी आडविला आहे तथापि सैन्याला स्पष्टपणे व्याकुळ करीत आहे ॥ ६६ ॥ अग्नीच्या ज्वालेप्रमाणे दिसणाऱ्या मानेवरच्या दाट केसराना हालविणारे असे सिंह या वनातून अशा रीतीने बाहेर निघत आहेत की जणु ते या वनाचे प्राण बाहेर पडत आहेत असे वाटत आहे ॥ ६७ ।। म. १३ Page #109 -------------------------------------------------------------------------- ________________ ९८) महापुराण (२७-६८ गुग्गुलूनां वनादेष महिषो घनकर्बुरः । निर्याति मृत्युदंष्ट्राभविषाणाग्रोऽतिभीषणः ॥ ६८ लस द्वालधयो लोलजिह्वा व्यालोहितेक्षणाः । व्याला बलस्य संक्षोभममी तन्वन्त्यनाकुलाः ॥ ६९ शरभ: खं समुत्पत्य पतनुत्तानितोऽपि सन् । नैष दुःखासिकां वेद चरणः पृष्ठतिभिः ॥ ७० चमूरोऽयं चमूरोधात् विद्रुतो द्रुतमुत्पतन् । क्षोभं तनोति सैन्यस्य दो रूपी च दुर्धरः ॥ ७१ शशःश्वसन्नयं देव सैनिकरननुद्रुतः। शरणायेव भीतात्मा मध्ये सैन्यं निलीयते ॥ ७२ सारङ्गोऽयं तनुच्छायाकल्माषितवनः शनैः । प्रयाति शृङ्गभारेण शाखिनेव प्रशुष्यता ॥ ७३ दक्षिणेर्मतया विष्वगभिधावप्रवीक्ष्यताम् । प्रजानुपालनं न्याय्यं तवाचष्टे मृगवजः ॥ ७४ । कलापी बहभारेण मन्दं मन्दं वज्ञत्यसौ । केशपाशश्रियं तन्वन् वनलक्षम्यास्तनूरुहैः ॥ ७५ नेत्रावलीमिवातन्वन वनभम्याः सचन्द्रकैः । कलापिनामयं संघो विभात्यस्मिन्वनस्थले ॥७॥ _ज्याच्या शिंगांचे अग्रभाग यमाच्या दाढेप्रमाणे भासत आहेत व जो अतिशय भयंकर दिसत आहे, असा हा मेघाप्रमाणे काळसर असलेला रेडा या गुग्गुळवृक्षांच्या वनातून बाहेर पडत आहे ॥ ६८॥ __ ज्यांची शेपटे चमकत आहेत, ज्यांच्या जिभा चंचल आहेत व ज्यांचे डोळे लालभडक आहेत, असे वाघ सिंह आदि दुष्ट प्राणी सैन्यात क्षोभ उत्पन्न करीत असून स्वतः बिलकुल घाबरत नाहीत असे दिसतात ।। ६९ ।। हा शरभ आकाशात उडी मारून खाली जमिनीवर पडताना उताणा झाला तरीही पाठीवर असलेल्या पायानी तो उभा राहिल्यामुळे पडण्याचे दुःख त्याला समजत नाही ।। ७० ॥ असह्य व मूर्तिमान् जणु गर्वच असो हा वाघ सैन्याने अडविल्यामुळे शीघ्र उड्या मारून सैन्यात मोठी गडबड करीत आहे ॥ ७१ ॥ हे प्रभो, उड्या मारीत पळणा-या या सशाच्या मागे कोणी सैनिक धावले नाहीत तथापि भित्र्या स्वभावाचा हा ससा श्वास घेत जणु सैनिकाना शरण जाऊन त्यांच्यातच कोठे तरी लपत आहे ।। ७२ ।। __ आपल्या शरीराच्या कान्तीने वनाला काळसर करणारा हा काळवीट सुकलेल्या झाडाप्रमाणे फांद्या फुटलेल्या शिंगाच्या ओझ्याने हळूहळू चालत आहे ।। ७३ ।। हे प्रभो, शरीराच्या उजव्या बाजूला व्रण झाल्यामुळे चोहीकडे पळणारा हा हरणांचा समूह प्रजेचे पालन करणे हेच तुझे योग्य कर्तव्य आहे असे आपणास सांगत आहे तिकडे आपण लक्ष्य द्यावे ॥ ७४॥ हा मोर आपल्या पिसान्याच्या ओझ्याने हळुहळु गमन करीत आहे व आपल्या पंखानी वनलक्ष्मीच्या केशपाशाच्या शोभेला वृद्धिंगत करीत आहे ॥ ७५ ।। आपल्या चन्द्रकयुक्त पिसान्यानी या वनभूमीला अनेक नेत्रांच्या पंक्तीनी जणु युक्त केले आहे. असा हा मोरांचा समुदाय या वनस्थलांत शोभत आहे ।। ७६ ॥ Page #110 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-८४) सक्रीडतां रथाङ्गानां स्वनमाकर्णयन्मुहुः । हरिणानामिदं यूथं नापसर्पति वर्त्मनः ॥ ७७ हरिणीप्रेक्षितेष्वेताः पश्यन्ति सकुतूहलम् । स्वां नेत्रशोभां कामिन्यो बर्हिबर्हेषु मूर्धजान् ॥ ७८ इत्यनाकुलमेवेदं सैन्यैरप्याकुलीकृतम् । वनमालक्ष्यते विष्वग सम्बाधमृगद्विजम् ॥ ७९ जरठोsप्यातपो नायमिहास्मान्देव बाधते । वने महातरुच्छायानैरन्तर्यानुबन्धिनि ॥ ८० इमे वनमा भान्तिसान्द्रच्छाया मनोरमाः । त्वद्भक्त्यै वनलक्ष्म्येव मण्डपा विनिवेशिताः ॥ ८१ सरस्यःस्वच्छसलिला वारितोष्णास्तटद्रुमाः । स्थापिता वनलक्ष्म्येव प्रपा भान्ति क्लमच्छिदः ॥ बहुबाणासनाकीर्णमिदं खड्गिभिराचितम् । सहास्तिकमपर्यन्तं वनं युष्मद्वलायते ॥ ८३ इत्थं वनस्य सामृद्धयं निरूपयति सारथौ । वनभूमिमतीयाय सम्राडविदितान्तराम् ॥ ८४ महापुराण हे प्रभो, क्रीडा करीत चाललेल्या अर्थात् सावकाश चाललेल्या या रथांच्या चाकांचा safe वारंवार ऐकूनही हा हरिणांचा कळप मार्ग सोडून बाजूला सरकत नाही ।। ७७ ।। (९९ या स्त्रिया हरिणींच्या डोळयामध्ये आपल्या डोळ्यांची शोभा कौतुकाने पाहत आहेत व मोराच्या पिसान्याचे ठिकाणी आपल्या केशांची शोभा कौतुकाने पाहत आहेत ॥७८॥ हे राजन् तुझ्या सैन्याने जरी हे वन आकुल केले आहे तथापि ते आकुलतारहित आहे अर्थात् सैन्याने कोणाला पीडा दिली नाही म्हणून हे वन चारी बाजूनी पशु व पक्षी यांना बाधा दिली नसल्यामुळे शान्त दिसत आहे ।। ७९ ।। हे प्रभो, हा वाढलेला असाही सूर्याचा ताप आम्हाला येथे बाधा देत नाही. कारण मोठमोठ्या वृक्षांच्या सावलींचा या प्रदेशात निरंतर संबंध आहे म्हणून येथे सूर्याचे कडक उन्ह आम्हाला बिलकुल बाधक होत नाही ॥ ८० ॥ हे प्रभो, दाट सावलीचे हे मनोहर वनवृक्ष जणु आपल्याविषयीच्या भक्तीने वनलक्ष्मीने मंडप उभे केल्याप्रमाणे दिसतात ॥ ८१ ॥ तटावरील वृक्षानी ज्यावर पडणा-या सूर्याचे उन्हाचे निवारण केले आहे अशी ही स्वच्छ पाण्याची सरोवरे वाटसरूचे श्रम नष्ट करण्यासाठी वनलक्ष्मीने स्थापन केलेल्या जणु पाणपोया आहेत असे वाटते ।। ८२ ।। हे प्रभो, हे वन आपल्या सेनेसारखे वाटत आहे, कारण आपली सेना बहुबाणासनाकीर्ण आहे अर्थात् पुष्कळ धनुष्यानी युक्त आहे तसे हे वनही बाण नावाचे वृक्ष व आसण्याची झाडे यानी युक्त आहे. आपली सेना खड्गी - तरवारधारी वीर पुरुषानी युक्त आहे व हे वन खड्गी - गेंडे यानी युक्त आहे. आपली सेना हत्तींनी युक्त आहे व हे वनही सहास्तिक अनेक वनगजानी युक्त आहे. आपल्या सेनेचा अन्त जसा लागत नाही तसे या वनाचाही अन्त लागत नाही म्हणून आपल्या सैन्याप्रमाणे हे वन आहे ।। ८३ ।। याप्रमाणे वनभूमीच्या समृद्धीचे वर्णन सारथी करीत असता, जिच्या लांबी-रुंदीचे ज्ञान नाही अशा त्या वनलक्ष्मीला त्या सम्राटाने उल्लंघिले ॥ ८४ ॥ Page #111 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२७-८५ तदाश्वीयखुरोद्घातादुत्थिता वनरेणवः । दिशां मुखेषु सँल्लग्नास्तेनुर्जवनिकाश्रियम् ॥ ८५ साविनां चारबाणानि स्यूतान्यपि सितांशुकः । काषायाणीव जातानि ततानि वनरेणुभिः ॥ ८६ वनरेणुभिरालग्नजडीभूतानि योषितः । स्तनांशुकानि कृच्छेण दधुरध्वश्रमालसाः ॥ ८७ कुम्भस्थलेषु संसक्ताः करिणामध्वरेणवः । सिन्दूरश्रियमातेनुर्धातुभूमिसमुत्थिताः ॥ ८८ ततो मध्यन्दिनेऽभ्यणे दिदीपे तीव्रमंशुमान् । विजिगीषरिवारूढप्रतापः शुद्धमण्डलः ॥ ८९ सरस्तीरतरच्छायामाश्रयन्ति स्म पक्षिणः । शरदातपसन्तापात्सडकुचत्पत्रसम्पदः ॥ ९० हंसाः कलमखण्डेषु पुजीभूतान्स्वशावकान् । पक्षराच्छादयामासुरसोढजरठातपान् ॥ ९१ वन्याःस्तम्बरमा भेजःसरसोरवगाहितुम् । मदनुतिषु तप्तासु मुक्ता मधुकरव्रजः ॥ ९२ त्यावेळी सेनेतील घोड्यांच्या खुरांच्या आघातानी वर उडालेला जो वनातील धुराळा त्याने सर्व दिशा व्यापल्यामुळे त्यानी पडद्याची शोभा धारण केली ॥ ८५ ॥ स्वारांची चिलखते ही वरून शुभ्र वस्त्रानी जरी अच्छादलेली होती तरीही त्या वनातील धुळीनी भरून गेल्यामुळे कषायवस्त्रांनी-तांबड्यो वस्त्रांनी आच्छादल्याप्रमाणे दिसू लागली ।। ८६ ॥ मार्गात झालेल्या श्रमाने थकलेल्या स्त्रियांनी वनातील धुराळा चिकटून जड झालेल्या आपल्या स्तनांशुकांना-चोळ्यांना मोठ्या कष्टाने धारण केले ॥ ८७ ॥ गेरु, हुरमुंज वगैरे धातूंच्या जमिनीपासून वर उडलेल्या रस्त्यावरील धुळी जेव्हां हत्तीच्या गण्डस्थलावर चिकटून बसल्या तेव्हा त्यानी तेथे शेंदूराची शोभा उत्पन्न केली. शेंदूर हत्तीच्या गण्डस्थलावर लावलेला आहे असे वाटू लागलें ॥ ८८॥ यानंतर दिवस उगवून जेव्हां दोन प्रहर झाले तेव्हां सूर्याचा प्रकाश तीव्र झाला व आकाशात मेघ नसल्यामुळे सूर्यबिंब निर्मल झाले व शत्रूना जिंकण्यास निघालेल्या व ज्याचा देश शत्रूच्या उपद्रवानी रहित आहे व ज्याचा प्रताप वाढला आहे अशा राजाप्रमाणे तो सूर्य दिसू लागला ॥ ८९॥ शरदऋतूच्या उन्हाच्या संतापाने ज्यानी आपले पंख मिटविले आहेत अशा पक्ष्यानी सरोवराच्या तटावर असलेल्या झाडाच्या सावलीचा आश्रय घेतला ।। ९० ।। ज्याना सूर्याचे तीव्र उन्ह सहन झाले नाही म्हणून साळीच्या शेतात जी एके ठिकाणी गोळा होऊन बसली आहेत अशा आपल्या पिलांना हंसपक्षांनी आपल्या पंखानी झाकून घेतले ।। ९१॥ मदाचे पाणी सूर्याच्या प्रखर किरणानी तापून गालावरून जेव्हा गळू लागले तेव्हा भुंग्यांच्या समुदायानी ज्याचा त्याग केला आहे असे रानटी हत्ती पाण्यात खूप डुंबण्याकरिता सरोवराकडे गेले ॥ ९२ ॥ Page #112 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-१००) महापुराण शाखाभङ्ग कृतच्छायां प्रयान्तो गजयूथपाः । शाखोद्धारमिवातन्वन्खरांशोःकरपीडिताः ॥ ९३ यूथं वनवराहाणामुपर्युपरि पुञ्जितम् । तदा प्रविश्य वेशन्तमधिशिश्ये सकर्दमम् ॥ ९४ । मृणालरङ्गमावेष्टय स्थिता हंसा विरेजिरे । प्रविष्टाः शरणायेव शशाङ्ककरपञ्जरम् ॥ ९५ चक्रवाकयुवा भेजे घनं शैवलमाततम् । सर्वाङ्गलग्नमुष्णालुविनीलमिव कञ्चकम् ॥ ९६ पुण्डरीकातपत्रेण कृतच्छायोऽब्जिनीवने । राजहंसस्तदा भेजे हंसीभिः सह मज्जनम् ॥ ९७ बिसभङ्गः कृताहारा मृणालैरवगुण्ठिताः । बिसिनीपत्रतल्पेषु शिश्यिरे हंसशावकाः ॥ ९८ इति शारदिके तीवं तन्वाने तापमातपे । पुलिनेष प्रतप्तेषु न हंसा धृतिमादधुः ॥ ९९ मध्यस्थोऽपि तदा तीवं तताप तरणिर्भुवम् । नूनं तीवप्रतापानां माध्यस्थ्यमपि तापकम् ॥ १०० ...--.----.............. सूर्याच्या किरणानी पीडित झालेल्या हत्तीच्या कळपांच्या नायकानी झाडांच्या फांद्या तोडून तोडून आपल्या अंगावर पसरून त्यानी सावली केली व ते जेव्हा चालू लागले तेव्हा ते राजाच्या करांनी पीडित झालेल्या जनतेप्रमाणे त्यानी शाखोद्धार केला आहे की काय असे दिसले. असह्यकर पीडित प्रजा हातात शाखा घेऊन राजाकडे जाऊन आपले दुःख निवेदन करते तेव्हा तो कमी करून त्याना सुखी करतो. तसे हत्तीनी झाडाच्या फांद्या तोडून त्या आपल्या अंगवर पसरून उन्हाचा संताप नाहीसा केला ॥ ९३ ।। त्यावेळी रानटी डुकरांच्या समूहाने लहान तळ्यातील चिखलात प्रवेश केला व तेथे पुंजरूपाने एकमेकावर पडून तो झोपला ॥ ९४ ।। त्यावेळी कमलतन्तूनी आपल्या अंगांना हंस पक्ष्यांनी वेष्टिले असता ते आपले रक्षण करण्याकरिता चंद्रकिरणांच्या पिंजऱ्यात जणु शिरले आहेत असे शोभत होते ।। ९५ ॥ उन्हाचा ताप ज्याला सहन होत नाही अशा ह्या तरुण चक्रवाक पक्ष्याने पुष्कळ व पसरलेल्या अशा दाट शेवाळाचा आश्रय घेतला. ते त्याच्या सर्वांगाना चिकटल्यामुळे हिरवा अंगरखा त्याने अंगात घातला आहे असे वाटते ।। ९६ ॥ कमलिनींच्या वनात पांढ-या कमलाच्या छत्राने त्याच्यावर सावली केली आहे, असा हा राजहंस त्यावेळी हंसीबरोबर पाण्यात स्नान करू लागला ।। ९७ ॥ कमलांच्या तंतूच्या तुकड्यांचा आहार ज्यानी घेतला आहे व कमलतन्तूनी ज्यांची शरीरे वेष्टिली आहेत अशी ही राजहंसाची पिली कमलांच्या पानावर झोपली आहेत ॥ ९८ ॥ याप्रमाणे शरद्ऋतूमध्ये सूर्याचे किरण अतिशय तीव्र ताप देत असता व त्यामुळे वाळवंटे ही तप्त झाली म्हणून हंसाना स्वस्थता वाटेनाशी झाली ते बेचैन झाले ॥ ९९ ॥ ___ त्यावेळी सूर्य मध्यस्थ होता, आकाशाच्या मध्यभागी होता. पक्षपातरहित होता तरीही पृथ्वीला त्याने फार सन्तप्त केले. बरोबरच आहे की, दुःसह प्रताप असलेल्या व्यक्तींची मध्यस्थता देखिल तापदायकच असते. या श्लोकात मध्यस्थ शब्दाचे मध्यभागी असलेला व जे वादी प्रतिवादी यांचे ऐक्य करण्याकरिता मध्ये असलेला विद्वान् असे दोन अर्थ आहेत. वादी Page #113 -------------------------------------------------------------------------- ________________ १०२) महापुराण (२७-१०१ स्वेदबिन्दुभिराबद्धजालकानि नृपस्त्रियः । वदनान्यूहरब्जिन्यः पनानीवाम्बुशीकरैः ॥ १०१ नृपवल्लभिकावक्त्रपङ्कजेष्वपुषच्छ्यिम् । धर्मबिन्दूद्गमो निर्यल्लावण्यरसपूरवत् ॥ १०२ गलद्धर्माम्बुबिन्दूनि मुखानि नृपयोषिताम् । अवश्यायततानीव राजीवानि विरेजिरे ॥ १०३ नृपाङ्गनामुखाब्जानि धर्मबिन्दुभिराबभुः । मुक्ताफलैर्द्रवीभूतैरिवालकविभूषणः ॥ १०४ रथवाहा रथानहुरायतैः फेनिलैर्मुखैः । तीवं तपति तिग्मांशौ समेऽपि प्रस्खलत्खुराः ॥ १०५ ह्रस्ववृत्तखुरास्तुङ्गास्तनुस्निग्धतनूरुहाः । पृथ्वासना महावाहाः प्रययुर्वातरंहसः ॥ १०६ महाजवजुषो वक्त्रादुद्वमन्तः खुरानिव । महोरस्काः स्फुरत्प्रोथा द्रुतं जग्मुर्महाहयाः ॥१०७ समुच्छ्रितपुरोभागाः शुद्धावर्ता मनोजवाः । अपर्याप्तेषु मार्गेषु द्रुतमीयुस्तुरङ्गमाः ॥ १०८ मेधासत्त्वजवोपेता विनीताश्चटुलक्रमाः । गलमाना इव स्प्रष्टुं महीमश्वा द्रुतं ययुः ॥ १०९ प्रतिवादीपेक्षा मध्यस्थी करणारा मनुष्य जर तेजस्वी असेल तर त्यापासून दोघानाही त्रास होतो. मध्ये आलेल्या सूर्यापासून पृथ्वीला जो ताप होतो त्यावरून कवीने हा अभिप्राय सुचविला आहे ॥ १०० ।। ___ ज्याप्रमाणे कमलांच्या वेली जलबिदूनी युक्त अशा कमलाना धारण करतात त्याप्रमाणे नृपस्त्रियानी घामाच्या जलबिंदूनी युक्त अशी आपली तोण्डे धारण केली ।। १०१ ॥ नृपस्त्रियांच्या मुखकमलावर उत्पन्न झालेले घामाचे बिंदु त्यांच्या सौन्दर्यरसाचा पूरच वाहतो की काय असे शोभू लागले ।। १०२ ॥ घामाचे बिंदु ज्यापासून गळत आहेत अशी नृपस्त्रियांची तोण्डे प्रातःकाळी पडलेल्या दवांनी व्यापिलेली जणु कमले आहेत अशी शोभत होती ।। १०३ ॥ राजस्त्रियांची मुखकमले केशात गुंफलेल्या व सूर्याच्या तापाने जणु पातळ झालेल्या मोत्यानी जशी शोभावीत त्याप्रमाणे घामाच्या बिंदूनी शोभत होती ।। १०४ ।। सूर्य तीव्रतेने जनाला संतप्त करीत असता, लांबट व फेसयुक्त अशा मुखांच्या घोड्यांनी रथ धारण करून तो रथ ओढू लागले. ओढीत असता सम जमिनीवरही अडखळत पाय टाकू लागले ।। १०५ ॥ ___ आखूड व गोल ज्यांचे खूर आहेत व जे उंच आहेत, आखूड व तुळतुळित ज्यांची आयाळ आहे, ज्यांची पाठ रुंद आहे असे घोडे वान्याच्या वेगाने धावत होते ॥ १०६ ।। जे फार वेगवन्त आहेत, ज्यांची छाती रुंद व ज्यांचे ओठ फुरफुरत आहेत, आणि मुखातून जणु आपले खूर बाहेर टाकीत आहेत असे मोठे घोडे फार त्वरेने पळू लागले ॥१०७॥ ज्यांचा पुढचा भाग-मान उंच आहे व देवमणि वगैरे शुभ भोव-यानी जे युक्त आहेत, मनाप्रमाणे तीव्र वेगवान् आहेत असे घोडे लहानशा मार्गात वेगाने चालू लागले ।। १०८ ॥ बुद्धि, वेग व बल यानी युक्त, चांगले शिकलेले, ज्याचे पाय चंचल आहेत व जमिनीवर धुराळा असल्यामुळे तिला स्पर्श करण्याविषयी जणु मनात चिळस धारण करणारे असे घोडे फार वेगाने धावू लागले ।। १०९ ॥ Page #114 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-११९) महापुराण (१०३ अश्वेभ्योऽपि रथेभ्योऽपि पत्तयो वेगितं ययुः । सोपानकः पदैः स्थाणुकण्टकोपललखिनः ॥ ११० शाक्तिकाः सहयाष्टीकैः प्रासिका धन्विभिः समम् । नैस्त्रिशिकाश्च तेऽन्योन्यं स्पर्द्धयेव ययुद्धतम् ।। पुरः प्रधावितैः प्रेङ्घद्वारबाणाग्रपल्लवाः । जातपक्षा इवोड्डीय भटा जग्मुरभिद्रुतम् ॥ ११२ प्रयात धावतापेत मागं मारुद्ध्वमग्रतः । इत्युच्चैरुच्चरद्ध्वानाः पौरस्त्यानत्ययुर्भटाः ॥ ११३ इतोऽपसर्पताश्वीयादितो धावत हास्तिकात् । इतो रथादपत्रस्तात् दूरं नश्यत नश्यत ॥ ११४ अमुष्माज्जनसङ्घट्टादुत्थापयत डिम्भकान् । इतो हस्त्युरसादश्वानपसारयत द्रुतम् ॥ ११५ इतः पन्थानमारुद्धय स्थितोऽयं घातुको गजः । मध्येऽध्वं प्राजितुर्दोषात्पर्यस्तोऽयमितो रथः ॥११६ क्रमेलकोऽयमुत्रस्तः प्रतीपं पथि धावति । उत्सृष्टभारो लम्बोष्ठो जनानिव विडम्बयन् ॥ ११७ वित्रस्ताद्वेसरादेनां पतन्तीमवरोधिकाम् । सन्धारयन्प्रपातेऽस्मिन्सोविदल्लः पतत्ययम् ॥ ११८ यवीयानेष पण्यस्त्रीमुखालोकनविस्मितः । पतितोऽप्यश्वसङघट्टैनात्मानं वेद शून्यधीः ॥ ११९ ज्यांच्या पायात जोडे आहेत व त्यामुळे खुंट, कांटे व दगड याना उल्लंघणारे असे पायदळ सैन्य, घोड्यापेक्षा व रथापेक्षा देखिल अधिक वेगाने पुढे निघून गेले ।। ११० ॥ शक्त्यायुध धारण करणारे, यष्टि आयुधधारक, भाला धारण करणारे, धनुष्यधारी, खड्गधारी, हे सगळे एकमेकाविषयी जणु ईर्ष्या धारण करून फार वेगाने पुढे गेले ॥ १११ ॥ पुढे वेगाने पळण्याने ज्यांच्या चिलखताचे अग्रभाग-पदर उडत आहेत असे योद्धे पंख उत्पन्न झाल्यामुळे जणु उडून जात आहेत की काय असे फार वेगाने ते गेले ॥ ११२ ।। चला, पळा, पुढील मार्ग अडवू नका याप्रमाणे मोठ्याने बोलणारे काही योद्धे पुढे असलेल्याना ओलांडून गेले ।। ११३ ।। हे लोकहो, तुम्ही घोडेस्वारापासून बाजूला जा. या हत्तीच्या समुदायापासून बाजूला वेगाने पळा. हा रथ इकडे तिकडे धावत आहे याच्यापासून फार दूर लौकर पळा ॥ ११४ ।। या लोकांच्या गर्दीतून या बालकाना उचलून घ्या. इकडे हत्तीच्या जवळून घोड्याना कोकर बाजूला करा ॥ ११५ ॥ हा दुष्ट हत्ती रस्ता आडवून उभा राहिला आहे व मार्गामध्येच हाकणान्याच्या चुकीमुळे हा रथ पडला आहे ॥ ११६ ।। तसेच ह्या लांब ओठाच्या उंटाने आपल्या पाठीवरचे ओझे टाकून दिले आहे व मार्गात लोकाना त्रास देत उलट पळत सुटला आहे ॥ ११७ ॥ गजादिकाना पाहून भ्यालेल्या या खेचरावरून ही पडद्यातील स्त्री खाली पडत असता तिला सावरून धरणारा हा कंचुकी या उचंवटयावर आपण ही पडत आहे ।। ११८ ।। वेश्येच्या मुखाकडे पाहून आश्चर्यचकित झालेला शून्यधी अविचारी हा तरूण घोड्याच्या धक्क्याने आपणही पडला आहे पण ते त्याला समजत नाही ॥ ११९ ॥ Page #115 -------------------------------------------------------------------------- ________________ १०४) महापुराण (२७-१२० हरिद्रारञ्जितश्मश्रुः कज्जलाङ्कितलोचनः । कुट्टिनीमनुयन्नेष प्रवयास्तरुणायते ॥ १२० इति प्रयाणसञ्जल्पैरजाताध्वपरिश्रमाः । सैनिकाः शिबिरं प्रापन्सेनान्या प्राङनिवेशितम् ॥ १२१ तत्रावरोधनवधूमुखच्छायाविलजिनि । मध्यन्दिनाधिपे सम्राट् सम्प्राप शिबिरान्तिकम् ॥ १२२ छत्ररत्नतच्छायो दिव्यं रथमधिष्ठितः । न तदातपसम्बाधां विदामास विशाम्पतिः ॥ १२३ वर्षीयोभिरथासन्नरारब्धमुखसंकथः । प्रयातमपि नावानं विवेद भरताधिपः ॥ १२४ नोद्धातः कोप्यभूदङ्गे रथाङ्गपरिवर्तनः । रथवेगेऽपि नास्याभूत्क्लेशो दिव्यानुभावतः ।। १२५ रयवेगानिलोदस्तं व्यायतं तद्ध्वजांशुकम् । पश्चादागामिसैन्यानामिव मार्गमसूत्रयत् ॥ १२६ रथोद्धतगतिक्षोभादुद्भूताङ्गपरिश्रमाः । कथं कथमपि प्रापत्रथिनोऽन्ये रथं प्रभोः ॥ १२७ तमध्वशेषमध्वन्यस्तुरङ्गरत्यवाहयन् । सादिनः प्रभुणा साध शिबिरं प्रविविक्षवः ॥ १२८ ज्याने आपल्या मिशा कलप लावून काळ्या केल्या आहेत व ज्याने डोळ्यात काजळ घातले आहे, असा हा म्हातारा कुंटिणीच्या मागून हिंडत आहे व आपण तरुण आहोत असे भासवीत आहे ॥ १२० ।। याप्रमाणे अनेक त-हेच्या प्रयाणाच्या भाषणानी ज्याना मार्गातील श्रम झाले नाहीत असे सैनिक पूर्वी तयार करून ठेवलेल्या छावणीत मुक्कामासाठी आले ॥ १२१॥ यानंतर अन्तःपुरातील राजस्त्रियांच्या मुखांची कान्ति म्लान करणारा सूर्य दिवसाच्या मध्यभागी आला असता सम्राट् भरत आपल्या शिबिराजवळ आला ॥ १२२ ॥ भरताच्या मस्तकावर दिव्यछत्ररत्नाची सावली होती व तो रथावर आरूढ झाला होता. त्यामुळे सूर्याच्या उन्हाचा त्रास त्याला मुळीच जाणवला नाही ॥ १२३ ॥ भरतचक्रवर्तीच्या जवळ जे वृद्ध बसले होते त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी बोलणाऱ्या भरताला आपण किती मार्ग उल्लंघून पुढे आलो आहोत हे समजले नाही ।। १२४ ।। रथाची चक्रे वेगाने चालत असता भरताच्या अंगाला कोणताही धक्का लागला नाही. भरताच्या अंगात दिव्य सामर्थ्य असल्यामुळे रथ वेगाने जात असताही कोणताही क्लेश त्याला झाला नाही ॥ १२५ ॥ रथाच्या वेगयुक्त वान्याने फडफडणारा दीर्घ असा जो ध्वजाचा कपडा तो पाठीमागून येणाऱ्या सैन्याला जणु मार्गदर्शक झाला ।। १२६ ॥ रथांच्या वेगयुक्त गतीमुळे पुष्कळ राजांची शरीरे श्रमयुक्त झाली. यामुळे मोठ्या कष्टाने कसे तरी भरतराजाच्या रथाजवळ ते आले ॥ १२७ ॥ भरतराजाबरोबर शिबिरात प्रवेश करावा अशी इच्छा करणान्या कित्येक घौ स्वारानी वेगाने जाऊन मार्ग संपविणा-या घोड्यावर बसून मार्ग ओलांडला ॥ १२० ॥ Page #116 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-१३७) महापुराण दूराष्यकुटीभेदानुत्थितान्प्रभुरक्षत । सेनानिवेशमभितः सौधशोभापहासिनः ॥ १२९ रौप्यदण्डेषु विन्यस्तान् विस्तृतान्पटमण्डपान् । सोऽपश्यज्जनतातापहारिणः सुजनानिव ॥ १३० किमेतानि स्थलाब्जानि हंसयूथान्यमूनि वा । इत्याशडक्य स्थलाग्राणि दूराद्ददृशिरे जनैः॥१३१ सामन्तानां निवेशेषु कायमानानि नैकथा । निवेशितानि विन्यासैनिदध्यौ प्रभुरग्रतः ॥ १३२ परितः कायमानानि वीक्ष्य कण्टकनिर्वृतीः । निष्कण्टके निजे राज्ये मेने तानेव कण्टकान् ॥१३३ तरुशाखाग्रसंसक्तपर्याणादिपरिच्छदान् । स्कन्धावाराबहिः कांश्चिदावासान्प्रभुरक्षत ॥ १३४ बहिनिवेशमित्यादीन्विशेषान्स विलोकयन् । प्रवेशे शिबिरस्यास्य महाद्वारमथासदत् ॥ १३५ तदतीत्य समं सैन्यः स गच्छन् किञ्चिदन्तरम् । महाब्धिसमनिर्घोषमाससाद वणिक्पथम् ॥ १३६ कृतोपशोभमाबद्धतोरणं चित्रकेतनम् । वणिग्भिरूढ रत्नार्घ स जगाहे वणिक्पथम् ॥ १३७ ।। सेनेच्या निवासस्थानाच्या सभोवती राजवाड्याच्या शोभेला हसणाऱ्या अशा अनेक तंबूला दुरूनच पाहिले ।। १२९ ।। रुप्याच्या खांबावर जे उभे केले आहेत असे विस्तृत वस्त्रमंडप भरतराजाने पाहिले. ते लोकांचा ताप दूर करणारे असल्यामुळे सज्जनाप्रमाणे वाटत होते ॥ १३० ॥ त्या तंबूची टोके ही जणु जमिनीवर उगवलेली कमले आहेत, किंवा हे हंसाचे कळप जणु आहेत अशा अनेक प्रकारच्या शंकानी ते तंबू लोकानी दुरून पाहिले ॥ १३१ ।। जे मांडलिकराजाचे तंबू होते त्यात अनेक प्रकारचे विभाग पडदे लावून केले होते. (जसे हे भोजनगृह, ही बसण्याची खोली वगैरे) या सर्वांचे भरतराजाने निरीक्षण केले॥१३२॥ त्या प्रत्येक तंबूच्या भोवती काटेरी कुंपणे होती. त्याना भरतप्रभूने पाहिले व आपल्या निष्कण्टक राज्यात हेच काय ते काटे आहेत असे त्याला वाटले ॥ १३३ ॥ त्या छावणीच्या बाहेर वृक्षांच्या शाखांच्या अग्रावर घोड्यांचे खोगीर वगैरे पदार्थ अडकविले होते. याचप्रमाणे झोपड्यासारखे लहान लहान निवासस्थानेही प्रभूने पाहिली।।१३४॥ याचप्रमाणे छावणीच्या बाहेर असलेली काही विशेष स्थाने पाहात पाहात शिबिरात प्रवेश करताना शिबिराच्या महाद्वाराजवळ भरतराजे आले ॥ १३५ ॥ सैन्यासह जाणाऱ्या प्रभु भरताने महाद्वाराला ओलांडून कांहीं अन्तर गमन केले व मोठ्या समुद्राप्रमाणे शब्द जिथे होत आहेत अशा बाजारात ते आले ॥ १३६ ।। तो बाजार अनेक तन्हानी सुशोभित झाला होता. त्यात अनेक ठिकाणी तोरणे बांधली होती व चित्रविचित्र पताका उभ्या केल्या होत्या. व्यापारी लोक त्या बाजारात रत्नादि पदार्थांच्या किंमती वगैरेचे वर्णन करीत होते. अशा बाजारात भरतराजाने प्रवेश ला ।। १३७ ।। म.१४ Page #117 -------------------------------------------------------------------------- ________________ १०६) प्रत्यापणमसौ तत्र रत्नराशीशिधीनिव । पश्यन्मेने निषीयत्तां प्रसिद्धयैव तथास्थिताम् ॥ १३८ समौक्तिकं स्फुरद्रत्नं जनतोत्कलिकाकुलम् । रथा वणिक्पथाम्भोधि पोता इव ललङ्घिरे ॥ १३९ चलदश्वीयकल्लोलः स्फुरनिस्त्रिशरोहितैः । राजमार्गोऽम्बुबेर्लीलां महेभमकरैरधात् ॥ १४० राजन्यकेन संरुद्धः समन्तादानृपालयम् । तदासौ विपणीमार्गः सत्यं राजपथोऽभवत् ॥ १४१ ततः पर्यन्तविन्यस्त रत्नभासुरतोरणम् । रथकडयापरिक्षेपकृतबाह्यपरिच्छदम् ॥ १४२ आरुध्यमानमश्वीयैस्तिकेनातिदुर्गमम् । बहुनागबलैर्जुष्टं फलभैश्च करेणुभिः ॥ १४३ छत्रखण्डकृतच्छायं सहोद्यानमिव क्वचित् । क्वचित्सामन्तमण्डल्या रचितास्थानमण्डलम् ॥ १४४ प्रविशद्भिश्च निर्यद्भिरपर्यन्तैर्नियोगिभिः । महाब्धेरिव कल्लोलैस्तटमाविर्भवध्वनि ॥ १४५ महापुराण त्या भरतप्रभूने प्रत्येक दुकानात निधीप्रमाणे रत्नांचे ढीग पाहिले व निधि नऊ आहेत अशी जी निधींची इयत्ता - संख्या ठरविली आहे ती फक्त प्रसिद्धीकरिता ठरविली आहे. खरे पाहिले असता ते निधि पुष्कळ आहेत असे त्याने मानले ।। १३८ ॥ (२७-१३८ तो बाजार, ज्यात रत्नें चमकत आहेत अशा मोत्यानी भरलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होता. लोकरूपी तरंगानी तो भरलेला - व्याप्त झालेला दिसत होता. त्या बाजारात जे रथ जात होते ते नावा- नौकाप्रमाणे होते. त्या नौका त्या बाजाररूपी समुद्राला उल्लंघून पुढे गेल्या ।। १३९ ।। त्या बाजारातील मोठा रस्ता चालणाऱ्या अश्वसमूहरूपी लाटानी युक्त होता व चमकणा-या खड्गरूपी माशानी व मोठे हत्ती हेच कोणी सुसरमगर त्यांनी समुद्राप्रमाणे शोभत होता ।। १४० ।। त्यावेळी भरतेश्वराच्या तंबूपर्यन्त मांडलिक राजसमूहाने तो व्यापाऱ्यांच्या दुकानांचा मार्ग व्यापून गेला होता म्हणून खरोखर त्यावेळी तो राजमार्ग झाला ॥। १४१ ।। यानंतर भरतेश्वराने आपल्या राजवाड्याच्या अंगणाला पाहिले व त्याला फार मोठे आश्चर्य वाटलें. त्या अंगणाच्या सर्व बाजूनी रत्नांची चमकणारी तोरणे लावली होती व त्या अंगणाच्या बाहेरच्या भागात गोलाकाराने रथांचे समूह उभे केले होते ।। १४२ ।। याचप्रमाणे बाहेरच्या भागात घोड्यांच्या व हत्तींच्या समूहाने ते अंगण व्यापून गेले असल्यामुळे प्रवेश करण्यास कठिण झाले होते. तसेच तेथे हत्तींचे छावे व हत्तिणीही होत्या. त्यामुळे ते अंगण हत्ती ज्यात राहतात अशा वनाप्रमाणे भासत होते ।। १४३ ।। ते अंगण कोठे कोठे अनेक छत्रांच्या सावलीनी मोठ्या बगीचाप्रमाणे दिसत होते व कोठे कोठे अनेक राजांच्या समूहाने युक्त असल्यामुळे जणू तें नृपांगण सभामण्डलाची शोभा धारण करीत होते ।। १४४ ॥ त्या अंगणातून पुष्कळ राजसेवक बाहेर जात होते. पुष्कळ सेवक आत प्रवेश करीत होते. त्यामुळे ज्यातून शब्द करणाऱ्या लाटा तटापर्यन्त जात आहेत व तटापासून पुन: Page #118 -------------------------------------------------------------------------- ________________ २७-१५०) महापुराण (१०७ जनतोत्सारणव्यग्रमहादौवारपालकम् । कृतमङ्गलनिर्घोषं वाग्देव्येव कृतास्पदम् ॥ १४६ चिरानुभूतमप्येवमपूर्वमिव शोभया । नृपो नृपाङ्गणं पश्यन् किमप्यासीत्सविस्मयः ॥ १४७ निधयो यस्य पर्यन्ते मध्ये रत्नान्यनन्तशः। महतः शिबिरस्यास्य विशेषं को नु वर्णयेत् ॥ १४८ शार्दूलविक्रीडितम्स श्रीमानिति विश्वतः स्वशिबिरं लक्ष्म्या निवासायितम् । पश्यन्नात्तधृतिविलाध्य विशिखाः स्वर्गापहारिश्रियः ॥ सम्भ्राम्यत्प्रतिहाररुद्धजनतासम्बाधमुत्केतनम् । प्राविक्षत्कृतसग्निवेशमचिरावात्मालयं श्रीपतिः ॥ १४९ तत्राविष्कृतमङ्गले सुरसरिद्वीचीभुवा वायुना। सम्मृष्टाङ्गणवेदिके विकिरता तापच्छिदः शीकरान् । शस्ते वास्तुनि विस्तृते स्थपतिना सद्यः समुत्थापिते ।। लक्ष्मीवान्मुखमावसन्निधिपतिः प्राची दिशं निर्जयन् ॥ १५० आत प्रवेश करीत आहेत अशा गर्जना करीत असलेल्या समुद्राप्रमाणे ते राजांगण शोभत होते ॥ १४५ ॥ या अंगणाच्या दरवाजावर उभे राहिलेले द्वारपाल लोकांची गर्दी हटविण्यात दंग झाले होते व अंगणात मंगलशब्द होत होते. त्यामुळे सरस्वतीदेवी येथे निवास करीत आहे असे वाटत होते ।। १४६ ॥ भरतराजाने असे दृश्य पुष्कळ वेळा अनुभविले होते, पाहिले होते तथापि हे शोभेने अपूर्व आहे असे त्याला वाटले व ते राजांगण पाहत असता त्याला वर्णन न करता येणारे आश्चर्य वाटले ॥ १४७ ॥ ज्याच्या सभोवती नऊ निधिमध्ये अनेक प्रकारची अनंतरत्ने आहेत अशा मोठ्या छावणीची शोभा वर्णन करण्यास कोण बरे समर्थ होईल ।। १४८ ॥ सर्व बाजनी जे लक्ष्मीचे निवासस्थान बनले आहे अशा शिबिराला पाहणाऱ्या त्या लक्ष्मीसंपन्न भरतराजाला मोठा संतोष वाटला. स्वर्गाच्या शोभेचे हरण करणाऱ्या अनेक मार्गाला उल्लंघून राजा भरत आपल्या शिबिराजवळ आला. दरवाजावर पुढे द्वारपाल फिरत होते व ते लोकांची गर्दी हटवीत होते. शिबिरावर ध्वज फडकत होता. त्या शिबिराच्या अनेक विभागांची रचना सुंदर होती. अशा त्या शिबिरातील आपल्या वाड्यात लक्ष्मीपति भरताने प्रवेश केला ॥ १४९ ॥ _स्थपतिरत्नाने विस्तृत व प्रशस्त असा राजवाडा तत्काळ रचला होता. त्यात दर्पण वगैरे अष्टमंगलद्रव्ये स्थापिली होती. त्या वाड्याच्या अंगणातील वेदिका देवनदीच्या तरंगापासून Page #119 -------------------------------------------------------------------------- ________________ १०८) महापुराण : (२७-१५१ राज्ञामावसथेषु शान्तजनताक्षोभेषु पीताम्भसा-। मश्वानां पटमण्डपेषु निवहे स्वरं तृणग्रासिनि ॥ गङ्गातीरसरोवगाहिनि वनेष्वालानिते हास्तिके । जिष्णोस्तत्कटकं चिरादिव कृतावासं तदा लक्ष्यते ॥ १५१ तत्रासीनमुपायनैः कुलधनैः कन्याप्रदानादिभिः । प्राच्या मण्डलभूभुजः समुचितैराराधयन्साधनैः॥ संरुद्धाः प्रविहाय मानमपरे प्राणंसिषुश्चक्रिणम् । दूरादानतमौलयो जिनमिव प्राज्योदयं नाकिनः ॥ १५२ उत्पन्न झालेल्या वायूने स्वच्छ केली होती. अर्थात् हवेतील उष्णता नष्ट करणान्या जलबिंदूना चोहीकडे पसरणान्या वायूकडून ती वेदिका स्वच्छ केली होती. पूर्वदिशेला जिंकणाऱ्या लक्ष्मीसंपन्न, निधिस्वामी भरताने त्या वाड्यात सुखाने निवास केला ।। १५० ।। सर्व राजेलोकांच्या निवासस्थानात लोकांची गडबड जेव्हा शान्त झाली, घोडे आपल्या पटमंडपात- तबेल्यात स्वेच्छेने पाणी पिऊन गवत खात असता, गंगेच्या तीरावरील सरोवरात अवगाहन केल्यावर हत्तींना खांबाला बांधले असता या जयशील भरतराजाचे सर्व सैन्य आपआपल्या स्थानी दीर्घकालापासून राहिले आहे असे वाटू लागले ॥ १५१ ॥ ज्याचा उदय-महिमा अत्यन्त श्रेष्ट आहे अशा जिनेश्वराला देव दूरूनच मस्तक नम्र करून जसे नमस्कार करतात. तसे श्रेष्ठवैभवधारक असलेले व मण्डपात बसलेल्या भरतेश्वरास पूर्वदिशेच्या सर्व राजानी आपल्या कुलपरम्परेने चालत आलेले धन व अनेक नजराणे भेट म्हणून दिले व आपल्या कन्या भेट म्हणून अर्पण केल्या व आणखी अनेक योग्य वस्तु देऊन त्याची आराधना केली व सेनेने ज्याना घेरले आहे अशा अनेक राजानी मान सोडून या चक्रवर्तीला नमस्कार केला ।। १५२ ॥ इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसङग्रहे भरतराजविजयप्रयाणवर्णनं नाम सप्तविंशतितमं पर्व ॥ २७॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यानी रचलेल्या आर्ष त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादात भरतराजाने राजाना जिंकण्यासाठी प्रयाण केले याचे वर्णन करणारे सत्ताविसावे पर्व समाप्त झाले. Page #120 -------------------------------------------------------------------------- ________________ अष्टाविंशतितमं पर्व अथान्येद्युदिनारम्भे कृतप्राभातिकक्रियः । प्रयाणमकरोच्चक्री चक्ररत्नानुमार्गतः ॥ १ अलङध्यं चक्रमाक्रान्तपरचक्रपराक्रमम् । दण्डश्च दण्डितारातिर्द्वयमस्य पुरोऽभवत् ॥ २ रक्ष्यं देवसहस्रेण चक्रं दण्डश्च तादृशः । जयाङ्गमिदमेवास्य द्वयं शेषः परिच्छदः ॥ ३ विजयार्धप्रतिस्पद्धवर्माणं यागहस्तिनम् । प्रतस्थे प्रभुरारुह्य नाम्ना विजयपर्वतम् ॥ ४ प्राचीं दिशमथो जेतुमापयोधेस्तमुद्यतम् । ननु स्तम्बेरमव्याजागृहे विजयपर्वतः ॥ ५ सुरेभं शरदभ्राभमारूढो जयकुञ्जरम् । स रेजे दीप्तमुकुटः सुरेभं सुरराडिव ॥ ६ सितातपत्र मस्योच्चैविधृतं श्रियमादधे । यशसां प्रसवागारमिव तद्व्याजजृम्भितम् ॥ ७ लक्ष्मीप्रहासविशदा चामराली समन्ततः । व्यधूयतास्य विध्वस्ततापा ज्योत्स्नेव शारदी ॥ ८ यानंतर दुसरे दिवशी दिवसाच्या प्रारंभी चक्रवर्तीने सकाळच्या सर्व क्रिया केल्या व चक्ररत्नाच्या मार्गाला अनुसरून प्रयाण केले ॥ १ ॥ शत्रूंच्या सैन्याच्या पराक्रमाचा नाश करणारे व ज्याचे अन्य कोणी उल्लंघन करू शकत नाही असे चक्ररत्न व शत्रूंना दण्डित करणारे दण्डरत्न ही दोन्ही चक्रवर्तीच्यापुढे चालत होती ॥ २ ॥ या चरत्नाचे हजार देव रक्षण करीत असत, तसेच हजार देव दण्डरत्नाचे रक्षण करीत असत. चक्रवर्तीला जय मिळवून देण्यास ही दोन रत्नेच कारण आहेत. बाकीची सर्वं सैन्य आदिक सामग्री शोभेसाठी होती ।। ३ ॥ विजयार्ध पर्वताशी स्पर्द्धा करणारे शरीर ज्याचे आहे अशा विजयपर्वत नावाच्या आदरणीय हत्तीवर आरोहण करून भरतचक्रीने प्रयाण केले ॥ ४ ॥ समुद्रापर्यन्त पूर्व दिशेला जिंकण्यासाठी उद्यत झालेल्या त्या भरतप्रभूला हत्तीच्या मिषाने विजयपर्वताने आपल्या मस्तकावर धारण केले की काय असे वाटत होते ।। ५ ॥ सु-उत्तम रेभं शब्द ज्याचा आहे अर्थात उत्तम गर्जना करणारा व शरत्कालच्या शुभ्र मेघाप्रमाणे कान्ति ज्याची आहे अशा जयकुञ्जरावर जयशील हत्तीवर आरूढ झालेला व ज्याचा मुकुट चमकत आहे असा भरतचक्री सुरेभदेव हत्तीवर- ऐरावतावर आरुढ झालेल्या इन्द्राप्रमाणे शोभू लागला ॥। ६ ।। मस्तकावर धारण केलेलें या भरताचे जे शुभ्र छत्र त्याने भरताला अपूर्व शोभा आली व तें छत्राच्या मिषाने कीर्तीच्या उत्पत्तीचे जणु घर आहे असे शोभत होते ।। ७ ।। लक्ष्मीच्या उत्कृष्ट हास्याप्रमाणे निर्मल अर्थात् शुभ्र अशी चामरांची पंक्ति भरताच्या चारी बाजूनी वारली जात होती व शरत्कालच्या चन्द्राच्या चांदण्याप्रमाणे त्या चामरसमूहांनी सर्व उष्णता नाहीशी केली होती ॥। ८ ।। Page #121 -------------------------------------------------------------------------- ________________ ११०) महापुराण (२८-९ जयद्विरदमारूढो ज्वलज्जैत्रास्त्रभासुरः । जयलक्ष्मीकटाक्षाणामगमत्स शरव्यताम् ॥ ९ महामुकुटबद्धानां सहस्राणि समन्ततः । तमनुप्रचलन्ति स्म सुराधिपमिवामराः ॥१० दूरमद्य प्रयातव्यं निवेष्टव्यमुपार्णवम् । त्वरध्वमिति सेनान्यः सैनिकानुदतिष्ठिपन् ॥ ११ त्वर्यतां प्रस्थितो देवो दवीयश्च प्रयाणकम् । बलाधिकारिणामित्थं वचो बलमचिक्षुभत् ॥ १२ अद्यासिन्धु प्रयातव्यं गङ्गाद्वारे निवेशनम् । संसाध्यो मागधोऽद्यैव विलंघ्य पयसां निधिम् ॥ १३ समुद्रमद्य पश्यामः समुद्रङ्गत्तरङ्गकम् । समुद्रलङ्घनेऽद्यैव समुद्रं शासनं विभोः ॥ १४ भन्योन्यस्येति सञ्जल्पैः सम्प्रास्थिषत सैनिकाः। प्रयाणभेरीप्रध्वानस्तदोद्यन्द्यामदिध्वनत् ॥ १५ ततः प्रचलिता सेना सानुगङ्ग धृतायतिः । मिमानेव तदायाम पप्रथे प्रथितध्वनिः ॥ १६ प्रभू भरत जयशाली हत्तीवर आरुढ झाला होता. उज्ज्वल व जयशाली अस्त्रांनी तो फार तेजस्वी दिसत होता. जणु जयलक्ष्मी आपले नेत्र कटाक्ष त्याच्यावर फेकून त्याला विद्ध करीत आहे असे वाटत असे ॥ ९ ॥ ___ जसे इंद्राच्या मागून हजारो देव जातात तसे या सम्राटाच्या मागून हजारो मुकुटबद्ध महाराजे सर्व बाजूंनी चालले होते ॥ १० ॥ " आज फार दूर प्रयाण करावयाचे आहे, आज समुद्राजवळ मुक्काम करावयाचा आहे. यासाठी त्वरा करा" असे म्हणून अनेक सेनापतीनी सर्व सैनिकांना उठविले ॥ ११ ॥ " उठा. त्वरा करा. भरत महाराजानी पुढे प्रयाण केले आहे व आपणा सर्वाना फार दूर जाऊन मुक्काम करावयचा आहे, तुम्ही मोठ्या त्वरेने चालले पाहिजे. असे सेनापतीचे सर्व भाषण ऐकून सर्व सैन्यात मोठी गडबड उत्पन्न झाली ॥ १२ ॥ ___आज समुद्रापर्यन्त प्रयाण करावयाचे आहे व गंगा जेथे समुद्राला मिळते तेथे मुक्काम करावयाचा आहे व आजच समुद्रात प्रवेश करून आजच तेथे राहणाऱ्या मागध देवाला जिंकावयाचे आहे ॥ १३ ॥ ज्यातील लाटा उंच उसळत आहेत अशा समुद्राला आपण सर्वानी बघावयाचे आहे व आजच समुद्र उल्लंधिला पाहिजे. असा महाराजांचा मोर्तब होऊन आज्ञा झाली आहे यास्तव प्रयाण वेगाने करा ।। १४ ॥ सर्व सैनिकही एकमेकांना वरच्याप्रमाणे सांगून प्रयाण करू लागले व त्यावेळी प्रयाणसूचक नगन्यांचा मोठा आवाज वर आकाशात पसरून सर्वत्र त्याने आकाश व्यापलें ॥ १५ ॥ ____ यानंतर गंगानदीला अनुसरून जिने आपली लांबी धारण केली आहे व जिची लांबी मोजण्याकरिता जी लांब पसरली आहे व जिचा ध्वनि पसरला आहे अशी ती चक्रिसेना प्रयाण करू लागली ॥ १६ ॥ Page #122 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-२२) महापुराण (१११ सचामरा चलखंसां सबलाकां पताकिनी । अन्वियाय चमूर्गङ्गां सतुरङ्गा तरङगिणीम् ॥ १७ राजहंसैःकृताध्यासा क्वचिदप्यस्खलद्गतिः । चमूरब्धि प्रति प्रायात्सा द्वितीयेव जाह्नवी ॥ १८ विपरीतामतवृत्तिनिम्नगामुन्नतस्थितिः । त्रिमार्गगां व्यजेष्टासौ पृतना बहुमार्गगा ॥ १९ अनुगङ्गातट यान्ती ध्वजिनी सा ध्वजांशुकैः । वनरेणुभिराकोणं सम्ममार्जेव खाडगणम् ॥ २० दुर्विगाहा महाग्राहाः सैन्यान्युत्तेरुरुत्तरे । गङगानुगा धुनीबह्वीबहुराजकुलस्थितीः ॥ २१ मार्गे बहुस्थितान्देशान्सरितः पर्वतानपि । धनवान्बहुदुर्गाणि खनीरप्यत्यगात्प्रभुः ॥ २२ जिच्यात हंस विहार करीत आहेत, जिच्यांत बगळे फिरत आहेत व जिच्यात तरङ्ग उठत आहेत अशा गंगानदीला, चामरानी युक्त, पताकांनी सहित, पुष्कळ घोड्यांनी युक्त, अशी भरतसेना अनुसरली. अर्थात् गंगानदीला अनुसरून भरतसेना जाऊ लागली. चामरांचे सादृश्य हंसपक्ष्याशी, पताकांचे बगळयाबरोबर, घोड्यांची समानता तरंगाशी दाखवून आचार्यानी सेना गंगानदीला अनुसरली असे म्हटले आहे ।। १७ ।। जिच्यात श्रेष्ठ राजे आहेत, जिची गति अस्खलित आहे व जी जणु गंगेप्रमाणे वाटते अशी भरतसेना, जणु दुसरी जाह्नवी-गंगानदी आहे अशी दिसली व ती समुद्रापर्यन्त गेली ॥१८॥ भरताच्या सेनेने गंगानदीला जिंकले. गंगानदी-विपरीता-राजहंस, बगळे आदिक पक्ष्यानी युक्त होती पण सेना अतवृत्ति-तिच्यापेक्षा वेगळ्या स्वभावाची आहे, गंगानदी निम्नगा-सखल प्रदेशात वाहणारी पण सेना उन्नतस्थिति-उच्च अवस्थेला धारण करणारी, गंगानदी त्रिमार्गगा तीन मार्गानी समुद्राकडे जाणारी व भरतसेना बहुमार्गगा-अनेक मार्गानी प्रयाण करणारी होती म्हणून तिने गंगानदीला जिंकले आहे ।। १९ ।। गंगेच्या किनाऱ्याला अनुसरून जात असलेल्या भरतसेनेने आपल्या ध्वजांच्या वस्त्रांनी वनातील धूळीनी व्याप्त झालेले आकाश जणु पुसून स्वच्छ केले असे दिसू लागले ॥२०॥ महाराज भरताच्या सैन्यानी उत्तरेकडे वाहणाऱ्या व उत्तरेकडून येणाऱ्या ज्या अनेक नद्या व सैन्याना पार केले होते. त्या अन्योन्याशी अनुरूप होत्या. अर्थात् नद्या सैन्यासारख्या होत्या व सैन्ये नद्याप्रमाणे होती. नद्या दुर्विगाहा- मोठ्या कठिनतेने प्रवेश करण्यायोग्य असतात व सैन्ये देखिल कठिणपणाने ज्यांच्यात प्रवेश करता येईल अशी असतात. नद्या महाग्राहा-मोठमोठ्या मगर-सुसरी आदि प्राण्यानी युक्त असतात. अशी सैन्येही महाग्राहा-मोठ्या आग्रहाने युक्त असतात. जशा नद्या 'बहुराजकुलस्थिती:' अनेक राजांच्या पृथ्वी-भूमीत त्या वाहात जातात व सैन्ये देखिल अनेक राजांच्या कुलाला स्थिर करणारी असतात. अशा गंगेला अनुसरणा-या अनेक नद्यातून भरतराजांची सैन्ये उतरून पुढे गेली ॥ २१ ॥ प्रयाण करीत असतां मार्गात पुष्कळसे देश, नद्या व पर्वताना, पुष्कळ वनाना आणि अनेक खाणीना उल्लंघून लक्ष्मीवान् भरताने पुढे प्रयाण केले ।। २२ ।। Page #123 -------------------------------------------------------------------------- ________________ ११२) महापुराण (२८-२३ अगोष्पदेष्वरण्येषु दृशं व्यापारयन्विभुः । भूमिच्छिद्रापिधानाय क्षणं यत्नमिवातनोत् ॥ २३ पथि प्रणेमुरागत्प सम्भ्रान्ता मण्डलाधिपाः । दण्डोपनतवृत्तस्य विषयोऽयमिति प्रभुम् ॥ २४ सचक्रं धेहि राजेन्द्र, सधुरं प्राज सारथे । सञ्जल्प इति नास्यासीदयत्नानतविद्विषः ॥ २५ प्रतियोद्धमशक्तास्तं प्रधनेषु जिगीषवः । तत्पदं प्रणतिव्याजात् स्वमौलिभिरताडयन् ॥ २६॥ विभुत्वमरिचक्रेषु भूपरागानुरञ्जनम् । स्वचक्र इव सोऽधत्त महतां चित्रमीहितम् ॥ २७ सन्ध्यादिविषये नास्य समकक्षो हि पार्थिवः । षाड्गुण्यमत एवास्मिश्चरितार्थमभूत्प्रभौ ॥ २८ प्रतिराष्ट्रमुपानीतप्राभूतान्विषयाधिपान् । संभावयत्प्रसादेन सोऽत्यगाद्विषयान्बहून् ॥ २९ । +--........ गाय आदिक प्राण्यांच्या संचाराने रहित बनात दृष्टि टाकणारे भरतचक्री जणु लोकाना असे वाटले की, पृथ्वीच्या छिद्राना बुजविण्यासाठी काही क्षणापर्यन्त प्रयत्न करीत आहेत ।। २३ ।। मार्गात घाबरलेले अनेक देशाचे राजे चक्रवर्तीजवळ येऊन आपल्या दंडाने या देशाचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे असे म्हणून त्यांना नमस्कार करू लागले ॥ २४ ।। या भरतराजाला प्रयत्नावाचून शत्रु नम्र होत असत म्हणून हे राजेन्द्र आपण चक्ररत्न धारण करा व हे सारथ्या तूं रथाची पुढची बाजु उत्तम रीतीने सांभाळ असे शब्द बोलण्याचा कधी प्रसंग आला नाही ॥ २५ ॥ समरांगणात जय मिळविण्याची इच्छा करणारे पण युद्ध करण्यास असमर्थ असे राजे नमस्कार करण्याच्या निमित्ताने आपल्या किरीटानी भरतेश्वराच्या पायाना ताडन करीत असत ॥ २६ ॥ भरतराजेश्वर जसे आपल्या राज्यात विभुत्व-ऐश्वर्य धारण करीत होते तसे शत्रूच्या राज्यातही विभुत्व धारण करीत होते अर्थात् शत्रूना पृथ्वीरहित करीत होते. त्यांच्या पृथ्वीचे हरण करीत असत व भरत महाराज जसे आपल्या राज्यात 'भूपरागानुरञ्जन' राजे लोकावर प्रेमपूर्ण अनुरंजन करीत असत तसे शत्रूच्या राज्यात देखिल भूपरागानुरंजन म्हणजे पृथ्वीला धूळीनी व्याप्त करीत असत. अर्थात् शत्रूला धुळीत मिळवीत असत. यावरून हे योग्यच वाटते की जे महापुरुष असतात त्यांचे आचरण आश्चर्यकारक असते ॥ २७ ॥ सन्धि- तह करणे, विग्रह- युद्ध करणे, यान- शत्रूवर चाल करून जाणे, आसनदबा धरून बसणे, द्वैधीभाव- शत्रू मध्ये फूट पाडणे, आश्रय- कोणाची तरी मदत मिळविणे याविषयी कोणताही राजा भरतराजाच्या बरोबरीचा नव्हता म्हणून सन्धि आदिक सहा गुण या भरतेश्वरात चरितार्थ झाले होते ॥ २८ ॥ प्रत्येक राष्ट्रामध्ये नजराणा घेऊन येणाऱ्या त्या त्या देशाच्या राजावर कृपा करून त्याचा भरतेश्वर सत्कार करीत असे. अशारीतीने भरतेश्वर अनेक देशाना उल्लंघून पुढे गेला ॥ २९॥ Page #124 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-३७) महापुराण (११३ नासौ व्यापारितो हस्तो मौर्वी धनुषि नापिता । केवलं प्रभुशक्त्यैव प्राची दिग्विजितामुना ॥ ३० गोकुलानामुपान्त्येषु सोऽपश्यद्यवबल्लवान् । वनवल्लीभिराबद्धजटकान्गोभिरक्षिणः ॥ ३१ मन्थाकर्षश्रमोद्भूतस्वेदबिन्दुचिताननाः । मथ्नतीः सकुचोत्कम्पं सलीलत्रिकनर्तनः ॥ ३२ मन्थरज्जुसमाकृष्टिक्लान्तबाहूः श्लपांशकाः । स्रस्तस्तनांशुका लक्ष्यत्रिवलीभङगुरोदराः ॥ ३३ क्षुब्धाभिघातोच्चलितस्थूलगोरसबिन्दुभिः । विरलैरङ्गसंलग्नः शोभा कामपि पुष्णतीः ॥ ३४ मन्थारवानुसारेण किञ्चिदारब्धमूर्च्छनाः । विस्रस्तकबरीबन्धाः कामस्येव पताकिकाः ॥ ३५ गोष्ठाङगणेषु संलापैः स्वरमारब्धमन्थनाः । प्रभुर्गोपवधूः पश्यन्किमप्यासीत्समुत्सुकः ॥ ३६ बने वनगजर्जुष्टे प्रभुमेनं वनेचराः । वन्तर्वनकरीन्द्राणामद्राक्षुः सह मौक्तिकः ॥ ३७ ........... __ या भरतेशाने कधी आपल्या हातात तरवार घेतली नाही व धनुष्यावर दोरी बढविली नाही. परन्तु याने फक्त आपल्या प्रभु शक्तीनेच- विशिष्ट राजतेजानेच पूर्व दिशा जिंकली ॥ ३० ॥ __ ज्यानी आपले केश वनातील वेलीनी बांधले आहेत व जे गाई म्हशींचे रक्षण करितात अशा तरुण गवळयाना गायींच्या कळपाजवळ भरतेशाने पाहिले ॥ ३१ ॥ रवीची दोरी सारखी ओढल्यामुळे झालेल्या श्रमापासून उत्पन्न झालेल्या घामाच्या बिंदूनी ज्यांचे मुख भरून गेले आहे व दही घुसळीत असता ज्यांचे स्तन व ढुंगणही हलत आहेत, वारंवार रवीची दोरी ओढीत असता ज्यांचे बाह थकले आहेत. ज्यांचे वस्त्र दिले झाले आहे. स्तनावरील वस्त्र खाली गळाल्यामुळे ज्यांच्या कृश पोटावरील त्रिवळी दिसत आहेत ।। ३२-३३ ।। रवीच्या घुसळण्यामुळे क्षुब्ध होऊन वर उसळलेले व स्थूल असे जे गोरसाचे-दह्याचे बिंदु ते ज्यांच्या अंगाला चिकटलेले आहेत, त्यामुळे त्या गवळणींच्या अंगाला काही अपूर्व शोभा आली होती ॥ ३४ ।।। दही घुसळताना होणारा जो शब्द त्याला अनुसरून चढ-उताराचे गाणे ज्या मुखाने म्हणत आहेत, ज्यांच्या वेणीचे बंधन गळून पडल्यामुळे सुटलेले केसानी ज्या मदनाच्या जणु पताका आहेत असा भास उत्पन्न होतो ॥ ३५ ॥ गोठ्याच्या अंगणात एकमेकीशी बोलत स्वच्छन्दाने दही घुसळण्याचे कार्य ज्या करीत आहेत अशा गवळयांच्या स्त्रियांना भरत प्रभूनी पाहिले व त्यांच्या मनात काही उत्सुकता उत्पन्न झाली ।। ३६ ॥ रानटी हत्ती जेथे आहेत अशा वनात राहणारे जे भिल्ल आदिक लोक त्यांनी प्रभु भरताचे दर्शन घेतले व त्यांनी जंगली मोठ्या हत्तींचे दात आणि त्यांच्या गंडस्थलात उत्पन्न मालेली मोत्येही नजराणा म्हणून अर्पण केली ॥ ३७ ।। म. १५ Page #125 -------------------------------------------------------------------------- ________________ ११४) महापुराण (२८-३८ श्यामाङगीरनभिव्यक्तरोमराजीस्तनूदरीः । परिधानोकृतालोलपल्लवव्यक्तसंवृतीः ॥ ३८ चमरीबालकाविद्धकबरीबन्धबन्धुराः । फलिनीफलसन्दृब्धमालारचितकण्ठिकाः ॥ ३९ कस्तूरिकामृगाध्यासवासिताः सुरभीम॒दः । सञ्चिन्वतीर्वनाभोगे प्रसाधनजिघृक्षया ॥ ४० पुलिन्दकन्यकाः सैन्यसमालोकनविस्मिताः । अव्याजसुन्दराकारा दूरादालोकयत्प्रभुः ॥ ४१ चमरीबालकान्केचित्केचित्कस्तूरिकाण्डकान् । प्रभोरूपायनीकृत्य ददृशुर्लेच्छराजकाः ॥ ४२ तत्रान्तपालदुर्गाणां सहस्राणि सहस्रशः । लब्धचक्रधरादेशः सेनानीः समशिधियत् ॥ ४३ अपूर्वरत्नसन्दर्भः कुप्यसारधनैरपि । अन्तपालाः प्रभोराज्ञां सप्रणामरमानयन् ॥ ४४ ततो विदूरमुल्लङध्य सोऽध्वानं सहसेनया। गङगाद्वारमनुप्रापत्स्वमिवालङध्यमर्णवम् ॥ ४५ बहिःसमुद्रमुद्रिक्तं द्वैप्यं निम्नोपगं जलम् । समुद्रस्येव निष्यन्दमब्धेराराद्वयलोकयत् ॥ ४६ ज्यांचे अवयव सावळ्या रंगाचे आहेत, ज्यांचे पोट कृश असून त्यावरील रोमपंक्ति अव्यक्त आहे, ज्यानी आपल्या अंगावर चंचलपाने वस्त्राप्रमाणे धारण केली असल्यामुळे ज्याच्या शरीराचे आच्छादन स्पष्ट दिसत आहे, ज्यानी आपले केस चमरीमृगाच्या केसानी बांधले असल्यामुळे ज्या फार सुंदर दिसत आहेत व ज्यानी गुंजा गुंफून त्यांच्या माळा आपल्या गळ्यात धारण केल्या आहेत, कस्तूरी मृगाच्या बसण्याने जिला सुगंध प्राप्त झाला आहे अशी माती आपल्याला भूषित करण्यासाठी वनाच्या एका भागात ज्या गोळा करीत आहेत, सैन्याला पाहून ज्या आश्चर्ययुक्त झाल्या आहेत, ज्यांचा आकार स्वाभाविक सुन्दर आहे अशा भिल्लांच्या तरुण मुलींना भरतराजाने दुरून पाहिले ॥ ३८-४१ ।। कांही म्लेंच्छ राजांनी (वनातील भिल्ल वगैरेचे राजे) कस्तुरी मृगांचे नजराणे भरत प्रभूला अर्पण करून त्यांचे दर्शन केले व कांहीनी कस्तूरीच्या काण्डकांना नजराणा म्हणून प्रभूला अर्पण केले व त्याचे दर्शन घेतले ॥ ४२ ॥ त्या गंगामुखाच्या जवळ चक्रवर्ती भरतप्रभूची आज्ञा प्राप्त करून सेनापतीने लक्षावधी किल्ले आपल्या ताब्यात घेतले ।। ४३ ।। म्लेंच्छ राजांचे जे किल्ल्यांचे रक्षक होते त्यांनी उत्कृष्ट रत्नांचे ढीग व रेशमी वस्त्रे, चंदनादिकांचे नजराणे नृपेश्वर भरताला प्रणामपूर्वक अर्पण केले व अशा रीतीने त्यांचा सन्मान केला ॥ ४४ ।। तदनंतर आपल्या सेनेला बरोबर घेऊन भरतेशाने दूरचा मार्ग उल्लंधिला व आपल्या प्रमाणे अलङध्य अशा समुद्राच्याजवळ असलेल्या गंगाद्वाराला तो प्राप्त झाला ।। ४५ ॥ गंगेच्या मुखाजवळ अधिक झाल्यामुळे समुद्राच्या बाहेर द्वीपसंबंधी खोलगट प्रदेशात पसरलेले गंगेचे पाणी जणु समुद्राचा प्रवाह आहे अशा त्याला भरतेशाने दूरून पाहिले ।। ४६ ॥ Page #126 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-५४) महापुराण (११५ वर्षारम्भो युगारभ्भे योऽभूत्कालानुभावतः । ततः प्रभृति संवृद्धं जलं द्वीपान्तमावृणोत् ॥ ४७ मलङध्यत्वान्महीयस्त्वाद्वीपपर्यन्तवेष्टनात् । द्वैप्यमम्बु समुद्रिक्तमभादुपसमुद्रताम् ॥ ४८ पश्यन्नुपसमुद्रं तं गत्वा सुखपथेन सः । गङगोपवनवेद्यन्तभागे सैन्यमवीविशत् ॥ ४९ वेदिकातोरणद्वारमस्ति तत्रोत्तरं महत् । शनस्तेन प्रविश्यान्तर्वणं सैन्यं न्यविक्षत ॥ ५० तत्र वास्तुवशादस्य किञ्चित्सङकुचितायतः । स्कन्धावारनिवेशोऽभूदलाध्यव्यूहविस्तृतिः ॥५१ नन्दनप्रतिमे तस्मिन् वने रुद्धातपाङघ्रिपे । गङगाशीतानिलस्पर्शस्तबलं सुखमावसत् ॥ ५२ तस्मिन्पौरुषसाध्येऽपि कृत्ये दैवं प्रमाणयन् । लवणाब्धिजयोद्युक्तः सोऽभ्यच्छविकी क्रियाम् ॥ ५३ भधिवासितजैत्रास्त्रः स त्रिरात्रमुपोषिवान् । मन्त्रानुस्मृतिपूतात्मा शुचितल्पोपगः शुचिः ॥ ५४ कर्मभूमीच्या युगाच्या आरंभसमयी कालाच्या सामर्थ्याने जी जलवृष्टि झाली तेव्हांपासून समुद्राचे पाणी वाढत गेले व ते द्वीपाच्या अन्तभागापर्यन्त व्याप्त झाले ॥ ४७ ।। ते समुद्रापासून बाहेर आलेले पाणी तरून जाण्याला अशक्य व महाविस्ताराचे झाले व द्वीपाच्या शेवटच्या प्रदेशाला त्याने वेढून टाकिले आहे. ते द्वीपाला वेढणारे पाणी अधिक झाल्यामुळे उपसमुद्राच्या अवस्थेला पोहोचले आहे ।। ४८ ॥ त्या उपसमुद्राला भरतेशाने पाहिले व सुखकर मार्गाने जाऊन गंगेच्या उपवनवेदिकेच्या अन्तभागात सैन्याला त्याने नेले ॥ ४९ ॥ तेथे उत्तरेला मोठे वेदिकेचे तोरणद्वार आहे व त्या तोरणद्वाराने प्रवेशून त्याच्या उपवनात आपले सर्व सैन्य भरतेशाने स्थापिले ।। ५० ॥ तेथे जागेच्या संकोचामुळे भरतेशाच्या सैन्याचा तळ काहीसा संकुचितपण लांबीने विस्तृत असा झाला व त्या सेनेच्या विस्ताराला कोणी उल्लंघू शकत नसे ।। ५१ ॥ ते वन इन्द्राच्या नन्दनवनाप्रमाणे होते व तेथील वृक्षांच्या दाट सावलीनी सूर्याचा आताप बिलकुल प्रवेश करीत नसे. अशा वनात गंगानदीच्या थंड वान्याच्या स्पर्शाने भरतेशाचे सैन्य सुखाने राहिले ।। ५२ ॥ ते दिग्विजयाचे कार्य पौरुषसाध्य असताही देव हेच शुभ प्राप्तीला कारण आहे असे मानणाऱ्या भरतेश्वराने लवणसमुद्रावर विजय मिळविण्यास उद्युक्त होऊन कांहीं दैविकक्रिया करण्याचा विचार मनात आणला ॥ ५३ ॥ भरतेशाने जय प्राप्त करून देणारी अस्त्रे मंत्रानी सुसंस्कृत केली. तीन दिवसपर्यन्त उपोषणे केली. मंत्राच्या वारंवार स्मरणाने स्वतःचा आत्मा त्याने पवित्र केला व पवित्र शय्येवर तो पवित्र राजा झोपला ।। ५४ ॥ Page #127 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२८-५५ सायंप्रातिकनिःशेषकरणीये समाहितः । पुरोधोऽधिष्ठितः पूजां स व्यधात्परमेष्ठिनाम् ॥ ५५ सोनन्यं बलरक्षायै नियोज्य विधिवद्विभुः । प्रतस्थे धृतदिव्यास्त्रो जिगीषुलवणाम्बुधिम् ॥ ५६ प्रतिग्रहापसारादिचिन्ताभून्नास्य चेतसि । विलिलङ्घयिषोरब्धिमहो स्थैर्य महात्मनाम् ॥ ५७ अजितञ्जयमारुक्षद्रथं दिव्यास्त्रसंभृतम् । योजितं वाजिभिदिव्यर्जलस्थलविलअधिभिः ॥ ५८ पत्रश्यामरथं प्रोच्चश्चलच्चकाङ्ककेतनम् । तमूहर्जवना वाहा दिव्यसव्येष्टचोदितम् ॥ ५९ ततोऽस्मै दत्तपुण्याशीः पुरोधा घृतमङ्गलम् । त्वं देव विजयस्वेति स इमामृचमापठत् ॥ ६० जयन्ति विधुताशेषबन्धना धर्मनायकाः। त्वं धर्मविजयी भूत्वा तत्प्रसादाज्जयाखिलम् ॥ ६१ सन्स्यब्धिनिलया देवास्त्वद्भुक्त्यन्तनिवासिनः । तान्विजेतुमयं कालस्तवेत्युच्चर्जुघोष च ॥ ६२ ___ संध्याकाळची व सकाळची सर्व कार्ये करण्यात तत्पर अशा भरतेशाने पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे पंच परमेष्ठींची पूजा केली ।। ५५ ॥ यानंतर सेनापतीला सैन्याच्या रक्षणासाठी विधीपूर्वक नेमून व दिव्य अस्त्र धारण करून लवणसमुद्राला जिंकण्याच्या इच्छेने प्रभु भरताने प्रयाण केले ॥ ५६ ।। समुद्राला उल्लंघून जाण्याची इच्छा करणाऱ्या या भरतराजाच्या मनात कोणत्या वस्तु स्वीकाराव्यात व कोणत्या त्यागाव्यात याचा विचार मुळीच उत्पन्न झाला नाही. हे थोर मनाच्या महात्म्यांचे विलक्षण धैर्य आहे ।। ५७ ।। जलप्रदेश व स्थलप्रदेश उल्लंघण्याचे सामर्थ्य असलेले दिव्य घोडे ज्याला जुंपले आहेत, जो दिव्यास्त्रांनी भरलेला आहे अशा अजितंजय नामक रथावर भरतेश बसले ॥ ५८ ॥ दिव्य सारथ्याने ज्याला चालविले आहे, जो चक्राच्या ध्वजाने युक्त आहे अर्थात् ज्याचा चक्रचिह्नाने युक्त असा ध्वज फडफडत आहे, ज्याचे घोडे पानाप्रमाणे हिरवे आहेत भशा त्या रथाला वेगवान् घोडे वाहून नेऊ लागले ॥ ५९ ॥ यानन्तर प्रस्थानसमयी ज्याने मंगलकृत्य केले आहे, अशा भरतेशाला ज्याने पुण्याशीर्वाद दिला आहे, असा तो पुरोहित हे राजन् तुझा विजय होवो असे म्हणून पुढील ऋचा स्याने याप्रमाणे म्हटली ।। ६० ।। __ ज्यांनी सर्व कर्मबन्धनें तोडून टाकली आहेत, जे धर्माचे नायक आहेत असे तीर्थंकर सर्वात महान् उत्कर्षाला प्राप्त झालेले आहेत अशा त्यांच्या प्रसादाने हे राजन् तू धर्मविजयी हो व सर्व जगाला जिंक ॥ ६१ ॥ हे राजन्, समुद्रात राहणारे देव हे तू ज्याचा उपभोग घेत आहेस त्याच देशात राहतात. यास्तव त्यांना जकण्याचा हाच काल योग्य आहे. असे म्हणून त्याने मोठी घोषणा केली ।। ६२ ।। Page #128 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-६१) महापुराण (११७ ततः कतिपयैरेव नायकैः परिवारितः । जगतीतलमारुक्षद्गङ्गाद्वारस्य चक्रभृत् ॥ ६३ न केवलं समुद्रान्तःप्रवेशद्वारमेव तत् । कार्यसिद्धरपि द्वारं तदमस्त रथाङगधृत् ॥ ६४ धृतमडगलवेषस्य तद्वद्यारोहणं विभोः । विजयश्रीसमुद्वाहवेद्यारोहणवद्बभौ ॥ ६५ मद्गृहाङगणवेदीयं जगतीति विकल्पय न् । वृशं व्यापारयामास कुल्याबुद्धचा महोदधौ ॥ ६६ स प्रतिज्ञामिवारूढो जगतीं तां महायतीम् । निस्तीर्णमिव तत्पारं पारावारमजीगणत् ॥ ६७ मुहुः प्रचलदुद्वेलकल्लोलमनिलाहतम् । विलङ्घनभयादुच्चैः फूत्कुर्वन्तमिवारवैः ॥ ६८ वीचीबाहुभिरुन्मुक्तः सरत्नः सीकरोत्करैः । पाद्यं स्वस्येव तन्वानं मौक्तिकाक्षतमिश्रितैः ॥ ६९ असङख्यशङ्खमाक्रान्तविश्वद्वीपमपारकम् । परैरलाध्यमक्षोभ्यं स्वबलौघानुकारिणम् ॥ ७० ....................................... यानन्तर कित्येक वीरनायकपुरुषांना बरोबर घेऊन, चक्रवर्ती गंगाद्वाराजवळच्या भूमीवर आला ।। ६३ ॥ ते गंगाद्वार फक्त समुद्रात प्रवेश करण्याचेच द्वार आहे असे नाही तर ते माझ्या कार्यसिद्धीचेही द्वार आहे असे चक्रवर्तीने मानले. चक्रवर्तीने मंगलवेष धारण केला व त्या गंगाद्वाराच्या वेदीवर आरोहण केले तेव्हां विजयलक्ष्मीबरोबर विवाह करण्याकरिता जणु बोहल्यावर तो चढला आहे असा शोभू लागला ॥ ६४-६५ ॥ ही वेदी माझ्या घरातील अंगणाचा कट्टा आहे असे मानून समुद्राकडे त्याने आपली दृष्टि टाकली व हा माझ्या अंगणातील लहानसा जलप्रवाह आहे असे मानले ॥ ६६ ।। त्या अन्तवेदीच्या विस्तृत भूमीवर चढलेल्या भरतेशाने जणु समुद्र जिंकण्याच्या प्रतिज्ञेवर आरोहण केले आहे असे भासले व मी हा समुद्र तरून त्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर मी पोहोचलो आहे असे मानले ॥ ६७ ।। भरतेशाने गंगाद्वाराच्या वेदीवरून समुद्र पाहिला. वान्याच्या आघाताने या समुद्राच्या चंचल लाटा किना-यावर आदळत होत्या व भरतेश मला उल्लंघील म्हणून भयाने आपल्या गर्जनांनी जणु तो फुत्कार टाकीत होता ।। ६८ ।। तरंगरूपी बाहूंनी जलबिंदुसमूहासह तो समुद्र मोतीरूपी अक्षतांनी युक्त अशा रत्नांनी भरतेशाचे पाय धूत आहे असे वाटत होते ॥ ६९ ॥ तो समुद्र असंख्य शंखांनी युक्त होता. त्याने सर्व द्वीपांना घेरले होते. तो पाररहित होता, इतराकडून तो अलंध्य होता व क्षोभरहित असल्यामुळे भरताच्या सैन्यसमूहाचे अनुकरण करीत होता. भरतसैन्यही असंख्य महाशंखांना वाजवीत असे व त्याने सगळया द्वीपांना वेढले आहे, व तें अपार आहे, शत्रुसैन्याने तें उल्लंधिले जात नव्हते व क्षुब्ध-घाबरे होत नव्हते ॥ ७० ॥ Page #129 -------------------------------------------------------------------------- ________________ ११८) महापुराण (२८-७१ उत्फेनज़म्भिकारम्भैः सापस्मारमिवोल्बणम् । केनाप्यशक्यमाधर्तुं क्वचिदप्यनवस्थितम् ॥ ७१ अकस्मादुच्चरद्ध्वानमनिमित्तचलाचलम् । अकारणकृतावर्तमतिसङकुसुकस्थितिम् ॥ ७२ हसन्तमिव फेनोत्थैर्लसन्तमिव वीचिभिः । चलन्तमिव कल्लोलाद्यन्तमिव घृणितैः ॥ ७३ सरत्नमुल्बणविषं मुक्तसूत्कारभीकरम् । स्फुरत्तरङगनिर्मोकं स्फुरन्तमिव भोगिनम् ॥ ७४ अत्यम्बुपानादुद्रिक्तप्रतिश्यायमिवाधिकम् । क्षुतानीव विकुर्वाणं ध्वनितानि सहस्रशः ॥ ७५ मायूनमसकृत्पीतविश्वस्रोतस्विनीरसम् । रसातिरेकादुद्गारं तन्वानमिव खात्कृतः ॥ ७६ निजगम्भीरपातालमहाग पदेशतः। अतृप्यन्तमिवाम्भोभिरातालविवृताननम् ॥ ७७ विशां रावणमाक्रान्त्या चलग्राहं बिभीषणम् । रक्षसामिव सम्पातमतिकायं महोदरम् ॥ ७८ जसे अपस्मार-फेफरे रोगाने पीडित रोगी वारंवार फेसानीसहित जांभया देतो तसा हा समुद्र फेससहित तरंगानी युक्त आहे, जसा अपस्मार रोगी कोणाकडून पकडला जात नाही तसा हा समुद्रही कोणाकडून रोकला जात नाही, अडविला जात नाही. जसा अपस्मार रोगी कोठेही स्थिर राहत नाही तसा हा समुद्र स्थिर नव्हता, नेहमी त्यात चंचलपणा होता ।। ७१॥ या समुद्रात अकस्मात् गर्जना होत असे व कारणावाचून चंचलता उत्पन्न होत असे. कारणावाचून त्यात भोवरे उत्पन्न होत असत. यामुळे त्याचा अस्थिर स्वभाव प्रकट होत होता ।। ७२ ॥ फेसांनीसहित तरंगामुळे तो हसत आहे व नाचत आहे असे वाटत होते व मोठ्या लाटांनी तो धावत आहे व गर्जनांनी तो उन्मत्ताप्रमाणे वाटत होता ॥ ७३ ।। ज्याच्या फणावर रत्न आहे व ज्याच्या ठिकाणी तीव्र विष आहे व फुत्कार सोडीत असल्यामळे जो भीति उत्पन्न करतो आणि चमकणाच्या तरङ्गाप्रमाणे ज्याच्यावर कात आहे अशा फुरफुरणान्या सप्रिमाणे हा लवणसमुद्र आहे. अर्थात् हा समुद्रही रत्नांनी युक्त आहे व पुष्कळ विष-पाणी यात आहे. हा सू सू असा शब्द करतो, याचे तरङ्ग सर्पाच्या कांतीप्रमाणे चमकतात ।। ७४ ।। अथवा या समुद्राला अतिशय पाणी प्याल्यामुळे जणु पडसे आले आहे व त्यामुळे शिंकाप्रमाणे हा हजारो वेळा आवाज करीत आहे असे वाटते ।। ७५ ।। __ अथवा हा समुद्र अतिशय खादाड मनुष्याप्रमाणे आहे. अर्थात् त्याच्याप्रमाणे सगळ्या नद्यांचे पाणी हा पीत असतो. तो मनुष्य अतिशय अन्न खाऊन वारंवार ढेकरा देतो तसा हा अतिशय पाण्यामुळे वारंवार खात्कार करतो म्हणजे वारंवार शब्द करतो ।। ७६ ॥ हा समुद्र आपल्या गंभीर पातालरूपी मोठ्या पोटाच्या मिषाने पुष्कळ पाण्याने ही जणु अतृप्त झाल्यामुळे टाळूपर्यन्त त्याने आपले तोंड पसरले आहे असा दिसतो ।। ७७ ।। तो समुद्र संपूर्ण दिशामध्ये व्याप्त होऊन शब्द करीत होता म्हणून रावण होता. त्याने अनेक पर्वत आपल्या पाण्यात बुडविले होते म्हणून तो अचलग्राह होता. तो सर्व जीवांना Page #130 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-८३) महापुराण वीचिबाहुभिराघ्नन्तमजस्रं तटवेदिकाम् । समर्यादत्वमाहत्य श्रावयन्तमिवात्मनः ॥ ७९ चलद्भिरचलोदग्रैः कल्लोलैरतिवर्तनम् । सरिद्युवतिसम्भोगादसम्मान्तमिवात्मनि ॥ ८० तरङगिततनुं वृद्धं पृथुकं व्यक्तरङगितम् । सरन्तमतिकान्ताङ्गं सग्राहमतिभीषणम् ॥ ८१ लावण्येऽपि न सम्भोग्यं गाम्भीर्येऽप्यनवस्थितम् । महत्त्वेऽपि कृताक्रोशं व्यक्तमेव जलाशयम् ॥ ८२ न चास्य मदिरासङगो न कोऽपि मदनज्वरः । तथाप्युद्रिक्तकन्दर्प मारूढमधुविक्रियम् ॥ ८३ ( ११९ भय उत्पन्न करीत होता म्हणून बिभीषण होता. तो अत्यन्त मोठा होता व गंभीर होता म्हणून महोदर होता. या प्रकारे तो असा दिसत होता की, जणु राक्षसांचा समूहच आहे ॥ ७८ ॥ तो समुद्र आपल्या तरङ्गरूपी बाहूंनी वारंवार तटाच्या वेदिकेला धक्के देऊन जणु आपला मर्यादितपणा तिला तो ऐकवीत आहे ।। ७९ ।। तो समुद्र पर्वताप्रमाणे उंच अशा आपल्या लाटांनी किनान्याचे उल्लंघन करीत होता. जणु नद्यारूपी तरुणींच्या संभोगाने तो स्वतःमध्ये मावत नाही असे वाटत होते ॥ ८० ॥ त्याच्या ठिकाणी अनेक तरंगरूपी सुरकुत्या उत्पन्न झाल्यामुळे तो वृद्ध पुरुषाप्रमाणे दिसत होता. अथवा पुष्कळ तरंगांनी तो खूप वाढल्याप्रमाणे दिसत होता. अथवा तो समुद्र एखाद्या पृथुक - बालकासारखा दिसत होता अथवा पृथु- पुष्कळ कं पाणी ज्यात आहे असा दिसत होता जसे बालक पृथ्वीवर आपल्या गुडघ्यानी रांगत असते तसे हा समुद्र लहरींनी सरकत होता. जसे बालक नेहमी अतिशय सुन्दर अंगाचे दिसते तसे हा समुद्रही अतिशय कान्ताङ्ग-सुंदर अंगाचा होता. तो समुद्र सुग्राह- मगरमत्स्यादिकांनी युक्त असल्यामुळे अतिशय भीषण - भयंकर होता ।। ८१ ।। त्या समुद्रात लावण्य-सौन्दर्य असूनही ते उपभोग योग्य नव्हते. अर्थात् त्याच्या ठिकाणी लावण्य - खारटपणा असल्यामुळे तो भोगण्यास योग्य नव्हता. त्याच्या ठिकाणी गंभीरता असूनही तो अनवस्थित होता, चंचल होता. त्याच्या ठिकाणी महत्त्व मोठेपणा होता पण नेहमी आक्रोश करीत होता, गर्जना करीत होता, म्हणून तो स्पष्टपणे जलाशय होता. फार मोठ्या पाण्याचा साठा त्याच्याजवळ होता अथवा तो स्पष्टपणे जलाशय-जडाशय - मूर्खपणाचे अस्तित्वानेयुक्त होता ॥ ८२ ॥ या समुद्राला मदिरासंग मद्याचा स्पर्श झाला नव्हता व याला कोणता मदनज्वरही नव्हता. तथापि तो उद्रिक्त कन्दर्प- अधिक मदन बाधेने युक्त होता हा विरोध आहे. पण परिहार असा - हा समुद्र आरूढ मधुविक्रियः मधु-पुष्परसाच्या विकाराला धारण करीत होता अथवा मधु-मनोहर वि जलपक्ष्यांची क्रिया धारण करीत होता व हा समुद्र मदनज्वराने युक्त असूनही उद्रिक्त कन्दर्प होता, अतिशय कामविकाराने रहित होता. याचा दुसरा अर्थ - उद्रिक्तवाढला आहे कं-पाण्याचादर्प- अहंकार तो ज्याला अधिक आहे असा हा समुद्र आहे ॥ ८३ ॥ Page #131 -------------------------------------------------------------------------- ________________ १२०) महापुराण (२८-८४ अनाशितंभवं पीत्वा सुस्वादु सरितां जलम् । गतागतानि कुर्वन्तं सन्तोषादिव वीचिभिः ॥ ८४ नदीवधूभिरासेव्यं कृतरत्नपरिग्रहम् । महाभोगिभिराराध्यं चातुरन्तमिव प्रभुम् ॥ ८५ यादोदोर्घातनिर्दूतैर्दूरोच्छलितशीकरः । सपताकमिवाशेषशेषार्णवविनिर्जयात् ॥ ८६ कुलाचलपृथुस्तम्भजम्बूद्वीपमहौकसः । विनीलरत्ननिर्माणमेकं शालमिवोत्थितम् ॥ ८७ अनादिमस्तपर्यन्तमखिलावगाहिनम् । गम्भीरशम्दसन्दर्भ श्रुतस्कन्धमिवापरम् ॥८८ नित्यप्रवृत्तशब्दत्वाद्रव्याथिकनयाश्रितम् । वीचीनां क्षणभङगित्वात्पर्यायनयगोचरम् ॥ ८९ नित्यानुबद्धतृष्णत्वाच्छश्वज्जलपरिग्रहात् । गुरूणां च तिरस्कारात्किराजानमिवान्वहम् ॥ ९० __ जे कितीही प्याले तरी तृप्ति होत नाही असे नद्यांचे अतिशयस्वादु पाणी पिऊन हा समुद्र संतोषाने जणु तरंगाच्याद्वारे इकडे तिकडे फिरत आहे असे वाटते ॥ ८४ ।। नद्या याच कोणी स्त्रिया-नद्यारूपी स्त्रिया ज्याची सेवा करीत आहेत, ज्याच्याजवळ पुष्कळ रत्ने आहेत व ज्याची मोठमोठे भोगी-(सर्प व मित्रसमूह) आराधना सेवा करतात असा जणु सार्वभौम राजा आहे असा तो समुद्र दिसत होता ॥ ८५ ॥ क्रूर असे सुसर मगर वगैरे जलचरांच्या बाहूंच्या आघातांनी उंच उडत असलेल्या पाण्याच्या तुषारानी हा समुद्र बाकीच्या कालोद, क्षीरोदादि समुद्राना जिंकल्यामुळे जणु हातात जयध्वज धरल्याप्रमाणे दिसत आहे ॥ ८६ ॥ हिमवदादिक जे कुल पर्वत हेच जणु ज्याचे मोठे खांब आहेत असा जो जम्बूद्वीपरूपी महाप्रासाद त्याचा हा समुद्र नीलरत्नांनी जो बनविला आहे असा जणु हा उंच तट आहे असा भासत आहे ॥ ८७ ॥ अथवा हा लवण समुद्र जणु दुस-या श्रुतस्कन्धाप्रमाणे भासत आहे. जसा श्रुतस्कंध अनादि व अनिधन आहे तसा हा समुद्रही अनादि अनिधन आहे. जसा श्रुतस्कंध जीवादिक पदार्थाचे अवगाहन-सांगोपांग वर्णन करतो तसे हा समुद्रही सर्व पदार्थांचा प्रवेश आपल्यामध्ये करीत आहे. जसा श्रुतस्कंध गंभीर शब्दाच्या रचनेने युक्त आहे तसा हा समुद्र गंभीर शब्दानीगर्जनानी युक्त आहे ।। ८८ ॥ जसे द्रव्याथिक नय वस्तूंच्या नित्य धर्माचे वर्णन शब्दानी करीत असतो तसा हा समुद्र नित्य शब्दांनी प्रवृत्ति करितो अर्थात् नित्य गर्जना करीत असतो. जसा पर्यायार्थिकनय पर्यायांची क्षण नश्वरता सांगतो तसे या समुद्राच्या लहरी क्षणपर्यन्त राहून नाश पावत होत्या. त्यामुळे हा समुद्र पर्यायनयाचाही विषय बनलेला होता ।। ८९ ॥ हा समुद्र दुष्ट राजाप्रमाणे दिसत होता. दुष्टराजा नेहमी द्रव्याच्या तृष्णेने युक्त असतो व हा समुद्रही नेहमी तृष्णेने युक्त आहे कारण हा नेहमी अनेक नद्यांचे पाणी ग्रहण करीत असतो. दुष्ट राजा गुरु-वृद्ध अनुभवी लोकांच्या सल्ल्याचा तिरस्कार करतो. हा समुद्रही गुरु वजनदार पदार्थांना बुडवितो म्हणून दुष्ट राजाप्रमाणे आहे ॥ ९० ।। Page #132 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-९६) महापुराण (१२१ ससत्वमतिगम्भीरं भोगिभिर्धृतवेलकम् । सुराजानमिवात्युच्चैर्वृत्ति मर्यादया धृतम् ॥ ९१ अनेकमन्तरद्वीपमन्तर्वतिनमात्मनः । दुर्गदेशमिवाहायं पालयन्तमलङ्घनः ॥ ९२ गर्जद्भिरतिगम्भीरं नभोव्यापिभिरूजितः । आपूर्यमाणमम्भोभिर्घनौधः किङ्करैरिव ॥ ९३ रिङगितैश्चलितः क्षोभैरुत्थितैश्च विवर्तनः । ग्रहाविष्टमिवोज्जम्भं सध्वानं च सधूणितम् ॥ ९४ रत्नांशुचित्रिततलं मुक्ताशबलितासम् । ग्राहैरध्यासितं विष्वक सुखालोकं च भीषणम् ॥ ९५ नदीनं रत्नभूयिष्ठमप्राणं चिरजीवितम् । समुद्रमपि चोन्मुद्रं झषकेतुममन्मथम् ॥ ९६ हा लवणसमुद्र सुस्वभावी राजाप्रमाणे आहे. उत्तम राजा ससत्त्व-पराक्रमी बलशाली व सत्वगुणाने सहित असतो, हा समुद्रही ससत्त्व-जलचरप्राण्यानी युक्त आहे. उत्तम राजा अतिशय गंभीर-दूरवर विचार करणारा असतो. हा समुद्रही गंभीर-अतिशय खोल आहे. उत्तम राजाजवळ अनेक भोगीलोक अनेक राजे व श्रीमंत लोक असतात. हा समुद्र देखील आपल्या किना-यावर अनेक भोगीनी-सर्पानी युक्त आहे. उत्तम राजाचे वागणे मर्यादेने युक्त असते व हा समुद्रही उत्तम मर्यादेने युक्त होता व त्याचे पाणी हवेमुळे उंच उसळत होते ॥ ९१ ॥ हा समुद्र आपल्या मध्यभागी असणाऱ्या अनेक अन्तर्वीपांचे रक्षण करीत होता व अलङध्य आणि हरण करण्यास जिंकण्यास अशक्य अशा किल्ल्याप्रमाणे त्यांचे पालन करीत होता ।। ९२ ।। जे अतिशय गंभीर गर्जना करीत आहेत, जे आकाशात व्यापून पसरलेले आहेत व आपल्या विपुल पाण्यानी सेवकाप्रमाणे ज्याला भरीत आहेत अशा उत्कृष्ट मेघानी हा समुद्र युक्त होता ॥ ९३ ॥ हा समुद्र ज्याला पिशाचबाधा झाली आहे अशा मनुष्याप्रमाणे भासत आहे. अर्थात् तो मनुष्य जमिनीवर लोळतो, वारंवार झिंगतो, खवळतो, वारंवार उठतो आणि गरगर फिरतो, तसे हा समुद्रही आपल्या लहरींनी रांगत आहे, चंचल होत आहे, क्षुब्ध व वारंवार उसळत आहे व कधी इकडे तर कधी तिकडे फिरत आहे. पिशाचपीडित मनुष्य जसा वारंवार जांभया देतो, बडबडतो व घुमतो तसा हा समुद्र वारंवार शब्द करीत वर उसळतो आणि वायूने थरथर कापतो ।। ९४ ।। या समद्राचा तळभाग रत्नांच्या किरणांनी अनेक रंगांचा बनला आहे व याचे पाणी मोत्यांनी मिश्रित झाले आहे. अशा या समुद्राचे दर्शन सुखदायक आहे असे वाटते. पण मगर वगैरे क्रूर जीवानी हा युक्त असल्यामुळे भयंकरही वाटत आहे ।। ९५ ।। समुद्र हा सर्व नद्यांचा पति आहे व अनेक रत्नांनी खूप भरलेला आहे. हा अप्राण-प्राण रहित असूनही दीर्घकालच्या जीविताने युक्त आहे हा विरोध आहे. याचे निरसन असे-हा अप्प्राण भप-पाणी हेच ज्याचे प्राण आहेत असा आहे. समुद्र-मुद्रासहित असून ही उन्मुद्र आहे. विरोधपरिहार-उम्मद्र-उत्कृष्ट आनंदाला देणारा आहे. झषकेतु- मासा ज्याचा ध्वज आहे असा असूनही तो मन्मथ नाही हे विरुद्ध आहे. परिहार-माशांचे समुद्र उत्पत्ति स्थान आहे म्हणून तो अमन्मथ-मदन नव्हे ॥ ९६ ॥ म.१६ Page #133 -------------------------------------------------------------------------- ________________ १२२) महापुराण (२८-९७ अदृष्टपारमक्षोभ्यमसंहार्यमनुत्तरम् । सिद्धालयमिव व्यक्तमव्यक्तममृतास्पदम् ॥ ९७ 'क्वचिन्महोपलच्छायाधृतसन्ध्याभ्रविभ्रमम् । कृतान्धतमसारम्भं क्वचिन्नीलाश्मरश्मिभिः ॥ ९८ हरिन्मणिप्रभोत्सः क्वचित्सन्दिग्धर्शवलम् । क्वचिच्च कोडकुमी कान्ति तन्वानं विद्रुमाजकुरैः ॥९९ क्वचिच्छक्तिपुटोद्धदसमृच्छलितमौक्तिकम् । तारकानिकराकोणं हसन्तं जलभृत्पथम् ॥ १०० वेलापर्यन्तसम्मूछेत्सर्वरत्नांशुशीकरैः । क्वचिदिन्द्रधनुर्लेखां लिखन्तमिव खासगणे ॥ १०१ रथाङगपाणिरित्युच्चैः सम्भृतं रत्नकोटिभिः । महानिधिमिवापूर्वमपश्यन्मकरालयम् ॥ १०२ दृष्ट्वाथ तं महाभागः कृतधोरनिःस्वनम् । दृष्ट्वैवातुलयच्चक्री गोष्पदावज्ञयार्णवम् ॥ १०३ ...................... तो समुद्र स्पष्टरीतीने सिद्धालयासारखा वाटत असे. सिद्धालयाचा पार जसा दिसत नाही तसा समुद्राचा पारही दिसत नाही. सिद्धालय जसे अक्षोभ्य आहे आकुलतारहित आहे तसे हाही अक्षोभ्य कोणाकडून ढवळला जात नाही, मळकट केला जात नाही. सिद्धालय असंहार्यज्यांचा संहार कोणाकडून केला जात नाही. विनाश ज्याचा कोणीही करू शकत नाही असे आहे व हा समुद्रही असंहार्य आहे. त्याचा कोणाकडून नाश केला जात नाही. सिद्धालय अनुत्तर आहे. अत्यत्कृष्ट आहे व हा समद्रही अनत्तर-ज्याला कोणी तरून जाऊ शकत नाही असा आहे. सिद्धालय व्यक्त-सकलगुण परिपूर्ण आहे. पण पूर्णतया छद्मस्थांना गम्य नाही. म्हणून अव्यक्तही आहे. हा समुद्रही नेत्रांना दिसतो म्हणून व्यक्त आहे पण त्याचे स्वरूप नेत्रांना सर्व व्यक्त नाही म्हणून अव्यक्त आहे व सिद्धालय अमृतास्पद आहे- मोक्षाचे स्थान आहे व हा समुद्र अमृतजलाचे स्थान आहे ॥ ९७ ।। हा समुद्र कोठे कोठे पद्मरागमण्यांच्या कान्तीनी सन्ध्याकालीन मेघाची शोभा धारण करीत आहे व कोठे कोठे नीलमण्यांची कान्ति पसरल्यामुळे दाट अग्धकाराला निर्मित आहे असा भासतो ॥ ९८ ।। हिरव्या पाचू रत्नांची कान्ति वर पसरल्यामुळे हा समुद्र कोठे कोठे शेवाळच्या प्रदेशाची शंका उत्पन्न करीत आहे व कोठे कोठे पोवळ्यांच्या अंकुरानो केशराची लाल कान्ति वाढवित आहे ।। ९९ ॥ या समुद्राच्या काही प्रदेशात शिंपल्यांचे जोड उघडल्यामुळे आतून बाहेर पडलेली मोत्ये विखुरली होती त्यामुळे ते प्रदेश चांदण्यांच्या समूहानी व्याप्त झालेल्या मेघांच्या मार्गाला-आकाशाला जणु हसत आहेत असे भासत होते ।। १०० ॥ स्वतःच्या किनाऱ्यापर्यन्त पसरलेल्या अनेक रत्नांच्या किरणानी काही ठिकाणी आकाशात इन्द्र-धनुष्यांच्या पंक्तींची शोभा या समुद्राने चित्रित केली होती ।। १०१ ॥ कोट्यवधि रत्नांचे मोठे ढीग जेथे पसरले आहेत अशा जणु अपूर्व महानिधिप्रमाणे असलेल्या समु ला भरतेशाने पाहिले ।। १०२ ॥ Page #134 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-१११) महापुराण (१२३ ततोऽभिमतसंसिख कृतसिद्धनमस्क्रियः । रथं प्रचोदयेत्युच्चः प्राजितारमचोदयत् ॥ १०४ विमुक्तप्रग्रहैवहिरह्यमानो मनोजवैः । लवणान्धी व्रतं प्रायाखानपात्रायितो रथः ॥ १०५ रथो मनोरथात्पूर्व रथात्पूर्व मनोरथः । इति संभाव्यवेगोऽसौ रथो वाद्धि व्यगाहत ॥ १०६ जलस्तम्भः प्रवृत्तो न जलं नु स्थलतां गतम् । स्यन्दनं यदसौ वाहा जले निन्यः स्थलास्थया ॥१०७ तथैव चऋचीत्कारस्तथैवाश्वः प्रधौरितम् । यथा बहिर्जलं पूर्वमहो पुण्यं रथाङगिनः ॥ १०८ महद्भिरपि कल्लोलैः सिच्यमानास्तुरङगमाः। रथं निन्युरनायासात्प्रत्युतैषां स विश्रमः ॥ १०९ रथचक्रसमुत्पीडाज्जलोत्पीडः समुच्छलन् । व्यधाद्ध्वजांशुके जाउचं जलानामीदृशी गतिः ॥११० नागरागस्तुरडगानामादितः श्रममितः । क्षालितः खरवेगोत्थैः केवलं शीकरैरपाम ॥ १११ यानतर महाभाग्यवान् व कृतधी-विद्वान् भरतप्रभूने गंभीर गर्जना करणान्या समुद्राला पाहिले व पाहूनच त्याने अवज्ञेने गायीच्या पावलाप्रमाणे त्याला मानिले ॥ १०३ ।। यानंतर भरतेशाने आपले इष्टकार्य सिद्ध व्हावे म्हणून सिद्धपरमेष्ठींना नमस्कार केला व रथ पढे चाल कर अशी सारथ्याला उच्चस्वराने आज्ञा केली ॥ १०४ ॥ ज्यांचे लगाम ढिले केले आहेत व ज्यांचा वेग मनाप्रमाणे आहे अशा घोड्यांनी ओढून नेलेला तो रथ लवणसमुद्रात नावेप्रमाणे शीघ्र वेगाने चालू लागला-पळू लागला ॥१०५।। भरतराजाच्या मनोर थापूर्वी रथ जातो का रथाच्या पूर्वी भरतेशाचा मनोरथ जातो याविषयी ज्याच्या वेगाचा विचार केला जात होता अशा ह्या रथाने समुद्रात प्रवेश केला ॥१०६।। या समुद्राच्या पाण्याचे रतंभन झाले काय ? अथवा पाण्याचे स्थलांत रूपान्तर झाले काय ? कारण घोड्यांनी हा भरतेशाचा रथ पाण्यात स्थल समजून नेला ॥ १०७ ।। भूमीवर रथ चालत असता जसा चाकांचा आवाज होतो तसाच आवाज पाण्यातून रथ जात असता होत होता व घोडेही जमीनीवर चालण्याचे वेगाने पाण्यात चालत होते. यावरून भरतेश्वराचे पुण्य आश्चर्यकारक होते ।। १०८॥ मोठमोठ्या लाटानी ते रथाचे घोडे भिजत होते व त्यामुळे त्यानी अनायासाने तो रथ नेला पण अंग वारंवार भिजत असल्यामुळे त्यांना विसावा मिळाल्याप्रमाणे वाटे ॥ १०९ ।। रथाच्या चाकांच्या आघाताने पाण्याचा प्रवाह वर आकाशात उडत असे व त्यामुळे रथावरच्या ध्वजाचे वस्त्र भिजून ते जड झाले व वाऱ्याने ते फडफडेनासे झाले. बरोबरच आहे की, जडाच्या संगतीने अशीच स्थिति होत असते. संस्कृत भाषेत ड आणि ल यामध्ये फरक मानीत नाहीत म्हणून 'जलानां' याच्या ऐवजी जडानां असे म्हणता येते. येथे अर्थाचा चमत्कार दाखविण्याकरिता असा फरक केला आहे ।। ११० ॥ ___घोड्यांच्या अंगावर लावलेली उटी श्रमाने उत्पन्न झालेल्या घामाने नाहीशी झाली नाही पण त्यांच्या खुरांच्या वेगापासून वर उडालेल्या पाण्याच्या तुषारानी ती उटी सर्व धुऊन गेली.।। १११॥ Page #135 -------------------------------------------------------------------------- ________________ १२४) महापुराण (२८-११२ क्षणं रथाअगसङ्गट्टाज्जलमब्धेद्विधाभवत् । व्यभावि भाविनां वर्त्म चक्रिणामिव सूत्रितम् ॥ ११२ रथोऽस्याभिमतां भूमि प्रायात्सारथिचोदितः । मनोरथोऽपि संसिद्धि पुण्यसारथिनोदितः ॥ ११३ गत्वा कतिपयान्यब्धौ योजनानि रथः प्रभोः। स्थितोऽन्तर्जलमाक्रम्य प्रस्ताश्व इव वाद्धिना ॥११४ द्विषड्योजनमागाह्य स्थिते मध्येर्णवं रथे । रथाङ्गपाणिराक्रुष्टो जग्राह किल कार्मुकम् ॥ ११५ स्फुरज्ज्यं वज्रकाण्डं तद्धनुरारोपितं यदा । तदा जीवितसन्देहदोलारूढमभूज्जगत् ॥ ११६ स्फुरन्मौर्वीरवस्तस्य मुहुः प्रध्वानयन्दिशः । प्रक्षोभमनयद्वाद्धिचलत्तिमिकुलाकुलम् ॥ ११७ संहार्यः किममष्याब्धिरुत विश्वमिदं जगत् । इत्याशडक्य क्षणं तस्थे तदानभसि खेचरः॥ ११८ वक्रेऽपि गुणवत्यस्मिन्नृजुकर्मणि कार्मुके । अमोघं सन्दधे बाणं श्लाघ्यं स्थानकमास्थितः ॥ ११९ रथाच्या चाकांच्या घर्षणामुळे समुद्राचे पाणी दुभागले जाई. जणु पुढे होणारे जे सगरादि चक्रवर्ती त्यांच्यासाठी दोरी लावून मार्ग तयार केला आहे की काय ? असे वाटलें ।। ११२॥ सारथ्याने हाकाललेला रथ भरतेशाला जे स्थान इष्ट होते तेथे जाऊन पोहोचला व पुण्यरूपी सारथ्याने प्रेरिलेल्या राजाच्या मनोरथाचीही सिद्धि झाली. इष्टस्थली रथ पोहोचल्याने राजाचे मनोरथही पूर्ण झाले ॥ ११३ ।। भरतराजाचा रथ समुद्रात कांही योजन जाऊन, पाण्यामध्ये उभा राहिला. जणु समुद्राने आक्रमण करून त्यांच्या रथाचे घोडे थांबविले होते ।। ११४ ।। तो रथ बारा योजने जाऊन समुद्रात उभा राहिला. यानंतर रागावलेल्या चक्रवर्तीने भापल्या हातात धनुष्य घेतले ॥ ११५ ॥ ज्याची दोरी चमकत आहे व ज्याचा बाण वज्राचा आहे असे धनुष्य जेव्हा चक्रवर्तीने सज्ज्य केले तेव्हां हे सगळे जगत् जीविताच्या संशयरूपी झोक्यावर आरूढ झाल्याप्रमाणे वाटले ।। ११६ ॥ चोहीकडे पसरून सर्व दिशांना दणाणून टाकणा-या त्या धनुष्याच्या दोरीच्या टंकारानी समुद्र अतिशय प्रक्षुब्ध झाला व मासे चोहीकडे धावू लागले ॥ ११७ ।। हा भरतराजा समुद्राचा नाश करणार आहे ? का या सगळ्या जगाचा नाश करणार आहे ? अशा संशयाने त्यावेळी आकाशात सर्व विद्याधर क्षणपर्यन्त उभे राहिले ॥ ११८ ॥ ___ जे वक्र असूनही गुणवान् आहे ( पक्षी- दोरीने सहित आहे. ) व सरल कार्य करणारे आहे. ( सरळ अशा बाणाला सोडणारे आहे ) अशा धनुष्यावर त्याने व्यर्थ न होणारा असा बाण जोडला व स्वतः वैशाखस्थानाने उभा राहिला. ( डावा पाय पुढे व उजवा पाय मागे करून उभे राहणे याला वैशाख स्थान म्हणतात ) ॥ ११९ ।। Page #136 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-१२८) महापुराण (१२५ अहं हि भरतो नाम चक्री वृषभनन्दनः । मत्साद्भवन्तु मद्भुक्तिवासिनो व्यन्तरामराः ॥१२० इति व्यक्तलिपिन्यासो दूतमुख्य इव द्रुतम् । स पत्री चक्रिणा मुक्तः प्रामुखीमास्थितो गतिम् ॥ जितनिर्घातनिर्घोषं ध्वनि कुर्वन्नभस्तलान् । व्यपतन्मागधावासे तत्सैन्यक्षोभमानयन् ॥ १२२ । किमेष क्षुभितोऽम्भोधिः कल्पान्तपवनाहतः । निर्घातः किं स्विदुद्ध्वान्तो भूमिकम्पो नु जम्भते ॥ इत्याकुलाकुलधियस्तनिकायोपगाः सुराः । परिवव्ररुपेत्यैनं सन्नद्धा माग प्रभम् ॥ १२४ देव दीप्रः शरः कोऽपि पतितोऽस्मत्सभाङगणे । तेनायं प्रकृतः क्षोभो न किञ्चित्कारणान्तरम् ॥ येनायं प्रहितः पत्री नाकिना दानवेन वा । तस्य कतुं प्रतीकारमिमे सज्जा वयं प्रभो ॥ १२६ इत्यारक्षिभरेस्तर्णमेत्य विज्ञापितः प्रभः। अलमाध्वं भटालापरित्यचः प्रत्यवाच तान ॥ १२७ यूयं त एव मद्गृह्याः सोऽहमेवास्मि मागधः । श्रुतपूर्वमिदं किं वः सोढपूर्वो मयेत्यरिः॥ १२८ मी वृषभदेवाचा पुत्र भरत चक्रवर्ती आहे. माझ्या ताब्यात असलेल्या प्रदेशात राहणारे जे व्यंतरदेव आहेत त्यांनी माझ्या अधीन असले पाहिजे अशा अभिप्रायाची अक्षरे ज्यावर आहेत असा जणु मुख्य दूत की काय असा बाण भरतराजाने सोडला तेव्हां तो पूर्वदिशेकडे निघाला ॥ १२०-१२१ ॥ विजेच्या कडकडाटाला जिंकणारा अशा ध्वनीला करणारा तो बाण आकाशातून मागध नावाच्या व्यंतर राजाच्या निवासस्थानी पडला व त्यावेळी त्या व्यंतरदेवाच्या सैन्यात मोठा क्षोभ उत्पन्न झाला. त्या सैन्यात मोठी धांदल उडाली ।। १२२ ॥ कल्पान्तकालाच्या वाऱ्याच्या आघाताने हा समुद्र खवळला आहे काय ? किंवा अतिशय भयंकर शब्द करणारा हा विजांचा कडकडाट आहे काय ? किंवा हा भूमिकम्प वाढू लागला आहे काय ? ।। १२३ ।। __ याप्रमाणे विचार मनात उत्पन्न होऊन ज्यांना फार भय वाटत आहे असे त्या व्यंतरनिकायाचे देव त्या मागध देवाकडे आले व त्याला घेरून याप्रमाणे बोलू लागले ।। १२४ ॥ हे प्रभो, एक अतिशय तेजस्वी बाण आमच्या सभागृहाच्या अंगणात येऊन पडला व त्यामुळे हा क्षोभ उत्पन्न झाला आहे. याशिवाय दुसरे काही कारण नाही ॥ १२५ ।। हे प्रभो, कोणी स्वर्गीय देवाने किंवा दानवाने हा बाण पाठविला आहे. तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यास आम्ही सर्व आज तयार झालो आहोत ॥ १२६ ॥ ___ याप्रमाणे सभागृह रक्षणाकरिता नेमलेल्या वीरांनी शीघ्र येऊन आपल्या मालकाला विनंती केली. तेव्हां हे वीरहो आता तुमचे भाषण पुरे करा असे मागधदेवाने म्हटले व तो याप्रमाणे त्यांना बोलला ।। १२७ ॥ हे देवांनो माझे स्वामित्व ज्यांच्यावर आहे असे तुम्ही माझेच पूर्वीचे देव आहात व मीही तोच पूर्वीचा तुमचा स्वामी असा मागध देव आहे. मी माझ्या शत्रूचे हे कृत्य पूर्वी कधी सहन केले आहे काय ? व तुम्ही पूर्वी कधी हे ऐकले आहे काय ? ॥ १२८ ।। Page #137 -------------------------------------------------------------------------- ________________ १२६) महापुराण (२८-१२९ बिभर्ति यः पुमान्प्राणान्परिभूतिमलीमसान् । न गुलिङगमात्रेण पुमानेष प्रतीयते ॥ १२९ स चित्रपुरुषो वास्तु चञ्चापुरुष एव वा । यो विनापि गुणः पोस्नर्नाम्नैव पुरुषायते ॥ १३० स पुमान्यः पुनीते स्वं कुलं जन्म च पौरुषः । भटब्रुवो जनो यस्तु तस्यास्त्वभवनिर्भुवि ॥ १३१ विजिगीषुतया देवा वयं नेच्छाविहारतः । ततोऽरिविजयादेव सम्पदस्तु सदापि नः ॥ १३२ बस्तुवाहनराज्याङगैराराधयति यः परम् । परभोगीणमेश्वयं तस्य मन्ये विडम्बनम् ॥ १३३ शरशाली प्रभुः कोऽपि मत्तोऽयं धनमिच्छति । धनायतोऽस्य दास्यामि निधनं प्रधनैः समम् ॥ १३४ विचूण्यनं शरं तावत्कोपाग्नः प्रथमेन्धनम् । करवाणीदमेवास्तु तनुशल्करुपेन्धनम् ॥ १३५ साक्षेपमिति संरम्भादुदीर्य गिरमूजिताम् । ब्यरंसीद्दशनजोत्स्ना संहरन्मगधामरः ॥ १३६ हे वीरानो, शने केलेल्या पराभवामुळे जो मळकट झालेल्या प्राणाना धारण करतो तो गुणानी पुरुष नसून तो केवळ पुरुषाच्या चिह्नांनीच पुरुष आहे असे समजावे ।। १२९ ।। __ जो पुरुषात अवश्यक असणाऱ्या गुणावाचून पुरुष आहे. तो पुरुष नव्हे तो पुरुषाचे चित्र आहे किंवा तो पुरुषाचा पुतळा आहे असे मला वाटते ।। १३० ॥ जो आपल्या पराक्रमानी आपले कुल व जन्म पवित्र करतो त्यालाच पुरुष म्हणावे. पण जो व्यर्थ आपणाला वीरपुरुष म्हणवितो त्याची या पृथ्वीवर उत्पत्ति होणे व्यर्थच आहे ___ आम्ही स्वच्छन्दाने विहार-क्रीडा करीत असल्यामुळे देव झालो आहोत असे नाही तर शत्रूना जिंकण्याच्या इच्छेने देव झालो आहोत म्हणून आम्हाला नेहमी शत्रूना जिंकल्यामुळेच संपत्ति-ऐश्वर्य प्राप्त होवो ।। १३२ ।। हे वीर हो, रत्नादिकांचे नजराणे पाठविणे अथवा हत्ती घोडे वगैरे वाहने देणे व शत्रुराजांच्या प्रधानमंत्री वगैरेना खूष ठेवणे इत्यादि साधनांनी जो शत्रूची आराधना करतो, सन्तुष्ट ठेवतो त्यांचे ऐश्वर्य हे परक्यांना भोगण्यासाठी आहे असे समजावे व हे त्याला लाजिरवाणे आहे असे मला वाटते ।। १३३ ।। वीर हो, ह्या बाणावरून हा राजा माझ्यापासून धन मिळावे अशी इच्छा करीत आहे पण धनाची इच्छा करणा-या या राजाला मी युद्धात निधन-मरणच देणार आहे असे समजा ॥ १३४ ॥ हे वीर हो, या बाणाचे प्रथम तुकडे करून माझ्या कोपरूपी अग्नीचे ते इंधन-जळण बनवीन व हे वाणरूपी इंधन आपल्या लहान तुकड्यानी माझ्या कोपरूपी अग्नीला पेटविण्यास अधिक उपयोगी होईल ॥ १३५ ।। याप्रमाणे त्या मागध देवाने रागाने जोरदार तिरस्कारयुक्त भाषण केले व आपल्या दातांच्या कांतीला संकुचित करून त्याने आपले भाषण संपविले ।। १३६ ।। Page #138 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-१४४) महापुराण ( १२७ ततस्तमूचुरभ्यर्णाः सुरा दृष्टपरम्पराः । प्रभुं शमयितुं क्रोधाद्विद्यावृद्धैः प्रभोः स्थितिः ॥ १३७ यथावसरमथ्यं च मितं च बहुविस्तरम् । अनाकुलं च गम्भीरं नाधियामीदृशं वचः ॥ १३८ सत्यं परिभवः सोढुमशक्यो ज्ञानशालिनाम् । बलवद्भिविरोधस्तु स्वपराभवकारणम् ।। १३९ सत्यमेव यशो रक्ष्यं प्राणैरपि धनैरपि । तत्तु प्रभुमनाश्रित्य कथं लभ्येत धीधनैः ॥ १४० अलब्धलाभो लब्धार्थपरिरक्षमित्यपि । द्वयमेतत्सुखाल्लभ्यं जिगीषोर्नाश्रयं विना ॥ १४१ बलिनामपि सन्त्येव बलीयांसो मनस्विनः । बलवानहमस्मीति नोत्सेक्तव्यमतः प्रभो ॥। १४२ न किञ्चिदप्यनालोच्य विधेयं सिद्धिकाम्यता । ततः शरः कुतस्त्योऽयं किमीयो वेति मृग्यताम् ॥ श्रुतं च बहुशोऽस्माभिराप्तीयं पुष्कलं वचः । जिनाश्चक्रधरैः सार्धं वर्त्स्यन्तीहेति भारते ॥ १४४ यानंतर त्याच्याजवळ असलेले व ज्यांनी कुलपरम्परा पाहिली आहे असे देव मागध देवाचा कोप शान्त करण्यासाठी याप्रमाणे बोलू लागले. हे योग्यच आहे. कारण ज्ञानवृद्ध अशा लोकानीच राजाची मर्यादा ठेविली जाते, सांभाळली जाते ॥ १३७ ॥ ते विद्यावृद्ध देव जे बोलले ते असे होते. त्यांचे भाषण प्रसंगाला अनुरूप होते. ते स्वल्प होते पण त्यात पुष्कळ अर्थ भरलेला होता, त्यात भीति व मोह बिलकुल नव्हता व ते गंभीर होते अर्थात् विचाराने भरलेले होते. असे भाषण अज्ञानीजनाला बिलकुल करता यावयाचे नाही ।। १३८ ।। ते ज्ञानवृद्ध असे म्हणाले - " हे प्रभो, मानी लोकाना दुसन्यानी केलेला पराभव सहन करणे अशक्य असते. पण बलवान् लोकाशी विरोध केला तर तो आपल्या पराभवाला कारण होतो म्हणून बलवंताशी विरोध करणे योग्य नाही ।। १३९ ।। 13 " प्राण व धन या दोहोंच्या द्वारे खरोखर यशाचे रक्षण करावे. पण ते यश बलवान् प्रभूंचा आश्रय केल्याशिवाय शहाण्या लोकांना कसे बरे मिळेल ।। १४० ।। "" " 'जी वस्तु मिळाली नाही ती प्राप्त करून घेणे व जी वस्तु मिळविली आहे तिचे चांगले रक्षण करणे या दोन्ही गोष्टी विजयी राजाच्या आश्रयावाचून सुखाने मिळत नसतात हे ध्यानात घेतले पाहिज ।। १४१ ।। "या जगात जे कोणी बलवान् आहेत त्यांच्यापेक्षाही अधिक बलवान् व अधिक मानी पुष्कळ आहेत म्हणून हे प्रभो, मी बलवान् आहे असा अभिमान आपण करू नका ॥ १४२ ॥ " आपले कार्य अवश्य झाले पाहिजे असे इच्छिणान्याने कोणतेही कार्य विचार केल्यावाचून करू नये. यास्तव हा बाण कोठून आला, हा कोणाचा आहे याचा विचार " करा ।। १४३ ।। " 'हे प्रभो, आम्ही पुष्कळ वेळा सर्वज्ञाचे वचन या भारतात चक्रवर्तीबरोबर जिनेश्वर होतील असे पुष्कळ वेळा ऐकिले आहे " ।। १४४ ॥ Page #139 -------------------------------------------------------------------------- ________________ १२८) महापुराण (२८-१४५ नूनं चक्रिण एवायं जयाशंसी शरागमः । धूतान्घतमसो द्योतः सम्भाव्योऽन्यत्र कि रवेः ॥ १४५ अथवा खलु संशय्य चक्रपाणेरयं शरः । व्यनक्ति व्यक्तमेवैनं तन्नामाक्षरमालिका ॥ १४६ तदेनं शरमभ्यर्च्य गन्धमाल्याक्षतादिभिः। पूजाद्यैव विभोराज्ञा गत्वास्माभिः शरार्पणात् ॥ १४७ मा गा मागध वैचित्यं कार्यमेतद्विनिश्चिनु । न युक्तं तत्प्रतीपत्वं तव तद्देशवर्तिनः ॥ १४८ तदलं देव संरभ्य तत्प्रातीप्यं न शान्तये । महतः सरिदोघस्य कः प्रतीपं तरन्सुखी ॥ १४९ बलवाननुवर्त्यश्चेवनुनेयोऽद्य चक्रभृत् । महत्सु वैतसौं वृत्तिमामनन्त्यविपत्करीम् ॥ १५० इहामुत्र च जन्तूनामुन्नत्य पूज्यपूजनम् । पापं तत्रानुबध्नाति पूज्यपूजाव्यतिक्रमः ॥ १५१ इति तद्वचनात्किञ्चित्प्रबुद्ध इव तत्क्षणम् । अज्ञातमेवमेतत्स्यादित्यसो प्रत्यपद्यन ॥ १५२ " खरोखर जगद्विजयाला सुचविणारा हा बाण चक्रवर्तीचाच आहे. कारण दाट अंधकाराचा नाश करणारा प्रकाश सूर्यावाचून अन्य पदार्थात आढळून येतो काय ?"१४५ ॥ " अथवा या विषयात संशय नकोच. हा बाण चक्रवर्तीचाच आहे. कारण त्याच्या नावाची अक्षरपंक्ति आम्हाला हा बाण चक्रवर्तीचाच आहे असे स्पष्ट सांगत आहे "|| १४६ ।। " म्हणून गन्ध, फुले, अक्षतादिकांनी बाणाची पूजा करावी व आजच चक्रवर्तीकडे जाऊन त्याला हा बाण अर्पण करावा व त्या प्रभूची आज्ञा आजच पूज्य मानावी" ॥ १४७ ।। __ " हे मागधदेवा मन विकारी होऊ देऊ नकोस व या कार्याचा अवश्य विचार कर. आपण चक्रवर्तीच्या देशात राहत आहोत याचा विचार करून तूं त्यांच्या विरुद्ध राहणे हे योग्य नाही" ।। १४८ ॥ " म्हणून हे प्रभो, हा कोप आता पुरे. चक्रवर्तीच्या उलट वागणे हे केव्हाही शान्तीला कारण होणार नाही. कारण नदीच्या मोठ्या प्रवाहाच्या उलट पोहणारा कोण बरे सुखी होईल" ॥ १४९ ।। " जर बलवान व्यक्तीला अनुसरावे असे म्हणशील तर तो चक्रवर्ती बलवान् आहे म्हणून आज त्याला आम्ही अवश्य खुष केले पाहिजे. कारण मोठ्यांच्या पुढे वेताच्या वृत्तीने वागणे (वेत जसा नदीच्या प्रवाहाला अनुसरून नम्र होतो ) हे विपत्तीला दुःखाला कारण होत नाही" ।। १५० ॥ " पूज्यांचे पूजन करणे, त्यांचा आदर करणे हे इहपरलोकी प्राण्यांच्या उन्नतीला-सुखाला कारण होते व पूज्यांचा अनादर करणे हे इहलोकी व परलोकी पापाला उत्पन्न करणारे आहे" ।। १५१।। ___याप्रमाणे त्यांच्या भाषणाने तो मागधदेव तत्काल जागा झाल्याप्रमाणे झाला व यांनी मला जे माहीत नव्हते ते आज मला शिकविले असे तो मानू लागला" ।। १५२ ॥ Page #140 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-१६०) महापुराण (१२९ ससम्भ्रममिवास्याभूच्चित्तं किञ्चित्ससाध्वसम् । साशङ्कमिव सोद्वेगं प्रबुद्धमिव च क्षणम् ॥१५३ ततः प्रसेदुषी तस्य न चिरादेव शेमुषी । पूर्वापरं व्यलोकिष्ट कोपापायात्प्रशेमुषी ॥ १५४ सोऽयं चक्रभृतामाद्यो भरतोऽलङध्यशासनः । प्रतीक्ष्यः सर्वथास्माभिरनुनेयश्च सादरम् ॥ १५५ चक्रित्वं चरमाङ्गत्वं पुत्रत्वं च जगद्गुरोः । इत्यस्य पूज्यमेकैकं किं पुनस्तासमुच्चितम् ॥ १५६ इति निश्चित्य सम्भ्रान्तैरनुयातः सुरोत्तमैः । सहसा चत्रिणं द्रष्टुमुच्चचाल स मागधः ॥ १५७ समुन्मणितिरीटांशुरचितेन्द्रशरासनम् । क्षणेनोल्लडध्य सम्प्रापत्तं देशं यत्र चक्रभृत् ॥ १५८ पुरोधाय शरं रत्नपटले सुनिवेशितम् । मागधः प्रभुमानसीदार्य स्वीकुरु मामिति ॥ १५९ चक्रोत्पत्तिक्षणे भद्र यन्नायामोऽनभिज्ञकाः । महान्तमपराध नस्तं क्षमस्वाथितो महुः ॥ १६० त्यावेळी त्या मागधदेवाचे चित्त थोडेसे व्यग्र झाले, थोडीशी भीतिही त्याला वाटली. थोडा संशयही उत्पन्न झाला व त्याचे मन खिन्न झाले व पूर्वीचे अज्ञान नाहीसे होऊन ते चांगले जागेही झाले ॥ १५३ ॥ यानंतर लौकरच त्याची बुद्धि प्रसन्न झाली व कोप नाहीसा झाल्यामुळे प्रशम धारण करून मागच्या व पुढच्या कालाचा तो विचार करू लागला ॥ १५४ ।। हा भरत सर्वचक्रीमध्ये पहिला चक्रवर्ती आहे, याची आज्ञा उल्लंघता येणार नाही. हा आमच्याकडून सर्वप्रकारे पूजिला गेला पाहिजे व आम्ही त्याला पूर्णपणे सन्तुष्ट केले पाहिजे ।। १५५ ॥ ___ हा भरतराजा चक्रवर्ती आहे, तद्भवमोक्षगामी आहे व आदिभगवंताचा पुत्रही आहे. यांच्यातील एकेक धर्म देखिल पूज्य आहे. मग या तीन धर्माचा समुदाय यांच्यात असल्यामुळे तो पूज्य आहे हे सांगण्याची आवश्यकताच नाही ॥ १५६ ॥ या सर्व गोष्टींचा निश्चय केला व त्वरा करणाऱ्या त्या सर्व उत्तम देवासह चक्रवर्तीला पाहण्यासाठी तो मागधदेव एकदम निघाला ।। १५७ ॥ ज्यांचे किरण वर पसरले आहेत, अशा रत्नांच्या किरीटाने ज्याने इन्द्रधनुष्य उत्पन्न केले आहे असा तो मागधदेव शीघ्र आकाशाचे उल्लंघन करून जेथे चक्रवर्ती भरत होता तेथे आला ॥ १५८॥ रत्नखचित करंड्यात ठेवलेला तो बाण त्या देवाने पुढे ठेवला व हे प्रभो, माझा आपण स्वीकार करा असे म्हणून त्याने चक्रवर्तीला नमस्कार केला ॥ १५९ ॥ हे प्रभो, आपणास चक्ररत्नाची प्राप्ति झाली त्यावेळी आम्हाला न समजल्यामुळे आम्ही आलो नाही. हा आमच्याकडून मोठा अपराध घडला आहे. आपण आम्हाला क्षमा करावी अशी त्याने वारंवार प्रार्थना केली ।। १६० ।। म.१७ Page #141 -------------------------------------------------------------------------- ________________ १३० ) महापुराण युष्मत्पादरजःस्पर्शाद्वाधिरेव न केवलम् । पूता वयमपि श्रीमंस्त्वत्पादाम्बुजसेवया ॥। १६१ रत्नान्यमून्यनर्धाणि स्वर्गेऽप्यसुलभानि च । अधो निषीनामाधातुं सोपयोगानि सन्तु ते ॥ १६२ हारोऽयमतिरोचिष्णुरवारा हैरशुक्तिजः । अवेणुद्विपसम्भूतैर्दृब्धो मुक्ताफलैर्युजः ॥ १६३ तव वक्षःस्थलाश्लेषादुपेयादुपहारताम् । स्फुरती कुण्डले चेमे कर्णसङ्गात्पवित्रताम् ॥ १६४ इत्यस्मै कुण्डले दिव्ये हारं च विततार सः । त्रैलोक्यसार सन्दोहमिवैकध्यमुपागतम् ॥ १६५ रत्नेश्चाभ्यर्च्य रत्नेशं मागधः प्रीतमानसः । प्रभोरवाप्तसत्कारस्तन्मतात्समयात्पदम् ॥ १६६ अथ तत्रस्थ एवाधि सान्तद्वीपं विलोकयन् । प्रभुविसिस्मिये किञ्चित् बह्वाश्चर्यो हि वारिधिः ॥ ततः कुतूहलाद्वाद्धि पश्यन्तं धूर्गतः पतिम् । तमित्युवाच दन्तांशु सुमनोमञ्जरीं किरन् ॥ १६८ (२८-१६१ पृथ्वीवृत्तम् भयं जलधिरुच्छलत्तरलवीचिबाहूद्धृत । स्फुरन्मणिगणार्चनो ध्वनदसङ्ख्य शङ्खाकुलः ॥ तवार्धमिव संविधित्सुरनुवेलमुच्चैर्नदन् । मरुद्धृतजलानको दिशतु शश्वदानन्दथुम् ॥ १६९ हे लक्ष्मीसंपन्न प्रभो, आपल्या पायाच्या धुळीच्या स्पर्शाने केवल समुद्रच पवित्र झाला असे नाही तर आम्ही देखिल आपल्या चरणकमलाच्या सेवेने पवित्र झालो आहोत ।। १६१ ।। हे प्रभो, ही अत्युत्तम व अमूल्य रत्ने स्वर्गात देखिल सुलभ नाहीत. ही रत्ने afrain खाली ठेवण्यास आपणास उपयोगी पडतील म्हणून ही आपणाजवळ असोत ॥ १६२॥ हे प्रभो, वराह, शिप, वेळू व हत्ती यांच्यापासून उत्पन्न न झालेल्या व स्वर्गात उत्पन्न झालेल्या अशा मोत्यांनी गुंफलेला हा हार अत्यंत कान्तिसम्पन्न आहे व आपल्या वक्षःस्थलावर लोळण्याने उपहार होईल. या नजराण्याचा आपण स्वीकार करावा. तसेच ही चमकणारी रत्नकुण्डले आपल्या कानाच्या संसर्गाने पवित्र होवोत असे म्हणून मागध देवाने दिव्य कुण्डले व हार चक्रवर्तीला अर्पण केला. त्रैलोक्यातील सार वस्तूचा जणु समूह असे हे हार व कुण्डले शोभत होती. ही भरतचक्रीला मगधदेवाने दिली ।। १६३-१६५ ॥ याशिवाय चौदा रत्नांचा स्वामी अशा त्या भरताची मागघदेवाने प्रीतियुक्त अन्तःकरणाने पुष्कळ रत्नांनी पूजा केली, आदर केला. यानंतर प्रभु भरतापासून मागघदेवाचा सत्कार झाला व तो देव चक्रवर्तीच्या संमतीने आपल्या स्थानी निघून गेला ।। १६६ ।। यानंतर तेथेच अन्तद्वीपासह समुद्राला भरतेश पाहत असता त्याला थोडेसे आश्चर्य वाटले. बरोबरच आहे कीं तो लवणसागर पुष्कळ आश्चर्यांचे स्थानच होता ।। १६७ ।। यानंतर भरत प्रभु कौतुकाने समुद्राला पाहात आहे असे पाहून रथाच्या धुरेवर बसलेला सारथी दातांच्या किरणरूपी मंजरीना बाहेर पसरून याप्रमाणे बोलू लागला ।। १६८ ।। हे प्रभो, वर उसळणा-या चंचल तरङ्गरूपी बाहूंनी या समुद्राने आपले पूजन करण्यासाठी चमकणारी रत्नसमूहरूपी सामग्री धारण केली आहे व आपल्या सत्कारासाठी असंख्य शंख वाजविण्यात दंग झाला आहे व आपणास जगु अ करण्याचा इच्छेने Page #142 -------------------------------------------------------------------------- ________________ २४-१७२) महापुराण अमुष्य जलमुत्पतद्गमनमेतदालक्ष्यते । शशाडूकरकोमलच्छविभिराततं शीकरैः ॥ प्रहासमिव दिग्वधूपरिचयाय विष्वग्दधत् । तितांसदिव चात्मनः प्रतिदिशं यशोभागशः ॥ १७० क्वचित्स्फुटितशुक्तिमौक्तिकततं सतारं नभो । जयत्यलिमलीमसं मकरमीनराशिश्रितम् ।। क्वचित्सलिलमस्य भोगिकुलसंकुलं सून्नतम् । नरेन्द्रकुलमुत्तमस्थिति जिगीषतीवोद्भटम् ॥ १७१ इतो विशति गाङ्गमम्बु शरदम्बुदाच्छच्छवि । जुतं हिमवतोऽमतश्च सुरसं पयः सैन्धवम् ॥ तथापि न जलागमेन धृतिरस्य पोपूर्यते । ध्रुवं न जलसंग्रहैरिह जलाशयो प्रायति ॥ १७२ किनाऱ्यावर येऊन मोठ्याने जयजयकार करीत आहे. वाऱ्याने हालणारे पाणीरूपी नगारे वाजवीत आहे, असा हा समुद्र आपणास निरंतर आनंद देवो ।। १६९ ।। चंद्राच्या किरणसमूहाप्रमाणे कोमल कान्ति ज्यांची आहे अशा तुषारकणानी भरलेले या समुद्राचे वर उसळणारे पाणी दिशारूपी वधूंचा आपल्याशी परिचय व्हावा म्हणून जणु हास्य करीत आहे असे भासत आहे व हे प्रभो, आपले यश प्रत्येक दिशेला विभागरूपाने पसरविण्याची इच्छा करीत आहे असे आम्हास वाटत आहे ।। १७० ।। या समुद्राच्या पाण्याने फुटलेल्या शिंपल्यातून निघालेल्या मोत्यांच्या समूहानी कोठे कोठे तारकानीसहित अशा आकाशाला जिकले होते व कोठे कोठे या समुद्राचे पाणी मकर व मौन अर्थात् मगर व मासे यांच्या समूहाने भरलेले असल्यामुळे भुंग्याप्रमाणे काळसर झाले होते व मकरराशि आणि मीनराशि यांनी युक्त अशा आकाशाच्या शोभेला ते जिकीत होते. कोठे कोठे या समुद्राचे पाणी राजांच्या कुलाला जिंकण्याची इच्छा करीत आहे कारण राजांचे कूल भोगी लोकांच्या समहाने भूषित असते व या समुद्राचे जलप्रदेश देखिल कोठे कोठे भोगि-सर्पाच्या समूहाने भूषित होते. राजांचे कुल सून्नत-अतिशय उच्च असते तसे या समुद्राचे पाणी देखिल कोठे उन्नत-अतिशय उंच वाढून उसळत होते. जसे राजाचे कुल उत्तम स्थितिमर्यादेने सहित असते, तसे या समुद्राचे पाणी उत्तम स्थितीने-सीमेने युक्त होते अर्थात् आपली मर्यादा ते उल्लंधित नव्हते. जसे राजकुल उद्भट उत्कृष्ट योद्धयानी सहित असते तसे ह्या समुद्राचे पाणी कोठे कोठे उद्भट-अतिशय प्रबल झाले होते ॥ १७१ ॥ इकडे हिमवान् पर्वतापासून निघालेले व शरदऋतूच्या मेघाप्रमाणे शुभ्रकान्ति ज्याची आहे असे गंगानदीचे पाणी या समुद्रात प्रवेश करीत आहे व या बाजूने सिंधुनदीचे सुरस-गोड पाणी प्रवेश करीत आहे, तथापि या पाण्यांच्या आगमनानेही जलाशयाची-समुद्राची तृप्ति होत नाही, याची हाव कमी होत नाही. हे योग्यच आहे की, जलशय-जे पाण्याचे साठे व पक्षी जड बुद्धि असतात त्याना कितीही ( जलसंग्रह-पाण्याचा संग्रह व मूखांचा संग्रह ) झाला तरी तृप्ति होत नाही. भावार्थ-जसे जडाशय-मूर्ख मनुष्य जडसंग्रह-मूर्ख मनुष्याच्या संग्रहाने तृप्त होत नाही. तसे जलाशय पाण्यानी भरलेला समुद्र अथवा तळे जलसंग्रहाने-पाण्यांचा संग्रह करण्याने सन्तुष्ट होत नाही ।। १७२ ॥ Page #143 -------------------------------------------------------------------------- ________________ १३२) महापुराण (२८-१७३ वसंततिलक व्याप्योदरं चलकुलाचलसन्निकाशाः । पुत्रा इवास्य तिमयः पयसा प्रपुष्टाः ॥ कल्लोलकाश्च परिमारहिताः समन्तादन्योन्यघट्टनपराः सममाविशन्ति ॥ १७३ आपो धनं धृतरसाः सरितोऽस्य दाराः । पुत्रायिता जलचराः सिकताश्च रत्नम् ॥ इत्थं विभूतिलवदुर्ललितोऽपि चित्रम् । धत्ते महोदधिरिति प्रथिमानमेषः ॥ १७४ निःश्वासधूममलिनाः फणमण्डलान्तः- सुव्यक्तरत्नरुचयः परिती भ्रमन्तः । व्यायच्छमाननतवो रुषितरकस्मादत्रोल्मुकश्रियममी दधते फणीन्द्राः ॥ १७५ पादैरयं जलनिधिः शिशिरैरपीन्दोरास्पृश्यमानसलिलः सहसा खमुद्यन् ॥ रोषादिवोच्छलति मुक्तगभीररावो वेलाच्छलेन न महान् सहतेऽभिभूतिम् ।। १७६ नाकोकसां प्रतरसां सहकामिनीभिः । आक्रीडनानि समनोहरकाननानि ॥ द्वीपस्थलानि रुचिराणि सहस्रशोऽस्मिन् । सन्त्यन्तरीपमिव दुर्गनिवेशनानि ॥ १७७ हे प्रभो, या समुद्राच्या पोटात चोहीकडे पसरून राहिलेले आणि हलणाऱ्या कुलपर्वताप्रमाणे जे दिसतात व या समुद्राच्या पाण्याने पुष्ट झालेले जणु या समुद्राचे पुत्र असे हे मोठे मासे व ज्यांच्या मोठेपणाचे परिमाण करता येत नाही असे या समुद्राचे कल्लोळ-तरङ्ग हे दोघे एकमेकावर आघात करीत राहतात व समुद्रात एकदम प्रवेश करतात ।। १७३ ॥ हे राजेन्द्रा, पाणी हे या समुद्राचे धन आहे. ज्यांनी खूप पाणी धारण केले आहे अशा अथवा शंगार किंवा स्नेह धारण करणा-या या नद्या या समुद्राच्या स्त्रिया आहेत. मगर, मत्स्य आदि जलचरप्राणी हेच याचे पुत्र आहेत व वाळू हीच रत्ने आहेत. याप्रमाणे थोड्याशा ऐश्वर्याने देखिल उन्मत्त झालेला हा समुद्र महोदधि' या नावाने सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे हे मोठे आश्चर्यकारक आहे ।। १७४ ।। श्वासोच्छ्वासाच्या धुराने मळकट झालेले, फणांच्या गोलाकारात असलेल्या रत्नांच्या व्यक्त कान्तीनी शोभणारे व गोलाकार सभोवती फिरणारे, ज्यांची शरीरे लांबट-दीर्घ आहेत व अकस्मात् रागावण्याने या समुद्रात ते फणीन्द्र कोलीत फिरविल्याने जो शोभा दिसते तसल्या शोभेला ते धारण करीत आहेत ।। १७५ ॥॥ हे प्रभो, हा समुद्र चंद्राच्या थंड अशाही पादांनी-पायांनी-दुसरा अर्थ किरणानी याच्या पाण्याला स्पर्श केला असता एकदम आकाशात उसळी घेऊन रागाने मोठी गर्जना करीत आहे व लाटांच्या मिषाने चंद्राकडे धाव घेत आहे. बरोबरच आहे की, जो मोठा असतो तो इतराने केलेला पराभव-अपमान सहन करीत नाही ।। १७६ ॥ या समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्या देवांगनाबरोबर मोठ्या वेगाने येणान्या स्वर्गातील देवांची हजारो क्रीडास्थळे आहेत. हजारो मनोहर वने आहेत आणि हजारो सुंदर द्वीप आहेत व ते सर्व जणु या समुद्रात किल्ले बांधले आहेत असे दिसतात ॥ १७७ ।। Page #144 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-१८२) महापुराण मालिनीवृत्त अयमनियतवेलो रुद्धरोधोन्तरालै । रनिलबलविलोलभूरिकल्लोलजालैः ॥ तटवनभिहन्ति व्यक्तमस्मै प्ररुष्यन्मम किल बहिरस्मान्नास्ति वृत्तिर्मुधेति ॥ १७८ अविगणितमहत्त्वा यूयमस्मान्स्वपादै-रभिहथ । किमलङध्यं वो वृथा तौंग्यमेतत् ॥ वयमिव किमलडध्याः किं गभीराः इतीत्थं । परिवदति विरावजूनमब्धिः कुलाद्रीन् ॥ १७९ प्रहर्षिणीवृत्तम् अत्रायं भुजगशिशुबिलाभिशङ्को । व्यात्तास्यं तिमिमभिधावति प्रहृष्टः ॥ तं सोऽपि स्वगलबिलावलग्नस्वान्त्रस्था विहितदयो निजेगिलोति ॥ १८० दोधकवृत्तम्-एष महामणिरश्मिविकोणं तोयमनुष्य धृतामिषशङ्कः ॥ मीनगणोऽनुसरन् सहसास्भावह्निधिया पुनरप्यपयाति ॥ १८१ लोलतरङ्गविलोलितदृष्टिर्वृद्धतरोऽसुमतिः सुमतं नः॥ ही रथमेष तिमिङ्गिलशङ्की, पश्यति पश्य तिमिस्तिमिताक्षः ॥ १८२ भरती व ओहोटी यांनी चंचल झालेला हा समुद्र या वनाच्या बाहेर माझे जाणे होत नाही म्हणून या वनावर प्रकट रीतीने क्रोध करून आपल्या किनाऱ्यावर असलेल्या वनाला वायूच्या वेगाने अतिशय चंचल करीत आहे व पृथ्वी आणि आकाशाच्या मध्यभागाला रोकणान्या अनेक लहरींच्या समूहानी त्या वनाला व्यर्थच ताडन करीत आहे ॥ १७८ ॥ हा समुद्र आपल्या मोठ्या गर्जनानी कुलपर्वताना जणु असे म्हणत आहे ' हे पर्वतानो तुम्ही आमचे महत्त्व ध्यानात न घेता आम्हाला पायानी लाथा मारीत आहात. तुम्हाला ओलांडून जाणे शक्य आहे. तुमचा हा उंचपणा व्यर्थ आहे. आमच्याप्रमाणे तुम्ही अलङ्गम्य आहा काय ? गंभीर तरी आहा काय ?' असे म्हणून जणु गर्जनानी त्यांची निंदा करीत आहे असे वाटते ॥ १७९ ॥ या ठिकाणी हा सर्पाचा बालक हे बीळ आहे असे समजून आनंदित होऊन ज्याने आपले तोंड उघडले आहे अशा माशाकडे धावत आहे व तो मासाही हा स्वतःच्या गळ्याच्या मध्यभागातले स्वतःचे आतडे आहे असे समजून दया न करता त्याला गिळून टाकीत आहे ॥१८०।। __ महामण्यांच्या-पद्मरागमण्यांच्या किरणानी व्याप्त झालेल्या या समुद्राच्या पाण्याला पाहून हे मांस आहे असे समजणारा हा माशांचा समूह त्याच्याजवळ जातो पण हा अग्नि आहे असे समजून पुनः त्यापासून एकदम दूर परतत आहे ॥ १८१ ॥ हे देवा इकडे आपण पहा, चंचल तरंगानी ज्याची दृष्टि चंचल झाली आहे व जो अतिशय म्हातारा झाला आहे असा हा मासा या रथाला, माशांना खाणारा हा मोठा मासा आहे असे समजून निश्चल दृष्टीने रथाकडे पाहत आहे असे आम्हाला वाटते व हा मासा मोठा मूर्ख आहे असे मनाला वाटते ।। १८२ ॥ Page #145 -------------------------------------------------------------------------- ________________ १३४) महापुराण (२८-१८३ भुजङ्गप्रयातम् बहामी भुजङ्गाःसरत्नःफणाप्रैः । समुत्क्षिप्य भोगान्खमुदीक्षमाणाः विभाव्यन्त एते तरङ्गोव्हस्तेऽता दीपिकौघा महावार्षिनेव ॥ १८३ भुजङ्गप्रयातैरिदं वारिराशेर्जलं लक्ष्यतेऽन्तःस्फुरद्रत्नकोटि ।। महानीलवेश्मेव दीपैरनेकैवलद्भिश्चलभिस्ततध्वान्तनुद्भिः ॥ १८४ मत्तमयूरवृत्तम् बाताघातात्पुष्करवाद्यध्वनिमुच्चस्तन्वानेऽब्धौ मन्द्रगभीरं कृतवास्याः ॥ छोपोपान्ते सन्ततमस्मिन्सुरकन्या। रंरम्यन्ते मत्तमयूरः सममेतैः ॥ १८५ नोलं श्यामाः कृतरवमुच्चधुतमोदा । विद्युद्वन्तः स्फुरितभुजङ्गोत्फणरत्नम् ॥ आश्लिष्यन्तो जलदसमूहा जलमस्य । व्यक्तं नोपवजितुमलं ते घनकाले ॥ १८६ पश्याम्भोधेरनुतटमेनां वनराजी । राजीवास्य प्रशमिततापां विततापाम् ॥ वेलोत्सर्पज्जलकणिकाभिः परिधौताम् । नीलां शाटीमिव सुमनोभिः प्रविकीर्णाम् ॥ या ठिकाणी आपले शरीर उंच उभे करून रत्नांनी सहित असलेल्या आपल्या फणाच्या अग्रभागानी आकाशाकडे पाहणारे हे सर्प या महासमुद्राने आपल्या तरंगरूप मोठया हातानी जणु हे दिव्यांचे समूह अर्थात् अनेक दिवट्या-मशाली धारण केल्या आहेत असे बाटते ॥ १८३ ॥ ___ ज्याच्या आत सर्वांच्या फणावरील कोट्यवधि रत्ने चमकत आहेत असे हे समुद्राचे पाणी सर्वांच्या इकडे तिकडे फिरण्याने चोहीकडे फिरणारे, पसरलेल्या अंधकाराला नष्ट करणारे, प्रदीप्त-प्रकाशयुक्त झालेल्या अनेक दिव्यानी शोभत असलेले नीलमण्याच्या मोठ्या बाड्याप्रमाणे शोभत आहे असे वाटते ॥ १८४ ।। हा समुद्र वाऱ्याच्या आघातामुळे नगाऱ्याप्रमाणे खोल व गंभीर असा शब्द अर्थात् गर्जना जेव्हा करतो तेव्हा नृत्य करीत असलेल्या या देवकन्या या द्वीपाच्या जवळ उन्मत्त झालेल्या या मोरांच्या थव्याबरोबर नेहमी पुष्कळ प्रकारच्या क्रीडा करतात ॥ १८५ ।। काळ्या रंगाचे व मोठी गर्जना करून आपला आनंद व्यक्त करणारे, वारंवार ज्यात विजा चमकत आहेत असे हे मेघ, ज्यात सर्वांच्या वर उभारलेल्या फणावरील रत्ने चमकत आहेत अशा समुद्राच्या पाण्याला अगदी चिकटून आलिंगन देत आहेत म्हणून हे ( मेघ ) वर्षाकालात अन्य ठिकाणी आकाशातून गमन करण्यास उत्सुक होत नाहीत असे स्पष्ट दिसत भाहे ।। १८६ ॥ हे कमलमुख राजेन्द्रा सूर्याच्या किरणापासून होणाऱ्या दाहाला मिटविणारी व जिच्यात पाणी पसरले आहे अशी आणि तीरावर पसरलेल्या जलकणानी धुतलेले अर्थात ओले झालेले जणु निळे वस्त्र आहे असा भास उत्पन्न करणारी ही समुद्रतीरावरील वनपंक्ती फुलांनी बनदी गजबजलेली आहे तिजकडे आपण पाहा ॥ १७ ॥ Page #146 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-१९२) महापुराण (१३५ तोटकवृत्तम् परितः सरसीः सरसैः कमलैः । सुहिताः सुचिरं विचरन्ति मृगाः ॥ उपतीरममुष्य निसर्गसुखां । वसति निरुपद्रुतिमेत्य वने ॥ १८८ अनुतीरवनं मृगयूथमिदं कनकस्थलमुज्ज्वलितं रुचिभिः ॥ परिवीक्ष्य दवानलशङ्कि भृशं परिधावति धावति तीरभुवः ॥ १८९ प्रहषिणी लावण्यादयमभिसारयन्सरित्स्त्रीरास्रस्तप्रतनुजलांशुकास्तरङ्गः ॥ आश्लिष्यन्मुहुरपि नोपयाति तृप्ति सम्भोगैरतिरसिको न तृप्यतीह ॥ १९० वसंततिलक रोषोभुवोऽस्य तनुशीकरवारिसिक्ताः समाजिता विरलमुच्चलितैस्तरङ्गः ॥ भान्तीह सन्ततलताविगलत्प्रसूननित्योपहारसुभगा द्युसदां निषेव्याः ॥ १९१ मन्दाक्रान्ता स्वर्गाद्यानश्रियमिद हसत्युत्प्रसूने वनेस्मिन् । मन्दाराणां सरति पवने मन्दमन्दं वनान्तात् ॥ मन्दाक्रान्ताः सललितपदं किञ्चिदारब्धगाना- ३चक्रम्यन्ते खगयुक्तयस्तीरदेशेष्वमुष्य ॥ १९२ या समुद्राच्या तटावरील वनात उपद्रवरहित व स्वभावतः सुखदायक अशा स्थानी येऊन सरस असे कलमी जातीचे साळीचे धान्य खाऊन पुष्कळ काळपर्यंत या तलावाच्या चारी बाजूस हरिण सुखाने राहतात ॥ १८८ ॥ या समुद्राच्या तीरावरील वनात आपल्या कान्तीनी चमकणारे सुवर्णाचे स्थल पाहून हा हरिणांचा समदाय दावानलाची शंका उत्पन्न झाल्यामुळे अतिशय लौकर किनाऱ्याच्या प्रदेशाकडे सर्व बाजूनी धावत आहे।। १८९ ॥ ___ ज्यांचे जलरूपी पातळ वस्त्र काही खाली सरकले आहे अशा नद्यारूपी स्त्रियांना लावण्यामुळे सौंदर्यामुळे पक्षी-खारेपाण्यामुळे हा समुद्र आपल्याकडे बोलावून वारंवार त्यांना आपल्या तरंगरूपी हातानी आलिंगितो तथापि तो तृप्त होतच नाही. पण हे अगदी बरोबरच दिसते. कारण जो अतिशय रसिक अर्थात् कामी असतो तो स्त्रियांच्या पुष्कळ संभोगानेही तृप्त होत नाही ॥ १९० ॥ या समुद्राच्या किनाऱ्यावरील भूमि बारीक जलकणांनी नेहमी सिंचित होतात व विरळ उसळणाऱ्या तरंगानी धुराळा नाहीसा करून स्वच्छ केल्या जातात व यानंतर नेहमी वेळीच गळत असलेल्या पुष्पानी आच्छादित होऊन सुन्दर दिसतात अशा भमि देवानी सेव्य होतात अर्थात् अशा ठिकाणी देव येऊन क्रीडा करितात ।। १९१ ॥ आपल्या प्रफुल्ल पुष्पांनी स्वर्गातील बगीचाच्या सौंदर्याला जणु हसत आहे अशा मन्दार वृक्षांच्या वनात वारा मंद मंद रीतीने वाहत असतां गमतीने एकेक पाऊल टाकीत मंद चालणाऱ्या आणि काही गात असलेल्या या विद्याधरांच्या स्त्रिया या समुद्राच्या तीरावर हिंडत आहेत हे राजेन्द्रा आपण पाहा ॥ १९२ ।। Page #147 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२८-१९३ प्रहर्षिणी अप्सव्यस्तिमिरयमाजिघांसुरारादभ्येति । द्रुतमाभिभावकोऽप्सुयोनीन ॥ शैलोच्चानपि निगिलंस्तिमीनितोऽन्यो । व्यत्यास्ते समममुना युयुत्समानः ॥ १९३ पृथ्वी जलादजगरस्तिमि शयुमपि स्थलादण्डजो। विकर्षति युयुत्सया कृतदृडग्रहो दुर्ग्रहः ।। तथापि न जयो मिथोऽस्ति समकक्षयोरेनयोः । ध्रुवं न समकक्षयोरिह जयेतरप्रक्रमः ॥ १९४ वनं वनगजैरिदं जलनिधेः समास्फालितम् । वनं वनगजैरिव स्फुटविमुक्तसाराविणम् ॥ मृदङ्गपरिवादनश्रियमुपादधद्दिक्तटे । तनोति तटमुच्छलत्सपदि दत्तसम्मार्जनम् ॥ १९५ तरत्तिमिकलेवरं स्फुटितशुक्तिशल्काचितम् । स्फुरत्परुषनिःस्वनं विधृतरन्ध्रपातालकम् ॥ भयानकभितं जलं जलनिधेर्लसत्पन्नगप्रमुक्ततनुकृत्तिसंशयितवीचिमालाकुलम् ॥ १९६ इतो धतवनोऽनिलः शिशिरशीकरानाकिरन् । उपैति शनकैस्तटं द्रुमसुगन्धिपुष्पाहरः॥ इतश्च परुषोऽनिलःस्फुरति धौतकल्लोल । सात्कृतस्वनभयानकस्तिमिकलेवरानाधुवन ॥ १९७ इकडे या समुद्राच्या पाण्यात उत्पन्न झालेल्या अनेक मत्स्यांचा तिरस्कार करून त्यांना मारण्यास इच्छिणारा हा फार मोठा मासा याच पाण्यात उत्पन्न झाला आहे व अतिशय दुरून येत आहे व पर्वताप्रमाणे मोठ्या माशांनाही खाणारा हा दुसरा मोठा मासा पहिल्या माशाशी युद्ध करण्याच्या इच्छेने उभा राहिला आहे ॥ १९३ ।। । इकडे हा अजगर पाण्यातून कोण्या मोठ्या माशाला आपल्याकडे जमिनीवर ओढीत आहे व खूप मजबूत रीतीने पकडणारा मासा देखिल जमिनीपासून त्या अजगराला आपणाकडे ओढीत आहे. परंतु समान बल असणा-या दोघापैकी कोणाचा विजय व कोणाचा पराजय होत नाही. बरोबरच आहे की या जगात जे समानबलाचे असतात त्यांच्या परस्परात जयपराजयाचा निर्णय होत नसतो ॥ १९४ ।। रानटी हत्तींच्याद्वारे आपल्या सोंड आदिकानी अतिशय ताडन केले गेलेले हे समुद्राचे पाणी ज्यात रानटी हत्ती स्पष्टरूपाने गर्जना करीत आहेत अशा वनाप्रमाणे दिसत आहे व तसेच मृदंग वाजण्याच्या शोभेस धारण करीत आहे व दिशामध्ये उडणारे हे पाणी या समुद्र किनाऱ्याला अतिशय शीघ्रतेने स्वच्छ करीत आहे ॥ १९५ ।। या समद्राचे पाण्यात अनेक माशांची शरीरे तरंगत आहेत. व कोठे कोठे फुटलेल्या शिंपल्यांच्या तुकड्यानी हे समुद्रजल भरून गेले आहे. ज्यांच्यात कठोर शब्द होत आहेत, ज्याने आपल्या खोल छिद्रानी पाताळालाही धारण केले आहे व जे तरत असलेल्या सापांच्या कांतीनी लोकमनात असा संशय उत्पन्न करीत आहे की, जणु लहरीच्या समूहानींच व्याप्त होत आहे असे समुद्राचे पाणी या ठिकाणी फारच भयंकर होत आहे दिसत आहे ।। १९६ ।।। इकडे ज्याने वनाला हलविले आहे व शीतल जलबिदूंचा जो वर्षाव करीत आहे व वृक्षांच्या सुगंधितपुष्पांच्या सुगंधाला हरण करणारा हा वायु मन्दमन्दपणाने किनाऱ्याकडे Page #148 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-२०० ) महापुराण शार्दूलविक्रीडित अस्योपान्तभुवश्चकासति तरां वेलोच्छलन्मौक्तिकैः ॥ आकीर्णाः कुसुमोपहारजनितां लक्ष्मीं दधाना भृशम् ॥ सेवन्ते सहसुन्दरीभिरमरा याः स्वर्गलोकान्तरम् ॥ तन्वाना घृतसम्म दास्तटवनच्छायातरून् संश्रिताः ॥ १९८ एते ते मकरादयो जलचरा मत्वेव कुक्षिम्भरिम् । वारांराशिमनन्तरायमधिकं पुत्रा इवास्यौरसाः ॥ भागस्य प्रतिलिप्सया नु जनकस्याक्रोशतोऽप्यग्रतो । युध्यन्ते मिलिताः परस्परमहो बद्धक्रुधो धिग्धनम् ॥ १९९ लोकानन्दिभिरप्रमापरिगतं रुच्चावचैर्भोगिनाम् । आरूढैरधिमस्तकं शुचितमैः सन्तापविच्छेदिभिः ॥ पातालविनृताननं म्हुरपि प्राप्तव्ययंरक्षये । रासंसारममुष्य नास्ति विगमो रत्नैर्जलौघैरपि ॥ २०० वाहत चालला आहे व इकडे मोठमोठ्या माशांच्या शरीराना कंपित करणारा व हलणान्या लहरींच्या शब्दानी भयंकर भासणारा हा प्रचंड वायु वाहत आहे ॥ १९७ ॥ (१३७ या समुद्राच्या तीरावरील भूमि भरतीच्या वेळी वर उडालेल्या मोत्यांच्या समूहांनी भरून गेल्यामुळे पुष्पांचे समूह सर्वत्र पसरल्याप्रमाणे अतिशय सुंदर शोभेला धारण करीत आहेत व त्यावेळी या भूमि अन्य स्वर्ग जणु आहे अशा शोभतात. आणि त्यावेळी या किना-यावरील वृक्षांच्या सावलींचा आश्रय घेऊन आपल्या देवांगनासह देव येथे येऊन मोठ्या आनंदाने या भूमींचा आश्रय घेऊन क्रीडा करतात ।। १९८ ।। हे मगर, मासे वगैरे जलचर प्राणी या समुद्राला आपला जनक मानतात व आपण त्याचे औरसपुत्र आहोत असे समजतात. आपल्या पित्याजवळ अनन्त धन आहे असे मानून आपल्याला धनाचा हिस्सा मिळावा म्हणून आपसात भांडतात व आपला पिता असे भांडू नका असे म्हणत असताही रागावून आपसात लढाई करतात. यावरून अशा अनर्थाला कारण असलेल्या धनाचा धिक्कार असो असे मला वाटते ।। १९९ ॥ ज्यांनी आपली तोंडे उघडली आहेत अशी पाताले व वडवानल यांच्यामुळे वारंवार - हास पावूनही ज्यांचा केव्हांही नाश होत नाही, जी लोकांना आनंद देतात, जी प्रमाणरहित अगणित आहेत, अनेक प्रकारांची आहेत, जी सर्पाच्या मस्तकावर फणावर आरूढ झाली आहेत व जी अत्यंत पवित्र आहेत, ज्याच्यापासून संताप नष्ट होतो अशी रत्ने व पाण्याचे समूह यांचा संसार असेपर्यन्त केव्हाही नाश होत नाही. तात्पर्य- जरी या समुद्राची अनेक रत्ने पाताळांत व विवरात पडून नष्ट होतात आणि पुष्कळ पाणी वडवानलात जळून जाते तरीही याचे रत्नसमूह व जलसमूह कधीही विनाश पावत नाहीत. कारण ज्यांचा नाश होतो त्यापेक्षा अधिक रत्ने व जलसमूहाची नेहमी उत्पत्ति होत जात आहे ॥ २०० ॥ म. १८ Page #149 -------------------------------------------------------------------------- ________________ १३८) महापुराण (२८-२०१ स्रग्धरा वनद्रोण्याममष्य क्वथदिव जठरं व्यक्तमुढ दाम्बु । स्फूर्जत्पातालरन्ध्रोछ्वसदनिलबलाविष्वगावय॑मानम् ॥ प्रस्तीर्णानेकरत्नान्युपहरति जने नूनमुत्तप्तमन्तः। प्रायो रायां वियोगो जनयति महतोऽप्युग्रमन्तर्विदाहम् ॥ २०१ प्रहर्षिणी आयुष्मन्निति बहुविस्मयोऽयमब्धिः । सद्रत्नः सकलजगज्जनोपजीव्यः । गम्भीरप्रकृतिरनल्पसत्त्वयोगः । प्रायस्त्वामनहरते विना जडिम्ना ॥ २०२ वसन्ततिलक इत्थं वियन्तरि परां श्रियमम्बराशेरावर्णयत्यनुगतैर्वचनविचित्रः । प्राप प्रमोदमधिकं न चिराच्च सम्राट् सेनानिवेशमभियातुमना बभूव ॥ २०३ फार मोठ्या पातालरूपी छिद्रांच्या द्वारातून वर येणान्या व वाढणा-या वान्यांच्या वेगाने जो सर्व बाजूंनी फिरत आहे व ज्यात पाण्याचे अनेक बुडबुडे सारखे उत्पन्न होत आहेत अशा समुद्राचा मध्यभाग अर्थात् पोटाचा प्रदेश वज्राच्या कढईत उकळत आहे- कढत आहे असा भासत आहे अथवा या समुद्राची रत्ने इतस्ततः पसरली असल्यामुळे लोक नेहमी घेऊन जातात. यामुळे हा समुद्र मनातल्या मनात फार सन्तप्त होत आहे व हे सन्तप्त होणे याचे अयोग्य नाही. कारण धनाचा वियोग मोठमोठ्या व्यक्तींच्या मनातही भयंकर दाह उत्पन्न करीत असतो॥ २०१॥ हे दीर्घायुषी राजा, आपण जसे अनेक आश्चर्यानी भरलेले आहात, हा समुद्रही आपल्याप्रमाणे अनेक आश्चर्यानी भरलेला आहे. जसे आपल्याजवळ अनेक ( उत्तम ) रत्ने आहेत तसे हा समुद्रही अनेक (उत्तम ) रत्नांनी युक्त आहे, भरलेला आहे. हे राजन् जगातील सर्व जीव आपल्या साहाय्याने जगतात तसे सर्व जीव या समुद्राचे उपजीव्य आहेत, अर्थात् समुद्रात उत्पन्न झालेल्या रत्नानी, मोत्यानी व पाण्यानी लोक आपली उपजीविका करतात. जसे आपण गंभीर स्वभावाचे आहात तसा हा समुद्र देखील गंभीर अतिशय खोल स्वभावाचा आहे. हे प्रभो आपण जसे अनल्पसत्वयोग-अनन्त शक्तीच्या संबंधाने युक्त आहात तसे हाही अनल्पसत्त्वयोग-मोठ्या मगर मासे आदि जलचर प्राण्यानी युक्त आहे. या प्रकारे हा समुद्र आपले अनुकरण करीत आहे. पण अन्तर आहे ते असे आहे- हा जलाच्या समृद्धीने युक्त आहे व आपण जडिम्ना विना- मूर्खपणाने रहित आहात. आपण अतिशय सुज्ञ आहात तसा हा सुज्ञ नाही. हा मूर्ख आहे ॥ २०२ ।। याप्रमाणे त्या सारथ्याने योग्य व मनोरम अशा अनेक विचित्र वचनानो समद्राच्या शोभेचे वर्णन केले व त्याने भरतराजाला आनंद झाला. नंतर लोकर आपल्या सेनेच्या छावणीत जाण्याची त्याला इच्छा झाली ।। २०३ ।। Page #150 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-२०८) महापुराण मालिनी अथ रथपरिवृत्त्यै सारथौ कृच्छकृच्छात विषमवलनभुग्नग्रोवमश्वानुनुत्सौ । पवति मरुति मन्दं वीचिवेगोपशान्तेः शिबिरमभि निधीनामीशिता संप्रतस्थे ॥ २०४ कथमपि रथचक्रं सारयित्वाम्बुरुद्धं । प्रवहणकृतकोपान्वाजिनोऽनुप्रसाध ॥ रथमधिजलमब्धौ चोदयामास सूतो। जलधिरपि नपानुव्रज्ययेवोच्चचाल ॥ २०५ अयमयमुदभारो वारिराशेर्वरूथम् । स्थगयति रथवेगादेष भिन्नोमिरब्धिः । इति किल तटसद्भिस्तर्यमाणो रथोऽयम् । जवनतुरगकृष्टः प्राप पारेसमुद्रम् ॥ २०६ तरङ्गात्यस्तोऽयं समघटितसर्वाङ्गघटनो । रथः क्षेमात्प्राप्तो रथचरणहेतिश्च कुशली ॥ तुरङ्गा घौताङ्गा जलधिसलिलरक्षतखुरा । महत्पुण्यं जिष्णोरिति किल जजल्पुस्तटजुषः ॥ २०७ नपैर्गङ्गाद्वारे प्रणतिमणिमौपितकरः । रस्तात्सद्वद्याः सजयजयघोषरधिकृतः ॥ बहिरं सैन्ययुगपदसकृद्घोषितजयः । विभुर्दृष्टः प्रापत्स्वशिबिरबहिस्तोरणभुवम् ॥ २०८ मग रथ फिरविण्याकरिता सारथ्याने मोठ्या कष्टाने व जोराने काडण्या खेचून घोड्यांच्या माना वळविल्या व घोडयाना चालण्याविषयी प्रेरणा केली. वायु मंद वाहू लागला व लाटांचा वेग शान्त झाला व तो निधिपति भरतराजा आपल्या छावणीकडे निघाला ।। २०४ ।। यानंतर पाण्यात जखडलेले रथाचे चाक कसे तरी प्रयासाने वर काढ़न व फार वेळ रथ ओढल्यामुळे त्रासलेल्या घोड्यांना सारथ्याने त्यांच्या अंगावर हात फिरवून प्रसन्न केले व त्याने समुद्रात पाण्यातूनच रथ चालविला. त्यावेळी समुद्रही राजास पोचविण्याकरिता की काय त्याला अनुसरून चालू लागला. अर्थात् आघाताने समुद्राचे पाणी पुढे पुढे चालू लागले ।।२०५।। हा पाण्याचा मोठा प्रवाह या रथाच्या टपावरून जाणार, या समुद्राच्या लाटा रथाच्या वेगाने फुटल्या, याप्रमाणे तीरावर असलेले लोक ज्याच्याविषयी तर्क करीत आहेत असा हा रथ वेगवान् घोड्यानी ओढल्यामुळे समुद्राच्या तीरावर आला ।। २०६॥ ज्याच्या सर्व अवयवांची रचना एकसारखी सुंदर आहे असा हा रथ तरंगांना उल्लंघन निर्विघ्न सुखाने तीरावर आला आहे व चक्रायुधाला धारण करणारा हा भरतपतिही कुशल आहे. समुद्राच्या पाण्यानी ज्यांचे अंग धुतले आहे असे हे घोडे ज्यांच्या खुराना काही इजा झाली नाही असे सुरक्षित आले आहेत. यावरून या विजयशाली चक्रवर्तीचे महापुण्यच या सर्व क्षेमाला कारण आहे असे तटावरील लोक बोलू लागले ।। २०७॥ गंगाद्वारावर व त्याच्या वेदीवर रक्षणाकरिता नेमलेले जे अनेक राजे होते त्यानी नम्र केलेल्या आपल्या रत्नम कुटावर आपले दोन हात जोडन जयघोषपूर्वक प्रभु भरताला नमस्कार करून प्रेमाने पाहिले व गंगाद्वाराच्या बाहेर जे सैन्य होते त्याने एकदम जयघोष करून भरतप्रभूला पाहिले. असा हा भरतप्रभु आपल्या छावणीच्या बाहेरील तोरणयुंक्त प्रदेशात आला ।। २०८ ॥ Page #151 -------------------------------------------------------------------------- ________________ १४०) महापुराण (२८-२०९ शार्दूलविक्रीडित तत्रोखोषितमङ्गलैजयजयेत्यानन्दितो बन्दिभिः । गत्त्वान्तःशिबिरं नपालयमहाद्वारं समासादयन् ॥ अन्तर्वेशिकलोकवारवनितादत्ताक्षताशासनः। प्राविक्षनिजकेतनं निधिपतिर्वातोल्लसत्केतनम् ॥ २०९ वसन्ततिलक देवोऽयमक्षततनुर्विजिताब्धिरागात् । ते यूयमानयतसाक्षतविद्धशेषाः ॥ माशाध्वमाध्यमिह सम्मुखमेत्य तुर्णमित्युत्थितः कलकलः कटके तदाभूत् ॥ २१० जीवेति नन्दतु भवानिति वद्धिषीष्ट । देवेति निर्जय रिपूनिति गां जयेति ॥ त्वं स्ताच्चिरायुरिति कामितमाप्नुहोति पुण्याशिषां शतमलम्भि तदा स वृद्धः ॥ २११ जीयादरीनिह भवानिति निजितारिदेव प्रशाषि वसुधामिति सिद्धरत्नः । त्वं जीवताच्चिरमिति प्रथमश्चिरायुरायोजि मंगलधिया पुनरुक्तवाक्यः ॥ २१२ देवोऽयमम्बुधिमगाधमलङध्यपार-मुल्लङघ्य लब्धविजयः पुनरप्युपायात् ॥ त्या ठिकाणी मंगलगीताचे पठन करणान्या स्तुति-पाठकानी जयजयकार करून ज्याला आनंदविले आहे अशा भरतचक्रीने छावणीच्या आत प्रवेश केला व तो राजवाड्याच्या महाद्वारात आला. त्यावेळी त्या ठिकाणी अन्तःपुरातील लोकानी व वेश्याजनानी मंगलाक्षतापूर्वक भाशीर्वाद दिला. यानंतर ज्यावर वान्याने ध्वज फडकत आहेत अशा आपल्या राजवड्यात राजाकरिता उभारलेल्या तंबूत त्याने प्रवेश केला ॥ २०९ ।। ज्याने समुद्राला जिंकले आहे व ज्याच्या देहाला कोठेही जखम झाली नाही असा हा भरतप्रभु आला आहे. यास्तव तुम्ही सर्व अक्षतासह सिद्धशेषा अरिहंताच्या चरणी अपिलेले पुष्पादिक शेषा हे पदार्थ घेऊन या व भरतप्रभूला आशीर्वाद द्या व शीघ्र त्याच्या संमुख बसा. याप्रमाणे सैन्याच्या निवासस्थानी तेव्हा जिकडे तिकडे कलकलाट सुरू झाला ।। २१० ॥ त्यावेळी हे राजा तूं दीर्घकाल जग, प्रभो तुला ऐश्वर्यसमृद्धि प्राप्त होवो. हे ईशा तुला धनधान्यसमृद्धि प्राप्त होवो. हे देव, तूं शत्रूना जिंकून विजयी हो व पृथ्वीला जिक, हे स्वामिन् तूं दीर्घायुषी हो व तुला सर्व इष्टपदार्थांची प्राप्ति होवो. याप्रमाणे वृद्धांनी भरतेशाला शेकडो पुण्यमय आशीर्वाद दिले ।। २११ ।। ज्याने शत्रूना जिंकले आहे अशा हे राजा तूं शत्रूना जिक. हे प्रभो, तुला चक्रदण्डादिक रत्ने प्राप्त झाली आहेत. म्हणून तूं सर्व पृथ्वीचे पालन कर. हे ईशा, तू पहिला चक्रवर्ती आहेस. तू चिरायु हो. अशा पुनरुक्त वचनानी किती एक लोकानी अनेक मंगल आशीर्वाद दिले ॥२१२॥ हा लवणसमुद्र अगाध आहे. याच्या परतीराचे उल्लंघन करता येत नाही. परंतु या भरतप्रभूनी त्याला उल्लंघून त्यावर विजय मिळविला आहे. पुण्यच सारथि ज्याचा आहे असा Page #152 -------------------------------------------------------------------------- ________________ २८-२१८) पुण्यक सारथिरिति विनान्तरायः । पुष्ये प्रसेदुषि नृणां किमिवास्त्यल अध्यम् ॥ २१३ पुण्यादयं भरतचक्रधरो जिगीषु रुद्भिन्नवेलमनिलाहतवीचिमालम् । प्रोल्लध्य वाद्धिममरं सहसा विजिग्ये । पुण्ये बलीयसि किमस्ति जगत्यलङध्यम् ॥ २१४ पुण्योदयेन मकराकर वारिसीमां । पृथ्वीं स्वसादकृत चक्रधरः पृथुश्रीः ॥ दुर्लभ्यमब्धिमवगाह्य विनोपसर्गेः । पुण्यात्परं न खलु साधनमिष्टसिद्धये ॥ २१५ चक्रायुधोऽयमरिचक्रभयङ्कर श्रीः । आक्रम्य सिन्धुमतिभीषणनऋचक्रम् ॥ चक्रे वशे सुरमवश्यमनन्यवश्यं । पुण्यात्परं न हि वशीकरणं जगत्याम् ॥ २१६ पुण्यं जले स्थलमिवाभ्युपपद्यते नृन् । पुण्यं स्थले जलमिवाशु निहन्ति तापम् ॥ पुण्यं जलस्थलभये शरणं तृतीयम् । पुण्यं कुरुध्वमत एव जना जिनोक्तम् ॥ २१७ पुण्यं परं शरणमापदि दुविलङ्घ्यं । पुण्यं दरिद्रति जने सुखदायि पुण्यम् ॥ पुण्यं सुखार्थानि जने सुखदायि रत्नम् । पुण्यं जिनोदितमतः सुजनाश्चिनुध्वम् ॥ २१८ महापुराण हा भरतप्रभु कांही अन्तराय न येता येथे आला आहे. पुण्य प्रसन्न झाले म्हणजे मनुष्याला अलंघ्य वस्तु कोणतीच राहात नाही. अर्थात् सर्व उत्तम वस्तूंची प्राप्ति होतेच ।। २१३ ।। ( १४१ सर्व जगाला जिंकण्याची इच्छा करणान्या भरतराजाने ज्याच्यात भरती ओहोटीनहमी उत्पन्न होतात व ज्याच्या लाटा वायूने सारख्या उठून आपटल्या जातात अशा समुद्राचे उल्लंघन केले व मागधदेवाला सहसा जिंकले. हे सर्व योग्यच झालें. कारण पुण्य बळकट असल्यावर जगात कांहीच अलंध्य - असाध्य नाही ।। २१४ ।। ज्यांचे वैभव फार मोठे आहे अशा चक्री भरताने ही संपूर्ण भरतक्षेत्ररूपी पृथ्वी जिला लवणसमुद्राच्या पाण्याची सीमा आहे तिला पुण्याच्या विशाल उदयाने आपल्या आधीन करून घेतले आहे. ज्यात प्रवेश करणे अत्यंत कठिण आहे अशा लवणसागरात प्रवेश करून काहीही विघ्नावाचूनही भरत लक्ष्मी निजाधीन करून घेतली. यावरून इष्टसंसिद्धि होण्याकरिता पुण्याशिवाय दुसरे उत्कृष्ट साधन नाहीच असे म्हणावयास बिलकुल हरकत नाही ।। २१५ ।। शत्रुसमूहाला ज्याची लक्ष्मी फार भयंकर वाटते अशा या चक्रायुधयुक्त भरतेशाने अतिशय भयंकर मगरादिक जलचरांचा समूह ज्यात आहे अशा सिन्धु - लवणसमुद्राला जिंकले व कोणालाही वश न होणान्या मागधदेवाला वश केले. यावरून या जगात पुण्याशिवाय दुसरें वश करणारे साधन नाही हे सिद्ध होते ।। २१६ ।। पुण्य हे पाण्यात मानवाना स्थलस्वरूपाचे होते व हे पुण्य स्थलावर पाण्याप्रमाणे होऊन संतापाचा नाश करते. हे पुण्य जलभय व स्थलभय दूर करण्यास मनुष्याना तिसरा उपाय आहे. म्हणून जनहो जिनेश्वराने सांगितलेले पुण्य करा ।। २१७ ॥ है पुण्य आपत्तीत ज्याचा अतिक्रम कोणीही करू शकत नाही असे मनुष्याचे रक्षक आहे. हे पुण्य दारिद्रयावस्थेत मनुष्याला धन देणारे आहे. जो सुखेच्छु आहे त्याला हे पुण्य • Page #153 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (२८-२१९ पुण्यं जिनेन्द्रपरिपूजनसाध्यमाद्यम् । पुण्यं सुपात्रगतदानसमुत्थमन्यत् ॥ पुण्यं व्रतानुचरणादुपवासयोगात् । पुण्यार्थिनामिति चतुष्टयमर्जनीयम् ॥ २१९ इत्थं स्वपुण्यपरिपाकजमिष्टलाभम् । स श्लाघयनजनतया श्रुतपुण्यघोषः॥ चक्री सभागृहगतो नृपचक्रमध्ये । शक्रोपमः पृथुनपासनमध्यवात्सीत् ॥ २२० हरिणी धुततटवने रक्ताशोकप्रवालपुटोद्भिदि । स्पृशति पवने मन्दं मन्वं तरङ्गविभेदिनि । अनुसुरसरित्सन्यः साधं प्रभुः सुखमावस-ज्जलनिधिजयश्लाघाशीभिजिनाननुचिन्तयन् ॥ २२१ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसंग्रह पूर्वार्णवद्वारविजयवर्णनं नामाष्टाविशं पर्व ॥ २८॥ सुख देणारे रत्नाप्रमाणे आहे. म्हणून हे सज्जनानो, आपण जिनेश्वरानी सांगितलेले पुण्य नेहमी संचित करा ॥ २१८ ।। जिनेश्वराचे पूजन केल्यापासून प्राप्त होणारे जे पुण्य ते सर्वश्रेष्ठ म्हणून पहिले होय. सत्पात्राला दान दिल्यापासून उत्पन्न होणारे जे पुण्य आहे ते दुसरे पुण्य आहे. अहिंसादिक व्रताचरणापासून प्राप्त होणारे पुण्य हे तिसरे पुण्य होय व उपवास केल्यापासून प्राप्त होणारे जे पुण्य ते चौथे होय. असे पुण्याचे चार प्रकार आहेत. म्हणून पुण्याची इच्छा करणान्यानी श्रीजिनेन्द्रपूजा करावी, सत्पात्राला दान द्यावे, अहिंसादिक व्रतांचे पालन करावे व उपवासादि नियम पाळावे. अशा या चार क्रिया अवश्य कराव्यातच ।। २१९ ।। याप्रमाणे आपल्या पुण्याच्या उदयापासून जो इष्टपदार्थाचा लाभ झाला आहे त्याविषयी मनात जो आनंद मानीत आहे व स्वपुण्याची जनतेकडून झालेली घोषणा ज्याने ऐकिली आहे असा तो चक्रवर्ती सभागृहात गेला. तो राजसमूहामध्ये इद्राप्रमाणे दिसत होता व सभागृहातील मोठ्या राजसिंहासनावर तो इंद्राप्रमाणे बसला ॥ २२० ॥ तीरावरील वृक्षांना हालविणारा व लाल अशोकाच्या कोवळ्या पालवींना विकसित करणारा व लाटांना मंदमंदपणाने वेगळे करणारा असा वारा वहात असता त्या गंगानदीच्या तटावर आपल्या सैन्यासह नृपेशभरत सुखाने राहिला व समुद्राला जिंकल्यामुळे लोकांच्या मंगल आशीर्वादासह श्रीजिनेश्वराचे चिन्तन तो मनात करू लागला ।। २२१ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत आर्षत्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादात पूर्वसमुद्राच्या द्वाराच्या विजयाचे वर्णन करणारे अठ्ठाविसावे पर्व समाप्त झाले. Page #154 -------------------------------------------------------------------------- ________________ एकोनत्रिंशं पर्व | अथ चक्रधरो जेनीं कृत्वेज्यामिष्टसाधनीम् । प्रतस्थे दक्षिणामाशां जिगीषुरनुतोयधि ॥ १ तोऽस्य पटुढक्कानां ध्वनिरामन्द्रमुच्चरन् । मूर्च्छितः काहलारावैरब्धिध्वानं तिरोदधे ॥ २ प्रयाणभेरी निःस्वानः सम्मूर्च्छन् गजबृंहितैः । दिङ्मुखान्यनयत्क्षोभं हृदयानि च विद्विषाम् ॥ ३ विबभुः पवनोद्धूता जिगीषोजयकेतनाः । वारिधेरिव कल्लोलानुद्वेलाना जुहूषवः ॥ ४ एकतो लवणाम्भोधिरन्यतोऽप्युपसागरः । तन्मध्येयान्बलौघोऽस्य तृतीयोऽब्धिरिवाबभौ ॥ ५ हस्त्यश्वरथपादातं देवाश्च सनभश्चराः । षडङ्गं बलमस्येति पप्रथे व्याप्य रोदसी ॥ ६ पुरः प्रतस्थे दण्डेन चक्रेण तदनन्तरम् । ताभ्यां विशोधिते मार्गे तद्दलं प्रययौ सुखम् ॥ ७ तच्चक्रमरिचक्रस्य केवलं क्रकचायितम् । दण्डोऽपि दण्डचपक्षस्य कालदण्ड इवापरः ॥ ८ यानंतर चक्रायुधधारी भरतेश्वराने इष्टजयप्राप्ति करून देणारी जिनेश्वराची पूजा केली. नंतर दक्षिणदिशेला जिंकण्याची इच्छा करणारा तो समुद्राला अनुसरून प्रयाण करू लागला ।। १ ॥ त्यावेळी मोठ्या नगान्यांचा गंभीर ध्वनि तुतान्यांच्या आवाजानी युक्त होऊन दुप्पट झाला व त्याने समुद्राच्या ध्वनीला आच्छादले. समुद्राची गर्जना ऐकू येईना अशी झाली ॥ २ ॥ प्रयाणाच्यावेळी वाजविलेल्या नगान्यांचा ध्वनि हत्तीच्या शब्दानी द्विगुण- दुप्पट झाला व त्याने दिशांची मुखे दणाणली व शत्रूची मनेही घाबरी झाली ॥ ३ ॥ दक्षिणेकडील प्रदेशाला जिंकण्याची इच्छा करणान्या भरतराजाचे वायानी वर फडफडणारे विजयध्वज तीरावर येऊन आपटत असलेल्या समुद्राच्या तरंगाना जणु बोलावण्याची इच्छा करीत असल्याप्रमाणे शोभत होते ॥ ४ ॥ एका बाजूला लवणसमुद्र आणि दुसरीकडे उपसागर. या दोहोच्या मध्यप्रदेशातून प्रयाण करणारे हे भरतेशाचे सैन्य जणु तिसन्या समुद्राप्रमाणे शोभले ।। ५ ।। हत्ती, घोडे, रथ, पायदळ व विद्याधर सैन्यासह असलेले देवसैन्य असे सहा प्रकारचे या भरतराजश्वराचे सैन्य होते व ते आकाशात व पृथ्वीवर व्यापून पसरले होते ॥ ६ ॥ सर्व सैन्याच्या पुढे दण्डरत्न चालत असे, यानंतर चक्ररत्न चालत असे आणि या दोघांच्याद्वारे स्वच्छ केलेल्या मार्गानी चक्रवर्तीचे सैन्य सुखाने प्रयाण करू लागले ।। ७ ।। ते चक्र शत्रुसैन्याला केवळ करवताप्रमाणे कापून टाकणारे वाटत असे व दण्डरत्न देखिल शत्रुगणाला यमाच्या दण्डाप्रमाणे वाटत असे ।। ८ ।। Page #155 -------------------------------------------------------------------------- ________________ १४४) महापुराण . (२९-९ प्रययो निकषाम्भोधि समया तटवेदिकाम् । अनुवेलावनं सम्राट् सन्यैः संभावयन्विशः ॥९ मनुवाद्धितटं कर्षन्नलच्या स्वमनीकिनीम् । आज्ञालतां नृपाद्रीणां मूनि रोपयति स्म सः॥ चलिते चलितं पूर्व निर्याते निःसृतं पुरः । प्रयाते यातमेवास्मिन् सेनानीभिरिवारिभिः॥ ११ निष्क्रान्त इति सम्भ्रान्तरायात इति भीवशः । प्राप्त इत्यनवस्थश्च प्रणेमे सोऽरिभूमिपैः ॥१२ महापगारयस्येव तरुरस्य बलीयसः । यो यः प्रतीपमभवत्स स निर्मूलतां ययौ ॥ १३ प्रतीपवृत्तिमादर्श छायास्मानं च नात्मनः । विक्रमकरसश्चक्री सोऽसोढ किमुत द्विषम् ॥ १४ सम्राट भरताने आपल्या सैन्याच्याद्वारे सर्व दिशाना शब्दमय करीत प्रयाण केले. अर्थात् समुद्राच्याजवळ व तटवेदिकेला लागून असलेल्या वनाच्या जवळ त्याने सैन्यासह प्रयाण केले ॥ ९ ॥ जिचा पराभव करणे शक्य नाही अशा आपल्या सेनेला चक्रवर्तीने समुद्रतटाला अनुसरून नेले व त्याने राजे हेच जणु पर्वत त्यांच्या मस्तकावर त्याने आपल्या आज्ञारूपी लतेचे आरोपण केले ॥१०॥ भरतराजा जाण्याला उद्युक्त झाला म्हणजे त्याच्या पूर्वी सेनापति जसे निघत असत तसे शत्रुसमूहही भरतराजाच्या निघण्याच्या पूर्वीच जाण्याला उद्युक्त होत असत. जसे भरतराजा निघाला असता सेनापति तत्पूर्वी पुढे निघून जात असत तसे भरतप्रभूचे शत्रु त्याच्या आधीच आपले स्थान सोडून निघून जात असत. अर्थात् स्थान सोडून पळत असत. अथवा भरतप्रभूला शरण जाण्यासाठी उद्युक्त होत असत. भरतमहाराज नगरातून निघण्याच्या पूर्वीच सेनापति प्रथम नगरातून पुढे जात असत. तसे शत्रु आपल्या नगरातून आधीच निघून पुढे पळत जात असत. अथवा भरतराजाला भेटण्यासाठी आपल्या नगरातून शत्रु बाहेर येत असत. भरतमहाराजानी प्रस्थान करण्याच्या पूर्वी त्यांचे सेनापति प्रस्थान करीत होते तसे त्यांचे शत्रुही भरतमहाराजाच्या प्रस्थानापूर्वीच प्रस्थान करीत असत अर्थात् अन्य ठिकाणी निघून जात असत किंवा चक्रवर्तीला भेटण्यासाठी पुढे जात असत ।। ११ ॥ चक्रवर्ती भरतमहाराज नगरातून निघाले असे ऐकल्याबरोबर शत्रु व्याकुल होत असत व भरतमहाराज आले असे ऐकल्याबरोबर शत्रु भयवश होत असत व महाराज अगदी असे ऐकल्यावर त्यांचे चित्त ठिकाणावर राहात नसे आणि मग शरण येऊन ते शत्र भरतमहाराजाना नमस्कार करीत असत ।। १२ ।। अतिशय बलवान् अशा महानदीच्या वेगासमोर आलेल्या वृक्षाची जशी परिस्थिति होते अर्थात् तो मुळासकट उन्मळून पडतो तसे जे शत्रु या चक्रवर्तीच्या विरुद्ध जात ते पूर्णपणे नष्ट होत असत ।। १३ ॥ _पराक्रम गाजवणे हेच ज्याला आवडते अशा या भरत भूपालाला आरशात आपलेच प्रतिबिम्ब उलट दिसत असलेले सहन होत नव्हते. मग त्याला आपल्या उलट असलेला शत्रु कसा बरे सहन होईल ? ॥ १४ ॥ Page #156 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-२१) महापुराण (१४५ चमूरवधवादेव कैश्चिदस्य विरोधिभिः । चमूरुवृत्तमारब्धमतिदूरं पलायिभिः॥ १५ महाभोगर्नुपैः कैश्चिद्भयादुत्सृष्टमण्डलैः । भुजङ्गरिव निर्मोकस्तत्यजेऽपि परिच्छदः ॥ १६ प्रदुष्टान्भोगिनः कांश्चितप्रभुरुद्धृत्य मन्त्रतः । वल्मीकेष्विव दुर्गेषु कुल्यानन्यानतिष्ठिपत् ॥१७ अनन्यशरणैरन्यैस्तापविच्छेदमिच्छुभिः । तत्पादपादपच्छाया न्यषेवि सुखशीतला ॥ १८ केषाञ्चित्पत्रनिर्मोक्षं छायापायं च भूभुजाम् । पादपानामिव ग्रीष्मः समभ्यर्णश्चकार सः॥ १९ ध्वस्तोष्मप्रसरा गाढमुच्छ्वसन्तोऽन्तराकुलाः । प्राप्तेऽस्मिन्वैरिभूपालाः प्रापुर्मर्तव्यशेषताम्॥२० वैरकाम्यति यो नास्मिन्प्रागेव विननाश सः । विदिध्यापयिषुर्वह्नि शलभः कुशली किम् ॥ २१ सैन्याचा शब्द ऐकल्याबरोबर या भरतराजाचे शत्रु अतिदूर पळून हरिणाच्या वृत्ताचा आश्रय करीत असत ॥ १५ ॥ उत्तम सुखे भोगणारे अशा कित्येक राजांनी आपल्या-मण्डलाचा देशाचा त्याग केला. जसे ज्यांची शरीरे स्थूल आहेत असे सर्प भयाने आपल्या शरीराचा मंडलाकार त्यागतात व कांत सोडून देतात. तसे महाभोग सुखे भोगणारे असे राजे भयाने आपल्या देशाचा त्याग करून व आपले छत्र चामरादिक सोडून टाकून गेले ।। १६ ॥ ___जसे दुष्ट सर्पाना मंत्राच्याद्वारे पकडून वारूळात सोडतात तसे प्रजेला पिळून सुखोपभोग घेणाऱ्या दुष्ट राजांना आपल्या मंत्राच्याद्वारे सल्लामसलतीने किल्ल्यात डांबून ठेवले व कुलीन इतर राजांना त्यांच्या राज्यावर भरतमहाराजानी स्थापन केले ॥ १७ ॥ ज्याना दुसरा कोणी रक्षक नाही व आपल्याला त्रास-दुःख होऊ नये असे इच्छिणारे कित्येक राजानी या भरतराजाच्या चरणरूपी वृक्षाची सुखदायक व शीतल अशी जी छाया तिचा आश्रय घेतला ॥ १८ ॥ ग्रीष्मऋतु जवळ आला म्हणजे तो कित्येक वृक्षाची पाने नाहीशी करतो व कित्येकांची छाया-सावली नाहीशी करतो. तसे या भरतराजाने देखिल कित्येक दुष्ट राजांचा पत्रनिर्मोक्षहत्ती घोडे वगैरे पत्राना-वाहनाना नाहीसे केले. व कित्येकांच्या छायेचा अपाय-आश्रयाचा नाश केला ॥ १९ ॥ हा भरतराजा जेव्हा जवळ आला तेव्हा कांहीं शत्रुराजांच्या तेजस्वीपणाचा नाश झाला. ते मोठ्या वेगाने श्वास टाकू लागले व त्यांच्या अन्तःकरणात फारच व्याकुळता उत्पन्न झाली. आता त्यांचे फक्त मरावयाचे बाकी उरले होते ॥ २० ॥ __जो राजा या भरतराजाविषयी मनात शत्रुभाव बाळगीत होता. त्याचा पूर्वीच नाश होऊन चुकला. बरोबरच आहे की अग्नि आपण विझवू अशी इच्छा करणा-या टोळाचे कुशल कसे होईल ? तो सुखी होणे कसे शक्य आहे ? ॥ २१ ॥ Page #157 -------------------------------------------------------------------------- ________________ १४६) महापुराण (२९-२२ वस्तुवाहनसर्वस्वमाच्छिद्य प्रभुराहरत् । अरित्वमरिचक्रेषु व्यक्तमेव चकार सः ॥ २२ स्वयमपितसर्वस्वा नमन्तश्चक्रवतिनम् । पूर्वमप्यरयः पश्चादधिकारित्वमाचरन् ॥ २३ साधनैरमुनाकान्ता या धरा घृतसाध्वसा । सा धनैरेव तं तोषं नीत्वाभूद्धृतसाध्वसा ॥ २४ कुल्याः कुलघनान्यस्मै दत्वा स्वां भुवमाजिजन् । कुल्याधनजलौघाश्च जिगीषोस्ते हि पार्थिवाः ॥ प्रजाः करभराक्रान्ता यस्मित्स्वामिनि दुःखिताः । तमुद्धृत्य पदे तस्य युक्तदण्डं न्यधाद्विभुः ॥ २६ विजग्राह नपान्दृप्ताननुजग्राहसत्क्रियान् । न्यायः क्षात्रोऽयमित्येवं प्रजाहितविधित्सया ॥ २७ योगक्षेमौ जगत्स्थित्य न प्रजास्वेव केवलम् । प्रजापालेष्वपि प्रायस्तस्य चिन्त्यत्वमीयतुः ॥ २८ या भरतराजाने शत्रूची रत्ने, मोत्ये आदिक धन आणि घोडे, हत्ती आदिक वाहने व आणखी बाकीचे पदार्थ, देश कोशादिक सर्व लुटून नेले व स्पष्ट रीतीने या शत्रुसमूहात त्याने अरित्व व्यक्त केले. अरित्व-अरि-रे म्हणजे धन संपत्ति ती शत्रूची या भरताने घेतल्यामुळे ते शत्रु उघडपणे अरि झाले-धनरहित झाले ।। २२ ।। भरतराजाला नमस्कार करून त्याला सर्वस्व अर्पण करणारे कांहीं राजे पूर्वी त्याचे शत्रु होते पण त्यानंतर ते मोठे अधिकारी झाले ।। २३ ॥ या भरतेश्वराच्या सैन्यानी आक्रमण केलेली व भयभीत झालेली जी पृथ्वी तिने धन देऊन चक्रवर्तीला जेव्हा सन्तुष्ट केले तेव्हा चक्रवर्तीने तिचे भय दूर केले ॥ २४ ॥ कुलीन वंशातील राजानी आपल्या जवळचे वंशपरंपरेने चालत आलेले रत्नादिक धन देऊन आपली भूमि चक्रवर्तीपासून मिळविली. हे योग्यच झाले कारण कुल्य-कुलपरंपरेने प्राप्त झालेले धन व कुल्या म्हणजे कालव्याचे जल-पाणी हे दोनही पदार्थ पृथ्वी पासून उत्पन्न झालेले असल्यामुळे पृथ्वीला जिंकणाऱ्याचेच असतात ॥ २५ ॥ जो राजा राज्य करीत असता प्रजेवर अतिशय कर बसवून तिला दुःखी करितो अशा राजाला भरतचक्रवर्तीने राज्यापासून बाजूला केले व त्याच्या पदावर कोणा योग्य व्यक्तीला त्याने बसविले ।। २६ ।। या भरतेश्वराने उन्मत्त झालेल्या राजाना दंड केला व चांगले कार्य करणान्यावर अनुग्रह केला व हे योग्यच झाले. कारण प्रजेचे हित करण्याच्या इच्छेने क्षत्रियानी असे वागणे न्याययुक्तच आहे ॥ २७ ॥ __ योग-- जी वस्तु जवळ नसते ती मिळविणे, क्षेम- मिळविलेली जी वस्तु तिचे रक्षण करणे. हे योग क्षेम जगाचे सर्व व्यवहार सुरळित चालण्यास कारण आहेत. भरतेश्वराने ते योग क्षेम फक्त प्रजेच्या ठिकाणी असले म्हणजे पुरे आहे असे मानले नाही तर ते योगक्षेम प्रजापालक मांडलिक राजातही असावेत याविषयी भरतराजाला फार काळजी होती ॥ २८ ।। Page #158 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-३५) महापुराण (१४७ पार्थिवस्यैकराष्ट्रस्य मता वर्णाश्रमाः प्रजाः । पार्थिवाः सार्वभौमस्य प्रजा यत्तेन ते धृताः ॥२९ पुण्यं साधनमस्यैकं चक्रं तस्यैव पोषकम् । तद्वयं साध्यसिद्धयङ्ग सेनाङ्गानि विभूतये ॥ ३० इति मण्डलभूपालान्बलात्प्राणमयनयम् । मानमेवाभनक तेषां न सेवाप्रणयं विभुः ॥ ३१ प्रतिप्रयाणमभ्येत्य प्राणंसिषुरमुं नृपाः । प्राणरक्षामिवास्याज्ञां वहन्तः स्वेषु मूर्धसु ॥ ३२ प्रणताननुजग्राह सातिरेकैः फलैः प्रभुः । किमु कल्पतरोः सेवास्त्यफलाल्पफलापि वा ॥ ३३ सम्प्रेक्षणः स्मितहासः सविश्रम्भश्च जल्पितैः । सम्राट् सम्भावयामास नपान्संमाननैरपि ॥३४ स्मितः प्रसाद सञ्जल्पवित्रम्भं हसितैर्मुदम् । प्रेक्षितैरनुरागं च व्यनक्ति स्म नृपेषु सः ॥ ३५ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण. आणि ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि भिक्षु हे चार आश्रम. या चार वर्णांचे व चार आश्रमांचे जे जनसमुदाय हे एका राष्ट्राची-एका देशाच्या राजाची प्रजा आहे व असे नम्र झालेले अनेक देशाचे जे राजे ते चक्रवर्तीची प्रजा होय. म्हणून प्रजेबरोबर राजांचीही काळजी वाहणे हे चक्रवर्तीला योग्यच आहे ॥ २९॥ पूर्वजन्मी प्राप्त करून घेतलेले पुण्यकर्म हे या चक्रवर्तीला सर्व कार्यसिद्ध करण्यास मुख्य साधन होते व चक्ररत्न हे त्या पुण्याला मदत करणारे दुसरे साधन होते व सैन्य हे त्याच्या वैभवाला प्रकट करणारे होते. अर्थात् विजयरूपकार्याच्या सिद्धीलाही दोन मुख्य कारणे होती ॥ ३० ॥ याप्रमाणे वर सांगितलेल्या साधनानी ह्या राजेश्वराने मांडलिक राजांना नम्र केले अर्थात् त्यांचा अभिमान त्याने नष्ट केला पण सेवा करण्याविषयी जे त्यांचे प्रेम होते ते त्याने नष्ट केले नाही ॥ ३१ ॥ प्रत्येक प्रयाणाचे वेळी ते राजे आले व त्यानी त्याला नमस्कार केला व जणु आपल्या प्राणाचे रक्षण करणारी अशी या चक्रवर्तीची आज्ञा त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केली ॥ ३२ ॥ भरतेश्वराने जे राजे नम्र झाले होते त्याना अतिशय अधिक फळ देऊन त्यांच्यावर चांगला अनुग्रह केला. बरोबरच आहे की, कल्पवृक्षाची सेवा निष्फळ किंवा त्याच्यापासून अल्प फल मिळाले असे कधी घडले आहे काय ? ॥ ३३ ।। या चक्रवर्तीने कित्येक राजाना प्रसन्नपाहण्याने, कित्येकांना अधिक हसण्याने, कित्येकाबरोबर विश्वासयुक्त भाषणाने व कित्येकांचा आदराने सत्कार करून संतुष्ट केले ॥ ३४ ॥ ___या भरतराजाने किंचित् हसण्याने त्या मांडलिक राजाविषयी आपली प्रसन्नता व्यक्त केली. कित्येकाशी मनमोकळेपणाच्या भाषणाने विश्वास प्रकट केला. अधिक हसण्याने आनंद व्यक्त केला व प्रेमळ पाहण्याने त्यांच्याविषयीचे प्रेम त्याने व्यक्त केले ॥ ३५ ॥ Page #159 -------------------------------------------------------------------------- ________________ १४८) महापुराण (२९-३६ अतार्सीत्प्रणतानेष समताप्सोद्विरोधिनः । शमप्रतापौ मां जेतुं पार्थिवस्योचितौ गुणौ ॥३६ प्रसन्नया दृशवास्य प्रसादः प्रणते रिपौ। भ्रूभङगेणास्फुटत्कोपः सत्यं बहुनटा नपाः ॥ ३७ अङगान्मणिभिरत्यङगैर्वङगांस्तुङगैर्मतङगजः । तेश्च तैश्च कलिङगेशान्सोऽभ्यनन्ददुपानतान् ॥ मागधीयितमेवास्य स्फुटं मागधकर्नृपः । कोर्तयद्भिर्गुणानुच्चैः प्रसादमभिलाषकः ॥ ३९ कुरूनवन्तीन्पाञ्चालान्काशींश्च सह कोसलैः । वैदर्भानप्यनायासादाचकर्ष चमूपतिः ॥ ४० व्रजन्मद्रांश्च कच्छांश्च वेदोनवत्सान्ससुह्मकान् । पुण्डानौण्ड्रांश्च गौडांश्च मतमश्रावयद्विभोः॥ दशार्णान्कामरूपांश्च काश्मीरानप्युशीनरान् । मध्यमानपि भूपालान्सोऽचिराद्वशमानयत् ॥ ४२ बदुरस्मै नृपाः प्राच्यकलिङगाङगारजान्गजानृ । निरीनिवमहोच्छायान्प्रश्चोतन्मदनिर्झरान् ॥ जे राजे भरत चक्रवर्तीला नम्र झाले त्यांच्यावर तो सन्तुष्ट झाला, प्रसन्न झाला आणि जे राजे विरोधक होते त्याना त्याने अतिशय त्रस्त केले. बरोबरच आहे की, जो राजा पृथ्वीवर दिग्विजय करण्यासाठी निघाला आहे त्याच्या ठिकाणी शम-शान्ति व प्रताप हे दोन गुण असणे अगदी योग्य आहे ।। ३६ ।। जे शत्रु नम्र होत असत त्यांच्याविषयी या भरतेशाने आपल्या प्रसन्न दृष्टीनेच प्रसाद व्यक्त केला व नम्र न झालेल्या राजाविषयी त्याने आपल्या भुवया चढवून कोप व्यक्त केला. यावरून अनेक भाव व्यक्त करणारा राजा अनेक नटाप्रमाणे असतो अशी म्हण सत्य आहे असे मानावयास हरकत नाही ।। ३७ ।। अतिशय उत्कृष्ट रत्ने अर्पण करून नम्र झालेल्या अंग देशाच्या राजाना व उंच असे हत्ती नजराण्याकरिता पुढे करून नम्र झालेल्या वंग देशाच्या राजाना व उत्तम रत्ने आणि मोठे हत्ती यांचा नजराणा देऊन नम्र झालेल्या कलिंग देशांच्या राजाना पाहून तो चक्रवर्ती आनन्दित झाला ॥ ३८॥ चक्रवर्ती आपल्यावर नेहमी प्रसन्न राहावा या इच्छेने त्याच्या गुणांचे उच्च स्वराने गायन करणाऱ्या मगध देशाच्या राजानी उघड रीतीने स्तुति पाठकाचेच काम पत्करले ।। ३९॥ भरतेशाच्या सेनापतीने कोसल देशाच्या राजाबरोबर कुरु, अवन्ती, पांचाल, काशी व विदर्भ या देशांच्या राजाना अनायासाने वश केले होते ॥ ४० ॥ __मद्र, कच्छ, चेदि, वत्स, सुह्मक, पुण्ड, औण्ड, गौड आदिक देशात प्रयाण करणा-या सेनापतीने त्या त्या देशातील राजाना भरतप्रभूचे मत-शासन आज्ञा कळविली ।। ४१ ।। याचप्रमाणे दशार्ण, कामरूप, काश्मीर, उशीनर व मध्यम या देशांच्या राजानाही त्या सेनापतीने लौकरच वश केले ॥ ४२ ॥ पर्वताप्रमाणे फार उंच व ज्यांच्या गंडस्थलातून मद झरत आहे असे जे पूर्व दिशेकडे असलेल्या कलिंग व अंगार देशात उत्पन्न झालेले हत्ती ते या चक्रवर्तीला अनेक राजानी भेट म्हणून अर्पण केले ॥ ४३ ॥ Page #160 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-५३) महापुराण (१४९ दशार्णकचनोभूतानपि चेदिकरूषजान् । दिङनागस्पद्धिनो नागानदुर्भागवनाधिपाः ॥ ४४ विभोर्वलभरक्षोभमसहन्तीव दुःसहम । सूषवेऽनन्तरत्नानि गर्भिणीव वसुन्धरा ॥ ४५ आपाण्डुरगिरिप्रस्थादा च वैभारपर्वतात् । आशैलाद्गोरथादस्य विचेरुर्जयकुञ्जराः ॥४६ वङ्गाङ्गपुण्ड्रमगधान्मालवान्काशिकौशलान् । सेनानीः परिबभ्राम जिगीषुर्जयसाधनः ॥४७ कालिन्दकालकूटौ च किरातविषयं तथा । मल्लदेशं च सम्प्रापन्मतादस्य चमूपतिः ॥ ४८ धनी सुमागधी गङ्गां गोमती च कपोवतीम् । देवस्यां च नदी तीभ्रमरस्य चमूगजाः ॥ गम्भीरामतिगम्भीरां कालतोयां च कौशिकीम् । नदी कालमहीं तानामरुणां निचुरामपि।।५० तं लौहित्यसमुद्रं च कम्बुकं च महत्सरः । चमूमतङ्गजास्तस्य भेजुः प्राच्यवनोपगाः ॥५१ दक्षिणेन नदं शोणमुत्तरेण च नर्मदाम् । बीजानदीमुभयतः परितो मेखलानदीम् ॥ ५२ विचेरुः स्वखुरोद्भूतधूलीसंरुद्धदिङमुखाः । जविनोऽस्य स्फुरत्प्रोथाः जयसाधनवाजिनः ॥ ५३ ज्या वनात हत्ती उत्पन्न होतात त्या वनाच्या अधिपतीनी दशार्णक देशाच्या वनात उत्पन्न झालेल्या आणि चेदि देश व करूष देश या देशात उत्पन्न झालेल्या व दिग्गजाशी स्पर्धा करणारे असे हत्ती भरत राजाला भेट म्हणून दिले ॥ ४४ ।। या भरत प्रभूच्या सैन्याचे दु:सह ओझे जणु सहन न करणारी आणि जणु गर्भिणी अशा या वसुंधरेने-पृथ्वीने अनन्तरत्नाना जन्म दिला ॥ ४५ ॥ या भरतेशाचे विजयशाली हत्ती हिमवान् पर्वताच्या पायथ्याच्या टेकडीपासून वैभारपर्वतापर्यन्त आणि शिल पर्वतापासून गोरथपर्वतापर्यन्त फिरू लागले ॥ ४६ ।। शत्रूना जिंकण्याची इच्छा करणारा भरतप्रभूचा सेनापति वंग, अंग, पुण्ड्र, मगध, मालव, काशि आणि कौशल या देशाना जिंकण्याच्या इच्छेने चतुरंग सैन्य घेऊन फिरू लागला ॥ ४७ ॥ भरतप्रभूच्या आज्ञेने तो सेनापति कालिंद व कालकूट या देशात, भिल्लांच्या राज्यात आणि मल्ल देशात क्रमाने आला ।। ४८ ।। या भरत चक्रधराच्या सैन्यातले हत्ती सुमागधी, गंगा, गोमती, कपीवती, रेवस्या या नद्यातून तरून पलिकडे गेले ।। ४९ ।। पूर्व दिशेच्या वनाकडे गेलेले भरत प्रभूचे हत्ती अतिशय खोल पाण्याची गंभीरानदी, कालतोया, कौशिकी, कालमही, ताम्रा, अरुणा, निचुरा या नद्या व लौहित्यसमुद्र आणि कंधुक सरोवर या ठिकाणी फिरले ॥ ५०-५१ ॥ आपल्या खुरांच्या आघातानी उडालेल्या धुराळयानी ज्यानी सर्व दिशा व्यापिल्या आहेत, ज्याचे नाकाचे भाग फुरफुरत आहेत व जय मिळवून देणारे असे भरतेशाचे घोडे, शोणभद्रनदीच्या दक्षिण बाजूने व नर्मदा नदीच्या उत्तर बाजूने बीजा नामक नदीच्या दोन्ही बाजूनी व मेखलानदीच्या सर्व बाजूनी फिरत होते ।। ५२-५३ ।। Page #161 -------------------------------------------------------------------------- ________________ १५०) महापुराण (२९-५४ उदुम्बरी च पनसां तमसा प्रमशामपि । पपुरस्य द्विधाः शुक्तिमती च यमुनामपि ॥ ५४ चेदिपर्वतमुल्लडघ्य चेदिराष्ट्र विजिग्यिरे । पम्पासरोऽम्भोऽतिगमा विभोरस्य तुरङ्गमाः ॥ ५५ तमण्यमूकमाक्रम्य कोलाहलगिरि श्रिताः । प्राङमाल्यगिरिमासेदुर्जयिनोऽस्य जयद्विपाः ॥ ५६ नागप्रियाद्रिमाक्रम्य कुतपावज्ञया विभोः । सेनाचराः स्वसाच्चक्रुर्गजांश्चेदिकरूषजान् ॥ ५७ नदी छत्रवती क्रान्त्वा वन्येभक्षतरोधसम् । भेजुश्चित्रवतीमस्य चमूवीरास्तुरङ्गमैः ॥५८ एद्धवामाल्यवतीनीरवनं वन्येभसङकुलम् । यामुनं च पयः पीत्वा जिग्युरस्य द्विपा दिशः॥ ५९ अनुवेणुमतीतीरं गत्वास्य जयसाधनम् । वत्सभूमि समाक्रम्य दशामिप्यलयत् ॥ ६० विशालां नालिकां सिन्धुं पारा निःकुन्दरीमपि । बहुवज्रां च रम्यां च नदी सिकतिनीमपि ॥६१ कुहां च समतोयां च कञ्चामपि कपीवतीम् । निर्विन्ध्यां च धुनी जम्बुमती च सरिदुत्तमाम् ॥६२ वसुमत्यापगामधिगामिनी शर्करावतीम् । स॒पां च कृतमालां च परिजां पनसामपि ॥ ६३ नदीमवन्तिकामां च हस्तिपानी च निम्नगाम् । कागन्धुमापगां व्याघ्री धुनी चर्मण्वतीमपि ॥ ६४ शतभागां च नन्दां च नदीं करभवेगिनीम् । चुल्लितापी च रेवां च सप्तपारां च कौशिकीम् ॥ सरितोऽमूरगाधापा विष्वगारुध्य तबलम् । तुरङ्गगमखुरोत्खाततीरा विस्तारिणीय॑धात् ॥ ६६ या भरतेशाचे हत्ती, उदुम्बरी, पनसा, तमसा, प्रमशा, शुक्तिसती आणि यमुना या नद्यांचे पाणी प्याले ॥ ५४ ॥ पंपा सरोवराचे पाणी ज्यानी उल्लंघिले आहे अशा प्रभु भरताच्या घोड्यानी चेदिपर्वताला उल्लंघून चेदिराष्ट्राला जिंकले ।। ५५ ॥ ऋष्यमूक पर्वताला उल्लंघून जयशाली भरताच्या जयशाली हत्तीनी ऋष्यमूक पर्वताला उल्लंघिले व त्यानी कोलाहल पर्वताचा आश्रय घेतला. या नंतर पूर्वदिशेच्या माल्य गिरि पर्वताकडे आले ॥ ५६ ।। या भरतेशाच्या सैन्यानी जणु उंबरठा समजून नागप्रिय नामक पर्वत ओलांडला आणि त्यानी चेदि व करूष देशात उत्पन्न झालेल्या हत्तीना आपल्या ताब्यात घेतले ।। ५७॥ या राजाच्या सैन्यातील वीरानी जिचा तट रानटी हत्तीनी तोडला आहे, पाडला आहे अशा छत्रवती नदीला आपल्या घोड्याच्या द्वारे ओलांडले आणि ते चित्रवती नदीकडे आले ।। ५८॥ या राजाच्या हत्तीनी रानटी हत्तीनी भरलेल्या माल्यवती नदीच्या तीराला वेढा घातला व नंतर यमुना नदीचे पाणी पिऊन तेथील आजु-बाजूच्या दिशा त्यानी जिंकल्या ॥५९॥ या भरतेशाला जय मिळवून देणाऱ्या सैन्याने वेणुमती नदीच्या तीराला अनुसरून गमन केले व वत्स देशाच्या प्रदेशाला जिंकले आणि त्यानी दशाणी नदीलाही ओलांडले ॥६॥ - यानंतर या भरतेशाच्या सैन्याने विशाला नदी, नालिका, सिन्धु, पारा व निःकुन्दरी या नद्याना, तसेच बहुवज्रा नदी, रम्या नदी आणि सिकतिनी या नद्याना तसेच Page #162 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-७३) महापुराण (१५१ तैरश्चिकं गिरि क्रान्त्वा रुद्ध्वा वैडूर्यभूधरम् । भटाः कुटाद्रिमुल्लङध्य पारियात्रमशिवयन् ॥ ६७ गत्वा पुष्पगिरेः प्रस्थान्सानू स्मितगिरेरपि । गदागिरेनिकुञ्जषु बलान्यस्य विशश्रमः॥ ६८ वातपृष्ठदरीभागाबृक्षवत्कुक्षिभिः समम् । तत्सैनिकाः श्रयन्तिस्म कम्बलाद्रितटान्यपि ॥ ६९ वासवन्तं महाशैलं विलअध्यासुरधूपने । स्थित्वास्य सैनिकाः प्रापन्मदेभानगिरेयिकान् ॥७० निःसपत्नमिति भ्रमरितश्चेतश्च सैनिकाः । द्विपान्वनविभागेषु कर्षन्तोऽस्य निजगंजः ॥ ७१ दुस्तराः सुतरा जाताः सम्भुक्ताः सरितो बलैः । स्वारोहाश्च दुरारोहा गिरयः क्षुण्णसानवः॥ राष्ट्राण्यवधयस्तेषां राष्ट्रीयाश्च महीभुजः । फलायज्जज्ञिरे भर्तुर्योनिताश्चामुना फलैः ॥७३ कुहा, समतोया, कञ्चानदी व कपीवती या नद्यानाही, याचप्रमाणे निर्विन्ध्या नदी, जाम्बुवती, उत्तमा नदी, समुद्राला मिळालेली वसुमती नदी, शर्करावती नदी, सपा, कृतमाला, परिञ्चा पनसा नदी, अवन्तिकामा आणि हस्तिपानी नदी, वागन्धु नदी, व्याघ्री नदी व चर्मण्वती नदी, शतभागा, नन्दा व करमवेगिनी नदी, चुल्लितापी, रेवी, सप्तपारा व कौशिकी नदी या सर्व नद्यांचे पाणी खोल होते, या सर्व नद्याना भरतेशाच्या सैन्याने चोहीकडून घेरले व घोड्यांच्या खुरानी त्यांचे तट पडल्यामुळे ते अधिक विस्तृत झाले ॥ ६१-६६ ॥ याच्या सैन्यातील वीरांनी तैरश्चिकनामक पर्वताला उल्लंघून नन्तर वैडूर्य पर्वताला वेढा दिला. तदनंतर त्या वीरांनी कुट पर्वताला उल्लंघिले आणि पारियात्र पर्वतावर मुक्काम केला ॥ ६७ ॥ पुष्पगिरीच्या वरच्या सपाट भागावर भरतेशाची सैन्ये आधी गेली. यानंतर स्मितगिरीच्या सानूवर-वरच्या सपाट भागावर गेली. नंतर गदागिरीच्या लतामंपडात त्यांनी विश्रान्ति घेतली ॥ ६८ ॥ या चक्रवर्तीच्या सैन्यानी ज्याच्या गुहामध्ये अस्वले आहेत अशा वातपृष्ठ नामक पर्वताच्या दन्यामध्ये निवास केला व कंबल पर्वताच्या तटावरही निवास केला ॥ ६९ ।। भरतेशसैनिकानी यानंतर वासवन्त नामक महान् पर्वत उल्लंधिला आणि ते असुरधूपन पर्वतावर गेले. तेथे मुक्काम करून नंतर ते मदेभ व अनंगिरेयक या दोन पर्वतावर गेले ॥ ७० ॥ हा सर्व प्रदेश शत्रुरहित असल्यामुळे भरतेशाचे सैनिक इकडे तिकडे खुशाल फिरू लागले व येथील वनविभागात असलेल्या हत्तींना आपल्या हत्तींच्या द्वारे त्यानी ओढून आणिले ।। ७१ ।। ज्या नद्या तरून जाण्यास अशक्य होत्या त्यांचे पाणी भरतेशाच्या सैन्यानी प्याल्यामुळे त्या सुतर-तरून जाण्या योग्य झाल्या. ज्या पर्वताचा वरील भाग चढून जाणे कठिण होते या सैन्याच्या चालण्याने तो भाग फुटून गेल्यामुळे सहज चढता येण्यास योग्य झाले ।। ७२ ॥ सर्व राष्ट्र व त्यांच्या सीमा, त्या राष्ट्रात असलेले लोक व त्या राष्ट्राचे अधिपति राजे यांचा भरतेशाने संतोष केला त्यामुळे त्यांनीही भरतेशाला सन्तुष्ट केले ।। ७३ ॥ Page #163 -------------------------------------------------------------------------- ________________ १५२) महापुराण नृपानवारपारीणान् द्वैप्यानप्युपसागरे । बली बलेरवष्टभ्य पुपोष वनजान्गजान् ॥ ७४ रत्नान्यपि विचित्राणि तेभ्यो लब्ध्वा यथेप्सितम् । तानेवास्थापयतत्र सन्तुष्टः प्रभुराज्ञया ॥ ७५ महान्ति गिरिदुर्गाणि निम्नदुर्गाणि च प्रभोः । सिद्धानि बलरुद्धानि किमसाध्यं महीयसाम् ॥ ७६ इत्थं स पृथिवीमध्यात्पौरस्त्यान्निर्जयन्नृपान् । प्रतस्थे दक्षिणामाशां दाक्षिणात्यजिगीषया ॥ ७७ यतो यतो बलं जिष्णोः प्रचलत्युद्घनायकम् । ततस्ततः ससामन्ता नमन्त्यानम्प्रमौलयः ॥ ७८ त्रिलिङ्गाधिपानौशान् कच्छान्ध्रविषयाधिपान् । प्रातरान्करेलांश्चेरान्पुनाटांश्च व्यजेष्ट सः ॥७९ कूटस्थानोलिकांश्चैव समाहिषक मेकुरान् । पांड्यानन्तरपाण्ड्यांश्च दण्डेन वशमानयत् ॥ ८० नृपानेतान्विजित्याशु प्रणमध्य स्वपादयोः । हृत्वा तत्साररत्नानि प्रभुः प्रापत्परं मुदम् ॥ ८१ सेनानीरपि बभ्राम प्रभोराज्ञां समुद्वहन् । गिरीन्ससरितो देशान्कालिङ्गकवनाश्रितान् ॥ ८२ (२९-७४ जे राजे उपसमुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याजवळ राहत होते व जे समुद्राच्या द्वीपात राहत होते त्या सर्वांना आपल्या सैन्याच्या द्वारे भरतेशाने वश केले होते व वनात उत्पन्न झालेल्या हत्तीना पकडून त्याने त्याना पुष्ट केले ॥ ७४ ॥ त्या राजापासून नाना प्रकारची रत्नेही भरतेशाने आपल्या इच्छानुरूप मिळविली व त्यामुळे सन्तुष्ट होऊन आपल्या आज्ञेने त्यानाच त्यांच्या राज्यावर पुनः स्थापन केले ॥ ७५ ॥ पर्वतावरील मोठे किल्ले आणि जमीनीवरचे किल्ले भरतेशाच्या सेनेने घेरा घालून वश केले होते. बरोबरच आहे की, महान् सामर्थ्यशाली राजाना काय असाध्य असते बरे ? त्याना असाध्य कांहीच असत नाही ॥ ७६ ॥ याप्रमाणे भरतेशाने पूर्व दिशेच्या सर्व राजाना जिंकले. नंतर दाक्षिणात्य राजाना जिंकण्याच्या इच्छेने पृथ्वीच्या मध्यभागापासून दक्षिण दिशेकडे त्याने प्रयाण केले ॥ ७७ ॥ उत्कृष्ट सेनापतीने युक्त असे विजयी भरतेशाचे सैन्य जिकडे जिकडे प्रयाण करू लागले तिकडचे राजे सामन्तासहित आपले मस्तक नम्र करून त्याना नमस्कार करीत होते ॥ ७८ ॥ चक्रवर्ती भरताने त्रिकलिंग, ओश, कच्छं आणि आन्ध्र देशांच्या राजाना जिंकले. तसेच प्रातर, केरल, चेर आणि पुन्नाट या देशांचा अधिपतीनाही त्याने जिंकले ।। ७९ ।। राजा भरताने कूट देश, औलिक देश, माहिष देश, कमेकुर देश, पांड्य व अन्तरपांड्य या देशातील राजाना दण्डरत्नाच्या साहाय्याने जिंकले ॥ ८० ॥ या राजाना जिंकून व आपल्या चरणावर नमस्कार करवून व त्यांच्यापासून साररत्ने ग्रहण करून भरत प्रभूला अतिशय आनंद वाटला ।। ८१ ।। भरतप्रभूची आज्ञा धारण करणारा सेनापति देखील पर्वत, नद्यानी सहित अनेक देशात फिरला व कलिंग देशाच्या अरण्यातही फिरला ॥ ८२ ॥ Page #164 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-९४) महापुराण (१५३ स साधनैः समं भेजे तैलामिक्षमतीमपि । नदी नरवां वङ्गा श्वसनां च महानदीम् ॥ ८३ धुनों वैतरणी माषवती च समहेन्द्रकाम् । सैनिकः सममुत्तीर्य ययौ शुष्कनदीमपि ॥ ८४ सप्तगोदावरं तीथं पश्यन्गोदावरी शुचिम् । सरो मानसमासाद्य मुमुदे शुचिमानसः ॥ ८५ सुप्रयोगां नदी तीर्वा कृष्णवर्णां च निम्नगाम् । सन्नीरां च प्रवेणी च व्यतीयाय समं बलैः॥८६॥ कुब्जा धैर्यां च चूर्णां च वेणां सूकरिकामपि । अम्बेणां च नदी पश्यन्दाक्षिणात्यानशुश्रुवत् ॥ ८७ महेन्द्रादि समानामन्विन्ध्योपान्तं च निर्जयन् । नागपर्वतमध्यास्य प्रययौ मलयाचलम् ॥८८ गोशीर्ष दुर्दराद्रिचगिरि पाण्डयकवाटकम् । स शीतगुहमासीदन्नगंश्रीकटनाह्वयम् ॥ ८९ श्रीपर्वतं च किष्किन्धं निर्जयन्जयसाधनैः । तत्र तत्रोचितै भैरवर्षत चमूपतिः ॥ ९० कर्णाटकान्स्फुटाटोपविकटोशूटवेषकान् । हरिद्राञ्जनताम्बूलप्रियान्प्रायो यशोधनान् ॥ ९१ आन्ध्रान्रुन्द्रप्रहारेषु कृतलक्षान्कदर्यकान् । पाषाणकठिनानङगैर्न परं हृदयैरपि ॥ ९२ कालिङ्गकान्गजप्रायसाधनान्सकलाधनान् । प्रायेण तादृशानोण्डान्जडानुड्डमरप्रियान् ॥ ९३ चोलिकानलिकप्रायान्प्रायशोऽनृजुचेष्टितान् । केरलान्सरलालापान् कलगोष्ठीषु चञ्चुरान् ॥ ९४ तो सेनापति आपल्या सेनेसह तैला, इक्षुमती,, नक्रखा, बङ्गा, श्वसना आणि महानदी या नद्यावर क्रमाने आला ॥ ८३ ।। सेनापति आपल्या सैनिकासह वैतरणी, भाषवती, महेन्द्रका या नद्यावर उतरून नंतर शुष्क नदीवर देखील गेला ।। ८४ ।। सप्तगोदावर तीर्थ व पवित्र गोदावरीला पाहून तो राजा पवित्र मानससरोवराकडे प्रयाण करून आनंदित झाला ॥ ८५ ।। सुप्रयोगा नामक नदी व कृष्णवर्णा नदीला तरून आणि सन्नीरा व प्रवेणी या नदीला उल्लंघून चक्रवर्ती आपल्या सेनेसह पुढे गेला. तसेच कुब्जा, धैर्या, चूर्णी, वेणा, सूरिका आणि अम्बेणा या नद्याना पाहत त्याने भरत राजाने आपले आगमन दक्षिणेतल्या राजाना कळविले ।। ८६-८७ ॥ यानंतर महेन्द्र नामक पर्वताला ओलांडून आणि विन्ध्य पर्वताचा परिसर जिंकून सेनापति नाग पर्वतावर गेला. तेथे राहून नन्तर तो मलय पर्वतावर गेला ॥ ८८ ॥ ___ यानंतर गोशीर्ष, दर्दुर पर्वत व पाण्डयकवाट पर्वत यांना उल्लंघून नंतर शीतगुह पर्वत व श्रीकट पर्वतावर गेला. श्रीपर्वत व किष्किध याना सेनापतीने आपल्या जय मिळविणा-या सेनासमूहाने जिकिले व तेथे योग्य अशा लाभानी तो सेनापति समृद्ध झाला ।। ८९-९० ॥ ज्याच्या ठिकाणी गर्व स्फुरत होता व त्याला अनुसरून त्यांचा वेष होता असे व हळद काजळ व तांबूल हे ज्यांना फार आवडतात व ज्यांना यशोधन आवडते असे कर्नाटक देशाचे राजे होते. मर्मस्थली प्रहार करण्यात चतुर व जे कृपण आहेत, जे अङ्गांनीच म. २० Page #165 -------------------------------------------------------------------------- ________________ १५४) महापुराण (२९-९५ पाण्ड्यान्प्रचण्डदोर्दण्डान्स्वण्डितारातिमण्डलान् । प्रायो गजप्रियान्धन्विकुन्तभूयिष्टसाधनान् ॥९५ दृष्ट्वापदानानन्यांश्च तत्र तत्र व्युदुत्थितान् । जयसैन्यरनस्कन्ध सेनानीरनयद्वशम् ॥९६ ते च सत्कृत्य सेनान्यं पुरस्कृत्य ससाध्वसम् । चक्रिणं प्रणमन्ति स्म दूरादूरीकृनायतिम् ॥९७ करग्रहेण सम्पीड्य दक्षिणाशां वधूमिव । प्रसभं हृततत्सारो दक्षिणाब्धिमगात्प्रभुः ॥ ९८ लवङ्गलवलीप्रायमेलागुत्मलताङकितम् । वेलोपान्तवनं पश्यन्महतीं धृतिमाप सः ॥ ९९ तमासिषेविरे मन्दमान्दोलितसरोजलाः । एलासुगन्धयः सौम्या वेलान्तवनवायवः ॥ १०० मरुदुद्भूतशाखानविकीर्णसुमनोऽञ्जलिः । नूनं प्रत्यगृहीदेनं वनोद्देशो विशाम्पतिम् ॥ १०१ पवनाधूतेशाखाप्रैर्व्यक्तषट्पनिस्स्वनैः । विश्रान्त्यै सैनिकानस्य व्याहरनिव पादपाः ॥ १०२ पाषाणाप्रमाणे कठीण नसून हृदयानेही कठीण आहेत असे जे तेलंगण देशाचे राजे, ज्यांच्या सैन्यात हत्ती फार आहेत असे व जे नाना कलात निपुण आहेत असे कलिंग देशाचे राजे व त्यांच्याच स्वभावाप्रमाणे स्वभाव ज्यांचा आहे असे साहसी व मूर्ख असे आण्ड्र देशाचे राजे ; ज्यांना खोटे बोलणे आवडते व जे कपट प्रवृत्ति करतात असे चोल देशाचे राजे; ज्याची प्रवृत्ति सरळ व जे मधुरभाषी आहेत असे केरळ देशाचे राजे ; ज्यांचे बाहु प्रचण्ड आहेत, ज्यांनी शत्रु समुहाला जिंकले आहे, ज्यांना हत्ती प्रिय आहेत, ज्यांचे सैन्य धनुष्यधारी व भालाधारी आहे असे पाण्डय देशाचे राजे व आणखी काही राजे या सर्वांनी खंडणी द्यायची नाही म्हणून लढण्यासाठी तयारी केली होती. पण सेनापतीने आपल्या जयशाली सैन्याने हल्ला करून या सर्वांना जिंकून वश केले ॥ ९१-९७ ॥ नंतर त्यांनी आपणास जिंकणा-या सेनापतीचा सत्कार केला व त्याला पुढे करून भयभीत होऊन ते चक्रवर्तीकडे गेले. चक्रवर्तीने त्यांना राजपदावर कायम केले. त्यामुळे त्यांनी त्याला दूरून नमस्कार केला. जणु दक्षिण दिशेला स्त्रीप्रमाणे करग्रहण करून ज्याने तिचा स्वीकार केला आहे व त्या राजाचे स्थान ग्रहण करून चक्रवर्ती दक्षिण समुद्राकडे गेला ॥९८॥ लवंगाच्या आणि चन्दनाच्या वेलीनी युक्त व वेलदोड्याचे लहान झडपासारख्या बेलींनी यक्त, समद्राच्या किनाऱ्याजवळ असलेल्या वनाला पाहन चक्रवर्तीला फार सन्तोष वाटला ॥ ९९ ॥ ज्यांनी सरोवराचे पाणी मन्द रीतीने हालविले आहे, ज्यांच्यात वेलदोड्यांचा सुगंध पसरला आहे, जे किनाऱ्याच्या वनातून वाहात आहेत अशा सौम्य वायूनी या चक्रवर्तीची सेवा केली ॥ १०० ॥ वाऱ्याने हलविलेल्या शाखाच्या अग्रभागानी ज्याने फुलांची ओंजळ अपिली आहे अशा या वन प्रदेशाने खरोखर या चक्रवर्तीचे स्वागत केले आहे असे वाटले ॥ १०१ ।। वाऱ्याने झाडांच्या फांद्यांचे अग्रभाग हालत होते व त्यावर व्यक्त रीतीने भुंगे गुंजारव करीत होते, त्यामुळे असे वाटत होते की, या वनातील वृक्ष जणु विश्रान्तीसाठी चक्रवर्तीच्या सैन्याला जणु बोलावीत आहेत ।। १०२ ॥ Page #166 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-१०८) महापुराण (१५५ अथ तस्मिन्वनाभोगे सैन्यमावासयद्विभुः । वैजयन्त महाद्वार निकटेऽम्बुनिधेस्तटे ॥ १०३ सन्नागं बहुपुन्नागं सुमनोभिरधिष्ठितम् । बहुपत्ररथं जिष्णोर्बलं तद्वनमावसत् ॥ १०४ सच्छायान्सफलांस्तुङ्गान्बहुपत्रपरिच्छदान् । असेवन्त जनाः प्रीत्या पार्थिवांस्तापविच्छिदः ॥ सच्छायानप्यसम्भाव्यफलान्प्रोझ्य महाद्रुमान् । सफलान्विरलच्छायानप्यहो शिधियुर्जनाः॥१०६ आकालिकोमनादृत्य बहिश्छायां तवातनीम् । भाविनी तरुमूलेषु छायामाशिश्रियुर्जनाः ॥१०७ वनस्थली तरुच्छायानिरुद्धधुमणित्विषः । सजानयस्सरस्तीरेष्वध्यासिषत सैनिकाः ॥ १०८ यानन्तर दक्षिण समुद्राच्या तटावर वैजयन्त नावाच्या महाद्वाराजवळ विस्तृत वनप्रदेशातच चक्रवर्तीने आपले सैन्य ठेविले ॥ १०३ ।। ते वन आणि भरतचक्रीचे सैन्य दोघेही समान होते ते असे- सन्नागं वन उत्तम नागवृक्षांनी युक्त होते आणि सैन्य सन्नाग-उत्तम हत्तींनी युक्त होते. वन बहु पुन्नागं पुष्कळ नागकेसर वृक्षांनी युक्त होते व सैन्य बहु पुन्नागं-पुष्कळ उत्तम पुरुषानी युक्त होते. वन सुमनोभिरधिष्ठितं-पुष्कळ फुलांनी गजबजले होते व सैन्य पुष्कळ देव अथवा उत्तम हृदयाच्या पुरुषानी युक्त होते. वन बहु पत्ररथं बहु पुष्कळ पत्ररथ-पक्ष्यानी सहित होते व सैन्य बहु पत्ररथ पुष्कळ वाहने व रथ यानी युक्त होते. याप्रमाणे भरताचे सैन्य आपल्या समान असलेल्या वनात राहिले होते ।। १०४ ॥ सैन्याने वृक्षांचा व राजांचा आश्रय परस्परामध्ये समानता असल्यामुळे घेतला होता ती समानता अशी- वनवृक्ष सच्छाय उत्तम सावलीनी युक्त होते व राजेही सच्छाय उत्तम कान्तीने सम्पन्न होत. राजे पार्थिव-पृथ्वीचे स्वामी म्हणून पार्थिव होत. वृक्ष पार्थिव-पृथिव्यां भवाः पृथ्वीमध्ये उत्पन्न होतात म्हणून पार्थिव होत. राजे सफल-पुष्कळ द्रव्य प्राप्तीने सम्पन्न असतात व वृक्ष हे सफल फलानी लकडलेले असतात. राजे तुंग-उंच-उदार स्वभावाचे असतात. वृक्ष देखील उंच असतात. राजे बहुपत्र परिच्छद-पुष्कळ वाहनादिक वैभवाने संपन्न असतात आणि वृक्ष पुष्कळ पानाच्या परिवाराने सहित असतात. राजे ताप विच्छिदः- दारिद्रयादिक दुःखे नष्ट करणारे असतात व वृक्ष सूर्य सन्तापाचा नाश करणारे असतात. ते सैन्यातील लोक राजांच्या स्वभावाप्रमाणे असलेल्या त्या वन वृक्षांच्या खाली प्रीतीने राहिले ॥ १०५ ॥ सैन्यातील लोकानी दाट सावलीचे परन्तु ज्याना फळे नाहीत अशा मोठ्या वृक्षांना देखील त्यागले पण ज्यांची छाया विरळ असूनही जे फलानी भरून गेले आहेत अशा वृक्षाचा त्यांनी आश्रय घेतला ।। १०६ ॥ तसेच कित्येक सैनिक थोडा वेळ राहणाऱ्या छायेला त्यागून वृक्षाच्या मुळाखाली पुढे येणारी जी छाया तिचा त्यानी आश्रय घेतला ॥ १०७ ॥ त्यावेळी वन प्रदेशातील वृक्षांच्या दाट सावलीमुळे सूर्य किरणाच्या उष्णतेचा ताप ज्याना बिलकुल होत नाही असे कित्येक सैनिक सरोवराच्या तीरावर आपल्या स्त्रियासह बसले ॥ १०८ ॥ Page #167 -------------------------------------------------------------------------- ________________ १५६) महापुराण (२९-१०९ सप्रेयसीभिराबद्धप्रणयराश्रिता नृपः । कल्पपादपजां लक्ष्मी व्यक्तमूहुर्वनद्रुमाः ॥ १०९ कपयः कपिकच्छूनामुद्धन्वानाः फलच्छटाः । सैनिकानाकुलांश्च निविष्टान्वीरुधामधः ॥ ११० सरः परिसरेष्वासन्प्रभोराश्वीयमन्दुराः । सुन्दराः स्वरमाहार्येर्बाष्पच्छेद्यैस्तृणाङकुरैः ॥ १११ अवतारितपर्याणमुखभाण्डाद्युपस्कराः । स्फुरत्प्रोथैर्मुरवैरश्वाः क्षमा जविविवृत्सवः ॥ ११२ सान्द्रपद्मरजः कीर्ण सरसामन्तिकस्थले । मन्दं दुधुवुरङ्गानि वाहाः कृतनिवर्तनाः ॥ ११३ विबभावम्बरे कजरजः पुजोऽनिलोद्भुतः । अयं तु रचितोऽश्वानामिवोच्चैः पटमण्डपः ॥११४ रजस्वलां महीं दृष्ट्वा जुगुप्सव इवोत्थिताः । द्रुतं विविशुरम्भांसि सरसीनां महाहयाः ॥ ११५ वारि वारिजकिञ्जल्कततमश्वा विगाहिताः । धौतमप्यङ्गरागस्वं भेजुरम्भोजरेणुभिः ॥ ११६ अतिशय प्रेमळ अशा आपल्या आवडत्या स्त्रियासह अनेक राजे ज्यांच्या मुळाशी बसले आहेत असे त्या वनातील वृक्ष व्यक्तपणे कल्पवृक्षाच्या शोभेला पावले. अर्थात त्यांनी कल्पवृक्षाची शोभा धारण केली ॥ १०९ ।। कुहरीच्या वेलीच्या शेंगा हलविणाऱ्या वानरानी त्या वेलीच्या खाली बसलेल्या सैनिकाना अगदी व्याकुळ केले ॥ ११० ॥ आपल्या इच्छेप्रमाणे खाता येतील व तोंडाच्या वाफेने देखील तुटतील अशा कोवळ्या गवतांच्या अंकुरानी सुंदरी दिसणाऱ्या भरताचे घोडे बांधण्याच्या पागा त्या सरोवराच्या भोवती तयार केल्या होत्या ।। १११ ।। पाठीवरील खोगीर व तोंडातील लगाम वगैरे सामान ज्यांचे उतरले आहे अशा त्या घोड्याना जेव्हा लोळण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांचे वरचे ओठ फुरफुरू लागले व ते जमिनीचा वास घेऊ लागले ।। ११२ ॥ कमलांच्या आतील दाट परागानी सरोवराचा जवळचा भू-प्रदेश व्याप्त झाला होता. अशा त्या भूमीवर लोळलेल्या घोड्यानी हळुहळू आपली अंगे झाडली ।। ११३ ॥ ... कमलांच्या परांगांचा समूह जेव्हा वाऱ्यानी आकाशात उडून पसरला तेव्हा जणु तो घोड्याना राहण्याकरिता उंच वस्त्रांचा मंडप बनविला आहे, असा शोभला ।। ११४ ॥ धुळीनी मलिन झालेली पृथ्वी जणु विटाळशी झालेली आहे असे पाहून तिच्याविषयी जणु ज्याना किळस आलेली आहे असे मोठे घोडे शीघ्र तळ्यांच्या पाण्यात शिरले. जणु शुद्ध होण्यासाठी शिरले ॥ ११५ ॥ कमलांच्या परागांनी व्याप्त झालेल्या पाण्यात स्नान केलेल्या त्या घोड्यांच्या अंगाला पूर्वी लावलेला सुगन्धी लेप धुवून गेला होता तरीही कमलांच्या परागानी जणु तो पूर्वीचा लेप पुनः त्यानी धारण केला आहे असे दिसू लागले ॥ ११६ ।। Page #168 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-१२४) महापुराण (१५७ सरोवगाहनिर्धूतश्रमाः पीताम्भसो हयाः । आमीलिताक्षमध्यषुर्विततान्पटमण्डपान् ॥ ११७ नालिकेरद्रुमेष्वासीदुचितो वमशालिनः । निवेशो हास्तिकस्यास्य विभोस्तालीवनेषु च ॥११८ प्रपतन्नालिकेरौघ स्थपुटा वनभूमयः । हस्तिनां स्थानतामीघुस्तैरेव प्रान्तसारितैः ॥ ११९ द्विपानुदन्यतस्तीवं वमथुव्यजितश्रमान् । निन्युजलोपयोगाय सरांस्यभिनिषादिनः ॥ १२० नीचैर्गतेन सुव्यक्तमार्गसञ्जनितश्रमान् । गजानाधोरणा निन्युः सरसीरवगाहने ॥ १२१ प्रवेष्टुमब्जिनीपत्रच्छन्नं नागो नवग्रहः । नैच्छत्प्रचोद्यमानोऽपि वारि वारिधिशङ्कया ॥ १२२ वनं विलोकयन्स्वरं कवलोचितपल्लवम् । गजश्चिरगृहीतोऽपि किमप्यासीत्समुत्सुकः ॥ १२३ स्वैरं न पपुरम्भांसि नागृह्णकवलानपि । केवलं वनसम्भोगसुखानां सस्मरुन्जाः ॥ १२४ सरोवराच्या पाण्यात स्नान केल्यामुळे घोड्यांचा प्रवास-श्रम नाहीसा झाला व त्यानंतर ते पाणीही प्याले. यानंतर विस्तृत अशा वस्त्र मंडपात थोडेसे डोळे मिटून उभे राहिले ॥ ११७ ॥ ज्यांची शरीरे उंच व स्थूल होती अशा हत्तींच्या समुदायाचा निवास नारळाच्या झाडाखाली व ताडांच्या वनात होता. अर्थात् भरतमहाराजांचे हत्ती वरील वनात बांधले होते हे योग्यच होते ॥ ११८ ॥ वरून पडणाऱ्या नारळाच्या फलानी त्या वनभूमि उंच व खोलगट झालेल्या होत्या. पण हत्तीनीच ती फळे बाजूला सारली. त्यामुळे त्या वनभूमि त्याना राहण्यास योग्य झाल्या ॥ ११९ ॥ हत्तीना खूप तहान लागली होती व त्यांच्या तोंडातून फेस गळत असल्यामुळे ते श्रमाने थकले होते. म्हणून महातानी त्याना सरोवराकडे पाणी पाजण्याकरिता नेले ॥ १२० ॥ मंद मंद चालण्यामुळे हत्तीना मार्ग श्रम झाला असे स्पष्ट दिसत होते. म्हणून महातानी त्याना स्नानाकरिता सरोवराकडे नेले ॥ १२१ ॥ नवीनच ज्याला पकडले आहे अशा हत्तीला महांताने प्रेरणा केली तरीही कमलिनींच्या पानानी झाकलेल्या सरोवरात त्याने प्रवेश केला नाही. कारण त्याला हे समुद्राचे पाणी आहे असे वाटले ॥ १२२ ॥ ज्याला धरून पुष्कळ दिवस झाले आहेत असाही एक हत्ती ज्याची कोवळी पाने खाण्याला योग्य आहेत अशा वनाला पाहून विलक्षण उत्सुक झाला ।। १२३ ॥ कांही हत्तीनी स्वैरपणाने पाणी प्राशिले नाही व वनातील कोवळी पानेही पण खाल्ली नाहीत पण वनात पूर्वी आपण विहार करून यथेच्छ सुख भोगले होते याचे स्मरण ते करू लागले ।। १२४ ।। Page #169 -------------------------------------------------------------------------- ________________ १५८) महापुराण (२९-१२५ उत्पुष्करान्स्फुरद्रौक्मकक्षानिन्यद्विपान्सरः । सशयूनिव नीलाद्रीन्सविद्युत इवाम्बुदान् ॥ १२५ वनद्विपमदामोदवाहिने गन्धवाहिने । गजः कुप्यन् जलोपान्ते निन्ये कृच्छान्निषादिना ॥ १२६ अकस्मात्कुपितो दन्ती शिरस्तिर्यग्विधूनयन् । अनङकुशवशस्तीवमाधोरणमखेदयत् ॥ १२७ वन्यानकेपसम्भोगसङक्रान्तमदवासनाम् । विगाढुं सरसीं नैच्छन्मदेभः करिणीमिव ॥ १२८ पीतं वनद्विपः पूर्वमम्बु तद्दानवासितम् । द्विपः करेण सजिघ्रन्नापादास्फालयत्परम् ॥ १२९ पीताम्भसो मदासारैर्वृद्धि निन्यः सरोजलम् । गजा मुधा धनादानं नूनं वाञ्छन्ति नोन्नताः॥१३० उत्पुष्कर सरोमध्ये निमग्नोऽपि मदद्विपः । रंरद्धिः खमुत्पत्य व्यज्यते स्म मधुव्रतैः ॥ १३१ पीताम्बुरम्बुदस्पद्धिबृंहितो मदकुञ्जरः । दुधाव गण्डकण्डूयां चण्डगण्डूषवारिभिः ॥ १३२ ज्यानी आपल्या सोंडीचे अग्रभाग वर केले आहेत व ज्यांच्या पाठीवर सोन्याच्या जरीच्या झुली आहेत असे हत्ती अजगरानी युक्त अशा नील पर्वताप्रमाणे व विजेने सहित अशा मेघाप्रमाणे दिसत होते व त्याना महातानी सरोवराकडे नेले ।। १२५ ॥ रानटी हत्तींच्या मदाचा गंध वाहून नेणान्या अशा वाऱ्यावर एक हत्ती रागावला होता. त्याला महाताने मोठ्या कष्टाने पाण्यात भरलेल्या सरोवराकडे नेले ।। १२६ ।। एक हत्ती अकस्मात रागावला. त्याने आपले मस्तक इकडे तिकडे फिरविले व इकडे तिकडे आपले मस्तक तो हलवू लागला, तो अंकुशाच्या वश राहिला नाही व त्याने तीव्रपणाने महात्ताला तीव्र खेदखिल्ले ।। १२७ ॥ रानटी हत्तींच्या संभोगाने जिचे पाणी मदाच्या वासाने युक्त झाले आहे अशा सरोवरात एक हत्ती प्रवेश करण्यास नाखुष झाला. जसे एका हत्तीने उपभोगलेल्या हत्तीणीचा उपभोग घेण्यास दुसरा हत्ती नाखुष असतो त्याप्रमाणे तो नाखुष झाला ॥ १२८ ॥ पूर्वी ज्याचे पाणी अन्य हत्तीनी प्राशन केल्यामुळे त्याच्या मदाने ते पाणी वासयुक्त झाले होते अशा त्या पाण्याचा वास आपल्या सोंडेने हुंगून तो हत्ती ते पाणी प्याला नाही. पण न पिता तो ते पाणी ढवळू लागला ।। १२९ ॥ - कांही हत्तीनी सरोवराचे पाणी प्राशन केले व आपल्या मद जलाच्या वृष्टीने ते सरोवराचे पाणी वाढविले. हे त्यांचे करणे योग्यच झाले. कारण जे उन्नत थोर असतात ते दुसऱ्याचे धन फुकट घेण्याची इच्छा करीत नाहीत ॥ १३० ॥ एक मत्त हत्ती सरोवरात बुडालेला होता तथापि त्याने आपल्या सोंडेचा अग्रभाग पाण्यावर ठेवला होता. त्यावेळी आकाशात उडून जोराने गुंजारव करणाऱ्या भुंग्यांनी त्याला व्यक्त केले. अर्थात् येथे हत्ती बुडाला आहे असे स्पष्ट केले ॥ १३१॥ जो पाणी प्याला आहे, ज्याची गर्जना मेघाच्या गर्जनेशी स्पर्धा करीत आहे अशा मत्त हत्तीने सोंडेतून वेगाने सोडलेल्या पाण्यानी गालावरची खाज शांत केली ॥ १३२॥ Page #170 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-१४१) महापुराण विमुक्तं व्यक्तसूत्कारं करमुत्क्षिप्य वारणैः । वारि स्फटिक दण्डस्य लक्ष्मीमूहे खमुच्छलत् ॥ १३३ उदगाहैविनिर्धूतश्रमाः केचिन्मतङ्गजाः । बिसभङ्गरधुस्तृप्ति हेलया कवलीकृतः ॥ १३४ मृणालैरधिदन्ताग्रमपितविबभुर्गजाः । अजस्त्रमम्बुसंसेकाद्दन्तैः प्रारोहितैरिव ॥ १३५ प्रमाद्यद्विरदः कश्चिन्मृणालं स्वरोद्धृतम् । ददावालानबुद्धचैव नियन्त्रे द्विगुणीकृतम् ॥ १३६ चरणालग्नमाकर्षन्मृणालं भीलुको गजः । बहिः सरस्तटीं व्यास्थवन्दुतन्तुकशङ्कया ॥ १३७ करैरुत्क्षिप्य पद्मानि स्थिताः स्तम्बरमा बभुः । देवतानुस्मृति किञ्चत्कुर्वन्तोऽर्धेरिवोद्धृतः ॥ १३८ सरस्तरङ्गधौताङ्गा रेजस्तुङ्गा मतङ्गजाः । शृङ्गारिता इवालग्नः सान्द्ररम्भोजरेणुभिः ॥ १३९ ययुः करिभिरारुद्धं परिहत्य सरोजलम् । पतत्रिणः सरस्तीरं तद्युक्तमबलीयसाम् ॥ १४० सरोऽवगाहनिणिक्तमूर्तयोऽपि मतङ्गजाः । रजः प्रमाथैरात्मानं चक्रुरेव मलीमसम् ॥ १४१ ज्यातून जोराने सूत्कार शब्द बाहेर पडत आहे अशा आपल्या सोंडा हत्तीनी उंच करून त्यातून पाणी बाहेर सोडले असता ते आकाशात उंच उडू लागले व त्याने स्फटिकाच्या काठीची शोभा धारण केली ॥ १३३ ।। ___ पाण्यात खूप अवगाहन केल्यामुळे ज्यांचे श्रम दूर झाले आहेत अशा कित्येक हत्तीनी लीलेने खाल्लेल्या कमलांच्या दांड्यांच्या तुकड्यानी संतोष धारण केला ।। १३४ ।।। कित्येक हत्तींनी आपल्या दातांच्या अनावर कमलांचे दांडे धारण केले होते. त्यामुळे नेहमी पाण्याच्या सिंचनाने जणु त्यांच्या दाताना अंकुर फुटले आहेत असे ते शोभू लागले ।। १३५॥ उन्मत्त अशा कोणी एका हत्तीने आपल्या सोंडेने उपटलेले कमलाचे दांडे दुहेरी केले व तेही आपल्या पायाला बांधण्याची साखळी आहे अशा बुद्धीने महाताला दिली ।। १३६ ॥ आपल्या पायात अडकलेल्या कमलाच्या दांड्याला ओढणारा कोणी भित्रा हत्ती त्याला आपल्याला बांधण्याचा साखळदंड आहे असे समजू लागला व तळयाच्या बाहेरच्या तटावरच तो उभा राहिला ॥ १३७ ।। आपल्या सोंडानी कमळे उंच धरून उभे राहिलेले हत्ती देवतांचे कांही स्मरण करून जणु त्यांना अर्घ्य अर्पण करीत आहेत असे दिसत होते ॥ १३८ ॥ __ सरोवराच्या तरङ्गानी ज्यांची अंगे चांगली धुतली आहेत असे उंच हत्ती अंगांना दाट लागलेल्या कमलांच्या परागानी जणु रंगवून सुशोभित केल्याप्रमाणे दिसू लागले ॥१३९।। हत्तींनी सर्व बाजूनी सरोवराचे पाणी व्यापलेले असल्यामुळे सरोवराचे पाणी सोडून सर्व पक्षी तटावर आले अर्थात् हे बरोबरच झाले. कारण दुर्बल जीवानी असेच वागणे योग्य आहे ॥ १४० ॥ सरोवरात अवगाहन करून हत्ती निर्मल-स्वच्छ झाले होते तरीही धूळ आपल्या अंगावर उडवून त्यांनी स्वतःला पुनः मलिन बनविले ।। १४१ ॥ Page #171 -------------------------------------------------------------------------- ________________ १६०) महापुराण (९२-१४२ वयंजात्यैव मातङ्गा मदेनोद्दीपिताः पुनः । कुतस्त्या शुद्धिरस्माकमित्यात्तं नु रजो गजः ॥ १४२ वसन्ततिलकावृत्तंइत्थं सरस्सु सुचिरं प्रविहृत्य नागाः । सन्तापमन्तरुदितं प्रशमय्य तोयैः तीरQमानुपययुः किमपि प्रतोषात् । बन्धं तु तत्र नियतं न विदाम्बभूवुः ॥ १४३ हृत्वा सरोऽम्बु करिणो निजदान वारि संवद्धितं विनिमयादतृषाः श्वसन्तः ॥ तद्वीचिहस्तजनितप्रतिरोषशङ्काव्यासङगिनो नु सरसः प्रसभं निरीयुः ॥ १४४ आधोरणा मदमषीमलिनान्करीन्द्रानिणेक्तुमम्बु सरसामवगाहयन्तः॥ शेकुर्न केवलमपामुपयोगमानं तीरे स्थिता ननु नयैस्तवचीकरन्त ॥ १४५ स्वैरं न चाम्बु परिपीतभयत्नलभ्यं तीरद्रुमेषु न कृतः कवलग्रहोऽपि । छायास्वलम्भि न तु विश्रमणं प्रभिन्नः स्तम्बेरमैर्बत मदः खलु नात्मनीनः ॥ १४६ आम्ही जातीनेच मातङ्ग (मांग दुसरा अर्थ हत्ती) आहोत व पुनः आम्ही मदेनोद्दीपित ( मद्यपानाने बेशुद्ध दुसरा अर्थ मस्तीने ) अतिशय वेडे झालेले आहोत. मग आम्हाला ( शुद्धिनिष्पापपणा दुसरा अर्थ स्वच्छता) कोठून असणार असा विचार करून जणु त्या हत्तीनी आपल्या अंगावर धूळ उडवून घेतली ॥ १४२ ॥ याप्रमाणे सरोवरात त्या हत्तीनी पुष्कळ वेळपर्यंत क्रीडा केली व आत उत्पन्न झालेला संताप -दाह पाण्यानी त्यांनी शमविला. यानंतर ते संतोषाने सरोवराच्या तीरावरील वृक्षाकडे आले. पण तेथे आपणास खात्रीने बंधन प्राप्त होईल हे मात्र त्यांना समजले नाही ॥ १४३ ॥ त्या हत्तींनी सरोवराचे पाणी प्राशन केले व त्याच्या मोबदल्यात त्यानी आपल्या मदजलाने ते पाणी वाढविले. तहानेने रहित होऊन त्यांनो सुखाने श्वास सोडला. यानंतर त्या सरोवराच्या तरङगरूपी हस्तांनी आपण अडविले जाऊ अशा शंकेने की काय ते मोठ्या वेगाने त्या सरोवरातून बाहेर पडले ॥ १४४ ।। मदरूपी शाईने मळकट झालेल्या महागजांना सरोवराच्या पाण्यात प्रवेश करवून त्यांना स्वच्छ करण्यास महात जसे समर्थ झाले नाहीत तसे किना-यावर उभे राहिलेल्या त्यांना पाणी पाजण्यासही समर्थ झाले नाहीत. तात्पर्य हे की मदोन्मत्त हत्तीनी पाण्यात प्रवेश केला नाही व ते पाणीही प्याले नाहीत ॥ १४५ ।। ___मत्त झालेल्या त्या हत्तीनी यत्नावाचून प्राप्त झालेले पाणी मनसोक्त प्राशन केले नाही व सरोवराच्या काठावर असलेल्या वृक्षातला एक घासभर पालाही खाल्ला नाही व त्यांच्या छायेत त्यांनी विश्रान्तीही घेतली नाही. अरेरे ! हा उन्मत्तपणा खरोखर केव्हाही आत्म्याचे हित करणारा नाही ॥ १४६ ।। Page #172 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-१५१) महापुराण नाध्वा द्रुतं गुरुवरैरपि नानुयातः युद्धेषु जातु न किमप्यभिराद्धमेभिः । भारक्षमाश्च करिणः सविशेषमेव बद्धास्तथाप्यनिभृता इति धिक्चलत्वम् ॥ १४७ बध्नीथ नः किमिति हन्त विनापराधात् जानीत भोः प्रतिफलत्यचिरादिदं नः। इत्युच्चलच्छणि विधूय शिरांसि बन्धर्वैरं नियन्त्रिषु गजाः स्म विभावयन्ति ॥ १४८ आघातुको द्विरदनः सविशेषमेव गात्रापरान्तकरबालधिषु व्ययोजि । बन्धेन सिन्धुरवरास्त्वितरे तथा नो गाढीभवन्त्यविरतान्न परत्र बन्धाः ॥ १४९ आलानिता वनतरुष्वतिमात्रमुच्चस्कन्धेषु सिन्धुरवराश्च तथोच्चकर्यत् । तन्नूनमाश्रयणमिष्टमुदात्तमेव सन्धारणाय महतामहतात्मसारम् ॥ १५० इत्थं नियन्तृभिरनेकपवृन्दमुच्चैरालानितं तरुषु सामि निमीलिताक्षम् । तस्थौ सुखं त्रिचतुरेण कृताङ्गहारम् । लोलोपयुक्तकवलं स्फुटकर्णतालम् ॥ १५१ ___ या हत्तींनी आपले शरीर स्थूल असल्यामुळे जलदीने मार्गक्रमण केले नाही असे नाही व यांनी युद्धप्रसंगी कांही अपराध केला, चुकवाचुकवी केली असेही पण नाही व ओझे वाहण्याच्या कामी यांनी विशेषरीतीने दक्षता घेतली. खूप ओझे वाहिले पण चंचलता अंगी असल्यामळे त्यांना विशेषरीतीने जखडन बांधले होते. यावरून त्यांच्या चंचलपणाला धिक्कार असो असे म्हणणे अयोग्य होईल असे वाटत नाही ।। १४७ ।। ___अहो आम्ही कांहीं अपराध केला नसताही आम्हाला विनाकारण कां बरे बांधता ? पण याचे फल तुम्हाला भोगण्याचा प्रसंग येईल हे तुम्ही चांगले ध्यानात घ्या असे जणु म्हणून त्या हत्तींनी कानावर असलेल्या अंकुशाला जोराने हालविले अर्थात् आपली अंकुशासह डोकी जोराने हालविली व महातांनी आपणास बांधल्यामुळे त्यांच्याविषयींचे स्वत:च्या मनात असलेले वैर त्यांनी प्रकट केले ॥ १४८ ॥ जी हत्तीची जात प्राणिघात करणारी होती. त्यांच्या शरीराचा मागचा भाग अर्थात् मागचे पाय पुढची सोंड व मागचे शेपूट इत्यादि ठिकाणी त्यांना विशेषरीतीने बांधून टाकले होते. पण जे उत्तम हत्ती तसे नव्हते त्यांना तसे बळकट बांधले नव्हते. यावरून असे वाटते की, मत्त हत्ती वाचून इतर हत्तींना फार बळकट बांधण्याचे कारण नव्हते ॥ १४९ ॥ __ ज्यांच्या मोठ्या शाखा अगदी उंच आहेत अशा वनवृक्षाशी मोठे हत्ती चांगले कसून बांधलेले होते. बरोबरच आहे की, ज्याचे सामर्थ्य नष्ट झाले नाही असा मोठा आश्रय मोठ्याना बांधण्यास त्यांचे संधारण करण्यास योग्य आहे असे आम्हास वाटतें ॥ १५० ॥ ___ याप्रमाणे महातांनी अनेक हत्तींचा समूह मजबूत झाडांच्या ठिकाणी बांधला व तो हत्तींचा समूह आपले अर्धे डोळे मिटून व लीलेने घास खात उभा राहिला व सहज आपले पाय सोंड वगैरे अवयव गमतीने हालवू लागला व आपले कान हालवीत सुखाने उभा राहिला ।। १५१ ॥ म २१ Page #173 -------------------------------------------------------------------------- ________________ १६२) महापुराण (२९-१५२ उत्तारिताखिलपरिच्छदलाघवेन प्रव्यजितद्रुतगतिक्रमलक्ष्यवेगाः। आपातुमम्बु सरसां परितः प्रसनुः उच्छृङ्खलैरनुगताः कलभैः करिण्यः ॥ १५२ प्राक्पीतमम्बु सरसां कृतमौष्ट्रकेण स्वोद्गालदूषितमुपात्ततदङ्गगन्धम् । नापातुमैच्छदुदकं तृषितोऽपि बर्कः सर्वो हि वाञ्छति मनोविषयं मनोज्ञम् ॥ १५३ पीतं पुरा गजतया सलिलं मदाम्बुसंवासितं सरसिजाकरमेत्य तूर्णम् । प्रीत्या पपुः कलभकाश्च करेणवश्च सम्भोगहेतुरुदितो हि सगन्धभावः ॥ १५४ प्रहषिणी-पीताम्भोव्यपगमितान्तरङ्गतापा सन्तापं बहिरुदितं सरोऽवगाहैः । नीत्वान्तं गजकलभैः समं करिष्यः सम्भोक्तुं सपदि वनद्रुमान्विचेरुः ॥ १५५ वल्लीनां सकुसुमपल्लवाग्रभङगान् गुल्मौघानपि सरसान्कडङगरांश्च । सुस्वादून्मृदुविटपान्वनद्रुमाणां तयूथं कवलयति स्म धेनुकानाम् ॥ १५६ अंगावरचे हौदा वगैरे सर्व सामान उतरून घेतल्यामुळे ज्यांना आता हलकेपणा वाटत आहे व त्यामुळे ज्यांची शीनगति-गमन होऊन ज्यांचा वेग व्यक्त झाला आहे. अशा हत्तिणी सरोवरांचे पाणी पिण्यासाठी सर्व बाजूंनी जेव्हा जाऊ लागल्या तेव्हां त्यांचे बंधनरहित छावे त्यांच्या मागून जाऊ लागले ।। १५२ ॥ कित्येक सरोवरांचे पाणी उंटांनी आधी प्राशन केले होते व त्यांच्या तोंडातील फेसाने ते दूषित झाले होते. त्याला उंटाच्या अंगाचा वास पण येत होता. त्यामुळे हत्तीच्या छाव्याला तहान लागली असूनही ते प्यावे असे त्याला वाटेना. बरोबर आहे की, सर्वाना आपल्या मनाचा विषय-मनाला आवडणारा पदार्थ सुंदर असावा असे वाटत असते ॥ १५३ ।। पूर्वी हत्तींचा समूह येऊन पाणी पिऊन गेला होता व त्याच्या मदजलाने ते पाणी गंधयुक्त झाले होते. त्याला हत्तींच्या मदाचा वास येत होता. पण असे ते पाणी हत्तिणी व त्याच्या छाव्यानी शीघ्र व प्रेमाने प्राशन केले. हे ठीकच आहे- कारण समानता-समानजातिपणा हा खाणेपिणे आदि कार्यात योग्य कारण मानले आहे ।। १५४ ॥ सूर्याच्या किरणानी उत्पन्न झालेला जो बाह्य सन्ताप तो सरोवरात प्रवेश करून आपल्या छाव्यासह हत्तीणींनी नाहीसा केला. यानंतर त्यांनी शरीरात होणारा अन्तस्ताप पाणी पिऊन नाहीसा केला आणि नंतर त्या आपल्या छाव्यासह शीघ्र वनात वक्षांची पाने खाण्यासाठी निघाल्या ।। १५५ ॥ फुलांनी व कोवळ्या पानानी युक्त असे वेलींचे पुढले शेंडे, स्वादयुक्त असे झुडपांचे समूह, रसाळ व कोमल अशा वनवृक्षांच्या फांद्या आणि भूस-धान्याचा कोंडा अशा वनस्पतींच्या प्रकारांचे त्या हत्तिणींनी भक्षण केले ।। १५६ ॥ Page #174 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-१६२) महापुराण (१६३ कुञ्जेषु प्रतनुतणाङकुरान्प्रमृद्नन् वप्रान्तानपि रदनैः शनैर्विनिघ्नन् । वल्ल्यग्रनसनचणः फलेनहिः सन् व्यालोलः कलभगणश्चिरं विजहे ॥ १५७ प्रत्यग्राः किसलयिनीहाण शाखा भङग्युच्चैर्वनगहनं निषीद कुञ्ज। सम्भोग्यानुपसर सल्लकीवनान्तानित्येवं व्यहृत वने करेणुवर्गः । १५८ सम्भोगैर्वनमिति निविशन्यथेष्टम् स्वातन्त्र्यान्मुहुरपि धूर्मतैनिषिद्धः। बद्धव्यः सहकलभः करेणुवर्गः सम्प्रापत्समुचितमात्मनो निवेशम् ॥ १५९ वित्रस्तरपथमुपाहतस्तुरङगैः पर्यस्तो रथ इह भग्ननिरक्षः। एतास्ता द्रुतमुपयान्त्यपेत्य मार्गाद्वारस्त्रीवहनपराश्च वेगसर्यः ॥ १६० वित्रस्तः करभनिरीक्षणाद्गजोऽयं भीरुत्वं प्रकटयति प्रधावमानः । उत्रस्तात्पतति च वेसरादमुष्माद्विस्रस्तस्तनजघनांशुका पुरन्ध्री ॥ १६१ इत्युच्चय॑तिवदतां पृथग्जनानां सजल्पः क्षुभितरवरौष्ट्रकौक्षकश्च । व्याक्रोशैर्जनितरवैश्च सैनिकानां संक्षोभः क्षणमभवच्चमूषु राज्ञाम् ॥ १६२ त्या हत्तींच्या छाव्यांच्या समूहाने लतामंडपातील बारिक गवताचे अंकुर पायानी तुडविले व तटावर आपल्या दातांनी हळु हळु प्रहार केले. तसेच वेलींचे शेंडे खाण्यात ते चतुर होते. त्यांनी झाडांची फळे तोडली व चंचलपणाने इकडे तिकडे ते खूप वेळपर्यन्त फिरले ॥ १५७ ॥ ताज्या व कोवळ्या पानांनी भरलेल्या फांद्या तोडून घे, मोडलेल्या ढाप्यांनी दाट भरलेल्या अशा वनात बैस, लतामंडपांतील प्रदेशात सल्लकीच्या लतांचे भक्षण कर अशा क्रिया करीत तो हत्तीणींचा समुदाय त्या वनात फिरू लागला ।। १५८ ।। याप्रमाणे अरण्यांत नाना प्रकारच्या संभोगांनी-क्रीडानी अर्थात् क्रीडा करीत वनाचा आपल्या इच्छेने उपभोग करणारा, स्वतंत्ररूपाने पुढे चालल्यामुळे महातांनी ज्याला रोकले आहे व पिलासह असलेला व बांधावयास योग्य असा हत्तिणीचा कळप आपल्या राहण्यास योग्य अशा स्थानास आला ॥ १५९ ॥ हत्तीना पाहून भ्यालेल्या घोड्यांनी आडवाटेकडे नेलेला हा रथ येथे पडला व त्याचे जू मोडले व कणाही तुटला आहे. तसेच वेश्यांना वाहून नेणान्या या खेचरी भिऊन मार्ग सोडून फार वेगाने पळत आहेत ॥ १६० ॥ उंटाला पाहून घाबरलेला हा हत्ती पळत आहे व आपला भ्याडपणा व्यक्त करीत आहे व हत्तीला पाहून घाबरलेल्या. या खेचरावरून ही स्त्री खाली पडली आणि हिची चोळी व ढुंगणावरचे वस्त्र दोन्ही सुटले आहेत ।। १६१ ।। याप्रमाणे जोराने बोलणाऱ्या सामान्य लोकांच्या भाषणानी क्षुब्ध झालेले गाढव, उंट आणि बैल यांच्या शब्दानी व अन्योन्य सैनिकांच्या शब्दानी राजांच्या सेनेमध्ये क्षणपर्यंत फार मोठा क्षोभ उत्पन्न झाला ।। १६२ ।। Page #175 -------------------------------------------------------------------------- ________________ १६४) महापुराण (२९-१६३ मालिनी-अवनिपतिसमाजेनानुयातस्तुरङगैरकृशविभवयोगाग्निर्जयन्लोकपालान् । प्रतिदिशमुपशृण्वन्नाशिषश्चक्रपाणिः शिबिरमविशदुच्चैर्बन्दिना पुण्यघोषः ॥ १६३ अथ सरसिजिनीनां गन्धमादाय सान्द्रं धुततटवनवीथिमन्दमावासमन्तात् । श्रममखिलमनौत्सीत्कर्तुमस्योपचारम् प्रहित इव सगन्धः सिन्धुना गन्धवाहः ॥ १६४ अविदितपरिमाणैरन्वितो रत्नशङखैः स्फुरितमणिशिखाग्रे गिभिः सेवनीयः। सततमुपचितात्मा रुद्धदिक्चक्रवालो जलनिधिमनुजह तस्य सेनानिवेशः ॥ १६५ तत्रावासितसाधनो निधिपतिर्गत्वा रथेनाम्बुधिम् । जैत्रास्त्रप्रतिनिजितामरसभस्तं व्यन्तराधीश्वरम् ॥ जित्वा मागधवत्क्षणाद्वरतनुं तत्साह्वमम्भोनिधि- । द्वीपं शश्वदलञ्चकार यशसा कल्पान्तरस्थायिना ॥ १६६ लेभेऽभेद्यमुरश्च्छंदं वरतनोग्रैंवेयकं च स्फुरत्चूडारत्नमुदंशु दिव्यकटकान्सूत्रं च रत्नोज्ज्वलम् । सद्रत्नैरिति पूजितः स भगवान् श्रीवैजन्तार्णवद्वारेण प्रतिसन्निवृत्य कटकं प्राविक्षदुत्तोरणम् ॥१६७ घोड्यावर बसून अनेक राजे ज्याच्या मागून येत आहेत, ज्याने आपल्या विशाल वैभवाने लोकपालांना जिंकले आहे, प्रत्येक दिशात लोकांचे आशीर्वाद ऐकणारा, चक्ररत्न ज्याच्या हातात आहे असा, भाट लोकांच्या उच्च जयजय अशा पुण्यघोषांचे श्रवण करणारा अशा त्या भरतचक्रवर्तीने आपल्या शिबिरात प्रवेश केला ।। १६३ ।। यानन्तर किना-याच्या वनपंक्तीला जो हालवीत आहे व कमलिनींचा उत्कट गंध घेऊन हळुहळु चोहोकडे जो वाहत होता व समुद्राने पाठविलेला जणु खास कोणी सम्बन्धीजन आहे असा वायु चक्रवर्तीच्या सर्व श्रमांना दूर करीत होता ।। १६४ ।।। त्यावेळी चक्रवर्तीच्या सेनांचे राहण्याचे स्थान बिलकुल समुद्राचे अनुकरण करीत होते. जसे समुद्र प्रमाणरहित असंख्य रत्ने व शंख यांनी भरलेला असतो तसे हे चक्रवर्तीचे सेनास्थान देखिल प्रमाणरहित शंख आदि निधि व रत्नाचे निवासस्थान होते. समुद्र जसा ज्यांच्या मस्तकावरील रत्नाचे किरणाग्र चमकत आहेत अशा सर्पानी सेवनीय असतो तसे चक्रवर्तीचे सेनास्थान देखिल ज्यांच्या मस्तकावर अनेक रत्ने चमकत आहेत अशा भोगी अर्थात् राजे लोकांनी सेवनीय होते. जसे समुद्र निरन्तर वाढत असतो तसे या चक्रवर्तीचे सेनास्थान देखिल नेहमी वाढत होते व समुद्र जसा सर्व दिशात पसरून राहतो, तसे चक्रवर्तीचे हे सेनास्थान सर्व दिशांना घेरून राहिले होते. म्हणून हे सेनास्थान समुद्राचे अनुकरण करीत होते ।। १६५ ।। ज्याने आपल्या सेनेला समुद्राच्या किनाऱ्यावर ठेवले आहे व ज्याने आपल्या विजयलील शस्त्रानी मागधदेवाच्या सभेला जिंकले आहे. अशा निधिपतिभरत चक्रवर्तीने रथाच्याद्वारे समुद्रात जाऊन मागधदेवाप्रमाणे व्यन्तरदेवाचा स्वामी अशा वरतनु नामक देवालाही जिंकले व समुद्रात असलेल्या वरतनु नामक द्वीपाला कल्पान्त कालापर्यन्त स्थिर राहणान्या आपल्या यशाने नेहमी अलंकृत केले ।। १६६ ॥ चक्रवर्ती भरताने त्या वरतनु देवापासून कधीही न तुटणारे कवच-चिलखत, अतिशय कान्तिसंपन्न हार, चमकणारे चूडारत्न-चूडामणि, दिव्यकडे व रत्नांनी प्रकाशमान असा Page #176 -------------------------------------------------------------------------- ________________ २९-१६९) महापुराण (१६५ स्वच्छं स्वं हृदयं स्फुटं प्रकटयन्मुक्ताफलच्छद्मना। स्वं चान्तर्गतरागमाशु कथयन्नुद्यत्प्रवालाङकुरैः। सर्वस्वं च समर्पयन्नुपनयनन्तर्धनं दक्षिणो वारां राशिरमात्यवद्विभुमसौ निर्व्याजमाराधयत् ॥१६८ आस्थाने जयदुन्दुभीमननदन्प्राभातिके मङगले । गम्भीरध्वनितर्जयध्वनिमिव प्रस्पष्टमुच्चारयन् ॥ सुव्यक्तं स जलाशयोऽप्यजलधीर्वारम्पतिः श्रीपतिम् । निर्भत्यस्थितिरन्वियाय सचिरं चक्री यथाद्यं जिनम ॥ १६९ इत्या भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहे दक्षिणार्णवद्वार विजयवर्णनं नामकोनत्रिशं पर्व ॥ २९ ॥ करदोडा हे पदार्थ मिळविले. यानंतर उत्तम रत्नानी ज्याचा आदर केला आहे असा तो ऐश्वर्यवान् चक्रवर्ती भरत श्रीवैजयन्त नामक समुद्राच्या द्वाराने निघून ज्यांत उंच तोरण लावले आहे अशा आपल्या छावणीत आला ॥ १६७ ।। ___ मोत्यांच्या मिषाने आपल्या स्वच्छ अन्तःकरणाला स्पष्टरीतीने दाखविणारा व पोवळयांच्या वेलींच्या अंकुरानी आपल्या हृदयातले प्रेम शीघ्न जणु सांगणारा व आपले रत्नादि सर्वधन अर्पण करणारा व सरळवृत्तीचा जणु अमात्य की काय अशा या दक्षिणसमुद्राने निष्कपटपणाने प्रभु भरतराजाची सेवा केली ।। १६८ ।। ___ अर्थ- जसे इन्द्र दास होऊन अनन्त चतुष्टयरूप लक्ष्मीचे पति अशा आदिजिनेश्वराची सेवा करीत होता तसे हा समुद्र देखिल दास होऊन राज्यलक्ष्मीचे पति अशा भरतचक्रीची सेवा करीत होता. जसे इन्द्र समवसरणसभेत जाऊन विजयदुन्दुभि वाजवीत होता तसे हा समुद्र देखिल भरताच्या सभामण्डपाच्याजवळ आपल्या गर्जनेने विजयदुन्दुभि वाजवीत होता. जसे इन्द्र प्रातःकाली म्हटला जाणान्या मंगलपाठासाठी जय जय शब्दाचे उच्चारण करीत होता तसे तो समुद्र देखिल प्रातःकाली म्हटले जाणा-या भरताच्या मंगलपाठास्तव आपल्या गंभीर शब्दांनी जय जय शब्दाचा स्पष्ट उच्चार करीत होता. जसे इन्द्र जलाशय-जडाशय अर्थात् केवलज्ञानाच्या अपेक्षेने अल्पज्ञानी होऊन देखिल आपल्या ज्ञानाच्या अपेक्षेने अजलधी-अजडधी अर्थात् विद्वान (अजडा धीर्यस्य सः) अथवा अजड-ज्ञानपूर्ण परमात्मा त्याचे ज्ञान करणारा ( अजडं ध्याय तीति अजडधीः) होता. तसे तो समुद्र देखिल जलाशय-जलयुक्त होऊन देखिल अजलीं-जलप्राप्त करण्याच्या इच्छेने ( नास्ति जले धीर्यस्य सः ) रहित होता. याप्रमाणे तो समुद्र दीर्घकालपर्यन्त भरतेश्वराची सेवा करीत राहिला. याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्य प्रणीत आर्ष त्रिषष्टिलक्षण श्रीमहापुराणसंग्रहातील दक्षिणसमुद्रद्वार जिंकल्याचे वर्णन करणारे हे एकोणतिसावें पर्व समाप्त झाले ॥ २९॥ Page #177 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिशं पर्व अथापरान्तं निर्जेतुमुद्यतः प्रभुरुद्ययौ । दक्षिणापरदिग्भागं वशीकुर्वन्स्वसाधनैः ॥१ पुरः प्रयातमाश्वीयरन्वक् प्रचलितं रथैः । मध्ये हस्तिघटा प्रायात्सर्वत्रवान पत्तयः ॥२ सदेवं बलमित्यस्य चतुरङ्गं विभोर्बलम् । विद्याभतां बलैः साधं षड्भिरङ्गविप्रपथे॥३ प्रचलद्वलसडाक्षोभादुच्चचालकिलार्णवः । महतामनुवृत्ति नु श्रावयन्ननुजीविनाम् ॥ ४ बलैःप्रसह्य निर्भुक्ताःप्रह्वन्ति स्म महीभुजः । सरितः कर्दमन्ति स्म स्थलन्ति स्म महाद्रयः ॥५ सुरसाः कृतनिर्वाणाः स्पृहणीयाबुभक्षुभिः । महद्भिः सममुद्योगैः फलन्तिस्मास्य सिद्धयः॥ ६ अभेद्या दृढसन्धाना विपक्षक्षयहेतवः । शक्तयोऽस्य स्फरन्तिस्म सेनाश्चविजिगीषष ॥ ७ यानंतर आपल्या सैन्याच्याद्वारें नैऋत्य दिशेला वश करून भरत चक्रवर्ती पश्चिम दिशा जिंकण्यास उद्युक्त झाला ॥ १ ॥ सर्वांच्या पुढे घोडेस्वार चालले व रथसमूह सर्व सैन्याच्या पाठीमागून प्रयाण करू लागले. हत्तींचा समूह या दोन सैन्यांच्यामध्ये राहून प्रयाण करू लागला आणि पायदळ सैन्य चोहो बाजूनी प्रयाण करू लागले ॥ २ ॥ हत्ती, घोडे, रथ व पायदळ अशी चार प्रकारची भरतराजाची सेना देव व विद्याधरांच्या सैन्यासह प्रयाण करू लागली. याप्रमाणे ही सहा प्रकारची सेना बरोबर प्रयाण करीत होती व ही पृथ्वीवर आणि आकाशांत पसरून प्रयाण करीत होती ॥ ३ ॥ त्या प्रयाण करणाऱ्या सेनेच्या क्षोभाने देखिल समुद्र क्षुब्ध होऊन उसळला. त्याच्या लाटा वर उसळू लागल्या. त्यावेळी महापुरुषांचे अनुकरण सर्वांनी करावे असे जणु सेवकाना सागत आहे असे लोकाना वाटले ॥४॥ चक्रवर्तीच्या सैन्यांनी ज्यांच्यावर आक्रमण केले असे राजे नम्र झाले व सगळ्या नद्या चिखलाने भरून गेल्या अर्थात् त्यांचे पाणी सैन्यानी प्राशन केल्याने त्या आटल्या व सैन्याच्या जाण्या-येण्याने मोठे पर्वत जमिनीप्रमाणे सपाट झाले ॥ ५ ॥ ज्यांचा उपभोग सुखकर आहे व ज्यानी दुःखाचा नाश केला आहे, उपभोगांची इच्छा करणारे मानव ज्यांचा नेहमी अभिलाष करतात अशा सर्व सिद्धि या चक्रवर्तीच्या मोठया उद्योगाचे फळ म्हणून त्याला प्राप्त झाल्या होत्या ।। ६ ।। __या भरतराजाच्या ठिकाणी प्रभुशक्ति, उत्साहशक्ति, व मंत्रशक्ति अशा तीन शक्ति होत्या. या तीन शक्तींचे भेदन शत्रु करू शकत नव्हते. या शक्तींची सामग्री बळकट होती व या शत्रूचा क्षय करण्यास समर्थ होत्या. या शक्ति भरतराजाच्या ठिकाणी नेहमी स्फुरण पावत होत्या. तसेच या भरतप्रभूचे सैन्यही अभेद्य होते व त्याची सामग्री पण दृढ होती. म्हणून ते सैन्य शत्रूवर चढाई मोठ्या उत्साहाने करीत असे. प्रभुशक्ति-पराक्रमापासून उत्पन्न झालेले सामर्थ्य-उत्साहशक्ति-धैर्यापासून उत्पन्न झालेले सामर्थ्य-मन्त्रशक्ति-सल्लामसलतीपासून उत्पन्न झालेले सामर्थ्य ॥ ७ ॥ Page #178 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०-१३) महापुराण (१६७ फलेन योजितास्तीक्ष्णाः सपक्षा दूरगामिनः । नाराचैः सममेतस्य योधा जग्मुर्जयाङ्गताम् ॥ ८ दूरमूत्सारिताः सैन्यैः परित्यक्तपरिच्छदाः । विपक्षाः सत्यमेवास्य विपक्षत्वमुपाययुः ॥९ आक्रान्ता भूभृतो नित्यं भुजानाः फलसम्पदम् । कुपतित्वं ययुश्चित्रं कोपेऽप्यस्य विरोधिनः॥१० सन्धिविग्रहचिन्तास्य पदविद्यास्वभूत्परम् । धूतयातव्यपक्षस्य क्व सन्धानं क्व विग्रहः ॥ ११ इत्यजेतव्यपक्षोऽपि यदयं दिग्जयोद्यतः । तन्नूनं भुक्तिमात्मीयां तद्व्याजेन परीयिवान् ॥ १२ आक्रान्ताः सैनिकरस्य विभोः पारेऽर्णवं भुवः । पूगद्रुमकृतच्छाया नालिकेरवनस्तताः ॥ १३ भरतराजाचे वीर पुरुष युद्धात पराक्रम गाजविल्यामुळे फलाने योजित केले. उत्तम बक्षिस देऊन गौरविले गेले. ते तीक्ष्ण-पराक्रमी होते व सपक्ष-पुष्कळ सहाय्य देणारे होते व अनेक दूर देशात लढण्यासाठी जाणारे होते. म्हणून ते बाणाप्रमाणे या भरतराजाच्या जयाला कारण झाले. तसेच बाण देखिल फलाने अग्रभागाने युक्त केले होते, तीक्ष्ण होते. त्यांना शेवटी पक्ष-पंख जोडलेले होते आणि ते खूप दूरजाऊन शत्रूवर पडत असत म्हणून भरतराजाला जय मिळविण्यास ते बाण कारण झालेले होते ।। ८ ॥ या भरतराजाचे विपक्ष-शत्रू खरोखर विपक्ष झाले-सहायरहित झाले. कारण त्यांना भरतराजाच्या सैन्याने दूर पळविले होते व ते शत्रुसैन्य छत्र चामरादि सामग्रीनीरहित झाले होते ॥ ९॥ हा भरतराजा शत्रूवर रागावला असताही त्याचे शत्रू कुपतित्वं ययुः पृथ्वीच्या पतित्वाला-स्वामित्वाला प्राप्त झाले हे आश्चर्यकारक वाटते. कारण ते भरतराजाच्या सैन्याने त्यांच्यावर आक्रमण केले असताही नेहमी अनेक प्रकारच्या फलसंपदाचा उपभोग घेत होते. तात्पर्य-या श्लोकात विरोधाभास अलंकार आहे. विरोध परिहार असा-भरतराजाने कोपाने आक्रमण केल्यावर त्यांना कुपतित्व आले अर्थात् थोडासा राजेपणा त्यांच्या ठिकाणी राहिला. भरतचक्रीने त्यांना पूर्णपणे राज्यभ्रष्ट केले नाही. किंवा ते शरण आले पण मनात त्यांच्या दुष्ट राजेपणा राहिला ॥ १०॥ सर्व शत्रूना हाकून लाविले असल्यामुळे या भरतराजाला संधि व विग्रह करणे यांचा विचार व्याकरण शास्त्रात करावा लागत होता. संधि म्हणजे तह करणे व विग्रह म्हणजे युद्ध करणे या दोन गोष्टी शत्रूना हाकून दिल्यामुळे याला करण्याची आवश्यकताच राहिली नाही म्हणून संधि-दोन स्वर किंवा दोन व्यंजने एकत्र करणे हा संधि व विग्रह करणे म्हणजे जुळलेली पदे, स्वर व व्यंजने वेगळे करणे एवढेच कार्य याचे उरले होते ॥ ११ ॥ जिंकण्यास योग्य असा शत्रु कोणीही नव्हता तरीही हा भरत दिग्विजय करण्याकरिता निघाला याचे कारण असे आहे. या दिग्विजयाच्या मिषाने तो आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर फेरफटका करून आला असे मानणेच योग्य होय ॥ १२ ॥ ज्याच्यावर सुपारीच्या झाडांच्या सावल्या सतत पडतात व नारळाच्या झाडांनी जे गजबजलेले आहेत असे समुद्राच्या कितान्याचे प्रदेश या भरताच्या सैनिकानी व्यापलेले होते॥१३॥ Page #179 -------------------------------------------------------------------------- ________________ १६८) महापुराण (३०-१४ निपपे नालिकेराणां तरुणानां नुतो रसः । सरस्तीरतरुच्छायाविश्रान्तरस्य सैनिकः ॥ १४ स्फुरत्परुषसम्पातः पवनाधूननोत्थितः । तालीवनेषु तत्सैन्यः शुश्रुवे मर्मरध्वनिः ॥ १५ समं ताम्बूलवल्लीभिरपश्यत्क्रमुकान् विभुः । एककार्यत्वमस्माकमितीव मिलितान्मिथः ॥ १६ नृपस्ताम्बूलवल्लीनामुपध्नान् क्रमुकद्रुमान् । निध्यायन्वेष्टितांस्ताभिर्मुमुदे दम्पतीयितान् ॥१७ - स्वाध्यायमिव कुर्वाणान्वनेष्वविरतस्वनान् । वीन्मुनी निव सोऽपश्यद्यत्रास्तमितवासिनः ॥ १८ पनसानि मुद्न्यन्तः कण्टकीनि बहिस्त्वचि । सुरसान्यमृतानीव जनाः प्रादन्यथेप्सितम् ॥ १९ नालिकेररसः पानं पनसान्यशनं परम् । मरीचान्युपदंशश्च वन्या वृत्तिरहो सुखम् ॥ २० सरसानि मरीचानि किमप्यास्वाद्य विष्किरान् । रुवतःप्रभुरद्राक्षीद्गलदश्रुविलोचनान् ॥ २१ विदश्य मञ्जरीस्तीक्ष्णा मरीचानामशङकितम् । शिरोविधूनतोऽपश्यत्प्रभुस्तरुणमर्कटान् ॥ २२ सरोवराच्या तीरावर असलेल्या वृक्षांच्या सावलीत विश्रांति घेऊन भरताचे सैनिक तरुण नारळांच्या झाडांचा आपोआप गळणारा रस यथेच्छ पीत असत ॥ १४ ॥ त्या भरतराजाच्या सैनिकांनी ताडवृक्षाच्या अरण्यात वा-याने हलविल्यामुळे उत्पन्न झालेला, जवळ आल्यानंतर ज्यांचा कठोरपणा कानाला झोंबत आहे असा वाळलेल्या ताडांच्या पानांचा ध्वनि ऐकिला ॥ १५ ॥ आम्हा दोघांचे कार्य एकच आहे असे समजून जणु सुपारीची झाडे तांबूललताशी परस्पर मिळून गेलेली आहेत असे भरतराजाने पाहिले ॥ १६ ॥ तांबूलाच्या वेलींना आधाररूप असलेले व स्त्रियांनी युक्त अशा पुरुषाप्रमाणे दिसणाऱ्या सुपारीच्या झाडाना तांबल वेलीनी वेष्टिलेले पाहून भरतराजाला मोठा आनंद वाटला. हे दम्पति आहेत असे वाटून तो आनंदला ॥ १७ ॥ ___त्या वनात सूर्यास्ताच्या वेळी निवास करणारे जे पक्षी सारखा शब्द करीत होते ते पाहून सूर्यास्ताचे वेळी एकेच ठिकाणी निवास करणारे व स्वाध्याय करणारे जणु मुनि आहेत असे भरतराजाला वाटले ॥ १८ ॥ ___ ज्यांच्या त्वचेवर बाहेर काटे आहेत व जे आत मृदु आहेत व जे अमृताप्रमाणे सुरस आहेत असे फणस लोकानी आपली तृप्ति होईपर्यंत भक्षिले ॥ १९ ॥ नारळांच्या रसाचे पान करणे, यथेच्छ फणस खाणे व मियांचा चटणीप्रमाणे उपयोग करणे अशा रीतीने वनातील निवास अत्यंत सुखदायक आहे ॥ २० ॥ काही तरी मिन्यांचे सरस दाणे खाऊन जे शब्द करीत आहेत व ज्यांच्या डोळ्यातून अश्रु गळत आहेत अशा पक्ष्यांना भरतराजाने पाहिले ॥ २१ ॥ मियांच्या तीक्ष्ण-तिखट मंजरी निःशंकपणे खाऊन नंतर आपले मस्तक हलविणाऱ्या तरुण माकडाना भरतराजाने पाहिले ॥ २२॥ Page #180 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १६९ वनस्पतीन्फलानत्रान्वीक्ष्य लोकोपकारिणः । जाताः कल्पद्रुमास्तित्वे निरारेकास्तदा जनाः ॥२३ लतायुवति संसक्ताः प्रसवाढ्या वनद्रुमाः । करदा इव तस्यासन्प्रीणयन्तः फलैर्जनान् ॥ २४ नालिकेरासर्वमंत्ताः किञ्चिदाघूर्णितेक्षणाः । यशोऽस्य जगुरामन्द्रकुहरं सिंहलाङ्गनाः ॥ २५ त्रिकूटे मलयोत्सङ्गे गिरौ पाण्डयकवाटके । जगरस्य यशो मन्द्रमूर्च्छनाः किन्नराङ्गनाः ॥ २६ मलयोपान्तकान्तारे सह्याचलवनेषु च । यशो वनचरस्त्रीभिरुज्जगेऽस्य जयाजितम् ॥ २७ चन्दनोद्यानमाधूय मन्दं गन्धवहो ववौ । मलयाचलकुञ्जेभ्यो हरनिर्झरशीकरान् ॥ २८ विष्वग्विसारी दाक्षिण्यं समुज्झन्नपि सोऽनिलः । सम्भावयन्निवातिथ्यैवभोः श्रममपाहरत् ॥ २९ एलालवंग संवास सुरभिश्वसितैर्मुखैः । स्तनैरापाण्डुभिः सान्द्रचन्दनद्रवचचितैः ॥ ३० ३०-३०) महापुराण फळांनी थोडेसे वाकलेले व जगावर उपकार करणान्या अशा मोठमोठ्या वृक्षांना पाहून त्यावेळी पूर्वी या जगात कल्पवृक्ष होते यांच्या अस्तित्वाबद्दल लोक संशयरहित झाले ।। २३ ।। त्य वनांतील वृक्ष वेलीरूपी स्त्रियांनी युक्त होते. फुलांनी लकडलेले होते व सैन्यांतील लोकांना फलांनी संतुष्ट करणारे व जणु भरतराजाला करभार देत आहेत असे दिसले || २४ ॥ नारळाच्या आसवाने मादक पेयाने मत्त झालेल्या, ज्यांचे नेत्र थोडेसे फिरत आहेत अशा सिंहलद्वीपांतील स्त्रिया या भरतराजाची कीर्ति गद्गदकापऱ्या स्वरांनी गाऊ लागल्या ।। २५ ।। त्रिकूट पर्वतावर, मलयपर्वताच्या शिखरावर आणि पाण्डयकवाटक नांवाच्या पर्वतावर किन्नर देवता या भरतराजाच्या यशाचे गायन गंभीर ताना घेऊन करू लागल्या ॥ २६ ॥ मलयपर्वताच्याजवळ असलेल्या जंगलांत व सह्याद्रीच्या अनेक वनांत राहणाया भिल्लांच्या स्त्रियांनी या भरतराजाचे अनेक राजांना जिंकून मिळविलेल्या यशाचे गायन केले ।। २७ ।। मलयपर्वताच्या लतागृहांतील झन्याच्या जलबिन्दूना हरण करणारा वायु चंदन वनास हलवून मंदरीतीने वाहू लागला ॥ २८ ॥ चोहोकडे वाहणारा असा वायु आपले दाक्षिण्य ( सरळपणा, दुसरा अर्थ दक्षिण दिशेकडून वाहणे हा स्वभाव ) सोडून देखिल पाहुणचाराला योग्य अशा सत्कारानी जणु आदर करीत आहे असा होऊन या भरतराजाचे श्रम दूर करू लागला ।। २९ ॥ वेलदोडे, लवंग यांच्या संस्काराने सुगंधित श्वासांनी ज्यांचे मुख शोभत आहे, दाट चन्दनाची उटी लावल्यामुळे ज्यांचे स्तन थोडेसे शुभ्र दिसत आहेत, नितम्बाच्या ओझ्याने ज्यांची चालण्याची पद्धति लीलायुक्त व कोमल भासत आहे, ज्यांचे हास्य मदनाच्या पुष्प म. २२ Page #181 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३०-३१ सलीलमृदुभिर्यानिनितम्ब भरमन्थरः । स्मितैरनङ्गपुष्पास्त्रस्तबकोद्भेदविभ्रमैः ॥ ३१ कोकिलालापम घुरैर्जल्पितैरनतिस्फुटैः । मृदुबाहुलतान्दोलसुभगश्च विचेष्टितैः ॥ ३२ लास्यैः स्खलत्पदन्यासैर्मुक्ताप्रार्थीविभूषणैः । मन्दमञ्जुभिरुद्गीतेजितालिकुलसिञ्जने ॥ ३३ तमालवनवीथीषु सञ्चरन्त्यो यदृच्छथा । मनोऽस्य जन्हरारूढयौवनाः केरलस्त्रियः ॥ ३४ प्रसाध्य दक्षिणामाशां विभुस्त्रैराज्यपार्थिवान् । समं प्रणमयामास विजित्य जयसाधनः ॥ ३५ कालिङ्गकैर्गजैरस्य मलयोपान्तभूधराः । तुलयद्भिरिवोन्मानमाक्रान्ताः स्वेन वर्मणा ॥ ३६ दिशां प्रान्तेषु विश्रान्तैदिग्जयेऽस्य चमूगजैः । विग्गजत्वं स्वसाच्चक्रे शोभायैतत्कथान्तरम् ॥३७ ततोऽपरान्तमारुह्य सह्याचलतटोपगः । पश्चिमार्णववेलान्तपालकानजयत्प्रभुः ॥ ३८ जयसाधनमस्याब्धेरारात्तीरे विजृम्भितम् । महासाधनमित्युच्चैः परंपारमवाष्टभत् ॥ ३९ उप सिन्धुरिति व्यक्तमुभयोस्तीरयोर्बलम् । दृष्ट्वास्य साध्वसात्क्षुभ्यन्निवाभूदाकुलाकुलः ॥ ४० शरांच्या विलासाना उत्पन्न करीत आहे, ज्यांचे भाषण कोकिलांच्या स्वराप्रमाणे मधुर व थोडेसे अस्पष्ट आहे, ज्यांच्या कोमल बाहुलतांच्या हालचाली मोठ्या सुन्दर वाटतात, पावले टाकतांना अडखळण्याचा भास ज्यामध्ये होत आहे असे नृत्य करणाऱ्या, ज्यांनी प्रायः मोत्यांचे अलंकार धारण केले आहेत व भ्रमरांच्या मधुर गुंजारवांना जिंकणा-या पैंजणांचे शब्द ज्या चालत असतांना होत आहेत, ज्या तमालवनाच्या मार्गात लीलेने संचार करीत आहेत, अशा केरलदेशांतील तारुण्याने मुसमुसलेल्या स्त्रियांनी यां भरतराजाचे अन्तःकरणाला आपल्याकडे आकर्षून घेतले || ३०-३४ ॥ १७० ) महापुराण या प्रमाणे भरतचक्रीने दक्षिणदिशा हस्तगत करून चोल, केरळ आणि पाण्ड्य या तीन देशांच्या राजांना आपल्याला जय मिळवून देणाऱ्या सैन्याच्याद्वारे एकदम जिंकले व आपल्यापुढे त्यांना नमस्कार करावयास लाविले ।। ३५ ।। जे आपल्या शरीराच्या उंचीने जणु मलयपर्वताच्या उंचीची तुलना करीत आहेत अशा कलिंगदेशाच्या आपल्या हत्तीनी या भरतचक्रीने मलयपर्वताच्याजवळ असलेल्या पर्वतांना व्याप्त केले ॥ ३६ ॥ दिग्विजयाच्या निमित्ताने दिशांच्या शेवटी जाऊन विश्रान्ति घेतलेल्या या भरतेशाच्या सैन्यांतील हत्तीनी दिग्गजपणाही आपल्याकडेच घेतला यास्तव दिशांचे अंजनादिक दिग्गज आहेत असे जे वर्णिले जाते तें शोभेकरिताच आहे असे समजावे ।। ३७ ।। यानंतर पश्चिमेच्या बाजूकडे वळून भरतचक्री सैन्यासह सह्यपर्वताच्या तटाजवळ गेला आणि पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याच्या सर्व राजांना त्याने जिंकले ॥ ३८ ॥ भरताची ती विजयी सेना समुद्राच्या अलिकडल्या किनाऱ्यावर सर्व ठिकाणी पसरली होती व ती इतकी मोठी होती की, तिने समुद्राचा दुसरा किनारा देखिल व्याप्त केला होता ।। ३९ ।। आपल्या दोन्ही किनान्यावर भरतचक्रीचे सैन्य पसरलेले पाहून तो उपसमुद्र जणु भीतीने अतिशय व्याकुळ झाला || ४० ॥ Page #182 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०-४८) महापुराण ( १७१ ततः स बलसङ्क्षोभादितो वाद्धिः प्रसर्पति । इतः स बलसङ्क्षोभात्ततोऽब्धिः प्रतिसर्पति ॥४१ हरिन्मणिप्रभोत्स पैस्ततमब्धेर्बभौ जलम् । चिराद्विवृत्तमस्यैव सशैवलमधस्तलम् ॥ ४२ पद्मरागांशुभिर्भिनं क्वचनाब्षेर्व्यभाज्जलम् । क्षोभादिवास्य हृच्छोर्णमुच्छलच्छोणितच्छटम् ॥४३ सह्योत्सङ्गे लुठन्नब्धिर्नूनं दुःखं न्यवेदयत् । सोऽपि सन्धारयशेनं बन्धुकृत्यमिवातनोत् ॥ ४४ असह्यैर्बलसङ्घट्टैः सह्यः स ह्यतिपीडितः । शाखोद्धारमिव व्यक्तमकरोदुग्णपादपैः ॥ ४५ चलत्सत्त्वो गुहारन्ध्रविमुञ्चन्नाकुलं स्वनम् । महाप्राणोऽद्रिरुत्क्रान्ति मियायेव बलक्षतः ॥ ४६ चलच्छाखी चलत्सत्त्वश्चलच्छिथिलमेखलः । नाम्नैवाचलतां भेजे सोऽद्रिरेवं चलाचलः ॥ ४७ जनतावनसम्भोगैस्तुरङ्गखुरघट्टनैः । सह्योत्सङ्गभुवः क्षुण्णाः स्थलीभावं क्षणाद्ययुः ॥ ४८ त्या तीरावर होत असलेल्या सैन्याच्या क्षोभामुळे उपसमुद्र या किनान्याकडे येत होता व या किनान्यावर सैन्यक्षोभ झाला म्हणजे तो त्या किनान्याकडे जात असे ॥ ४१ ॥ हिरव्या रत्नांच्या कान्ति पाण्यावर पसरल्यामुळे ते समुद्राचे पाणी दीर्घकालापासून खालचा शेवाळलेला तलभाग वर आल्याप्रमाणे वाटू लागला ॥ ४२ ॥ कोठे कोठे समुद्राचे पाणी पद्मरागमण्यांच्या किरणांनी व्याप्त झाले तेव्हां ते जणु सेनेच्या क्षोभाने समुद्राचे हृदय फुटून आंतून रक्तांच्या छटा उसळून बाहेर पडत आहेत असे वाटले ।। ४३ ।। सह्यपर्वताच्या पायथ्यापर्यन्त लाटांनी जाणाऱ्या त्या समुद्राने आपले दु:ख त्यास जणु सांगितले व त्या पर्वतानेही त्याला धारण करून आपले जणु मित्राचे कर्तव्य चांगले बजाविले ॥ ४४ ॥ चक्रवर्तीच्या दुस्सह अशा सेनेच्या तुडव्याने सह्यपर्वत अत्यंत पीडित झाला व आपल्या तुटलेल्या वृक्षांनी तो असा दिसला की जणु आपल्या मस्तकावर वृक्षाच्या शाखा धारण करून चक्रवर्तीला शरण आला आहे ।। ४५ ।। ज्याच्यावरील प्राणी पळत सुटले आहेत अथवा ज्याचे धैर्य चंचल झाले आहे, ज्याच्या गुहांच्या छिद्रांतून व्याकुळपणाचे शब्द बाहेर पडत आहेत, असा तो सह्याद्रि चक्रवर्तीच्या सैन्याने घायाळ झाल्यामुळे जरी तो महाप्राण महासमर्थ होता तरीही प्राणरहित होण्याच्या पंथाला जणु लागल्यासारखा दिसला ।। ४६ ।। या पर्वतावरील प्राणी पळत होते, याचे धैर्य डगमगत होते, याच्यावरील वृक्ष थरथर कांपत होते. या पर्वताचा मध्यभाग ढिला झाला होता. गदगदा हलणारा तो सह्याचल नावानेच अचल होता ॥ ४७ ॥ जनतेने याच्या वनांत क्रीडा करून याचा खूप उपभोग घेतला होता. घोडघांच्या खुरांचे संघर्षणही याच्यावर खूप झालेले होते. त्यामुळे या पर्वताच्या वरच्या उंच भूमीचे चूर्ण होऊन त्याला सखल जमीनीचे स्वरूप प्राप्त झाले होते ॥ ४८ ॥ Page #183 -------------------------------------------------------------------------- ________________ १७२) महापुराण (३०-४९ आपश्चिमार्णवतटादा च मध्यमपर्वतात् । आतुङगवरकादद्रेस्तुङ्गगण्डोपलाङकितात् ॥ ४९ तं कृष्णगिरिमुल्लजच्य तं च शैलं सुमन्दरम् । मुकुन्दं चाद्रिमुढुप्ता जयभास्तस्य बभ्रमः ॥५० तत्रापरान्नकानागान् हस्वनीवात्परारदः। युक्तान्पीनायितस्निग्धेः श्यामान्स्वक्षान्मृदुत्वचः॥५१ महोत्सङ्गानुदग्राङ्गान् रक्तजिह्वोष्ठतालुकान् । मानिनो दीर्घबालोष्ठान्पद्मगन्धमदच्युतः॥ ५२ सन्तुष्टान्स्वे वने शूरान्दृढपादान्सुवर्मणः । स भेजे तलाधीशः ससम्भ्रममुपाहतान् ॥ ५३ वनरोमावलीस्तुङ्गतटारोहा बहूनदीः । पूर्वापराब्धिगाः सोऽत्यत् सह्याद्रेर्दू हितरिव ॥५४ सञ्चरभीषणग्राहां भीमा भैमरथी नदीम् । नचऋकृतावर्तेरवेणां च दारुणाम् ॥ ५५ नीरां तोरस्थवानीरशाखाग्रस्थगिताम्भसम् । मूलां कूलङ्कङ्गरोधरुन्मूलिततटद्रुमाम् ॥ ५६ चक्रवर्तीभरताचे मदोन्मत्त विजयी हत्ती, पश्चिम समुद्राच्या तीरापासून मध्यम पर्वतापर्यन्त व तेथून मोठमोठया पाषाणांनी व्याप्त झालेल्या तुंगवरक नामक पर्वतापर्यन्त, कृष्णगिरि नावाचा पर्वत, सुमंदर नामक पर्वत आणि मुकुन्द नामक पर्वत हे सर्व ओलांडून फिरते झाले ॥ ४९-५० ॥ पश्चिम समुद्राजवळच्या प्रदेशांत उत्पन्न झालेले, ज्यांचे कंठ आखूड आहेत व जे दिसण्यांत सुंदर आहेत, जे जाड, लांब व तुळतुळित दांतांनी युक्त आहेत, जे लठ्ठ, स्निग्ध व श्यामवर्णाचे आहेत, ज्यांचे डोळे सुंदर व ज्यांची त्वचा मृदु आहे, ज्यांची पाठ फार रुंद आहे. व जे उंच आहेत, ज्यांच्या जिभा, ओठ व टाळू हे लालभडक आहेत, जे मानी आहेत, ज्यांचे ओठ व शेपूट लांब आहेत व कमलाच्या वासाप्रमाणे सुगन्धित मद ज्याच्यापासून वाहत आहे, जे सर्वदा सन्तुष्ट असतात, आपल्या अरण्यांत दुसऱ्याला न येऊ देणारे, जे शूर आहेत, ज्यांचे पाय मजबूत आहेत व जे शरीराने पुष्ट आहेत, अशा हत्तींना त्या त्या राजांच्या सेनापतीनी आणले होते व त्यांनी मोठया आदराने ते हत्ती भरतराजाला अर्पण केले व त्याने त्यांचा स्वीकार केला ॥ ५१-५३ ।। अरण्यांतील वृक्ष हेच ज्यांचे केश आहेत व उंच तट हेच ज्यांचे नितम्ब-ढुंगण आहेत व ज्या पूर्वपश्चिम समुद्राला मिळाल्या आहेत व ज्या सह्याद्रीच्या जणु कन्या आहेत अशा पुष्कळ नद्या उल्लंघून भरतचक्रीने पुढे प्रयाण केले ॥ ५४ ।। जिच्यांत भय उत्पन्न करणा-या सुसरी फिरत आहेत व त्यामुळे जी भयंकर दिसते अशी भैमरथीनामक नदी, मगरीच्या समूहांनी जिच्यांत भोवरे उत्पन्न झाले आहेत त्यामुळे जी भयंकर वाटते अशी दारुवेणा नामक नदी ॥ ५५ ॥ जिच्या तीरावर वेतांचे वन पसरल्यामुळे त्यांच्या शाखांनी जिचे पाणी वाहणे स्थगित झाले आहे- बंद झाले आहे अशी नीरा नावाची नदी, तीराला घासून जाणा-या प्रवाहांनी जिने तटावरील झाडे उपडून टाकली आहेत अशी मूला नांवाची नदी ।। ५६ ।। Page #184 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०-६५) महापुराण (१७३ बाणामविरताबाणां केतम्बामम्बुसम्भृताम् । करीरिततटोत्सङ्गां करीरी सरिदुत्तमाम् ॥ ५७ प्रहरी विषममाहेर्दूषितामसतीमिव । मुररां कुररैः सेव्यामपपङ्कां सतीमिव ॥ ५८ पारां पारेजलं कूजत्क्रौञ्चकादम्बसारसाम् । मदनां समनिम्नेषु समानामस्खलद्गतिम् ॥ ५९ मदतिमिवाबद्धवेणिकां ससह्यदन्तिनः । गोदावरीमविच्छिन्नप्रवाहामतिविस्तृताम् ॥ ६० . करीरवनसंरुद्धतटपर्यन्तभूतलाम् । तापीमातपसन्तापात्कवोष्णा बिभ्रतीमपः ॥ ६१ रम्यां तीरतरुच्छायासंसुप्तमृगशावकाम् । खातामिवापरान्तस्य नदी लाङ्गलखातिकाम् ॥ ६२ सरितोऽमूःसमं सैन्यरुत्ततार चम्पतिः । तत्र तत्र समाकर्षन्मदिनो वनसामजान् ॥ ६३ प्रसारितसरिज्जिह्वो योऽब्धि पातुमिवोद्यतः। सह्याचलं तमुल्लङघ्य विन्ध्यादि प्राप तद्वलम्॥६४ भूभृतां पतिमुत्तुङ्ग पृथुवंशंधृतायतिम् । परैरलङध्यमद्राक्षीद्विन्ध्यादि स्वमिव प्रभुः ॥ ६५ जिच्यांत पाण्याचा खळखळाट नेहमी होत असतो अशी बाणा नावाची नदी, जिच्यात पाणी नेहमी भरलेले असते अशी केतम्बा नामक नदी. जिचा तीरप्रदेश हत्तींनी उकरलेला आहे अशी नद्यामध्ये उत्तम असलेली करीरी नदी, जसे नीच पुरुषांच्या सहवासाने बिघडलेल्या स्त्रीप्रमाणे भयंकर मगरसुसरी वगैरे जलचरांनी बिघडलेली तरून जाण्यास कठिण झालेली प्रहरानामक नदी, जशी सती स्त्री अपपंक-पापरहित असते तशी जी अपपंक चिखलरहित आहे आणि जिच्या तीरावर कुरर नांवाचे पक्षी राहतात अशी मुररा नांवाची नदी ॥ ५७-५८ ॥ जिच्या किना-यावरील पाण्यांत करकोचा, कलहंसबदक व सारस पक्षी शब्द करीत आहेत अशी पारानदी. सपाट प्रदेश व खोलगट प्रदेश अशा दोन्ही स्थानी समान वन अडखळता जिचा प्रवाह वाहत असतो अशी मदना नामक नदी ॥ ५९॥ सह्यपर्वतरूपी हत्तीचा जणु मदाचा प्रवाह जो की बांधलेल्या वेणीसारखा सरळ आहे. अशी व जिचा प्रवाह अतिशय विस्तृत व अखण्ड आहे अशी गोदावरी नदी ।। ६० ।। नेपतीच्या वनाने जिच्या तटावरील भूमिप्रदेश व्याप्त झाला आहे व जी सूर्याच्या प्रखर तापामुळे कोमट पाणी धारण करीत आहे अशी तापी नदी॥ ६१ ।। जिच्या तीरावरील वृक्षांच्या छायेत हरिणबालक झोपले आहेत अशी रम्या नदी आणि पश्चिमेकडील प्रदेशाची जणु खातिका ( खंदक ) अशी लांगलखातिका नदी ।। ६२ ॥ इत्यादि अनेक नद्या सेनापतीने आपल्या सैन्यासह पार केल्या व त्याने अनेक जंगली मदोन्मत्त हत्तीनाही पकडवून आणिले होते ॥ ६३ ॥ नद्यारूपी आपल्या जिभा लांब पसरून जो समुद्राचे पाणी पिण्यासाठी उद्युक्त झाला आहे अशा सह्याद्रीला उल्लंघून भरतराजाचे सैन्य विध्याद्रीजवळ आले ॥ ६४ ।। प्रभु भरताने आपल्याप्रमाणे या विध्यपर्वताला पाहिले. प्रभुभरत भूभतां पतिम्आपण ज्याप्रमाणे सर्व राजांचे स्वामी आहोत तसे हा विध्य देखिल सर्व पर्वतांचा पति स्वामी आहे. उत्तडं आपण जसे वैभवादिकांनौ उंच आहोत तसा हा पर्वत उत्तंग-शिखरांनी उंच आहे व आपण जसे पृथुवंश-श्रेष्ठ वंशामध्ये जन्मलो आहोत तसा हा पर्वत पृथुवंश-मोठ्या वेळूनी युक्त आहे, आपण जसे धृतायति-उत्कृष्ट भविष्याला धारण करणारे आहोत तसे हा Page #185 -------------------------------------------------------------------------- ________________ १७४) महापुराण (३०-६६ भाति यः शिखरस्तुर्दूरव्यायतनिझरः । सपताकैविमानौविश्रमायेव संश्रितः ॥ ६६ यः पूर्वापरकोटिभ्यां विगाह्याम्बुनिधि स्थितः । नूनं दावभयात्सख्यममुना प्रचिकीर्षति ॥ ६७ नयन्ति निझरा यस्य शश्वत्पुष्टि तटदुमान् । स्वपादाश्रयिणः पोष्याः प्रभुणेवेति शंसितुम् ॥ ६८ तटस्थपुटपाषाणस्खलितोच्चलिताम्भसः नदीवधूः कृतध्वानं निर्झरहसतीव यः ॥ ६९ वनाभोगसपर्यन्तं यस्य दग्घुमिवाक्षमः । भृगुपाताय दावाग्निः शिखराण्यधिदोहति ॥ ७० ज्वलद्दावपरीतानि यत्कूटानि वनेचरैः । चामोकरममानीव लक्ष्यन्ते शुचिसन्निधो ॥ ७१ समातङ्गं वनं यस्य सभुजङ्गपरिग्रहम् । विजातिकण्टकाकीर्ण क्वचिद्धत्तेऽतिकष्टताम् ॥ ७२ पर्वत अतिशय लांबीला धारण करीत आहे. आपण जसे परैः अलंध्यम्- शत्रूनी न जिंकले जाणारे आहोत तसे हा पर्वतही इतराकडून उल्लंघन न करण्यास योग्य आहे. अशारीतीने भरताने आपल्याप्रमाणे त्या पर्वताला पाहिले ।। ६५ ।। जो पर्वत दूर व लांब झरे ज्यांच्यावर आहेत अशा उंचशिखरांनी युक्त असल्यामुळे जणु पताकांनी सहित अशा विमानांनी विश्रांतिकरिता आश्रय घेतल्याप्रमाणे शोभत आहे ॥६६।। जो पर्वत पूर्व आणि पश्चिमेकडील आपल्या दोन टोकांनी समुद्रात प्रवेश करून राहिला आहे. जणु वणव्याच्या भयाने समुद्राबरोबर सख्य-मैत्री करण्याची इच्छा करीत आहे असा भासतो ॥ ६७ ।।। ज्याचे झरे-पाण्याचे प्रवाह आपल्या पायांचा आश्रय घेतलेल्याचे मालकाने अवश्य रक्षण केले पाहिजे असे जनांना जणु कळविण्याकरिता तटावर असलेल्या वृक्षांना कायमचे पुष्ट करीत आहैत ।। ६८ ॥ ज्याचे पाणी तटावर असलेल्या उंच सखल पाषाणावर आपटून उडत आहे अशा आपल्या नद्यारूपी स्त्रियांना जो पर्वत झऱ्याच्या मिषाने मोठ्याने खदखदा हसत आहे असा भासतो ॥ ६९ ॥ या विन्ध्यपर्वताच्या विस्तृत अरण्यप्रदेशाला मी जाळण्यास असमर्थ आहे असे जणु वणव्याच्या अग्नीला वाटले म्हणून तो शिखरावरून पडून आत्महत्या करावी अशा विचाराने या पर्वताच्या शिखरावर चढत आहे ॥ ७० ॥ आषाढमास जवळ आला असता या पर्वताची शिखरे जेव्हां पेटलेल्या उज्वल अग्नीने व्याप्त होतात तेव्हां भिल्ल लोकांना ती जणु सुवर्ण निर्मित आहेत असे वाटते ॥ ७१ ॥ ___ या पर्वतावरील वन कोठे कोठे समातङ्ग-हत्तींनी युक्त होते अथवा मांग जातीच्या लोकाचे निवासस्थान होते व कोठे कोठे सभुजङ्गपरिग्रहम्-सांच्या परिवारांनी युक्त होते किंवा भुजंग-विट-नीच लोकांच्या निवासाने युक्त होते व कोठे कोठे विजाति नाना पक्ष्याच्या जातींनी युक्त होते अथवा नीच लोकांनी युक्त होते, अनेक कण्टकांकीर्ण-नाना प्रकारच्या काटयांनी भरले होते व अनेक उपद्रव देणाऱ्या लोकांनी युक्त होते. यामुळे या पर्वतावरील वन अतिकष्टदायक होते ॥ ७२ ॥ Page #186 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०-७८) महापुराण (१७५ क्षीबकुञ्जरयोगेऽपि क्वचिदक्षीबकुञ्णरम् । विपत्रमपि सत्पत्रपल्लवं भाति यवनम् ॥ ७३ स्फुटद्वेणूवरान्मुक्तैर्व्यस्तैर्मुक्ताफलः क्वचित् । वनलक्ष्म्यो हसन्तीव स्फुरद्दन्तांशु यहुने ॥ ७४ गुहामुखास्फुरद्धीरनिर्झरप्रतिशब्दकः । गर्जतीव कृतस्पर्को महिम्ना यः कुलाचलैः॥ ७५ स्फुटं निम्नोन्नतोद्देशैश्चित्रवर्णैश्च धातुभिः । मृगरूपैरतक्यैश्च चित्राकारं विभति यः ॥ ७६ ज्वलन्त्योषषयो यस्य वनान्तेषु तमीमुखे । देवताभिरिवोत्क्षिप्ता दीपिकास्तिमिरच्छिदः ॥७७ क्वचिन्मृगेन्द्रभिन्नभकुलोच्छलितमौक्तिकः । यदुपान्तस्थलं धत्ते प्रकीर्णकुसुमश्रियम् ॥ ७८ त्या पर्वतावरचे वन क्षीबकुंजरयोगेऽपि उन्मत्त हत्तींनी सहित असून देखिल अक्षीबकुज्जर-मदोन्मत्त हत्तींनी रहित होते आणि विपत्रमपि-पानांनी रहित असूनही सत्पत्रपल्लवं-पाने व कोवळ्या पानांनी सहित होते. याप्रमाणे विरोधरूप असून सुशोभित झाले होते. या श्लोकांत विरोधाभास अलंकार आहे. विरोधाचा परिहार असा- तेथील वन क्षीबकुंजर मदोन्मत्त हत्तींनी युक्त असूनही अक्षीबकुञ्जर म्हणजे समुद्राच्या मिठाने युक्त व हत्तींच्या दातांना देणारे होते. अथवा शोभांजन नामक लतामण्डपाना देणारे होते आणि विपत्र-पक्षांच्या पंखांनीसहित असूनही उत्तम पाने व नवीन कोमल पानानी सहित ते वन होते. याप्रमाणे विरोध परिहार शाला ।। ७३ ।। या विध्यपर्वताच्या वनांत वेळू फुटून त्यांच्या पोटांतून बाहेर आलेले व इकडे तिकडे पसरलेले जे मोत्यांचे समूह ते अनेक वनलक्ष्मी हसत असतां त्यांच्या दातांचे किरण पसरल्याप्रमाणे वाटतात ॥ ७४ ।। गुहांच्या तोंडातून बाहेर पडणा-या झ-यांच्या गंभीर प्रतिध्वनींनी तो पर्वत इतर हिमवदादि कुलपर्वताबरोबर जणु आपल्या महिमेने स्पर्धा करीत गर्जना करीत आहे असे वाटते ।। ७५ ॥ हा पर्वत खोलगट व उंच असे प्रदेश धारण करीत आहे, आणि नाना रंगांचे धातु धारण करीत आहे. ज्याच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही असे चित्रविचित्र रंगाचे व आकृतीचे पशु धारण करीत आहे. यामुळे हा पर्वत अनेक विचित्र आकार धारण करीत आहे असे वाटते ॥ ७६ ।। या पर्वताच्या अरण्यांत कृष्णरात्रीच्या आरंभी जणु देवतांनी लावलेल्या व अंधकाराचा नाश करणाऱ्या अनेक दिवट्या आहेत. असा भास करणान्या अनेक वनस्पति प्रकाशत असतात ।। ७७॥ सिंहाने फोडलेल्या अनेक हत्तींच्या गंडस्थलांतून-मस्तकांतून बाहेर उसळून पडलेल्या मोत्यांनी फुले पसरली असता जी शोभा दिसते तशी शोभा या पर्वताच्या पायथ्याची जमीन एके ठिकाणी धारण करीत आहे ।। ७८ ॥ Page #187 -------------------------------------------------------------------------- ________________ १७६) महापुराण (३०-७९ स तमालोकयन्दूरादाससाद महागिरिम् । आह्वयन्तमिवासक्तं मरुद्भूतैस्तटमः ॥ ७९ स तद्वनगतान्दूरादपश्यद्धनकळुरान् । सयथानुद्धनुर्वशान्किरातान्करिन्णोऽपि च ॥८० सरिद्वधस्तदुत्सङ्ग विवत्तशफरीक्षणाः। तद्वल्लभा इवापश्यत्स्फुरद्विरुतमन्मनाः ॥८१ मध्येविन्ध्यमथैक्षिष्ट नर्मदां सरिदुत्तमाम् । प्रततामिव तत्कीतिमासमुद्रमपारिताम् ।। ८२ तरडागितपयोवेगां भवो वेणीमिवायताम। पताकामिव विन्ध्याद्रः शेषाद्रिजयशंसिनीम ॥८३ सा धुनी बलसङक्षोभादुड्डोनविहगावलिः । विभोरुपागमे बद्धतोरणेव क्षणं व्यभात् ॥ ८४ नर्मदा सत्यमेवासीन्नर्मदा नृपयोषिताम् । यदपी हयुत्तरन्तीस्ताः शफरीभिरघट्टयत् ॥ ८५ वान्याने हालविलेल्या तटावरील वृक्षांनी हा पर्वत जणु आपणास बोलावित आहे असे जाणून आपणाविषयी जणु आसक्त अशा त्या महापर्वताला दुरून पाहत तो भरतप्रभु त्याच्याजवळ आला ।। ७९ ॥ त्या भरतराजाने विध्यपर्वताच्या अरण्यांत संचार करणारे मेघाप्रमाणे श्यामवर्णाचे धनुष्य व वेळूच्या काठ्या उंच धारण करणा-या भिल्लांच्या टोळीला दुरून पाहिले व मेघाप्रमाणे काळे, धनुष्याप्रमाणे उंच अशा पाठीनी युक्त असलेल्या हत्तींच्या कळपांनाही दुरून पाहिले ।। ८० ॥ ___त्या पर्वताच्या टेकडीवर चंचलमासे हेच ज्यांचे डोळे आहेत व किलबिल करणाऱ्या पक्ष्यांचे शब्द हेच ज्यांचे मनोहर शब्द आहेत अशा विंध्यपर्वताच्या प्रियस्त्रियाप्रमाणे असलेल्या नदीरूपी स्त्रियांना अतिशय उत्कण्ठेने भरतराजाने पाहिले ॥ ८१ ।। यानंतर विन्ध्यपर्वताच्या मध्यभागी समुद्रापर्यन्त जी पसरली आहे व जी या पर्वताची न रोकली जाणारी जणु कीर्ति आहे अशा नद्यांत श्रेष्ठ असलेल्या नर्मदा नदीला भरत राजाने पाहिले ॥ ८२ ॥ तरङ्गयुक्त पाण्याच्या वेगाला धारण करणारी ती नर्मदा जणु पृथ्वीदेवीच्या लांब वेणीप्रमाणे दिसत होती. तसेच बाकीच्या पर्वतांना या विन्ध्यपर्वताने जिंकले आहे असे जणु सांगणारी ही जयपताका आहे अशी भासत होती ॥ ८३ ॥ सैन्याच्या गलबल्याने नर्मदानदीच्या तीरावरील पक्षी उडाले तेव्हां भरतराजाच्या आगमनसमयी तिने जणु तोरणाची रचना केली की काय अशी क्षणभर ती जनाना दिसली ।। ८४ ॥ ती नर्मदा नदी खरोखर राजस्त्रियांना नर्मदा-खेळवणारी व त्यांची थट्टा करणारी झाल्यामुळे तिचे नर्मदा हे नांव अन्वर्थक झाले. कारण जेव्हां राजस्त्रिया नर्मदेच्या पाण्यातून तरून जाऊ लागल्या तेव्हा तिने माशांच्याद्वारे त्यांच्या मांड्याजवळ घर्षण केले. गुदगुल्या केल्या ॥ ८५ ॥ Page #188 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०-९२) महापुराण (१७७ तामुत्तीर्य जनक्षोभात् उत्पतत्पतगावलीम् । बलं विन्ध्योत्तरस्थानमाक्रामत्कुतपास्थया ॥ ८६ तस्य दक्षिणतोऽपश्यद्विन्ध्यमुत्तरतोऽप्यसौ। द्विधाकृतमिवात्मानमपर्यन्तं दिशोर्द्वयोः ॥ ८७ स्कन्धावारनिवेशोऽस्य नर्मदामभितोऽद्युतत् । प्रथिम्नाविन्ध्यमावेष्टय स्थितो विन्ध्य इवापरः ॥८८ बलोपभुक्तनिःशेषफलपल्लवपादपः । अप्रसूनलतावीरुद्विन्ध्यो वन्ध्यस्तदाभवत् ॥ ८९ वैणवस्तण्डुलैर्मुक्ताफलमित्रैः कृतार्चनाः । अध्यूषः सैनिकाः स्वैरं रम्या विन्ध्याचलस्थितिः॥९० गजैगण्डोपलरश्वैरश्ववकत्रश्च विद्वतैः । स्कन्धावारः सविन्ध्यश्च भिदा नावापतुर्मिथः ॥ ९१ कृतावासं च तत्रैनं ददृशुस्तद्वनाधिपाः । वन्यरुपायनैः श्लाघ्यरगदैश्च महौषषैः ॥ ९२ ..............------------- लोकांच्या क्षोभाने-गलबल्याने जिच्या तटावरील पक्ष्यांची पंक्ति उडून गेली आहे अशा नर्मदा नदीतून भरताचे सैन्य उतरून विंध्यपर्वताच्या उत्तरेकडील टेकड्यावर येथे आम्हास बसण्याकरिता देवडी केलेली आहे अशा बुद्धीने चढू लागले ॥ ८६ ।। त्या भरतराजाने दक्षिणेकडे व उत्तरेकडेही पसरलेल्या विन्ध्यपर्वताला पाहिले. जणु आपले दोन विभाग करून या दोन दिशांना त्याने स्वतः आपल्याला वाटून दिले आहे असे भरताला वाटले ।। ८७ ।। नर्मदानदीच्या दोन्ही किनान्यावर पसरलेली भरतराजाच्या सैन्यांची छावणी आपल्या मोठ्या विस्ताराने विन्ध्यपर्वताला वेढून दुसरा विंध्यपर्वत जणु राहिला आहे अशी शोभली ॥ ८८ ॥ भरतराजाच्या सैन्याने विन्ध्यपर्वतावरील सर्व वृक्षांची फळे व कोवळी पाने उपभोगिली. तसेच वेलींची व झुडपांची फलेही उपभोगिली. त्यामुळे तो विध्याद्रि त्यावेळी वन्ध्याद्रि झाला अर्थात् पुष्पफळांनी रहित वांझ-झाला ।। ८९ ।। वेळूच्या समूहांतील तांदूळ व त्यांतील मोत्यांचा समूह यांच्या मिश्रणानी ज्यांची पूजा अर्थात् आदर केला आहे असे सैनिक स्वच्छंदाने तेथे राहिले. त्यांना तेथे राहणे मोठे आनंददायक वाटले ॥ ९० ॥ गजैर्गण्डोपलैरिति- हत्तींनी व घोड्यांनी युक्त अशी सैन्याची छावणी होती व विन्ध्यपर्वत देखिल हत्तीप्रमाणे मोठमोठे जे काळे दगड त्यांनी युक्त होता व इकडून तिकडे पळणारे घोडमुखे किन्नर यांनी युक्त होता. त्यामुळे सैन्याची छावणी व विन्ध्यपर्वत एकमेकापासून वेगळे दिसत नव्हते. दोघांचे सादृश्य मात्र दिसले ।। ९१ ॥ त्या विंध्यवनाचे जे राजे होते त्यांनी भरतराजाला पाहिले व अरण्यात उत्पन्न झालेल्या उत्तम अशा वस्तु व रोगविनाशक उत्तम उत्तम औषधेही त्याला भेट दिली याप्रमाणे राजांनी भरतप्रभूचे दर्शन घेतले ॥ ९२ ।। म. २३ Page #189 -------------------------------------------------------------------------- ________________ १७८) महापुराण (३०-९३ उपानिन्यः करीन्द्राणां दन्तानस्मै समौक्तिकान् । किरातवर्या वर्या हि स्वोचिता सतक्रिया प्रभोः॥ पश्चिमान्तेन विन्ध्याद्रिमुल्लाध्योत्तीर्य नर्मदाम् । विजेतुमपरामाशां प्रतस्थे चक्रिणो बलम् ॥९४ गत्वा किञ्चिदुदग्भूय प्रतीची दिशमानशे। प्राक्प्रतापोऽस्य दुर्वारः सचक्रं परमं बलम् ॥ ९५ तदाप्रचलदश्वीयखुरोद्भूतमहीरजः । न केवलं द्विषां तेजो रुरोध धुमणेरपि ॥ ९६ लाटा ललाटसन्दष्टभूपृष्ठाः स्वादुभाषिणः । लालाटिकपदं भेजः प्रभोराज्ञावशीकृताः ॥ ९७ केचित्सौराष्ट्रिकगिः परे पाञ्चनदैर्गजैः । तं तद्वनाधिपा वीक्षाञ्चक्रिरे चक्रचालिताः ॥ ९८ चक्रसन्दर्शनादेव त्रस्ता निमंण्डलग्रहाः । ग्रहा इव नृपाः केचिच्चक्रिणो वशमाययुः ॥ ९९ दिश्यानिव द्विपान्धमापान् पृथुवंशान्मदोरान्।प्रचक्रे प्रगुणांश्चक्री बलादाक्रम्य दिक्पतीन्॥१०० त्याठिकाणी कित्येक श्रेष्ठ भिल्ल राजे होते त्यांनी हत्तींच्या मस्तकांत उत्पन्न झालेले मोत्यांचे समूह आणि त्या हत्तींचे दात भरतराजाला भेट म्हणून अर्पण केले. कारण प्रभूचा अर्थात् थोर मनुष्याचा सत्कार आपणास जसा अनुकूल होईल तसा करणे योग्य आहे ।। ९३ ।। पश्चिम दिशेच्या बाजने विध्याद्रि व नर्मदानदीला ओलांडन व उतरून चक्रवर्तीच्या सैन्याने दुसरी दिशा ( वायव्य ) अवलंबिली अर्थात् तिकडे प्रयाण केले ।। ९४ ॥ तें भरतराजाचे सैन्य कांहीं अन्तर उत्तरेकडे गेले व पुनः तें पश्चिमेकडेच प्रयाण करू लागले. या भरतप्रभूचा दुर्वार प्रताप पुढे प्रयाण करीत असे व नंतर चक्ररत्नासह सैन्य तेथें पोहोचत असे ॥ ९५ ।। त्यावेळी मोठया वेगाने घावणा-या घोड्यांच्या टापानी उडालेल्या पृथ्वीवरच्या धळीनी फक्त शत्रचे तेजालाच अडविले, आच्छादिले असे नाही तर त्यानी सूर्याच्या तेजालाही झाकून टाकले ॥ ९६ ॥ भरतप्रभूच्या आज्ञेला लाट देशाचे राजे वश झाले. मधुर भाषण करून आपल्या कपाळानी भूमीला स्पर्श करून त्यानी भरतप्रभूला नमस्कार केला त्यामुळे ते ‘लालाटिक' या नांवाला प्राप्त झाले. तेव्हापासून जनता त्यांना 'लालाटिक'' म्हणू लागली ।। ९७ ।। ___ त्या लाटदेशातील वनांचे जे राजे होते त्यांचा भरतराजाच्या चक्राने पराभव केला तेव्हां कांहीनी सौराष्ट्रदेशाचे हत्ती प्रभूला अर्पण करून त्याचे दर्शन घेतले व कांहीनी पंचनद देशातील हत्तींचा नजराणा प्रभूला अपिला व त्याचे दर्शन घेतले ॥ ९८॥ भरतप्रभूचे चक्ररत्न पाहिल्याबरोबर भ्यालेल्या काही राजांनी आपल्या देशाचा त्याग केला व काही राजे सूर्यादिग्रहाप्रमाणे चक्रवर्तीला वश झाले ॥ ९९ ॥ ___भरतचक्रवर्तीने दिग्गजाप्रमाणे पृथुवंश-उत्कृष्ट वंशामध्ये उत्पन्न झालेले, दुसरा अर्थ पाठीवरचा विस्तृत जो कणा त्याने सहित असलेलेव मदोद्धर-अभिमानाने भरलेले उत्कट अभिमानी. दसरा अर्थ मदजलाने मत्त झालेले अशा इत्तीसमान असलेल्या आक्रमण केले व दिग्गजाप्रमाणे असलेल्या त्यांना वश केले ॥ १०० ॥ १. 'ललाटं पश्यति इति लालाटिकः' मालक कोणती आज्ञा करतो त्या अभिप्रायाने जो मालकाच्या कपाळाकडे नेहमी दृष्टि फेकतो त्या नोकराला लालाटिक म्हणतात. अर्थात् लाटदेशाचे राजे चक्रवर्तीचे आज्ञाधारक बनले. Page #190 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०-१०९) ( १७९ नृपान्सौराष्ट्रकानुष्टवामीशतभृतोपदान् । सभाजयत्प्रभुर्भेजे रम्या रैवतकस्थलीः ॥ १०१ सुराष्ट्रेषज्जयन्ताद्रिमद्रिराजमिवोच्छ्रितम् । ययौ प्रदक्षिणीकृत्य भावितीर्थमनुस्मरन् १०२ क्षौमांशुक दुकूलैश्च चीनपट्टाम्बरैरपि । पटीभेदैश्च देशेशा ददृशुस्तमुपायनैः ॥ १०३ कांश्चित्संमानदानाभ्यां कांश्चिद्विश्रम्भभाषितैः । प्रसन्नैर्वीक्षितैः कांश्चिद्भूपान्विभुररञ्जयत् ॥१०४ गजप्रवेकंर्जात्यश्व रत्नैरपि पृथग्विधैः । तमानर्चुर्नृपास्तुष्टाः स्वराष्ट्रोपगतं प्रभुम् ॥ १०५ तरस्विभिर्वर्मेघावयः सत्त्वगुणान्वितैः । तुरङ्गमैस्तुरुष्काद्यैर्विभुमाराधयन्परे ॥ १०६ केचित्काम्भोजबाह्लीकतैतिलारट्टसंन्धवैः । वानायुजैः सगान्धारैर्वापीयैरपि वाजिभिः ॥ १०७ कुलोप कुलसम्भूतैर्नानादिग्देशचारिभिः । आजानेयैः समग्राङ्गः प्रभुमैक्षन्त पार्थिवाः ॥ १०८ प्रतिप्रयाणमित्यस्य रत्नलाभो न केवलम् । यशोलाभश्च दुःसाध्यान्बलात्साधयतो नृपान् ॥ १०९ 1 महापुराण शेकडो उंट व घोड्यांची भेट घेऊन आलेल्या सौराष्ट्र देशातील राजांना आनंदित करणाच्या भरतचक्रीने रमणीय रैवतक पर्वताचा आश्रय घेतला ॥ १०१ ॥ सुराष्ट्रदेशामध्ये मेरुपर्वताप्रमाणे उंच असा उज्जयन्त पर्वत आहे तो भावी तीर्थ म्हणून त्याला भरतचीने प्रदक्षिणा घालून पुढे प्रयाण केले ।। १०२ ॥ तागाची वस्त्रे व रेशमी वस्त्रे, चीन देशाची वस्त्रे व आणखी कांही वस्त्रांचे प्रकार यांची भेट कित्येक देशांच्या राजांनी भरतराजाला केली व त्यांचे दर्शन त्यानी घेतले ।। १०३ ॥ कित्येक राजांचा भरताने संमान केला, कांहींना बक्षिसे दिली, कांही राजाबरोबर विश्वासयुक्त भाषण केले, कांही राजाना त्याने प्रसन्न नजरेने पाहिले. याप्रमाणे राजे लोकांना त्याने खुष केले ।। १०४ ॥ भरतप्रभु आपल्या राष्ट्रात राज्यात आला म्हणून आनंदित झालेल्या राजानी श्रेष्ठ हत्ती, जातिवंत घोडे व नाना प्रकारची रत्ने त्याला अर्पण करून त्यांचे पूजन केले - आदर केला ॥ १०५ ॥ इतर कांही राजानी वेगवंत, सुंदर शरीराचे, बुद्धि, वय व बल या गुणानी युक्त असलेले तुरुष्क वगैरे देशात उत्पन्न झालेले अनेक घोडे दिले व त्यांनी प्रभूची आराधना केली, त्याला प्रसन्न केले ॥ १०६ ॥ कित्येक राजांनी काम्भोज, बाह्लीक, तैतिल, आरट्ट, सिन्धुदेश, वनायुजदेश, गंधार व वापी या देशांत उत्पन्न झालेले घोडे प्रभूला देऊन त्याचे दर्शन घेतले. तसेच समान जातीच्या घोडीपासून उत्पन्न झालेले व भिन्न जातीच्या घोडीपासून उत्पन्न झालेले, अनेक दिशा व अनेक देशात संचार करणारे सर्वांगांनी युक्त असे पुष्कळ घोडे नजर करून भरतराजाचे दर्शन घेतले ।। १०७ - १०८ ॥ याप्रमाणे प्रत्येक मुक्कामाचे ठिकाणी भरतराजाला उत्कृष्ट पदार्थांचा रत्नादिकांचाच लाभ झाला असे नसून मोठमोठ्या दुःसाध्य बलिष्ठ राजांना स्वपराक्रमाने त्याने जिंकले असल्यामुळे त्याला खूप यशो - लाभही झाला ॥ १०९ ॥ Page #191 -------------------------------------------------------------------------- ________________ १८०) महापुराण (३०-११० जलस्थलपथान्विष्वगारुध्य जयसाधनैः । प्रत्यन्तपालभूपालानजयत्तच्चमूपतिः ॥ ११० विलड्डध्य विविधान्देशानरण्यानीः सरिगिरीन् । तत्र तत्र प्रभोराज्ञां सेनानीराश्वशुश्रुवत् ॥१११ प्राच्यानिव स भूपालान्प्रतीच्यानप्यनुक्रमात् । श्रावयन्हृततन्मानधनःप्रायात्पराम्बुधिम् ॥११२ वेलासरित्करान्वाधिरतिदूरं प्रसारयन् । नूनं प्रत्यग्रहीदेनं नानारत्नार्थमुद्वहन् ॥ ११३ शर्पोन्मेयानि रत्नानि वार्द्धरिभ्यप्रशंसिभिः। यानपात्रमहामानरुन्मेयान्यत्र तानि यत् ॥ ११४ नाम्नेव लवणाम्भोषिरित्युदन्वान्लघुकृतः । रत्नाकरोऽयमित्यूचर्बहुमेने तदा नृपः ॥ ११५ पतन्यत्र पतङ्गोऽपि तेजसा याति मन्दताम् । दिदीपे तत्र तेजोऽस्य प्रतीच्याञ्जयतो नपान् ॥११६ धारयश्चक्ररत्नस्य पारयः सङ्गरोदधेः । द्विषामुद्वैजयस्तीवं स तिग्मांशुरिवाद्युतत् ॥ ११७ अनुवाद्धितटं गत्वा सिन्धुद्वारे न्यवेशयत् । स्कंधावारं स लक्ष्मीवानक्षोभ्यं स्वमिवाशयम् ॥ ११८ भरताच्या सेनापतीने आपल्या विजयी सैन्याच्याद्वारे, चारी बाजूनी जलमार्ग व स्थलमार्ग रोकले व पर्वताच्या टेकड्यावर असलेल्या देशांच्या राजाना जिंकिले ॥ ११० ।। अनेक देश, मोठमोठी अरण्ये, नद्या, पर्वत या सर्वांना उल्लंघून त्या त्या ठिकाणी राजे लोकाना प्रभु भरताची आज्ञा सेनापतीने कळविली ॥ १११ ।। पूर्वी पूर्वदिशेकडील राजांना भरतेशाची आज्ञा सेनापतीने कळविली होती तशी आता त्याने अनुक्रमाने पश्चिमेकडच्या राजांनाही त्यांचे मानधन-अभिमानरूपी धन हरण करून ती प्रभूची आज्ञा शीघ्र कळविली ॥ ११२ ।। __ तीरावरील नद्यारूपी हात ज्याने अतिशय दूरपर्यन्त पसरले आहेत व नाना रत्नरूपी पूजाद्रव्ये ज्याने आपल्याजवळ घेतली आहेत असा समुद्र या भरतप्रभूचा त्यांनी जणु सत्कार केला आहे असा शोभला ।। ११३ ॥ समुद्राच्या श्रीमंतीची प्रशंसा करणाऱ्या लोकानी समुद्राजवळ सुपाने मोजण्याइतकी रत्ने आहेत असे म्हटले पण त्यामुळे समुद्र मोठा धनिक आहे असे मुळीच होत नाही पण या भरतेशाजवळ अनेक गाड्यांनी मोजता येतील इतकी रत्ने आहेत ॥ ११४ ॥ ___ या समुद्राला लवणसमुद्र हे नांव देऊन हलका बनविले आहे पण हा फार मोठा रत्नांचा साठा आहे असे समजून राजांनी त्यावेळी त्याचा मोठा आदर केला ।। ११५ ॥ ___ ज्या पश्चिमदिशेकडे जाणारा सूर्य देखिल तेजाने मंद होतो त्या पश्चिम दिशेतल्या राजांना जिंकणान्या या भरतप्रभूचे तेज अतिशय चमकू लागले ॥ ११६ ॥ चक्ररत्नाला ज्याने धारण केले आहे, जो युद्धरूपी समुद्राला तरून पलिकडे गेला आहे व शāना तीव्रपणाने ज्याने भययुक्त केले आहे असा तो चक्रीभरत तीक्ष्ण किरणांच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसू लागला ।। ११७ ॥ __ लक्ष्मीपति त्या भरतराजाने समुद्राच्या किना-यावर जाऊन कधीही न भिणारे अशा स्वतःच्या मनाप्रमाणे निर्भय अशा आपल्या सैन्याला सिन्धुनदीच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवले, तेथे सैन्याचा मुकाम झाला ।। ११८॥ Page #192 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०-१२६) महापुराण (१४१ सिन्धोस्तटवने रम्ये न्यविक्षन्तास्य सैनिकाः । चमूद्विरदसम्भोगनिकुब्जीभूतपादपे ॥ ११९ तत्राधिवासितानोङ्गः पुरश्चरणकर्मवित् । पुरोधा धर्मचक्रेशान्प्रपूज्य विधिवत्ततः ॥ १२० सिद्धशेषाक्षतैः पुण्यैर्गन्धोदकविमिश्रितैः । अभ्यनन्दत्सुयज्वा तं पुण्याशीभिश्च चक्रिणम् ॥१२१ ततोऽसौ धृतदिव्यास्त्रो रथमारुह्य पूर्ववत् । जगाहे लवणाम्भोधि गोष्पदावज्ञया प्रभुः ॥ १२२ प्रभासमजयत्तत्र प्रभासं व्यन्तराधिपम् । प्रभासमूहमर्कस्य स्वभासा तर्जयन्प्रभुः ॥ १२३ जयश्रीशफरीजालंमुक्ताजालं ततोऽमरात् । लेभे सान्तानिकी मालां हेममालां च चक्रभृत् ॥१२४ इति पुण्योदयाज्जिष्णुळजेष्टामरसत्तमान् । तस्मात्पुण्यधनं प्राज्ञाः शश्वदर्जयतोजितम् ॥ १२५ त्वङ्गत्तुङ्गतुरङ्गसाधनखुरक्षुण्णान्महीस्थण्डिलात् । उद्भूतैरथरेणभिर्जलनिधेः कालुष्यमापादयन् ॥ सिन्धुद्वारमुपेत्य तत्र विधिना जित्वा प्रभासामरम् । तस्मात्सारधनान्यवापदतुलश्रीरग्रणीश्चक्रिणाम् ॥ १२६ सैन्यातील हत्तींनी भक्षण केल्यामुळे ज्यातील झाडे खुजी झाली आहेत अशा सिन्धु नदीच्या तटावरील सुंदर वनात या भरतेशाचे सैन्य राहिले ।। ११९ ॥ ___ त्या ठिकाणी पूजेचा विधि जाणणारा अशा पुरोहिताने प्रथम चक्ररत्नाची स्थापना करून धर्मचक्राचे स्वामी अशा अहंत परमेष्ठींची विधिपूर्वक पूजा केली व नंतर पवित्र गंधोदकमिश्रित पवित्र सिद्धशेषाक्षता व पुण्यकारक आशीर्वादानी चक्रवर्ती भरताला त्याने आनंदित केले ॥ १२०-१२१ ॥ यानंतर ज्याने दिव्य अस्त्रे आपल्या हातात घेतली आहेत अशा भरतप्रभूने पूर्वीप्रमाणे रथात आरोहण केले व गायीच्या पावलासमान तुच्छ समजून लवणसमुद्रात प्रवेश केला ॥१२२॥ सूर्याच्या किरणसमूहाचा स्वतःच्या कान्तीने तिरस्कार करणाऱ्या भरतचक्रीने उत्कृष्ट कान्ति ज्याची आहे अशा प्रभासनामक व्यन्तराला जिंकले ।। १२३ ॥ यानंतर त्या प्रभासदेवापासून जयलक्ष्मीरूपी मत्सीला पकडण्यासाठी जणु जाळे अशा मोत्यांनी गुंफलेले जाळे व सन्तानक नामक कल्पवृक्षाच्या फुलांची माला व सुवर्णमाला या चक्रवर्तीला मिळाल्या ।। १२४ ।। ____ याप्रमाणे पुण्याच्या उदयामुळे जयशाली भरतेशाने श्रेष्ठ अशा देवांना जिंकले म्हणून हे विद्वज्जनहो तुम्ही उत्तम फल देण्याची शक्ति धारण करणारे पुण्यरूपी धन नेहमी मिळवा ॥ १२५ ॥ वारंवार उड्या मारणाऱ्या उंच घोड्यांच्या सैन्याच्या टापानी चूर्ण झालेल्या जमिनीपासून उडालेल्या धुराळयानी समुद्राला गढूळ करणारा, लक्ष्मीसंपन्न सर्व चक्रीमध्ये पहिला श्रेष्ठ असा भरतराजा सिन्धुद्वाराजवळ आला व त्याने तेथे असलेल्या प्रभासनामक व्यंतरदेवाला योग्य विधीने जिंकले व त्याच्यापासून सारधन उत्कृष्ट धनाची प्राप्ति करून घेतली ॥ १२६ ॥ Page #193 -------------------------------------------------------------------------- ________________ १८२) महापुराण (३०-१२७ लक्ष्म्यान्दोललतामिवोरसि दधत्सन्तानपुष्पस्त्रजम् । मुक्ताहेममयेन जालयुगलेनालङकृतोच्चस्तनः ॥ लक्ष्म्युद्वाहगृहादिवाप्रतिभयो निर्यानिषेरम्भसाम् । लक्ष्मीशो रुरुचे भशं नववरच्छायां परामुखहन् ॥ १२७ प्राच्यानाजलधेरपाच्यनृपतीना वैजयन्ताज्जयन् । निजित्यापरसिन्धुसीमघटितामाशां प्रतीचीमपि ॥ दिक्पालानिव पार्थिवान्प्रणमयनाकम्पयन्नाकिनो । दिकचक्रं विजितारिचक्रमकरोदित्थं स भूभृत्प्रभुः ॥ १२८ पुण्याच्चक्रधरधियं विजयिनीमैन्द्री च दिव्यश्रियम् । पुण्यात्तीर्थकरश्रियं च परमां नैःश्रेयसीं चाश्नुते ॥ पुण्यादित्यसुभृच्छियां चतसृणामाविर्भवेद्धाजनम् । तस्मात्पुण्यमुपार्जयन्तु सुधियः पुण्याज्जिनेन्द्रागमात् ॥ १२९ इत्या भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे पश्चिमार्णवद्वारविजयवर्णनं नाम त्रिशं पर्व ॥३०॥ लक्ष्मीची जणु झोका घेण्याची वेली अशी सन्तानक कल्पवृक्षाच्या पुष्पांची माला भरतेशाने आपल्या वक्षःस्थलावर धारण केली होती. तसेच मोत्यांनी गुंफलेले व सुवर्णमय अशा दोन जाळ्यांनी त्याचे उंच शरीर शोभत होते. लक्ष्मीचा पति असा हा चक्रवर्ती निर्भय होता. जणु लक्ष्मीच्या विवाहगृहाप्रमाणे असलेल्या समुद्रापासून बाहेर आलेला, नूतन वराची उत्कृष्ट शोभा धारण करणारा हा चक्रवर्ती फारच शोभू लागला ॥ १२७ ।। याप्रमाणे समुद्रापर्यन्त पूर्वदिशेचे राजे व वैजयन्तपर्वतापर्यन्त दक्षिणदिशेचे राजे व पश्चिमसमुद्राच्या सीमेपर्यन्त पश्चिम दिशेपर्यन्तचे राजे या सर्व राजाना भरतचक्रवर्तीने वश केले व त्या सर्व राजाना दिक्पालप्रमाणे नमस्कार करावयास लाविले व स्वर्गीयदेवांना देखिल कंपित केले. याप्रमाणे त्या सर्वराजांच्या स्वामीने-भरतेशाने सर्वदिशासमूहाला शत्रुसमूहाने रहित केले ।। १२८ ॥ पुण्यापासून सर्वावर विजय प्राप्त करून देणारी चक्रवर्तीची लक्ष्मी प्राप्त होते. आणि इन्द्राची दिव्यलक्ष्मी देखिल पुण्यापासून प्राप्त होते. या पुण्यापासूनच तीर्थकरलक्ष्मी प्राप्त होते व या पुण्यानेच परमकल्याणकारी मोक्षलक्ष्मीही प्राप्त होते. या पुण्यापासून प्राणी उपर्युक्त चार लक्ष्मीचे पात्र होतो म्हणून हे सुबुद्धिवंतांनो, तुम्ही जिनेन्द्र भगवंताच्या पवित्र आगमाचा आश्रय घेऊन त्याला अनुसरून पुणोपार्जन करा ।। १२९ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत त्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहाच्या भाषानुवादामध्ये पश्चिमसमुद्राच्या द्वाराच्या विजयवर्णनाचे तिसावे पर्व समाप्त झाले. Page #194 -------------------------------------------------------------------------- ________________ एकत्रिंशत्तमं पर्व कौबेरोमथ निर्जेतुमाशामभ्युद्यतो विभुः । प्रतस्थे वाजिभूयिष्ठः साधनः स्थगयन्दिशः॥१ पौरितर्गतमुत्साहैः सत्त्वं शिक्षां च लाघवः । जाति वपुर्गुणस्तज्ज्ञास्तदाश्वानां विजज्ञिरे ॥२ धौरितं गतिचातुर्यमुत्साहस्तु पराक्रमः । शिक्षाविनयसम्पत्तीरोमच्छायावपुर्गुणः ॥ ३ पुरोभागानिवात्यतुं पश्चाद्भागः कृतोद्यमाः । प्रययुर्वृतमध्वानमध्वनीनास्तुरङगमाः ॥ ४ खुरोद्भतान्महीरेणून्स्वाङगस्पर्शभयादिव । केचिद्वयतीयुरध्यध्वं महाश्वाः कृतविक्रमाः ॥५ छायात्मनः सहोत्थानं केचित्सोदुमिवाक्षमाः । खुरैरघट्टयन्वाहाः स तु सौक्षम्यान बाधितः ॥६ केचिनृत्तमिवातेनुमहीरङगे तुरङगमाः। क्रमैश्चङक्रमणारम्भे कृतमड्डुकवादनः ॥ ७ स्थिरप्रकृतिसत्त्वानामश्वानां चलताभवत् । प्रचलत्खुरसंक्षुण्णभुवां गतिषु केवलम् ॥८ --......................------------------ यानंतर कुबेराची दिशा जिंकण्यास अर्थात् उत्तरदिशा जिंकण्यास ( उत्तर दिशेचा स्वामी कुबेर असल्यामुळे तिला कौबेरी नांव आहे ) भरत उद्युक्त झाला व ज्यात घोडे पुष्कळ आहेत अशा आपल्या सैन्यानी सर्व दिशा व्यापून त्याने प्रयाण केले ॥१॥ ___ त्यावेळी अश्वहृदय नामक शास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वान् लोकानी धौरित नामक गतीवरून घोड्यांची चाल जाणली. उत्साहाने त्याची बलशक्ति जाणली. त्यांची स्फूर्ति पाहून त्यांना दिलेल्या शिक्षणाचे ज्ञान झाले व शरीराच्या गुणावरून त्यांच्या जातींचा निर्णय त्यांना झाला ॥२॥ गतीच्या चातुर्याला धौरित म्हणतात, त्यांच्या पराक्रमाला उत्साह म्हणतात, विनयाला शिक्षा आणि त्यांच्या केसांच्या कान्तीला शरीराचा गुण म्हणतात ॥ ३ ॥ याप्रमाणे वर्णिलेले ते घोडे जेव्हां रस्त्यावरून धावत सुटले तेव्हां त्यांच्या मागील भागांनी-अवयवांनी जणु पुढल्या भागाना उल्लंघण्याचा यत्न चालविला. अशा रीतीने ते घोडे आपल्या मार्गाला वेगाने उल्लंघू लागले ॥ ४ ॥ आपल्या टापांनी उडालेल्या जमीनीच्या धुराळयाचा आपल्या अंगाला स्पर्श होईल या भीतीने जणु कांही मोठे घोडे रस्ता उल्लंघून वेगाने पुढे जाऊ लागले ॥ ५ ॥ आपल्याबरोबर आपली सावली चालत आहे हे ज्यांना जणु सहन झाले नाही असे कित्येक घोडे त्या आपल्या सावलीला आपल्या टापानी जणु ताडन करीत आहेत असे होऊन पळू लागले पण ती सूक्ष्म असल्यामुळे तिला टापाच्या आघातानी ते बाधु शकले नाहीत ॥ ६॥ प्रयाण करण्याच्या आरंभी नगान्याच्या ध्वनीला अनुसरून अनेक घोडे चालण्याच्या अनेक गतीनी जणु ते या पृथ्वीरूपी रंगभूमीवर नृत्य करीत आहेत असे वाटले ॥ ७ ॥ ज्यांचा स्वभाव आणि बल स्थिर आहे परंतु ज्यांनी चालताना आपल्या खुरांनी जमीन खोदून चूर्ण केली आहे अशा घोड्यांची चंचलता फक्त चालण्यात होती. अन्यकार्यात ती नव्हती ॥ ८॥ Page #195 -------------------------------------------------------------------------- ________________ १८४) महापुराण कोटयोऽष्टादशास्य स्युजिनां वाथुरंहसाम् । आजानेयप्रधानानां योग्यानां चक्रवर्तिनः ॥९ रुद्धरोपोवना क्षुण्णतटभूसियन्त्यपः । सिन्धोः प्रतीपतां भेजे प्रयान्ती सा पताकिनी ॥ १० प्रभोरिवागमात्तुष्टा सिन्धुः सैन्याधिनायकान् । तरङगपवनैर्मन्दमासिषेवे सुखाहरः॥ ११ गङगावर्णनयोपेतां फेनाढयां सम्मुरवागताम् । तां पश्यन्नुत्तरामाशां जितां मेने निधीश्वरः॥१२ अनुसिन्धुतटं सैन्यैरुदीच्यान्साधयन्नृपान् । विजयार्धाचलोपान्तमाससाद शनैर्मनुः ॥ १३ स गिरिमणिनिर्माणनवकूटविशङ्कटः । ददृशे प्रभुणा दूराद्धृतार्घ इव राजतः ॥ १४ स शैलः पवनाधूतचलशाखाग्रबाहुभिः । दूरादभ्यागतं जिष्णुमाजुहावेव पादपैः ॥ १५ सोऽचलः शिखरोपान्तनिपतन्निराम्बुभिः । प्रभोरुपागमे पाद्यं संविधित्सुरिवाचकात् ॥ १६ स नगो नागपुन्नागपूगादिद्रुमसङकुल । रम्यैस्तटवनोद्देशैराह्वत्प्रभुमिवासितुम् ॥ १७ वायुप्रमाणे ज्यांचा वेग आहे, जे उत्तम जातीचे व योग्य आहेत असे घोडे या चक्रवर्तीजवळ अठरा कोटि होते ॥ ९॥ जिने तटावरील वने व्यापिली आहेत, जिने तटप्रान्त खोदला आहे, जिने तिचे पाणी कमी केले आहे अशी ती चाललेली चक्रवर्तीची सेना जणु सिन्धुनदीबरोबर वैर करीत आहे अशी वाटली ॥ १० ॥ जणु भरतप्रभूच्या आगमनाने सन्तुष्ट झालेल्या सिन्धुनदीने सुख देणान्या आपल्या तरङ्गाच्या वान्यांनी सेनेच्या मुख्य नायकांची हळूहळू सेवा केली ।। ११ ॥ गंगानदीच्या वर्णनाप्रमाणे असलेली, फेसानी भरलेली व आपल्या समोर आलेली अशा त्या सिन्धु नदीला पाहून निधिस्वामी भरताने उत्तरदिशा मी जिंकली असे मानले ।। १२॥ सिन्धुतटाला अनुसरून राहणाऱ्या उत्तरदिशेच्या अनेक राजांना आपल्या सैन्याच्याद्वारे वश करणान्या भरतमनूने विजयापर्वताजवळ हळूहळू प्रवेश केला ॥ १३ ॥ रत्नखचित अशा नऊ शिखरानी विस्तृत दिसणारा तो चांदीचा विजयापर्वत जणु ज्याने अर्घ धारण केले आहेत अशा भरतेशाकडून पाहिला गेला ।। १४ ।। वायने हाललेले शाखांचे अग्र हेच कोणी बाहु ज्याचे आहेत अशा वृक्षानी तो पर्वत विजयशाली व दूरून आलेला जणु पाहुणा अशा भरतप्रभूला बोलावित आहे असा दिसला ॥ १५ ॥ शिखरांच्याजवळ पडणाऱ्या झन्यांच्या पाण्यांनी तो पर्वत प्रभु जवळ आले असतां त्यांना पाय धुण्यास पाणी देण्याकरितां जणु उभा राहिला आहे असा शोभला ॥ १६ ।। तो पर्वत नागवृक्ष, नागकेसर, सुपारी आदिक वृक्षांनी रमणीय दिसणारे जे तटवनाचे प्रदेश त्यांनी प्रभु भरताला येथे बसा म्हणून जणु बोलावित आहे असा शोभू लागला ॥ १७ ॥ Page #196 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-२५) महापुराण (१८५ रजो वितानयन्पौष्पं पवनैः परितो वनम्। सोऽभ्युत्तिष्ठन्निवास्यासीत्कूजत्कोकिलडिण्डिमः ॥१८ फिमत्र बहुना सोऽद्रिविभुं दिग्विजयोद्यतम् । प्रत्यच्छदिव सम्प्रीत्या सत्काराङगैरतिस्फुटः॥१९ विभक्ततोरणामुच्चैरतीत्य वनवेदिकाम् । नियन्त्रितं बलाध्यक्षजगाहेऽन्तर्वणं बलम् ।। २० वनोपान्तभुवः सैन्यैरारुद्धा रुद्धदिङमुखैः । उड्डीनविहगप्राणा निरुच्छ्वासास्तदाभवन् ॥ २१ अभूतपूर्वमुद्भूतप्रतिध्वानं बलध्वनिम् । श्रुत्वा बलवदुत्त्रेसुस्तिर्यञ्चो वनगोचराः ॥ २२ बलक्षोभादिभो निर्यन्वलक्षोऽभावनान्तरात् । सुरेभः सुविभक्ताङगः सुरेभ इव वर्मणा ॥२३ प्रबोधजम्भणावास्यं व्याददौ किल केसरी। न मेऽस्त्यन्त यं किञ्चत्पश्यतेतीव दर्शयन् ॥ २४ शरभो रभसादूर्ध्वमुत्पत्योत्तानितः पतन् । सुस्थ एव पदः पृष्ठभेरभूनिर्मातकोशलात् ॥ २५ वाऱ्याने वनाच्या सर्व बाजूनी जणु पुष्पांच्या परागांचे छत निर्माण करणारा व कुहु, कुहु शब्द करणारे कोकिलरूपी नगारे ज्याचे वाजत आहेत असा तो पर्वत प्रभूचा सत्कार करण्यासाठी उठून उभा राहिल्याप्रमाणे दिसत आहे ॥ १८ ॥ याविषयी अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. तो पर्वत दिग्विजयासाठी उद्युक्त झालेल्या त्या भरतप्रभूच्या सत्कारासाठी सर्व सामग्री घेऊन अतिशय प्रेमाने सामोरे आला आहे असा जणु दिसत होता ॥ १९ ॥ जिच्यावर चारी बाजूनी तोरणे बांधली आहेत अशा उंच वनाच्या वेदीला उल्लंघणारे व सेनापतीनी ज्याचे नियंत्रण केले आहे असे ते सैन्य वनाच्या आतील प्रदेशात घुसले ॥ २० ॥ ज्यानी सर्व दिशा व्यापल्या आहेत अशा सैन्यानी दाट भरल्यामुळे ज्याचे पक्षीरूप प्राण वर उडून गेले आहेत अशा त्या वनभूमि त्यावेळी श्वास कोण्डल्याप्रमाणे झाल्या ॥ २१ ।। ज्याचा प्रतिध्वनि होत आहे असा सैन्याचा ध्वनि जो कधी पूर्वी ऐकला नव्हता तो ऐकून त्या वनात फिरणारे पशु व पक्षी अत्यन्त भ्याले ॥ २२ ॥ सैन्याच्या मोठ्या ध्वनीमुळे त्या वनातून देवाच्या हत्तीप्रमाणे मोठा व ज्याचे सर्व अवयव व्यक्त दिसत आहेत व जो गर्जना, करीत आहे असा शुभ्र हत्ती बाहेर पडून शोभू लागला ॥ २३ ॥ माझ्या मनात काहीही भय नाही. कोणाला पाहावयाचे असेल तर त्याने पाहावे अशा विचाराने जणु कोणी सिंह जागा होऊन त्याने आपले तोंड आ करून उघडले होते ॥ २४ ॥ एक अष्टापद प्राणी वेगाने वर उडून उताणा होऊन खाली पडत असता त्याच्या उत्पत्तीस कारण असलेल्या नामकर्माच्या कौशल्यामुळे पाठीवर असलेल्या पायानी पुनः चांगल्या रीतीने उभा राहिला ॥ २५ ॥ म.२४ Page #197 -------------------------------------------------------------------------- ________________ १८६) महापुराण (३१-२६ विषाणोल्लिखितस्कन्धो रुषिताताम्रितेक्षणः । खुरोत्खातावनिः सैन्यैर्ददृशे महिषो विभीः ॥२६ चमूरवश्रवोद्भूतसाध्वसाः क्षुद्रका मृगाः । विजयार्षगुहोत्सङ्गान्युगक्षय इवाश्रयन् ॥ २७ अनुद्रुता मृगाः शावैः पलायाञ्चक्रिरेऽभितः। वित्रस्ता वेपमानाङगाः सिक्ता भयरसैरिव ॥२८ वराहाररति मुक्त्वा वराहा मुक्तपल्वलाः । विनेशविस्फटाथाश्चमूक्षोभादितोऽमुतः ॥ २९ वरणावरणास्तस्थुः करिणोऽन्ये भयद्रुताः । हरिणा हरिणारातिगहान्तानधिशिश्यिरे ॥३० इति सत्वा वनस्येव प्राणाः प्रचलिता भृशम् । प्रत्यापत्ति चिरादीयुः सैन्यक्षोभे प्रसेदुषि ॥३१ प्रयायानुवनं किञ्चिदन्तरं तदनन्तरम् । रौप्याद्रेमध्यमं कुटं सन्निकृष्य स्थितं बलम् ॥ ३२ ततस्तस्मिन्वने मन्दमरुतान्दोलितद्रुमे । नृपाज्ञया बलाध्यक्षाः स्कन्धावारं न्यवेशयन् ॥ ३३ आपल्या शिंगानी झाडाच्या फांदीला घासणारा, क्रोधाने ज्याचे डोळे लालबुंद झाले आहेत, ज्याने आपल्या खुरानी भूमि खोदली आहे व जो निर्भय आहे असा जंगली रेडा सैन्यानी पाहिला ॥ २६ ॥ सैन्याच्या मोठ्या कोलाहलाला ऐकून जे भ्याले असे क्षुद्र हरिण वगैरे प्राणी युग क्षयाच्यावेळी प्रलयकोलाचे वेळेप्रमाणे विजया पर्वताच्या गुहांच्या मध्यभागात घुसून बसले. तात्पर्य-प्रलयकालाचे वेळी जीव जसे विजयार्धपर्वताच्या गुहांचा आश्रय घेतात तसे यावेळी देखिल अनेक प्राण्यानी सैन्याचा शब्द ऐकून भीतीने त्याच्या गुहांचा आश्रय घेतला ॥ २७ ॥ __हरिणाप्रमाणे त्यांची पिलेही त्यांच्या पाठीमागे चोहोबाजूनी पळू लागली. ती घाबरली होती. त्यांची अंगे थरथर कापत होती व ती जणु भयाच्या रसानी न्हाली होती ।। २८ ॥ सैन्याच्या मोठ्या कोलाहलाला ऐकून रानटी डुकरानी आपल्या उत्तम आहारावरचे प्रेम त्यागले व डबक्यातले लोळणे त्यानी त्यागिले व आपल्या कळपातून ती फुटून वेगळी झाली आणि इकडून तिकडून पळत सुटली ॥ २९ ॥ कांही अन्य हत्ती भयाने पळून विशिष्ट झाडानी आच्छादित होऊन उभे राहिले होते व हरिण भयाने पळून हरिणांचे शत्रु असे जे सिंह त्यांच्या गुहांच्या आत जाऊन उभे राहिले ॥३०॥ याप्रमाणे वनाचे जणु प्राण असे ते चंचल प्राणी जेव्हा सेनेचा क्षोभ बरेच वेळानंतर शान्त झाला तेव्हा पुनः आपल्या पूर्वस्थळी आले ॥ ३१ ॥ यानंतर त्याच वनात ते सैन्य कांही अन्तर चालून गेले व विजयार्धपर्वताच्या मध्य शिखराच्या म्हणजे पाचव्या कूटाच्या जवळ त्याने आपला तळ दिला ॥ ३२ ॥ यानंतर भरतेशाच्या आज्ञेने मन्दवाऱ्याने जेथे वृक्ष हलत आहेत अशा त्या वनात सेनापतीनी सैन्याची स्थाने डेरे तंबू हे लावले. अर्थात् सेना तेथे राहिली ॥ ३३ ॥ Page #198 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-४२) महापुराण (१८७ स्वरं जगहुरावासान्सैनिकाः सानुमत्तटे । स्वयं गलत्प्रसूनौघघनशाखिघने वने ॥ ३४ सरस्तीरतरूपान्तलतामण्डपगोचराः । रम्या बभूवुरावासाः सैनिकानामयत्नतः ॥ ३५ वनप्रवेशमुन्मुग्धाः प्राहुर्वैराग्यकारणम् । तत्प्रवेशो यतस्तेषामभवद्रागवृद्धये ॥ ३६ । अथ तत्र कृतावासं ज्ञात्वा सनियमं प्रभुम् । अगान्मागधवद्रष्टुं विजयार्धाधिपः सुरः ॥ ३७ तिरीटशिखरीदनो लम्बप्रालम्बनिर्झरः । स भास्वत्कटको रेजे राजताद्रिरिवापरः ॥ ३८ सितांशुकधरः त्रग्वी हरिचन्दनचचितः । स बभौ धृतरत्ना? निधिः शङ्ख इवोच्छितः ॥ ३९ ससम्भ्रमं समभ्येत्य प्रबतामगमत्प्रभोः । ससत्कारं च तं चक्री भद्रासनमलम्भयत् ॥ ४० गोपायिताहमस्याद्रेमध्यमं कूटमावसन् । स्वैरचारी चिरादद्य स्वयास्मि परवान्विभो ॥ ४१ विद्धि मां विजया ख्यममुं च गिरिभूजितम् । अन्योऽन्यसंश्रयादावामलकघ्यावचलस्थिती ॥४२ त्या पर्वताच्या तटावर जेथे आपोआप गळणाऱ्या पुष्पांच्या समूहांनी युक्त असे दाट वृक्ष आहेत अशा ठिकाणी स्वच्छंदाने सैनिक राहू लागले ॥ ३४ ॥ सरोवराच्या तीरावर असलेल्या वृक्षांचे जवळ लतामण्डप होते व ते आयासावाचून सैनिकांची रम्य निवासस्थाने बनली ॥ ३५ ॥ __वनात प्रवेश करणे हे वैराग्याचे कारण आहे असे मूर्ख लोक म्हणतात. पण त्या वनात भरतप्रभु काही नियम धारण करून बसले आहेत असे जाणून त्याना पाहण्यासाठी विजयार्धपतिदेव मगध देवाप्रमाणे पाहावयास आला. त्यावेळी तो देव जणु दुसरा विजया पर्वत आहे असा शोभला. कारण विजयाध पर्वत शिखरानी उंच आहे व त्याप्रमाणे हा देवही मुकुटरूपी उंच शिखराने युक्त होता. तो पर्वत लांबलचक वाहणाऱ्या झऱ्यानी युक्त होता व हा देवही लांब जें हाराचें तेज ते जणु ज्याचे झरे आहेत असा दिसत होता. विजयापर्वत प्रकाशमान अशा कड्यानी शोभत होता व तो देवही चमकणान्या हातातील कड्याच्या अलंकारानी शोभत होता ।। ३६-३८ ।। ज्याने शुभ्र वस्त्र धारण केले आहे, ज्याने गळयात माला धारण केली आहे, ज्याने आपल्या अंगाला चन्दनाची उटी लाविली आहे व आपल्या हातात ज्याने रत्नांचा अर्घ्य धारण केला आहे, असा तो देव उंच उभा राहिलेल्या शंख नामक निधीप्रमाणे दिसत होता ॥ ३९ ॥ तो देव त्वरेने येऊन या भरतेशाच्या चरणी नम्र झाला. त्यावेळी चक्रवर्तीने त्याचा सत्कार केला आणि त्याला उत्तम आसन बसावयास दिले ॥ ४० ॥ __तो म्हणाला हे प्रभो, मी या पर्वताच्या मध्यम शिखरावर राहत असतो आणि मी याचा रक्षक आहे. मी दीर्घकालापासून स्वतंत्र होतो पण आज मी आपल्या अधीन झालो आहे ॥४१॥ माझे नांव विजयार्द्ध आहे व या उन्नत पर्वताचेही तेच नांव आहे असे आपण समजा व आम्ही दोघे एकमेकांच्या आश्रयाने अलङघ्य आहोत व आम्ही निश्चल स्थितीचे आहोत ॥४२॥ Page #199 -------------------------------------------------------------------------- ________________ १८८) महापुराण (३१-४३ देव, विग्विजयस्याद्धं विभजन्नेष सानुमान् । विजया स्थिति धत्ते तात्स्थ्यात्तबूढयो वयम् ॥४३ आयुष्मन् युष्मदीयाज्ञां मूर्ना स्रजमिवोद्रहन् । पदातिनिविशेषोऽस्मि विज्ञाप्यं किमतः परम् ॥४४ इति ब्रुवंस्तथोत्थाय शिवस्तीर्थाम्बुभिः प्रभुम् । सोऽभ्यषिञ्चत्सुरः सार्द्ध स्वं नियोगं निवेदयन् ॥ ४५ तदा प्रणेदुरामन्द्रमानकाः पथि वार्मुचाम् । विचेरुर्मरुतो मन्दमाधूतवनवीथयः ॥ ४६ ननृतुः सुरनर्तक्यः सलीलार्तितभ्रवः। जगुश्च मङ्गलान्यस्य जयशंसोनि किन्नराः ॥ ४७ कृताभिषेकमेनं च शुभ्रनेपथ्यधारिणाम् । युयोज रत्नलाभेन लम्भयन्स जयाशिषः॥ ४८ स तस्मै रत्नभृङ्गारं सितमातपवारणम् । प्रकीर्णकयुगं दिव्यं ददौ च हरिविष्टरम् ॥ ४९ इति प्रसाधितस्तेन वचोभिः सानुवर्तनः । प्रसादतरलां दृष्टि तत्र व्यापारयत्प्रभुः ।। ५० विजितश्च सानुशं प्रभुणा कृतसक्रियः । भृत्यत्वं प्रतिपाद्यास्य स्वमोकः प्रत्यगात्सुरः॥५१ विजयाः जिते कृत्स्नं जितं दक्षिणभारतम् । मन्वानो निधिराट्तच्च चक्ररत्नमपूजयत् ॥ ५२ हे देवा, हा पर्वत दिग्विजयाचा अर्धा विभाग करीत असल्यामुळे विजयाध नाव धारण करीत आहे व मी या पर्वतावरच राहत असल्यामुळे मीही त्याच नावाचा धारक आहे ॥४३॥ हे आयुष्यवंता, मी आपली आज्ञा मस्तकाने मालेप्रमाणे धारण करीत आहे व मी पादचारी सैनिकाप्रमाणे आहे. यापेक्षा मी अधिक काय सांगू ? ॥ ४४ ॥ याप्रमाणे बोलून तो उठला व त्याने कल्याण करणाऱ्या तीर्थजलानी सर्व देवाना बरोबर घेऊन चक्रवर्तीचा अभिषेक केला व दिग्विजय करणाऱ्या चक्रवर्तीचा अभिषेक करणे हे माझे काम व ते मी पार पाडले आहे असे त्याने चक्रवर्तीला कळविले ॥ ४५ ॥ __ त्यावेळी आकाशांत गंभीरपणाने नगारे वाजू लागले व वनपंक्तीना मन्दमन्द कंपित करीत वारे वाहू लागले. भुवया लीलेने वर उडवीत नर्तकी नाचू लागल्या व किन्नरदेव जयसूचक मंगलश्लोक गाऊ लागले ॥ ४६-४७ ।। ज्याचा अभिषेक केला गेला आहे व ज्याने शुभ्र वस्त्र धारण केली आहेत अशा भरतप्रभूला जयलाभाचे आशीर्वाद विजयार्धदेवाने दिले व अनेकरत्नांचा नजराणा दिला ॥४८॥ ___ या विजयार्धदेवाने भरतप्रभूला रत्नाची झारी, शुभ्र छत्र, दोन दिव्यचवऱ्या व सिंहासन हे नजराणा म्हणून दिले ॥ ४९ ॥ विनययुक्त भाषणानी त्याने चक्रवर्तीला गौरविले. त्यावेळी भरतप्रभूने सन्तुष्ट होऊन त्याच्याकडे प्रसादयुक्त चंचल दृष्टीने पाहिले ॥ ५० ॥ भरतप्रभूने त्याचा सत्कार करून त्याला जाण्याची परवानगी दिली. त्या देवाने मी आपला दास आहे असे कबूल केले व तो आपल्या घराकडे गेला ॥ ५१ ।। _ विजया पर्वत जिंकला म्हणजे सर्व दक्षिणभारत जिंकला असे मानणाऱ्या निधिपति भरताने त्यावेळी चक्ररत्नाची पूजा केली ॥ ५२ ।। Page #200 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-६१) महापुराण (१८९ गन्धैः पुष्पैश्च धूपैश्च दीपश्च सजलाक्षतैः । फलश्च चरुभिदिव्यश्चक्रेज्यां निरवर्तयत् ॥ ५३ विजयाद्धजयेऽप्यासीदमन्दोऽस्य जयोद्यमः । उत्तरार्द्धजयाशंसां प्रत्यागर्णस्य चक्रिणः ॥ ५४ ततः प्रतीपमागत्य रौप्याद्रः पश्चिमां गहाम् । निकषा वनमारुध्य बलैरीशो न्यविक्षत ॥ ५५ दक्षिणेन तमद्रीन्द्रं मध्ये वेदिकयोर्द्वयोः । बलं निविविशे भर्तुः सिन्धोस्तटवनावहिः॥ ५६ भूयो द्रष्टव्यमत्रास्ति बह्वाश्चर्ये धराधरे । इति तत्र चिरावासं बहु मेने किलाधिराट् ॥ ५७ चिरासनेऽपि तत्रास्य नासीत्स्वल्पोऽप्युपक्षयः । प्रत्युतापूर्वलाभेन प्रभुरापूर्यताब्धिवत् ॥ ५८ कृतासनं च तत्रनं श्रुत्वा द्रष्टुमुपागमन् । पार्थिवाः पृथिवीमध्यान्मध्ये नद्योर्द्वयोः स्थिताः ॥५९ दूरानतचलन्मौलिसन्दष्टकरकुडमलाः । प्रणमन्तः स्फुचटीक्रुः प्रभौ भक्ति महीभुजः ॥ ६० कुङकुमागरुकर्पूरसुवर्णमणिमौक्तिकः । रत्नैरन्यैश्च रत्नेशं भक्त्यानचुनूपाः परम् ॥ ६१ चन्दनादिक गन्ध, फुले, धूप, दीप, जलासहित अक्षता, फले व नैवेद्य हे सर्व पदार्थ दिव्य होते. यानी भरतेशाने चक्राची पूजा केली ।। ५३ ॥ विजयाई पर्वताला भरतपतीने जरी जिंकले होते तथापि उत्तरार्द्धाला जिंकण्याची आशा भरतेशाच्या मनात होती म्हणून त्याला जिंकण्याचा त्याचा प्रयत्न शिथिल मंद झाला नव्हता. तो त्याने खूप जोराने चालू केला ॥ ५४ ॥ यानंतर त्या भरतेशाने त्या पर्वताच्या कांही पाठीमागे वळून त्या पर्वताच्या पश्चिम गुहेच्या जवळ वनाला वेढून आपल्या सैन्यासह मुक्काम केला ॥ ५५ ॥ त्या पर्वताच्या दक्षिणेकडे पर्वत आणि वन यांच्या दोन वेदिकांच्यामध्ये सिन्धु नदीच्या तटावरील वनाच्या बाहेर या भरतेशाचे सैन्य राहिले ॥ ५६ ॥ हा पर्वत अनेक आश्चर्याचे स्थान आहे. येथे पाहण्यास योग्य वस्तु पुष्कळ आहेत. म्हणून येथे आपण पुष्कळ दिवस मुक्काम करावा असे भरतेशाने ठरविले ॥ ५७ ॥ येथे जरी पुष्कळ दिवस भरतप्रभूने मुक्काम केला होता तथापि त्याला थोडाही खर्च सहन करावा लागला नाही. परन्तु समुद्राप्रमाणे अपूर्वलाभाने प्रभु भरत उत्तरोत्तर पुष्टच झाला ।। ५८॥ या पर्वतावरच भरतमहाराज पुष्कळ दिवसापासून राहिले आहेत असे कळल्यामुळे राजे पृथ्वीच्या मध्यप्रदेशामधून काही आले व काही दोन नद्यांच्यामध्ये प्रदेशात जे राहत होते ते सर्व राजे भरतेशाला पाहण्यासाठी आले ॥ ५९ ॥ दूरून नम्र झालेल्या व हलणाऱ्या किरीटावर ज्यानी आपल्या करकमलाच्या कळया स्थापन केल्या होत्या अशा राजानी प्रभु भरतेशाला नमस्कार करीत आपली त्याच्या विषयाची भक्ति स्पष्ट केली ॥ ६ ॥ केशर, अगरू-चन्दन, कापूर, सोने, रत्ने, मोती व आणखी अनेक प्रकारची रत्ने यानी त्या राजानी अतिशय भक्तीने चौदा रत्नाचा अधिपति अशा भरतराजाचा सत्कार केला ॥६१॥ Page #201 -------------------------------------------------------------------------- ________________ १९०) महापुराण (३१-६२ विष्वगापूर्यमाणस्य रैराशिभिरनारतम् । कोशप्रावेश्यरत्नानामियत्तां कोऽस्य निर्णयेत् ॥ ६२ देशाध्यक्षा बलाध्यक्षवलं सुकृतरक्षणम् । यवसेन्धनसन्धानस्तदोपजगहुश्चिरम् ॥ ६३ उत्तरार्षजयोद्योगं प्रभोः श्रुत्वा तदागमन् । पार्थिवाः कुरुराजाद्याः समग्रबलवाहनाः ॥ ६४ आहूताः केचिदाजग्मुः प्रभुणा मण्डलाधिपाः । अनाहूताश्च सम्भजुर्विभुं चारभटाः परे ॥ ६५ विदेशः किल यातव्यो जेतव्या म्लेच्छभूभुजः। इति सञ्चिन्त्य सामन्तः प्रायः सज्जं धनुर्बलम्॥६६ धन्विनः शरनाराचसम्भृते युधि बन्धनः । न्यवेदयन्निवात्मानमणदासमधीशिनाम् ॥ ६७ ।। धनुर्धरा धनुः सज्जमास्फाल्याचकृषुः परे । चिकीर्षव इवारीणां जीवाकर्ष सहुअकृताः ॥ ६८ करबालान्करे कृत्वा तुलयन्ति स्म केचन । स्वामिसत्कारभारेण नूनं तान् प्रमिमित्सवः ॥ ६९ सर्व बाजूनी धनराशीनी जो नेहमी भरला जात आहे, अशा या भरतराजाच्या खजिन्याच्या घरात ज्याचा प्रवेश झाला आहे अशा रत्नांच्या संख्येचा कोण बरे निर्णय करू शकेल ? कोणासही त्याचा निर्णय करता येणार नाही ।। ६२ ॥ त्यावेळी जवळच्या देशाच्या राजानी ज्याचे सेनापतीकडून चांगले रक्षण केले गेले आहे अशा सैन्याचे गवत, लाकडे, भाजीपाला इत्यादिकानी दीर्घकालपर्यंत चांगले पोषण केले ॥ ६३ ॥ भरतक्षेत्राच्या उत्तर भागाला जिंकण्याचा उद्योग भरतराजाकडून केला जात आहे हे कुरुराज जयकुमार वगैरे राजानी ऐकले तेव्हा ते संपूर्ण सैन्य व अनेक प्रकारच्या वाहनाना घेऊन भरतराजाकडे आले ॥ ६४ ॥ . प्रभु भरताकडून बोलावले गेलेले कित्येक देशाचे राजे त्यावेळी आले व कित्येक उत्तम योद्धे न बोलावताही प्रभुकडे आले ॥ ६५ ॥ आता विदेशावर स्वारी करण्याकरिता जावयाचे आहे व म्लेच्छ राजांना जिंकावयाचे आहे असा विचार करून माण्डलिक राजानी धनुष्य धारण करणाऱ्या सैन्याचा खूप संग्रह केला ॥६६॥ ते धनुर्धारी वीर शर-नाराच-लहानमोठे असे जे तीक्ष्ण बाण त्यानी व्याप्त अशा युद्धात आपण आपल्या मालकाचे ऋणी नोकर आहोत जणु असे चिलखत वगैरेच्या बंधनानी दर्शवू लागले ॥ ६७ ॥ हुंकार शब्द करून कांही धनुष्य धारण करणारे वीर शत्रूच्या जीवाचे जणु आकर्षण करण्याची इच्छा करीत आहेत असे होऊन दोरी लावून आपले धनुष्य टणत्कार करून ओढू लागले ॥ ६८ ॥ कित्येक वीर तरवारी हातात घेऊन त्या तोलू लागले. आपल्या मालकाने केलेल्या सत्काराच्या वजनाशी आपल्या तलवारीची बरोबरी होते काय हे ते जणु पाहात आहेत असे तेव्हां दिसले ॥ ६९॥ Page #202 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-७६) महापुराण (१९१ संमिता भृशं रेज़र्भटाः प्रोल्लासितासयः । निर्मोकरिव विश्लिष्टर्ललज्जिह्वा महाहयः ॥७०. साटोपं स्फुटिताः केचिद्वल्गन्तिस्माभितो भटाः । अस्युद्यताः पुरोऽरातीन्पश्यन्त इव सम्मुखम् ॥ ७१ अस्त्रय॑स्त्रश्च शस्त्रश्च शिरस्त्रैः सतन्त्रकैः । दधुर्जयनशालानां लीलां रथ्याः सुसम्भृताः ॥ ७२ रथिनो रथकड्यासु गुरुरायुधसम्पदः । समारोप्यापि पत्तिभ्यो भेजुरेवातिगौरवम् ॥ ७३ हस्तिनां पदरक्षाय सुभटा योजिता नृपः । राजन्यः सहयुध्वानः कृप्ताश्चाभिनिपादिनः ॥७४ प्रवीरा राजयुध्वानः क्लुप्ताः पत्तिषु नायकाः । आश्वीये च ससन्नाहाः सोत्तरङ्गास्तुरङगिणः ॥७५ आरचय्य बलान्येके स्वानीक्षां चक्रिरे नपाः । दण्डमण्डलभोगासंहृतव्यूहैः सुयोजितैः ॥ ७६ ज्यानी आपल्या अंगात चिलखत घातले आहे व आपल्या चमकणाऱ्या तरवारी ज्यानी हातात घेतल्या आहेत असे काही वीर ज्यांची कात शिथिल झाली आहे व ज्यांच्या जिभा वारंवार बाहेर फिरत आहेत अशा महासप्रिमाणे दिसले ॥ ७० ॥ __ कांही योद्धयानी अभिमानाने आपले दंड ठोकले व ते इकडे तिकडे ऐटीने चालू लागले व आपल्यापुढे समोर जणु आपण आपल्या शत्रूना पाहात आहोत असे त्याना वाटले व त्यानी आपल्या तलवारी भ्यानातून वर काढल्या ।। ७१ ।। आग्नेयबाण आदिक अस्त्रे, काठी लाठी वगैरे व्यस्त्रे, तरवार, जंबिया आदिक शस्त्रे व चिलखतानी सहित अशी शिरस्त्राणे इत्यादिकानी भरलेले सैन्य जेथून चालत आहे. असे रस्ते शस्त्रशालांच्या शोभेला धारण करू लागले ॥ ७२ ॥ ___ अतिशय वजनदार आयुधसंपत्ति आपल्या रथसमूहात ज्यानी ठेविली आहे असे रथात बसलेले वीर पायदळ सैन्यापेक्षा अधिक गौरवाला वजनदार पणाला पावले. अर्थात् रथिक वीरानी शस्त्रादिकाचे ओझे रथात ठेवले होते पण पायदळ सैन्याने ते आपल्या अंगावर धारण केले होते तथापि रथिकापेक्षा ही पायदळ अधिक वजनदार झाले नाही. अर्थात् पायदलापेक्षा रथिकाची योग्यता अधिक आहे. असे समजावे ।। ७३ ॥ हत्तीच्या पायांचे रक्षण करण्याकरिता राजानी सुभटाची-वीराची योजना केली होती. ते शत्रूशी युद्ध करीत असलेल्या त्या वीराना नंतर महात बनविले. महात पडल्यानंतर त्याच्या जागी त्या वीराची योजना केली अर्थात् महाताच्या कामातही ते चतुर असल्यामुळे ते त्याकामी योजिले गेले ॥ ७४ ॥ राजाबरोबर युद्ध करणारे असे वीरपुरुष ते पायदळावरचे अधिकारी म्हणून नेमले गेले आणि जे घोडेस्वार ज्यानी कवच धारण केले होते व जे तरङ्गयुक्त नदीप्रमाणे होते त्याना घोडेस्वारांचा सेनापति बनविले होते ॥ ७५ ॥ दंडव्यूह- ओळीने सैन्य उभे करणे, मण्डलव्यूह- गोलाकाराने सैन्याला उभे करणे, भोगव्यूह- अर्धगोलाकाराने सैन्य उभे करणे, असंहृतव्यूह- पसरून सैन्याला उभे करणे याप्रमाणे आपल्या सैन्याची रचना करून राजे आपल्या सैन्याना पाहात होते ॥ ७६ ॥ Page #203 -------------------------------------------------------------------------- ________________ १९२) चक्रिणोऽवसरः कोऽस्य योऽस्माभिः साध्यतेऽल्पकैः । भक्तिरेषा तु नः काले प्रभोर्यदनुसर्पणम् ॥ ७७प्रभोरवसरः सार्यः प्रसायं नो यशोधनम् । विरोधि बलमुत्सायं सन्धायं पुरुषव्रतम् ॥ ७८ द्रष्टव्या विविधा देशा लब्धव्याश्च जयाशिषः । इत्युदाचक्रिरेऽन्योन्यं भटाः श्लाघ्यंरुदाहृतः ॥ ७९. गिरिदुर्गोऽयमुल्लङ्घ्यो महत्यः सरितोऽन्तरा । इत्यपायेक्षिणः केचिदयानं बहुमेनिरे ॥ ८० इति नानाविधैर्भावैः सञ्जत्पश्च लघुत्थिताः । प्रस्थिताः सैनिकाः प्रापन्सेश्वराः शिबिरं प्रभोः ॥ ८१ प्रचेलुः सर्वसामग्र्या भूपाः सम्भूतकोष्ठिकाः । प्रभोश्चिरं जयोद्योगमाकलय्या हिमाचलम् ॥ ८२ भट्टेल कुटिकैः कैश्चिद्धता लालाटिकैः परैः । नृपाः पश्चात्कृतानीका विभोनिकटमाययुः ॥ ८३ समन्तादिति सामन्तैरापतद्भिः ससाधनः । समिद्धशासनश्चक्री समेत्य जयकारितः ॥ ८४ महापुराण ( ३१-७७ या चक्रवर्ती भरतराजाचे असे कोणते कार्य आहे की ज्याचे आम्हा क्षुद्र लोकाना स्मरण होईल. अर्थात् या चक्रवर्तीचे कार्य आमच्याकडून केले जाणे शक्यच नाही पण त्याचे आम्ही स्मरणही करू शकणार नाही. तरी देखिल आम्ही याच्या पाठीमागून जात आहोत याला कारण आमच्या मनात चक्रवर्तीविषयी भक्ति आहे. श्रद्धा आहे म्हणून आम्ही त्याला अनुसरत आहोत ॥ ७७ ॥ आम्ही प्रभूचे कार्य सिद्ध केले पाहिजे व आम्ही आपले यशरूपी धन चोहोकडे पसरले पाहिजे, शत्रूचे सैन्य दूर हटविले पाहिजे आणि पुरुषार्थ धारण केला पाहिजे ॥ ७८ ॥ अनेक देश पाहावेत व विजयाचे अनेक आशीर्वाद मिळविले पाहिजेत. याप्रमाणे प्रशंसनीय उदाहरणे देऊन योद्धे एकमेकाशी गोष्टी करीत होते ॥ ७९ ॥ हा चढण्याला अतिशय कठिण पर्वत उल्लंघून जावे लागेल व मध्येच अनेक मोठ्या नद्या आहेत. त्या पार कराव्या लागतील. याप्रमाणे अनेक विघ्ने व बाधा उत्पन्न होतील म्हणून पुढे न जाणेच बरे आहे. असे कित्येकानी मानले होते ॥ ८० ॥ याप्रमाणे अनेक प्रकारच्या विचारानी व नानाप्रकारच्या उत्तम भाषणानी शीघ्र उठलेल्या लोकानी, सैनिकानी प्रस्थान केले व आपल्या स्वामीसह चकवर्तीच्या शिबिरामध्ये प्रवेश केला ।। ८१ ॥ त्यावेळी भरतेश्वराचा हिमवान् पर्वतापर्यन्त दिग्विजय करण्याचा उद्योग पुष्कळ वेळानी पार पडेल असे समजून राजे लोकानी धान्यानी आपले कोठे सर्व प्रकारच्या सामग्रीने भरले व ते निघाले ॥ ८२ ॥ ज्यांच्या हातात काठ्या आहेत अशा योध्याबरोबर व ललाटाना - कपाळाना पाहणाऱ्या उत्तम सेवकासमवेत अनेक राजे आपल्या सेनेला पाठीमागे सोडून भरतेशाजवळ आले ।। ८३ ।। अनेक सामन्त राजे आपआपल्या सेनेसहित सर्व बाजूनी आले व चक्रवर्तीजवळ येऊन त्यानी ज्याची आज्ञा सर्वत्र दैदिप्यमान झाली आहे अशा त्या चक्रवर्तीचा जयजयकार केला ॥८४॥ Page #204 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-९२) महापुराण सामवायिकसामन्तसमाजेरिति सर्वतः । सरिदोघरिवाम्भोषिरापूर्यत विभोर्बलम् ॥ ८५ सवनः सावनिः सोऽद्रिः परितो रुरुधे बलैः। जिनजन्मोत्सवे मेरुरनीकरिव नाकिनाम् ॥ ८६ विजयाचिलप्रस्था विभोरत्यासिता बलः । स्वर्गावासश्रियं तेनुविभक्तर्नुपमण्डपः॥ ८७ प्रक्ष्वेलितरथं विष्वक् प्रहेषिततुरङ्गमम् । प्रबृंहितगजं सैन्यं ध्वनिसादकरोगिरिम् ॥ ८८ बलध्वानं गुहारन्धेः प्रतिश्रुभूतमुद्वहन् । सोऽद्रिरुद्रिक्ततायोध्रुवं फूत्कारमातनोत् ॥ ८९ अत्रान्तरे ज्वलन्मौलिप्रभापिञ्जरिताम्बरः । ददृशे प्रभुणा व्योम्नि गिरेरवतरत्सुरः ॥ ९० स ततोऽवतरन्नद्रेर्बभौ सानुचरोऽमरः । सवनः कल्पशाखीतु लसदाभरणांशुकः ॥ ९१ दिव्यः प्रभान्वयः कोऽपि सम्मूछेति किमम्बरे । तडित्पुञ्जः किमयचिरिति दृष्टःक्षणं जनैः॥९२ नद्यांच्या समूहानी समुद्र जसा भरून जातो तसे सहायता देणाऱ्या सामन्तराजाच्या समूहानी भरतेश्वराची सेना सर्वबाजूनी भरून गेली ॥ ८५ ॥ जसे जिनेश्वराच्या जन्मोत्सवप्रसंगी देवांच्या सैन्यानी नन्दनादिवने व सर्व जमिनीसह मेरुपर्वत पूर्ण व्यापला होता तसे तो विजयार्धपर्वत त्याच्या वनासह व जमिनीसह भरतेश्वराच्या सैन्यानी सर्व बाजनी पूर्ण व्यापला होता ।। ८६ ॥ विजयार्धपर्वताची शिखरे भरतप्रभूच्या सैन्याकडून पूर्ण व्यापिली होती व अनेक राजांचे जे तेथे वेगवेगळे मनुष्य होते त्यानी तेथे स्वर्गातील घरांची शोभा उत्पन्न केली होती ॥ ८७ ।। त्या विजयापर्वतावर रथांचा सिंहाप्रमाणे आवाज होत होता. चोहीकडे घोड्याचे खिकाळणे ऐकू येत होते व हत्तींच्या सैन्याचा चीत्कार शब्द होत होता या सर्व शब्दानी त्याला शब्दमय केले होते ॥ ८८ ॥ ___सैन्याचे ध्वनि त्या पर्वताच्या गुहामध्ये पसरून मोठे प्रतिध्वनि उत्पन्न होत असत. जणु सैन्याच्या सर्वबाजूंच्या घेराव्यानी त्याला त्रास झाल्यामुळे तो जणु मोठ्याने फार सुस्कारे टाकीत आहे असे वाटत होते ॥ ८९ ।। ___ अशावेळी ज्याने उज्ज्वल मुकुटाच्या कान्तीनी आकाश पिवळसर केले आहे, असा एक देव त्या पर्वतावरून खाली उतरत असता भरतप्रभूकडून आकाशात पाहिला गेला ॥ ९० ॥ त्या पर्वतावरून आपल्या अनुचरासह खाली उतरणारा तो देव अलंकार व वस्त्रे यानी शोभत असल्यामुळे वनासह असलेल्या सालंकार व वस्त्रयुक्त अशा कल्पवृक्षाप्रमाणे शोभत होता ॥ ९१॥ ___ ज्याचे वर्णन करता येत नाही. दिव्य असा हा कान्तींचा समुदाय जणु आकाशाला सर्वत्र व्यापित आहे काय, असा भासणारा, किंवा हा विजांचा पुंज आहे काय किंवा ह्या अग्नीच्या ज्वाला आहेत काय अशा रीतीने लोकाकडून काही वेळपर्यन्त तो देव उतरत असता पाहिला गेला ॥ ९२ ।। म. २५ Page #205 -------------------------------------------------------------------------- ________________ १९४) महापुराण (३१-९३ किमप्येतदपिज्योतिरित्यादावविशेषतः । पश्चादवयवव्यक्त्या प्रव्यक्तपुरुषाकृतिः ।। ९३ कृतमालश्रुतिव्यक्त्यै कृतमालः स चम्पकः । कृतमाल इवोत्फुल्लो निदध्ये प्रभुणाग्रतः ॥ ९४ सप्रणामं च सम्प्राप्तं तं वीक्ष्य सहसा विभुः । यथार्हप्रतिपत्त्यास्मायासनं प्रत्यपादयत् ॥ ९५ प्रभुणानुमतश्चायं कृतासनपरिग्रहः । क्षणं विसिष्मिये पश्यन्धामामुष्यातिमानुषम् ॥ ९६ । सम्भाषितश्च सम्राजा पूर्व पूर्वाभिभाषिणा । सुरः प्रचक्रमे वक्तुमिति प्रश्रयवद्वचः ॥ ९७ क्व वयं क्षुद्रका देवाः क्व भवान्दिव्यमानुषः । पौतन्यमुचितं मन्ये वाचाटयति नः स्फुटम् ॥९८ आयुष्मन्कुशलं प्रष्टुं जिह्रोमः शासितुस्तव । त्वदायत्ता यतः कृत्स्ना जगतः कुशलक्रिया ॥ ९९ लोकस्य कुशलाधाने निरूढं यस्य कौशलम् । कुशलं दक्षिणस्यास्य बाहोस्ते मां जिगीषतः॥१०० देवानां प्रिय देवत्वं त्वयाशेषजगज्जयात् । नाम्नैव तु वयं देवा जातिमात्रकृतोक्तयः ॥ १०१ __ प्रथमतः हे कांही तर उत्तम तेज आहे अशा सामान्य कल्पनेने व नंतर अवयवांच्या व्यक्ततेने त्याची पुरुषाकृति स्पष्ट लोकाकडून पाहिली गेली व नंतर आपल्या कृतमाल या नावाच्या स्पष्टतेसाठी चाफ्यांच्या फुलांच्या माळा ज्याने धारण केल्या आहेत म्हणून फुललेल्या कृतमालनामक वृक्षाप्रमाणे जो दिसत आहे असा तो देव भरतराजाने आपल्यापुढे "पाहिला ॥ ९३-९४ ॥ ___नमस्कार करीत आपल्याकडे आलेल्या त्या देवाला प्रभुभरताने तत्काल पाहिले व त्याचा योग्य आदर करून त्याला त्याने आसन दिले. त्याला प्रभुभरताने बसण्यास अनुमति दिली. आसनावर बसलेल्या या देवाला इतर मानवाना ज्याने उल्लंधिले आहे असे भरताचे तेजस्वीरूप दिसले व क्षणपर्यन्त तो विस्मित झाला ॥ ९५-९६ ॥ प्रथम प्रश्नरूपाने बोलणाऱ्या चक्रवर्तीकडून प्रथम विचारला गेलेला तो देव याप्रमाणे नम्रतायुक्त भाषण करू लागला ॥ ९७ ॥ हे प्रभो, आम्ही क्षुद्रदेव कोणीकडे व आपण दिव्यमनुष्य कोणीकडे. अर्थात् आपण आमच्यापेक्षा फार मोठे आहात. हे प्रभो, आमचा देवपणा आम्हाकडून योग्य असे भाषण करवीत आहे. आमचा कमीपणा आम्हास तुमच्याशी बोलावयास लावित आहे हे उघड आहे ॥ ९८॥ हे.दीर्घायुषी राजा, तू सर्व जगाचे रक्षण करणारा आहेस म्हणून तुझे कुशल विचारण्यास आम्हाला लाज वाटते. कारण सगळ्या जगाचे क्षेमकुशल करणे तुझ्याच हातात आहे ॥ ९९ ॥ - जगाचे कल्याण करण्याचे चातुर्य ज्याचे प्रसिद्ध आहे व सर्व जगाला जिंकणाऱ्या या तुझ्या उजव्या बाहूचे कुशल आहे ना ? ॥ १०० ॥ हे देव, आपण देवाना देखिल प्रिय आहात, आपण सर्व जगाला जिंकले आहे म्हणून आपल्या ठिकाणीच देवपणा योग्य आहे. पण आम्ही नावानेच देव आहोत. फक्त देवजातीमध्ये आमचा जन्म झाला म्हणून आम्ही देव म्हटले जात आहोत ॥ १०१॥ Page #206 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-१०८) महापुराण (१९५ गीर्वाणा वयमन्यत्र जिगीषो क्षतगीश्वराः। त्वयि कुण्ठगिरो जाताः प्रस्खलद्गर्वगद्गदाः ॥१०२ राजोक्तिस्त्वयि राजेन्द्र राजतेऽनन्यगामिनी । अखण्डमण्डलां कृत्स्ना षटखण्डां गां नियच्छति॥१०३ चक्रात्मना ज्वलत्येष प्रतापस्तव दुःसहः । प्रथते दण्डनीतिश्च दण्डरलच्छलाद्विभोः ॥ १०४ ईशितव्या मही कृत्स्ना स्वतंत्रस्त्वमसीश्वरः। निधिरत्नद्धिरैश्वयं कापरस्त्वादशः प्रभुः ॥१०५ भ्रमत्येकाकिनी लोकं शश्वत्कोतिरनर्गला । सरस्वती च वाचाला कथं ते ते प्रिये प्रभोः ॥१०६ इति प्रतीतमाहात्म्यं त्वां समाजयितुं दिवः । त्वद्वलध्वानसंक्षोभसाध्वसाद्वयमागताः ॥ १०७ कूटस्था वयमस्याः स्वपदावविचालिनः । भूमिमेतावती तावत्त्वया देवावतारिताः ॥ १०८ आम्ही गीर्वाण आहोत, आपणाशिवाय विजयाची इच्छा करणारा जो दुसरा पुरुष आहे त्याच्याविषयी आम्ही तीक्ष्ण वचनरूपी बाण धारण करणारे आहोत. पण आपल्यापुढे आम्ही कुण्ठितवचन होत आहोत. आमचा अहंकार गळून गेला आहे व आमचे भाषण गद्गद स्वराने बाहेर पडत आहे ॥ १०२॥ __ हे राजेन्द्रा, ज्याचा अर्थ दुसऱ्या ठिकाणी जात नाही संभवत नाही असा 'राजा' हा शब्द अखण्ड देशानी युक्त सहा खंडानी युक्त अशा सर्व पृथ्वीला ताब्यात ठेवणाऱ्या तुझ्याच ठिकाणी शोभत आहे ॥ १०३ ॥ हे राजेन्द्रा, या चक्ररत्नाच्या स्वरूपाने तुझा हा दुःसह पराक्रम प्रज्वलित झाला आहे. आणि प्रभु अशा तुझी ही दण्डनीति (अपराधी लोकाना शिक्षा करणे) दण्डरत्नाच्या मिषाने सर्वत्र प्रसिद्ध होत आहे ॥ १०४ ॥ हे राजन्, ही सर्व पृथ्वी तुजकडूनच पालन केली जाण्यास योग्य आहे व तूच स्वतन्त्र असा या पृथ्वीचा ईश्वर-स्वामी आहेस. नऊ निधि आणि चौदा रत्नांची समृद्धि हे ऐश्वर्य तुला प्राप्त झाले आहे. तुझ्यासारखा दुसरा कोण या पृथ्वीचा प्रभु आहे बरे ? ॥ १०५ ॥ हे प्रभो, तुझी कीर्ति जिला कोठेही प्रतिबंध नाही अशी एकटी सर्वभूतलावर सतत भटकत आहे व कोठेही स्खलन न पावणारी तुझी वाणी देखिल चोहीकडे सारखी फिरत आहे. मग अशा स्वतंत्र झालेल्या या दोन स्त्रिया प्रभु-समर्थ अशा तुला कशा बरे आवडतात ? अर्थात् हे प्रभो, तुझी कीर्ति सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे व तुझी वाणी सर्व विषयात प्रवृत्त झाली आहे हे तात्पर्य ॥ १०६ ।। ___याप्रमाणे ज्याचे माहात्म्य-मोठेपणा प्रसिद्ध आहे अशा आपला सत्कार करण्यासाठी आकाशातून आपल्या सैन्याच्या क्षोभाने भिऊन आम्ही येथे आलो आहोत ॥ १०७॥ - आम्ही या पर्वताच्या शिखरावर राहणारे आहोत व आपल्या स्थानाहून अन्यत्र जात नसतो. पण हे देवा, इतक्या लांब भूमीवर आपण आम्हास यावयास भाग पाडले आहे ॥१०८॥ Page #207 -------------------------------------------------------------------------- ________________ १९६) महापुराण (३१-१०९ विप्रकृष्टान्तरावासवासिनो व्यन्तरा वयम् । संविधेयास्त्वयेदानी प्रत्यासत्राः पदातयः॥१०९ विद्धि मां विजयाद्धस्य मर्मज्ञममृताशनम् । कृतमालं गिरेरस्य कूटेऽमुष्मिन्कृतालयम् ॥११० मयि स्वसात्कृते देव स्वीकृतोऽयं महाचलः । सगुहाकाननस्यास्य गिरेगर्भविदस्म्यहम् ॥१११ गर्भज्ञोऽहं गिरेरस्मीत्यत्त्यल्पमिदमुच्यते। द्वीपाधिवलये कृत्स्ने नास्माकं कोऽप्यगोचरः ॥११२. वटस्थानवटस्थांश्च कूटस्थान्कोटरोटजान् । अक्षपाटान क्षपाटांश्च विद्धि नःसार्व सर्वगान्॥११३ इति प्रशान्तमोजस्वि वचः सम्भाष्य सादरम् । सोऽमरो विततारासी भूषणांनि चतुर्दश ॥११४ तान्यनन्योपलभ्यानि प्राप्य चक्री परां मुदम् । भेजे सत्कृतसत्कारैः सुरः सोऽप्याप सम्मदम् ॥११५ तं रोप्याद्रिगुहाद्वारप्रवेशोपायशंसिनम् । प्रविसय॑ स्वसेनान्यं प्राहिणोत्प्रभुरग्रतः ॥ ११६ त्वमुद्घाटय गुहाद्वारं यावनिर्वाति सा गुहा । तावत्पाश्चात्यखण्डस्य निर्जयाय कुरूद्यमम् ॥११७ हे प्रभो, आम्ही फार दूरच्या स्थानी निवास करणारे व्यन्तरदेव आहोत पण आता आपण आम्हाला जवळ राहणारे शिपाई हुजरे करावे ।। १०९ ॥ मी या विजयार्धपर्वताचे सर्व मर्म जाणणारा देव आहे, माझे ‘कृतमाल' हे नांव आहे व या पर्वताच्या शिखरावर माझे निवासस्थान आहे ॥ ११० ॥ हे देवा, मला आपण वश केले आहे त्यामुळे हा सर्व पर्वत देखिल आपण स्वाधीन करून घेतला आहे. मी गुहा व वने यानी युक्त असलेल्या या पर्वताच्या आत असलेल्या सर्व पदार्थांचा ज्ञाता आहे ॥ १११॥ मी या पर्वताच्या गर्भात असलेले पदार्थ जाणतो असे जे म्हणालो ते मी थोडेच सांगितले पण सर्व द्वीप व सर्वसमुद्रांचे जे मण्डल आहे त्यात आम्हाला न समजणारा असा कोणताही पदार्थ नाही ॥ ११२ ।। हे सार्व-सर्वांचे हित करणाऱ्या हे राजा, वडांच्या झाडावर, पातालस्थानी, पर्वतांच्या शिखरावर, झाडांच्या ढोलीत व पर्णरचित झोपडी या ठिकाणी राहणारे व दिवसा आणि रात्रीही सर्वत्र फिरणारे व सर्व ठिकाणी जाणारे आहोत असे आम्हास आपण समजावे ॥११३॥ याप्रमाणे प्रशान्त पण तेजस्वी असे भाषण कृतमाल देवाने केले व आदराने त्याने चक्री भरताला चौदा अलंकार दिले ॥ ११४ ।। इतरापासून न प्राप्त होणारे ते चौदा अलंकार कृतमाल देवापासून भरत चक्रीला मिळाले. त्यामुळे त्याला फार आनंद वाटला. यानंतर भरत चक्रीनेही त्या देवाचा आदर केला व त्यालाही त्यामुळे मोठा आनंद वाटला ॥ ११५ ॥ त्या कृतमाल देवाने विजयार्द्ध पर्वताचे गुहाद्वार उघडण्याचा उपाय सांगितल्यावर त्या देवाचे चक्रीने विसर्जन केले व भरतप्रभूने आपल्या सेनापतीला पुढे पाठवून दिले ॥ ११६ ॥ हे सेनापते, तू गुहेचा दरवाजा उघड व ती गुहा शान्त होईपर्यन्त पश्चिम खंडाला जिंकण्यासाठी उद्योग कर अशी आज्ञा चक्रीने सेनापतीला केली ॥ ११७ ॥ Page #208 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-१२७) महापुराण (१९७ इति चक्रधरादेशं मूर्ना माल्यमिवोद्वहन् । कृतमालामरोद्दिष्टकृत्स्नोपायप्रयोगवित् ॥ ११८ कृती कतिपयरेष तुरङ्गः सपरिच्छदैः । प्रतस्थे वाजिरत्नेन दण्डपाणिश्चमपतिः ॥ ११९ किञ्चिच्चान्तरमुल्लङघ्य स सिन्धोर्वनवेदिकाम् । विगाह्य विजयार्द्धस्य सम्प्रापत्तटवेविकाम्॥१२० तत्सोपानेन रूप्यारारुह्य जगतीतलम् । प्रत्यङमुखो गुहोत्सङ्गमाससाद चमूपतिः। १२१ जयताच्चक्रवर्तीति सोऽश्वरत्नमधिष्ठितः। दण्डेन ताडयामास गुहाद्वारं स्फुरद्ध्वनि ॥ १२२ दण्डरत्नाभिघातेन गुहाद्वारे निरर्गले । तद्गर्भालवानुष्मा निर्ययोकिल सन्ततः ॥ १२३ वधद्दण्डाभिघातोत्थं क्रेङ्कारमररीपुटम् । सवेदनमिवास्वेदि निर्गतासु गुहोष्मणा ॥ १२४ उद्घाटितकवाटेन द्वारेणोष्माणमुद्वमन् । रराज राजतः शैलो लब्धोच्छ्वासश्चिरादिव ॥ १२५ कपाटपुटविश्लेषावुच्चचार महानध्वनिः । दण्डेनाभिहतस्याद्वेराक्रोश इव विस्फुरन् ॥ १२६ गहोष्मणा स नाश्लेषि विदूरमपवाहितः। तरस्विनाश्वरत्नेन देवताभिश्च रक्षितः ॥ १२७ ___ त्याप्रमाणे भरतचक्रीची आज्ञा सेनापतीने माळेप्रमाणे मस्तकाने धारण केली. हा सेनापति कृतमालदेवाने सांगितलेल्या सर्व उपायांचे प्रयोग कसे करावे हे जाणत होता ।। ११८॥ तो कुशल सेनापति सर्वसाधनसामग्रीनी कित्येक घोडेस्वारासह आपल्या उत्कृष्ट अश्वरत्नावर बसून व हातात दंडरत्न घेऊन निघाला ॥ ११९ ॥ कांही अन्तर उल्लंघून त्याने सिंधुनदीच्या वनवेदिकेमध्ये प्रवेश केला व नंतर विजायध 'पर्वताच्या तटवेदिकेकडे आला ॥ १२० ॥ त्या वेदिकेच्या पायऱ्यानी विजया पर्वताच्या वरील भागावर त्याने आरोहण केले. नंतर पश्चिमेकडे मुख करून सेनापति गुहेच्या वरच्या बाजूवर आला ॥ १२१ ॥ __ "भरतचक्रवर्ती जयवन्त असो" असे म्हणून अश्वरत्नावर बसलेल्या सेनापतीने दण्डरत्नाने गुहेचे द्वार ठोकले तेव्हा मोठा ध्वनि झाला ॥ १२२ ॥ दण्डरत्नाच्या आघाताने ते गुहाद्वार मोकळे झाले व त्या गुहेच्या आतल्या भागातून अतिशय प्रखर अशी उष्णता सारखी बाहेर पडू लागली ॥ १२३ ॥ दण्डाच्या प्रहाराने करकर आवाज करणारी ती दोन कवाडे गुहेच्या उष्णतेने ज्याना घाम आला आहे व जे वेदनानी पीडित होऊन जणु प्राण सोडीत आहे अशी दिसली ॥१२४॥ ___ ज्याची कवाडे उघडली आहेत अशा त्या गुहाद्वाराने उष्णता बाहेर सोडणारा तो 'विजयार्धपर्वत फार दीर्घकालाने वर ज्याला श्वास घेता आला आहे असा जणु शोभू लागला ॥ १२५ ॥ कवाडांची जोडी उघडल्यामुळे फार मोठा ध्वनि झाला. दण्डरत्नाच्या आघाताने तो पर्वत जणु चोहीकडे पसरणारा आक्रोश करीत आहे असे लोकाना वाटले ॥ १२६ ॥ त्या गुहेच्या उष्णतेने तो सेनापति बिलकुल होरपळला नाही कारण अत्यंत वेगवान् अशा अश्वरत्नाने त्याला फार दूर नेले व देवतानीही त्याचे रक्षण केले ।। १२७ ।। Page #209 -------------------------------------------------------------------------- ________________ १९८) महापुराण (३१-१२८ निपेतुरमरस्त्रीणां दृक्क्षेपः सममम्बरात् । सुमनः प्रकरास्तस्मिन्हासा इव जयश्रियः॥ १२८ तटवेदी ससोपानां रौप्याद्रः समतीयिवान्। सोऽभ्यत्सतोरणां सिन्धोः पश्चिमां वनवेदिकाम्॥१२९ वेदिकां तामतिक्रम्य सञ्जगाहे परां भुवम् । नानाकरपुरग्रामसीमारामैरलडकृताम् ॥ १३० प्रविष्टमात्र एवास्मिन्प्रजास्त्रासमुपाययुः । समं दारगवैरन्या घटन्ते स्म पलायितुम् ॥ १३१ केचित्कृतधियो धीराः सार्धाः पुण्याक्षतादिभिः । प्रत्यग्रहीषुरभ्येत्य सबलं बलनायकम् ॥ १३२ न भेतव्यं न भेतव्यमाध्वमाध्वं यथासुखम् । इत्यस्याज्ञाकरा विष्वक्भ्रेमुराश्वासितप्रजाः॥१३३ म्लेच्छखण्डमखण्डाज्ञः परिक्रामन्प्रदक्षिणम् । तत्र तत्र विभोराज्ञां म्लेच्छराजैरजिग्रहत् ॥१३४ इदं चऋषरक्षेत्रं स चैव निकटे प्रभुः । तमाराधयितुं यूयं त्वरध्वं सह साधनः ॥ १३५ भरतस्यादिराजस्य चक्रिणोऽप्रतिशासनम् । शासनं शिरसा दध्वं यूयमित्यन्वशाच्च तान् ॥१३६ जयश्रीचे जणु हास्य असा फुलांचा समूह आकाशातून देवांगनांच्या नेत्रकटाक्षासह त्या सेनापतीवर पडला ।। १२८ ।। विजयापर्वताची पायऱ्यानी युक्त असलेली जी तटवेदी ती त्या सेनापतीने ओलांडली व तोरणानी सहित असलेल्या सिन्धुनदीच्या पश्चिमेकडच्या वनवेदिकेकडे तो आला ॥ १२९ ॥ ती वेदिकाही ओलांडून सेनापति अनेक धातूंच्या खाणी, नगरे, गावे व त्यांच्या सीमावर असलेली उद्याने यांनी शोभणाऱ्या अशा उत्तम भूप्रदेशावर आला ॥ १३० ॥ - त्या प्रदेशात सेनापतीने प्रवेश केल्याबरोबर तेथील प्रजा फार घाबरली व कांही लोक आपल्या स्त्रिया व गायी, बैल वगैरे पशु बरोबर घेऊन पळून जाण्याची तयारी करू लागले।।१३१॥ ___ कांही पूर्वापरविचार करणारे जे धैर्यवंत लोक होते त्यानी मंगलाक्षतादिकासह अर्घ्य-आदर करण्याचे साहित्य घेतले व सैन्यासहित असलेल्या सेनापतीकडे ते आले व त्याचा त्यांनी आदर केला ॥ १३२ ॥ __आपण भिऊ नका, भिऊ नका; सुखाने राहा, सुखाने राहा याप्रमाणे सेनापतीच्या आज्ञेला कळविणारे सेवक सर्वत्र फिरले व त्यानी सर्वप्रजाना आश्वासन दिले. व त्यांचे भय दूर केले ॥१३३॥ ज्याच्या आज्ञेचा भंग कोठेही झाला नाही अशा त्या सेनापतीने सर्व म्लेच्छखंडाला प्रदक्षिणा घातली व त्या त्या ठिकाणी भरतप्रभूची आज्ञा सेनापतीने त्यांना मान्य करावयास लाविली ॥ १३४ ॥ जेथे आपण राहिलेले आहात ती भूमि चक्रवर्तीची आहे व तो प्रभु जवळच आहे, तुम्ही आपल्या सैन्यासह त्याला सन्तुष्ट करण्याकरिता लोकर चला, त्वरा करा ॥ १३५ ॥ भरतचक्री, या युगाचा पहिला अथवा मुख्य राजा आहे. यास्तव कधी भंग न पावणाऱ्या त्याच्या आज्ञेला तुम्ही सर्वजण आपल्या मस्तकावर धारण करा असे सेनापतीने त्या म्लेच्छराजाना सांगितले ॥ १३६ ॥ Page #210 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-१४५) महापुराण जाता वयं चिरादद्य सनाथा इत्युदाशिषः । केचिच्चक्रधरस्याज्ञामशठाः प्रत्यपत्सत ॥ १३७ सन्धिविग्रहयानादिषाड्गुण्यकृतविक्रमाः । बलात्प्रणामिताः केचिदश्वर्यलवदूषिताः ॥ १३८ कांश्चिदुर्गाश्रिताम्लेच्छानवस्कन्दनिरोधनः । सेनानीर्वशमानिन्ये नमत्यज्ञोऽधिकं क्षतः॥१३९ केचिद्बलैरवष्टब्धास्तत्पीडां सोढुमक्षमाः। शासने चक्रिणस्तस्थुः स्नेहो नापीलितात्खलात् ॥१४० इत्युपायरुपायज्ञः साषयम्लेच्छभूभुजः । तेभ्यः कन्यादिरत्नानि प्रभोर्नोग्यान्युपाहरत् ॥ १४१ धर्मकर्मबहिर्भूता इत्यमी म्लेच्छका मताः । अन्यथान्यः समाचाररार्यावर्तेन ते समाः ॥१४२ इति प्रसाध्य तां भूमिमभूमि धर्मकर्मणाम् । म्लेच्छराजबलैः साधं सेनानीयवृतत्पुनः ॥ १४३ रराज राजराजस्य साश्वरत्नचम्पतिः। सिद्धदिग्विजयो जैत्रः प्रताप इव मूर्तिमान् ॥ १४४ सतोरणामतिक्रम्य स सिन्धोर्वनवेदिकाम् । विगाढश्च ससोपानां रूप्याद्रवनवेदिकाम् ॥ १४५ आपण आज पुष्कळ दिवसानंतर सनाथ झालो असे म्हणून मंगलाशीर्वाद देणाऱ्या कित्येक सरळ मनाच्या लोकानी चक्रवर्तीची आज्ञा मान्य केली ॥ १३७ ।। संधि-तह, विग्रह-युद्ध, यान-पळून जाणे, आसन-दबा धरून बसणे, संश्रय-प्रबळ राजाचा आश्रय घेणे, द्वेधीभाव-फितुरी करणे या गुणानी पराक्रम करणारे व थोड्याशा वैभवाने उन्मत्त झालेल्या कित्येक राजाना सेनापतीने जबरदस्तीने नम्र केले ॥१३८ । किल्ल्याचा आश्रय करून राहणाऱ्या कित्येक राजाना ताब्यात घेण्यासाठी सेनापतीने त्यांच्या वाटा रोखून धरिल्या व त्याना अशा रीतीने वश केले. हे ठीकच झाले कारण फार त्रास दिला असता अज्ञ मनुष्य नम्र होतो ।। १३९ ॥ कित्येक म्लेच्छ राजाना सैन्याने वेढले. तेव्हा त्यांचा त्रास सोसण्यास असमर्थ झालेले ते चक्रवर्तीच्या आज्ञेवरून वश झाले. बरोबरच आहे की न दाबलेल्या पेंडीतून जसे तेल निघत नाही तसे त्रास न दिलेल्या दुष्टापासून स्नेह उत्पन्न होत नाही ॥ १४० ॥ ___ याप्रमाणे अनेक युक्ति जाणणाऱ्या त्या सेनापतीने अनेक उपायानी म्लेच्छराजांना जिंकले व त्यांच्यापासून प्रभूस भोगण्यास योग्य असे कन्यादिक पदार्थ त्याने घेतले ॥ १४१ ।। हे म्लेच्छ धर्म-अहिंसा वगैरे धर्म आणि सदाचार यांनी रहित होते म्हणून हे म्लेच्छ होत पण बाकीच्या विवाहादि आचारानी आर्यावर्तातील लोकासारखे होते. याप्रमाणे धर्मकर्माला अयोग्य अशा त्या भूमीला-प्रदेशाला जिंकून तो सेनापति म्लेच्छराजांच्या सैन्यासह पुनः ‘परतला ।। १४२-१४३ ॥ सर्वराजांचा राजा अशा भरतेश्वराचा अश्वरत्नाने युक्त असलेला सेनापति जो जयकुमार तो म्लेच्छांना जिंकण्याच्या कार्यानी फार शोभला. कारण सर्व हा विजय मिळविणारा व साक्षात् जणु शरीरधारी पराक्रम आहे असा होता ॥ १४४ ॥ या सेनपतीने सिन्धुनदीच्या द्वारासहित वनवेदिकेला उल्लंघून विजयार्धपर्वताच्या पायऱ्यानी युक्त अशा वनवेदिकेत प्रवेश केला ॥ १४५ ॥ Page #211 -------------------------------------------------------------------------- ________________ २०० ) महापुराण ( ३१ - १४६ आरूढो जगतीमद्रेर्व्यूढोरस्को महाभुजः । षड्भिर्मासैः प्रशान्तोष्मं सोऽध्यवात्सीद्गुहामुखम् ।। १४६ तत्रासीनश्च संशोध्य ब्रह्नपायं गृहोदरम् । कृतरक्षाविधिः सम्यक् प्रत्यायाच्छिबिरं प्रभोः ॥ १४७ अथ सम्मुखमागत्य सानीकैर्नृपसत्तमः । प्रत्यगृह्यत सेनानीः सजयानकनिःस्वनम् ॥ १४८ विभक्ततोरणामुच्चैः प्रचलत्केतुमालिकाम् । महावीथीमतिक्रम्य प्राविक्षत्स नृपालयम् ।। १४९ तुरङ्गमवराद्दूरात्कृतावतरणः कृती । प्रभर्नृपासनस्थस्य प्रापदास्थानमण्डपम् ॥ १५० दूरानतचलन्भौलिसम्बद्धकरकुड्मलः । प्रणनाम प्रभुं सभ्यैर्वोक्ष्यमाणः स विस्मितः ।। १५१ मुखरैजयकारेण म्लेच्छराजः ससाध्वसम् । प्रणेमे प्रभुरभ्येत्य ललाटस्पृष्टभूतलैः ॥ १५२ तदुपाहुतरत्नाद्यैरर्घ्ययनुपढौकितः । नामादेशं च तानस्मै प्रभवेऽसौ न्यवेदयत् ॥ १५३ ज्याचे वक्षःस्थल छाती पुष्ट आहे, ज्याचे दोन बाहु पुष्ट आहेत असा तो सेनापति या पर्वताच्या वेदिकेवर आरूढ झाला व सहा महिन्यानी जिची उष्णता नाहीशी झाली आहे अशा गुहेच्या मुखाजवळ त्याने मुक्काम केला ।। १४६ ॥ जिचा मध्यभाग अनेक अपायकारक वस्तूनी प्राण्यानी भरलेला आहे अशा त्या गुहेला त्याने स्वच्छ करविले आणि उत्तम रीतीने संरक्षण करण्यासाठी त्याने तेथे लोकांची नियुक्ति केली. यानंतर ती पुनः भरतप्रभूकडे आला ॥ १४७ ॥ यानंतर अनेक श्रेष्ठ राजे आपले सैन्य घेऊन स्वागत करण्यासाठी आले व जयसूचक नगाऱ्यांच्या ध्वनीनी त्याचा त्यानी आदर केला ।। १४८ ॥ ज्याच्यावर अनेक तोरणे शोभत आहेत व ज्याच्यावर पताकांच्या पंक्ति फडफडत आहेत, असा मोठा राजमार्ग सेनापतीने उल्लंघिला व त्याने राजवाड्यात प्रवेश केला ॥ १४९ ॥ दुरूनच आपल्या उत्तम घोड्यावरून उतरलेला कार्यकुशल सेनापति राजसिंहासनावर बसलेल्या भरतेशाच्या सभामंडपात आला ।। १५० ।। दूरूनच नम्र व चंचल झालेल्या मस्तकावर ज्याने आपली हातरूपी कमलकळी जोडली आहे व ज्याला विस्मित झालेले सभ्य पाहत आहेत अशा त्या जयकुमार सेनापतीने प्रभूला नमस्कार केला ।। १५१ ।। त्यावेळी जयजयकाराच्या ध्वनीनी ज्यांची तोंडे वाचाळ झाली आहेत, ज्यानी आपल्या कपाळानी भूमीला स्पर्श केला आहे असे म्लेच्छराजे भीतभीत प्रभुजवळ आले व त्यानी त्याला नमस्कार केला ॥। १५२ ।। त्या म्लेच्छराजाने नजराणा म्हणून पुढे आणिलेले रत्नादिक वस्तु प्रभू पुढे ठेविले व नामादिकांचा उच्चार करून त्या म्लेच्छराजांचा परिचय त्या सेनापतीने भरत प्रभूला करून दिला ।। १५३ ।। Page #212 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१-१५४) महापुराण (२०१ सप्रसादं च सम्मान्य सत्कृतास्ते महीभुजः । प्रभोरनुमताद्भूयः स्वमोकः प्रत्ययासिषुः ॥१५४ इत्थं पुण्योदयाच्चक्री बलात्प्रत्यन्तपालकान् । विजिग्ये दण्डमात्रेण जयः पुण्यादृते कुतः ॥ १५५ मालिनीवृत्तअथ नृपतिसमाजेनाचितः सानुरागम् । विजिनसकलदुर्गः प्रह्वयम्लेच्छनाधान् ॥ पुनरपि विजयायायोजि सोऽग्रेसरत्वे । जय इव जयचिह्नर्मानितो रत्नभा ॥ १५६ जयति जिनवराणां शासनं यत्प्रसादात् पदमिदमधिराज्ञां प्राप्यते हेलयैव ॥ समुचितनिधिरत्नप्राज्यभोगोपभोग-प्रकटितसुखसारं भूरिसम्पत्प्रसारम् ॥ १५७ छत्रं चन्द्रकरापहासि रुचिरं चामीकरप्रोज्ज्वलद्दण्डं चामरयुग्मकं सुरसरिड्डिण्डीरपिण्डच्छवि ॥ रुक्माद्रेरिव संविभक्तमपरं कूट मृगेन्द्रासनम् । लेभेऽसौ विजयार्द्धनाथविजयाद्रत्नान्यथान्यान्यपि ॥ १५८ भरतराजाने प्रसन्नतेने म्लेच्छराजांचा बहुमानाने सत्कार केला. यानंतर ते म्लेच्छराजे त्यांची आज्ञा घेऊन आपआपल्या स्थानी गेले ॥ १५४ ।। याप्रमाणे पुण्योदयाने चक्रवर्तीने फक्त एका दण्डरत्नाच्या साहाय्याने बलात्काराने म्लेच्छदेशांच्या राजाना वश केले. बरोबरच आहे की, पुण्याशिवाय जय कोठून प्राप्त होईल बरे ? ॥ १५५ ॥ यानंतर राजांच्या समूहानी ज्याचा प्रेमाने आदर केला आहे व ज्याने म्लेच्छराजाना वश करून त्यांचे सर्व किल्ले जिंकले आहेत अशा त्या जयकुमार सेनापतीचा चौदा रत्नांचा अधिपति अशा भरतराजाने विजयाच्या चिह्नानी आदर केला व पुनः त्याने विजयासाठी सेनापतिदावर त्याला नियुक्त केले ॥ १५६ ।। नऊ निधि व चौदा रत्ने व उत्कृष्ट भोगोपभोगानी ज्याने सर्वसुखांचा सार प्रकट केला आहे व ज्याने सर्व संपदांचा समूह मिळवून दिला आहे व हे चक्रवर्तीचे पद ज्याच्या आश्रयाने लीलेनेच प्राप्त होते असे हे जिनेन्द्राचे शासन नेहमी जयवंत असो ॥ १५७ ॥ चक्रवर्ती भरताने विजयार्धपर्वताच्या स्वामीला-कृतमालनामक देवाला जिंकल्यामुळे त्याच्यापासून चन्द्राच्या किरणाना हसणारे कान्तियुक्त छत्र, सुवर्णाचे उज्ज्वल दाण्डे ज्याना आहेत व गंगानदीच्या फेसाच्या पिण्डाप्रमाणे कान्ति ज्यांची आहे अशा दोन चवऱ्या, मेरुपर्वतापासून जणु वेगळे केलेले हे त्याचे शिखर आहे असे सिंहासन हे पदार्थ मिळविले व आणखीही अनेक रत्ने मिळविली ।। १५८ ॥ म. २६ Page #213 -------------------------------------------------------------------------- ________________ २०२) महापुराण (३१-१५९ गीर्वाणः कृतमाल इत्यभिमतः सम्पूज्य तं सावरम् । प्रादादाभरणानि यानि न पुनस्तेषामिहास्त्युन्मितिः ॥ सम्राट्तरचकादलङकृततनः कल्पद्रुमः पुष्पितो। मेरोः सानुमिवाश्रितो मणिमयं सोऽध्यासितो विष्टरम् ॥ १५९ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे विजयाल गुहाद्वारोद्घाटनवर्णनं नामैकत्रिंशत्तमं पर्व समाप्तम् ॥३१॥ कृतमालनामक प्रसिद्ध देवाने आदराने भरताची पूजा करून जे अलंकार दिले होते त्याना या भरतक्षेत्रात उपमा देण्यास योग्य असा कोणताही पदार्थ नाही. त्या अलंकारानी भूषित झाले आहे शरीर ज्याचे असा तो सम्राट भरत जेव्हा मणिमय सिंहासनावर बसला तेव्हा मेरुपर्वताच्या रत्नखचित शिखराचा आश्रय घेतलेल्या व फुलानी लकडलेल्या कल्पवृक्षाप्रमाणे शोभू लागला ॥ १५९ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत-त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहातील विजयार्द्ध पर्वताच्या गुहेच्या द्वाराच्या उद्घाटनाचे वर्णन करणारे एकतीसावे पर्व संपले. Page #214 -------------------------------------------------------------------------- ________________ द्वात्रिंशत्तमं पर्व अथान्येधुरुपारूढसम्भ्रमर्बलनायकः । प्रत्यपाल्यत सन्नद्धः प्रयाणसमयः प्रभोः ॥१ गजताश्वीयसैन्यानां पदातीनां च सडकुलः। न नृपाजिरमेवासीद्रुद्धमद्रेवनान्यपि ॥२ जयकुञ्जरमारूढः परीतो नृपकुञ्जरः । रेजे निर्यन्प्रयाणाय सम्राट शक्र इवामरैः ॥ ३ किञ्चित्पश्चान्मुखं गत्वा सेनान्या शोषिते पथि। ध्वजिनी सडकुचन्त्यासीदीर्याशुद्धि श्रितेव सा ॥४ प्रगुणस्थानसोपानां रूप्याद्रेः श्रेणिमश्रमात् । मुनेः शुद्धिरिव श्रेणीमारूढा सा पताकिनी ॥५ तमिस्रति गुहा यासौ गिरिव्याससमायतिः। उच्छिता योजनान्यष्टौ ततोऽर्धाधिकविस्तृतिः ॥६ वाचं कपाटयोर्युग्मं या स्वोच्छायमितोच्छिति । दधे पृथक्स्वविष्कम्भसाधिकवचंशविस्तृति ॥ ७ पराय॑मणिनिर्माणरुचिमद्वारबन्धना । तवधस्तलनिस्सर्पसिन्धुस्रोतोविराजिता ॥८ अशक्योद्घाटनान्येषां मुक्त्वा चक्रिचमूपतिम् । तन्निरर्गलितत्वाच्च प्रागेव कृतनिवृतिः ॥९ नंतर दुसरे दिवशी ज्याना पुढे प्रयाण करण्याची फार त्वरा उत्पन्न झाली आहे असे जे अनेक सेनापति ते सन्नद्ध होऊन भरतचक्रीच्या प्रयाणसमयाची वाट पाहात राहिले ॥१॥ हत्तींचा समुदाय, घोडेस्वारांचे सैन्य व पायदळ यांच्या दाटीनी भरतनृपाच्या राजवाड्याचे अंगणच फक्त व्यापले होते असे नाही तर विजयार्द्धपर्वतावरील सर्व वनेही व्यापिली होती ॥२॥ __ जो आपल्या विजयशाली हत्तीवर बसला आहे व ज्याला अनेक श्रेष्ठ राजांनी वेढले आहे व जो प्रयाणासाठी-शत्रूना जिंकण्यासाठी निघत आहे असा सम्राट भरत देवानी घेरलेल्या इन्द्राप्रमाणे शोभत होता ।। ३ ॥ थोडेसे पश्चिमेकडे वळून सेनापतीने शुद्ध केलेल्या मार्गात संकोचून जाणारी ती सेना जणु ईर्यापथशुद्धीला प्राप्त झाली आहे असे वाटले ॥४॥ ___ जसे मुनींच्या चारित्राची विशुद्धता उत्कृष्ट गुणस्थानाची ( आठवे, नौवे, दहावे या गुणस्थानांची ) जी श्रेणी आहे त्यावर वाढत जाते तशी भरतेशाची सेना ज्याच्यावर उत्तम पायऱ्या बनविल्या आहेत अशा त्या विजयार्धपर्वताच्या श्रेणीवर चढू लागली ॥ ५॥ या विजयापर्वताची तमिस्रा नावाची जी गुहा आहे ती पर्वताच्या रुंदीबरोबर रुंदीची होती व लांबीही तितकीच होती. मात्र तिची उंची आठ योजन प्रमाणाची होती व रुंदी बारा योजन प्रमाणाची होती ॥ ६ ॥ या गुहेचे दोन दरवाजे वज्राचे-वज्रमय होते व तिच्या उंची इतके उंच होते आणि सहा सहा योजन रुंद होते व या दरवाजांची चौकट महामूल्य रत्नानी बनविलेली असल्यामुळे अतिशय चमकत होती व तिच्या खालच्या भागातून निघालेल्या सिन्धुनदीच्या प्रवाहाने शोभत होती ॥ ७-८॥ ही गुहा चक्रवर्तीच्या सेनापतीवाचून इतराकडून उघडली जाणे शक्यच नसते व ते उद्घाटन पूर्वीच झाले असल्यामुळे आता ती गुहा जिची शान्ति केली आहे अशी झाली आहे ॥९॥ Page #215 -------------------------------------------------------------------------- ________________ २०४) महापुराण (३२-१० जगत्स्थितिरिवानाद्याघटितेव च केनचित् । जनश्रुतिरिवोपातगाम्भीर्या मुनिभिर्मता ॥ १०. व्यायता जीविताशेव मूछेव च तमोमयी।गतेवोल्लाघतां कृच्छान्मुक्तोमा शोधितान्तरा॥११ कुटीव च प्रसूताया निषिद्धान्यप्रवेशना । कृतरक्षाविधिारे धृतमङ्गलसंविधिः ॥ १२ तामालोक्य बलं जिष्णोर्दूरादासीत्ससाध्वसम् । तमसा सूचिभेयेन कज्जलेनेव सम्भता ॥ १३ चक्रिणा ज्ञापितो भूयः सेनानीः सपुरोहितः । तत्तमोनिर्गमोपाये प्रयत्नमकरोत्ततः ॥ १४ काकिणीमणिरत्नाभ्यां प्रतियोजनमालिरवत् । गुहाभित्तिद्वये सूर्यसोमयोमण्डलद्वयम् ॥ १५ तत्प्रकाशकृतोद्योतं सज्ज्योत्स्नातपसन्निधि । गुहामध्यमपध्वान्तं व्यगाहत ततो बलम् ॥ १६ चक्ररत्नज्वलद्दीपे ससेनान्या पुरः स्थिते । बलं तदनुमार्गेण प्रविभज्य द्विधा ययौ ॥ १७ जसे या जगाचे अस्तित्व अनादि आहे तशी ही गुहाही अनादिकालीन आहे तथापि कोणी निर्माण केल्यासारखी वाटते, जशी जिनेश्वराची वाणी गंभीरपणाला धारण करिते तशी ही गुहा अतिशय गंभीर आहे असे मुनीनी सांगितले आहे ।। १० ॥ ही गुहा जगण्याच्या इच्छेप्रमाणे जणु फार दीर्घ-लांबीने युक्त आहे. ही गुहा मूछेप्रमाणे आहे. मूर्छा जशी अज्ञानाने बेशुद्धीने युक्त असते तशी ही तमोमय-अंधकाराने भरलेली आहे व जशी एखादी आजारी स्त्री पोटातील मलशुद्धि केल्यामुळे आरोग्य युक्त व मुक्तोष्मा-उष्णज्वराने रहित होते तशी ही गुहा आतील भागाचे शोधन केल्यामुळे उष्णतेने रहित झाली आहे ॥ ११ ॥ ___ जशी एखाद्या प्रसूत झालेल्या स्त्रीची झोपडी इतराना प्रवेश जीत नाही अशी असते तशी ही गुहा द्वारावर रक्षणकार्य होत असल्यामुळे इतराना प्रवेश मिळत नाही व जशी नूतन प्रसूतस्त्रीची झोपडी मंगलविधीनी सहित असते तशी ही मंगलविघीला धारण करणारी आहे ॥ १२ ॥ अशा त्या गुहेला दूरून पाहून चक्रवर्तीचे सैन्य भ्याले. तिच्यात सुईने फोडता येण्यासारखा अंधकार असल्याने जणु ती काजळाने भरल्याप्रमाणे वाटत होती ।। १३ ॥ - चक्रवर्तीने पुनः ज्याला सूचना दिली आहे अशा पुरोहितासहित सेनापतीने नंतर त्या गुहेतील अंधार नाहीसा करण्याचा उपाय याप्रमाणे केला ॥ १४ ॥ त्या दोघानी त्या गुहेच्या दोन भिंतीवर काकिणीरत्न व चूडामणिरत्न या दोन रत्नानी एक एक योजनाच्या अंतरावर सूर्य व चंद्र या दोघांचे मण्डल लिहिलेले होते, रचले होते ॥ १५ ॥ त्यांच्या प्रकाशाने ती गुहा उजेडसहित झाली. चन्द्रप्रकाश व सूर्यप्रकाशाच्या सानिध्याने गुहेचा मध्यभाग अंधाररहित झाला व त्यामुळे चक्रिसेनेने गुहेत प्रवेश केला ॥१६॥ चक्ररत्नरूपी उज्ज्वल दीप सेनापतीसह पुढे चालत होता व त्याच्या मार्गाला अनुसरून सैन्य दोन विभागाने युक्त होऊन चालले होते ॥ १७ ॥ Page #216 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-२६) महापुराण (२०५ परिसिन्धनदीस्रोतः प्राक्पश्चाच्चोभयोः पथोः। बलं प्रायाज्जलं सिन्धोरुपयुज्योपयुज्य तत् ॥१८ पथि वैधे स्थिता तस्मिन्सेनानण्यनियन्त्रिता । सा चमः संशयद्वैधं तदा प्रापद्दिगाश्रयम् ॥ १९ ततः प्रयाणकः कैश्चित्प्रभूतयवसोदकः । गुहार्धसम्मितां भूमि व्यतीयाय पतिविशाम् ॥ २० यत्रोन्मग्नजला सिन्धुनिमग्नजलया समम् । प्रविष्टा तिर्यगुद्देशं तं प्राप बलमीशितुः ॥ २१ तयोरारात्तटे सैन्यं निवेश्य भरतेश्वरः । वैषम्यमुभयो द्योः प्रेक्षाञ्चक्रे सकौतुकम् ॥ २२ एकाधः पातयत्यन्या दाद्युित्प्लावयत्यरम् । मिथो विरुद्धसाङ्गत्ये सङ्गते ते कथञ्चन ॥ २३ नद्योरुत्तरणोपायः को नु स्यादिति तर्कयन् । द्रुतमाह्वापयामास तत्रस्थ स्थपति पतिः ॥ २४ स तन्नदीद्वयं पश्यनुत्पतनिपतज्जलम् । दृष्टयैव तुलयामास जलाञ्जलिमिव क्षणम् ॥ २५ उपर्युच्छ्वासयत्येनां महान्वायुः स्फुरन्नधः। वायुस्तदन्यथावृत्तिरमुष्यां च विजृम्भते ॥ २६ ती सेना सिन्धुनदीच्या प्रवाहाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन मार्गातून जात होती व त्या नदीच्या पाण्याचा वारंवार उपयोग करीत करीत ती चालली होती ॥ १८ ॥ त्या गुहेतील दोन मार्गावर आलेले व सेनापतीने ज्याचे चांगले नियंत्रण केले आहे असे ते सैन्य दिशासंबंधी दोन संशय मनात उत्पन्न झाल्यामुळे गोंधळात पडले. पूर्व कोणती व पश्चिम दिशा कोणती अशा दोन संशयानी युक्त झाले ॥ १९ ॥ यानंतर ज्यात गवत व पाणी पुष्कळ आहे अशा गुहेच्या अर्ध्या भागापर्यंत सर्व मानवांचा पति अशा त्या चक्रवर्तीने अनेक प्रयाण करून ती भूमि ओलांडली ॥ २० ॥ जेथे 'उन्मग्नजला' नदी व निमग्नजला' नदी पूर्व व पश्चिम अशा कुण्डातून निघून सिन्धुनदीला मिळालेल्या आहेत अशा स्थानी ती चक्रवर्तीची सेना पोहोचली ॥ २१ ॥ त्या दोन नद्यांच्या अलिकडच्या तटावर भरतेश्वराने आपल्या सेनेस ठेवले व कौतुकाने त्या दोन नद्यांचा उंच सखलपणा त्याने पाहिला ॥ २२ ॥ - त्यातील एक नदी लाकूड वगैरे वस्तु टाकली तर तिला खाली नेते व दुसरी जलदीने वर उसळून देते. अशा परस्परात विरुद्ध असलेल्या या नद्या येथे कशा तरी एकत्र झाल्या आहेत ॥ २३ ॥ या दोन नद्याना ओलांडून जाण्याचा उपाय काय याचा मनात विचार करणाऱ्या तेथेच असलेल्या भरतेश्वराने शीघ्र स्थपतीला-सुताराला बोलाविले ॥ २४ ॥ ज्यांचे पाणी वर उसळत आहे व खाली जात आहे अशा त्या दोन नद्याना राजा भरताने आपल्या दृष्टीनेच जणु आपल्या ओंजळीत असलेल्या पाण्याप्रमाणे मानले ।।२५।। खालून स्फुरण पावणारा अर्थात् वर उसळणारा मोठा वायु या नदीला वर उसळीत आहे आणि याच्या उलट क्रिया करणारा वरून खाली घुसणारा वायु या नदीमध्ये वाढत आहे त्यामुळे या दोन नद्यांचे वेगळे वेगळे प्रवर्तन होत आहे ॥ २६ ॥ Page #217 -------------------------------------------------------------------------- ________________ २०६) महापुराण (३२-२७ उपनाहादते कोऽन्यः प्रतीकारोऽनयोरिति । भिषग्वर इवारेभे सङक्रमोपक्रम कृती ॥ २७ अमानुषेष्वरण्येषु ये केचन महाद्रुमाः । स तानानाययामास दिव्यशक्त्यनुभावतः ॥ २८ सारदारुभिरुत्तम्भ्य स्तम्भानन्तर्जले स्थिरान् । स्थपतिः स्थापयामास तेषामुपरि सङक्रमम् ॥२९ बलव्यसनमाशंक्य चिरवृत्तौ स धीरधीः । क्षणाग्निष्पादयामास सङक्रम प्रभुशासनात् ॥ ३० कृतः कलकलः सैन्यनिष्ठिते सेतुकर्मणि । तदेव च बलं कृत्स्नमुत्ततार परं तटम् ॥३१ नायकैः सममन्येयुः प्रभुर्गजघंटावृतः । महापथेन तेनैव जलदुर्ग व्यलद्धयत् ॥ ३२ ततः कतिपयैरेव प्रयाणरतिवाहितः । गिरिदुर्ग विलाघ्योदग्गुहाद्वारमवासवत ।। ३३ । निरर्गलोकृतं द्वारं पौरस्त्यैरिभसाधनः । व्यतीत्य प्रभुरस्याद्रेरध्यवास वनावनिम् ॥ ३४ अधिशय्यं गुहागर्भ चिरं मातुरिवोदरम् । लब्धं जन्मान्तरं मेने निःसृतःसनिकैबहिः ॥ ३५ गुहेयमतिगृढघेव गिलित्वा जनतामिमाम् । जरणाशक्तितो नूनमुज्जगाल बहिः पुनः ॥ ३६ ____ या दोन नद्याना पुलावाचून दुसरा कोणता उपाय आहे असे बोलून त्या कुशल स्थपतिसुताराने उत्कृष्ट वैद्याप्रमाणे त्या नद्यातून पार पाडण्याच्या उद्योगाला सुरुवात केली ॥ २७ ॥ यानंतर त्याने आपल्या दिव्य शक्तीच्या सामर्थ्याने मनुष्यरहित अरण्यात जे काही मोठे वृक्ष होते ते आणविले ॥ २८॥ त्या स्थपतिरत्नाने अतिशय मजबूत अशा लाकडांचे खांब बनवून ते पाण्यात हलणार नाहीत अशा रीतीने उभे केले आणि त्यावर त्याने चालण्याचे साधन अशा फळया ठेविल्या ॥२९॥ आपण पूल बनविण्यास फार उशीर केला तर सैन्यावर संकट कोसळेल म्हणन स्थिर बुद्धीच्या त्या स्थपतिरत्नाने भरतेश्वराच्या आज्ञेने फार लौकर सेतूची रचना केली॥३०॥ पूल तयार झाला असता सैन्याने आनंदाने फार कलकलाट केला व नंतर ते सर्व सैन्य त्या नद्यांच्या दुसऱ्या किनाऱ्यावर उतरले ॥ ३१ ॥ ___ मग दुसरे दिवशी हत्तींच्या समुदायाने वेढलेल्या भरतप्रभूने त्याच महामार्गाने जलरूपी संकट उल्लंधिले ॥ ३२ ॥ यानंतर काही दिवस प्रयाण करून पर्वताच्या संकटास उल्लंघून तो भरतप्रभु उत्तरेकडील गुहेच्या द्वाराजवळ आला ।। ३३ ।। तेथे पुढे असलेल्या हत्तीच्या सैन्याने त्या गुहेचे द्वार उघडे केले व ती गुहा ओलांडून या विजयार्धपर्वताच्या वनभूमीवर प्रभु भरताने निवास केला ।। ३४ ॥ मातेच्या उदराप्रमाणे त्या गुहेच्या आतील भागात पुष्कळ दिवस राहून बाहेर आलेल्या सैनिकानी आपला पुनर्जन्म झाला असे जणु मानले ॥ ३५ ।।। ___ या गुहेने अतिशय अधाशीपणाने या सैन्याला जणु गिळले होते पण पचविण्यास असमर्थ झाल्यामुळे जणु तिने त्या सैन्याला पुनः बाहेर टाकिले की काय असे ते सैन्य भासू लागले ॥ ३६॥ Page #218 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२--४४) महापुराण (२०७ व्यजनैरिव शाखा:जयन्वनवीरधाम् । गुहोष्मणा चिरं खिन्नां चमूमाश्वासयन्यरुत् ॥ ३७ तद्वनं पवनाधूतं चलच्छाखाकरोत्करैः । प्रभोरुपागमे तोषाननर्तेव धृतार्तवम् ॥ ३८ पूर्ववत्पश्चिमे खण्ड़े बलागण्या प्रसाधिते । विजेतुं मध्यमं खण्डं साधनैः प्रभुरुद्ययौ ॥ ३९ न करैः पीडितो लोको न भुवः शोषितो रसः । नार्केणेव जनस्तप्तः प्रभुणाभ्यु द्यताप्यदक् ॥४० कोबेरी दिशमास्थाय तपत्येकान्ततः फरः । भानुर्भरतराजस्तु भुवस्तापमपाकरोत् ॥४१ कृतव्यूहानि सैन्यानि संहतानि परस्परम् । नातिभूमि ययुजिष्णोर्न स्वरं परिबभ्रमः ॥ ४२ प्रसाधितानि दुर्गाणि कृतं चाशक्यसाधनम् । परचक्रमवष्टब्धं चक्रिणो जयसाधनैः ॥ ४३ बलवानभियोक्तव्यो रक्षणीयाश्च संश्रिताः । यतितव्यं क्षितित्राणे जिगीषोत्तमीदृशम् ॥ ४४ गुहेच्या उष्णतेने खिन्न झालेल्या सैनिकाना वनलतांचे शाखाग्र हे जणु पंखे त्यानी वारा घालून त्यांना वान्याने आनंदित केले ।। ३७ ।। वाऱ्याने हलविलेले व ज्याला ऋतूतील फुलानी लकडलेले तें वन भरतप्रभूच्या आगमनामुळे आपल्या हलणान्या शाखारूपी हातांचे अभिनय करून आनंदाने जणु नृत्य करीत आहे असे भासले ॥ ३८ ॥ पूर्वीप्रमाणेच म्हणजे पूर्वखण्डाप्रमाणे पश्चिमखंड देखील सेनापतीने जिंकले असता मध्यम म्लेच्छखण्डाला भरतचक्री आपल्या सैन्याच्याद्वारे जिंकण्यास उद्युक्त झाला ॥ ३९ ॥ __ उत्तरदिशेकडे निघालेल्या अशाही भरतचक्रीने सूर्याप्रमाणे करांनी-किरणानी दुसरा अर्थ राजास द्यावयाच्या करानी लोक त्रस्त केले नाहीत. भूमीचा रस सूर्य शोषून घेतो पण भरतप्रभूने पृथ्वीचा रस-आनन्द शोषला नाही नष्ट केला नाही. सूर्य लोकाना संताप देतो पण भरतेशाने कोणाला संतप्त केले नाही ॥ ४० ॥ सूर्य कौबेरी दिशेला-कुबेराच्या उत्तरदिशेला राहून आपल्या किरणानी अतिशय त्रस्त करितो परंतु भरतराजाने उत्तरदिशेकडे प्रयाण करून पृथ्वीला होणारा ताप शान्त केला ॥ ४१ ॥ __ ज्यात अनेक व्यूह-नाना प्रकारच्या गरुडव्यूहादि रचना केल्या आहेत अशी सैन्ये एकमेकाशी संलग्न होती, फुटून वेगळी झाली नव्हती व भरतराजाकडून ती दूरही गेली नव्हती आणि ती स्वच्छंदाने फिरतही नव्हती ॥ ४२ ॥ चक्रवर्तीच्या जयशाली सैन्यानी सर्व किल्ले हस्तगत केले होते. अजिंक्य असे देश जिंकिले. शत्रूच्या सैन्यास प्रतिबंधही केला ॥ ४३ ॥ बलवान शत्रुबरोबर लढावे, जे आपल्या आश्रयास आले आहेत त्यांचे रक्षण करावे. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी यत्न करावा. ही विजेत्याची आचरणपद्धति आहे. विजेता याप्रमाणे वागत असतो ॥ ४४ ॥ Page #219 -------------------------------------------------------------------------- ________________ २०८) महापुराण (३२-४५ इत्यलयबलश्चक्री चक्ररत्नमनुव्रजन् । कियतीमपि तां भूमिमवाष्टम्भोत्स्वसाधन ॥ ४५ तावच्च परचक्रेण स्वचक्रस्य पराभवम् । चिलातावर्तनामानौ प्रभू शुश्रुवतुः किल ॥ ४६ अभूतपूर्वमेतन्नो परचक्रमुपस्थितम् । व्यसनं प्रतिकर्तव्यमित्यास्तां सङ्गती मिथः ॥ ४७ ततो धनुर्धरप्रायं सहाश्वीयं सहास्तिकम् । इतोऽमुतश्च सजग्मे तत्सैन्यं म्लेच्छराजयोः ॥४८ कृतोच्चविग्रहारम्भौ संरम्भं प्रतिपद्य तौ । विक्रम्य चक्रिणः सैन्यर्भेजतुर्विजिगीषुताम् ॥ ४९ तावच्च सुधियो धीराः कृतकार्याश्च मन्त्रिणः । निषिध्य तो रणारम्भावचः पथ्यमिदं जगुः ॥५० न किञ्चिदप्यनालोच्य विधेयं सिद्धिकाम्यता । अनालोचितकार्याणां दवीयस्योऽर्थसिद्धयः ॥५१ कोऽयं प्रभरवष्टम्भी कुतस्त्यो वा कियबलः । बलवानित्यनालोच्य नाभिषेण्यः कथञ्चन ॥५२ विजयार्षाचलोल्लङ्घी नैष सामान्यमानुषः । विध्यो दिव्यानुभावो वा भवेदेष न संशयः ॥ ५३ ज्याचे सामर्थ्य शत्र नष्ट करू शकत नाहीत असा हा भरतचक्री चक्ररत्नाला अनसरून प्रयाण करू लागला व त्याने आपल्या सैन्याच्याद्वारे बरीचशी किती तरी म्लेच्छभूमि व्यापून टाकली ॥ ४५ ॥ - इतक्यात चिलात व आवर्त या दोन म्लेच्छराजानी आपल्या सैन्याचा पराभव झाला ही वार्ता ऐकिली ।। ४६ ॥ शत्रूचे सैन्य हे आमच्यावर चालून आले असे पूर्वी कधी घडले नव्हते. यास्तव हे आलेले संकट दूर करावे असा विचार करून ते दोघे राजे एकत्र झाले ॥ ४७ ।। नंतर ज्यात धनुर्धारी योद्धे पुष्कळ आहेत व ज्यात घोड्यांचे व हत्तींचे सैन्यही पुष्कळ आहे असे त्या दोन म्लेच्छ राजांचे सैन्य इकडून तिकडून येऊन एकत्र झाले ॥ ४८ ॥ ज्यानी फारच मोठ्या लढाईचा उद्योग प्रारंभिला आहे असे ते दोन म्लेच्छराजे क्रुद्ध झाले व चक्रवर्तीच्या सैन्याशी पराक्रम करून त्यानी विजयाची इच्छा धारण केली ॥ ४९ ॥ तितक्यात उत्तम बुद्धीचे, विचारी व पूर्वी ज्यांनी राज्यसंबंधी कार्ये केली आहेत अशा प्रधानानी या चिलात व आवर्त राजानी जो युद्धारंभ केला त्याविषयी त्या दोघांचा निषेध केला व त्या दोघाना त्यानी पुढे वर्णिल्याप्रमाणे हितकर भाषण केले ॥ ५० ॥ ____आपली कार्यसिद्धि व्हावी अशी इच्छा करणान्याने कोणतेही कृत्य विचार न करता करू नये. कारण ज्यानी कार्याचा विचार केला नाही त्यांच्यापासून फलप्राप्ति फार दूर राहतात" ॥५१॥ हा आमच्या सैन्यास अडथळा करणारा राजा कोण आहे, कोठे राहणारा आहे, त्याचे सैन्य किती आहे, त्याचे सामर्थ्य केवढे आहे याचा विचार जर तुम्ही करीत नाही तर तुम्ही त्याच्यावर तुटून पडणे हे तुमचे कार्य बिलकुल योग्य नाही ॥ ५२ ॥ विजयार्धपर्वताला ज्याने उल्लंघिले आहे तो सामान्य मनुष्य नाही. तो देव असेल किंवा दिव्य सामर्थ्यवान् असेल यात आम्हाला संशय वाटत नाही ॥ ५३॥ Page #220 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-६२) ( २०९ तदास्तां समरारम्भः सम्भाव्यो दुर्गसंश्रयः । तदाश्रितैरनायासाज्जेतुं शक्यो रिपुर्महान् ॥ ५४ स्वभावदुर्गमेतन्नः क्षेत्रं केनाभिभूयते । हिमवद्विजयार्द्धाद्रिगङ्गासिन्धुतटावधि ॥ ५५ अन्यच्च देवताः सन्ति सत्यमस्मत्कुलोचिताः । नागमेघमुखा नाम ते निरुन्धन्तु शात्रवान् ॥५६ इति तद्वचनाज्जातजयाशंसौ नरेश्वरौ । देवतानुस्मृति सद्यश्चक्रतुः कृतपूजनौ ॥ ५७ ततस्ते जलदाकारधारिणो घनगर्जिताः । परितो वृष्टिमातेनुः सानिलामनिलाशनाः ।। ५८ तज्जलं जलवोद्गीणं बलमाप्लाव्य जैष्णवम् । अघस्तिर्यगयोध्वं च समन्तादभ्यद्रवत् ॥ ५९ न चेलवनोपमस्यासीच्छिबिरं वृष्टिरोशितुः । बहिरेकार्णवं कृत्स्नमकरोद्वयाप्य रोदसी ॥ ६० छत्ररत्नमुपर्यासीच्चर्मरत्नमधोऽभवत् । ताभ्यामावेष्ट्य तक्रुद्धं बलं स्यूतमिवाभितः ॥ ६१ मध्ये रत्नद्वयस्यास्य स्थितमासप्तमाद्दिनान् । जलप्लवे बलं भर्तुर्व्यक्तमण्डायितं तदा ॥ ६२ महापुराण म्हणून या युद्धाचा आरंभ करणे बरोबर नाही. पण किल्ल्याचा आश्रय करणे योग्य आहे. किल्ल्यात राहिलेल्या तुम्हाकडून आयासावाचून मोठा शत्रूही जिंकणे शक्य आहे ॥५४॥ हिमवान् पर्वत, विजयार्ध पर्वत व गंगासिंधुतटापर्यन्तचा प्रदेश हे ज्याच्या मर्यादा आहेत असा हा आमचा देश स्वाभाविक किल्ल्यासारखा आहे व तो कोणाकडून जिंकला जाणार आहे बरे ? ॥ ५५ ॥ दुसरे असे पाहा की, आमच्या कुलाकडून पूज्य अशा आमच्या कुलदेवता आहेत. ज्यांची नांवे नागमुख व मेघमुख अशी आहेत. त्या शत्रूंना प्रतिबंध करतील ।। ५६ । याप्रमाणे मंत्र्यांच्या भाषणाने ज्यांना आपल्याला जयप्राप्ति होईल अशी अभिलाषा उत्पन्न झाली आहे अशा त्या दोघा राजानी आपल्या देवतांचे स्मरण केले व तत्काल त्यांचे ते दोघे पूजन करू लागले ।। ५७ ।। यानंतर त्या देवतानी मेघांचा आकार धारण केला व त्या खूप गर्जना करू लागल्या. त्या नागमुख देवता वाऱ्यासह सभोवती जलवृष्टि करू लागल्या ॥ ५८ ॥ मेघानी वर्षिलेल्या त्या पाण्याने जयशाली अशा भरताचे सैन्य बुडले व खाली वर बाजूस आणि सभोवती ते पाणी वाहू लागले. चोहीकडे धावू लागले ।। ५९ ।। भरतराजाच्या शिबिरात वस्त्र भिजण्याइतकीही वृष्टि झाली नाही पण त्या छावणीच्या बाहेर मात्र पृथ्वी व आकाशाला व्यापून वृष्टि झाली व ती समुद्राप्रमाणे पसरली ॥ ६० ॥ त्या चक्रवर्तीच्या सैन्यावर छत्ररत्न होते व खाली चर्मरत्न पसरले होते. त्या दोन रत्नांनी सर्व बाजूनी वेढलेले ते चक्रिसैन्य सर्व बाजूनी शिवल्याप्रमाणे रोघले गेले होते ॥ ६१॥ त्या जलप्रलयात चर्मरत्न व छत्ररत्न या दोघांच्यामध्ये सात दिवसपर्यन्त राहिलेले ते जयशाली भरताचे सैन्य त्यावेळी स्पष्टरीतीने अण्डाकर झाले होते ।। ६२ ।। म. २७ Page #221 -------------------------------------------------------------------------- ________________ २१०) महापुराण (३२-६३ चक्ररत्नकृतोधोते रुखद्वावशयोजने । तत्राण्डके स्थितं जिष्णोनिराबाधमभूवलम् ॥ ६३ प्रविभक्तचतुरि सेनान्यान्तः सुरक्षितम् । बहिर्जयकुमारेण ररक्षे किल तलम् ॥ ६४ तदा पटकुटीभेदाः किटिकाश्च विशङ्कटाः । कृताः स्थपतिरत्नेन रवाश्चाम्बरगोचराः ॥ ६५ बहिः कलकलं श्रुत्वा किमेतदिति पार्थिवाः । करं व्यापारयामासुः क्रुखाः कोक्षेयकं प्रति ॥६६ ततश्चक्रधरादिष्टा गणबद्धामरास्तदा । नागानुत्सारयामासुरारुष्टा हुकृतः क्षणात् ॥ ६७ बलवान्कुरराजोऽपि मुक्तसिंहप्रजितः । दिव्यास्त्ररजयनागारयं दिव्यमधिष्ठितः ॥ ६८ तदारणाङ्गणे वर्षन्शरधारामनारतमः । स रेज धृतसन्नाहः प्रावृषेण्य इवाम्बुदः ॥ ६९ तन्मुक्ता विशिखा दीप्रा रेजिरे समराजिरे । द्रष्टुं तिरोहितानागान्दीपिका इव बोधिताः ॥७० ततो निववृते जित्वा नागान्मेघमुखानसो । कुमारो रणसंरम्भात्प्राप्तमेघस्वरश्रुतिः ॥ ७१ ..................................... चक्ररत्नाचा बारा योजनपर्यन्त प्रकाश पसरला असता जयशाली भरतसैन्य त्या अंड्यात बाधारहित असे स्थिर झाले ॥ ६३ ॥ त्या अण्डाकृति अशा तंबूला चार दरवाजे होते व त्यात निवास केलेल्या सैन्याचे संरक्षण सेनापतीकडून केले जात होते व बाहेरून जयकुमार त्याचे रक्षण करीत होता ॥ ६४ ॥ त्यावेळी शिल्पशास्त्रज्ञ अशा स्थपतिरत्नाने अनेक त-हेची वस्त्रांची घरे, तंबू वगैरे आणि किटिका-रुंद मोठी अशी गवताची घरे तयार केली व आकाशात चालणारे रथ तयार केले ॥ ६५ ॥ __ यानंतर बाहेर मोठा गोंगाट होत असलेला ऐकून हे काय आहे असे म्हणून रागावलेल्या राजांनी आपल्या हातात तरवारी धारण केल्या ॥ ६६ ॥ यानंतर चक्रवर्तीने ज्यांना आज्ञा केली असे गणबद्ध नावाचे देव नागदेवावर अतिशय रागावले आणि त्यांनी हुंकारानी तत्काल नागदेवाना पिटाळले, तेथून हाकालून दिले ।। ६७ ॥ सामर्थ्यशाली कुरुराज जयकुमार दिव्य रथावर बसला व मुक्तकंठाने त्याने सिंहाप्रमाणे गर्जना केली व दिव्य अस्त्रानी त्या नागदेवाना जिंकले ॥ ६८ ।। ज्याने अंगावर चिलखत धारण केले आहे असा जयकुमार सेनापति रणभूमीवर येऊन सतत बाणाची वृष्टि करू लागला तेव्हा तो सतत जलवृष्टि करणान्या पावसाळी मेघाप्रमाणे शोभू लागला ।। ६९ ॥ ___ त्या जयसेनापतीने सोडलेले चमकणारे उज्ज्वल बाण रणभूमीत लपून बसलेल्या नागदेवाना हुडकण्यासाठी पाहण्यासाठी जणु दिवट्या पेटविल्या आहेत असे शोभले ।। ७० ॥ ___ यानंतर त्याने नागमुख व मेघमुख या देवाना जिंकले. त्यामुळे त्याला 'मेघस्वर' हे पद मिळाले. नंतर तो युद्धापासून परतला ।। ७१ ।। Page #222 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-७९) महापुराण (२११ कुरुराजस्तवा स्फूर्जत्पर्जन्यस्तनितोजितः । गजितनिर्जयन्मेघमुखान्ख्यातस्तदाख्यया ॥ ७२ तोषितैरवदानेन घोषितोऽस्य जयोऽमरैः । दध्वनदुदुन्दुभिध्वानबधिरीकृतदिङमुखः ॥ ७३ ततो दृष्टावदानोऽयं तुष्टुवे चक्रिणा मुहुः। नियोजितश्च सत्कृत्य वीरो वीराग्रणीपदे ॥ ७४ इन्द्रजाल इवामुष्मिन्व्यतिक्रान्तेऽहिविप्लवे । प्रत्यापत्तिमगाद्भूयो बलमाविर्भवज्जयम् ॥ ७५ विध्वस्ते पन्नगानीके विवलौ म्लेच्छनायकौ । चक्रिणश्चरणावेत्य भयभ्रान्तौ प्रणेमतुः॥ ७६ धनं यशोधनं चास्मै कृतागःपरिशोधनम् । दत्वा प्रसीद देवेति तो भूत्यत्वमुपेयतुः ॥ ७७ निःसपत्नां महीमेनां कुर्वनर्वाजनिधीश्वरः । आहिमाद्रितटाद्भूयः प्रयाणमकरोदलैः ॥ ७८ सिन्धुरोधोभुवः अन्दन् प्रयाणे जयसिन्धुरैः । सिन्धुप्रपातमासीदन् सिन्धुदेव्या न्यषेचि सः ॥७९ ---------- __त्यावेळी वीज पाडण्याच्या पूर्वी मेघ जशी भयंकर गर्जना करितो त्याप्रमाणे तेजस्वी गर्जना करून नागमुख व मेघमुखनामक देवाना जिंकून जयकुमार मेघेश्वर या नावाने प्रसिद्ध झाला ॥ ७२ ॥ ___ या जयकुमाराच्या पराक्रमाने देव आनंदित झाले आणि पुनः पुनः वाजवणाऱ्या नगान्यांच्या आवाजानी ज्यानी सर्व दिशांची मुखे बधिर केली आहेत अशा त्या देवानी या जयसेनापतीचा जय सर्वत्र घोषित केला ॥ ७३ ।। यानंतर जयकुमाराचा पराक्रम चक्रवर्तीच्या दृष्टीस सापडला व त्याने त्याची वारंवार स्तुति केली आणि त्याचा सत्कार करून श्रेष्ठ वीराच्या पदावर-वीराग्रणीच्या पदावर त्याला नियुक्त केले ॥ ७४ ॥ इन्द्रजालाप्रमाणे त्या नागदेवांचा उपद्रव जेव्हां शान्त झाला तेव्हां ज्याला जय प्राप्त झाला आहे असे ते सैन्य पुनः स्वस्थ झाले अर्थात् सुखानुभव घेऊ लागले ।। ७५ ॥ जेव्हा नागांचे सैन्य पळून गेले त्यावेळी ते दोन म्लेच्छराजे बलरहित झाले. भीतीने घाबरे होऊन चक्रवर्तीच्या दोन चरणाकडे ते आले व त्यानी त्यांना नमस्कार केला ।। ७६ ॥ केलेल्या अपराधापासून मुक्तता व्हावी म्हणून त्या दोन राजानी आपले धन आणि यज्ञरूपी धन भरतचक्रीला दिले व हे देवा आमच्यावर प्रसन्न व्हा. असे म्हणून ते भरतेशाचे सेवक झाले ॥ ७७ ॥ ___या निधिपति भरताने येथपर्यन्तची पृथ्वी शत्रुरहित केली आणि नंतर आपल्या सैन्यासह त्याने हिमाचलाच्या तटापर्यन्त पुनः प्रयाण केले ।। ७८ ॥ प्रयाण करीत असताना जयशाली अशा हत्तींच्या द्वारे सिन्धुनदीच्या तटभूमीचे चूर्ण करणारा भरतराजा सिंधुनदी जेथून खाली पडत आहे अशा ठिकाणी आला तेव्हा सिन्धुदेवीने त्याला स्नान घातले ॥ ७९ ॥ Page #223 -------------------------------------------------------------------------- ________________ २१२) महापुराण (३२-८० ज्ञात्वा समागतं जिष्णुं देवी स्वावासगोचरम् । उपेयाय समुदत्य रत्नाघं सारच्छदा ॥ ८० पुण्यैः सिन्धुजलैरेनं हेमकुम्भशतोद्धृतः । साभ्यषिञ्चत्स्वहस्तेन भद्रासननिवेशितम् ॥ ८१ कृतमङ्गलनेपथ्यमभ्यनन्दज्जयाशिषा । देव त्वद्दर्शनादद्य पूतास्मीत्यवदच्च तम् ॥ ८२ तत्र भद्रासनं दिव्यं लब्ध्वा तदुपढौकितम् । कृतानुव्रजनां किञ्चिसिन्धुदेवीं व्यसर्जयत् ॥ ८३ हिमाचलमनुप्राप्तस्तत्तटानि जयं जयम् । कश्चित्प्रयाणकः प्रापद्धिमवत्कूटसन्निधिम् ॥ ८४ पुरोहितसरवस्तत्र कृतोपवसनक्रियः। अध्यशेत शुचि शय्यां दिव्यास्त्राण्यधिवासयन् ॥ ८५ विधिरेष न चा शक्तिरिति सम्भावितो नृपः । स सज्यमकरोच्चापं वज्रकाण्डमयत्नतः ॥ ८६ तत्रामोघं शरं दिव्यं समधत्तोर्ध्वगामिनम् । वैशाखस्थानमास्थाय स्वनामाक्षरचिह्नितम् ॥ ८७ मुक्तसिंहप्रणादेन यदा मुक्तः शरोऽमुना । तदा सुरगणैस्तुष्टैर्मुक्तोऽस्य कुसुमाञ्जलिः ॥ ८८ जयशाली भरतराजा आपल्या प्रासादाच्या भूप्रदेशावर आला आहे असे जाणून ती देवता आपल्या परिवारासह अमूल्य रत्नांचा अर्घ्य घेऊन आली ॥ ८० ॥ तिने त्याला भद्रासनावर बसविले आणि सुवर्णाच्या शेकडो कुंभात भरलेल्या सिन्धुनदीच्या पवित्र पाण्यानी तिने त्याला आपल्या हाताने स्नान घातले ॥ ८१ ॥ __ ज्याने मंगलवेष धारण केला आहे अशा भरतप्रभूला तिने जयकारक आशीर्वादानी आनन्दित केले व हे प्रभो, आज तुझ्या दर्शनाने मी पवित्र झाले असे ती त्याला म्हणाली ॥८२॥ सिन्धुदेवीने आपल्या प्रासादात भरतेशाला देण्यासाठी दिव्य भद्रासन आणिले होते ते तिने त्याला दिले व ती त्याला काही मार्गापर्यन्त अनुसरली आणि नंतर त्याने तिचे विसर्जन केले अर्थात् घरी परत जाण्यास परवानगी दिली ॥ ८३ ॥ । जेव्हा भरतराजा हिमाचल पर्वताकडे आला तेव्हां त्याच्या तटाचे अनेक प्रदेश त्याने जिंकिले व असे जिंकीत तो काही ठिकाणी मुक्काम करीत करीत हिमवान् पर्वताच्या शिखरावर आला ॥ ८४ ॥ तेथे पुरोहित ज्याचा मित्र आहे अशा भरतेशाने उपवास केला व दिव्यास्त्रांची दीपधूपादिकांनी पूजा करून तो भाग्यशाली आपल्या पवित्र शय्येवर निजला ॥ ८५ ॥ शस्त्रांची पूजा करणे हा परंपरेने चालत आलेला विधि आहे तो असमर्थपणा नाही असे मानून भरतेशाचा राजानी आदर केला. यानंतर वज्रकाण्ड नावाचे धनुष्य भरतप्रभूने अनायासाने सज्ज केले त्याला त्याने दोरी लावली ॥ ८६ ॥ एकवितीचे अन्तर आपल्या दोन पायात ठेवून चक्रवर्ती उभा राहिला. त्याने आपल्या बाणावर आपले नाव लिहिले व तो अमोघ दिव्य बाण अवश्य कार्यसिद्धि करून देणारा व आकाशात वर जाणारा असल्यामुळे तो बाण त्याने आपल्या धनुष्याला जोडला ॥ ८७ ॥ सिंहाप्रमाणे गर्जना करून जेव्हां तो बाण चक्रवर्तीने सोडला त्यावेळी आनंदित झालेल्या देवसमूहानी त्याच्यावर पुष्पांची वृष्टि केली ॥ ८८ ॥ Page #224 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-९६) महापुराण स शरो दूरमुत्पत्य क्वचिदप्यस्खलद्गतिः । सम्प्रापद्धिमवत्कूटं तद्वेश्माकम्पयत्पतन् ॥ ८९ स मागधवदाध्याय ज्ञातचक्रधरागमः। उच्चचाल चलन्मौलिस्तनिवासी सुरोत्तमः ॥९० सम्प्राप्तश्च तमुद्देशं यमध्यास्ते स्म चक्रभृत् । दरोपरुद्धसंरम्भो धनुमिसकृत्स्पृशन् ॥ ९१ तुङ्गोऽयं हिमवानद्रिरलङध्यश्च पृथग्जनः । लङधितोऽद्य त्वया देव त्वद्वत्तमतिमानुषम् ॥ ९२ विप्रकृष्टान्तराः क्वास्मदावासाः क्व भवच्छरः । तथाप्याकम्पितास्तेन पततैकपदे वयम् ॥ ९३ त्वत्प्रतापः शरव्याजादुत्पतन्गगनाङ्गणम् । गणबद्धपदे कर्तुमस्मानाहृतवान्ध्रुवम् ॥ ९४ ।। विजिताब्धिः समाक्रान्तविजयागहोदरः। हिमाद्रिशिखरेष्वद्म जम्भते ते जयोद्यमः ॥ ९५ जयवादोऽनुवादोयं सिद्धदिग्विजयस्य ते । जयतानन्दताज्जिष्णो वद्धिषीष्ट भवानिति ॥ ९६ त्या बाणाची उर्ध्वगति कोठेही अडखळली नाही. अशारीतीने तो बाण दूरवर गेला आणि हिमवान् पर्वताच्या शिखरावरील त्या हिमवान् देवाच्या घराला कंपित करून तेथे पडला ॥ ८९ ॥ त्या हिमाचलवासी देवाने मागध देवाप्रमाणे विचार करून चक्रवर्तीचे आगमन झाले असे ओळखले व ज्याचा किरीट चंचल होत आहे असा तो तेथील निवासी उत्तम देव तेथून निघाला व आपला कोप थोडासा आवरून व धनुष्याच्या दोरीला वारंवार झटके देत चक्रवर्ती जेथे उभा राहिला होता तेथे तो आला ॥ ९०-९१ ॥ व भरतचक्रवर्तीला असे म्हणाला, " हे प्रभो, हा हिमवान् पर्वत उंच आहे व सामान्य माणसाना उल्लंघन करण्यास अशक्य आहे पण आपण आज तो ओलांडला आहे म्हणून आपले चरित्र मनुष्याला उल्लंघणारे अर्थात् लोकोत्तर आहे ॥ ९२ ॥ हे प्रभो, ज्याचे अन्तर फार दूर आहे असे आमचे राहण्याचे प्रदेश कोणीकडे व आपला हा बाण कोणीकडे तथापि आमच्या ठिकाणात अकस्मात् येऊन पडणाऱ्या आपल्या बाणाने आम्हाला एकदम कंपित केले आहे ॥ ९३ ॥ हे प्रभो, आपला पराक्रम बाणाच्या मिषाने आकाशात उंच वर जाऊन त्याने आम्हाला गणबद्ध अमरामध्ये प्रविष्ट करण्यासाठी येथे निश्चयाने आणले आहे असे वाटते ॥९४॥ हे प्रभो, आपल्या जयोद्योगाने प्रथमतः समुद्राला जिंकिले. यानंतर विजयार्द्ध पर्वताच्या गुहेचा आतील सर्व भाग त्याने व्याप्त केला आणि आज या हिमवान् पर्वताच्या शिखरावर तो वृद्धिंगत होत आहे ।। ९५ ॥ हे प्रभो, आपण विजयी व्हा, आपला आनंद वृद्धिंगत होवो, हे जयशालिन् आपण सर्व संपदानी खूप वृद्धिंगत व्हा असे आशीर्वाद आपणास देणे म्हणजे आपण प्राप्त करून घेतलेला जो संपूर्ण दिग्विजय त्याचा आम्ही अनुवाद करणेच होय असे आम्हाला वाटते ॥९६॥ Page #225 -------------------------------------------------------------------------- ________________ २१४) महापुराण (३२-९७ समुच्चरज्जयध्वानमुखरः स सुरैः समम् । प्रभुं सभाजयामास सोपचारं सुरोत्तमः ॥ ९७ अभिषिच्य च राजेन्द्रं राजवद्विधिना ददौ । गोशीर्षचन्दनं सोऽस्मै सममौषधिमालया ॥ ९८ त्वद्भुक्तिवासिनो देव दूरानमितमौलयः । देवास्त्वामामनन्त्येते त्वत्प्रसादाभिकांक्षिणः ॥ ९९ धेहि देव ततोऽस्मासु प्रसादतरलां दृशम् । स्वामिप्रसादलाभो हि वृत्तिलाभोऽनजीविनाम् ॥१०० निदेशरुचितश्चास्मान्सम्भावयितुमर्हसि । वृत्तिलाभादपि प्रायस्तल्लाभः किडफरैर्मतः ॥ १०१ मानयन्निति तद्वाक्यं स तानमरसत्तमान् । व्यसर्जयत्स्वसात्कृत्य यथास्वं कृतमाननात् ॥ १०२ हिमवज्जयशंसोनि मङ्गलान्यस्य किन्नराः । जगुस्तत्कुञ्जदेशेषु स्वैरमारब्धमूर्च्छनाः ॥ १०३ असकृत्किन्नरस्त्रीणामातन्वानाः स्तनावृतीः । सरोवीचिभिदो मन्दमावस्तद्वनानिलाः ॥१०४ स्थलाब्जिनीवनाद्विष्वक्किरन् किञ्जल्कजं रजः। हिमो हिमाद्रिकुञ्जभ्यस्तं सिषेवे समीरणः ॥१०५ आपल्या सर्व देवासह भरतेशाचा जयजयकार करण्यात ज्याचे मुख तत्पर झाले आहे अशा त्या श्रेष्ठ हिमवान् नावाच्या देवाने सर्व आदराच्या प्रकारानी प्रभु भरताची सेवा केली ॥ ९७ ॥ त्या हिमवान् देवाने राजाचा अभिषेक करण्याच्या विधीने राजेन्द्र भरताचा अभिषेक केला व वनपुष्पमालेसह भरतेशाला गोशीर्षचन्दन दिले ।। ९८ ॥ हे देवा, आपल्या प्रसादाची अभिलाषा करणारे आम्ही दूरूनच आपली मस्तके नम्र केली आहेत. हे देवा, आम्ही तुझ्या भोग्यप्रदेशात राहत आहोत ॥ ९९ ॥ ___ हे देवा, आम्हावर आपण कृपेने चंचल अशी दृष्टि फेका कारण मालकाची नोकराविषयी जी संतोषवृत्ति असते ती नोकरांना आपल्याला वेतन मिळण्यासारखी वाटते ।। १०० ॥ हे प्रभो, आम्हाला योग्य आज्ञा करून आपण आमच्यावर अनुग्रह करावा कारण की उपजीविकेच्या लाभापेक्षाही मालकाची कार्य करण्यासाठी आज्ञा मिळणे फार महत्त्वाचे असते असे नोकराना वाटत असते ॥ १०१॥ याप्रमाणे त्या हिमवान् देवाचे भाषण मान्य करणाऱ्या भरतराजाने त्या सर्व उत्तम देवांचा सत्कार केला व त्याना आपल्या आधीन करून त्याना पाठवून दिले ॥ १०२॥ त्यावेळी आपल्या इच्छेप्रमाणे स्वरामध्ये चढ व उतार करणारे किन्नरदेव तेथील लतागृहांच्या प्रदेशात भरतप्रभूने हिमवान् देवाला जिंकले या विषयाचे मंगलगीत गाऊ लागले ॥ १०३ ॥ . त्यावेळी तेथे वारंवार किन्नरस्त्रियांना आपल्या स्तनावरील वस्त्राना वारंवार आच्छादित करविणारे व सरोवराच्या तरंगाना वेगळे वेगळे करणारे असे लागले ॥ १०४॥ स्थलकमलिनींच्या वनापासून चोहोकडे केसरांचा पराग पसरणारा, हिमपर्वताच्या लतागृहातून बाहेर वाहणारा थंड वारा महाराज भरताची सेवा करू लागला ॥ १०५ ॥ Page #226 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-११४) महापुराण (२१५ स्थलाम्भोरुहिणीवास्य कीतिः माकं जयश्रिया। हिमाचलनिकुञ्जेषु पप्रथे दिग्जयाजिता॥१०६ हिमाचलस्थलेष्वस्य तिरासीत्प्रपश्यतः । कृतोपहारकृत्येषु स्थलाम्भोजैविकस्वरः ॥१०७ ।। तमुच्चैर्वृत्तिमाक्रान्तदिक्चक्रं विघृतायतिम् । स्वमिवानल्परत्नद्धिहिमाद्रि बह्वमस्त सः॥१०८ अत्रान्तरे गिरीन्द्रेऽस्मिन्व्यापारितदृशं प्रभुम्। विनोदयितुमित्युच्चैः पुरोधा गिरमभ्यधात्॥१०९ हिमवानयमुत्तुङ्गः सङ्गतः सततं श्रिया। कुलक्षोणीभृतां धुर्यो धत्ते युष्मदनुक्रियाम् ॥ ११० अहो महानयं शैलो दुरारोहो दुरुत्तरः । शरसन्धानमात्रेण राद्धो युष्मन्महोदयात् ॥ १११ चित्ररलङकृता रत्नरस्य श्रेणी हिरण्मयी। शतयोजनमात्रोच्चा टङ्कच्छिन्नेव भात्यसौ ॥ ११२ स्वपूर्वापरकोटिभ्यां विगाह्य लवणार्णवम्। स्थितोऽयं गिरिराभाति मानदण्डायितो भुवः॥११३ द्विविस्तृतोऽयमद्रीन्द्रो भरताद्धरतर्षभ । मूले चोपरिभागे च तुल्या विस्तारसम्मितिः ॥ ११४ सर्व दिशा जिंकल्यामुळे मिळविलेली या भरतराजाची कीर्ति जयलक्ष्मीला बरोबर घेऊन स्थलकमलिनीप्रमाणे हिमवान् पर्वताच्या लतागृहामध्ये चोहीकडे पसरली ॥ १०६ ॥ प्रफुल्ल झालेल्या स्थलकमालांचा जणु ज्यानी आपणास नजराणा दिला आहे अशा हिमवान् पर्वताच्या स्थलाना पाहून या भरतराजाला फार आनंद वाटला ॥ १०७ ।। सर्वापेक्षा उंच असलेला, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत व जो अति विस्तीर्ण आहे व स्वतःप्रमाणे विपुल रत्नसंपत्ति ज्याने धारण केली आहे अशा हिमालयाला भरतेश्वराने फार मानले अर्थात् त्याला तो स्वतःप्रमाणे समजून आनंदित झाला ॥ १०८ ॥ ___या प्रसंगी त्या पर्वताकडे ज्याने आपली नजर फेकली आहे अशा भरतराजाचे मन रमविण्याकरिता पुरोहिताने याप्रमाणे भाषण केले ॥ १०९ ।। ___ हा हिमवान् पर्वत अतिशय उंच आहे व नेहमी शोभेने युक्त आहे, संपत्तीने युक्त आहे व सर्व कुलपर्वतात श्रेष्ठ आहे व नेहमी उन्नत व नेहमी लक्ष्मीने शोभित व सर्व राजामध्ये श्रेष्ठ अशा तुझे अनुकरण करीत आहे ॥ ११० ॥ हा महापर्वत चढण्याला कठिण व उतरण्यालाही कठिण आहे. पण आपल्या विलक्षण पुण्योदयाने धनुष्याला बाण जोडण्यानेच हे राजन् हा आपल्या ताब्यात आला याचे आम्हाला आश्चर्य वाटते ॥ १११ ।।। याची सुवर्णमय पंक्ति नानाविध रत्नानी शोभत आहे व शंभर योजने उंच आहे व टाकीने जणु घडविल्याप्रमाणे वाटत आहे ॥ ११२ ॥ याने आपल्या पूर्व व पश्चिम अशा दोन टोकानी लवणसमुद्रात प्रवेश केला आहे, असा हा पर्वत पृथ्वीला मोजण्यासाठी जणु काठीप्रमाणे भासत आहे ॥ ११३ ॥ हे श्रेष्ठ भरता हा पर्वत भरतक्षेत्रापेक्षा दुप्पट विस्ताराचा आहे व हा मूलभागी, मध्यभागी आणि वरच्या भागातही समान विस्ताराचा आहे ।। ११४ ॥ Page #227 -------------------------------------------------------------------------- ________________ २१६) महापुराण (३२-११५ अस्यानुसानु रम्येयं वनराजी विराजते । शश्वदध्युषिता सिद्धविद्याधरमहोरगैः ॥ ११५ तटाभोगा विभान्त्यस्य ज्वलन्मणिविचित्रिताः। चित्रिता इव सङक्रान्तः स्वर्वधूप्रतिबिम्बकैः॥११६ पर्यटन्ति तटेष्वस्य सप्रेयस्यो नभश्चराः । स्वरसम्भोगयोग्येषु हारिभिर्लतिकागृहैः ॥ ११७ विविक्तरमणीयेषु सानुष्वस्य धृतोत्सवाः । न ति दधतेऽन्यत्र गीर्वाणाः साप्सरोगणः ॥ ११८ पर्यन्तस्य वनोद्देशा विकासिकुसुमस्मिताः। हसन्तीवामरोद्यानश्रियमात्मीयया श्रिया ॥ ११९ स्वेन मूर्ना बिभत्र्येष श्रियं नित्यानपायिनीमास्मार्ताः स्मरन्ति यां शच्याः सौभाग्यमवर्षिणीम्।।१२० मूनि पद्मह्रदोऽस्यास्ति धृतश्रीबहुवर्णनः । प्रसन्नवारिरुत्फुल्लहेमपङ्कजमण्डनः ॥ १२१ हृदस्यास्य पुरः प्रत्यक्तोरणद्वारनिर्गते । गङ्गासिन्धू महानद्यौ धत्तेऽयं धरणीधरः ॥ १२२ सरितं रोहितास्यां च दधात्येष शिलोच्चयः । तदुदक्तोरणद्वाराग्निःमृत्योदङमुखीं गताम् ॥१२३ याच्या प्रत्येक शिखरावर सुंदर वनपंक्ति शोभत आहे व तेथे नेहमी सिद्धजातीचे देव, विद्याधर आणि महोरय हे देव नेहमी राहतात ।। ११५ ॥ या पर्वताच्या विस्तृत तटप्रदेश चमकणाऱ्या मण्यानी चित्रविचित्र दिसतात व स्वर्गातील देवांगनांच्या प्रतिबिंबामुळे चित्रे काढल्याप्रमाणे वाटतात ॥ ११६ ॥ या पर्वताच्या तटप्रदेशावर आपल्या स्त्रियासह विद्याधर स्वच्छंदाने विहार करितात. याचे तटप्रदेश सुंदर लतागृहानी युक्त आहेत त्यामुळे ते स्वच्छंदाने क्रीडा करण्यास योग्य आहेत ॥ ११७ ।। एकान्त रमणीय म्हणजे अत्यंत सुंदर अशा याच्या तटावर देव आपल्या देवांगनाच्या समूहासह आनंदित होऊन क्रीडा करितात. त्याना इतर ठिकाणी क्रीडा करण्यात मौज वाटत नाही ॥ ११८ ॥ या पर्वताच्या कड्यावरील प्रदेश प्रफुल्ल फुलानी युक्त असल्यामुळे आपल्या शोभेने ते देवाच्या उद्यान शोभेला जणु हसत आहेत असे दिसतात ॥ ११९ ।। इन्द्राणीच्या सौभाग्यसंपत्तीचा गर्व हरण करणारी शोभा हा पर्वत आपल्या शिखरानी धारण करीत आहे व ही शोभा नित्य टिकणारी व कधीही नाश न पावणारी आहे असे विद्वान् लोक या शोभेचे स्मरण करितात-वर्णन करितात ।। १२० ॥ हा पर्वत आपल्या मस्तकावर अत्यंत शोभा धारण करणारा व ज्याचे वर्णन पुष्कळ केले जाते असे पद्मसरोवर धारण करीत आहे. त्याचे पाणी नेहमी स्वच्छच असते व ते पद्म सरोवर प्रफुल्ल सुवर्णकमलरूपी अलंकार धारण करीत आहे ॥ १२१ ॥ या सरोवराच्या पूर्व व पश्चिमेच्या कमानी दरवाज्यातून गंगा व सिन्धु या दोन नद्या निघालेल्या आहेत व त्याना हा पर्वत धारण करीत आहे ॥ १२२ ॥ याच सरोवराच्या उत्तर द्वारापासून निघून उत्तर मुखाने वाहत गेलेली रोहितास्या नावाच्या नदीलाही हा पर्वत धारण करीत आहे ।। १२३ ॥ Page #228 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-१२९) महापुराण (२१७ महापगाभिरित्याभिरलङध्याभिविभात्ययम्। तिसृभिःशक्तिभिः स्वंवा भूभृद्भाव विभावयन्।।१२४ शिखरैरेष कुत्कोलः कीलयन्निव खाङ्गणम् । सिद्धाध्वानं रुणद्धीद्धैः पराद्धर्चेरुद्धदिङमुखैः ॥ १२५ परश्शतमिहाद्रीन्द्रे सन्त्यावासाः सुधाशिनाम् । येऽनल्पां कल्पजां लक्ष्मी हसन्तीव स्वसम्पदा ॥१२६ इत्यनेकगणेऽप्यस्मिन् दोषोऽस्त्यको महान् गिरौ। यत्पर्यन्तगतान्धत्ते गुरुरप्यगुरुदुमान् ॥ १२७ अलाध्यमहिमोदनो गरिमाक्रान्तविष्टपः । जगद्गुरोः पुरोराभामयं धत्ते घराधरः ॥ १२८ इत्यस्याद्रेः परां शोभा शंसत्यच्चैः पुरोधसि । प्रशशंस तमद्रीन्द्र सम्प्रीतो भरताधिपः ॥ १२९ हा पर्वत ज्याचे उल्लंघन कोणी करू शकत नाही अशा तीन महानद्याना धारण करीत असल्यामुळे प्रभुशक्ति-सामर्थ्य धारण करणे, उत्साहशक्ति-खूप धैर्य धारण करणे व मन्त्रशक्ति-सल्लामसलत करण्याची बुद्धि अशा तीन शक्तीना धारण करणाऱ्या राजाप्रमाणे हा पर्वत आपला भूभृद्भाव- राजेपणा व दुसरा अर्थ पर्वतपणा लोकाना दाखवीत आहे असा जणु शोभत आहे ।। १२४ ।। सर्व दिशाना ज्यानी अडविले आहे अशा अतिशय उत्कृष्ट प्रकाशमान रत्नसमूहानी युक्त अशा आपल्या शिखरानी आकाशाच्या अंगणास खिळून टाकणारा हा पर्वत सिद्धदेवांच्या मार्गाला जणु अडवित आहे ॥ १२५ ।। या पर्वतराजावर देवांची शेकडो निवासस्थाने आहेत व ती आपल्या सम्पदेने विपुल अशा स्वर्गीय लक्ष्मीला जणु हसत आहेत असे वाटते ।। १२६ ॥ याप्रमाणे हा महापर्वत अनेक गुणानी युक्त असूनही एक मोठा दोष यात आहे तो असा- हा पर्वत गुरु मोठा असूनही आपल्याजवळ अगुरु-लहान-द्रुमान् झाडाना धारण करीत आहे. हा विरोध आहे. विरोधपरिहार असा- हा पर्वत आपल्या चोहोबाजूनी अगुरुनामक चन्दनाची झाडे धारण करतो ।। १२७ ॥ हा पर्वत जगताचे गुरु अशा वृषभजिनेश्वराची शोभा-धारण करीत आहे. त्यांच्याशी सारखेपणा धारण करीत आहे. भगवान् वृषभजिनेश्वर आपल्या अलङध्य माहात्म्याने युक्त आहेत व हा पर्वतही आपल्या अलंध्य मोठेपणामुळे उदग्र-उंच आहे. भगवान् वृषभ जिनेश्वरानी आपल्या गरिमेने- अतिशय पूज्य गुरुपदाने सर्व जगाला व्याप्त केले आहे. या पर्वतानेही आपल्या गरिमेने अतिशय वजनदारपणाने सगळ्या जगाला व्याप्त केले आहे. भगवंताचा गुरुपणा सर्व जगात प्रसिद्ध आहे तसा या पर्वताचा वजनदारपणाही प्रसिद्ध आहे. याने आपल्या विस्ताराने लोकाचा बराच मोठा भाग व्याप्त केला आहे ।। १२८॥ याप्रमाणे पुरोहिताने या पर्वताच्या मोठ्या शोभेचे खूप वर्णन केलेले ऐकून आनंदित झालेल्या भरतेश्वराने त्या हिमवान् पर्वताची खूप प्रशंसा केली ॥ १२९ ॥ म. २८ Page #229 -------------------------------------------------------------------------- ________________ (३२-१३० स्वभुक्तिक्षेत्रसीमानं सोऽभिनन्द्य हिमाचलम् । प्रत्यावृत्तत्प्रभुर्द्रष्टुं वृषभाद्रिं कुतूहलात् ॥ १३० यो योजनशतोच्छ्रायो मूले तावच्च विस्तृतः । तदर्धविस्तृतिर्मूनि भुवो मौलिरिवोद्गतः ॥ १३१ यस्योत्सङ्गभुवो रम्याः कदलीषण्डमण्डितैः । सम्भोगाय नभोगानां कल्पन्ते स्म लतालयैः ॥ १३२ सनागम सनागैश्च सपुन्नागैः परिष्कृतम् । यदुपान्तवनं सेव्यं मुच्यते जातु नामरैः ॥ १३३ स्वतटस्फाटिकोत्सर्पत्प्रभादिग्धहरिन्मुखम् । शरदभ्रंरिवारब्धवपुषं सनभोजुषम् ॥ १३४ तं शैलं भुवनस्यैकं ललामेव निरूपयन् । कलयामास लक्ष्मीवान्स्वयशःप्रतिमानकम् ॥ १३५ तमेकपाण्डुरं शैलमाकल्पान्तमनश्वरम् । स्वयशोराशिनीकाशं पश्यन्नभिननन्द सः ॥ १३६ सोऽचलः प्रभुमायान्तं मायान्तमखिलद्विषाम् । प्रत्यग्रहीदिवाभ्येत्य विष्वद्रयग्भिर्वनानिलः ॥ १३७ तत्तटोपान्तविश्रान्तखचरोरग किन्नरः । प्रोद्गीयमानममलं शुश्रुवे स्वयशोऽमुना ।। १३८ २१८) महापुराण आपल्या भोग्यप्रदेशाची सीमा असलेल्या हिमवान् पर्वताची प्रशंसा करून यानंतर वृषभाचल पर्वतास पाहण्याकरिता कौतुकाने भरतराजा परत निघाला ।। १३० ।। जो पर्वत शंभर योजने उंच व मूळभागीही तेवढाच विस्तृत आहे आणि मस्तकावर अर्ध्या विस्ताराचा म्हणजे पन्नास योजने विस्तृत आहे व वरचा भाग पृथ्वीचे जणु मस्तक असा उंच गेलेला आहे ।। १३१ ॥ ज्याच्या तटावरील रमणीय प्रदेश केळीच्या वनानी शोभत होता व तेथील लतागृहे विद्याधराना उपभोगासाठी क्रीडा करण्यासाठी योग्य होते ।। १३२ ॥ नाग नांवाच्या वृक्षानी युक्त, पुन्नागवृक्ष व असाणावृक्ष यानी शोभत असलेले व उपभोगण्यास योग्य असे ज्या पर्वताच्या जवळचे वन देवाकडून केव्हाही सोडले जात नाही हे वन नेहमी देवाकडून सेविले जाते ॥ १३३ ॥ आपल्या तटावरील स्फटिकमण्याच्यावर पसरणाऱ्या कान्तीनी ज्याने दिशांची मुखे लिप्त केली आहेत, शुत्र केली आहेत, असा शरत्कालच्या शुभ्र मेघानी जणु ज्याचे शरीर बनले आहे व जो देव विद्याधरानी युक्त आहे, जणु जगाचा एक अलंकार की काय, असा तो पर्वत भरतेशाने पाहिला. लक्ष्मीसंपन्न अशा त्या चक्रीने आपल्या यशाचे जणु प्रतिबिंब आहे असे मानिले ।। १३४ -१३५ ।। तो पर्वत अगदी स्वच्छ पांढरा होता. कल्पान्तकालापर्यन्त नष्ट न होणारा व आपल्या यशः समूहासारखा भासणारा अशा त्याला पाहून भरत आनंदित झाला ।। १३६ । सर्व शत्रूंच्या कपटाचा नाश करणारा प्रभु भरत आपल्याकडे येत आहे असे जाणून जणु तो पर्वत चोहीकडे पसरणाऱ्या अशा वायूनी त्याच्याजवळ जाऊन त्याचा सत्कार करीत आहे काय असा भासला ।। १३७ ॥ त्यांच्या तटाजवळ विश्रान्ति घेत असलेले जे विद्याधर, नागदेव व किन्नर यांच्याकडून गायिले जाणारे आपले निर्मलयश या भरताने ऐकिले ।। १३८ ॥ Page #230 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-१४७) महापुराण (२१९ --------..-- जयलक्ष्मीमुखालोकमङ्गलादर्शविभ्रमाः । तत्तटीभित्तयो जहुर्मनोऽस्य स्फटिकामलाः ॥ १३९ अधिमेखलमस्यासोच्छिलाभित्तिषु चक्रिणः । स्वनामाक्षरविन्यासे धृतिविश्वक्षमाजितः ॥ १४० काकिणीरत्नमादाय यदा लिलिखिषत्ययम् । तदा राजसहस्राणां नामान्यत्रक्षताधिराट् ॥ १४१ असङख्यकल्पकोटीषु येऽतिक्रान्ता धराभुजः । तेषां नामभिराकोणं तं पश्यन्स विसिष्मिये ॥ १४२ ततः किञ्चित्स्खलद्गो विलक्षीभूय चक्रिराट् । अनन्यशासनामेनां न मेने भरतावनिम् ॥ १४३ स्वयं कस्यचिदेकस्य निरस्यन्नामशासनम् । स मेने निखिलं लोकं प्रायःस्वार्थपरायणम् ॥ १४४ अथ तत्र शिलापट्टे स्वहस्ततलनिस्तले । प्रशस्तिमित्युदात्तार्था व्यलिखत्स यशोधनः ॥ १४५ स्वस्तीक्ष्वाकुकुलव्योमतलप्रालेयदीधितिः । चातुरन्तमहीभर्ता भरतः शातमातुरः ॥ १४६ श्रीमानानम्रनिःशेषखचरामरभूचरः । प्राजापत्यो मनुर्मान्यः शूरः शुचिरुदारधीः ॥ १४७ या वृषभाचलाच्या तटभिती स्फटिकाप्रमाणे अतिशय निर्मल होत्या. त्यामुळे जयश्रीला आपले मुख पाहण्यास मंगल दर्पणाप्रमाणे त्या भासत असत. त्या तटभितीनी या भरतराजाचे मन आकर्षिले होते ॥ १३९ ॥ सर्व पृथ्वीला जिंकणाऱ्या या भरतराजाला या पर्वताच्या तटावर असलेल्या शिलारूपी भितीवर आपल्या नांवाची अक्षरे खोदण्याविषयी मोठा आनंद वाटला ।। १४० ॥ जेव्हा काकिणीरत्न घेऊन या चक्रवर्तीला आपली प्रशस्ति लिहिण्याची इच्छा झाली तेव्हा या अधिराजाला या तटावरच्या शिलावर हजारो राजांची नावे दिसली ।। १४१ ॥ असंख्यातकोटिकल्पकालात जे चक्रवर्ती होऊन गेले त्यांच्या नावानी तो सगळा तट कोरला गेला आहे असे भरतराजाला आढळून आले व त्यामुळे त्याला आश्चर्य वाटले ।।१४२।। त्यामुळे त्याचा थोडासा गर्वही गळून गेला. तो भरतचक्री खिन्न झाला व ही भरत पृथ्वी इतरांच्या शासनाखाली नांदत नाही अर्थात् माझेच शासन या सर्व पृथ्वीवर आहे अशी त्याची कल्पना गळून गेली व असंख्य चक्रवर्तीनी हिच्यावर आपले शासन चालविले होते असे त्याला वाटू लागले ।। १४३ ॥ यानंतर स्वतः कोणाच्या तरी नावाचे शासन त्याने पुसून टाकले व तो सर्व लोक प्रायः स्वार्थ परायण असतात असे मानू लागला. त्या तटावर स्वतःची प्रशस्ति लिहिण्यास जागा नसल्यामुळे त्याने दुसऱ्याची प्रशस्ति मोडून टाकली ॥ १४४ ।। यानंतर कीति हेच धन आहे असे समजणाऱ्या त्या भरतचक्रीने आपल्या हाताच्या तळव्याप्रमाणे स्निग्ध गुळगुळीत असलेल्या त्या शिलापट्टावर गंभीर अर्थाने अभिप्रायाने युक्त अशी प्रशस्ति लिहिलो ।। १४५ ।। स्वस्ति- जो इक्ष्वाकु कुलरूपी आकाशात चन्द्र आहे व जो चार जिचे शेवट आहेत. अशा पृथ्वीचा पति आहे. शंभर जिला पुत्र झाले अशा मातेचा जो पुत्र आहे अशा त्याचे भरत. असे नांव आहे. तो लक्ष्मीसंपन्न आहे व सर्व विद्याधर, देव आणि सर्व भूमिगोचरी राजे यांना त्याने वश केले आहे, तो प्रजापति श्रीवृषभ जिनेश्वराचा पुत्र आहे, तो सोळावा मान्य मनु आहे, तो शर, पवित्र व उदार बुद्धिधारक आहे ।। १४६-१४७ ।। Page #231 -------------------------------------------------------------------------- ________________ २२० ) (३२-१४८ चरमाङ्गधरो धीरो धौरेयश्चक्रधारिणाम् । परिक्रान्तं धराचक्रं जिष्णुना येन दिग्जये ॥ १४८ यस्याष्टादशकोटयोऽश्वा जलस्थलविलङ्घिनः । लक्षाश्चतुरशीतिश्च मदेभा जयसाधने ॥ १४९ यस्य दिग्विजये विष्वग्बलरेणुभिरुत्थितैः । सदिङ्मुखं स्वमारुद्धं कपोतगलकर्बुरैः ॥ १५० प्रसाधितदिशो यस्य यशः शशिकलामलम् । सुरैरसकृदुद्गीतं कुलक्षोणी प्रकुक्षिषु ॥ १५१ दिग्जये यस्य सैन्यानि विश्रान्तान्यधिदिक्तटम् । चक्रानुभ्रान्तितान्तानि क्रान्त्वा हेमवतीस्स्थलीः ॥ नप्ता श्रीनाभिराजस्य पुत्रः श्रीवृषभेशिनः । षट्खण्डमण्डितामेनां यः स्म शास्त्यखिलां महीम् ॥१५३ मत्वा गत्वरीं लक्ष्मीं जित्वरः सर्वभूभृताम् । जगद्विसृत्वरों कीर्तिमतिष्ठिपदिहाचले ॥ १५४ इति प्रशस्तिमात्मीयां व्यलिखत्स्वयमक्षरः । प्रसूनप्रकरैर्मुक्तैर्नृपोऽवचकिरेऽमरैः ॥ १५५ · तत्रोच्चैरुच्चरध्वाना मन्द्रदुन्दुभयोऽध्वनन् । दिवि देवा जयेत्याशीश्शतान्युच्चैरघोषयन् ॥ १५६ महापुराण जो शेवटचे शरीर धारण करीत आहे अर्थात् याच जन्मात जो मुक्त होणारा आहे, जो धीर आणि सर्व चक्रवर्तीमध्ये पहिला श्रेष्ठ चक्रवर्ती आहे. अशा त्या भरताने दिग्विजयाच्या वेळी जय मिळवून हे संपूर्ण भूतल व्याप्त केले आहे जिंकले आहे. जल, पाणी व स्थल-भूमि या दोहोंचे उल्लंघन करणारे अशा अठरा कोटि अश्वांचा जो स्वामी आहे व जय मिळवून देण्याचे - साधन असलेले चौऱ्याऐंशी लक्ष मदन्मत्त हत्तींचा जो अधिपति आहे ।। १४८-१४९ ।। ज्याच्या दिग्विजयाच्या वेळी चोहीकडे वर उडालेल्या पारव्यांच्या गळयाप्रमाणे धुरकट अशा सैन्याच्या वर उडालेल्या धुळीनी सर्व दिशांची मुखे व आकाश व्यापले होते ।। १५० ।। ज्याने सर्व दिशा जिंकल्या आहेत व चन्द्रकलेप्रमाणे निर्मल ज्याचे यश कुलपर्वत जे विजयार्ध व हिमवान् यांच्या गुहामध्ये देवाकडून नेहमी गायिले गेले आहे ।। १५१ ।। दिग्विजयाच्या वेळी चक्राच्या मागून सतत जाणाऱ्या ज्याच्या सैन्यानी दमल्यामुळे हिमवान् पर्वताची भूमि उल्लंघून दिशांच्या अन्तिम तटावर खूप विश्रान्ति घेतली ।। १५२ ।। जो श्रीनाभिराजाचा नातु आहे व जो श्रीवृषभ जिनेश्वराचा पुत्र आहे. अशा या भरतचक्रीने षट्खण्डानी भूषित या सर्व भरतभूमीचे पालन केले आहे ॥। १५३ ।। ज्याने सर्व राजाना जिंकले आहे अशा या भरतचक्रीनें सर्व लक्ष्मी नाशवंत आहे असे जाणून या वृषभपर्वतावर सर्व जगात पसरलेल्या प्रसिद्ध झालेल्या आपल्या कीर्तीला स्थापिले, स्थिर केले ।। १५४ ॥ याप्रमाणे भरतचक्रीने आपली कीर्ति स्वतः आपल्या हातानी लिहिली तेव्हा देवानी त्याच्यावर केलेल्या पुष्पांच्या वृष्टीने तो व्याप्त झाला. अर्थात् देवानी त्याच्यावर पुष्पवृष्टि करून आपला आनंद व्यक्त केला ।। १५५ ।। त्या पर्वतावर मोठा शब्द करणारे गंभीर नगारे त्यावेळी वाजू लागले आणि आकाशात हे भरताधिपते तुझा विजय असो असे देवानी त्याला शेकडो आशीर्वाद दिले ।। १५६ ।। Page #232 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-१६४) महापुराण (२२१ स्वर्घनीसोकरासारवाहिनो गन्धगाहिनः । मन्दं विचेरुराधमातसान्द्रमन्दारनन्दनाः॥ १५७ न केवलं शिलाभित्तावस्य नामाक्षरावली। लिखितानेन चान्द्रेऽपि बिम्बे तल्लाञ्छनच्छलात् ॥१५८ लिखितं साक्षिणो भुक्तिरित्यस्तीहापि शासने । लिखितं सोऽचलो भुक्तिदिग्जये साक्षिणोऽमराः ॥ अहो महानुभावोऽयं चक्री दिक्चक्रनिर्जये । येनाकान्तं महीचक्रमानवसतित्रिकात् ॥ १६० खचरादिरलङध्योऽपि हेलया लङ्गितोऽमुना । कीर्तिः स्थलाब्जिनीवास्य रूढा हैमाचलस्थले ॥१६१ इति दृष्टावदानं तं तुष्टुवु किनायकाः । दिष्टया स्म वर्धयन्त्येनं साङ्गनाश्च नभश्चराः ॥ १६२ भूयः प्रोत्साहितो देवर्जयोद्योगमनूनयन् । गङ्गापातमभीयाय व्याहूत इव तत्स्वनः ॥ १६३ गलद्गङ्गाम्बुनिष्ठयूताः शीकरा मदशीकरः । सम्मुमूर्छनृपेभानां व्यात्युक्षी वा तितांसवः ॥ १६४ त्यावेळी गंगानदीच्या जलबिन्दूंची वृष्टि करणारे आणि मंदार व नन्दनवनाची दाट वृक्षपंक्ति ज्यानी हालविली आहे असे सुगंधित वायु मन्दमन्द वाहू लागले ॥ १५७ ॥ या भरतपति भरताने फक्त आपल्या नावाची अक्षरपंक्ति त्या शिलांच्या भिंतीवरच लिहिली असे नाही तर ती चन्द्राच्या बिंबातही त्याच्या कलंकाच्या मिषाने-निमित्ताने लिहिली आहे, अर्थात् जो चन्द्रात काळा डाग दिसतो तो त्याचे लांछन नाही तर भरताने खोदलेला जणु शिलालेख आहे ॥ १५८ ॥ कोणत्याही शासनपत्रात लिखित-लेख, साक्षीदार व उपभोग या तिघांचा उल्लेख असतो तसा तो या शिलालेखातही आहे. येथे वृषभगिरि हा लिखित आहे. दिग्विजयामुळे उपभोग सिद्ध होतो आणि देव साक्षीदार आहेत म्हणून हे तीनही येथे आहेत ॥ १५९ ॥ हा भरतचक्री अतिशय पराक्रमी आहे, कारण याने सर्व दिशाना जिंकण्याच्या प्रसंगी पूर्वसमुद्र, दक्षिणसमुद्र, व पश्चिमसमुद्रापर्यन्त सर्व भरतक्षेत्र पूर्ण व्यापले ॥ १६० ।। हा विजयाध पर्वत ओलांडण्यास अशक्य होता तरीही या भरतेशाने तो ओलांडला व यामुळे याची कीर्ति स्थलकमलिनीप्रमाणे हिमवान् पर्वतावरील प्रदेशावर चढली आहे ॥ १६१॥ याप्रमाणे ज्याचा पराक्रम दिसला आहे अशा त्या भरतेशाची स्वर्गीय श्रेष्ठ देवानी स्तुति केली व आपल्या स्त्रियासह विद्याधरही हा अपूर्व भाग्यवान् आहे असे म्हणून त्याच्या उत्कर्षाची प्रशंसा करू लागले ॥ १६२ ॥ देवानी पुनः भरताला उत्साह युक्त केले म्हणून त्याने आपला जयोद्योग न संपविता जेथे गंगा पर्वतावरून खाली पडते अशा प्रदेशात तिच्या मोठ्या ध्वनीने जणु बोलाविला गेलेला तो भरतराजा त्या गंगाप्रपातासमोर गेला ॥ १६३ ॥ वरून पडणा-या गंगेच्या पाण्याचे उडणारे बारीक कण ते राजांच्या हत्तीच्या मदजल कणाशी असे मिळून गेले की जणु ते एकमेकावर पाणी फेकून जलक्रीडा करीत आहेत असे वाटले ।। १६४ ॥ Page #233 -------------------------------------------------------------------------- ________________ २२२) महापुराण (३२-१६५ पतद्गङ्गाजलावर्तपरिवद्धितकौतुकः । प्रत्यग्राहि स तत्पाते गङ्गादेव्या धृतार्घया ॥ १६५ सिंहासने निवेश्यन प्राङमुखं सुखशीतलैः । साऽभ्यषिञ्चज्जलैङ्गिः शशाङककरहासिभिः॥१६६ कृतमङ्गलसङ्गीतनान्दीतूर्यरवाकुलम् । निर्वयं मज्जनं जिष्णुर्भेजे मण्डनमप्यतः ॥ १६७ अथास्मै व्यतरत्प्रांशुरत्नांशस्थगिताम्बरम् । सेन्द्रचापमिवाद्रीन्द्रशिखरं हरिविष्टरम् ॥ १६८ चिरं वर्द्धस्व वद्धिष्णो जीवतानन्दताद्भवान् । इत्यनन्तरमाशास्य तिरोऽभूत्सा विसजिता ॥१६९ अनुगङ्गातटं सैन्यरावजन्विषयाधिपः । सिषेवे पवमानश्च गंगाम्बुकणवाहिभिः ॥ १७० गङ्गातटवनोपान्तनिवेशेषु विशाम्पतिम् । सुखयामासुरन्वीयमायाता वनमारुताः ॥ १७१ वने वनचरस्त्रीणामुदस्यन्नलकावलीः । मुहुस्स्वलन्कलापेषु नृत्यद्वनशिखण्डिनाम् ॥ १७२ विलोलितालिराधुन्वन्नुत्फुल्ला वनवल्लरीः । गिरिनिर्झरसंश्लेषशिशिरो मरुदाववौ ॥ १७३ खाली पडणाऱ्या गंगानदीच्या पाण्याचे भोवरे पाहून ज्याचे कौतुक वाढले आहे अशा भरताला त्या गंगापातस्थानी गंगादेवीने अर्घ्य देऊन त्याचा सत्कार केला ।। १६५ ॥ गंगादेवीने पूर्वेकडे मुख ज्याने केले आहे अशा या भरतप्रभूला सिंहासनावर बसवून चन्द्राच्या किरणाना हंसणाऱ्या अशा सुखदायक शीत-थंड गंगेच्या पाण्यानी स्नान घातले।। १६६ ॥ ज्यात मंगल गायन गायिले गेले व जे मंगल वाद्यांच्या शब्दानी युक्त आहे असे स्नान आटोपून त्या विजयी भरतराजाने त्या गंगा देवीपासून अलंकाराचाही स्वीकार केला ।। १६७ ।। यानंतर वर पसरणाऱ्या रत्नकिरणानी ज्याने आकाशाला व्यापिले आहे व जे इन्द्र धनुष्यानी युक्त मेरुपर्वताचे शिखर आहे असे भासते असे सिंहासन गंगा देवीने या भरतेशाला दिले आणि यानंतर तिने "वृद्धि पावणाऱ्या हे राजा तू दीर्घ कालपर्यन्त ऐश्वर्यादिकानी वृद्धिंगत हो. तू दीर्घकाल जग आणि दीर्घकालपर्यन्त तुझ्या आनंदाची वृद्धि होवो" अशा रीतीने तिने भरतेशाला आशीर्वाद दिले आणि भरतेशाने तिला जाण्याची परवानगी दिल्यावर ती निघून गेली ।। १६८-१६९ ॥ .. यानंतर गंगा नदीच्या किनाऱ्याला अनुसरून सैन्यासह भरतेश्वर प्रयाण करीत असता अनेक देशाच्या राजानी व गंगेच्या जलकणाना वाहणाऱ्या वायूनी त्याची सेवा केली ॥ १७० ।। . गंगेच्या तटावर जेथे जेथे त्याचा मुक्काम होत असे तेथे तेथे त्याच्या मागून वाहणाऱ्या वाऱ्यानी त्याला सुखविले ॥ १७१॥ . त्या वनात वनचर-भिल्लादिकांच्या स्त्रियांच्या केशसमूहाला वर उडविणारा, नाचणाऱ्या वनमयूरांच्या पिसाऱ्यात वारंवार अडखळणारा, भुंग्याना चंचल करणारा, पुष्पित अशावनलताना हालविणारा व पर्वताच्या झऱ्याबरोबर संबंध झाल्यामुळे थंड झालेला असा वारा वाहू लागला ॥ १७२-१७३ ॥ Page #234 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-१८२) महापुराण (२२३ प्रतिप्रयाणमानम्रा नपास्तद्देशवासिनः । प्रभुमाराधयाञ्चक्रुराकान्ता जयसाधनैः ॥ १७४ कृत्स्नामिति प्रसाध्यैनामुत्तरां भरतावनिम् । प्रत्यासीददथो जिष्णुविजयार्धाचलस्थलीम् ॥ १७५ तत्रायासितसैन्यश्च सेनान्यं प्रभुरादिशत् । अपावृतगुहाद्वारः प्राच्यखण्डं जयेत्यरम् ॥ १७६ यावदभ्येति सेनानीम्र्लेच्छराजजयोद्यमात् । तावत्प्रभोः किलातीयुर्मासाः षट्सुखसङ्गिनः॥ १७७ दक्षिणोत्तरयोः श्रेण्योर्निवसन्तोऽम्बरेचराः । विद्याधराधिपः सार्धं प्रभुं द्रष्टुमिहाययुः ॥ १७८ । विद्याधरधराधीशैरारादानम्रमौलिभिः । नरवांशुमालिकाव्याजादाज्ञास्य शिरसा धृता ॥ १७९ नमिश्च विनमिश्चैव विद्याधरधराधिपौ । स्वसारधनसामग्या प्रभुं द्रष्टुमुपेयतुः ॥ १८० विद्याधरधरासारधनोपायनसम्पदा । तदुपानीतयानन्यलभ्ययासीद्विभो तिः ॥ १८१ तद्दत्तकृतरत्नौधैः कन्यारत्नपुरःसरैः । सरिदोघेरिवोदवानापूर्यत तदा प्रभुः ॥ १८२ प्रत्येक प्रयाणाच्यावेळी जय मिळवून देणान्या सैन्यानी ज्यांच्यावर हल्ला केल्यामुळे नम्र झालेले त्या त्या देशाचे राजे या भरतराजाची सेवा करू लागले ॥ १७४ ॥ याप्रमाणे संपूर्ण उत्तरेकडची पृथ्वी जिंकून जयशाली भरतचक्री विजया पर्वताच्या जवळच्या प्रदेशात येऊन राहिला ।। १७५ ।। त्याठिकाणी चक्रवर्तीने आपल्या सेनेला ठेवले व सेनापतीला त्याने अशी आज्ञा केली 'आता तूं गुहेचे द्वार उघडून पूर्वखंडाला लौकर जिंक' ॥ १७६ ।। तो सेनापति म्लेच्छराजाना जिंकण्याची कामगिरी पूर्ण करून जोपर्यन्त येत आहे तोपर्यन्त सुखात आसक्त झालेल्या भरतराजाचे सहा महिने निघून गेले ॥ १७७ ॥ ज्या ठिकाणी चक्री राहिला होता तेथे दक्षिणश्रेणीमध्ये राहणारे विद्याधर लोक आपआपल्या राजासह प्रभूला पाहण्यासाठी येथे आले ॥ १७८ ॥ ज्यानी दूरूनच आपली मस्तके नम्र केली आहेत अशा विद्याधरराजानी या प्रभूच्या नखकिरणांच्या मिषाने याची आज्ञा आपल्या मस्तकाने धारण केली ॥ १७९ ॥ याठिकाणी विद्याधराचे दोन राजे नमि आणि विनमि आपल्या उत्कृष्ट धनसामग्रीला घेऊन प्रभूला पाहण्यासाठी आले ॥ १८० ॥ इतर राजाकडून केव्हाही प्राप्त न होणारी व विद्याधरांच्या भूमीत जी उत्पन्न झाली अशी साररूप संपत्ति या दोघा राजानी या भरताला नजराणा म्हणून दिली त्यामुळे भरतप्रभूला फार आनंद वाटला ॥ १८१ ॥ ___ जसे नद्यांच्या समूहानी समुद्र परिपूर्ण केला जातो तसे कन्यारत्न ज्यात मुख्य आहे अशा अनेक रत्नांचे समूह त्या दोघा राजानी या चक्रवर्तीला अर्पण केले त्यामुळे प्रभु भरत द्रव्यसंपन्न झाला ।। १८२ ।। Page #235 -------------------------------------------------------------------------- ________________ २२४) (३२-१८३ स्वसारं च नमेर्धन्यां सुभद्रां नाम कन्यकाम् । उदुवाह स लक्ष्मीवान्कल्याणैः खचरोचितैः ॥ १८३ तां मनोज्ञां रसस्येव स्रुति सम्प्राप्य चक्रभृत् । स्वं मेने सफलं जन्म परमानन्दनिर्भरः ॥ १८४ ताव निजित निःशेषम्लेच्छराजबलो बलैः । जयलक्ष्मी पुरस्कृत्य सेनानीः प्रभुमैक्षत ।। १८५ कृतकार्यं च सत्कृत्य तं तांश्च म्लेच्छनायकान् । विसज्यं सम्राट् सज्जोऽभूत्प्रत्यायातुमपाङमहीम् ॥ जयप्रयाणशंसिन्यस्तदा भेर्यः प्रदध्वनुः । विष्वग्बलार्णवे क्षोभमातन्वन्त्यो महीभृताम् ॥ १८७ तां काण्डकप्रपाताख्यां प्रागेवोद्घाटितां गुहाम् । प्रविवेश बलं जिष्णोश्चक्ररत्नपुरोगमम् ॥ १८८ गङ्गापगोभयप्रान्तमहावीथीद्वयेन सा । व्यतीयाय गुहां सेना कृतद्वारां चभूभृता ॥ १८९ मुच्यमाना गुहा सैन्यंश्चिरदुच्छ्वासितेव सा । चमूरपि गुहारोधान्निःसृत्योज्जीवितेव सा ॥ १९० नाट्यमालामरस्तत्र रत्नार्थैः प्रभुमर्धयन् । प्रत्यगृह्लाद्गुहाद्वारि पूर्णकुम्भादिमङ्गलैः । १९१ महापुराण नमिविद्याधर राजाची भाग्यवती बहिण जिचे नांव सुभद्रा असे होते, तिच्याशी अनेक विद्याधर योग्य मंगलकार्यपूर्वक लक्ष्मीसंपन्न भरतराजाचा विवाह झाला ।। १८३ ॥ जणु रसाची मनाला आकर्षिणारी धारा अशा त्या सुंदरीच्या प्राप्तीने भरताला अतिशय आनंद वाटला व त्याने आपला जन्म सफल मानिला ।। १८४ ।। इकडे तोपर्यन्त आपल्या सैन्याच्याद्वारे सेनापतीने संपूर्ण म्लेच्छ राजांच्या सैन्याला जिंकले व जयलक्ष्मीला पुढे करून तो प्रभूच्या दर्शनाला आला. त्याने त्याला पाहिले ।। १८५ ।। ज्याने सांगितलेले कार्य केले आहे अशा सेनापतीचा चक्रवर्तीने सत्कार केला आणि म्लेच्छराजानाही सत्कार करून त्याने त्यानाही स्वस्थानी पाठविले. यानंतर तो सम्राट् दक्षिणेकडील प्रदेशावर आक्रमण करण्यास तयार झाला ।। १८६ ।। तेव्हां राजांच्या सैन्यसमुद्रामध्ये चोहीकडे क्षोभ उत्पन्न करणारे व जयप्रयाण सुचविणारे असे नगारे वाजू लागले ।। १८७ । ती काण्डकप्रपात नावाची गुहा सहा महिन्यापूर्वीच उघडलेली होती. त्या गुहेत चक्ररत्न पुढे जाऊ लागले व त्याच्यामागून विजयशाली चक्रीचे सैन्याने प्रवेश केला ।। १८८ ।। सैन्य गंगा व सिन्धूया दोन नद्यांच्या तीरावरील मोठ्या दोन मार्गानी त्या गुहेच्या दरवाजातून बाहेर गेली ।। १८९ ।। सैन्य जिच्यातून बाहेर पडले आहे अशा त्या गुहेने बऱ्याच वेळाने उच्छ्वास सोडला अशी भासली आणि ते सैन्यही गुहेच्या प्रतिबंधातून बाहेर पडल्यामुळे आपण पुनः जगलो असे स्वतःस मानू लागले ॥ १९० ॥ त्या गुहेच्या द्वारात नाट्यमाल नांवाचा देव आला. त्याने पूर्ण कुंभादिमंगलांच्याद्वारे व रत्नाच्या अर्षांनी चक्रीचे पूजन केले ॥ १९१ ॥ Page #236 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२-१९७) महापुराण (२२५ कृतोपच्छन्दनं चामुं नाटयमालं सुरर्षभम् । व्यसर्जयद्यथोद्देशं सत्कृत्य भरतर्षभः ॥ १९२ कृतोदयमिनं ध्वान्तात्परितो गगनेचराः। परिचेरुर्नभोमार्गमारुद्धय धृतसायकाः ॥ १९३ नमिविनमिपुरोगैरन्वितः खेचरन्द्रः । खचरगिरिगुहान्तन्तिमुत्सार्य दूरम् ॥ रविरिव किरणोपर्योतयन्दिग्विभागान् । निधिपतिरुदियाय प्रीणयजीवलोकम् ॥ १९४ सरसकिसलयान्तःस्यन्दमन्दे सुरस्त्रीस्तनतटपरिलग्नक्षौमसङक्रान्तवासे । सरति मरुति मन्दं कन्दरेष्वद्रिभर्तुनिधिपतिशिविराणां प्रादुरासन्निवेशाः ॥ १९५ किसलयपुटभेदी देवदारुमाणामसकृदमरसिन्धोः सीकरान्व्याधुनानः । श्रमसलिलममुष्मादुष्णसम्भूष्णुजिष्णोः खचरगिरितटान्तान्निष्पतन्मातरिश्वा ॥ १९६ सपदि विजयसैन्यनिजितम्लेच्छखण्डः । समुपहृतजयश्रीश्चक्रिणादिष्टमात्रात् ॥ जिनमिव जयलक्ष्मीसन्निधानं निधीनाम् । परिवृढमुपतस्थौ नम्रमौलिश्चमूभृत् ॥ १९७ ज्याने स्तुति केली आहे अशा देवश्रेष्ठ नाट्यमालाचा श्रेष्ठ भरतचक्रवर्तीनेही सत्कार केला व त्याला त्याच्या देशास पाठविले ।। १९२ ॥ __ ज्यानी आपल्या हातात बाण व तरवारी धारण केल्या आहेत व जे सर्व बाजूनी उभे राहिले आहेत असे विद्याधर अंधाराचा नाश करून उदय पावलेल्या सूर्याप्रमाणे उत्कर्षास प्राप्त झालेल्या चक्रवतीची सेवा करू लागले ।। १९३ ।। नमि व विनमि हे ज्यात मुख्य आहेत अशा विद्याधरराजानी सहित असलेला आणि विजयार्धपर्वताच्या गुहेतील अंधार दूर सारून सूर्याप्रमाणे किरणाच्याद्वारे सर्व दिशाना प्रकाशित करणारा व सर्व जीवसमूहाला आनंदित करणारा निधिपति भरतेश मोठ्या उत्कर्षास पावला ॥ १९४ ॥ टवटवीत कोवळ्या पानांच्या आत शिरल्यामुळे ज्याच्या ठिकाणी मंदपणा आला आहे व देवांगनाच्या स्तनतटावर असलेल्या रेशमीवस्त्रात ज्याचा गंध शिरला आहे, असा वारा विजयाध पर्वताच्या गुहामध्ये मंदपणाने शिरत असता निधींचा स्वामी अशा चक्रवर्तीच्या सेनांचे डेरे इतस्ततः रचले गेले ।। १९५ ।। . देवदारुवृक्षाच्या कोवळ्या पानांच्या जोडी विसकटणारा व वारंवार गंगानदीच्या बारीक जलबिन्दूंना इकडे तिकडे हलविणारा व उष्णतेमुळे उत्पन्न झालेल्या भरताच्या श्रमजलाला घालविणारा, अशा प्रकारचा वारा या विजयार्धपर्वताच्या कड्यावरून खाली पडला. अर्थात् वाहू लागला ।। १९६ ।। ज्याने विजयशाली सैन्याच्याद्वारे म्लेच्छखंड जिंकले आहेत, चक्रवर्तीने आज्ञा केल्याबरोबर ज्याने शीघ्र जयश्रीला ओढून आणले आहे, असा नम्र मस्तक केलेला सेनापति जयलक्ष्मी नेहमी ज्याच्याजवळ राहते अशा जिनेश्वराप्रमाणे निधींचा स्वामी असलेला भरतप्रभूच्याजवळ आला ॥ १९७ ।। म. २९ Page #237 -------------------------------------------------------------------------- ________________ २२६) महापुराण (३२-१९९ जित्वा म्लेच्छनृपो विजित्य सुचिरं प्रालेयशैलेशिनम् । देव्यौ च प्रणमय्य दिव्यमुभयं स्वीकृत्य भद्रासनम् ॥ हेलानिजितखेचराद्विरधिराट् प्रत्यन्तपालाञ्जयन् । सेनान्या विजयी व्यजेष्ट निखिलां षट्खण्डभूषां भुवम् ॥ १९८ पुण्यादित्ययमा हिमाह्वयगिरेरा तोयधेः प्राक्तनादावापाच्यपयोनिर्जलनिधेरा च प्रतीच्यादितः। चक्रे क्षमामरिचक्रभीकरकरश्चक्रेण चक्री वशे । तस्मात्पुण्यमुपार्जयन्तु सुधियो जने मते सुस्थिताः ॥ १९९ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङ्ग्रहे भरतोत्तरार्ध विजयवर्णनं नाम द्वात्रिंशत्तम पर्व ॥ ३२ ॥ या भरतचक्रीने चिलात व आवर्त या दोन म्लेच्छ राजाना जिंकले. यानंतर हिमवान् पर्वताचा अधिपति अशा हिमवान् देवालाही जिंकले. तद्नन्तर गंगा व सिन्धु या दोन देवतानी भरतचक्रवर्तीला नमस्कार केला व त्या दोन देवताकडून दोन भद्र-उत्तम दोन आसने त्याने घेतली व त्याने लीलेने विजया पर्वताला जिंकले व आपल्या सेनापतीच्या द्वारे जवळच्या प्रदेशाचे रक्षण करणाऱ्या म्लेच्छराजांना जिंकले. याप्रमाणे विजयी या भरतराजाने सहा खण्ड जिचे अलंकार आहेत अशा सर्व भरतभूमीला जिंकले ।। १९८ ।। शत्रुसमुदायाला भय दाखविणारा ज्याचा हात आहे अशा या भरतचक्रीने चक्राच्याद्वारे आपल्या पुण्यामुळे हिमालयापर्यन्त व पूर्वसमुद्र, पश्चिमसमुद्र आणि दक्षिणसमुद्र या तीन समुद्रापर्यन्त संपूर्ण पृथ्वी आपल्या वश केली म्हणून हे सुबुद्धियुक्त-जनानो आपण जिनेश्वराच्या मतांत दृढतेने स्थिर राहा व पुण्यसंपादन करा ॥ १९९ ।। याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत विशष्टिलक्षणमहापुराणाच्या मराठी अनुवादात उत्तरार्ध भरताच्या विजयाचे वर्णन करणारे बत्तीसावे पर्व समाप्त झाले. Page #238 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रयस्त्रिंशत्तमं पर्व | श्रीमानानमिताशेषनृपविद्याधरामरः । सिद्धदिग्विजयश्चक्री न्यवृतत्स्वां पुरीं प्रति ॥ १ नवास्य निषयः सिद्धा रत्नान्यपि चतुर्दश । सिद्धा विद्याधरैः सार्द्धं षट्खण्डधरणीभुजः ॥ २ जित्वा महीमिमां कृत्स्नां लवणाम्भोधिमेखलाम् । प्रयाणमकरोच्चक्री साकेतनगरं प्रति ॥ ३ प्रकीर्णकचलद्वी चिकल्लसच्छत्रबुदबुदा । निर्ययौ विजयार्द्धाद्रितटाद्गङ्गेव सा चमूः ॥ ४ करिणीनौ भिरश्वीयकल्लोले जनतोमिभिः । दिशो रुन्धन्बलाम्भोषिः प्रससर्प स्फुरद्ध्वनिः ॥ ५ चलतां रथचक्राणां चीत्कारैर्हयहेषितः । बृंहितैश्च गजेन्द्राणां शब्दाद्वैतं तदाभवत् ॥ ६ भेर्यः प्रस्थानशंसिन्यो नेदुरामन्द्रनिःस्वनाः । अकालस्तनिताशङ्कामातन्वानाः शिखण्डिनाम् ॥७ तदाभूदुद्धमश्वीयं हास्तिकेन प्रसर्पता । न्यरोधि पत्तिवृन्दं च प्रयान्त्या रथकयया ॥ ८ ज्याने सर्व राजे, विद्याधर व देव नम्र केले आहेत व ज्याने दिग्विजयाचे कार्य पूर्ण तडीस नेले आहे असा श्रीमान्- लक्ष्मीपति, चक्रीभरत आपल्या नगरीकडे जाण्यास परतला ॥ १ ॥ या भरतराजाला नऊ निधि मिळाले आणि चौदा रत्ने प्राप्त झाली व विद्याधर राजासह षट्खण्डातले सर्व राजेही वश झाले ॥ २ ॥ लवणसमुद्र हा जिचा कमरपट्टा आहे अशा या सगळ्या पृथ्वीला जिंकून चक्रवर्ती भरताने आपल्या साकेत नगराकडे प्रयाण केले || ३ || चवऱ्या ह्याच जिच्यात तरंग आहेत व शोभणारी छत्रे हीच जिच्यात बुडबुडे आहेत, अशी ती सेना विजयार्द्धपर्वताच्या तटापासून वहाणाऱ्या गंगानदीप्रमाणे पुढे प्रयाण करू लागली ।। ४ ।। हत्तिणी ह्याच नावानी युक्त, घोड्याचे समूहरूपी लाटानी उसळणारा आणि पायदळ हेच लहान तरङ्ग ज्यात आहेत असा सैन्यसमुद्र गर्जना करीत व सर्व दिशात व्यापून पुढे प्रयाण करू लागला ॥ ५ ॥ त्यावेळी वेगाने चालणाऱ्या रथाचे चीत्कार शब्द होऊ लागले, घोडे खिंकाळू लागले व मोठे हत्ती गर्जना करू लागले त्यामुळे ते चक्रवर्तीचे सैन्य शब्दाद्वैतमय झाले अर्थात् चोहीकडे शब्दच शब्द ऐकू येऊ लागले ॥ ६ ॥ ज्यांचा गंभीर आवाज आहे असे नगारे पुढे प्रयाण करण्याची सूचना देऊ लागले. त्यामुळे मोरांच्या मनात अकालीच मेघांची गर्जना होत आहे अशी शंका उत्पन्न होऊ लागली ।। ७ ।। त्यावेळी पुढे जाणान्या हत्तींच्या सैन्याने घोडयाच्या सैन्याला अडविले व रथाचा समूह चालू लागल्याने पायदळाच्या सैन्याला त्याने अडविले त्यामुळे ते थांबले ।। ८ ।। Page #239 -------------------------------------------------------------------------- ________________ २२८) महापुराण (३३-१७ पादातकृतसम्बाधात् पथःपर्यन्तपातिनः । हया गजा वरुथाश्च भेजुस्तिर्यक्प्रचोदिताः ॥९ पर्वतोदनमारूढो गजं विजयपर्वतम् । प्रतस्थे विचलन्मौलिश्चक्री शक्रसमद्युतिः ॥ १० अनुगङ्गातट देशान्विलडध्य स सरिगिरीन् । कैलासशैलसानिध्यं प्राप तच्चक्रिणो बलम् ११ कैलासाचलमभ्यर्णमथालोक्य रथाङ्ग भत् । निवेश्य निकटं सैन्यं प्रययौ जिनर्माचतुम् ॥ १२ प्रयान्तमनुजग्मुस्तं भरतेशं महाद्युतिम् । रोचिष्णुमौलयः क्षमापाः सौधर्मेन्द्रमिवामराः ॥ १३ अचिराच्च तमासाद्य शरदम्बरसच्छविम् । जिनस्येव यशोराशिमभ्यानन्द द्विशाम्पतिः ॥ १४ निपतन्निर्झरारावैराह्वयन्तमिवामरान् । त्रिजगद्गुरुमेत्यारात्सेवध्वमिति सावरम् ॥ १५ मरुदान्दोलितोदग्रशाखाग्रस्तटपादपैः । प्रतोषादिव नृत्यन्तं विकासिकुसुमस्मितैः ॥ १६ तटनिर्झरसम्पाततुिं पाद्यमिवोद्यतम् । वन्दारो व्यवृन्दस्य विष्वगास्कन्दतो जिनम् ॥ १७ पायदळांच्या शिपायांच्या गर्दीने सर्व रस्ते व्यापल्यामुळे हत्ती, घोडे आणि रथ थोडे अन्तरापर्यन्त काही वेळपर्यन्त तिरपे चालून नंतर ते रस्त्यावरून प्रयाण करू लागले ॥ ९ ॥ ज्याचा किरीट थोडासा हालत आहे व ज्याची कान्ति इन्द्राप्रमाणे आहे असा चक्री भरत पर्वताप्रमाणे उंच अशा 'विजयपर्वत' नामक हत्तीवर आरूढ होऊन प्रयाण करू लागला ॥ १० ॥ चक्रवर्तीच्या सैन्याने गंगातटाला अनुसरून असलेल्या अनेक देशाना, अनेक नद्याना व अनेक पर्वताना उल्लंघिले आणि तें कैलास पर्वताच्या जवळ येऊन पोहोचले ॥ ११ ।। कैलास पर्वताजवळ आपण आलो आहोत हे चक्रवर्तीने पाहिले आणि त्याने त्या पर्वताजवळ आपल्या सैन्याचा तळ दिला व आपण जिनेश्वराचे पूजन करण्यासाठी निघाला ॥ १२ ॥ अतिशय तेजस्वी भरतेश जात असता सौधर्मेन्द्राला देव जसे अनुसरतात तसे ज्यांचे मुकुट चमकत आहेत असे इतर राजे त्याला- भरतेशाला अनुसरले ॥ १३ ॥ शरत्कालाच्या आकाशाप्रमाणे निर्मल कान्तीचा जणु जिनेश्वराचा यशःसमूह अशा कैलासपर्वताजवळ भरतेश्वर लौकरच पोहोचला आणि अतिशय प्रसन्न झाला ॥ १४ ।। त्रिलोकगुरु भगवान् वृषभजिनाकडे येऊन त्यांची आदराने सेवा करा असे जणु पडणान्या झन्यांच्या शब्दानी तो पर्वत देवाला बोलावित आहे असा भासला ॥ १५ ॥ विकसित झालेली फुले हीच ज्यांचे हास्य आहे व वाऱ्याने ज्यांच्या उंच शाखा हालत आहेत अशा वृक्षानी तो पर्वत जणु आनंदाने नृत्य करीत आहे असे भरतेश्वराला वाटले ॥१६॥ चोहीकडून जिनेश्वराना वंदण्यासाठी येणाऱ्या भव्यजीवाना तटावरून पडणान्या झयांच्या मिषाने जणु तो पर्वत पाय धुण्यासाठी पाणी देत आहे असा भासला ॥ १७ ॥ Page #240 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१८) महापुराण (२२९ शिखरोल्लिखिताम्भोदपटलोद्गीर्णवारिभिः । दावभीत्येव सिञ्चन्तं स्वपर्यन्तलतावनम् ॥ १८ शचिग्रावविनिर्माणः शिखरैः स्थगिताम्बरैः । गतिप्रसरमर्कस्य न्यककुर्वाणमिवोच्छितः ।। १९ क्वचित्किन्नरसम्भोग्यः क्वचित्पन्नगसेवितैः । क्वचिच्च खचराक्रोवनराविष्कृतश्रियम् ॥ २० क्वचिद्विरलनीलांशु मिलितैः स्फटिकोपलैः । शशाङ्कमण्डलाशङ्कामातन्वन्तं नभोजुपाम् ॥२१ हरिन्मणिप्रभाजालै जालैश्च प्रभाश्मनाम् । क्वचिदिन्द्रधनुर्लेखामालिखन्तं नमोऽङ्गणे ॥ २२ पद्मरागांशभिभिन्नः स्फटिकोपलरश्मिभिः । आरक्तश्वेतवप्रान्तंकिलासिनमिव क्वचित् ॥ २३ क्वचिद्विश्लिष्टशैलेयपटलैबहुदद्रुणः । मृगेन्द्रनखरोल्लेखसहैर्गण्डोपलैस्ततम् ॥ २४ । क्वचिद्गुहान्तराद्गुञ्जन्मृगेन्द्रप्रतिनादिनीः । तटोर्दधानमुद्वद्धमदः परिहता गजः ।। २५ आपल्या शिखरानी मेघसमूहाना विदीर्ण केल्यामुळे त्यातून झालेल्या जलवृष्टीनी हा पर्वत अग्नीच्या भीतीने जणु आपल्या सभोवती असलेल्या वेलींच्या वनाला सिंचित आहे असा भासला ।। १८ ॥ ज्यानी आकाशाला झाकून टाकले आहे अशा उंच स्फटिकाच्या शिखरानी जणु हा पर्वत सूर्याच्या गतीला अडवित आहे असा भासत आहे ॥ १९ ॥ या पर्वताच्या काही वनात किन्नर राहुन सुखोपभोग घेत आहेत. काही वने पन्नगनागजातीच्या देवानी सेविली जात आहेत व काही वने सभोवती चाललेल्या विद्याधरांच्या क्रीडानी फार शोभत आहेत ।। २० ॥ कोठे कोठे या पर्वतावरील तुरळक अशा नीलमण्यांच्या किरणाशी स्फटिकमणि मिसळून गेल्यामुळे आकाशात विहार करणान्या देवाना व विद्याधराना हा चन्द्रमण्डलाची भ्रान्ति उत्पन्न करीत आहे ॥ २१ ॥ कोठे कोठे पाचरत्नांच्या किरणसमूहाशी पद्मरागमण्याच्या कांतिसमूहाचे मिश्रण झाल्यामुळे हा पर्वत आकाशाच्या अंगणात इन्द्रधनुष्याची शोभा उत्पन्न करीत आहे असे वाटत होते ॥ २२ ॥ पद्मरागमण्यांच्या किरणाशी मिश्रण पावलेल्या स्फटिकाच्या किरणानी या पर्वताचा तट कोठे कोठे लाल व पांढरा असा दिसत असल्यामुळे जणु त्याला कुष्टरोग झाला आहे असा दिसला ॥ २३ ॥ ज्याच्या तटावर शिलांचे अनेक तुकडे तुटून पडले आहेत व ते सिंहाच्या नखांचा आघात सहन करणारे असल्यामुळे जणु या पर्वताला अनेक ठिकाणीं दद्रुरोग झाला आहे व अनेक ठिकाणी चट्टे पडले आहेत असा तो भासू लागला ॥ २४ ॥ कोठे कोठे गुहांच्या आत सिंह गर्जना करीत होते त्यामुळे या पर्वताचे तट प्रतिध्वनि युक्त झाले त्यामुळे उन्मत्त हत्तीनी याच्या तटांचा त्याग केला आहे असे दिसले ॥ २५ ॥ Page #241 -------------------------------------------------------------------------- ________________ २३०) महापुराण (३३-३४ क्वचित्सितोपलोत्सङ्गचारिणीरमराङ्गनाः । बिभ्राणं शरदभ्रान्तर्वतिनीरिव विद्युतः ॥ २६ तमित्यद्भुतया लक्ष्म्या परीतं भूभृतां पतिम् । स्वमिवालङध्यमालोक्य चक्रपाणिरगान्मदम् ॥ २७ गिरेरधस्तले दूराद्वाहनादिपरिच्छदम् । विहाय पादचारेण ययौ किल स धर्मधीः ॥ २८ पद्भ्यामारोहतोऽस्याद्रि नासीत्खेदो मनागपि । हितार्थिनां हि खेदाय नात्मनीनः क्रियाविधिः ॥२९ आररोह स तं शैलं सुरशिल्पिविनिर्मितैः । विविक्तर्मणिसोपानः स्वर्गस्येवाषिरोहणः॥ ३० अधित्यकासु सोऽस्याद्रः प्रस्थाय वनराजिषु । लम्भितोऽतिथिसत्कारमिव शीतैर्वनानिलः ॥ ३१ क्वचिदुत्फुल्लमन्दारवनवीथीविहारिणीः । विविक्तसुमनोभूषाः सोऽपश्यद्वनदेवताः ॥ ३२ क्वचिद्वनान्तसंसुप्तनिजशावानुशायिनीः । मृगीरपश्यदारब्धमदुरोमन्थमन्थराः ॥ ३३ क्वचिन्निकुञ्जसंसुप्तान्बृहतः शयुपोतकान् । पुरीतन्निकरान।रिवापश्यत्स पुञ्जितान् ॥ ३४ कोठे कोठे या पर्वताच्या शुभ्रपाषाणांच्या उंचवट्यावरून देवांगना चालत असता शरत्कालच्या शुभ्र मेघांच्या आंत संचार करणाऱ्या विजाप्रमाणे त्या वाटल्या ॥ २६ ॥ अनेक पर्वतांचा स्वामी असलेला हा कैलासपर्वत माझ्याप्रमाणेच अद्भुत लक्ष्मीने युक्त आहे असे चक्री भरताला वाटले व त्याला पाहून तो आनंदित झाला ।। २७ ।। • या पर्वताच्या खालच्या तळभागी दूर अंतरावर आपले वाहनादिक परिवार भरतेशाने ठेविले आणि तो धर्मबुद्धीचा राजा पायानीच त्या पर्वतावर चालत गेला ।। २८ ।। वाहनावाचून दोन पायानी पर्वतावर चढत असता या भरतेश्वराला थोडासा देखिल खेद वाटला नाही. जे हितार्थी लोक असतात त्यांचे धर्माचार आत्मकल्याण करणारे असल्यामुळे त्याना ते खेदाला कारण होत नाहीत ॥ २९ ॥ देवांच्या शिल्पकारानी रचलेल्या ज्या रत्नांच्या पाय-या त्या जणु स्वर्गावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत की काय अशा दिसत होत्या. अशा त्या पवित्र पाय-यानी तो भरतचक्री त्या कैलासपर्वतावर चढला ।। ३० ।। त्या पर्वताच्या वरील भूमीवर चढ़न तेथे असलेल्या वनपंक्तीमध्ये जेव्हा भरतेश पोहोचला तेव्हा तेथील शीत अशा वनवायूनी त्याचा जणु पाहुणचार केला असे वाटले ॥ ३१॥ त्या भरतेशाने तेथे काही ठिकाणी ज्यांच्या अंगावर वेगळ्या वेगळ्या फुलांचे अलंकार आहेत व ज्या प्रफुल्ल मंदारवनाच्या पंक्तीमध्ये विहार करीत आहेत अशा वनदेवताना पाहिले ॥ ३२ ॥ त्या पर्वतावर कोठे वनाच्या मध्यभागी आपल्या पाडसाबरोबर झोपलेल्या व सावकाश रवंथ करणाऱ्या हरिणींना त्याने पाहिले ।। ३३ ॥ त्या पर्वतावरील काही लतागृहामध्ये अजगरांच्या मोठ्या मोठ्या बच्चांना भरतेशाने पाहिले. जणु ते बच्चे या पर्वताची एके ठिकाणी गोळा झालेली जणु आतडीच आहेत असे भरतप्रभूला वाटले ।। ३४ ।। Page #242 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-३५) महापुराण (२३१ क्वचिद्गजमदामोववासितान्गण्डशैलकान् । ददृशे हरिरारोषादुल्लिखन्नखराङकुरैः॥ ३५ किञ्चिदन्तरमारुह्य पश्यन्नद्रेः परां श्रियम् । प्राप्तावसरमित्यूचे वचनं च पुरोधसा ॥ ३६ पश्य देव गिरेरस्य प्रदेशान्बहुविस्मयान् । रमन्ते त्रिदशा यत्र स्वर्गावासेप्यनादराः ॥ ३७ पर्याप्तमेतदेवास्य प्राभवं भुवनातिगम् । देवो यदेनमध्यास्ते चराचरगुरुः पुरुः ॥ ३८ महाद्रिरयमुत्सङ्गासङगिनीः सरिदङ्गनाः । शश्वद्विभत्ति कामीव गलन्नीलजलांशुकाः ॥ ३९ क्रीडाहेतोरहिंस्रोऽपि मृगेन्द्रो गिरिकन्दरात् । महाहिमयमाकर्षन्दान्मुञ्चत्यपारयन् ॥ ४० सर्वद्वन्द्वसहान्सा,जनतातापहारिणः । मनोनिव वनाभोगानेव धत्तेऽधिमेखलम् ॥ ४१ त्या पर्वतावर काही ठिकाणी हत्तींच्या मदांच्या गंधाने सवासित झालेले मोठे पाषाण होते त्याना हत्ती समजून अतिशय रोषाने सिंह आपल्या तीक्ष्ण नखांच्या अंकुरानी ओरबडत आहे असे भरताने पाहिले ॥ ३५ ॥ पर्वताच्या काही अन्तरावर चढून पर्वताच्या उत्कृष्ट शोभेला-लक्ष्मीला भरतेश पाहत असता बोलण्यास योग्य संधि आली आहे असे पाहून पुरोहिताने याप्रमाणे भाषण केले ॥ ३६॥ हे देवा भरतप्रभो, या पर्वताच्या विपुल आश्चर्यकारक प्रदेशाना आपण पाहा. स्वर्गाच्या निवासस्थानी ही ज्याना राहणे आदराचे वाटत नाही असे देव येथे येऊन रमतात क्रीडा करतात ॥ ३७ ।। या पर्वताचे प्रभुत्व जगाला उल्लंघणारे आहे एवढे सांगणे पुरेसे आहे. कारण चराचरांचे गुरु असे भगवान् पुरु-वृषभदेव या पर्वतावर निवास करीत आहेत ॥ ३८ ॥ हा महापर्वत आपल्या ओटीमध्ये कामी मनुष्य जसे ज्यांचे निळे वस्त्र गळत आहे. अशा स्त्रियाना धारण करितो तसे ज्यांचे नीलजलरूपी वस्त्र गळत आहे अशा नद्यारूपी स्त्रियाना नेहमी धारण करीत आहे ॥ ३९ ॥ ___ हा सिंह जरी अहिंस्र-हिंसात्यागी आहे तरी क्रीडा करण्यासाठी या पर्वताच्या गुहेतून या महासर्पाला बाहेर ओढीत आहे. पण तो सर्प फारच लांबलचक असल्यामुळे सगळा बाहेर ओढून काढण्यास असमर्थ झाल्यामुळे त्याला सोडून देत आहे ।। ४० ॥ __ मुनि जसे सर्व द्वन्द्व-उन्ह, पाऊस, थंडी वगैरे बाधा सहन करितात तसे येथील वनप्रदेश उन्ह, पाऊस थंडी, वगैरे सहन करितात व सर्व पशुपक्ष्यांची जोडपी धारण करितात, मुनि जसे सर्वाचे हित करतात तसे हे वनप्रदेशही सर्वाचे कल्याण करितात. मुनि जसे लोकांच्या संतापाचामानसिक रागद्वेषापासून होणाऱ्या व्यथांचा ताप नाहीसा करतात तसे हे वनप्रदेश संताप-सूर्याच्या उन्हापासून होणाऱ्या गरमीची व्यथा-पीडा दूर करतात अशा वनप्रदेशाना हा पर्वत आपल्या तटावर धारण करीत आहे ।। ४१ ।। Page #243 -------------------------------------------------------------------------- ________________ २३२) महापुराण (३३-४२ हरीनखरनिभिन्नमदद्विरदमस्तकान् । निर्झरैः पापभीत्येव तर्जयत्येव सारवः ॥ ४२ धत्ते सानुचरान्भद्रानुच्चवंशान्स्ववग्रहान् । वनद्विपानयं शैलो भवानिव महीभुजः ॥ ४३ ध्वनतो घनसङ्घाताशरभारभसादमी । द्विरवाशङ्कयोपेत्य पतन्तो यान्ति शोच्यताम् ॥ ४४ कपोलकाषसंरुग्णत्वचो मदजलाविलाः । द्विपानां वनसम्भोगं सूचयन्तीह शाखिनः ॥ ४५ शाखामृगा मृगेन्द्राणां गजितैरिह तजिताः । पुजीभूता निकुञ्जषु पश्य तिष्ठन्ति साध्वसान् ॥४६ मुनीन्द्रपाठनि?षेरितो रम्यमिदं वनम् । तृणानकवलमासिकुरङ्गकुलसङकुलम् ॥ ४७ इतश्च हरिणारातिकठोरारवभीषणम् । विमुक्तकवलच्छेदप्रपलायितकुञ्जरम् ॥ ४८ जरज्जरन्तशृङगाग्रक्षतवल्मीकरोधसः । इतो रम्या वनोद्देशा वराहोत्खातपल्वलाः ॥ ४९ आपल्या तीक्ष्ण नखाग्रांनी उन्मत्त हत्तींची मस्तके ज्यानी भिन्न केली आहेत अशा सिंहांना हा पर्वत शब्द करणाऱ्या झ-याच्याद्वारे जणु पापभयाने त्याना दरडावित आहे असा भासत आहे ।। ४२ ।। हे राजन् भरतेशा, जसे आपण सानुचर- आपल्या सेवकानी सहित, भद्र-चांगल्या विचारांचे, उच्चकुलीन व सुंदर मजबुत शरीराचे अशा अनेक राजाना धारण करिता, त्याना आपल्या अधीन ठेवता तसे हा पर्वत आपल्या शिखरावर फिरणा-या, भद्र जातीचे व ज्यांचा पाठीचा कणा उंच आहे व ज्यांचे शरीर पुष्ट व सुंदर आहे अशा वनगजांना आपल्याप्रमाणे धारण करीत आहे ।। ४३ ।। मेघांचे समुदाय गर्जना करीत असताना शरभ प्राणी मोठया वेगाने हत्तींच्या शंकेने त्यावर धावून जाऊन खाली पडतात आणि शोचनीय अवस्थेला प्राप्त होत आहेत हे आपण पाहा ॥ ४४ ॥ आपले गण्डस्थल घासल्यामुळे ज्यांच्या साली घासल्या आहेत असे हे वृक्ष त्या हत्तींच्या मदजलाने भिजले आहेत व हे वृक्ष या हत्तींनी या वनाचा उपभोग घेतला आहे असे या स्थली सूचित करीत आहेत ॥ ४५ ॥ हे माकडांचे समूह येथे सिंहाच्या गर्जनानी भेडसावलेले होऊन लतादिकांच्या जाळयात भीतीने घाबरून बसले आहेत तिकडे हे प्रभो आपण पाहा ।। ४६ ।। मुनीश्वरांच्या स्तोत्रपाठाच्या ध्वनीनी इकडे हे वन सुंदर दिसत आहे व गवताच्या अग्रांचे भक्षण करणाऱ्या हरिणाच्या समूहानी हे वन गजबजले आहे ॥ ४७ ।। इकडे सिंहाच्या अतिशय कठोर गर्जनानी हे वन भयंकर वाटत आहे व इकडे तोंडातला घास टाकून हत्तीचा समूह पळत आहे हे आपण पाहा ॥ ४८ ॥ इकडे म्हाताऱ्या रेड्यानी आपल्या शिंगांच्या अग्रभागानी वारुळाचे तट फोडले आहेत ते पाहा व इकडे वराहानी-डुकरानी लहान लहान तलाव आपल्या दाढानी खोदले आहेत अशी ही सुंदर वने दिसतात ।। ४९ ॥ Page #244 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-५७) मृगः प्रविष्टवे शन्तंवंशस्तम्बोपगैर्गजैः । सच्यते हरिणाक्रान्तं वनमेतद्भयानकम् ॥ ५० वनप्रवेशिभिनित्यं नित्यं स्थण्डिलशायिभिः । न मुच्यतेऽयमद्रीन्द्रो मृगैर्मुनिगणैरपि ॥ ५१ इति प्रशान्तो रौद्रश्च सर्वथायं धराधरः । सन्निधानाज्जिनेन्द्रस्य शान्त एवाधुना पुनः ॥ ५२ गजैः पश्य मृगेन्द्राणां संवासमिह कानने । नखरक्षत मार्गेषु स्वैरमास्पृशतामिमान् ॥ ५३ चारणाध्युषितानेते गुहोत्सङ्गानशङ किताः । विशन्त्यनुगताः शावैः पाकसत्त्वैः समं मृगाः ॥ ५४ अहो परममाश्चर्यं तिरश्चामपि यद्गणैः । अनुयातं मुनीन्द्राणामज्ञातभयसम्पदाम् ॥ ५५ सोऽयमष्टापदैर्जुष्टो मृगैरन्वर्थनामभिः । पुनरष्टापदख्याति पुरैति त्वदुपक्रमम् ॥ ५६ स्फुरन्मणितटोपान्तं तारकाचक्रमापतत् । न याति व्यक्तिमस्यास्तद्रोचिच्छन्नमण्डलम् ॥ ५७ महापुराण इकडे लहान लहान तलावात मृग घुसून बसले आहेत व वेळूच्या जाळ्यांचा हत्तीनी आश्रय घेतला आहे म्हणून हे भयानक वन सिंहाने आक्रमिले आहे असे वाटते ।। ५० ।। ( २३३ नेहमी वनात प्रवेश करणारे अर्थात् वनात राहणारे व नेहमी जमिनीवर झोपणारे अशा हरिणाकडून व मुनिसमूहाकडून ही हा महापर्वत केंव्हाही त्यागला गेला नाही ॥ ५१ ॥ याप्रमाणे हा पर्वत नेहमी प्रशान्त व रौद्रही पूर्वी राहिला होता पण आता तो आदि जिनेन्द्राच्या सान्निध्याने फक्त शान्तच झाला आहे. आता त्याचा रौद्रपणा नाहीसाच झाला आहे ।। ५२ ।। आता येथील वनात हत्तीबरोबर सिंह राहत आहेत हे भरतेश आपण पाहा. या हत्तींच्या ज्या तीक्ष्ण जखमा सिंहानी केल्या होत्या त्याना हे सिंह स्वच्छंदाने - शांतपणाने स्पर्श करीत आहेत ॥ ५३ ॥ जे सिंह व्याघ्रादिक निर्दय दुष्ट प्राणी आहेत त्यांच्या बच्चांना अनुसरून हे हरिण निर्भय होऊन चारणमुनि जेथे राहत आहेत. अशा गुहांच्या मध्यभागी प्रवेश करीत आहेत. हे राजेन्द्रा पाहा ॥ ५४ ॥ ज्याना वनाची भीति वाटत नाही आणि ज्याना संपत्तीची अभिलाषा नाही अशा मुनींच्या पाठीमागे हे पशूंचे समूह जात आहेत. हा मोठ्या आश्चर्याचा विषय आहे ।। ५५ ।। अष्टापद या सार्थक नावाला धारण करणाऱ्या अष्टापदनामक पशूनी हा पर्वत युक्त असल्यामुळे पूर्वी हा पर्वत अष्टापद या नावाने युक्त झाला आहे व आता तो पर्वत तुझ्या चढण्याने पुनः अष्टापद या नावाला प्राप्त होईल ॥ ५६ ॥ जेव्हा या पर्वताच्या चमकणाऱ्या रत्नानी युक्त असलेल्या तटाजवळ तारकासमूह येतो तेव्हा या पर्वताच्या मण्यांच्या कान्तीनी तो आच्छादित झाल्यामुळे तो व्यक्त होत नाही. अर्थात् हा मण्यांचा समूहच आहे तारकांचा समूह त्यापासून वेगळा जाणला जात नाही ।। ५७ ।। म. ३० Page #245 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३३-५८ ज्वलत्यौषधिजातेऽपि निशि नाभ्येति किन्नरः । तमोविशङ्कयास्याद्रेरिन्द्रनीलमयीस्तटीः ॥ ५८ हरिन्मणितटोत्सर्पन्मयूखानत्र भूघरे । तृणाङ्कुरधियोपेत्य मृगा यान्ति विलक्ष्यताम् ॥ ५९ सरोजरागरत्नांशुच्छुरिता वनराजयः । तताः सन्ध्यातपेनेव पुष्णन्तीह परां श्रियम् ॥ ६० सूर्यांशुभिः परामृष्टाः सूर्यकान्ता ज्वलन्त्यमी । प्रायस्तेजस्विसम्पर्कस्तेजः पुष्णाति तादृशम् ॥ ६१ इहेन्दुकरसंस्पर्शात्प्रक्षरन्तोऽप्यनुक्षपम् । चद्रकान्ता न हीयन्ते विचित्रा पुद्गल स्थितिः ।। ६२ सुराणामभिगम्यत्वात्सिहासनपरिग्रहात् । महत्त्वादचलत्वाच्च गिरिरेष जिनायते ॥ ६३ शुद्धस्फटिकसङ्काशनिर्मलोदारविग्रहः । शुद्धात्मेव शिवायास्तु तवायमचलाधिपः ॥ ६४ २३४) महापुराण रात्री या पर्वतावर वनस्पतींचा समूह दिव्याप्रमाणे प्रज्वलित होत असताही किन्नरदेव अंधाराच्या शंकेने या पर्वताच्या इन्द्रनीलमण्यांनी युक्त असलेल्या तटावर प्रवेश करीत नाहीत ॥ ५८ ॥ हिरव्या पाचनामक रत्नानी युक्त अशा या पर्वताच्या तटापासून पाचूंचे हिरवे किरण वर पसरत असल्यामुळे हरिणांना हे गवताचे अंकुर आहेत असे वाटून जवळ येतात परंतु नंबर तेथे गवत न मिळाल्याने ते खिन्न होतात ।। ५९ ।। या पर्वतावरील पद्मरागमण्यांच्या किरणानी व्याप्त झालेल्या येथील वनभूमि जणु सम्ध्याकालच्या लाल प्रकाशांच्या उत्कृष्ट शोभेला त्या पुष्ट करीत आहेत असे वाटते ॥ ६० ॥ सूर्याच्या किरणानी ज्यांना स्पर्श केला आहे असे हे सूर्यकान्तमणि प्रज्वलित होत आहेत. बरोबरच आहे की, तेजस्वी पदार्थाचा सम्पर्क झाला असता बहुत करून तशाच प्रकारची तेजाची पुष्टि तो करीत असतो असे दिसून येते ।। ६१ ।। येथे चन्द्राच्या किरणांचा स्पर्श झाल्यामुळे चन्द्रकान्तमणि दररोज रात्री झिरपतात पण ते झिरपून देखिल मुळीच कमी होत नाहीत. यावरून पुद् गलद्रव्याची स्थिति फार विचित्र आहे असे म्हणावयास हरकत नाही ।। ६२ ।। हा पर्वत बिलकुल जिनेश्वराप्रमाणे आहे. जसे जिनेश्वर देवाकडून सेवनीय पूजनीय आहेत, देव प्रभुकडे जसे येतात तसे ह्या पर्वताकडेही येतात, प्रभूनी सिंहासनाचा परिग्रह जसा केला आहे तसा हा पर्वत सिंहांचा व असणा नावाच्या वृक्षांचा आश्रय झाला आहे. जिनेश्वर सर्वज्ञपणामुळे महान् आहेत व हा पर्वत आपल्या विस्ताराने व उंचीने महान् आहे. जिनेश्वर स्वरूपात अनन्त ज्ञानादिस्वरूपात निश्चल आहेत तसे हा पर्वतही स्वस्थानापासून कधी ढळत नाही म्हणून जिनेश्वराप्रमाणे निश्चल भासतो ॥ ६३ ॥ हे राजेन्द्रा, शुद्ध स्फटिकाप्रमाणे निर्मल व फार विशाल आकार धारण करणारा हा सर्वपर्वतांचा राजा शुद्धात्म्याप्रमाणे-कर्मरहित सिद्धपरमात्म्याप्रमाणे हे राजश्रेष्ठा तुला सुख प्राप्ति करून देणारा होवो ॥ ६४ ॥ Page #246 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-७२) महापुराण इति शंसति तस्याद्रेः परां शोभां पुरोधसि । शंसाद्भूत इवानन्दं परं प्राप परन्तपः ॥ ६५ किञ्चिच्चान्तरमुल्लङ्घ्य प्रसन्नेनान्तरात्मना । प्रत्यासन्नजिनास्थानं विदामास विदांवरः ॥ ६६ निपतत्पुष्पवर्षेण दुन्दुभीनां च निःस्वनैः । विदाम्बभूव लोकेशमभ्यासकृतसन्निधिम् ॥ ६७ सुमनोवृष्टिरापतदापूरितनभोऽङ्गणा । पवनस्तमभीयायप्रत्युद्यन्निव पावनः ॥ ६८ मन्दारकुसुमोद्गन्धिरान्दोलितलतावनः । विरजीकृत भूलोकः समं शीतैरपां कणैः ॥ ६९ शुश्रुवे ध्वनिरामन्द्रो दुन्दुभीनां नभोऽङ्गणे । श्रुतः केकिभिरुग्रीवर्धनस्त नितशकिभिः ॥ ७० गुल्फदघ्नप्र सू नौघसम्मर्दमृदुना पथा । तमद्विशेषमश्रान्तः प्रययौ स नृपाप्रणीः ॥ ७१ ततोऽधिरुह्य तं शैलमपश्यत्सोऽस्य मूर्धनि । प्रागुक्तवर्णनोपेतं जनमास्थानमण्डलम् ॥ ७२ ( २३५ याप्रमाणे पुरोहित त्या कैलास ( अष्टापद ) पर्वताचे उत्कृष्ट सौन्दर्य वर्णित असता शत्रूना सन्ताप देणारा भरतेश जणु सुखात आकण्ठ बुडल्याप्रमाणे अतिशय आनन्दित झाला ।। ६५ ॥ त्या पर्वतावर कांही अन्तर भरतेशाला उल्लंघावे लागले. यानंतर विद्वच्छ्रेष्ठ त्या भरतेशाला आदिप्रभूचे समवसरण जवळच आले आहे असे आढळून आले. त्याला फार प्रसन्नता वाटली ।। ६६ । आकाशातून पुष्पवृष्टि होत होती व नगाऱ्यांचा आवाज ऐकू येत होता व त्यावरून आदिभगवंत आता जवळच आहेत हे त्याने ओळखले ।। ६७ ॥ मंदारपुष्पांचा सुगंध धारण करणारा व ज्याने लतावने हालविली आहेत असा पवित्र वायु उभा राहून जणु भरतेशाचे स्वागत करण्यासाठी त्याच्याकडे आला ।। ६८ ।। जिने सर्व आकाशाचे अंगण व्यापले आहे अशी पुष्पवृष्टि त्या पर्वतावर होऊ लागली व तिच्याबरोबरच ज्यानी भूतल धुळीनी रहित केले आहे असे थंड पाण्याचे कणही पडू लागले अर्थात् पुष्पवृष्टि व जलकणवृष्टिही होऊ लागली ।। ६९ ।। त्यावेळी आकाशात होत असलेला नगाऱ्यांचा गंभीर स्वर ऐकू येऊ लागला आणि मेघांच्या गडगडाटाची शंका ज्याना आली आहे अशा मोरानी आपल्या माना उंच करून तो गंभीर ध्वनि ऐकला ॥ ७० ॥ घोट्यापर्यन्त पसरलेल्या फुलांच्या समूहांनीं अत्यन्त मृदुल झाला आहे अशा मार्गाने न थकता पर्वताच्या उरलेल्या भागापर्यन्त राजश्रेष्ठ भरताने गमन केले ॥ ७१ ॥ - यानंतर त्या पर्वतावर चढून त्याच्या शिखरावर पूर्वी ज्याचे वर्णन केले आहे असे आदिभगवंताचे आस्थानमण्डल - समवसरण भरतेश्वराने पाहिले ॥ ७२ ॥ Page #247 -------------------------------------------------------------------------- ________________ २३६) महापुराण (३३-७३ समेत्यावसरावेक्षास्तिष्ठन्त्यस्मिन्सुरासुराः । इति तज्जैनिरुक्तं तत्सरणं समवादिकम् ॥ ७३ आखण्डलधनुर्लेखामखण्डपरिमण्डलाम् । जनयन्तं निजोद्योत लीसालमवासवत् ॥ ७४ हेमस्तम्भाविन्यस्तं रत्नतोरणभास्वरम् । धूलीसालमतीत्यासौ मानस्तम्भमपूजयत् ॥ ७५ मानस्तम्भस्य पर्यन्तसरसीः ससरोरुहाः । जनीरिव श्रुतीः स्वच्छशीतलापो ददर्श सः ॥ ७६ धूलीसालपरिक्षेपस्यान्तर्भागे समन्ततः । वीथ्यन्तरेषु सोऽपश्यद्देवावासोचिता भुवः ॥ ७७ अतीत्य परतः किञ्चिद्ददर्श जलखातिकाम् । सुप्रसन्नामगाधां च मनोवृत्तिं सतामिव ॥ ७८ वल्लीवनं ततोऽद्राक्षीनानापुष्पलताततम् । पुष्पासवरसामत्तभ्रमभ्रमरसङकुलम् ॥ ७९ । ततः किञ्चित्पुरो गच्छन्सालमाद्यं व्यलोकत । निषधाद्रितटस्पद्धिवपुषं रत्नभाजषम् ॥ ८० सुरदौबारिकारक्ष्यतत्प्रतोलीतलाश्रितान् । सोऽपश्यन्मङ्गलद्रव्यभेदास्तत्राष्टधास्थितान् ॥ ८१ ____ स्वर्गीय देव आणि भवनत्रिकांतले असुरदेव हे जेथे येऊन जिनेश्वराच्या दर्शनाच्यावेळेची बाट पाहत राहतात अशा जिनेन्द्राच्या सभास्थानाला तज्ज्ञ लोकानी समवरसरण म्हटले आहे ।। ७३ ॥ यानंतर भरतराजा आपल्या प्रभेने अखण्ड व गोलाकार रूपाची इन्द्रधनुष्याची शोभा उत्पन्न करणान्या धूलीसालनामक पहिल्या तटाजवळ आला ॥ ७४ ॥ सुवर्णाच्या खांबांच्या अग्रभागावर लावलेल्या रत्नांच्या तोरणानी चकाकणाऱ्या धूलीसालाला उल्लंघून भरतेश्वराने मानस्तम्भाचे पूजन केले ॥ ७५ ॥ मानस्तम्भाच्या सभोवती थंडपाण्यानी भरलेली व कमलानी सहित अशी सरोवरे जी जिनेश्वरानी सांगितलेल्या वाणीप्रमाणे वाटत होती ती भरतेशाने पाहिली ।। ७६ ।। धूलीसालाच्या घेऱ्याच्या आतील भागात चोहीकडे जे मार्ग होते त्याच्यामध्ये ज्या देवाना राहण्यास योग्य अशा भूमि आहेत त्याना भरतेशाने पाहिले ।। ७७ ।। याच्यापुढे थोडेसे गेल्यानंतर भरतेशाने सत्पुरुषांच्या मनाप्रमाणे अतिशय प्रसन्न व अगाध जलखातिका-खंदक पाहिला ।। ७८ ॥ यानंतर अनेक प्रकारच्या पुष्पांनी गजबजलेल्या वेलींनी विस्तृत व पुष्पातील मकरन्द प्राशनाने मत्त झालेल्या भ्रमरानी व्याप्त अशा वल्लीवनाला भरतेशाने पाहिले ।। ७९ ॥ यानंतर थोडेसे पुढे जाऊन भरतेशाने पहिला तट पाहिला, तो निषधपर्वताच्या तटाशी स्पर्धा करणारा व रत्नांच्या कान्तीनी चमकत होता ।। ८० ॥ यानंतर द्वारपालाचे काम करणाऱ्या देवानी रक्षिलेल्या वेशीच्या तळमजल्याच्या आश्रयाने असलेल्या आठ प्रकारच्यां मंगल द्रव्याना चक्रवर्तीने पाहिले ॥ ८१ । Page #248 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-९०) महापुराण (२३७ ततोऽन्तः प्रविशन्वीक्ष्य द्वितयं नाटयशालयोः । प्रीति प्राप परां चत्री शक्रस्त्रीनर्तनोचितम् ॥ ८२ स धूमघटयोर्युग्मं तत्र वीथ्युभयान्तयोः । सुगन्धीन्धन सन्दोहोद्गन्धिधूपं व्यलोकयत् ॥ ८३ कक्षान्तरे द्वितीयेऽस्मिन्नसौ वनचतुष्टयम् । निदध्यौ विगलत्पुष्पैः कृतार्घमिव शाखिभिः ॥ ८४ प्रफुल्लवनमाशोकं साप्तपर्णं च चाम्पकम् । आम्रेडितं वनं प्रेक्ष्य सोऽभूदास्म्रेडितोत्सवः ॥ ८५ तत्र चैत्यद्रुमांस्तुङ्गाजिनबिम्बैरधिष्ठितान् । पूजयामास लक्ष्मीवान्पूजितान्नसुरेशिनाम् ॥ ८६ तत्र किन्नरनारीणां गीतैरामन्द्रमूर्च्छनैः । लेभे परां धृतिं चकी गायन्तीनां जिनोत्सवम् ॥ ८७ सुगन्धिपवनामोदनिःश्वासा कुसुमस्मिता । वनश्रीः कोकिलालापैः सञ्जञ्जल्पेव चक्रिणा ॥ ८८ भृङ्गसङ्गीत सम्मूर्च्छत्कोकिलानकनिःस्वनैः । अनङ्गविजयं जिष्णोर्वनानीवोदघोषयन् ॥ ८९ त्रिजगज्जनताजत्र प्रवेशरभसोत्थितम् । तत्राशृणोन्महाघोषमपां घोषमिवोदधेः ॥ ९० यानंतर त्या भरतेशाने आत प्रवेश करून इन्द्राच्या स्त्रिया नृत्य करण्यास योग्य असलेल्या दोन नाट्यशाला पाहिल्या. त्या पाहून त्याला फार संतोष वाटला ॥ ८२ ॥ तेथे मार्गाच्या दोन्ही बाजूंचे स्थानी चक्रवर्तीने दोन धूपघट पाहिले. सुगंधयुक्त लाकडांच्या समूहानी ज्यांच्यातून सुगंधित धूम वर पसरत आहे असे ते होते ।। ८३ ।। याच्याच दुसऱ्या विभागात भरतेशाने चार वने पाहिली. ज्यांच्यापासून फुले गळत आहेत अशा वृक्षांच्याद्वारे प्रभु जिनेशाला ती जणु अर्घ्य देत आहेत अशी दिसली ॥ ८४ ॥ जी फुलानी गजबजली आहेत अशी अशोकवन, सप्तपर्णवन, चंपकवन व आम्रफलांनी प्रशंसनीय असे आम्रवन अशी चारवने पाहून भरतचक्रीचा उत्सव आनंद द्विगुणित झाला ॥ ८५ ॥ त्या चार वनात जे मनुष्य व देवांचे अधिपति अशा राजे व इन्द्रानी पूजिले आहेत व जिनबिम्बानी युक्त आहेत अशा चैत्यवृक्षांना लक्ष्मीसंपन्न भरताने पूजिले ।। ८६ ।। तेथे श्रीजिनाच्या जन्मादिकल्याणांचे गायन थोड्या गंभीर अशा तानानी युक्त असे ज्या गात आहेत अशा किन्नरींच्या गायनानी चक्रवर्तीला फार आनंद झाला ॥ ८७ ॥ जिचा निश्वास सुगंधी वान्याच्या गंधाने युक्त आहे. फुले हेच जिचे हास्य आहे. अशी वनश्री कोकिलांच्या आलापानी जणु चक्रवर्तीशी बोलू लागली ॥ ८८ ॥ भ्रमरींच्या संगीताचे मिश्रण ज्यात झाले आहे अशा कोकिलारूपी नगान्यांच्या शब्दानी दुमदुमलेली ती वने आदिभगवंतानी मदनावर जो विजय मिळविला आहे त्याचे जणु वर्णन चक्रवर्तीच्या पुढे करीत आहेत अशी दिसली ।। ८९ ।। त्रैलोक्यातील जनांचा सतत होत असलेला जो प्रवेश त्यामुळे उत्पन्न झालेला जो मोठा ध्वनि तो जणु समुद्राची गर्जना आहे असा भासला ।। ९० ।। Page #249 -------------------------------------------------------------------------- ________________ २३८) ( ३३-९१ अनवेदी मथापश्यद्वनरुद्धावनेः परम् । वनराजीविलासिन्याः काञ्चीमिव कनन्मणिम् ॥ ९१ तद्गोपुरावन क्रान्त्वा ध्वजरुद्धार्वान सुराट् । आजुहूषुमिवापश्यन्मरुद्धूतैर्ध्वजांशुकैः ॥ ९२ सावनिः सावनीवोद्यद्ध्वजमालातताम्बरा । सचक्रा सगजा रेजे जिनराजजयोजिता ॥ ९३ haat हरिवस्त्राजबहिणेभ गरुन्मनाम् । स्रगुक्षहंसचक्राणां दशधोक्ता जिनेशिनः ॥ ९४ तानेकशः शतं चाष्टौ ध्वजान्प्रतिदिशं स्थितान् । वरिवस्यन्नगाच्चक्री स तद्रुद्धावनेः परम् ॥ ९५ द्वितीयमार्जुनं सालं स गोपुरचतुष्टयम् । व्यतीत्य परतोऽपश्यन्नाट्यशालादिपूर्ववत् ।। ९६ तत्र पश्यन्सुरस्त्रीणां नृत्यं गीतं निशामयन् । धूपामोदं च सञ्जिघ्रन्सुप्रीताक्षोऽभवद्विभुः ॥ ९७ कक्षान्तरे ततस्तस्मिन् कल्पवृक्षवनावनिम् । स्रग्वस्त्राभरणादीष्टफलदां स निरूपयन् ॥ ९८ सिद्धार्थपादपांस्तत्र सिद्ध बिम्बैरधिष्ठितान् । परीत्य प्रणमन्प्राचदचिताना किनायकैः ।। ९९ महापुराण वनानी व्यापिलेल्या प्रदेशांच्या पलिकडे वनपंक्तिरूपी स्त्रीचा चमकणाऱ्या मण्यानी युक्त असा जणु कमरपट्टा आहे अशी वनवेदी चक्रवर्तीने पाहिली ।। ९९ ।। या वनवेदीच्या वेशीचा प्रदेश उल्लंघून सम्राट् भरताने ध्वजानी घेरलेला भूप्रदेश पाहिला. तो वाऱ्याने फडफडविलेल्या ध्वजवस्त्रानी आपणास जणु बोलावित आहे असे भरतेशाला वाटले ।। ९२ ।। यज्ञाच्या भूमिप्रमाणे जिने उंच ध्वज व मालांनी आकाश व्याप्त केले आहे, अशी ती भूमि जिनराजानी घातिकर्मांचा नाश करून विजय मिळविल्यामुळे धर्मचक्र व गज-हत्ती या चिह्नांनी फार शोभली ।। ९३ ।। श्रीजिनेन्द्राच्या ध्वजांचे दहा भेद आहेत ते याप्रमाणे सिंह, वस्त्र, कमळ, मोर, हत्ती, गरुड,, माला, बैल, हंस, व चक्र अर्थात् ध्वजावर ही चिह्न असतात ।। ९४ ।। प्रत्येक दिशेत एकेक प्रकारचे एकशे आठ, एकशे आठ ध्वज होते या ध्वजांचे पूजन करीत करीत चक्रवर्ती ध्वजभूमींच्या प्रदेशाच्या पुढे गेला ।। ९५ ।। यानंतर त्याने चार गोपुरानीसहित असलेल्या चांदीच्या तटाला उल्लंघिले व त्या तटाच्यापुढे असलेल्या दोन नाट्यशाला वगैरेना पूर्वीप्रमाणेच पाहिले ।। ९६ ।। तेथे त्याने देवांगनांचे नृत्य पाहिले व गाणे ऐकिले व धूपघटांचा सुगंध हुंगून त्यांची इन्द्रिये प्रसन्न झाली ।। ९७ ।। पुढे दुसऱ्या विभागात जाऊन भरतप्रभूने कल्पवृक्षवनभूमि पाहिली. ती पुष्पमाला, वस्त्रे अलंकार आदि आवडत्या पदार्थाना देणारी होती ॥ ९८ ॥ तेथे ज्यांची देवाचे नायक अशा इंद्राकडून नेहमी पूजा केली जाते अशा सिद्धबिंबानी अधिष्ठित झालेल्या सिद्धार्थवृक्षाना भरतेश्वराने प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार व पूजिले ।। ९९ ।। केला Page #250 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१०९) महापुराण (२३९ वनवेदी ततोऽतीत्य चतुर्गोपुरमण्डनाम् । प्रासादरुद्धामनि स्तूपांश्च प्रभुरक्षत ॥ १०० प्रासादा विविधास्तत्र सुरावासाय कल्पिताः । त्रिचतुष्पञ्चभूम्याद्या नानाछन्दैरलङकृताः ॥१०१ स्तूपाश्च रत्ननिर्माणाः सान्तरा रत्नतोरणः । समन्ताज्जिनबिम्बैस्ते निचिताङ्गाश्चकाशिरे ॥१०२ तान्पश्यन्नर्चयंस्तांश्च तांश्च तांश्च स कोर्तयन् । तां च कक्षां व्यतीयाय विस्मयं परमीयिवान्॥१०३ नभःस्फटिकनिर्माणं प्राकारवलयं ततः । प्रत्यासजिनस्येव लब्धशुद्धि ददर्श सः ॥ १०४ तत्र कल्पोपगैर्देवैर्महादौवारपालकः । सादरं सोऽभ्यनुज्ञातः प्रविवेश सभां विभोः ॥ १०५ समन्ताद्योजनायामविष्कम्भपरिमण्डलम् । श्रीमण्डपं जगद्विश्वमपश्यन्मान्तमात्मनि ॥१०६ तत्रापश्यन्मुनीनिद्धबोधान्देवीश्चकल्पजाः । सायिका नपकान्ताश्च ज्योतिर्वन्योरगामरीः॥ १०७ भावनव्यन्तरज्योतिःकल्पेन्द्रान्पार्थिवान्मृगान् । भगवत्पादसम्प्रेक्षाप्रीतिप्रोत्फुल्ललोचनान् ॥ १०८ गणनातिकमात्पश्यन्परीयाय परन्तपः । त्रिमेखलस्य पीठस्य प्रथमां मेखलां श्रितः ॥ १०९ ___ यानंतर चार गोपुरानी शोभणाऱ्या वनवेदीपासून भरतेश्वराने पुढे गमन केले व त्याने पुढे अनेक प्रासादानीं शोभत असलेली भूमि पाहिली आणि अनेक स्तूपही पाहिले ।। १०० ॥ तेथील ते प्रासाद अनेक आकाराचे होते. देवाना राहण्याकरिता त्यांची रचना केली होती. ते प्रासाद तीन, चार, पाच वगैरे मजल्यांचे होते आणि स्वस्तिक, सर्वतोभद्र, नन्द्यावर्त आदिक आकृतीनी शोभत होते ।। १०१॥ ज्यांच्यामध्ये रत्नांची तोरणे आहेत असे रत्ननिर्मित स्तूप आहेत. या स्तूपांच्या सभोवती जिनप्रतिमा आहेत व त्यानी युक्त असे ते स्तूप फार कान्तिसंपन्न आहेत ॥ १०३ ॥ त्यांना भरतप्रभूने पाहिले त्यांची पूजा केली, व त्यांचे त्याने वर्ण केले. या प्रमाणे करून त्याने त्या प्रदेशाचे उल्लंघन केले व तो अतिशय विस्मय पावला ॥ १०४ ।। जिनेश्वराच्या जवळ निवास केल्यामुळे जणु ज्याला जिनेश्वराच्या सन्निध राहिल्यामुळे निर्मलता प्राप्त झाली आहे असा आकाशस्फटिकांनी ज्याची निर्मिति केली आहे अशा प्राकार वलयाला त्यांनी पाहिले ।। १०५ ।। ___ यानंतर महाद्वाराचे रक्षण करणाऱ्या कल्पवासी द्वारपालांनी आदराने ज्याला मान्यता दिली आहे अशा भरतेश्वराने भगवंत आदिजिनाच्या सभेत प्रवेश केला ॥ १०६ ।।। जिनेशाच्या सभेला श्रीमण्डप म्हणतात. तो श्रीमण्डप सर्व बाजूनी एक योजन लांब व एक योजन रुंद व गोल होता. व आपल्या आंत त्याने सर्व जगाला स्थान दिले होते. असा श्रीमण्डप भरतेश्वराने पाहिला ।। १०७-१०८ ।। शत्रूना ताप देणान्या भरताने तेथे ज्यांचे ज्ञान वाढले आहे अशा मुनींना, कल्पवासी देवीना, आर्यिकासहित, राजांच्या स्त्रियांना, ज्योतिष्क देवस्त्रिया, व्यंतरदेवी, व नागदेवीभवनवासीदेवांगना, भवनवासी देव, व्यंतरदेव, ज्योतिष्क देव व स्वर्गवासी देव त्यांचे इन्द्र, याच प्रमाणे अनेक राजे व पशु या सर्वांना भरतेश्वराने पाहिले. हे सर्व भगवंताचे चरण पाहून Page #251 -------------------------------------------------------------------------- ________________ २४० ) महापुराण ( ३३-११० तत्रानचं मुदा चत्री धर्मचक्रचतुष्टयम् । यक्षेन्द्रविघृतं मूर्ध्ना ब्रध्नबिम्बानुकारि यत् ॥ ११० द्वितीयमेखलायां च प्राचंदष्टौ महाध्वजान् । चक्रेभोक्षाब्जपञ्चास्य स्रग्वस्त्रगरुडाङ कितान् ॥ १११ मेखलायां तृतीयस्यामथैक्षिष्ट जगद्गुरुम् । वृषभं स कृती यस्यां श्रीमद् गन्धकुटी स्थिता ॥ १२२ तद्गर्भे रत्नसन्दर्भ रुचिरे हरिविष्टरे । मेरुशृङ्ग इवोत्तुङ्गे सुनिविष्टं महातनुम् ॥ ११३ छत्रत्रयकृत च्छामप्यच्छायमघच्छिदम् । स्वतेजोमण्डलाक्रान्तन सुरासुरमण्डलम् ॥ ११४ अशोकशाखिचिह्नेन व्यञ्जयन्तमिवाञ्जसा । स्वपादाश्रयिणां शोकनिरासे शक्तिमात्मनः ॥ ११५ चलत्प्रकीर्णकाकीर्णपर्यन्तं कान्तविग्रहम् । रुक्माद्रिमिव वप्रान्तपतन्निर्शरसडकुलम् ॥ ११६ तेजसां चक्रवालेन स्फुरता परितो वृतम् । परिवेषवृत्तस्यार्कमण्डलस्यानुकारकम् ।। ११७ तद्विषयक प्रीतीने अतिशय प्रफुल्ल नेत्राचे बनले होते. अर्थात् या सर्वांचे डोळे प्रभूला पाहून अतिशय हर्षित झाले होते. असंख्य अशा या सर्वांना पाहून भरतेशाने श्रीमण्डपाला तीन प्रदक्षिणा दिल्या. यानंतर तो तीन मेखला - कट्टयापैकी पहिल्या मेखलेवर उभा राहिला ॥ १०९ ॥ तेथे आनंदाने त्याने चार धर्मचक्राना पूजिले - ही चार चक्रे यक्षेन्द्रांनी आपल्या मस्तकावर धारण केली होती व ही सूर्यबिंबाप्रमाणे तेजस्वी होती ।। ११० ।। दुसऱ्या मेखलेवर भरतेशाने चक्र, हत्ती, बैल, कमल, सिंह, पुष्पमाला, वस्त्र व गरुड या चिह्नानी युक्त अशा आठ महाध्वजांची पूजा केली ॥ १११ ॥ यानंतर तिसन्या मेखलेवर जी अतिसुंदर गन्धकुटी आहे तिच्यांत जगताचे गुरु अशा वृषभ जिनेश्वराला पुण्यवान् भरताने पाहिले ॥। ११२ ।। या गन्धकुटीच्या आंत मेरुपर्वताच्या शिखराप्रमाणे उंच व रत्नाच्या रचनेनें सुंदर अशा सिंहासनावर बसलेल्या विशाल शरीरधारी वृषभ जिनाला भरतेशाने पाहिले. हे वृषभनाथ तीन छत्रांनी ज्यांच्यावर सावली केलेली असताही स्वतःच्छायारहित होते अर्थात् पूर्ण तेजस्वी होते, पापविनाशक होते व स्वतःच्या कान्तिमंडलाने त्यांनी सर्व मनुष्य, देव व दानव - भवनत्रिकदेव ( ज्यांना असुर म्हणतात ) यांच्या तेजाला पराभूत केले होते. अशा प्रभूला भरतेशाने पाहिले. हे प्रभु अशोकवृक्षाच्या चिह्नाने स्वतःच्या चरणांचा ज्यांनी आश्रय घेतला आहे त्यांच्या शोकाला दूर करण्याचे सामर्थ्य परमार्थपणाने आपणामध्ये आहे. हे जणु व्यक्त करीत होते ।। ११३ ते ११५ ।। हलणाऱ्या चवऱ्यानी ज्यांच्या सभोवतीचा भाग व्याप्त झाला आहे, व ज्यांचे शरीर सुंदर आहे, असे वृषभ जिनेश्वर तटावरून पडणाऱ्या निर्झरांनी व्याप्त झालेल्या मेरु पर्वताप्रमाणे जणु भासत होते ॥ ११६ ॥ स्फुरण पावणा-या कान्तिमण्डलाने ( भामण्डलाने ) प्रभु वृषभनाथ सर्व बाजूंनी घेरले गेले होते व त्यामुळे ते ज्याच्या सभोवती गोल तेजाचे मंडल पसरले आहे अशा सूर्यमंडलाचें अनुकरण करीत आहेत असे वाटले ।। ११७ ॥ Page #252 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१२५) महापुराण वियदुन्दुभिभिर्मन्द्रघोषैरुद्घोषितोदयम् । सुमनोर्वार्षाभिदिव्यजीमूतैरूर्जितश्रियम् ॥ ११८ स्फुरद्गम्भीरनिर्घोषप्रोणितत्रिजगत्सभम् । प्रावृषेण्यं पयोवाहमिव धर्माम्बुवर्षिणम् ॥ ११९ नानाभाषात्मिकां दिव्यभाषामेकात्मिकामपि । प्रथयन्तमयत्नेन हृद्ध्वान्तं नुदतीं नृणाम् ॥ १२० अमेयवीर्यमाहार्य विरहेऽप्यतिसुन्दरम् । सुवाग्विभवमुत्सर्पत्सौरभं शुभलक्षणम् ॥ १२१ अस्वेदममलच्छायम पक्ष्मस्पन्दबन्धुरम् । सुसंस्थानमभेद्यं च दधानं वपुजतम् ॥ १२२ इत्यप्रत माहात्म्यं दूरादालोकयन् जिनम् । प्रोऽभूत्स महीस्पृष्टजानुरानन्दनिर्भरः ॥ १२३ दूरानतचलन्मौलिरालोलमणिकुण्डलः । स रेजे प्रणमन्भक्त्या जिनं रत्नैरिवार्धयन् ॥ १२४ ततो विधिवदानर्च जलगन्धस्रगक्षतैः । चरुप्रदीपधूपैश्च सफलैःस फलेप्सया ॥ १२५ (२४१ ज्यांचा ध्वनि गंभीर आहे अशा आकाशांतील नगान्यांनी प्रभूचा उत्कर्ष सूचित केला होता व पुष्पवृष्टि करणाऱ्या दिव्यमेघांनीं प्रभूची शोभा वृद्धिंगत झाली होती ।। ११८ ॥ चोहीकडे पसरणारा जो गंभीर दिव्यध्वनि त्याने भगवंतानी त्रैलोक्यसभेला अतिशय आनंदित केले होते व धर्मरूपी जलाची वृष्टि प्रभु करीत होते त्यामुळे ते पावसाळी मेघाप्रमाणे वाटत होते ।। ११९ ।। जी भव्यमनुष्यांच्या मनांतील अज्ञानान्धकारास दूर करिते, व जी एकस्वरूपाची असूनही दिव्यभाषारूप असल्यामुळे नानाभाषारूपाने परिणमन करिते व अयत्नाने-यत्न न करताही मुखातून बाहेर पडते. अशा भाषेला वृषभ प्रभूंनी धारण केले होते ।। १२० ।। प्रभु वृषभनाथ अपरमित शक्तिधारक होते व आभूषणांनी रहित असूनही अतिसुंदर होते. उत्तम वाणीरूपी वैभवाने युक्त होते. त्यांचे शरीर ज्यापासून सुगन्ध चोहोकडे पसरत आहे असे होते व अनेक शुभलक्षणानी युक्त होते ।। १२१ ।। त्यांचे शरीर अस्वेद-घाम रहित होते. त्यांची शरीरकान्ति मलरहित होती. त्यांच्या नेत्रांच्या पापण्या हालत नव्हत्या व नेत्र फार सुंदर होते. ते समचतुरस्र संस्थानाचे धारक होते. शरीर अतिशय बलयुक्त व अभेद्य होते ।। १२२ ॥ प्रभु वृषभनाथाचे माहात्म्य अतर्क्य होते. अशा प्रभूला भरतेशाने दुरून पाहिले व तो अतिशय नम्र झाला. अत्यानन्दित झाला व त्याने आपले दोन गुढघे भूमीवर टेकून प्रभूला नमस्कार केला ॥। १२३ ।। लांबून नम्र झाल्यामुळे ज्याचा किरीट हालत आहे व ज्याची रत्नखचित कुण्डले हालत आहेत असा तो भरत भवतीने नमस्कार करीत असता श्रीजिनेशाला रत्नांनी जणु अर्ध्य अर्पण करीत आहे असा शोभला ॥ १२४ ॥ यानंतर मोक्षफल मिळावे या इच्छेने त्या चक्रवर्तीने जल, गंध, पुष्पमाला, अक्षता, नैवेद्य, दीप, धूप, व फळे यांनी यथाविधि पूजा केली ।। १२५ ।। म. ३१ Page #253 -------------------------------------------------------------------------- ________________ २४२) महापुराण (३३-१२६ कृतपूजाविधिर्भूयः प्रणम्य परमेष्ठिनम् । स्तोतुं स्तुतिभिरत्युच्चरारेभे भरताधिपः ॥ १२६ त्वां स्तोष्ये परमात्मानमपारगुणमच्युतम् । चोदितोऽहं बलाद्धक्त्या शक्त्या मन्दोऽप्यमन्दया ॥१२७ क्व ते गुणा गणेन्द्राणामप्यगम्याः क्व मादृशः । तथापि प्रयते स्तोतुं भक्त्या त्वद्गुणनिघ्नया ॥१२८ फलाय त्वद्गता भक्तिरनल्पाय प्रकल्पते । स्वामिसम्पत्प्रपुष्णाति ननु सम्पत्परम्पराम् ॥ १२९ घातिकर्ममलापायात् प्रादुरासन्गुणास्तव । धनावरणनिर्मुक्तमूर्तेर्भानोर्यथांशवः ।। १३० यथार्थदर्शनज्ञानसुखवीर्यादिलब्धयः । क्षायिक्यस्तव निर्जाता घातिकर्मविनिर्जयात् ॥ १३१ केवलाख्यं परं ज्योतिस्तव देव यदोदगात् । तदालोकमलोकं च त्वमबुद्धा विनावधेः ।। १३२ सार्वश्यं तव वक्तीश वचःशुद्धिरशेषगा। न हि वाग्विभवो मन्दधियामस्तीह पुष्कलः ॥ १३३ ज्याने पूजन केले आहे अशा भरतपति भरताने पुनः परमेष्ठि वृषभ जिनेशाला नमन करून अतिशय उच्चस्वराने याप्रमाणे स्तुतीनी स्तुति करण्यास आरंभ केला ॥ १२६ ।। हे प्रभो, आपण घातिकर्माचा नाश करून अनन्तज्ञानादिगुणांचे धारक व स्वगुणापासून केव्हाही च्युत न होणारे, असे अत्यंत निर्मल परमात्मा बनलेले आहात. स्तुति करण्याची अत्यन्त मन्द माझी शक्ति आहे तरी ही मी फार मोठ्या भक्तीने बलात्काराने प्रेरित झालो आहे. म्हणून आपली स्तुति करीत आहे ।। १२७ ।। ___ हे प्रभो, तुझे गुण गणधारांनाही जाणता येणे शक्य नाही. मंग माझ्यासारखा मनुष्य त्या गुणांचे वर्णन कसे करू शकेल? तरीही माझी भक्ति तुझ्या गुणांच्या अधीन झाली आहे म्हणून तुझी स्तुति करण्याचा मी प्रयत्न करतो ॥ १२८ ॥ हे प्रभो, तुझ्या ठिकाणी भक्ति ठेवून मी तुझी स्तुति केली तर ती विपुल फल मला देण्यास समर्थ होईल. तूं त्रैलोक्याचा स्वामी आहेस. तुझे हे ऐश्वर्य आमच्या अनेक प्रकारच्या संपत्तीला कारण होईल ।। १२९ ।। जसे मेघांच्या आवरणापासून मुक्त झालेल्या सूर्याचे किरण स्पष्ट प्रकट होतात तसे घातिकर्मरूपी मल नाहीसा झाल्याने हे प्रभो तुझ्या ठिकाणी सर्वगुण पूर्ण प्रकट झाले आहेत ।। १३० ॥ घातिकम-ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय व अन्तराय यांना हे प्रभो आपण जिंकले आहे म्हणून आपणास यथार्थ दर्शन, ज्ञान, सुख, वीर्य वगैरे क्षायिकलब्धि प्राप्त झाल्या आहेत ।। १३१ ॥ ___जेव्हां हे प्रभो आपणास केवलज्ञानरूपी ज्योति प्राप्त झाली तेव्हां आपण लोक व अलोकाला मर्यादारहित व युगपत् जाणले. आधी दर्शन झाल्यानंतर ज्ञान होणे हा क्रम आपल्या ठिकाणी नाही ॥ १३२ ॥ हे प्रभो, सर्व जीवादिक विषयाविषयी तुझ्या वचनाची शुद्धि- खरा विषय समजावून देणे हा धर्म तुझ्या सर्वज्ञपणाला प्रकट करीत आहे. कारण मंदबुद्धीच्या लोकात असे वचनाचे वैभव- माहात्म्य असतच नाही ।। १३३ ।। Page #254 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१३६) महापुराण (२४३ वक्तृप्रामाण्यतो देव वचःप्रामाण्यमिष्यते । न ह्यशुद्धतराद्वक्तुः प्रभवन्त्युज्ज्वला गिरः ॥ १३४ सप्तभडग्यात्मिकेयं ते भारती विश्वगोचरा । आप्तप्रतीतिममलां त्वय्यद्भावयितुं क्षमा ॥ १३५ स्यावस्त्येव हि नास्त्येव स्यादवक्तव्यमित्यपि । स्यादस्ति नास्त्यवक्तव्यमिति ते सार्वभारती ॥१३६ हे जिनदेवा वक्त्याच्या खरेपणावरून त्याच्या वचनाचा खरेपणा मानला जातो. कारण अत्यन्त अशुद्ध वक्त्यापासून उज्ज्वल अशी वाणी उत्पन्न होणे शक्य नाही ॥ १३४ ॥ हे जिनदेवा, आपल्या मुखातून जी सप्तभङगात्मक वाणी निघते ती सगळ्या विश्वाला विषय करिते-जाणते व ती वाणी आपल्यामध्ये निदोष आप्तता सर्वज्ञता आहे अशी प्रतीति उत्पन्न करण्यास समर्थ आहे ।। १३५ ।। __ सर्वजीवांचे हित करणा-या हे जिनदेवा, आपली सप्तभंगात्मक वाणी याप्रमाणे आहे. १ जीवादिक पदार्थ कथंचित् आहेतच, व २ कथंचित् नाहीतच ३ कथंचित् क्रमाने दोन्ही प्रकारचेही आहेतच, ४ कथंचित्, अवक्तव्यही आहेतच ५ कथंचित् अस्तित्वरूप असून अवक्तव्य आहेत ६ कथंचित् नास्तित्वरूप होऊन अवक्तव्य आहेत व ७ क्रमाने अस्तित्व नास्तित्वरूप होऊन अवक्तव्य आहेत. यांचे स्पष्टीकरण- जगातील सर्व पदार्थ स्वचतुष्टयाने- स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव यांच्या अपेक्षेने अस्तित्व स्वरूपच आहेत. पण परचतुष्टयांच्या अपेक्षेनेपरद्रव्य, परक्षेत्र, परकाल व परभाव यांच्या अपेक्षेने नास्तिस्वरूपच आहेत. पण एकावेळी दोन धर्म सांगणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक वस्तु अवक्तव्यरूप देखिल आहे. याप्रमाणे प्रत्येक पदार्थात मुख्यत्वाने अस्तित्व, नास्तित्व आणि अवक्तव्य हे तीन धर्म आढळून येतात. या मुख्य धर्माच्या संयोगाने सात सात धर्म होतात. ते याप्रमाणे जसे ‘जीवोऽस्ति' जीव आहे. येथे जीव व त्याची अस्तित्व क्रिया यात विशेषणविशेष्यभावसंबंध आहे. विशेषण विशेष्यातच राहते म्हणून जीवाचे अस्तित्व जीवातच आहे ते अन्यत्र असत नाही. याच प्रकारे जीवो नास्ति' जीव नाही यात देखिल जीव व नास्तित्व यात विशेषण विशेष्यत्वभाव-संबन्ध आहे. म्हणून वर सांगितलेल्या नियमाप्रमाणे जीवाचे नास्तित्व जीवातच आहे ते इतर ठिकाणी नाही. जीवाच्या या अस्तित्व व नास्तित्व धर्माला एकदम सांगणे शक्य नाही. म्हणून अवक्तव्य नांवाचा धर्मही यात आहे. या तीन धर्मापैकी जेव्हा जीवाच्या फक्त अस्तित्व धर्माची विवक्षा असते तेव्हां स्यात् अस्त्येव जीवः' असा पहिला भंग उत्पन्न होतो. जेव्हा नास्तित्व धर्माची विवक्षा असते तेव्हां 'नास्त्येव जीव:' हा दुसरा भंग होतो. या दोन धर्माची जेव्हां क्रमाने विवक्षा होते तेव्हा 'स्यादस्ति च नास्त्येव जीवः' हा तिसरा भंग उत्पन्न होतो. पण या दोन धर्मांची जेव्हां युगपत् विवक्षा असते तेव्हां दोन विरुद्ध धर्म एकेवेळी सांगणे शक्य नसल्यामळे स्यादवक्तव्यमेव असा चौथा भंग उत्पन्न होतो. जेव्हा अस्तित्व व अवक्तव्य या दोन धर्माची विवक्षा असते तेव्हां 'स्यादस्ति अवक्तव्य' हा पाचवा भंग उत्पन्न होतो. यानंतर जेव्हां नास्तित्व आणि अवक्त धर्माची विवक्षा असते तेव्हां 'स्यान्नास्ति च अवक्तव्यम्' हा साहवा भंग उत्पन्न होतो आणि जेव्हा अस्तित्व, नास्तित्व व अवक्तव्य या धर्मांची विवक्षा असते तेव्हां सातवा धर्म उत्पन्न होतो. अर्थात् ' स्यात् अस्ति नास्ति च अवक्तव्यं' हा सातवा धर्म होय. संयोगाच्या अपेक्षेने प्रत्येक Page #255 -------------------------------------------------------------------------- ________________ २४४) महापुराण (३३-१३७ विरुद्धाबद्धवाग्जालरुद्धव्यामुग्धबुद्धिषु । अश्रद्धेयमनाप्तेषु सार्वश्यं त्वयि तिष्ठते ॥ १४७ रविः पयोधरोत्सङ्गसुप्तरश्मिविकासिभिः । सूच्यतेऽब्जर्यथानद्वदुद्धर्वाग्विभवैर्भवान् १४८ यथान्धतमसे दूरात्तय॑ते विरुतैः शिखी । तथा त्वमपि सुव्यक्तः सूक्तैराप्तोक्तिमर्हसि ॥ १४९ आस्तामाध्यात्मिकीयं ते ज्ञानसम्पन्महोदया। बहिविभूतिरेवैषा शास्ति नः शास्तृतां त्वयि ॥१४० पराय॑मासनं संहं कल्पितं सुरशिल्पिभिः । रत्नरुकछुरितं भाति तावकं मेरुशङ्गवत् ॥ १४१ पदार्थात प्रत्येक धर्म सात सात भंगरूपाने उत्पन्न होतो म्हणून त्याचे वर्णन करण्याकरितां जिनेंद्रभगवंतानी सप्तभङगीरूपवाणीने जीवादिकतत्त्वांचा उपदेश केला आहे. ज्यावेळी जीवाच्या अस्तित्व धर्माचे वर्णन केले जाते त्यावेळी त्याच्या अवशिष्ट नास्तित्वादिक धर्माचा अभाव मानण्यात येऊ नये म्हणून त्याच्या बरोबर स्यात् शब्दाचा प्रयोग केला जातो व संशय दूर करण्यासाठी नियमवाचक 'एव' शब्दाचा प्रयोग केलेला आहे. यामुळे सर्व मिळून ' स्यादस्त्येव जीवः' या वाक्याचा अर्थ जीव स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेने आहेच. याचप्रमाणे अन्यवाक्यांचा अर्थ देखील जाणून घेतला पाहिजे. पदार्थात असलेल्या सर्व धर्मांचे वर्णन विवक्षेला अनुसरून जैनधर्म करीत असतो. अशी जैनधर्माची व्यापक दृष्टि आहे. या दृष्टीच्या अभावी वस्तूचे पूर्ण स्वरूप वणिले जात नाही ॥ १३६ ॥ प्रत्यक्षादि प्रमाणाशी विरुद्ध व असंबद्ध अशा भाषणाच्या जाळ्यात ज्यांनी मूढबुद्धि लोकांना अडकविले आहे अशा लोकामध्ये सर्वज्ञता आहे असे समजणे हे श्रद्धेय नाही. पण हे जिनेश्वरा यथार्थ वस्तुस्वरूप सांगणे व ते प्रत्यक्षादि प्रमाणाशी विरुद्ध नसणे हे सर्वज्ञतेशीच संगत आहे व अशी सर्वज्ञता हे प्रभो आपल्या ठिकाणी आहे ॥ १३७ ॥ मेघांच्या मध्यभागांत ज्याचे किरण सुप्त झाले आहेत प्रतिबंध पावले आहेत असा सूर्य प्रफुल्ल झालेल्या कमलानी जसा सूचित केला जातो तसा हे प्रभो आपला सर्वज्ञपणा उत्कृष्ट निर्दोष वाणीच्या वैभवाने व्यक्त केला जात आहे ॥ १३८ ॥ जसे दाट अंधकारात केकारवाने दूर ठिकाणी मोर असावा असा तर्क केला जातो तसा अतिशय स्पष्ट व उत्तम निर्दोष भाषणांनी हे प्रभो आपण सर्वज्ञ आहात या वचनाला योग्य आहात ।। १३९ ॥ हे प्रभो ही अतिशय उत्कर्षाला पावलेली आपली आध्यात्मिक ज्ञानसंपत्ति असू द्या. कारण या संपत्तीवरून आपण सर्वज्ञ आहात हे निश्चित ठरतेच पण जी आपली ही बाह्य विभूति- ऐश्वर्य आहे तीच आपल्या ठिकाणी सर्वज्ञता आहे, हितोपदेशकता आहे हे आम्हाला सांगत आहे ।। १४० ।। हे प्रभो देवांच्या कारागिरानी आपले अत्युत्कृष्ट सिंहासन बनविले ते मेरूच्या शिखराप्रमाणे उंच व ज्याला जडविलेल्या रत्नांची कान्ति चोहोकडे पसरली आहे असे शोभते ।। १४१ ॥ Page #256 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१५०) महापुराण (२४५ सुरैरुच्छ्रितमेतत्ते छत्राणां त्रयमूजितम् । त्रिजगत्प्राभवे चिह्नं न प्रतीमः कथं वयम् ॥ १४२ चामराणि तवामूनि वीज्यमानानि चामरैः । शंसन्त्यनन्यसामान्यमश्वयं भुवनातिगम् ॥ १४३ परितस्त्वत्सभां देव वर्षन्त्येते सुराम्बुदाः । सुमनोवर्षमुद्गन्धि व्याहूतमधुपव्रजम् ॥ १४४ सुरदुन्दुभयो मन्द्रं नदन्त्येते नभोऽङ्गणे । सुरकिङ्करहस्ताग्रताडितास्त्वज्जयोत्सवे ॥ १४५ सुरैरासेवितोपान्तो जनताशोकतापनुत् । प्रायस्त्वामयमन्वेति तवाशोकमहीरुहः ॥ १४६ स्वदेहदीप्तयो दीप्राः प्रसरन्त्यभितः सभाम् । धृतबालातपच्छायास्तन्वाना नयनोत्सवम् ॥ १४७ दिव्यभाषा तवाशेषभाषाभेदानुकारिणी। निरस्यति मनोध्वान्तमवाचामपि देहिनाम् ॥ १४८ प्रातिहार्यमयी भतिरियमष्टतयी प्रभो। महिमानं तवाचष्टे विस्पष्टं विष्टपातिगम् ॥ १४९ त्रिमेखलस्य पीठस्य मेरोरिव गरीयसः । चूलिकेव विभात्युच्चैः सेव्या गन्धकुटी तव ॥ १५० ही उत्कृष्ट तीन छत्रे आपल्यावर देवांनी उंच अशी धारण केली आहेत व आपले त्रैलोक्यावर स्वामित्व आहे याचे चिह्न आहे हे आम्ही कसे बरे जाणणार नाही ? ।। १४२ ॥ देवाकडून आपल्यावर वारली जाणारी जी चामरे आहेत ती आपले ऐश्वर्य इतरांना प्राप्त होणाऱ्या सामान्य ऐश्वर्यासारखे नाही अर्थात् हे असामान्य आहे व त्रैलोक्यात कोठेही आढळून येणार नाही ॥ १४३ ॥ हे जिनदेवा, हे देवरूपी मेघ आपल्या सभेच्या सभोवती जिने भुंग्यांच्या समूहाला बोलाविले आहे व जिचा सुगंध आकाशात पसरला आहे अशी पुष्पवृष्टि करीत आहेत ॥ १४४ ॥ हे प्रभो, आपण ज्ञानावरणादि कर्मांचा नाश करून विजय मिळविलेला असल्यामुळे त्या उत्सवप्रसंगी आकाशाङगणात देवांच्या सेवकानी आपल्या हातांच्या अग्रभागानी ताडलेले हे देवनगारे गंभीरस्वराने वाजत आहेत ।। १४५ ।।। हे प्रभो हा तुझा अशोकवृक्ष देवाकडून सेविला जात आहे व हा लोकांचा शोक व ताप नाहीसा करणारा असल्यामुळे बहुतांशी तुझे अनुकरण करीत आहे ।। १४६ ॥ हे जिनप्रभो, ज्यांनी प्रातःकालच्या कोवळ्या उन्हाची कान्ति धारण केली आहे व ज्या लोकांच्या नेत्राना आनंदित करतात अशा तुझ्या देहाच्या उज्वल कान्ती सर्व सभेत पसरल्या आहेत ॥ १४७ ॥ हे जिनप्रभो, तुझी दिव्य भाषा सर्वभाषांच्या भेदांचे अनुकरण करीत आहे व ज्याना बोलता येत नाही अशा प्राण्यांच्या (पशु पक्षी इत्यादिकांच्या ) मनातील अंधार-अज्ञान दूर करीत आहे ।। १४८ ।। __ हे जिननाथ, हे आठ प्रतिहार्यरूप ऐश्वर्य तुझा महिमा त्रिलोकाला मागे टाकणारा आहे असे स्पष्ट सांगत आहे ॥ १४९ ॥ हे प्रभो, आपले तीन कट्टयानी सहित जसे सिंहासन मेरुप्रमाणे विशाल आहे व त्यावर आपली गन्धकुटी ही उंच शिखराप्रमाणे शोभत असून भव्यजनांनी सेव्य आहे आदरणीय आहे ॥ १५० ॥ Page #257 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१५१) महापुराण (२४६ वन्दारूणां मुनीन्द्राणां स्तोत्रप्रतिरवैर्मुहुः । स्तोतुकामेव भक्त्या त्वां सैषा भात्यतिसंमदात् ॥ परार्ध्यरत्ननिर्माणामेनामत्यन्तभास्वराम । त्वामध्यासीनमानम्रा नाकभाजो भजन्त्यमी ॥ १५२ सशिखामणयोऽमीषां नम्राणां भान्ति मौलयः । सदीपा इव रत्नार्धाः स्थापितास्त्वत्पदान्तिके । मतानां सुरकोटीनां चकासत्यधिमस्तकम् । प्रसादांशा इवालग्ना युष्मत्पादनखांशवः ॥ १५४ नखदर्पणसङक्रान्तबिम्बान्यमरयोषिताम् । दधत्यमूनि वक्त्राणि तदुपाङघ्न्यम्बुजश्रियम् ॥ १५५ वक्त्रेष्वमरनारीणां सन्धत्ते कुसुमश्रियम् । युष्मत्पादतलच्छाया प्रसरन्ती जपारुणा ॥१५६ गणाध्यषितभूभागमध्यवर्ती त्रिमेखलः । पीठाद्रिरयमाभाति तवाविष्कृतमङ्गलः ॥ १५७ प्रथमोऽस्य परिक्षेपो धर्मचरलडकृतः । द्वितीयोऽपि तवामीभिदिश्वष्टासु महाध्वजैः ॥ १५८ श्रीमण्डपनिवेशस्ते योजनप्रमितोऽप्ययम् । त्रिजगज्जनताजस्रप्रावेशोपग्रहक्षमः ॥ १५९ हे प्रभो, आपणास वंदना करणाऱ्या मुनीश्वरांच्या स्तोत्रांच्या प्रतिध्वनींनी ही गन्धकुटी अतिशय आनन्दाने भक्तीने आपली स्तुति करीत असल्याप्रमाणे भवताना वाटते ।। १५१ ॥ अमूल्यरत्नानी निर्मिलेली व अत्यन्त चमकणारी प्रकाशयुक्त अशा या गन्धकुटीवर आपण विराजमान झालेले आहात व नम्र होऊन स्वर्गातील देव आपली उपासना करीत आहेत ।। १५२ ॥ चूडामणियुक्त अशी या देवांची ही मस्तके हे प्रभो आपल्या चरणाजवळ प्रदीपानी सहित असे रत्नार्ध स्थापन केल्याप्रमाणे शोभत आहेत ॥ १५३ ।। हे जिनदेवा, आपणास हे कोट्यवधि देव नमस्कार करीत असताना यांच्या मस्तकावर आपल्या पायांच्या नखांचे किरण प्रसादाच्या लेशाप्रमाणे शोभत आहेत ।। १५४ ॥ हे जिननाथ, आपल्या नखरूपीदर्पणात ज्यांचे प्रतिबिंब पडले आहे अशा देवांगनाची मुखे आपल्या चरणाजवळ कमलांची शोभा धारण करीत आहेत ॥ १५५ ।। हे जिनप्रभो, आपल्या चरणांच्या नखांची जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल कान्ति देवांगनांच्या मुखावर पुष्पांची शोभा धारण करीत आहेत ॥ १५६ ।। बारा सभांचा निवास जेथे आहे अशा भूमिप्रदेशाच्या मध्ये तीन मेखलानी शोभणारा व अनेक मंगलद्रव्ये जेथे प्रकट झाली आहेत असा हे प्रभो आपला पीठरूपी पर्वत शोभत आहे ॥ १५७ ॥ याचा पहिला विभाग धर्मचक्रानी शोभत आहे व दुसरा देखील आठ दिशात आठ महाध्वजानी शोभत आहे ॥ १५८ ॥ या श्रीमण्डपाची रचना जरी एक योजनप्रमाणाची आहे तरीही तीनही जगांच्या लोकांचा सतत प्रवेश झाला तरी त्याना समावून घेण्यास समाविष्ट करून घेण्यास समर्थ आहे ।। १५९ ॥ Page #258 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१६८). महापुराण (२४७ धूलीसालपरिक्षेपो मानस्तंभाः सरांसि च । खातिका सलिलैः पूर्णा वल्लीवनपरिच्छदः ॥ १६० सालत्रितयमुत्तुङ्गचतुर्गोपुरमण्डितम् । मङ्गलद्रव्यसन्दोहो निधयस्तोरणानि च ॥ १६१ नाटयशालाद्वयं दो लसद्भपघटीद्वयम् । वनराजिपरिक्षेपश्चैत्यद्रुमपरिष्कृतः ॥ १६२ वनवेदीद्वयं प्रोच्चलजमालाततावनिम् । कल्पद्रुमवनाभोगः स्तूपहावलीत्यपि ॥ १६३ सदोऽवनिरियं देव नसुरासुरपावनी । त्रिजगत्सारसन्दोह इवैकत्र निवेशितः ॥ १६४ बहिविभूतिरित्युच्चराविष्कृतमहोदयाः । लक्ष्मीमाध्यात्मिकी व्यक्तं व्यनक्ति जिन तावकीम् ॥ सभापरिच्छदः सोऽयं सुरैस्तव विनिर्मितः । वैराग्यातिशयं नाथ, नोपहन्त्यप्रकितः ॥ १६६ इत्यत्यद्भुतमाहात्म्यस्त्रिजगद्वल्लभो भवान् । स्तुत्योपतिष्ठमानं मां पुनीतात्पूतशासनः॥१६७ अलं स्तुतिप्रपञ्चेन तवाचिन्त्यतमा गुणाः । जयेशान नमस्तुभ्यमिति सडक्षेपतः स्तुवे ॥१६८ हे प्रभो हा धूलिसाल सर्व बाजूनी घेरून राहिला आहे व मानस्तम्भ, सरोवरे, पाण्यानी भरलेला खंदक, वल्लीवनाचा समूह, उंच चार गोपुरानी शोभित असे तीन तट, छत्रादि अष्टमंगलद्रव्यांचा समूह, नऊ निधि, तोरण समूह ।। १६०-१६१ ॥ प्रकाशयुक्त दोन नाट्यशाळा व शोभणारे दोन धूपघट, चैत्यवृक्षाने शोभणारा असा वनपंक्तींचा सभोवती घेर ।। १६२ ॥ दोन वनवेदिका व अतिशय उंच अशा ध्वजसमूहानी व्याप्तपृथ्वी, कल्पवृक्षांच्या वनाचा विस्तार, अनेक स्तूप व अनेक प्रासाद-पंक्ति ।। १६३ ॥ हे जिनदेवा ही आपली समवसरणसभा मनुष्य, देव व असुर यांना पवित्र करणारी आहे. या आपल्या सभेत त्रैलोक्यातील सारयुक्त पदार्थांचा समूह एके ठिकाणी आढळून येत आहे ।। १६४ ॥ हे जिनदेवा, या बाह्य ऐश्वर्याने आपला महान् उत्कर्ष प्रकट केला आहे व ते आपल्या आत्म्याच्या अन्तरंग लक्ष्मीला स्पष्टपणे व्यक्त करीत आहे ॥ १६५ ॥ हे प्रभो, ज्याच्या विषयी कोणाला बिलकुल तर्क करता येत नाही अशी ही देवानी निर्माण केलेली आपली समवसरणाची लक्ष्मी आपल्या वैराग्याच्या माहात्म्याला नष्ट करीत नाही. हे समवसरणाचे वैभव पाहून आपल्या हृदयातील वीतरागता तिळमात्रही कमी होत नाही ॥ १६६ ॥ हे जिननाथा, आपण अत्यन्त अद्भुत माहात्म्याने युक्त आहात. आपण सर्व त्रैलोक्याला अतिशय आवडते आहात. आपले शासन ( उपदेश ) अत्यंत पवित्र आहे. आपली स्तुति करण्यासाठी उद्युक्त झालेल्या मला आपण पवित्र करा ॥ १६७ ॥ हे नाथ, मी आता आपली स्तुति विस्ताराने करीत नाही कारण आपले गुण अत्यंत अचिन्त्य आहेत. हे प्रभो, आपण महासामर्थ्यशाली आहात; आपला जय होवो व आपणास नमस्कार असो एवढीच मी आपली संक्षेपाने स्तुति करतो ।। १६८ ।। Page #259 -------------------------------------------------------------------------- ________________ २४८) महापुराण (३३-१६९ जयेश जय निर्दग्धकर्मेन्धन जयाजर । जय लोकगुरो सार्व जयताज्जय जित्वर ॥१६९ जय लक्ष्मीपते जिष्णो जयानन्तगुणोज्ज्वल । जय विश्वजगद्वन्धो जय विश्वजगद्धित ॥ १७० जयाखिलजगद्वेदिन जयाखिलसुखोदय । जयाखिल जगज्ज्येष्ठ जयाखिल जगद्गुरो ॥ १७१ जय निजितमोहारे जय निजितमन्मथ । जय जन्मजरातङ्कविजयिन्विजितान्तक ॥ १७२ जय निर्मद निर्माय जय निर्मोह निर्मम । जय निर्मल निर्द्वन्द्व जय निष्कल पुष्कल ॥ १७३ जय प्रबुद्धसन्मार्ग जय दुर्मागरोधन । जय कर्मारिमर्माविद्धर्मचक्र जयोद्धर ॥ १७४ नयाध्वरपते यज्वन् जय पूज्य महोदय । जयोद्धर दयाचिह्न सद्धर्मरथसारथे ॥ १७५ हे ईशा, आपण कर्मरूपी लाकडे जाळून टाकली आहेत. आपण जरादिक दोषानी रहित आहात, आपण लोकगुरु आहात, सार्व-सर्वाचे हितकर्ते आहात व सर्वकर्माना जिंकणारे आहात. आपला नेहमी जयजयकार असो ।। १६९ ॥ हे लक्ष्मीपते, आपण सर्व कामादिक विकार जिंकले आहेत, आपण अनन्त ज्ञानादि गुणानी नेहमी उज्ज्वल आहात, आपण सगळ्या जगाचे बन्धु आहात व आपण सर्व जगाचे हित करणारे आहात. यास्तव आपला सर्वदा जयजयकार असो ॥ १७० ॥ सर्व जगाला जाणणाऱ्या हे जिनदेवा, तुझा जय असो. सर्व सुखांची ज्याच्यापासून उत्पत्ति आहे व जो सर्व सद्गुणांनी जगात सर्वापेक्षा ज्येष्ठ आहे, मुक्तिमार्गाचा उपदेश करणारा असल्यामुळे जो सर्व जगाचा गुरु आहे अशा हे जिनेश्वरा, तुझा नेहमी जयजयकार असो ।। १७१ ॥ मोहशत्रूला जिंकणान्या हे प्रभो, आपण मदनाला जिंकले आहे, आपण जन्म, वृद्धावस्था, रोग, यांना जिंकले आहे व आपण मृत्यूचा नाश केला आहे म्हणून आपला नेहमी जयजयकार असो ॥ १७२ ॥ हे मदरहित जिनवरा, आपणाला माया-कपट नाही, आपण मोहरहित, ममतारहित, आहात, निर्मल आहात, रागद्वेषादिद्वन्द्वाने रहित आहात, आपण शरीररहित व पुष्कळ-पूर्णज्ञानी आहात, आपला वारंवार जय असो ।। १७३ ।। आपण आत्महिताचें खरें मर्म जाणले आहे, आपण संसारात फिरविणाऱ्या मार्गाला प्रतिबंध केला आहे, आपण कर्मशत्रूच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यास घायाळ केले आहे व धर्मचक्राच्या प्राप्तीने आपण जय मिळवून महान् झालेले आहात ॥ १७४ ॥ हे जिनदेव, आपण यज्ञाचे स्वामी आहात, कर्मरूपो लाकडे जाळून टाकण्यास आपण भग्नि आहात अर्थात् आपण ज्ञानावरणादिकर्माचा होम केला आहे. सर्व पूज्य लोकाकडून आपण आदरणीय आहात. आपला केवलज्ञानरूपी मोठा उत्कर्ष झाला आहे. आपल्या ठिकाणी असलेली उत्कट दया हे आपणास ओळखण्याचे चिह्न आहे व आपण उत्कृष्ट अहिंसा धर्मरूपी रथाला चालविणारे सारथी आहात, आपला नेहमी जयजयकार असो ॥ १७५ ॥ Page #260 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१८२) महापुराण जय निजितसंसारपारावार गुणाकर । जय निःशेषनिःपीतविद्यारत्नाकर प्रभो ॥ १७६ नमस्ते परमानन्तसुखरूपाय तायिने । नमस्ते परमानन्दमयाय परमात्मने ॥ १७७ ममस्ते भवनोद्भासिज्ञानभाभारभासिने । नमस्ते नयनानन्दिपरमौदारिकत्विषे ॥ १७८ नमस्ते मस्तकन्यस्तस्वहस्ताञ्जलिकुड्मलैः । स्तुताय त्रिदशाधीशः स्वर्गावतरणोत्सवे ॥ १७९ नमस्ते प्रचलन्मौलिघटिताञ्जलिबन्धनः । नुताय मेरुशैलाग्रस्नाताय सुरसत्तमः ॥ १८० नमस्ते मुकुटोपानलग्नहस्तपुटोद्भवः । लोकान्तिकरषीष्ठाय परिनिष्क्रमणोत्सवे ॥ १८१ नमस्ते स्वकिरीटाग्ररत्नग्रावान्तचुम्बिभिः । कराब्जमुकुलैः प्राप्तकेवलेज्याय नाकिनाम् ॥ १८२ हे प्रभो, आपण जन्म-जरा-मरणात्मक संसारसमुद्राला जिंकिले आहे व सर्वगुणांचा साठा आपण आहात. हे प्रभो, आपण संपूर्ण ज्ञानरूपी समुद्राला पिऊन टाकले आहे. अर्थात् आपण अनन्तज्ञानी आहात, आपला नेहमी जयजयकार असो ।। १७६ ।। हे जिनदेवा, आपण लोकोत्तर उत्कृष्ट अनन्त सुख हेच स्वरूप धारण करीत आहात व आपण जगाचे पालन पोषण करणारे आहात. आपण परमानन्दानी पूर्ण भरलेले असे परमात्मा आहात. आपणास आमचे वंदन आहे ॥ १७७ ॥ हे जिनराज, सगळ्या जगाला साक्षात् जाणणारे व पाहणारे अशा ज्ञानाच्या कान्ति समूहाने प्रकाशणारे आहात व नेत्राना आनंदित करणारी परमौदारिकदेहाची कांति धारण करीत आहात, म्हणून आपणास आम्ही वारंवार नमस्कार करतो ॥ १७८ ॥ हे जिनेश्वरा, आपण जेव्हां सर्वार्थसिद्धि विमानातून जिनमातेच्या गर्भी आला त्यावेळी अर्थात् गर्भकल्याणाच्या वेळी स्वतःच्या मस्तकावर ज्यांनी आपल्या हातांची ओंजळ कमलकळीप्रमाणे ठेवली आहे अशा देवेन्द्रांनी आपली स्तुति केली होती अशा आपणास मी नमस्कार करतो ॥ १७९ ॥ ज्यांनी हलणान्या स्वमस्तकावर दोन हात जोडून ठेविले आहेत अशा देवश्रेष्ठ इन्द्रानी आपणास मेरुपर्वतावर स्नान घालून आपली स्तुति केली आहे अशा आपणास मी नमस्कार करतो ।। १८० ॥ किरीटाच्या अग्रभागावर ज्यांनी आपले दोन हात जोडून ठेवले आहेत व जे मोठे उत्साहयुक्त दिसतात अशा लौकान्तिकदेवानी आपल्या दीक्षामहोत्सवाच्या प्रसंगी आपला आदर केला म्हणून आपणास मी नमस्कार करितो ॥ १८१ ।। आपल्या किरीटाच्या अग्रभागी बसविलेल्या रत्नांचे चुम्बन करणाऱ्या देवाच्या हातरूपी कमलांच्या कळ्यांनी ज्यांच्या केवलज्ञानाची पूजा केली अशा हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो॥ १८२ ॥ म. ३२ Page #261 -------------------------------------------------------------------------- ________________ २५०) महापुराण (३३-१८३ नमस्ते परिनिर्वाणकल्याणेऽपि प्रवय॑ति । पूजनीयाय वह्नीन्द्रज्वलन्मुकुटकोटिभिः ॥ १८३ नमस्ते प्राप्तकल्याणमहेज्याय महौजसे । प्राज्यत्रैलोक्यराज्याय ज्यायसे ज्यायसामपि ॥ १८४ नमस्ते नतनाकीन्द्रचूलारत्नाचिताङघ्रये । नमस्ते दुर्जयारातिनिर्जयोपाजितश्रिये ॥ १८३ नमोऽस्तु तुभ्यमिद्ध? सपर्यामर्हते पराम् । रहोरजोऽरिघाताच्च प्राप्ततन्नामरूढये ॥ १८६ जितान्तक नमस्तुभ्यं जितमोह नमोऽस्तु ते । जितानङ्ग नमस्ते स्ताद्विरागाय स्वयम्भुवे ॥ १८७ स्वां नमस्यञ्जननम्रनम्येत सुकृती पुमान् । गां जयज्जितजेतव्यस्त्वज्जयोद्घोषणाकृती ॥ १८८ हे भगवन्ता, जेव्हा आपले मोक्षकल्याण होईल तेव्हा देखील अग्निकुमारेन्द्राकडून ज्वालायुक्त मुकुटाच्या अग्रभागांनी आपली पूजा केली जाईल म्हणून आपणास माझा नमस्कार आहे ॥ १८३ ॥ ___ हे प्रभो, आपण पांचही कल्याणांच्या महापूजेला प्राप्त झालेले आहात. आपण महा तेजस्वी आहात. आपणास उत्कृष्ट असे त्रैलोक्याचे राज्य मिळाले आहे. आपण ज्ञानाने श्रेष्ठ व ज्येष्ठ असलेल्या लोकातही श्रेष्ठ व ज्येष्ठ आहात. अशा आपणास माझा नमस्कार असो ॥१८४ ॥ हे प्रभो, आपले पाय नम्र झालेल्या स्वर्गीय इन्द्रांच्या चूडामणिकडून पूजिले गेले आहेत व ज्यांना जिंकणे अत्यंत कठिण आहे अशा मोहादिक शत्रूना जिंकून आपण अन्तरंगलक्ष्मी-केवलज्ञानरूप लक्ष्मी व बहिरंग समवसरणरूप लक्ष्मी याना प्राप्त करून घेतले आहे. अशा आपणास माझा नमस्कार असो ॥ १८५ ॥ हे प्रभो, अनेक ऋद्धि आपल्या ठिकाणी सर्वोत्कर्षाला प्राप्त झाल्या आहेत व आपण महापूजेला प्राप्त झालेले आहात म्हणून आपणास माझा नमस्कार असो. हे प्रभो, रहस्-अन्तराय कर्म, रजस्-ज्ञानावरण व दर्शनावरण कर्म आणि अरि-मोहनीय कर्म यांचा आपण नाश केला असल्यामुळे आपण 'अर्हत्' अशा रुढनामाला प्राप्त झालेले आहात म्हणून आपणास माझा नमस्कार असो ॥ १८६ ।। __ हे जितान्तक, हे मरणाला जिंकणाऱ्या जिना आपणास नमस्कार असो, मोहाला जिंकलेल्या आपणास नमस्कार असो, आपण मोहाला जिंकले आहे म्हणून आपणास नमस्कार असो. मदनाला जिंकणाऱ्या आपणास नमस्कार असो व आपण विराग-रागद्वेषरहित आहात म्हणून आपणास नमस्कार असो व स्वयम्भू-परोपदेशाशिवाय आपण स्वहिताकडे प्रवृत्त झालेले आहात म्हणून आपणास नमस्कार असो ॥ १८७ ॥ हे जिनदेवा, जो पुण्यवान् पुरुष आपणास नमस्कार करतो त्याला नम्र लोक नमस्कार करतील. हे प्रभो, आपल्या विजयाची जो मानव घोषणा करितो तो पुण्यवान् जिंकण्यास योग्य अशा कर्माना ज्याने जिंकले आहे असा तो पृथ्वीला जिंकतो व वाणी त्याला वश होते ॥ १८८॥ Page #262 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-१९६) महापुराण (२५१ त्वन्नुतेः पूतवागस्मि त्वत्स्मतेः पूतमानसः । त्वन्नतेः पूतदेहोऽस्मि धन्योऽस्म्यद्य त्वदीक्षणात् ॥ १८९ अहमद्य कृतार्थोऽस्मि जन्माद्य सफलं मम । सुनिर्वते दृशौ मेऽन्ध सुप्रसन्नं मनोऽद्य मे ॥ १९० स्वत्तीर्थसरसि स्वच्छे पुण्यतोयसुसम्भृते । सुस्नातोऽहं चिरादद्य पूतोऽस्मि सुखनिर्वृतः॥ १९१ त्वत्पादनखभाजालसलिलैरस्तकल्मषैः । अधिमस्तकमालग्नरभिषिक्त इवास्म्यहम् ॥ १९२ एकतः सर्वभौमश्रीरियमप्रतिशासना । एकतश्च भवत्पादसेवा लोकैकपावनी ॥ १९३ यदिग्भ्रान्तिविमूढेन महदेनो मयाजितम् । तत्त्वसन्दर्शनाल्लीनं तमो नेशं रवेर्यथा ॥ १९४ स्वत्पदस्मृतिमात्रेण पुमानेति पवित्रताम् । किमुत तत्वद्गुणस्तुत्या भक्त्यवं सुप्रयुक्तया ।। १९५ भगवंस्त्वद्गुणस्तोत्राद्यन्मया पुण्यमजितम् । तेनास्तु त्वत्पदाम्भोजे परा भक्तिः सदापि मे ॥१९६ हे जिनदेवा, तुझी स्तुति केल्यामुळे माझी वाणी पवित्र झाली आहे, तुझे स्मरण केल्यामुळे मी पवित्र मनाचा बनलो आहे आणि तुझ्या चरणाला नमस्कार केल्यामुळे माझा देह पवित्र झाला आहे, तुझ्या दर्शनापासून आज मी धन्य झालो आहे ।। १८९ ।। आज मी कृतार्थ झालो. करण्यायोग्य कार्य मी आज केले आहे. आज माझा जन्म सफल झाला. माझे डोळे संतुष्ट झाले व आज माझे मन प्रसन्न झाले आहे ॥ १९० ॥ पुण्यरूपी पाण्याने जे खूप भरले आहे, अशा आपल्या स्वच्छ तीर्थसरोवरात मी आज पुष्कळ दिवसानी उत्तम स्नान केले आहे. आज मी पवित्र झालो आहे व अत्यन्त सुखी झालो आहे ॥ १९१ ॥ हे प्रभो, तुझ्या पायांच्या नखांच्या कान्तिरूप जलाने सर्व पाप नष्ट होते. त्या कान्तिरूप जलानी हे प्रभो माझे मस्तक धुतले गेले म्हणून मी आज जणु स्नान केले आहे असे मला वाटते ॥ १९२ ॥ हे प्रभो, जिच्यावर कोणाची सत्ता चालत नाही अशी सार्वभौमलक्ष्मी माझ्या एका बाजूला आहे व एका बाजूला एकटीच मुख्य रीतीने लोकाना पवित्र करणारी आपल्या चरणांची सेवा आहे म्हणून मी धन्य झालो आहे ।। १९३ ॥ हे प्रभो, मी दिग्विजयासाठी भ्रमण करीत असता जे महापातक मी उपाजिले आहे ते सूर्यापासून जसा रात्रीचा अंधार नष्ट होतो तसे हे प्रभो तुझ्या दर्शनाने नष्ट झाले आहे ।। १९४ ।। हे प्रभो, तुझ्या पायांच्या केवळ स्मरणाने मानव पवित्र होतो. मग मनात भक्ति ठेवून तुझ्या गुणांची स्तुति उत्तम प्रकारे केली असता तो पवित्र होणार नाही काय ? अवश्य पवित्र होईल ।। १९५ ॥ - हे भगवंता, तुझ्या गुणांच्या स्तुतीपासून जे पुण्य मी मिळविले आहे, त्या पुण्याचे. फळ मी हे इच्छितो की तुझ्या चरणकमलातच नेहमी माझी उत्कृष्ट भक्ति राहो ॥ १९६ ।। Page #263 -------------------------------------------------------------------------- ________________ २५२) महापुराण (३३-१९७ ( वसन्ततिलकवृत्तम् ) इत्थं चराचरगुरुं परमादिदेवम् । स्तुत्वाषिराट् धरणिपः सममिद्धबोधः ॥ आनन्दबाष्पलवसिक्तपुरःप्रवेशो । भक्त्या ननाम करकुङमललग्नमौलिः ॥ १९७ श्रुत्वा पुराणपुरुषाच्च पुराणधर्म । कर्मारिचक्रजयलब्धविशुद्धबोधात् । सम्प्रीतिमाप परमां भरताधिराजः प्रायोतिः कृतधियां स्वहितप्रवृत्तौ ॥ १९८ आपृच्छय च स्वगुरुमादिगुरुं निधीशो। व्यालोलमौलितटताडितपादपीठः ॥ भूयोऽनुगम्य च मुनीन्प्रणतेन मूर्ना । स्वावासभूमिमभिगन्तुमना बभूव ॥ १९९ भक्त्यापितां सजमिवाधिपदं जिनस्य । स्वां दृष्टिमन्वितलसत्सुमनोविकासाम् ॥ शेषास्थयेव च पुनविनिवर्त्य कृच्छात् । चक्राधिपो जिनसभाभवनात्प्रतस्थे ॥ २०० आलोकयन् जिनसभावनिभूतिमिद्धां विस्फारितेक्षणयुगो युगदीर्घबाहुः । पृथ्वीश्वररनुगतः प्रणतोत्तमाङ्गः प्रत्यावृतत्स्वसदनं मनुवंशकेतुः ॥ २०१ ___ याप्रमाणे स्थावर व त्रसप्राण्यांचे गुरु अशा आदिभगवंतांची सम्राट् भरताने सर्व राजसमूहासह स्तुति केली. ज्याचे ज्ञान प्रकाशमान झाले आहे अशा भरतेशाने आपल्या आनंदाश्रूच्या थेंबानी पुढील प्रदेश भिजविला व हातरूपी कमलांची कळी मस्तकावर ठेवून भक्तीने प्रभूना नमस्कार केला ॥ १९७ ।। कर्मरूपी शत्रुसमूहावर जय मिळविल्यामुळे ज्यांना निर्मल बोध-केवलज्ञान प्राप्त झाले आहे अशा पुराणपुरुष आदिभगवंतापासून पुरातन जैनधर्माचे स्वरूप ऐकून भरत सम्राटाला अतिशय संतोष आनंद झाला. हे योग्यच झाले. कारण बुद्धिमान् पुरुषांना प्राय आपल्या हितकर कार्यात प्रवृत्त होण्याचीच इच्छा असते. त्यातच त्यांना संतोष वाटतो ॥१९८॥ नम्र होत असता चंचल झालेल्या मस्तकाने व ज्या अग्रभागाने पायाच्या खाली असलेल्या आसनाला ज्याने स्पर्श केला आहे अशा निधिपति भरताने आपले पिता असलेल्या आदिभगवंतांना विचारले आणि नम्रमस्तकाने वृषभसेनादिगणधरादिकांना त्याने विचारले व नन्तर तो आपल्या राहण्याच्या भूमीकडे जाण्यास तत्पर झाला- उत्सुक झाला ॥ १९९ ॥ विकसित झालेली सुंदर फुले अनुक्रमाने जिच्यामध्ये गुंफलेली आहेत व जी श्रीजिनेश्वराच्या पायावर भक्तीने अर्पण केली आहे अशा पुष्पमालेप्रमाणे सुंदर मनाच्या प्रसन्नतेने युक्त अशा आपल्या दृष्टीला शेषेप्रमाणे समजून प्रभूपासून अतिकष्टाने आपल्या दृष्टीला वळवून भरतचक्रीने भगवंताच्या सभाभवनापासून-समवसरणापासून पुढे प्रस्थान केले ॥ २०० ॥ ज्यानी आपली मस्तके नम्र केली आहेत अशा अनेक राजानी ज्याचे अनुसरण केले आहे, ज्याचे बाहु गाडीच्या जूप्रमाणे दीर्घ आहेत, जो मनुवंशाचा ध्वज आहे, अशा भरतचक्रीने आपले दोन डोळे चांगले उघडून जिनेश्वराच्या समवसरणाची खूप वृद्धिंगत झालेली वैभवलक्ष्मी पाहिली व तो आपल्या घराकडे जाण्यास परतला ॥ २०१ ॥ Page #264 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३-२०२) महापुराण पुण्योदयानिधिपतिविजिताखिलाशः । तन्निजितौ गमितषष्टिसमासहस्रः॥ प्रीत्याभिवन्ध जिनमाप परं प्रमोदम् । तत्पुण्यसङग्रहविधौ सुषियो यतध्वम् ॥ २०२ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसङग्रहे भरतराजकैलासाभिगमनवर्णनं नाम त्रयस्त्रिशत्तमं पर्व ॥ पुण्याच्या उदयाने निधीश्वर भरतचक्रीने सर्व दिशा जिंकल्या. त्या जिंकण्याच्या कार्यात त्याची साठ हजार वर्षे समाप्त झाली. आदिजिनाला प्रेमाने वंदन करून तो फार आनंदित झाला. म्हणूत हे सुबुद्धिवंतांनो, त्या पुण्याचा संग्रह-संचय करण्याचा आपण यत्न करा ॥ २०२ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहाच्या मराठी अनुवादात भरतराजाने कैलासपर्वतावर गमन केले याचे वर्णन करणारे तेहतीसावें पर्व समाप्त झाले. Page #265 -------------------------------------------------------------------------- ________________ चतुस्त्रिंशत्तमं पर्व । अथावरुह्य कैलासादद्रीन्द्रादिव देवराट् । चक्री प्रयाणमकरोद्विनीताभिमुखं कृती ॥१ सैन्यैरनुगती रेजे प्रथांचकी निजालयम् । गङ्गौघ इव दुर्वारः सरिवोर्घरपाम्पतिम् ॥ २ ततः कतिपयैरेव प्रयाणेश्चक्रिणो बलम् । अयोध्यां प्रापदाबद्धतोरणां चित्रकेतनाम् ॥ ३ चन्दनद्रवसंसिक्तसुसंमृब्टमहीतला । पुरी स्नावानुलिप्तेव सा रेजे प्रत्युरागमे ॥४ नातिदूरे निविष्टस्य प्रवेशसमये विभोः । चक्रमस्तारिचक्रं च नाक्रस्त पुरगोपुरे ॥५ सा पुरी गोपुरोपान्तस्थितचक्रांशुरञ्जिता धृतसन्ध्यातपेवासीत्कुडकुमापिञ्जरच्छविः ॥ ६ सत्यं भरतराजोऽयं धौरेयश्चक्रिणामिति । धृतदिव्येव सा जज्ञे ज्वलच्चका पुरः पुरी ॥ ७ ततः कतिपये देवाश्चक्ररत्नाभिरक्षिणः। स्थितमेकपदे चक्रं वीक्ष्य विस्मयमाययुः ॥८ यानंतर जसा मेरुपर्वतावरून सौधर्मेन्द्र खाली उतरतो तसे कैलासपर्वतावरून खाली उतरून त्या बुद्धिमान् चक्रवर्तीने अयोध्येकडे तोंड करून प्रयाण केले ॥ १ ॥ ज्याला रोकू शकत नाही असा गंगेचा प्रवाह जसा अनेक नद्यांच्या प्रवाहासह समुद्राला मिळतो तसा आपल्या सैन्यानी अनुसरलेला हा चक्री आपल्या घराकडे जात असता शोभला ।। २ ।। यानंतर काही मुक्कामानी चक्रवर्तीचे सैन्य जिथे तोरणे बांधली आहेत व नानाविध ध्वज उभारलेले आहेत अशा अयोध्येजवळ आले ॥ ३ ॥ पतीचे आगमन झाले असता स्नान करून अंगाला जिने सुगंधित उटी लाविली आहे अशा स्त्रीप्रमाणे चन्दनाच्या सड्यांनी जिचे भूतल अतिशय स्वच्छ केले आहे अशी अयोध्यानगरी फार शोभू लागली ॥ ४ ॥ प्रवेशसमयी अयोध्येपासून जवळच भरतचक्रवर्तीचा मुक्काम होता त्यावेळी ज्याने शत्रुसमूह नष्ट केले आहेत असे ते चक्र नगराच्या वेशीत प्रवेश न करता बाहेरच थांबले ।। ५ ।। वेशीच्या जवळ उभे राहिलेल्या चक्ररत्नाच्या किरणानी रंगलेली ती अयोध्यानगरी केशरी रंगाप्रमाणे पिवळी कांति जिची आहे अशा उन्हाची शोभा धारण केलेल्या संध्येप्रमाणे वाटू लागली ।। ६ ॥ " खरोखर हा भरतराजा सर्वचक्रवर्तीचा पुढारी आहे.” जिच्यापुढे ज्वालायुक्त चक्र उभे राहिले आहे अशी ती नगरी दिव्यधारण केल्याप्रमाणे भासली. अर्थात् हा भरत सर्व चक्रवर्तीत श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरिता तिने आपल्या हातात दिव्य तापलेला लोखंडाचा गोळा जणु धारण केला आहे अशी ती नगरी दिसली ।। ७ ।। यानंतर या चक्ररत्नाचे सर्व तन्हेने रक्षण करणारे कांही देव ते चक्र एकदम स्थिर झाले हे पाहून आश्चर्यचकित झाले ॥ ८ ॥ Page #266 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-१९) महापुराण (२५५ सुरा जातरुषः केचित् कि किमित्युच्चरगिरः । अलातचक्रवर्द्रमुः करवालापितः करैः॥९ किमम्बरमविम्बमम्बरात्परिलम्बते । प्रतिसूर्यः किमुद्भूत इत्यन्ये मुमहुर्मुहुः॥१० कस्याप्यकालचक्रेण पतितव्यं विरोधिनः । करेणेव ग्रहेणाद्य यतश्चक्रेण वक्रितम् ॥ ११ अथवाद्यापि जेतव्यपक्षः कोऽप्यस्ति चक्रिणः । चक्रस्खलनतः कैश्चिदित्थं तज्ज्ञविकितम् ॥ १२ सेनानीप्रमुखास्तावत्प्रभवे तन्यवेदयन् । तद्वार्ताकर्णनाच्चक्री किमप्यासीत्सविस्मयः ॥ १३ । अचिन्तयच्च किं नाम चक्रमप्रतिशासने । मयि स्थिते स्खलत्यद्य क्वचिदप्यस्खलद्गति ॥ १४ सम्प्रधार्यमिदं तावदित्याहूय पुरोधसम् । धीरो घोरतरां वाचमित्युच्चराजगौ मनुः ॥ १५ वदतोऽस्य मुखाम्भोजाद् व्यक्ताकूता सरस्वती। निर्ययौसदलङ्कारा शम्फलीव जयश्रियः ॥ १६ चक्रमाक्रान्तदिक्वचक्रमरिचक्रभयङ्करम् । कस्मानास्मत्पुरद्वारि क्रमतेन्यकृतार्करुक् ॥ १७ विश्वदिग्विजये पूर्वदक्षिणापरवाद्धिषु । यदासीदस्खलद्वृत्तिरूप्याद्रेश्च गुहाद्वये ॥ १८ चक्रं तद्दधुना कस्मात्स्खलत्यस्मद्गृहाङ्गणे । प्रायोऽस्माभिविरुद्धेन भवितव्यं जिगीषुणा ॥ १९ कित्येक देव क्रुद्ध होऊन 'हे काय झाले हे काय झाले' असे शब्द मोठ्याने बोलू लागले व हातात तरवारी घेऊन कोलतीप्रमाणे गरगर फिरू लागले ॥ ९॥ हे आकाशमण्याचे बिंब अर्थात् सूर्याचे बिंब आकाशातून खाली लोंबत आहे की काय? किंवा हा दुसरा सूर्य जणु उत्पन्न झाला असा संशय कित्येक देवांच्या मनात उत्पन्न झाला ॥१०॥ किंवा कोणा तरी शत्रूचे भयंकर ग्रहाप्रमाणे असलेले अकस्मात् निघालेले चक्र येथे आले असावे. कारण हे चक्ररत्न येथेच अकस्मात् थांबले आहे. अथवा या चक्रवर्तीकडून जिंकण्यायोग्य एखादा शत्रु उरला असेल अन्यथा हे चक्र एकाएकी का थांबले आहे ? असा कांही तज्ज्ञ देवानी वितर्क केला ॥ ११-१२ ।।। सेनापति वगैरे प्रमुख अधिकान्यांनी प्रभु भरताला ही हकीकत सांगितली व ती ऐकून चक्रवर्ती काही आश्चर्यचकित झाला ।। १३ ॥ ___ ज्याला कोणीही शत्रु उरला नाही असा मी असता कोठेही न अडखळणारी गति ज्याची आहे असे हे चक्र आज का बरे अडखळले आहे असा विचार चक्रवर्ती करू लागला ॥ १४ ॥ याचा निश्चय केला पाहिजे असे ठरवून त्याने पुरोहिताला बोलाविले व त्या धैर्यशाली मनूने अधिक गंभीर असे भाषण याप्रमाणे उच्चस्वराने केले ॥ १५ ॥ भरतेश बोलत असता त्याच्या मुखकमलापासून उत्तम शब्दालंकार व अर्थालंकारांनी युक्त जणु जयलक्ष्मीची दूती अशी व्यक्त अभिप्रायाची सरस्वतीवाणी बाहेर पडली ॥ १६ ॥ जे शत्रुसैन्याला भयंकर वाटते, ज्याने सर्व दिशाना वश केले आहे, ज्याचे तेज सूर्याच्या तेजाला फिक्के करते ते चक्ररत्न आमच्या नगरद्वारामध्ये का प्रवेश करीत नाही? ॥ १७ ॥ जे पूर्वसमुद्र, दक्षिण समुद्र व पश्चिम समुद्र यात अस्खलित गतीचे होते. सर्व दिशांना जिंकण्याच्या कामी व विजयाईपर्वतांच्या दोन्ही गुहामध्ये कोठेही अडखळले नाही. ते आता आमच्या घराच्या अंगणात अडखळत आहे याचे कारण काय बरे असावे? बहुतकरून आमच्याशी विरूद्ध व आम्हास जिंकण्याची इच्छा करणारा कोणी तरी शत्रु असला पाहिजे ॥ १८-१९ ।। Page #267 -------------------------------------------------------------------------- ________________ २५६) महापुराण (३४-२० किमसाध्यो द्विषत्कश्चिदस्त्यस्मद्भुक्तिगोचरे । सनाभिः कोऽपि किं वास्मान्द्वेष्टि दुष्टान्तराशयः॥२० यः कोऽप्यकारणद्वेषी खलोऽस्मान्नाभिनंदति । प्रायः स्खलन्ति चेतांसि महत्स्वपि दुरात्मनाम् ॥२१ विमत्सराणि चेतांसि महतां परवृद्धिषु । मत्सरीणि तु तान्येव क्षुद्राणामन्यवृद्धिषु ॥ २२ अथवा दुर्मदाविष्टः कश्चिदप्रणतोऽस्ति मे । स्ववर्यस्तन्मदोच्छित्त्य नूनं चक्रेण वक्रितम् ॥ २३ खलूपेक्ष्य लघीयानप्युच्छेद्यो लघुतादृशः । क्षुद्रो रेणुरिवाक्षिस्थो रुजत्यरिरुपेक्षितः ॥ २४ बलादुद्धरणीयो हि क्षोदीयानपि कण्टकः । अनुद्धृतः पदस्थोऽसौ भवेत्पीडाकरो भृशम् ॥ २५ चक्रं नाम परं देवं रत्नानामिदमनिमम् । गतिस्खलनमतस्य न विना कारणाद्भवेत् ॥ २६ । ततो नाल्पमिदं कार्य यच्चक्रेणार्य, सूचितम् । सूचिते खलु राज्याङ्गे विकृति ल्पकारणात् ॥ २७ तदत्र कारणं चिन्त्यं त्वया धीमन्निदन्तया । अनिरूपितकार्याणां नेह नामुत्रसिद्धयः ॥ २८ .......................... आम्ही ज्याचा उपभोग घेत आहोत त्या आमच्या देशातच कोणी असाध्य शत्रु आहे काय? किंवा ज्याच्या मनात दुष्ट आशय आहे असा कोणी आमचा गोत्रज आमच्याशी द्वेष करीत आहे काय ? ॥ २० ॥ जो कोणी विनाकारण द्वेष करणारा दुष्ट मनुष्य आमच्याविषयी आनंद मानीत नसेल तर न मानो. कारण दुष्ट मनुष्यांची अन्तःकरणे बहुतकरून मोठ्या लोकाविषयीही मत्सर करीत असतात ॥ २१ ॥ मोठ्या लोकांची मने दुसन्यांच्या वैभवाच्या भरभराटीविषयी मत्सररहित असतात पण क्षुद्रमनुष्यांची मने दुसन्यांच्या उत्कर्षाविषयी मत्सर करतात, जळफळतात ।। २२ ।। अथवा आमच्यातीलच कोणी दुरभिमानाने भरलेला दुष्ट मनुष्य मला नमस्कार करीत नसेल. त्याची मस्ती नष्ट करावी या हेतूने हे चक्र वक्र झाले असावे अर्थात् याची गति बंद पडली असावी ॥ २३ ॥ __ शत्रु अतिशय लहान असला तरी त्याची उपेक्षा करू नये. त्याला शीघ्र उपडून टाकावे. डोळ्यामध्ये क्षुद्र रेणु गेला तरी त्याची उपेक्षा केली तर तो पीडा करतो ॥ २४ ॥ क्षुद्र काटा असला तरी तो आपल्या सामर्थ्याने उपडून टाकला पाहिजे. पायात घुसलेला तो काटा आपण काढून नाही टाकला तर तो अतिशय पीडा करणारा होतो ।। २५ ।। हे चक्ररत्न उत्तम देवस्वरूपी आहे व चौदा रत्नात हे मुख्य रत्न आहे. याची गति बंद होणे कारणावाचून शक्य नाही ।। २६ ॥ हे आर्य, या चक्राने जे कार्य सूचित केले आहे ते छोटेसे आहे असे समजणे योग्य नाही. कारण हे चक्ररत्न राज्याचे उत्तम योग्य अंग आहे. यांच्यात अल्पकारणाने विकृति झाली नसती ॥ २७॥ यास्तव हे पुरोहितजी आपण विद्वान् आहात या चक्ररत्नाची गति का रुवली याचा विचार करा. ज्यांनी कार्याचा विचार केला नाही त्याना इहलोकी व परलोकीही कार्याची सिद्धि होत नसते ॥ २८॥ Page #268 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-३६) Parti कार्यविज्ञानं तिष्ठते दिव्यचक्षुषि । तमसां छेदने कोऽन्यः प्रभवेदंशुमालिनः ॥ २९ निवेद्य कार्यमित्यस्मै देवज्ञाय मिताक्षरः । विरराम प्रभुः प्रायः प्रभवो मितभाषिणः ॥ ३० ततः प्रसन्न गम्भीरपदालङ्कारकोमलाम् । भारतीं भरतेशस्य प्रबोधायेति सोऽब्रवीत् ॥ ३१ अस्ति माधुर्यमस्त्योजस्तदस्ति पदसौष्ठवम् । अस्त्यर्थानुगमो व्यक्तं यन्नास्ति त्वद्वचोमये ॥ ३२ शास्त्रज्ञा वयमेकान्तान्नाभिज्ञाः कार्ययुक्तिषु । शास्त्रप्रयोगवित्कोऽन्यस्त्वत्समो राजनीतिषु ॥ ३३ स्वमादिराजो राजर्षिस्तद्विद्यास्तदुपक्रमम् । तद्विदस्तत्प्रयुञ्जाना न जिहीमः कथं वयम् ॥ ३४ तथापि त्वत्कृतोऽस्मासु सत्कारोऽनन्यगोचरः । तनोति गौरवं लोके ततः स्मो वक्तुमुद्यताः ॥ ३५ इत्यनुश्रुतमस्माभिर्देव देवज्ञशासनम् । नास्ति चक्रस्य विश्रान्तिः सावशेषे दिशां जये ॥ ३६ महापुराण (२५७ हे पुरोहितजी आपण दिव्यनेत्रधारक आहात, आपल्या ठिकाणी या कार्याचे ज्ञान निश्चितपणे आहेच. सूर्याशिवाय अंधकाराचा छेद करण्यास दुसरा कोण बरे समर्थ आहे ? ॥२९॥ याप्रमाणे निमित्तज्ञानी पुरोहिताला थोडक्या अक्षरांनी आपले कार्य भरतेशाने सांगितले व मौन धारण केले. हे बरोबर आहे की, जे प्रभु असतात ते प्रायः थोडेच भाषण करीत असतात ॥ ३० ॥ यानंतर प्रसन्न व गम्भीर अशा शब्दानी युक्त व अलंकारानी कोमल अशी वाणी पुरोहिताने भरतेशाला समजावण्यासाठी याप्रमाणे उच्चारली ।। ३१ ॥ जे माधुर्य, जो तेजस्वीपणा, व जी शब्दांची सुंदर रचना व जी अर्थाची सरलता, हे प्रभो, आपल्या भाषणात जर नाही तर ती काय दुसऱ्या ठिकाणी आहे ? अर्थात् आपल्या भाषणात वरील माधुर्य, ओज वगैरे गुण नसतील तर ते दुसरे ठिकाणी कोठेच आढळून येणार नाहीत ।। ३२ ॥ आम्ही केवळ शास्त्रज्ञ आहोत. पण कार्य करणाऱ्या युक्तीचे ज्ञान आम्हाला बिलकुल नाही. हे प्रभो, राजनीतीमध्ये शास्त्राचा कसा उपयोग करावा हे जाणणारा आपणासारखा कोण बरे आहे ? ॥ ३३ ॥ हे प्रभो, आपण राजामध्ये पहिले राजा आहात आणि राजसमूहात आपण ऋषीप्रमाणे असल्यामुळे राजर्षि आहात व या राजविद्या आपणापासून प्रकट झाल्या आहेत. आम्ही त्या राजविद्या फक्त जाणत आहोत. आता त्या राजविद्यांचा प्रयोग आम्ही करू लागलो तर आम्हाला कशी बरे लाज वाटणार नाही ? ।। ३४ ।। तरीही आपणाकडून केला गेलेला जो असाधारण सत्कार तो आम्हाला जगात उच्च गौरवाप्रत नेत आहे. यास्तव आम्ही कांही बोलण्यासाठी उद्युक्त झालो आहोत ॥ ३५ ॥ हे राजन्, दिग्विजय पूर्ण व्हावयाला कांही बाकी राहिले असल्यास चक्राला विश्रान्ति प्राप्त होत नाही असे नैमित्तिक विद्वान् म्हणतात ते आम्ही ऐकले आहे ॥ ३६ ॥ म. ३३ Page #269 -------------------------------------------------------------------------- ________________ २५८) महापुराण (३४-३७ ............. स्वलच्चिः करालं वो जैत्रमस्त्रमिदं ततः । संस्तम्भितमिवाव्यक्तं पुरद्वारि विलम्बते ॥ ३७ अरिमित्रममित्रं मित्रमित्रमिति श्रुतिः । श्रुतिमात्रे स्थिता देव प्रजास्त्वय्यनुशासति ॥ ३८ तथाप्यस्त्येव जेतव्यः पक्षः कोऽपि तवाधुना । योऽन्तर्गृहे कृतोत्थानः कूरो रोग इवोदरे ॥ ३९ बहिर्मण्डलमेवासीत्परिक्रान्तमिदं त्वया । अन्तर्मण्डलसंशुद्धिर्मनाग्नाद्यापि जायते ॥ ४० जितजेतव्यपक्षस्य न नम्रा भ्रातरस्तव । व्युत्थिताश्च सजातीया विधाताय ननु प्रभोः ॥४१ स्वपक्षरेव तेजस्वी महानप्युपरुध्यते । प्रत्यर्फमर्ककान्तेन ज्वलतेदमुदाहृतम् ॥ ४२ विबलोऽपि सजातीयो लब्ध्वा तीक्ष्णं प्रतिष्कशम् । दण्डः परश्वधस्व निबर्हयति पार्थिवम् ॥४३ भ्रातरोऽमी तवाजय्या बलिनो मानशालिनः । यवीयांस्तेषु धौरेयो धीरो बाहुबली बली ॥ ४४ एकोनशतसङख्यास्ते सोदर्या वीर्यशालिनः । प्रभोरादिगुरोर्नान्यं प्रणमाम इति स्थिताः ॥ ४५ पेटणाऱ्या ज्वालानी भयंकर दिसणारे, जयशाली असे हे तुमचे अस्त्र (चक्ररत्न) अव्यक्त राहून कोणी तरी त्याची गति जणु रोकल्याप्रमाणे नगराच्या वेशीत स्तंभित केल्याप्रमाणे उभे राहिले आहे ॥३७॥ हे राजन्, तू प्रजेचे रक्षण करीत असता शत्रु, मित्र, शत्रूचा मित्र व मित्राचा मित्र हे शब्द केवळ शास्त्रातच ऐकू येतात. व्यवहारात ते फक्त शब्दांनी राहिले आहेत ॥ ३८॥ तरीही कोणी तरी जिंकण्यास योग्य असा पक्ष आहे व क्रूर रोग जसा पोटामध्ये वाढतो तसा तुझ्या घरात हा जेतव्यपक्ष उत्पन्न झाला आहे व त्याने आपले डोके वर काढले आहे ॥ ३९ ॥ हे प्रभो, तू आपल्या बाह्यमंडलालाच जिंकले आहेस. पण अन्तर्मण्डल तुझ्याकडून हे प्रभो, अद्यापि शुद्ध केले गेले नाही. अर्थात् अन्तर्मण्डलात असलेले हे तुझे बंधु वगैरे तुझ्याविषयी शुद्ध अन्तःकरणाचे नाहीत ।। ४० ॥ _हे प्रभो, तू सर्व शत्रूना जिंकले आहेस. पण तुझे सर्व भाऊ तुला नम्र नाहीत, कारण सजातीय लोक जेव्हा विरुद्ध होतात तेव्हा ते राजाच्या नाशाला कारण होतात ॥ ४१ ।। तेजस्वी मनुष्य जरी मोठा असला तरीही आपल्या सजातीय लोकाकडून पराजित केला जातो. ते त्याच्याशी विरोध करतात. सूर्यकान्तमणि प्रज्वलित होऊन सूर्याबरोबर विरोध करतो हे याचे उदाहरण आहे ॥ ४२ ॥ शक्तिहीन असाही सजातीय मनुष्य बलवान् पुरुषाचा आश्रय मिळवून राजाचा घात करतो, जसे दाण्डा कुन्हाडीचा आधार मिळवून सजातीय वृक्षांचा नाश करतो ।। ४३ ।। हे प्रभो, हे तुझे भाऊ मानशाली आहेत व बलवान् आहेत. त्यामुळे ते तुजकडून जिंकले जाणे शक्य नाही. त्यात धाकटा धैर्यशाली, बलवान् असा बाहुबली सर्वांत प्रमुख आहे ।। ४४॥ तुझे ते नव्याण्णव भाऊ वीर्यशाली - पराक्रमी आहेत व प्रभु - आदिप्रभुशिवाय इतराला आम्ही नमस्कार करणार नाही असा त्यानी निश्चय केला आहे ॥ ४५ ॥ Page #270 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-५४) तदत्र प्रतिकर्तव्यमाशु चक्रधर त्वया । ऋणव्रणाग्निशत्रूणां शेषं नोपेक्षते कृती ॥ ४६ राजन् राजन्वती भूयात्त्वयैवेयं वसुन्धरा । मा भूद्राजवती तेषां भूम्ना द्वैराज्यदुः स्थिता ॥ ४७ त्वयि राजनि राजोक्तिर्देव नान्यत्र राजते । सिंहे स्थिते मृगेन्द्रोक्ति हरिणा बिभृयुः कथम् ॥ ४८ देव त्वामनुवर्तन्तां भ्रातरो धौतमत्सराः । ज्येष्ठस्य कालमुख्यस्य शास्त्रोक्तमनुवर्तनम् ॥ ४९ त्वच्छासनहरा गत्वा सोपायमुपजप्य तान् । त्वदाज्ञानुवशान्कुर्युविगृह्य ब्रूयुरन्यथा ॥ ५० मिथ्यामदोद्धतः कोऽपि नोपेयाद्यदि ते वशम् । स नाशयेद्धतात्मानमात्मगृह्यं च राजकम् ॥ ५१ राज्यं कुलकलत्रं च नेष्टं साधारणं द्वयम् । भुङ्क्ते सार्धं परैर्यस्तन्न नरः पशुरेव सः ॥ ५२ किमत्र बहुनोक्तेन त्वामेत्य प्रणमन्तु ते । यान्तु वा शरणं देवं त्रातारं जगतां जिनम् ॥ ५३ न तृतीया गतिस्तेषामेषैषां द्वितयी गतिः । प्रविशन्तु त्वदास्थानं वनं वामी मुर्गः समम् ॥ ५४ महापुराण हे चक्रवर्तिन् तू लौकर याविषयी प्रतीकार कर. कारण शहाणा प्रयत्नशील मनुष्य ॠण, व्रण, जखम, अग्नि आणि शत्रु यांच्या थोड्या अंशाची देखिल उपेक्षा करीत नाही ||४६|| हे राजा, ही पृथ्वी तुझ्यामुळेच राजन्वती ( उत्तम राजा जिला आहे अशी ) होवो. पण तुझे भाऊ नव्याण्णव असल्यामुळे ही पृथ्वी राजवती अनेक राजे जिच्यावर सत्ता चालवितांत अशी न होवो, अर्थात् अनेक राजामुळे जिची स्थिति बिघडली आहे अशी ती न होवो ॥ ४७ ॥ (२५२ हे प्रभो, तू राजा असता राजा हा शब्द अन्य ठिकाणी शोभत नाही कारण सिंह असताना मृगेन्द्र हा शब्द हरिण कसे बरे धारण करू शकतील ॥ ४८ ॥ हे देवा, ज्यानी आपल्यातला मत्सर काढून टाकला आहे असे हे तुझे भाऊ तुझ्याशी अनुकूल होऊन राज्य करोत आणि अधिक कालामुळे महत्त्व पावलेल्या वडील भावाशी अनुकूल वागणे हे धाकट्या भावाचे कर्तव्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे ॥ ४९ ॥ हे राजन् आपले दूत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी त्यानी युक्तीने बोलावे व त्याना त्याने आज्ञावश करावे व जर ते आज्ञावश झाले नाहीत तर अन्य प्रकाराने दमदाटीने त्यांच्याशी त्यानी बोलावे ॥ ५० ॥ खोट्या अभिमानाने उद्धत होऊन जर कोणी तुझ्या वश होणार नाही तर तो आपला नाश करून घेईल व स्वतःच्या अधीन असलेल्या राजांचाही नाश करील ।। ५१ ।। राज्य व कुलीन अशी पत्नी हे दोन पदार्थ साधारण नाहीत त्यांचा उपभोग एकाच पुरुषाने करावा. परन्तु या दोन पदार्थांचा जो इतर पुरुषाबरोबर उपभोग घेतो तो मनुष्य नव्हे तो पशुच होय ॥ ५२ ॥ याविषयी अधिक बोलणे नको. ते तुझे बन्धु तुझ्याकडे येऊन तुला ते नमस्कार करोत अथवा जगाचे रक्षण करणाऱ्या आदिभगवन्ताना ते शरण जावोत ॥ ५३ ॥ या आपल्या भावाना तिसरी गति उपाय नाही. याना हेच दोन उपाय आहेत. त्यानी तुझ्या सभेत प्रवेश करावा अथवा त्यांनी हरिणाबरोबर वनात राहावे ॥ ५४ ॥ Page #271 -------------------------------------------------------------------------- ________________ २६०) महापुराण (३४-५५ स्वकुलान्युल्मकानीव दहन्त्यननुवर्तनः । अनुवर्तीनि तान्येव नेत्रस्थानन्दथुः परम् ॥ ५५ प्रशान्तमत्सराः शान्तास्त्वां नत्वा नम्रमौलयः । सोदर्याः सुखमेधन्तां त्वत्प्रसादाभिकाइक्षिणः ॥५६ इति शासति शास्त्रज्ञे पुरोषसि सुमेधसि । प्रतिपद्यापि तत्कायं चक्री चुक्रोध तत्क्षणम् ॥५७ आरुष्टकलुषां दुष्टि क्षिपन् दिक्ष्विव दिग्बलिम् । सधूमामिव कोपाग्नेः शिखां मुकुटिमुत्क्षिपन्॥५८ भ्रातृभाण्डकृतामर्षविषवेगमिवोद्वमन् । वाक्छलेनोच्छलन्रोषाद्वभाषे परुषा गिरः ॥ ५९ कि किमात्थ दुरात्मानो भ्रातरः प्रणतां न माम् । पश्य मद्दण्डचण्डोल्कापातात्तान् शल्कसास्कृतान् । अदृष्टमश्रुतं कृत्यमिदं वैरमकारणम् । अवध्याः किल कुल्यत्वादिति तेषां मनीषितम् ॥ ६१ यौवनोन्मादतस्तेषां भटवादोऽस्ति दुर्मदः । ज्वलच्चक्राभितापेन स्वेदस्तस्य प्रतिक्रिया ॥ ६२ अकरां भोक्तुमिच्छन्ति गुरुदत्तामिमां तके । तत्कि भटावलेपेन भुक्ति ते श्रावयन्तु मे ॥ ६३ एकाच कुलातले लोक एकमेकाशी विरुद्ध वागण्याने विस्तवाप्रमाणे आपल्या कुलाचा नाश करून घेतात व एकमेकाबरोबर अनुकूल वागले असता ते डोळयाना अतिशय आनंद देणारे होतात ।। ५५ ॥ ज्यांचा मत्सर नष्ट होऊन मन शान्त झाले आहे व नम्रमस्तकाने नमस्कार करून तुझ्या प्रसादाची अभिलाषा करणारे तुझे भाऊ सुखाने समृद्ध होवोत ॥ ५६ ॥ याप्रमाणे बुद्धिमान् व शास्त्रज्ञ पुरोहिताने सांगितलेले त्यांचे कर्तव्य मान्य करून देखिल चक्री तत्काल रागावला ।। ५७ ॥ जणु दिशाना बलि अर्पण करीत आहे अशी रोषाने लाल दष्टि करून व ती सर्व दिशाना फेकन व कोपरूपी अग्नीची धुरासहित ज्वाला की काय अशी आपली भुवई वर करून व आपल्या भावांच्या समूहरूपी मूलधनावर कोधरूपी विषवेगाला वचनाच्या मिषाने ओकणारा व वचनाच्या मिषाने जो वर उसळत आहे असा चक्रपति कठोर वचनें याप्रमाणे बोलला ।। ५८-५९ ॥ आपण काय म्हणता? ते माझे दष्ट भाऊ मला नमस्कार करणार नाहीत ? माझ्या दण्डरत्नाच्या प्रचंड ठिणग्यांच्या समूहांच्या वृष्टीनी त्यांचे तुकडे तुकडे होत असलेले हे पुरोहितजी आपण पाहा ।। ६० ।। हे त्यांचे कार्य पूर्वी कधी पाहिले नाही व ऐकिलेही नाही. हे त्यांचे वैर निष्कारण आहे. त्यांची अशी समजूत झाली आहे की आपण एका कुलात जन्मलेले आहोत त्यामुळे अवध्य आहोत ।। ६१ ॥ तारूण्याच्या मस्तीमुळे आम्ही मोठे शूर आहोत असा दुरभिमान उत्पन्न झाला आहे पण पेटलेल्या ज्वालानी युक्त अशा चक्राचे सर्व बाजूने चटके देऊन तो दुरभिमान नाहीसा करणे हा त्यावर चांगला उपाय आहे ।। ६२ ।। ते माझे दुष्ट भाऊ ही पृथ्वी आम्हाला गुरु-आमच्या पित्याने आदि भगवंताने-दिली आहे असे ते समजून तिचा उपभोग घेण्याची त्यांची इच्छा आहे. असे जर आहे तर त्यानी शूरपणाचा गर्व कशाला वहावा. त्यांनी आपला भोगवटा आम्हाला कळ वावा ।। ६३ ।। Page #272 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-७१) महापुराण (२६१ प्रतिशय्यानिपातेन भुक्ति ते साधयन्तु मे । शितास्त्रकण्टकोत्सङ्गपतिताङ्गा रणाङ्गणे ॥ ६४ क्व वयं जितजेतव्या भोक्तव्यासङ्गताश्च ते । तथापि संविभागोऽस्तु तेषां मदनुवर्तने ॥ ६५ न भोक्तुमन्यथाकारं महीं तेभ्यो ददाम्यहम् । कथङ्कारमिदं चक्रं विश्रमं यात्वतज्जये ॥ ६६ इदं महदनाख्येयं यत्प्राज्ञो बन्धुवत्सलः । स बाहुबलिसाह्वोऽपि भजते विकृति कृती ॥ ६७ अबाहुबलिनानेन राजकेन नतेन किम् । नगरेण गरेणेव भुक्तेनापोदनेन किम् ॥ ६८ किं किङ्करैः करालास्त्रप्रतिजितशात्रवैः । अनाज्ञावशगे तस्मिन् नवविक्रमशालिनि ॥ ६९ कि वासुरभटरेभिरुद्धटारभटै रसैः । मयेवमसमा स्पर्द्धा तस्मिन्कुर्वति गविते ॥७० । इति जल्पति संरम्भाच्चक्रपाणावपक्रमम् । तस्योपचक्रमे कर्तुं पुनरित्थं पुरोहितः ॥ ७१ अथवा रणाङ्गणात कठोर तीक्ष्ण अशा शस्त्राच्या काट्यावर ज्यांची शरीरे पडली आहेत असे ते माझे बन्धु वीरशय्येवर पडून आपल्या पृथ्वीची भुक्ति सिद्ध करोत ॥ ६४ ॥ ज्यानी जिंकण्यास योग्य असे जे जे ते सर्व जिंकले आहे असे आम्ही कोणीकडे व भोगण्याच्या पदार्थाकरिता-पृथ्वी भोगण्याकरिता फक्त एकत्र झालेले हे माझे भाऊ कोणीकडे ? तरीही ते माझ्याशी अनुकूल वागतील तर त्यांचाही या राज्यात वाटा आहे हे मी मान्य करीन ।। ६५॥ ते जर माझ्याशी अनुकूलतेने वागणार नाहीत तर मी त्याना पृथ्वी भोगण्यास देणार नाही व त्याना जर मी जिंकले नाही तर हे चक्र कसे विश्रान्ति घेईल ॥६६॥ माझा भाऊ बाहुबलि, तो तर मोठा बन्धुवत्सल आहे. सर्व भावावर त्याचे फार प्रेम आहे आणि तो मोठा चतुर आहे पण तो देखिल विकृतमनाचा झाला आहे. हे त्याचे वागणे निद्य आहे. त्याचे वर्णन करणे मला योग्य वाटत नाही ॥ ६७ ॥ भाऊ बाहुबलि जर नम्र झाला नाही तर सर्व राजसमूह नम्र होऊनही काय उपयोग आहे आणि त्याचे नगर जे पोदनपुर ते जर ताब्यात आले नाही तर त्यावाचून विषासारखे असलेल्या या नगराचा अयोध्येचा तरी काय उपयोग आहे ॥ ६८ ॥ जोमदार अशा पराक्रमाने शोभणारा जो बाहुबलि तो जर आज्ञावश होणार नाही तर भयंकर शस्त्रसमूहानी ज्यानी शत्रुसमूहाला तिरस्कृत केले आहे अशा या माझ्या वीर नोकरांचा तरी काय उपयोग आहे ॥ ६९ ॥ गर्विष्ठ असा बाहुबलि जर माझ्याशी असाधारण स्पर्धा - द्वेष करू लागला तर अतिशय भय उत्पन्न करणारा वीररस ज्यांच्या ठिकाणी आहे अशा देवरूपी सैन्याने तरी माझे काय प्रयोजन सिद्ध होणार आहे ? ॥ ७० ।।। याप्रमाणे चक्रवर्ती क्रोधाने त्यांच्याशी युद्ध करावे अशी भाषा बोलत असता तो पुरोहित पुनः याप्रमाणे चक्रवर्तीला बोलला ॥ ७१ ।। Page #273 -------------------------------------------------------------------------- ________________ २६२) महापुराण (३४-७२ जितजेतव्यतां देव घोषयन्नपि कि मुधा । जितोऽसि क्रोधवेगेन प्राग्जय्यो वशिनां हि सः ॥ ७२ बालास्ते बालभावेन विलसन्त्यपणेऽप्यलम् । देवे जितारिषड्वर्गे न तमः स्थातुमर्हति ॥ ७३ कोधान्घतमसे मग्नं यो नात्मानं समुद्धरेत् । स कृत्यसंशयद्वैधान्नोत्तरीतुमलं तराम् ॥ ७४ कि तरां स विजानाति कार्याकार्यमनात्मवित् । यः स्वान्तःप्रभवाजेतुमरीन्न प्रभवेत्प्रभुः ॥ ७५ तद्देव विरमामुष्मात्संरंभादपकारिणः । जितात्मानो जयन्ति क्षमा क्षमया हि जिगीषवः ॥ ७६ विजितेन्द्रियवर्गाणां सुश्रुतश्रुतसम्पदाम् । परलोकजिगीषूणां क्षमा साधनमुत्तमम् ॥ ७७ लेखसाध्ये च कार्येऽस्मिन्विफलोऽतिपरिश्रमः । तृणाङकुरे नखच्छेद्ये कः परश्वधमुद्धरेत् ॥ ७८ ततस्तितिक्षमाणेन साध्यो भ्रातृगणस्त्वया । सोपचारं प्रयुक्तेन वचोहरगणेन सः ॥ ७९ ----------------- हे प्रभो, जे जिंकण्यास योग्य होते त्याना आपण जिंकले अशी घोषणा आपण व्यर्थ करीत आहात. कारण आपण क्रोधाने यावेळी जिंकले गेलेले आहेत. खरे पाहिले असता जितेन्द्रिय लोकानी प्रथम क्रोधाला जिंकले पाहिजे ।। ७२ ।। हे प्रभो, आपले भाऊ बाल-अज्ञानी आहेत. ते अज्ञानाने दुःखदायक मार्गात यथेच्छ क्रीडा करीत आहेत. परंतु आपण क्रोध, लोभादिक सहा अन्तरंग शत्रूना जिंकले आहे यास्तव आपल्या ठिकाणी हे तम-अज्ञान राहणे योग्य नाही. आपण क्रोधावश होऊ नका ।। ७३ ॥ जो मानव क्रोधरूपी दाट अंधारात बुडलेल्या स्वतःला वर काढू शकत नाही तो कार्याच्या संशयात सापडून द्विधा मनोवृत्तीचा होतो आणि मग तो त्या संशयाच्या मनोवृत्तीतून पार पडत नाही ॥ ७४ ।। __ जो प्रभु, जो राजा आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामादिक शत्रूना जिंकण्यास समर्थ नाही त्या अविचारी प्रभूला कार्य करण्यास योग्य काय व अकार्य- करण्यास अयोग्य असे काम कोणते याचे स्वरूप समजते काय ? अर्थात् समजत नाही ॥ ७५ ।। ___म्हणन हे प्रभो, या अपकारी क्रोधापासून आपण दूर राहा. आपण शांत व्हा. जे जगाला जिंकण्याची इच्छा करतात ते जितेन्द्रिय पुरुष पृथ्वीला क्षमेने जिंकतात ।। ७६ ॥ ज्यानी स्पर्शनादि पाच इंद्रिये जिकली आहेत व ज्यांच्याजवळ आगमज्ञानाची संपत्ति उत्तम निर्दोष आहे व जे परलोकाला जिंकण्याची इच्छा करतात, त्यांना क्षमा हे उत्तम साधन आहे ॥ ७७ ॥ हे प्रभो, पत्र पाठवून जे कार्य करावयाचे त्याविषयी अधिक परिश्रम करणे व्यर्थ आहे. कारण गवताचा अंकुर नखाने तोडण्यास योग्य असता तो तोडण्यास कोण बरे कु-हाड उचलील ॥ ७८ ॥ म्हणून शांति धारण करून हे प्रभो, आपण आपल्या भावांच्या समुदायाला वश करा. अर्थात् आपला अभिप्राय सांगणाऱ्या दूताबरोबर भेटीचे पदार्थ पाठवून आपण आपल्या भावाना वश करा ॥ ७९ ॥ Page #274 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-८८) अद्यैव च प्रहेतव्याः समं लेखर्वचोहराः । गत्वा ब्रूयुश्च तानेत चक्रिणं भजताग्रजम् ॥ ८० कल्पानोकहसेवेव तत्सेवाभीष्टदायिनी । गुरुकल्पोऽग्रजश्चक्री स मान्यः सर्वथापि वः ॥ ८१ विदूरस्थैर्न युष्माभिरैश्वयं तस्य राजते । तारागणैरनासन्नैरिव बिम्बं निशापतेः ॥ ८२ साम्राज्यं नास्य तोषाय यद्भवद्भिर्विना भवेत् । सहभोग्यं हि बन्धूनामधिराज्यं सता मुदे ॥ ८३ इदं वाचिकमन्यत्तु लेखार्थादवधार्यताम् । इति सोपायनेर्लेखैः प्रत्यय्यास्ते मनस्विनः ॥ ८४ यशस्यमिदमेवार्य कार्यं श्रेयस्यमेव च । चिन्त्यमुत्तरकार्यं च साम्ना तेष्ववशेषु वं ॥ ८५ बिभ्यता जननिर्वादादनुष्ठेयमिदं त्वया । स्थायुकं हि यशो लोके गत्वर्यो ननु सम्पदः ॥ ८६ इति तद्वचनाच्चकी वृत्तिमारभटीं जहाँ । अनुवर्तनसाध्या हि महतां चित्तवृत्तयः ॥ ८७ आस्तां बाहुबली तावद्यत्नसाध्यो महाबलः । शेषैरेव परीक्षिष्ये भ्रातृभिस्तद्विजिह्मताम् ॥ ८८ महापुराण व आजच पत्रासह दूताना पाठवा व ते जातील आणि आपला वडील भाऊ जो चक्रवर्ती आहे त्याच्याकडे जा आणि त्याची सेवा करा असे बोलतील ॥ ८० ॥ ( २६३ तुमच्या वडील भावाची तुम्ही सेवा केली तर ती कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित फल देणारी आहे. हा तुमचा वडील भाऊ चक्रवर्ती आहे व तो तुम्हाला पित्याप्रमाणे आहे व त्याचा तुम्ही सर्व प्रकारे आदर केला पाहिजे ।। ८१ ॥ तुम्ही त्यांचे बंधु आहात. तुम्ही दूर राहिल्यास त्याच्या ऐश्वर्याला शोभा येणार नाही. तारांचा समुदाय दूर राहील तर चन्द्राच्या बिम्बाला शोभा येईल काय ? ॥ ८२ ॥ आपणावाचून त्याला प्राप्त झालेले साम्राज्य त्याला आनंददायक होणार नाही. कारण बंधूसह उपभोगात येणारे राज्य हे सज्जनाना आनंदित करणारे होते ॥ ८३ ॥ हे तोंडाने सांगावयाचे झाले. लेखात लिहिलेल्या अभिप्रायावरून बाकीचे समजा. याप्रमाणे बोलून नजराण्यासह लेखानी मानी असलेल्या आपल्या बंधूना हे राजन् आपण विश्वासात घ्या ॥ ८४ ॥ हे राजन्, ज्येष्ठ बंधु अशा तुझे हे कर्तव्य कीर्ति कारणारे आहे व कल्याण करणारे आहे व आपल्या ताब्यात नसलेल्या त्या तुझ्या बंधूविषयी इतर जे उत्तर कर्तव्य आहे तेही साधावे - खेळीमेळीने सलोख्याने हे आर्या तू विचार कर ॥ ८५ ॥ लोकापवादापासून भय मानणाऱ्या हे चक्रवर्तिन् तुजकडून हेच कर्तव्य केले जावे. कारण या जगात यश हेच स्थिर राहणारे आहे व संपत्ति नाशवंत आहेत ॥ ८६ ॥ याप्रमाणे पुरोहिताचे वचन ऐकूनच चक्रवर्तीने आपली क्रोधाची वृत्ति त्यागली. बरोबरच आहे की मोठ्यांच्या चित्तवृत्ति अनुकूल भाषणानें साध्य होतात ॥ ८७ ॥ बाहुबली विषयीचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवावा. महाबाहु तो महाबलवान् आहे त्याला महाप्रयत्नाने जिंकणे शक्य होईल. पण बाकीचे जे भाऊ आहेत त्यांच्या प्रतिकूलपणाची परीक्षा मी करीन ॥ ८८ ॥ Page #275 -------------------------------------------------------------------------- ________________ २६४) महापुराण (३४-८९ इति निर्धार्य कार्यज्ञान कार्ययुक्तौ विविक्तधीः । प्राहिणोत्स निसृष्टार्थान्दूताननुजसन्निधिम् ॥ ८९ गत्वा च ते यथोद्देशं दृष्ट्वा तांस्तान्यथोचितम् । जगुः सन्देशमीशस्य तेभ्यो दूता यथास्थितम् ॥९० मथ ते सह सम्भूय कृतकार्यनिवेदनात् । दूतानित्यूचुरारूढ़प्रभुत्वमदकर्कशाः ॥ ९१ यदुक्तमादिराजेन तत्सत्यं नोऽभिसंमतम् । गुरोरसन्निधौ पूज्यो ज्यायान्भ्रातानुजैरिति ॥ ९२ प्रत्यक्षो पुरुरस्माकं प्रतपत्येष विश्वदृक् । स नः प्रमाणमैश्वयं तद्वितीर्णमिदं हि नः ॥ ९३ तदत्र गुरुपादाज्ञातन्त्रा न स्वैरिणो वयम् । न देयं भरतेशेन नादेयमिह किञ्चन ॥ ९४ यत्तु नः संविभागार्थ इदमामन्त्रणं कृतम् । चक्रिणा तेन सुप्रीताः प्रीणाश्च वयमागलात् ॥ ९५ इति सत्कृत्य तान्दूतान्सन्मानः प्रभवत्प्रभौ । विहितोपायनाः सद्यः प्रतिलेखैर्व्यसर्जयन् ॥ ९६ याप्रमाणे निश्चय करून कार्य करण्यात ज्यांची बुद्धि केव्हाही गोंधळत नाही अशा चक्रवर्तीने कार्य जाणणारे व वारंवार सोपवलेली कामगिरी उत्तम रीतीने पार पाडणारे अशा दूताना आपल्या धाकट्या भावाकडे पाठविले ॥ ८९ ।। ज्या उद्देशाने त्याना पाठविले होते तो उद्देश चांगला ध्यानात ठेवून ते दूत गेले व त्यानी चक्रवर्तीच्या भावाना. त्याचा मानमरातब ठेवून प्रभूचा-चक्रवर्तीचा जो संदेश जसा होता तसा त्यानी त्याना सांगितला ।। ९० ॥ त्या दूतानी आपल्या कार्याचे निवेदन केल्यानंतर ते चक्रवर्तीचे बंध एकत्र जमले. प्रभुत्वाचा मद आरूढ झाल्यामुळे ज्यांचे स्वभाव कठोर बनले आहेत असे भरताचे बंधु त्या दूताना याप्रमाणे बोलले ।। ९१ ॥ ते त्या दूताना असे बोलले " पित्याचे जेव्हा सान्निध्य नसते अशावेळी वडील भावाचा आदर धाकटया भावानी ठेवला पाहिजे असे जे आदिराजा भरताने आमच्या वडील भावाने म्हटले आहे ते सत्य आहे व आम्हाला मान्य आहे ।। ९२ ।। पण आमचे पिताजी आदिभगवंत त्रैलोक्याला पाहणारे व सूर्यासारखे या भूतलावर प्रत्यक्ष तळपत आहेत व तेच आम्हाला प्रमाण व त्यानीच आम्हाला हे ऐश्वर्य दिले आहे ॥ ९३।। आम्ही आमच्या पितचरणाची आज्ञा मान्य करून त्याप्रमाणे वागत आहोत. म्हणून आम्ही स्वच्छंदी स्वैराचारी नाहीतच. आम्हाला भरतेशाने काही दिले नाही व आमच्याकडून त्याने घेणेही योग्य नाही. अर्थात् आम्ही भरतेशाचे काही देणे घेणे लागत नाही ।। ९४ ।। आम्हाला राज्यादिकाची वाटणी देण्याकरिता चक्रवर्तीने बोलाविले आहे. त्यामुळे आम्ही संतुष्ट झालो आहोत व गळ्यापर्यन्त तृप्त झालो आहोत ।। ९५ ॥ यानंतर त्यानी राजाप्रमाणे दूताचा सन्मानानी सत्कार केला व प्रभुभरतासाठी त्यानी नजराणे पाठविले व पत्राची उत्तरे लिहून त्यासह त्यानी दूताना भरताकडे पाठविले ।। ९६ ॥ Page #276 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-१०४) महापुराण दूतसात्कृत सन्मानाः प्रभुसात्कृतवीचिकाः । गुरुसात्कृत्य तत्कार्यं प्रापुस्ते गुरुसन्निधिम् ॥ ९७ गत्वा च गुरुमद्राक्षुसितोचितपरिच्छदाः । महागिरिमिवोत्तृङ्ग कैलासशिखरालयम् ॥ ९८ प्रणिपत्य विधानेन प्रपूज्य च यथाविधि । व्यजिज्ञपन्निदं वाक्यं कुमारा मारविद्विषम् ॥ ९९ त्वत्तः स्मो लब्धजन्मानस्त्वत्तः प्राप्ताः परां श्रियम् । त्वत्प्रसादैषिणो देव त्वत्तो नान्यमुपास्महे ॥१०० गुरुप्रसाद इत्युच्चर्जनो वक्त्येव केवलम् । वयं तु तद्रसाभिज्ञास्त्वत्प्रसादाजितश्रियः ॥ १०१ त्वत्प्रणामानुरक्तानां त्वत्प्रसादाभिकाङक्षिणाम्। त्वद्वचः किङ्कराणां नो यद्वा तद्वास्तु नापरम् ॥१०२ इति स्थिते प्रणामार्थं भरतोऽस्माञ्जुहूषति । तन्नात्र कारणं विद्मः किं मदः किं नु मत्सरः ॥ १०३ युष्मत्प्रणमनाभ्यासरसदुर्ललितं शिरः । नान्यप्रणमने देव धृति बध्नाति जातु नः ॥ १०४ (२६५ ज्यानी दूतांचा योग्य सन्मान केला आहे व भरतराजाला योग्य उत्तर दिले आहे व भरताने केलेले कार्य ज्यांनी प्रभूला कळविले आहे असे ते भरताचे धाकटे भाऊ प्रभुभगवंतासंनिध गेले ॥ ९७ ॥ अल्प व योग्य सामग्री ज्यांच्याजवळ आहे अशा त्या भरतानुजांनी गुरूना - आदि जिनेश्वराना पाहिले. आदिभगवान् महापर्वताप्रमाणे उन्नत होते व कैलासाच्या शिखरावर ते विराजमान झाले होते ।। ९८ ।। त्या कुमारानी भगवंताला योग्यविधीने वंदन केले व त्यांचे पूजन करून मदनाचा नाश ज्यानी केला आहे अशा त्याना याप्रमाणे बोलले ।। ९९ ॥ हे प्रभो, आम्ही तुमच्यापासून जन्मलो आहोत व आपणापासून आम्हाला उत्कृष्ट लक्ष्मी प्राप्त झाली आहे व हे प्रभो, तुमच्याच प्रसादाची आम्हाला नेहमी इच्छा आहे व आम्ही आपणाशिवाय इतराची उपासना करणार नाही ॥ १०० ॥ आमच्यावर गुरु फार प्रसन्न झाले असे फक्त लोक बोलतात. परंतु आम्ही परमगुरु अशा आपल्या प्रसादाचा रस चाखत आहोत. त्याचा अनुभव आम्ही जाणत आहोत व हे प्रभो आपल्या प्रसादाने आम्हाला लक्ष्मीची प्राप्ति झाली आहे ।। १०१ ॥ हे प्रभो, आम्ही आपणास वंदन करण्यात अनुरक्त झालेले आहोत. आपल्या प्रसादाची आम्हाला नेहमीच इच्छा आहे व आपल्या आज्ञेचे आम्ही किंकर -नोकर आहोत. आम्हाला जे मिळाले आहे ते असो. आम्हाला इतराची कांहीही अपेक्षा नाही ॥ १०२ ॥ असे असताही आम्ही भरताला नमस्कार करावा म्हणून तो आम्हाला बोलावीत आहे. पण त्याचे कारण आम्हाला समजत नाही. त्याच्या बोलावण्याचे कारण त्याला आलेला गर्व है आहे किंवा मत्सर कारण आहे हे आम्हाला समजत नाही ॥ १०३ ॥ हे प्रभो, आपणास नमस्कार करण्याच्या अभ्यासाचा जो आनंदरस त्यात तत्पर झालेले आमचे मस्तक ते दुसऱ्याला नमस्कार करण्यात केव्हाही व कधीही संतोष धारण करणार नाही ।। १०४ ।। म. ३४ Page #277 -------------------------------------------------------------------------- ________________ २६६) महापुराण (३४-१०५ किमम्भोजरजःपुञ्जपिञ्जरे वारि मानसे । निषेव्य राजहंसोऽयं रमतेऽन्यसरोजले ॥ १०५ किमप्सरःशिरोजान्तसुमनोगन्धलालितः । तुम्बीवनान्तमभ्येति प्राणान्तेऽपि मधुव्रतः ॥ १०६ मुक्ताफलाच्छमापीय गगनाम्बु नवाम्बुदात् । शुष्यत्सरोम्बु किं वाञ्छेदुदन्यन्नपि चातकः ॥१०७ इति युष्मत्पदाज्जन्मरजोरञ्जितमस्तकाः । प्रणब्तुमसदाप्तानामिहामुत्र च नेश्महे ॥ १०८ परप्रणामविमुखी भवसङ्गविजिताम् । वीरदीक्षां वयं धर्तुं भवत्पावमुपागताः॥ १०९ तद्देव कथयास्माकं हितं पथ्यं च कर्म यत् । येनेहामुत्र च स्याम स्वद्भक्तिदुढवासनाः ।। ११० परप्रणामसञ्जातमानभङ्गभयातिगाम् । पदवी तावकी देव भवेमहि भवेभवे ॥ १११ मानखण्डनसम्भूतपरिभूतिभयातिगाः । योगिनः सुखमेधन्ते वनेषु हरिभिः समम् ॥ ११२ ब्रुवाणानिति साक्षेपं स्थापयन्पथि शाश्वते । भगवानिति तानुच्चरन्वशादनुशासिता ॥ ११३ कमलाच्या परागसमूहाने पिवळे झालेल्या मानससरोवरातील पाणी पिऊन हा राजहंस अन्य सरोवराच्या पाण्यात रमतो काय ? ।। १०५ ।। अप्सरांच्या मस्तकावरील केसाना शोभविणाऱ्या फुलांच्या गंधाचे सेवन करणारा भुंगा प्राणान्तीही भोपळ्याच्या वनात प्रवेश करील काय ? नवीन मेघापासून निघालेले मोत्याप्रमाणे निर्मल असे आकाशजल पिऊन आनंदित झालेला चातक तहान लागली तरीही वाळणाऱ्या सरोवराचे पाणी तो इच्छील काय ? केव्हाही इच्छिणार नाही ।। १०६-१०७ ।। हे भगवन्ता, आपल्या पादकमलाच्या परागानी ज्यांची मस्तके रंगली आहेत असे आम्ही असदाप्त-रागादि दोषाने रहित नसलेले जे लोक आहेत त्याना नमस्कार करण्यास इच्छित नाहीत अर्थात् भरतही रागादि-दोषानी रहित नसल्यामुळे आम्ही त्यास नमस्कार करणार नाही ।। १०८ ॥ जी दुसऱ्याना नमस्कार करण्यापासून विमुख आहे, जी संसाराच्या संबन्धाने रहित आहे अशी वीरदीक्षा घेण्यासाठी आम्ही आपल्याजवळ आलो आहोत ।। १०९ ॥ म्हणून हे भगवंता, आपण आम्हाला हितकर व धर्ममार्गात सुखकर असे कार्य सांगा ज्यामुळे इहलोकी व परलोकीही आपल्या ठिकणीच आमच्या भक्तीची दृढवासना राहील ॥ ११० ॥ हे देवा, दुसऱ्याना नमस्कार करण्याने जो मानभंग होतो त्याच्या भयापासून आपली ही पदवी नेहमी दूर आहे म्हणून ती पदवी आम्हाला प्रत्येक जन्मात प्राप्त होवो ।। १११ ॥ मानाचे खंडन झाल्याने उत्पन्न होणारा जो पराभव व भय यापासून हे योगी दूर असतात. त्यामुळे ते वनात सिंहाबरोबर राहून सुखवृद्धीला प्राप्त होतात ।। ११२ ।। याप्रमाणे परतन्त्रजीवन हे दोषानी भरले आहे असे बोलणा-या त्या राजकुमाराना विनाशरहित मोक्षमार्गात स्थापन करणारे हितोपदेशी भगवान् वृषभजिन याप्रमाणे त्याना उपदेश करू लागले ॥ ११३ ।। Page #278 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-१२१) महापुराण (२६७ महामाना वपुष्मन्तो वयःसत्त्वगुणान्विताः । कथमन्यस्य संवाह्या यूयं भद्रा द्विपा इव ॥ ११४. भगिना किम राज्येन जीवितेन चलेन किम् । किञ्च भो यौवनोन्मादैरैश्वर्यबलदूषितः ॥ ११५ कि बलैर्बलिनां गम्यैः किं हार्यैर्वस्तुवाहनः । तृष्णाग्निबोधनैरेभिः किं धनरिन्धनैरिव ॥ ११६ भुक्त्वापि सुचिरं कालं यैर्न तृप्तिः क्लमः परम् । विषयस्तैरलं मुक्तविषमिश्ररिवाशनैः ॥ ११७ किञ्च भो विषयास्वादः कोऽप्यनास्वादितोऽस्ति वः । स एव पुनरास्वादः किं तेनास्त्याशितंभवः ॥ यत्र शस्त्राणि मित्राणि शत्रवः पुत्रबान्धवाः । कलत्रं सर्वभोगीणा धरा राज्यं धिगीदृशम् ॥ ११९ भुनक्तु नृपशार्दूलो भरतो भरतावनिम् । यावत्पुण्योदयस्तावत्तत्रालं वोऽतितिक्षया ॥ १२० तेनापि त्याज्यमेवेदं राज्यं भडगि यदा तदा । हेतोरशाश्वतस्यास्य युध्यध्वे बत किं मुधा ॥ १२१ महाअभिमानी, उत्तम शरीरधारक, तारुण्य, सामर्थ्य, धैर्य वगैरे गुणानी युक्त असे तुम्ही भद्रजातीचे उत्तम हत्ती जसे कोणाचे ओझे वाहणारे नसतात तसे तुम्ही इतराचे सेवक कसे व्हाल ? ॥ ११४ ।। हे पुत्रानो, त्या नाशवंत राज्याचा काय उपयोग आहे ? व हे जीवित ही चंचल आहे व हा तारुण्याचा उन्माद, ऐश्वर्य व शरीरसामर्थ्य यानी दूषित झाले आहे ॥ ११५ ॥ जी बलवन्ताच्याद्वारे जिंकली जातात अशा सैन्याशी काय प्रयोजन आहे ? जें चोरले जातात असे धन, हत्ती, घोडे आदि पदार्थानी काय प्रयोजन सिद्ध होईल. जसे लाकडे अग्नीला वाढवितात तसे ही धने तृष्णारूपी अग्नीला वाढविणारी आहेत म्हणून यांचा काही आत्मकल्याणासाठी उपयोग नाही ॥ ११६ ।। दीर्घकालपर्यन्त भोगूनही ज्याने आत्म्याला तृप्ति तर होत नाहीच पण उलट खेद परिश्रम मात्र उत्पन्न होतो असे ते भोगपदार्थ विषमिश्रित अन्नाप्रमाणे भोगले असता अधिक दुःखालाच कारण होतात. म्हणून त्याना भोगणे आता पुरे करा. ते भोगपदार्थ सर्व ॥ ११७॥ __ हे वत्सानो, तुम्ही ज्याचा आस्वाद घेतला नाही असा कोणता विषय उरला आहे काय ? तेच तेच पुनः भोगाचे आस्वाद तुम्हाला कशी तृप्ति उत्पन्न करतील बरे ? ॥ ११८ ।। ज्याला शस्त्रे हेच मित्र आहेत, पुत्र आणि बांधव हे शत्रु आहेत व जिचा सर्वजण उपभोग घेतात अशी पृथ्वी ही पत्नी आहे अशा ह्या राज्याला धिक्कार असो ॥ ११९ ॥ हे कुमारानो, तो नृपश्रेष्ठ भरतराजा या भारतखंडाचे जोपर्यन्त त्याचा पुण्योदय आहे तोपर्यन्त रक्षण करो, उपभोग घेवो. तुम्ही मात्र त्याच्याविषयी मनात कोप धरू नका ।। १२० ॥ तो भरत देखिल हे नश्वर राज्य केव्हा तरी त्यागणारच आहे. म्हणून या नाशवंत राज्यासाठी व्यर्थ का बरे लढता? ही खेदाची गोष्ट आहे ॥ १२१ ॥ Page #279 -------------------------------------------------------------------------- ________________ २६८) महापुराण (३४-१२२ तबलं स्पर्द्धया दध्वं यूयं धर्ममहातरोः । दयाकुसममम्लानि यत्तन्मुक्तिफलप्रदम् ॥ १२२ पराराधनदेन्योनं परैराराध्यमेव यत् । तद्वो महाभिमानानां तपोमानाभिरक्षणम् ॥ १२३ दीक्षा रक्षा, गुणा भृत्या दयेयं प्राणवल्लभा। इति ज्यायस्तपो राज्यमिदं श्लाघ्यपरिच्छदम् ॥१२४ इत्याकर्ण्य विभोर्वाक्यं परं निर्वेदमागताः । माहाप्रावाज्यमास्थाय निष्क्रान्तास्ते गृहाद्वनम् ॥ १२५ निर्दिष्टां गुरुणा साक्षादीक्षां नववधूमिव । नवा इव वराः प्राप्य रेजुस्ते युवपार्थिवाः ॥ १२६ या कचग्रहपूर्वेण प्रणयेनातिभूमिगा। तस्याः पाणिद्वयों प्राप्य सुखमन्तरुपागताः ॥ १२७ तपस्तीव्रमथासाद्य ते चकासुर्नपर्षयः । स्वतेजोरुद्ध विश्वाशा ग्रीष्ममशिवो यथा ॥ १२८ तेऽतितीव्रस्तपोयोगैस्तनुभूतां तनुं दधुः। तपोलक्ष्म्या समुत्कीर्णामिव दीक्षां तपोगुणः ॥ १२९ म्हणून आता ही स्पर्धा सोडून द्या व तुम्ही धर्मरूपी महावृक्षाचे कधीही न कोमेजणारे असे दयारूपी पुष्प धारण करा. हे पुष्प तुम्हाला मोक्षरूपी फलाला देणारे आहे ।। १२२ ।। दुसऱ्याची सेवा करण्यात जो दीनपणा येतो तो या तपात नसतो, पण अन्यलोकाना हे तप सेवा करावयास लावते. म्हणून महाअभिमानी असलेल्या तुमच्या मनाचे रक्षण करणारे हे तप आहे असे समजा ।। १२३ ॥ हे तपोराज्य फार मोठे आहे. यात दीक्षा ही तपोराज्याचे रक्षण करणारी आहे. या दीक्षेचे महाव्रतादिक गुण हे सेवक आहेत व प्राणिमात्रावर दया ही प्राणप्रिय पत्नी आहे. याप्रमाणे या तपोराज्याचा प्रशंसनीय परिवार आहे. म्हणून भौतिक राज्यापेक्षा हे फारच मोठे आहे ॥ १२४ ॥ याप्रमाणे आदिभगवंताचे वाक्य ऐकून ते सर्व कुमार अतिशय विरक्त झाले. त्यानी घराचा त्याग केला व सर्व परिग्रहाचा त्याग जीत आहे अशी महामुनिदीक्षा धारण करून ते वनात गेले ॥ १२५ ॥ जणु प्रत्यक्ष पित्याने दाखविलेली नवीन नवरी अशा दीक्षेला धारण करून ते तरुण राजे नूतन नवरदेव आहेत की काय असे शोभू लागले ॥ १२६ ॥ या कुमारांची दीक्षा एखाद्या राजकन्येसारखी वाटत होती. जसे राजकन्या केस धरून मोठ्या प्रेमाने जवळ येते तशी ही दीक्षा देखिल कचग्रह- अर्थात् केशलोचपूर्वक त्यांच्याजवळ आली. याप्रमाणे राजकन्येप्रमाणे शोभणाऱ्या त्या दीक्षेचे दोन हात आपल्या हातात धारण करून आपल्या हृदयात ते अतिशय सुखी झाले ॥ १२७ ॥ यानंतर तीव्र तप त्या कुमारानी धारण केले. ग्रीष्मऋतूत आपल्या तेजाने सर्व दिशा ज्यानी व्यापल्या आहेत असे सूर्याचे किरण जसे शोभतात तसे ते तीव्र तप धारण करून सर्व राजर्षि शोभू लागले ॥ १२८ ॥ ___ अतिशय तीव्र अशा तपश्चरणानी ते कुमार अतिशय कृश शरीराचे झाले. जणु तपश्चरणाच्या प्रशम, वैराग्य आदि गुणांनी तपोलक्ष्मीने त्याना कोरून ठेवले की काय अशी दीक्षा त्यानी धारण केली ॥ १२९ ॥ Page #280 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-१३७) महापुराण (२६९ --- स्थिताः सामायिके वृत्ते जिनकल्पविशेषिते । ते तेपिरे तपस्तीवं ज्ञानशुद्धयुपवृहितम् ॥ १३० वैराग्यस्य परां काष्टामारूढास्ते युवेश्वराः। स्वसाच्चक्रुस्तपोलक्ष्मी राज्यलक्षभ्यामनुत्सुकाः॥१३१ तपोलक्ष्म्या परिष्वक्ता मुक्तिलक्ष्म्यां कृतस्पृहाः। ज्ञानसम्पत्प्रसक्तास्ते राज्यलक्ष्मी विसस्मरुः ॥ द्वादशाङ्गश्रुतस्कन्धमधीत्यते महाधियः । तपोभावनयात्मानमलञ्चक्रुः प्रकृष्टया ॥ १३३ स्वाध्यायेन मनोरोधस्ततोऽक्षाणां विनिर्जयः । इत्याकलय्य ते धीराः स्वाध्यायधियमादधुः ॥१३४ आचाराङ्गन निःशेष साध्वाचारमवेदिषुः । चर्याशुद्धिमतो भेजुरतिक्रमविजिताम् ॥ १३५ ज्ञात्वा सूत्रकृतं सूत्रं निखिलं सूत्रतोऽर्थतः । धर्मक्रियासमाधाने ते दधुः सूत्रधारताम् ॥ १३६ स्थानाध्ययनमध्यायशतैर्गम्भीरमब्धिवत् । विगाह्य तत्त्वरत्नानामयुस्ते भेदमञ्जसा ॥ १३७ जिनकल्प-दीक्षा धारण करून तपश्चरणात तत्पर राहून संघविरहित एकटे विहार करणे याला जिनकल्प म्हणतात. या जिनकल्पसाधूंचे अभेदचारित्र म्हणजे पहिले सामायिक चारित्रच असते. जिनकल्पाचा विशेषपणा दाखविणाऱ्या सामायिकचारित्रात ते कुमारमनि स्थिर झाले व ज्ञानाच्या अतिशय निर्मल झालेले तीव्र तप ते करीत असत ।। १३० ।। राज्यलक्ष्मीत ते अगदीच अनुत्सुक होते. अतिशय विरक्तावस्था धारण करणारे ते तरुण महामुनि वैराग्याच्या परमसीमेवर आरूढ झाले. त्यांनी तपोलक्ष्मीला पूर्ण आपल्या स्वाधीन करून घेतले ।। १३१ ॥ तपोलक्ष्मीने ज्याना गाढ आलिंगिले आहे असे ते कुमारश्रमण मुक्तिलक्ष्मीची इच्छा करीत होते आणि सम्यग्ज्ञानसम्पत्तीमध्ये ते अत्यासक्त झाले आणि राज्यलक्ष्मीला ते पूर्ण विसरले ॥ १३२ ।। ___ हे कुमार मुनि अत्यन्त उत्कृष्टबुद्धीचे धारक होते. त्यांनी द्वादशांग श्रुतस्कंधाचे अध्ययन करून उत्कृष्ट तपोभावनेने आपल्याला सुशोभित केले ॥ १३३ ॥ स्वाध्याय केल्याने मनाला आळा घातला जातो, मन एकाग्र होते, मन ताब्यात राहिले म्हणजे इन्द्रिये जिंकता येतात. असे जाणून त्या धीर मुनिवर्यांनी आपल्या बुद्धीला स्वाध्यायात तत्पर केले ।। १३४ ॥ आचाराङ्गाच्या अध्ययनाने त्यानी सर्व मुनींच्या आचाराना जाणले. त्यामुळे त्यांच्या आचारात अतिचारानी रहित अशी शुद्धि प्राप्त झाली ।। १३५ ।।। त्यानी सर्व सूत्राङ्ग शब्द आणि अर्थानी जाणून घेतले. त्यामुळे ते धर्मक्रिया धारण करण्यात सूत्रधार झाले अर्थात् धर्म-क्रियाना उत्तम पाळण्यात तत्पर झाले ।। १३६ ॥ स्थानाध्ययन नावाचे तिसरे श्रुतांशशास्त्र शेकडो अध्यायाचे असल्यामुळे समुद्राप्रमाणे गंभीर होते. त्यात त्यानी अवगाहन केले व त्यांच्यातील तत्त्वरत्नांचे भेदप्रभेद त्यानी उत्तम रीतीने जाणले ।। १३७ ॥ Page #281 -------------------------------------------------------------------------- ________________ २७०) महापुराण (३४-१३८ समवायाख्यमङ्गं ते समधीत्य सुमेधसः । द्रव्यादिविषयं सम्यक्समवायमयुत्सत ॥ १३८ स्वभ्यस्तात्पञ्चमादङ्गाद्वयाख्याप्रज्ञप्तिसंज्ञितात् । साध्ववादीधरन्धीराः प्रश्नार्थान् विविधानमी॥ ज्ञात्वा धर्मकयां सम्यग्बुद्धवा बोद्धनबोधयन् । धां कथामसंमोहात्ते यथोक्तां महर्षिणा ॥ १४० तेऽधीत्योपासकाध्यायमङ्ग सप्तममूजितम् । निखिलं श्रावकाचारं श्रोतृभ्यः समुपादिशन ॥ १४१ तथान्तकृद्दशादङ्गानमुनीनन्तकृतो दश । तीर्थम्प्रति विदामासुः सोढासह्योपसर्गकान् ॥ १४२ अनुत्तरविमानौपपादिकान्दश तादृशान् । शमिनो नवमादङ्गाद्विदाञ्चक्रुविदांवराः ॥ १४३ प्रश्नव्याकरणात्प्रश्नमुपादाय शरीरिणाम् । सुखदुःखादिसम्प्राप्ति व्याचक्रुस्ते समाहिताः ॥ १४४ विपाकसूत्रनितिसदसत्कर्मपडाक्तयः । बद्धकक्षास्तदुच्छित्तौ तपश्चक्रुरतन्द्रिताः ॥ १४५ दृष्टिवादेन नितिदृष्टिभेदा जिनागमे । ते तेनुः परमां भक्ति परं संवेगमाश्रिताः ॥ १४६ उत्तम बुद्धीच्या ज्ञानी मुनीनी समवायांगाचे अध्ययन करून द्रव्यसमवाय, क्षेत्रसमवाय, कालसमवाय व भावसमवाय यांचे स्वरूप उत्तम जाणून घेतले ।। १३८ ।। व्याख्याप्रज्ञप्ति नामक पाचव्या अंगाचा त्यानी चांगला अभ्यास केला व त्यात केलेल्या प्रश्नाना व त्यांच्या उत्तराना त्यांनी मनाने चांगले धारण केले ॥ १३९ ।। धर्मकथा नावाचे सहावे अंग जाणून व त्याचा चांगला निश्चय करून श्रीजिनेश्वरानी जशी धर्मकथा सांगितली तशी असंमोहाने न चुकता न जाणणाऱ्या लोकाना त्यानी सांगितली ॥ १४० ॥ उपासकाध्ययन नावाचे उत्कृष्ट सातवे अंग ज्यात श्रावकाच्या आचारांचे वर्णन आहे ते सर्व श्रोत्याना त्यानी सांगितले ।। १४१ ॥ अन्तकृत्दशनामक अंगापासून त्यानी प्रत्येक तीर्थंकराच्या तीर्थात ज्यानी भयंकर उपसर्ग सहन करून मोक्ष प्राप्ति करून घेतली त्यांची चरित्रे वणिली आहेत त्यांचे स्वरूप त्यानी जाणून घेतले ।। १४२ ।। ___ अनुत्तरोपपादिकदश या नवव्या अंगात प्रत्येक तीर्थात दहा दहा यतीनी दारुण उपसर्ग सहन करून पंचानुत्तरात जन्म धारण केला. त्यांची चरित्रे या मुनिवर्यानी जाणिली।। १४३ ।। प्रश्नव्याकरण नामक दहाव्या अंगात प्रश्न ग्रहण करून प्राण्याना सुखदुःखादिकांची कशी प्राप्ति होते याचे विवेचन ते मुनिवर्य एकाग्रतेने वर्णन करीत असत ।। १४४ ।। विपाकसूत्रनामक अंगापासून शुभ व अशुभ कर्मांच्या समूहाचे स्वरूप त्यानी जाणून घेतले व त्या कर्मांचा नाश करण्यासाठी त्यानी कंबर बांधून निरलस होऊन तप केले ॥ १४५ ॥ दृष्टिवाद नावाच्या अंगाने त्यानी जिनागमात मिथ्यामताचे जे भेद सांगितले आहेत ते त्यानी उत्तम रीतीने जाणले व उत्कृष्ट वैराग्याचा आश्रय करून जिनागमात त्यानी उत्कृष्ट भक्ति ठेवली ।। १४६ ।। Page #282 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-१५४) तदन्तर्गत निःशेषश्रुततत्त्वावधारिणः । चतुर्दशमहाविद्यास्थानान्यध्येषत क्रमात् ॥ १४७ ततोऽमी श्रुत निःशेषश्रुतार्थाः श्रुतचक्षुषः । श्रुतार्थ भावनोत्कर्षाद्दधुः शुद्धि तपोविधौ ॥ १४८ वाग्देव्या सममालापो मया मौनमनारतम् । इतीर्ष्यतीव सन्तापं व्यधत्तेषु तपःक्रिया ॥ १४९ तनुतापमसह्यं ते सहमाना मनस्विनः । बाह्यमाध्यात्मिकं चोग्रं तपः सुचिरमाचरन् ॥ १५० ग्रीष्मेर्ककरसन्तापं सहमानाः सुदुःसहम् । ते भेजुरातपस्थानमारूढगिरिमस्तकाः ॥ १५१ शिलातलेषु तप्तेषु निवेशितपदद्वयाः । प्रलम्बित भुजास्तस्थुगियं ग्रग्रावगोचरे ।। १५२ तप्तपांसुचिता भूमिर्वावदग्धा वनस्थली । याता जलाशयाः शोषं दिशो घूमान्धकारिताः ॥ १५३ इत्यत्युग्रतरे ग्रीष्मे सम्प्लुष्टगिरिकानने । तस्थुरातपयोगेन ते सोढ़जरठातपाः ॥ १५४ महापुराण या दृष्टिवादात अन्तर्भूत अशा सर्व श्रुतज्ञानाच्या स्वरूपाचा त्यानी चांगला निश्चय केला व त्यामध्येच अन्तर्भूत असलेली चौदा जी उत्पादपूर्वादिपूर्वविद्यास्थाने त्यांचे क्रमानें त्यानी स्वरूप जाणले ।। १४७ ।। (२७१ श्रुतज्ञानरूपी डोळे ज्याना आहेत व ज्यानी सम्पूर्ण श्रुतज्ञानाचे विषय असलेल्या पदार्थाचे स्वरूप ऐकले आहे. अशा कुमारमुनींच्या ठिकाणी श्रुत व त्याच्या अर्थाच्या चिन्तनाचा उत्कर्ष झाल्यामुळे त्यानी तपश्चरणात उत्तम शुद्धि-निर्मलता धारण केली ॥ १४८ ॥ हे कुमारमुनि वाग्देवीबरोबर बोलतात आणि माझ्याशी मात्र नेहमी मौन धारण करतात म्हणून तपःक्रियेला ईर्ष्या उत्पन्न झाली व ती त्या मुनीना सन्तप्त करू लागली. अर्थात् श्रुतज्ञानाचे साहाय्याने त्यांचे तपश्चरण अधिक वाढले ।। १४९ ॥ त्या धैर्यशाली मुनीनी असह्य असा शरीर सन्ताप सहन केला व त्यानी बाह्य अनशनादि तपे व अन्तरंग प्रायश्चित्त विनयादिक तीव्र तपे दीर्घकालपर्यन्त आचरली ।। १५० ।। ग्रीष्मर्तुमध्ये सूर्याच्या किरणांचा अत्यन्त असह्य ताप सहन करणारे ते कुमारमुनि पर्वताच्या शिखरावर चढून आतापनयोग धारण करीत असत ॥ १५१ ॥ पर्वताच्या शिखराग्रावर असलेल्या दगडांच्या प्रदेशातील तापलेल्या शिलातलावर ज्यानी आपले दोन पाय ठेवले आहेत व ज्यानी आपले दोन हात लोंबते ठेवले आहेत असे ते मुनि उभा राहून तप करीत असत ।। १५२ ॥ उन्हाळ्याच्या दिवसात सर्व ठिकाणी जमीन तापलेल्या धुळीनी भरलेली होती व वनप्रदेश अग्नीने दग्ध झालेले होते, सर्व तळी वगैरे पाण्याचे प्रदेश शुष्क झाले, जलरहित झाले होते आणि सर्व दिशा धुरानी अंधारयुक्त बनल्या होत्या ।। १५३ ।। याप्रमाणे अत्यन्त तीव्र अशा उन्हाळयात पर्वतावरील जंगले सर्व जळून खाक झाली होती. अशावेळी ज्यानीं तीव्र उन्हाचा संताप सहन केला आहे असे होऊन हे मुनि आतापनयोगाने उभा राहत असत. आत्मध्यानात तत्पर राहत असत ।। १५४ ।। Page #283 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३४-१५५ मेघान्धकारिताशेषदिक्चक्रे जलदागमे । योगिनो गमयन्ति स्म तरुमूलेषु शर्वरीः ॥ १५५ मुसलस्थूलधाराभिर्वर्षत्सु जलवाहिषु । निशामनैषुरव्यथ्या वार्षिकीं ते महर्षयः ॥ १५६ ध्यान गर्भगृहान्तस्था धृतिप्रावारसंवृताः । सहन्ते स्म महासत्त्वास्ते घनाघनदुर्दिनम् ॥ १५७ हिमानीपरिक्लिष्टां तनुर्याष्ट हिमागमे । दधुरभ्रावकाशेषु शयाना मौनमास्थिताः ।। १५८ अनग्नमुषिता एव नग्नास्तेऽनग्निसेविनः । घृतिसंर्वामतैरङ्गः सेहिरे हिममारुतान् ॥ १५९ हिमानीषु त्रियामासु स्थगितास्ते हिमोच्चयैः । प्रवारितैरिवाङ्गः स्वैर्धीराः स्वयमशेरत ॥ १६० त्रिकालविषयं योगमास्थायैवं दुरुद्वहम् । सुचिरं धारयन्ति स्म धीरास्ते धृतियोगतः ॥ १६१ दधानास्ते तपस्तापमन्तर्दीप्तं दुरासदम् । रेजस्तरङगितैरङ्गः प्रायोऽनुकृतवार्द्धयः ।। १६२ २७२) महापुराण जेव्हा पावसाळयाचे आगमन होई तेव्हा सर्व दिशामंडल मेघानी अन्धकारयुक्त होत असे. त्यावेळी हे मुनिराज झाडाच्या तळी बसून आत्मध्यानात रात्री घालवीत असत ।। १५५ ॥ जेव्हा मेघ मुसळाप्रमाणे स्थूल जलधारानी वृष्टि करीत असत त्यावेळी ते महर्षि पीडारहित होऊन पावसाळ्याच्या रात्री घालवीत असत ।। १५६ ॥ ध्यानरूपी गर्भगृहात माजघरात ते महाशक्तिशाली मुनि धैर्यरूपी पांघरुणाने वेष्टिलेले होऊन पावसाळयाच्या ढगानी व्यापिलेले दिवस सहन करीत असत ।। १५७ ।। उघड्या मैदानात झोपणारे व मौन धारण केलेले असे ते मुनि हिवाळयात बर्फाच्या कणानी पीडित अशा शरीररूपी काठीला धारण करीत असत. ते नग्न मुनि अग्नीचे सेवन करीत नसत. धैर्यरूपी आवरणानी आच्छादित झालेल्या आपल्या शरीराच्या अवयवानी जणु नग्न नसलेले असे होत्साते बर्फसहित कणानी वाहणाऱ्या अशा वाऱ्यानी होणारे कष्ट सहन करीत असत ।। १५८-१५९ ।। हिवाळ्याच्या अनेक रात्रीमध्ये ते मुनि बर्फाच्या समूहाने आच्छादित होत असत. त्यावेळी जणु ते वस्त्रानी झाकलेल्या आपल्या अवयवानी युक्त आहेत असे वाटत असे ते मुनि धैर्य धारण करून झोपत असत ।। १६० ॥ याप्रमाणे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन कालचे जे आतापन, तरूमूलवास आणि अवकाश योग हे धारण करण्यास फार कठिण आहेत पण या मुनीनी ते दीर्घकालपर्यन्त धारण केले. कारण हे मुनि अतिशय धैर्यवान होते आणि ते योग त्यानी धैर्यामुळे धारण केले ।। १६१ ।। आत प्रज्वलित झालेले व इतराना प्राप्त होण्यास कठिण असलेले असे तपाचे तेज धारण करणारे ते मुनि तरङगाप्रमाणे झळकणारे आपल्या अंगानी अवयवानी तरंग युक्त समुद्राचे अनुकरण जणु करीत आहेत असे शोभले ।। १६२ ।। Page #284 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-१६९) महापुराण (२७३ ते स्वभुक्तोज्झितं भयो नैच्छन्भोगपरिच्छदम् । निर्भुक्तमात्मनिःसारं मन्यमाना मनीषिणः॥१६३ फेनोमिहिमसन्ध्याभ्रचलं जीवितमङ्गिनाम् । मन्वाना दृढमासक्ति भेजुस्ते पथि शाश्वते ॥ १६४ संसारावासनिविण्णा गृहावासाद्विनिःसृताः । जैने मार्गे विमुक्त्यङ्ग ते परां धृतिमादधुः ॥ १६५ इतोऽन्यदुत्तरं नास्तीत्यारूढ़दृढभावनाः । तेऽमी मनोवचःकायैः श्रद्दधुर्गुरुशासनम् ॥ १६६ तेऽनुरक्ता जिनप्रोक्ते सूक्ते धर्मे सनातने । उत्तिष्ठन्ते स्म मुक्त्यर्थ बद्धकक्षामुमुक्षवः ॥ १६७ संवेगजनितश्रद्धाः शुद्ध वर्त्मन्यनुत्तरे। दुरापां भावयामासुस्ते महावतभावनाम् ॥ १६८ अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्य विमुक्तताम् । राज्यभोजनषष्ठानि व्रतान्येतान्यभावयन् ॥ १६९ -------------- ते विवेकी विचारवंत मुनि भोगून त्यागिलेल्या भोगोपभोगाच्या पदार्थाना उपभोगलेल्या पुष्पमालेप्रमाणे निःसार मानीत असत. म्हणून त्यानी पुनः त्यांची इच्छा कधीही केली नाही ॥ १६३ ॥ फेस, पाण्याच्या लाटा, गवतावर पडणारे दहिवराचे थेंब व संध्याकाळी जमलेले ढग हे जसे चंचल नाशवंत आहेत तसे हे प्राण्याचे जीवित चंचल नाशवंत आहे असे हे मुनि मानीत असत आणि त्यामुळे अविनाशी अशा मोक्षमार्गात-रत्नत्रयमार्गात ते अतिशय दृढपणे आसक्त झाले ।। १६४ ।। ते मुनि संसारात परिभ्रमण करण्यापासून विरक्त झाले होते व घरात राहण्याचा त्यानी त्याग केला होता व मोक्ष प्राप्त करून देण्यास कारण अशा भगवान् वृषभदेवानी सांगितलेल्या जैनमार्गात- जिनप्रणीतचारित्रात त्यानी फार संतोष मानला, त्यात ते फार दृढ राहिले ॥ १६५ ॥ भगवंत वृषभेश्वरानी सांगितलेल्या मोक्षमार्गाशिवाय दुसरा कोणताही मार्ग उत्कृष्ट नाही अशी त्या मुनींची दृढ भावना झाली व त्या भावनेत ते दृढ स्थिर राहिले. आदिभगवंतानी सांगितलेल्या मोक्षमार्गावर त्यानी मन, वचन व कायेने दृढश्रद्धान ठेविले ॥ १६६ ।। जिनेन्द्र भगवंतानी सांगितलेला आणि अनादिकालापासून चालत आलेला अशा दोषरहित जिनधर्मात ते मुनिराज मोक्षासाठी दृढतेने तत्पर झाले ॥ १६७ ।। त्याना संसारापासून भय उत्पन्न झाल्यामुळे जिनधर्मावर श्रद्धा उत्पन्न झाली आहे, ज्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही अशा निर्दोष मुक्तिमार्गात जिची प्राप्ति होणे कठिण आहे अशा महाव्रतांच्या भावना ते भावू लागले ।। १६८ ।। अहिंसा, सत्यभाषण करणे, चोरी न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे व बाह्याभ्यंतर परिग्रहांचा त्याग ही पाच महाव्रते आणि सहावे रात्रिभोजनत्याग, अणुव्रत, अशा सहा व्रतांचे पालन ते निरन्तर करीत होते ॥ ॥ १६९ ॥ म. ३५ Page #285 -------------------------------------------------------------------------- ________________ २७४) महापुराण (३४-१७० यावज्जीवं व्रतेष्वेष ते दृढीकृतसङ्गराः । त्रिविधेन प्रतिक्रान्तदोषाः शुद्धि परां दधुः ॥ १७० सर्वारम्भविनिर्मुक्ता निर्ममा निष्परिग्रहाः । मार्गमाराधयञ्जनं व्युत्सृष्टतनुयष्टयः ॥ १७१ सर्वोपधिविनिर्मुक्ताः स्थिता धर्मे जिनोदिते । नैच्छन्बालाग्रमानं च द्विधाम्नातं परिग्रहम् ॥ १७२ निर्मूस्तेि स्वदेहेऽपि धर्मवद्मनि सुस्थिताः । सन्तोषभावनापास्ततृष्णाः सन्तो विजहिरे।। १७३ वसन्ति स्मानिकेतास्ते यत्रास्तं भानुमानितः । तत्रैकत्र क्वचिद्देशे नै सङग्यं परमास्थिताः ॥ १७४ विविक्तकान्तसेवित्वाद्ग्रामेष्वेकाहवासिनः । पुरेष्वपि न पञ्चाहात्परं तस्थु पर्षयः ॥ १७५ शून्यागारश्मशानादिविविक्तालयगोचराः। ते वीरवसतीभेंजुरुज्झिताः सप्तभिर्भयैः ॥ १७६ तेऽभ्यनन्दन्महासत्वाः पाकसत्त्वैरधिष्ठिताः। गिर्यग्रकन्दरारण्यवसतीः प्रतिवासरम् ॥ १७७ जोपर्यन्त जीवन आहे तोपर्यन्त या व्रतांचे पालन करण्याची त्यांची प्रतिज्ञा दृढ होती व या व्रतात दोष उत्पन्न झाले तर मनाने, वचनाने व शरीराने त्या दोषांचे प्रतिक्रमण करीत असत. त्यामुळे त्यांच्या व्रतात अतिशय शुद्धि उत्पन्न झाली ॥ १७० ॥ ज्यात हिंसा होते अशा सर्व कार्यापासून विरक्त झालेले, कोणत्याही पदार्थात ज्याना ममत्व नाही असे बाह्याभ्यन्तरपरिग्रहांचे त्यागी आणि देहावरच्या उपेक्षाबुद्धीने युक्त असलेले ते मुनि श्रीजिनमार्गाचे सेवन-आराधन करण्यात तत्पर राहिले ॥ १७१ ॥ ते मुनिराज सर्व प्रकारच्या रागद्वेषादि उपाधीपासून मुक्त होते. जिनधर्माचरणात तत्पर राहिले म्हणून बाह्य व अन्तरंग अशा दोन्ही प्रकारच्या परिग्रहांची ते केशाग्रमात्रही इच्छा करीत नसत ॥ १७२ ।। त्यांचे आपल्या देहावरही ममत्व नव्हते आणि धर्ममार्गात दृढ स्थिर होते. सन्तोषाच्या चिन्तनाने त्यानी आपल्या हृदयातून लोभाला काढून टाकले होते. याप्रमाणे ते विहार करीत असत ।। १७३ ॥ ते मुनि जेथे सूर्यास्त होईल त्या ठिकाणी राहत असत. उत्कृष्ट परिग्रहत्यागवतात नेहमी स्थिर राहणारे गृहत्यागी असे ते मुनि जेथे सूर्यास्त होईल तेथील एका कोणत्याही वनादिक प्रदेशात राहत असत ।। १७४ ।। लोकसंसर्गरहित अशा एकान्त स्थानी राहणारे ते राजर्षि गावात एक दिवसच राहत असत व नगरात देखिल पाच दिवसापेक्षा अधिक दिवस ते राहत नसत ॥ १७५ ॥ इहलोकभय, परलोकभय, आकस्मिकभय, अत्राणभय, अगुप्तिभय, मरणभय, वेदनाभय अशा सात भयानी रहित असे ते मुनि शून्य घर, श्मशानादिक एकान्तप्रदेशात ज्याना वीरवसती म्हणतात तेथे राहत असत ।। १७६ ॥ हिंस्रप्राणी जेथे राहतात अशी पर्वताची शिखरे गुहा व अरण्य या ठिकाणी ते महाधैर्यशाली मुनि राहत असत. ही स्थाने चांगली आहेत असे ते मानीत असत ।। १७७ ।। Page #286 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-१८६) महापुराण सिंहर्क्षवृकशार्दूलतरक्ष्वादिनिषेविते । वनान्ते ते वसन्ति स्म तदारसितभीषणे ॥ १७८ स्फुरत्परुषशार्दूलगजितप्रतिनिःस्वनैः । आगुञ्जत्पर्वतप्रान्ते ते स्म तिष्ठन्त्य साध्वसाः ॥ १७९ कण्ठीरव किशोराणां कठिनैः कण्ठनिःस्वनैः । प्रोन्नादिनि वने ते स्म निवसन्त्यस्तभीतयः ॥ १८० नृत्यत्कबन्धपर्यन्तसञ्चरद्डाकिणीगणाः । प्रचण्डकौशिकध्वाननिरुद्धोपान्तकाननाः ॥ १८१ शिवानामशिवैर्ध्वाने राद्वाखिलदिङ्मुखाः । महा पितृवनोद्देशा निशास्वेभिः सिषेविरे ॥ १८२ सिंहा इव नृसिहास्ते तस्थुगिरिगुहाशयाः । जिनोक्त्यनुगतैः स्वान्तैरनुद्विग्नैः समाहिताः ॥ १८३ पाकसत्त्वशताकीर्णां वनभूमि भयानकाम् । तेऽध्यवात्सुस्त मित्रासु निशासु ध्यानमास्थिताः ॥ १८४ न्यषेवन्त वनोद्देशान्निषेव्यान्यनदन्तिभिः । ते तद्दन्ताग्रनिभिन्नतरुस्थपुटितान्तरान् ॥ १८५ वनेषु वनमातङ्गवृंहितप्रतिनादिनी: । दरीस्तेऽध्यूषुरा रुष्ट राक्रान्ताः करिशत्रुभिः ॥ १८६ सिंह, अस्वल, लांडगा, वाघ, तरस आदिक हिंस्र प्राणी जेथे राहतात व त्यांच्या गर्जनानी जे अतिशय भय उत्पन्न करिते अशा वनात ते मुनि निवास करित असत ।। १७८ ।। (२१५ उत्तरोत्तर स्फुरत असलेल्या कर्कश अशा ज्या व्याघ्रांच्या डरकाळ्या त्यांच्या प्रतिध्वनीनी जेथे पर्वताचे प्रदेश शब्दमय झाले आहेत अशा ठिकाणी भयरहित होऊन ते निवास करीत असत ॥ १७९ ॥ सिंहाच्या बच्चांच्या कठोर अशा गलगर्जनानीं जे प्रतिध्वनियुक्त झाले आहे अशा वनात ते मुनि निर्भय होऊन राहत असत ॥ १८० ॥ शिररहित घडे जेथे नाचत आहेत व त्याच्याजवळ जेथे डाकिनींचे समूह फिरत आहेत, अधिक भयदायक घुबडांच्या धूत्कारानी जे वनप्रदेश घुमत आहेत, कोल्ह्यांचे अभद्र ज्या कोल्हे कुई - ( शब्द ) त्यानी जेथिल सर्व दिशांची मुखे व्याप्त झाली आहेत अशी जी महापितृवनेमोठ्या ज्या स्मशानभूमि तेथे हे मुनिराज राहत असत ।। १८१-१८२ ॥ ते नरश्रेष्ठ मुनि सिंहाप्रमाणे निर्भय होऊन पर्वताच्या गुहामध्ये राहत असत आणि त्यांची मने जिनोपदेशाला अनुसरणारी होती, निर्भय होती व आत्मस्वरूपात तत्पर राहत होती ।। १८३ ।। दाट अंधकाराच्या अनेक रात्री शेकडो हिंस्र प्राण्यानी व्याप्त अशा भयंकर वनभूमीमध्ये ध्यानात एकाग्र चित्त होऊन ते मुनि राहत असत ।। १८४ । जेथे रानटी हत्ती निवास करितात व जेथे वृक्षानी जेथील वनप्रदेश उंच सखल झाला आहे, होते ॥ १८५ ॥ त्यांच्या दातांच्या अग्रानी तुटलेले अशा अशा वनाचे प्रदेश त्या मुनिवर्यानी सेविले रानटी हत्तींच्या चीत्कारानी जे प्रतिध्वनियुक्त होत असत व रागावलेल्या सिंहानी व्याप्त अशा वनातील अनेक प्रदेशात ते मुनि निवास करीत होते ।। १८६ ॥ Page #287 -------------------------------------------------------------------------- ________________ २७६) महापुराण (३४-१८७ स्वाध्याययोगसंसक्ता न स्वपन्ति स्म रात्रिषु । सूत्रार्थभावनोद्युक्ता जागरूकाः सदाप्यमी ॥१८७ पल्यथेन निषण्णास्ते वीरासनजुषोऽथवा । शयाना वैकपार्वेन शर्वरीरत्यवाहयन् ॥ १८८ त्यक्तोपधिभरा धीरा व्युत्सृष्टाङ्गा निरम्वराः। नैष्किञ्चन्यविशुद्धास्ते मृक्तिमार्गममार्गयन् ॥१८९ निाक्षेपा निराकाडक्षा वायुवीथ्यनुगामिनः । व्यहरन्वसुधामेनां सग्रामनगराकराम् ॥ १९० विहरन्तो महीं कृत्स्ना ते कस्याप्यनभिद्रुहः । मातृकल्पा दयालुत्वात्पुत्रकल्पेषु देहिषु ॥ १९१ जीवाजीवविभागज्ञा ज्ञानोद्योतस्फुरदृशः । सावधं परिजन्हुस्ते प्रासुकावसथाशनाः ॥ १९२ स्याद्यत् किञ्चिच्च सावधंतत्सर्वं त्रिविधेन ते । रत्नत्रितयशुद्धयर्थ यावज्जीवमवर्जयन् ॥ १९३ प्रसान्हरितकायांश्च पृथिव्यप्पवनानलान् । जीवकायानपायेभ्यस्ते स्म रक्षन्ति यत्नतः ॥ १९४ ।। ते मुनिवर्य स्वाध्याय व ध्यानात तत्पर राहत असत. त्यामुळे रात्री ते झोपत नसत. आचारांगादि सूत्रार्थाच्या चिन्तनात तत्पर राहत असत. त्यामुळे नेहमी जागरुक असत ॥१८७।। पल्यङ्कासनाने बसून किंवा वीरासनाने युक्त होऊन अथवा शरीराच्या एका बाजूने झोपून ते मुनि सर्व रात्री घालवीत असत ।। १८८ ॥ ज्यानी परिग्रह त्यागले आहेत, जे धैर्यवन्त, शरीरावरील ममत्वाचा त्याग केलेले, वस्त्ररहित, परिग्रहाच्या त्यागामुळे परिणामात अतिशय विमलता धारण केलेल्या त्या मुनीनी मुक्तीच्या मार्गाचा शोध करणे सतत चालू ठेवले ।। १८९ ॥ __ कशाचीही ज्याना अपेक्षा राहिली नाही असे निरिच्छ, आकाशपंक्तीचे अनुसरण करणारे अर्थात् आकाशाप्रमाणे निर्लेप राहणारे असे ते मुनि गाव, शहर यानी युक्त या पृथ्वीवर विहार करीत असत ॥ १९० ॥ कोणाशीही द्वेष न करणारे व दयाळू असल्यामुळे पुत्रासारखे अशा सर्व प्राणिमात्रावर मातेप्रमाणे असलेले ते यतिराज सम्पूर्ण पृथ्वीवर पर्यटन करीत असत ।। १९१ ॥ जीवद्रव्य व अजीवद्रव्य यांची चांगली माहिती ज्याना आहे आणि ज्ञानाच्या प्रकाशाने ज्यांचा सम्यग्दर्शनगुण निर्मल झाला आहे व ज्यांचे निवासस्थान व अन्न प्रासुक आहेत अर्थात् वसतिका व आहार सर्व दोषानी रहित आहेत अशा त्या मुनिवरानी पापसहित क्रियांचा सर्वथा त्याग केला होता ।। १९२ ।। आपल्या रत्नत्रयाची शुद्धि व्हावी म्हणून जे कांहीं पापयुक्त असेल ते सर्व ते मुनि मनवचनकायेने रत्नत्रयाच्या शुद्धीसाठी आजन्म त्यागीत असत ।। १९३ ॥ द्वीन्द्रियादिक त्रसजीव, वनस्पतिकायिकजीव, पृथ्वी, जल, वायु, अग्नि, अशा षटकाय जीवाना ते मुनि त्याना आपणापासून बाधा होऊ नये म्हणून त्यांचे यत्नाने रक्षण करीत असत ।। १९४॥ Page #288 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-२०२) महापुराण (२७७ अदीनमनसः शान्ताः परमोपेक्षयान्विता।। मुक्तिसाध्यास्त्रिभिर्गुप्ताः कामभोगेष्वविस्मिताः ॥१९५ जिनाज्ञानुगताः शश्वत्संसारोद्विग्नमानसाः । गर्भवासजरामृत्युपरिवर्तनभीरवः ॥ १९६ श्रुतज्ञानदृशो दृष्टपरमार्था विचक्षणाः । ज्ञानदीपिकया साक्षाच्चक्रुस्ते पदमक्षरम् ॥ १९७ ते चिरं भावयन्ति स्म सन्मार्ग मुक्तिसाधनम् । परदत्तविशुद्धान्नभोजिनः पाणिपात्रकाः ॥ १९८ शङकिताभिहतोद्दिष्टऋयक्रीतादिलक्षणम् । सूत्रे निषिद्धमाहारं नैच्छन्प्राणात्ययेऽपि ते ॥ १९९ भिक्षां नियतवेलायां गृहपङक्त्यनतिक्रमात् । शुद्धामाददिरे धीरा मुनिवृत्ती समाहिताः ॥ २०० शीतमुष्णं विरूक्षं च स्निग्धं सलवणं न वा । तनुस्थित्यर्थमाहारमाजन्हुस्ते गतस्पृहाः ॥२०१ अक्षम्रक्षणमात्रं ते प्राणभृत्य विषष्वणुः । धर्मार्थमेव च प्राणान्धारश्यन्ति स्म केवलम् ॥ २०२ ___ त्या मुनींच्या मनात दीनपणा नव्हता, ते शान्त व परमोपेक्षा युक्त, रागद्वेषानी रहित होते, मोक्ष हेच त्यांचे साध्य होते. मनवचनकायेला त्यानी आपल्या ताब्यात ठेवले होते आणि कामभोगाविषयी कधीही त्यांच्या मनात विस्मय- आश्चर्य वाटत नसे ॥ १९५ ॥ जिनेश्वराच्या आज्ञेला अनुसरून वागणारे, ज्यांच्या मनात संसाराचे भय राहत आहे असे, गर्भात राहणे, जन्मणे, मरणे यांच्या फेन्यापासून भिणारे असे ते मुनि होते ॥ १९६ ॥ श्रुतज्ञान- द्वादशांग श्रुतज्ञान हे ज्याना डोळे आहेत व ज्यानी परमार्थाचे स्वरूप जाणले आहे, जे चतुर आहेत असे मुनि ज्ञानरूपी दिव्याने अविनाशी असे स्थान- परमात्मपद साक्षात् पाहू लागले ॥ १९७ ॥ दुसऱ्यानी दिलेल्या शुद्ध अन्नाचाच आहार घेणारे, हात हेच पात्र ज्यांचे आहे असे ते मुनि रत्नत्रयच सन्मार्ग आहे व तोच मुक्तीचे साधन आहे असे दीर्घकालापासून चिन्तन करीत असत ॥ १९८ ॥ ____ जो शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे असा संशय ज्याविषयी येतो त्याला शंकित आहार म्हणतात, अभिहृत- जो आहार कोणाकडून तरी आणविलेला आहे तो अभिहृत होय. जो ज्याना द्यावयाचा त्यांच्यासाठीच बनविलेला आहे त्याला उद्दिष्टाहार म्हणतात व विकत आणलेला आहार तो क्रयक्रीत होय. इत्यादिक आहार आचारांगसूत्रात निषिद्ध मानले आहेत. असले आहार प्राण जाण्याची वेळ आली तरी ते मुनि इच्छित नसत ॥ १९९ ।। मुनिराजांचे चारित्र पालनात तत्पर असे ते धीर मुनि आहाराच्या वेळी गृहपंक्तीला अनुसरून जो शुद्ध आहार मिळत असे तोच घेत असत ।। २०० ॥ ___ ज्यांची अभिलाषा नष्ट झाली आहे असे मुनिराज शरीर टिकावे म्हणून थंड, उष्ण, रूक्ष, स्निग्ध, मीठ घातलेला किंवा अळणी जसा मिळेल तसा आहार घेत असत ।। २०१ ॥ गाडीच्या कण्याला जसे वंगण लावतात तसे ते मुनि प्राण धारण करण्याकरिता अल्प आहार घेत असत व त्यानी केवळ धर्मासाठीच प्राण धारण केले होते ॥ २०२॥ Page #289 -------------------------------------------------------------------------- ________________ २७८) महापुराण (२५-९६ न तुष्यन्ति स्म ते लब्धे व्यषीदन्नाप्यलब्धितः । मन्यमानास्तपोलाभमधिकं धूतकल्मषाः ॥ २०३ स्तुति निन्दा सुखं दुःखं तथा मानं विमानताभ् । समभावेन तेऽपश्यन्सर्वत्र समशिनः ॥ २०४ वाचंयमत्वमास्थाय चरन्तो गोचराधिनः । निर्यान्ति स्माप्यलाभेन नाभञ्जन्मौनसङ्गरम् ॥ २०५ महोपवासम्लानाङ्गा यतन्ते स्म तनस्थितौ । तत्राप्यशुद्धमाहारं नैषिषुर्मनसाप्यमी ॥ २०६ गोचराग्रगता योग्यं भुक्त्वान्नमविलम्बितम् । प्रत्याख्याय पुनर्वीरा निर्ययुस्ते तपोवनम् ॥ २०७ तपस्तापतनूभूततनवोऽपि मुनीश्वराः । अनुबद्धात्तपोयोगान्नारेमुर्दृढ़सङ्गराः ॥ २०८ तीवं तपस्यतां तेषां गात्रेषु श्लथताभवत् । प्रतिज्ञा या तु सद्धयानसिद्धावशिथिलैव सा ॥ २०९ नाभूत्परीषहैर्भङ्गस्तेषां चिरमुपोषुषाम् । गताः परीषहा एव भडगं तान्जेतुमक्षमाः ।। २१० ते मुनि आहार मिळाला असता आनंदित होत नसत व न मिळाला असता खिन्नही होत नसत. ज्यांनी पातक नाहीसे केले अशा त्यानी आहार नाही मिळणे हे अधिक तपोलाभ होण्यास कारण आहे असे मानले ॥ २०३ ॥ ज्यांची दृष्टि सर्वत्र समदर्शी झाली आहे असे ते मुनि स्तुति, निंदा, सुख, दुःख, मान व अपमान यांना समभावाने पाहत असत ।। २०४ ।। आहाराची इच्छा करणारे ते मुनि भाषणाला बंधन घालून आहारासाठी निघत असत व आहार न मिळाल्यास आपल्या मौनाची प्रतिज्ञा सोडीत नसत ।। २०५ ॥ अनेक दिवसांचे उपवासामुळे ज्यांचे शरीर म्लान झाले आहे असे ते मुनि देह रक्षणाकरिता यत्न करीत असत, आहार घेत असत. पण मनाने देखिल अशुद्ध आहाराची इच्छा करीत नसत. आगमदृष्टीने शुद्ध आहार मिळाला तरच ते घेत असत ॥ २०६॥ गोचरीवृत्ति धारण करणाऱ्या मुनिवर्गात श्रेष्ठ असे ते मुनि योग्य आहार घेऊन शीघ्र प्रत्याख्यान करीत असत अर्थात् दुसरे दिवशी आहार मिळेपर्यन्त मला आहाराचा त्याग आहे असे प्रत्याख्यान ते करीत असत व असे प्रत्याख्यान करून ते मुनि तपोवनाकडे जात असत ॥ २०७॥ तपश्चरणाच्या तापाने ज्यांचे शरीर कृश झाले होते असेही ते मुनिराज दृढ प्रतिज्ञापालक असल्यामुळे आपण प्रारंभिलेल्या तपापासून विराम पावत नसत ।। २०८ ॥ तीव्र तप करणाऱ्या त्या मुनिवर्याच्या शरीरात शिथिलता आलेली होती. पण उत्कृष्ट तपश्चरणाची सिद्धि प्राप्त करून घ्यावी अशी जी त्यांची प्रतिज्ञा होती ती मात्र ढिली झाली नाही, ती दृढच राहिली ॥ २०९ ।। दीर्घकालपर्यन्त उपवास करणाऱ्या त्या कुमारश्रमणांचा भूक, तहान वगैरे परिषहानी पराभव केला नाही पण ते परिषहच त्याना जिंकण्यासाठी असमर्थ होऊन पराभूत-पराजित झाले ॥ २१० ॥ Page #290 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-२१८) महापुराण (२७९ सपस्तनूनपात्तापादभूतेषां परा द्युतिः । निष्टप्तस्य सुवर्णस्य दीप्तिर्न व्यतिरेकिणी ॥ २११ तपोऽग्नितप्तदीप्ताङ्गास्तेऽन्तःशुद्धि परां दधुः। तप्तायां तनुमूषायां शुद्धचत्यात्मा हि हेमवत् ॥२१२ त्वगस्थिमात्रदेहास्ते ध्यानशुद्धिमधुस्तराम् । सर्वं हि परिकर्मेदं बाह्यमध्यात्मशुद्धये ॥ २१३ । योगजाः सिद्धयस्तेषामणिमादिगुणर्द्धयः । प्रादुरासन्विशुद्धं हि तपः सूते महत्फलम् ॥ २१४ तपोमयः प्रणीतोऽग्निः कर्माण्याहुतयोऽभवन् । विधिज्ञास्ते सुयज्वानो मन्त्रः स्वायम्भुवं वचः॥२१५ महाध्वरपतिर्देवो वृषभो दक्षिणा दया। फलं कामितसंसिद्धिरपवर्गः क्रियावधिः ॥ २१६ इतीमामार्षभीमिष्टिमभिसन्धाय तेऽञ्जसा । प्रावीवृतन्ननूचानास्तपोयज्ञमनुत्तरम् ॥ २१७ इत्यमूमनगाराणां परां सङ्गीर्य भावनाम् । ते तथा संवहन्ति स्म निसर्गोऽयं महीयसाम् ॥ २१८ तपरूपी अग्नीच्या तापाने त्यांच्या शरीरावर अत्युत्कृष्ट कान्ति-तेज प्रकट झाली. बरोबरच आहे की, पुष्कळ तापविलेल्या सोन्याची कान्ति कधी नाश पावत नाही ॥ २११ ।। तपरूपी अग्नीने सर्व अवयव तापून त्यांचे शरीर फार तेजस्वी झाले, तसेच त्या तपामुळे त्यांच्या आत्म्यात अतिशय निर्मलता उत्पन्न झाली. बरोबरच आहे की शरीररूपी मूस तापली असता त्यातील आत्मा सोन्याप्रमाणे शुद्ध होतोच ॥ २१२ ।।.. तपश्चरणाने त्यांच्या शरीरात कातडे व हाडे एवढेच पदार्थ राहिले. पण त्या तपस्व्यांना ध्यानाने अधिक आत्मशुद्धि प्राप्त झाली. ही अनशनादि बाह्य तपांची सामग्री अध्यात्म शुद्धीला कारण आहे ॥ २१३ ॥ मनवचनकायेच्या एकाग्रतेने केलेल्या तपापासून त्याना आणिमादि गुणांच्या ऋद्धि सिद्धि प्राप्त झाल्या. बरोबरच आहे की, निर्मल तपश्चरण हे फार मोठ्या फलाला उत्पन्न करिते ॥ २१४ ॥ ___ या मुनिवर्यानी तपश्चरणरूपी अग्नि पेटविला व त्यात त्यानी ज्ञानावरणादि अष्ट कर्माच्या आहुति टाकल्या, विधि जाणून तप करणारे ते मुनि उत्तम यज्ञकर्ते ऋत्विज होत व स्वयंभू आदिभगवंताचा उपदेश हा मंत्र होय ॥ २१५ ॥ ___ या तपश्चरणरूपी महायज्ञाचा आराध्यदेव श्रीवृषभ जिनेश्वर दया ही दक्षिणा होय आणि इच्छित वस्तुप्राप्ति हीच फल होय व मोक्षाची प्राप्ति होणे ही या यज्ञाची मर्यादा होय ॥ २१६ ॥ याप्रमाणे वृषभजिनानी सांगितलेल्या द्वादशांगश्रुतज्ञानाचे ज्यानी अध्ययन केले आहे अशा त्या मुनिराजानी वृषभजिनानी सांगितलेल्या यज्ञाचा संकल्प करून अत्युत्कृष्ट असा तपोयज्ञ केला ॥ २१७ ॥ याप्रमाणे त्या मुनीनी मुनीच्या उत्तम भावनांची प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे सर्व भावनांचे आचरण त्यानी शेवटपर्यन्त धारण केले. बरोबर आहे की, जे मोठे असतात त्यांचे प्रतिज्ञेप्रमाणे वागणे नैसर्गिक असते ॥ २१८ ॥ Page #291 -------------------------------------------------------------------------- ________________ २८०) महापुराण (३४-२१९ किमत्र बहुना धर्मक्रिया यावत्यविप्लुता । तां कृत्स्ना ते स्वसाच्चक्रुस्त्यक्तराजन्यविक्रियाः॥२१९ वसन्ततिलकवृत्त इत्थं पुराणपुरुषादधिगम्य बोधि तत्तीर्थमानससरःप्रियराजहंसाः। ये राज्यभूमिमवधूय विधूतमोहाः । प्रावाजिषुर्भरतराजमनन्तुकामाः ।। २२० ते पौरवा मुनिवराः पुरुधैर्यसाराः। धीरानगारचरितेषु कृतावधानाः ॥ योगीश्वरानुगतमार्गमनुप्रपन्नाः । शं वो दिशन्त्वखिललोकहितकतानाः ॥ २२१ शार्दूलविक्रीडित नत्वा विश्वसृजं चराचरगुरुं देवं दिवीशाचितम् । नान्यस्य प्रति व्रजाम इति ये दीक्षां परां संश्रिताः ।। ते नः सन्तु तपोविभूतिमुचितां स्वीकृत्य मुक्तिश्रियम् । बद्धेच्छा वृषभात्मजा जिनजुषामग्रेसराःश्रेयसे ॥ २२२ याविषयी जास्ती सांगण्याची आवश्यकता नाही. त्या सर्व मुनीनी राज्यावस्थेत असताना उद्भवणारे सर्व विकार त्यागले होते व दिगंबर दीक्षा घेऊन जितक्या धर्मक्रिया त्यानी केल्या त्यात दोष तिळमात्रही उत्पन्न होऊ दिला नाही व त्या सर्व धर्मक्रिया त्यानी उत्तम रीतीने पाळल्या ।। २१९ ॥ भरतराजाला नमस्कार करण्याची ज्याना इच्छा नव्हती अशा आदिभगवंताच्या बाहुबलीवय॑ सर्व पुत्रानी राज्यभूमीचा त्याग केला, तद्विषयक मोह त्यागला व ते पुराणपुरुष भगवान् आदिभगवंताकडे आले. हे भगवंताचे पुत्र भगवत्तीर्थ हेच कोणी मानससरोवर त्यात प्रिय राजहंसासारखे झाले. भगवन्तापासून त्यानी रत्नत्रयाची प्राप्ति करून घेतली व दीक्षा धारण केली ॥ २२० । श्रेष्ठ मुनि असे ते भगवंताचे पुत्र महाधैर्याचा सार धारण करणारे म्हणजे महान् धैर्यशाली होते व महान् बलवान् होते. धीर अशा मुनिचारित्रांचे पालन करण्यात सतत तत्पर होते. योगीश्वर-भगवान् आदिजिनेश्वरानी अनुसरलेल्या मार्गाचे पालन ते करीत होते. सर्व जगाचे हित करण्यात तत्पर असे ते भगवंताचे पुत्र तुम्हाला सुख देवोत ॥ २२१ ॥ ज्याची इन्द्र पूजा करतात, जो चराचरांचा गुरु आहे, जो जगाचा कर्ता आहे, अशा देवाला-आदिभगवंताला नमस्कार करून आम्ही इतराला नमस्कार करणार नाही असा निश्चय करून ज्यानी उत्कृष्ट दीक्षा धारण केली, जे जिनभगवंताची सेवा करण्यात अग्रेसर आहेत, जे उत्कृष्ट व तपोवैभव स्वीकारून मुक्तिलक्ष्मीची इच्छा करतात ते वृषभजिनेश्वराचे पुत्र आमचे कल्याण करोत ।। २२२ ॥ Page #292 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४-२२३) महापुराण स श्रीमान्भरतेश्वरः प्रणिधिभिर्यान्प्रहृतां नानयत् । सम्भोक्तुं निखिलां विभज्य वसुधां सार्धं च यैर्नाशकत् ॥ निर्वाणाय पितृषभं जिनवृषं ये शिश्रियः श्रेयसे । ते नो मानधना हरन्तु दुरितं निर्दग्धकर्मेन्धनाः ॥ २२३ म. ३६ इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराण सङग्रहे भरतराजानुजदीक्षावर्णनं नाम चतुस्त्रिशत्तमं पर्व ॥ ३४ ॥ तो षट्खण्डलक्ष्मीपति भरतेश्वर दूताकडून ज्याना नम्र करू शकला नाही आणि सर्व पृथ्वीची विभागणी करून आपल्या भावासह पृथ्वीचा उपभोग घेण्यास समर्थ झाला नाही. ज्यानी मोक्ष मिळावा म्हणून आपले श्रेष्ठ पिता अशा वृषभनाथाचा आश्रय घेतला, जे स्वाभिमानाला धन मानतात व ज्यानी कर्मरूपी इन्धन जाळून टाकले आहे असे ते कुमार तपस्वी आमच्या पातकाचा नाश करोत ।। २२३ ।। याप्रमाणे मराठी भगवज्जिनसेनाचार्य प्रणीत- त्रिषष्टिलक्षण - महापुराणसंग्रहाच्या भाषानुवादात भरतेश्वराच्या सर्व लहान बंधूनी दीक्षा घेतली याचे वर्णन करणारा हा चौतीसावा: पर्व समाप्त झाला. (२८१: Page #293 -------------------------------------------------------------------------- ________________ पञ्चत्रिंशत्तमं पर्व अथ चक्रधरस्यासीत्किञ्चिच्चिन्ताकुलं मनः । दोर्बलिन्यनुनेतव्ये यूनि दोर्दर्पशालिनि ॥ १ अहो भ्रातृगणोऽस्माकं नाभिनन्दति नन्दथुम् । सनाभित्वादवध्यत्वं मन्यमानोऽयमात्मनः ॥ २ अवध्यं शतमित्यास्था नूनं भ्रातृशतस्य मे । यतः प्रणामविमुखं गतवन्नः प्रतीपताम् ॥ ३ न तथास्मादृशां खेदो भवत्यप्रणते द्विषि । दुर्गविते यथाज्ञातिवर्गेऽन्तर्गेहवर्तिनि ॥ ४ मुखैरनिष्टवाग्वह्रिदीपितैरतिधूमिताः । दहन्त्यलातवच्च स्वाः प्रातिकूल्यानिलेरिताः ॥ ५ प्रतीपवृत्तयः कामं सन्तु वान्ये कुमारकाः । बाल्यात्प्रभृति येऽस्माभिः स्वातन्त्र्येणोपलालिताः ॥ ६ युवा तु दोर्बली प्राज्ञः क्रमज्ञः प्रश्रयी पटुः । कथं नाम गतोऽस्मासु विक्रियां सुजनोऽपि सन् ॥ ७ कथं च सोऽनुनेतव्यो बली मानधनोऽधुना । जयाङ्गं यस्य दोर्दर्पः श्लाध्यते रणमूर्धनि ॥ ८ यानंतर आपल्या बाहूंच्या गर्वाने शोभणाऱ्या तरुण बाहुबलीला वश करण्याच्या कार्यात चक्रवर्तीचे मन चिन्तेने थोडेसे व्याकुळ झाले . ॥ १ ॥ अरेरे हा आम्हा भावांचा समूह आम्ही एकाच कुलात जन्मलो आहोत, भाऊबंद आहोत, आम्ही अवध्य आहोत असे समजत आहे व त्यामुळे आमचे अभिनंदन करण्याच्या कामी आनन्द मानीत नाही. आमच्या या ऐश्वर्याविषयी त्यांचे मन ईर्ष्या द्वेष बाळगीत आहे ॥ २ ॥ माझे हे शंभर भाऊ आम्ही शंभरजण अवध्य आहोत असा विश्वास मनात बाळगीत आहेत म्हणून मला नमस्कार करण्याच्या कामी ते विमुख होऊन माझ्याशी विरोध करीत आहेत ॥ ३ ॥ शत्रु नम्र नाही झाला तरी मला तसा खेद वाटत नाही पण आपल्या घरात एकत्र राहणारे आपले भाऊबंद गविष्ठ होऊन ते नम्र न झाल्यामुळे मन खेद - खिन्न होत आहे ॥ ४ ॥ अनिष्ट बोलणे हाच अग्नि त्याने त्यांचे तोंड प्रज्वलित झाले आहे व त्यामुळे अशुभ चिन्तनरूपी धुराने हे भाऊबंद धुरकटले आहेत व माझ्याशी प्रतिकूल वागणेरूप वाऱ्याने हे भडकले आहेत. त्यामुळे अग्नीच्या कोलतीप्रमाणे मला जाळण्यासाठी- दुःख देण्यासाठी उद्यत झाले आहेत ॥ ५ ॥ हे सगळे माझे इतर भाऊ यथेच्छ माझ्या उलट वागोत कारण बालपणापासून त्यांना स्वतन्त्रपणे वागू दिले आहे ॥ ६ ॥ पण बाहुबली तरुण, बुद्धिमान् व वंशपरंपरा जाणणारा आहे, धाकट्यानी मोठ्याशी कसे वागावे याचे ज्ञान त्याला आहे, तो विनयाने वागणारा आणि हुशार आहे. अल्लड नाही, सज्जन आहे. असा असूनही माझ्याविषयी तो असा विरुद्ध का वागत आहे ? ॥ ७ ॥ तो भुजबली अभिमानरूपी धन जवळ बाळगणारा व बलवान् आहे. त्याला आता क बरे वश करावे ? व त्याचे विजयाचे साधन अशा दोन बाहूंचा गर्व भयंकर युद्धात लोकाकडून प्रशंसिला जात असतो ॥ ८ ॥ Page #294 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-१६) महापुराण (२८३ सोऽयं भुजबली बाहुबलशाली मदोद्धतः । महानिव गजो माद्यन्दुग्रहोऽनुनयविना ॥९ न स सामान्यसन्देशः प्रतीभवति दुर्मदी । ग्रहो दुष्ट इवाविष्टो मन्त्रविद्याचर्णविना ॥ १० शेषक्षत्रिययूनां च तस्य चास्त्यन्तरं महत् । मृगसामान्यमानायतुं कि शक्यते हरिः ॥ ११ सोऽभेद्यो नीतिचञ्चत्वाइण्डसाध्यो न विक्रमी । नेष सामप्रयोगस्य विषयो विकृताशयः ॥ १२ ज्वलत्येव स तेजस्वी स्नेहेनोपकृतोऽपि सन् । घृताहुतिप्रसेकेन यथेद्धाचिर्मखानलः ॥ १३ । स्वभावपरुषे चास्मिन्प्रयुक्तं साम नार्थकृत् । वपुषि द्विरवस्येव योजितं त्वच्यमौषधम् ॥ १४ प्रायो व्याख्यात एवास्य भावः शेषैः कुमारकः । मदाज्ञाविमुखैस्त्यक्तराज्यभोगवनोन्मुखैः॥ १५ भूयोऽप्यनुनयरस्य परीक्षिष्यामहे मतम् । तथाप्यप्रणते तस्मिन्विधेयं चिन्त्यमुत्तरम् ॥ १६ ___ असा तो हा भुजबली आपल्या भुजबलाने शोभत आहे व गर्वाने उद्धट झाला आहे. मत्त झालेल्या मोठ्या हत्तीप्रमाणे अनुनय केल्यावाचून मधुर भाषणादिकावाचून वश करणे शक्य नाही ॥ ९॥ तो मोठा अभिमानी असल्यामुळे सामान्य संदेश-निरोप पाठविण्याने नम्र होणार नाही. मन्त्रविद्येत अतिशय प्रवीण असलेल्या मांत्रिकाशिवाय जसे अंगात शिरलेले भूत वश होत नाही तसा हा बाहुबली सामान्य संदेशानी वश होणार नाही ॥ १० ॥ ____ बाकीच्या तरुण क्षत्रियात व या बाहुबलींत मोठे अंतर आहे. कारण हरिण वगैरे सामान्य पशूना पकडण्यासाठी बनविलेल्या जाळयानी सिंहाला पकडणे कसे शक्य होईल ? ॥ ११॥ तो बाहुबली राजनीतीमध्ये चतुर असल्यामुळे त्याला फितुर करता येत नाही व पराक्रमी आहे म्हणन तो युद्धानेही वश होणार नाही व याचे विचार वक्र व विकारयुक्त असल्यामुळे. त्याच्याबरोबर शान्तीचाही विचार करणे योग्य होणार नाही ॥ १२ ॥ जसा यज्ञाचा अग्नि तुपाच्या आहुतीने अधिकच प्रज्वलित होतो तसा हा तेजस्वी बाहुबली स्नेहाने-प्रेमाने वश करण्याचा प्रयत्न केला तरीही अधिकच भडकत आहे, कोपयुक्त होत आहे ॥ १३ ॥ हा स्वभावाने कठोर असल्यामुळे सामोपाय करणेही उपयुक्त होणार नाही. हत्तीच्या शरीरावर मृदुपणा यावा म्हणून योजलेलें त्वचेवरचे औषध जसे व्यर्थ होते तसा सामोपाय व्यर्थ होईल ॥ १४ ॥ ज्यानी माझी आज्ञा नाही मानली व राज्यभोगांचा त्याग करून जे वनाकडे गेले अशा माझ्या इतर धाकट्या भावानी या बाहुबलीचा स्वभाव बहुतांशी स्पष्ट केला आहेच ॥ १५ ॥ जरी असे आहे तरीही कोमल भाषणादिकानी याच्या मताची आपण परीक्षा करू या. त्या उपायानीही हा जर नम्र झाला नाही तर याच्यावर काय करावे याचा विचार पुढे करणे योग्य होईल ॥ १६ ॥ Page #295 -------------------------------------------------------------------------- ________________ २८४) महापुराण (३५-१७ शातिव्याजनिगूढान्तविक्रियो निष्प्रतिक्रियः । सोऽन्तर्ग्रहोत्थितो वह्निरिवाशेषं बहेत्कुलम् ॥ १७ अन्तःप्रकृतिजः कोपो विधाताय प्रभोर्मतः। तरुशाखाप्रसंघट्ट-जन्मा वह्निर्यथा गिरेः ॥ १८ तदाशु प्रतिकर्तव्यं स बली वक्रतां श्रितः । क्रूर ग्रह इवामुष्मिन् प्रशान्ते शान्तिरेव नः ॥ १९ इति निश्चित्य कार्यज्ञं दूतं मन्त्रविशारदम् । तत्प्रान्तं प्राहिणोच्चकी निसृष्टार्थतयान्वितम् ॥ २० उचितं युग्यमारूढो वयसा नातिकर्कशः । अनुद्धतेन वेषेण प्रतस्थे स तवन्तिकम् ॥ २१ आत्मनेव द्वितीयेन स्निग्धेनानुगतो द्रुतम् । निजानुजीविलोकेन हस्तशम्बलवाहिना ॥ २२ सोऽन्वीपं वक्ति चेदेवमहं ब्रूयामकत्थनः । विगृह्य यदि स ब्रूयाद्विरहं विग्रहे घटे ॥ २३ भाऊबंदाच्या मिषाने या बाहुबलीने आपले आतील विचार गुप्त ठेवले आहेत. त्यामुळे त्याच्यावर काही इलाज करता येत नाही. हा बाहुबली घरात प्रकट झालेल्या आगीप्रमाणे सगळया कुलाला भस्म करून टाकील असे वाटते ॥ १७ ॥ झाडांच्या फांद्यांचे एकमेकाशी खूप जोराने घर्षण झाले असता अग्नि उत्पन्न होऊन तो जसा पर्वताच्या नाशाला कारण होतो तसा भाऊ, चुलता आदिक जे राजाचे अंतरंग संबंधी लोकात उत्पन्न झालेला कोप तो राजाच्या नाशाला कारण होतो ॥ १८ ॥ यावेळी बलवान् असा बाहुबली माझ्याशी वाकडा होऊन वागत आहे यास्तव त्याचा प्रतीकार शीघ्र केला पाहिजे. क्रूर ग्रह जसा वक्र झाला असता त्याची शान्ति करावी लागते तसे याला शान्त केले तरच आम्हाला शान्ति सुख मिळेल ।। १९ ॥ याप्रमाणे भरतेश्वराने निश्चय केला. सांगितलेले कार्य पूर्ण पार पाडण्यास जो समर्थ आहे, कार्याचे स्वरूप ज्याला चांगले समजले आहे व जो मागचा पुढचा विचार करण्यास समर्थ आहे असा दूत बाहुबलीकडे त्याने पाठविला ।। २० ॥ जो वयाने फार मोठा किंवा फार लहान नाही असा मध्यम वयाचा, ज्याचा वेश उद्धतपणाचा नाही अर्थात् नम्रतासूचक वेश ज्याचा आहे असा दूत योग्य वाहनावर बसून बाहुबली राजाकडे जाण्यास निघाला ।। २१ ।। ज्याच्या हातात मार्गात खाण्यासाठी शिदोरी आहे व जो आपल्यावर प्रेम करीत आहे असा आपल्याला अनुकूल असलेला एक सेवक या दूताने बरोबर घेतला होता व तो दूत बाहुबलीकडे जाण्यासाठी निघाला ॥ २२॥ ___ मार्गात याप्रमाणे विचार करीत तो दूत चालला. “जर तो बाहुबली माझ्याबरोबर अनुकूल भाषण करील तर मीही त्याच्याशी बढाई न करता योग्य असे भाषण करीन, अनुकूल बोलेन आणि जर तो विरुद्ध होऊन युद्धाची गोष्ट बोलेल तर युद्धविराम पावण्यास कारण असे बोलेन अर्थात् युद्धापासून काय हानि होते हे सांगून युद्धाची भाषा बोलण्यापासून त्याला परावृत्त करीन ।। २३ ॥ Page #296 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-३१) महापुराण (२८५ सन्धि च पणबन्धं च कुर्यात्सोऽन्तरमेव नः । विक्रम्य क्षिप्रमेष्यामि विजिगीषावसङ्गते ॥ २४ गुणयन्निति सम्पत्तिविपत्ती स्वान्यपक्षयोः । स्वयं निगढ़मन्त्रत्वादनिर्भेद्योऽन्यमन्त्रिभिः ॥ २५ मन्त्रभेदभयाद्गूढं स्वपन्नेकः प्रयाणके । युद्धापसारभूमीश्च स पश्यन् दूरमत्यगात् ॥ २६ क्रमेण देशान्सिन्धश्च देशसन्धींश्च सोऽतियन् । प्रापत्सडख्यांतरात्रैस्तत्पुरं पोदनसाह्वयम् ॥२७ बहिः पुरमथासाद्य रम्याः सस्यवतीर्भुवः । पक्वशालिवनोद्देशान्स पश्यन्प्राप नन्वथुम् ॥ २८ पश्यन्स्तम्बकरिस्तम्बान्प्रसूतफलशालिनः । कृतरक्षाजनैर्यत्नात्स मेने स्वाथिनं जनम् ॥ २९ स कुटुम्बिभिरुद्दात्रैर्नृत्यद्भिरभिनन्दितान् । केदारलावसङ्घर्षतूर्यघोषान्न्यशामयत् ॥ ३० क्वचिच्छुकमुखाकृष्टकणाः कणिशमञ्जरीः । शालिवप्रेषु सोऽपश्यद्विटैर्भुक्ता इव स्त्रियः ॥ ३१ . व तो संधि करण्याची भाषा बोलेल व पणबंध-कांही भेट राजा भरताला देण्याची भाषा जर करील तर ते मी माझ्या मनातलेच बोलत आहे असे समजून मी ते मान्य करीन आणि जर तो भरतराजाला मी जिंकीन अशी असंगत भाषा बोलेल तर मीही त्याच्याशी कांही पराक्रमाची भाषा बोलून लौकर भरतराजाकडे जाईन ।। २४ ॥ आपल्या पक्षाचा उत्कर्ष कसा होईल व शत्रुपक्षाची हानि कशी होईल तद्विषयक विचार करीत तो दूत चालला होता. तो दूत आपल्या विचाराना गुप्त ठेवणारा असल्यामुळे शत्रूच्या मंत्र्याकडून फोडला जात नव्हता ।। २५ ॥ जेथे जेथे मुक्काम होत असे तेथे तेथे आपला विचार फुटू नये म्हणून एकटाच तो झोपत असे व प्रयाण करताना युद्ध करण्याला कोणती भूमि व युद्धापासून निवृत्त होण्यास कोणती भूमि योग्य आहे हे पाहत तो फार दूर गेला ॥ २६ ॥ तो दूत क्रमाने अनेक देश व अनेक नद्या आणि अनेक देशांच्या सीमा उल्लंघून काही मोजक्या दिवस व रात्री व्यतीत करून पोदननगराला जाऊन पोहोचला ॥ २७ ॥ गावाच्या बाहेर अनेक धान्यानी सुंदर दिसणाऱ्या भूमि-शेते त्यानी पाहिली व पिकलेल्या साळीच्या शेताना पाहून तो दूत आनंदित झाला ॥ २८ ॥ ज्यांचे लोंबे बाहेर पडलेले असल्यामुळे जे शोभत आहेत व ज्यांचे शेतकरी यत्नाने रक्षण करीत आहेत, अशा साळीच्या धाटाना पाहणाऱ्या त्या दूताने सर्व लोक स्वार्थी आहेत असे मानले ।। २९ ॥ ____ ज्यानी आपली खुरपी हातानी उंच धरली आहेत व जे आपल्या स्त्रियासह नाचत आहेत अशा शेतक-याना व शेत कापणीच्या वेळी होणान्या वाद्याच्या आवाजाप्रमाणे होणाऱ्या शब्दाना ऐकून त्याने मोठा आनंद मानला ॥ ३० ॥ त्या दूताने साळीच्या शेतात कोठे कोठे राघूनी-पोपटानी आपल्या मुखानी ज्यातील धान्यकण काढून खाल्ले आहेत अशा कणसांच्या मंजरीना पाहिले. त्या त्याला जारानी ज्यांचा उपभोग घेतला आहे अशा स्त्रियाप्रमाणे वाटल्या ।। ३१ ॥ . Page #297 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३५-३२ सुगन्धिकलमामोदसंवादिश्वसितानिलैः । वासयन्तीदिशः शालिकणिशैरवतंसिताः ॥ ३२ पीनस्तनतटोत्सङ्गगलद्धर्माम्बुबिन्दुभिः । मुक्तालङ्कारजां लक्ष्मों घटयन्तीनिजोरसि ॥ ३३ सरसोऽब्जरजः कीर्ण सीमन्तरुचिरः कचैः । चूलामाबध्नतीः स्वैरग्रन्थितोत्पलवामकैः ॥ ३४ दधतीरातपक्लान्तमुख पर्यन्तसङगिनीः । लावण्यस्येव कणिकाः श्रमधर्माम्बुविप्रुषः ॥ ३५ शुकान् शुकच्छवच्छायैः रुचिराङ्गीः स्तनांशुकैः । छोत्कुर्वतीः कलक्वाणं सोऽपश्यच्छालिगोपिकाः ॥ भ्रमद्यन्त्रकुटीयन्त्रचीत्कारैरिक्षुवाटकान् । फूत्कुर्वत इवाद्राक्षीदतिपीडाभयेन सः ॥ ३७ उपक्षेत्रं च गोधेनूर्महोषोभारमन्थराः । वात्सकेनोत्सुकाः स्तन्यं क्षरतीनिचचाय सः ॥ ३८ इति रम्यान्पुरस्यास्य सीमान्तान्स विलोकयन् । मेने कृतार्थमात्मानं लब्धतद्दर्शनोत्सवम् ॥ ३९ २८६) महापुराण शेतक-याच्या स्त्रियांनी सुगन्धित साळीच्या सुवासासारख्या श्वासोच्छ्वासाच्या वायूनी दिशाना सुगन्धित केले होते व त्यानी साळीची लोंबे आपल्या कानावर धारण करून त्यांची शोभा वाढविली होती ॥ ३२ ॥ आपल्या पुष्ट स्तनांच्या तटावरून गळत असलेल्या घामांच्या जलबिन्दूंनी त्या स्त्रिया आपल्या छातीवर जणु त्यांच्या हाराची शोभा धारण करीत होत्या ॥ ३३ ॥ सरोवराच्या कमलांचा पराग त्यांच्या भांगांत पसरल्यामुळे सुंदर दिसणान्या केसानी त्यानी आपला बुचडा बांधला होता व त्याच्या सभोवती त्यानी कमळाच्या माळा बांधल्या होत्या ।। ३४ ।। उन्हाने कोमजलेल्या त्यांच्या मुखाच्यासभोवती श्रमाने घामाचे जलबिंदु जमलेले होते. जणु सौंदर्य रसाचे कण त्यांच्या मुखाच्या सभोवती पसरल्याप्रमाणे वाटत होते ।। ३५ ।। राधूंच्या पंखाप्रमाणे हिरवा रंग ज्यांचा आहे अशा चोळींनी त्यांचे अंग सुन्दर दिसत होते व त्या आपल्या मधुर शब्दांनी धान्य खाण्यासाठी आलेल्या राघूंना हाकून देत होत्या. अशा त्या शेतक-यांच्या स्त्रियाना त्याने पाहिले ।। ३६ ।। फिरणाऱ्या घाण्याच्या शब्दानी आपणास होत असलेल्या पीडेच्या भयामुळे जणु ती उसांची शेते इवळतात की काय अशा त्यांना त्या दूताने पाहिले ॥ ३७ ॥ शेताच्याजवळ पुष्ट असलेल्या मोठ्या कासेच्या भाराने मंद चालणाऱ्या व वासराना पाहण्यासाठी उत्सुक झालेल्या आणि ज्यांच्या कासेतून दूध गळत आहे अशा नूतन प्रसूत झालेल्या गायी त्या दूताने पाहिल्या ॥ ३८ ॥ याप्रमाणे या नगराच्या सीमेवरील रम्य प्रदेशाना पाहून त्या दूताला मोठा आनंद वाटला आणि त्याने स्वतःला त्या प्रदेशाच्या अवलोकनाने कृतार्थ मानले ।। ३९ ।। Page #298 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-४७) महापुराण (२८७ उपशल्यभुवः कुल्याप्रणालीप्रसृतोदकाः । शालीाजीरकक्षेत्रवृतास्तस्य मनोऽहरन् ॥ ४० वापीकूपतडागैश्च सारामैरम्बुजाकरः । पुरस्यास्य बहिर्देशास्तेनादृश्यन्त हारिणः ॥ ४१ पुरगोपुरमुल्लङ्घ्य स निचायन्वणिक्पथान् । तत्र पुंजीकृतान्मेने रत्नराशीनिधीनिव ॥ ४२ नपोपायनवाजीभलालामदजलाविलम् । कृतच्छटमिवालोक्य सोऽभ्यनन्दन्नुपाङ्गणम् ॥ ४३ स निवेदितवृत्तान्तो महादौवारपालकः । नपं नृपासनासीनमुपासीवचोहरः ॥ ४४ पृथुवक्षस्तटं तुङ्ग मुकुटोदनशृङ्गकम् । जयलक्ष्मीविलासिन्याः क्रीडाशैलमिबंककम् ॥ ४५ ललाटपट्टमारूढपट्टबन्धं सुविस्तृतम् । जयश्रिय इवोद्वाहपढें दधतमुच्चकः ॥ ४६ वधानं तुलिताशेषराजन्यकयशोधनम् । तुलादण्डमिवोदूढभूभारं भुजदण्डकम् ॥.४७ पाट आणि पन्हाळे यांच्याद्वारे जेथे पाणी पसरले आहे व साळी, ऊस व जिरे यांच्या शेतानी व्यापलेले प्रदेश या नगराच्या सभोवती होते व त्यानी या दूताच्या मनाला आपल्याकडे आकर्षिले होते ॥ ४० ॥ या नगराच्या बाहेरील प्रदेश विहिरी, आडे आणि तळी व बगीचे यानी फार सुंदर दिसत होते. तळी कमळांच्या समूहानी शोभत होती. याप्रमाणे या प्रदेशानी त्या दूताचे मन आनंदित झाले ॥ ४१ ॥ तो दूत पोदनपुर नगराची वेस ओलांडून नगरात आल्यावर त्याला बाजाराचा मार्ग दिसला. तेथे त्याला रत्नांच्या राशि जणु निधि आहेत असे वाटले ।। ४२ ।। तेथून तो पुढे राजवाड्याकडे आला. तेव्हा त्याचे अङ्गण त्याला दिसले. बाहुबली राजाला नजराणा देण्याकरिता इतर राजानी आणलेले जे घोडे व हत्ती त्यांच्या लाळेने व मदजलाने ते भिजलेले अंगण सडा टाकल्यासारखे दिसू लागले. ते पाहून त्या दूताला फार आनन्द वाटला ॥ ४३ ॥ त्या वार्ताहराने जेव्हा आपली सर्व हकीकत सांगितली तेव्हा मुख्य द्वारपालानी ती सर्व हकीकत बाहुबली राजाला कळविली. यानंतर राजसिंहासनावर बसलेल्या बाहुबली राजाकडे तो दूत आला ॥ ४४ ॥ या बाहुबलीची छाती विस्तृत होती व याचा मुकुट उंच शिखराप्रमाणे दिसत असल्यामुळे हा जयलक्ष्मीरूपी स्त्रीचा क्रीडा करण्याचा जणु एक अद्वितीय पर्वत आहे असा शोभत आहे ॥ ४५ ॥ ___ या बाहुबलीचे विस्तृत असे कपाळ राज्यपट्टाने युक्त असल्यामुळे ते जणु विजयश्रीच्या विवाहपट्टाला धारण करीत आहे असे दिसत आहे ॥ ४६ ॥ याचे दोन भुजदण्ड हे तराजूच्या दण्डाप्रमाणे विस्तृत दीर्घ होते, या भुजदंडानी त्याने सर्व राजांचे यशोधन तोलले होते आणि सर्व पृथ्वीचा भार धारण केला होता ॥ ४७ ॥ Page #299 -------------------------------------------------------------------------- ________________ २८८) महापुराण (३५-४८ मुखेन पडूजच्छायां नेत्राभ्यामुत्पलश्रियम् । दधानमप्यनासन्नविजातिमजलाशयम् ॥ ४८ बिभ्राणमतिविस्तीर्ण मनोवक्षश्च यद्वयम् । वाग्देवीकमलावत्योर्गतं नित्यावकाशताम् ॥ ४९ रक्षावृत्तिपरिक्षेपं गुणग्रामं महाफलम् । निवेशयन्तमात्माङ्गे मनः सु च महीयसाम् ॥ ५० स्फुरदाभरणोद्योतच्छद्मना निखिलादिशः । प्रतापज्वलनेनैव लिम्पन्तमलघीयसा ॥ ५१ मुखेन चन्द्रकान्तेन पद्मरागेण चारुणा। चरणेन विराजन्तं वज्रसारेण वर्मणा ॥ ५२ हरिन्मणिमयस्तम्भमिवकं हरितत्विषम् । लोकावष्टम्भमाधातुं सृष्टमायेन वेधसा ॥ ५३ सर्वाङ्गसग्छतं तेजो वधानं क्षात्रमूजितम् । नूनं तेजोमयैरेव घटितं परमाणुभिः ॥५४ या बाहुबलीने आपल्या मुखाने कमलाची व आपल्या दोन डोळ्यानी उत्पलाची-नीलकमलाची शोभा धारण केली होती. तरीही त्यांच्याजवळ विजाति-अर्थात् पक्ष्याच्या जाति नव्हत्या आणि ते जलाशय-तळे-सरोवर आदि नव्हते. या श्लोकात विरोधाभास अलंकार आहे. विजाति-या बाहुबलीजवळ संकरजन्य माणसे आश्रयाला नव्हती व पक्षीही नव्हते आणि बाहुबली हे अजडाशय-अजलाशय सरोवर तळे आदिक नव्हते व स्वतः अजडाशय-मूर्खपणाच्या अभिप्रायाने रहित होते ।। ४८ ॥ या बाहुबलीचे मन आणि वक्षस्थल अतिशय विस्तृत होते व त्यात नेहमी क्रमाने वाग्देवी-सरस्वती आणि कमलावती-लक्ष्मी या दोन देवता राहत असत ॥ ४९॥ प्रजांचे रक्षण करण्यास जे साधन आहेत आणि महाफले देणारे असे सद्गुणसमूह बाहबलीने आपल्या शरीरात धारण केले होते व त्याने महापुरुषांच्या अन्तःकरणातही ठेवले होते. याचे तात्पर्य असे- तो बाहुबली स्वतः सद्गुणी होता व लोकानाही त्यानी सद्गुणी केले होते ॥ ५० ॥ चमचमणाऱ्या अलंकारांच्या प्रकाशाच्या मिषाने जण आपल्या प्रतापरूपी अग्नीने याने सर्व दिशा व्याप्त केल्या होत्या ।। ५१ ।। हा बाहुबली चंद्राप्रमाणे सुन्दर मुखाने, पद्मरागमण्याप्रमाणे लाल अशा पायानी वज्राप्रमाणे सामर्थ्य ज्यात आहे, कठिणपणा ज्यात आहे अशा आपल्या शरीराने शोभत होता ।। ५२ ॥ __ ज्याची कान्ति हिरवी आहे असा व जो पहिल्या ब्रह्मदेवाने-आदिभगवंताने सर्व जगाला सावरून धरण्याकरिता जणु उत्पन्न केलेला अद्वितीय पाचूरत्नांचा खांब आहे की काय असे पाहणाऱ्यास वाटत होते ।। ५३ ।। याने आपल्या सर्व अंगात क्षत्रियांचे उत्कृष्ट तेज धारण केले होते. जणु हा बाहुबली तेजोमय परमाणूंनीच बनविला आहे असा दिसत होता ।। ५४ ॥ Page #300 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-६२) महापुराण (२८९ तमित्यालोकयन्दूराद्धाम्नः पुञ्जमिवोच्छिखम् । चचाल प्रणिधिः किञ्चित्प्रणिधानान्निधीशितुः॥५५ प्रणमंश्चरणावेत्य दधदूराननं शिरः । ससत्कारं कुमारेण नातिदूरे न्यवेशि सः ॥ ५६ तं शासनहरं जिष्णोनिविष्टमुचितासने । कुमारो निजगादेति स्मितांशन्विष्वगाकिरन ॥ ५७ चिराच्चक्रधरस्याद्य वयं चिन्त्यत्वमागताः । भद्र भद्रं जगद्धतुर्बहुचिन्त्यस्य चक्रिणः॥५८ विश्वक्षन्त्रजयोद्योगमद्यापि न समापयत् । स कच्चिद्भभुजां भर्तुः कुशली दक्षिणो भुजः ॥ ५९ श्रुता विश्वदिशः सिद्धा जिताश्च निखिला नृपाः । कर्तव्यशेषमस्यास्ति किमस्य वद नास्ति वा ॥६० इति प्रशान्तमोजस्वि वचः सारं मिताक्षरम । वदन कुमारी दूतस्य वचनावसरं व्यधात ॥ अथोपचक्रमे वक्तुं वचो हारि वचोहरः । वागर्थाविव सम्पिण्ड्य दर्शयन्दशनांशुभिः ॥ ६२ __ज्याच्या ज्वाला वर जात आहेत अशा तेजाचा जणु पुंज की काय अशा त्या बाहुबली राजाला त्या दूताने दुरून पाहिले व तो क्षणपर्यन्त भरतराजाने सांगितलेल्या विचारसरणीपासून - चलित झाला. त्याच्याशी कोणत्या विषयाची वाटाघाट करावयाची हे क्षणपर्यन्त विसरून गेला ।। ५५ ।। दुरूनच मस्तक नम्र करणान्या त्या दूताने जवळ येऊन त्याच्या चरणाना नमस्कार केला. तेव्हां भुजबलिकुमाराने सत्कारपूर्वक त्याला फार दूर नाही असे आपल्याजवळ बसविले ॥ ५६ ॥ जयशील भरतचक्रीच्या त्या दूताला कुमाराने योग्य आसनावर बसविले. यानंतर आपल्या हास्यांच्या किरणाना चोहीकडे पसरून प्रभु भुजबली याप्रमाणे बोलला ॥ ५७ ॥ पुष्कळ वर्षानी चक्रवर्ती भरताच्या स्मरणाचा विषय आम्ही आज बनलो आहोत, सगळ्या जगावर चक्रवर्तीचे प्रभुत्व असल्यामुळे त्याला पुष्कळांचे चिन्तन करावे लागते. अशा त्याचे कुशल आहे ना ? ॥ ५८ ।। जगातील सगळ्या क्षत्रियांना जिंकण्याचा उद्योग अद्यापि समाप्त न करणा-या त्या चक्रवर्तीचा उजवा बाहु खुशाल आहे ना ? ॥ ५९॥ सर्व दिशा चक्रवर्तीच्या ताब्यात आल्या आहेत असे आम्ही ऐकिले आहे आणि सर्व राजांनाही त्याने जिंकले आहे असे आम्ही ऐकिले आहे. आता याचे कांहीं कर्तव्य बाकी राहिले आहे किंवा नाही हे सांग बरे ? ॥ ६० ॥ याप्रमाणे शान्त, तेजस्वी, अल्पाक्षरयुक्त आणि सारयुक्त भाषण बाहुबली कुमाराने करून नंतर दूताला बोलण्यास अवसर दिला ॥ ६१ ॥ यानन्तर शब्द आणि अर्थ यांना एकत्र जुळवून आपल्या दाताच्या किरणानी प्रकाशित करून तो दूत मनाला आकर्षित करणारे असे भाषण याप्रमाणे बोलला ।। ६२ ।। म.३७ Page #301 -------------------------------------------------------------------------- ________________ २९० ) ( ३५-६३ त्वद्वचः सम्मुखीनेऽस्मिन्कार्यं सुव्यक्तमीक्ष्यते । असंस्कृतोऽपि यत्रार्थं प्रत्यक्षयति मादृशः ॥ ६३ वयं वचोहरा नाथ, प्रभोः शासनहारिणः । गुणदोषविचारेषु मन्दास्तच्छन्दचारिणः ॥ ६४ ततश्चक्रधरेणार्य यदादिष्टं प्रियोचितम् । प्रयोक्तृगौरवादेव तद्ग्राह्यं साध्वसाधु वा ॥ ६५ गुरोर्वचनमादेयमविकल्प्येति या श्रुतिः । तत्प्रामाण्यादमुष्याज्ञा संविधेया त्वयाधुना ॥ ६६ ऐक्ष्वाकः प्रथमो राज्ञां भरतो भवदग्रजः । परिक्रान्ता मही कृत्स्ना येन नामयतामरान् ॥ ६७ गंगाद्वारं समुल्लङध्य यो रथेनाप्रतिष्कशः । चलदाविद्धकल्लोलमकरोन्मकरालयम् ॥ ६८ शरव्याजः प्रतापाग्निर्ज्वलत्यस्य जलेऽम्बुधेः । पपौ न केवलं वाद्धि मानं च त्रिदिवौकसाम् ॥ ६९ मा नाम प्रणति यस्य व्राजिषुर्द्युसद : कथम् । आकृष्टाः शरपाशेन प्राध्वङ्कृत्य गले बलात् ॥ ७० महापुराण हे प्रभो, आपल्या वचनरूपी दर्पणात सर्व कार्य अगदी स्पष्ट दिसत आहे. कारण या वचनरूपी दर्पणात माझ्यासारखा विद्यासंस्काररहित अर्थात् अडाणी मनुष्य देखिल सर्व वस्तु प्रत्यक्ष बघत आहे ॥ ६३ ॥ हे प्रभो, आम्ही दूतलोक मालकाची आज्ञा कळविणारे आहोत व मालकाच्या छंदाप्रमाणे वागणारे आहोत. त्यामुळे गुण व दोषांचा विचार करण्यात आम्ही मंद आहोतअज्ञ आहोत ॥ ६४॥ यास्तव हे आर्य, चक्रपति भरतेश्वराने प्रिय व योग्य असे सांगितले आहे तें चांगले असो अथवा वाईट असो, सांगणाऱ्याच्या मोठेपणाकडे लक्ष देऊन त्याचा आपण स्वीकार करावा ॥ ६५ ॥ जे गुरूचे - वडिलांचे वचन आहे ते कांहीं मनामध्ये संशयादिक न येऊ देता ग्रहण करावे असे श्रुतिवचन आहे. त्या वचनाला प्रमाण मानून या वडील भावाची - भरतेश्वराची आज्ञा आपण मानणे योग्य आहे, तिला आपण अनुसरावे ।। ६६ ॥ आपले वडिलबंधु भरत हे इक्ष्वाकुवंशात उत्पन्न झाले आहेत. सर्व राजात ते श्रेष्ठ आहेत व पहिले आहेत. त्यानी सर्व अमराना नम्र केले आहे व पृथ्वी आपल्या आज्ञाधीन केली आहे ।। ६७ ।। या भरतेश्वराने गंगाद्वाराला उल्लंघून कोणाचे साहाय्य न घेता ज्याच्या चंचल लाटा एकमेकावर आपटत आहेत अशा समुद्रात रथाने प्रवेश केला ॥ ६८ ॥ बाणाच्या मिषाने याचा प्रतापरूपी अग्नि समुद्राच्या पाण्यात देखिल प्रज्वलित झाला आहे व त्याने समुद्रच पिऊन टाकला आहे असे नाही तर त्याने देवांच्या अभिमानालाही पिऊन टाकले आहे ॥ ६९ ॥ या भरतेश्वराने बाणांच्या पाशाने गळा बांधून बलात्काराने देवाना देखिल ओढले आहे. असे जर आहे तर ते देव या भरतेश्वराला कसे बरे नमस्कार करणार नाहीत ? अवश्य करतील ॥ ७० ॥ Page #302 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-७८) महापुराण (२९१ शरव्यमकरोद्यस्य शरपातो महाम्बुधौ । प्रसभं मगधादासं क्रान्तद्वादशयोजनः ॥ ७१ विजयाआँचले यस्य विजयो घोषितोऽमरैः । जयतो विजयाद्धेशं शरेणामोघपातिना ॥ ७२ कृतमालादयो देवा गता यस्य विधेयताम् । कृतमस्योभयश्रेणीनभोगजयवर्णनैः ॥ ७३ गुहामुखमपध्वान्तं व्यतीत्य जयसाधनैः । उत्तरां विजया द्रो व्यगाहत तां महीम् ॥ ७४ म्लेच्छाननिच्छतोऽप्याज्ञां प्रच्छाद्य जयसाधनैः । सेनान्या यो जयं प्राप बलादाच्छिद्य तद्धनम् ॥७५ कृतोऽभिषेको यस्यारदभ्येत्य सुरसत्तमैः । यस्याचलेन्द्रकूटेषु स्थलपद्मायितं यशः ॥ ७६ रत्नार्धेः पर्युपासातां यं च स्वर्धन्यदेवते । वृषभाद्रितटे येन टडाकोत्कीर्णं कृतं यशः ॥ ७७ घटदासीकृता लक्ष्मीः सुराः किडकरतां गताः । यस्य स्वाधीनरत्नस्य निधयः सुवते धनम् ॥ ७८ ज्याने बारा योजनपर्यन्तचा प्रदेश ओलांडला आहे, अशा भरतेश्वराच्या बाणाचे पतन समुद्रात असलेले जे मगधदेवाचे निवासस्थान त्याला त्याने भयंकर रीतीने आपल्या तीक्ष्ण बाणाचे निशाण बनविले आहे ॥ ७१ ।। लक्ष्यसिद्धि करून देण्यासाठी होणारे ज्याचें पतन कधीही व्यर्थ होत नाही अशा बाणाने विजयार्धपर्वताचा स्वामी असलेल्या विजयार्धनामक देवाला जिंकणाऱ्या या भरतेशाच्या विजयाची घोषणा देवानी विजयार्धपर्वतावर केली ।। ७२ ।। कृतमाल वगैरे देव या भरतेश्वराचे त्यावेळी दास झाले व त्यावेळी भरतेश्वराने दोन्ही श्रेणीच्या विद्याधरांना जिंकले. एवढे त्याचे जयवर्णन येथे पुरे आहे ॥ ७३ ॥ ___ या पर्वतावरील गुहा अंधाराने रहित करून जय प्राप्त करून देणाऱ्या साधनानीसैन्यानी ती गुहा ओलांडली आणि चक्रवर्तीने विजयार्धपर्वताच्या उत्तरश्रेणीच्या पृथ्वीवर प्रवेश केला ।। ७४ ॥ सेनापतीने जयसाधक सैन्याच्या द्वारे म्लेच्छराजांना जिंकले आणि नाखुष असलेल्या त्यांच्यावर भरतराजाची आज्ञा लादली व जबरदस्तीने त्यांचे धन हरण करून त्यांच्यावर विजय मिळविला ॥ ७५ ॥ त्यावेळी श्रेष्ठदर्जाच्या देवानी जवळ येऊन या भरतेशाचा अभिषेक केला. या विजयार्धमहापर्वताच्या अनेक शिखरावर भरतेशाचे यश स्थलकमलाप्रमाणे शोभत आहे ॥७६॥ या भरतेश्वराची गंगा आणि सिंधु या दोन देवतांनी रत्नांचे अर्घ्य अर्पण करून पूजा केली व या चक्रवर्तीने वृषभ पर्वताच्या तटावर आपले यश टाकीने कोरून ठेवले आहे ॥ ७७ ॥ या चक्रेश्वराने लक्ष्मीला घटदासी-घागरीने पाणी भरणारी दासी केले आहे आणि देव त्याचे सेवक झाले आहेत. जो सर्व रत्नांचा स्वामी आहे अशा त्याला नऊ निधि नेहमी घन देत असतात ॥ ७८ ॥ Page #303 -------------------------------------------------------------------------- ________________ २९२) महापुराण (३५-७९ स यस्य जयसैन्यानि निजित्य निखिला दिशः । भ्रमन्ति स्माखिलाम्भोधितटान्तवनभूमिषु ॥ ७९ त्वामायुष्मन् जगन्मान्यो मानयन्कुशलाशिषा । समादिशति चक्राडका प्रथयन्नधिराजताम् ॥ ८० मदीयं राज्यमाकान्तनिखिलद्वीपसागरम् । राजतेऽस्मप्रियभ्रात्रा न बाहुबलिना विना ॥ ८१ ताः सम्पदस्तदैश्वयं ते भोगाः स परिच्छदः । ये समं बन्धुभिर्भुक्ताः संविभक्तसुखोदयैः ॥ ८२ अन्यच्च नमिताशेषनृसुरासुरखेचरम् । नाधिराज्यं विभात्यस्य प्रणामविमुखे त्वयि ॥ ८३ न दुनोति मनस्तीवं रिपुरप्रणतस्तथा । बन्धुरप्रणमन्गर्यो दुर्विदग्धो यथा प्रभुम् ॥ ८४ तदुपेत्य प्रणामेन पूज्यतां प्रभुरक्षमी । प्रभुप्रणतिरेवेष्टा प्रसूतिर्नन सम्पदाम् ।। ८५ अवन्ध्यशासनस्यास्य शासनं ये विमन्वते । शासनं द्विषतां तेषां चक्रमप्रतिशासनम् ॥ ८६ .................... या राजेश्वराच्या सैन्यानी सर्व दिशा जिंकल्या आहेत व त्यानी सर्वसमुद्रांच्या तटावर असलेल्या वनभूमीवर विहार केला आहे ॥ ७९ ॥ हे आयुष्मन्ता-हे दीर्घायुषी प्रभो, सर्व विश्वमान्य असलेला तो आमचा प्रभु कल्याणदायक आशीर्वादाने आपला सत्कार करीत आहे व सर्वमान्य आणि चक्रायुध हेच ज्याचे चिह्न आहे असा तो आपल्या सर्वश्रेष्ठ राजेपणास-चक्रवर्तीपणास प्रसिद्ध करून आपणास आज्ञा देत आहे ।। ८० ।। माझे राज्य सर्व द्वीप आणि समुद्र याना व्यापून पसरलेले आहे. पण त्याला माझ्या प्रिय भाऊ बाहुबलीवाचून शोभा नाही ।। ८१ ।। __ आपले सुख व उत्कर्षाची विभागणी ज्याच्याशी झाली आहे अशा आपल्या भावासह ज्या भोगल्या जातात त्याच संपत्ति होत. तेच ऐश्वर्य, तेच भोग व तोच परिवार योग्य होय ॥ ८२॥ दुसरे असे आहे की, हे प्रभो, आपण जर या चक्रवर्तीला नमस्कार करणार नाही तर सर्व मानव, देव, असुर आणि विद्याधराना ज्याने नम्र केले आहे असे या चक्रवर्तीचे राज्य मुळीच शोभणार नाही ॥ ८३ ॥ गर्विष्ठ व आपणास शहाणा समजणारा असा भाऊ जर राजाला नम्र होणार नाही तर त्या राजाचे मनाला. त्याने नमस्कार न करणाऱ्या शत्रूपेक्षाही अतिशय दुःखविले असे होईल ॥८४॥ यास्तव क्षमा न करणाऱ्या या राजाकडे येऊन आपण नमस्कार करून त्याचा आदर करा व प्रभूला नमस्कार करणे हेच सर्वाना आवडणारे आहे व हा प्रभुनमस्कार सम्पत्तीना जन्म देणारा आहे ।। ८५ ।। हे प्रभो, ज्याचे शासन निष्फळ नाही अशा या आमच्या राजाचे शासन ज मानीत नाहीत त्या शत्रूना हे चक्ररत्न शासन करणारे आहे ।। ८६ ।। Page #304 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-९४) महापुराण (२९३ प्रचण्डदण्ड निर्घातनिपातपरिखण्डितान् । तदाज्ञाखण्डनव्यग्रान्पश्यैतात्मण्डलाधिपान ॥ ८७ तदेत्य द्रुतमायुष्मन् पूरयास्य मनोरथम् । युवयोरस्तु साङगत्यात्सङगतं निखिलं जगत् ॥ ८८ इति तद्वचनस्यान्ते कृतमन्दस्मितो युवा । घोरं वचो गभीरार्थमाचचक्षे विचक्षणः ॥ ८९ साधूक्तं साधुवृत्तत्वं त्वया घटयता प्रभोः । वाचस्पत्यं तदेवेष्टं पोषकं स्वमतस्य यत् ॥ ९० साम दर्शयता नाम भेददण्डौ विशेषतः । प्रयुञानेन साध्येऽर्थे स्वातन्त्र्यं दर्शितं त्वया ॥ ९१ स्वतन्त्रस्य प्रभोः सत्यं स त्वमन्तश्वरश्चरः। अन्यथा कथमेवास्य व्यनक्त्यन्तर्गतं गतम् ॥ ९२ निसृष्टार्थतयास्मासु निर्दिष्टस्त्वं निधीशिना। विशिष्टोऽपि न वैशिष्टयं परमर्मस्पृगीदृशम् ॥ ९३ अयं खलु खलाचारो यबलात्कारदर्शनम् । स्वगुणोत्कीर्तनं दोषोद्भावनं च परेषु यत् ॥ ९४ हे प्रभो, अतिशय भयंकर दण्डरत्नाचा जो वज्राप्रमाणे होणारा आघात त्याने ज्यांचे तुकडे झाले आहेत व भरतराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे व्याकुळ झालेल्या ह्या अनेक माण्डलिक राजाना पाहा ।। ८७ ॥ म्हणून हे राजन्, हे आयुष्यवन्ता, लौकर भरतमहाराजाकडे येऊन त्याचे मनोरथ पूर्ण कर. तुम्हा दोघा भावांच्या मिलापाने सगळ्या जगाची एकी होईल ॥ ८८ ॥ याप्रमाणे त्या दूताने भाषण करून ते जेव्हा संपविले तेव्हा तरुण बाहुबलीने मंद हास्य केले आणि चतुर अशा त्याने ज्याचा अभिप्राय गंभीर खोल आहे, असे प्रौड भाषण याप्रमाणे केले ॥ ८९ ॥ हे दूता, आपल्या मालकाच्या सदाचाराचे समर्थन करणाऱ्या तुजकडून फार उत्तम भाषण केले गेले आहे. जे वक्तृत्व आपल्या मताचे पोषण करणारे असते तेच वक्तृत्व योग्य होय ॥ ९०॥ सलोखा दाखविणाऱ्या हे दूता, तुजकडून भेद व दण्ड देखिल विशेष रीतीने स्पष्टीकरण करून सांगितले गेले आहेत व त्यांचा प्रयोग करीत असताही आपला विषय सिद्ध करण्यात तू किती स्वतंत्र आहेस हे दाखविले आहेस ।। ९१ ॥ स्वतंत्र अशा मालकाच्या अन्तःकरणात शिरलेला असा तू दूत आहेस. तसा जर तू नसतास तर तुला त्याच्या मनातला अभिप्राय कसा बरे स्पष्ट करता आला असता ॥ ९२ ॥ हे दूता तू पुष्कळ कार्ये पूर्वी पार पाडली आहेत म्हणून आमच्याविषयीही तुलाच चक्रवर्तीने आज्ञा केली आहे. तू श्रेष्ठ आहेस. पण या प्रकाराने दुसऱ्याच्या मर्माचे छेदन करणे हे चातुर्याचे कार्य नाही यात तुझा विशिष्टपणा आढळून येत नाही ।। ९३ ॥ बलात्काराचे जे प्रकाशन करणे ते खरोखर दुष्टांचा आचार आहे. आपल्या गुणांचे वर्णन करणे व दुसन्याच्या ठिकाणी दोष दाखविणे हाही दुष्टाचारच आहे ॥ ९४ ॥ Page #305 -------------------------------------------------------------------------- ________________ २९४) महापुराण (३५-९५ विवृणोति खलोऽन्येषां दोषान्स्वांश्च गुणान् स्वयम् ॥ संवृणोति च दोषान्स्वान् । परकीयान्गणानपि ॥ ९५ अनिराकृतसन्तापां सुमनोभिः समुज्झिताम् । फलहीनां श्रयन्त्यज्ञाः खलतां खलतामिव ॥ ९६ सतामसम्मतां विष्वगाचितां विरसैः फलैः । मन्ये दुःखलतामेनां खलतां लोकतापिनीम् ॥ ९७ सोपप्रदानं सामादौ प्रयुक्तमपि बाध्यते । पराभ्यां भेददण्डाभ्यां न्याय्ये विप्रतिषेधिनि ॥ ९८ यथाविषयमेवैषामुपायानां नियोजनम् । सिद्ध्यङगं तद्विपर्यासः फलिष्यति पराभवम् ॥ ९९ नैकान्तशमनं साम समाम्नातं सहोष्मणि । स्निग्धेऽपि हि जने तप्ते सर्पिषीवाम्बुसेचनम् ॥ १०० दुष्ट मनुष्य इतराच्या दोषांचे वर्णन करतो आणि स्वतःच्या गुणाचे स्वतःच वर्णन करतो. तो स्वतःच्या दोषाना झाकतो व इतराच्या गुणानाही झाकतो ॥ ९५ ॥ जी लोकाना होणारा सन्ताप दूर करीत नाही व जी सुमनानी-फुलानी रहित आहेपक्षी-चांगल्या मनुष्यानी त्यागली आहे, जी फलानी रहित आहे अशा आकाशातील वेलीप्रमाणे असलेल्या दुष्टतेचा अज्ञ लोक आश्रय करतात. भावार्थ- आकाशवेलीपासून कोणाचा सन्ताप दूर होत नाही. तसे दुष्टपणामुळे कोणाचा सन्ताप दूर होत नाही. जसे आकाशवेल पुष्पानी रहित असते तशी दुष्टताही सुमनानी विद्वान्-सज्जनानी रहित असते. जशी आकाशवेल फलरहित असते तशी ही दुष्टता फलरहित असते अर्थात् हिच्यापासून कोणाचाही फायदा होत नाही. अशा दुष्टतेचा मूर्ख लोकच फक्त आश्रय करतात ।। ९६ ॥ ही दुष्टता केव्हाही सज्जनाना मान्य नसते आणि ही दुष्टता विरस-नीरस किंवा दुष्टपणा-द्वेषादि फलानी सर्व बाजूनी भरलेली असते. म्हणून ही खलता दुष्टता-दुःखलताच होय. या दुःखलतेपासून लोकाना अत्यन्त सन्ताप उत्पन्न होतो ।। ९७ ।। न्यायाला अनुसरून विरोध करणाऱ्या पुरुषाविषयी प्रथमतः काही त्याला देण्याच्या विधानात सामोपायाचा प्रयोग केला असेल तर व नंतर भेद आणि दंडाचा उपाय अंमलात आणला तर पहिला उपाय जो साम तो बाधित होतो तो मोडला जातो. याचे तात्पर्य असे- न्यायवान् शत्रूला प्रथमतः काही देण्याचे कबूल करून सामनीतीचा प्रयोग-शान्ततेचा उपाय केला आणि नंतर त्याला भेदाची किंवा दंडाची धमकी दाखविली तर पहिला उपयोगात आणलेला सामोपाय व्यर्थ होतो. न्यायवान् विरोधी त्याच्या कूटनीतीला तत्काल समजून घेतो ।। ९८ ।। साम, दाम, दंड आणि भेद या उपायांचा विषयाला अनुसरून उपयोग केला पाहिजे म्हणजे हे उपाय आपल्या कार्यसिद्धीला कारण होतात व त्यांचा विपर्यास केला, विपरीत उपयोग केला तर त्यापासून जयलाभ होत नाही, पराभव मात्र पदरी पडतो. जो उपाय ज्याच्यासाठी योग्य आहे त्याचाच प्रयोग केला तर त्यापासून कार्यलाभ होतो, कार्य सफल होते. विरुद्ध प्रयोग केल्याने कार्यहानि होऊन दुःख भोगावे लागते ॥ ९९ ॥ प्रतापशाली शत्रूविषयी साम-सलोख्याचा उपाय सर्वथा उपयोगी पडेल असे नाही. कारण प्रेमळ असाही मनुष्य रागावला तर त्याच्यावर सामोपाय करणे हे तापलेल्या तुपात पाणी सिंचन करण्याप्रमाणे आहे ।। १०० ॥ Page #306 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-१०८) महापुराण (२९५ उपप्रदानमप्येवम्प्रायं मन्ये महौजसि । समित्सहस्रदानेऽपि दीप्तस्याग्नेः कुतः शमः ॥ १०१ लोहस्येवोपतप्तस्य मृदुता न मनस्विनः । दण्डोऽप्यनुनयग्राह्ये सामजे न मृगद्विषि ॥ १०२ ततो व्यत्यासयन्नेतानुपायाननुपायवित् । स्वयं प्रयोगवैगुण्यात्सीदत्येव भवादृशः ॥ १०३ - साम्नापि दुष्करं साध्या वयमित्युपसंहृते । तत्रोत्सेकं प्रयुञ्जानो व्यक्तं मुग्धायते भवान् ॥ १०४ वयसाधिक इत्येव न श्लाघ्यो भरताधिपः । जरन्नपि गजः कक्षां गाहते कि हरेः शिशोः ॥ १०५ प्रणयः प्रश्रयश्चेति सङ्गतेषु सनाभिषु । तेष्वेवासङ्गतेष्वङ्ग तवयस्य हता गतिः॥ १०६ ज्येष्ठः प्रणम्य इत्येतत्काममस्त्वन्यदा सदा । मूर्ध्यारोपितखड्गस्य प्रणाम इति कः क्रमः ॥१०७ दूत दूनायते चित्तमन्योत्सेकानुवर्तनः । तेजस्वी भानुरेवैकः किमन्योऽप्यस्त्यतः परम् ॥ १०८ एखाद्या महान् तेजस्वी शत्रूला शान्त करण्यासाठी काही धनदान करणे देखिल वरीलप्रमाणेच शान्तीला कारण होत नाही. कारण पेटलेल्या अग्नीत हजारो समिधा टाकल्या तरीही त्याची शांति होणार नाहीच ॥ १०१ ॥ तापलेल्या लोखंडावर दण्ड-प्रयोग केला तरीही त्याच्यात मृदुता-मऊपणा उत्पन्न होत नाही तसे अभिमानी मनुष्यावर दमनाचा उपयोग होत नाही. कारण हा दण्डप्रयोग विनय करून शान्त करण्यास योग्य अशा हत्तीवर दण्डप्रयोग करणे योग्य आहे पण त्याचा उपयोग सिंहावर करणे निरुपयोगी आहे ॥ १०२ ॥ या सामादिक उपायाना कोठे योजावे याचे ज्ञान ज्याला नाही असा तुझ्यासारखा मनुष्य भलत्याच ठिकाणी याची योजना करतो त्यामुळे उपायात विगुणपणा येतो आणि त्यामुळे स्वतःच दुःखी होतो ॥ १०३ ॥ हे दूता आम्ही सामोपायाने देखिल वश होणार नाही असे जाणूनही तू अहंकाराने त्याचा प्रयोग करीत आहेस त्याअर्थी तू स्पष्ट मूर्ख आहेस असे वाटते ॥ १०४ ॥ भरतखण्डाचा स्वामी भरत वयाने अधिक आहे म्हणून तो आम्हास पूज्य आहे असे समजू नकोस. हत्ती जरी वृद्ध झाला तरीही तो सिंहाच्या बच्चाची बरोबरी करू शकतो काय? ॥ १०५ ॥ प्रेम आणि विजय हे दोन गुण जरी पस्परावर प्रेम करणाऱ्या भावात संभवतात. पण तेच जर मिळूनमिसळून वागत नसतील तर त्या प्रेमाची व विनयाचीही प्रवृत्ति नष्ट होते ॥१०६।। ज्येष्ठ भाऊ हा नेहमी नमस्कार करण्याला योग्य आहे ही गोष्ट इतर वेळी आम्हाला नेहमी मान्य आहे. पण ज्याने आमच्या मस्तकावर तरवार ठेविली आहे त्याला नमस्कार. करावा ही रीत कोठली ? ॥ १०७ ।। हे दूता दुसन्याच्या गर्विष्ठपणाला अनुसरून वागण्याने आमच्या मनाला फार दुःख होते. जगात सूर्य हाच एक तेजस्वी आहे. त्याच्या वाचून दुसरा कोणी मोठा तेजस्वी आहे काय ? ॥ १०८॥ Page #307 -------------------------------------------------------------------------- ________________ २९६) महापुराण (३५-१०९ राजोक्तिर्मयि तस्मिश्च संविभक्तादिवेधसा । राजराजः स इत्यद्य स्फोटो गण्डस्य मूर्धनि १०९ कामं स राजराजोऽस्तु रत्नर्यातोऽतिगृध्नुताम् । वयं राजान इत्येव सौराज्ये स्वे व्यवस्थिताः ॥११० बालानिव च्छलादस्मानाहूय प्रणमय्य च । पिण्डीखण्ड इवाभाति महीखण्डस्तदर्पितः ॥ १११ स्वदोन॒मफलं श्लाघ्यं यत्किञ्चन मनस्विनाम् । न चातुरन्तमप्यश्यं परभ्रूलतिकाफलम् ॥ ११२ पराज्ञोपहतां लक्ष्मी यो वाञ्छेत्पार्थिवोऽपि सन् । सोऽपार्थयति तामुक्ति सोक्तिमिव डुण्डुभः।।११३ परावमानमलिनां भूति धत्ते नपोऽपि यः। नपशोस्तस्य नन्वेष भारो राज्यपरिच्छदः ॥ ११४ मानभङ्गाजित गर्यः प्राणान्धर्तुमीहते । तस्य भग्नरदस्येव द्विरदस्य कुतो भिदा ॥ ११५ छत्रभङ्गाद्विनाप्यस्य छायाभङ्गोऽभिलक्ष्यते । यो मानभङ्गभारेण विभय॑वनतं शिरः॥ ११६ आदिब्रह्मा श्रीवृषभनाथानी राजा हा शब्द. माझ्या ठिकाणी व त्या भरताच्या ठिकाणी विभागलेला आहे असे असून तो भरत राजाधिराज आहे असे म्हणणे हे गालावर उठलेल्या फोडाप्रमाणे आहे ॥ १०९ ॥ तो भरत रत्नांच्या प्राप्तीमुळे अतिशय लोभी झाला आहे म्हणून तो खुशाल राजाधिराज होवो. आम्ही आपल्या उत्तम धर्मराज्यात सुखाने राहिलेले केवळ राजे आहोत ॥ ११०॥ बालकाप्रमाणे काही निमित्ताने आम्हास बोलावून आणि आपल्या पुढे आम्हाला नम्र करून काही पृथ्वीचा अंश देण्याची इच्छा . करीत आहे तर तो पृथ्वीचा विभाग आम्हाला पेंडीच्या खाड्याप्रमाणे वाटतो ।। १११॥ स्वतःच्या बाहुरूपी वृक्षाचे फल मग ते छोटे का असेना तेजस्वी व्यक्तीला ते प्रशंसनीय वाटते. पण दुसऱ्याच्या भुवयारूपी वेलीचे जणु चार दिशांच्या अन्तापर्यंत जें पृथ्वीरूपी फल त्याचा स्वामीपणा प्राप्त झाला तरी तो बरा वाटत नाही ।। ११२ ।। जसे निविषसर्प ‘सर्प सर्प' या शब्दास व्यर्थ धारण करितो अर्थ रहित धारण करितो. तसे जो मनुष्य राजा असूनही दुसऱ्याच्या आशेच्या अधीन झालेल्या लक्ष्मीला धारण करीत आहे तो पार्थिव-राजा असूनही आपल्या 'पार्थिव' या शब्दाला व्यर्थता आणित आहे ।। ११३।। ___जो मनुष्य राजा होऊन देखिल दुसऱ्याने केलेल्या अपमानामुळे निस्तेज झालेल्या विभूतीला-संपत्तीला धारण करीत आहे त्या मनुष्यपशूला राज्यरूप सर्वसामग्री ओझ्यासारखीच आहे ।। ११४ ॥ मानभंग सहन करून मिळविलेल्या राज्यादिक भोगानी जो मनुष्य प्राण धारण करण्याची इच्छा करितो, तो ज्याचे दात तुटले आहेत अशा हत्तीसारखाच होय. त्याच्यापासून तो मनुष्य भिन्न कसा समजावा. अर्थात् भग्नमान मनुष्य दांत तुटलेल्या हत्तीप्रमाणे होय ॥११५।। जो मानभंगाच्या भाराने नम्र झालेले मस्तक धारण करितो त्याचा छत्रभंग-छत्रनाश झाला नाही तरीही त्याच्या छायेचा नाश दृष्टीस पडतो. तात्पर्य- छाया शब्दाचे दोन अर्थ आहेत सावली आणि कान्ति. छत्रभंग न होताही सावलीचा नाश झाला हा विरोध आहे. तो विरोध छाया शब्दाचा अर्थ कान्ति हा घेतला म्हणजे नाहीसा होतो. अर्थात छत्रभंग न होताही मानभंग झाल्यामुळे मुखकान्ति नष्ट होऊन तो मनुष्य निस्तेज दिसतो ॥११६ ॥ Page #308 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-१२५) महापुराण (२९७ मुनयोऽपि समानाश्चेत्त्यक्तभोगपरिच्छदाः । को नाम राज्यभोगार्थो पुमानुज्झेत्समानताम् ॥ ११७ वरं वनाधिवासोऽपि वरं प्राणविसर्जनम् । कुलाभिमानिनः पुंसो न पराज्ञाविधेयता ॥ ११८ मानमेवाभिरक्षन्तु धीराः प्राणः प्रणश्वरैः । नन्वलडकुरुते विश्वं शश्वन्मानाजितं यशः ॥ ११९ । चार चक्रधरस्यायं त्वयात्युक्तः पराक्रमः । कुतो यतोऽर्थवादोऽयं स्तुतिनिन्दापरायणः ॥ १२० वचोभिः पोषयन्त्येव पण्डिताः परिफल्म्वपि । प्रक्रान्तायां स्तुताविष्टः सिंहो प्राममगो ननु ॥ १२१ इवं वाचनिकं कृत्स्नं त्वदुक्तं प्रतिभाति नः । क्वास्य दिग्विजयारम्भः क्व धनोञ्छनचञ्चुता ॥ दषच्चाक्रधरी वृत्ति बलि भिक्षामिवाहरन् । दीनतायाः परां कोटि प्रभुरारोपितस्त्वया ॥ १२३ सत्यं विग्विजये चक्री जितवानमरानिति । प्रत्येयमिदमेतत्तु चिन्त्यमत्र ननु स्वया ॥ १२४ स किं न वर्भशय्यायां सुप्तो नोपोषितोऽथवा । प्रवृत्तो जलमायायां शरपातं समाचरन् ॥ १२५ । __ ज्यानी सुखभोगास साधन असलेली अशी घर धनादि सामग्री त्यागली आहे असे मुनि देखिल समान-साभिमान असतात. तर मग राज्यभोगाची इच्छा करणारा कोणता मनुष्य साभिमानपणा सोडील बरे ? ॥ ११७ ॥ हे दूता, वनात राहणे ही बरेच आहे व प्राणत्याग करणेही बरे आहे. परंतु आपल्या कुलाचा अभिमान ज्याला आहे अशा मनुष्याने दुसऱ्याच्या हुकुमतीखाली राहणे बरे नाही ।। ११८ ॥ . जे धीरपुरुष असतात ते आपल्या नश्वर प्राणानी आपल्या अभिमानाचे रक्षण करतात. कारण अभिमानाने मिळविलेले त्यांचे यश सर्व जगाला शोभविते ॥ ११९ ॥ हे दूता, तू जो चक्रवर्तीचा पराक्रम अतिशय वाढवून वर्णिलास हे फार चांगले काम केलेस. कारण हे सर्व तुझे वर्णन स्तुतिरूप असून निन्देला सूचित करीत आहे ॥ १२० ।। जे पंडित असतात ते आपल्या वचनानी अतिशय तुच्छ वस्तु फुगवून सांगतात. स्तुतीला प्रारंभ केल्यावर कुत्र्याला देखिल सिंह म्हणावे लागते ॥ १२१ ।। हे दूता तू जे सर्व कार्याचे वर्णन केलेस ते सर्व केवळ वचनाडम्बर आहे असे आम्हाला वाटते. कारण या चक्रवर्तीचा दिग्विजयारम्भ कोणीकडे आणि द्रव्य गोळा करण्याचे याचे चातुर्य कोणीकडे ? अर्थात् हा दिग्विजयाला निघाला नसून धन गोळा करण्यासाठी निघाला असावा असे आम्हाला वाटते ।। १२२ ॥ __ चक्रवर्तीच्या आचाराला धारण करणारा व जणु भिक्षेप्रमाणे करभाग वसूल करणारा हा प्रभु तुजकडून दीनपणाच्या पराकाष्ठेप्रत पोचविला गेला आहे ।। १२३ ॥ हे दूता, दिग्विजयप्रसंगी चक्रीभरताने देवाना जिंकले असे म्हणणे खरे असले पाहिजे. परंतु हे सर्व खरे आहे काय याचा तू विचार कर ॥ १२४ ॥ हे दूता, जलमाया करून अर्थात् जलनिश्चल करून पाण्यात बाण सोडणारा असा तुझा प्रभु दर्भशय्येवर झोपला नाही काय ? किंवा उपोषणही त्याने केले नाही काय? ॥ १२५ ॥ म. ३८ Page #309 -------------------------------------------------------------------------- ________________ २९८) महापुराण (३५-१२६ कृतचक्रपरिभ्रान्तिदण्डेनायतिशालिना । घटयन्पार्थिवानेष स कुलालायते बत ॥ १२६ आग:परागमातन्वन् स्वयमेष कलङ्कितः। चिरं कलङ्कयत्येष कुलं कुलभतामपि ॥ १२७ नृपानाकर्षतो दूरान्मन्त्रैस्तन्त्रैश्च योजितः । श्लाघ्यते कियदेतस्य पौरुषं लज्जया विना ॥ १२८ दुनोति नो भूशं दूत श्लाघ्यतेऽस्य यदाहवः । दोलायितं जले यस्य बलं म्लेच्छबलस्तदा ॥ १२९ यशोधनमसंहायं क्षत्रपुत्रेण रक्ष्यताम् । निखनन्तो निधीन्भूमौ बहवो निधनं गताः ॥ १३० रत्नः किमस्ति वा कृत्यं यान्यरनिमिता भुवम् । न यान्ति यत्कृते यान्ति केवलं निधनं नपाः॥. तुलापुरुष एवायं यो नाम निखिलैर्नृपः । तुलितो रत्नपुजेन बत नैश्वर्यमीदृशम् ॥ १३२ ध्रुवं स्वगुरुणा दत्तामाच्छिचित्सति नो भुवम् । प्रत्याख्येयत्वमुत्सृज्य गृध्नोरस्य किमौषधम् ॥१३३ दूत तातवितीर्णा नो महीमेनां कुलोचिताम् । भ्रातृजायामिवादित्सो स्य लज्जा भवत्पतेः ॥ १३४ __ लांब अशा दंडरत्नाच्याद्वारे चक्ररत्नास फिरविणारा व सर्व राजेलोकांना एकत्र करणारा हा भरत काठीने चाक फिरवून मातीची भांडी तयार करणाऱ्या कुंभाराप्रमाणे भासत आहे हे फार निन्द्य आहे ॥ १२६ ॥ पातकांच्या रेणूना चोहीकडे पसरणारा हा राजा स्वतः पातकी आहे व हा कुलीनाच्या कुलानाही दीर्घकालपर्यन्त कलङकित करीत आहे ॥ १२७ ।। आपण योजलेल्या मन्त्र आणि तन्त्राच्याद्वारे दूरून ओढून आणणाऱ्या या भरताचा पराक्रम तुला लाज नसल्याने तुझ्याकडून किती बरे वर्णिला जात आहे ॥ १२८ ।। हे दूता ज्यावेळी या भरताच्या युद्धाची स्तुति करतोस त्यावेळी आमचे मन फार दुःखी होते. कारण म्लेच्छांच्या सैन्यानी या भरताचे सैन्य पाण्यात झोपाळ्याप्रमाणे हालविले होते म्हणून भरताच्या युद्धाची स्तुति करणे बिलकुल योग्य नाहीं ॥ १२९ ।। क्षत्रियांच्या पुत्रानी दुसऱ्याकडन नेले जाण्यास जे शक्य नाही असे यशोधन अवश्य रक्षावे. यापृथ्वीवर निधीना उकरून काढणारे अनेक लोक मरण पावले आहेत ॥ १३० ॥ ज्यांच्यासाठी राजे मात्र मरण पावतात व जी मरणोत्तर हातभर जमिनीपर्यन्त देखिल येत नाहीत अशा त्या रत्नानी काय कार्यसिद्धि होते बरे ? ॥ १३१ ॥ सर्व राजानी रत्नराशीच्या योगाने ज्याचे वजन केले तो हा भरतराजा खरोखर तुलापुरुषच होय. पण मला खेद वाटतो की ऐश्वर्य अशा त-हेचे नसते ॥ १३२ ॥ आमच्या पित्याने आम्हास दिलेली पृथ्वी जो भरत हिसकावून घेण्याची इच्छा करीत आहे. त्या अत्यंत लोभी भरताचा तिरस्कार करणे सोडून दुसरे कोणते औषध आहे बरे ? ॥ १३३ ॥ हे दूता, आम्हाला पित्याने दिलेली व आमच्या कुलाला योग्य असलेली अशी जी भूमि तिला भावाच्या स्त्रियेप्रमाणे आपल्या ताब्यात घेण्याची इच्छा करणाऱ्या तुझ्या राजाला लाज कशी वाटत नाही ? ॥ १३४ ।। Page #310 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-१४२) महापुराण (२९९ देयमन्यत्स्वतन्त्रेण यथाकामं जिगीषुणा । मुक्त्वा कुलकलत्रं च मातलं च भुजाजितम् ॥ १३५ भूयस्तवलमालप्य स वा भुक्तां महीतलम् । चिरमेकातपत्राङ्कमहं वा भुजविक्रमी ॥ १३६ कृतं वृथा भटालापैरर्थसिद्धिबहिष्कृतः । सग्रामनिकषे व्यक्तिः पौरुषस्य ममास्य च ॥ १३७ ततः समरसङ्घट्टे यद्वा तद्वास्तु नौ द्वयोः । नीरेकमिदमेकं नो वचो हर वचोहर ॥ १३८ इत्याविष्कृतमानेन कुमारेण वचोहरः । व्रतं विजितो गच्छ पति संन्नाहयेत्यरम् ॥ १३९ तवा मुकुटसङ्घट्टादुच्छलन्मणिकोटिभिः । कृतोल्मुकशतक्षेपरिवोत्तस्थे महेशिभिः ॥ १४० क्षणं समरसङ्घट्टपिशुनो भटसङ्कटे । श्रूयते स्म भटालापो बले भुजबलोशितुः ॥ १४१ चिरात्समरसंमः स्वामिनोऽयमभूविह । किं वयं स्वामिसत्कारादनृणीभवितुं क्षमाः ॥ १४२ .......................................... स्वतंत्र असलेल्या आणि शत्रूना जिंकण्याची इच्छा करणाऱ्या मनुष्याने आपली कुलीन स्त्री आणि आपल्या बाहूनी मिळविलेली पृथ्वी सोडून दुसरी कोणतीही वस्तु कोणासही खुशाल द्यावी ॥१३५॥ आता तेच ते सांगणे मी पुरे करतो. एक छत्राचे चिह्न ज्याला आहे असे हे भूतल तो भरतराजा एकटाच उपभोगी किंवा ज्याच्या बाहूत सामर्थ्य आहे असा मी तरी एकटाच उपभोगीन ।। १३६ ॥ हे दूता कार्यसिद्धीस साधक नसलेल्या या शौर्याच्या व्यर्थ भाषणांचा काही उपयोग नाही. आता युद्धाच्या कसोटीवर त्याच्या आणि माझ्या पराक्रमाची स्पष्टता होईलच ॥१३७।। __आता या युद्धाच्या गर्दीत आम्हा दोघांचे काय व्हावयाचे असेल ते होवो. हे दूता आमचे निःसंशय भाषण तू तुझ्या मालकाला कळव ॥ १३८ ॥ याप्रमाणे ज्याने आपला अभिमान प्रकट केलेला आहे अशा कुमाराने हे दूता, आता जा आणि तुझ्या मालकाला युद्धासाठी लौकर तयार कर असे म्हणून त्याने दूताला शीघ्र पाठवून दिले ।। १३९ ॥ त्यावेळी एकमेकांच्या किरीटांच्या घर्षणाने वर उसळलेल्या रत्नांच्या अग्र कान्तींनी ज्यानी शेकडो कोलत्या जणु वर फेकल्या आहेत असे ते राजे आपआपल्या आसनावरून उठले ॥ १४० ॥ यानंतर काही कालपर्यन्त बाहुबलिराजाच्या अनेक शूर योद्ध्यांनी भरलेल्या सैन्यात आता युद्ध लौकरच सुरू होणार आहे याची सूचना देणारे योद्धयांचे भाषण ऐकू येऊ लागले ॥ १४१ ॥ या ठिकाणी आमच्या स्वामीला-राजाला फार वर्षानी हा युद्धाचा प्रसंग प्राप्त झाला आहे. आमच्या मालकाने आजपर्यन्त आमचे पालनपोषण करून जो सत्कार केला आहे त्याचे ऋण फेडण्यास आम्ही समर्थ आहोत काय ॥ १४२ ॥ Page #311 -------------------------------------------------------------------------- ________________ ३००) महापुराण (३५-१४३ पोषयन्ति महीपाला भृत्यानवसरं प्रति । न चेदवसरः सार्यः किमेभिस्तृणमानुषः ॥ १४३ कलेवरमिदं त्याज्यमर्जनीयं यशोधनम् । जयश्रीविजये लभ्या नाल्पोदर्को रणोत्सवः ॥ १४४ मन्दातपशरच्छाये प्रत्यङ्गवणजर्जरैः। लप्स्यामहे कदा नाम विश्रामं रणमण्डपे ॥ १४५ प्रत्यनीककृतानीकव्यूहं निभिद्य सायकैः । शरशय्यामसंबाधमध्याशिष्ये कवान्वहम् ॥ १४६ कर्णतालानिलाधूतिविधूतसमरश्रमः । गजस्कन्धे निषीदामि कदाहं क्षणमूच्छितः ॥ १४७ दन्तिदन्तार्गलप्रोताद्गलदस्त्रः स्खलद्वचाः । जयलक्ष्मीकटाक्षाणां कदाहं लक्ष्यतां भजे ॥ १४८ गजवन्तान्तरालम्बिस्वान्त्रमालावरत्रया । कहि दोलामिवारोप्य तुलयामि जयश्रियम् ॥ १४९ ब्रुवाणैरिति सजग्रामरसिकरुद्भटभटेः । शस्त्राणि सशिरस्त्राणि सज्जान्यासन्यले बले ॥ १५० राजे हे काही विशेषप्रसंगाच्या उद्देशाने सेवकांचे पालनपोषण करीत असतात. त्याप्रसंगी जर आम्ही उपयोगी पडलों नाही तर गवताने बनविलेल्या मनुष्याप्रमाणे आमचा काय उपयोग आहे ? ॥ १४३ ॥ हे शरीर त्याज्य आहे. अर्थात् शरीराचा त्याग करून मनुष्याने यशरूपी धन मिळविले पाहिजे. शत्रूला जिंकून विजयलक्ष्मी मिळविली पाहिजे. हा रणोत्सव वीराना अल्पफल देणारा नाही. अर्थात् यापासून महाफलाची प्राप्ति होते ॥ १४४ ।। युद्धामध्ये शरीराचा प्रत्येक अवयव व्रणांनी अतिशय भरून गेल्यामुळे ज्यात मंद उन्हाने बाणांची सावली पडली आहे अशा युद्धमण्डपात आम्हाला केव्हा बरे विश्रान्ति मिळेल ?॥ १४५ ।। कोणी वीर असे भाषण करीत आहे- युद्धामध्ये शत्रूनी रचलेल्या सैन्याच्या व्यूहाला बाणानी भेदून मी ज्यात कोणतीही पीडा नाही अशा बाणांच्या शय्येवर केव्हा बरे झोपेन ॥१४६।। दुसरा एक वीर असे म्हणतो- हत्तीचे कान हेच ताडाचे पंखे त्यांच्या वाऱ्याच्या वाहण्याने ज्याचे युद्धातील श्रम नाहीसे झाले आहेत असा मी क्षणपर्यन्त मूच्छित होऊन हत्तीच्या खांद्यावर केव्हा बरे मी बसेन ।। १४७ ।। हत्तीच्या दातरूपी अर्गळीवर अडकल्यामुळे ज्यांच्यातून रक्त वाहत आहे व ज्याच्या तोंडातून अडखळत अडखळत शब्द बाहेर पडत आहेत असा मी जयलक्ष्मीच्या कटाक्षांचे लक्ष्य केव्हा बरे होईन ॥ १४८ ॥ हत्तीच्या दोन दातांच्या अन्तरालात लोंबणान्या आतड्याची मजबूत दोरी तिच्या साहायाने जणु झोपाळ्यावर जयलक्ष्मीला बसवून केव्हा बरे मी तिचे वजन करीन असे एक वीर म्हणाला ॥ १४९ ॥ जे युद्धरसिक आहेत असे महान् पराक्रमी भट याप्रमाणे बोलत होते व प्रत्येक सैन्यात त्यावेळी योद्धयानी आपआपली शस्त्रे सज्ज ठेवली आणि ते अंगात कवच घालून सज्ज झाले ॥ १५० ।। Page #312 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-१५७) महापुराण (३०१ ततः कृतभयं भूयो भटभ्रकुटिजितः । पलायितमिव क्वापि परिच्छित्तिमगावहः ॥ १५१ अथारुष्यद्भटानीकनेत्रच्छायापिता रुचम् । दधान इव तिग्मांशुरासीदारक्तमण्डलः ॥ १५२ क्षणमस्ताचलप्रस्थकाननक्षमाजपल्लवैः । सदगालोहितच्छायो ददृशेऽकांशुसंस्तरः ॥ १५३ करगिर्यनसंलग्नर्भानुरालक्ष्यत क्षणम् । पातभीत्या करालाः करालम्बमिवाश्रयन् ॥ १५४ पतन्तं वारुणीसङ्गात्परिलुप्तविभावसुम् । नालम्बत बतास्ताविर्भानुं बिभ्यदिवैनसः ॥ १५५ गतो न दिनमन्वेष्टुं प्रविष्टो नु रसातलम् । तिरोहितोऽनु शृङ्गारस्ताने क्षि भानुमान् ॥ १५६ विघटय्य तमो नैशं करैराक्रम्य भूभृतः । विवावसाने पर्यास्थवहो रविरनंशुकः ॥ १५७ ।। यानन्तर वीरानी आपल्या भुवयानी वारंवार केलेल्या तिरस्कारामुळे जणु भिऊन पळून गेला की काय असा तो दिवस समाप्त झाला ॥ १५१ ।। यानन्तर रागावलेल्या वीरसैन्याच्या डोळ्यांच्या छायेने दिलेल्या कान्तीला जणु धारण करीत आहे असा हा सूर्य त्यावेळी ज्याचे लाल मण्डल झाले आहे असा दिसला।। १५२।। जेव्हा सूर्य अस्ताचलावर गेला तेव्हा त्याच्या शिखरावरील वनातील वृक्षांच्या कोवळ्या लाल पानासारखा त्याच्या किरणांचा विस्तार दिसू लागला ॥ १५३ ।। त्यावेळी अस्तपर्वताच्या शिखराला अवलंबिलेल्या आपल्या किरणानी सूर्य क्षणपर्यन्त पडण्याच्या भीतीने आपल्या किरणरूपी हातानी कोणाच्या तरी हाताचा आश्रय घेत आहे असा दिसला ॥ १५४ ॥ वारुणीच्या-दारूचा दुसरा अर्थ पश्चिम दिशेचा आश्रय केल्यामुळे ज्याचे तेजरूपी द्रव्य नष्ट झालेले आहे व जो खाली पडत आहे, अशा सूर्यास तो अस्त पर्वत जणु पापापासून भीत आहे असा झाला व त्याने सूर्याला धारण केले नाही. जसा एखादा मनुष्य दारू पिऊन रस्त्यावर पडतो व त्याच्या तोंडाची कांति लुप्त होते व त्याच्याजवळचे धनही नाहीसे होते व त्या दारुड्याला कोणीही मनुष्य पातकाच्या भीतीने स्पर्श करीत नाही तसे हा सूर्य पश्चिम दिशेच्या आश्रयाने पतन पावतो व त्याची कांति मंद होते. कांतिरूपी धन नष्ट होते व त्यामुळे पश्चिम पर्वताने-अस्तपर्वताने जणु पडत असलेल्या सूर्याला हस्तालंबन देऊन त्याला आश्रय दिला नाही. त्याला पडण्यापासून आवरून धरले नाही ।। १५५ ।।। त्यावेळी तो सूर्य दिवसाला हुडकण्यासाठी जणु गेला, किंवा पाताळात जणु त्याने प्रवेश केला किंवा अस्तपर्वताच्या शिखरांच्या अग्रभागानी जणु झाकून गेला असा तो सूर्य दिसेनासा झाला ।। १५६ ।। .. या सूर्याने रात्रीचा अंधार नाहीसा केला व आपल्या करानी-किरणानी सर्व भूभृताना-पर्वताना व्यापले व सर्व भूभृतांना-राजाना जसा एखादा पराक्रमी राजा आपल्या खंडणीच्या द्वारे आक्रमण करतो पण दिवसाच्या शेवटी सूर्य जसा अनंशुक होतो-किरणरहित होतो तसा एखादा पराक्रमी राजा दिवावसानाने आपली सद्दी पुण्य संपले म्हणजे अनंशुक नेसावयाच्या वस्त्रानेही रहित होतो तसा हा सूर्य दिवसाच्या शेवटी किरणरहित होतो॥ १५७ ।। Page #313 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३५-१५८ तिर्यङमण्डलगत्यैव शश्वद्भानुरयं भ्रमन् । विप्रकर्षाज्जनैर्मूढैरग्राहीव पतन्नधः ॥ १५८ व्यसनेऽस्मिन्दिनेशस्य शुचेव परिपीडिताः । विच्छायानि मुखान्यू हस्त मोरुद्धा दिगङ्गनाः ।। १५९ पद्मिन्यो म्लानपद्मास्या द्विरेफकरुणारुतैः । शोचन्त्य इव संवृत्ता वियोगादहिमत्विषः ॥ १६० सन्ध्यातपततान्यासन्वनान्यस्त महीभृतः । परीतानीव दावाग्निशिखयातिकरालया ॥ १६१ अनुरक्तापि सन्ध्येयं परित्यक्ता विवस्वता । प्रविष्टा वाग्निमारक्तच्छ विरालक्ष्यताम्बरे ॥ १६२ शनैराकाशवाराशिविद्रुमोद्यानराजिवत् । रुरुचे दिशि वारुण्यां सन्ध्यासिन्दूरसच्छविः ॥ १६३ चक्रवाकीमनस्तापदीपनो नु हुताशनः । पप्रथे पश्चिमाशान्ते सन्ध्यारागो जपारुणः ॥ १६४ सन्ध्यारागः स्फुरन्दिक्षु क्षणमंक्षि प्रियागमे । मानिनीनां मनोरागः कृत्स्नो मूर्च्छतिवैकतः ॥ १६५ ३०२) महापुराण हा सूर्य तिरकस अशा मण्डलाकार गतीनेच नेहमी भ्रमण करीत असतो. पण तो फार लांब गेल्यामुळे मूढलोकानी तो खाली पडत आहे अशी आपली समजूत करून घेतली आहे ।। १५८ ।। सूर्याच्या या संकटाच्या वेळी जणु शोकाने अंधाराने व्याप्त झाल्या व त्यांची मुखे निस्तेज झाली ॥ १५९ ॥ पीडित झालेल्या या दिशारूपी स्त्रिया सूर्याच्या वियोगाने ज्यांची कमलरूपी तोंडे म्लान - खिन्न झाली आहेत अशा पधिनी - दिवसा ज्यांची कमले प्रफुल्ल होतात अशा कमलवेली सूर्याच्या वियोगाने जणु भ्रमरांच्या गुंजारवरूपी करुणा उत्पन्न होईल अशा शब्दानी शोक करीत आहेत अशा वाटल्या ।। १६० ।। सायंकालच्या तांबूस किरणानी व्याप्त झालेली अशी अस्तपर्वतावरील वने अतिशय भयंकर अशा वनाग्नीच्या ज्वालानी जणु वेढली आहेत अशी दिसू लागली ।। १६१ ।। ही सन्ध्या जरी सूर्यावर प्रेम करीत होती तरीही तिचा त्याने त्याग केला. म्हणून जिची लाल कान्ति आहे अशा तिने अग्नीत प्रवेश केला जणु अशी ती आकाशात दिसू लागली ।। १६२ ॥ यानंतर पश्चिम दिशेकडे हळु हळु शेंदराप्रमाणे सुंदर कान्ति जिची आहे अशी संध्या पश्चिम दिशेत आकाशरूपी समुद्राच्या पोवळयांच्या बगीचांच्या पंक्तीप्रमाणे शोभू लागली ।। १६३ ॥ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लालभडक अशी संध्याकालाची कान्ति पश्चिम दिशेत जणु चक्रवाकीच्या मनात विरहतापाला वाढविणारा अग्नि आहे की काय अशी पसरली ।। १६४ ।। सर्व दिशामध्ये स्फुरण पावणारा वाढणारा हा सन्ध्याकालीनराग- तांबडा प्रकाश प्रिय पतीच्या येण्याच्या वेळचे मानी स्त्रियांच्या मनातील सर्व प्रेम जणु एकत्र जमले आहे की काय असा भासू लागला ।। १६५ ।। Page #314 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-१७३) महापुराण (३०३ घृतरक्तांशुका सन्ध्यामनुयान्ती दिनाधिपम् । बहुमेने सती लोकः कृतानुमरणामिव ।। १६६ चक्रवाकी धृतोत्कण्ठमनुयान्ती कृतस्वनाम् । विजहावेव चक्राङ्को नियति को नु लंघयेत् ॥ १६७ रवेः किमपराधोऽयं कालस्य नियतेः किम् । रथाङ्गमिथुनान्यासन्वियुक्तानि यतो मिथः ॥ १६८ घनं तमो विनार्केण व्यानशे निखिला दिशः । विना तेजस्विना प्रायस्तमो रुन्धेनुसन्ततम् ॥ १६९ तमोऽवगुण्ठिता रेजे रजनी तारकातता । विनीलवसना भास्वन्मौक्तिकेवाभिसारिका ॥ १७० ततान्धतमसे लोके जनरुन्मीलितेक्षणः । नादृश्यत पुरः किञ्चिन्मिथ्यात्वेनेव दूषितैः ॥ १७१ प्रसह्य तमसा रुखो लोकोऽन्ताकुलीभवन् । दृष्टिवैफल्यदृष्टर्नु बहुमेने शयालुताम् ॥ १७२ दीपिका रचिता रेजः प्रतिवेश्म स्फुरत्त्विषः । घनान्धतमसोद्भदे प्रक्लुप्ता इव सूचिकाः ॥ १७३ लाल किरणरूपी वस्त्र जिने धारण केले आहे व जी दिवसांचा अधिपति जो सूर्य त्यांच्या पाठीमागून जात आहे अशा सन्ध्येस जिने पतीच्या मरणानंतर स्वतः मरणाचा स्वीकार केला आहे. अशा सतीप्रमाणे लोकानी फार चांगले मानले ॥ १६६ ॥ ___ अतिशय उत्कण्ठेने जी आपल्या पाठीमागे येत आहे व जी शब्द करीत आहे अशा चक्रवाकीला चक्रवाकपक्षाने सोडून दिलेच. बरोबरच आहे की निश्चयाने अवश्य प्राप्त होणारे दुर्दैवाला कोण बरे उल्लंघू शकेल ? ॥ १६७ ॥ ज्याअर्थी ही चक्रवाक पक्ष्यांची जोडपी आपसात वियुक्त होतात यात सूर्याचा अपराध मानावा, का कालाचा अपराध मानावा किंवा नियतीचाच अपराध आहे असे मानावे ? ॥ १६८॥ त्यावेळी सूर्याच्या नसण्यामुळे दाट अंधाराने सर्व दिशा पूर्ण व्याप्त झाल्या. हे बरोबरच आहे कारण जेव्हा तेजस्वी पदार्थाचा अभाव होतो तेव्हा बहुत करून अंधार नेहमी सर्व आकाशाला व्यापून टाकतोच ।। १६९॥ ___अंधाराने सर्व बाजूनी व्याप्त झालेली व जिच्यात तारका चमकत आहेत अशी रात्र, जिने काळे वस्त्र आपल्या सभोवती धारण केले आहे व जिने मोत्याचे चमकणारे अलंकार धारण केले आहेत अशा अभिसारिकेप्रमाणे (प्रिय पुरुषाच्या समागमाकरिता ठरलेल्या ठिकाणी स्वतः जाणान्या स्त्रीप्रमाणे ) शोभू लागली ॥ १७० ॥ जसे मिथ्यादर्शनाने दूषित झालेल्या लोकाना पदार्थाच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होत नाही तसे सर्व पृथ्वी गाढ अंधकाराने व्याप्त झाल्यामुळे लोकानी आपले डोळे मोठे करून पाहिले तरीही त्यांना पुढे काही दिसेना ।। १७१ ॥ लोकाना बलात्काराने गाढ अंधाराने घेरले त्यामुळे ते मनात फार व्याकुळ झाले व आपली दृष्टि यावेळी विफल झाली आहे यास्तव आता आपण झोप घेणेच चांगले आहे असे ते समजू लागले ॥ १७२ ॥ । प्रत्येक घरात ज्यांची कान्ति पसरत आहे असे दिवे लावले गेले व ते दाट अंधाराला फोडण्यासाठी तयार केलेल्या सुयाप्रमाणे वाटू लागले ॥ १७३ ॥ Page #315 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०४) (३५-१७४ तमो विधूय दूरेण, जगदानन्दिभिः वरः । उदियाय शशी लोकं क्षीरेण क्षालयन्निव ।। १७४ अखण्ड मनुरागेण निजं मण्डलमुद्वहन् । सुराजेव कृतानन्दमुदगाद्विधुरुत्करः ।। १७५ वृष्ट्वैवाकृष्टहरिणं हरि हरिणलाञ्छनम् । तिमिरौषः प्रदुद्राव करियथसवृद्धमहान् ॥ १७६ तततारावली रेजे ज्योत्स्नापूरः सुधाच्छवेः । सबुद्बुद इवाकाशसिन्धोरोधः परिक्षरन् ॥ १७७ हंसपोत इवान्विष्यन् शशी तिमिरशैवलम् । तारासहचरी क्रान्तं विजगाहे नभःसरः ॥ १७८ तमो निःशेषमुद्भूय जगदाप्लावयन्करैः । प्रालेयांशुस्तदा विश्वं सुधामयमिवातनोत् ॥ १७९ तमो दूरं विषूयापि विधुरासीत्कलङकवान् । निसर्गजं तमो नूनं महतापि सुदुस्त्यजम् ।। १८० महापुराण यानंतर जगाला आनंदित करणाऱ्या किरणानी रात्रीच्या अंधाराला फार दूर घालविणारा आणि सर्व जगाला जणु दुधाने लोकाना धुवून स्वच्छ करीत आहे असा चन्द्र उदयाला आला ।। १७४ ।। जसा उत्तम राजा आपल्या अखंड देशाला प्रेमाने धारण करतो व सर्व प्रजाना आनंदित करतो तसे ह्या चन्द्रानें देखिल आपल्या लाल रंगाने युक्त अशा अखण्ड गोल बिम्बाला धारण केले होते. जसा राजा सर्व प्रजेपासून कर घेतो तसे या चन्द्राने चोहीकडे आपले किरण पसरले व तो उदयाला आला ।। ११५ ।। ज्याने हरिणाला ओढले आहे अशा सिंहाप्रमाणे हरिणाचे चिह्न धारण केलेल्या चन्द्राला पाहून हत्तींच्या कळपाप्रमाणे असलेला असा फार मोठा अंधाराचा समूह पळून गेला अर्थात् अंधार नाहीसा झाला ।। १७६ ।। चन्द्राच्या अमृताची कान्ति धारण करणारा असा प्रकाशाचा प्रवाह चोहोकडे पसरला होता व त्यात चान्दण्यांचा समूह शोभत होता. बुडबुड्यानी सहित आकाशगंगेचा प्रवाह जणु पसरल्याप्रमाणे शोभा उत्पन्न झालेली होती ।। १७७ ॥ जसा एखादा तरुण हंस आपल्या सहचरीसह सरोवरात शेवाळाचा शोध करीत विहार करतो तसा चन्द्ररूपी तरुण हंस आपल्या तारकारूपी सहचरीला बरोबर घेऊन आकाशरूपी सरोवरात अंधाररूपी शेवाळाला हुडकीत विहार करीत आहे ।। १७८ ॥ ज्याचे किरण शान्त-थंड आहेत अशा चन्द्राने सगळा अंधार आपल्या किरणानी नाहीसा केला व त्याने सर्व विश्वाला जगाला जणु अमृतमय केले ॥ १७९ ॥ या चन्द्राने सगळा अंधार नाहीसा केला तरीही तो कलङ्कयुक्तच राहिला. यावरून आम्हाला असे वाटते की, मोठ्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वाभाविक असलेले तम- काळोखी - अज्ञान हे ते नष्ट करू शकत नाहीत असे वाटते ॥ १८० ॥ Page #316 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-१८८) महापुराण (३०५ भिषजेव करैः स्पृष्टा विशस्तिमिरभेदिभिः । शनर्देश इवालोकमातेनुः शिशिरत्विषा ॥ १८१ इति प्रदोषसमये जाते प्रस्पष्टतारके । सौधोत्सङ्गभुवो भेजुः पुरन्ध्न्यः सहकामिभिः ॥ १८२ चन्दमद्रवसिक्ताग्यः स्त्रग्विण्यः सावतंसिकाः । लसवाभरणा रेजुस्तन्व्यः कल्पलता इव ॥ १८३ इन्दुपावैः समुत्कर्षमागान्मकरकेतनः । तदोवन्वानिवोढेलो मनोवृत्तिषु कामिनाम् ॥ १८४ रमणा रमणीयाश्च चन्द्रपादाः सचन्दनाः । मदाश्च मवनारम्भमातन्वन्रमणीजने ॥ १८५ शशाडकरजैत्रास्त्रस्तर्जयन्निखिलं जगत् । नृपवल्लभिकावासान्मनोभूरभ्यषणयत् ॥ १८६ नास्वादि मदिरा स्वरं ना जत्रे न करेऽपिता । केवलं मदनावेशातरुण्यो भेजुरुकताम् ॥ १८७ उत्सङ्गसगिनी भर्तुः काचिन्मदविणिता । कामिनी मोहनास्त्रेण बतानङ्गेन तजिता ॥ १८८ जसे वैद्य आपल्या हातानी लोकांच्या डोळ्याना स्पर्श करून त्यातील तिमिररोग नाहीसा करतो व त्यामुळे लोकांचे डोळे प्रकाशयुक्त होतात तसे चन्द्राने अंधकाराचा नाश करणाऱ्या आपल्या थंड कांतीच्या किरणानी दिशाना स्पर्श केला व त्यामुळे त्यांच्यातून हळु हळु प्रकाश बाहेर पडू लागला अर्थात् दिशा चन्द्रप्रकाशाने जननेत्राप्रमाणे स्वच्छ कान्तियुक्त झाल्या ॥ १८१॥ याप्रमाणे रात्रीला प्रारंभ झाल्यावर आकाशात तारकांचा समूह स्पष्ट दिसू लागला. तेव्हा स्त्रियानी आपल्या पतीसह प्रासादांच्या वरच्या मजल्यांचा आश्रय घेतला ॥ १८२ ।। चन्दनाची उटी ज्यांनी आपल्या अंगाला लावली आहे व ज्यांनी आपल्या गळयात माळा घातल्या आहेत, ज्यांचे कान आभूषणानी भूषित झाले आहेत व ज्यांचे इतर अलंकार फार चमकत आहेत अशा त्या सुन्दर स्त्रिया कल्पवल्लीप्रमाणे शोभू लागल्या ॥ १८३ ॥ चन्द्राच्या किरणानी समुद्र जसा मर्यादेचे उल्लंघन करितो, त्याप्रमाणे कामिजनांच्या मनात मदन फार वाढला ॥ १८४ ॥ अन्तःकरणास रमविणारे असे आवडते पति, चन्दनाच्या उटीवर पडलेले चन्द्राचे किरण, मद उत्पन्न करणारे पदार्थ यांनी स्त्रियांच्या मनात कामविकाराची वृद्धि केली ॥१८५॥ चन्द्राचे किरण हेच जगाला जिंकणारी अस्त्रे त्यांनी सर्व जगाला त्रस्त करणाऱ्या मदनाने राजस्त्रियांच्या मंदिरावर आक्रमण केले ॥ १८६ ।। त्या तरुण स्त्रियांनी यथेच्छ दारु प्राशन केली नाही. तिचा वास घेतला नाही किंवा ती हातातही घेतली नाही पण केवल मनात मदनाचा आवेश उत्पन्न झाल्यामुळे त्या पतिविषयी उत्सुक झाल्या ॥ १८७॥ मदाने उन्मत्त झालेली व आपल्या पतीच्या मांडीवर बसलेली अशा एका स्त्रीला मदनाने आपल्या मोहनास्त्राने घाबरे केले ।। १८८ ।। म.३९ Page #317 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण ( ३५-१८९ सखोवचनमुल्लङ्घ्य भक्त्वा मानं निरर्गला । प्रयान्ती रमणावासं काप्यनङ्गेन धीरिता ॥ १८९ शम्फलीवचनंर्द्वना काचित्पर्यश्रुलोचना । चक्राह्वेव भृशं तेपे नायाति प्राणवल्लभे ।। १९० शून्यगानस्वनैः स्त्रीणामलिज्याकलझङ्कृतैः । पूर्वरङ्गमिवानङ्गो रचयामास कामिनाम् ॥ १९१ गोत्रस्खलनसम्बद्धमन्युमन्यामनन्यजः । नोपक्षिष्ट प्रियोत्सङ्गमनयन्नवसङ्गताम् ॥ १९२ नेन्दुपादैर्धृति लेभे नोशीरैर्नजलार्द्रया । खण्डिता मानिनी काचिवन्तस्तापे बलीयसि ॥ १९३ काचिदुत्तापिभिर्बाणैस्तापितापि मनोभुवा । नितम्बिनी प्रतीकारं नेच्छयविलम्बिनी ॥ १९४ अनुरक्ततया दूरं नीतया प्रणयोचिताम् । भूमि यूनान्यया सोढः सन्देशः परुषाक्षरः ॥ १९५ ३०६) एका स्त्रीने आपल्या मैत्रिणीचे सांगणे मान्य केले नाही, आपला अभिमान तिने बाजूला सारला व ती आपल्या प्रियपुरुषाच्या घराकडे मदनाने तिला धैर्य दिल्यामुळे गेली ।। १८९ ।। दासीच्या सांगण्याने जिचे मन दुःखी झाले आहे व त्यामुळे जिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली आहे, अशी कोणी स्त्री तिचा पति न आल्यामुळे चक्रवाकीप्रमाणे फार दुःखी झाली ।। १९० ॥ मोहाने बेफाम बनलेल्या स्त्रियांच्या गाण्याने आणि भुंग्यांच्या मधुर गुंजारवाने कामी पुरुषांच्या मनात मदनाने जणु पूर्वरंगाला प्रारंभ केला की काय ? तात्पर्य- कामाने बेहोश होऊन गाणे व भुंग्यांचा गुंजारव याने पुरुषांच्या मनात मदनविकाराला सुरुवात झाली ॥। १९१ ।। आपल्या पतीने चुकीने अन्य स्त्रीचे नाव घेतल्यामुळे जिच्या मनात कोप उत्पन्न झाला आहे अशा कोण्या नवविवाहित स्त्रीची मदनाने उपेक्षा केली नाही अर्थात् ती रुसली जरी तरीही तिच्या मनाला मदनाने आपल्या बाणांनी घायाळ केले व त्याने तिला तिच्या पतीकडे नेले ॥ ९९२ ॥ जिची मानखंडना झाली आहे अशी कोणी अभिमानी स्त्री अन्तःकरणात ताप अधिक उत्पन्न झाल्यामुळे फारच रागावली. त्यामुळे तिचा राग चन्द्राच्या किरणानी, पांढऱ्या वाळयाने व काळ्या वाळयानेही शान्त झाला नाही ॥ १९३ ॥ कोण्या गंभीर अन्तःकरणाच्या स्त्रीला आपल्या संताप देणाऱ्या बाणानी मदनाने त्रस्त केले होते तरीही तिने धैर्याचा अवलम्ब केला व त्या बाणांचा प्रतीकार केला नाही. तो ताप शान्त करण्याकरिता ती पतीकडे गेली नाही ॥। १९४ ।। कोण्या तरुण पुरुषाने प्रेमाने भरलेल्या आपल्या अन्यस्त्रीला प्रेम करण्यायोग्य कोणत्या दूर अशा स्थानी नेले होते व तेथे त्याने तिला कठोर शब्दानी आपली आज्ञा कळविली पण ती अतिप्रेमामुळे तिने सहन केली ॥। १९५ ।। Page #318 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-२०३) महापुराण (३०७ आलि तमालिक ब्रूहि गतः किन विलक्षताम् । प्रियानामाक्षरः क्षीणैर्मोहान्मय्यवतारितः ॥ १९६ यथा तव हृतं चेतस्तया लज्जाप्यहारि किम् । येन निस्त्रप भूयोऽपि प्रणयोऽस्मासु तन्यते ॥ १९७ सैवानुवर्तनीया ते सुभगम्मन्य मानिनी । अस्थाने योजिता प्रीतिर्जायतेऽनुशयाय ते ॥ १९८ इति प्राणप्रियां काञ्चित्सन्दिशन्ती सखोजने। युवा सादरमभ्येत्य नानुनिन्येऽथ मानिनीम् ॥१९९ चन्द्रपादास्तपन्तीव चन्दनं वहतीव मां । सन्धुक्ष्यत इवामीभिः कामाग्नियंजनानिलैः ॥ २०० तमानयानुनीयेह नय मां वा तदन्तिकम् । त्वदधीना मम प्राणा प्राणेशे बहुवल्लभे ॥२०१ इत्यनङ्गातुरा काचित्सन्दिशन्ती सखी मिथः । भुजोपरोधमाश्लेषि पत्या प्रत्यग्रखण्डिता ॥ २०२ राज्ये मनोभवस्यास्मिन्स्वरं रंरम्यतामिति । कामिनीकलकाञ्चीभिरुदघोषीव घोषणा ॥ २०३ कोणी स्त्री आपल्या मैत्रिणीला सांगत होती की हे सखि, प्रियाने हळू उच्चारिलेल्या व तीच ही आहे अशा भ्रमाने माझ्याकडे लावलेल्या आपल्या गुप्त असलेल्या प्रियेच्या नामाक्षरानी तो प्रिय चकित झाला होता काय ? ते मला खरे सांग ॥ १९६ ।। दुसऱ्या स्त्रीवर अनुरक्त झालेल्या प्रियाला उद्देशून कोणी एक तरुण स्त्री त्याला असे म्हणते. 'हे निर्लज्जा जिने तुझे मन आकर्षण करून घेतले आहे तिने तुझी लज्जाही हरण करून नेली काय ? आता तू आम्हावर पुनः कां प्रेम करीत आहेस ?' || १९७ ॥ कोणी स्त्री आपल्या पतीला हिणवित होती, हे प्रिय आपण स्वतः सौभाग्यशाली समजत आहात म्हणून मी म्हणते की त्याच मानी स्त्रीची आपण सेवा करा कारण अयोग्यस्थानी योजिलेली प्रीति आपणास पश्चात्तापास कारण होईल. माझ्यावर प्रेम करण्याने आपणास संतापदुःख होईल म्हणून आपण त्या आवडत्या स्त्रीकडे जा ।। १९८॥ याप्रमाणे आपल्या मैत्रिणीसमुदायात बोलणाऱ्या कोणा अहंकारयुक्त स्त्रीला तिचा तरुण पति तिच्याकडे येऊन त्याने आदराने तिचा अनुनय केला नाही काय? अर्थात् अनुनय केलाच ॥ १९९ ॥ कोणी स्त्री आपल्या मैत्रिणीला असे सांगत होती " हे चन्द्राचे किरण मला जणु सन्तप्त करीत आहेत. मला ही चन्दनाची उटी आगीप्रमाणे भाजते व या पंख्याच्या वाऱ्यानी हा कामाग्नि पेटत आहे, यास्तव हे सखि, तू माझ्या पतीला विनवणी करून येथे मजकडे आण किंवा मला तरी त्याच्याकडे ने. माझा पति अनेक वल्लभानी युक्त आहे ॥ २००-२०१॥ याप्रमाणे कामपीडित होऊन कोणी स्त्री आपल्या सखीला आपसात बोलत असता इतक्यात तिचा पति तिथे आला व त्याने नवीन विरहिणी अशा आपल्या पत्नीला आपल्या दोन बाहूंनी पकडून आलिंगन दिले ॥ ॥ २०२ ॥ या मदनाच्या राज्यात मनसोक्त-यथेच्छ क्रीडा करा अशी जणु स्त्रियांच्या मधुर शब्द करणाऱ्या कंबरपट्टयांनी दौंडी पिटविली की काय ? ॥ २०३ ॥ Page #319 -------------------------------------------------------------------------- ________________ ३०८) महापुराण (३५-२०४ कर्णोत्पलनिलीनालिकुलकोलाहलस्वनः । उपजेपे किमु स्त्रीणां कर्णजाहे मनोभुवा ॥ २०४ स्तनाङ्गरागसम्म> परिरम्भोऽतिनिर्दयः । ववृधे कामिवृन्देषु रभसश्च कचग्रहः ॥ २०५ आरक्तकलुषा दृष्टिर्मुखमापाटलाधरम् । रतान्ते कामिनामासीत्सीत्कृतं वासकृत्कृतम् ॥ २०६ पुष्पसंमर्दसुरभीरालस्तजघनांशुका । सम्भोगावसतौ शय्या मिथुनान्यध्यशेरत ॥ २०७ कैश्चिद्वीरभटै विरणारम्भकृतोत्सवः । प्रियोपरोधान्मन्देच्छरप्यासेवि रतोत्सवः ॥ २०८ केचित्कीर्त्यङ्गनासङ्गसुखसङ्गकृतस्पहाः । प्रियाङ्गनापरिष्वङ्गमङ्गीचक्रुर्न मानिनः ॥ २०९ निजितारिभटै ग्याः प्रिया नास्माभिरन्यथा । इति जातिभटाः केचिन्न भेजुः शयनान्यपि ॥२१० शरतल्पगतानल्पसुख सङ्कल्पतः परे । नाभ्यनन्दन्प्रियातल्पमनल्पेच्छा भटोत्तमाः॥ २११ कानावर ठेवलेल्या कमलात दडलेल्या भुंग्याच्या गुंजारवानी मदनाने स्त्रियांच्या कानांच्या मुळाजवळ काही गुप्त गोष्ट जणु सांगितली असावी ।। २०४ ।। स्तनाना लावलेल्या उटण्याला पुसून टाकणारे अतिशय निर्दय-गाढ आलिङ्गन आणि वेगाने केश पकडणे या दोन क्रिया कामिजनात फार वाढल्या ।। २०५ ॥ स्त्रीसंभोगानंतर कामिजनांचे डोळे थोडेसे लाल काळसर झाले आणि तोंड ज्यात खालचा ओठ किञ्चित् गुलाबी झाला आहे असे बनले. तसेच ज्यात वारंवार सीत्कार शब्द होत आहे असे झाले ।। २०६ ॥ संभोग समाप्त झाल्यानंतर पुष्पांच्या चुरगाळण्याने सुगन्धित व जिच्यावर ढुंगणावरचे वस्त्र गळून पडले आहे अशा शय्येवर ती जोडपी त्यावेळी झोपली ।। २०७॥ त्यावेळी पुढे होणाऱ्या युद्धारंभाचे उत्साहात ज्याचे मन गढून गेले आहे असे व ज्याची इच्छा मंद आहे अशा वीरभटानी स्त्रियांच्या आग्रहाने इच्छा मंद असताही संभोगाच्या उत्सवाचे सुख अनुभविले ॥ २०८ ।। कीर्तिरूपी स्त्रीच्या आलिंगनसुखाची ज्यांनी इच्छा धारण केली आहे अशा काही अभिमानी योद्धयांनी आपल्या प्रियस्त्रियांच्या आलिंगनांचा आदर केला नाही ।। २०९ ।। ज्यांनी शत्रूचे वीर योद्धे जिंकले आहेत अशा प्रकारच्या आम्हाकडून स्त्री भोगली जावी, नाही तर तिला भोगू नये असा विचार करून कित्येक कुलीन वीरानी शयनाचाही त्याग -केला ॥ २१० ॥ ज्यांची इच्छा मोठी-उदात्त आहे अशा कित्येक महायोद्धयानी बाणांच्या शय्येवर झोपण्याने फार मोठे सुख प्राप्त होते असा संकल्प केला व त्यानी स्त्रीशय्येची इच्छा धरली नाही ।। २११॥ Page #320 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-२१९ ) महापुराण स्वकामिनीभिरारब्धवीरालापैर्भटः परैः । विभावरी विभातापि सा नावेदि रणोन्मुखैः ॥ २१२ केचिद्रण रसासक्तमनसोऽपि पुरः स्थितम् । कान्तासङ्गरसं स्वैरं भेजुः समरसा भटाः ॥ २१३ प्रहारकर्कशोदष्टदशनच्छदनिष्ठुरः । रतारम्भो रणारम्भनिर्विशेषो न्यषेवि तैः ॥ २१४ रतानुवर्तनैर्गाढं परिरम्भर्मुखार्पणः । मनांसि कामिनां जन्तुः कामिन्यस्ताः स्मरातुराः ॥ २१५ दुगवीक्षितैः सान्तहर्मन्मनजल्पितेः । अकाण्डरुषितैश्चण्डेविवृत्तं रसमश्रुभिः ॥ २१६ तासामकृतकस्नेहगर्भः कृतककैतवैः । रसिकोऽभूद्रतारम्भः सम्भोगान्तेषु कामिनाम् ॥ २१७ तेषां निषुवनारम्भमतिभूमिगतं तदा । सन्द्रष्टुमसहन्तीव पर्यवर्तत सा निशा ।। २१८ अलं बत चिरं रवा दम्पती ताम्यथो युवाम् । लम्बितेन्दुमुखी तस्थावितीवापर दिग्वधूः ॥ २१९ (३०९ युद्धाला जाण्यासाठी उत्सुक झालेले कांही योद्धे आपल्या स्त्रियाबरोबर वीर योद्ध्यांच्या गोष्टी सांगण्यात तल्लीन झाले त्यामुळे त्याना रात्र उजाडलेली माहितच झाली नाही ॥ २१२ ॥ कांही योद्धे रणलक्ष्मीवर आसक्त झाले होते. तथापि पुढे आलेल्या कान्तासंभोगाच्या रसात व युद्धरसात समानता मानून त्यांनी स्त्रीसंभोगरसाचा यथेच्छ अनुभव घेतला ।। २१३ ॥ त्या योद्ध्यांनी रणाच्या प्रारंभाप्रमाणेच संभोगाचा प्रारंभ केला होता. रणाचा प्रारंभ एकमेकाना प्रहार करण्यामुळे कठोर असतो तसा संभोगाचा प्रारंभही परस्पराना प्रहार करणे अर्थात् केस पकडणे, नखानी क्षत करणे यामुळे कठोर होता. जसा रणाचा प्रारंभ ओठ चावण्याने निर्दय असतो, तसाच संभोगाचा प्रारंभही ओठांच्या चुम्बनादिकानी निर्दय होता. अशा संभोगरसाचे त्या योद्ध्यानी सेवन केले ॥ २१४ ॥ मदनाने उत्कण्ठित झालेल्या त्या स्त्रियानी रतिकाली पतीच्या इच्छेप्रमाणे वागणे, गाढ आलिंगन देणे, चुम्बनासाठी मुख पुढे करणे वगैरे क्रियानी पतीच्या मनाला वश केले ।। २१५ ।। वाकड्या नजरेने बघणे, थोडेसे हसून अस्पष्ट बोलणे, मध्येच क्रोधयुक्त होणे, एकदम जोराने तोंड फिरविणे, भुवया वाकड्या करणे, स्वाभाविक प्रीतीने अनेक कृत्रिम भाव वरून दाखविणे वगैरे समागमाच्या वेळी केलेले जे स्त्रियांचे मनोहर व्यापार त्यानी विलासी पुरुषांचा 'पुढील सुखप्रसंग मोठा रसयुक्त आल्हाददायक झाला ।। २१६-२१७ ।। त्यावेळी त्या विलासी पुरुषांच्या अमर्याद झालेल्या सुखोद्योगास पाहून जणु कंटाळली अशी ती रात्र परतली अर्थात् पाहाटेची वेळ झाली ॥। २१८ ॥ फार वेळ क्रीडा केली आता पुरे करा, तुम्ही दोघेही पतिपत्नी म्लान व्हाल जणु असे बोलून तिने आपले चन्द्ररूपी तोंड खाली केले आहे अशी पश्चिमदिशारूपी स्त्री उभी राहिली ॥ २१९ ॥ Page #321 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१०) महापुराण (३५-२२० विघटय्य रथाङगानां मिथुनानि मियोंऽशमान् । तापेन तत्कृतेनेव परीतोऽभ्युदियाय सः ॥ २२० तावदासीदिनारम्भो गतं नेशं तमो लयम् । सहस्रांशुर्दिशं प्राची परिरेभे करोत्करैः ॥ २२१ किरणस्तरुणैरेव तमः शार्वरमुद्धृतम् । तरणेः करणीयं तु दिनश्रीपरिरम्भणम् ॥ २२२ कोककान्तानुरागेण समं पद्माकरं श्रियम् । पुष्णनुष्णांशुरुद्यच्छन् अमुष्णात्कौमुदीं श्रियम् ॥ २२३ तमःकवाटमद्घाटय विडमुखानि प्रकाशयन् । जगदुद्धाटिताक्षं वा व्यधादुष्णकरः करैः ॥ २२४ प्रातस्तरामथोत्थाय पद्माकरपरिग्रहम् । तन्वन्भानुः प्रतापेन जिगीषोवृत्तमन्वगात् ॥ २२५ सुकण्ठाः पेठुरत्युच्चः प्रभोः प्राबोधिकास्तदा । स्वयं प्रबुद्धमप्येनं प्रबोधनयुयुक्षवः ॥ २२६ अशिशिरकरो लोकानन्दी जनैरभिनन्दितः । बहुमतकरं तेजस्तन्वनितोऽयमदेष्यति ॥ नवर जगतामुद्योताय त्वमप्युदयोचितम् । विधिमनुसरन् शय्योत्सङ्ग जहीहि मदे श्रियः ॥ २२७ पूर्व दिवशी सूर्याने चक्रवाकपक्ष्यांच्या जोडप्याना आपसात एकमेकाना वियुक्त केले होते, वेगवेगळे केले होते. त्यामुळे त्यानी केलेल्या तापाने जणु व्याप्त होऊन तो सूर्य उगवला ।। २२० ॥ तितक्यात दिवसाला प्रारम्भ झाला व रात्रीचा अन्धार नाहीसा झाला व हजारो किरणांचा धारक सूर्य उगवला आणि त्याने आपल्या किरणसमूहाने पूर्व दिशेला आलिंगिले॥२२१॥ सूर्याने आपल्या तरुण कठोर किरणानी रात्रीचा अंधार नाहीसा केला व आता दिवस- श्रीला आलिंगन करणे हेच फक्त कर्तव्य राहिले ।। २२२ ॥ सूर्यानेच कवीच्या प्रेमाबरोबर कमलसमूहाच्या शोभेला पुष्ट केले आणि रात्रिविकासी कमलाच्या शोभेला त्याने नष्ट केले, हरण केले ।। २२३ ॥ ___ अंधाररूपी दरवाजा उघडून दिशांची मुखे उज्ज्वल करणाऱ्या सूर्याने आपल्या किरणानी सर्व जगाचे डोळे जणु उघडले असे कार्य केले ॥ २२४ ॥ जसा पराक्रमाने विजयाची इच्छा करणारा राजा प्रातःकाली उठून लक्ष्मीच्या हाताचा स्वीकार करतो तसे हा सूर्य प्रातःकाली उगवला आणि त्याने पद्माकर-सूर्यविकासी कमलांची उत्पत्ति जेथे होते अशा सरोवरांचा स्वीकार केला अर्थात् सरोवरातील कमले विकसित केली ।। २२५ ।।। ज्यांचा कण्ठ सुरेल आहे, असे बाहुबलीचे भाटजन स्वतः जागृत झालेल्या अशाही या बाहुबली राजास पुनः अधिक जागृत करण्यास उद्युक्त होऊन मोठ्या स्वराने मंगलपाठ म्हणू लागले ॥ २२६ ॥ हे मनुष्यश्रेष्ठा, लोकाना आनंद देणारा व लोकानी ज्याची स्तुति केली आहे असा हा सूर्य सर्व जगाला प्रकाशित करण्यासाठी उदयाला येईल व हे प्रभो आपणही सर्वाना उन्नत करण्यासाठी योग्य विधि करून लक्ष्मीला आनंदित करण्यासाठी आता शय्येच्या मध्यभागाचा त्याग करा ॥ २२७॥ Page #322 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-२३२) कतरकतमे नाक्रान्तास्ते बलैर्बलशालिनः । भुजबलमिदं लोकः प्रायो न वेत्ति तवाल्पकः ॥ भरतपतिना सार्धं युद्धे जयाय कृतोद्यमः । नृपवर भवान्भूयाद्भर्ता नृवीर जयश्रियः ॥ २२८ रविरविरलान व्रातानिवाश्रमशाखिनाम् । तुहिनकणिकाव्रातानाशु प्रमृज्य करोत्करैः ॥ अयमुदयति प्राप्तानन्वैरितोऽम्बुजिनीवनैः । उदयसमये प्रत्युद्यातो धृतार्घमिवाम्बुजेः ॥ २२९ अयमनुसरन्कोकः कान्तां तन्टान्तरशायिनीम् । अविरलगलद्वाष्पव्याजादिवोत्सृजती शुचम् ॥ विशति बिसिनी पत्रच्छलां सरोजसरस्तटीम् । सरसिजरजः कोणी पक्षौ विधूय शनैः शनैः ॥ २३० जर बिसिनो कन्दच्छायामुषस्तरलास्त्विषः । तुहिन किरणो दिक्पर्यन्तादयं प्रतिसंहरन् ॥ अनकुमुदिनीखण्डं तन्वन् करानमृतश्च्युतः । द्रढयति परिष्वङ्गासङ्ग वियोगभयादिव ।। २३१ तिमिरकरिणां यूथं भित्त्वा तदत्रपरिप्लुतामिव । तनुमयं बिभ्रच्छोणां निशाकरकेसरी ॥ वनमिव नभः क्रान्त्वास्ताद्रेर्गुहागहनान्यतः । श्रयति नियतं निद्रासङ्गाद्विजिह्मिततारकः ॥२३२ महापुराण ( ३११ हे नृपश्रेष्ठा, तुझ्या सैन्यानी कोणते कोणते राजे जिंकले नाहीत बरे ? हे मनुष्यातील श्रेष्ठवीरा, प्रायः हे तुच्छ लोक तुझ्या बाहूंचे बल जाणत नाहीत. हे प्रभो, तू आता भरतपति अशा भरतराजाबरोबर लढून युद्धात जय मिळविण्यास उद्युक्त झाला आहेस. हे नृपश्रेष्ठा, तू जयलक्ष्मीचा भर्ता - स्वामी हो ।। २२८ ॥ अविरल-सारखे पडत असलेले जणु अश्रुसमूह की काय ? असे जे दवांचे कणसमूह त्याना आपल्या किरणसमूहानी पुसून हा सूर्य उदयाला येत आहे व ज्याना आनंद प्राप्त झाला आहे अशी कमलवने सूर्याच्या उदयसमयी कमलांचा अर्ध घेऊन त्याचे स्वागत करीत आहेत असे वाटते. असा हा सूर्य उदयास येत आहे ।। २२९ ।। निरन्तर गळणाऱ्या अश्रूंच्या मिषाने जणु शोकाला बाहेर टाकीत आहे अशी व सरोवराच्या दुसन्या तटावर निजलेली अशा आपल्या मादीकडे जाणारा हा कोकपक्षी आपले कमलाच्या परागानी भरलेले दोन पंख हलवून कमलिनीच्या पानानी आच्छादित झालेल्या कमलयुक्त सरोवराच्या तीराकडे हळू हळू जात आहे ॥ २३० ॥ जुनाट झालेला जो कमलिनीचा शुभ्र कंद त्याची कान्ति हरण करणाऱ्या व अमृतस्रवणाऱ्या आपल्या किरणाना दिशांच्या अन्तापासूत हरण करणारा हा चन्द्र शुभरात्री विकासी कमलाना जणु वियोगभीतीमुळे आलिंगनाचा संबन्ध दृढ करीत आहे ।। २३१ ।। या चन्द्ररूपी सिंहाने अंधाररूपी हत्तीच्या कळपांचा संहार केला व त्याच्या रक्तानी सर्व बाजूनी याचे शरीर भरून गेले व त्यामुळे जणु हा लाल शरीराचा बनला - दिसू लागला. यानन्तर जणु वनाप्रमाणे भासणारे आकाश उल्लंघून या चन्द्रसिंहाने अस्तपर्वताच्या गुहानी युक्त अरण्याचा मार्ग आश्रयिला आणि निद्रेमुळे ज्याचे तारारूपी डोळे थोडेसे म्लान झाले आहेत असा होऊन त्यांचा ( त्या अस्तपर्वताच्या ) गुहावनांचा खरोखर आश्रय घेत आहे असे वाटते ।। २३२ ॥ Page #323 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१२) महापुराण (३५-२३३ सरति सरसीतीरं हंसः ससारसकूजितम् । झटिति घटते कोकद्वन्द्वं विशामपि वाधुना ॥ पतति पततां वृन्दं विष्वक् ब्रुमेषु कृतारवम् । गतमिव जगत्प्रत्यापत्ति समुधति भास्वति ॥ २३३ उदयशिखरिग्रावधेणीसरोव्हरागिणी । गगनजलधेरातन्वाना प्रवालवनश्रियम् ॥ दिगिभवदने सिन्दूरश्रीरलक्तकपाटला । प्रसरति तरां सन्ध्यादीप्तिदिगाननमण्डनी ॥ २३४ कमलमलिनी नालं वेष्टुं बत प्रविकस्वरम् । गतमरुणतां बालार्कस्य प्रसारिभिरंशभिः ॥ परिगतमिब प्रादुष्यद्भिः कणरनिलाचिषाम् । नियतविपदं धिग्व्यामूढि विवेकपराडमुखीम् ॥२३५ उपवनतरुनाधुन्वाना विलोलितषट्पदाः । कृतपरिचया वीचीचक्रः सरस्सु सरोरुहाम् ।। रतिपरिमलानाकर्षन्तः सरोजरजोजडाः । प्रतिदिशममी मन्वं वान्ति प्रगेतनमारुताः ॥ २३६ नपवर जिनभर्तुगालेरेभिरिष्टः । प्रकटितजयघोषस्त्वं विबुध्यस्व भूयः ॥ भवति निखिलविघ्नप्रप्रशान्तिर्यतस्ते । रणशिरसि जयश्रीकामिनीकामुकस्य ॥ २३७ __ या सूर्याचा उदय होत असता, जेथे सारस पक्षी किलबिल करीत आहेत अशा सरोवराच्या तीराकडे हा हंस जात आहे व हे कोकपक्षाचे जोडपे जणु शापमुक्त होऊन आता शीघ्र एकमेकास भेटत आहे. चोहीकडे पक्ष्यांचा समूह शब्द करीत प्रत्येक झाडावर उडून जात आहे. जणु हा सूर्य उगवत असता हे जगत् जणु पूर्वस्थितीप्रत पोहोचत आहे असे वाटते ॥२३३ ॥ उदयपर्वताच्या दगडांच्या समूहात उत्पन्न झालेल्या स्थलकमलाप्रमाणे ही लाल प्रातःकालची कान्ति दिसत आहे व ती जणु आकाशरूपी समुद्राच्या पोवळ्याच्या वनाची शोभा धारण करीत आहे व दिग्गजाच्या मुखावरील शेंदुराच्या शोभेप्रमाणे भासत आहे, किंवा अदित्याप्रमाणे लाल वाटत आहे, अशीही प्रातःकालाची कान्ति सर्वदिशांच्या मुखाना भूषविणारी शोभत आहे. ॥ २३४ ॥ बालसूर्याच्या सर्वत्र पसरणाऱ्या लाल किरणानी कमल व्याप्त झाले असता ज्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत अशा अग्नीने हे कमल व्याप्त झाले आहे अशी भ्रान्ति भ्रमरीला झाली व ती त्या कमलात प्रवेश करण्यास धजेना जिच्यापासून निश्चयाने आपत्ति प्राप्त होते व जिच्यामुळे विवेकापासून प्राणी विमुख होतो अशा मूढतेला धिक्कार असो ॥ २३५ ॥ जे बगीचातील वृक्षाना हालवित आहेत, ज्यानी भुवयाना चंचल बनविले आहे, कमलयुक्त सरोवरातील लहरीशी जे संबंध पावले आहेत, सुरतप्रसंगी अंगाला लावलेल्या सुगंधित उटीच्या सुगंधाना जे वाहून नेत आहेत व कमलांच्या परागानी ज्याना जडपणा आलेला 'आहे असे सकाळचे वारे प्रत्येक दिशाकडे मंदमंदपणाने वाहत आहेत ।। २३६ ।। ज्यात जयजय अशा शब्दांचा वारंवार घोष होत आहे अशा श्रीजिनेश्वराच्या हितकर मंगल गीतानी हे राजश्रेष्ठा तू पुनः जागा हो! युद्धामध्ये जयलक्ष्मीरूपी स्त्रीची इच्छा करणाऱ्या अशा तुझ्या संपूर्ण विघ्नांची पूर्णशान्ति होत आहे ॥ २३७ ॥ Page #324 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-२४२) महापुराण जयति दिविजमाथैः प्राप्तपूर्जाद्ध रहेन् । घुतदुरितपरागो वीतरागोऽपरागः ॥ कृतनतिशतयज्वप्रज्वलन्मौलिरत्नच्छुरित रुचिररोचिर्मञ्जरी पिञ्जराङघ्रिः ॥ २३८ जयति जयविलासः सूच्यते यस्य पौष्पर लिकुलरुत गर्भे निर्जितानङ्गमुक्तैः ॥ अनुपदयुगमस्त्रैर्भङगशोकादिवाविष्कृतकरुणनिनादैः सोऽयमाद्योजिनेन्द्रः ॥ २३९ जयति जितमनोभूर्भूरिधाम्ना स्वयम्भूजिनपतिरपरागः क्षालितागः परागः ॥ सुरमुकुट विटङ्कोढपादाम्बुजश्रीजंगद जगदगारप्रान्तविश्रान्तबोधः ॥ २४० जयति मदनबाणैरक्षतात्मापि योऽधात्रिभुवनजयलक्ष्मीकामिनीं वक्षसि स्वे ॥ स्वयमवृत च मुक्तिप्रेयसी यं विरूपाप्यनवमसुखताति तन्वती सोऽयमर्हन् ॥ २४१ जयति समरभेरीभैरवारावभीमम् । बलमरचि न कूजच्चण्डको दण्डकाण्डम् ॥ भृकुटिकुटिलमास्यं येन नाकारि वोच्चैर्मनसिजरिपुघाते सोऽयमाद्यो जिनेन्द्रः ॥ २४२ नमस्कार करणाऱ्या देवेन्द्राच्या चमकणाऱ्या किरोटातील रत्नांच्या पसरलेल्या सुन्दर कान्तींच्या मंजरीनी ज्यांचे पाय पिंगट झाले आहेत व देवेन्द्राकडून ज्याना पूजेचा महोत्सव प्राप्त झालेला आहे, ज्यानी पातकांची धूळ उडविली आहे व विषयप्रीति ज्यांची नष्ट झाली आहे, असे रागद्वेषादिदोषानी रहित अर्हत्परमेश्वर नेहमी उत्कर्ष पावत आहेत ।। २३८ ।। ( ३.१३ ज्यांच्या आत भुंगे गुंजारव करीत आहेत आणि त्यामुळे असे वाटू लागतें की मदन जिंकला गेल्यामुळे त्यानें पराजयाच्या शोकाने करुणा उत्पन्न होईल असे ध्वनि बाहेर काढले आहेत आणि आपली फुलांची अस्त्रे तो आदिप्रभूंच्या चरणावर टाकून जात आहे असे सूचित होत आहे. अशा जयविलासाने युक्त असलेले आदिप्रभु उत्कर्षाला पावत आहेत ।। २३९ ।। ज्यानी कामदेवाला जिंकले आहे व ज्याचे तेज फार मोठे आहे, गुरूच्या साहाय्यावाचूनच ज्यानी विश्वाला जाणले असे भगवान् स्वयंभू आहेत व जिनपति आहेत, ते रागद्वेषरहित आहेत, त्यांनी पापरूपी धूळ धुऊन टाकली आहे, त्यांच्या चरणकमलांची शोभा देवानी आपल्या मुकुटांच्या अग्रभागावर धारण केली आहे, लोक व अलोकरूपी घराच्या शेवटी त्यांचा बो- केवलज्ञान विश्रान्ति घेत आहे असे आदिजिनेश्वर सर्वोत्कर्षाला पावले आहेत ॥ २४० ॥ मदनाच्या बाणानी ज्यांचा आत्मा खंडित झाला नाही, तथापि ज्यानी त्रैलोक्य जयलक्ष्मीरूप स्त्रीला आपल्या वक्षःस्थलावर धारण केले आहे व विरूप- कुरूप असूनही दुसरा अर्थ अमूर्तिक असूनही अत्यंत उत्कृष्ट सुखसमूहाला देणारी अशा मुक्ति- लक्ष्मीने ज्याना स्वयंवरले ते प्रभु सर्वोत्कर्षाला पावत आहेत ॥ २४१ ॥ भयंकर टंकार शब्द करणारा धनुष्यसमूह ज्यांच्याजवळ आहे व युद्धाच्या नगाऱ्यांच्या भयंकर आवाजानी जे भयंकर दिसते अशा सैन्याची रचना ज्यानी केली नाही, ज्यानी भुवया वाकड्या करून आपले मुख भयंकर केले नाही तथापि ज्यानी फार बलवान् अशा मदनशत्रूचा नाश केला ते आदिनाथ प्रभु सर्वोत्कर्ष युक्त आहेत, जयवन्त आहेत ॥ २४२ ॥ म. ४० Page #325 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१४) महापुराण (३५-२४३ स जयति जिनराजो दुविभावप्रभावः । प्रभुरभिभवितुं पं नाशकन्मारवीरः॥ दिविजविजयदूरारूढगर्वोऽपि गवं न हृदि हृदिशयोऽधाद्यत्र कुण्ठास्त्रवीर्यः ॥ २४३ जयति तरुरशोको दुन्दुभिः पुष्पवर्षम् । चमररुहसमेतं विष्टरं सैंहमुद्धम् ॥ वचनमसममुच्चरातपत्रं च तेजस्त्रिभुवनजयचिह्नं यस्य सार्वो जिनोऽसौ ॥ २४४ जयति जननतापच्छेदि यस्य क्रमाब्ज, विपुलफलदमारान्नम्रनाकीन्द्रभङगम् ॥ समुपनतजनानां प्रीणनं कल्पवृक्षस्थितिमकृतमहिम्ना सोऽवतात्तीर्थकृतः ॥ २४५ नवर भरतराजोप्यूजितस्यास्य युष्मद्भुजपरिघयुगस्य प्राप्नुयानैव कक्षाम् ॥ भुजबलमिदमास्तां दृष्टिमात्रेऽपि कस्ते रणनिकषगतस्य स्थातुमीशः क्षितीशः ॥ २४६ तदलमधिप, कालक्षेपयोगेन निद्राम् । जहिहि महति कृत्ये जागरूकस्त्वमेधि ॥ सपदि च जयलक्ष्मी प्राप्य भूयोऽपि देवं । जिनमवनम भक्त्या शासितारं जयाय ॥ २४७ ___ ज्याना जिंकण्यास मदनवीर समर्थ झाला नाही व ज्याचा प्रभाव जाणण्यास योग्य नाही, देवावर विजय मिळविल्यामुळे ज्याला गर्व फारच वाढला आहे असा मदन देखिल ज्या प्रभूवर आपल्या अस्त्राचे सामर्थ्य चालवू शकला नाही. त्याचे अस्त्रसामर्थ्य कुण्ठित झाले, त्यामुळे तो गर्वरहित झाला. असा हा जिननाथ उत्कर्ष पावत आहे ।। २४३ ॥ अशोक वृक्ष, देवांचे नगारे, पुष्पवृष्टि, चामरानी सहित असे उत्कृष्ट सिंहासन, इतरापेक्षा वेगळी उपमारहित अशी दिव्य वाणी, उंच असे छत्र आणि भामण्डल ही त्रिभुवनावर विजय मिळविल्याची चिह्ने ज्यांच्याजवळ आहेत व जे सर्वांचे हित करतात असे श्रीजिन उत्कर्ष पावत आहेत ॥ २४४ ।। ज्यांचे चरणकमल पुनः पुनः जन्मण्याने होणाऱ्या संतापाचा नाश करणारे आहे व विपुल सुखफल देणारे आहे व ज्यांच्या चरणकमलाजवळ इन्द्रादिक भुंग्यांचा समूह नम्र झाला आहे आणि ज्यांचे चरणकमल नम्र झालेल्या भक्ताना आनंदित करणारे व कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित पूर्ण करणारे आहे असे ते आदिजिनेश्वर आपल्या माहात्म्याने तुमचे रक्षण करोत ॥ २४५ ॥ हे पुरुषश्रेष्ठा, भरतराजा देखिल अतिशय बलिष्ठ अशा तुमच्या दोन बाहुरूपी अगळीची बरोबरी करू शकत नाही. हे आपले बाहुबल बाजूला राहू द्या. पण युद्धाच्या कसोटीला प्राप्त झालेल्या आपल्या दृष्टीपुढे देखिल कोणता राजा उभा राहण्यास समर्थ आहे बरे? ॥ २४६ ॥ म्हणून हे राजन्, आता व्यर्थ काल घालविणे पुरे, झोपेचा त्याग करा आणि महत्त्वाच्या कार्यात सावधपणा ठेवा, लौकरच जयलक्ष्मीला प्राप्त होऊन म्हणजे जय मिळवून पुनः भक्तीने जय मिळविण्यासाठी सर्व जगाचे धर्मोपदेशाने रक्षण करणान्या प्रकाशमान जिनदेवास नमस्कार करा ।। २४७ ॥ Page #326 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५-२४९) महापुराण इति समुचितरुच्चैरुच्चावचैर्जयमङगलः । सुघटितपदभूयोऽमीभिर्जयाय विबोधितः ॥ शयनममुचन्निद्रापायात्स पार्थिवकुञ्जरः । सुरगजइवोत्सङगं गङगाप्रतीरभुवं शनैः ॥ २४८ जयकरिघटाबन्ध रुन्धन्दिशो मवविह्वलैः । बलपरिवृढरारूढश्रीरुदूढपराक्रमः॥ नृपकतिपयैरारादेत्य प्रणम्य दिक्षितो । भुजबलियुवा भेजे सैन्यैर्भुवं समरोचिताम् ॥ २४९ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे कुमारबाहुबलिरणोद्योगवर्णनं नाम पञ्चत्रिंशत्तमं पर्व ॥ ३५॥ याप्रमाणे ज्यात उत्तम उत्तम पदरचना केली आहे व अनेक प्रकारानी उत्कृष्ट व राजाना योग्य अशा मंगलगीतानी व पुनः या जिनाष्टकाने बाहुबली राजा जागृत झाला व जसा देवांचा ऐरावत हत्ती निद्रापूर्ण झाल्यामुळे हळु हळू गंगेच्या तीरप्रदेशाचा त्याग करतो तसा या श्रेष्ठ बाहुबली राजाने शयनाचा त्याग केला ।। २४८ ।। मदाने व्याकुल झालेल्या विजयी हत्तींच्या समूहानी सर्व दिशाना व्यापणारा व सैन्यातील श्रेष्ठ अशा योद्धयानी ज्याचा पराक्रम खूप वाढला आहे व कांही राजानी जवळ येऊन ज्याचे दर्शन घेतले आहे, असा तो तरुण भुजबली राजा आपल्या सैन्याला घेऊन युद्ध करण्यास योग्य अशा भूमीवर आला ॥ २४९ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यांनी रचलेल्या आर्ष त्रेसष्ट लक्षणयुक्त श्रीमहापुराण संग्रहातील कुमार बाहुबलीच्या रणोद्योगाचे वर्णन करणारे हे पस्तीसावे पर्व समाप्त झाले. Page #327 -------------------------------------------------------------------------- ________________ षत्रिंशत्तमं पर्व । अथ दूतवचरचण्डमरुदाघातपूर्णितः । प्रचचाल बलाम्भोधिजिष्णोरारुध्य रोदसी ॥१ साङग्रामिक्यो महाभेर्यस्तवा धीरं प्रदध्वनः । सुध्वानः साध्वसं भेजः खङ्गाव्यप्रा नभश्चराः ॥२ बलानि प्रविभक्तानि निधीशस्य विनिर्ययुः । पुरः पादातमाश्वीयमारादाराच्च हास्तिकम् ॥३ रथकटया परिक्षेपो बलस्योभयपक्षयोः । अग्रतः पृष्ठतश्चासीदूध्वं च खचरामराः ॥४ । षडङ्गबलसामग्य सम्पन्नः पार्थिवैरमा। प्रतस्थे भरताधीशो निजानुजजिगीषया ॥५ महान्गजघटाबन्धो रेजे सजयकेतनः । गिरीणामिव सङ्कातः सञ्चारी सहशाखिभिः ॥६ श्च्योतन्मदजलासारसिक्तभूमिमदद्विपैः । प्रतस्थे रुद्धदिक्चक्रः शलैरिव सनिर्झरैः॥७ जयस्तम्बरमा रेज़स्तुङ्गाः शृङ्गारिताङ्गकाः । सान्द्रसन्ध्यातपाक्रान्ताश्चलन्त इव भूधराः ॥८ यानन्तर दूताच्या भाषणरूपी प्रचण्ड वाऱ्याच्या आघाताने प्रेरलेला तो चक्रवर्तीचा सेनासमुद्र, पृथ्वी व आकाश याना व्यापून पुढे प्रयाण करू लागला ॥१॥ त्यावेळी युद्धाचे मोठे नगारे गंभीरपणाने वाजू लागले. त्यांच्या त्या आवाजांनी तरवार हातात घेण्यासाठी व्यग्र झालेले विद्याधर तेव्हा भययुक्त झाले ॥२॥ निधींचा स्वामी अशा चक्रवर्तीची ती सैन्ये वेगवेगळ्या विभागाने युक्त होऊन चालू लागली. सर्वात पुढे पायदळ चालू लागले. त्यानंतर काही दूर घोडेस्वारांचे सैन्य आणि त्याहून काही दूर अन्तराने हत्तींचे सैन्य चालले होते ॥ ३ ॥ सैन्याच्या दोन्ही बाजूनी रथांचा समूह चालत होता आणि पुढे पाठीमागे आणि वर विद्याधर आणि देव चालू लागले ॥ ४ ॥ ___ याप्रमाणे सहा प्रकारच्या सैन्यसामग्रीने युक्त असा भरतप्रभु आपल्या भावाला जिंकण्याच्या इच्छेने अनेक राजासह निघाला ॥ ५ ॥ जयध्वजासह असलेला हत्तींचा मोठा समूह जणु वृक्षानी युक्त असा पर्वतांचा समुदाय चालत आहे असा भासला ॥ ६ ॥ गळणाऱ्या मदजलाच्या वृष्टीने ज्यानी जमीन भिजविली आहे व ज्यांच्यावर झरे वाहत आहेत असे जणु पर्वत की काय आणि ज्यांनी दिशामंडल अडविले आहे अशा मत्त हत्तीसह भरतप्रभु प्रयाण करू लागला ॥ ७॥ __ ज्यांची शरीरे शृंगारली आहेत, असे उंच हत्ती दाट सायंकालच्या लाल उन्हाने युक्त असे जणु चालत असलेले पर्वत आहेत असे शोभू लागले ॥ ८ ॥ Page #328 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-१६) महापुराण (३१७ चमूमतङ्गाजाः सज्जशस्त्राः सजयकेतनाः । कुलशैला इवायाताः प्रभोः स्वबलदर्शने ॥९ गजस्कन्धगता रेजुबूंर्गता विधृताडकुशाः । प्रदीप्तोद्धटनेपथ्या दः सम्पिण्डिता इव ॥ १० कौक्षेयकैनिशातानधाराः सादिनो बभुः । मूर्तीभूय भुजोपानलग्नेर्वा स्वः पराक्रमः ॥११ धन्विनः शरनाराचसम्भृतेषुधयो बभुः । वनक्ष्माजा महाशाखाः कोटरस्थैरिवाहिभिः ॥ १२ रथिनो रथकटयासु सम्भृतोचितहेतयः । सङग्रामवाधितरणे प्रस्थिता नाविका इव ॥ १३ भटा हस्त्युरसं भेजः सशिरस्त्रतनुत्रकाः । समुत्खातनिशातासिपाणयः पादरक्षणे ॥ १४ । पुस्फुरुः स्फुरवस्त्रौघा भटाः संदंशिताः परे । औत्पातिका इवानीलाः सोल्का मेघाः समुत्थिताः॥१५ करवालं करालाग्रं करे कृत्वा भटोऽपरः । पश्यन्मुखरसं तस्मिन्स्वं शौर्य परिजज्ञिवान् ॥ १६ भरतराजा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता जयध्वजानी सहित व शस्त्रास्त्रानी सज्ज असे त्याचे सैन्यातील हत्ती जणु कुलपर्वत भरतराजाला स्वतःचे बल दाखविण्यासाठी आले आहेत असे शोभले ॥ ९ ॥ उज्ज्वल आणि वीराना शोभणारा ज्यांचा वेष आहे, ज्यांनी हातात अंकुश घेतले आहे व जे हत्तीच्या स्कन्धावर-खांद्यावर बसले आहेत असे महात जणु एकत्र झालेले हे गर्वाचे पिण्ड आहेत असे दिसले ॥ १० ॥ ज्यांच्या पुढील धारेचे अग्रभाग फार तीक्ष्ण आहेत व जे मूर्तरूप धारण केलेले जणु स्वतःचे पराक्रम आहेत व जे बाहूंच्या वरच्या अग्रावर अवलम्बलेले आहेत अशा खड्गानी युक्त असलेले घोडेस्वार फार शोभले ॥ ११ ॥ ज्यांनी आपल्या भात्यात अनेक प्रकारचे बाण भरले आहेत असे धनुर्धारी वीर ज्यांच्या ढोलीत सर्प आहेत अशा व ज्यांना मोठ्या फांद्या आहेत अशा अरण्यातील वृक्षाप्रमाणे शोभत होते ॥ १२॥ ___ ज्यांनी आपल्या रथात युद्धोपयोगी शस्त्रे भरली आहेत, असे रथांत बसलेले वीर जणु असे चालले होते की, ते युद्धरूपी समुद्राला तरून जाणाऱ्या नावाड्याप्रमाणे दिसू लागले होते ॥ १३ ॥ ज्यांनी आपल्या मस्तकावर टोप व अंगावर चिलखत धारण केले आहे व म्यानातून बाहेर काढलेल्या तीक्ष्ण तरवारी ज्यांनी हातात घेतल्या आहेत, असे काही योद्धे मुख्य हत्तीच्या पुढे त्याच्या पायांचे रक्षण करण्यासाठी उभे राहिले ॥ १४ ॥ ज्याचा शस्त्रसमूह चमकत आहे व ज्यांनी चिलखते. आपल्या अंगात घातली आहेत असे अन्य योद्धे ज्यांच्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत असे उत्पातकाली प्रकट झालेले जणु नीलवर्णाचे मेघ आहेत अशा रीतीने चमकू लागले ॥ १५ ॥ ज्याची धार तीक्ष्ण आहे असा खड्ग हातात घेऊन त्यात आपल्या मुखाचा रंग पाहणाऱ्या कोणी योद्धयाने आपला शूरपणा जाणून घेतला ।। १६ ॥ Page #329 -------------------------------------------------------------------------- ________________ ३१८) महापुराण (३६-१७ कराग्रविधृतं खड्गं तुलयकोऽप्यभाद्भटः । प्रतिमित्सुरिवानेन स्वामिसत्कारगौरवम् ॥ १७ महामुकुटबद्धानां साधनानि प्रतस्थिरे । पादातहास्तिकाश्वीयरथकटयापरिच्छवैः ॥ १८ बभुर्मुकुटबद्धास्ते रत्नांशूदग्रमौलयः । सलीला लोकपालानामंशा भुवमिवागताः ॥ १९ परिवेष्टय निरैयन्त पार्थिवाः पृथिवीश्वरम् । दूरात्स्वबलसामग्री दर्शयन्तो यथायथम् ॥ २० प्रत्यग्रसमरारम्भसम्भवोद्धान्तचेतसः । भटीराश्वासयामासुर्भटाः प्रत्याय्य धीरितैः ॥ २१ भूरेणवस्तदाश्वीयखुरोद्धृताः खलखिनः । क्षणविनितसम्प्रेक्षाः प्रचक्रुरमराङ्गनाः ॥ २२ रजःसन्तमसे रुखविक्चके व्योमलङ्किनि । चक्रोद्योतो नृणां चक्रे दृशः स्वविषयोन्मुखीः ॥ २३ समुद्भटरसप्रायैर्भटालापमहीश्वराः । प्रयाणके धृति प्रापुर्जनजल्परपीवृशः ॥ २४ दुसऱ्या एका वीरानं आपल्या हातात तरवार तोलून धरून तिच्याद्वारे आपल्या मालकाने जो आपला सत्कार केला त्याचे वजन किती मोठे आहे हे जणु तो मापीत आहे असे दिसले ॥ १७ ॥ __ याप्रमाणे महामुकुटबद्ध राजांची पायदळे, हत्तींचे समूह, घोड्यांचे सैन्य, रथसमूह, वगैरेनी युक्त अशी सैन्ये प्रयाण करू लागली ॥ १८ ।। ___ रत्नांच्या किरणांनी ज्याचे मुकुट ऊंच भासत आहेत असे ते मुकुटबद्ध राजे जणु लोक पालांचे काही अंश भूभीवर लीलेने आले आहेत असे वाटले ।। १९ ॥ ते सर्व राजे पृथ्वीप्रभु भरताला आपली सैन्याची सामग्री जशी असेल तशी जणु दूरून दाखवित आहेत असे त्याला दोन्ही बाजूनी घेरून जाऊ लागले ॥ २० ॥ पुनः नवीन युद्धाचा आरंभ होईल अशा विचाराने ज्यांची मने घाबरली आहेत अशा वीरांच्या स्त्रीयांना वीरांनी 'युद्धास भिण्याचे कारण नाही. आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे ' अशी धैर्याची वचने बोलून व त्यांची खात्री करून त्यांना धैर्ययुक्त केले ॥ २१ ॥ त्यावेळी घोड्यांच्या खरानी वर उडविलेल्या व आकाशात उल्लंघणान्या जमिनीच्या धुळीनी काही क्षणपर्यन्त देवस्त्रियांना पाहण्यात विघ्न उत्पन्न केले. त्या धुळीचे उपशमन होईपर्यन्त सैन्याची शोभा त्यांना नीट दिसली नाही ॥ २२ ॥ ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत व जो आकाशात जाऊन पसरला आहे अशा धुराळयाने चोहीकडे दाट अंधार उत्पन्न केला. तेव्हा चक्ररत्नाच्या प्रकाशाने लोकांच्या नेत्राना आपल्या विषयाकडे वळविले. चक्ररत्नाच्या प्रकाशाने त्यांना सर्व पदार्थ चांगले दिसू लागले ॥ २३ ॥ रस्त्यात अतिशय वीररसानी भरलेली वीरांची परस्पराशी भाषणे होत होती व इतर लोकांची देखील अशीच उत्कट भाषणे होत होती ती ऐकून राजे युद्धप्रयाणात उत्साहित होत असत ॥ २४॥ Page #330 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-३२) महापुराण रणभूमि प्रसाध्यारास्थितो बाहुबली नृपः । अयं च नृपशार्दूलः प्रस्थितो निनियन्त्रणः ॥ २५ न विद्मः किनु खल्वत्र स्याद्भात्रोरनयोरिति । प्रायो न शान्तये युद्धमेनयोरनुजीविनाम् ॥ २६ विरूपकमिवं युद्धमारब्धं भरतेशिना । ऐश्वर्यमददुर्वाराः स्वैरिणः प्रभवो यतः ॥ २७ इमे मुकुटबद्धाः किं नैनौ वारयितुं क्षमाः। येऽमी समग्रसामग्र्या सङग्रामयितुमागताः॥ २८ अहो महानुभावोऽयं कुमारो भुजविक्रमी । क्रुद्ध चक्रधरेऽप्येवं यो योध्दुं सम्मखं स्थितः ॥ २९ अथवा तन्त्रमयस्त्वं न जयाडं मनस्विनः । नन सिंहो जयत्येकः संहितानपि दन्तिनः ॥ ३० अयं च चक्रभद्दोवो नेष्टः सामान्यमानुषः । योऽभिरक्ष्यः सहस्रेण प्रणम्राणां सुधाभुजाम् ॥ ३१ तन्माभूदनयोयुद्धं जनसङक्षयकारणम् । कुर्वन्तु देवताः शान्ति यदि सन्निहिताइमाः ॥ ३२ इकडे बाहुबली राजाने रणभूमीची रचना केली व तो लढण्यासाठी तयार झाला आणि ज्याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही असा नृपश्रेष्ठ भरतही त्याच्याबरोबर लढण्यास तयार झाला ॥ २५ ॥ ___ या युद्धामध्ये या दोन भावांची काय परिस्थिति होणार आहे हे आम्हाला समजत नाही. बहुत करून या दोघांच्या युद्धामध्ये जो नोकरवर्ग आहे त्यांचे कल्याण होईल. त्याला शान्ति लाभेल असे दिसत नाही ॥ २६ ।। या भरतेश्वराने हे युद्ध आरंभिले आहे हे चांगले केले नाही यण यांना कोणी सांगावे कारण हे राजे स्वैरी-स्वच्छंदी असतात. यांचा ऐश्वर्यगर्व दुर्वार आहे त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाहीत ।। २७ ॥ जे हे राजे सर्व सामग्री घेऊन युद्ध करण्यासाठी आले आहेत ते या दोघाना निवारण करण्यास समर्थ नाहीत काय ? ॥ २८ ॥ भुजांच्या पराक्रमाने युक्त असलेला हा कुमार बाहुबलि फार मोठ्या सामर्थ्याने शोभत आहे. कारण चक्रवर्ती भरत रागावला असताही त्याच्या पुढे युद्ध करण्यास उभा राहिला आहे ॥ २९ ॥ अथवा पुष्कळ सामग्री असूनही ती वीर पुरुषाला जिंकण्याचे साधन होत नसते. कारण एके ठिकाणी जमाव करून उभे राहिलेल्या हत्तीनाही एक सिंह जिंकतोच ।। ३० ॥ व हा चक्र धारण करणारा भरतप्रभु पण सामान्य मनुष्य नाही. कारण नम्र अशा हजार देवाकडून रक्षिला जात आहे ॥ ३१ ॥ तेव्हां यांचे युद्ध होऊ नये हेच बरे. कारण याचे युद्ध लोकनाशाला कारण होईल. व जर देवता जवळ असतील तर त्या शान्तीला उत्पन्न करोत. या दोघांना युद्धापासून निवृत्त करोत ॥ ३२ ॥ Page #331 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२०) महापुराण (३६-३३ इति माध्यस्थ्यवृत्त्य के जनाः श्लाघ्यं वचो जगुः । पक्षपातहताः केचिस्त्वपक्षोत्कर्षमुज्जगुः ॥३३ एवंप्रापर्जनालापमहीनाथा विनोदिताः । द्रुतं प्राप्तास्तमुद्देशं यत्र वीराग्रणीरसौ ॥ ३४ । दोर्वपं विगणय्यास्य दुर्विलडध्यमरातिभिः । त्रेसुः प्रतिभटाः प्रायस्तस्मिन्नासन्नसन्निधौ ॥ ३५ इत्यभ्यणे बले जिष्णोर्बलं भुजबलीशिनः । जलमब्धेरिवाक्षुभ्यद्वीरध्वाननिरुद्धदिक् ॥ ३६ अथोभयबले वीराः सन्नद्धगजवाजयः । बलान्यारचयामासुरन्योन्यं प्रयुयुत्सया ॥ ३७ तावच्च मन्त्रिणो मुख्या सम्प्रधाविदन्निति । शान्तये नानयोयुद्धं ग्रहयोः ऋरयोरिव ॥ ३८ चरमाङ्गाधरावेतो नानयोः काचनक्षतिः । क्षयो जनस्य पक्षस्य व्याजेनानेन जम्भितः ॥ ३९ इति निश्चित्य मन्त्रज्ञा भीत्वा भूयो जनक्षयात् । तयोरनुमति लब्ध्वा धम्यं रणमघोषयन् ॥ ४० __ असे मध्यस्थ वृत्तीने काही लोकांनी प्रशंसनीय भाषण केले. पण जे पक्षपाताने दूषित झाले होते असे काही लोक स्वपक्षाच्या उत्कर्षाविषयीच बोलू लागले ॥ ३३ ॥ याप्रमाणे अनेक लोकांच्या निरनिराळ्या भाषणानी ज्यांचे मन आनंदित झाले, ज्यांच्या मनाची करमणूक झाली असे राजे ज्या ठिकाणी वीरांचा पुढारी बाहुबली कुमार होता तेथे शीघ्र गेले ॥ ३४ ॥ बाहुबली कुमाराच्या अगदी जवळ आपण आलो आहोत असे जेव्हा भरताच्या वीर लोकाना समजले तेव्हा या बहुबलीच्या भुजांचा दर्प शत्रूकडून उल्लंघण्यास शक्य नाही असे त्याना वाटले व ते प्रायः घाबरून गेले ॥ ३५ ॥ जेव्हा भरताचे सैन्य जवळ आले तेव्हा जसे समुद्राचे पाणी आपल्या गर्जनेने दिशा व्याप्त करून क्षुब्ध होते तसे बाहुबलीचे सैन्य क्षुब्ध होऊन वीरगर्जना करू लागले. आपल्या गर्जनानी त्यानी दिशा व्याप्त केल्या ॥ ३६ ।। या नंतर एकमेकाशी लढण्याच्या इच्छेने दोन्ही सैन्यामध्ये हत्ती, घोडे युद्धासाठी सज्ज केले गेले व सैन्याची योग्य रचना केली गेली आणि वीर युद्धासाठी सज्ज झाले ॥ ३७ ॥ त्यावेळी दोन क्रूर ग्रहाचे एकत्र येणे जसे शांतीला कारण होत नाही तसे या दोघांचे युद्ध शान्तीला कारण होणार नाही असा विचार मुख्यमंत्र्यानी केला व ते याप्रमाणे बोलले ॥ ३८॥ श्रीबाहुबलि आणि भरतेश्वर हे दोघे चरमशरीरधारक आहेत म्हणून यांच्या शरीराला कोणताही अपाय होणार नाही. परन्तु यांची बाजू घेणाऱ्या लोकांचा मात्र या युद्धाच्या निमित्ताने क्षय होण्याची वेळ प्राप्त झाली आहे ॥ ३९ ॥ याप्रमाणे त्या मुख्यमंत्र्यानी निश्चय केला व युद्ध झाले तर मोठा जनक्षय होईल या भीतीने त्यानी त्या दोघांची अनुमति मिळविली आणि त्यानी या दोघाचे धर्मयुद्ध होईल अशी घोषणा केली, दौंडी पिटविली ।। ४० ॥ Page #332 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-४९) अकारणरणेनालं जनसंहारकारिणा । महानेवमधर्मश्च गरीयांश्च यशोवधः ॥ ४१ बलोत्कर्षपरीक्षेयमन्यथाप्युपपद्यते । तदस्तु युवयोरेव मिथो युद्धं त्रिधात्मकम् ॥ ४२ भ्रूभङ्गेन विना भङ्गः सोढव्यो युवयोरिह । विजयश्च विनोत्सेकात्धर्मो ह्येष सनाभिषु ॥ ४३ इत्युक्तौ पार्थिवैः सर्वैः सोपरोधैश्च मन्त्रिभिः । तौ कृच्छ्रात्प्रत्यपत्सातां तादृशं युद्धमुद्धतौ ॥ ४४ जलदृष्टिनियुद्धेषु योऽनयोजयमाप्स्यति । स जयश्री विलासिन्याः पतिरस्तु स्वयं वृतः ॥ ४५ इत्युद्घोष्य कृतानन्दमानन्दिन्या गभीरया | भेर्या चमूप्रधानानां न्यधुरेकत्र सन्निधिम् ॥ ४६ नृपा भरतगृह्या ये तानेकत्र न्यवेशयत् । ये बाहुबलिगृह्याश्च पार्थिवास्ते ततोऽन्यतः ॥ ४७ मध्ये महीभृतां तेषां रेजतुस्तौ नृपौ स्थितौ । गतौ निषधनीलाद्री कुतश्चिदिव सन्निधिम् ॥ ४८ तयोर्भुजबली रेजे गरुडग्रावसच्छविः । जम्बूद्रुम इवोत्तुङ्गः सभृङ्गः शितमूर्धज : ॥ ४९ महापुराण जे लोकसंहार करणारे युद्ध आहे ते निष्कारण आहे. असले लोकविनाशक युद्ध नको. ते युद्ध महान् अधर्मरूप आहे आणि त्यात यशाचा फार मोठा नाश होतो ॥ ४१ ॥ ( ३२१ कोणाचे बल उत्कृष्ट आहे याची परीक्षा अन्य प्रकारानेही होऊ शकते. म्हणून तुमचे दोघांचे अन्योन्य युद्ध तीन प्रकारचे होवो ॥ ४२ ॥ या तीन प्रकारच्या युद्धात दोघापैकी ज्याचा पराजय होईल त्याने तो भुवया वाकड्या न करता सहन करावा व विजय झाला तर तोही गर्वरहित धारण करावा. अशा रीतीने वागणे हा संबंधी जनामध्ये धर्म आहे असे समजावे ।। ४३ ।। असे सर्व राजानी आणि मंत्र्यानी त्या दोघाना आग्रहपूर्वक सांगितले व त्या उद्धत दोघानी मोठ्या कष्टाने त्यांचे ते तसले युद्ध मान्य केले ॥ ४४ ॥ जलयुद्ध, दृष्टियुद्ध व मल्लयुद्ध या तीन युद्धात जो जय मिळवील तो जयलक्ष्मीरूपी विलासिनीकडून स्वतः वरला गेलेला तिचा पति होईल ।। ४५ ।। या प्रकारे निश्चित केल्यावर आनन्दिनी नामक गंभीर भेरीच्या द्वारे मुख्य प्रधानानी ज्याना आनंद झाला आहे अशा दोन्ही बाजूच्या मुख्य लोकांना एकत्र केले ॥ ४६ ॥ जे भरताच्या बाजूचे राजे होते त्यांना एके ठिकाणी बसविले व जे बाहुबलीच्या बाजूचे राजे होते त्यांना दुसरे स्थानी एकत्र बसविले ।। ४७ ।। त्या सर्व राजांच्या मध्यभागी ते दोघे भरत व बाहुबलि हे दोन राजे उभे राहिले. जणु ते निषधपर्वत व नीलपर्वत कोठून तरी एकत्र जवळ आल्याप्रमाणे दिसले ॥ ४८ ॥ त्या दोघापैकी गारुडमण्याप्रमाणे ज्याची कान्ति आहे, ज्याचे काळे केस आहेत असा बाहुबलि भुंग्यानी सहित व अतिशय उंच अशा जांभळाच्या झाडाप्रमाणे शोभला ॥ ४९ ॥ म. ४१ Page #333 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२२) महापुराण (३६-५० रराज राजराजोऽपि तिरीटोवनविग्रहः । सचूलिक इवाद्रीन्द्रस्तप्तचामीकरच्छविः ॥५० दधद्धीरतरां दृष्टि निनिमेषामनुटाम् । दृष्टियुद्धे जयं प्राप प्रसभं भुजविक्रमी ॥५१ विनिवार्य कृतक्षोभमनिवार्यबलार्णवम् । मर्यादया यवीयांसं जयेनायोजयनृपाः ॥ ५२ . सरसीजलमागाढी जलयुद्ध मदोद्धतौ । दिग्गजाविव तौ दीर्धेत्युिक्षामासतुर्भुजैः॥५३ अधिवक्षस्तटं जिष्णोरेजुरच्छा जलच्छटाः । शैलभर्तुरिवोत्सङगसद्धगिन्यः नुतयोऽम्भसाम् ॥ ५४ जलौघो भरतेशेन मुक्तो दोर्बलशलिनः । प्रांशोरप्राप्य दूरेण मुखमारात्समापतत् ।। ५५ भरतेशः किलात्रापि न यदाप जयं तदा । बलैर्भुजबलीशस्य भूयोऽप्युद्धोषितो जयः ॥५६ नियुद्धमथ सङगीर्य नृसिंहौ सिंहविक्रमौ । धारावाविष्कृतस्पों तो रङगमवतेरतुः ॥५७ अनेक राजांचा अधिपति राजराज भरतचक्री देखिल मुकुटामुळे अधिक उंच दिसत होता व तो ज्याची तापविलेल्या सोन्याप्रमाणे कांति आहे व जो चूलिकेने-शिखराने सहित आहे अशा पर्वतराज-मेरूप्रमाणे शोभला ॥ ५० ॥ बाहुबलीने अधिक गंभीर आणि शान्त व पापण्या जिच्यात लवत नाहीत अशी आपली दृष्टि भरताच्या दृष्टीवर लावली आणि त्यामुळे त्या भुजविक्रमशाली बाहुबलीने दृष्टियुद्धात शीघ्र जय मिळविला ॥ ५१ ॥ या दृष्टिविजयामुळे बाहुबलीच्या सैन्यात फार आनन्द उसळला व तो सैन्यसमुद्र अनिवार्य झाला तथापि त्याला प्रधानादिकानी रोखून धरले व मर्यादेने त्यानी धाकट्या भावाला म्हणजे बाहुबलीला त्या सर्व राजानी जययुक्त केले ।। ५२ ।। यानन्तर त्या दोघानी सरोवराच्या पाण्यात प्रवेश केला. मदाने उद्धत झालेले दोघे जणु उद्धत झालेले दोन दिग्गज आहेत असे ते आपल्या दीर्घ बाहूनी एकमेकाच्या अंगावर पाणी फेकू लागले ॥ ५३॥ भुजबलीने भरताच्या अंगावर फेकलेल्या स्वच्छ पाण्याच्या छटा जणु मेरूपर्वताच्या मध्यभागावर पाण्याच्या लहरी खेळत आहेत अशा भासल्या ।। ५४ ।। भरतेश्वराने जो पाण्याचा लोट फेकला तो बाहुबलाने शोभणारा व उंच अशा बाहुबलीच्या मुखापासून फार दूर असा खाली पडला ॥ ५५ ॥ भरतेशाला या जलयुद्धातही जेव्हा जय प्राप्त झाला नाही तेव्हा बाहुबलीराजाच्या सैन्यानी पुनः बाहुबलीला जय प्राप्त झाला म्हणून मोठ्याने घोषणा केली ॥ ५६ ॥ यानन्तर त्या दोघानी बाहु-युद्ध करण्याची प्रतिज्ञा केली-सिंहाप्रमाणे पराक्रमी असे ते दोघे धैर्यशाली पुरुषसिंह मनात ईर्ष्या उत्पन्न झाल्यामुळे रंगभूमीवर आले ॥ ५७ ॥ Page #334 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-६५) महापुराण (३२३ बल्गितास्फोटितश्चित्रः करणैर्बन्धपीडितः । दोर्दर्पशालिनोरासीबाहुयुद्धं तयोर्महत् ॥ ५८ ज्वलन्मुकुटभाचको हेलयोभ्रामितोऽमुना । लीलामलातचक्रस्य चक्री भेजे क्षणं भ्रमन् ॥ ५९ यवीयान्नपशार्दूलं ज्यायांसं जितभारतम् । जित्वापि नानयभूमि प्रभुरित्येव गौरवात् ॥६० भुजोपरोधमुद्धत्य स तं धत्ते स्म दोर्बली । हिमाद्रिमिव नीलाद्रिमहाकटकभास्वरम् ॥ ६१ तदा कलकलश्चक्रे पक्ष्यर्भुजबलीशिनः । नृपर्भरतगृह्येस्तु लज्जया नमितं शिरः ॥ ६२ समक्षमीक्षमाणेषु पार्थिवेषभयेष्वपि । परां विमानतां प्राप्य ययौ चक्री विलक्षताम् ॥ ६३ बद्धभ्रकुटिरुभ्रान्तरुधिरारुणलोचनः । क्षणं दुरीक्ष्यतां भेजे चक्री प्रज्वलितः क्रुधा ॥ ६४ क्रोधान्धेन तदा दध्ये कर्तुमस्य पराजयम् । चक्रमत्कृत्तनिःशेषद्विषच्चक्रं निधीशिना ॥ ६५ ------------.... आपआपल्या बाहूच्या बलाच्या गर्वाने शोभणाऱ्या त्या दोघांचे बायुद्ध- ( कुस्ती) फार मोठे झाले. गर्जना करणे, हातपाय आपटणे, छड्डू ठोकणे, अनेक प्रकारचे पेच करणे व एकमेकाना खोडा घालणे अशा प्रकारानी मोठे वर्णन करण्यासारखे झाले ॥ ५८ ॥ या बाहुबलिकुमाराने जेव्हा लीलेने चक्रवर्ती भरताला गरगर फिरविले तेव्हा चमकणाऱ्या मुकुटाच्या कान्तिसमूहाने युक्त असलेला व थोडा वेळपर्यन्त फिरणाऱ्या ह्या चक्रीने अग्निचक्राची शोभा धारण केली ॥ ५९ ॥ ज्याने सर्व भरतक्षेत्र जिंकले आहे व जो सर्व राजामध्ये श्रेष्ठ आहे अशा आपल्या वडील भावाला धाकटा भाऊ अशा बाहुबलीने जरी जिंकले तथापि हा आमचा प्रभु आहे अशी त्याच्या विषयी जी गौरवबुद्धि तिच्यामुळे त्याने जमिनीवर त्याला आणले नाही. जमिनीवर पाडले नाही ।। ६० ॥ जसा नीलपर्वताने मोठमोठ्या टेकड्यानी शोभणाऱ्या हिमाचलाला जणु उचलून घरावे तसे आपल्या दोन बाहूनी पकडून व वर उचलून त्या बाहुबलीने त्या भरतेश्वराला उंच धरले ॥ ६१ ॥ त्यावेळी भुजबलीराजाच्या पक्षांच्या राजानी मोठा कलकलाट केला आणि भरताच्या बाजूच्या राजानी लाजेने आपले मस्तक खाली घातले ॥ ६२ ॥ दोन्ही बाजूचे राजे देखिल आपणास प्रत्यक्ष पाहत आहेत असे दिसून आल्यामुळे अत्यन्त अपमानित झालेला भरत अत्यन्त खिन्न झाला ।। ६३ ॥ तत्काल तो क्रोधाने खूप पेटला, त्याच्या भुवया वर चढल्या, त्याचे डोळे वर फिरून रक्ताप्रमाणे लालबुंद झाले व तो क्षणपर्यन्त भयंकर दिसू लागला ॥ ६४ ॥ त्यावेळी क्रोधाने अंध झालेल्या निधिपति भरताने या बाहुबलीचा पराजय करण्याकरिता ज्याने सर्व शत्रुसमुहाला उपडून टाकले आहे अशा चक्राचे चिन्तन केले, स्मरण केले ॥ ६५ ॥ Page #335 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३६-६६ आध्यानमात्रमेत्याराददः कृत्वा प्रदक्षिणाम् । अवध्यस्यास्य पर्यन्तं तस्थौ मन्दीकृतातपम् ॥ ६६ कृतं कृतं बतानेन साहसेनेति धिक्कृतः । तदा महत्तमैश्चक्री जगामानुशयं परम् ॥ ६७ कृतापदान इत्युच्चैः करेण तुलयन्नृपम् । सोऽवतीर्यांसतो धीरो निकृष्टां भूमिमापयत् ॥ ६८ सत्कृतः स जयाशंसमभ्येत्य नृपसत्तमैः । मेने सोत्कर्षमात्मानं तदा भुजबली प्रभुः ॥ ६९ अचिन्तयच्च fक नाम कृते राज्यस्य भङगिनः । लज्जाकरो विधिर्भ्रात्रा ज्येष्ठेनायमधिष्ठितः ॥७० विपाककटु साम्राज्यं क्षणध्वंसि धिगस्त्विदम् । दुस्त्यजं त्यजदप्येतदगिभिर्बुष्कलत्रवत् ॥ ७१ अहो विषयसौख्यानां वैरूप्यमपकारिता । भङगुरत्वमरुच्यत्वं सक्तैर्नान्विष्यते जनः ॥ ७२ को नाम मतिमानी सेद्विषयान्विषदारुणान् । येषां वशगतो जन्तुर्यात्यनर्थपरम्पराम् ॥ ७३ ३२४) महापुराण मनात चिन्तन केल्याबरोबर ते चक्ररत्न आले व त्यानें अवध्य असलेल्या या बाहुबलीला एक प्रदक्षिणा घातली आणि ज्याने सूर्याचा प्रकाश मंद केला आहे असे ते त्याच्याजवळ उभे राहिले ॥ ६६ ॥ त्यावेळी मोठ्या अनेक राजानी ' अरेरे हे असले हीनमनोवृत्तीचे द्योतक साहस पुरे 'करा' असे म्हणून चक्रवर्तीचा धिक्कार केला तेव्हा चक्रवर्तीला अतिशय पश्चात्ताप झाला ॥६७॥ ज्याने मोठा पराक्रम केला आहे व ज्याने आपल्या हाताने वर तोलून धरले होते अशा त्या बुद्धिमान् बाहुबलीने आपल्या खांद्यावरून उतरवून खालच्या निकृष्ट जमीनीवर त्याला ठेवले अथवा (धीरोऽनिकृष्टां ) त्या बुद्धिवंताने निकृष्ट नसलेल्या म्हणजे उत्तम अशा जमिनीवर भरताला ठेवले ॥ ६८ ॥ त्यावेळी उत्तम राजे बाहुबलीजवळ आले. त्यानी त्याच्या जयाची प्रशंसा करून त्याचा सत्कार केला. तेव्हा बाहुबलीने आपल्याला उत्कर्षशाली मानले ॥ ६९ ॥ त्यावेळी असा विचार केला कशासाठी बरे माझ्या वडील भावाने हे लज्जा उत्पन्न करणारे कार्य केले ! कारण हे राज्य नश्वर आहे ।। ७० ।। हे साम्राज्य परिणामी कटु-कडु आहे- दुःख देणारे आहे, क्षणात नाश पावणारे आहे. याला धिक्कार असो. हे साम्राज्य व्यभिचारिणी स्त्री जसा पतीचा त्याग करते त्याप्रमाणे आपणास उपभोगणाऱ्या राजाचा त्याग करणारे आहे पण राजाला मात्र ते सोडावेसे वाटत नाही ॥ ७१ ॥ या विषयसुखांत आसक्त झालेले लोक या विषयसुखांचा निद्यपणा, त्या पासून होणारा अपकार-दुःख, त्याचा नाशवंतपणा व शेवटी त्यापासून प्राप्त होणारी अरुचि विरसपणा यांचा शोध करीत नाहीत. हा मोठा अविवेक आहे ।। ७२ ।। कोणता शाहणा मनुष्य विषाप्रमाणे भयंकर असलेल्या या पंचेन्द्रियाच्या विषयांची इच्छा करील बरे? या विषयात आसक्त झालेला प्राणी नाना अनर्यांनी संकटानी युक्त होतो. नाना संकटानी ग्रस्त होतो ॥ ७३ ॥ Page #336 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-८१) महापुराण (३२५ वरं विषं यदेकस्मिन्भवे हन्ति न हन्ति वा । विषयास्तु पुनर्नन्ति हन्त जन्तूनन्तशः ॥ ७४ आपातमात्ररम्याणां विपाककटुकात्मनाम् । विषयाणां कृतेनाज्ञो यात्यनानपार्थकम् ॥ ७५ अत्यन्तरसिकानादौ पर्यन्ते प्राणहारिणः । किम्पाकपाकविषमान्विषयान्कः कृती भजेत् ॥ ७६ शस्त्रप्रहारदीप्राग्निवज्राशनिमहोरगाः । न तथोद्वेजकाः पुंसां यथामी विषयद्विषः ॥ ७७ महाब्धिरौद्रसद्धग्रामभीमारण्यसरिगिरीन् । भोगाथिनो भजन्त्यज्ञा धनलाभधनायया ॥७८ दीर्घदोर्घातनिर्घातनिर्घोषविषमीकृते । यादसां यादसां पत्यो चरन्ति विषयार्थिनः ॥ ७९ समापतच्छरवातनिरुद्धगगनाङ्गणम् । रणाङ्गणं विशन्त्यस्तभियो भोगविलोभिताः ॥ ८० चरन्ति वनमानुष्या यत्र सत्रासलोचनाः । ताः पर्यटन्त्यरण्यानी गाशोपहता जडाः ॥ ८१ विष हे एका भवात प्राण्याला मारते किंवा मारीतही नाही. पण हे विषय मात्र प्राण्याना अनन्त वेळा मारीत आले आहेत. म्हणून यांच्यापेक्षा विष बरे आहे ॥ ७४ ।। हे विषय वरून फक्त फार सुंदर दिसतात, पण फलकाली हे फार कडु आहेत असा अनुभव येतो. पण या विषयामुळे अज्ञ मनुष्य व्यर्थ अनेक अनर्थाना-दुःखाना-संकटाना प्राप्त होतो ॥ ७५ ॥ हे पंचेन्द्रियाचे विषय आरंभी अत्यन्त आनन्द देतात पण शेवटी प्राणहरण करतात. म्हणून किंपाक नावाच्या फळाप्रमाणे यांचे सेवन अत्यन्त दुःखदायक आहे. कोणता शहाणा मनुष्य या विषयांचे सेवन करील बरे? ॥ ७६ ॥ हे विषयशत्रु जसे मनुष्यांना दुःख देतात तसे दुःख शस्त्रांचे प्रहार, खूप पेटलेला अग्नि, वज्र व वीज अंगावर पडणे व मोठे सर्प देखील जीवाला देत नाहीत ॥ ७७ ॥ मोठा समुद्र, भयंकर युद्ध, भयंकर जंगल, नद्या आणि पर्वत यांचे देखील अज्ञ लोक धनाची प्राप्ति होईल म्हणून सेवन करतात. धनाच्या आशेने वरील भयंकर समुद्रादिकात प्रवेश करतात व दुःख भोगतात ॥ ७८ ॥ विषयलंपट झालेले लोक जलचर, मगर वगैरे प्राण्यांच्या दीर्घ हातानी ताडन केल्यामुळे विद्युत्पाताप्रमाणे प्रचण्ड शब्दानी क्षुब्ध झालेल्या समुद्रात देखील प्रवेश करतात ।। ७९ ॥ विषयाभोगानी लुब्ध केलेले लोक त्यासाठी जेथे सारखी बाणांची वृष्टि होत आहे व त्यामुळे जेथील आकाश व्यापलेले आहे अशा युद्धस्थानी निर्भय होऊन प्रवेश करतात ॥ ८० ॥ ज्यांचे डोळे भीतीने चंचल झाले आहेत असे रानटी लोक जेथे प्रवेश करतात अशा महाभंयकर मोठ्या अरण्यात विषयभोगाच्या आशेने पीडित झालेले अज्ञ लोक प्रवेश करतात ॥ ८१ ॥ Page #337 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२६) महापुराण (३६-८२ सरितो विषमावर्तभीषणा ग्राहसङकुलाः । तितीर्षन्ति बताविष्टा विषविषयग्रहैः ॥ ८२ आरोहन्ति दुरारोहान गिरीनप्यभियोगिनः । रसायनरसज्ञानबलवादविमोहिताः ॥ ८३ अनिष्टवनितेवेयमालिङ्गति बलाज्जरा । कुर्वती पलितव्याजाद्रभसेन कचग्रहम् ॥ ८४ भोगेष्वत्युत्सुकः प्रायो न च वेद हिताहितम् । भक्तस्य जरसा जन्तोम॑तस्य च किमन्तरम् ॥ ८५ प्रसह्य पातयन्भूमौ गात्रेषु कृतवेपथुः । जरापातो नृणां कष्टो ज्वरः शीत इवोद्भवन् ॥ ८६ अङ्गसादं मतिभ्रषं वाचामस्फुटतामपि । जरा सुरा च निविष्टा घटयत्याशु देहिनाम् ॥ ८७ कालव्यालगजेनेदमायुरालानकं बलात् । चाल्यते यदबलाधानं जीवितालम्बनं नणाम् ॥ ८८ शरीरबलमेतच्च गजकर्णवदस्थिरम् । रोगाखूपहतं चेदं जरदेहकुटीरकम् ॥ ८९ अतिशय भयंकर विषयपिशाचानी पीडित झालेले लोक बिकट भोवऱ्यानी ज्या भयंकर झालेल्या आहेत व ज्या मगर सुसरीनी भरलेल्या आहेत अशा नद्या तरून जाण्याची इच्छा करतात ।। ८२ ।। रसायन आणि रस आदि ज्ञानाच्या उपदेशाने मोहित केलेले उद्योग करणारे कित्येक लोक ज्याच्यावर चढणे फार कठिण आहे अशा पर्वतावर देखिल चढतात ॥ ८३ ॥ वृद्धपणामुळे केसाना येणाऱ्या शुभ्रतेच्या मिषाने जणु केश पकडते की काय अशी ही जरा-वृद्धदशा अप्रिय असलेल्या स्त्रीप्रमाणे जबरदस्तीने मनुष्यास आलिंगन करिते ॥ ८४ ।। भोगाविषयी अतिशय उत्कण्ठित झालेला मनुष्य बहुत करून हिताहिताला जाणत नसतो. याचप्रमाणे वृद्धावस्थेने घेरलेला मनुष्य आणि मेलेला मनुष्य यात काही अन्तर आहे काय ? मुळीच नाही ॥ ८५ ।। शरीरात भरलेला शीतज्वर, जसा मनुष्याला जमिनीवर पाडतो आणि सर्व अवयवांत कम्प उत्पन्न करतो तशी ही वृद्धदशा देखिल मनुष्याला जमीनीवर पाडते आणि सर्व अवयवात कम्प उत्पन्न करिते ॥ ८६ ।। दारूप्रमाणे ही वृद्धावस्था आहे. दारू मनुष्याच्या शरीराला कृश करिते, बुद्धिभ्रंश करिते आणि बोलण्यामध्ये अस्पष्टपणा-अडखळत बोलणे हा दोष उत्पन्न करते. वृद्धावस्थेनेही देह कृश होतो, स्मृतिभ्रंश होतो आणि भाषणात अस्पष्टपणा अडखळत बोलणे असे दोष उत्पन्न होतात ।। ८७ ॥ मनुष्याचे जगणे ज्याच्या सामर्थ्याने, ज्याच्या अवलंबनाने असते तो आयुष्यरूपी खांब हा कालरूपी-यमरूपी दुष्ट हत्ती उपडून टाकतो ॥ ८८ ॥ हे शरीराचे सामर्थ्य हत्तीच्या कानाप्रमाणे अस्थिर आहे, चंचल आहे. तसेच हा वृद्धावस्थेचा देह जुन्या झोपडीप्रमाणे आहे व ती रोगरूपी उन्दरानी पोखरलेली आहे ॥ ८९ ॥ Page #338 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-९७) महापुराण इत्यशाश्वतमप्येतद्राज्यादि भरतेश्वरः । शाश्वतं मन्यते कष्टं मोहोपहतचेतनः ॥ ९० चिरमाकलयशेवमग्रजस्यानुदात्तताम् । व्याजहारैनमुद्दिश्य गिरः प्रपरुषाक्षराः ॥ ९१ भो नृपशार्दूल क्षणं वैलक्ष्यमुत्सृज । मूढेनेदं त्वयालम्बि दुरीहमतिसाहसम् ॥ ९२ अभेद्ये मम देहाद्रौ त्वया चक्रं नियोजितम् । विद्वचकिञ्चित्करं वाज्ञे शैले वज्रमिवापतत् ॥ ९३ अन्यत्र भ्रातृभाण्डानि भङक्त्वा राज्यं यदीप्सितम् । त्वया धर्मो यशश्चैव तेन पेशलमर्जितम् ॥९४ चक्रभृद्भरतः स्रष्टुः सुनुराद्यस्य योऽग्रणीः । कुलस्योद्वारकः सोऽभूदितीडाऽस्थापि च त्वया ॥ ९५ जितं च भवतैवाद्य यत्पापोपहतामिमाम् । मन्यसेऽनन्यभोगीनां नृपश्रियमनश्वरीम् ॥ ९६ प्रेयसीयं तवैवास्तु राज्यश्रीर्या त्वयादृता । नोचितेषा ममायुष्मन् बन्धो न हि सतां मुदे ।। ९७ (३२७ याप्रमाणे हे राज्यादिक अनित्य आहेत पण हा भरत राजा मोहाने ज्याची चैतन्यशक्ति ग्रस्त झाली आहे असा झाला आहे. तो हे राज्यादिक नित्य आहेत असे मानत आहे. ही फार खेदाची गोष्ट आहे ॥ ९० ॥ आपल्या ज्येष्ठ भावाचा हलका स्वभाव आहे याचा फार वेळ विचार करून त्याला उद्देशून ज्यात कठोर अक्षरे आहेत अशी भाषणे बाहुबलीने बोलावयास सुरूवात केली ॥ ९१ ॥ हे नृपश्रेष्ठा क्षणपर्यन्त मनातील लज्जा खिन्नता सोडून दे व माझे म्हणणे ऐक. मूर्ख अशा तुजकडून हे इतर कोणी करण्यास इच्छिणार नाही असे अयोग्य मोठे साहस अवलंबिले गेले आहे. अर्थात् फार मोठा अविचार तूं केला आहेस ।। ९२ । माझ्या अभेद्य अशा देहरूपी पर्वतावर तूं चक्र सोडलेस परन्तु वज्रनिर्मित पर्वतावर ते पडलेल्या वज्राप्रमाणे माझ्या वज्रमय देहावर पडून काहीच कार्य करू शकले नाही. ते तू पक्के जाण ।। ९३ ॥ दुसरे असे पहा - आपल्या सर्व भावांची सर्व संपत्ति नष्ट करून राज्य मिळविण्याची जी इच्छा केलीस त्यामुळे तू उत्तम धर्म आणि यश मिळविलेस असे म्हटले पाहिजे अर्थात्विपरीतलक्षणेने हा टोमणा बाहुबलीने भरताला मारला आहे. अर्थात् तू मोठा अधर्म व अपकीर्ति मिळविली आहेस ।। ९४ ।। आदिब्रह्मा वृषभनाथाचा पुत्र चक्रवर्ती भरत हा सर्व शंभर पुत्रात श्रेष्ठ आहे व · कुलाचा तो उद्धारक आहे अशी स्तुति देखिल तू सर्वत्र स्थापिली आहेस. अर्थात् तू कुलाचा विध्वंस केला आहेस व सर्वत्र अकीर्ति तुझी पसरली आहे ॥ ९५ ॥ व तूच आज खरोखर विजय मिळविला आहेस कारण ही पापानी भरलेली राज्यलक्ष्मी नाश न पावणारी व दुसऱ्याकडून कधीही न उपभोगली गेलेली आहे असे मानीत आहेस ।। ९६॥ हे आयुष्मन्ता, जी राज्यलक्ष्मी तू स्वीकारली आहेस ती तुलाच अतिशय लाडकी असो. हे बंधो, ही राज्यलक्ष्मी मलाही योग्य नाही. कारण हिच्या मोहामुळे होणारा कर्मबन्ध सज्जनाना आनन्ददायक होत नसतो ।। ९७ ॥ Page #339 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२८) महापुराण (३६-९८ दूषितां कण्टकैरेनां फलिनीमपि ते श्रियम् । करेणापि स्पृशेद्धीमाल्लतां कण्टकिनी च कः ॥ ९८ विषकण्टकजालीव त्याज्यषा सर्वथापि नः । निष्कण्टकां तपोलक्ष्मी स्वाधीनां कर्तुमिच्छताम् ॥९९ मृष्यतां च तदस्माभिः कृतमागो यदीदृशम् । प्रच्युतो विनयात्सोऽहं स्वं चापलमदीदशम् ॥१०० इत्युच्चरगिरामोघो मुखाबाहुबलीशितुः । ध्वनिरब्दादिवातप्तं जिष्णोरालादयन्मनः ॥१०१ हा दुष्टं कृतमित्युच्चरात्मानं स विगर्हयन् । अन्ववातप्त पापेन कर्मणा स्वेन चक्रराट् ॥ १०२ प्रत्युक्तानुनयं भूयो मनुमन्त्यं स धीरयन् । न्यवृतन्न स्वसङ्कल्पादहो स्थैयं मनस्विनाम् ॥ १०३ महाबलिनि निक्षिप्तराद्धिः स स्वनन्दने । दीक्षामुपादधे जैनी गुरोराराधयन्पदम् ॥ १०४ ___ अनेक माण्डलिक राजेरूपी काट्यानी भरलेली अशी ही तुझी राज्यलक्ष्मी जरी फले देणारी असली तरी ती तुलाच लखलाभ होवो. करण कोणता विचारी शाहणा मनुष्य या काटेरी लतेप्रमाणे असलेल्या तिला हाताने देखिल स्पर्श करील बरे? ॥ ९८ ॥ जी निष्कण्टक आहे, जिला कोणीही शत्रु नाही अशा तपोलक्ष्मीला हस्तगत करून घेण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ही राज्यलक्ष्मी विषारी काट्यांच्या जाळीप्रमाणे पूर्णपणे त्याज्य आहे ॥ ९९ ॥ म्हणून आमच्याकडून जो हा असला अपराध केला गेला आहे तो आपण सोसून घ्या. मी विनयापासून भ्रष्ट झालो होतो. म्हणून असला माझा चपलपणा-मूर्खपणा आपणास दाखविला आहे ।। १०० ॥ याप्रमाणे बाहुबलीराजाच्या मुखापासून उच्चारला गेलेल्या वाणीच्या प्रवाहाने मेघापासून उत्पन्न झालेल्या ध्वनीप्रमाणे जयशाली भरताच्या संतप्त झालेल्या मनाला आनंदित केले ।। १०१ ॥ अरेरे मी फार वाईट कार्य केले असे म्हणून भरताने आपली निंदा करीत स्वतःच्या पापकर्मामुळे फार पश्चात्ताप केला ॥ १०२ ॥ __ व पुनः अन्तिम मनु भरताने त्या बाहुबलीचा पुष्कळ अनुनय विनय केला अर्थात् तू दीक्षा घेऊ नकोस म्हणून प्रार्थना केली. तथापि त्याने त्याला धीर दिला व स्वतःच्या संकल्पापासून तो चलित झाला नाही. बरोबरच आहे की स्वाभिमानी लोकांचे आपले कार्य करण्याची स्थिरता-निश्चय आश्चर्ययुक्त व दृढ असते ॥ १०३ ॥ बाहुबलीने आपल्या महाबलिनामक पुत्रावर सर्व राज्याचे वैभव ठेवले. त्याला राज्य दिले व गुरु आदिभगवंताच्या चरणाची आराधना करून त्याने जिनदीक्षेचा स्वीकार केला ॥ १०४ ।। Page #340 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-११२) महापुराण (३२९ दीक्षावल्या परिष्वक्तस्त्यक्ताशेषपरिच्छवः । स रेजे-सलतः पत्रमोक्षक्षाम इव द्रुमः ॥ १०५ गुरोरनुमतेऽधीती दधवेकविहारिताम् । प्रतिमायोगमावर्षमातस्थे किल संवृतः ॥ १०६ सशंसितवतोऽनाश्वान् बनवल्लीततान्तिकः । वल्मोकरन्ध्रनिःसर्पत्सरासीभयानकः ॥ १०७ श्वसदाविर्भवद्भोगभुजङ्गशिशुजम्भितः । विषाङकुरैरिवोपाङघ्रि स रेजे वेष्टितोऽभितः ॥ १०८ वधानः स्कन्धपर्यन्तलम्बिनीः केशवल्लरीः । सोऽन्वगाढकृष्णाहिमण्डलं हरिचन्दनम् ॥ १०९ माधवीलतया गाढमुपगूढः प्रफुल्लया। शाखाबाहुभिरावेष्टय सध्रीच्येव सहायया ॥ ११० विद्यापरीकरालूनपल्लवा सा किलाशुषत् । पादयोः कामिनीवास्य सामि नम्रानुनेष्यती ॥ १११ रेजे स तववस्थोऽपि तपो दुश्चरमाचरन् । कामीव मुक्तिकामिन्या स्पृहयालः कृशीभवन् ॥ ११२ ज्याने राज्यादिपरिवार व सर्व परिग्रह त्यागले आहेत असा तो बाहुबली दीक्षा वेलीने जेव्हा अलिंगित झाला. त्यावेळी ज्याची पाने सगळी गळून पडली आहेत व त्यामुळे कृश झालेल्या व लतेने सहित असलेल्या वृक्षाप्रमाणे तो शोभू लागला ॥ १०५ ॥ गुरूच्या आज्ञेत राहून शास्त्रांचे अध्ययन करणाऱ्या बाहुबलीने एकटा विहार करण्याचे व्रत धारण केले आणि जितेन्द्रिय होऊन एक वर्षपर्यन्त एकाच जागी उभे राहून प्रतिमायोग धारण केला ॥ १०६ ॥ बाहुबलि मुनिराजानी प्रशंसित अशी व्रते धारण केली. त्यांच्या व्रतांची लोक प्रशंसा करीत असत. एक वर्षाचा प्रतिमायोग धारण केल्यामुळे एक वर्षपर्यंत त्यांनी आहार धारण केला नाही. त्यांच्या आजूबाजूचा प्रदेश वनवल्लीनी व्याप्त झाला होता. आजुबाजूला वारुळाच्या छिद्रातून बाहेर पडणाऱ्या सर्पानी ते मुनिराज भयानक दिसू लागले ॥ १०७ ॥ ___ श्वास सोडीत म्हणजे फूत्कार करीत ज्यांची शरीरे बाहेर आली आहेत अशा बाल सर्पानी श्रीबाहुबलिमुनीश्वरांच्या पाया सभोवती वेढा घातला होता तेव्हा ते मुनिराज विषांच्या अंकुरांनी वेढल्याप्रमाणे शोभले ।। १०८ ॥ खांद्यापर्यन्त लोंबणाऱ्या केशरूपी वेलीना धारण करणारे बाहुबलि मुनिराजानी ज्याने काळ्या सर्वांचा समूह धारण केला आहे अशा चन्दनवृक्षाचे अनुकरण केले आहे असे वाटले ॥ १०९॥ प्रफुल्ल अशा मोगऱ्याच्या वेलीने आपल्या शाखारूपी बाहूनी वेढून घट्ट आलिंगिलेले ते मुनिराज पुष्पहार धारण केलेल्या एखाद्या मैत्रिणीने जणु आलिंगित झाले आहेत असे दिसले॥११० जिची कोवळी पाने विद्याधर स्त्रियानी तोडली आहेत अशी ती मोगऱ्याची वेल या मुनिराजाच्या दोन पायावर पडली होती. तेव्हा ती थोडेसे नम्र होऊन मुनींची जणु विनवणी करीत असलेल्या स्त्रीप्रमाणे शुष्क झाली ।। १११ ।। ते बाहुबलि मुनिराज तशा अवस्थेतही म्हणजे कठिण तप करीत असतांही, मुक्तिरूपी स्त्रीमध्ये अभिलाषा ठेवून कृश झाले व त्यामुळे कामिपुरुषाप्रमाणे शोभले ।। ११२ ॥ म. ४२ Page #341 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३६-११३ तपस्तनूनपात्तापसन्तप्तस्यास्य केवलम् । शरीरभशुषनोवंशोषं कर्माप्यशर्मदम् ॥ ११३ तीव्रं तपस्यतोऽप्यस्य नासीत्कश्चिदुपप्लवः । अचिन्त्यं महतां धेयं येनायान्ति न विक्रियाम् ॥ ११४ सर्वसहः क्षमाभारं प्रशान्तः शीतलं जलम् । निःसङ्गः पवनं दीप्तः स जिगाय हुताशनम् ॥ ११५ क्षुधं पिपासां शीतोष्णं स दंशमशकद्वयम् । मार्गाच्यवनसंसिद्धयं द्वन्द्वानि सहते स्म सः ॥ ११६ सनाग्न्यं परमं बिभ्रनाभेदीन्द्रियधूर्तकः । ब्रह्मचर्यस्य सा गुप्तिर्नान्यं नाम परं तपः ॥ ११७ ति चारतिमप्येष द्वितयं स्म तितिक्षते । न रत्यरतिबाधा हि विषयानभिषङ्गिणः ॥ ११८ नात्यासीत् स्त्रीकृता बाषा भोग निर्वेदमापुषः । शरीरमशुचि स्त्रैणं पश्यतश्चर्मपुत्रिकाम् ॥ ११९ ३३०) महापुराण तपरूपी अग्नीच्या तापाने संतप्त झालेल्या या मुनिराजाचे शरीरच केवळ वरून - खालीपर्यन्त शुष्क झाले असे नाही तर दुःख देणारे कर्म देखिल वरून खालीपर्यंत शुष्क झाले, सुकून गेले ।। ११३ ॥ हे मुनिराज तीव्र तप करीत असताही याना कोणताहि विकार - उपद्रव उत्पन्न झाला नाही. बरोबरच आहे की, महापुरुषांचे धैर्य अचिन्त्य - अतर्क्यं असते त्यामुळे ते विकारयुक्त होत नाहीत ।। ११४ ।। सर्वं उपसर्ग आणि भूक तहान वगैरे परीषहांना सहन करणाऱ्या या मुनिराजानी पृथ्वीला जिंकिले. अतिशय शान्तियुक्त असल्यामुळे त्यांनी शीतल पाण्याला जिंकले. परिग्रहरहित असल्यामुळे त्यांनी वायूला जिंकले आणि तपाने दीप्त झाल्यामुळे त्यानी अग्नीला जिंकले होते ॥ ११५ ॥ ते मुनिराज रत्नत्रयरूप मोक्षमार्गापासून च्युत न व्हावे व त्या मोक्षमार्गाची सिद्धि व्हावी म्हणून भूक, तहान, थंडी, उष्णता, दंशमशक- डास, ढेकूण, विंचू वगैरे चावणारे जे जीव त्यापासून होणारा त्रास सहन करीत असत ॥। ११६ ।। उत्कृष्ट नग्नपणा धारण करणान्या त्या मुनिराजांना इन्द्रियरूपी धूर्त संयम भ्रष्ट करू शकले नाहीत. वैराग्यपूर्ण नग्नता ही उत्कृष्ट तप आहे. व हेच ब्रह्मचर्याचे उत्कृष्ट रक्षण करणारे आहे ।। ११७ ॥ मुनिवर्य, पंचेन्द्रिय विषयापासून पूर्ण विरक्त होते म्हणून त्याना रति व अरतीची बाधा होत नव्हती. ते रति व अरति या दोन्ही उपसर्गाना सहन करीत होते ।। ११८ ॥ भोगापासून विरक्ति यांच्या ठिकाणी पूर्ण पुष्ट झाली होती म्हणून स्त्रीपरीषहाची बाघा याना झाली नाही. कारण स्त्रीशरीर हे अपवित्र आहे. स्त्री ही चामड्याची पुतळी आहे असे ते पाहत असत ॥ ११९ ॥ Page #342 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-१२५) . महापुराण स्थितश्चर्या निषद्यां च शय्यां चासोढ हेलया। मनसानभिसन्धित्सन्नुपानच्छयनासनम् ॥ १२० स सेहे वधमाक्रोशं परमार्थविदांवरः । शरीरके स्वयं त्याज्ये निःस्पृहोऽनभिनन्वथुः॥ १२१ याचित्रियेण नास्येप्टा विष्वाणेन तनुस्थितिः। तेन वाचंयमो भूत्वा याञ्चाबाधामसोढ सः॥१२२ जल्लं मलं तृणस्पर्श सोऽसोढोढोत्तमक्षमः । व्युत्सृष्टतनुसंस्कारो निविशेषसुखासुखः ॥ १२३ रोगस्यायतनं देहमाध्यायधीरधीरसौ । विविधातङ्कजा बाधां सहते स्म सुदुःसहाम् ॥ १२४ प्रज्ञापरीषहं प्राज्ञो ज्ञानजं गर्वमुत्सृजन् । आसर्वज्ञं तदुत्कर्षात्स ससाह ससाहसः ॥ १२५ ... हे मुनिराज नेहमी उभे राहून ध्यान करीत असत. म्हणून चर्या चालण्यापासून होणारी बाधा, बसण्यापासून बाधा आणि झोपण्यापासून होणारी बाधा या सर्व बाधाना त्यानी लीलेने सहन केले होते व कधीही मनाने पायात जोडा असता तर बरे झाले असते; तसेच झोपण्यासाठी बिछाना आणि बसण्यासाठी आसन-खुर्ची वगैरेचा संकल्प त्यानी कधीही केला नाही ।। १२० ॥ जे आत्म्याचे खरे स्वरूप जाणणाऱ्या मुनिवर्गात श्रेष्ठ होते, अशा त्या बाहुबलि मुनिराजांनी वधपरीषह-काठीने शस्त्राने ठोकणे मारणे इत्यादि स्वरूपाचा शत्रूकडून होणारा परीषह जसा सहन केला तसाच आक्रोशपरीषह-शत्रूकडून निंदा केली जाणे, शिवीगाळी दिली जाणे हा परीषह पण सहन केला. कारण शरीर हे मूळापासून त्याज्यच आहे, त्याच्याविषयी त्यांनी कधी स्पृहा धारण केली नाही व त्याचे कधी अभिनन्दनही केले नाही ॥ १२१ ॥ या मुनिराजाला याचना करून मिळविलेल्या आहाराने शरीर पोषण करणे कधीही आवडले नाही आणि त्यामुळे त्यानी मौन धारण करून तो याचनापरीषह सहन केला ॥ १२२ ॥ ज्यानी उत्तम क्षमा धारण केली आहे, ज्यानी शरीराला सुगंधी जलाने स्नान घालणे, त्याला अत्तर लावणे आदिक क्रिया सोडल्या आहेत, जे शारीरिक सुखदुःखाविषयी समान आहेत, अशा त्या मुनिवर्यानी स्वेदमल व गवताचा स्पर्श होणे, काटे टोचणे यापासून जी बाधा होते ती अर्थात् मलस्पर्शपरीषह व तृणस्पर्शपरीषह हे सहन केले. ।। १२३ ॥ शरीर हे रोगांचे घर आहे असे चिन्तन करून धेर्ययुक्त अशा या मुनिवर्याने नाना प्रकारच्या रोगांच्या अतिशय दुःसह पीडा सहन केल्या ॥ १२४ ॥ विद्वान् अशा त्या मुनीनी ज्ञानापासून उत्पन्न होणारा जो प्रज्ञा परीषह तो सर्व त्यागला. ते असा विचार करीत असत की केवलज्ञानी जे सर्वज्ञ तेथपर्यंत या बुद्धीचे उत्तरोत्तर विशेष वाढतात व केवलज्ञान झाल्यावर पुनः बुद्धि प्रज्ञा ही वाढत नाही, त्या अर्थी जगात सर्वज्ञता प्राप्त ईपर्यन्त मध्ये प्रज्ञांचे असंख्यात भेद आहेत. यास्तव जगात एकापेक्षा दुसरा अधिक प्रज्ञावान् आढळतो असा विचार करून त्या साहसी मुनिवर्यांनी प्रज्ञापरीषह सहन केला ॥ १२५ ।। Page #343 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३२) महापुराण (३६-१२६ स सत्कारपुरस्कारे नासीज्जातु समुत्सुकः । पुरस्कृतो मुदं नागात्सत्कृतो न स्म तुष्यति ॥ १२६ ' परीषहमलाभं च सन्तुष्टो जयति स्म सः । अज्ञानदर्शनोद्भता बापासीन्नास्य योगिनः ॥ १२७ परीषहजयावस्य विपुला निर्जराभवत् । कर्मणां निर्जरोपायः परीषहजयः परः ॥ १२८ पञ्चेन्द्रियाण्यनायासात्सोऽजयज्जितमन्मथः । विषयेन्धनदीप्तस्य कामाग्नेः शमनं तपः ॥ १२९ क्रोधं तितिक्षया मानमत्सेकपरिवर्जनः । मायामजुतया लोभं सन्तोषेण जिगाय सः॥१३० आहास्भयसंज्ञे च समैथुनपरिग्रहे । अनङ्गविजयादेताः संज्ञाः क्षपयति स्म सः॥ १३१ इत्यन्तरङ्गशत्रूणां स भजन्प्रसरं महुः । जयति स्मात्मनात्मानमात्मविद्विदिताखिलः ॥ १३२ . व्रतं च समितीः सर्वाः सम्यगिन्द्रियरोधनम् । अचेलतां च केशानां प्रतिलञ्चनसङ्गरम् ॥ १३३ आवश्यकेष्वसम्बाधामस्नानं क्षितिशायिताम । अदन्तपावनं स्थित्वा भक्ति भक्तं च नासकृत् ॥ प्राहुर्मूलगुणानेतांस्तथोत्तरगुणाः परे । तेषामाराधने यत्नं सोऽतनिष्टातनर्मुनिः ॥ १३५ ते मुनिराज आपला लोकानी सत्कार करावा व आपणास सर्वकार्यात पुढे करून पुढारी मानावे याविषयी केव्हाही उत्सुक नसत. कोणी आपणास पुढारीपणा दिल्यास ते आनंदी होत नसत व कोणी सत्कार केला असता त्यांना हर्ष वाटत नसे. याप्रमाणे सत्कारपुरस्कार परीषहाला ते जिंकीत असत ॥ १२६ ॥ नेहमी सन्तोषवृत्ति धारक अशा या मुनीशानी अलाभ परीषहाला जिंकले होते आणि अज्ञान व अदर्शन यापासून होणारी बाधा त्यांना कधीही झाली नाही ॥ १२७ ॥ परीषहावर विजय मिळविल्याने या मुनींना फार मोठी कर्मनिर्जरा प्राप्त झाली. म्हणून परिषहाना जिंकणे हा कर्माच्या निर्जरेचा फार मोठा उपाय आहे ॥ १२८ ॥ मदनाला जिंकल्यामुळे या मुनीशाने आयासावाचून पाचही इन्द्रियाना जिंकले. हा कामाग्नि पंचेन्द्रियांच्या विषयरूप लाकडानी प्रज्वलित होतो पण त्या अग्नीला तप हे नष्ट करते, शान्त करते ॥ १२९ ।। या मुनिवर्यानी क्षमेने क्रोधाला जिंकले, गर्वाला गर्वाचा त्याग करून जिंकले. सरळपणाने मायेला-कपटाला व सन्तोषाने लोभाला जिंकले ।। १३० ।। कामविकारावर विजय मिळविल्यामुळे या मुनीश्वरानी आहार, भय, मैथुन आणि परिग्रह या चार संज्ञा-अभिलाषांना जिंकले ॥ १३१ ॥ याप्रमाणे अन्तरंग शत्रूचा फैलाव वारंवार या मुनिराजानी मोडून टाकला. त्यामुळे आत्म्याला व इतर सर्व पदार्थांना जाणणा-या या मुनीश्वराने स्वतःच्याद्वारे स्वतःवर विजय मिळविला. म्हणजे स्वस्वरूपात स्थिर झाले ।। १३२ ।। ___ अहिंसा, सत्यादिक पाच महाव्रते, ईर्यासमिति, भाषासमित्यादिक पाच समिति आणि आपल्या स्पर्शन जिह्वादिक पाच इन्द्रियाना त्यांच्या स्पर्शादिक विषयाकडे जाऊ न देणे, अर्थात् पंचेन्द्रियाना ताब्यात ठेवणे, सर्व वस्त्रमात्रांचा त्याग अर्थात् पूर्ण नग्नता धारण करणे, केशांचा Page #344 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-१४१) महापुराण एतेष्वहापयन्किञ्चिद्वतशुद्धि परां श्रितः । सोऽदीपि किरण स्वामिव दीप्रैस्तपोंऽशभिः ॥ १३६ गारवैस्त्रिभिरुन्मुक्तः परां निःशल्यतां गतः । धमर्दशभिरारूढदाढर्योऽभून्मुक्तिवर्मनि ॥ १३७ ।। गुप्तित्रयमयीं गुप्ति धितो ज्ञानासिभासुरः। संवर्तितः समितिभिः स भेजे विजिगीषुताम् ॥ १३८ कषायतस्कर स्यि हृतं रत्नत्रयं धनम् । सततं जागरूकस्य भूयो भूयोऽप्रमाद्यतः ॥ १३९ वाचंयमस्य तस्यासीन्न जातु विकथादरः । नाभिद्यतेन्द्रियरस्य मनोदुर्ग सुसंवृतम् ॥ १४० मनोगारे महत्यस्य बोधिता ज्ञानदीपिका । व्यदीपि तत एवासन्विश्वेऽर्था ध्येयतापदे ॥ १४१ लोच करणे, ( दाढी, मिशा व डोक्याचे केश हाताने उपडणे- केशलोचाची प्रतिज्ञा घेणे, सामायिक, वन्दना, प्रतिक्रमण, आलोचना, प्रत्याख्यान, चोविस तीर्थंकरांची स्तुति या सहा आवश्यकक्रिया करणे, यामध्ये बाधा न आणणे, स्नान न करणे, जमिनीवर झोपणे, दात न घासणे उभा राहून आहार घेणे व एकदा जेवणे, असे हे अट्ठावीस मूलगुण मुनींना सांगितले आहेत. याहून उत्तरगुण पुनः वेगळे सांगितलेले आहेत. या महामुनींनी या मूलगुण व उत्तरगुणांची आराधना करण्याचा यत्न केला ।। १३३-१३५ ॥ या अठ्ठावीस मूलगुणात व उत्तरगुणात काहीही या मुनिवर्याने त्यागले नाही. त्यामुळे यांच्या व्रताची शुद्धि अत्युत्कृष्ट झाली. त्यामुळे सूर्य जसा आपल्या किरणानी दैदीप्यमान दिसतो तसे हे मुनिवर्य दीर्घ अशा तपरूपी किरणानी चमकत होते ॥ १३६ ॥ मी उत्तमवक्ता आहे, मला उत्कृष्ट आहार मिळतो व मला अनेक ऋद्धि प्राप्त झाल्या आहेत अशा तीन प्रकारच्या गारवानी-गर्वानी हे मुनिवर्य रहित होते. तसेच माया, मिथ्यात्व आणि निदान या तीन शल्यानी रहित होते त्यामुळे शल्यरहित व गारवरहित उत्कृष्ट मुनीपणाला ते प्राप्त झाले होते व मोक्षमार्गात उत्तम क्षमादि दहा धर्मानी उत्कृष्ट दृढतेला पावले होते ॥ १३७ ॥ . मनोगुप्ति, वचनगुप्ति आणि कायगुप्ति या तीन गुप्तीना-जणु गुप्ति नामक शस्त्राला व ज्ञानरूपी तरवारीला धारण केल्यामुळे हे मुनिवर्य मोठे तेजस्वी दिसत होते व ईर्यासमित्यादि पाच समितिरूपी चिलखत धारण केल्यामुळे कर्मशत्रूला जिंकण्याची इच्छा करणारे हे मुनिराज शत्रूना जिंकण्याची इच्छा करणा-या राजाप्रमाणे झाले ॥ १३८॥ हे मुनीश पुनः पुनः जागरूक राहत असत व आपल्या व्रतादिकात सतत प्रमादरहितआळस त्यागून दक्ष राहत होते व त्यामुळे कषायरूपी चोरानी यांचे रत्नत्रयरूपी धन हरण केले नाही ।। १३९ ॥ नेहमी मौनव्रत धारण करणाऱ्या या मुनिवर्याना राजकथा, स्त्रीकथादि विकथामध्ये कधीही आदर वाटला नाही व उत्तमरीतीने रक्षिलेल्या यांच्या मनरूपी किल्याला इन्द्रियानी कधीही फोडले नाही. ॥ १४० ॥ ___ या मुनिवर्याच्या विशाल अशा मनरूपी घरात वृद्धिंगत झालेली ज्ञानरूपी दिवटी खूप प्रकाशयुक्त झाली. त्यामुळे सर्व पदार्थ जाणण्यास योग्य असे झाले ॥ १४१ ।। Page #345 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३४) महापुराण (३६-१४२ मतिश्रुताभ्यां निःशेषमर्थतत्वं विचिन्वतः । करामलकवद्विश्वं तस्य विस्पष्टतामगात् ॥ १४२ परीषहजयैर्दीप्तो विजितेन्द्रियशात्रवः । कषायशत्रूनुच्छेद्य स तपोराज्यमन्वभूत् ॥ १४३ योगजाश्चर्द्धयस्तस्य प्रादुरासंस्तपोबलात् । यतोऽस्याविरभूच्छक्तिस्त्रैलोक्यक्षोभणं प्रति ॥ १४४ चतुर्भेदेऽपि बोधेऽस्य समुत्कर्षस्तदोदभूत् । तत्तवावरणीयानां क्षयोपशमभितः ॥ १४५ मतिज्ञानसमुत्कर्षात्कोष्ठबद्धचादयोऽभवन् । श्रुतज्ञाने च विश्वाङ्गपूर्व वित्त्वादिविस्तरः ॥ १४६ परमावधिमुल्लडच्य स सर्वावधिमासदत् । मनःपर्ययबोधं च सम्प्रापद्विपुलां मतिम् ॥ १४७ ज्ञानशुद्धचा तपःशुद्धिरस्यासीदतिरेकिणी । ज्ञानं हि तपसो मूलं यद्वन्मूलं महातरोः ॥ १४८ मतिज्ञान व श्रुतज्ञान या दोन ज्ञानांच्याद्वारे सर्व जीवादि पदार्थांच्या स्वरूपाचा विचार चिन्तन ते मुनिराज करीत असत व त्यावेळी हातातल्या आवळ्याप्रमाणे सर्व विश्व त्याना स्पष्ट झाले ॥ १४२ ।। सर्व परीषहाना यानी जिंकिले होते यामुळे हे मुनिवर्य अतिशय प्रकाशयुक्त झाले होते, यानी कषायशत्रूना जिंकले होते, त्यामुळे क्रोधादिकषायांचा नाश करून उत्तम तपरूपी राज्याचा ते उपभोग घेऊ लागले ॥ १४३ ।। त्याना तपाच्या सामर्थ्याने ध्यानापासून अनेक ऋद्धि प्राप्त झाल्या. त्यामुळे त्रैलोक्यात क्षोभ उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्याना प्राप्त झाले ॥ १४४ ।। त्यांच्या मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान आणि मनःपर्ययज्ञान या चारी ज्ञानामध्ये चांगली उत्कृष्टता प्राप्त झाली होती. कारण त्या त्या मत्यादि चार ज्ञानावरणीय कर्मांचा क्षयोपशम खूप वाढला होता ।। १४५ ।। - या महर्षीच्या ठिकाणी मतिज्ञानाचा अतिशय उत्कर्ष झाल्यामुळे कोष्ठबुद्धि, बीजबुद्धि आदिक ऋद्धि प्राप्त झाल्या आणि श्रुतज्ञानात आचारादि बारा अंगज्ञाने व उत्पादपूर्वादिक चौदा पूर्वांचे ज्ञान यांचा विस्तार याना प्राप्त झाला ॥ १४६ ॥ अवधिज्ञानाचे देशावधि, परमावधि आणि सर्वावधि असे तीन भेद आहेत त्यापैकी परमावधि ज्ञानाला उल्लंघून सर्वावधिज्ञानाची याना प्राप्ति झाली आणि मनःपर्यायज्ञानाचे ऋजुमति व विपुलमति असे दोन भेद आहेत त्यापैकी विपुलमति मन.पर्यायज्ञान याना प्राप्त झाले ॥ १४७ ॥ याप्रमाणे ज्ञानशुद्धि झाल्यामुळे तपश्चरणातही अतिशय निर्मलता प्राप्त झाली. जसे मूळ हे झाडाच्या मोठेपणाला कारण असते तसे ज्ञान हे तपाचे मूळ आहे. यामुळेच तपात विशुद्धि व अपूर्व सामर्थ्य प्राप्त होते ।। १४८ ।। Page #346 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-१५५) महापुराण (३३५ तपसोग्रेण चोग्रोग्रतपसा चातिकर्शितः । स दीप्ततपसात्यन्तं दिदीपे दीप्तिमानिव ॥ १४९ सोऽतप्यत तपस्तप्तं तपो घोरं महच्च यत् । तथोत्तराण्यपि प्राप्तः समुत्कर्षाण्यनुक्रमात् ॥ १५० तपोभिरकृशैरेभिः स बभौ मुनिसत्तमः । घनोपरोधनिर्मुक्तः करैरिव गभस्तिमान् ॥ १५१ विक्रियाष्टतयी चित्रं प्रादुरासीत्तपोबलात् । विक्रियामखिलां हित्वा तीव्रमस्य तपस्यतः ॥१५२ प्रप्तौषधढेरस्यासीत्सन्निधिर्जगते हितः । आमर्शवेलजल्लाद्यैः प्राणिनामुपकारिणः ॥ १५३ अनाशुषोऽपि तस्यासीद्रसद्धिः शक्तिमात्रतः। तपोबलसमुद्भूता बद्धिरपि प्रप्रये ॥ १५४ अक्षीणावसथः सोऽभूत्तथाक्षीणमहानसः । सूते हि फलमक्षीणं तपोषणमुपासितम् ॥ १५५ --------------- ते महामुनि उग्र तपाने व अधिक उग्र उग्र अशा तपाने अतिशय कृश झाले पण दीप्त अशा तपाने सूर्याप्रमाणे ते अत्यन्त तेजस्वी झाले ॥ १४९ ।। ___ या महामुनीनी तापकारक असे तप आचरिले. तसेच घोरतप आणि महाघोर तप आचरले. तसेच आणखी अतिशय उत्कर्षशाली उत्तर तपेहि त्यानी क्रमाला अनुसरून आचरणात आणली ॥ १५० ॥ जसा मेघाच्या आवरणापासून मोकळा झालेला सूर्य किरणानी तेजस्वी दिसतो तसे ते बाहुबली महामुनि उत्कृष्ट अशा सर्व तपानी खूप शोभले ।। १५१ ॥ सर्व प्रकारची विक्रिया विकार त्यागून तीव्र तपश्चरण करणाऱ्या या मुनीश्वराना तपाच्या बलाने आठ प्रकारची विक्रिया प्राप्त झाली. हे आश्चर्यकारक घडले. भावार्थ-रागद्वेषादि विकाराना त्यागून तप करणाऱ्या या मुनीश्वराना अणिमा, महिमा, गरिवा व लघिमा प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ विक्रिद्धि प्राप्त झाल्या ॥ १५२ ।। ___ ज्याना औषध ऋद्धि प्राप्त झाली आहे व जे आमर्श-वांति, क्ष्वेल-थुकी व जल्ल-अंगाचा घाम वगैरेच्या द्वारे उपकार करतात अशा या मुनिराजाचे सानिध्य जगताच्या हिताला कारण होते. अशा मुनींच्या संनिध जे मुनि राहतात त्यांचे रोगादिक दूर होऊन त्यांचे कल्याण होते. असा भावार्थ समजावा ।। १५३ ॥ जरी ते आहार घेत नव्हते तथापि अचिन्त्य सामर्थ्याने रसऋद्धि प्राप्त झाली होती व तपोबलामुळे त्यांच्या ठिकाणी बलऋद्धि देखिल प्रकट झाली होती ॥ १५४ ।। याचप्रमाणे ते महामुनि अक्षीणावसथऋद्धिधारक व अक्षीणमहानसत्रऋद्धिधारकही झाले होते. नेहमी अखंड तपश्चरण केले असता ते तप कधी न संपणाऱ्या फळाची प्राप्ति करून देते. जेथे अक्षीणावासऋद्धीचे धारक मुनि बसलेले असतात तेथे कितीही प्राणी येऊन बसले तरी कोणालाच अडचण वाटत नाही, सर्व सुखाने बसतात व अक्षीणमहानसऋद्धिधारक मुनि ज्या घरी आहार घेतात घरचे अन्न सगळ्या गावाला वाटले तरी ते सम्पत नाही ।। १५५ ॥ Page #347 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण ( ३६-१५६ निर्द्वन्द्ववृत्तिरध्यात्ममिति निर्जित्य जित्वरः । ध्यानाभ्यासे मनश्चक्रे योगी योगविदांवरः ॥ १५६ क्षमामथोत्तमां भेजे परं मार्दवमार्जवम् । सत्यं शौचं तपस्त्यागावाकिञ्चन्यं च संयमम् ॥ १५७ ब्रह्मचर्यं च धर्म्यस्य ध्यानस्यैता हि भावनाः । योगसिद्धी परां सिद्धिमामनन्तीह योगिनः ॥ १५८ अनित्यात्राण संसारकत्वान्यत्वान्य त्वान्य शौचताम् । निर्जरास्त्रवसंरोधलोकस्थित्यनुचिन्तनम् ॥ धर्मस्वाख्याततां बोधिर्दुर्लभत्वं च लक्षयन् । सोऽनुप्रेक्षाविधि दध्यौ विशुद्धद्वादशात्मकम् ॥ १६० आज्ञापायौ विपाकं च संस्थानं चानुचिन्तयन् । स ध्यानमभजद्धम्यं कर्मांशान्परिशातयन् ॥ १६१ ३३६) रागद्वेषादिरहित अशी निर्विकल्पवृत्ति धारण करणे अर्थात् चित्ताला रागद्वेषरहित करणे यालाच अध्यात्म म्हणतात असा निश्चय करून योगाला जाणणाऱ्यामध्ये श्रेष्ठ व जितेन्द्रिय अशा त्या मुनिवर्याने मनाला जिंकून त्याला ध्यानाच्या अभ्यासात तत्पर केले ।। १५६ ।। या मुनिराजानी उत्तम क्षमा- सहनशीलता, मार्दव - मानकषायाचा त्याग, आर्जव निष्कपटपणा, सत्य - खरे भाषण करणे, शौच निर्लोभ वृत्ति, तप- अनशनादि तप करणे, त्याग - दान देणे, आकिञ्चन्य निष्परिग्रहपणा, संयम - इन्द्रिये ताब्यात ठेवणे आणि ब्रह्मचर्य या धर्मध्यानाच्या दहा भावना आहेत. या जगात योगाची सिद्धि झाली म्हणजेच उत्कृष्ट सिद्धि-सफलता - मोक्षाची प्राप्ति होते असे योगी लोक मानतात ।। १५७-१५८ ।। अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचित्व, आस्रव, संवर, निर्जरा, लोक, बोधिदुर्लभ व धर्मस्वाख्यातता या बारा भावनांचे त्यानी विशुद्धचित्ताने चिन्तन केले होते. अनित्य- शरीर, धन वगैरे अनित्य आहे असे समजणे. अशरण- माझे रक्षण करणारा कोणी नाही असे चिंतन करणे, संसार- चतुर्गतीत फिरणे, एकत्व- मी एकटा आहे, पुत्रादिक कोणी भवान्तरी येत नाहीत असे चिन्तन, अन्यत्व, मी सर्वाहून भिन्न आहे असा विचार करणे, अशुचित्व- शरीर अपवित्र घाणेरडे आहे असे चिन्तन करणे, निर्जरा-बांधलेले कर्म कसे हळू हळू सडून जाईल याचा विचार करणे, आस्रव-जीवप्रदेशात कर्म कोणत्या कारणानी येतें याचा विचार करणे, संवर-कर्म कोणत्या उपायानी आत्म्यात येणार नाही त्या उपायाचा विचार, लोकस्थिति-जंग कसे आहे त्याची रचना कशी आहे याचा विचार करणे. धर्मस्वाख्यात-धर्मच संसारातून तारणारा आहे असा विचार करणे व त्याचे पालन करणे, बोधिदुर्लभता - रत्नत्रयाची प्राप्ति होणे दुर्लभ आहे असे चिन्तन करणे या बारा भावनांचे बाहुबलीमुनीनी निर्मल चिंतन केले होते ।। १५९ - १६० ॥ या मुनिराजानी आज्ञा, अपाय, विपाक आणि संस्थान यांचे चिन्तन करून व कर्माच्या अंशाना क्षीण करून धर्मध्यानाचा आश्रय केला. आज्ञाविचय- जिनेश्वरानी तत्त्वाचे स्वरूप अतिशय सूक्ष्म असे सांगितले आहे. त्यांची आज्ञाप्रमाण मानून त्या तत्त्वावर श्रद्धा ठेवणे, त्याचे चिन्तन करणे त्याला आज्ञाविचय धर्मध्यान म्हणतात. अपायविचय-मिथ्याज्ञानादिक हे जीवाला संसारात भ्रमण करण्यास कारण आहेत असा विचार करणे, विपाकविचय-कर्माच्या उदयादिकाचा विचार करणे हे तिसरे धर्मध्यान व संस्थानविचय-लोकाची रचना व त्यात असणारे पदार्थ यांचे स्वरूपचिंतन करणे हे चौथे धर्मध्यान होय ॥ १६१ ॥ Page #348 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-१६१) महापुराण ( ३३७ afreturnवामुष्य ध्यानदीप्तौ निरीक्षिताः । क्षणं विशीर्णाः कर्माशा: कज्जलांशा इवाभितः ॥ तद्देहदीप्तिप्रसरो दिङ्मुखेषु परिस्फुरन् । तद्वनं गारुडग्रावच्छायाततमिवातनोत् ॥ १६३ तत्पदोपान्तविश्रान्ता विस्रब्धा मृगजातयः । बबाधिरे मृगैर्नान्यः क्रूररक्रूरतां श्रितैः ॥ १६४ विरोधिनोऽप्यमी मुक्तविरोधाः स्वरमासिताः । तस्योपाङग्रीभसिंहाद्याः शशंसुर्वैभवं मुनेः ।। १६५ जरज्जन्तुकमाघ्राय मस्तके व्याघ्रधेनुका । स्वभावनिविशेषं तमापोप्यत्स्तन्यमात्मनः ॥ १६६ करिणो हरिणाराती नन्वीयुः सह यूथपैः । स्तनपानोत्सुका भेजुः करिणीः सिंहपोतकाः ॥ १६७ कलभान्कलभाकार मुखरान्नखरैः खरैः । कण्ठीरवः स्पृशन्कण्ठे नाभ्यनन्दि न यूथपैः ॥ १६८ करिण्यो बिसिनी पत्रपुटैः पानीयमानयन् । तद्योगपीठपर्यन्तभुवः संमार्जनेच्छया ॥ १६९ श्यानरूपी जणु दिवटी तिच्या प्रकाशात कर्माचे अंश जणु काजळाच्या अंशाप्रमाणे तत्काल वर चोहोकडे निघून जात असल्याप्रमाणे दिसू लागले. अर्थात् धर्मध्यानाने कर्माचे अंश बाहुबलिमुनि राजापासून निघून जात आहेत असे दिसले ।। १६२ ॥ या मुनिराजाच्या शरीराच्या कान्तीचा समूह सर्व दिशामध्ये पसरून त्या वनाला जणु त्याने गारुडरत्नांच्या कान्तीनी व्याप्त केल्याप्रमाणे केले || १६३ ॥ त्या मुनिराजाच्या चरणाजवळ विश्रान्तीकरिता बसलेले अनेक प्रकारच्या हरिणादि प्राण्याना मातापित्याजवळ आपण बसलो आहोत असे वाटत असे कारण अन्य क्रूर प्राणी तेथे आले तरी ते त्या मुनीश्वराच्या प्रभावाने अक्रूर बनत असत व त्यांच्याकडून हरिणादिकाना बाधा पोहोचत नसे ॥ १६४ ॥ या मुनिराजाच्या चरणाजवळ हत्ती, सिंह, वाघ, गाय वगैरे परस्परविरोधी प्राणीदेखिल स्वच्छंदाने बसून वैररहित होत असत व त्यानी या मुनीश्वराचे वैभव ( प्रभाव ) व्यक्त केले ॥ १६५ ॥ नुकतीच प्रसवलेल्या वाघिणीने म्हशीच्या पिलाला बच्चाला त्याच्या मस्तकाला हुंगून आपल्या बच्च्याप्रमाणे त्याला मानले व तिने त्याला आपले दूध पाजले ॥ १६६ ॥ हत्ती आपल्या कळपाच्या मुख्य हत्तीसह सिंहाच्या मागोमाग जाऊ लागले व सिंहाचे बच्चे स्तनपान करण्यास उत्सुक होऊन हत्तिणीजवळ गेले ।। १६७ । बालपणाचे कोमल स्वर काढणाऱ्या हत्तीच्या बच्च्याना सिंह आपल्या तीक्ष्ण नखानी त्यांच्या कंठाजवळ जेव्हा स्पर्श करून खाजवू लागला तेव्हा कळपाच्या मुख्य हत्तीनी त्याचे अभिनंदन केले नाही असे नाही. अर्थात् त्याना मोठा आनंद वाटला ॥। १६८ ।। त्या मुनिराजाच्या योगासनाच्या जवळची जमीन स्वच्छ करावी अशा इच्छेने हत्तिणीनी कमलिनीच्या पानांच्या द्रोणानी पाणी आणले ।। १६९ ॥ म. ४३ Page #349 -------------------------------------------------------------------------- ________________ ३३८) महापुराण (३६-१७० पुष्करः पुष्करोदस्तन्यस्तैरषिपदद्वयम् । स्तम्बेरमा मुनि भेजुरहो शमकरं तपः ॥ १७० उपानि भोगिनां भोगविनीलय॑रुचन्मुनिः । विन्यस्तैरर्चनायेव नीलरुत्पलदामकः ॥ १७१ फणमात्रोद्गता रन्ध्रात्फणिनः सितयोऽद्युतन् । कृताः कुवलयरर्घा मुनेरिव पदान्तिके ॥ १७२ रेजुर्वनलता नम्रः शाखाद्यैः कुसुमोज्ज्वलः । मुनि भजन्त्यो भक्त्येव पुष्पार्धेनंतिपूर्वकम् ॥ १७३ शश्वविकासिकुसुमैः शाखाग्नेरनिलाहतः । बभुवनगुमास्तोषानिनृत्सव इवासकृत् ॥ १७४ कलरलिरुतोद्गीतः फणिनो नन्तुः किल । उत्फणाः फणरत्नांशुदीप्रैर्भोगविवर्तितः ॥ १७५ पुंस्कोकिलकलालापडिण्डिमानुगतल्यैः । चक्षुःश्रवस्सु पश्यत्सु तद्विषो नटिषुर्मुहुः ॥ १७६ महिम्ना शमिनः शान्तमित्यभूत्तच्च काननम् । धत्ते हि महतां योगः शममप्यशमात्मसु ॥ १७७ .......................................... हत्तीनी आपल्या सोंडाच्या अग्रभागानी कमले आणली व ती या मुनिराजाच्या दोन चरणाजवळ ठेविली व अशारीतीने त्यानी त्या मुनिवर्याची भक्ति केली. अहो हे तप शान्ति उत्पन्न करणारे आहे असे कोण म्हणाणर नाही बरे ? ।। १७० ॥ मुनिराजाच्या पायाजवळ नीलसांची वेटाळयानी शोभत असलेली शरीरे जणु त्यांचे पूजनासाठी नीलकमलांच्या माला ठेवल्या आहेत अशारीतीने ते मुनिराज शोभले ॥ १७१ ॥ ज्यानी वारुळाच्या छिद्रातून फणामात्र वर काढला आहे असे काळे सर्प त्या मुनीश्वराच्या चरणाजवळ जणु त्याना अर्घ अर्पण केल्याप्रमाणे शोभू लागले ॥ १७२ ॥ पुष्पानी उज्ज्वल दिसणाऱ्या व शाखांच्या शेंड्यानी नम्र झालेल्या वनलता जणु भक्तीने नम्र होऊन व फुलानी अर्घ अर्पण करून त्या मुनींची पूजा करीत आहेत असे वाटले ॥ १७३॥ ज्यांची फुले नेहमी प्रफुल्ल आहेत, वारंवार वान्याने हालत आहेत, डुलत आहेत अशा शाखांच्या अग्रभागानी युक्त असे वृक्ष आनंदाने अनेकवेळा जणु नाचण्याची इच्छा करीत आहेत असे शोभले ।। १७४ ।। मधुर अशा भुंग्यांच्या उच्च झंकारानी ज्यानी आपल्या फणा वर केल्या आहेत व फणावरील रत्नकिरणानी प्रकाशित ज्याची शरीरे झाली आहेत असे सर्प आपली ती शरीरे वळवून नृत्य करीत आहेत असे शोभत होते ॥ १७५ ॥ नरकोकिलांच्या मधुर गायन-कुहुकुहू असे जे मधुर शब्द हेच डिडिम-वाद्ये त्याना अनुसरून असणाऱ्या लयानी सर्प पाहत असता त्यांचे शत्रु-अर्थात् मोर वारंवार नृत्य करू लागतात ॥ १७६ ॥ त्या शमदमशील बाहुबलि मुनीशाच्या प्रभावाने वर वर्णिल्याप्रमाणे त्या वनात चोहोकडे शान्ति पसरली. बरोबरच आहे की, महापुरुषांचा संबंध झाला असता जे अशान्त वृत्तीचे आहेत त्यांच्याही ठिकाणी शान्ति उत्पन्न होते ॥ १७७ ॥ Page #350 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-१८६) महापुराण शान्तस्वनैर्नदन्ति स्म वनान्तेऽस्मिन् शकुन्तयः । घोषयन्त इवात्यन्तं शान्तमेतत्तपोवनम् ॥ १७८ तपोऽनुभावादस्यैवं प्रशान्तेऽस्मिन्वनाश्रमे । विनिपातः कुतोऽप्यासीत्कस्यापि न कथञ्चन ॥ १७९ महसास्य तपोयोगजृम्भितेन महीयसा । बभूवुर्हत हृद्ध्वान्तास्तिर्यञ्चोऽप्यनभिद्रुहः ॥ १८० गतिस्खलनतो ज्ञात्वा योगस्थं तं मुनीश्वरम् । असकृत्पूजयामासुरवतीर्य नभश्चराः ॥ १८१ महिम्नास्य तपोवीर्यजनितेनालघीयसा । मुहुरासन कम्पोऽभून्नतमुर्ध्ना सुषाशिनाम् ॥ १८२ विद्याधर्यः कदाचिच्च क्रीडाहेतोरुपागताः । वल्लीरुद्वेष्टयामासुर्मुनेः सर्वाङ्गसङ्गिनीः ॥ १८३ इत्युपारूढसद्धयानबलोद्भूततपोबलः । स लेश्याशुद्धिमास्कन्दन्शुक्लध्यानोन्मुखोऽभवत् ।। १८४ वत्सरानशनस्यान्ते भरतेशेन पूजितः । स भेजे परमज्योतिः केवलाख्यं यदक्षरम् ॥ १८५ सक्लिष्टो भरताधीशः सोऽस्मत्त इति यत्किल । हृद्यस्य हादं तेनासीत्तत्पूजापेक्षिकेवलम् ॥ १८६ या वनाच्या मध्यभागी पक्षी शान्त शब्दानी किलबिल करीत आहेत. जणु ते हे तपोवन अत्यन्त शान्त आहे अशी घोषणा करीत आहेत असे वाटते ॥ १७८ ॥ ( ३३९. तपाच्या प्रभावाने हा वनाश्रम याप्रमाणे अतिशय शान्त आहे व येथे कोणाचाही व कसल्याही प्रकारचा उपद्रव होत नाही ।। १७९ ॥ या मुनिराजाच्या तपोयोगाने वृद्धिंगत झालेल्या मोठ्या तेजाने येथील तिर्यंच पशुपक्षीही त्यांच्या हृदयातील अंधार अज्ञान नाहीसा झाला असल्यामुळे वैररहित झाले आहेत ॥ १८० ॥ विद्याधर आपल्या गमनास प्रतिबंध झाल्यामुळे येथें आत्मध्यानात लवलीन झालेले मुनीश्वर आहेत हे जाणून व वारंवार उतरून त्यांची पूजा करीत असत ।। १८१ ।। तपश्चरणाच्या सामर्थ्याने फार मोठा प्रभाव या मुनिवर्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला असल्यामुळे ज्यांची मस्तके नम्र झाली आहेत अशा देवांचे वारंवार आसनकम्प होत असत ।। १८२ ॥ केव्हा केव्हा क्रीडा करण्यासाठी या वनात विद्याधरी येत असत व या मुनीश्वराच्या सर्व अंगाना लपेटलेल्या वेली त्या काढून दूर करीत असत ।। १८३ ॥ याप्रमाणे धारण केलेल्या उत्तम ध्यानाच्या सामर्थ्याने ज्यांच्यामध्ये तपोबल प्रकट. झाले आहे असे हे मुनिवर्य लेश्यांची निर्मलता धारण करून शुक्लध्यानाकडे वळले || १८४ ॥ एक वर्षाच्या उपवासांची समाप्ति झाल्यावर भरतचक्रवर्तीने या बाहुबलि मुनिवर्यांची पूजा केली. त्यावेळी त्याना सर्व तत्त्वाना प्रकाशित करणारे व अविनाशी असे केवलज्ञान प्राप्त झाले ।। १८५ ।। हा भरताधीश आमच्यापासून फारच पीडित झाला अशा अभिप्रायाचे बाहुबलीच्या मनात प्रेम होते म्हणून बाहुबलीचें केवलज्ञान त्याने भरताधीशानें पूजा करावी अशी अपेक्षा जणु करीत होते ॥ १८६ ॥ Page #351 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४०) महापुराण (३६-१८७ केवलार्कोदयात्प्राक्च पश्चाच्च विधिवव्यधात् । सपर्या भरताधीशो योगिनोऽस्य प्रसन्नधीः॥१८७ स्वागःप्रमार्जनार्थेज्या प्राक्तनी भरतेशिनः । पाश्चात्यात्यायताऽपीज्या केवलोत्पत्तिमन्वभूत् ॥ या कृता भरतेशेन महेज्या स्वानुजन्मनः । प्राप्तकेवलबोधस्य को हि तवर्णने क्षमः ॥१८९ स्वाजन्यानुगमोऽस्त्येको धर्मरागस्तथापरः । जन्मान्तरानुबन्धश्च प्रेमबन्धोऽतिनिर्भरः ॥ १९० इत्येकशोऽप्यमी भक्तिप्रकर्षस्य प्रयोजकाः । तेषां तु सर्वसामग्री कां न पुष्णाति सक्रियाम् ॥१९१ सामात्यः समहीपालः सान्तःपुरपुरोहितः । तं बाहुबलियोगीन्द्रं प्रणनामाधिराट् मुदा ॥ १९२ किमत्र बहुना रत्नैः कृतोऽर्घः स्वर्णदीजलम् । पाद्यं रत्नाचिषो दीपास्तण्डुलेज्या च मौक्तिकैः ॥ हविः पीयूषपिण्डेन धूपो देवद्रुमांशकः । पुष्पार्चा पारिजातादिसुरागसुमनश्चयः ॥ १९४ सरत्ना निधयः सर्वे फलस्थाने नियोजिताः। पूजां रत्नमयीमित्थं रत्नेशो निरवर्तयत् ॥ १९५ ___ केवलज्ञानरूपी सूर्योदयाच्या पूर्वी आणि केवलज्ञान उत्पन्न झाल्यावर या बाहुबलियोगिराजाची प्रसन्न बुद्धीने भरतपतीने विधीप्रमाणे पूजा केली ।। १८७ ।। ___भरतेश्वराने प्रथम जी पूजा केली ती स्वतःच्या अपराधाच्या क्षालनासाठी केली होती व नन्तर मागाहून जी फार मोठी पूजा योगिराजाची केली होती. ती केवलज्ञानानन्तर झाली ॥ १८८॥ ज्याला केवलज्ञानाची प्राप्ति झाली आहे अशा आपल्या भावाची या भरतचक्रीने जी फार मोठी पूजा केली तिचे वर्णन करण्यास कोण बरे समर्थ आहे ? ॥ १८९ । बाहुबली भरताचे स्वजन होते- धाकटे भाऊ होते हे त्यांची पूजा करण्याचे पहिले कारण, दुसरे कारण धर्मावर उत्कट प्रेम, तिसरे कारण अनेक पूर्वजन्मापासूनचे संबंध व चौथे कारण अतिशय गाढ असे बाहुबलीवरचे प्रेम. यापैकी एकेक देखिल भक्तिप्रकर्षाच्या उत्पत्तीचे कारण आहे. मग या सर्वकारणांची सामग्री प्राप्त झाल्यावर ती कोणत्या श्रेष्ठ कार्याला पुष्ट करणार नाही बरे ? ॥ १९०-१९१ ॥ त्या भरतचक्रेश्वराने आपले प्रधान, आपल्या अधीन असलेले राजे, आपले अन्तःपूर व आपला पुरोहित या सर्वाना बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने बाहुबली योगीन्द्राला अतिशय नम्र पणाने वंदन केले ।। १९२ ॥ ___ या पूजेविषयी अधिक वर्णन करण्याची आवश्यकता नाही. या भरतेश्वराने रत्नानी अर्घ्य अर्पण केला. गंगानदीचे पाणी त्या बाहुबलीच्या चरणक्षालनास भरतेश्वराने उपयोगात आणले. रत्नांच्या कान्तीनी त्याने दीपपूजा केली व मोत्यांचे समूह हे तांदूळ त्यानी अक्षत पूजा केली. अमृताच्या पिण्डाने नैवेद्य अर्पण केला. देवदारुवृक्षांच्या चूर्णाने-कल्पवृक्षांच्या चूर्णाने धूपपूजा केली व पारिजात आदिक कल्पवृक्षांच्या पुष्पसमूहानी त्याने पुष्पपूजन केले. रत्नासहित नवनिधि त्याने फलपूजेसाठी उपयोगात आणले. यांप्रमाणे चौदा रत्नांचा अधिपति अशा भरतेशाने ही रत्नमय पूजा बाहुबलींच्या चरणांची केली ॥ १९३-१९५ ।। Page #352 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-२०४) महापुराण (३४१ सुराश्चासनकम्पेन ज्ञाततत्केवलोदयाः । चक्रुरस्य परामिज्यां शताध्वरपुरःसराः ॥ १९६ वर्मन्दं स्वरुद्यानतरुधूननचञ्चवः । तदा सुगन्धयो वाताः स्वधुनीशीकराहराः ॥ १९७ मन्द्रं पयोमुचांमार्गे दध्वनुश्च सुरानकाः । पुष्पोत्करो दिवोऽपप्तत् कल्पानोकहसम्भवः ॥ १९८ रत्नातपत्रमस्योच्चनिमितं सुरशिल्पिभिः । पराय॑मणिनिर्माणमभादिव्यं च विष्टरम् ॥ १९९ स्वयं व्यधूयतास्योच्चैः प्रान्तयोश्चमरोत्करः । सभावनिश्च तद्योग्या पप्रथे प्रथितोदया ॥ २०० सुरैरिचितः प्राप्तकेवद्धिः स योगिराट् । व्यधुतन्मुनिभिर्जुष्टः शशीवोडुभिराश्रितः ॥ २०१ घातिकर्मक्षयोद्भूतामुद्वहन्परमेष्टिताम् । विजहार महीं कृत्स्नां सोऽभिगम्यः सुधाशिनाम् ॥ २०२ इत्थं स विश्वविद्विश्वं प्रोणयन्स्ववचोऽमृतः । कैलासमचलं प्रापत्पूतं सन्निधिना गुरोः ॥ २०३ सकलनृपसमाजे दृष्टिमल्लाम्बुयुद्धविजितभरतकोतिर्यःप्रववाज मुक्त्यै ॥ तृणमिव विगणय्य प्राज्यसाम्राज्यभारं। चरमतनुधराणामग्रणीः सोऽवताद्वः ॥ २०४ ___ आसने कम्पित झाल्यामुळे श्रीबाहुबलि मुनिवर्याला केवलज्ञान झाले आहे असे देवाना समजले व ते इन्द्रासह आले व त्यांनी त्यांची उत्कृष्ट पूजा केली ॥ १९६ ।। स्वर्गातील उद्यानांच्या वृक्षाना हालविण्यात निपुण असे वारे मन्द मन्द वाहू लागले व त्या सुगंधी वायानी स्वर्गीय नद्यांच्या कणाना हरण करून आणिले होते ॥ १९७ ।। मेघांच्या मार्गात अर्थात आकाशात देवनगारे गंभीर शब्द करू लागले व कल्पवृक्षापासून उत्पन्न झालेला पुष्पसमूह स्वर्गातून पडू लागला ॥ १९८ ।। देवांच्या कारागिरानी उंच रत्नांचे छत्र निर्मिले व अमूल्यरत्नानी ज्याची रचना केली आहे असे दिव्य सिंहासन बनविले ।। १९९ ॥ या भगवंताच्या दोन्ही बाजूना चामरांचा समूह आपोआप हालत होता. जिची उन्नति व ऐश्वर्यशोभा प्रसिद्ध आहे अशी या भगवंताना शोभणारी योग्य अशी गंधकुटीसभा तेव्हा देवानी निर्माण केली ॥ २० ॥ ज्याना केवलज्ञानाचे वैभव प्राप्त झाले आहे, अशा त्या योग्याची देवानी पूजा केली व चांदण्या जसा चन्द्राचा आश्रय घेतात तसे मुनिसमूहाने युक्त असे ते योगिराज गंधकुटीमध्ये शोभत होते ॥ २०१॥ ज्ञानावरणादि घातिकर्माचा क्षय झाल्यामुळे प्रकट झालेले परमेष्ठिपद धारण करणारे, देवानी पूज्य असे ते बाहुबली मुनिवर्य सर्व पृथ्वीवर विहार करू लागले ।। २०२ ॥ याप्रमाणे आपल्या वचनामृतानी विश्वाला आनंदित करणारे असे ते सर्वज्ञ बाहुबलि मुनिराज गुरु अशा आदिभगवंताच्या सांनिध्याने पवित्र झालेल्या कैलासपर्वतावर आले । २०३ ।। सर्व राजांच्या सभेत दृष्टियुद्ध, मल्लयुद्ध व जलयुद्ध या तीन युद्धानी ज्यानी भरताची कीति जिंकिली व यानंतर ज्यानी उत्कृष्ट पुष्कळ असा साम्राज्यभार गवताप्रमाणे तुच्छ मानून मोक्षप्राप्तीसाठी जिनदीक्षा घेतली व जे मुक्ति प्राप्तीला कारण असे शेवटचे शरीर धारण करणान्यामध्ये श्रेष्ठ होते ते बाहुबलि मुनिराज तुमचे रक्षण करोत ।। २०४ ।। Page #353 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४२) महापुराण (३६-२०५ भरतविजयलक्ष्मीर्जाज्वलच्चक्रमा यमिनमभिसरन्ती क्षत्रियाणां समक्षम् ॥ चिरतरमवधूतापत्रपापात्रमासीदधिगतगुरुमार्गः सोऽवताहोर्बली वः ॥ २०५ स जयति जयलक्ष्मीसङ्गमाशामवन्ध्यां विदधदधिकधामा सन्निधौ पार्थिवानाम् ॥ सकलजगदगारव्याप्तकोतिस्तपस्यामभजत यशसे यः सूनुराधस्य धातुः ॥ २०६ जयति भुजबलीशो बाहुवीयं स यस्य । प्रथितमभवदग्रे क्षत्रियाणां नियुद्धे ॥ भरतनृपतिनामा यस्य नामाक्षराणि । स्मृतिपथमुपयान्ति प्राणिवृन्दं पुनन्ति ॥ २०७ जयति भुजगवक्त्रोद्वान्तनिर्यद्गराग्निः । प्रशममसकृदापत्प्राप्य पादौ यदीयौ ॥ सकलभुवनमान्यः खेचरस्त्रीकराग्रोद्ग्रथितविततवीरुद्वेष्टितो दोबलीशः ॥ २०८ जयति भरतराजप्रांशुमौल्यग्ररत्नो-पललुलितनखेन्दुः स्रष्टुराद्यस्य सुनुः ॥ भुजगकुलकलापैराकुलैनाकुलत्वं । धृतिबलकलितो यो योगभन्नैव भेजे ॥ २०९ षट्खण्ड भरतक्षेत्राची जयलक्ष्मी जी प्रज्वलितचक्राच्या स्वरूपाने सर्व क्षत्रियांच्या समक्ष प्रभु अशा बाहुबलीकडे येत असता तिचा प्रभु बाहुबलीने तिरस्कार केला त्यामुळे ती दीर्घकालावधि लज्जित झाली. अर्थात् चक्रवतिलक्ष्मीचा स्वीकार बाहुबली प्रभूने केला नाही व आपल्या पित्याचा मार्ग स्वीकारला अर्थात् जिनदीक्षा घेतली. ते बाहुबलि प्रभु तुमचे रक्षण करोत ।। २०५ ॥ सर्व राजांच्या समक्ष जयलक्ष्मीची संगमाची इच्छा ज्याने सफल केली, जो अधिक तेजस्वी आहे, ज्याची कीर्ति सर्वजगतरूपी घरात व्याप्त झाली आहे व ज्याने यशासाठी तपश्चरणाचा स्वीकार केला तो आदिब्रह्मापुत्र-श्रीवृषभ जिनेश्वरपुत्र बाहुबली नेहमी विजयी आहे ॥ २०६॥ सर्व क्षत्रियांच्यापुढे मल्लयुद्धात ज्याचे बाहूचे सामर्थ्य प्रसिद्ध झाले. भरतराजाबरोबर ज्याच्या नावाची अक्षरे लोकांच्या स्मरणपथात राहून ती प्राणिसमूहाना पवित्र करतात तो प्रभु बाहुबली नेहमी विजयी आहे ।। २०७॥ ज्याच्या पायाजवळ आल्यावर भुजंगाच्या मुखातून ओकल्यामुळे बाहेर पडणारा विषरूपी अग्नि वारंवार शांत झाला. जो सगळ्या जगाला मान्य झाला आहे व ज्याच्या सर्वांगावर वेढून पसरलेले वेलीचे वेष्टन विद्याधर स्त्रियांनी आपल्या हातानी काढले आहे. ते बाहुबली मुनिराज विजयी आहेत ॥ २०८ ॥ भरतराजाच्या उंच किरीटाच्या पुढील रत्नांनी ज्याच्या पायाचे नखचन्द्र चित्र विचित्र झाले आहेत, जो धैर्य आणि बलाने-शक्तीने सम्पन्न आहे. क्रोधयुक्त झालेल्या सर्पसमुदायानी जो व्याकुळ झाला नाही घाबरला नाही, योगी असा आदिसृष्टिकर्त्याचा पुत्र बाहुबली विजयी आहे ॥ २०९॥ Page #354 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६-२१२) महापुराण ३४३ शितिभिरलिकलाभराभुजं लम्बमानः । पिहितभुजविटङ्को मूर्धजर्वेल्लिताः ॥ जलधरपरिरोधध्याममूव भूध्रः । श्रियमपुषदनूनां दोर्बली यः स नोऽव्यात् ॥ २१० स जयति हिमकाले यो हिमानीपरीतम् । वपुरचल इवोच्चैबिभ्रदाविर्बभूव ॥ नवधनसलिलोधैर्यश्च धोतोऽब्दकाले । खरघृणिकिरणानप्युष्णकाले विषेहे ॥ २११ जगति जयिनमेनं योगिनं योगिवर्यैरधिगतमहिमानं मानितं माननीयः । स्मरति हृदि नितान्तं यः स शान्तान्तरात्मा । भजति विजयलक्ष्मीमाशु जैनीमजय्याम् ॥२१२ इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे भुजबलिजलमल्लदृष्टियुद्धविजयदीक्षाकेवलोत्पत्तिवर्णनं नाम षट्त्रिंशत्तमं पर्व ॥३६॥ मस्तकापासून बाहूपर्यंत लोंबणारे व ज्यांनी बाहूंचा अग्रभाग झाकला आहे, ज्यांचे अग्रभाग वाकडे झाले आहेत. भुंग्याप्रमाणे ज्यांची कान्ति आहे अशा काळ्या केशांनी युक्त असल्यामुळे मेघांनी घेरल्यामुळे ज्याचे मस्तक शिखर काळे दिसत आहे अशा पर्वताप्रमाणे जो शोभेला पुष्ट करीत आहे असा भुजबलिमुनिराज आमचे रक्षण करो ॥ २१० ॥ हिवाळ्यात जो हिमानी-बर्फानी व्याप्त झालेले आहे शरीर ज्याचे असा असूनही उंच पर्वताप्रमाणे ज्याने आपले शरीर निश्चल धारण केले आहे म्हणजे ज्याचे शरीर थंडीने थरथर कापत नाही आणि पावसाळयात नवीन मेघांच्या पाण्याच्या वृष्टींनी जो धुतला गेला आहे व उन्हाळ्यात तीक्ष्ण किरण ज्याचे आहेत अशा सूर्याच्या किरणांना ज्याने सहन केले आहे तो महामुनि बाहुबलि विजयी आहे ॥ २११ ।। श्रेष्ठ योगिजनांनी ज्याचा महिमा गायिला आहे, आदरणीय मुनिजनांनी ज्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानले आहे व जो जगात विजयी म्हणून प्रसिद्ध आहे. अशा या भुजबलि महायोग्याला जो आपल्या हृदयात नित्य स्मरतो, त्याच्या आत्म्याला शांति प्राप्त होते व तो शीघ्र जिला कोणी जिंकू शकत नाही अशा विजयलक्ष्मीला-मोक्षलक्ष्मीला मिळवितो ।। २१२ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यविरचित आर्ष-त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादात बाहुबलीला जलयुद्ध, मल्लयुद्ध आणि दृष्टियुद्धात विजय प्राप्त झाला यानंतर त्यांनी दीक्षा घेऊन केवलज्ञान प्राप्त करून घेतले याचे वर्णन करणारे छत्तीसावे पर्व समाप्त झाले ॥ ३६ ॥ Page #355 -------------------------------------------------------------------------- ________________ सप्तत्रिंशत्तमं पर्व । अथ निर्वतिताशेषदिग्जयो भरतेश्वरः । पुरं साकेतमुत्केतु प्राविक्षत्परया श्रिया ॥ १ तत्रास्य नपशार्दूलैरभिषेकः कृतो मुदा । चातुरन्तजयश्रीस्ते प्रथतां भुवनेष्विति ॥ २ तमभ्यषिञ्चन् पौरास्ते सान्तःपुरपुरोधसः । चिरायः पृथिवीराज्यं क्रियाद्देव भवानिति ॥ ३ राज्याभिषेचने भर्तुर्यो विधिर्वृषभेशिनः। स सर्वोऽत्रापि तीर्थाम्बुसम्भारादिः कृतो नपैः ॥ ४ तथाभिषिक्तस्तेनैव विधिनालडाकृतोऽधिराट् । तथैव जयघोषादिः प्रयुक्तः सामरनपैः ॥५ तथैव सत्कृता विश्वे पार्थिवाः ससनाभयः । तथैव तपितो लोकः परया दानसम्पदा ॥६ तथा ध्वनन्महाघोषा नान्दीघोषा महानकाः । प्रक्षुभ्यदब्धिनिर्घोषो येषां घोषेरधः कृतः ॥७ आनन्दिन्यो महाभेयस्तथैवाभिहता मुहुः । सङगीतविधिरारब्धस्तथा प्रमदमण्डपे ॥८ यानन्तर ज्याने सर्व दिशा जिंकल्या आहेत अशा भरतेश्वराने अनेक पताका जेथे उभारल्या आहेत अशा साकेतनगरात उत्कृष्ट ऐश्वर्यासह प्रवेश केला ॥ १ ॥ त्या नगरात या भरतराजाचा मोठमोठ्या राजानी आनंदाने राज्याभिषेक केला व त्यावेळी सर्व राजानी हे प्रभो, चार दिशा जिंकल्यामुळे आपणास प्राप्त झालेली जयलक्ष्मी सर्व जगामध्ये वृद्धिंगत होवो अशी इच्छा व्यक्त केली ॥ २ ॥ याचप्रमाणे हे प्रभो, आपण दीर्घायुषी होऊन पृथ्वीचे राज्यपालन करा असे म्हणून अन्तःपुर व पुरोहिताना बरोबर घेऊन नागरिकानी त्या भरत चक्रवर्तीचा अभिषेक केला ॥ ३ ॥ जो विधि भगवान् ऋषभनाथाना राज्याभिषेक करताना केला होता ( अर्थात् सर्व तीर्थांचे पाणी एकत्र करणे वगैरे विधि ) तो सर्व विधि या चक्रवर्तीच्या राज्याभिषेकाच्या समयी राजानी केला ॥ ४ ॥ आदिभगवंताना राज्याभिषेक करताना जो विधि केला होता तो सर्व अभिषेकविधि देवासह राजेलोकानी भरताला राज्याभिषेक करताना केला. याचप्रमाणे अभिषेक करून जयघोषादिकही केले ॥ ५ ॥ त्यावेळी भरतचक्रीने सर्व राजांचा व त्यांच्या परिवारांचा आदरसत्कार केला व उत्कृष्ट अशा दानसंपदेने सर्व लोकाना चक्रवर्तीने सन्तुष्ट केले ॥ ६ ॥ ज्यांचा ध्वनि मोठा आहे व ज्यांचा ध्वनि मंगलकारक आहे असे मोठे नगारे वाजू लागले आणि आपल्या आवाजानी खवळलेल्या समुद्राच्या गर्जनेला त्यानी हीन केले, जिंकिले ।।७।। आनंदाच्या प्रसंगी वाजविण्याचे नगारे पूर्वीप्रमाणे वारंवार वाजविले आणि उत्सवाच्या मण्डपात गायनाचा थाट पूर्वीसारखाच आरंभिला ।। ८ ।। Page #356 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-१५) महापुराण (३४५ मूर्धाभिषिक्तैः प्राप्ताभिषेकस्यास्याजनि द्युतिः । मेराविवाभिषिक्तस्य नाकीन्द्ररादिवेधसः ॥९ गंगासिन्धू सरिद्देव्यौ साक्षतैस्तीर्थवारिभिः । अभ्योक्षिष्टां तमभ्येत्य रत्नभृङ्गारसम्भृतैः॥ १० कृताभिषेकमेनं च नृपासनमषिष्ठितम् । गणबद्धामरा भेजुः प्रणम्रर्मणिमौलिभिः ॥ ११ । हिमवद्विजया शौ मागधाद्याश्च देवताः। खेचराश्चोभयश्रेण्योस्तं नेमुर्नम्रमौलयः ॥ १२ सोभिषिक्तोऽपि नोसिक्तो बभूव नृपसत्तमैः । महतां हि मनोवृत्ति!त्सेकपरिरम्भिणी ॥ १३ 'चामर:ज्यमानोऽपि न निर्वृतिमगाद्विभुः । भ्रातृष्वसंविभक्ता श्रीरितीहानुशयानुगः ॥ १४ दोर्बलिभ्रातृसङ्घर्षान्नास्य तेजो विकर्षितम् । प्रत्युतोत्कर्षि हेम्नो वा घृष्टस्य निकषोपले ॥ १५ मेरुपर्वतावर स्वर्गातील इंद्रानी आदिभगवंताचा अभिषेक केला होता व त्यावेळी जशी आदिभगवंताच्या ठिकाणी कान्ति उत्पन्न झाली होती तशी राजानी जेव्हा भरतचक्रीचा राज्याभिषेक केला तेव्हा तशी कान्ति यालाही उत्पन्न झाली ।। ९ ॥ गंगा आणि सिंधु या दोन नदीदेवता चक्रवर्तीकडे आल्या व रत्नांच्या झारीमध्ये भरलेल्या व अक्षतानी सहित अशा अनेक तीर्थजलानी त्याचा त्यानी अभिषेक केला ॥ १० ॥ ज्याचा अभिषेक केला आहे व जो राजसिंहासनावर बसला आहे अशा या भरतेश्वराची गणबद्ध देव नम्र केलेल्या रत्नखचित मुकुटानी सेवा करू लागले. मस्तक नम्र करून ते देव त्याची सेवा करीत असत ।। ११॥ हिमवान् पर्वत व विजयार्धपर्वताचे स्वामी असे देव आणि मागधादि देव व विजयार्द्ध पर्वताच्या दोन्ही श्रेणीचे स्वामी असे विद्याधरराजे हे सर्व मस्तक नम्र करून चक्रवर्तीना नमस्कार करू लागले ॥ १२ ॥ श्रेष्ठ राजांनी ज्याचा राज्याभिषेक केला आहे असाही भरतचक्री गर्वाने फुगला नाही. बरोबरच आहे की जे मोठे लोक असतात त्यांची मनोवृत्ति गर्वाने आलिंगिलेली नसते म्हणजे त्यांना गर्वाचा स्पर्श होत नाही ॥ १३ ॥ तो भरतेश्वर चवऱ्यानी नेहमी वारला जात होता तथापि तो स्वतःला सुखी समजत नव्हता. कारण आपली सम्पत्ति भावामध्ये वाटली गेली नाही याचा त्याला फार पश्चात्ताप वाटत होता ॥ १४ ।। आपल्या बाहुबली बंधूबरोबर झालेल्या युद्धाने या भरतेश्वराचे तेज कमी झाले असे नाही. उलट ते वाढलेच. कसोटीच्या दगडावर सोने घासले गेले असता त्याचे तेज कमी होते असे नाही. उलट त्याचे तेज वाढते ॥ १५ ॥ म. ४४ Page #357 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (३७-१६ निष्कण्टकमिति प्राप्य साम्राज्यं भरताधिपः । बभौ भास्वानिवोद्रिक्तप्रतापः शुद्धमण्डलः ॥ १६ क्षेमकतानतां भेजुः प्रजास्तस्मिन्सुराजनि । योगक्षेमो वितन्वाने मन्वानाः स्वां सनाथताम् ॥ १७ यथास्वं संविभज्यामी सम्भुक्ता निषयोऽमुना । सम्भोगः संविभागश्च फलमर्थार्जने द्वयम् ॥ १८ रत्नान्यपि यथाकामं निविष्टानि निधी शिना । रत्नानि ननु तान्येव यानि यान्त्युपयोगिताम् ॥१९ सूनुश्चक्रभृतामाद्यः षट्खण्डभरताधिपः । राजराजोऽधिराट् सम्राडित्यस्योद्घोषितं यशः ॥ २० नन्दनो वृषभेशस्य भरतः शातमातुरः। इत्यस्य रोदसी व्याप शुभ्रा कोतिरनश्वरी ॥ २१ कीदृक्परिच्छदस्तस्य विभवश्चक्रवर्तिनः । इति प्रश्नवशादस्य विभवोद्देशकीर्तनम् ॥ २२ गलन्मदजलास्तस्य गजाः सुरगजोपमाः । लक्षाश्चतुरशीतिस्ते रदैर्बद्धः सुकल्पितः ॥ २३ निष्कंटक, शत्रुरहित असे साम्राज्य मिळवून ज्याचे मंडळ शुद्ध आहे व ज्याचा प्रताप वाढला आहे अशा सूर्याप्रमाणे भरतेश्वराचा प्रताप वाढला आणि त्याचे सर्वमण्डल-देश हे शुद्ध शत्रुरहित झाले ॥ १६ ।। योग-अप्राप्त वस्तु प्राप्त करून घेणे आणि क्षेम-प्राप्त झालेल्या वस्तूचे रक्षण करणे, याला योगक्षेम म्हणतात. गुणी उत्तम राजा भरत प्रजांचे योगक्षेम चालवीत होता. त्यामुळे सर्व प्रजा आपणास सनाथ मानीत होती. अर्थात् प्रजेला ज्या इष्टपदार्थांची आवश्यकता वाटत असे ते पदार्थ तिला मिळत असत व प्रजेजवळ असलेल्या पदार्थाचे संरक्षणही भरतराजामुळे चांगले होत असे त्यामुळे प्रजा आपणास सनाथ समजून कुशल मंगलाला प्राप्त झाली होती ॥ १७ ॥ __ महाराजा भरताने योग्यरीतीने विभागणी करून निधींचा उपभोग घेतला. कारण द्रव्य संपादन केल्यावर त्याचा उपभोग घेणे व ते यथायोग्य वाटून देणे ही दोन फळे द्रव्यार्जनाची समजावीत ॥ १८ ॥ या निधिपति भरताने आपल्या इच्छेप्रमाणे रत्ने देखील लोकाना देऊन टाकली. व रत्ने त्यानाच म्हणावे जी लोकाना उपयोगात येतात ॥ १९ ॥ . हा भरत सोळावा मनु आणि सर्व चक्रवर्तिजनात पहिला चक्रवर्ती, षट्खण्डयुक्त 'भरतक्षेत्राचा अधिपति स्वामी, सर्व राजांचा राजा आहे. अधिराट् मुख्य राजा आहे आणि सम्राट् आहे असे याचे यश चोहीकडे वणिले गेले ।। २० ।। हा भरत वृषभ जिनेश्वराचा पुत्र आहे व याच्या मातेला शंभर पुत्र आहेत. अशा याच्या नाश न पावणाऱ्या शुभ्र कीर्तीने आकाश व भूमी व्यापली होती ॥ २१ ॥ या चक्रवर्ती भरताचा परिवार कसा आहे, केवढा आहे व त्याचे वैभव किती आहे असा श्रेणिकाचा प्रश्न झाला व त्याला गौतमगणधर उत्तर देण्यासाठी याप्रमाणे त्याच्या ऐश्वर्याचे वर्णन करू लागले ॥ २२ ॥ ज्यांच्या गण्डस्थळातून मदजल गळत आहे व जे देवांच्या ऐरावत हत्तीप्रमाणे सुंदर आहेत असे चौयाऐंशी लक्ष हत्ती या भरताचे आहेत, ते सुसज्ज अशा दातानी शोभतात ॥२३।। Page #358 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-३२) महापुराण (३४७ विव्यरत्नविनिर्माणा रथास्तावन्त एव हि । मनोवायुजवाः सूर्यरथप्रस्पद्धिरंसः ॥ २४ कोटयोऽष्टादशाश्वानां भूजलाम्बरचारिणाम् । यत्खुराग्राणि धौतानि पूर्तस्त्रिपथगाजलैः ॥ २५ चतुभिरधिकाशीतिः कोटयोऽस्य पदातयः । येषां सुभटसंमर्दे निरूढं पुरुषव्रतम् ॥ २६ वज्रास्थिबन्धननिर्वलयर्वेष्टितं वपुः । वज्रनारानिभिन्नमभेद्यमभवत्प्रभोः॥ २७ समसुप्रविभक्ताङ्गं चतुरस्रं सुसंहति । वपुः सुन्दरमस्यासीत्संस्थानेनादिना विभोः ॥ २८ निष्टप्तकनकच्छायं सच्चतुःषष्टिलक्षणम् । रुरुचे व्यञ्जनस्तस्य निसर्गसुभगं वपुः ॥ २९ शारीरं यच्च यावच्च बलं षट्खण्डभूभुजाम् । ततोऽधिकतरं तस्य बलमासीबलीयसः॥ ३० शासनं तस्य चक्रामासिन्धोरनिवारितम् । शिरोभिरूढमारूढविक्रमः पृथिवीश्वरैः ॥ ३१ द्वात्रिंशन्मौलिबद्धानां सहस्राणि महीक्षिताम् । कुलाचलैरिवादीन्द्रः स रेजे यैः परिष्कृतः ॥ ३२ ज्याची रचना दिव्य रत्नांनी केली आहे व जे मनाप्रमाणे व वायुप्रमाणे वेगवान आहेत व सूर्यरथाशी स्पर्धा करणारा वेग ज्यांचा आहे असे चौयाऐंशी लक्ष रथ या भरतराजाचे आहेत ॥ २४ ।। ज्याच्या खुरांचे अग्रभाग गंगानदीच्या पवित्र पाण्यानी धुतले आहेत व जे जमीन, पाणी आणि आकाशातून धावतात असे चक्रीचे घोडे अठरा कोटी होते ॥ २५ ॥ ज्यांचा पराक्रम शूर योद्धयाबरोबर लढण्यात सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे असे या चक्रीचे पायदल सैन्य चौऱ्याऐंशी कोटी होते ॥ २६ ॥ ___ या चक्रवर्तीचे शरीर वज्राप्रमाणे कठिण अशा हाडांच्या बंधनानी व वज्राच्याच वेष्टनानी वेष्टित होते आणि वज्राच्या खिळयानी चांगले मजबूत असे बनले होते. व ते अभेद्य केव्हाही न मोडणारे होते. अर्थात् याचे शरीर वज्रवृषभनाराच या पहिल्या संहनननाम कर्माच्या उदयाने बनलेले होते ।। २७ ।। या प्रभूचे शरीर चतुरस्र होते म्हणजे चारी बाजूनी सुंदर होते. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव प्रमाणबद्ध होता व सुन्दर होता. पहिल्या चतुरस्रसंस्थान नामकर्माच्या उदयाने याचे शरीर बिलकुल प्रमाणबद्ध बनलेले होते ॥ २८ ॥ त्याच्या शरीराची कांति तापविलेल्या सोन्याप्रमाणे होती व त्या शरीरावर चौसष्ट लक्षणे होती. तिळ वगैरे व्यंजनानी स्वाभाविक फार सुंदर दिसत होते ॥ २९ ॥ भरतक्षेत्रातील षट्खंडाच्या राजेलोकांच्या शरीरामध्ये जेवढे बल होते त्यापेक्षा अधिक बल त्या बलवान् भरतचक्रीच्या शरीरात होते ॥ ३० ॥ चक्रचिह्नाने शोभणारे त्याचे शासन समुद्रापर्यन्त अनिवार्य असे होते. व सर्व पराक्रमी राजानी ते आपल्या मस्तकानी धारण केले होते ।। ३१ ।।। हिमवान् वगैरे कुलपर्वतानी वेढलेला व मध्यभागी असलेला मेरुपर्वत जसा शोभतो तसे मुकुटबद्ध अशा बत्तीस हजार राजानी सेविलेला हा चक्रवर्ती भरत शोभत असे ॥ ३२ ॥ Page #359 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४८) महापुराण (३७-३३ तावन्त्येव सहस्राणि देशानां सुनिवेशिनाम् । यरलस्कृतमाभाति चक्रभृत्क्षेत्रमायतम् ॥ ३३ कुलजात्यभिसम्पन्नाः देव्यस्तावत्प्रमाः स्मृताः । रूपलावण्यकान्तीनां याः शुद्धाकरभूमयः ॥ ३४ म्लेच्छराजादिभिर्दत्तास्तावन्त्यो नृपवल्लभाः। अप्सरःसङ्कथाः क्षोणी यकाभिरवतारिताः ॥ ३५ अवरुद्धाश्च तावन्त्यस्तन्व्यः कोमलविग्रहाः । मदनोद्दीपनैर्यासां दृष्टिबाजितं जगत् ॥ ३६ . नरवांशुकुसुमो दैरारक्तैः पाणिपल्लवः । तास्तन्व्यो भुजशाखाभिर्भेजः कल्पलताश्रियम् ॥ ३७ स्तनाब्जकुड्मलेरास्यपङ्कजैश्च विकासिभिः । अब्जिन्य इव ता रेजुर्मदनावासभूमिकाः ॥ ३८ मन्ये पात्राणि गात्राणि तास्तं कामग्रहोच्छितौ । यदावेशवशादेष दशां प्राप्तोऽतिवतिनीम् ॥ ३९ शङ्के निशानपाषाणान्नखानासां मनोभवः । यत्रोपारूढतैक्षण्यैः स्वरविध्यत्कामिनः शरैः॥ ४० ज्याची रचना उत्तम आहे अशा बत्तीस हजार देशानी अलंकृत झालेले या चक्रवर्तीचे हे विशाल क्षेत्र भारतवर्ष शोभत होते ॥ ३३ ॥ __ या चक्रवर्तीला उत्तम कुल आणि उत्तम जातीच्या अशा पट्टराण्याही तितक्याच म्हणजे बत्तीस हजार होत्या. या रूप-आकृति, सौंदर्य आणि कान्ति यांच्या जणु निर्दोष उत्कृष्ट खाणी अशा होत्या ॥ ३४ ।। या चक्रवर्तीला पाच म्लेच्छ खंडांचे जे राजे आदिकानी आपल्या कन्या अर्पण केल्या त्यानी अप्सरांची कथा या भूमीवर आणिली होती. अर्थात् त्या अप्सराप्रमाणे सुंदर होत्या. अशा त्या नृपवल्लभा राण्याही बत्तीस हजार होत्या ॥ ३५ ॥ ___ मदनाला उद्दीपित करणाऱ्या आपल्या दृष्टिबाणानी ज्यानी जगत् जिंकले आहे व ज्यांचे कोमलशरीर आहे अशा बत्तीस हजार राण्या अन्तःपुरामध्ये आणखी होत्या. त्याना 'अवरुद्धा' म्हणतात. मिळून या सर्व राण्या शहाण्णव हजार होत्या ॥ ३६ ।। त्या नाजूक व सुन्दर स्त्रिया नखांच्या किरणरूपी पुष्पांच्या विकासानी व थोडेसे लाल अशा हस्तरूपी कोमल पालवीनी युक्त अशा बहुरूपी शाखानी, फांद्यानी जणु युक्त अशा कल्पलतेच्या शोभेला धारण करू लागल्या ।। ३७ ॥ मदनाचे निवासस्थान असलेल्या त्या सुन्दर स्त्रिया स्तनरूपी कमलकलिकानी व मुखरूपी विकसित कमलानी जणु कमलिनीलताप्रमाणे शोभू लागल्या ॥ ३८ ।। त्या सुंदर स्त्रियांची शरीरे, मदनरूपी पिशाचाचे लोकांच्या अंगात शिरण्याचे जणु स्थानच आहे असे वाटते. कारण त्याच्या आवेशाच्या वश होऊन हा भरतेश्वर विमर्याद दशेला (अत्यन्त विषयासक्तीला) प्राप्त झाला ॥ ३९ ॥ मला असे वाटते की त्या राण्यांची नखे बाण तीक्ष्ण करण्याचे पाषाण असावेत. कारण मदन आपले बाण त्या नखरूपी पाषाणावर तीक्ष्ण करून त्या आपल्या बाणानी कामीजनाना विद्ध करीत असे ॥ ४० ॥ Page #360 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-४८) सत्यं महेषुधी जङ्घे तासां मदनधन्विनः । कामस्यारोहनिःश्रेणीस्थानीयावूरुदण्डको ॥ ४१ कटी कुटी मनोजस्य काञ्ची सालकृतावृतिः । नाभिरासां गभीरैका कूपिका चित्तजन्मनः ॥ ४२ मनोभुवोऽतिवृद्धस्य मन्येऽवष्टम्भयष्टिका । रोमराजिः स्तनौ यासां कामरत्नकरण्डकौ ॥ ४३ कामपाशायितौ बाहू शिरीषोद्गमकोमलौ । कामस्योच्छ्वसितं कण्ठः सुकण्ठीनां मनोहरः ॥ ४४ मुखं रतिसुखागारप्रमुखं मुखबन्धनम् । वैराग्यरससङ्गस्य तासां च रदनच्छदः ॥ ४५ दृग्विलासाः शरास्तासां कर्णान्तौ लक्ष्यतां गतौ । भ्रूवल्लरी धनुर्यष्टिजिगीषोः पुष्पधन्विनः ॥ ४६ ललाटाभोगमेतासां मन्ये बाह्यालिकास्थलम् । अनङ्गनृपतेरिष्टभोगकन्दुकचारिणः ॥ ४७ अलकाः काम कृष्णाहेः शिशवः परिपुञ्जिताः । कुञ्चिताः केशवल्लय मदनस्येव वागुराः ॥ ४८ महापुराण त्या स्त्रियांच्या पायांच्या पिंड या मदनाचे बाण ठेवण्याचे जणु भाते आहेत व त्यांच्या मांडया कामदेवाला वर चढण्यास जिन्याच्या स्थानी होत्या ॥ ४१ ॥ ( ३४९ स्त्रियांची कंबर हे मदनाचे घर आहे व कमरपट्टा हा त्या घराचा तट आहे व स्त्रियांची बेंबी ही मदनाची गंभीर अशी कूपिका- छोटी विहीर आहे ॥ ४२ ॥ स्त्रियांच्या पोटावर असलेली बारीक रोमपंक्ति ही अतिशय वृद्ध झालेल्या मदनाची त्याला आधार देणारी जणु काठी आहे असे दिसते. स्त्रियांचे दोन स्तन रत्ने ठेवण्यासाठी कामदेवाचे जणु दोन करडे आहेत ।। ४३ ।। त्या चक्रवर्तीच्या स्त्रियांचे बाहू शिरीषपुष्पाप्रमाणे कोमल होते व मदनाच्या पाशाप्रमाणे दीर्घ होते. त्या सुन्दरींचा मनोहर असा गळा मदनाच्या उच्छ्वासाप्रमाणे होता ॥ ४४ ॥ त्यांचे तोंड संभोगसुखाच्या मंदिराचा जणु दरवाजा होते आणि त्यांचे ओठ वैराग्य रसाचा स्पर्श बंद करण्यास जणु आगळीसारखे होते ।। ४५ ।। त्यांचे नेत्रविलास कटाक्ष हे जणु बाण होते आणि कानांच्या पाळ्या त्या बाणानी वेधण्याचे स्थाननिशान होते. त्यांच्या वेलीसारख्या भुवया जगाला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या मदनाच्या धनुष्याप्रमाणे होत्या ।। ४६ ।। ह्या स्त्रियांचा विस्तृत जो कपाळाचा प्रदेश होता, तो आवडते भोगरूपी चेंडू खेळणान्या मदनरूपी राजाचे बाह्य खुले क्रीडा करण्याचे जणु मैदान होते असे मला वाटते ।। ४७ ।। त्या स्त्रियांच्या कपाळाजवळचे बारीक आखुड केश हे मदनरूपी काळया सर्पांची लहान पोरे जणु एके ठिकाणी पुंज रूपाने जमली आहेत असे दिसत होते आणि बाकीच्या थोडे थोडे वाकड्या झालेल्या केशलता जणु मदनाच्या जाळया आहेत अशा भासत होत्या ॥ ४८ ॥ Page #361 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५०) ( ३७-४९ इत्यनङ्गमयीं सृष्टि तन्वानाः स्वाङ्गसङ्गिनीम् । मनोऽस्य जगृहुः कान्ताः कान्तैः स्वैः कामचेष्टितैः ॥ तासां मृदुकरस्पर्शैः प्रेमस्निग्धैश्च वीक्षितैः । महती धृतिरस्यासीज्जल्पितैरपि मन्मनैः ॥ ५० स्मितेष्वासां दरोद्भिन्नो हसितेषु विकस्वरः । फलिनः परिरम्भेषु रसिकोऽभूद्रतिद्रुमः ॥ ५१ क्षेपयन्त्र पाषाणैर्दृक्क्षेपक्षेपणीकृतैः । बहु दुर्गवणस्तासां स्मरोऽभूत्स कचग्रहः ॥ ५२ खरः प्रणयगर्भेषु कोपेष्वनुनये मृदुः । स्तब्धो व्यलीकमानेषु मुग्धः प्रणयकैतवे ॥ ५३ निर्दयः परिरम्भेषु सानुज्ञानो मुखार्पणे । प्रतिपत्तिषु संमूढः पटुः करणचेष्टिते ॥ ५४ सङ्कल्पेष्वाहितोत्कर्षो मन्दः प्रत्यग्रसङ्गमे । प्रारम्भे रसिको दीप्तः प्रान्ते करुणकातरः ।। ५५ इत्युच्चावचतां भेजे तासां दीप्तः स मन्मथः । प्रायो भिन्नरसः कामः कामिनां हृदयङ्गमः ॥ ५६ प्रकाममधुरानित्थं कामान्कामातिरेकिणः । स ताभिनिविशन्रेजे वपुष्मानिव मन्मथः ॥ ५७ महापुराण याप्रमाणे आपल्या शरीराच्या सर्व अवयवात पूर्ण भरलेली व मदनपरिपूर्ण अशा नवीन सृष्टीला जणु उत्पन्न करणाऱ्या त्या सुन्दर स्त्रियानी मनोहर काम चेष्टितानी या भरतेश्वराच्या मनाला आकर्षित केले होते ।। ४९ ।। त्या स्त्रियांच्या मृदु हातांच्या स्पर्शाने, प्रेमळ व स्निग्ध अशा पाहण्यानी व मधुर अशा भाषणानी या भरतेश्वराला फार आनंद वाटत असे ।। ५० ।। या सुन्दर स्त्रिया गालात अस्पष्ट हसू लागल्या म्हणजे अंकुरयुक्त होणारा, स्पष्ट हसू लागल्या म्हणजे पुष्पानी लकडणारा आणि या स्त्रियानी आलिङ्गनें दिली असतां फलयुक्त होणारा असा संभोगरूपी वृक्ष मोठारसयुक्त झाला ।। ५१ ।। भुवया उडविणे हेच जणु दगड आणि तेच दृष्टिकटाक्षरूपी गोफणीने फेकणे, यामुळे त्या स्त्रियांचें जे भरतराजाशी बिकट रतियुद्ध होत असे. त्यात मदन हा त्यांचे केश धरणारा झाला ।। ५२ ॥ ज्याच्या पोटी प्रेम आहे अशा कोपाच्या वेळी मदन कठोर होत असे. प्रियेचे आराधन करते वेळी तो मृदु होत असे. कृत्रिम रुसव्याच्या प्रसंगी ताठर होत असे. प्रेमपूर्ण कपटाचे वेळी तो मदन भोळा होत असे ।। ५३ ।। आलिंगनाचे वेळी तो निर्दय होई. चुंबनाचे वेळी आपली संमति दर्शविणारा, स्वीकार करते वेळी विचाररहित होणारा, मोहक हावभाव करण्याचे वेळी, हा मदन अतिशय चतुर होत असे. अमुक एक गोष्ट करावयाची अशा संकल्पाच्या वेळी आनंदित होणारा, नवीन संगमाचे वेळी थोडासा मंद होणारा, संभोगाच्या वेळी रसिक व दीप्त आणि सुरतक्रीडेच्या शेवटी करुणायुक्त, असा तो कामदेव होत असे. याप्रमाणे त्या सुन्दरींच्या ठिकाणी वृद्धि पावलेला तो मदन त्या त्या प्रसंगास अनुसरून न्यूनाधिक भाव धारण करीत होता. बहुत करून निरनिराळा होऊन मदन विलासी जनाना आवडता होत असतो ।। ५४-५६ ॥ याप्रकारे अतिशय मधुर व इच्छेपेक्षा अधिक अशा भोगांना त्यांच्यासह भोगणारा हा भरतचक्री मूर्तिमन्त जणु मदन आहे असे वाटत असे || ५७ ॥ Page #362 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-६६) महापुराण (३५१ ताश्च तच्चित्तहारिण्यस्तरुण्यः प्रणयोद्धराः । बभुवुः प्राप्तसाम्राज्या इव रत्युत्सवश्रियः ॥५८ नाटकानां सहस्राणि द्वात्रिंशत्प्रमितानि वै । सातोद्यानि सगेयानि यानि रम्याणि भूमिभिः ॥ ५९ द्वासप्ततिः सहस्राणि पुरामिन्द्रपुरश्रियाम् । स्वर्गलोक इवाभाति नृलोको यैरलडकृतः ॥ ६० ग्रामकोट्यश्च विज्ञेया विभोः षण्णवतिप्रमाः । नन्दनोद्देशजित्वों यासामारामभूमयः ॥ ६१ द्रोणामुखसहस्राणि नवतिर्नव चैव हि । धनधान्यसमृद्धीनामधिष्ठानानि यानि वै ॥ ६२ । पत्तनानां सहस्राणि चत्वारिंशतथाष्ट च । रत्नाकरा इवाभान्ति येषामुद्घा वणिक्पथाः ॥ ६३ षोडशव सहस्राणि खेटानां परिमा मता। प्राकारगोपुराट्टालखातवप्रादिशोभिनाम् ॥ ६४ भवेयुरन्तरद्वीपाः षट्पञ्चाशत्प्रमामिताः । कुमानुषजनाकीर्णाः येऽर्णवस्य खिलायिताः ॥ ६५ संवाहानां सहस्राणि संख्यातानि चतुर्दश । वहन्ति यानि लोकस्य योगक्षेमविधाविधिम् ॥ ६६ ...................... भरतेश्वरांचे चित्त हरणाया, प्रेमाने उचंबळणाऱ्या अशा त्या स्त्रिया लक्ष्मीप्रमाणे होत्या व रतिसुखाचे वेळी जणु सर्वसाम्राज्य आपल्या हाती आले आहे अशा झाल्या ॥ ५८॥ या चक्रवर्तीच्या ऐश्वर्यात ज्यांची गणना आहे अशा बत्तीस हजार नाटकशाला होत्या. त्या अनेक वाद्यानी व गायनानी व अनेक प्रकारच्या वेषानी रमणीय दिसत होत्या ॥ ५९ ।। ज्यानी सुशोभित केलेला हा मनुष्यलोक स्वर्गाप्रमाणे शोभत आहे व ज्यांचे ऐश्वर्य इन्द्रनगराप्रमाणे आहे अशी या चक्रवर्तीची मोठ मोठी नगरे बहात्तर हजार होती ।। ६० ॥ ज्यातील बगीचे नन्दनवनाच्या प्रदेशाना जिंकित आहेत अशी शाहाण्णव कोटी गावे या चक्रवर्तीच्या स्वाधीन आहेत ॥ ६१॥ या चक्रवर्तीची धनधान्य समृद्ध अशी नव्याण्णव हजार द्रोणमुख गावे होती. नदीच्या व समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या गावाला द्रोणमुख म्हणतात ।। ६२ ।। ज्यातील उत्कृष्ट धनसंपन्न बाजाराचे मार्ग रत्नाच्या खाणीप्रमाणे शोभतात अशी पतने अठेचाळीस हजार होती. ( रत्नांच्या खाणीनी युक्त गावाना पत्तन म्हणतात ॥ ६३ ॥ जी तट, वेशी, सज्जे, खंदक व गावकोस आदिकानी शोभत होती अशी नदी व पर्वत यानी घेरलेली गावे ज्यांना ‘खेट' म्हणतात ती गावे सोळा हजार होती ॥ ६४ ॥ या चक्रवर्तीच्या अधीन छप्पन अन्तर्वीपे होती. त्यात कुमानुष-राहत होते या अन्तर्वीपाना कुभोगभूमि म्हणतात. तेथील माणसे नाना आकाराची असतात. ही अन्त:पे समुद्राला खिळे मारून बसविल्या प्रमाणे होती ।। ६५ ।। या चक्रवर्तीची संवाहन नावाची गावे चौदा हजार होती. ही गावे लोकांचा योगक्षेम चालवित होती अर्थात् नवीन वस्तूची प्राप्ति करून देणे यास योग म्हणतात व असलेल्या वस्तूचे रक्षण करणे यास क्षेम म्हणतात. अर्थात् ही गावे लोकांचा योगक्षेम चालवीत होती व ही गावे पर्वतावर वसलेली होती म्हणून याना संवाहन म्हणतात ॥ ६६ ॥ Page #363 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५२) महापुराण (३७-६७ स्थालीनां कोटिरेकोक्ता रन्धने या नियोजिताः । पक्त्री स्थालीविलीयानां तण्डुलानां महानसे ॥ कोटीशतसहस्रं स्याद्धलानां कुलियः समम् । कर्मान्तकर्षणे यस्य विनियोगो निरन्तरः ॥ ६८ तिस्रोऽस्य वजकोटयः स्युर्गोकुलैः शश्वदाकुलाः। यत्र मन्थरवाकृष्टास्तिष्ठन्ति स्माध्वगाः क्षणम्॥ कुक्षिवासशतान्यस्य सप्तैवोक्तानि कोविदः । प्रत्यन्तवासिनो यत्र न्यवात्सुः कृतसंश्रयाः॥ ७० दुर्गाटवीसहस्राणि तस्याष्टाविंशतिर्मता । वनधन्वाननिम्नादिविभागैर्वा विभागिताः ॥ ७१ म्लेच्छराजसहस्राणि तस्याष्टादशसडख्यया । रत्नानामुद्धवक्षेत्रं यः समन्तादधिष्ठितम् ॥ ७२ कालारव्यश्च महाकालो नैसर्ग्यः पाण्डुकाह्वयः । पद्ममाणवपिङ्गाब्जसर्वरत्नपदादिकाः ॥ ७३ निषयो नव तस्यासन्प्रतीतैरिति नामभिः । यैरयं गृहवार्तायां निश्चिन्तोऽभूनिधीश्वरः॥ ७४ निषिः पुण्यनिषेरस्य कालाख्यः प्रथमो मतः । यतो लौकिकशब्दादिवार्तानां प्रभवोऽन्वहम् ॥ ७५ इन्द्रियार्था मनोज्ञा ये वीणा वंशानकादयः । तान्प्रसूते यथाकालं निधिरेष विशेषतः ॥ ७६ शिजविण्याचे काम करणारे एक कोटि हंडे या चक्रीच्या स्वैपाकघरात होते. तांदुळ शिजविण्याच्या कार्वी त्यांचा उपयोग होत असे ॥ ६७ ।।। या चक्रवर्तीचे कुळवासह नांगर एक लक्ष कोटी होते. धान्य पदरी पडल्यावर जमीन नांगरण्यासाठी त्यांचा निरन्तर उपयोग होत असे ।। ६८ ।। ज्यात दही घुसळणे चालले असता वाटसरू क्षणपर्यन्त त्यांचे ध्वनि ऐकत उभे राहत असत. असे गायींनी गजबजलेले गौळवाडे तीन कोटी होते ।। ६९ ।।। ज्यात रत्नांचा व्यापार होत असल्यामुळे समीपचे लोक येऊन राहत असत अशा स्थानाला कुक्षिवास म्हणतात तेथे या चक्रवर्तीचे सातशे कुक्षिवास होते ॥ ७० ॥ जेथे मोठ्या कष्टाने जाता येते अशा या चक्रवर्तीची अठ्ठावीस हजार जंगले होती. त्या जंगलाचा काही प्रदेश ओसाड, काही प्रदेश दाट झाडीचा, काही निर्जल व काही प्रदेश पर्वतमय व काही खोलगट अशा विभागानी विभक्त झालेला होता ॥ ७१ ।। ज्यानी रत्नांच्या उत्पत्तीचा प्रदेश चोहोकडून व्यापलेला आहे असे त्या चक्रवर्तीच्या ताब्यात राहणारे अठरा हजार राजे होते ॥ ७२ ।। काल, महाकाल, नैःसर्प, पांडुक, पद्म, माणव, पिंग, शंख आणि सर्वरत्न या नावानी प्रसिद्ध असे नऊ निधि या राजाला प्राप्त झाले होते. त्यामुळे गृहकृत्याच्या-आजीविकेच्या संबंधाने हा राजा निश्चित होता ।। ७३-७४ ।। पुण्य निधि ज्याच्याजवळ आहे अशा या राजाचा पहिला निधि कालनावाचा होता व त्यापासून लौकिक शब्द व्याकरण वार्ता वगैरेची नेहमी उत्पत्ति होत असे. तसेच योग्य काली इन्द्रियांना आवडणारे अनेक विषय व वीणा, बासरी, नगारे आदिक वाद्यांची या कालनिधीपासून विशेष उत्पत्ति होत होती ।। ७५-७६ ।। Page #364 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-८४) महापुराण (३५३ असिमष्यादिषट्कर्मसाधनद्रव्यसम्पदः । यतः शश्वत्प्रसूयन्ते महाकालो निधिः स वै ॥ ७७ शय्यासनालयादीनां नःसात्प्रभवो निधेः । पाण्डकाद्धान्यसम्भूतिः षड्रसोत्पत्तिरप्यतः ॥ ७८ पट्टांशकदुकलादिवस्त्राणां प्रभवो यतः । स पद्माख्यो निधिः पद्मागर्भाविर्भावितोऽद्युतत् ॥ ७९ दिव्याभरणभेदानामुद्धवः पिङ्गलान्निधेः। माणवानीतिशास्त्राणां शस्त्राणां च समुद्धवः ॥ ८० शंखात्प्रदक्षिणावर्तात्सौवर्णी सृष्टिमुत्सृजन् । स शङ्कनिधिरुत्प्रेसद्रुक्मरोचिजितार्करुक् ॥ ८१ सर्वरत्नान्महानीलनीलस्थूलोपलादयः। प्रादुष्यन्ति मणिच्छायाचितेन्द्रायुधत्विषः ॥ ८२ रत्नानि द्वितयान्यस्य जीवाजीवविभागतः । मात्राणेश्वर्यसम्भोगसाधनानि चतुर्दश ॥ ८३ चक्रातपत्रदण्डासिमणयश्चर्म काकिणी । चमूगृहपतीभाश्वयोषित्तक्षपुरोषसः ॥ ८४ दुसऱ्या महाकालनिधिपासून असि, मषी आदिक सहा कर्माना साधक अशा पदार्थांची संपत्तीची निरन्तर उत्पत्ति होत असे ॥ ७७ ॥ नैसर्प निधीपासून शय्या, आसने, घरे आदिकांची उत्पत्ति होत असे, पाण्डुकनिधीपासून सर्व धान्ये उत्पन्न होत असत व याच्यापासून सहा रसांचीही उत्पत्ति होत असे ॥ ७८ ॥ रेशमी वस्त्रे व भरजरी वस्त्रे, सुती वस्त्रे, आदिक अनेक प्रकाराच्या वस्त्रांची उत्पत्ति होत असे व तो पद्मनिधि लक्ष्मीच्या गर्भापासून उत्पन्न झाल्याप्रमाणे शोभत असे ।। ७९॥ पिंगल नामक निधीपासून दिव्य अलंकाराचे अनेक प्रकार उत्पन्न होतात आणि माणव नामक निधीपासून नीतिशास्त्राची व अनेक शास्त्रांची उत्पत्ति होते ।। ८० ॥ ज्याच्या आतील भोवरे उजव्या बाजूकडून आहेत, अशा शंखापासून सुवर्णमय वस्तूना उत्पन्न करणारा शंख नावाचा निधि आपल्या चमकणाऱ्या सुवर्णाप्रमाणे कान्तीने सूर्याच्या किरणाना जिंकणारा होता ॥ ८१ ॥ सर्वरत्न नामक निधि आपल्या मण्यांच्या कान्तीपासून इन्द्रधनुष्याची कान्ति उत्पन्न करितो व या निधीपासून महानीलमणि, नील व पद्मराग आदिक अनेक प्रकारांची रत्ने उत्पन्न होतात ॥ ८२ ॥ या चक्रवर्तीजवळ सजीव रत्ने व अजीव अशी दोन प्रकारची रत्ने होती व ती पृथ्वी व बल, ऐश्वर्य यांचा उपभोग घेण्यास साधनीभूत होती. चक्र, छत्र, दण्ड, तरवार, चूडामणि, चर्म आणि काकिणी ही सात अजीव रत्ने आणि सेनापति, गृहपति, हत्ती, घोडा, स्त्री, तक्षरत्न-सुतार आणि पुरोहित ही सात जीवरत्ने होत ।। ८३-८४ ॥ Page #365 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५४) महापुराण (३७-८५ चक्रदण्डासिरत्नानि सच्छत्राण्यायुधालयात् । जातानि मणिचर्मभ्यां काकिणी श्रीगृहोदरे ॥ ८५ स्त्रीरत्नगजवाजीनां प्रभवो रौप्यशैलतः। रत्नान्यन्यानि साकेताज्जज्ञिरे निधिभिः समम् ॥ ८६ निधीनां सहरत्नानां गुणान्को नाम वर्णयेत् । वैराजितमूर्जस्वि हृदयं चक्रवर्तिनः ॥ ८७ भेजे षड़तुजानिष्टान्भोगान्पञ्चेन्द्रियोचितान् । स्त्रीरत्नसारथिस्तद्धि निधानं सुखसम्पदाम् ॥८८ कान्तारत्नमभूत्तस्य सुभद्रेत्यनुपद्रुतम् । भद्रिकासौ प्रकृत्यैव जात्या विद्याधरान्वया ॥ ८९ शिरीषसुकुमाराङ्गी चम्पकच्छदसच्छविः । बकुलामोदनिःश्वासा पाटलापाटलाधराः ॥९० प्रबुद्धपद्मसौम्यास्या नीलोत्पलदलेक्षणा । सुभ्ररलिकुलानीलमदुकुञ्चितमूर्धजा ॥ ९१ तनदरी वरारोहा वामोरूनिबिडस्तनी। मृदुबाहुलता साभन्मदनाग्नेरिवारणिः ॥ ९२ तत्क्रमौ नूपुरामञ्जुगुञ्जितर्मुखरीकृतौ । मदनद्विरदस्येव तेनतुर्जयडिण्डिमम् ॥ ९३ चक्र, दण्ड, तरवार, छत्र ही आयुधशालेपासून उत्पन्न झाली. चूडामणि, चर्मरत्न व काकिणीरत्न है न ही श्रीगहापासन उत्पन्न होतात. स्त्रीरत्न. गजरत्न व अश्वरत्न यांची उत्पत्ति 'विजयार्धपर्वतापासून होते. याहून बाकीची रत्ने ही अयोध्येत निधीबरोबर उत्पन्न झाली. ॥ ८५-८६ ॥ या रत्नासह निधींच्या गुणांचे कोण वर्णन करू शकेल ? कारण या निधीनी व रत्नानी चक्रवर्तीचे अत्यन्त शक्तिशाली हृदय वश केले होते ।। ८७ ॥ सुखसम्पत्तीचे निधान असे स्त्री-रत्न ज्याला सहाय्यक आहे असा तो चक्रवर्ती पंचेन्द्रियांना योग्य आणि सहा ऋतूपासून उत्पन्न होणारे जे भोग त्याचे सेवन करीत असे ॥८॥ या चक्रवर्तीचे स्त्रीरत्न सर्वदोषरहित होते. त्याचे नाव सुभद्रा होते. ती स्वभावतःच 'भद्र-मंगलस्वरूपाची होती आणि तिचा विद्याधरकुलात जन्म झाला होता ।। ८९ ॥ तिचे सर्व अंग शिरीष पुष्पाप्रमाणे सुकुमार होते. तिची अंगकान्ति पिवळ्या 'चाफ्याच्या पाकळीप्रमाणे होती. बकुल पुष्पाप्रमाणे तिचे श्वास सुगंधित होते. तिचा खालचा ओठ पाडळीच्या फुलाप्रमाणे गुलाबी रंगाचा होता ।। ९० ॥ विकसित कमलाप्रमाणे तिचे मुख सुंदर होते. निळया कमळाच्या पाकळीप्रमाणे तिचे डोळे होते. तिच्या भुवया फार सुन्दर होत्या आणि तिचे मस्तक-केश भ्रमरपंक्तिप्रमाणे काळे मऊ आणि कुरळे होते ।। ९१ ॥ तिचे पोट कृश होते व तिचे ढुंगण पुष्ट होते, तिच्या मांड्या सुंदर व तिचे स्तन पुष्ट व कठिण होते. तिचे बाहु मृदुलतेप्रमाणे नाजुक होते. ती जणु मदनाग्नीचे उत्पत्ति स्थान आहे असे वाटत असे ॥ ९२ ॥ तिचे दोन पाय पैंजणांच्या मधुर शब्दानी युक्त होते व ते तिचे पाय मदनरूपी हत्तीच्या विजयाचा नगारा जणु वाजवितात असे होते ॥ ९३ ॥ Page #366 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-१०१) महापुराण (३५५ निःश्रेणीकृत्य तज्जङ्घ सदूरुद्वारबन्धनम् । वासगेहास्थयानङ्गस्तच्छ्रोणी नूनमासदत् ॥ ९४ निःसृत्य नाभिवल्मीकात्कामकृष्णभुजङ्गमः। रोमावलीछलेनास्या ययौ कुचकरण्डकम् ॥ ९५ निर्मोकमिव कामाहेर्दधानोचं स्तनांशुकम् । भुजगीमिव तद्धृत्यै सैकामेकावलीमधात् ॥९६ बभ्रे हारलतां कण्ठलग्नां सा नाभिलम्बिनीम् । मन्त्ररक्षामिवानङ्गग्रथितां कामदीपिनीम् ॥ ९७ हाराकान्तस्तनाभोगा सा स्म धत्ते परां श्रियम् । सीतेव यमकाद्रिस्पृक्प्रवाहा सरिदुत्तमा ॥ ९८ बाहू तस्या जितानङ्गपाशौ लक्ष्मीमुदूहतुः । कामकल्पनुमस्येव प्ररोही दोप्रभूषणैः ॥ ९९ रेजे करतलं तस्याः सूक्ष्मरेखाभिराततम् । जयरेखा इवाबिभ्रदन्यस्त्रीनिर्जयाजिता ॥ १०० मुखमुद्धृ तनूदर्यास्तरलापाङ्गमाबभौ । सशरं समहेष्वासं जयागारमिवातनोः ॥ १०१ -------... मदन हा तिच्या पिंडांना शिडी करून सुंदर मांड्या ह्या ज्याच्या दारे आहेत अशा तिच्या ढुंगणाला राहण्याचे आपले घर आहे असे समजून त्यात तो राहिला ॥ ९४ ॥ बेंबीरूपी वारुळातून मदनरूपी काळा सर्प निघून रोमावलीच्या मिषाने तो तिच्या स्तनरूपी करंड्याकडे गेला होता ।। ९५ ॥ त्या मदनरूपी सापाची जणु कात की काय अशी सूक्ष्म सुन्दर चोळी तिने धारण केली होती व त्या सापाच्या संतोषाकरिता जणु तिने एक पदरी कंठी सर्पिणीप्रमाणे धारण केली होती ॥ ९६ ॥ ___मदनाने स्वतः गुंफून तयार केलेला व पतीच्या ठिकाणी कामोद्दीपन करणारा असा मंत्राने भारलेला जणु दोरा अशा प्रकारचा हार त्या सुभद्रा राणीने गळ्यात घातला होता व तो नाभीपर्यन्त रुळत होता ॥ ९७ ॥ हाराने जिच्या स्तनाचा विस्तार व्यापला आहे अशी ती सुभद्रादेवी उत्कृष्ट शोभेला प्राप्त झाली होती. जिचा प्रवाह यमकाद्रि नामक दोन पर्वताना स्पर्श करून वाहत आहे अशा उत्तम सीतानदीप्रमाणे ती सुभद्रादेवी शोभत होती. कारण तिच्या गळ्यातला हार तिच्या दोन स्तनाच्या मध्यभागाला स्पर्श करून रुळत असल्यामुळे तिने अपूर्व शोभा धारण केली होती ॥९८॥ ज्यानी मदनाच्या पाशाना आपल्या सौन्दर्याने जिंकले आहे असे तिचे दोन बाहू फार शोभा धारण करीत होते व ते चमकणान्या भूषणाना धारण करीत असल्यामुळे कामरूपी कल्पवृक्षाचे दोन अंकुर आहेत की काय असे वाटत होते ।। ९९ ॥ सूक्ष्मरेखांनी व्याप्त झालेला तिच्या हाताचा तळवा अन्य स्त्रियांना जिंकून उत्तम जय रेखाना जणु धारण करीत आहे असा शोभत असे ॥ १० ॥ त्या कृशोदरी सुभद्रादेवीचे चंचल कटाक्षानी युक्त आणि वर चढलेल्या भुवयानी युक्त असे मुख बाण व धनुष्याने सहित असे व जयसंपादन करणारे मदनाचे जणु मंदिर आहे असे शोभत होते ॥ १०१ ॥ Page #367 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५६) महापुराण (३७-१०२ वक्त्रमस्याः शशाङकस्य कान्ति जित्वा स्वशोभया। दधेऽनुभूपताकाङक कर्णाभ्यां जयपत्रकम् ॥ हेमपत्राङिकतौ तस्याः कणा लीलामवापतुः । स्वर्वनिर्जयायेव कृतपत्रावलंबनौ ॥ १०३ कपोलावुज्ज्वलौ तस्या दधतुर्दर्पणश्रियम् । द्रष्टुकामस्य कामस्य स्वा दशा दशधा स्थिताः॥ १०४ मध्येचक्षुरषीराक्ष्या नासिकाभान्मखोन्मुखी । तदामोदमिवाघ्रातुं कृतयत्ना कुतूहलात् ॥ १०५ कृत्वा श्रोतृपदे कर्णी तन्नेत्रे विभ्रमैमिथः । कृतस्पर्द्ध इवाभातां पुष्पबाणे सभापतौ ॥ १०६ अभूत्कान्तिश्चकोराक्ष्या ललाटे लुलिनालके । हेमपट्टान्तसंलग्ननीलोत्पलविडम्बिनी ॥ १०७ तस्या विनीलविसस्तकबरीबन्धबन्धुरम् । केशपाशमनङ्गस्य मन्ये पाशं प्रसारितम् ॥ १०८ इत्यस्या रूपमुद्भूतसौष्ठवं त्रिजगज्जयि । मत्वानङ्गस्तदङ्गेषु सन्निधानं व्यधाभ्रुवम् ॥ १०९ या देवीचे तोंड आपल्या शोभेने चन्द्राची कान्ति जिंकून कानांच्या मिषाने जयपत्र व भुवयांच्या मिषाने जणु जयपताका धारण करीत आहे असे दिसत होते ।। १०२ ।। सोन्याच्या पानड्यानी युक्त असे तिचे दोन कान स्वर्गातील देवाङगनांना जिंकण्यासाठी ज्यानी शिफारशीची पत्रे जणु घेतली आहेत असे शोभत होते ॥ १०३ ।। तिचे निर्मल चमकणारे दोन गाल दहा प्रकारच्या आपल्या अवस्था पाहण्याची इच्छा करणाऱ्या कामदेवाच्या दर्पणाच्या शोभेला धारण करीत होते. १) सर्वदा प्रियाचे किंवा प्रियेचे चिन्तन, २) तिला किंवा त्याला पाहण्याची इच्छा, ३) दीर्घ श्वासोच्छवास, ४) कामज्वर, ५) सन्ताप, ६) कोणत्याही विषयात अप्रीति, ७) मूर्छा, ८) जगण्याचा संशय, १०) मरण. या मदनाने पीडित झालेल्या स्त्री-पुरुषांच्या दहा अवस्था शास्त्रात वर्णिल्या आहेत ।। १०४ ॥ चंचलनयना अशा सुभद्रादेवीच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी असलेली आणि मुखाचे जवळ प्राप्त झालेली तिची नासिका (नाक) कौतुकाने जणु मुखाचा सुगंध हुंगण्यासाठी तिने प्रयत्न केला आहे अशी शोभत होती ॥ १०५ ॥ तिच्या दोन डोळ्यानी कानाना साक्षीदार श्रोते बनविले होते आणि मदनाला जणु त्यानी सभापति बनविले व ते दोन डोळे एकमेकाशी जणु स्पर्धा करीत आहेत असे शोभले ॥ १०६ ॥ जिचे डोळे चकोर पक्ष्याप्रमाणे आहेत अशा त्या सुभद्रादेवीच्या कपाळावर कुरळे केश रुळत होते. त्यामुळे सोन्याच्या पट्टीच्या वरील भागावर लोंबत असलेल्या नीलकमलांचे अनुकरण करणारी शोभा उत्पन्न झाली होती ॥ १०७ ।। जिचे बन्धन सुटले आहे अशा काळ्या वेणीचा जो सुन्दर सुभद्रादेवीचा केशपाश तो मला वाटते हा मदनाने पसरलेला पाश आहे ॥ १०८ ।। याप्रमाणे या सुभद्रादेवीचे रूप अतिशय सुन्दर असल्यामुळे हे त्रैलोक्याला जिंकणारे आहे असे मदनाला वाटले म्हणून तिच्या सर्व अवयवात तो जणु येऊन राहिला आहे असे मला वाटते ॥ १०९॥ Page #368 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-११७) महापुराण (३५७ तद्रूपालोकनोच्चक्षुस्तद्गात्रस्पर्शनोत्सुकः । तन्मुखामोदमाज्जिघ्रन् रसयंश्चासकृन्मुखम् ॥ ११० तद्गेयकालनिक्वाणश्रुतिसंसक्तकर्णकः । तद्गात्रविपुलारामे स रेमे सुखनिर्वृतः ॥ १११ पञ्चबाणाननङ्गस्य वदन्त्येतानकुण्ठितान् । पुष्पेषुसथा लोके प्रसिद्धयेव गता प्रथाम् ॥ ११२ धनुर्लता मनोजस्य प्राहुःपुष्पमयों जडाः । सुकुमारतरं स्त्रणं वपुरेवातनोधनः ॥ ११३ पञ्चबाणाननङ्गस्य नियच्छंति कुतो जडाः । यदेव कामिनां हारि तदस्त्रकामदीपनम् ॥ ११४ स्मितमालोकितं हासो जल्पितं मदमन्मनम् । कामाङ्गमिदमेवान्यकतवं तस्य पोषकम् ॥ ११५ आरूढयौवनोष्माणौ स्तनावस्था हिमागमे । रोम्णां हृषितमस्याडगे शिशिरोत्थं विनिन्यतुः॥११६ हिमानिलैः कुचोत्कम्पमाहितं साहतक्लमः । प्रेयस्तलकरस्पर्शेरपनिन्येऽङ्कशायिनी ॥ ११७ भरत चक्रवर्ती तिचे रूप डोळे न मिटवता सारखे पाहत असे. तिच्या शरीराला स्पर्श करण्यात नेहमी भरत उत्सुक होत असे. तिच्या मुखाचा सुगंध तो नेहमी हुंगत असे आणि तिच्या मुखाचे तो वारंवार चुम्बन घेत असे ॥ ११० ॥ तिच्या गाण्यात जो मधुर ध्वनि तो ऐकण्यात त्याचे कान नेहमी आसक्त होत असत. तो चक्री नेहमी तिच्या शरीररूपी विस्तृत बगीचात रमत असे व त्या सुखानी तो कृतार्थ झाला ॥ १११ ।। मदनाचे पाच बाण सर्वत्र अकुंठित आहेत असे सर्व लोक म्हणतात व मदनाचे बाण फुलांचे आहेत अशी कथा लोकात पुष्प बाण या नावाने प्रसिद्ध झाली आहे ॥ ११२ ।। मदनाचे धनुष्य फुलानी बनलेले आहे असे अज्ञ लोक म्हणतात. पण खरे पाहिले असता अधिक कोमल असलेले जे स्त्रीशरीर तेच मदनाचे धनुष्य होय ॥ ११३ ॥ मदनाचे बाण पाचच आहेत आहेत असे मूर्खलोक कसे निश्चित करतात? वास्तविक पाहिले असता कामिजनांच्या मनाला जे जे आकर्षिते ते ते सर्व कामोत्तेजक मदनाचे शस्त्र होय ॥ ११४ ॥ सुंदर स्त्रीचे मंद हास्य, वक्र दृष्टीने पाहणे, स्पष्ट हसणे आणि तारुण्यमदाने अस्पष्ट असे बोलणे हे सर्व मदनोत्पत्तीची साधने आहेत पण बाकीचे कपट व्यापार त्याचेच पोषक आहेत ॥ ११५ ॥ तारुण्याची उष्णता ज्यात उत्पन्न झाली आहे असे या सुभद्रादेवीच्या दोन स्तनानी हिवाळ्यात या चक्रवर्तीच्या अंगात थंडीमुळे उत्पन्न झालेले जे रोमांच ते नाहीसे केले ।। ११६ ॥ पति भरताच्या मांडीवर झोपणाऱ्या सुभद्रादेवीने थंड वान्यानी उत्पन्न झालेल्या स्तनांच्या कंगाला क्लेश हरण करणाऱ्या आपल्या पतीच्या हाताच्या स्पर्शानी नाहीसे केले ॥ ११७ ।। Page #369 -------------------------------------------------------------------------- ________________ ३५८) महापुराण (३७-११८ साशोककलिकां चूनमञ्जरी कर्णसङगिनीम् । बध्नती चम्पकप्रोतः केशान्तः सारुचन्मधौ ॥११८ मधौ मधुमदारक्तलोचनामास्खलद्गतिम् । बहुमेने प्रियःकान्तां मूर्तामिव मदश्रियम् ॥ ११९ कलैरलिकुलक्वाणः सान्यपुष्टविकूजितः । मधुरं मधुरभ्यष्टौत् तुष्टय वामुंविशाम्पतिम् ॥ १२० कलकण्ठोकलक्वाणमूच्छितैरलिझङगकृतः । व्यज्यतेस्मस्मराकाण्डावस्कन्दो डिडिमायितैः ॥ १२१ पुष्यच्च्यूतवनोद्गन्धिरुत्फुल्लकमलाकरः । पप्रथे सुरभिर्मासः सुरभीकृतदिङमुखः ॥ १२२ कृतालिकुलझङ्कारः सञ्चरन्मलयानिलः । अनङगनृपतेरासीद्घोषयन्निव शासनम् १२३ सन्ध्यारुणां कलामिन्दोमने लोको जगद्ग्रसः । करालामिव रक्ताक्तां दंष्ट्रां मदनरक्षसः ॥ १२४ उन्मत्तकोकिले काले तस्मिन्नुन्मत्तषट्पदे । नानुन्मत्तोजनः कोऽपि मुक्त्वानडगनुहोमुनीन् ॥ १२५ .......................... अशोकाच्या कळ्यांनी युक्त अशा आंब्याच्या मंजरीला ती सुभद्रादेवी आपल्या कानावर धारण करीत असे व तिला चाफ्याच्या फुलांनी गुंफलेल्या आपल्या केशांच्या अग्रभागानी बांधीत असे. याप्रमाणे स्वताःस सजविणारी देवी वसन्त ऋतूत फारच शोभत असे ॥ ११८ ।। वसन्तऋतूच्या काळी दारूच्या धुंदीने जिचे डोळे ताम्बूस बनले आहेत व त्यामुळे जिचे चालणेही अडखळत असे अशा त्या आपल्या कान्तेला सुभद्रादेवीला तो पति भरतेश्वर जणु मूर्तिमंत मदलक्ष्मी आहे असे समजत असे ॥ ११९ ।। ___ तो वसन्त ऋतू कोकिळांच्या स्वरानी युक्त अशा भुंग्याच्या मधूर गुंजारवानी जणु या भरतराजाची सन्तुष्ट होऊन स्तुति करीत होता ॥ १२० ।। जयदुन्दुभीप्रमाणे ज्याचा आवाज भासत आहे अशा कोकिलांच्या मधुर स्वरानी युक्त असलेल्या भुंग्यांच्या गुंजारवानी जणु मदनाने एकाएकी भरतचक्रीवर छापा घातला आहे असे वाटत होते ॥ १२१ ॥ फुललेल्या आंबरायीच्या सुगन्धानी जेथील वनप्रदेश दरवळलेले आहेत व जेथे कमलांचे समूह विकसित झाले आहेत व सर्व दिशांचा प्रान्त ज्याने सुगन्धित केला आहे असा चैत्रमास चोहीकडे पसरला होता ।। १२२ ॥ . ज्याने भुंग्यांच्या गुंजारवाला आपल्याबरोबर घेतले आहे, असा चोहोकडे संचार करणारा मलय पर्वतावरील वारा मदनरूपी राजाच्या आज्ञेला चोहोकडे प्रसिद्ध करणान्या दौंडीवाल्याप्रमाणे सर्वाना वाटत होता ॥ १२३ ॥ सन्ध्यकालच्या लालरंगाने लालभडक झालेली चन्द्राची कला ही सगळ्या जगाला खाऊन टाकणारी मदनरूप राक्षसाची जणु रक्तांनी माखलेली भयंकर दाढ आहे असे लोकांनी मानले ॥ १२४ ॥ ज्यात कोकिल उन्मत्त झाले आहेत, ज्यात भुंगे उन्मत्त झाले आहेत, अशा काली मदनाशी द्रोह करणाऱ्या मुनीशिवाय कोणताही माणूस अनुन्मत्त-उन्मत्तपणाने रहित नव्हता. अर्थात मुनिजन मात्र कामोन्मत्त झाले नव्हते ॥ १२५ ॥ Page #370 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-१३३) महापुराण (३५९ सायोदगाहनिर्णिक्तरङगैस्तुहिनशीतलैः । ग्रीष्मे मदनतापातं सास्याङग निखापयत् ॥ १२६ चन्दनद्रवसंसिक्तसुन्दराङगलतां प्रियाम् । परिरभ्य दृढं दोभ्यां स लेभे गात्रनिर्वृतिम् ॥ १२७ मवनज्वरतापाता तीवग्रीष्मोष्मनिःसहाम् : सतां निर्वापयामास स्वाङस्पर्शसुखाम्बुभिः ॥ १२८ उत्फुल्लमल्लिकामोदवाहिभिर्गन्धवाहिभिः । स सायंप्रातिकभैजे ति रतिसुखाहरैः ॥ १२९ उत्फुल्लपाटलोद्गन्धिमल्लिकामालधारिणीम् । उपगृह्य प्रियां प्रेम्णा नैदाघीं सोऽनयन्निशाम्॥१३० सा घनस्तनितव्याजातजितेव मनोभुवा । भुजोपपीडमाश्लिष्य शिष्ये पत्या तपात्यये ॥ १३१ नवाम्बुकलुषाःपूराध्वनिरुन्मदके किनाम् । कदम्बामोदिनो वाताः कामिनां धृतयेऽभवन् ॥ १३२ आरूढकालिकां पश्यन्बलाकामालभारिणीम् । धनाली पथिकःसाश्रुर्दिशो मेनेऽन्धकारिताः॥ १३३ ...............--- .............. ग्रीष्मकाळी संध्याकाळी पाण्यात प्रवेश करून स्नान केल्यामुळे स्वच्छ व बर्फाप्रमाणे थंड झालेल्या आपल्या अंगानी या चक्रवर्तीच्या मदनतापाने पीडित झालेल्या सर्व अंगाना सुभद्रादेवीने शान्त केले ।। १२६ ॥ चन्दनाच्या ओल्या उटीने जिची सर्व सुन्दर अंगलता माखली आहे अशा सुभद्रा प्रियेला आपल्या दोन बाहूंनी दृढ आलिंगून या चक्रवर्तीने आपल्या अंगाला सुखविले ॥ १२७ ।। मदनज्वराच्या सन्तापाने पीडित झालेली तीव्र ग्रीष्माच्या उष्णतेला सहन करण्यास असमर्थ अशा आपल्या प्रियेला या चक्रवर्तीने आपल्या अंगाच्या स्पर्शरूपी सुखकर जलानी शान्त केले ॥ १२८ ॥ प्रफुल्लमोगऱ्याच्या पुष्पांचा सुगन्ध वाहून आणणारे व रतिकाली सुख देणाऱ्या अशा सायंकालच्या आणि प्रातःकालच्या वाऱ्यानी तो चक्रवर्ती आनंदित होत असे ॥ १२९ ।। प्रफुल्ल झालेल्या पाडळीच्या फुलांच्या सुवासाने युक्त अशा मोगऱ्यांच्या फुलांच्या माळा धारण करणा-या सुभद्रादेवीला तो भरतचक्री प्रेमाने आलिंगून उन्हाळ्याच्या रात्री घालवीत असे ॥१३०॥ मेघांच्या गर्जनेच्या मिषाने जणु मदनाने जिला भय दाखविले की काय अशी ती सुभद्रादेवी वर्षाऋतूंत दृढ आलिंगन देऊन पतीबरोबर झोपत असे ॥ १३१ ॥ त्या वर्षाऋतुसमयी नद्यांचे प्रवाह नवीन पाण्याने गढूळ झाले. मत्त झालेले मोर केकारव करू लागले आणि कदंबाच्या पुष्पांचा सुगन्ध ज्यात आहे असे वारे वाहू लागले. हे सर्व प्रकार कामीलोकाना सन्तोष देण्यास कारण झाले आहेत ॥ १३२॥ जिच्यात काळेपणा उत्पन्न झाला आहे व बगळ्यांच्या पंक्तीना जिने मालेप्रमाणे धारण केले आहे अशा मेघपंक्तीला पाहणारा वाटसरू ज्याच्या डोळ्यात अश्रु उत्पन्न झाले आहेत असा होऊन सर्व दिशाना अंधकाराने भरल्या आहेत असे मानू लागले ॥ १३३ ॥ Page #371 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६०) महापुराण (३७-१३४ धरारज्जुभिरानद्धा वागुरेव प्रसारिता । रोधाय पथिकणानां लुब्धकेनेव हृद्भुवा ॥ १३४ कृतावधिः प्रियोनागादगाच जलदागमः । इत्युदीक्ष्य घनान्काचिद्धृदि शून्याभवत्सती ॥ १३५ विभिन्दन्केतकीसूचीस्तन्पांसूनाकिरन्मरुत् । पान्थानां दृष्टिरोधाय धूलिक्षेपमिवाकरोत् ॥ १३६ इत्यभ्यर्णतमे तस्मिन्काले जलदमालिनि । सवासभवने रम्ये प्रियामरमयन्मुहुः ॥ १३७ आकृष्टनिचुलामोदं तद्वक्त्रामोदमाहरन् । तस्याःस्तनतटोत्सङ्गे सोऽनषीद्वार्षिकी निशाम् ॥ १३८ स रेमे शरदारम्भे विहरन्कान्तया समम् । वनेष्वभिनवोद्भिन्नसप्तच्छद सुगन्धिषु ॥ १३९ स कान्तां रमयामास हारज्योत्स्नाञ्चितस्तनीम् । शारदी निर्विशन् ज्योत्स्ना सौधोत्सङ्गेष हारिषु।। सोत्पलां कुब्जकदृब्धां मालां चूडान्तलम्बिनीम् । बालपत्युररस्यस्य स्थिता सजिघ्रति स्म सा॥ ज्या पावसाच्या धारा पडत होत्या त्या जणु प्रवासी रूपी हरिणाना पकडण्यासाठी मदनरूपी पारध्याने दोऱ्यानी पृथ्वीला बांधून तेथे जणु जाळे पसरले आहे असे वाटत होते ।। १३४ ।। ज्याने आपल्या येण्याची दिनमर्यादा सांगितली होती असा आपला पति आला नाही आणि आता हा पावसाळा आला आहे अशा विचाराने मेघाना पाहून कोणी एक पतिव्रता स्त्री आपल्या मनात शून्य झाली. अर्थात् चिन्तेने तिची विचारशक्ति नष्ट झाली ॥१३५ ।। केवड्याच्या कणसाना विस्कळित करून त्यातील परागाला-धुळीला इकडे तिकडे पसरणाऱ्या या वाऱ्याने प्रवासी जनांच्या डोळ्याना रोकण्यासाठी जणु धूळ उडविली आहे असे वाटत होते ॥ १३६ ॥ याप्रमाणे अगदी जवळ आलेल्या मेघपंक्तीनी युक्त अशा त्या पावसाळ्यात तो भरतराजा रम्य अशा महालात आपल्या प्रियेला वारंवार रमवित असे ॥ १३७ ।। ज्याने पाण्यात उत्पन्न होणाऱ्या वेताचा वास ओढून आणिला आहे अशा त्या सुभद्रादेवीच्या मुखसुगंधाचे सेवन करणारा तो भरतचक्रवर्ती तिच्या स्तनतटाच्या जवळ वर्षाऋतूतील रात्र घालवीत असे ।। १३८ ॥ शरदऋतूला प्रारंभ झाला असता सात्विणी वृक्षाच्या फुलांचा सुगंध ज्यात पसरला आहे अशा वनात आपल्या सुभद्रादेवीसह विहार करीत तिच्याशी रममाण होत असे ।। १३९ ।। मनाला हरण करणा-या प्रासादाच्या गच्चीवर शरत्कालाच्या चंद्रप्रकाशाचा अनुभव घेणारा तो चक्रवर्ती हाराच्या चांदण्याने जिचे स्तन.शोभत आहेत अशा मनोहर सुभद्रादेवीला रमवित असे ॥ १४०॥ __ जेव्हा ही सुभद्रादेवी आपल्या पतीच्या वक्षःस्थलावर निजत असे तेव्हा कंचुकींनी गुंफलेली व चक्रवर्तीच्या मस्तकापर्यन्त लांब असलेली जी कमलांची माला तिचा सुवास ती हुंगत असे ॥ १४१॥ Page #372 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-१४९) महापुराण इति सोत्कर्षमेवास्यां प्रथयन्प्रेमनिघ्नताम् । स रेमे रतिसाद्भूतो भोगाङ्गदशधोदितः ॥ १४२ सरत्ना, निधयो देव्यः पुरं शय्यासने चमूः । नाटयं सभाजनं भोज्यं वाहनं चेति तानि वै ॥१४३ वशाङ्गमिति भोगाङ्ग निर्विशन्स्वाशितम्भवम् । सुचिरं पालयामास भवमेकोष्णवारणाम् ॥ १४४ षोडशास्य सहस्राणि गणबद्धामराः प्रभोः । ये युक्तापुतनिस्त्रिशा निधिरत्नात्मरक्षणे ॥ १४५ क्षितिसार इतिख्यातः प्राकारोऽस्य गृहावृतिः । गोपुरं सर्वतोभद्रं प्रोल्लसद्रत्नतोरणम् ॥ १४६ नन्यावर्तो निवेशोऽस्य शिबिरस्यालघीयसः । प्रासादो वैजयन्ताख्यो यःसर्वत्र सुखावहः ॥ १४७ विक्स्वस्तिकासभाभूमिः परायमणिकुट्टिमा। तस्य चङक्रमणी यष्टिः सुविधिर्मणिनिमिता ॥१४८ गिरिकूटकमित्यासीत्सौधं दिगवलोकने । वर्षमानकमित्यन्यत्प्रेक्षागृहमभूद्विभोः ॥ १४९ याप्रमाणे या सुभद्रादेवी वरील प्रेमात अतिशय अडकून पडलेले आहोत असे अधिक व्यक्त करणारा तो चक्रवर्ती तिच्या रति सुखात लुब्ध होऊन दहा प्रकारच्या भोगसाधनानी तो तिच्याबरोबर रमत असे ।। १४२ ॥ चौदा रत्ने, नऊ निधि, पट्टराण्या, नगर, शय्या, आसने, सैन्य, नाटक-शाळेतील नृत्यादिक, नाना प्रकारची भांडी, भोजन वस्तु आणि वाहने ही दहा प्रकारची भोगसाधने होती ॥ १४३ ।। याप्रमाणे तृप्ति उत्पन्न करणाऱ्या दहा प्रकारच्या भोगसाधनांचा अनुभव भरतेश्वर घेत असे व एक छत्राधीन अशा या पृथ्वीचे त्याने दीर्घकालपर्यन्त रक्षण केले ॥ १४४ ॥ ___ या भरतेश्वराचे सोळा हजार गणबद्धामर देव होते ते हातात तरवार धारण करून निधींचे, रत्नांचे व चक्रवर्तीचे रक्षण करीत होते ॥ १४५ ।। या भरत राजाच्या घराला वेढलेला क्षितिसार नावाचा तट होता आणि ज्याला रत्नमय तोरणाने शोभा प्राप्त झाली आहे असे सर्वतोभद्र नावाचे गोपुर (वेस) होते ॥ १४६ ।। या भरत राजाच्या मोठ्या छावणीचे राहण्याचे ठिकाण नंद्यावर्त नांवाचे होते आणि या चक्रीच्या महालाचे नांव 'वैजयन्त' होते. हा महाल सर्व ऋतूमध्ये अतिशय सुखदायक होता ।। १४७ ॥ या चक्रवर्तीच्या सभागृहाचे नांव 'दिक्स्वस्तिका' असे होते व यातील जमीन अत्यंत मौल्यवान रत्नांनी बनविली होती. जेव्हा हा चक्री फिरावयास जात असे तेव्हा हा हातात 'सुविधि' नावाची काठी घेत असे ती अनेक मणि जिला जडविले आहेत अशी होती ॥ १४८॥ सर्व दिशा जेथून पाहता येतात असा याचा सौध होता उंच महाल होता त्याचे 'गिरिकूटक' नांव होते व या चक्रवर्तीचे नाटक पाहण्याचे जे स्थान होते त्याचे नांव 'वर्धमानक' असे होते ॥ १४९॥ म.४६ Page #373 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३७ - १५० धर्मान्तोऽस्य महानासीद्धारागृहसमाह्वयः । गृहकूटकमित्यूच्चैर्वर्षावासः प्रभोरभूत् ॥ १५० पुष्करावर्त्यभिख्यं च हर्म्यमस्य सुधासितम् । कुबेरकान्त मित्यासीद्भाण्डागारं यवक्षयम् ।। १५१ वसुधारकमित्यासीत्कोष्ठागारं महाव्ययम् । जीमूतनामधेयं च मज्जनागारमूजितम् ॥। १५२ 'रत्नमाला तिराचिष्णुर्बभूवास्यावतंसिका । देवरम्येति रम्या सा मता दृष्यकुटी पृथुः ॥ १५४ सिंहवाहिन्यभूच्छय्या सिंहरूढा भयानकः । सिंहासनमथोस्योच्चैर्गुणैर्नाम्नाप्यनुत्तरम् ॥ १५४ चामराण्युपमामानं व्यतीत्यानुपमान्यभान् । विजयार्द्धकुमारेण वित्तीणीनि निधीशिने ॥ १५५ भास्वत्सूर्यप्रभं तस्य बभूवा तपवारणम् । परार्ध्य रत्ननिर्माणं जितसूर्यशतप्रभम् ॥ १५६ विद्युत्प्रभे चास्य रुचिरे मणिकुण्डले । जित्वा ये वैद्युतों दीप्ति सरुचा ते स्फुरत्विषी ॥। १५७ ३६२) महापुराण या राजाचे उन्हाळ्यातील गरम हवेपासून रक्षण करणारे धारागृह नांवाचे मोठे स्थान होते व पावसाळयात राहण्याचे 'गृहकूटक' म्हणून स्थान गृह होते ते फार उंच होते ।। १५० ।। या चक्रवर्तीचा चुन्याने बांधलेला शुभ्र वाडा होता. त्याचे पुष्करावर्ती हे नाव होते व याच्या जामदारखान्याचे कोषगृहाचे नाव कुबेरकान्त असे होते व त्यातील धनादिक वस्तु केव्हांही संपत नसत ।। १५१ ।। ज्यातील धान्यादिक वस्तु केव्हांच संपत नसत असे याचे कोठार होते व त्याचे नाव 'वसुधारक' हे होते व याच्या उत्कृष्ट स्नानगृहाचे नाव 'जीभूत' असे होते ।। १५२ ।। या चक्रीच्या कंठीचे नाव ' अवतंसिका' हे होते. ती अतिशय मनोहर कान्तीने युक्त होती आणि याच्या तंबूचे नाव 'देवराया' असे होते. तो तंबू रमणीय आणि मोठा होता ।। १५३ ।। या चक्रवर्तीच्या निजण्याची शय्या 'सिंहवाहिनी' नावाची होती व ती भयंकर अशा सिंहानी धारण केली होती. याचप्रमाणे याचे सिंहासनही खूप मोठे व उंच होते व त्यांचे 'अनुत्तर' असे नाव होते ते सिंहासन नावाने व गुणानीही उत्कृष्ट होते. त्याच्या सिंहासनासारखे उत्कृष्ट सिंहासन दुसरे इतर राजाचे नव्हते ।। १५४ ॥ विजयार्ध पर्वताचा स्वामी अशा देवाने निधिपति भरताला जी चामरे दिली होती त्याच्यासारखी चामरे कोठेच नव्हती म्हणून ती उपमारहित अर्थात् अनुपम - शोभत होती ।। १५५ ॥ या चक्रवर्तीचे छत्र शेकडो सूर्याच्या प्रकाशाला जिंकणारे होते आणि ते बहुमूल्यवान् रत्नानी बनविले होते व त्याचे सूर्यप्रभ नाव अन्वर्थक होते ।। १५६ ॥ याच चक्रवर्तीची विद्युत्प्रभ नावाची दोन रत्नकुंडले होती. त्यांची पसरली होती व त्यानी विजेच्या कान्तीला जिंकून शोभत होती ।। १५७ ।। Page #374 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-१६५) महापुराण रत्नांशुजटिलास्तस्य पादुका विषमोचिकाः । परेषां पदसंस्पर्शान्मुञ्चन्त्यो विषमुल्बणम् ॥ १५८ अभेद्याख्यमभूत्तस्य तनुत्राणं प्रभास्वरम् । द्विषतां शरनाराचैर्यदभेद्यं महाहवे ॥ १५९ रथोजितज्जयोनाम्ना जयलक्ष्मीभरोद्वहः । यत्र शस्त्राणि जैत्राणि दिव्यान्यासन्ननेकशः ॥ १६० चण्डाकाण्डाशनिप्रख्यज्याघाताकम्पिताखिलम् । जितदैत्यामरं तस्य वज्रकाण्डमभूद्धनुः ॥ १६१ अमोघपातास्तस्यासन्नमोघाख्या महेषवः । यैरसाध्यजये चक्रीकृतश्लाघ्यो रणाङगणे ॥ १६२ प्रचण्डा वज्रतुण्डाख्या शक्तिरस्यारिखण्डिनी। बभूव वज्र निर्माणा श्लाध्या वजिजयेऽपि या ॥ कुन्तः सिंहाठको नाम यः सिंहनखराजकुरैः । स्पर्द्धते स्म निशानानो मणिदण्डाग्रमण्डनः ॥ १६४ तस्यासिपुत्रिका दीप्रारत्नानद्धस्फुरत्सरूः । लोहवाहिन्यभून्नाम्ना जयश्री दर्पणास्थिता ।। १६५ --...-..-----------------------.. रत्नांच्या किरणानी चमचमणाऱ्या व इतराच्या पायांचा स्पर्श झाला असता तीव्र विष बाहेर टाकणान्या अशा पादुका या चक्रवर्तीच्या होत्या. 'विषमोचिका' हे त्यांचे नाव होते ॥१५८॥ या चक्रवर्तीचे चमकणारे अभेद्य नावाने चिलखत होते व ते महायुद्धात शत्रूच्या तीक्ष्ण बाणानी अभेद्य होते ॥ १५९ ॥ या चक्रीचा जयलक्ष्मीचा भार धारण करणारा अजितंजय नावाचा रथ होता. या रथात अनेक विजयशाली दिव्य अस्त्रे होती ॥ १६० ॥ अकाली होणाऱ्या प्रचंड विद्युत्पाताप्रमाणे होणाऱ्या दोरीच्या टङ्कारानी ज्याने सारे जग कम्पित केले आहे व ज्याने दैत्य व देवाना जिंकले आहे असे या चक्रीचे वज्रकाण्ड नावाचे धनुष्य होते ।। १६१ ॥ ज्यांचे शत्रूवर पडणे व्यर्थ होत नाही असे या चक्रीचे अमोघ नावाचे महाबाण होते. या बाणाच्या योगाने चक्रवर्ती भरताला जेथे जय मिळविणे असाध्य असे अशा रणांगणातही जय प्राप्त होत असे. त्यामुळे हा चक्रवर्ती प्रशंसिला जात असे ॥ १६२ ॥ या चक्रवर्तीजवळ वज्रतुण्डा नावाचे शत्रूचे खंडन करणारे शक्ति आयुध होते. ते वज्रापासून बनविले होते व त्या आयुधाने इन्द्रालाही जिंकता येते अशी त्याची प्रशंसा केली जात असे ॥ १६३ ॥ या चक्रीचा सिंहाटक नावाचा भाला होता. त्याचा अग्रभाग फार तीव्र असल्यामुळे तो सिंहाच्या तीक्ष्ण नख्यांच्या अग्रभागाबरोबर स्पर्धा करीत असे व त्याच्या दंडाचा अग्रभाग रत्नानी जडविलेला असल्यामुळे शोभत असे ।। १६४ ॥ या भरत राजाची सुरी (जंबिया) अतिशय तेजस्वी होती. तिची मूठ रत्नानी जडविली होती व त्यामुळे ती चमकत असे. 'लोहवाहिनी' हे तिचे नाव होते व ती सुरी जयश्रीच्या दर्पणाप्रमाणे होती ।। १६५ ॥ Page #375 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६४) महापुराण (३७-१६६ कणवोऽस्य मनोवेगो जयश्री प्रणयावहः । द्विषत्कुल कुलक्ष्मान दलने योऽशनीयितः॥ १६६ सोनन्दकाख्यमस्याभूदस्तिरत्नं स्फुरद्युति । यस्मिन् करतलारूढे दोलारूपमिवाखिलम् ॥ १६७ प्राहुर्भूतमुखं खेटं विभोर्भूत मुखमङकितम् । स्फुरता श्रीमुखे येन द्विषां मृत्यमुखायितम् ॥ १६८ चक्ररत्नमभूज्जिष्णोदिक्चक्राक्रमणक्षमम् । नाम्ना सुदर्शनं दीप्रं यदुर्दशमरातिभिः ॥ १६९ प्रचण्डचण्डवेगाख्यो दण्डोऽभूच्चक्रिणः पृथः । स यस्य विनियोगोऽभडितकण्टकशोषने ॥ १७० नाम्ना वजमयं दिव्यं चर्मरत्नमभूद्विभोः । तद्वलं यद्बलाघानानिस्तीर्ण जलविप्लवात् ॥ १७१ मणिश्चूडामणि म चिन्तारत्नमनुत्तरम् । जगच्चूडामणेरस्य चित्तं येनानुरञ्जितम् ॥ १७२ सा चिन्ताजननीत्यस्य काकिणी भास्वराभवत् । या रूप्याद्रिगुहाध्वान्तविनिर्भेदैकदीपिका ॥ चमूपतिरयोध्याख्यो नृरत्नमभवत्प्रभोः । समरेऽरिजयाद्यस्य रोदसी व्यानशे यशः ॥ १७४ या चक्रीचे कणव अस्त्र होते. त्याचे मनोवेग हे नाव होते. जयलक्ष्मीची प्रीति संपादन करण्यास ते समर्थ होते. शत्रूचे वंशरूपी कुलपर्वताना फोडण्याच्या कामी ते वज्रासारखे होते ॥ १६६ ॥ या राजाचे सौनन्दक नावाचे खड्गरत्न होते. त्याची कान्ति फार चमकत असे. ते चक्रीने हातात घेतल्याबरोबर सर्व शत्रु आता काय प्रसंग गुदरेल याची काळजी करीत असत ।। १६७ ॥ या भरतेश्वराची भूतमुख नावाची ढाल होती. तिच्यावर भुताच्या मुखाची आकृति काढलेली होती. रणाच्या अग्रभागी चमकणाऱ्या या ढालीने शत्रूना मृत्युमुखाप्रमाणे भय उत्पन्न केले होते ॥ १६८ ॥ सगळ्या दिग्मण्डलावर आक्रमण करण्यास समर्थ असलेले, शत्रु ज्याला पाहण्यास असमर्थ होते असे तेजस्वी सुदर्शन चक्र या विजयी राजाचे होते ॥ १६९ ॥ या चक्रीचे चण्डवेग नावाचे प्रचंड व मोठे दंडरत्न होते व याचा उपयोग विजया 'पर्वताच्या गुहेतील काटे नष्ट करण्यासाठी झाला होता ॥ १७० ।। या प्रभूचे 'वज्रमय' या नावाचे दिव्य चर्मरत्न होते. याच्या सामर्थ्यामुळे या चक्रीचे सैन्य जलप्रलयातून तरून गेले होते ॥ १७१ ।। जगाला चूडामणिप्रमाणे शोभविणाऱ्या या भरतेश्वराचे चित्त ज्याने आपल्या ठिकाणी अनुरक्त केले होते असे इच्छित फल देणारे अत्युत्कृष्ट चूडामणि नावाचे रत्न होते ॥ १७२ ॥ चिंताजननी नावाचे काकिणी रत्न या भरतेश्वराला प्राप्त झाले होते. हे रत्नरूप्य पर्वताच्या गुहेतील अंधार नाहीसा करणारी जणु मुख्य अद्वितीय दिवटी होते ॥ १७३ ॥ या प्रभूचे 'अयोध्य' या नावाचे पुरुष-श्रेष्ठरत्न होते. युद्धात सर्व शत्रूना जिंकल्यामुळे याचे यश आकाश व पृथ्वी या दोहोमध्ये व्यापलेले होते ।। १७४ ।। Page #376 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-१८३) महापुराण ( ३६५ बुद्धिसागरनामास्य पुरोधाः पुरुधीरभूत् । धर्म्या क्रिया यदायत्ता प्रतीकारोऽपि दैविके ।। १७५ सुधीगृहपतिर्नाम्ना कामवृष्टिरभीष्टदः । व्ययोपव्ययचिन्तायां नियुक्तो यो निधीशिना ।। १७६ रत्नं स्थपतिरप्यस्य वास्तुविद्यापदात्तधीः । नाम्नाभद्रमुखोऽनेकप्रासादघटने पटुः ॥ १७७ शैलादग्रो महानस्य यागहस्ती क्षरम्मदः । भद्रो गिरिचरः शुभ्रो नाम्ना विजयपर्वतः ।। १७८ पवनस्य जयन्वेगं हयोऽस्य पवनञ्जयः । विजयार्द्धगृहोत्सङ्गे हेलया यो व्यलङ्घयत् ॥ १७९ प्रागुक्तवर्णनं चास्य स्त्रीरत्नं रूढनामकम् । स्वभावमधुरं हृद्यं रसायनमिवापरम् ॥ १८० रत्नान्येतानि दिव्यानि बभूवुश्चक्रवर्तिनः । देवताकृतरक्षाणि यान्यलङध्यानि विद्विषाम् ॥ १८१ आनन्दिन्योऽन्धिनिर्घोषा भेर्योऽस्य द्वावशाभवन् । द्विषड्योजनमापूर्य स्वध्वनेर्याः प्रदध्वनु ॥ १८२ आस विजयघोषाख्या पटहा द्वादशापरे । गृहकेकिभिरुग्रीवैः सानन्दं श्रुतनिःस्वनः ॥ १८३ या राजाचा बुद्धिसागर नावाचा पुरोहित उपाध्याय होता. तो फार बुद्धिमान होता. सर्व धार्मिक क्रिया करण्याचे कार्य त्याच्या हातात होते आणि दैविक उपद्रवांचा नाश करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते ।। १७५ ।। शुभ बुद्धीचा कामवृष्टि नावाचा या राजाचा इच्छित वस्तु देणारा शहाणा गृहपति श्रेष्ठी होता. भरतेश्वराने त्याला खर्च व जमा याचा विचार करण्याच्या कामी नेमले होते ॥ १७६ ॥ या राजाचा घरे, प्रासाद वगैरेच्या विद्येत ज्याची बुद्धि तरबेज आहे व अनेक प्रासाद निर्माण करण्यात चतुर असा भद्रमुख नावाचा कुशल सुतार स्थापित रत्न होते ।। १७७ ।। या भरतेश्वराचा पर्वताप्रमाणे उंच, ज्याच्या गंडस्थलादिकातून मद गळत आहे असा मोठा शुभ्र भद्र जातीचा पर्वतावर चढून जाणारा विजयपर्वत नावाचा पट्टहस्ती होता ।। १७८ ॥ या प्रभूचा वाऱ्याच्या वेगाला जिंकणारा पवनंजय नावाचा घोडा होता. तो विजया पर्वताच्या गुहेच्या जवळ असलेल्या टेकड्या सहज उल्लंघित असे ॥। १७९ ।। या चक्रवर्तीचे जे स्त्री रत्न आहे त्याचे वर्णन पूर्वी केले आहे. त्याचे नाव प्रसिद्ध आहे. ते स्त्रीरत्न स्वभावाने मधुर व रमणीय आहे आणि रसायनाप्रमाणे आनंद देणारे आहे ॥ १८० ॥ ही चक्रवर्तीची दिव्य रत्ने होती. देवता यांचे रक्षण करतात आणि शत्रूकडून कोणत्याही प्रकारे यांचा पराभव, अपमान, हरण केले जाणे होत नसे ।। १८१ ॥ या राजेश्वराच्या आनंदिनी नावाचा बारा भेरी नौबदी होत्या. त्यांचा आवाज समुद्राच्या गर्जनेप्रमाणे होता व त्या आपल्या आवाजानी बारा योजनपर्यंत प्रदेश व्याप्त करीत असत ।। १८२ ॥ या सम्राटाचे विजयघोष नावाचे बारा नगारे होते. त्यांचा आवाज ऐकून घरात पाळलेले मोर आनंदाने आपल्या माना उंच करीत असत ॥ १८३ ॥ Page #377 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-१८४) महापुराण गम्भीरावर्तनामानः शङखा गम्भीरनिःस्वनाः । चतुर्विशतिरस्यासन्शुभाः पुण्याब्धिसम्भवाः ॥ १८४ कटकारत्न निर्माणा विभोर्वीराङगदाह्वयाः। रेजुः प्रकोष्ठमावेष्ट्य तडिद्वलयविभ्रनाः ॥ १८५ पताकाकोटयोऽस्याष्टचत्वारिंशत्प्रमा मताः। मरुत्प्रेखोलितोत्प्रेडखदंशुकोन्मृष्टखाङगणाः॥१८६ महाकल्याणकं नाम दिव्याशनमभूद्विभोः। कल्याणाङगस्य येनास्य तुप्तिपुष्टीबलान्विते ॥ १८७ भक्षाश्चामृतगर्भाख्या रुच्यास्वादाः सुगन्धयः । नान्ये जरयितुं शक्ता यान्गरिष्ठरसोत्कटान् ॥१८८ स्वाद्यं चा मृतकल्पाख्यं हृद्यास्वादं सुसंस्कृतम् । रसायनरसं दिव्यं पानकं चामृताह्वयम् ॥ १८९ पुण्यकल्पतरोरासन्फलान्येतानि चक्रिणः । यान्यनन्योपभोग्यानि भोगाङगान्यतुलानि वै ॥ १९० पुण्याविना कुतस्तादृग्रूपसम्पदनीदृशी । पुण्याद्विना कुतस्तादृगभेद्यं गात्रबन्धनम् ॥ १९१ पुण्याविना कुतस्तादृडनिधिरत्नद्धिरूजिता । पुण्याद्विना कुतस्तादृगिभाश्वादिपरिच्छदः ॥ १९२ ___ ज्यांचा आवाज गंभीर आहे अर्थात् मोठा आहे, जे शुभ आहेत व पुण्यरूपी समुद्रापासून जे उत्पन्न झाले आहेत असे गंभीरावर्त नावाचे चोवीसशे शंख या सम्राटाचे होते ॥ १८४ ।।" __ या प्रभूची रत्नानी बनविलेली वीरांगद नावाची कडी होती. ती त्याच्या मनगटाला घेरून शोभत होती व विजेच्या वलयाप्रमाणे चमकत असत. त्यामुळे फार सुंदर दिसत होती ॥१८५ या नृपेश्वराच्या ४८ पताका होत्या व वाऱ्याच्या वाहण्याने त्यांचे कपडे हलत असत व त्यांनी आकाशांगणाला जण स्वच्छ केले आहे अशा शोभत असत ॥ १८६ ।। या प्रभु भरताचे महाकल्याणक नावाचे दिव्य भोजन होते. त्यामुळे आरोग्ययुक्त शरीर ज्याचे आहे अशा याला सामर्थ्ययुक्त तुष्टि आणि पुष्टि प्राप्त झाली होती ।। १८७ ।। याचे अमृतगर्भ नावाचे मोदक आदिक भक्ष्य पदार्थ होते. ते रुचकर, आस्वाद घेण्यास योग्य आणि सुगन्धित होते. ते अतिशय रसाने भरलेले होते. त्या भक्ष्य पदार्थाना अन्य माणसे 'पचवू शकत नसत ।। १८८॥ ज्यांचा स्वाद मनाला प्रिय वाटतो व मसाला वगैरे घालून जे संस्कारयुक्त केले आहेत, असे अमृतकल्प नांवाचे या राजेश्वराचे फलादिक पदार्थ होते. ज्याचा रस रसायनासारखा सुखदायक आहे असे अमृत नांवाचे दिव्य पेय हा राजा नेहमी सेवित असे ॥ १८९ ॥ जे इतरांना भोगावयास मिळत नाहीत असे अनुपम भोग पदार्थ या चक्रवर्ती राजाच्या 'पुण्यरूपी कल्पवृक्षाची फळे होती ।। १९० ।। जिच्यासारखी रूपसंपत्ति जगात कोठेही मिळणार नाही अशी रूपसंपत्ति भरताला पुण्याने प्राप्त झाली होती ती इतरांना पुण्यावाचून कशी प्राप्त होईल ? याची अभेद्य शरीर रचना होती. ती याला पुण्याने प्राप्त झाली होती. याच्यासारखे पुण्य इतराचे नसल्यामुळे ती इतराना कशी प्राप्त होणार ? पुण्यावाचून याच्यासारखो निधिरत्नांची उत्कृष्ठ ऋद्धि इतराना कशी प्राप्त होणार? व याच्यासारखा हत्ती, घोडे आदि क परिवार इतराना पुण्यावाचून कसा प्राप्त होणार? ॥ १९१-१९२ ।। Page #378 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-२००) महापुराण (३६७ पुण्याविना कुतस्तादृगन्तः पुरमहोदयः । पुण्याविना कुतस्तादृग्दशाङगो भोगसम्भवः ॥ १९३ पुण्याविना कुतस्तादृगाज्ञा द्वीपाब्धि लङघिनी । पुण्याविना कुतस्तादृग्जयश्रीजित्वरी दिशाम् ॥ पुण्याविना कुतस्तादृक्प्रतापः प्रणनामरः । पुण्याद्विना कुतस्तादगृद्योग लङघितार्णबः ॥ १९५ पुण्याद्विना कुतस्तादृप्राभवं त्रिजगज्जयि । पुण्याद्विना कुतस्तादृग्नगराजजयोत्सवः ॥ १९६ पुण्याद्विना कुतस्तादृक्सत्कारस्तत्कृतोऽधिकः । पुण्याविना कुतस्तादृक् सरिद्देव्यभिषेचनम् ॥ १९७ पुण्याविना कुतस्तादकखचराचल निर्जयः । पुण्याद्विना कुतस्तादृररत्नलाभोऽन्यदुर्लभः ॥ १९८ पुण्याविना कुतस्तादृगायतिर्भरतेऽखिले । पुण्याविना कुतस्तादृक्कोतिर्दिक्तटलङधिनी ॥ १९९ ततः पुण्योदयोद्भूतां मत्वा चक्रभृतः श्रियम् । चिनुध्वं भो बुधाः पुण्यं यत्पुण्यं सुख सम्पदाम् ॥२०० पुण्यावाचून या भरतासारखे अन्तःपुराचे राण्या वगैरे वैभव इतराना कसे बरे प्राप्त होणार? पुण्यावाचून या भरत राजाप्रमाणे दहा प्रकारचे भोग इतरांना कसे बरेप्राप्त होतील? अनेक द्वीप व समद्र याना उल्लंघून पलीकडे जाणारी अशी भरतेश्वरासारखी आज्ञा देण्याची शक्ति इतराना पुण्यावाचून कशी बरे प्राप्त होईल? व सर्व दिशाना जिंकणारी अशी भरतेश्वरासारखी जयलक्ष्मी इतराना कशी बरे प्राप्त होईल? पुण्यावाचून सर्व देवाना नम्र बनविणारा असा भरतासारखा प्रताप इतरांना कसा बरे प्राप्त होईल ? आणि पुण्यावाचून ज्याने समुद्राचे उल्लंघन केले असा भरतासारखा उद्योग इतरांना कसा बरे प्राप्त पुण्यावाचून त्रैलोक्याला जिंकणारा असा प्रभुपणा कसा बरे प्राप्त होईल? आणि पुण्यावाचून हिमवान पर्वताला जिंकण्याचा उत्सव कसा बरे प्राप्त होईल ? ॥ १९३-१९६ ॥ ईल ? - जर या प्रभूच्या ठिकाणी पुण्योदय नसता तर हिमवान देवाने जो अधिक सत्कार केला तो केला गेला असता काय ? जर पुण्य नसते तर गंगा आणि सिंधु या देवीनी या भरत प्रभूचा अभिषेक केला असता काय ? ॥ १९७।। पुण्याच्या अभावी जो अपूर्व विजया पर्वतावर चक्रवर्तीला विजय मिळविता आला तो मिळाला असता काय ? जर या भरतेश्वराच्या ठायीं पुण्योदय नसताना अन्यजन दुर्लभ अशा चौदा रत्नांचा लाभ त्याला कोठून झाला असता? ।। १९८ ।। जर पुण्योदय नसता तर या सगळ्या भरत क्षेत्रात भरतेश्वराचा जो उत्कर्ष झाला तो घडून आला नसता आणि पुण्याच्या अभावी जी दिगंताला कीर्ति उल्लंघून गेली ती त्याला उल्लंघून गेली नसती ।। १९९ ।। यास्तव भरतेश्वराला जी चक्रवर्तीची लक्ष्मी प्राप्त झाली ती पुण्याच्या उदयामुळे त्याला प्राप्त झाली असे समजून हे विद्वज्जनहो तुम्ही पुण्याचा संग्रह करा. कारण ते आपणास प्राप्त करून घेण्याच्या सुखसंपत्तीचे ते मूल्य आहे. ती पुण्यरूपी किमत दिल्याशिवाय तुम्हाला सुखसंपत्ती प्राप्त व्हावयाची नाही ॥ २०० ।। Page #379 -------------------------------------------------------------------------- ________________ ३६८) महापुराण ( शार्दूलवि ) इत्याविष्कृत सम्पदो विजयिनस्तस्याखिलक्ष्माभृताम् । स्फीतामप्रतिशासनां प्रथयतः षट्खण्ड राज्यश्रियम् ॥ कालोऽनल्पतरोऽप्यगात्क्षण इव प्राक् पुण्यकर्मोदयात् । उद्भूतैः प्रमदावहैः षॠतुजैर्भोगैरतिस्वादुभिः ॥ २०१ नानारत्ननिधानदेशविलसत्सम्पत्ति गुर्वीमिमाम् । साम्राज्यश्रियमेकभोगनियतां कृत्वाखिलां पालयन् ॥ योsभूव किलाकुल: कुलवधूमेकामिवाङक स्थिताम् । सोऽयं चक्रधरोऽभुनक् भुवममूमेकातपत्रां चिरम् ॥ २०२ यन्नाम्ना भरतावनित्वमगमत् षट्खण्डभूषा मही । येनासेतुहिमाद्रिरक्षितमिदं क्षेत्रं कृतारिक्षयम् ॥ यस्याविनिधि रत्नसम्पदुचिता लक्ष्मीरुरःशायिनी । स श्रीमान्भरतेश्वरो निषिभुजामग्रेस रोऽभूत्प्रभुः ॥ २०३ याप्रमाणे ज्याने आपले वैभव प्रकट केले आहे व ज्याने सर्व समूहावर विजय मिळविला आहे व सर्वत्र पसरलेल्या षट्खण्ड राज्यलक्ष्मीवर इतरांचा ताबा नसून स्वतःचा पूर्ण ताबा ज्याने ठेविला आहे अशा या भरत चक्रवर्तीचा फार मोठा काळ देखिल पूर्वजन्मी संचित केलेल्या पुण्यकर्माच्या उदयामुळे उत्पन्न झालेल्या, अतिशय आनंद देणाऱ्या, अतिशय मधुर असलेल्या सहाही ऋतूपासून उत्पन्न झालेल्या अनेक प्रकारच्या भोगपदार्थांच्या उपभोगानी एक क्षणाप्रमाणे गेला ॥ २०१ ॥ ( ३७-२०१ अनेक रत्ने व निधी आणि देशानी शोभणाऱ्या सम्पत्तीनी जिला गौरव प्राप्त झाला आहे, जिला महत्त्व प्राप्त झाले आहे, अशा या सम्पूर्ण राज्यलक्ष्मीला भरतेश्वराने आपणा एकट्यासच भोगता येईल अशी केली व आपल्या मांडीवर बसलेल्या कुलवधूप्रमाणे तिला करून पूर्ण अशा तिचे त्याने पालन केले व तिचे पालन करीत असता तो तिळमात्रही व्याकुळ खिन्न झाली नाही. अशा भरतेश्वराने दीर्घ काळपर्यन्त जिच्यावर एकच छत्र अशा या षट्खण्ड पृथ्वीचा दीर्घ काळपर्यन्त उपभोग घेतला व रक्षण केले ॥ २०२ ॥ ही षट्खण्डानी शोभणारी पृथ्वी ज्याच्या नांवाने भरतभूमीपणास प्राप्त झाली ( अर्थात् ज्याच्या नावामुळे या भूमीला भरतभूमि असे म्हणतात ) व ज्याने सेतु - दक्षिण समुद्रापासून हिमवान् पर्वतापर्यन्त सर्व शत्रूचा क्षय करून या क्षेत्राचे रक्षण केले; प्रकट झालेली रत्ने व निधि यांच्या सम्पदेने शोभणारी लक्ष्मी ज्याच्या वक्षःस्थलावर सर्वदा राहात आहे असा तो श्रीमान् भरतेश्वर सर्व निधिपतिमध्ये सर्व चक्रवर्तीमध्ये अग्रेसर - पहिला चक्रवर्ती झाला ॥२०३॥ Page #380 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७-२०५) महापुराण यः स्तुत्यो जगतां त्रयस्य न पुनः स्तोता स्वयं कस्यचित् । ध्येयो योगिजनस्य यश्च न तरां ध्याता स्वयं कस्यचित् ॥ यो नन्नपि नेतुमुन्नतिमलं नन्तव्य पक्षे स्थितः । स श्रीमाञ्जयताज्जगत्रय गुरुर्देवः पुरुः पावनः ॥ २०४ म. ४७ यं नत्वा पुनरानमन्ति न परं स्तुत्वा च यं नापरम् । भव्याः संस्तुवने श्रयन्ति न परं यं संश्रितः श्रेयसे । यं सत्कृत्य कृतादरं कृतधियः सत्कुर्वते नापरम् । स श्रीमान् वृषभो जिनो भवभयान्नस्त्रायतां तीर्थकृत् ॥ २०५ इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्य प्रणीते त्रिषष्टिलक्षण महापुराणसङग्रहे भरतेश्वराभ्युदयवर्णनं नाम सप्तत्रिंशं पर्व ॥ ३७ ॥ तीनही जगतातील लोकाकडून जे स्तुति करण्यास योग्य आहेत परन्तु जे स्वतः कोणाची स्तुति करीत नाहीत, योगि जन ज्याचे ध्यान करतात पण जे कोणाचे बिलकुल ध्यान करीत नाहीत; जे नमस्करणाऱ्यांना उन्नत स्थानावर नेण्यास समर्थ आहेत व जे स्वतः इतरांनी नमस्कार करण्यायोग्य पक्षात आहेत; जे अनन्त ज्ञानादि चतुष्टय लक्ष्मीने युक्त आहेत, त्रैलोक्याचे गुरू आहेत व पवित्र आहेत असे आदि जिनदेव सर्वोत्कर्षाप्रत पावत ॥ २०४ ॥ भव्य जीव ज्याना नमस्कार करून पुन: दुसऱ्या कोणाला नमस्कार करीत नाहीत, याचप्रमाणे ज्याची स्तुति केल्यावर इतर कोणाची स्तुति करीत नाहीत व आपल्या कल्याणाकरिता ज्याचा आश्रय केल्यावर इतर कोणाचा आश्रय करीत नाहीत तसेच बुद्धिमान् भव्य जीव ज्याची पूजा करून आदर केल्यावर इतरांचा आदर करीत नाहीत. ते श्रीमान् वृषभ जिन तीर्थकर संसार भयापासून आमचे रक्षण करोत ॥ २०५ ॥ ( ३६९ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्य प्रणीत आर्ष त्रिषष्टि लक्षण महापुराण संग्रहाच्या मराठी अनुवादामध्ये भरतेश्वराच्या अभ्युदयाचे वर्णन करणारे सदतीसावें पर्व समाप्त झाले ।। ३७ ।। Page #381 -------------------------------------------------------------------------- ________________ अष्टत्रिंशत्तमं पर्व | जयन्त्वखिलवाङमार्गगामिन्यः सूक्तयोऽर्हताम् । धूतान्धतमसादीप्रा यास्त्विषोंऽशुमतामिव ॥ १ स जीयाहृपभो मोहविषसुप्तमिदं जगत् । पटविद्येव यद्विद्या सद्यः समुदतिष्ठपत् ॥ २ तं त्वा परमं ज्योतिर्वृषभं वीरमन्वतः । द्विजन्मनामथोत्पत्ति वक्ष्ये श्रेणिक भोः शृणु ॥ ३ भरतो भारतं वर्षं निजित्य सह पार्थिवैः । षष्ट्या वर्षसहस्रंस्तु दिशां निववृते जयात् ॥ ४ कृतकृत्यस्य तस्यान्तश्चिन्तेयमुदपद्यत । परार्थे सम्पदास्माकी सोपयोगा कथं भवेत् ॥ ५ महामहमहं कृत्वा जिनेन्द्रस्य महोदयम् । प्रीणयामि जगद्विश्वं विष्वग्विश्राणयन्धनम् ॥ ६ नानगारा वसून्यस्मत्प्रतिगृह्णन्ति निःस्पृहाः । सागारः कतमः पूज्यो धनधान्य समृद्धिभिः ॥ ७ अणुव्रतधरा घोरा धौरया गृहमेधिनाम् । तर्पणीया हितेऽस्माभिरीप्सितैर्वसुवाहनः ॥ ८ जिनेश्वरांची आत्म्याचे हित करणारी वचने सर्व भाषामध्ये परिणत होतात. आणि सूर्याच्या किरणाप्रमाणे ती तेजस्वी असल्यामुळे गाढ अज्ञानरूपी अन्धकाराचा नाश करितात अशी ती जिन वचने नेहमी जयवन्त होवोत ॥ १ ॥ गारुड्याची विद्या जशी विषाने मूच्छित झालेल्या जगाला प्राण्याला उठविते विषरहित करते तसे ज्यांच्या विद्येने केवलज्ञानाने मोहरूपी विषाने सुप्त झालेल्या आपले स्वरूप विसरलेल्या जगाला तत्काल उठविले मोहरहित करून त्याला आपल्या स्वरूपाची जाणीव करून दिली ते वृषभ जिनेश्वर सर्वोत्कर्ष युक्त होवोत ॥ २ ॥ अशा त्या उत्कृष्ट ज्योतिस्वरूप - उत्कृष्ट केवलज्ञान स्वरूपी वृषभ जिनाला आधी मी नमन करून नंतर महावीर भगवन्ताना नमन करितो यानन्तर मी गौतमगणधर द्विजांची ब्राह्मण वर्गाच्या उत्पत्तिचे वर्णन करितो हे श्रेणिकराजा तूं ऐक || ३ || भरताने अनेक राजाना बरोबर घेऊन भरतवर्षाला जिंकून साठ हजार वर्षेपर्यंन्त सर्व दिशांना जिंकण्याचे कार्य पूर्ण केले यानन्तर तो आपल्या राजधानीकडे आला ॥ ४ ॥ षट्खण्ड जिंकून कृतकृत्य झालेल्या भरताच्या मनात 'आम्ही मिळविलेली ही सम्पत्ति उत्कृष्ट अशा कार्यात कशी उपयोगी पडेल' अशी चिन्ता उत्पन्न झाली ॥ ५ ॥ मी मोठ्या ऐश्वर्याने जिनेश्वराची मोठी पूजा करून व सर्वांना धन देऊन सर्व जगाला सन्तुष्ट करीन ॥ ६॥ परन्तु जे अनगार - सर्व परिग्रहत्यागी मुनि आहेत ते निःस्पृह असल्यामुळे आमच्यापासून धन घेत नाहीत, मग धन, धान्याच्या समृद्धीने कोणता गृहस्थ पूजण्याला योग्य आहे ? ॥ ७ ॥ अहिंसा, सत्य, अचौर्य, परस्त्रीत्याग व परिग्रह प्रमाण अशी ज्यानी पाच अणुव्रते धारण केली आहेत, जे धैर्यशाली व गृहस्थामध्ये मुख्य आहेत त्यांना आम्ही इच्छित द्रव्य आणि वाहनादिक देऊन संतुष्ट करणे योग्य आहे ॥ ८ ॥ Page #382 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-१७) महापुराण (३७१ इति निश्चित्य राजेन्द्रः सत्कर्तुमुचितानिमान् । परीचिक्षिषुराह्वास्त तदा सर्वान्महीभुजः ॥९ सदाचारैनिजैरिष्टैरनुजीविभिरन्विताः । अद्यास्मदुत्सवे यूयमायातेति पृथक् पृथक् ॥ १० हरितैरङकुरैः पुष्पैः फलैश्चाकीर्णमङ्गणम् । सम्राडचीकरतेषां परीक्षायैस्ववेश्मनि ॥ ११ तेष्वव्रता विना सङ्गात्प्राविक्षन्नृपमन्दिरम् । नानेकतः समुत्सार्य शेषानाह्वाययत्प्रभुः ॥ १२ ते तु स्ववतसिद्धयर्थ महिमाना महान्वयाः । नैषुः प्रवेशनं तावद्यावदाङकुराः पथि ॥ १३ सधान्यहरितैः कोर्णमनाक्रम्य नपाङ्गणम् । निश्चक्रमुः कृपालुत्वात्केचित्सावद्यभीरवः ॥ १४ कृतानुबन्धनाभूयश्चक्रिणः किलतेऽन्तिकम् । प्रासुकेन पथान्येन भेजुः क्रान्त्वा नपाङ्गणम् ॥ १५ प्राककेन हेतुना यूयं नायाताः पुनरागताः। केन ब्रूतेति पृष्टास्ते प्रत्यभाषन्त चक्रिणम् ॥ १६ प्रवालपत्रपुष्पादेः पर्वणि व्यपरोपणम् । न कल्पतेऽद्य तज्जानां जन्तूनां नोऽनभिद्रुहाम् ॥ १७ याप्रमाणे निश्चय करून सत्कार करण्यास योग्य असलेल्या यांची परीक्षा करावी अशी इच्छा मनात धरून भरत राजेन्द्राने सर्व राजांना बोलाविले ।। ९॥ हे नृपानो आपण आपल्या सदाचारी इष्ट नोकरवर्गासह आज आमच्या उत्सवात वेगळेवेगळे या असे आमंत्रण भरतेश्वराने पाठविले ॥ १० ॥ सम्राट भरताने त्यांची परीक्षा घेण्यासाठी हिरवे अंकुर, फुले, हिरवी-कच्ची फळे यांनी आपल्या घरातले अंगण भरून टाकले. अंगणात हिरवे अंकुरादिक पसरले ।। ११ ॥ आमंत्रिलेल्या लोकापैकी जे अणुव्रत धारक नव्हते-अव्रती होते त्यांनी विचार न करता राजमंदिरात प्रवेश केला. तेव्हा त्याना एका बाजूला करून सम्राटाने बाकीच्या लोकाना बोलाविले ॥ १२॥ ते महाकुलीन लोक आपल्या व्रताच्या सिद्धिसाठी प्रयत्नपूर्वक प्रवृत्ति करीत होते म्हणून जेवढ्या मार्गात ओले अङकुरादिक होते तेथे त्यानी प्रवेश करण्याची इच्छा केली नाही ॥ १३ ॥ हिरव्या धान्याङकुरांनी व्याप्त झालेल्या राजाङगणाला न ओलांडता दयाळू व पापापासून भय पावणारे काही व्रती लोक परत गेले ।। १४ ।। परंतु चक्रवर्तीने त्याना येण्याचा पुनः आग्रह केला ते अन्य प्रासुक मार्गाने राजांगण ओलांडून राजाजवळ आले ॥ १५ ॥ पूर्वी कोणत्या हेतूने आपण आला नाहीत व पुनः कोणत्या हेतूने आपण आता आलेले आहात हे मला सांगा असे चक्रीने त्यांना विचारले तेव्हा ते त्याला याप्रमाणे बोलले ॥ १६ ॥ कोवळे अंकुर, पाने, फुलें इत्यादिकांचा आज पर्वकाली विधात करणे-तुडवणे वगैरे योग्य नाही व त्यात जन्मलेले कृमिकीटादिक ज्यांचा आमच्याशी द्रोह-द्वेष नाही त्यांचा आज पर्वकाली नाश करणे योग्य नाही ॥ १७ ॥ Page #383 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७२) महापुराण (३८-१८ सन्त्येवानन्तशो जीवा हरितेष्वङकुरादिषु । निगोता इति सार्वज्ञं देवास्माभिः श्रुतं वचः ॥ १८ तस्मानास्माभिराक्रान्तमद्यत्वे त्वद्गृहाङ्गणम् । कृतोपहारमाद्रिः फलपुष्पाङकुरादिभिः ॥ १९ इति तद्वचनात्सर्वान् सोऽभिनन्द्य दृढव्रतान् । पूजयामास लक्ष्मीवान्दानमानादिसत्कृतः ॥ २० तेषां कृतानि चिह्वानि सूत्रैः पद्माह्वयानिधेः । उपात्तैब्रम्हासूत्रारेकाोकादशान्तकैः ॥ २१ गुणभूमिकृताद्धदात्कृसृप्तयज्ञोपवीतिनाम् । सत्कारः क्रियते स्मैषामवताञ्च बहिःकृताः ॥ २२ अथ ते कृतसन्मानाश्चक्रिणा व्रतधारणे । भजन्ति स्म परं दाढयं लोकश्चनानपूजयत् ॥ २३ इज्यांवाता च दत्ति च स्वाध्यायं संयमं तपः । श्रुतोपासकसूत्रत्वात्स तेभ्यः समुपादिशत् ॥ २४ कुलधर्मोऽयमित्येषामहत्पूजादि वर्णनम् । तदा भरतराजर्षिरन्ववोचदनुक्रमात् ॥ २५ प्रोक्ता पूजार्हतां नित्या सा चतुर्धा सदार्चनम् । चतुर्मुखमहः कल्पद्रुमश्चाष्टाह्निकोऽपि च ॥ २६ याचप्रमाणे हे प्रभो हिरव्या कोवळ्या अंकुरादिकांत अनंत जीव असतातच व त्यांना * निगोद' म्हणतात असे सर्वज्ञाचे भाषण आम्ही ऐकले आहे ।। १८ ।। ज्यात अतिशय ओल्या अशा फळानी, फुलानी व अंकुरादिकांनी शोभा आणली आहे असे आपल्या प्रासादाचे अंगण आज आम्ही ओलांडले नाही ॥ १९ ॥ याप्रमाणे त्यांचे भाषण ऐकून त्या सर्व दृढ व्रतिकांचे चक्रवर्तीने अभिनंदन केले व त्या लक्ष्मीवंताने दान, मान सत्कारानी पूजा केली ।। २० ।। त्यावेळी पद्मनामक निधीपासून जी घेतली आहेत, ज्याना ब्रह्मसूत्र हे नांव आहे व एकापासून अकरा संख्येपर्यंत असलेली ती सूत्रे (यज्ञोपवीत-व्रतसूत्रे) व्रतिकांचे चिह्न म्हणून ती त्या व्रतिकांना दिली ।। २१ ।। ___ दर्शन प्रतिमा, व्रतप्रतिमा इत्यादि प्रतिमा भेदाना अनुसरून त्या व्रतिकाना भरताने एक दोन तीन अशारीतीने अकरापर्यन्त यज्ञोपवीते दिली आणि त्यांचा सत्कार चक्रवर्तीने केला व जे व्रतरहित होते त्याना बाहेर केले. अर्थात् ते बाहेर गेले ।। २२ ।। यानंतर चक्रवर्तीने त्यांचा सन्मान केला तेव्हा व्रतधारणात अतिशय दृढ झाले व लोकही त्यांना पुजू लागले ॥ २३ ॥ भरतचक्रवर्तीने उपासक सूत्र चांगले ऐकले असल्यामुळे जिनपूजा, उदरनिर्वाह, दान देणे, स्वाध्याय करणे, संयम व तप याची माहिती त्यांना सांगितली ॥ २४ ॥ हा या श्रावकांचा कुलधर्म आहे असे म्हणून भरतराजर्षीने अनुक्रमाने त्याना त्या अर्हत्पूजादिकांचे वर्णन करावयाला सुरवात केली ।। २५ ॥ जी अर्हन्ताची नित्य पूजा आहे तिचे चार भेद आहेत- १ नित्यपूजा (सदार्चन ), २ चतुर्मुखमह, ३ कल्पद्रुम आणि आष्टाह्निक ।। २६ ।। Page #384 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-३५) महापुराण (३७३ तत्र नित्यमहो नाम शश्वज्जिनगृहं प्रति । स्वगहान्नीयमानार्चा गन्धपुष्पाक्षतादिका ॥ २७ चैत्यचैत्यालयादीनां भक्त्या निर्मापणं च यत् । शासनीकृत्य दानं च ग्रामादीनां सदार्चनम् ॥ २८ या च पूजा मुनीन्द्राणां नित्यदानानुषङगिणी । स च नित्यमहो ज्ञेयो यथाशक्त्युपबृंहितः ॥ २९ महामुकुटबद्धैश्च क्रियमाणो महामहः । चतुर्मुखः स विज्ञेयः सर्वतोभद्र इत्यपि ॥ ३० । दत्त्वा किमिच्छकं दानं सम्राभिर्यः प्रवर्त्यते । कल्पद्रुममहः सोऽयंजगदाशाप्रपूरणः ॥ ३१ आष्टाह्निको महः सार्वजनिको रूढएव सः । महानन्द्रध्वजोऽन्यस्तु सुरराजः कृतोमहः ॥ ३२ बलिस्नपनमित्यन्यस्त्रिसन्ध्यासेवया समम् । उक्तेष्वेव विकल्पेषु ज्ञेयमन्यच्च तादृशम् ॥ ३३ एवंविधविधानेन या महेज्या जिनेशिनाम् । विधिज्ञास्तमुशन्तीज्यावृत्ति प्राथमकल्पिकीम् ॥ ३४ वार्ता विशुद्धवृत्या स्यात्कृष्यादीनामनुष्ठितिः । चतुर्धा वर्णिता दत्तिर्दयापात्रसमान्वये ॥ ३५ __आपल्या घरातून गंध, फुले, अक्षत, दीप, धूपादिक हे पदार्थ दररोज जिनमंदिरात नेऊन त्यांनी जिनेश्वराची पूजा करणे त्या पूजेला नित्यमह पूजा म्हणतात. याचप्रमाणे जिनप्रतिमा, जिनमन्दिरादिक मोठ्या भक्तीने तयार करणे आणि सनदपत्र दानपत्र करून गाव, शेत, घर, दुकानाचे उत्पन्न देणे यासही नित्यपूजा म्हणतात. तसेच मुनीश्वरांना आहारदान देऊन जी पूजा केली जाते तिलाही नित्यपूजा म्हणतात. आपल्या शक्तीला अनुसरून या नित्यपूजेला वृद्धिंगत करावे ।। २७-२९ ॥ महामुकुटबद्ध राजाकडून जी मोठी पूजा केली जाते तिला चतुर्भूख पूजा किंवा सर्वतोभद्र पूजा म्हणतात ।। ३० ।। आपणास काय पाहिजे असे विचारून दान मागणाऱ्याच्या इच्छेला अनुसरून त्याला ती वस्तु देऊन चक्रवर्तीकडून जी पूजा केली जाते तिला कल्पद्रुम पूजा म्हणतात ही पूजा जगतातील जीवांची इच्छा पूर्ण करणारी असल्यामुळे हिला कल्पद्रुम पूजा म्हणणे योग्य आहे ॥ ३१ ॥ __ आष्टाह्निक पूजा ही सार्वजनिक पूजा म्हणून रूढ आहेच आणि सुरराजानी इन्द्रानी केलेला जो जिनाचा उत्सव-जिनपूजा तिला इन्द्रध्वज पूजा म्हणतात ॥ ३२ ॥ बलि-नैवेद्य अर्पण करणे, जिनाभिषेक करणे, गीत नृत्यादिक करणे हे सर्व त्रिकाली जिन पूजा करणे व यासारखे इतर प्रकार जिनेश्वराची पालखी व रथाची मिरवणूक हे सर्व प्रकार वरील त्या त्या पूजेच्या प्रकारात अन्तर्भूत आहेत असे समजावे ।। ३३ ॥ या प्रकारच्या विधीने जी जिनेश्वराची महापूजा केली जाते पूजाविधि जाणणारे विद्वान् इज्यानामक पहिला प्रकार म्हणतात ।। ३४ ।। निर्मल आचरण पूर्वक शेती आदिक उपजीविकेची कार्ये करणे यास वार्ता म्हणतात ब दयादत्ति, पात्रदत्ति, समदत्ति आणि अन्वयदत्ति अशी चार प्रकाराची दत्ति आहे ॥ ३५ ॥ Page #385 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७४ ) ( ३८-३६ सानुकम्पमनुग्राह्ये प्राणिवृन्देऽभयप्रदा । त्रिशुद्धयनुगता सेयं दयादत्तिर्मता बुधैः ॥ ३६ महातपोधनायार्चा प्रतिग्रहपुरः सरम् । प्रदानमशनादीनां पात्रदानं तदिष्यते ॥ ३७ समानायात्मनान्यस्मै क्रियामन्त्रव्रतादिभिः । निस्तारकोत्तमायेह भू हेमाद्यतिसर्जनम् ॥ ३८ समानदत्तिरेषा स्यात्पात्रे मध्यमतामिते । समानप्रतिपत्त्यैव प्रवृत्त्या श्रद्धा यान्विता ॥ ३९ आत्मान्वयप्रतिष्ठार्थं सूनवे यदशेषतः । समं समयवित्ताभ्यां स्ववर्गस्यातिसर्जनम् ॥ ४० सैषा सकलदत्तिः स्यात्स्वाध्यायः श्रुतभावना । तपोऽनशनवृत्त्यादिसंयमो व्रतधारणम् ॥ ४१ विशुद्धावृत्तिरेषैषां षट्तयीष्टा द्विजन्मनाम् । योऽतिक्रामेदिमां सोऽज्ञो नाम्नैव न गुणैद्विजः ॥ ४२ तपः श्रुतं च जातिश्च त्रयं ब्राह्मणकारणम् । तपःश्रुताभ्यां यो हीनो जातिब्राह्मण एव सः ॥ ४३ अपापोपहता वृत्तिः स्यादेषां जातिरुत्तमा । दत्तीज्याधीतिमुख्यत्वाद्व्रतशुद्धया सुसंस्कृता ॥ ४४ महापुराण अनुग्रह करण्यायोग्य प्राणिसमूहाचे मनवचनकायेच्या शुद्धीने भय दूर करणे त्याला शहाणे लोक दयादत्ति म्हणतात ।। ३६ । महान् तपस्वीची सत्कारपूर्वक पूजा करून त्यांना आहारादिक देणे ते पात्रदान होय ।। ३७ ।। क्रियाव्रते व मंत्र यानी आपल्यासारखा जो आहे व संसार समुद्रातून जो तारून नेतो अशा गृहस्थाला जमीन, सुवर्ण घर वगैरे देणे अथवा मध्यम पात्राला समान बुद्धीने श्रद्धापूर्वक जे दान देणे त्याला समानदत्ति म्हणतात ।। ३८-३९ ।। आपल्या वंशाची चिरकाल स्थिति राहावी म्हणून आपल्या पुत्राला आपला सद्धर्म आपण मिळविलेले धन यांच्यासह धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांचे जे देणे त्यास सकलदत्ति म्हणतात ॥ ४० ॥ शास्त्राची भावना - चिंतन मनन करणे त्याला स्वाध्याय म्हणतात व तप - उपवास करणे, रसत्याग करणे वगैरे तप होय व अहिंसादिव्रते धारण करणे तो संयम होय ।। ४१ ।। या द्विजांची वर सांगितलेली सहा प्रकारची विशुद्ध वृत्ति आहे. जो या वृत्तींचा त्याग करितो तो अज्ञ नावानेच द्विज आहे तो गुणानी द्विज नाहीं ॥ ४२ ॥ तप, श्रुत-शास्त्रज्ञान आणि जाति या तीन गोष्टी ब्राह्मणाचे कारण आहेत. पण जो तव श्रुत यांनी रहित आहे तो केवळ जातीने ब्राह्मण आहे असे समजावे ॥ ४३ ॥ या लोकांची वृत्ति पापरहित आहे म्हणून यांची जाति उत्तम आहे आणि दान देणें, पूजा करणे, शास्त्राध्ययन करणे ही यांची मुख्य वृत्ति आहे व ती व्रताच्या निर्मलपालनाने सुसंस्कृत झाली आहे ॥ ४४ ॥ Page #386 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-५४) महापुराण (३७५ मनुष्यजातिरेकैव जातिनामोदयोद्भवा । वृत्तिभेदाहिताद्भेदाच्चातुर्विध्यमिहाश्नुते ॥ ४५ ब्राह्मणा व्रतसंस्कारात्क्षत्रियाःशस्त्रधारणात् । वणिजोर्थार्जनान्न्यायाच्छुद्रा न्यग्वृत्तिसंश्रयात् ॥४६ तपःश्रुताभ्यामेवातो जातिसंस्कार इष्यते । असंस्कृतस्तु यस्ताभ्यां जातिमात्रेण स द्विजः ॥ ४७ द्विर्जातोहिद्विजन्मेष्टः क्रियातोगर्भतश्च यः । क्रियामन्त्रविहीनस्तु केवलं नामधारकः ॥४८ तदेषां जातिसंस्कारं द्रढयन्निति सोऽधिराट् । सम्प्रोवाच द्विजन्मभ्यः क्रियाभेदानशेषतः ॥ ४९ ताश्च क्रियास्त्रिधाम्नाताः श्रावकाध्यायसङग्रहे । सदृष्टिभिरनुष्ठेया महोदाः शुभावहाः॥५० गर्भान्वयक्रियाश्चैव तथा दीक्षान्वयक्रियाः। कन्वयक्रियाश्चेति तास्त्रिधैवं बुधर्मताः ॥ ५१ आधानाद्यास्त्रिपञ्चाशज्ज्ञया गर्भान्वयक्रियाः । चत्वारिशदथाष्टौ च स्मता दीक्षान्वयक्रियाः॥५२ कन्वयक्रियाश्चैव सप्त तज्जैः समुच्चिताः । तासां यथाक्रम नाम निर्देशोऽयमनद्यते ॥ ५३ अङ्गानां सप्तमादङ्गादुस्तरादर्णवादपि । श्लोकैरष्टाभिरुन्नेष्ये प्राप्त ज्ञानलवं मया ॥ ५४ मनुष्य जाति ही एकच आहे व ती जाति नामकर्माच्या उदयामुळे उत्पन्न झाली आहे. उपजीविकेच्या भेदामुळे तिच्यांत भेद उत्पन्न होऊन ती चार प्रकारची बनली आहे. व्रतसंस्कारामुळे ब्राह्मण, शस्त्र धारणामुळे क्षत्रिय, न्यायपूर्वक धनार्जनाने वैश्य आणि नीच वृत्तीचा आश्रय केल्याने शूद्र असे चार प्रकार झाले ॥ ४५-४६ ॥ तप करणे व शास्त्राभ्यास करणे हा ब्राह्मण जातीचा संस्कार आहे. पण तपश्चरण करणे व शास्त्राभ्यास यांचा संस्कार ज्याचा झाला नसेल त्याला जातीने फक्त ब्राह्मण म्हणावे. क्रिया व गर्भ या दोन कारणांनी जो जन्मला आहे तो द्विजन्मा-ब्राह्मण म्हटला जातो पण जो क्रिया आणि मन्त्र या दोन्हींनीही रहित आहे तो फक्त नामधारक द्विज आहे ।। ४७-४८ ॥ म्हणून यांचा जाति संस्कार दृढ करण्यासाठी या भरतेश्वराने या द्विजांसाठी संपूर्ण क्रिया भेद पुढे लिहिल्याप्रमाणे सांगितले आहेत ।। ४९ ॥ श्रावकाध्याय संग्रहांत त्या क्रिया तीन प्रकारच्या सांगितल्या आहेत. त्या सम्यग्दृष्टि श्रावकांनी अवश्य कराव्यात कारण त्यांच्यापासून उत्तम फल मिळते व कल्याण होतें ।। ५० ॥ गर्भान्वयक्रिया, दीक्षान्वयक्रिया आणि कन्वयक्रिया अशा तीन प्रकारच्या क्रिया आहेत असे विद्वानांनी सांगितले आहे ।। ५१ ।। गर्भान्वयक्रियेचे आधान, प्रीतिसुप्रीति आदिक त्रेपन्न भेद आहेत आणि दीक्षान्वय क्रियेचे अवतारादिक अठेचाळीस भेद आहेत आणि कन्वयक्रियेचे सज्जात्यादिक सात भेद आहेत. याप्रमाणे तज्ज्ञांनी या क्रियांचा संग्रह केला आहे. आता त्या क्रियांची नावे चक्रवर्ती सांगत आहे ॥ ५२-५३ ॥ जे समुद्रापेक्षाही तरून जाण्यास कठिण आहे असे जे बारा आचारादिक अंगापैकी सातवे उपासकाध्ययन नामक जे अंग आहे त्यातून जे मला थोडेसे ज्ञान प्राप्त झाले आहे ते मी आठ श्लोकानी आपणास सांगतो ॥ ५४ ॥ Page #387 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७६) महापुराण (३८-५५ आधानं प्रीतिसुप्रीती धृतिर्मोदः प्रियोद्भवः । नामकर्म बहिर्याननिषद्याः प्राशनं तथा ॥५५ व्यष्टिश्च केशवापश्च लिपिसङख्यानसङग्रहः । उपनीतिवतचर्या व्रतावतरणं तथा ॥ ५६ विवाहो वर्णलाभश्च कुलचर्या गृहीशिता । प्रशान्तिश्च गृहत्यागो दीक्षाद्यं जिनरूपता ॥५७ मौनाध्ययनवृत्तत्वं तीर्थकृत्त्वस्य भावना । गुरुस्थानाभ्युपगमो गणोपग्रहणं तथा ॥५८ स्वगरुस्थानसङक्रान्तिनिस्सनत्वात्मभावना। योगनिर्वाणसम्प्राप्तिोगनिर्वाणसाधनम ॥ ५९ इन्द्रोपपादाभिषेकौ विधिदानं सुखोदयः । इन्द्रत्यागावतारौ च हिरण्योत्कृष्टजन्मता ॥६० मन्दरेन्द्राभिषेकश्च गुरुपूजोपलम्भनम् । यौवराज्यं स्वराज्यं च चक्रलाभो दिशां जयः ॥ ६१ चक्राभिषेकसाम्राज्ये निष्क्रान्तिोगसन्नहः । आर्हन्त्यं तद्विहारश्चयोगत्यागोऽननिर्वृतिः ॥ ६२ त्रयः पञ्चाशदेता हि मता गर्भान्वयक्रियाः । गर्भाधानादिनिर्वाणपर्यन्ताः परमागमे ॥ ६३ अबतारो वृत्तलाभः स्थानलाभो गणग्रहः । पूजाराध्यपुण्ययज्ञौ दृढचर्योपयोगिता ॥ ६४ इत्युद्दिष्टाभिरष्टाभिरुपनीत्यादयः क्रियाः । चत्वारिंशत्प्रमायुक्तास्ताः स्युर्दोक्षान्वयक्रियाः ॥ ६५ तास्तु कन्वया ज्ञेया याः प्राप्याः पुण्यकर्तृभिः । फलरूपतया वृत्ताः सन्मार्गाराधनस्य वै ॥ ६६ सज्जातिः सद्गहित्व च पारिवाज्यं सुरेन्द्रता। साम्राज्यं परमार्हन्त्यं परं निर्वाणमित्यपि ॥ ६७ स्थानान्येतानि सप्त स्युः परमाणि जगत्रये । अर्हद्वागमृतस्वादात्प्रतिलभ्यानि देहिनाम् ॥ ६८ ....... गर्भान्वयक्रियेचे त्रेपन्न भेद याप्रमाणे आहेत. १ आधान, २ प्रीति, ३ सुप्रीति, ४ धृति, ५ मोद, ६ प्रियोद्भव, ७ नामकर्म, ८ बहिर्यान, ९ निषद्या, १० प्राशनं, ११ व्युष्टि, १२ केशवाप, १३ लिपिसङख्यानसङग्रह, १४ उपनीति, १५ वतचर्या, १६ व्रतावतरण, १७ विवाह १८ वर्णलाभ, १९ कुलचर्या, २० गृहीशिता, २१ प्रशान्ति, २२ गृहत्याग, २३ दीक्षाद्य, २४ जिनरूपता, २५ मौनाध्ययनवृत्तत्व, २६ तीर्थकृत्वभावना, २७ गुरुस्थानाभ्युपगम, २८ गणोपग्रहण, २९ स्वगुरुस्थानसङक्रान्ति, ३० निःसङ्गत्वात्मभावना, ३१ योगनिर्वाणसम्प्राप्ति, ३२ योगनिर्वाण साधन, ३३ इन्द्रोपपाद, ३४ अभिषेक, ३५ विधिदान, ३६ सुखोदय, ३७ इन्द्रत्याग, ३८ अवतार, ३९ हिरण्योत्कृष्टजन्मता, ४० मन्दरेन्द्राभिषेक, ४५ गुरु पूजोपलम्भन, ४२ यौवराज्य, ४३ स्वराज्य, ४४ चक्रलाभ, ४५ दिशाजय, ४६ चक्राभिषेक, ४७ साम्राज्य, ४८ निष्क्रान्ति, ४९ योगसन्नह, ५० आर्हन्त्य, ५१ तद्विहार, ५२ योगत्याग, ५३ अग्रनिर्वृत्तिः. या त्रेपन गर्भान्वयक्रियांचे क्रमाने पुढे वर्णन केले आहे ।। ५५-६२ ॥ परमागमांत गर्भाधानापासून निर्वाण-मोक्षप्राप्तिपर्यन्त त्रेपन गर्भान्वयक्रियांचे वर्णन केले आहे ।। ६३ ॥ __ अवतार, वृत्तलाभ, स्थानलाभ, गणग्रह, पूजाराध्य, पुण्ययज्ञ, दृढचर्या आणि उपयोगिता या वणिलेल्या आठ क्रिया बरोबर उपनीत्यादिक चाळीस क्रिया युक्त केल्या म्हणजे अठ्ठेचाळीस दीक्षान्वय क्रिया होतात ।। ६४-६५ ॥ ज्या पुण्य करणाऱ्या प्राण्याकडून प्राप्त केल्या जातात व मोक्षमार्गाची आराधना केल्यापासून ज्या फलस्वरूपी आहेत त्या पुढे वणिलेल्या सात क्रिया कर्ज़न्वय नावाच्या जाणाव्यात. १ सज्जाति- म्हणजे उच्च जातीत जन्म होणे, २ सद्गृहित्व- उत्तम गृहस्थपणा Page #388 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-७६) महापुराण (३७७ क्रियाकल्पोऽयमाम्नातो बहुभेदो महर्षिभिः । सङक्षेपतस्तु तल्लक्ष्म वक्ष्ये सञ्चक्ष्य विस्तरम् ॥६९ आधानं नाम गर्भादौ संस्कारो मन्त्रपूर्वकः । पत्नीमृतुमती स्नातां पुरस्कृत्याहदिज्यया ॥७० तत्रार्चनविधौ चक्रत्रयं छत्रत्रयान्वितम् । जिना मभितः स्थाप्य समं पुण्याग्निभिस्त्रिभिः ॥७१ त्रयोऽग्नयोऽर्हद्गणभृच्छेषकेवलिनिर्वृतौ । ये हुतास्ते प्रणेतव्याः सिद्धार्चावेधुपाश्रयाः ॥ ७२ तेष्वर्हदिज्याशेषांशैराहुतिर्मन्त्रपूर्विका । विधेया शुचिभिर्द्रव्यैः पुंस्पुत्रोत्पत्तिकाम्यया ॥ ७३ तन्मन्त्रास्तु यथाम्नायं वक्ष्यन्तेऽन्यत्र पर्वणि । सप्तधा पीठिकाजातिमन्त्रादिप्रविभागतः ॥ ७४ विनियोगस्तु सर्वासु क्रियास्वेषां मतो जिनः । अव्यामोहादतस्तज्जैः प्रयोज्यास्ते उपासकैः ॥७५ गर्भाधानक्रियासेनां प्रयुज्यादौ यथाविधि । सन्तानार्थ विना रागाद्दम्पतिभ्यां विधीताम् ॥ ७६ इतिगर्भाधानम् ॥ मिळणे, ३ पारिवाज्य- जिनदीक्षा प्राप्त होणे, ४ सुरेन्द्रता- स्वर्गांत इन्द्रपद प्राप्त होणे, ५ साम्राज्य- षट्खंडाचे स्वामित्व प्राप्त होणे, ६ परमार्हन्त्य- उत्कृष्ट अर्हन्तपणा अर्थात् तीर्थकर केवलिपणा प्राप्त होणे व परनिर्वाण आणि उत्कृष्ट मोक्ष प्राप्ति होणे ही तीन लोकांत सात परमस्थाने होत. ही अर्हन्ताच्या वचनाचा आस्वाद घेणाऱ्या प्राण्यांनाच प्राप्त होतात ॥ ६६-६८ ॥ अशा रीतीने हा क्रियाकल्प अनेक भेदांचा महर्षीनी आगमात सांगितला आहे. या सर्वांची लक्षणे मी विस्ताराचा त्याग करून संक्षेपाने सांगेन । ६९ ॥ चतुर्थ स्नान केलेल्या व शुद्ध झालेल्या ऋतुमती पत्नीला पुढे करून गर्भाधानाच्या पूर्वी अरिहन्ताच्या पूजापूर्वक जो संस्कार मंत्रपूर्वक केला जातो त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. या गर्भाधानाच्या पूजेमध्ये जिनप्रतिमेच्या उजव्या बाजूला तीन चक्रे आणि डाव्या बाजूला तीन छत्रांची स्थापना करून पुढे तीन अग्नींची स्थापना करावी. जिनेश्वर, गणधर आणि सामान्य केवली यांना मुक्ति प्राप्त झाली त्यावेळी क्रमाने दक्षिणाग्नि, गार्हपत्याग्नि आणि गार्हपत्याग्नि यांची स्थापना केली होती. सिद्धप्रतिमेच्या वेदीच्या पुढे त्यांची स्थापना करावी. यानंतर प्रथम अर्हन्तांची पूजा करून उरलेल्या पवित्र द्रव्यांनी पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मंत्रपूर्वक या अग्नीत आहति द्याव्यात. त्या मंत्राचे वर्णन पुढील पर्वामध्ये शास्त्रानसारे केले जाईल. या मंत्राचे पीठिकामंत्र, जातिमन्त्र वगैरे सात प्रकार आहेत. या मंत्रांचा विनियोग या सर्व क्रियामध्ये करावा असे जिनेश्वरांनी सांगितले आहे. म्हणून तेव्हां श्रावकानी आपल्या बुद्धीत भ्रम उत्पन्न न होऊ देता यांचा उपयोग करावा. विधीला अनुसरून ही गर्भाधान क्रिया यथाशास्त्र करून नंतर आसक्त न होता दम्पतीनी सन्तान प्राप्तीकरिता समागम करावा. याप्रमाणे ही गर्भाधान क्रिया झाली ॥ ७०-७६ ।। म. ४८ Page #389 -------------------------------------------------------------------------- ________________ ३७८) महापुराण (३८-७७ गर्भाधानात्परं मासे तृतीये सम्प्रवर्तते । प्रीति मक्रिया प्रोतर्यानुष्ठेया द्विजन्मभिः ॥७७ तत्रापि पूर्ववन्मन्त्रपूर्वापूजा जिनेशिनाम् । द्वारि तोरणविन्यासः पूर्णकुम्भौ च सम्मतौ ॥ ७८ तदादि प्रत्यहभेरीशब्दो घण्टास्वनान्वितः । यथाविभवमेवैतः प्रयोज्यो गृहमेधिभिः ॥ ७९ । इति प्रीतिः॥ आधानात्पञ्चमेमासि क्रिया सुप्रीतिरिष्यते । या सुप्रीतैः प्रयोक्तव्या परमोपासकवतैः॥ ८० तत्राप्युक्तो विधिः पूर्वः सर्वोऽर्हद्विम्बसन्निधौ । कार्योमन्त्रविधानन्जैः साक्षीकृत्याग्निदेवताः ॥ ८१ इति सुप्रीतिः ॥ धृतिस्तु सप्तमे मासि कार्या तद्वत्कृतादरैः । गृहमेधिभिरव्यग्रमनोभिर्गर्भवृद्धये ॥ ८२ इति धृतिः॥ नवमे मास्यतोऽभ्यर्णे मोदो नाम क्रियाविधिः । तद्वदेवादतः कार्यो गर्भपुष्टचै द्विजोत्तमैः ॥ ८३ तत्रष्टो गात्रिकाबन्धोमङ्गल्यं च प्रसाधनम् । रक्षासूत्रविधानं च गभिण्या द्विजसत्तमैः ॥ ८४ इति मोदः॥ प्रियोद्धवः प्रसूताया जातकर्मविधिः स्मृतः । जिनजातकमाध्याय प्रवर्यो यो यथाविधि ॥ ८५ अवान्तरविशेषोऽत्र क्रियामन्त्रादिलक्षणः । भूयान्समस्त्यसौ ज्ञेयो मूलोपासकसूत्रतः ॥ ८६ इति प्रियोद्धवः ॥ प्रीति- गर्भाधानानंतर तिसऱ्या महिन्यात प्रीतियुक्त द्विजांनी प्रीति नावाचासंस्कार करावा. या संस्कार क्रियेतही पूर्वीप्रमाणे अर्हत्परमेष्ठींची पूजा मन्त्रपूर्वक करावी. द्वारावर तोरण बांधावे व द्वारावर दोन पूर्ण कुंभ स्थापन करावेत. यानंतर दररोज नगाऱ्याचा शब्द करावा. नगारे वाजवावेत आणि घण्टा ध्वनि करावा. आपल्या वैभवाला अनुसरून गृहस्थानी हा विधि करावा. याप्रमाणे हा दुसरा प्रीतिनामक संस्कार आहे ।। ७७-७९ ।। सुप्रीति- गर्भाधानानंतर पाचव्या महिन्यात सुप्रीति नांवाची क्रिया सांगितली आहे. ती प्रसन्न व उत्तम श्रावकाकडून केली जाते. ही क्रिया जिनेन्द्रबिम्बाच्या सन्निध अग्नि आणि देवतांच्या साक्षीने मंत्र विधान जाणणा-यानी उत्तमरीतीने करावी. - इति सुप्रीतिः ।। ८०-८१॥ धृतिक्रिया- आदरयुक्त श्रावकांनी आपले मन व्यग्र न होऊ देता गर्भाची वाढ व्हावी म्हणून सातव्या महिन्यात धृतिनामक क्रिया करावी ॥ ८२ ॥ मोद- जेव्हां नववा महिना जवळ येतो त्यावेळी आदरयुक्त उत्तम द्विज गृहस्थांनी गर्भ पुष्ट व्हावा म्हणून मोद नांवाची क्रिया करावी व गात्रिका बन्धन करावे अर्थात् मंत्रपूर्वक बीजाक्षरे लिहावीत. मङगलसूचक अलंकार गर्भिणीने धारण करावेत. गर्भ रक्षणार्थ रक्षासूत्र विधान करावे. हा मोद संस्कार होय ॥ ८३-८४ ॥ प्रियोद्भवसंस्कार-प्रसूति झाल्यानंतर प्रियोद्भवसंस्कार करावा. याचे दुसरे नांव जातकर्म-विधि असे आहे. ही क्रिया जितेन्द्र भगवंताचे स्मरण करून यथाविधि करावी. यात अवान्तर विशेष क्रिया मंत्रादिक पुष्कळ आहेत ते सर्व मूळ उपासक सूत्रावरून जाणावेत ॥ ८५-८६ ॥ Page #390 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-९५) महापुराण (३७९ द्वादशाहात्परं नामकर्म जन्मदिनान्मतम् । अनुकूले सुतस्यास्य पित्रोरपि सुखावहे ॥ ८७ यथाविभवमष्टं देवर्षिद्विजपूजनम् । शस्तं च नाम ध्येयं तत्स्थाप्यमन्वयवृद्धिकृत् ॥ ८८ अष्टोत्तरसहस्राद्वा जिननामकदम्बकात् । घटपत्रविधानेन ग्राह्यमन्यतमं शुभम् ॥ ८९ इतिनामकर्म। बहिर्यानं ततो द्विमसिस्त्रिचतुरैरुत । ययानुकूल मिष्टेऽह्नि कार्य तूर्यादिमङ्गलैः ॥ ९० ततः प्रभृत्यभीष्ठं हि शिशोः प्रसववेश्मन । बहिः प्रणयनं मात्रा धान्युत्सङ्गगतस्य वा ॥ ९१ तत्रबन्धुजनादर्थलाभो यः पारितोषिकः । स तस्योत्तरकालेऽर्यो धनं पित्र्यं यदाप्स्यति ॥ ९२ इति बहिर्यानम् । ततः परं निषद्यास्य क्रिया बालस्य कल्प्यते । तद्योग्ये तस्य आस्तीणं कृतमङ्गलसन्निधौ ॥ ९३ सिद्धार्चनादिकः सर्वो विधिः पूर्ववदत्र च । यतो दिव्यासनाहत्वमस्य स्यादुत्तरोत्तरम् ॥ ९४ इति निषद्या। गते मासपृथक्त्वे च जन्माद्यस्य यथाक्रमम् । अन्नप्राशनमाम्नातं पूजाविधिपुरःसरम् ॥ ९५ इति अन्नप्राशनम् । १० जन्म दिवसापासून बारा दिवस झाल्यानन्तर अनुकूल दिवशी माता-पिता व पुत्राला त्या सुखदायक अशा दिवशी बालकाचा नामकर्म विधि करावा, अर्थात् बालकाचे नाव ठेवावे. त्यावेळी आपल्या वैभवाला अनुसरून अरिहन्त, मुनि आणि द्विजांचे पूजन करावे व बालकाचे वंशवृद्धीला कारण असे प्रशंसनीय नांव ठेवावे. अथवा जिनेश्वराचा एक हजार आठ नावे कागदाच्या एक हजार आठ तुकड्यावर एक एक नांव लिहावे व त्या कागदांच्या गोळ्या एक घटात भराव्यात व एखादा अजाण बालक किंवा बालिका यांच्या हाताने त्यातून एक गोळी काढावी व ती उकलून जे नांव त्यात लिहिलेले असेल ते त्या बालकाचे नांव ठेवावे. हा नामकर्म विधि सातवा झाला ।। ८७-८९ ॥ यानंतर दोन तीन महिन्यानी किंवा तीन चार महिन्यानी अनुकूल अशा दिवशी त्या बालकाला वाजत गाजत प्रसूति घरातून बाहेर मातेसह न्यावे किंवा धात्रीच्या-दायीच्या ओटीमध्ये असलेल्या त्या बालकास दायीसह बाहेर ग्यावे. त्यावेळी त्या बालकाला जो पारितोषिक म्हणून धनलाभ होईल ते धन त्या बालकाला जेव्हा तो आपल्या पित्याच्या धनाचा अधिकारी होईल तेव्हा ते त्याला द्यावे. अशीही बहिर्यान क्रिया आठवी होय ॥९०-९२॥ यानंतर त्या बालकाची निषद्या क्रिया-बालकाला बसविण्याची क्रिया करतात. ती अशी- त्याच्याजवळ मंगलद्रव्ये- आरसा, झारी, कुंभ वगैरे स्थापन करावीत. अशा बालकास योग्य आसनावर बसवावे. या क्रियेत सिद्ध पूजादिक सर्वविधि पूर्वीप्रमाणेच करावा.ज्यामुळे त्याला उत्तरोत्तर दिव्य आसनावर बसण्याची योग्यता प्राप्त होईल. ही निषद्या-नामक क्रिया ९ वी होय ।। ९३-९४ ।। जन्मापासून सात आठ महिने संपल्यानंतर या बालकाचा क्रमाने अन्नप्राशन नांवाचा संस्कार पूजा विधीने युक्त असा करावा. हा दहावा संस्कार होय ।। ९५ ।। Page #391 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८० ) ततोऽस्य हायने पूर्णे व्युष्टिर्नाम क्रिया मता । वर्षवर्धनपर्याय शब्दवाच्या यथाश्रुतम् ॥ ९६ अत्रापि पूर्ववद्दानं जंनी पूजा व पूर्ववत् । इष्टबन्धुसमाह्वानं समाशादिश्च लक्ष्यताम् ॥ ९७ इतिव्युष्टिः । ११ केशवास्तु केशानां शुभेऽह्नि व्यपरोपणम् । क्षौरेण कर्मणा देवगुरुपूजापुरःसरम् ॥ ९८ गन्धोदकाद्रितान्कृत्वा केशान्शेषाक्षतोचितान् । मौण्डयमस्य विधेयं स्यात्स्वचूलं स्वान्वयोचितम् ॥ स्वपनोद धौताङ्गमनुलिप्तं सभूषणम् । प्रणमय्य मुनीन्पश्चाद्योजयेद्द्बन्धुताशिषा ॥ १०० चौलाख्यया प्रतीतेयं कृतपुण्याहमङ्गला । क्रियास्यामादृतो लोको यतते परया मुदा ॥ १०१ इति केशवापः । १२ ततोऽस्य पञ्चमे वर्षे प्रथमाक्षरदर्शने । ज्ञेयः क्रियाविधिर्नाम्ना लिपिसङख्यानसङग्रहः ॥ १०२ यथाविभवमत्रापि ज्ञेयः पूजापरिच्छदः । उपाध्यायपदे चास्यमतोऽधीती गृहव्रती ॥ १०३ लिपि संख्यान सङग्रहः । १३ महापुराण यानंतर जन्मून एक वर्ष पूर्ण झाले असता व्युष्टि नांवाची क्रिया जिला वर्षवर्धनवाढदिवस म्हणतात ती शास्त्राला अनुसरून करावी. या क्रियेतही पूर्वीप्रमाणे दान देणे व जिनपूजा करणे ही क्रिया करावी. या क्रियेच्या वेळी इष्ट बंधु मित्रादिकाना बोलवावे व त्यांच्याबरोबर जेवण करणे वगैरे कार्य करावे. ही अकरावी क्रिया होय ।। ९६-९७ ।। (३८-९६ केशवाप क्रिया - जिला जावळ काढणे म्हणतात. ही क्रिया देवपूजा, गुरुपूजा पूर्वक करावी अर्थात् शुभ दिवशी क्षीरकर्माने वस्त्र्याने केश काढावेत. प्रथमतः केश गंद्योदकाने ओले करावेत व त्यावर पुष्पाक्षता क्षेपण करावे. अर्थात् जिनपूजा करून उरलेल्या अक्षता बालकाच्या केशावर टाकाव्यात व आपल्या वंशाला योग्य अशा रीतीने शेंडी ठेवून बालकाचे केशांचे मुण्डन करावे. यानंतर त्याचे अंग स्नान योग्य पाण्याने धुवावे स्नान घालावे व नन्तर त्याला वस्त्राभूषणानी सजवावे. मुनींच्या पाया पडवून त्याला बंधुवर्गाकडून आशीर्वाद दिला जावा. पुण्याह वाचनरूपी मंगल क्रिया ज्यात आहे अशा या संस्काराला चौल क्रिया म्हणतात. ही क्रिया करण्यास लोक आनंदाने प्रवृत्त होतात. अशी ही केशवाप क्रिया बारावी आहे ।। ९८ - १०१ ॥ यानंतर पाचव्या वर्षी या बालकाला प्रथमतः अक्षराचे ज्ञान व संख्यांचे ज्ञान करून देण्याकरिता लिपिसंख्यान संग्रह हा विधि करावा. आपल्या वैभवाला अनुसरून जिनपूजा विधि करावा व या मुलाच्या गुरुस्थानी अध्ययन केलेला व्रती गृहस्थ असावा. ही लिपिसंख्यान नामक १३ वी क्रिया आहे ।। १०२ - १०३ ॥ Page #392 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-१०९) महापुराण (३८१ क्रियोपनीति मास्य वर्षे गर्भाष्टमेमता । यत्रापनीतकेशस्य मौजी सव्रतबन्धना ॥ १०४ कृतार्हत्पूजनस्यास्य मौजीबन्धो जिनालये । गुरुसाक्षी विधातव्यो व्रतार्पणपुरःसरणम् ॥ १०५ शिखी सितांशुकः सान्तर्वासा निर्वेषविक्रियः । व्रतचि दधत्सूत्रं तदोक्तो ब्रह्मचार्यसौ ॥ १०६ चरणोचितमन्यच्च नामध्येयं तदास्य वा । वृत्तिश्च भिक्षयान्यत्र राजन्यादुद्धवैभवात् ॥ १०७ सोऽन्तःपुरे चरेत्पाभ्यां नियोग इतिकेवलम् । तदनं देवसात्कृत्य ततोऽन्नं योग्यमाहरेत् ॥ १०८ इत्युपनीतिः । १४ व्रतचर्यामहं वक्ष्ये क्रियामस्योपबिभ्रतः । कटयूरूरः शिरोलिङ्गमनूचानव्रतोचितम् ॥ १०९ ___ गर्भापासून आठव्या वर्षी बालकाची उपनीति क्रिया करावी. यावेळी मुंडन करून व्रतासह मौंजी बंधन केले जाते. जिनमंदिरात अर्हन्ताची पूजा केल्यावर गुरूच्या साक्षीने व्रतार्पणपूर्वक मौंजी बन्धन करावे. ज्याला शिखा-शेंडी आहे, ज्याने शुभ्र वस्त्र धारण केले आहे व ज्याने लंगोटी धारण केली आहे, ज्याचा वेष निर्विकार आहे, व्रताचे चिह्न असे यज्ञोपवीत धारण केले आहे असा तो बालक 'ब्रह्मचारी' या नांवाने वाखाणला जातो. त्याच्या या आचरणाला अनुसरून दुसरेही योग्य नांव ठेवण्यास हरकत नाही. ज्याचे ऐश्वर्य मोठे आहे अशा राजपुत्राशिवाय बाकीच्या ब्रह्मचा-यानी आपला निर्वाह भिक्षेने करावा. याचप्रमाणे जो राजपुत्र असेल त्यानेही भिक्षा मागावी असा नियम असल्यामुळे अन्तःपुरात पात्र हातात घेऊन भिक्षा मागावी व थोडेसे अन्न देवाला अर्पण करावे आणि बाकीचे योग्य अन्न आपण खावे. याप्रमाणे उपनीति क्रिया १४ वी होय ।। १०४-१०८ ॥ आता मी व्रतचर्या नामक क्रियेचे वर्णन करतो. कंबर, मांड्या, छाती व मस्तक या ठिकाणी ब्रह्मचर्याला योग्य अशी चिह्न बालक-धारण करतो. तिहेरी केलेले मौंजीचे बन्धन कडदोरा याच्या कमरेला असतो. हे चिह्न रत्नत्रयाची विशुद्धि निर्मलता दाखविणारे आहे. अतिशय धुतलेले शुभ्र वस्त्र हे मांड्याचे चिन्ह आहे. हे चिन्ह जिनमत धारण करणाऱ्या जैनांचे कुल विशाल व पवित्र आहे याचे सूचक आहे. या ब्रह्मचारी बालकाचे छातीचे चिह्न जानवे आहे. हे सात पदरांचे असते व सज्जाति, सद्गृहस्थपणा, आदि सात परमस्थानांचे सूचक आहे. या बालकाचे मस्तकाचे चिन्ह स्वच्छ व उत्कृष्ट मुण्डन हे आहे व ते चिन्ह याच्या मनाची, वचनाची आणि शरीराची शुद्धता वाढविणारे आहे. इन्द्रियविषयाविषयीची अनासक्ति वाढविणारे आहे. अशा रीतीच्या तीन लिंगानी युक्त होऊन हा ब्रह्मचारी बालक स्थूल हिंसा त्याग, स्थूल असत्य भाषण त्याग इत्यादिक ब्रह्मचर्याला वाढविणारी पाच व्रते धारण करतो. याचप्रमाणे ह्या ब्रह्मचारी बालकाने दात घासण्याच्या काड्यानी दात घासू नयेत, याने तांबूल भक्षण करू नये, डोळयात अंजन घालू नये. अंगाला हळद वगैरे लावून स्नान करू नये. फक्त स्वच्छ पाण्याने स्नान करावे. याने बाजेवर, पलंगावर झोपू नये. दुसन्याशी अंग संघटन करून झोपू नये. अर्थात् त्याने जमिनीवर केवळ एकटयाने या ब्रह्मचर्याच्या व्रतशुद्धीकरिता झोपावे व जोपर्यन्त याच्या विद्येची समाप्ति होत नाही तोपर्यन्त या व्रताचे पालन याने केले पाहिजे. यानंतरही जेव्हा हा बालक विद्या समाप्तीनंतर गृहस्थ होतो तेव्हाही त्याने अहिंसादि Page #393 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८२) महापुराण ( ३८-११० कटीलिङ्गं भवेदस्य मौञ्जीबन्धात्त्रिभिर्गुणैः । रत्नत्रितयशुद्धयङ्गं तद्धि चिह्नं द्विजन्मनाम् ॥ ११० तस्येष्टमूरुलिङ्गं च सुधौतसितशाटकम् । आर्हतानां कुलं पूतं विशालं चेति सूचने ॥ १११ उरोलिङ्गमथास्य स्याद्ग्रथितं सप्तभिर्गुणैः । यज्ञोपवीतकं सप्तपरमस्थानसूचकम् ॥ ११२ शिरोलिङ्गं च तस्येष्टं परं मौण्ड्यमनाविलम् । मौण्ड्यं मनोवचः कायगतमस्योपबृंहयत् ॥ ११३ एवं प्रायेणलिङ्गेन विशुद्धं धारयेद्व्रतम । स्थूलहिंसाविरत्या दिब्रह्मचर्योपबृंहितम् ॥ ११४ दन्तकाष्ठग्रहो नास्य न ताम्बूलं न चाञ्जनम् । न हरिद्रादिभिः स्नानं शुद्धं स्नानं दिनं प्रति ।।११५ न खट्वा शयनं तस्य नान्यङ्गपरिघट्टनम् । भूमौ केवलमेकाकी शयीत व्रतशुद्धये ॥ ११६ यावद्विद्यासमाप्तिः स्यात्तावदस्येदृशं व्रतम् । ततोऽप्यध्वं व्रतं तत्स्याद्यन्मूलं गृहमेधिनाम् ॥ ११७ सूत्रमपासिकं चास्य स्यादध्येयं गुरोर्मुखात् । विनयेन ततोऽन्यच्च शास्त्रमध्यात्मगोचरम् ॥ ११८ शब्दविद्यार्थशास्त्रादि चाध्येयं नास्य दृष्यते । सुसंस्कारप्रबोधाय वैयात्यख्यातयेऽपिच ॥ ११९ ज्योतिर्ज्ञानमथच्छन्दोज्ञानं ज्ञानं च शाकुनम् । सङख्याज्ञानमितीदं च तेनाध्येयं विशेषतः ।। १२० इतिव्रतचर्या । १५ ततोऽस्याधीतविद्यस्य व्रतवृत्यवतारणम् । विशेषविषयं तच्चस्थितस्योत्सगिके व्रते ।। १२१ मधुमांस परित्यागः पञ्चोदुम्बरवर्जनम् । हिंसादिविरतिश्चास्य व्रतं स्यात्सार्वकालिकम् ॥ १२२ व्रतावतरणं चेदं गुरुसाक्षिकृतार्चनम् । वत्सराद्वादशादूर्ध्वमथवाषोडशात्परम् ॥ १२३ कृतद्विजार्चनस्यास्य व्रतावतरणोचितम् । वस्त्राभरणमात्यादि ग्रहणं गुर्वनुज्ञया ॥ १२४ शस्त्रोपजीविवर्ग्यश्चेद्धारयेच्छस्त्रमप्यदः । स्ववृत्तिपरिरक्षार्थं शोभाथं चास्यतद्ग्रहः ॥ १२५ भोगब्रह्मव्रता देवमवतीर्णो भवेत्तदा । कामब्रह्मव्रतं चास्य तावद्यावत्क्रियोत्तरा ।। १२६ व्रतावतरणम् । १६ अणुव्रताचे पालन करावे. या ब्रह्मचारी बालकाने गुरूच्या मुखाने औपासिक सूत्राचे श्रावकांच्या आचाराचे अध्ययन विनयाने युक्त होऊन करावे. याचप्रमाणे विनयपूर्वक अध्यात्मशास्त्राचेही अध्ययन करावे. आपल्या ठिकाणी उत्तम संस्काराची वाढ व्हावी व विद्वत्ता प्राप्त व्हावी म्हणून व्याकरण, न्याय वगैरे शब्दशास्त्र व अर्थशास्त्र आदिकांचे अध्ययन करणे देखिल दोषास्पद नाही. याचप्रमाणे यानंतर ज्योतिषशास्त्र, छन्दशास्त्र, शकुनशास्त्र व गणितशास्त्र आदिक शास्त्रांचेही त्याने विशेषरूपाने अध्ययन करावे. ही व्रतचर्या क्रिया १५ वी आहे ॥ १०९-१२० ॥ विद्याध्ययन केल्यानन्तर तात्कालिक विशेष व्रताचा त्याग करावा सामान्य व्रते जी स्थूलहंस त्याग, स्थूल असत्य त्याग वगैरे व्रते ह्यात तो आजन्म राहणारच. मध, मद्य, मांस यांचा त्याग आणि पाच उदुंबरांचा त्याग ही व्रते त्याची सार्वकालिक आहेत. हे व्रताचरण गुरुसाक्षीने जिनपूजा करून करावयाचे असते व ते बारा वर्षानन्तर किंवा सोळा वर्षानन्तर करावयाचे असते. ज्याने द्विजपूजा केली आहे, अशा त्या ब्रह्मचाऱ्याने गुरूच्या आज्ञेने वस्त्र, अलंकार, पुष्पमालादिक धारण करावेत व हा ब्रह्मचारी जर शस्त्रोपजीवी (क्षत्रिय) असेल तर त्याने शस्त्र ग्रहण करावे. आपल्या क्षत्रिय आचाराच्या पालनार्थं किंवा शोभेसाठी ग्रहण करावे. असा हा ब्रह्मचारी भोग ब्रह्मव्रतापासून खाली उतरतो पण जोपर्यन्त पुढची क्रिया त्याची झाली नाही तोपर्यन्त याने काम ब्रह्मचर्याचे पालन करावेच लागते ।। १२१-१२६ ।। Page #394 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-१४१) महापुराण (३८३ ततोऽस्यगुर्वनुज्ञानादिष्टा वैवाहिकी क्रिया । वैवाहिके कुले कन्यामुचितां परिणेष्यतः ॥ १२७ सिद्धार्चनविधि सम्यक् निवर्त्य द्विजसत्तमाः । कृताग्नित्रयसम्पूजा कुर्यस्तत्साक्षि तां क्रियाम् ॥ १२८ पुण्याश्रमे क्वचित्सिद्धप्रतिमाभिमुखं तयोः । दम्पत्योः परयाभूत्या कार्यः पाणिग्रहोत्सवः ॥ १२९ वेद्यां प्रणीतमग्नीनां त्रयं द्वयमर्थककम् । ततः प्रदक्षिणीकृत्य प्रसज्य विनिवेशनम् ॥ १३० पाणिग्रहणदीक्षायां नियुक्तं तद्वधूवरम् । आसप्ताहं चरेद्ब्रह्मव्रतं देवाग्निसाक्षिकम् ॥ १३१ क्रान्त्वा स्वस्योचितां भूमि तीर्थभूमीविहृत्य च । स्वगृहं प्रविशेद्भत्या परया तद्वधूवरम् ॥ १३२ विमुक्तकणं पश्चात्स्वगृहे शयनीयकम् । अधिशय्य यथाकालं भोगाङ्गरुपलालितम् ॥ १३३ सन्तानार्थमृतावेव कामसेवां मिथोभजेतृ । शक्तिकालव्यपेक्षोऽयं क्रमोऽशक्तेष्वतोन्यथा ॥ १३४ एवं कृत विवाहस्य गार्हस्थ्यमनुतिष्ठतः । स्वधर्मानतिवृत्त्यर्थ वर्णलाभमतो ब्रुवे ॥ १३५ ऊढभार्योऽप्ययं तावदस्वतन्त्रो गुरोर्गृहे । ततः स्वातन्त्र्यसिद्धर्थ वर्णलाभोऽस्यवणितः ॥ १३६ गुरोरनुज्ञया लब्धधनधान्यादिसम्पदः । पृथक्कृतालयस्यास्य वृत्तिवर्णाप्तिरिष्यते ॥ १३७ तदापि पूर्ववत्सिद्धप्रतिमार्चनमग्रतः । कृत्वान्योपासकान्मुख्यान्साक्षीकृत्यार्पयेद्धनम् ॥ १३८ धनमेतदुपादायस्थित्वास्मिन्स्वगृहे पृथक् । गृहिधर्मस्त्वया धार्यः कृत्स्नो दानादिलक्षणः ॥ १३९ यथास्मत्पित दत्तेन धनेनास्माभिरजितम् । यशोधर्मश्चतद्वत्त्वं यशोधर्मानुपार्जय ॥ १४० इत्येवमनुशिष्यनं वर्णलाभे नियोजयेत् । सदाचारः स सद्धर्म तथानुष्ठातुमर्हति ॥ १४१ ___ यानन्तर याच्या गुरूची आज्ञा घेऊन या बटूची विवाहक्रिया करावी. विवाह करण्यायोग्य अशा कुलातील योग्य कन्याबरोबर विवाह करावा. प्रथमतः सिद्धांची पूजाउत्तम रीतीने करावी व दक्षिण, गार्हपत्य आणि आहवनीय या तीन अग्नीची उत्तम रीतीने पूजा केल्यावर सिद्ध व अग्नित्रयांच्या साक्षीने ही विवाहक्रिया करावी. एखाद्या पवित्र स्थानी मोठ्या वैभवाने सिद्ध प्रतिमेच्या पुढे त्या दंपतीचा पाणिग्रहणविधि करावा अर्थात् वराच्या हातात कन्येचा हात द्यावा. पित्याने कन्यादान विधि करावा. वेदीवर तीन किंवा दोन अथवा एक अग्नीला वधूवरानी प्रदक्षिणा घालून एकमेकाजवळ बसावे. विवाह विधीत नियुक्त झालेल्या त्या वधूवरानी सात दिवसपर्यन्त देवाग्नीच्या साक्षीने ब्रह्मचर्यव्रत पाळावे. नंतर योग्य अशा ठिकाणी जाऊन किंवा तीर्थाच्या स्थानी जाऊन वधुवरानी मोठ्या समारंभाने आपल्या घरात प्रवेश करावा. यानंतर विवाह कंकण सोडावे. तांबूल वगैरे उपभोग्य वस्तूचे सेवन करावे. भोग आणि उपभोगांच्या साधनानी सज्ज अशा शय्येवर शयन करावे. केवळ पुत्रोत्पत्तीच्या इच्छेनेच ऋतुकाली वधुवरांनी कामसेवन करावे. हा संभोगाचा व्यवहार शक्ति व काळ यावर अवलंबून आहे. पण जे अशक्त आहेत त्यांचा याहून विपरीत क्रम समजावा. अर्थात् त्यानी संभोगात तत्पर राहू नये. याप्रमाणे ही विवाहक्रिया १७ वी आहे ॥१२७-१३४॥ याप्रमाणे ज्याचा विवाह झाला आहे व जे गृहस्थाश्रमाचे पालन करीत आहे, अशा आपल्या पुत्राने आपल्या धर्माप्रमाणे वागावे. म्हणून आता वर्णलाभ नावाची क्रिया मी सांगतो. जरी आपल्या पुत्राचा विवाह झाला तरीही तो आपल्या पित्याच्या घरी स्वतन्त्र मानला जात नाही. तेव्हा त्याला स्वातन्त्र्याची प्राप्ति व्हावी म्हणून वर्णलाभ हा संस्कार येथे वणिला आहे. Page #395 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८४) महापुराण (३८-१४२ लब्धवर्णस्य तस्येति कूलचर्यानकीर्तने । सात्विज्यादत्तिवार्तादिलक्षणा प्राकप्रपञ्चिता ॥ १४२ विशुद्धावृत्तिरस्यार्यषट्कर्मानुप्रवर्तनम् । गृहिणां कुलचर्येष्टा कुलधर्मोऽप्यसौ मतः ॥ १४३ ___ इति कुलचर्या क्रिया। १९ कुलचर्यामनुप्राप्तो धर्मे दाढर्यमथोद्वहन् । गृहस्थाचार्यभावेन संश्रयेत्सगृहीशिताम् ॥ १४४ ततोवर्णोत्तमत्वेन स्थापयेत्स्वां गृहीशिताम् । शुभवृत्तिक्रियामन्त्रविवाहैः सोत्तरक्रियः ॥ १४५ अनन्यसदृशैरेभिः श्रुतवृत्तिक्रियादिभिः । स्वमुन्नति नयन्नेष तदाहति गृहीशिताम् ॥ १४६ वर्णोत्तमो महीदेवः सुश्रुतो द्विजसत्तमः । निस्तारको ग्रामपतिर्मानाहश्चेतिमानितः ॥ १४७ इति गृहीशिता । २० ज्याला धनधान्यादि सम्पत्ति मिळाली आहे असा तो पुत्र वडिलाच्या सम्मतीने वेगळे घर करून जेव्हा राहतो तेव्हा स्वतंत्र होऊन उपजीविका करण्याच्या त्याच्या त्या वृत्तीला वर्णलाभ म्हणतात. ह्या वर्णलाभक्रियेच्या वेळीही पूर्वीप्रमाणे सिद्ध पूजन करावे व इतर मुख्य श्रावकाना साक्षी ठेवून पिता आपल्या पुत्राला धन अर्पण करितो व असे म्हणतो, हे पत्रा, हे धन घेऊन या माझ्या घरात तु पथक राहा आणि दान देणे, पूजा करणे वगैरे जो गहस्थ धर्म आहे त्याचे त पालन कर. जसे आमच्या पित्याने दिलेल्या धनाने आम्ही यश आणि धर्म मिळविला तसे तही यश व धर्म याचे उपार्जन कर, याप्रमाणे त्याला उपदेश करून वर्णलाभात त्याचे नियोजन करावे. असा हा सदाचार आहे व सद्धर्माचे आचरण करण्यास तू आता योग्य झाला आहेस. ही १८ वी वर्णलाभ क्रिया करावी ॥ १३५-१४१॥ ज्याला वर्णलाभ प्राप्त झाला आहे त्याची कुलचर्या आता सांगतो. ती कुलचर्या म्हणजे जिनपूजा करणे, सत्पात्राला दान देणे व न्यायाने उपजीविका करणे इत्यादी तिचे स्वरूप आहे व तिचा विस्तार पूर्वी सांगितला आहे. अर्थात् निर्दोष अशी उपजीविका करणे व आर्याच्या देव पूजादि षट्कर्माचे पूर्वजाप्रमाणे पालन करणे ही गृहस्थाची कुलचर्या होय. यासच कुलधर्म असेही म्हणतात. याप्रमाणे कुलचर्या १९ वी क्रिया होय ॥ १४२-१४३ ॥ कुलचर्येला प्राप्त झालेला हा गृहस्थ जेव्हा धर्मात अतिशय दृढ होतो तेव्हा गृहस्थाचार्य भावाला स्वीकारतो अर्थात् तो सर्व गृहस्थाचा स्वामी होतो अर्थात् गृहस्थाचार्य होतो. यानंतर स्वतःला वर्णात श्रेष्ठपणा प्राप्त झाल्यावर आपणात गृहीशिता-गृहस्थाचार्यता स्थापन करावी. दुसऱ्या गृहस्थात न आढळणारे व इतराप्रमाणे नसलेले अशा शुभवृत्ति, क्रिया, मन्त्र, विवाह आणि पुढे सांगितलेल्या क्रियांचे ज्ञान इत्यादीकानी व विशिष्ट शास्त्रज्ञान व चारित्र आदि क्रियानी आपल्याला उन्नत करून तो गृहीश अर्थात् गृहस्थात श्रेष्ठ होतो, गृहस्थाचार्य होतो. तेव्हा सर्व लोकानी त्याला वर्णोत्तम, महीदेव - पृथ्वीवर असलेला देव, उत्तम श्रुतज्ञानी, द्विजात सर्व श्रेष्ठ, निस्तारक, ग्रामपति - सर्व ग्रामात श्रेष्ठ व मानार्ह- मान देण्याला योग्य असे मानावे. याप्रमाणे गृहस्थाचार्य पदाला तो पोहोचतो ही विसावी गृहीशिता क्रिया आहे ॥१४४-१४७।। Page #396 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-१५६) महापुराण (३८५ सोऽनुरूपं ततो लब्ध्वा सूनुमात्मभरक्षमम् । तत्रारोपितगार्हस्थ्यः सन्प्रशान्तिमतः श्रयेत् ॥ १४८ विषयेष्वनभिष्वङ्गो नित्यस्वाध्यायशीलता । नानाविधोपवासैश्च वृत्तिरिष्टा प्रशान्तता ॥ १४९ । इति प्रशान्तिः । २१ ततः कृतार्थमात्मानं मन्यमानो गृहाश्रमे । यदोद्यतो गृहत्यागे तदास्यैष क्रियाविधिः ॥ १५० सिद्धार्थतां पुरस्कृत्य सर्वानाहूय सम्मतान् । तत्साक्षिसूनवे सर्व निवेद्यातो गृहं त्यजेत् ॥ १५१ कुलक्रमस्त्वया तात सम्पाल्योऽस्मत्परोक्षतः। विधाकृतं च नो द्रव्यं त्वयेत्थं विनियोज्यताम् ॥१५२ एकोऽशो धर्मकार्येऽतो द्वितीयः स्वगृहव्यये । तृतीयः संविभागाय भवेत्त्वत्सहजन्मनाम् ॥ १५३ पुन्यश्च संविभागार्हाः समं पुत्रैः समांशकः । त्वं तु भूत्वा कुलज्येष्ठः सन्तति नोऽनुपालय ॥१५४ श्रुतवृत्तक्रियामन्त्रविषिज्ञस्त्वमतन्द्रितः । प्रपालय कुलाम्नायं गुरुं देवांश्च पूजयन् ॥ १५५ इत्येवमनुशिष्य स्वं ज्येष्ठं सूनुमनाकुलः । ततो दीक्षां समादातुं द्विजः स्वं गृहमुत्सृजेत् ॥ १५६ इति गृहत्यागः । २२ यानन्तर आपल्याला अनुरूप व आपला संसारभार उचलण्यास समर्थ असा मुलगा झाल्यावर तो गृहस्थाचार्य त्याच्यावर आपला गृहस्थपणा टाकतो व आपण प्रशान्तिक्रियेचा आश्रय घेतो. तेव्हा त्यावेळी त्याच्या आत्म्यात विषयाविषयी अनासक्ति उत्पन्न होते. नेहमी जिनागमाचा स्वाध्याय तो करतो आणि अनेक प्रकारचे व्रतोपवास तो करतो. अशा अवस्थेला तो प्राप्त झाला म्हणजे त्याची ही २१ वी प्रशान्ति क्रिया होय ॥ १४८-१४९ ॥ जेव्हां तो गृहस्थाचार्य आपणास गृहस्थाश्रमात कृतकृत्यता प्राप्त झाली असे मानतो तेव्हां तो घराचा त्याग करण्यात उद्युक्त होतो. त्यावेळी हा क्रियाविधि करावा. गृहस्थाश्रमात राहण्याची आपली इच्छा पूर्ण झाली असा विचार करून आपणास मान्य असतील अशा लोकाना बोलावून त्यांच्या साक्षीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास सर्व सोपवतो व स्वतः नंतर गृहत्याग करतो. तो आपल्या ज्येष्ठ पुत्रास असे म्हणतो, हे पुत्रा 'तू आमच्या कुलात ज्येष्ठ होऊन, माझ्या परोक्ष माझ्या सन्ततीचे रक्षण कर. मी द्रव्याचे तीन विभाग केले आहेत त्याचा पुढीलप्रमाणे विनियोग कर- एक अंश धर्मकार्यात खर्च कर. दुसरा अंश घर कार्यात तू खर्च कर. तू तिसरा विभाग तुझ्या बंधूसह वाटून घे व तुझ्या बहिणी ज्या आहेत त्यांनाही तू आपल्या भावाबरोबरच समान धनविभाग दे. याप्रमाणे तू आमच्या कुलातील ज्येष्ठ पुत्र आहेस यास्तव माझ्या या सर्व सन्ततीचे पालन कर. हे पुत्रा, तू शास्त्र, वृत्त-सदाचार, क्रिया, मंत्र विधि या कार्यात आलस्य सोडून यांचे पालन कर. आपल्या कुलाचाराचे पालन करून गुरु आणि जिनदेवादिकांचे पूजन करीत जा, याप्रमाणे आपल्या ज्येष्ठ पुत्राला शान्त रीतीने उपदेश करावा. यानन्तर त्याने मुनिदीक्षा घेण्यासाठी घराचा त्याग करावा ॥ १५०-१५६ ॥ म. ४९ Page #397 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८६) महापुराण ( ३८-१५७ त्यक्तागारस्य सदृष्टेः प्रशान्तस्य गृहीशिनः । प्राग्दीक्षोपासिकात्कालादेकशाटकधारिणः ॥ १५७ यत्पुरश्चरणं दीक्षाग्रहणं प्रतिधार्यते । दीक्षाद्यं नाम तज्ज्ञेयं क्रियाजातं द्विजन्मनः ॥ १५८ इति दीक्षा त्यक्तचेलादिसङ्गस्य जैनी दीक्षामुपेयुषः । धारणं जातरूपस्य यत्तत्स्याज्जिनरूपता ॥ १५९ अशक्यधारणं चेदं जन्तूनां कातरान्मनाम् । जैनं निःसङ्गतामुख्यं रूपं धीरनिषेव्यते ॥ १६० इति जिनरूपता कृतदीक्षोपवासस्य प्रवृत्ते पारणाविधौ । मौनाध्ययनवृत्तत्वमिष्टमाश्रुतनिष्ठितेः ॥ १६१ । वाचंयमो विनीतात्मा विशुद्धकरणत्रयः । सोऽधीयोत श्रुतं कृत्स्नं आमूलाद्गुरुसन्निधौ ॥ १६२ श्रुतं हि विधिनानेन भव्यात्मभिरुपासितम् । योग्यतामिह पुष्णाति परत्रापि प्रसीवति ॥ १६३ इति मौनाध्ययनरूपता ततोऽधीताखिलाचारः शास्त्रादिश्रुतविस्तरः । विशुद्धाचरणोऽभ्यस्येत्तीर्थकृत्त्वस्य भावनाम् ॥ १६४ सा तु षोडशषाम्नाता महाभ्युदयसाधिनी । सम्यग्दर्शनशुद्धयादिलक्षणा प्राप्रपञ्चिता ॥ १६५ २६ इति तीर्थकृद्भावना ततोऽस्य विदिताशेषविद्यस्य विजितात्मनः । गुरुस्थानाभ्युपगमः सम्मतो गुर्वनुग्रहात् ॥ १६६ ___ ज्याने घराचा त्याग केला, जो गृहस्थाचार्य असून अतिशय शान्त व सम्यग्दृष्टि आहे व दीक्षा घेण्याच्या पूर्वी ज्याने एक वस्त्र धारण केले आहे अशा त्याचे दीक्षा घेण्यापूर्वी जे आचरण केले जाते व ज्या क्रिया केल्या जातात त्याना दीक्षाद्य हे नांव आहे. ही दीक्षाद्य क्रिया २३ वी समजावी ॥ १५७-१५८ ।। जन्मलेल्या बालकाप्रमाणे जी नग्नता धारण करणे तिला जिनरूपता म्हणतात. ही जिनरूपता वस्त्रादिक सर्व परिग्रह ज्याने त्यागले आहेत त्याला प्राप्त होते. जो भित्रा-धर्यहीन आहे त्याला ही जिनरूपता धारण करणे शक्य नाही. या जिनेश्वराच्या जातरूपात निःसंगतासंपूर्ण परिग्रहांचा त्याग हा मुख्य आहे. हे निःसंगतारूप धीर पुरुषाकडून धारण केले जाते. ही जिनरूपता क्रिया होय. ही २४ वी आहे ।। १५९-१६० ॥ ज्याने दीक्षा घेऊन उपवास धारण केला आहे व दुसरे दिवशी पारणा करण्यासाठी अर्थात् विधिपूर्वक आहार घेण्यासाठी जो प्रवृत्त झाला आहे तसेच शास्त्राच्या समाप्तीपर्यन्त जो मौनाने अध्ययन करीत आहे, त्याला मौनाध्ययनवृत्तित्व म्हणतात. ज्याने मौन धारण केले आहे, जो विनयशील आहे, ज्याचे मन, वचन व शरीराचे व्यापार पवित्र आहेत, अशा त्या मुनीने गुरूंच्या जवळ प्रारंभापासून सर्वश्रताचे अध्ययन करावे. या विधीने भव्यात्म्यानी श्रताचं उपासना केली म्हणजे त्यांच्या योग्यतेला ते शास्त्राध्ययन खूप पुष्ट करते व परलोकीही त्या आत्म्याना प्रसन्नता प्राप्त होते. ही मौनाध्ययनवृत्तिता २५ वी भावना होय ॥ १६१-१६३ ।। यानन्तर ज्याने सर्व आचारांचे अध्ययन केले आहे व ज्याने इतर शास्त्रांच्या अध्ययनाने ज्ञानाचा विस्तार जाणला आहे अशा त्या मुनीश्वराचे आचरण अत्यन्त निर्मळ होते व त्यामुळे तो मुनीश्वर तीर्थंकरपदाची प्राप्ति करून देणान्या भावनेचा अभ्यास करतो. ती Page #398 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-१७४) महापुराण (३८७ ज्ञानविज्ञानसम्पन्नः स्वगुरोरभिसम्मतः । विनीतो धर्मशीलश्च यः सोऽर्हति गुरोःपदम् ॥ १६७ गुरुस्थानाभ्युपगमः ॥ २७ ततः सुविहितस्यास्य युक्तस्य गणपोषणे । गणोपग्रहणं नाम क्रियाम्नाता महर्षिभिः ॥ १६८ श्रावकानायिकासाचं श्राविकाः संयतानपि । सन्मार्गे वर्तयन्नेष गणपोषणमाचरेत् ॥ १६९ . श्रुताथिभ्यःश्रुतं दद्याद्दीक्षार्थिभ्यश्च दीक्षणम् । धर्माथिभ्योऽपि सद्धर्म स शश्वत्प्रतिपादयेत् ॥ सद्वृत्तान्धारयन्सूरिरसदृत्तानिवारयन् । शोधयंश्च कृतादागोमलात्स बिभृयाद्गणम् ॥ इति गणोपग्रहणम् ॥ २८ गणपोषणमित्याविष्कुर्वन्नाचार्यसत्तमः । ततोऽयं स्वगुरुस्थानसङक्रान्तो यत्नवान्भवेत् ॥ १७२ अधीतविद्यं तद्विद्यैरादृतं मुनिसत्तमैः । योग्यं शिष्यमथाहूय तस्मै स्वं भारमर्पयेत् ॥ १७३ गुरोरनुमतात्सोऽपि गुरुस्थानमधिष्ठितः । गुरुवृत्तौ स्वयं तिष्ठेद्वर्तयेत्सकलं गणम् ॥ १७४ इति स्वगुरुस्थानावाप्तिः॥ २९ भावना सोळा प्रकारची सांगितली आहे. दर्शनशुद्धि, विनयसंपन्नता वगैरे सोळा प्रकारांची आहे व फार मोठ्या ऐश्वर्याची प्राप्ति तिच्यापासून होते. या भावनांचे वर्णन पूर्वी विस्ताराने केले आहे. ही २६ वी भावना होय ।। १६४-१६६ ॥ ___ यानन्तर ज्याला सर्व विद्या अवगत झालेल्या आहेत व ज्याने आपल्याला ताब्यात ठेवले आहे अशा त्या मुनिराजाला गुरूंचा अनुग्रह मिळाल्यामुळे गुरुस्थानाची प्राप्ति होते. तो मुनिराज ज्ञान व विज्ञान-अध्यात्मिक याने संपन्न असल्यामुळे मुरूना मान्य झालेला असतो. अर्थात् गुरु आपले पद देण्याला त्याला योग्य समजतात. तो विनयी व धर्मचरणात दक्ष असल्यामुळे गुरूंच्या पदाला धारण करण्यास योग्य होतो. ही गुरुस्थानाभ्युपगम-गुरुस्थानाचा स्वीकार करणे या नांवाची २७ वी क्रिया आहे ॥ १६७ ॥ सदाचार संपन्न हा मुनिराज गणपोषण करण्यास -शिष्यसमूहाचे रक्षण करण्यास - समर्थ होतो तेव्हा गणोपग्रहण क्रिया केली जाते असे महर्षीनी सांगितले आहे. श्रावक, आर्यिकांचा संघ, श्राविका व मुनि यांना सन्मार्गात तत्पर करणे ही गणोपग्रहण क्रिया होय. या मुनिराजाने ज्ञानाची इच्छा करणाऱ्याना ज्ञान द्यावे, त्यांच्याकडून शास्त्राभ्यास करून घ्यावेत, दीक्षा घेण्याची इच्छा करणाऱ्यांना दीक्षा द्यावी, धर्माची इच्छा करणाऱ्याना धर्मोपदेश द्यावा अशा क्रिया याने नेहमी कराव्यात. सदाचाराने वागणाऱ्याचे रक्षण करावे, दुराचाऱ्यांचे निवारण करावे व ज्यांच्या हातून पाप घडले असेल त्यांना प्रायश्चित्त देऊन शुद्ध करावे. याप्रमाणे गणाला स्वकृत्यात स्थिर करावे. ही गणोपग्रहण नांवाची २८ वी क्रिया होय ॥ १६८-१७१ ॥ ___ गण-शिष्यसंघाचे पोषण करणाऱ्या श्रेष्ठ आचार्यांनी यानन्तर आपले जे गुरुपद आहे ते योग्य शिष्याला देण्याचा विचार करावा, त्याविषयी यत्न करावा. ज्याने विद्याध्ययन केले आहे व जो विद्याध्ययन केलेल्या श्रेष्ठ मुनीनी आदरिलेला आहे अशा योग्य शिष्याला बोलावून त्याला ते आपले गुरुपद द्यावे. गुरूंच्या अनुमतीने त्या शिष्याने ते गुरुपद स्वीकारावे व गुरूंच्या स्थानी स्वतः बसून सगळ्या गणाला त्याने योग्य रीतीने वागवावे. ही गुरुस्थानप्राप्ति नांवाची २९ वी क्रिया होय ॥ १७२-१७४ ।। Page #399 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८८) महापुराण (३८-१७५ तत्रारोप्य भरं कृत्स्नं काले कस्मिश्चिदव्यथः । कुर्यादेकविहारी स निःसङ्गत्वात्मभावनाम् ॥१७५ निःसङ्गवृत्तिरेकाको विहरन्स महातपाः । चिकीर्षुरात्मसंस्कारं नान्यं संस्कर्तुमर्हति ॥ १७६ अपि रागं समुत्सृज्य शिष्यप्रवचनादिषु । निमैमत्वकतानः संश्चर्याशुद्धि तदाश्रयेत् ॥ १७७ इति निःसङ्गत्वात्मभावना ॥३० कृत्वैवमात्मसंस्कारं ततः सल्लेखनोद्यतः । कृतात्मशुद्धिरध्यात्म योगनिर्वाणमाप्नुयात् ॥ १७८ योगो ध्यानं तदर्थो यो यत्नः संवेगपूर्वकः । तमाहुर्योगनिर्वाणं सम्प्राप्तं परमं तपः ॥ १७९ कृत्वा परिफरं योग्यं तनुशोधनपूर्वकम् । शरीरं कर्शयेद्दोषैः समं रागादिभिस्तदा ॥ १८० तदेतद्योगनिर्वाणं संन्यासपूर्वभावना । जीविताशां मृतीच्छां च हित्वा भव्यात्मलब्धये ॥ १८१ रागद्वेषौ समुत्सृज्य श्रेयोऽवाप्तौ च संशयम् । अनात्मीयेषु चात्मीयसङ्कल्पाद्विरमेत्तदा ॥ १८२ नाहं देहो मनो नास्मि न वाणी न च कारणम् । तत्र यस्येत्यनुद्विग्नो भजेदन्यत्वभावनाम् ॥ १८३ अहमेको न मे कश्चिन्नवाहमपि कस्यचित् । इत्यदीनमनाः सम्यगेकत्वमपि भावयेत् ॥ १८४ मतिमाधाय लोकाग्रे नित्यानन्तसुखास्पदे । भावयेद्योगनिर्वाणं स योगी योगसिद्धये ॥ १८५ __इति योगनिर्वाणसम्प्राप्तिः ॥ ३१ याप्रमाणे योग्य शिष्यावर आपला सर्व भार अर्पण करून काही कालपर्यन्त काळजी न करता मी आता संपूर्ण परिग्रहरहित झालो अशी आत्मभावना करीत एकविहारी व्हावे, सर्व परिग्रहरहित, एकाकी व महातपस्वी अशा त्या महामुनीनी केवळ आपल्या आत्म्यावरच संस्कार करावे. स्वतःला सोडून इतर साधु किंवा गृहस्थाचा संस्कार करण्याची चिन्ता त्यांनी सोडून द्यावी. शिष्य, शास्त्र आदिकावरची रागभावना त्यागावी व त्या मुनिवर्याने निर्ममत्वामध्ये पूर्ण तत्पर व्हावे. आपल्या चारित्राच्या शुद्धीचा त्यावेळी आश्रय करावा. याप्रमाणे निःसङगत्वात्म भावना ३० होय ॥ १७५-१७७ ।। ___ याप्रमाणे आत्म्यावर संस्कार करून जेव्हा सल्लेखना करण्यासाठी उद्युक्त होतात तेव्हा ते मुनिराज आत्म्याची शुद्धि केली असल्यामुळे योगनिर्वाणाला प्राप्त होतात. योगनिर्वाणाचा खुलासा असा- योग म्हणजे ध्यान. त्यासाठी संसारभीति मनात बाळगून जो प्रयत्न करणे त्याला योगनिर्वाण म्हणतात. अर्थात् ते उत्कृष्ट तप आहे. प्रथमतः या योगनिर्वाणासाठी शरीरशुद्धि करावी. यानन्तर वातपित्तादिक दोषाबरोबर रागादिक दोष कृश करून शरीर कृश करावे. याला योगनिर्वाण म्हणतात. संन्यासाच्या वेळी पूर्वभावना अशी करावी अर्थात् जगण्याची इच्छा व मरण्याची इच्छाही त्यागावी. यामुळे आत्म्याचे हित होते. आत्मस्वरूप प्राप्त होते. रागद्वेषांचा त्याग करावा व मोक्षप्राप्तिविषयी मन निःशंक करावे. जे पदार्थ आत्म्याचे नाहीत त्याविषयी हे आत्म्याचे आहेत असा संकल्प त्यागावा. मी देह नाही, मी मन नाही व मी वचन नाही व देहमनोवचनांचे कारण पण नाही. या तीन पदार्थाविषयी खिन्न होऊ नये. याप्रमाणे यापासून मी भिन्न आहे अशी भिन्नत्वभावना भावावी. मी एकटाच, माझे कोणी नाहीत व मी पण कोणाचा नाही अशी उदात्त मनाने उत्तम एकत्वाची भावना भावावी. जो नित्य आहे व अनन्त सुखांचे स्थान आहे अशा मोझस्थानात आपली बुद्धि लावून या मुनिराजाने योगसिद्धीसाठी योगनिर्वाणाची भावना करावी. याप्रमाणे योगनिर्वाणसम्प्राप्ति ही एकतीसावी क्रिया आहे ।। १७८-१८५ ।। Page #400 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-१९४) महापुराण (३८९ ततो निःशेषमाहारं शरीरं च समुत्सृजन् । योगीन्द्रो योगनिर्वाणसाधनायोद्यतो भवेत् ॥ १८६ उत्तमार्थे कृतास्थानः संन्यस्ततनुरुद्धधीः । ध्यायन्मनोवचःकायान्बहिर्भूतान्स्वकान्स्वतः ॥ १८७ प्रणिधाय मनोवृत्ति पदेषु परमेष्ठिनाम् । जीवितान्ते स्वसात्कुर्याद्योगनिर्वाणसाधनम् ॥ १८८ योगः समाधिनिर्वाणं तत्कृता चित्तनिर्वृतिः । तेनेष्टसाधनं यत्तद्योगनिर्वाणसाधनम् ।। १८९ इति योगनिर्वाणसाधनम् ॥ ३२ तथा योगं समाधाय कृतप्राणविसर्जनः । इन्द्रोपपादमाप्नोति गते पुण्ये पुरोगताम् ॥ १९० इन्द्राःस्युस्त्रिदशाधीशास्तेषत्पादस्तपोबलात् । यः स इन्द्रोपपादः स्यात् क्रियाहन्मार्गसेविनाम्॥१९१ ततोऽसौ दिव्यशय्यायां क्षणादापूर्णयौवनः । परमानन्दसाद्भुतो दीप्तो दिव्येन तेजसा ॥ १९२ अणिमादिभिरष्टाभिर्युतोऽसाधारणैर्गुणैः । सहजाम्बरदिव्यस्रङमणिभूषणभूषितः ॥ १९३ दिव्यानुभावसम्भूतप्रभावं परमुद्वहन् । बोबुध्यते तदात्मीयमैन्द्रं दिव्यावधित्विषा ॥ १९४ इति इन्द्रोपपादक्रिया ॥ ३३ यानंतर संपूर्ण आहार व शरीराचा त्याग करणारा तो योगीन्द्र योगनिर्वाणसाधनासाठी उद्युक्त होतो. तो योगी उत्तमार्थ म्हणजे संन्यास त्यात आदरबुद्धि धारण करून अतिशय निर्मल बुद्धीने शरीरावरची ममत्वबुद्धि सोडून देतो. माझ्या आत्म्यापासून मन, वचन आणि शरीर ही भिन्न आहेत असे चिन्तन करतो व आपली मनोवृत्ति - मनाची एकाग्रता अहंदादि पंचपरमेष्ठींच्या चरणात स्थिर करतो. अशा रीतीने जीविताच्या अन्ती-मरणसमयी योगनिर्वाण साधनाची तो प्राप्ति करून घेतो. योग म्हणजे समाधि, त्या समाधीच्या द्वारे निर्वाण म्हणजे चित्ताला जो आनंद प्राप्त होतो त्याने इष्टपदाची सिद्धि-प्राप्ति करून घेता येते म्हणून त्यास योगनिर्वाणसाधन म्हणतात. ही योगनिर्वाणसाधन क्रिया ३२ वी आहे ॥ १८६-१८९ ।।। यानंतर मन, वचन व शरीराच्या प्रवृत्तीना स्थिर करून तो मुनिराज प्राणविसर्जन करतो आणि त्याचे पुण्य पुढे जाते व त्याला इन्द्रपदाची प्राप्ति होते. इन्द्र हे देवांचे स्वामी आहेत. तपांच्या सामर्थ्याने त्या इन्द्रपदामध्ये त्या योगिराजाची उत्पत्ति होते. अरिहन्ताच्या मोक्षमार्गाचे सेवन करणान्याची ही क्रिया आहे. यानंतर तो योगिराज थोड्याच वेळात दिव्य शय्येवर पूर्ण तारुण्याने उत्पन्न होतो, अत्यन्त आनन्दमय होतो व दिव्यतेजाने तो तळपतो. तो अणिमा, महिमादिक आठ असाधारण गुणानी युक्त होतो. जन्माबरोबरच उत्पन्न झालेले दिव्यवस्त्र, पुष्पमाला आणि रत्नभूषणानी भूषित होतो. दिव्य अशा सामर्थ्याने उत्पन्न झालेला जो प्रभाव त्याला धारण करून तो जागृत होतो व दिव्य अशा अवधिज्ञानाने आपणास इन्द्र पद प्राप्त झाले आहे असे तो जाणतो. याप्रमाणे इन्द्रोपपादक्रिया ३३ वी आहे ।। १९०-१९४ ॥ Page #401 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९०) महापुराण (३८-१९५ ......... पर्याप्तमात्र एवायं प्राप्तजन्मावबोधनः । पुनरिन्द्राभिषेकेण योज्यतेऽमरसत्तमः ॥ १९५ दिव्यसङ्गीतवादित्रमङ्गलोद्गीतिनिःस्वनः । विचित्रैश्चाप्सरोनृत्तनिवृत्तेन्द्राभिषेचनः ॥ १९६ तिरीटमुद्वहन्दीघ्रं स्वःसाम्राज्यकलाञ्छनम् । सुरकोटिभिरारूढप्रमदर्जयकारितः ॥ १९७ स्रग्वी सदंशुको दोप्रैर्भूषितो दिव्यभूषणः । ऐन्द्रविष्टरमारूढो महानेष महीयते ॥ १९८ इति इन्द्राभिषेकः ॥ २४ ततोऽयमानतानेतान्सत्कृत्य सुरसत्तमान् । पदेषु स्थापयन्स्वेषु विधिदाने प्रवर्तते ॥ १९९ स्वविमानद्धिदानेन प्रीणितैविबुधैर्वृतः । सोऽनुभुङक्ते चिरं कालं सुकृती सुखमामरम् ॥ २०० तदेतद्विषिदानेन्द्रसुखोदयविकल्पितम् । क्रियाद्वयं समाम्नातं स्वर्लोकप्रभवोचितम् ॥ २०१ इति विधिदानसुखोदयौ ॥ ३५॥३६ प्रोक्तास्त्विन्द्रोपपादाभिषेकदानसुखोदयाः । इन्द्रत्यागाख्यमघुना सम्प्रवक्ष्ये क्रियान्तरम् ॥ २०२ जेव्हा त्या इन्द्राच्या आहारादिक सहा पर्याप्ति पूर्ण होतात तेव्हा त्याला आपला जन्म यथे कसा झाला याचे ज्ञान होते. यानंतर त्याचा श्रेष्ठ असे देव इन्द्राभिषेक करतात. त्यावेळी दिव्य संगीत नृत्य होते, वाद्ये वाजविली जातात व मंगलगायने गायिली जातात. इन्द्राच्या जयजयकाराचे शब्द वारंवार उच्चारले जातात. अप्सरांचे नृत्यांचे अनेक प्रकार होतात. अशा रीतीने इन्द्राचा अभिषेकविधि केल्यानंतर स्वर्गीय साम्राज्याचे मुख्य चिह्न असा तेजस्वी मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवतात. तो धारण जेव्हा इन्द्र करतो त्यावेळी कोटयवधि देव आनंदित होऊन त्याचा वारंवार जयजयकार करतात. त्यावेळी आपल्या गळ्यात तो हार धारण करतो. उत्तम वस्त्र धारण करतो आणि दिव्य अशा अलंकारानी तो भूषित होतो आणि इन्द्राच्या आसनावर आरूढ होतो. याप्रमाणे हा महात्मा पूजिला जातो. याप्रमाणे इंद्राभिषेक क्रिया ३४ वी झाली ।। १९५-१९८ ॥ यानंतर तो इन्द्र नम्र झालेल्या त्या श्रेष्ठ देवाना आपआपल्या पदावर नियक्त करतो. अशा रीतीने तो इन्द्र विधिदान क्रियेत प्रवृत्त होतो. आपआपल्या विमानांची संपदा देऊन इन्द्र त्या देवाना संतुष्ट करतो. संतुष्ट अशा देवानी घेरलेला तो पुण्यवान् इन्द्र दीर्घ कालपर्यंत देवसुखाचा अनुभव घेत राहतो. याप्रमाणे स्वर्गात उत्पन्न झालेल्या देवाना योग्य असलेल्या विधिदान व सुखोदय नांवाच्या दोन क्रिया सांगितल्या. विधिदान ही ३५ वी क्रिया व सुखोदय ही छत्तीसावी क्रिया अशा दोन क्रियांचे वर्णन केले आहे ॥ १९९-२०१॥ इन्द्रोपपाद, अभिषेक, दान, सुखोदय या क्रियांचे वर्णन केले. आता 'इन्द्रत्याग' या क्रियेचे वर्णन मी करतो- जेव्हा स्वर्गाचा राजा अशा इन्द्राचे आयुष्य काही थोडेसे उरते तेव्हा आता आपणास या स्वर्गाहून खाली अवतरावे लागेल हे जाणतो व तो देवाना याप्रमाणे उपदेश करतो. हे देवानो, तुमचे आमच्याकडून दीर्घकालपर्यन्त पालन केले गेले आहे. काही देवांना मी पित्याप्रमाणे मानले व काहींचे पुत्राप्रमाणे आम्ही लालनपालन केले आहे. काही देवाना आम्ही पुरोहित, मन्त्री, अमात्य या पदावर योजले आहे. कित्येक देवाना आम्ही मित्र व कित्येक देवाना पीठमर्द-खुषमस्कऱ्यांच्या स्थानी योजले होते व कित्येक देवाना आमच्या प्राणासारखे Page #402 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-२१६) महापुराण (३९१ किञ्चिन्मात्रावशिष्टायां स्वस्यामायुःस्थितौ स्वराट । बुद्धवा स्वर्गावतारं स्वं सोऽनुशास्त्यमरानिति॥ भोभोःसुधाशना यूयमस्माभिः पालिताश्चिरम् । केचित्पित्रीयिताः केचित्पुत्रप्रीत्योपलालिताः॥२०४ पुरोधोमन्त्र्यमात्यानां पदे केचिन्नियोजिताः । क्यस्यपीठम>यस्थाने दृष्टाश्च केचन ॥ २०५ स्वप्राणनिविशेषं च केचित्त्राणाय सम्मताः । केचिन्मान्यपदे दृष्टाः पालकाः स्वनिवासिनाम् ॥२०६ केचिच्चमूचरस्थाने केचिच्च स्वजनास्थया । प्रजासामान्यमन्ये च केचिच्चानुचराः पृथक् ॥ २०७ केचित्परिजनस्थाने केचिच्चान्तःपुरेचराः । काश्चिद्वल्लभिकादेव्योमहादेष्यश्चकाश्चन ॥ २०८ इत्यसाधारणा प्रीतिर्मयायुष्मायु दर्शिता । स्वामिभक्तिश्च युष्माभिर्मय्यसाधारणी धृता ॥ २०९ साम्प्रतं स्वर्गभोगेषु गतो मन्देच्छतामहम् । प्रत्यासना हि मे लक्ष्मीरद्य भूलोकगोचरा ॥ २१० युष्मत्साक्षि ततः कृत्स्नं स्वःसाम्राज्यं मयोज्झितम् । यश्चान्यो मत्समो भावी तस्मै सर्व समर्पितम् ॥ इत्यनुत्सुकतां तेषु भावयन्ननुशिष्य तान् । कुर्वन्निन्द्रपदत्यागं स व्यथां नैति धीरधीः ॥ २१२ . इन्द्रत्यागक्रिया सैषा तत्स्व गातिसर्जनम् । धीरास्त्यजन्त्यनायास्तसादैश्यं तादृशमप्यहो ॥ २१३ इति इन्द्रत्यागः ॥३७वी क्रिया अवतारक्रियास्यान्या ततःसम्परिवर्तते । कृताहत्पूजनस्यान्ते स्वर्गादवतरिष्यतः ॥ २१४ सोऽयं नजन्मसम्प्राप्त्या सिद्धि द्रागभिलाषुकः। चेतः सिद्धनमस्यायां समाधत्ते सुराधिराट् ॥२१५ शुभैःषोडशभिःस्वप्नः संसूचितमहोदयः । तदा स्वर्गावताराख्यां कल्याणीमश्नुते क्रियाम् ॥ २१६ इति इन्द्रावतारः॥ ३८ मानून त्यांचे रक्षण केले आहे. कित्येकाना देवांच्या रक्षणाकरिता पालकांच्या पदावर आम्ही योजले होते. कित्येकाना आमच्या सैन्याप्रमाणे मानले व कित्येकांना आम्ही स्वजनाप्रमाणे मानले आहे. कित्येकाना प्रजाप्रमाणे मानले. कित्येकाना नोकराप्रमाणे मानले. कित्येकाना आम्ही परिजनाच्या स्थानावर नेमले होते. कित्येकाना अन्तःपुरात योजिले होते. कित्येक देवीना भोगांगना मानले व कित्येक देवीना महादेवी पट्टराण्या मानले. याप्रमाणे तुम्हा सर्वावर मी असाधारण प्रेम केले आहे. व आपण सर्वानीही माझ्याविषयी असाधारण स्वामिभक्ति दाखविली आहे. आता या स्वर्गाच्या भोग्य पदार्थाविषयी माझ्या मनात मंद इच्छा झाली आहे. आता भलोकाची लक्ष्मी प्राप्त होण्याची वेळ जवळ आली आहे. आता तमच्या सर्वांच्या साक्षीने हे सगळे स्वर्ग-साम्राज्य मी त्यागले आहे. जो माझ्यासारखा येथे पुढे उत्पन्न होईल त्याला मी हे सर्व अर्पण केले आहे. याप्रमाणे या सर्व वैभवात तो इन्द्र अनुत्सुकता-उदासीनतेचे चिन्तन करतो व व्यथा-दुःख न मानता तो धीर इन्द्रपदाचा त्याग करतो. ही इन्द्रत्यागक्रिया आहे. अर्थात् स्वर्गीय सर्व भोगांचा त्याग आहे. धीर पुरुष अशा रीतीचे महान् ऐश्वर्य ही अनायासाने त्यागतात. हे महाश्चर्य आहे. याप्रमाणे इन्द्रत्याग ही ३७ वो क्रिया पूर्ण झाली ।। २०२-२१३॥ यानंतर या इन्द्राची अवतार क्रिया होते. स्वर्गातून अवतरण्याच्या पूर्वी हा अर्हत्पूजन करतो. हा इन्द्र मनुष्य जन्म प्राप्त करून घेऊन शीघ्र मुक्तीची अभिलाषा धरतो. म्हणून आपले चित्त सिद्धाना नमस्कार करण्यात लावतो. यानन्तर सोळा शुभ स्वप्नाच्याद्वारे ज्याने आपला मोठा त्कर्ष सूत्रित केला आहे असा तो इन्द्र स्वर्गावतार नामकल्याण करणान्या क्रियेला प्राप्त होतो. याप्रमाणे ही इन्द्रावतार क्रिया ३८ वी आहे ॥ २१४-२१६ ॥ Page #403 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९२) महापुराण (३८-२१७ सतोऽवतीर्णो गर्भेऽसौ रत्नगर्भगृहोपमे । जनयित्र्या महादेव्यां श्रीदेवीभिविशोधिते ॥ २१७ हिरण्यवृष्टि धनदे प्राक्षण्मासान्प्रवर्षति । अन्वायान्त्यामिवानन्दात्स्वर्गसम्पदि भूतले ॥ २१८ अमृतश्वसने मन्दमावाति व्याप्तसौरभे। भूदेव्या इव निःश्वासे प्रक्लप्ते पवनामरैः ॥ २१९ दुन्दुभिध्वनिते मन्द्रमुत्थिते पथिवार्मुचाम् । अकालस्तनिताशङ्कामातन्वति शिखण्डिनाम् ॥ २२० मन्दारस्रजमम्लानिमामोदाह्रतषट्पदाम् । मुञ्चत्सु गुह्यकारव्येषु निकायेष्वमृताशिनाम् ॥ २२१ देवीषपचरन्तीषु देवीं भुवनमातरम् । लक्षम्या स्वयंसमागत्य श्रीहीधीतिकोतिषु ॥ २२२ कस्मिश्चित्सुकृतावासे पुण्ये राजर्षिमन्दिरे । हिरण्यगर्भो धत्तेऽसौ हिरण्योत्कृष्टजन्मनाम् ॥ २२३ हिरण्यसूचितोत्कृष्टजन्मत्वात्स तथाश्रुतिम्। विभ्राणां तां क्रियां धत्ते गर्भस्थोऽपि त्रिबोधषत् ॥२२४ इति हिरण्यजन्मता॥३९ विश्वेश्वरी जगन्माता महादेवी महासती । पूज्या सुमङ्गला चेति धत्ते रूढिं जिनाम्बिका ॥ २२५ ____रत्ननिर्मित गर्भगृहाप्रमाणे असलेला श्री आदिक देवतानी शुद्ध केलेला, महादेवीपदाला पावलेल्या अशा जननीच्या गर्भात तो इन्द्र अवतरतो. तो मातेच्या गर्भात येण्यास सहा महिन्याचा अवधि असतो अशा वेळी कुबेर-हिरण्य-सुवर्ण वृष्टि करीत असतो. जणु स्वर्गातून या इन्द्राची सम्पत्ति खाली येत आहे असे वाटते ॥ २१७-२१८ ।।। वायुकुमारानी जणु निर्माण केलेला भूदेवीचा जणु निश्वास आहे असा व ज्याचा सुगंध चोहोकडे पूर्ण भरला आहे असा अमृतासारखा वायु वाहात असतो ।। २१९ ॥ ___ मेघमार्गात-आकाशात गंभीर असा नगाऱ्यांचा ध्वनि होतो व मोराना अकाली मेघांची गर्जना होत आहे असा भास होतो ।। २२० । देवांच्या भेदात अन्तर्भूत अशा गुह्यक देवाकडून विकसित झालेल्या मंदारपुष्पांच्या माला ज्यानी आपल्या सुगंधाने भुंग्याना ओढून आणिले आहे त्या चोहोकडे वर्षिल्या जात होत्या ॥ २२१ ॥ श्री, ही, बुद्धि, धृति व कीति या देवता लक्ष्मीसह स्वतः येतात व त्रैलोक्यमाता अशा जिनजननीची सेवा करतात ॥ २२२ ॥ पुण्याचे घर असलेल्या पुण्ययुक्त-पवित्र अशा कोणा एका श्रेष्ठ राजाच्या मंदिरात हिरण्यगर्भ भगवान सुवर्णासमान उत्कृष्ट जन्माला धारण करतात ।। २२३ ॥ प्रभु गर्भात राहून देखिल तीन ज्ञानाना-मति, श्रुत व अवधि ज्ञानाना धारण करतात व हिरण्य-सुवर्ण वृष्टीनी जन्माची उत्कृष्टता सूचित होत असल्यामुळे हिरण्योत्कृष्ट जन्म या सार्थक नांवाला धारण करणान्या क्रियेला धारण करतात. याप्रमाणे हिरण्यगर्भता क्रिया ३९ वी संपली ।। २२४ ॥ विश्वेश्वरी, जगन्माता, महादेवी, महासती, पूज्या, सुमंगला इत्यादि नांवे जिनमातेला आहेत ॥ २२५ ।। Page #404 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-२३३) कुलाद्विनिलया देव्यः श्रीह्रीधीधृतिकीर्तयः । समं लक्ष्म्या षडेताश्च सम्मता जिनमातृकाः ।। २२६जन्मानन्तरमायातैः सुरेन्द्ररुर्मूर्धनि । योऽभिषेकविधिः क्षीरपयोधेः शुचिभिर्जलैः ॥ २२७ मन्दरेन्द्राभिषेकोऽसौ क्रियास्य परमेष्ठिनः । सा पुनः सुप्रतीतत्वाद्भूयो नेह प्रतन्यते ॥ २२८ इति मन्दरेन्द्राभिषेकः ॥ ४० ततो विद्योपदेशोऽस्य स्वतन्त्रस्य स्वयम्भुवः । शिष्यभावव्यतिक्रान्तिर्गुरुपूजोपलम्भनम् ।। २२९ तदेन्द्राः पूजयन्त्येतं त्रातारं त्रिजगद्गुरुम् । अशिक्षितोऽपि देव त्वं सम्मतोऽसीति विस्मिताः ॥ २३० इति गुरुपूजनम् ॥ ४१ ततः कुमारकालेऽस्य यौवराज्योपलम्भनम् । पट्टबन्धोऽभिषेकश्च तदास्य स्यान्महौजसः ।। २३१ इति यौवराज्यम् ॥ ४२ स्वराज्यमाधिराज्येऽभिषिक्तस्यास्य क्षितीश्वरः । शासतः सार्णवामेनां क्षितिमप्रतिशासनाम् ॥ २३२ इति स्वराज्यम् ॥ ४३ महापुराण चक्रलाभो भवेदस्य निधिरत्नसमुद्भवे । निजप्रकृतिभिः पूजा साभिषेकाधिराडिति ॥ २३३ इति चक्रलाभः ॥ ४४ ( ३९३ हिमवदादि कुलपर्वतावर राहणाऱ्या श्री, नही, घी-बुद्धि, धृति, कीर्ति व लक्ष्मी या सहा देवता जिनमाता मानल्या जातात ।। २२६ ॥ जेव्हां प्रभूंचा जन्म होतो तेव्हा देवेन्द्र स्वर्गावरून येतात आणि क्षीरसमुद्राच्या पवित्र पाण्यांनी मेरु पर्वतावर परमेष्ठी जिनबालकाचा अभिषेक करतात त्या क्रियेला मन्दरेन्द्राभिषेक म्हणतात. ती क्रिया प्रसिद्ध असल्यामुळे येथे तिचा विस्तार सांगत नाही. याप्रमाणे मन्दरेन्द्राभिषेक क्रिया ही ४० वी क्रिया आहे ।। २२७-२२८ ।। यानंतर जे स्वतन्त्र व स्वयम्भू आहेत अशा भगवंताचा विद्योपदेश होतो. अर्थात् शिष्यपणावाचूनच ते गुरुपूजेला प्राप्त होतात. तेव्हा सर्वांचे रक्षण करणारे त्रैलोक्यगुरु अशा जिनेश्वरांचे इन्द्र पूजन करतात व हे प्रभो, आपण अशिक्षित असूनही आम्हास गुरु म्हणून मान्य आहात असे आश्चर्याने म्हणतात. याप्रमाणे गुरुपूजन ही क्रिया ४१ वी आहे ।। २२९-२३० ॥ यानंतर कुमारावस्था प्राप्त झाल्यावर या जिनदेवाला यौवराज्याची प्राप्ति होते व त्यावेळी महातेजस्वी अशा या जिनेश्वरास पट्टबंधन अभिषेक होतो. ही योवराज्यक्रिया ४२ वी आहे ।। २३१ ॥ मग अनेक राजानी मुख्यराजाच्या पदावर या जिनेश्वराचा अभिषेक केल्यावर जिच्यावर दुसऱ्याची आज्ञा चालत नाही अशा समुद्रासह या पृथ्वीवर आपली आज्ञा प्रभु चालवितात. अशा या प्रभूंची ही स्वराज्यक्रिया होय ।। २३२ ।। यानंतर या प्रभूला निधि व रत्नांची प्राप्ति होते व चक्ररत्नही प्राप्त होते. त्यावेळी सर्व प्रजा परिवार त्याना राजाधिराज मानून त्यांचा अभिषेकपूर्वक आदर करतात. ही चक्रलाभ नांवाची चव्वेचाळीसावी क्रिया होय ।। २३३ ॥ म. ५० Page #405 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९४) महापुराण (३८-२३४ दिशाञ्जयः स विज्ञेयो योऽस्य दिग्विजयोद्यमः । चक्ररत्न पुरस्कृत्य जयतः सार्णवां महीम् ॥२३४ इति दिशां जयः ॥ ४५ सिद्धदिग्विजयस्यास्य स्वपुरानप्रवेशने । क्रिया चक्राभिषेकाहा साधुना सम्प्रकीर्त्यते ॥ २३५ चक्ररत्नं पुरोधाय प्रविष्टः स्वं निकेतनम् । परायविभवोपेतं स्वविमानापहासि यत् ॥ २३६ तत्र क्षणमिवासीनो रम्ये प्रमदमण्डपे । चामरोज्यमानोऽयं सनिर्झर इवाद्रिराट् ॥ २३७ सम्पूज्य निधिरत्नानि कृतचक्रमहोत्सवः । दत्वा किमिच्छकं दानं मान्यान्संमान्य पार्थिवान् ॥ २३८ ततोऽभिषेकमाप्नोति पार्थिवैर्महितान्वयैः । नान्दीतूर्येषु गम्भीरं प्रध्वनत्सु सहस्रशः ॥ २३९ यथावदभिषिक्तस्य तिरीटारोपणं ततः । क्रियते पार्थिवर्मुख्यश्चतुभिः प्रथितान्वयः ॥ २४० महाभिषेकसामग्या कृतचक्राभिषेचनः । कृतमङगलनेपथ्यः पार्थिवैः प्रणतोऽभितः ॥ २४१ तिरीटं स्फुटरत्नांशुजटिलीकृतदिङमुखम् । दधानश्चक्रसाम्राज्यककुदं नृपपुङगवः ॥ २४२ रत्नांशुच्छरितं बिभ्रत्कर्णाभ्यां कुण्डलद्वयम् । यद्वाग्देव्याः समाक्रोडारथचक्रद्वयायितम् ॥ २४३ तारालितरलस्थूलमुक्ताफलमुरोगृहे । धारयन्हारमाबद्धमिव मङगलतोरणम् ॥ २४४ चक्ररत्न प्राप्त झाल्यावर प्रभु दिग्विजयासाठी उद्यम करतात. अर्थात् चक्ररत्न पुढे करून संपूर्णसमुद्रासह पृथ्वीला जिंकतात. या क्रियेला दिग्विजय म्हणतात. ही क्रिया ४५ वी होय ॥ २३४ ॥ __ जेंव्हा जिनप्रभु चक्रपति आपला दिग्विजय पूर्ण करून आपल्या नगरात प्रवेश करतात तेव्हा त्यांची चक्राभिषेकक्रिया होते. तिचे आता वर्णन करतात- प्रभूचा प्रासाद अत्युत्कृष्ट वैभवाने युक्त असल्यामुळे स्वर्गातल्या विमानास तो हासत असतो. अशा आपल्या प्रासादात प्रवेश करून क्षणपर्यंत तेथील रमणीय प्रमदनामक मंडपात ते बसतात. त्यावेळी ज्यांच्यावर चामरे वारली जातात असे प्रभु अनेक झऱ्यानी युक्त मेरुपर्वताप्रमाणे शोभतात. त्यावेळी ते चक्राचा महान् उत्सव साजरा करतात. अर्थात् नऊ निधींची व चक्ररत्नाची पूजा करून याचकाना तुम्हाला काय पाहिजे असे विचारून त्याला ते देतात आणि माननीय राजांचा त्यावेळी ते सम्मान करतात ।। २३५-२३८ ॥ _यानन्तर लोकमान्यकुलात उत्पन्न झालेले राजे हजारो मंगलवाद्ये गंभीरपणाने वाजत असता प्रभूचा अभिषेक करितात ।। २३९ ।। शास्त्रोक्त अभिषेक झाल्यावर प्रसिद्ध वंशातील चार राजे प्रभूच्या मस्तकावर मुकुट ठेवतात ।। २४० ॥ ___ महाभिषेकाच्या सामग्रीने प्रभूच्या चक्ररत्नालाही अभिषेक घालतात. त्यावेळी नाना भूषणांनी भूषित अशा प्रभूला सर्व राजे नम्र होऊन नमस्कार करतात ।। २४१ ।। सर्व राजांचे मुकुटमणि अशा प्रभूनी जो मुकुट मस्तकावर धारण केलेला असतो त्यातील रत्नांच्या किरणानी सर्व दिशामुखे अगदी चमकत असतात. ज्यांच्या रत्नांची कान्ति पसरलो आहे अशी दोन कुण्डले त्यानी आपल्या कानात धारण केलेली असतात. ती जणु Page #406 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-२५२) विलसद्ब्रह्मसूत्रेण प्रविभक्ततनुन्नतिः । तटनिर्झर सम्पातरम्य मूर्तिरिवाद्रिपः ॥ २४५ सद्रत्नकटकं प्रोच्चैः शिखरं भुजयोर्युगम् । द्राधिमश्लाघि बिभ्राणः कुलक्ष्माद्वयायितम् ॥ २४६ कटिमण्डलसंसक्त लसत्काञ्चीपरिच्छदः । महाद्वीप इवोपान्त रत्नवेदी परिष्कृतः ।। २४७ मन्दारकुसुमामोदलग्नालिकुलझङकृतैः । किमप्यारब्धसङ्गीतमिव शेखर मुद्वहन् ॥ २४८ तत्कालोचितमन्यच्च दधन्मङगलभूषणम् । स तदा लक्ष्यते साक्षालक्ष्म्याः पुञ्ज इवोच्छिरवः ॥ प्रीताश्चाभिष्टुवन्त्येनं तदामी नृपसत्तमाः । विश्वञ्जयो दिशां जेता दिव्यमूर्तिर्भवानिति ।। २५० पौराः प्रकृतिमुख्याश्च कृतपादाभिषेचनाः । तत्क्रमार्चनमादाय कुर्वन्ति स्वशिरोधृतम् ॥ २५१ श्रीदेव्यश्च सरिद्देव्यो देव्यो विश्वेश्वरा अपि । समुपेत्थ नियोगैःस्वैस्तवैनं पर्युपासते ।। २५२ इति चक्राभिषेकः ॥ ४६ महापुराण सरस्वतीच्या रथाच्या दोन चाकाप्रमाणे शोभत होती. प्रभूनी वक्षस्थलावर जो हार धारण केला होता तो तारकांच्या पंक्तीप्रमाणे चमकणाऱ्या मोठ्या मोत्यांनी फार शोभत होता. जणु तो हार प्रभूंच्या वक्षःस्थलरूपी घरावर तोरण बांधल्याप्रमाणे शोभत होता. त्यानी गळयात ब्रह्मसूत्र धारण केले होते ते जणु त्यांच्या देहाची उंची विभागित होते. तटावरून झरे पडत असतांना पर्वत जसा सुंदर दिसतो तसे हे प्रभु त्या ब्रह्मसूत्राने सुंदर दिसत होते. ज्यांचे खांदे उंच आहेत व जे लांब आणि अतिशय सुंदर आहेत व रत्नांच्या कड्यांनी शोभत आहेत असे दोन हात दोन कुलपर्वताप्रमाणे शोभत होते ।। २४२ - २४६ ।। ( ३९५ या प्रभूंच्या कंबरेसभोवती कडदोरा शोभत होता. त्यामुळे ती कंबर सर्वबाजूंनी रत्नमयीवेदीने घेरलेल्या महाद्वीपाप्रमाणे भासत होती ॥ २४७ ॥ मंदारपुष्पांच्या सुगंधाला लुब्ध होऊन ज्याच्यावर भुंगे झंकार करीत असल्यामुळे जणु ज्याने काही मंगलगीत गायाला सुरुवात केली आहे असा तुरा चक्रवर्तीने धारण केला होता ॥ २४८ ॥ त्या चक्राभिषेकाच्या वेळी चक्रवर्तीने आणखी काही मंगलभूषणें धारण केली होती. त्यामुळे ज्यांचे किरण वर पसरले आहेत अशा लक्ष्मीचा तो जणु पुंज आहे असे वाटत होते ॥ २४९ त्या वेळी श्रेष्ठ राजे प्रीतीने हे प्रभो आपण विश्वविजयी, सर्व दिशाना जिंकणारे, व दिव्यमूर्ति आहात अशी स्तुति करूं लागले ।। २५० ।। नगरवासी लोक व मुख्य अधिकारी वर्गाने चक्रीच्या पायांचा अभिषेक केला व त्यांच्या पायांना पूजलेले पदार्थ घेऊन ते आपल्या मस्तकावर ठेवीत असत ।। २५१ ।। श्री ही आदिक देवता, गंगा, सिंधु आदिक नदीदेवता व विश्वेश्वरी आदिक देवतानीही आपल्या नियोगाला अनुसरून त्यावेळी या चक्रवर्तीची उपासना केली. याप्रमाणे चक्राभिषेकाचा ४६ वा संस्कार झाला ।। २५२ ।। Page #407 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९६) महापुराण (३८-२५३ ....................... चक्राभिषेक इत्येकः समाख्यातः क्रियाविधिः । तदनन्तरमस्य स्यात्साम्राज्याख्यं क्रियान्तरम् ॥ अपरेधुदिनारम्भे धृतपुण्यप्रसाधनः । मध्येमहानपसभं नपासनमधिष्ठितः ॥ २५४ दीप्रैः प्रकीर्णकवातः स्वर्धनीसोकरोज्ज्वलैः । वारनारीकराधूतैर्वीज्यमानः समन्ततः॥२५५ सेवागतः पृथिव्यादिदेवतांशैः परिष्कृतः। धृतिप्रशान्तिदीप्त्योजोनिर्मलत्वोपपादिभिः ॥ २५६ तान् प्रजानुग्रहे नित्यं समाधानेन योजयन् । संमानदानविधम्भैः प्रकृतीरनुरञ्जयन् ॥ २५७ पार्थिवान्प्रणतान्यूयं न्यायैः पालयत प्रजाः । अन्यायेषु प्रवृत्तिश्चेद्वत्तिलोपो ध्रुवं हि वः ॥ २५८ न्यायश्च द्वितयो दुष्टनिग्रहः शिष्टपालनम् । सोऽयं सनातनः क्षात्रो धर्मो रक्ष्यः प्रजेश्वरैः ॥२५९ दिव्यास्त्रदेवताश्चामूराराध्या:स्युविधानतः । ताभिस्तु सुप्रसन्नाभिरवश्यं भावुको जयः ॥ २६० राजवृत्तिमिमां सम्यक्पालयद्भिरतन्द्रितैः । प्रजासु वर्तितव्यं भो भवद्भिर्यायवर्त्मना ॥ २६१ पालयेद्य इमं धर्म स धर्मविजयी भवेत् । मां जयेद्विजितात्मा हि क्षत्रियो न्यायजीविकः ॥ २६२ चक्राभिषेक हा एक क्रियाविधि सांगितला. यानंतर साम्राज्य नामक आता दुसरी क्रिया सांगतात ।। २५३ ॥ दुसरे दिवशी ज्याने मंगल वस्त्रालंकार धारण केले आहेत असा तो सम्राट् मोठ्या राजसभेत राजसिंहासनावर आरूढ होतो ।। २५४ ॥ चमकणारे व गंगानदीच्या जलकणाप्रमाणे निर्मल शुभ्र असे चामरसमूह हातात घेऊन वारांगना सर्व बाजूंनी या चक्रवर्तीवर ती ज्या धृति सन्तोष, अतिशय शान्ति, कान्ति, ओज-बल व निर्मलपणा उत्पन्न करणाऱ्या देवतांचा अंश धारण करणाऱ्या पृथिव्यादि देवतांनी अर्थात् वैक्रियिक शरीराने आलेल्या देवतानी जो सेविला जात आहे असा तो चक्रवर्ती सिंहासनावर बसून प्रधानादिकांना सम्मान करणे, त्यांना पारितोषिक देणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे इत्यादिकानी त्यांचे अनुरंजन करतो व प्रजेवर अनुग्रह करण्याकरिता त्यांची योजना करतो ।। २५६-२५७ ॥ नम्र झालेल्या राजाना तो चक्रवर्ती असा उपदेश करतो- हे राजानो, तुम्ही न्यायाने प्रजांचे पालन करा. अन्यायांत जर तुमची प्रवृत्ति होईल तर तुमची वृत्ति नष्ट होईल तुम्हाला राज्यपदावरून काढून टाकले जाईल हे निश्चित समजा ॥ २५८ ॥ न्याय दोन प्रकारचा आहे-दुष्टाना शिक्षा करणे व शिष्टांचे पालन-रक्षण करणे. हा क्षत्रियांचा सनातन धर्म प्रजेचे स्वामी असलेल्या राजांनी अवश्य पाळला पाहिजे ॥ २५९ ॥ दिव्य अशा अस्त्रदेवतांची आराधना विधिपूर्वक राजानी केली पाहिजे व त्या सुप्रसन्न झाल्या असता अवश्य जय मिळतो ॥ २६० ।। या क्षत्रियांच्या अर्थात् राजांच्या कर्तव्याचे पालन आळसरहित होऊन त्यांनी केले पाहिजे. हे नृपानो तुम्ही प्रजेविषयी न्यायमार्गाने आपली वागणूक ठेवा. जो क्षत्रिय हा न्यायराजधर्म पाळील, तो धर्मविजयी राजा पृथ्वीला जिंकील. न्यायाने जीविका करणारा राजा अन्यायाचा पराजय करून आपल्या आत्म्याला स्वाधीन करणारा होऊन पृथ्वीला जिकील. ॥ २६१-२६२ ।। Page #408 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-२७०) महापुराण इहैव स्याधशोलाभो भूलाभश्च महोदयः । अमुत्राभ्युदयावाप्ति, मात्रैलोक्यनिर्जयः ॥ २६३ इति भूयोऽनुशिष्यैतान्प्रजापालनसद्विधौ । स्वयं च पालयत्येतान्योगक्षेमानुचिन्तनः ॥ २६४ तदिदं तस्य साम्राज्यं नाम धर्मक्रियान्तरम् । येनानुपालितेनायमिहामुत्र च नन्दति ॥२६५॥ इति साम्राज्यम् ॥४७ एवं प्रजाः प्रजापालानपि पालयतश्चिरम् । काले कस्मिश्चिदुत्पन्नबोधे दीक्षोद्यमो भवेत् ॥ २६६ सैषा निष्क्रान्तिरस्येष्टा क्रिया राज्याद्विरज्यतः । लौकान्तिकामरैर्भूयो बोधितस्य समागतः ॥२६७ कृतराज्यार्पणो ज्येष्ठे सूनो पार्थिवसाक्षिकम् । सन्तानपालने चास्य करोतीत्यनुशासनम् ॥२६८ त्वया न्यायधनेनाङग भवितव्यं प्रजातौ । प्रजा कामदुधा धेनुर्मता न्यायेन योजिता ॥२६९ राजवृत्तमिदं विद्धि यन्न्यायन धनार्जनम् । वर्धनं रक्षणं चास्य तीर्थे च प्रतिपादनम् ॥ २७० त्या राजाला या लोकीं यशःप्राप्ति होईल. पृथ्वीप्राप्ति होईल आणि मोठा उत्कर्ष होईल. व परलोकी त्याला अभ्युदय स्वर्ग प्राप्त होईल. आणि तो त्रैलोक्याला जिंकील म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होईल ॥ २६३ ।। __ याप्रमाणे प्रजापालनाच्या पद्धतीचा वारंवार सर्व लोकाना उपदेश करून व स्वतः योगक्षेमाचे चिन्तन करून प्रजेचे तो चक्रवर्ती पालन करतो ॥ २६४ ॥ याप्रमाणे त्या चक्रवर्तीची साम्राज्यनामक ही क्रिया आहे. या क्रियेच्या पालनाने हा परमेष्ठी-चक्रवर्ती इहलोकी व परलोकी सुखी होतो. याप्रमाणे ही ४७ वी साम्राज्यक्रिया आहे. ॥ २६५ ॥ निष्क्रान्तिक्रियेचे वर्णन याप्रमाणे आपल्या प्रजेचे व अनेक राजांचेही दीर्घकालपर्यन्त जिनप्रभु रक्षण करीत असता त्यांना एकेवेळी भेदविज्ञान उत्पन्न होते व ते दीक्षा घेण्यासाठी उद्युक्त होतात ॥ २६६ ॥ त्यावेळी ते राज्यापासून विरक्त होतात. ही. त्यांची निष्क्रान्ति क्रिया होय. त्यावेळी लौकान्तिक देव येऊन त्यांच्या वैराग्याला पुनः वृद्धिंगत करतात ॥ २६७ ।। त्यावेळी ते प्रभु आपल्या जेष्ठ पुत्राला सर्व राजांच्या समक्ष राज्य अर्पण करतात व 'प्रजेच्या पालनाविषयी त्याला याप्रमाणे उपदेश करतात ।। २६८ ॥ हे पुत्रा, न्यायधनाचे रक्षण कर अर्थात् न्यायाने प्रजेचे पालन कर. न्यायाने प्रजेचे रक्षण केले असता ती प्रजा कामधेनूसारखी होते. अर्थात् प्रजा राजाच्या सर्व मनोरथाना पूर्ण करते ॥ २६९ ॥ __ राजाने न्यायाने धन मिळवावे, ते वाढवावे त्याचे रक्षण करावे, आणि योग्य पात्रात त्याचा व्यय करावा. यालाच राजवृत्त अर्थात् राजाचे कर्तव्य समज ॥ २७० ।। Page #409 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९८) महापुराण (३८-२७१ प्रजानां पालनाथं च मतं मत्यनुपालनम् । मतिहिताहितज्ञानमात्रिकामुत्रिकार्थयोः ॥ २७१ ततः कृतेन्द्रियजयो वृद्धसंयोगसम्पदा । धर्मार्थशास्त्रविज्ञानात् प्रज्ञां संस्कर्तुमर्हति ॥२७२ अन्यथा विमतिर्भूपो युक्तायुक्तानभिज्ञकः । अन्यथान्यैः प्रणेयः स्यान्मिथ्याज्ञानलबोद्धतः ॥ २७३ कुलानुपालने चायं महान्तं यत्नमाचरेत् । अज्ञातकुलधर्मो हि दुवृत्तैर्दूषयेत्कुलम् ॥ २७४ तथायमात्मरक्षायां सदा यत्नपरो भवेत् । रक्षितं हि भवेत्सर्व नृपेणात्मनि रक्षिते ॥ २७५ अपायो हि सपत्नेभ्यो नृपस्यारक्षितात्मनः । आत्मानुजीविवर्गाच्च क्रुखलुब्धविमानितात् ॥ २७६ तस्माद्रसदतीक्ष्णादीनुपायानरियोजितान् । परिहत्य निरिष्टैः स्वं प्रयत्नेन पालयेत् ॥ २७७ स्यात्समञ्जसवृत्तित्वमप्यस्यात्मादिरक्षणे । असमञ्जसवृत्तो हि निजेरप्यभिभूयते ॥ २७८ प्रजेचे पालन करण्यासाठी आपली बुद्धि रक्षावी. त्यास सत्यनुपालन म्हणतात. अर्थात् इहलोकसंबंधी आणि परलोकसंबंधी जो हिताहिताचा विचार करणे त्याला मति म्हणतात ॥ २७१ ॥ वद्ध अनुभवी विद्वान लोकांची संगतिरूपी संपत्ति जवळ बाळगावी व त्यामुळे आपल्या इन्द्रियांना ताब्यात ठेवता येते, जिंकता येते. त्या विद्वानापासून धर्म व अर्थ या शास्त्रांचे ज्ञान होते व त्यामुळे आपली बुद्धि सुसंस्कृत होते ।। २७२ ।। ___जर अनुभवी लोकांचा राजाने संग्रह केला नाही तर मूर्ख राजाला युक्त कोणते व अयोग्य कोणते हे समजणार नाही. व अशा राजावर मिथ्याज्ञानाने अल्पज्ञानाने उद्धत बनलेल्या लोकांचा पगडा बसेल ॥ २७३ ॥ राजानी आपल्या कुलाचे रक्षण करण्यासाठी फार मोठा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला आपल्या कुलाच्या धर्माच्या मर्यादांचे ज्ञान नाही तो राजा दुराचारानी आपले कुल दूषित करील ।। २७४ ॥ याचप्रमाणे राजाने स्वतःचे रक्षण करण्याच्या कार्टी नेहमी दक्ष रहावे, यत्न करावा. राजाने आपले रक्षण केले तर तो सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ होतो ॥ २७५ ॥ जर राजाने आपल्या रक्षणाची काळजी घेतली नाही तर शत्रूपासून त्याला अपाय होईल. तसेच जे रागावले आहेत, जे लोभी आहेत, ज्यांचा आपण अपमान केला असेल अशा आपल्या नोकरवर्गापासूनही नाश होतो ॥ २७६ ।। प्रारंभी गोड पण परिणामी कटु असे शत्रूकडून उपाय योजले जातात त्याचा परिहार करून जे आवडते असे आपले लोक आहेत त्यांच्याकडून आपले रक्षण करून घ्यावे ।। २७७ ॥ याचप्रमाणे राजाच्या ठिकाणी समञ्जसवृत्तिही असावी लागते. अर्थात् त्याने स्वतःचे व प्रजांचे रक्षण करण्यात तत्पर असावे, पक्षपातरहित असावे. पण जो राजा असंमजसवृत्तीचा असतो त्याचा स्वतःच्या लोकाकडूनदेखील अपमान होतो ॥ २७८ ॥ Page #410 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-२८६) महापुराण (३९९ समञ्जसत्वमस्यष्टं प्रजास्वविषमेक्षिता । आनॅशस्यमवाग्दण्डपारुष्यादिविशेषितम् ॥ २७९ ततो जितारिषड्वर्गः स्वां वृत्ति पालयन्निमाम् । स्वराज्ये सुस्थितो राजा प्रेत्य चेह च नन्दति ॥ समं समञ्जसत्वेन कुलमत्यात्मपालनम् । प्रजानुपालनं चेति प्रोक्ता वृत्तिर्महीक्षिताम् ॥ २८१ ततःक्षात्रमिमं धर्म यथोक्तमनुपालयन् । स्थितो राज्ये यशो धर्म विजयं च त्वमाप्नुहि ॥ २८२ प्रशान्तधीः समुत्पन्नबोधिरित्यनुशिष्य तम् । परिनिष्क्रान्तिकल्याणे सुरेन्द्ररभिपूजितः ॥ २८३ महादानमथो दत्वा साम्राज्यपदमुत्सृजन् । स राजराजो राजर्षिनिष्कामति गृहाद्वनम् ॥ २८४ धौरेयः पार्थिवैः किञ्चित्समुत्क्षिप्तां महीतलात् । स्कन्धाधिरोपितां भूयःसुरेन्द्रर्भक्तिनिर्भरैः ॥ आरूढः शिबिकां दिव्यां दीप्तरत्नविनिर्मिताम । विमानवसति भानोरिवायातां महीतलम् ॥२८६ सर्व प्रजेला समान रीतीने पाहणे, कोणाबरोबर पक्षपात न करणे हे संमजसत्व होय. यात दुष्टपणा उत्पन्न झाला, घातकवृत्ति उत्पन्न झाली तर हा समंजसपणा नाहीसा होतो. म्हणून क्रूरपणा त्यागणे व कठोर वचन त्यागणे आणि कठोर दण्ड न देणे यांनी समंजसपणा उत्पन्न होतो ।। २७९ ॥ याप्रकारे जो वागतो कामक्रोधादिक अर्थात् काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मात्सर्य यांना जिंकतो याप्रमाणे समंजसवृत्ति आदि व उपयुक्त वृत्तींनी वागणारा राजा आपल्या राज्यात चांगल्या रीतीने राहतो व तो इहलोकी व परलोकीदेखील सुखी होतो ॥ २८० ॥ या समंजसवृत्तीबरोबर आपल्या कुलाची मर्यादा राखणे, आपल्या बुद्धीचे स्वमतीचे रक्षण करणे व प्रजांचे रक्षण करणे असे राजाचे कर्तव्य आहे ॥ २८१ ।। हा क्षात्रधर्म वर सांगितल्याप्रमाणे जो राजा पाळतो तो राजा स्वराज्यामध्ये स्थिर होतो आणि त्याला कीर्ती लाभते, धर्म प्राप्त होतो व विजय मिळतो. हे पुत्रा, तू याप्रमाणे वाग म्हणजे तुला कीर्ति, धर्म व विजय मिळेल. ।। २८२ ॥ ज्यांची बुद्धि शांत झाली आहे, ज्याना वैराग्य-भेदविज्ञान उत्पन्न झाले आहे असे ते भगवान् पुत्राला याप्रमाणे उपदेश देतात. यानंतर दीक्षाकल्याणात ते सर्व इंद्राकडून पूजिले जातात ॥ २८३ ।। ___ यानंतर ते महादान देतात व साम्राज्यपदाचा त्याग करतात व सर्व राजांचे स्वामी, राजर्षि असे भगवान् घरातून वनाकडे जातात ॥ २८४ ।। त्यावेळी मुख्य असे काही राजे ती पालखी जमीनीवरून उचलून खांद्यावर धारण करतात आणि अतिशय भक्तीने काही पावले नेतात. यानंतर अतिशय भक्तीने भरून सुरेन्द्र ती पालखी खांद्यावर धारण करतात ।। २८५ ॥ ती पालखी दिव्य असते अतिशय उज्ज्वल रत्नानी बनविलेली असते. जणू सूर्याच्या विमानात तिचा निवास होता व तेथून ती या भूतलावर आली आहे असे पाहणाऱ्यांना वाटते. अशा त्या पालखीत प्रभु बसलेले असतात, आरूढ झालेले असतात ॥ २८६ ॥ Page #411 -------------------------------------------------------------------------- ________________ ४००) महापुराण (३८-२८७ पुरःसरेष निःशेषनिरुद्धव्योमवीथिषु । सुरासुरेषु तन्वत्सु सन्दिग्धार्कप्रभं नभः ॥ २८७ अन्तःस्थितेषु सम्प्रीत्या पार्थिवेषु ससम्भ्रमम् । कुमारमग्रतःकृत्वा प्राप्तराज्यं नवोदयम् ॥ २८८ अनुयायिनि तत्त्यागादिव मन्दीभवद्युतौ । निधीनां सहरस्नानां सन्दोहेऽभ्यर्णसाक्षये ॥ २८९ सैन्ये च कृतसन्नाहि शनैःसमनुगच्छति । मरुघूतध्वजवातनिरुद्धपवनाध्वनि ॥ २९० ध्वनत्सु सुरतूर्येषु नृत्यत्यप्सरसा गणे । गायन्तीषु कलक्वाणं किन्नरीषु च मंगलम् ॥ २९१ भगवानभिनिष्क्रान्तःपुण्ये कस्मिंश्चिदाश्रमे । स्थितःशिलातले स्वस्मिश्चेतसीवातिविस्तुते ॥२९२ निर्वाणवीक्षयात्मानं योजयन्नद्भुतोदयः । सुराधिपैःकृतानन्दचितः परयेज्यया ॥ २९३ योऽत्र शेषो विधिर्मुक्तःकेशपूजादिलक्षणः । प्रागेव स तु निर्णीतो निष्क्रान्तौ वृषभेशिनः ॥ २२४ इति निष्क्रान्तिः ॥ ४८ सुर व असुर देव पुढे चाललेले असतात व त्यांनी सर्व आकाशाचे मार्ग रोकलेले असतात व त्यांनी व्याप्त झालेले आकाश सूर्याच्या कान्तीने व्याप्त झाले की काय असा संशय उत्पन्न होतो ।। २८७ ॥ ज्याला राज्य प्राप्त झाले आहे व ज्याला नवीन उदय प्राप्त झाला आहे अशा कुमाराला पुढे करून राजे प्रभुपुढे उभे राहतात ॥ २८८ ।। भगवंताच्या जवळ राहणे अर्थात् भगवंताचा संबंध आता ज्यांचा सुटला आहे व त्यामुळे जणू ज्यांची कान्ति मंद झाली आहे असा निधीचा व रत्नांचा समूह प्रभूच्या पाठीमागून जात होता ॥ २८९॥ वाऱ्याने हालत असलेल्या ध्वजांना हातात घेऊन ज्यांनी आकाश व्याप्त केले आहे, असे सज्ज सैन्य प्रभूच्या पाठीमागून हळूहळू जात होते ॥ २९० ।। त्यावेळी देवांची वाद्ये वाजत होती, अप्सरांचा समूह नाचत होता, किन्नरी देवी आपल्या मधुर स्वराने मंगलगाणे गात होत्या ।। २९१ ।। त्यावेळी दीक्षा घेण्यासाठी निघालेले भगवान पवित्र अशा एका आश्रमात शिलातलावर उभे राहिले. ते शिलातल प्रभूच्या हृदयाप्रमाणे अतिशय विस्तृत होते ।। २९२ ।। ज्यांचा उदय आश्चर्य उत्पन्न करणारा आहे व देवांच्या स्वामींनी इंद्रानी आनंदाने उत्कृष्ट पूजेने ज्यांना पूजिले आहे असे भगवंत त्यावेळी मोक्षप्राप्ति करून देणाऱ्या दीक्षेने युक्त झाले ॥ २९३ ॥ या दीक्षेत केशलोच करणे, त्या केशांची पूजा करणे, आदिकांचे वर्णन येथे केले नाही, ते सर्व आदिभगवंताच्या दीक्षेच्या प्रकरणात आचार्यानी त्याचा निर्णय केला आहे. याप्रमाणे निष्क्रान्ति क्रिया वणिली आहे ।। २९४ ।। Page #412 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-३०३) महापुराण परिनिष्क्रान्तिरेषा स्याक्रिया निर्वाणदायिनी । अतः परं भवेदस्य मुमुक्षोर्योगसम्महः ॥ २९५ यदायं त्यक्तबाह्यान्तःसङगो नैःसङग्यमाचरेत् । सुदुर्धरं तपोयोगं जिनकल्पमनुत्तरम् ॥ २९६ तदास्य क्षपकश्रेणीमारूढस्योचिते पदे । शुक्लध्यानाग्निनिर्दग्धघातिकर्मघनाटवेः ॥ २९७ प्रादुर्भवति निःशेषबहिरन्तर्मलक्षयात् । केवलाख्यं परञ्ज्योतिर्लोकालोकप्रकाशकम् ॥ २९८ तदेतत्सिद्धसाध्यस्य प्राप्नुषःपरमं महः । योगसम्मह इत्याख्यामनुधत्ते क्रियान्तरम् ॥ २९९ मानध्यानसमायोगो योगो यस्तत्कृतो महः । महिमातिशयः सोऽयमाम्नातो योगसम्महः ॥३०० इति योगसम्महः ॥ ४९ ततोऽस्य केवलोत्पत्तौ पूजितस्यामरेश्वरैः । बहिविभूत्तिरुद्भता प्रातिहार्यादिलक्षणा ॥ ३०१ प्रातिहार्याष्टकं दिव्यं गणो द्वादशधोदितः । स्तूपहावलीसालवलयः केतुमालिका ॥ ३०२ इयादिकामिमां भूतिमद्भुतामुपबिभ्रतः। स्यादाहन्त्यमिति ख्यातं क्रियान्तरमनन्तरम् ॥ ३०३ इति आर्हन्त्यक्रिया ॥ ५० ही परिनिष्क्रान्ति नांवाची क्रिया निर्वाण-मोक्ष देणारी सांगितली. यानंतर या मोक्षेच्छूची 'योगसंमह' नांवाची क्रिया होते ती अशी ।। २९५ ।। जेव्हां बाह्याभ्यन्तर परिग्रहांचा त्याग केलेले हे जिनराज निष्परिग्रह होतात तेव्हां हे अत्यंत दुर्धर असा तपोयोग धारण करतात. त्याला उत्कृष्ट जिनकल्प म्हणतात ।। २९६ ॥ ___त्यावेळी हे जिनप्रभु क्षपकश्रेणीच्या योग्य गुणस्थानावर आरूढ होतात व शुक्लध्यानाग्नीने घातिकर्मरूपी दाट जंगल जाळून भस्म करतात व त्याच्या बाह्य व अन्तरंग मलांचा म्हणजे ज्ञानावरणादि चार द्रव्यघातिकर्मांचा आणि अज्ञान, रागद्वेष, मोहादि भावघातिकर्मांचा नाश होतो आणि त्या जिनप्रभूना केवलज्ञानरूपी उत्कृष्ट ज्योति प्राप्त होते. ती सर्व लोकांना व अलोकाकाशाला प्रकाशित करते ।। २९७-२९८ ॥ जे साध्य करावयाचे आहे ते प्रभूनी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना उत्कृष्ट तेज प्राप्त झाले आहे. या क्रियेला योगसंमह म्हणतात. ज्ञान आणि ध्यान यांची एकत्र स्थिति होणे याला योग म्हणतात व त्याचे मह म्हणजे तेज या दोघांचा मोठा जो महिमातिशय त्याला योगसंमह म्हणतात. योगसंमह नांवाची ही क्रिया ४९ वी आहे. ॥ २९९-३०० ॥ यानंतर या जिनेश्वराला केवलज्ञान उत्पन्न होते व देवेंद्र त्यांची पूजा करतात. त्यावेळी या प्रभूला अशोकवृक्षादि प्रातिहार्य वगैरे स्वरूप ज्याचे आहे असे वैभव प्राप्त होते ।। ३०१ ॥ __अशोकवृक्षादिक आठ प्रातिहार्ये-अशोकवृक्ष, देवकृत पुष्पवृष्टि, दिव्यध्वनि, चौसष्ट चामरे सिंहासन, भामंडल, नगारे वाजणे, छत्रत्रय, हे ऐश्वर्य व बारा प्रकारचा गण-भवनवास्यादिक चार प्रकारचे देव व चार प्रकारच्या देवी मिळून आठ व मुनि, आर्यिका, श्रावक व श्राविका हे चार मिळून बारा प्रकारचा गण. स्तूप, प्रासादपंक्ति, तीन तट, ध्वजपंक्ति, इत्यादिक वैभव प्रभूला प्राप्त होते, याला अर्हन्तावस्था म्हणतात. ही आर्हन्त्य क्रिया ५० वी होय ।। ३०२-३०३ ।। म. ५१ Page #413 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०२) महापुराण (३८-३०४ विहारस्तु प्रतीतार्थो धर्मचक्रपुरःसरः । प्रपञ्चितश्च प्रागेव ततो न पुनरुच्यते ॥ ३०४ इति विहारक्रिया ॥५१ ततःपरार्थसंपत्त्यै धर्ममार्गोपदर्शने । कृततीर्थविहारस्य योगत्यागः परा क्रिया ॥ ३०५ विहारस्योपसंहारःसंवृतिश्च सभावनेः । वृत्तिश्च योगरोधार्था योगत्यागः स उच्यते ॥ ३०६ यच्च दण्डकपाटादिप्रतीतार्थ क्रियान्तरम् । तदन्तर्भूतमेवादस्ततो न पृथगुच्यते ॥ ३०७ इति योगत्यागक्रिया ॥ ५२ ततो निरुद्धनिःशेषयोगस्यास्य जिनेशिनः । प्राप्तशैलेश्यवस्थस्य प्रक्षीणाघातिकर्मणः ॥ ३०८ क्रियाग्रनितिमि परनिर्वाणमायषः । स्वभावनितामूवं व्रज्यामास्कन्दतो मता ॥ ३०९ इति निर्वाणपर्यन्ताः क्रिया गर्भादिकाः सदा । भव्यात्मभिरनुष्ठेयास्त्रिपञ्चाशत्समुच्चयात् ॥ यथोक्तविधिनताः स्युरनष्ठेया द्विजन्मभिः । योऽप्यत्रान्तर्गतो भेदस्तं वच्म्युत्तरपर्वणि ॥ ३११ ................... यानंतर प्रभूचा अनेक देशात उपदेश देण्यासाठी विहार होतो याचा अर्थ प्रसिद्ध आहे. अर्थात् पुढे सर्वाण्हयक्ष आपल्या मस्तकावर धर्मचक्र घेऊन जात असतो व प्रभु त्याला अनुसरून विहार करीत असतात. याचे वर्णन मागे केले आहे म्हणून पुनः याचे वर्णन येथे करीत नाहीत. ही विहारक्रिया ५१ वी आहे ॥ ३०४ ।। यानंतर परोपकार करण्यासाठी धर्ममार्गाचा उपदेश प्रभु करतात अर्थात् अनेक देशांत धर्मोपदेशार्थ विहार करतात व नंतर योगत्याग नांवाची उत्कृष्ट क्रिया होते ।। ३०५ ॥ ___ या क्रियेत विहार बंद होतो व समवसरणही नाहीसे होते. मनोयोग, वचनयोग आणि काययोग या योगांचा निरोध करण्याची उत्तम प्रवृत्ति होते. तिला योगत्याग क्रिया म्हणतात. दण्ड, व कपाट आदिकरूपाने आत्मप्रदेश प्रसरण पावतात व पुनः त्यांचा संकोच होतो. याला केवलि समुद्घात म्हणतात. हा समुद्घात या योग-त्याग क्रियेत अन्तर्भूत आहे, वेगळा सांगत नाहीत. ही योग-त्याग क्रिया ५२ वी आहे ।। ३०६-३०७ ।। यानंतर या जिनेश्वराच्या मनोयोगादि तीन योगांचा पूर्ण निरोध होतो व त्यांना संपूर्ण शीलांचे स्वामित्व लाभते. वेदनीय, नाम, गोत्र आणि आयु या चार अघाति कर्मांचा पूर्ण नाश होतो. सर्व गुणांनी पुष्ट झालेल्या या जिनेश्वराची स्वाभाविक उर्ध्वगति होते. या गतीला अग्रनिर्वृति म्हणतात. ही त्रेपन्नावी क्रिया आहे. याप्रमाणे गर्भापासून आरंभ करून निर्वाणापर्यंत त्रेपन्न क्रिया ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या भव्यानी कराव्यात. जसा यांचा विधि सांगितला आहे तशा या क्रिया कराव्यात. यामध्ये जे पोटभेद आहेत त्यांचे आचार्य पुढील पर्वात वर्णन करतात ॥ ३०८-३११ ॥ | Page #414 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८-३१३) महापुराण शार्दूलविक्रीडितम् । इत्युच्चैर्भरताधिपः स्वसमये संस्थापयंस्तान्द्विजान् । सम्प्रोवाच कृती सतां बहुमता गर्भान्वयोत्थाः क्रियाः ॥ गर्भाद्याः परिनिर्वृतिप्रगमनप्रान्तास्त्रिपञ्चाशतम् । प्राभेऽथ पुनः प्रवक्तुमुचिता दीक्षान्वयाद्याः क्रियाः ॥ ३१२ यस्त्वेता द्विजसत्तमैरभिमता गर्भादिकाः सत्क्रियाः । श्रुत्वा सम्यगधीत्य भावितमतिर्जेनेश्वरे दर्शने ॥ सामग्रीमुचितां स्वतश्च परतः सम्पादयन्नाचरेद् । भव्यात्मा स समग्रधस्त्रिजगतीचूडामणित्वं भजेत् ॥ ३१३ इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्य प्रणीते त्रिषष्टिलक्षणपुराणसंग्रहे द्विजोत्पत्ति गर्भावयक्रियावर्णनं नामाष्टत्रिंशत्तमं पर्व समाप्तम् । याप्रमाणे भरतक्षेत्रस्वामी अशा भरताने जिनधर्मात द्विजांना उत्तम रीतीने स्थापन करून सज्जन धार्मिक लोकांना अतिशय मान्य असलेल्या गर्भान्वयक्रियांचे वर्णन केले. गर्भापासून प्रारंभ करून मोक्षापर्यंतच्या अंतिम क्रियेपर्यंत त्रेपन्न क्रियांचे वर्णन केले. यानंतर पुनः विबेचन करण्यायोग्य अशा दीक्षान्वय क्रिया त्याने सांगण्यास सुरवात केली ॥ ३१२ ॥ (४०३ श्रेष्ठ अशा त्रैवर्णिकांना मान्य असलेल्या गर्भादिक क्रियांचे वर्णन ऐकून व उत्तम रीतीने त्यांचे अध्ययन करून जिनेश्वरांनी सांगितलेल्या दर्शनात ज्याची बुद्धि चांगली स्थिर झाली आहे असा जो श्रावक तोही योग्य सामग्री मिळवून दुसऱ्याना या क्रियांचे आचरण करावयास लावतो व स्वतःही यांचे आचरण करतो. तो भव्यपुरुष पूर्ण ज्ञानी होऊन - केवली सर्वज्ञ होऊन त्रैलोक्यातील अग्रभागावर मुक्तिशिलेवर चूडामणिपणाला प्राप्त होईल अर्थात् मोक्षस्थानी अग्रभागी विराजमान होईल ।। ३१३ ।। याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यांनी रचिलेल्या आर्ष त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादामध्ये द्विजांची उत्पत्ति व गर्भान्वयक्रियांचे वर्णन करणारे हे अडतीसावे पर्व समाप्त झाले || ३८ ॥ Page #415 -------------------------------------------------------------------------- ________________ एकोनचत्वारिंशत्तमं पर्व । अथाब्रवीद्विजन्मभ्यो मनुःक्षान्वयक्रियाः । यास्ता निःश्रेयसोदश्चित्वारिंशवथाष्ट च ॥१ श्रूयतां भो द्विजन्मानो वक्ष्ये निःश्रेयसीः क्रियाः। अवतारादिनिर्वाणपर्यन्ता दीक्षितोचिताः ॥२ व्रताधिकरणं दीक्षा द्विधाम्नातं च तद्वतम् । महच्चाणु च दोषाणां कृत्स्नदेशनिवृत्तितः॥३ महाव्रतं भवेत्कृत्स्नहिसाधागोविवर्जनम् । विरतिःस्थूलहिंसादिदोषेभ्योऽणुव्रतं मतम् ॥ ४ तदुन्मुखस्य या वृत्तिः पुंसो दीक्षेत्यसौ मता। तामन्विता क्रिया या तु सा स्याद्दीक्षान्वयक्रिया ॥५ तस्यास्त भेदसख्यानं प्राकनिर्णीतं षडष्टकम । क्रियते तद्विकल्पानामधना लक्ष्मवर्णनम् ॥६ तत्रावतारसंज्ञा स्यादाद्या दीक्षान्वयक्रिया । मिथ्यात्वदूषिते भव्ये सन्मार्गग्रहणोन्मखे ॥ ७ स तु संयत्य योगीन्द्रं युक्ताचारं महाधियम् । गृहस्थाचार्यमथवा पृच्छतीति विचक्षणः ॥८ ब्रूत यूयं महाप्राज्ञा मह्यं धर्ममनाविलम् । प्रायो मतानि तीर्थ्यानां हेयानि प्रतिभान्ति माम् ॥९ यानंतर सोळावे मनु अशा भरताने ज्याचे फल निःश्रेयस-मोक्ष आहे अशा अठेचाळीस दीक्षान्वयक्रिया त्रैवर्णिकांना सांगितल्या ॥ १ ॥ हे त्रैवर्णिकानो, ज्यानी दीक्षा घेतली आहे अशांना योग्य असलेल्या ज्या अवतार आदि क्रियाना धरून निर्वाणापर्यंत मुक्तिसाधक क्रिया मी तुम्हास सांगतो त्या तुम्ही ऐका ॥२॥ व्रतांना धारण करणे दीक्षा होय व ते व्रत दोन प्रकारचे सांगितले आहे. एक महाव्रत व दुसरे अणुव्रत. संपूर्ण हिंसा, असत्यादिकदोषापासून निवृत्त होणे ते महाव्रत होय व काही अंशाने दोषापासून निवृत्त होणे ते अणुव्रत होय ॥ ३ ।। ___संपूर्ण हिंसा, असत्य, चोरी आदिक पाच पापापासून निवृत्त होणे त्यांचा पूर्ण त्याग करणे ते महावत होय व स्थूलहिंसादि दोषापासून विरक्त होणे त्याला अणुव्रत म्हणतात ॥ ४ ॥ त्या कवांना ग्रहण करण्यास उन्मुख झालेल्या पुरुषाची प्रवृत्ति-जो त्याचा आचार त्याला दीक्षा म्हणतात. त्या दीक्षेशी संबद्ध असलेली जी क्रिया तिला दीक्षान्वयक्रिया म्हणतात ॥५॥ ___ या दीक्षान्वयक्रियेचे अठेचाळीस भेद आहेत असे पूर्वी निर्णीत केले आहे. आता तिच्या भेदांचे लक्षणवर्णन करतो ॥ ६ ॥ मिथ्यात्वाने दूषित झालेली व्यक्ति-भव्य पुरुष जेव्हा सन्मार्गाला ग्रहण करण्यास उन्मुख होतो तेव्हा पहिली अवतारनामक दीक्षान्वय क्रिया तो करतो ॥ ७ ॥ तो विद्वान भव्य जीव ज्याचा आचार शुद्ध आहे, जो महाबुद्धिमान आहे अशा योगीन्द्राजवळ जाऊन अथवा गृहस्थाचार्यांजवळ जाऊन याप्रमाणे विचारतो ॥ ८ ॥ हे महाबुद्धिमता मला आपण धर्माचे निर्मल स्वरूप सांगा. कारण अन्यमतीयांची मते बहुत करून त्याज्य आहेत असे मला वाटते ॥ ९ ॥ Page #416 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-१७) महापुराण (४०५ धौतान्यपि हि वाक्यानि संमतानि क्रियाविधौ । न विचारसहिष्णूनि दुःप्रणीतानि तानि वै॥ १० इति पृष्टवते तस्मै व्याचष्टे स विदांवरः । तथ्यं मुक्तिपथं धर्म विचारपरिनिष्ठितम् ॥ ११ । विद्धि सत्योद्यमाप्तीयं वचः श्रेयोऽनुशासनम् । अनाप्तोपज्ञमन्यत्तु वचो वाडमलमेव तत् ॥ १२ विरागः सर्ववित्सार्वः सूक्तसूनतपूतवाक् । आप्तः सन्मार्गदेशी यस्तदाभासास्ततोऽपरे ॥ १३ रूपतेजोगुणस्थानध्यानलक्ष्मद्धिदत्तिभिः । कान्तताविजयज्ञानदृष्टिवीर्यसुखामृतैः॥ १४ । प्रकृष्टो यो गुणैरेभिश्चक्रिकल्पाधिपादिषु । स आप्तः स च सर्वज्ञः स लोकपरमेश्वरः॥ १५ ततः श्रेयोऽथिनां श्रेयो मतमाप्तप्रणेतृकम् । अव्याहतमनालीढपूर्व सर्वज्ञमानिभिः ॥ १६ हेत्वाज्ञायुक्तमद्वैतं दीप्तं गम्भीरशासनम् । अल्पाक्षरमसन्दिग्धं वाक्यं स्वायम्भवं विदुः ॥ १७ धार्मिक क्रिया करण्यासाठी जी वेदवाक्ये मानली आहेत ती देखिल विचारांना सहन करणारी नाहीत कारण ती दुष्ट पुरुषांनी रचलेली आहेत ॥ १० ॥ याप्रमाणे विचारणाऱ्या त्या भव्याला विद्वच्छेष्ठ मुनिराज खरें व विचारपरिपूर्ण मोक्षाचा मार्ग असलेल्या धर्माचे विवरण करतात ।। ११ ॥ हे भव्या, मोक्षाचा उपदेश देणारे, सर्वज्ञाचे वचन सत्य प्रतिपादन करणारे आहे असे समज. पण याहून इतरांचे जे वचन आहे ते यथार्थ विवेचन करणाऱ्याचे नाही व ते केवळ वाणीचा मल आहे असे समज ॥ १२ ॥ __ खरा हितोपदेशी आप्त त्याला म्हणावे- ज्याच्या ठिकाणी विरागता-रागद्वेषमोह हे विकार नाहीत तो खरा आप्त होय. तो सर्व जाणणारा सर्वांचे हित करणारा असतो. त्याची वाणी खरी युक्तियुक्त व पवित्र अशी असते व तो सन्मार्गाचा उपदेश करणारा असतो व याहून बाकीचे जे ते आप्ता-भास होत- त्यासारखे दिसतात. ते आप्त नव्हेत ॥ १३ ॥ जो रूप, तेज, गुणस्थान, ध्यान, लक्षण, ऋद्धि, दान, सुन्दरता, विजय, ज्ञान, दृष्टि, वीर्य व सुखामृत या गुणानी चक्रवर्ती, इन्द्र आदिकात श्रेष्ठ आहे त्याला आप्त म्हणतात व तो सर्वज्ञ आणि सर्व लोकांचा परमेश्वर आहे ॥ १४-१५ ।। त्याला आप्त म्हणतात व त्याच्यापासून मोक्षेच्छुकाचे कल्याण होते. त्याचे जे मत ते आप्तप्रणेतक आहे- लोकांचे खरे कल्याण करणारे आहे. ते मत अव्याहत-कोणाकडून खंडित केले जात नाही व स्वतःला आम्ही सर्वज्ञ आहोत असे मानणान्या लोकाकडून ते स्पशिले जात नाही ॥ १६ ॥ हे अरहंत भगवंताचे शासनवाक्य हेतु-युक्तियुक्त व आगमयुक्त आहे, याच्यासारखे दुसरे जगात आढळून येणारे नाही असे आहे व गंभीर उपदेशाने भरलेले आहे, अतिशय तेजस्वी आहे, अल्पाक्षरयुक्त असूनही संशयरहित जीवादिक तत्त्वांचे प्रतिपादन करणारे आहे असे वाक्य अरहंत भगवंताचे आहे ।। १७ ॥ Page #417 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०६) महापुराण (३९-१८ इतश्च तत्प्रमाणं स्यात् श्रुतमन्त्रक्रियादयः । पदार्थाः सुस्थितास्तत्र यतो नान्यमतोचिताः ॥ १८ यथाक्रममतो ब्रूमस्तान्पदार्थान्प्रपञ्चतः । यैः सन्निकृष्यमाणाः स्युर्दुःस्थिताः परसूक्तयः ॥ १९ वेदाः पुराणं स्मृतयश्चारित्रं च क्रियाविधिः । मन्त्राश्च देवता लिङ्गमाहाराद्याश्च शुद्धयः ॥ २० एतेऽर्था यत्र तत्त्वेन प्रणीताः परमषिणा । स धर्मः स च सन्मार्गस्तदाभासाःस्युरन्यथा ॥२१ श्रुतं सुविहितं वेदो द्वादशाङ्गमकल्याणम् । हिंसोपदेशि यद्वाक्यं न वेदोऽसौ कृतान्तवाक् ॥ २२ पुराणं धर्मशास्त्रं च तत्स्याद्वधनिषेधि यत् । वधोपदेशि यत्तत्तु ज्ञेयं धूर्तप्रणेतृकम् ॥ २३ सावधविरतिवृत्तं आर्यषट्कर्मलक्षणम् । चातुराश्रम्यवृत्तं तु परोक्तमसदञ्जसा ॥ २४ क्रिया गर्भादिकायास्ता निर्वाणान्ताः परोदिताः।आधानादिश्मशानातान ताः सम्यक क्रिया मता या अरहंताच्या मतात शास्त्र, मन्त्र व क्रियादिक पदार्थ अतिशय निर्दोष पद्धतीने वणिले आहेत. असे निर्दोष विवेचन अन्यमतात आढळून येणारे नाही म्हणून हे अर्हन्मत प्रमाण आहे ॥ १८ ॥ हे भव्य आता मी जैनागमकथित पदार्थाचे क्रमाने वर्णन करतो, सविस्तर प्रतिपादन करतो व ज्याच्यापुढे इतर मतांची वचने दोषयुक्त सिद्ध होतात ।। १९ ।। या अरहंताच्या मतात वेद, पुराण, स्मृति, चारित्र, क्रियाविधि, मंत्र, देवता, लिङ्ग व आहारादिकांची शुद्धि, हे पदार्थ यथार्थ परमऋषि जिनदेवाने सांगितले आहेत म्हणून त्याला धर्म व सन्मार्ग म्हणावे व ज्यांच्यामध्ये असे यथार्थ वर्णन नाही ते सर्व धर्माभास व मार्गाभास आहेत असे समजावे ।। २०-२१ ॥ आचाराङ्ग, सूत्रकृताङ्ग वगैरे द्वादशांगांचे श्रुतज्ञान त्यास वेद म्हणतात. ते श्रुतज्ञान सुविहित सदाचाराचे प्रतिपादन करते व ते अकल्मष आहे, दुराचरणाच्या उपदेशाने रहित आहे. पण हिंसेचा उपदेश करणारे जे शास्त्र आहे त्याला वेद म्हणू नये. त्यास कृतान्तवाक् अर्थात् यमाची वाणी म्हणावे ॥ २२ ॥ जे हिंसेचा निषेध करते तेच पुराण होय व तेच धर्मशास्त्र होऊ शकते परन्तु जे याच्याविपरीत आहे अर्थात् हिंसेचा उपदेश जे करते असे पुराण व धर्मशास्त्र समजू नये ते धूर्त लोकानी बनविले आहे असे समजावे ॥ २३ ।। पापकार्यापासून विरक्त होणे यास वृत्त-चारित्र म्हणतात. आर्यपुरुषांची जी जिनपूजा, उपजीविका, दान देणे, स्वाध्याय, इन्द्रियसंयम व प्राणिसंयम पाळणे आणि तपश्चरण करणे ही सहा कर्मे करणे हे चारित्र होय व ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि भिक्षुकाश्रम यांचे जे अन्य धर्मात इतरांमी जे स्वरूप सांगितले आहे ते निश्चयाने अयोग्य आहे. जैनधर्मामध्ये या चार आश्रमांचे जे स्वरूप सांगितले आहे ते मात्र सत्य व योग्य आहे ॥ २४ ॥ गर्भाधानादि निर्वाणापर्यन्त ज्या क्रिया अर्थात् संस्कार सांगितले आहेत ते योग्य सम्यक् आहेत पण गर्भाधानापासून श्मशानापर्यन्त ज्या क्रिया इतरानी सांगितल्या आहेत त्या सम्यक् नाहीत ॥ २५ ॥ Page #418 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-३३) महापुराण (४०७ मन्त्रास्त एव धाः स्युर्ये क्रियासु नियोजिताः । दुर्मन्त्रास्तेऽत्र विज्ञेया ये युक्ताः प्राणिमारणे ॥२६ विश्वेश्वरादयो ज्ञेया देवताः शान्ति हेतवः । क्रूरास्तु देवता हेया यासां स्यावृत्तिरामिषः ॥ २७ निर्वाणसाधनं यत्स्यात्तल्लिङ्ग जिनदेशितम् । एषाजिनादिचिह्न तु कुलिङ्ग तद्धि वैकृतम् ॥ २८ स्यानिरामिषभोजित्वं शुद्धिराहारगोचरा । सर्वकषास्तु ते ज्ञेया ये स्युरामिषभोजिनः ॥ २९ अहिंसा शुद्धिरेषां स्याद्ये निःसङ्गा दयालवः । रताः पशुवधे ये तु न ते शुद्धा दुराशयाः ॥ ३० कामशुद्धिर्मता तेषां विकामा ये जिनेन्द्रियाः। सन्तुष्टाश्च स्वदारेषु शेषाः सर्वे विडम्बकाः ॥ ३१ इति शुद्धं मतं यस्य विचारपरिनिष्ठितम् । स एवाप्तस्तदुन्नीतो धर्मः श्रेयो हितार्थिनाम् ॥ ३२ श्रुत्वेनि देशनां तस्माद्भव्योऽसौ देशिकोतमात् । सन्मार्गे मतिमाधत्ते दुर्मार्गरतिमुत्सृजन् ॥ ३३ गर्भाधानादि क्रियामध्ये योजलेले जे मन्त्र आहेत तेच मन्त्र धर्म्य-पुण्य प्राप्त करून देणारे आहेत पण जे प्राणिघात करण्यात योजलेले मंत्र आहेत ते दुर्मन्त्र आहेत पापोत्पादक आहेत असे समजावे ॥ २६ ॥ विश्वेश्वरादि-तीर्थकरादिक ज्या देवता आहेत त्या शान्ति उत्पन्न करण्यास कारण आहेत पण ज्यांची वृत्ति मांसानी होते त्या क्रूर देवतांचा त्याग करणे योग्य आहे ॥ २७ ॥ __जे मोक्षप्राप्ति करून देण्याचे साधन ते लिंग समजावे असे जिनेश्वरानी सांगितले आहे पण हरिणाचे कातडे आदिक जे चिह्न आहे ते कुलिंग आहे व ते कुलिंगानी बनविले आहे ते मुक्तिसाधन केव्हाही होत नाही ॥ २८ ॥ ___मांसरहित भोजन करणे ही आहारविषयक शुद्धि आहे व जे मांसभोजन करतात ते लोक सर्वघाती आहेत असे समजावे ।। २९ ॥ हिंसा न करणे प्राणिघात न करणे हीच शुद्धि होय. अशी शुद्धि धारण करणारे जे निःसंग-परिग्रहरहित आहेत असे साधु दयाळु असतात. पण जे पशुवध करण्यात तत्पर आहेत ते दुष्ट अभिप्रायाचे लोक शुद्ध नाहीत ।। ३० ॥ जे कामरहित व जितेन्द्रिय आहेत त्यांच्या ठिकाणी कामशुद्धि राहते व ते स्वस्त्रीमध्ये सन्तुष्ट आहेत तेथेही कामशुद्धि राहते पण याहून जे अन्य-वेगळे आहेत ते सर्व विडंबक'फसविणारे आहेत ॥ ३१ ॥ __ अशा रीतीने ज्यांचे मत विशुद्ध निर्मल आहे व विचारात टिकाऊ आहे व ज्याचा विचार केला असता निर्दोष आहे असे सिद्ध होते त्या महात्म्याला आप्त म्हणावे व त्या आप्ताने-जिनेश्वराने सांगितलेला धर्म हितेच्छु लोकांचे श्रेय-कल्याण करणारा आहे ॥ ३२ ॥ याप्रमाणे उत्तम अशा मुनीश्वरापासून किंवा उत्तम गृहस्थाचार्यापासून उपदेश ऐकून तो भव्य दुर्मार्गावरील प्रेम त्यागून सन्मार्गात रति-प्रेमधारण करतो, जैनधर्मात तो प्रेम करतो ॥ ३३ ॥ Page #419 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०८) महापुराण (३९-३४ गुरुजनयिता तत्त्वज्ञानं गर्भः सुसंस्कृतः । तदा तत्रावतीर्णोसो भव्यात्मा धर्मजन्मना ॥ ३४ अवतारक्रियास्यषा गर्भाधानवदिष्यते । यतो जन्मपरिप्राप्तिरुभयत्र न विद्यते ॥ ३५ इति अवतारकिया ॥ ततोऽस्य वृत्तलाभः स्यात्तदैव गुरुपादयोः। प्रणतस्य व्रतवातं विधानेनोपसेदुषः ॥ ३६ इति वृत्तलाभः॥ ततः कृतोपवासस्य पूजाविधिपुरःसरम् । स्थानलाभो भवेदस्य तत्रायमुचितो विधिः ॥ ३७ जिनालये शुचौ रङ्गे पद्ममष्टदलं लिखेत् । विलिखेद्वा जिनास्थानमण्डलं समवृत्तकम् ॥ ३८ श्लक्ष्णेन पिष्टचूर्णेन सलिलालोडितेन वा । वर्तनं मण्डलस्येष्टं चन्दनादिद्रवेण वा ॥ ३९ तस्मिन्नष्टदले पद्मे जने वास्थानमण्डले । विधिना लिखिते तज्जैविष्वग्विरचितार्चने ॥ ४० जिनार्चाभिमुखं सूरिविधिनैनं निवेशयेत् । तवोपासकदीक्षेयमिति मुध्नि मुहःस्पृशन् ॥ ४१ पञ्चमुष्टिविधानेन स्पृष्ट्वैनमधिमस्तकम् । पूतोऽसि दीक्षयेत्युक्त्वा सिद्धशेषं च लम्भयेत् ॥ ४२ त्यावेळी त्या भव्याला उपदेश करणारा जो गुरु तोच पिता होय आणि त्याने जे तत्त्वज्ञानाचे विवेचन केले तोच सुसंस्कृत असा गर्भ होय. त्या गर्भात तो भव्यात्मा खऱ्या धर्माची जी उत्पत्ति जो जन्म त्या स्वरूपाने तो अवतीर्ण झाला आहे असे समजावे ।। ३४ ।। ही याची अवतारक्रिया गर्भाधानाप्रमाणे मानली जाते. कारण या दोनही क्रियामध्ये जन्माची प्राप्ति झालेली नसते. याप्रकारे ही पहिली अवतार क्रिया आहे ॥ ३५ ॥ त्यानंतर त्याचवेळी गुरूच्या दोन चरणाना ज्याने नमस्कार केला आहे व विधिपूर्वक ज्याने व्रतांचा समूह धारण केला आहे अशा त्या भव्याला वृत्तलाभ नावांची दुसरी क्रिया संस्कार प्राप्त होतो. वृत्तलाभ हा दुसरा संस्कार झाला ।। ३६ ॥ ___स्थानलाभ क्रियेचे वर्णन- यानंतर ज्याने उपवास केला आहे अशा त्याच्यावर पूजाविधिपुरःसर स्थानलाभ क्रियेचा संस्कार होतो. या संस्कारात हा योग्य विधि केला जातोजिनालयात पवित्र अशा मण्डपात तज्ज्ञाने आठ पाकळयांचे कमळ लिहावे. अथवा समानगोल जिनेश्वराच्या समवसरणमंडलाची रचना करावी. पाण्यात कालविलेल्या आ अशा पीठाने मण्डल करावे, अथवा चन्दनादिकाच्या पातळ गन्धाने मण्डल काढावे व त्या अष्टदल कमलाची किंवा समवसरण मंडलाची सर्व बाजूनी पूजा करावी ॥ ३७-४० ॥ विधीने उपासक दीक्षा ज्याला द्यावयाची आहे त्याला जिनप्रतिमेसमोर गृहस्थाचार्याने बसवावे. त्याच्या मस्तकाला वारंवार स्पर्श करून तुझी ही उपासक दीक्षा आहे असे म्हणून पंच मुष्टिविधानाने त्याच्या मस्तकाला स्पर्श करून तू या दीक्षेने आज पवित्र झाला आहेस असे म्हणून जिनपूजा करून राहिलेले पूजाद्रव्य सिद्धशेषा म्हणून त्याला द्यावे ॥ ४१-४२ ॥ Page #420 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-५०) महापुराण (४०९ ततः पञ्चनमस्कारपदान्यस्मा उपादिशेत् । मन्त्रोऽयमखिलात्पापात्त्वां पुनीतादितीरयन् ॥ ४३ कृत्वा विधिमिमं पश्चात्पारणाय विसर्जयेत् । गुरोरनुग्रहात्सोऽपि सम्प्रीतः स्वगृहं व्रजेत् ॥ ४४ इति स्थानलामक्रिया ॥ ३ निर्दिष्टस्थानलाभस्य पुनरस्य गणग्रहः । स्यान्मिथ्यादेवताः स्वस्माद्विनिःसारयतो गृहात् ॥ ४५ इयन्तं कालमज्ञानात्पूजिताः स्थ कृतादरम् । पूज्यास्त्विदानीमस्माभिरस्मत्समयदेवताः ॥ ४६ ततोऽपमषितेनालमन्यत्र स्वैरमास्यताम् । इति प्रकाशमेवैतान्नीत्त्वान्यत्र क्वचित्त्यजेत् ॥ ४७ गणग्रहः स एषः स्यात्प्राक्तनं देवतागणम् । विसृज्यार्चयतः शान्ता देवताः समयोचिताः ॥ ४८ इति गणग्रहणक्रिया ॥४ पूजाराध्याख्यया ख्याता क्रियास्य स्यादतःपरा । पूजोपवाससम्पत्त्या शृण्वतोऽङ्गार्थसङग्रहम् ॥४९ इति पूजाराध्यक्रिया ॥५ ततोऽन्यपुण्ययज्ञाख्या क्रिया पुण्यानुबन्धिनी । शृण्वतः पूर्वविद्यानामर्थ सब्रह्मचारिणः ॥ ५० । इति पुण्ययज्ञक्रिया ॥६ यानंतर त्याला पंचनमस्कारमंत्राच्या पदांचा उपदेश करावा व हा मन्त्र तुला सर्व पापांचा नाश करून पवित्र करो असे बोलावे. याप्रमाणे विधि केल्यावर नंतर त्याला पारणे करण्याकरिना घरी पाठवावे. गुरूंचा याप्रमाणे अनुग्रह झाल्यामुळे त्याने देखिल अतिशय आनंदित होऊन आपल्या घरी जावे. याप्रमाणे तिसऱ्या स्थानलाभक्रियेचे वर्णन झाले. गणग्रह क्रियेचे वर्णन असे- ॥ ४३-४४ ।। ज्याच्यावर स्थानलाभक्रियासंस्कार केला आहे असा हा भव्य गणग्रहसंस्काराने संस्कृत होतो. त्यावेळी तो आपल्या घरातून मिथ्यादेवता बाहेर काढतो. तो त्यावेळी असे म्हणतो, "इतके कालपर्यन्त मी अज्ञानामुळे आपली पूजा केली आहे, आपला आदर केला आहे पण आता आम्ही आमच्या मताच्या देवतांचे पूजन करू म्हणून आपण आमच्यावर न रागवता अन्य ठिकाणी स्वच्छंदाने बसावे" याप्रमाणे म्हणून प्रकटपणाने त्या देवतांचा अन्य कोणत्या तरी ठिकाणी त्याग करावा. याप्रमाणे हा गणग्रहसंस्कार आहे. यात पूर्वीच्या मिथ्यादेवांच्या समूहाचे विसर्जन करून आपल्या मताच्या शान्तदेवतांची तो पूजा करतो. ही गणग्रहक्रिया चौथी आहे ॥ ४५-४८॥ यानन्तर पूजाराध्य या नांवाची क्रिया गणग्रह या क्रियेनंतर केली जाते. या क्रियेच्या संस्काराने त्याला आचारादिक बारा श्रुतज्ञानाच्या अर्थाच्या संग्रहाचे श्रवण होते. ते श्रवण त्याने पूजा व उपवास करून करावे. अर्थात् जिनपूजा करून उपवास करावा व त्याने आचारांग स्थानांग, समवायाङ्ग वगैरे जे श्रुतज्ञानाचे भेद आहेत त्यांची माहिती गृहस्थाचार्यापासून ऐकावी अशा रीतीने जैनधर्माचे ज्ञान होते ॥ ४९ ॥ यानंतर पुण्ययज्ञ नांवाचा संस्कार पुण्यबंधाला कारण आहे तो करावा. सार्मिकाबरोबर उत्पादपूर्व, आग्रापणीयपूर्व इत्यादि चौदा पूर्वश्रुतज्ञानाचा अर्थ त्याने ऐकावा हा सहावा संस्कार आहे ॥ ५० ॥ म. ५२ Page #421 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१०) महापुराण (३९-५१ तथास्य दृढचर्या स्याक्रिया स्वसमयश्रुतम् । निष्ठाप्य शृण्वतो ग्रन्थान्वाह्यनन्यांश्च काश्चन ॥५१ ___ इति दृढचर्या ॥ दृढव्रतस्य तस्यान्या क्रिया स्यादुपयोगिता । पर्वोपदासपर्यन्ते प्रतिमायोगधारणम् ।। ५२ इति उपयोगिताक्रिया ॥८ क्रियाकलापेनोक्तेन शुद्धिमस्योपबिभ्रतः । उपनोतिरनूचानयोग्यलिङ्गग्रहो भवेत् ॥५३ उपनीतिहि वेषस्य वृत्तस्य समयस्य च । देवतागुरुसाक्षि स्याद्विधिवत्प्रतिपालनम् ॥ ५४ शुक्लवस्त्रोपवीतादिधारणं वेष उच्यते । आर्यषट्कर्मजीवित्वं वृत्तमस्य प्रचक्ष्यते ॥ ५५ जैनोपासकदीक्षा स्यात्समयः समयोचितम् । दधतो गोत्रजात्यादिनामान्तरमतः परम् ॥ ५६ इत्युपनीतिक्रिया ॥ ततोऽयमुपनीतः सन्वतचर्या समाश्रयेत् । सूत्रमौपासकं सम्यगभ्वस्य ग्रन्थतोऽर्थतः ॥ ५७ इति वतचर्याक्रिया ॥ ___ यानंतर दृढचर्या नावाचा सातवा संस्कार त्याच्यावर करतात. यात जैनधर्माच्या श्रुतज्ञानाच्या अर्थाचे श्रवण समाप्त करून बाह्य अनेक अन्यमताच्या ग्रंथाचे श्रवण तो करतो. हा सातवा संस्कार होय ।। ५१ ॥ जो व्रतांचे दृढ पालन करीत आहे अशा या श्रावकावर उपयोगिता नामक संस्कार करतात. अर्थात् तो अष्टमी चतुर्दशीच्या दिवशी उपवास करतो व रात्री प्रतिमायोग धारण करतो. अर्थात् रात्री आत्मध्यानात तत्पर तो राहतो. त्याची ही उपयोगिता नामक आठवी क्रिया आहे ॥ ५२ ।। वर सांगितलेल्या क्रियासमूहाच्या आचरणाने व्रतादिकात शुद्धि धारण करणाऱ्या व आचारादिक अंगासहित असलेल्या प्रवचनाचा-आगमाचा अभ्यास-अध्ययन ज्याचे झाले आहे अशा या भव्याची उपनीतिक्रिया होते ।। ५३ ।। देवता आणि गुरूंच्या साक्षीने विधीला अनुसरून आपला वेष, आपले व्रताचरण आणि जिनमताचे पालन करणे याला उपनीति किंवा उपनयसंस्कार म्हणतात ॥ ५४।। पांढरे वस्त्र, यज्ञोपवीत वगैरे धारण करणे याला वेष म्हणतात आणि आर्यांची जी असि, मष्यादिक सहा कर्मे यांनी उपजीविका करणे याला वृत्त म्हणतात ॥ ५५ ॥ जैन श्रावकाची जी दीक्षा घेणे त्यास समय म्हणतात व त्या दीक्षेला योग्य असे गोत्र, जाति व नाव वगैरे धारण करणाऱ्या या श्रावकाची ही उपनीतिक्रिया समजावी. ही नववी उपनीतिक्रिया आहे ।। ५६ ॥ ज्याच्यावर उपनयनक्रियेचा संस्कार झाला आहे अशा या श्रावकाने उपासकसूत्राचे ग्रन्थ व अर्थाचे चांगले अध्ययन करावे अर्थात् श्रावकाचाराचा चांगला मननपूर्वक अभ्यास करावा आणि व्रतचर्यानामक क्रियेचा आश्रय करावा. ही व्रतचर्या क्रिया दहावी आहे ॥ ५७ ।। Page #422 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-६८) महापुराण (४११ प्रतावतरणं तस्य भूयो भूषादिसङग्रहः । भवेदधीतविद्यस्य यथावद्गुरुसंनिधौ ॥ ५८ विवाहस्तु भवेदस्य नियुञ्जानस्य दीक्षया । सुव्रतोचितया सम्यक् स्वां धर्मसहचारिणीम् ॥ ५९ पुनविवाहसंस्कारः पूर्वः सर्वोऽस्य सम्मतः । सिद्धार्चनां पुरस्कृत्य पत्याः संस्कारमिच्छतः ॥ ६० इति विवाहक्रिया ॥ वर्णलाभस्ततोऽस्य स्यात्सम्बन्धं संविधित्सतः । समानाजीविभिलब्धवर्णैरन्यैरुपासकैः ॥ ६१ चतुरः श्रावकज्येष्ठानाहूय कृतसत्क्रियान् । तान्ब्रूयादस्म्यनुग्राह्यो भवद्भिः स्वसमीकृतः ॥ ६२ यूयं निस्तारका देवब्राह्मणा लोकपूजिताः । अहं च कृतदीक्षोऽस्मि गृहीतोपासकव्रतः ॥ ६३ मया तु चरितो धर्मः पुष्कलो गृहमेषिनाम् । दत्तान्यपि च दानानि कृतं च गुरुपूजनम् ॥ ६४ अयोनिसम्भवं जन्म लब्ध्वाहं गुर्वनुग्रहात् । चिरभावितमुत्सृज्य प्राप्तो वृत्तमभावितम् ॥ ६५ व्रतसिद्धयर्थमेवाहमुपनीतोऽस्मि साम्प्रतम् । कृतविद्यश्च जातोऽस्मि स्वधीतोपासकवतः ॥ ६६ व्रतावतरणस्यान्ते स्वीकृताभरणोऽस्म्यहम् । पत्नी च संस्कृतात्मीया कृतपाणिग्रहा पुनः ॥ ६७ एवं कृतवतस्याद्यवर्णलाभो ममोचितः । सुलभः सोऽपि युष्माकमनुज्ञानात्सधर्मणाम् ॥ ६८ ज्याने गुरूजवळ अध्ययन केले आहे अशा त्याने व्रतावतरण करावे अर्थात पूर्वीप्रमाणे भूषणादिक धारण करावेत. ही अकरावी व्रतावतरण क्रिया आहे ।। ५८ ॥ . जेव्हा तो भव्य आपल्या पत्नीला उत्तम व्रतानी योग्य अशा श्रावकाच्या दीक्षेने युक्त करतो तेव्हा त्याची विवाह नांवाची क्रिया होते. आपल्या पत्नीलाही संस्कारसहित करावे असे गान्या त्या भव्याचा पुनः तिच्याशी विवाह संस्कार होतो व या संस्कारात सिद्धपूजनपूर्वक पुनः सर्व विवाहविधि केला पाहिजे ही बारावी विवाहक्रिया आहे ।। ५९-६० ।। ज्यांची आजीविकासमान आहे व ज्यांना वर्णलाभ झाला आहे असे जे अन्य श्रावक गृहस्थ आहेत त्याच्याशी आपला सबध व्हावा असे इच्छिणाऱ्या त्या विवाह झालेल्या श्रावकाचा वर्णलाभ नांवाचा संस्कार होतो ।। ६१ ।। श्रावकामध्ये जे श्रेष्ठ आहेत अशा चार श्रावकांचा सत्कार करून त्यांना बोलावून त्याने असे म्हणावे, 'आपण मला आपल्यासारखे करून घेतले आहे. तेव्हा आता माझ्यावर आपण अनुग्रह करा. आपण संसारातून पार करणारे व लोकाकडून पूजिले जाणारे सन्मान्य गृहस्थ आहात व मी आपणाकडून दीक्षा दिला गेलेला आहे व मी श्रावकाची व्रते धारण केली आहेत. मी गृहस्थाच्या धर्माचे पुष्कळ आचरण केले आहे. मी दाने दिली व गुरूंचे पूजन केले आहे. मला गुरूंचा अनुग्रह झाला आणि त्यामुळे मी योनीवाचून उत्पन्न झालेला-जन्म धारण केला आहे. मी पुष्कळ काळापासून पाळलेला मिथ्याधर्म त्यागला व आता पूर्वी कधी न स्वीकारलेली अशी व्रते-जैनवते धारण करून त्यांचे पालन करीत आहे. त्या व्रतांची प्राप्ति व्हावी म्हणून मी उपनयनक्रियायुक्त केला गेलो आहे. श्रावकाचाराचे मी चांगले अध्ययन केले आहे व आपणाला विद्वान केले आहे. त्या उपनयन क्रियेची व्रते त्यागून अर्थात् व्रतावतरण करून अन्ती वस्त्राभरणे धारण केली आहेत आणि माझ्या पत्नीशी माझा पुनर्विवाह करून तिलाही या विवाहाने संस्कृत केले आहे याप्रमाणे व्रते धारण केलेल्या माझा वर्णलाभसंस्कार आपण करावा. सधार्मिक अशा आपणाकडून तो वर्णलाभ मला सुलभ होईल" असे त्याने ज्येष्ठ श्रावकाना म्हणावे ।। ६२-६८॥ Page #423 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१२) महापुराण (३९-६९ इत्युक्तास्ते च तं सत्यमेवमस्तु समञ्जसम् । त्वयोक्तं श्लाध्यमेवैतत्कोऽन्यस्त्वत्सदृशो द्विजः॥६९ युष्मादशामलाभे तु मिथ्यादृष्टिभिरप्यमा । समानाजीविभिः कर्तुं सम्बन्धोऽभिमतो हि नः ॥ ७० इत्युक्त्वेनं समाश्वास्य वर्णलाभेन युञ्जते । विधिवत्सोऽपि तं लब्ध्वा याति तत्समकक्षताम् ॥७१ वर्णलाभोऽयमुद्दिष्टः कुलचर्याधुनोच्यते । आर्यषट्कर्मवृत्तिःस्यात्कुलचर्यास्य पुष्कला ॥ ७२ इति कुलचर्या ॥ १४ विशुद्धस्तेन वृत्तेन ततोम्येति गृहीशिताम् । वृत्ताध्ययनसम्पत्त्या परानुग्रहणक्षमः ॥ ७३ ।। प्रायश्चित्तविधानज्ञः श्रुतिस्मृतिपुराणवित् । गृहस्थाचार्यताप्राप्तस्तदा धत्ते गृहीशिताम् ॥ ७४ इति गृहोशिताक्रिया ॥ १५ ततः पूर्ववदेवास्य भवेदिष्टा प्रशान्तता । नानाविधोपवासादिभावनाः समुपेयुषः ।। ७५ इति प्रशान्तताक्रिया ॥ १६ गृहत्यागस्ततोऽस्यस्याद्गृहवासाद्विरज्यतः । योग्यं सून यथान्यायमनुशिष्य गृहोज्झनम् ॥ ७६ गृहत्यागक्रिया ॥ १७ हे त्याचे भाषण ऐकून त्यांनीही त्याला असे म्हणावे- हे गृहस्था, तू जे बोललास ते सत्य व समंजसपणाचे व प्रशंसनीय आहे. तुझ्यासारखा दुसरा द्विज कोण आहे ? तुझ्यासारख्याचा लाभ आम्हाला झाला नाही तर ज्यांची समान आजीविका आहे अशा मिथ्यादृष्टि लोकाबरोबर देखिल संबन्ध करणे आम्हाला मान्य होईल. असे बोलून व त्याला आश्वासन देऊन त्याला वर्णलाभाशी युक्त करतात. योग्य विधिपूर्वक तो श्रावक वर्णलाभसंस्काराने युक्त होऊन त्यांच्याबरोबरीचा होतो. याप्रमाणे वर्णलाभक्रिया १३ वी आहे ॥ ६९-७१ ॥ या श्रावकाचा हा वर्णलाभसंस्कार सांगितला आहे. आता कुलचर्या संस्काराचे वर्णन करतो. आर्यांच्या सहा कर्मानी जिनपूजा, सत्पात्रदान आदिक सहा कार्यात पूर्ण प्रवृत्ति करणे ही मोठी कुलचर्या आहे. हा कुलचर्यासंस्कार चौदावी क्रिया आहे ।। ७२ ॥ वरील आर्यांच्या षट्कर्माचरणानी विशुद्ध झालेल्या या श्रावकाला गृहीशितागृहस्थाचार्यपद प्राप्त होते. तेव्हा हा आपला सदाचार व शास्त्राध्ययनाच्या सम्पत्तीने शिष्यादिकावर अनुग्रह करण्यास समर्थ होतो ॥ ७३ ।। याला प्रायश्चित्त व व्रतविधानाची माहिती असते. हा श्रुति, स्मृति व पुराणांचा जाणता असल्यामुळे गृहस्थाचार्यपदाला प्राप्त होतो तेव्हा हा सर्वगृहस्थांचा ईश-स्वामी होतो. याच्या तन्त्राने सर्व गृहस्थ धर्माचे पालन करतात. हा गृहीशितासंस्कार पंधरावा होय ।। ७४।। यानंतर नानाप्रकारच्या उपवासादिक भावनाना धारण करणाऱ्या या गृहस्थाचार्याची प्रशान्तता क्रिया होते. ही सोळावी प्रशान्तता क्रिया होय ।। ७५ ॥ यानन्तर या गृहस्थाचार्याला वैराग्य प्राप्त होते व त्यामुळे तो गृहात राहण्यापासून विरक्त होतो व आपल्या योग्य पुत्राला नीतीला अनुसरून सदाचाराचा उपदेश करतो व घराचा त्याग करतो. ही गृहत्यागक्रिया सतरावी ।। ७६ ।। Page #424 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-८४) महापुराण (४१३ त्यक्तागारस्य तस्यातस्तपोवनमुपेयुषः । एकशाटकषारित्वं प्राग्वद्दीक्षाद्यमिष्यते ॥ ७७ इति दीक्षाद्यक्रिया ॥ १८ ततोऽस्य जिनरूपत्वमिष्यते त्यक्तवाससः । धारणं जातरूपस्य युक्ताचाराद्गणेशिनः ॥ ७८ । ___ इति जिनरूपता ॥ १९ क्रियाशेषास्तु निःशेषाः प्रोक्ता गर्भान्वये यथा । तथैव प्रतिपाद्याः स्युन भेदोऽस्त्यत्र कश्चन ॥७९ यस्त्वेतास्तत्त्वतो ज्ञात्वा भव्यः समनुतिष्ठति । सोऽधिगच्छति निर्वाणमचिरात्सुखसाद्भवन् ॥ ८० इति दीक्षान्वयक्रिया ॥ २० अथातः सम्प्रवक्ष्यामि द्विजाः कन्वयक्रियाः । याः प्रत्यासन्ननिष्ठस्य भवेयुभव्यदेहिनः ॥ ८१ तत्र सज्जातिरित्याद्या क्रिया श्रेयोऽनुबन्धिनी । या सा चासन्नभव्यस्य नजन्मोपगमे भवेत् ॥ ८२ स नजन्मपरिप्राप्तौ दीक्षायोग्ये सदन्वये। विशुद्धं लभते जन्म सैषा सज्जातिरिष्यते ॥ ८३ विशुद्धकुलजात्यादिसम्पत्सज्जातिरुच्यते । उदितोदिजवंशत्वं यतोऽभ्येति पुमान्कृती ॥ ८४ घराचा त्याग करून तपोवनाकडे हा गृहस्थाचार्य जातो व पूर्वी गर्भान्वयक्रियेत सांगितल्याप्रमाणे एक वस्त्र धारण करतो. या संस्काराला दीक्षाद्यक्रिया म्हणतात. ही अठरावी क्रिया आहे ॥ ७७ ॥ यानन्तर त्या एक वस्त्राचाही त्याग करून हा गृहस्थाचार्य जिनरूपत्व धारण करतो अर्थात् ज्यांचा आचार यत्याचार शास्त्रानुसार आहे अशा गणाधिपमुनिराजापासून हा जातरूप धारण करतो अर्थात् जन्म झाला त्यावेळचे रूप-दिगंबरस्वरूप धारण करतो. ही जिनरूपता क्रिया १९ वी आहे ।। ७८ ॥ येथपर्यन्त आम्ही दीक्षान्वयक्रियांचे वर्णन केले आहे पण आणखी जे दीक्षान्वय वर्णन करणे राहिले आहे त्यांचे वर्णन करणे गर्भान्वयक्रियांचे जसे केले तसेच जाणावे. त्यात क्रियाचा काहीही फरक नाही. जो भव्य परमार्थरीतीने त्यांचे स्वरूप जाणून त्याचे आचरण करतो तो लौकरच सुखमय होऊन निर्वाणपदाला मिळवितो ॥ ७९-८० ॥ यानंतर हे द्विजानो, मी कर्जन्वयक्रियांचे वर्णन करतो. या क्रिया ज्याचा संसार थोडासा उरला आहे अर्थात् मोक्षाची प्राप्ति ज्याला लौकरच होईल त्याला होतात ।। ८१ ॥ या कन्वयक्रियामध्ये पहिली क्रिया सज्जाति नांवाची आहे व ती आसन्नभव्याला मनुष्यजन्म प्राप्त झाला असता प्राप्त होते व ती कल्याण करणारी आहे ॥ ८२ ॥ मनुष्य जन्म प्राप्त झाला असता दीक्षाग्रहण करण्यास योग्य अशा उत्तम वंशामध्ये विशुद्ध जन्म मिळवितो त्याला सज्जाति असे म्हणतात. ती त्याची सज्जातिक्रिया होय. निर्दोष असे कुल व जाति वगैरे संपदा प्राप्त होणे तिला सज्जाति म्हणतात. या सज्जातीपासूनच पुण्यवान् मनुष्याला उत्तरोत्तर उत्तमवंशाची प्राप्ति होते ।। ८३-८४ ।। Page #425 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१४) महापुराण (३९-८५ पितुरन्वयशुद्धिर्या तत्कुलं परिभाष्यते । मातुरंन्वयशुद्धिस्तु जातिरित्यभिलप्यते ॥ ८५ विशुद्धिरुभयस्यास्य सज्जातिरनवणिता। यत्प्राप्तौ सुलभा बोधिरयत्नोपनत्तैर्गुणैः ॥ ८६ सज्जन्मप्रतिलम्भोऽयमार्यावर्ते विशेषतः । सत्यां देहादिसामग्रयां श्रेयः सूते हि देहिनाम् ॥ ८७ शरीरजन्मना सैषा सज्जातिरुपणिता । एतन्मूला यतः सर्वाः पुंसामिष्टार्थसिद्धयः ॥८८ संस्कारजन्मना चान्या सज्जातिरनुकीय॑ते । यामासाद्य द्विजन्मत्वं भव्यात्मा समुपाश्नुते ॥ ८९ विशुद्धाकरसम्भूतो मणिः संस्कारयोगतः । यात्युत्कर्ष यथात्मैवं क्रियामन्त्रैः सुसंस्कृतः ॥ ९० सुवर्णधातुरथवा शुद्धोदासाद्य संस्क्रियाम् । यथा तथैव भव्यात्मा शुद्धयत्यासादितक्रियः ॥ ९१ ज्ञानजः स तु संस्कारः सम्यग्ज्ञानमनुत्तरम् । यदाथ लभते साक्षात्सर्वविन्मुखतः कृती ॥ ९२ तदेष परमज्ञानगर्भात्संस्कारजन्मना । जातो भवेद्विजन्मेति व्रतैः शीलैश्च भूषितः ॥ ९३ .....................-. पित्याच्या वंशाची जी शुद्धि तिला कुल म्हणतात आणि मातेच्या वंशाची जी शुद्धि तिला जाति म्हणतात. या पिता व मातेच्या वंशशद्धीला सज्जाति म्हणतात व या दोन कूल शुद्धि व जातिशुद्धीची प्राप्ति झाली असता प्रयत्नावाचून प्राप्त झालेल्या गुणानी रत्नत्रयाची प्राप्ति सुलभ होते ।। ८५-८६ ।। अशारीतीचा विशुद्ध आणि उत्तम जन्म प्राप्त होणे ही गोष्ट या आर्यावर्तातच विशेषरीतीने आढळून येते. विशुद्ध कुल व विशुद्ध जातिमुळे देहादिसामग्री निर्दोष प्राप्त होते व त्यामुळे प्राण्यांचे अनेक प्रकारानी कल्याण होते. या दोन शुद्धीनी शरीरजन्म झाला म्हणजे त्याला सज्जाति म्हणतात. अशारीतीने शरीरजन्म झाला असता त्यापासून पुरुषाना सर्व प्रकारच्या इष्टपदार्थाच्या सिद्धि होतात ॥ ८७-८८ ।। संस्काररूप जन्माने दुसरी सज्जाति शास्त्रकार वर्णितात. संस्कारानी प्राप्त झालेल्या सज्जातीने भव्यात्म्याला द्विजन्मपणा प्राप्त होतो ।। ८९ ।। शुद्ध अशा खाणीत उत्पन्न झालेले रत्न जसे घासणे वगैरे संस्कारानी उत्कर्षाला पावते, अतितेजस्वी होते तसे हा आत्मा देखिल क्रियामंत्रांनी सुसंस्कृत झाला असता उत्कर्षाला प्राप्त होतो ॥ ९० ॥ ___ अथवा सोने ही धातु तापविणे, इतर धातूपासून वेगळे करणे इत्यादिकानी संस्कारयुक्त झाली असता जशी शुद्ध होते तसे हा भव्यात्मा संस्कारानी शुद्ध होतो ॥ ९१ ॥ तो संस्कार ज्ञानज-ज्ञानापासून उत्पन्न होतो व ते सम्यग्ज्ञान अनुत्तर-सर्वोत्कृष्ट आहे. जेव्हा तो पुण्यवान् भव्य साक्षात्सर्वज्ञदेवाच्या मुखापासून त्या उत्तम ज्ञानाला मिळवितो तेव्हा तो उत्कृष्ट ज्ञानरूपी गर्भापासून संस्कारजन्म ग्रहण करून व्रतानी भूषित होऊन द्विज होतो ॥ ९२-९३ ॥ | Page #426 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-१०३) महापुराण व्रतचिह्नं भवेदस्य सूत्रं मन्त्रपुरःसरम् । सर्वज्ञाज्ञाप्रधानस्य द्रव्यभावविकल्पितम् ॥ ९४ यज्ञोपवीतमस्य स्यात्द्रव्यनस्त्रिगुणात्मकम् । सूत्रमौपासिकं तु स्याद्भावरूपैस्त्रिभिर्गुणैः ॥ ९५ यदैव लब्धसंस्कारः परंब्रह्माधिगच्छति । तदैनमभिनन्द्याशीर्वचोभिर्गणनायकाः ॥ ९६ लम्भयन्त्युचितां शेषां जैनी पुण्यरथाक्षतैः । स्थितीकरणमेतद्धि धर्मप्रोत्साहनं परम् ॥ ९७ अयोनिसम्भवं दिव्यं ज्ञानगर्भसमुद्भवम् । सोऽधिगम्य परं जन्म तदासज्जातिभाग्भवेत् ॥ ९८ ततोऽधिगतसज्जातिः सद्गृहित्वमसौ भजेत् । गृहमेधी भवन्नार्यषट्कर्माण्यनुपालयन् ॥ ९९ यदुक्तं गृहचर्यायामनुष्ठानं विशुद्धिमत् । तदाप्तविहितं कृत्स्नमतन्द्रालुः समाचरन् ॥ १०० जिनेन्द्राल्लब्धसज्जन्मा गणेन्द्ररनुशिक्षितः । स धत्ते परमं ब्रह्मवर्चसं द्विजसत्तमः ॥ १०१ तमेनं धर्मसाभतं श्लाघन्ते धामिका जनाः। परं तेज इव ब्राह्ममवतीर्ण महीतलम् ॥ १०२ स यजन्थाजयन्धीमान्यजमानरुपासितः। अध्यापयन्नधीयानो वेदवेदाङ्गविस्तरम् ॥ १०३ जो सर्वज्ञ जिनेश्वराची आज्ञा मुख्य प्रमाण आहे असे मानतो अशा त्या भव्याचे व्रताचे चिह्न सूत्र हे आहे व ते त्याने मन्त्रपुरःसर धारण केलेले असते. त्याचे द्रव्य व भाव असे दोन भेद आहेत. अर्थात् द्रव्यसूत्र आणि भावसूत्र असे ते दोन प्रकारचे आहे. द्रव्यसूत्र असे जे यज्ञोपवीत आहे ते तीन पदरांचे असते व भावरूप जे औपासिक सूत्र ते सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र या तीन गुणानी हृदयात उत्पन्न झालेल्या सम्यग्दर्शनादिक तीन गुणानी उत्पन्न झालेले असते त्याला भावयज्ञोपवीत म्हणतात. ज्यावेळी हा भव्य या संस्काराला प्राप्त करून उत्तम ब्रह्मस्वरूपाला-रत्नत्रयाला मिळवितो तेव्हा आचार्य व गृहस्थाचार्य त्याला शेषा देतात अर्थात् आशीर्वादानी त्याची प्रशंसा करून जिनपूजा करून उरलेल्या पुष्पांचा व अक्षतांचा प्रसाद देतात. असे करणे हे त्याला जिनधर्मात स्थिर करणे होय व त्याला धर्म पाळण्यात उत्तम प्रोत्साहन देणे होय. त्यावेळी दिव्यज्ञानरूपी गर्भापासून व योनीवाचून उत्तम जन्म त्या श्रावकाला प्राप्त होतो असा जन्म प्राप्त करून तो उत्तमजातीला धारण करतो ॥ ९४-९८॥ यानंतर ज्याला सज्जातिप्राप्ति झाली आहे असा श्रावक सद्गृहस्थ होतो व सद्गृहस्थाची जी श्रेष्ठ षट्कर्म आहेत त्यांचे हा पालन करतो ।। ९९ ॥ जे गृहचर्याक्रियेत आप्त- जिनेश्वरानी सांगितलेले निर्दोष आचरण आहे ते सर्व निरलस असा हा गृहस्थ आचरणात आणतो ॥ १०० ॥ जिनेश्वरापासून ज्याला उत्तम जन्म प्राप्त झाला आहे व गणधरापासून-जैनाचार्यापासून ज्याला जैनधर्माचे शिक्षण प्राप्त झाले आहे असा तो श्रेष्ठ द्विज उत्कृष्ट ब्रह्मतेजाला आत्मतेजाला धारण करतो ॥ १०१ ।। धर्मस्वरूपाला जणु प्राप्त झालेल्याची धार्मिक लोक "हे ब्रह्मतेज जणु या भूतलावर अवतीर्ण झाले आहे" अशी त्यांची प्रशंसा करतात ॥ १०२ ॥ पूजा करणारे अशा यजमानाकडून जो उपासिला जात आहे असा तो श्रेष्ठ द्विज स्वतः पूजा करतो व इतराना पूजा करावयास लावतो व वेद आणि वेदांगाच्या विस्ताराचे स्वतः अध्ययन करून इतरानाही त्याचे शिक्षण देतो ।। १०३ ॥ Page #427 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१६) महापुराण (३९-१०४ स्पृशन्नपि महीं नैव स्पृष्टो दोषैर्महीगतः । देवत्वमात्मसात्कुर्यादिहैवाचितैर्गुणैः ॥ १०४ नाणिमा महिमवास्य गरिमैव न लाघवम् । प्राप्तिः प्राकाम्यमोशित्वं वशित्वं चेति तद्गुणाः ॥१०५ गुणरेभिरुपारूढमहिमा देवसाद्भवन् । बिभ्रल्लोकातिगं धाम महामेष महीयते ॥ १०६ धयराचरितैः सत्यशौचक्षान्तिदमादिभिः । देवब्राह्मणतां श्लाघ्यां स्वस्मिन्सम्भावयत्यसो ॥ १०७ अथ जातिमदावेशाकश्चिदेनं द्विजब्रुवः । ब्रूयादेवं किमद्यैव देवभूयंगतो भवान् ॥ १०८ त्वमामुष्यायणः किन्तु किं तेऽम्बामुष्य पुत्रिका । येनैवमुन्नसो भूत्वा यास्यसत्कृत्य मद्विधान् ॥१०९ जातिः सैव कुलं तच्च सोऽसि योऽसि प्रगेतनः । तथापि देवतात्मानमात्मानं मन्यते भवान् ॥११० देवतातिथिपित्रग्निकार्येष्वप्राकृतो भवान् । गुरुद्विजातिदेवानां प्रणामाच्च पराङमुखः ॥ १११ तो या भूतलाला जरी स्पर्श करीत आहे तथापि पृथ्वीवरच्या दोषानी स्पशिला जात नाही. त्यामुळे इहलोकीच आदरणीय अशा गुणानी देवपणाला प्राप्त करून घेतो ॥ १०४ ।। याच्या ठिकाणी अणिमा-तुच्छपणा नसतो पण महिमा ऋद्धि-श्रेष्ठपणा असतो व याच्या ठिकाणी गरिमा-गुरुत्व मोठेपणा वजनदारपणा जरी नसतो तथापि श्रेष्ठपणा आदरणीयता असते. याच्या ठिकाणी प्राप्ति, प्राकाम्य, ईशत्व व वशित्व आदिक देवपणाचे गुण विद्यमान आहेत. वरील गुणानी याची महिमा वाढत असल्यामुळे हा जणु देवरूप होत आहे व लोकाला उल्लंघन करणारे उत्कृष्ट तेज धारण करीत असून हा लोकपूजित होत आहे ।। १०५ ।।। ___ या गुणानी याचा महिमा वाढल्यामुळे तो देवाप्रमाणे होऊन लोकाना उल्लंघणारे तेज धारण करून पृथ्वीवर तो पूज्य होत आहे ॥ १०६ ।। सत्य, शौच-निर्लोभता, क्षमा, जितेन्द्रियपणा आदिक गुणानी तो आपल्या ठिकाणी देवब्राह्मणपणाची संभावना करीत आहे. अर्थात् उत्तम आचरणाने स्वतःला देवब्राह्मणाप्रमाणे उत्तम बनवितो ॥ १०७ ॥ मी ब्राह्मण आहे अशा जातिमदाच्या आवेशाने स्वतःलाच ब्राह्मण समजणारा कोणी मनुष्य त्याला असे म्हणतो 'काय आजच तूं देवपणाला प्राप्त झाला आहेस ?' ॥ १०८ ॥ 'तू अमुक प्रसिद्ध पुरुषाचा पुत्र आहेस अर्थात् तुझा पिता प्रसिद्ध आहे व तुझी माता अमुक प्रसिद्ध पुरुषाची मुलगी आहे हे आम्हाला माहीत आहे पण तू आपले नाक वर करून आमच्या सारख्यांचा आदर न करता आमच्या पुढून तू निघून जातोस ? ॥ १०९ ॥ 'तुझी जातही जी पूर्वी होती तीच आताही आहे व तुझे कुलही पूर्वीचेच आहे तरीही तू आपणास देवपणाला प्राप्त मी झालो आहे असे समजतोस' ॥ ११० ॥ तू देवता, अतिथि व पितर यांच्याविषयी करावयाची होमादि कृत्ये तूं जाणत आहेस तरीही गुरु, द्विज व देव यांना नमस्कार करण्यापासून तू पराङमुख झाला आहेस ॥ १११ ॥ Page #428 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-११९) महापुराण (४१७ दीक्षा जैनी प्रपन्नस्य जातः कोऽतिशयस्तव । यतोद्यापि मनुष्यस्त्वं पादचारी महीं स्पृशन् ॥११२ इत्युपारूढ़संरम्भमुपालब्धः स केनचित् । ददात्युत्तरमित्यस्मै वचोभियुक्तिपेशलैः ॥ ११३ श्रूयतां भो द्विजम्मन्य त्वयास्मद्दिव्यसम्भवः । जिनो जनयितास्माकं ज्ञानं गर्भोऽतिनिर्मलः ॥११४ तत्रार्हन्तीं त्रिषाभिन्नां शक्ति त्रैगुण्यसंश्रिताम् । स्वसात्कृत्य समुद्भूता वयं संस्कारजन्मना ॥११५ अयोनिसम्भवास्तेन देवा एव न मानुषाः । वयं वयमिवान्येऽपि सन्ति चेब्रूहि तद्विधान् ॥ ११६ स्वायम्भुवान्मुखाज्जातास्ततो देवद्विजा वयम् । व्रतचिह्नं च नः सूत्रं पवित्रं सूत्रदर्शितम् ॥ ११७ पापसूत्रानुगा यूयं न द्विजाः सूत्रकण्टकाः । सन्मार्गकण्टकास्तीक्ष्णाः केवलं मलदूषिताः ॥ ११८ शरीरजन्म संस्कारजन्म चेति द्विधा मतम् । जन्माङ्गिनां मृतिश्चैवं द्विधाम्नाता जिनागमे ॥११९ तू जैनदीक्षा घेतली आहेस पण तुझ्या ठिकाणी कोणती विशिष्टता उत्पन्न झाली आहे ? तू अद्यापि मनुष्यच आहेस व पृथ्वीला स्पर्श करून आमच्याप्रमाणे पायानीच चालत आहेस ।। ११२ ॥ ___याप्रमाणे क्रोधाने कोणाकडून तरी जर तो निन्दिला गेला तर तो त्याला युक्तीनी सुन्दर अशा वचनानी याप्रमाणे उत्तर देतो- आपणास ब्राह्मण समजणाऱ्या हे पुरुषा, आमचा दिव्यजन्म कसा झाला आहे तो ऐक. जिनेश्वर हे आमचे जनक आहेत व अत्यन्त निर्मल गर्भ म्हणजे त्यानी दिलेले उत्कृष्ट ज्ञान हा गर्भ आहे ।। ११३-११४ ॥ त्या गर्भात उपलब्धि, उपयोग आणि संस्कार याप्रमाणे तीन प्रकारानी भिन्न झालेली व तीन गुणानी आश्रय केलेली म्हणजे अरिहन्त सम्बंधी सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र या तीन गुणांचा आश्रय करून आम्ही संस्काररूपी जन्माने उत्पन्न झालेले आहोत ॥ ११५ ॥ आम्ही योनीपासून उत्पन्न न झाल्यामुळे देवच आहोत आम्ही मनुष्य नाही व आमच्यासारखे जे इतरही आहेत तर त्यानाही तू अयोनिसंभवच म्हण ॥ ११६ ॥ स्वयंभू जिनेश्वराच्या मुखापासून आमचा जन्म झाला आहे म्हणून आम्ही देवब्राह्मण आहोत व आमचे सूत्र- यज्ञोपवीत हे आगमानें वर्णिलेले पवित्र सूत्र असे आहे ॥ ११७ ॥ पण आपण पापसूत्राला- हिंसा धर्म आहे असे निरूपण करणाऱ्या वेदाचे अनुयायी आहात व गळ्यात सूत अडकविणारे आहात व फक्त पापरूपी मलाने चिखलाने दूषित झालेले भरलेले आहात आणि सन्मार्गातील तीक्ष्ण काटे आहात आपण द्विज- ब्राह्मण नाहीत ॥ ११८॥ जिनागमात जन्म दोन प्रकारचा सांगितला आहे. एक शरीरजन्म व एक संस्कार जन्म. तसेच मरणही जिनागमात दोन प्रकारचे सांगितले आहे ॥ ११९ ॥ म. ५३ Page #429 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३९-१२० देहान्तरपरिप्राप्तिः पूर्वदेहपरिक्षयात् । शरीरजन्म विज्ञेयं देहभाजां भवान्तरे ॥ १२० तथा लब्धात्मलाभस्य पुनः संस्कारयोगतः । द्विजन्मतापरिप्राप्तिर्जन्म संस्कारजं मतम् ।। १२१ शरीरमरणं स्वायुरन्ते देहविसर्जनम् । संस्कारमरणं प्राप्तव्रतस्यागः समुज्झनम् ।। १२२ तोऽयं लब्धसंस्कारो विजहाति प्रगेतनम् । मिथ्यादर्शनपर्यायं ततस्तेन मृतो भवेत् ॥ १२३ तत्र संस्कारजन्मेदमपापोपहतं परम् । जातं नो गुर्वनुज्ञानादतो देवद्विजा वयम् ॥ १२४ इत्यात्मनो गुणोत्कर्ष ख्यापयन्त्यायवर्त्मना । गृहमेधीभवेत्प्राप्य सद्गृहित्वमनुत्तरम् ॥ १२५ भूयोऽपि सम्प्रवक्ष्यामि ब्राह्मणान्सत्क्रियोचितान् । जातिवादावलेपस्य निरासार्थमतः परम् ॥ १२६ ब्रह्मणोऽपत्यमित्येवं ब्राह्मणाः समुदाहृताः । ब्रह्मा स्वयम्भूर्भगवान्परमेष्ठी जिनोत्तमः ॥ १२७ सह्यादिपरमब्रह्मा जिनेन्द्रो गुणबृंहणात् । परंब्रह्म यदायत्त मामनन्ति मुनीश्वराः ।। १२८ ४१८) महापुराण प्राण्याला पूर्वीच्या देहाचा नाश झाल्यामुळे दुसन्या देहाची प्राप्ति अन्यभवात होते तो शरीरजन्म जाणावा असा शरीरजन्म झाल्यावर त्यावर संस्काराच्या योगाने पुनः आत्म लाभ ज्याला प्राप्त झाला आहे अशा पुरुषाला जी द्विजपणाची प्राप्ति होते तो संस्कारजन्म समजावा ।। १२०-१२१ ।। आपले आयुष्य संपल्यावर देहत्याग होणे यास शरीरमरण म्हणतात व व्रती पुरुष पापाचा त्याग करतो म्हणून त्या पापत्यागाला संस्कारमरण म्हणतात. याप्रमाणे मरण दोन 'प्रकारचे आहे ।। १२२ ॥ ज्याने संस्काराची प्राप्ति करून घेतली आहे असा पुरुष आपल्या पूर्वीच्या मिथ्यादर्शन पर्यायाचा त्याग करतो त्याअर्थी त्या त्यागाने तो मृत झाला असे मानले जाते ॥ १२३ ॥ पापाने जो दूषित झाला नाही तो संस्कारजन्म होय. असा संस्कारजन्म गुरूंच्या आज्ञेचे पालन केल्यामुळे आम्हाला प्राप्त झाला आहे म्हणून आम्ही देवद्विज आहोत ॥ १२४ ॥ याप्रमाणे न्यायपद्धतीने आपल्या गुणांचा उत्कर्ष प्रसिद्ध करणारा तो जैनद्विज उत्कृष्ट सद्गृहीपणाला मिळवून उत्तम गृहमेधीउत्कृष्ट गृहस्थ होतो ।। १२५ ॥ उत्तम संस्काराला योग्य अशा ब्राह्मणाचे मी पुनः वर्णन करतो. कारण जातिवादाच्या गर्वाचा परिहार व्हावा हा हेतु माझ्या मनात आहे ।। १२६ ।। ब्राह्मण - जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत त्यांना ब्राह्मण म्हणतात अशी ब्राह्मण शब्दाची 'निरुक्ति आहे. येथे ब्रह्मा म्हणजे आदिभगवान् ते स्वयम्भू परमेष्ठी व जिनोत्तम आहेत. तात्पर्य हे की, जे जिनेन्द्र भगवंताचा उपदेश ऐकून त्यांच्या शिष्यपरम्परेत राहून सदाचाराने वागत आले आहेत त्याना ब्राह्मण म्हणावे ।। १२७ ।। तो आदिजिनेश्वर अत्युत्तम ब्रह्मा आहे. त्याच्या ठिकाणी गुणाची वाढ झालेली होती म्हणून तो सर्वोत्कृष्ट ब्रह्मा होय. परब्रह्म त्याच्याच स्वाधीन आहे असे मुनीश्वर म्हणतात ।। १२८ ॥ Page #430 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-१३६) महापुराण (४१९ एणाजिनपरो ब्रह्मा जटाकूर्चाविलक्षणः । यः कामगर्दभो भूत्वा प्रच्युतो ब्रह्मवर्चसात् ॥ १२९ दिव्यमर्तेजिनेन्द्रस्य ज्ञानगर्भावनाविलात् । समासादितजन्मानो द्विजन्मानस्ततो मताः ॥ १३० वर्णान्तःपातिनो नेते मन्तव्या द्विजसत्तमाः । व्रतमन्त्रादिसंस्कारसमारोपितगौरवाः ॥ १३१ वर्णोत्तमानिमान्विद्मः क्षान्तिशौचपरायणान् । सन्तुष्टान्प्राप्तवैशिष्टयानक्लिष्टाचारभूषणान् ॥ क्लिष्टाचाराः परे नैव ब्राह्मणा द्विजमानिनः । पापारम्भरताः शश्वदाहृत्य पशुघातिनः ॥ १३३ सर्वमेधमयं धर्ममभ्युपेत्य पशुध्नताम् । का नाम गतिरेषां स्यात्पापशास्त्रोपजीविनाम् ॥ १३४ चोदनालक्षणं धर्ममधर्म प्रतिजानते । ये तेभ्यः कर्मचाण्डालात्पश्यामो नापरान्भुवि ॥ १३५ पाथिवैर्दण्डनीयाश्च लुण्टाकाः पापपण्डिताः। तेऽमी धर्मजुषां बाह्याः ये निघ्नन्त्यघृणाः पशन ॥१३६ ___ ज्याने हरिणाचे कातडे धारण केले आहे, जटाधारीमिशा आदिक ज्याचे लक्षण आहे असला ब्रह्मा आदि जिनेश्वर नव्हते. जटादिक लक्षणाचा ब्रह्मा हा कामशान्ति व्हावी म्हणून गाढव बनला होता व अहिंसादि व्रते, स्वाध्याय, ध्यान आदि स्वरूप जे ब्रह्मचर्याचे तेज त्यापासून तो भ्रष्ट झाला होता ॥ १२९ ॥ दिव्य शरीर ज्याचे आहे अशा जिनेन्द्राच्या निर्दोष ज्ञानरूपी गर्भापासून ज्यांचा जन्म झाला आहे असे जे तेच द्विज होत, तेच ब्राह्मण होत ॥ १३० ।। व्रते, मन्त्र, संस्कार आदिकामुळे ज्यांच्या ठिकाणी गौरव प्राप्त झाले आहे अशा या श्रेष्ठ द्विजाना वर्णान्तर्गत मानू नये. अर्थात् ते वर्णोत्तम आहेत ।। १३१ ।। हे श्रेष्ठ ब्राह्मण क्षमा, निर्लोभता यात तत्पर असतात व सन्तुष्ट असतात, ज्ञानामुळे याना विशिष्टता प्राप्त झाली आहे, निर्दोष आचरणरूपी अलंकार ज्यानी धारण केले आहेत असे हे ब्राह्मण वर्णोत्तम आहेत असे मानावेत ।। १३२॥ ज्यांचा आचार मळकट आहे व आपणास द्विज- ब्राह्मण आहोत असे मानतात ते वास्तविक ब्राह्मण नाहीत. कारण ते नेहमी पापारंभ करणारे आहेत व पशूना ओढून आणून यज्ञांत त्यांचा घात करणारे आहेत ।। १३३ ॥ सर्व हिंसामय धर्माचा स्वीकार करून पशु प्राण्याचा घात करतात व जे पापशास्त्राचा उपदेश करून उपजीविका करतात अशा या ब्राह्मणाना कोणती गति प्राप्त होईल हे समजत नाही ॥ १३४ ॥ हे ब्राह्मण अधर्म स्वरूप वेदामध्ये सांगितलेल्या प्रेरणात्मक धर्माला धर्म मानतात आम्ही त्यांच्याशिवाय इतराना या भूमीवर कर्मचांडाल समजत नाही. अर्थात् वेदांत सांगितलेल्या धर्माला मानणारे हे ब्राह्मण कर्मचांडाल आहेत ॥ १३५ ॥ हे ब्राह्मण निघृण-दयारहित होऊन पशूना मारतात म्हणून हे लुटारू आहेत, पापकार्ये करण्यात पंडित- निपुण आहेत. असे हे ब्राह्मण धर्मात्मा लोकापासून बाह्य आहेत, बहिष्कृत आहेत. असले ब्राह्मण राजाकडून दंडिले गेले पाहिजेत ।। १३६ ॥ Page #431 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२०) महापुराण पशुहत्यासमारम्भात्क्रव्यादेभ्योऽपि निष्कृपाः । यद्युच्छ्रितिमुशन्त्ये ते हन्तेवं धार्मिका हताः ॥ १३७ मलिनाचरिता ह्येते कृष्णवर्गे द्विजब्रुवा: । जैनास्तु निर्मलाचाराः शुक्लवर्गे मता बुधैः ॥ १३८ श्रुतिस्मृतिपुरावृत्त वृत्तमन्त्रक्रियाश्रिता । देवतालिङ्गकामान्तकृता शुद्धिर्द्विजन्मनाम् ॥ १३९ ये विशुद्धतरां वृत्ति तत्कृतां समुपाश्रिताः । ते शुक्लवर्गे बोद्धव्याः शेषाः सर्वे बहिः कृताः ॥ १४० तच्छुद्ध शुद्धी बोद्धव्ये न्यायान्यायप्रवृत्तितः । न्यायो दयार्द्रवृत्तित्वमन्यायः प्राणिमारणम् ॥ १४१ विशुद्धवृत्तयस्तस्माज्जैना वर्णोत्तमा द्विजाः । वर्णान्तःपातिनो नेते जगन्मान्या इति स्थितम् ॥ १४२ स्यादाका च षट्कर्मजीविनां गृहमेधिनाम् । हिंसादोषोऽनुषङ्गी स्याज्जनानां च द्विजन्मनाम् ॥ इत्यत्र ब्रूमहे सत्यमल्पसावद्यसङ्गतिः । तत्रास्त्येव तथाप्येषां स्याच्छुद्धिः शास्त्रदर्शिता ॥ १४४ (३९-१३७ पशु मारण्याचे कार्य करीत असल्यामुळे हे राक्षसापेक्षा अधिक निर्दय आहेत. असे पुरुष जर उन्नतियुक्त व श्रेष्ठ आहेत असे मानले गेले तर अरेरे खरे धार्मिक लोक बिचारे मारले गेले असे म्हणावे लागेल ।। १३७ ॥ आपणाला द्विज ब्राह्मण मानणारे हे लोक मलिन आचरणाचे असल्यामुळे याना कृष्ण वर्गात पापी लोकात अन्तर्भूत करावेत. जैन हे निर्मल आचरणाचे असल्यामुळे विद्वानानी त्याना शुक्लवर्गात पुण्यवंत लोकात मानले आहे ।। १३८ ॥ आगम, धर्मसंहिता ग्रन्थ, पुराणे, सदाचार, मन्त्र व क्रिया यानी जैन ब्राह्मणाची शुद्धि होते - आगमादिकांच्या आश्रयाने जैन वागत असल्यामुळे ते शुद्ध होतात, निष्पाप होतात. तसेच देवता व लिंग आणि कामविकाराचा नाश यांच्या योगाने त्याना शुद्धि प्राप्त झालेली असते ।। १३९ । वरील श्रुति, धर्मसंहिता आदिकानी झालेल्या शुद्धीने जे युक्त आहेत व ज्यांची वृत्ति उपजीविका शुद्ध आहे ते शुक्ल वर्गातले आहेत असे समजावे व याहून बाकीचे जे लोक आहेत त्याना शुद्धीपासून दूर राहिलेले समजावेत ।। १४० ।। यांची शुद्धि व अशुद्धि न्याय व अन्याय प्रवृत्तीवरून ओळखावी. दयार्द्रवृत्ति असणे ती न्यायप्रवृत्ति होय आणि प्राणी मारण्याच्या प्रवृत्तीला अन्यायवृत्ति म्हणतात ॥ १४१ ॥ यावरून असे निश्चित झाले - जैन हे विशुद्धवृत्तीचे असल्यामुळे तेच वर्णोत्तम सर्व वर्णात उत्तम - श्रेष्ठ आहेत व ते द्विज आहेत व जगन्मान्य आहेत ॥ १४२ ॥ आता येथे अशी शंका उत्पन्न होते - असि, मषि आदि सहा कार्यानी उपजीविका करणारे जे जैन गृहस्थ आहेत किंवा जे जैन द्विज आहेत त्याना हिंसा दोष लागतोच ? ॥१४३॥ या शंकेचे उत्तर आचार्य देतात- तुमची शंका सत्य आहे असि मष्यादि कर्मानी उपजीविका करणा-याना अल्प दोष पातक हे लागते तरी तो दोष ते पातक यापासून शुद्ध होण्यासाठी शास्त्राने त्याना शुद्धिही सांगितली आहे ।। १४४ ।। Page #432 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-१५३) महापुराण (४२१ अपि चैषां विशुद्धयङ्गं पक्षश्चर्या च साधनम् । इति त्रितयमस्त्येव तदिदानी विवृण्महे ॥ १४५ तत्र पक्षो हि जनानां कृत्स्नहिंसाविवर्जनम् । मैत्रीप्रमोदकारुण्यमाध्यस्थ्यरुपबृंहितम् ॥ १४६ । चर्या तु देवतार्थ वा मन्त्रसिद्ध चर्थमेव वा औषधाहारक्लप्त्यै वा न हिस्यामीति चेष्टितम् ॥१४७ तत्राकामकृते शुद्धिः प्रायश्चित्तविधीयते । पश्चाच्चात्मान्वयं सूनी व्यवस्थाप्य गृहोज्झनम् ॥१४८ चर्येषा गहिणां प्रोक्ता जीवितान्ते तु साधनम् । देहाहारेहितत्यागाद्धचानशुद्धयात्मशोधनम् ॥१४९ त्रिष्वेतेषु न संस्पर्शो वनाईद्धि जन्मनाम् । इत्यात्मपक्षनिक्षिप्तदोषाणां स्यान्निराकृतिः ॥ १५० चतुर्णामाश्रमाणां च शुद्धिः स्यादाहते मते । चातुराश्रम्यमन्येषामविचारितसुन्दरम् ॥ १५१ ब्रह्मचारी गृहस्थश्च वानप्रस्थोऽथ भिक्षुकः । इत्याश्रमास्तु जैनानामुत्तरोत्तरशुद्धितः ॥ १५२ ज्ञातव्याः स्युः प्रपञ्चेन सान्तर्भेदाः पृथग्विधाः । ग्रन्थगौरवभीत्या तु नात्रतेषां प्रपञ्चना ॥१५३ या जैन गृहस्थाना व जैन ब्राह्मणाना विशुद्ध होण्यास तीन कारणे म्हणजे पक्ष, चर्या आणि साधन अशी सांगितली आहेत. या कारणांचे आता येथे आम्ही (आचार्य) विवरण करतो॥ १४५ ॥ मैत्री, प्रमोद, कारुण्य-दया आणि रागद्वेषरहितता म्हणजे माध्यस्थ्य यांनी वृद्धिंगत झालेला जो संपूर्ण हिंसात्याग त्याला पक्ष म्हणतात ॥ १४६ ।। अर्थात् देवतेसाठी, मन्त्र सिद्ध व्हावा म्हणून, औषधासाठी व आहारासाठी मी प्राण्यांना मारणार नाही अशी जी प्रतिज्ञा करणे तिला पक्ष म्हणतात ।। १४७ ।। वर सांगितलेल्या कार्यात जी हिंसा घडलेली असते ती इच्छापूर्वक-संकल्पपूर्वक नसते म्हणून तिला अकामकृत म्हणतात. अशा हिंसेची शुद्धि ही प्रायश्चित्तानी केली जाते. याप्रमाणे पक्ष कशास म्हणतात त्याचे हे वर्णन झाले. यानन्तर चर्यावर्णन असे- आपल्या वंशाचा भार आपल्या पुत्रावर व्यवस्थेने ठेवून घराचा त्याग करणे ती चर्या होय व जीविताच्या समाप्तीच्यावेळी देह व आहाराविषयीच्या इच्छेचा त्याग करून ध्यानाच्या शुद्धीने आत्मा शुद्ध करणे अर्थात् सल्लेखनामरण साधणे याला साधन म्हणतात ॥ १४८-१४९ ॥ ___या पक्ष, चर्या किंवा निष्ठा आणि साधन या तीन गृहस्थावस्थात जैन ब्राह्मणाना हिंसेशी स्पर्श होत नाही. म्हणून या जैनांच्या तीन पक्षात अवस्थात जे दोष अन्यमतीयानी लादले होते त्यांचे निराकरण केले ॥ १५० ।। ___ या जैनमतात चार आश्रमांची शुद्धीही सांगितलेली आहे. इतरांच्या चार आश्रमाचे वर्णन अविचाराने सुन्दर वाटते. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व भिक्षुक असे चार आश्रम आहेत व त्यात उत्तरोत्तर अधिक शुद्धि वाढत गेली आहे. या चार आश्रमांचे सविस्तर वर्णन जाणून ध्यावे. याच्यात अन्तर्भेद देखिल निरनिराळे पुष्कळ आहेत ते जाणून घ्यावेत. ग्रंथाचा विस्तार होईल या भीतीने त्याचे वर्णन केले नाही ॥ १५१-१५३ ॥ Page #433 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२२) महापुराण (३९-१५४ सद्गृहित्वमिदं ज्ञेयं गुणरात्मोपबृंहणम् । पारिवाज्यमितो वक्ष्ये सुविशुद्ध क्रियान्तरम् ॥ १५४ गार्हस्थ्यमनुपाल्यैवं गृहवासाद्विरज्यतः । यद्दीक्षाग्रहणं तद्धि पारिवाज्यं प्रचक्ष्यते ॥ १५५ पारिवाज्यं परिवाजो भावो निर्वाणदीक्षणम् । तत्र निर्ममतावृत्त्या जातरूपस्य धारणम् ॥ १५६ प्रशस्ततिथिनक्षत्रयोगलग्नग्रहांशकः । निर्ग्रन्थाचार्यमाश्रित्य दीक्षा ग्राह्या ममक्षणा ॥ १५७ विशुखकुलगोत्रस्य सद्वृत्तस्य वपुष्मतः । दीक्षायोग्यत्वमाम्नातं सुमुखस्य सुमेघसः ॥ १५८ ग्रहोपरागग्रहणे परिवेषेन्द्रचापयोः । वक्रग्रहोदये मेघपटलस्थगिताम्बरे ॥ १५९ मष्टाधिमासदिनयोः सङक्रान्तौ हानिमत्तियो । दीक्षाविधि मुमक्षणां नेच्छन्ति कृतबुद्धयः॥ १६० सम्प्रदायमनावृत्य यस्त्विमं दीक्षयेदधीः । स साधुभिर्बहिः कार्यः वृद्धात्यासादनारतः ॥ १६१ याप्रमाणे गुणानी आपल्या आत्म्याची उत्तरोत्तर वृद्धि करणे याला गृहित्व म्हणतात श्रावकधर्म म्हणतात. यानंतर अतिशय विशुद्ध अशी पारिव्राज्य नांवाची अन्य क्रिया मी सांगतो ।। १५४ ॥ गृहस्थाचा आचार याप्रमाणे पाळून घरात राहण्यापासून जेव्हा वैराग्य उत्पन्न होते तेव्हा जी दीक्षा घेणे- मुनि होणे ते पारिव्राज्य होय. पारिव्राज्य म्हणजे परिव्राजक होणे म्हणजे निर्वाण दीक्षा घेणे. यात निर्ममतावृत्ति अतिशय वाढते सर्व परिग्रहांचा त्याग झाल्याने तो जातरूप धारण करतो अन्तर्बाह्य परिग्रहत्यागी जन्मलेल्या बालकाप्रमाणे नग्नरूप धारण करतो ॥ १५५-१५६ ॥ मुक्ति प्राप्त करून घेण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थाने शुभतिथि, शुभनक्षत्र, शुभयोग, शुभलग्न व शुभ ग्रहांचे अंश यांनी युक्त अशावेळी निर्ग्रन्थाचार्याजवळ जाऊन दीक्षा घ्यावी ॥ १५७ ॥ ज्याचे पितृवंश व मातृवंश निर्दोष आहेत व जो उत्तम व्रतपालक आहे व जो मजबुत शरीराचा आहे, जो सुमुख- म्हणजे सुन्दर अवयवांचा आहे आणि बुद्धिमान् आहे त्याच्या ठिकाणी निर्ग्रन्थ दीक्षा घेण्याची योग्यता आहे असे शास्त्रकारानी वणिले आहे ॥ १५८ ॥ ज्यादिवशी राहु व केतु यांचा वेध असता व ग्रहण लागले असता, सूर्याला व चन्द्राला परिवेष म्हणजे मंडलाकार त्यांच्या सभोवती उत्पन्न झाला असता इन्द्रधनुष्य उगवले असता, वक्री झालेल्या ग्रहांचा उदय झाला असता, आणि मेघांच्या समूहानी सर्व आकाश आच्छादित झाले असता, क्षय-मास व अधिक मासाचे दिवस असता, संक्रान्तीच्यावेळी व क्षयतिथीच्यादिवशी बुद्धिमान आचार्य, मुमुक्षूला दीक्षा देण्याची इच्छा करीत नाहीत अर्थात् दीक्षा देत नाहीत. पण जो मंदबुद्धियुक्त आचार्य वर सांगितलेल्या संप्रदायाचा अनादर करून दीक्षा देईल त्याला साधूनी वृद्ध आचार्याच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे संघातून बाहेर काढावे त्याला आपल्या संघाचा नेता मानू नये ।। १५९-१६१ ।। Page #434 -------------------------------------------------------------------------- ________________ (४२३ तत्र सूत्रपदान्याहुर्योगीन्द्राः सप्तविंशतिम् । यैनिर्णीतं भवेत्साक्षात्पारिव्राज्यस्य लक्षणम् ॥ १६२ जातिर्मूर्तिश्च तत्रत्यं लक्षणं सुन्दराङ्गता । प्रभामण्डलचक्राणि तथाभिषवनाथते ॥ १६३ सिंहासनोपधाने च छत्रचामरघोषणाः । अशोकवृक्षनिधयो गृहशोभावगाहने ॥ १६४ क्षेत्रज्ञाज्ञासभाः कीर्तिर्वन्द्यता वाहनानि च । भाषाहारसुखानीति जात्यादिः सप्तविंशतिः ॥ १६५ जात्यादिकानिमान्सप्तविंशति परमेष्ठिनाम् । गुणानीप्सुर्भजेद्दीक्षां त्वेषु तेष्वकृतादरः ॥ १६६ जातिमानप्यनुत्सिक्तः सम्भजेदर्हतां क्रमौ । यतो जात्यन्तरे जात्यां याति जातिचतुष्टयीम् ॥१६७ जातिरैन्द्री भवेद्दिव्या चक्रिणां विजयाश्रिता । परमा जातिरार्हन्त्ये स्वात्मोत्था सिद्धिमीयुषाम् ॥१६८ मूर्त्यादिष्वपि नेतव्या कल्पनेयं चतुष्टयी । पुराणज्ञैरसंमोहात्क्वचिच्च त्रितयी मता ॥ १६९ ३९-१६९) महापुराण या दीक्षेच्या लक्षणात योगीन्द्रानी सत्तावीस सूत्रपदे सांगितली आहेत. यांचा निर्णय झाल्याने दीक्षेच्या लक्षणाचा निर्णय होतो ।। १६२ ।। १) जाति, २) मूर्ति, ३) जाति व मूर्तीचे लक्षण, ४) अंगांचे सौन्दर्य, ५) प्रभा, ६) मण्डल, ७) चक्र, ८) अभिषव, ९) नाथता, १०) सिंहासन, ११) उपधान, १२) छत्र, १३) चामर, १४) घोषणा, १५) अशोकवृक्ष, १६) निधि, १७) गृहशोभा, १८) अवगाहन १९) क्षेत्रज्ञ, २०) आज्ञा, २१) सभा, २२) कीर्ति, २३) वन्द्यता, २४) वाहन, २५) भाषा, २६) आहार, २७ ) सुख ही जाति आदिक सत्तावीस स्थाने जाणावीत ।। १६३-१६५ ॥ वर सांगितलेल्या जाति आदिक सत्तावीस परमेष्ठींच्या गुणांची प्राप्ति आपणास व्हावी म्हणून त्या भव्यपुरुषाने स्वतःच्या ठिकाणी असलेल्या गुणाविषयी आदर न बाळगता दीक्षा घ्यावी. हे जाति आदिक सत्तावीस गुण परमेष्ठीमध्ये असतात तसे दीक्षेच्छुकातही काही असतात पण स्वतःच्या त्या गुणांचा आदर मनात न धरता परमेष्ठींच्या जाति आदिक गुणांचा आदर बाळगावा. असे करण्याने तो दीक्षा घेणारा अहंकारादिकाच्या वश होणार नाही व त्यामुळे त्याचे उत्थान - उन्नति होऊन तो परमेष्ठिपदास प्राप्त होईल ।। १६६ ॥ दीक्षा घेणा-या व्यक्तीने स्वतःच्या जात्यादिक गुणाविषयी अहंकार, गर्व न बाळगता जिनेश्वराच्या पायांची पूजा त्याने करावी. असे जर तो करील तर पुढच्या जन्मात त्याची उत्पत्ति झाल्यावर त्याला परमेष्ठीच्या चार जातींची प्राप्ति होईल ।। १६७ ।। जातीचे चार प्रकार आहेत. इंद्राच्या जातीला दिव्य जाति म्हणतात. चक्रवर्तीची जाति विजयाजाति आहे. अरहन्ताच्या जातीला परजाति म्हणतात व सिद्धांच्यात उत्पन्न झालेल्या जातीला स्वात्मोत्थजाति म्हणतात ।। १६८ ।। मूर्ति आदिकात देखिल या चार जातींची कल्पना करावी. पण पुराणाचे जाणते अश आचार्यानी निर्मोह होऊन कोठे कोठे जाति मानल्या आहेत. ते सिद्धामध्ये स्वात्मोत्थजाति - मानीत नाहीत ॥ १६९ ॥ Page #435 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२४ ) (३९-१७० कर्शयेन्मूर्तिमात्मीनां रक्षन्मूर्तिः शरीरिणाम् । तपोऽधितिष्ठेद्दिव्यादिमूर्तीराप्तुमना मुनिः ॥ १७० स्वलक्षणमनिर्देश्यं मन्यमानो जिनेशिनाम् । लक्षणान्यभिसंधाय तपस्येत्कृतलक्षणः ॥ १७१ म्लापयन्स्वाङ्ग सौन्दयं मुनिरुग्रं तपश्चरेत् । वाञ्छन्दिव्यादिसौन्दर्यमनिवार्यपरम्परम् ॥ १७२ मलीमसाङ्गो व्युत्सृष्टस्वकाय प्रभवप्रभः । प्रभोः प्रभां मुनिर्ध्यायन्भवेत्क्षिप्रं प्रभास्वरः ॥ १७३ स्वं मणिस्नेहदीपादितेजोऽपास्य जिनं भजन् । तेजोमयमयं योगी स्यात्तेजोवलयोज्ज्वलः ॥ १७४ त्यक्त्वास्त्रवस्त्रशस्त्राणि प्राक्तनानि प्रशान्तिभाक् । जिनमाराध्य योगीन्द्रो धर्मचक्राधिपो भवेत् ॥ त्यक्तस्नानादिसंस्कारः संश्रित्य स्नातकं जिनम् । मूनि मेरोरवाप्नोति परं जन्माभिषेचनम् ॥ १७६ स्वं स्वाम्यमैहिकं त्यक्त्वा परमस्वामिनं जिनम् । सेवित्वा सेवनीयत्वमेष्यत्येष जगज्जनैः ॥ १७७ 1 महापुराण दिव्यादिमूर्तीची प्राप्ति व्हावी असे इच्छिणाऱ्या मुनिवर्याने तपश्चरण करावे व प्राण्यांच्या मूर्तीचे - शरीराचे रक्षण करून आपली मूर्ति अर्थात् शरीर कृश करावे ।। १७० ।। अनेक लक्षणाना धारण करणाऱ्या त्या मुनीने आत्म्याचे लक्षण वर्णन करण्यास अशक्य आहे असे समजून जिनेश्वराच्या लक्षणाचे चिन्तन करीत तपश्चरण करावे ।। १७१ ।। ज्यांची परम्परा टाळणे अशक्य आहे दिव्या, विजया वगैरे चार जातीचे सौन्दर्य प्राप्त व्हावे अशी इच्छा करणाऱ्या मुनीने आपल्या अंगांचे सौन्दर्य कमी म्लान करून तपश्चरण करावे ।। १७२ ॥ ज्याचे अंग मळकट आहे व त्यामुळे ज्याच्या शरीराची कान्ति नष्ट झाली आहे असा हा मुनि जिनेश्वराच्या देहकान्तीचे भामण्डलाचे चिन्तन करण्याने शीघ्र कान्तिसम्पन्न होतो ।। १७३ ।। जो योगीन्द्र मुनि रत्ने, तेल व दीपकाची कान्ती त्यागून जिनेश्वराची उपासना करतो. तो योगी तेजोमय जिनाच्या चिन्तनाने भामण्डलाने उज्ज्वल होतो ।। १७४ ।। ज्याने आपली पूर्वीची अस्त्रे, वस्त्रे व शस्त्रे त्यागिली आहेत व ज्याने उत्कृष्ट शान्तीला धारण केले आहे असा तो योगीन्द्र जिनेश्वराची आराधना केल्याने धर्मचक्राचा अधिपति होतो अर्थात् जिनेश्वर होतो ।। १७५ ।। जो योगीन्द्र स्नानादिकाचा संस्कार त्यागून स्नातक - केवलज्ञानी अशा जिनेश्वराचा आश्रय घेतो, त्याचे ध्यान करतो तो मेरुपर्वतावर उत्कृष्ट जन्माभिषेकाला प्राप्त होतो ॥ १७६ ॥ जो आपले लोकावरचे स्वामित्व त्यागतो, इहलोकी प्राप्त झालेला राजेपणा त्यागतो व उत्कृष्ट त्रैलोक्याच्या स्वामी अशा जिनेश्वराची सेवा करतो तो जगातील लोकाकडून सेवनीय होतो. अर्थात् तो जि ेश्वर होऊन सर्व लोकाकडून उपासिला जातो ।। १७७ ।। Page #436 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-१८५) महापुराण स्वोचितासनभेदानां त्यागात्त्यक्ताम्बरो मुनिः । संहं विष्टरमध्यास्य तीर्थप्रख्यापको भवेत् ॥ १७८ स्वोपधानाद्यनावृत्य योऽभूनिरुपधिर्भुवि । शयानः स्थण्डिले बाहुमात्रार्पितशिरस्तटः ॥ १७९ स महाभ्युदयं प्राप्य जिनो भूत्वाप्तसत्क्रियः । देवैविरचितं दीप्रमास्कन्दत्युपधानकम् ॥ १८० त्यक्तशीतातपत्राण सकलात्मपरिच्छदः । त्रिभिश्च्छत्रः समुद्भासि रत्नैरुद्भासते स्वयम् ॥ १८१ विविधव्यजनत्या गावनुष्ठिततपोविधिः । चामराणां चतुःषष्ट्या वीज्यते जिनपर्यये ॥ १८२ उज्झितानकसंगीतघोषः कृत्वा तपोविधिम् । स्यात् द्युदुन्दुभिनिर्घोषैर्घुष्यमाणजयोदयः ॥ १८३ उद्यानादिकृतां छायामपास्य स्वां तपो व्यधात् । यतोऽयमत एवास्य स्यादशोकमहाद्रुमः ॥ १८४ स्वं स्वापतेयमुचितं त्यक्त्वा निर्ममतामितः । स्वयं निधिभिरभ्येत्य सेव्यते द्वारि दूरतः ॥ १८५ ज्याने स्वतःला योग्य अशा अनेक आसनांचा त्याग केला आहे व ज्याने वस्त्र त्यागले आहे असा मुनि सिंहासनावर आरूढ होऊन सर्व जगात तीर्थप्रख्यापक होतो अर्थात् जिनेश्वर होऊन जिनधर्मरूपी तीर्थाचा सर्वत्र प्रसार करतो ।। १७८ ।। (४२५ जो मुनि गिर्दा, लोड, उशी आदिकांचा त्याग करून परिग्रहरहित होऊन आपल्या डोक्याखाली आपला फक्त हात ठेवून उंच सकल अशा जमिनीवर झोपतो तो महान् ऐश्वर्याला प्राप्त होतो व नंतर स्वर्गातून अवतरण करून जिनेश्वर होतो; देवाकडून तो अतिशय आदरसत्कार युक्त होतो व देवानी रचलेल्या तयार केलेल्या चमकणाऱ्या उशीला प्राप्त होतो. अर्थात् समवसरणात सिंहासनावर चमकणाऱ्या लोडाला टेकून तो बसतो ।। १७९-१८० ।। , ज्याने थंडी व उन्ह यापासून रक्षण करणाऱ्या सर्व आपल्या साधनांचा त्याग केला आहे असा तो साधु चमकणाऱ्या रत्नांनी युक्त अशा तीन छत्रानी शोभतो ।। १८१ ।। नाना प्रकारच्या पंख्यांचा त्याग करून ज्याने अनेक प्रकारची अनशनादि तपे केली आहेत असा तो साधु जेव्हा त्याला जिनावस्था प्राप्त होते तेव्हा तो चौसष्ट चामरानी वारा घातला जातो ।। १८२ ।। ज्याने नगान्यांचे शब्द व नृत्य, वाद्य आणि गायनांचे शब्द ऐकणे सोडले आहे असा तो साधु अनशनादितपांची नानाव्रते करतो व त्यामुळे केवलज्ञान होऊन त्याला जिनावस्था प्राप्त झाल्यावर देवनगाऱ्यानी ज्याचा जयजयकार आणि ऐश्वर्याची घोषणा केली जात आहे असा होतो ।। १८३ ॥ अनेक जे स्वतःचे बागबगीचे त्यांची सावली सोडून या साधूने तपश्चरण केले म्हणून या साधूला जिनदशा प्राप्त झाल्यावर त्याला अशोकमहावृक्षाची प्राप्ति होईल ।। १८४ ॥ न्यायाने मिळविलेले आपलें धन त्यागून हा साधु ममतारहित झाला त्यामुळे स्वतः निघि दरवाजाजवळ येऊन दूरून याची सेवा करीत आहेत ।। १८५ ॥ म. ५४ Page #437 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२६) गृहशोभां कृतारक्षां दूरीकृत्य तपस्यतः । श्रीमण्डपादिशोभास्य स्वतोऽभ्येति पुरोगताम् ॥ १८६ तपोऽवगाहनादस्य गहनान्यधितिष्ठतः । त्रिजगज्जनतास्थानसहं स्यादवगाहनम् ॥ १८७ क्षेत्रवास्तुसमुत्सर्गात्क्षेत्रज्ञत्वमुपेयुषः । स्वाधीनत्रिजगत्क्षेत्रमश्यमस्योपजायते ॥ १८८ आज्ञाभिमानमुत्सृज्य मौनमास्थितवानयम् । प्राप्नोति परमामाज्ञां सुरासुरशिरोधृताम् ॥ १८९ स्वामिष्टभृत्य बन्ध्वाविसभामुत्सृष्टवानयम् । परमाप्तपदप्राप्तावध्यास्ते त्रिजगत्सभाम् ॥ १९० स्वगुणोत्कीर्तनं त्यक्त्वा त्यक्तकामो महातपाः । स्तुतिनिन्दासमो भूयः कीर्त्यते भुवनेश्वरैः ॥ १९१ वन्दित्वा वन्द्यमर्हन्तं यतोऽनुष्ठितवांस्तपः । ततोऽयं वन्द्यते वन्द्यैरनिन्द्यगुणसन्निधिः ॥ १९२ महापुराण जिचे रक्षण केले जात आहे अशा घरांची शोभा त्यागून तपश्चरण करणाऱ्या या मुनीच्यापुढे श्रीमण्डपादिकांची शोभा आपोआप स्वतःच येते ।। १८६ ॥ ( ३९ - १९२ तपश्चरणात अवगाहन सर्व प्रकारे प्रवेश करून अरण्यात राहणाऱ्या या मुनीला तीर्थंकरत्व प्राप्त झाल्यावर त्रैलोक्यातील जीवाना ज्यामध्ये स्थान मिळते अशी अवगाहनशक्ति प्राप्त होते. अर्थात् केवलज्ञान झाल्यावर या तपस्व्याला समवसरणसभा प्राप्त होते व याला अवगाहनशक्ति प्राप्त झाल्यामुळे त्रैलोक्यातील सर्व जीवाना त्यात सुखाने स्थान प्राप्त होते ॥ १८७ ॥ क्षेत्र - शेत व वास्तु-घर यांचा त्याग झाल्यामुळे क्षेत्रज्ञत्व - आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले अर्थात् केवलज्ञान झाले त्यामुळे या साधूला त्रैलोक्याचे क्षेत्र स्वाधीन होऊन त्याचे स्वामित्व प्राप्त होते ।। १८८ ॥ गृहस्थावस्थेतला आज्ञा करण्याचा स्वभाव व अभिमान हे टाकून दिल्यामुळे या मुनिराजाने मौनाचे सेवन केले आहे त्यामुळे या साधूच्या ठिकाणी सर्व सुर आणि असुर आपल्या मस्तकानी याची आज्ञा मान्य करतात ॥ १८९ ॥ या मुनिराजाने आपले आवडते मित्र, नोकर, बन्धु आदिकांच्या सभेचा त्याग केला त्यावरील मोह त्यागल्यामुळे त्याला उत्कृष्ट आप्तपदाची सर्वज्ञतेची प्राप्ति झाली आणि हा साधु त्रैलोक्याच्या सभेत विराजमान झाला आहे ।। १९० ।। या साघुराजाने आपल्या गुणांची बढाई मारणे सोडून दिले, कामविकाराचा त्याग केला व स्तुति व निंदासमान मानून तद्विषयक हर्षविषाद त्यागले व महातप केले. त्यामुळे त्रैलोक्याच्या सर्व स्वामीनी वारंवार स्तविला गेला आहे ।। १९१ ॥ त्रैलोक्यवद्य अशा अर्हत्परमेष्ठींना वन्दन करून या साधुवर्याने तपश्चरण एकनिष्ठेने केले. म्हणून हा साधुपुंगव अनिंद्य-प्रशंसनीय गुणांचा निधि बनला व त्यामुळे वन्द्य साधूंनी ही वन्दना करण्यास योग्य झालेला आहे ।। १९२ ।। Page #438 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-२००) महापुराण (४२७ ............................. तपोऽयमनुपानत्कः पादचारी विवाहनः । कृतवान्पद्मगर्भेषु चरणन्यासमर्हति ॥ १९३ वाग्गुप्तो हितवाग्वृत्या यतोऽयं तपसि स्थितः । ततोऽस्य दिव्यभाषा स्यात्प्रीणयन्त्यखिला सभाम् ॥ अनाश्वानियताहारपारणोऽतप्त यत्तपः । तदस्य दिव्य विजयपरमामृततृप्तयः ॥ १९५ त्यक्तकामसुखो भूत्वा तपस्यस्थाच्चिरं यतः। ततोऽयं सुखसाद्भूत्वा परमानन्द) भजेत् ॥ १९६ किमत्र बहुनोक्तेन यद्यदिष्टं यथाविषम् । त्यजेन्मुनिरसङ्कल्पस्तत्तत्सूतेऽस्य तत्तपः ॥ १९७ प्राप्तोत्कर्ष तदस्य स्यात्तपश्चिन्तामणेः फलम् । यतोऽर्हज्जातिमूर्त्यादिप्राप्तिः संषानुवर्णिता ॥ १९८ जैनेश्वरी परामाज्ञां सूत्रोद्दिष्टां प्रमाणयन् । तपस्यां यदुपाधत्ते पारिवाज्यं तदाञ्जसम् ॥ १९९ अन्यच्च बहुवाग्जाले निबद्धं युक्तिबाधितम् । पारिवाज्यं परित्यज्य ग्राह्यं चेदमनुत्तमम् ॥२०० (इति पारिवाज्यम्) जोडा-चपला इत्यादिकांचा ज्याने त्याग केला व गाडी, घोडा आदि वाहनांचाही ज्याने त्याग केला आहे व केवळ पायानीच चालणाऱ्या या साधूने जे तप केले त्यामुळे कमलांच्या मध्यभागात पावले ठेवून विहार करण्यास योग्य होतो ।। १९३ ॥ या मुनिवर्याने वचनगुप्तीचे पालन केले किंवा हितकर वचनांचा प्रयोग केला अशारीतीने वागून हे मुनि तपात स्थिर झाले होते म्हणून याना सर्वसभेला प्रीति उत्पन्न करणारी दिव्यवाणी प्राप्त झाली आहे ॥ १९४ ॥ या साधुवर्याने उपवास करून किंवा नियमित आहार घेऊन पारणा केली व अशारीतीने तपश्चरण केले म्हणून याला दिव्यतृप्ति, विजयतृप्ति, परमतृप्ति, अमृततृप्ति अशा चार तृप्ति प्राप्त झाल्या आहेत ॥ १९५ ॥ ह्या मुनिराजाने कामसुखाचा त्याग करून दीर्घकालपर्यन्त तप केले त्यामुळे हा अनन्त सुखी होऊन उत्कृष्ट आनन्दाला प्राप्त होईल ॥ १९६ ॥ आता याविषयी अधिक सांगणे पुरे. या मुनिराजाला जे जे ज्या प्रकारचे आवडते पदार्थ आहेत त्या त्या पदार्थांची मला प्राप्ति व्हावी असा संकल्प मुनीश्वराने त्यागावा. त्या पदार्थाचा संकल्प त्यागणाऱ्या त्याला त्याच्या तपश्चर्येने ते ते प्राप्त होतात ॥ १९७ ॥ ___ या मुनीश्वराने ज्यांचा संकल्प केला नव्हता असे ते ते पदार्थ उत्कर्षाने सहित असे प्राप्त होतात. अर्थात् हे त्याच्या चिन्तामणिस्वरूप तपश्चरणाचे फल आहे. अर्थात् या तपश्चरणापासून अर्हज्जाति, मूर्ति आदिकांची प्राप्ति होते. अशा या पारिव्राज्यक्रियेचे वर्णन केले ॥ १९८॥ जिनेश्वरानी आगमात वर्णिलेल्या उत्कृष्ट आज्ञेला प्रमाण मानून तिचे पालन करणाऱ्या मुनिवर्याने जे तप धारण केले आहे त्याला पारिव्राज्य म्हणतात व तेच आजसखरे आहे, निर्दोष आहे. अनेक प्रकारच्या वचनांच्या जाळ्यात जे बांधले आहे अशारीतीचे युक्तिबाधित जें अन्यलोकानी सांगितलेले पारिव्राज्य आहे त्याचा त्याग करावा व आम्ही जे पारिव्राज्य सांगितले आहे ते ग्रहण करावे व ते सर्वोत्कृष्ट आहे. याहून इतर पारिव्राज्य उत्कृष्ट नाहीच याप्रमाणे पारिव्राज्य वर्णिले आहे ॥ १९९-२००॥ Page #439 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२८) महापुराण (३९-२०१ या सुरेन्द्रपदप्राप्तिः पारिवाज्यफलोदयात् । सैषा सुरेन्द्रता नाम क्रिया प्रागनवणिता ॥ २०१ (इति सुरेन्द्रता) साम्राज्यमाधिराज्यं स्याच्चक्ररत्नपुरःसरम् । निधिरत्नसमुद्भूतभोगसम्पत्परम्परम् ॥ २०२ ।। (इति साम्राज्यम् ) आर्हन्त्यमहतो भावः कर्म वेति परा क्रिया । यत्र स्वर्गावतारादिमहाकल्याणसम्पदः ॥ २०३ यासौ दिवोऽवतीर्णस्य प्राप्तिः कल्याणसम्पदाम् । तदाहन्त्यमिति ज्ञेयं त्रैलोक्यक्षोभकारणम् ।। २०४ (इत्याहन्त्यम्) भवबन्धनमुक्तस्य यावस्था परमात्मनः । परिनिवृतिरिष्टा सा परं निर्वाणमित्यपि ॥ २०५। कृत्स्नकर्ममलापायात्संशुद्धिर्यान्तरात्मनः । सिद्धिः स्वात्मोपलब्धिः सा नाभावो न गुणच्छिदा॥२०६ इत्यागमानुसारेण प्रोक्ताः कन्वयक्रियाः । सप्तैताः परमस्थानसङ्गतिर्यत्र योगिनाम् ॥ २०७ योऽनुतिष्ठत्यतन्द्रालुः क्रिया ह्येतास्त्रिधोदिताः। सोऽधिगच्छेत्परं धाम यत्सम्प्राप्तौ परं शिवम्॥ २०८ जी या साध्वर्याला देवेन्द्रपदाची प्राप्ति होते ती पारिवाज्याचे फल आहे. ह्या सुरेन्द्रक्रियेचे वर्णन पूर्वी केलेले आहे. अशी सुरेन्द्रक्रिया आहे ॥ २०१॥ __साम्राज्य ज्याला आधिराज्य- सर्वोत्कृष्टराज्य म्हणतात हे चक्ररत्नाच्या प्राप्तीने युक्त असते. याची प्राप्ति झाली असता नऊ निधि व चौदा रत्ने यांच्यापासून भोगपदार्थांची परम्परा प्राप्त होते. याप्रमाणे साम्राज्यक्रियेचे वर्णन आहे ॥ २०२॥ अरिहन्ताची अवस्था प्राप्त होणे यास आर्हन्त्य म्हणतात किंवा अरिहन्ताच्या पदसूचक ज्या क्रिया होतात त्यास आर्हन्त्य म्हणतात जसे- सोळा स्वप्ने मातेला पडणे, यानंतर स्वर्गातून अवतरण होणे, इत्यादि महाकल्याणसंपदांची प्राप्ति होते ॥ २०३ ॥ स्वर्गातून अवतीर्ण झाल्यावर जी गर्भ, जन्म, दीक्षा, केवलज्ञान व मुक्तिप्राप्ति या पाच कल्याणांची प्राप्ति होते त्यास आर्हन्त्य-अर्हत्पद म्हणावे. हे अर्हत्पद त्रैलोक्यात क्षोभ उत्पन्न करणारे आहे. याप्रमाणे आहन्त्यक्रियेचे वर्णन आहे ।। २०४ ॥ संसारबन्धनापासून मुक्त झालेल्या परमात्म्याची जी अवस्था तिला परिनिर्वृति म्हणतात व तिलाच परंनिर्वाण असेही म्हणतात- संपूर्ण कर्ममलांचा नाश झाल्यावर जी अन्तरात्म्याची शुद्धि होते तिला सिद्धि म्हणतात व तिलाच आपले आत्म्याची शुद्धस्वरूप प्राप्ति असेही म्हणतात. ही शुद्धस्वरूपप्राप्ति अभावरूपाची नाही किंवा शुद्धात्म्याच्या सर्वगुणांचा नाश होणे या स्वरूपाचीही नाही ।। २०५-२०६ ।। याप्रमाणे आगमाला अनुसरून सात कर्जन्वयक्रिया सांगितल्या आहेत. या क्रियांनी योगिजनाना परमस्थानाची-मोक्षाची प्राप्ति होते ॥ २०७ ।। ___ जो भव्यजीव आळसरहित होऊन या तीन प्रकारच्या सांगितलेल्या क्रिया (गर्भान्वयक्रिया, दीक्षान्वय क्रिया आणि कन्वयक्रिया) आगमाला अनुसरून करतो त्याला उत्कृष्ट स्थानाची-मोक्षाची प्राप्ति होईल व त्याची प्राप्ति झाल्यावर उतम शिव-सुख प्राप्त होईल ॥ २०८ ॥ अ Page #440 -------------------------------------------------------------------------- ________________ ३९-२११) पुष्पिताग्रा वृत्तम् महापुराण शार्दूलविक्रीडितम् - भव्यात्मा समवाप्य जातिमुचितां जातस्ततः सद्गृही । पारिव्राज्यमनुत्तरं गुरुमतादासाद्य यातो दिवम् ॥ तत्रैन्द्रीं श्रियमाप्तवान्पुनरतश्च्युत्वा गतश्चक्रिताम् । प्राप्तार्हन्त्यपदः समग्र महिमा प्राप्नोत्यतो निर्वृतिम् ॥ २११ जनमत विहितं पुराणधर्मम् । य इममनुस्मरति क्रियानुबद्धम् । अनुचरति च पुण्यधीः स भव्यो भवभयबन्धनमाशु निर्धुनाति ॥ २०९ परम जिनपदानुरक्तधीर्भजति पुमान् य इमं क्रियाविधिम् । स धुतनिखिलकर्मबन्धनो जननजरामरणान्तकृद्भवेत् ॥ २१० इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यविरचिते त्रिषष्टिलक्षणश्री महापुराणसङग्रहे दीक्षान्वय क्रियावर्णनं नामैकोनचत्वारिंशत्तमं पर्व ॥ ३९ ॥ ( ४२९ पवित्र बुद्धिधारक जो भव्यजीव वर सांगितलेल्या तीन क्रियानी युक्त अशा जिनमतातील पुराणधर्माचे वारंवार स्मरण करतो व त्याचे आचरण करतो तो शीघ्र संसाराच्या भीतिदायक बंधाचा नाश करतो ॥ २०९ ॥ उत्तम जिनेश्वराच्या चरणावर ज्याची बुद्धि प्रीतियुक्त झाली आहे असा जो भव्य या क्रियाविधीचा आश्रय करतो. तो संपूर्ण कर्माच्या बन्धाना नष्ट करतो आणि तो जन्म, वृद्धावस्था व मरणाचा नाश करतो ।। २१० ॥ हा भव्यात्मा - भव्यपुरुष प्रथम योग्य जातीची प्राप्ति करून घेतो व नन्तर तो उत्तम गृहस्थ होतो. यानंतर गुरूच्या आज्ञेने उत्कृष्ट मुनिदीक्षा धारण करतो व आयुष्यांती स्वर्गात जातो. तेथे त्याला इन्द्राची लक्ष्मी प्राप्त होते. पुनः तेथून च्युत झाल्यावर चक्रवर्तीचे पद त्याला मिळते. यानन्तर सम्पूर्ण महात्म्याने भरलेले अरिहन्ताचे पद त्याला प्राप्त होते आणि त्यानन्तर तो भव्यात्मा मोक्ष प्राप्त करून घेतो ।। २११ ।। याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत आर्षत्रिषष्टिलक्षण श्रीमहापुराण संग्रहाच्या मराठी भाषानुवादात दीक्षान्वयक्रिया व कर्त्रन्वय क्रियांचे वर्णन करणारे एकोणचाळीसावें पर्व समाप्त झाले. Page #441 -------------------------------------------------------------------------- ________________ चत्वारिशत्तमं पर्व । अथातः सम्प्रवक्ष्यामि क्रियासूत्तरचूलिकाम् । विशेषनिर्णयो यत्र क्रियाणां तिसणामपि ॥१ तत्रादौ तावदुम्नेष्ये क्रियाकल्पप्रक्लप्तये । मन्त्रोद्धारं क्रियासिद्धिर्मन्त्राषीना हि योगिनाम् ॥ २ आधानादिक्रियारम्भे पूर्वमेव निवेशयेत् । त्रीणि छत्राणि चक्राणां त्रयं त्रीश्च हविर्भुजः ॥३ मध्येवेदि जिनेन्द्रार्चाः स्थापयेच्च यथाविधि । मन्त्रकल्पोऽयमाम्नातस्तत्र तत्पूजनाविधौ ॥ ४ नमोऽन्तो नीरजश्शब्दश्चतुर्थ्यन्तोऽत्र पठ्यताम् । जलेन भूमिबन्धार्थ परा शुद्धिस्तु तत्फलम् ॥ ५ वस्तरणसम्बन्धस्ततः पश्चादुवीर्यताम् । विघ्नोपशान्तये दर्पमथनाय नमः पदम् ॥६ गन्धप्रदानमन्त्रश्च शीलगन्धाय वै नमः । पुष्पप्रदानमन्त्रोऽपि विमलाय नमः पदम् ॥ ७ यानंतर मी ज्या गर्भान्वय, दीक्षान्वय व कन्वय अशा तीन क्रियांचे वर्णन मागील अध्यायात केले आहे त्यांची उत्तरचूलिका या अध्यायात सांगतो. या उत्तरचूलिकेत या तीनही क्रियांचा विशेष निर्णय होईल ॥ १॥ __ यात प्रारंभी सगळ्या क्रियांच्या समूहाची सिद्धि व्हावी म्हणून मन्त्रोद्धार-मन्त्राच्या रचनेचे वर्णन करतो. कारण योग्यांची क्रियासिद्धि देखिल मन्त्रांच्या आधीनच असते ॥ २ ॥ आधानादिक्रिया करण्याच्या आरंभी प्रथमतः तीन छत्रे, तीन चक्रे आणि तीन अग्नींची स्थापना करावी ॥३॥ वेदीच्या मध्यभागी विधिपूर्वक श्रीजिनप्रतिमांची स्थापना करावी व जिनप्रतिमांच्या पूजनविधीमध्ये वर्णिलेला मंत्रसमूह उपयोगात आणावा ॥ ४ ॥ ज्याच्या अन्ती नमः शब्द आहे असा चतुर्थ्यन्त नीरज शब्द भूमिसेचनासाठी पूजकाने म्हणावा व या मंत्राने द्रव्यकर्मे ज्ञानावरणादिक व भावकर्मे अज्ञान, राग, द्वेष, मोह आदिक या उभयकर्मानीरहित अशा जिनेश्वरास नमस्कार असा अभिप्राय आहे. उत्तम आत्मशुद्धि होणे या मंत्राचे फल आहे. तात्पर्य, या मंत्राचा उच्चार करून भूमिशुद्धि करावी व या मंत्राने आत्मशुद्धीही होते ॥ ५ ॥ यानंतर त्या शुद्ध केलेल्या जमीनीवर दर्भ पसरावे व विघ्नांची शान्ति व्हावी म्हणून दर्पमथनाय नमः हा मन्त्र उच्चारावा. अहंकाराला ज्यानी नष्ट केले त्या जिनेश्वरांना नमस्कार असा या मंत्राचा अर्थ आहे ॥ ६ ॥ यानंतर गंधप्रदानमंत्र ‘शीलगंधाय नमः' हा मंत्र म्हणावा. अठरा हजारशीलांचा सुगंध धारण करणाऱ्या जिनेश्वरास नमस्कार असा याचा अर्थ आहे. यानन्तर विमलाय नमः हा मंत्र म्हणून पुष्पप्रदान करावे. कर्ममलरहित जिनेश्वराला नमस्कार असा याचा अभिप्राय आहे ॥ ७॥ Page #442 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-१५) महापुराण कुर्यादक्षतपूजार्थमक्षताय नमः पदम् । धूपार्घ्य श्रुतधूपाय नमःपदमुदाहरेत् ॥ ८ ज्ञानोद्योताय पूर्व च दीपदाने नमः पदम् । मन्त्रः परमसिद्धाय नम इत्यमृतोद्धृतौ ॥९ मन्त्ररेभिस्तु संस्कृत्य यथावज्जगतीतलम् । ततोऽन्वपीठिकामन्त्रः पठनीयो द्विजोत्तमैः ॥ १० सत्यजातपदं पूर्व चतुर्थ्यन्तं नमः परम् । ततोऽर्हज्जातशब्दश्च तदन्तस्तत्परो मतः ॥ ११ ततः परमजाताय नम इत्यपरं पदम् । ततोऽनुपमजाताय नम इत्युत्तरं पदम् ॥ १२ ततश्च स्वप्रधानाय नम इत्युत्तरो ध्वनिः । अचलाय नमः शब्दादक्षयाय नमः परम् ॥ १३ अव्याबाधपदं चान्यदनन्तज्ञानशब्दनम् । अनन्तदर्शनानन्तवीर्ययशब्दो ततः पृथक् ॥ १४ अनन्तसुखशब्दश्च नीरजः शब्द एव च । निर्मलाच्छेद्यशब्दौ च तथाऽभेद्याजरश्रुती ॥ १५ अक्षतानी पूजा करण्यासाठी अक्षताय नमः हा मन्त्र म्हणावा. क्षयरहित जिनेशाला नमस्कार असा याचा अर्थ आहे व धूपाने प्रभूना अर्घ्य देण्यासाठी श्रुतधूपाय नमः हा मंत्र म्हणावा. ज्ञान किंवा शास्त्र हे सुगंधित द्रव्य ज्यांच्याजवळ आहे अशा जिनेशाना नमस्कार असा याचा अर्थ आहे ॥ ८ ॥ दीपार्चन करताना ज्ञानोद्योताय नमः हा मंत्र म्हणावा. ज्ञानप्रकाशक जिनेश्वरास नमस्कार व नैवेद्य अर्पण करताना परमसिद्धाय नमः हा मंत्र म्हणावा, उत्कृष्ट सिद्धभगवंताला नमस्कार असा याचा अर्थ आहे ॥ ९ ॥ अशा या मंत्रानी जिनेश्वराची स्थापना जेथे करावयाची आहे अशा भूतलाची शुद्धि करून यानंतर श्रेष्ठ द्विजानी पीठिकामन्त्र म्हणावेत ॥ १० ॥ पीठिकामन्त्र याप्रमाणे आहेत- प्रथमतः सत्यजात हा चतुर्थ्यन्त शब्द योजून नंतर नमः शब्द योजावा. यानन्तर अर्हज्जात शब्द चतुर्थ्यन्त योजून त्याच्यापुढे नमः शब्द योजावा. म्हणजे सत्यजाताय नमः- सत्यरूप जन्म धारण करणाऱ्या जिनास नमस्कार 'अर्हज्जाताय नमः' प्रशंसनीय जन्म धारण करणाऱ्या जिनेशाला नमस्कार ।। ११ ॥ यानंतर परमजाताय नमः हे पद बोलावे आणि नंतर अनुपमजाताय नमः असे उत्तरपद बोलावे. या मंत्राचे क्रमाने उत्कृष्ट जन्मधारक जिनेशाला नमस्कार व अनुपमउपमारहित जन्मधारक जिनेश्वराला नमस्कार ।। १२ ।। यानंतर स्वप्रधानाय नमः । अचलाय नमः, अक्षयाय नमः ही पदे आहेत. यांचा अर्थस्वतःच मख्यपद धारण करणान्या जिनेशाला नमस्कार हे पद बोलावे तदनन्तर अचलाय नमः स्वरूपात निश्चल अशा जिनेशाला नमस्कार आणि अक्षयाय नमः केव्हाही नाश न पावणाऱ्या जिनेश्वरास नमस्कार ॥ १३ ॥ यानन्तर अव्याबाध शब्द, अनन्तज्ञान शब्द, नंतर अनन्तदर्शन शब्द, अनंतवीर्य शब्द, पुनः अनन्तसुख शब्द, आणि नीरजः शब्द, पुनः निर्मल शब्द व अच्छेद्य शब्द व पुनः अभेद्य शब्द व अजर शब्द या सर्व चतुर्थ्यन्त शब्दापुढे नमः शब्द जोडन मन्त्र बनवावेत ते याप्रमाणे Page #443 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३२) महापुराण (४०-१६ ततोऽमराप्रमेयोक्ती सा गर्भावासशब्दने । ततोऽक्षोभ्या विलीनोक्ती परमादिर्घनध्वनिः ॥ १६ पृथक्पृथगिमे शब्दास्तदन्तास्तत्परा मताः । उत्तराण्यनुसन्धाय पदान्येभिः पदैर्वदेत् ॥ १७ आदो परमकाष्ठेति योगरूपाय वाक्परम् । नमः शब्दमुदीर्यान्ते मन्त्रविन्मन्त्रमुद्धरेत् ॥ १८ लोकाग्रवासिने शब्दात् परः कार्यो नमो नमः । एवं परमसिद्धेभ्योऽर्हत्सिद्धेभ्य इत्यपि ॥ १९ अव्याबाधाय नमः बाधारहित जिनेश्वरास नमस्कार असो. अनन्तज्ञानाय नमः अनन्तकेवलज्ञानधारी जिनेन्द्राला नमस्कार. अनन्तदर्शनाय नमः अनन्तदर्शनयुक्त जिनप्रभूला नमस्कार, अनन्तवीर्याय नमः अनन्तबलधारी जिनराजाला नमस्कार. अनन्तसुखाय नमः अनन्तसौख्ययुक्त जिनेश्वराला नमस्कार, नीरजसे नमः कर्मरूपी धूळीने रहित जिनदेवाला नमस्कार. निर्मलाय नमः कर्ममलांनी रहित अशा जिनराजाला नमस्कार. अच्छेद्याय नमः ज्यांचे कोणी छेदन करू शकत नाही अशा जिनराजाला नमस्कार. अभेद्याय नमः जे कोणत्याही प्रकारे तुटत नाहीत अखंड आहेत त्या जिनेशाला नमस्कार. अजराय नमः- वृद्धावस्थेने रहित जिनेश्वराला नमस्कार ।। १४-१५ ॥ यानंतर अमर आणि अप्रमेय हे दोन शब्द योजून वाक्य तयार करावे. नंतर अगर्भवास शब्द जोडून मंत्र रचावा. नन्तर अक्षोभ्य व अविलीन ही दोन पदे जोडून मंत्र तयार होतो. नंतर आरंभी परमपद व नंतर घनपद योजून मंत्रसिद्धि करावी. याप्रमाणे वेगळे वेगळे हे शब्द ध्यावेत व त्यांच्या शेवटी नमः पद जोडून या शब्दानी हे मंत्र बोलावेत. जसे- अमराय नमः मृत्युरहित जिनेश्वराला नमस्कार. अप्रमेयाय नमः छद्मस्थ जीव ज्याना प्रत्यक्षादि प्रमाणानी जाणण्यास असमर्थ आहेत अशा जिनेश्वरास नमस्कार. अगर्भवासाय नमः गर्भात जो आता राहणार नाही त्या जिनेश्वरास नमस्कार. यानंतर अक्षोभ्याय नमः ज्यांना कोणी क्षोभ करू शकत नाही अशा जिनेश्वरास नमस्कार. तदनंतर अविलीनाय नमः जो कधी विलीन-नष्ट होत नाही त्या जिनेश्वराला नमस्कार. 'परमघनाय नमः' उत्कृष्ट घनरूप घट्ट स्वरूप आहे ज्यांचे अशा परमात्म्याला नमस्कार ॥ १६-१७॥ आरंभी परमकाष्ठा हे पद व नन्तर योगरूपाय हे पद योजावे आणि तदनन्तर अन्ती नमः शब्द बोलून मन्त्र जाणणाऱ्या विद्वानाने मन्त्रोद्धार करावा. अर्थात् परमकाष्ठा योगरूपाय नमः हा मन्त्र रचावा. ज्यांचा योग-शुक्लध्यान उत्कृष्ट अवस्थेला पोहोचले आहे अशा परमात्म्याला नमस्कार ॥ १८ ॥ लोकाग्रवासिने या शब्दाच्या पुढे नमो नमः हा शब्द योजावा. याचप्रमाणे परमसिद्धेश्या आणि अर्हत्सिद्धेभ्य या शब्दापुढे ही नमो नमः शब्द योजून मन्त्र रचावा. अर्थात् 'लोकाग्रवासिनेनमो नमः' लोकाच्या अग्रभागावर विराजमान झालेल्या सिद्धपरमेष्ठींना वारंवार नमस्कार. 'परमसिद्धेभ्यो नमो नमः' परमसिद्धभगवंताला वारंवार नमस्कार. 'अर्हत्सिद्धेभ्यो नमो नमः' ज्यांनी प्रथम अरिहंत अवस्था प्राप्त करून घेतल्यानंतर सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली अशा जिनेशाला वारंवार नमस्कार ॥ १९ ॥ Page #444 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-२५) महापुराण (४३३ एवं केवलिसिद्धेभ्यः पदार्भूयोऽन्तकृत्पदात् । सिद्धेभ्य इत्यमुष्माच्च परंपरपदादपि ॥ २० अनादिपदपूर्वाच्च तस्मादेव पदात्परम् । अनाद्यनुपमादिभ्यः सिद्धेभ्यश्च नमो नमः ॥ २१ इति मन्त्रपदान्युक्त्वा पदानीमान्यतः पठेत् । द्विरुक्त्वामन्त्र्य वक्तव्यं सम्यग्दृष्टिपदं ततः ॥ २२ आसन्नभव्यशब्दश्च द्विर्वाच्यस्तद्वदेव हि । निर्वाणादिश्च पूजाहः स्वाहान्तोऽग्नीन्द्र इत्यपि ॥ २३ काम्यमन्त्रः-ततः स्वकाम्यसिद्धयर्थमिदं पदमुदाहरेत् । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु तत्परम् ॥ २४ अपमृत्युविनाशनं भवत्वन्तं पदं पठेत् । भवत्वन्तमतो वाच्यं समाधिमरणाक्षरम् ॥ २५ यानंतर केवलिसिद्धेभ्यो नमो नमः केवलिसिद्धांना नमस्कार, 'अन्तकृत्सिद्धेभ्यो नमो नमः' अन्तकृत् केवली होऊन नंतर सिद्ध झालेल्या मुनिवर्याना वारंवार नमस्कार. परम्परसिद्धेभ्यो नमो नमः' परंपरेने सिद्ध झालेल्या मुनिवर्याना वारंवार नमस्कार ॥ २० ॥ अनादि शब्द ज्यांच्या पूर्वी आहे असा जो परंपरा शब्द त्याने युक्त अशा सिद्धांना वारंवार नमस्कार. तसेच अनाद्यनुपमसिद्धेभ्यः नमो नमः अनादि व उपमारहित अशा सिद्धाना वारंवार नमस्कार असो ॥ २१ ॥ याप्रमाणे मन्त्र शब्द उच्चारून नन्तर पुढील सम्बोधनवाचक पदे दोन वेळा उच्चारावीत म्हणजे सम्यग्दृष्टि शब्द दोन वेळा उच्चारावा, आसन्नभव्य शब्द दोन वेळा उच्चारावा. निर्वाणपूजार्ह हे शब्द दोन वेळा उच्चारावेत आणि अग्नीन्द्र स्वाहा हे शब्द दोन वेळा उच्चारावेत. ते याप्रमाणे- सम्यग्दृष्टे सम्यग्दृष्टे, आसन्नभव्य आसन्नभव्य, निर्वाणपूजार्ह निर्वाणपूजाहं, अग्नीन्द्र स्वाहा अग्नीन्द्र स्वाहा । या सर्वांचा अभिप्राय हा आहे- हे सम्यग्दर्शनयुक्ता, हे आसन्नभव्या हे निर्वाणकल्याणसमयी पूजेला योग्य असलेल्या हे अग्निकुमार देवांच्या इन्द्रा तुला मी हवि अर्पण करतो. यानन्तर आपल्या इष्टसिद्धीसाठी पुढील शब्दांचे उच्चारण करावे. सेवाफलं षट्परमस्थानं भवतु, अपमृत्युविनाशनं भवतु, समाधिमरणं भवतु, यांचा अभिप्राय असा- हे जिनप्रभो, मी आपली सेवा केली त्याचे फल उत्तम गृहस्थपणा, जिनदीक्षा, इन्द्रपद, साम्राज्य, तीर्थकरपणा व मोक्ष या सहा परमस्थानांची प्राप्ति होवो. अपमृत्यूचा नाश होवो व मला समाधिमरणाची प्राप्ति होवो. वर सांगितलेल्या सर्वमंत्रांचा संग्रह याप्रमाणे आहे- १) सत्यजाताय नमः । २) अर्हज्जाताय नमः। ३) परमजाताय नमः । ४) अनुपमजाताय नमः ५) स्वप्रधानाय नमः । ६) अचलाय नमः । ७) अक्षयाय नमः । ८) अव्याबाधाय नमः । ९) अनन्तज्ञानाय नमः । १०) अनन्तदर्शनाय नमः । ११) अनंतवीर्याय नमः १२) अनन्तसुखाय नमः । १३) नीरजसे नमः । १४) निर्मलाय नमः । १५) अच्छेद्याय नमः । १६) अभेद्याय नमः । १७) आजराय नमः । १८) अमराय नमः । १९) अप्रमेयाय नमः । २०) अगर्भवासाय नमः । २१) अक्षोभ्याय नमः । २२) अविलीनाय नमः । २३) परमघनाय नमः। २४) परमकाष्ठायोगरूपाय नमः। २५) लोकाग्रवासिने नमो नमः। २६) परमसिद्धेभ्यो नमो नमः । २७) अर्हत्सिद्धेभ्यो नमो नमः २८) केवलिसिद्धेभ्यो नमो नमः । २९) अनन्तकृत्सिद्धेभ्यो नमो नमः । ३०) परम्पर म.५५ Page #445 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३४) पीठिकामन्त्र एषः स्यात्पदेरेभिः समुच्चितैः । जातिमन्त्रमितो वक्ष्ये यथाश्रुतमनुक्रमात् ॥ २६ सत्यजन्मपदं नान्तमादौ शरणमप्यतः । प्रपद्यामीति वाच्यं स्यादर्हज्जन्मपदं तथा ॥ २७ अर्हन्मातृपदं तद्वत्त्वन्तमर्हत्सुताक्षरम् । अनादिगमनस्येति तथानुपमजन्मनः ॥ २८ रत्नत्रयस्य शरणं प्रपद्यामीत्यतः परम् । बोद्धयन्तं च ततः सम्यग्दृष्टिं द्वित्वेन योजयेत् ॥ २९ ज्ञानमूर्तिपदं तद्वत्सरस्वतिपदं तथा । स्वाहान्तमन्ते वक्तव्यं काम्यमन्त्रश्च पूर्ववत् ॥ ३० महापुराण सिद्धेभ्यो नमो नमः | ३१ ) अनादिपरम्परसिद्धेभ्यो नमो नमः । ३२) अनाद्यनुपम सिद्धेभ्यो नमो नमः। ३३) सम्यग्दृष्टे सम्यग्दृष्टे, आसन्नभव्य आसन्नभव्य, निर्वाणपूजार्ह निर्वाणपूजार्ह अग्नीन्द्र अग्नीन्द्र स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु, अपमृत्युविनाशनं भवतु, समाधिमरणं भवतु । याप्रमाणे पीठिकामन्त्र सांगितले ।। २२-२५ ।। (४०-२६ याप्रमाणे यावरील सर्वपदानी पीठिकामंत्राचे वर्णन केले आहे. आता पुढे शास्त्राला अनुसरून मी जातिमंत्र सांगेन ।। २६ ।। आरंभी नकारान्त सत्यजन्म हा शब्द आहे व याच्यानंतर शरण शब्द आहे. यानंतर प्रपद्यामि हे पद बोलावे आणि अर्हज्जन्म हे पद बोलावे ।। २७ । तसेच अर्हन्मातृपद बोलून अन्ती शरणादिक पदे बोलावीत. यानंतर अर्हत्सुताक्षरअर्हत्सुत हे पद बोलून शरणादिक पदे बोलावीत. अनादिगमनस्य हे पद बोलून शरणादिक पदे बोलावीत. यानंतर अनुपमजन्मनः हे पद बोलून शरणादिक पदे बोलावीत ॥ २८ ॥ यानंतर रत्नत्रयस्य शरणं प्रपद्यामि हे पद बोलावे. यानन्तर सम्यग्दृष्टि हे सम्बोधनात्मक पद दोन वेळा बोलावे ।। २९ ।। ज्ञानमूर्तिपद व सरस्वतिपद ही पदे दोन वेळा उच्चारून अन्ती स्वाहापद बोलावे. यानन्तर काम्यमंत्र पूर्वीप्रमाणे बोलावा. १ सत्यजन्मनः शरणं प्रपद्यामि - मी सत्यरूप जन्माला धारण करणाऱ्या जिनेन्द्राला शरण जातो. २) अर्हज्जन्मनः शरणं प्रपद्यामि- अरिहंतपदाला योग्य जन्म धारण करणान्याला मी शरण जातो. अर्हन्मातुः शरणं प्रपद्यामि मी अर्हन्ताच्या मातेला शरण जातो. अर्हत्सुताला म्हणजे अरिहंत ज्याचा पुत्र आहे अशाला म्हणजे अरिहंताच्या पित्याला मी शरण जातो. अनादिगमनस्य शरणं प्रपद्यामि- अनादि ज्ञानाला धारण करणाऱ्याला मी शरण जातो त्याचा आश्रय घेतो. अनुपमजन्मनः शरणं प्रपद्यामि मी ज्याचा जन्म अनुपम उपमारहित श्रेष्ठ आहे त्याला मी शरण जावो. रत्नत्रयस्य शरणं प्रपद्यामि मी रत्नत्रयाला शरण जातो. हे सम्यग्दृष्टे, हे सम्यग्दृष्टे, हे ज्ञानमूर्ते, हे ज्ञानमूर्ते, हे सरस्वति, हे सरस्वति, स्वाहा हे सम्यग्दृष्टि सम्यग्दृष्टि युक्त सरस्वति, हे सरस्वति मी तुला हवि अर्पण करतो. सेवेचे फल अशी षट्स्थानांची मला प्राप्ति होऊ दे. अपमृत्युविनाशनं भवतु, समाधिमरणं भवतु । अपमृत्यु टळो आणि मला समाधिमरण प्राप्त होवो ॥ ३० ॥ Page #446 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-३७) महापुराण (४३५ ...... चूणि- सत्यजन्मनः शरणं प्रपद्यामि । अर्हजन्मनः शरणं प्रपद्यामि। अर्हन्मातुः शरणं प्रपद्यामि । अर्हत्सुतस्थ शरणं प्रपद्यामि । अनादिगमनस्य शरणं प्रपद्यामि । अनुपमजन्मनः शरणं प्रपद्यामि । रत्नत्रयस्य शरणं प्रपद्यामि । हे सम्यग्दृष्ट, हे सम्यग्दृष्टे, हे ज्ञानमूर्ते, हे ज्ञानमूर्ते हे सरस्वति हे सरस्वति स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु, अपमृत्यविनाशनं भवतु । समाधिमरणं भवतु। जातिमन्त्रोऽयमाम्नातो जातिसंस्कारकारणम् । मन्त्रं निस्तारकादि च यथाम्नायमितो ब्रुवे ॥ ३१ स्वाहान्तसत्यजाताय पदमादावनुस्मृतम् । तदन्तमर्हज्जाताय पदं स्यात्तदनन्तरम् ॥ ३२ ततः षट्कर्मणे स्वाहा पदमुच्चारयेद्विजः । स्याद्ग्रामपतये स्वाहा पदं तस्मादनन्तरम् ॥ ३३ अनादिश्रोत्रियायेति ब्रूयात्स्वाहापदं ततः । तद्वच्च स्नातकायेति श्रावकायेति च द्वयम् ॥ ३४ स्याद्देवब्राह्मणायेति स्वाहेत्यन्तमतः पदम् । सुब्राह्मणाय स्वाहान्तः स्वाहान्तानुपमायणीः ॥ ३५ सम्यग्दृष्टिपदं चैव यथा निधिपतिश्रुतिम् । ब्रूयाद्वैश्रवणोक्ति च द्विःस्वाहेति ततःपदम् ॥३६ काम्यमन्त्रमतो बयात्पूर्वबन्मन्त्रविदद्विजः । ऋषिमन्त्रमितो वक्ष्ये यथाहोपासकश्रुतिः ॥ ३७ ज्यांचे वर्णन वर आले आहे व जे जातिसंस्काराला कारण आहेत ते मी सांगितले आहेत. आता निस्तारकादिमन्त्र आम्नायाला अनुसरून मी सांगतो ॥ ३१ ॥ स्वाहा ज्याच्या शेवटी आहे असे सत्यजाताय हे प्रथम सांगितले आहे. यानंतर स्वाहान्त अर्हज्जाताय हे पद सांगितले आहे ॥ ३२ ॥ यानंतर द्विजाने षट्कर्मणे स्वाहा हे पद उच्चारावे. यानंतर ग्रामपतये स्वाहा हे पद उच्चारावे. या पदाच्या उच्चारानंतर अनादिश्रोत्रियाय स्वाहा हे पद बोलावे. यानंतर स्नातकाय स्वाहा व श्रोत्रियाय स्वाहा ही दोन पदे बोलावीत ।। ३३-३४ ॥ __यानंतर देवब्राह्मणाय स्वाहा, सुब्राह्मणाय स्वाहा, अनुपमाय स्वाहा ही पदे क्रमाने बोलावीत ॥ ३५ ॥ यानंतर सम्यग्दृष्टिपद, निधिपतिपद व वैश्रवणपद ही पदे दोनदोन वेळा उच्चारावीत ॥३६॥ यानंतर पूर्वीप्रमाणे मंत्र जाणणाऱ्या द्विजाने काम्यमन्त्र बोलावा. यानंतर उपासक श्रुतीने जसे ऋषिमंत्राचे वर्णन केले आहे तसे मी करतो. चूर्णीमध्ये श्लोकात सांगितलेल्या मंत्राचे विवेचन आले आहे ते असे- सत्यजाताय स्वाहा-सत्यरूपजन्म धारण करणाऱ्याला मी हवि अर्पण करतो. अर्हज्जाताय स्वाहा अर्हन्तरूपजन्म धारण करणाऱ्याला मी हवि अर्पण करतो. षट्कर्मणे स्वाहा- देवपूजा आदि षट्कर्म करणाऱ्याला मी हवि अर्पण करतो. ग्रामपतये स्वाहामी ग्रामपतीला हवि अर्पण करतो. अनादिश्रोत्रियाय स्वाहा- अनादिकालापासून श्रुताचे अध्ययन करण्याची परम्परा ज्याची आहे त्याला मी हवि अर्पण करतो. स्नातकाय स्वाहा केवलि अरिहंतास मी हवि अर्पण करतो आणि श्रावकाय स्वाहा-श्रावकास निजगणांचा स्त्राव करणाऱ्या शुद्धात्म्याला मी हवि अर्पण करतो. देवब्राह्मणाय स्वाहा देवब्राह्मणास मी हवि अर्पण करतो. सुब्राह्मणाय स्वाहा- उत्तम ब्राह्मण स्वरूप ज्ञात्याला मी हवि अर्पण करतो. अनुपमाय स्वाहा निरुपम अशा ब्राह्मणास-शुद्धात्म्यास मी हवि अर्पण करतो. सम्यग्दृष्टे २ निधिपते २ वैश्रवण २ स्वाहा-हे सम्यग्दर्शन युक्त, हे निधीचा अधिपति असलेल्या कुबेरा मी तुला हवि अर्पण करतो. सेवाफलं षट्परमस्थानं भवतु, अपमृत्युविनाशनं भवतु, समाधिमरणं भवतु । या सेवेपासून मला सहा परमस्थानांची प्राप्ति होवो, अपमृत्यूचा नाश होवो आणि समाधिमरणाची प्राप्ति होवो॥३७॥ Page #447 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३६) महापुराण (४०-३८ चूणि- सत्यजाताय स्वाहा । अर्हज्जाताय स्वाहा । षटकर्मणे स्वाहा। ग्रामपतये स्वाहा । अनादिश्रोत्रियाय स्वाहा। स्नातकाय स्वाहा । श्रावकाय स्वाहा । देवब्राह्मणाय स्वाहा । सुब्राह्मणाय स्वाहा । अनुपमाय स्वाहा । सम्यग्दृष्टे सम्यग्दृष्टे, निधिपते निधिपते वैश्रवण स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु । अपमृत्युविनाशनं भवतु । समाधिमरणं भवतु । प्रथम सत्यजाताय नमः पदमुदीरयेत् । गृह्णीयादहज्जाताय नमः शब्दांततः परम् ॥ ३८ निर्ग्रन्थाय नमो वीतरागाय नम इत्यपि । महावताय पूर्व च नमः पदमनन्तरम् ॥ ३९ त्रिगुप्ताय नमो महायोगाय नम इत्यतः । ततो विविधयोगाय नम इत्यनुपठ्यताम् ॥ ४० विविद्धिपदं चास्मानमः शब्देन योजितम् । ततोऽङ्गधरपूर्वं च पठेत्पूर्वधरध्वनिम् ॥ ४१ नमः शब्दपरौ चैतौ चतुर्थ्यन्तावनुस्मृतौ । ततो गणधधरायेति पदं युक्तनमः पदम् ॥ ४२ परमर्षिभ्य इत्यस्मात्परं वाच्यं नमो नमः । ततोऽनुपमजाताय नमो नम इतीरयेत् ॥ ४३ सम्यग्दृष्टिपदं चान्ते बोध्यान्तं द्विरुदाहरेत् । ततो भूपतिशब्दश्च नगरोपपदः पतिः ॥ ४४ द्विर्वाच्यो ताविमौ शब्दौ बोध्यान्तौ मन्त्रवेदिभिः । मन्त्रशेषोऽप्ययं तस्मादनन्तरमुदीर्यताम् ॥ ४५ प्रथमतः सत्यजाताय नमः हे बोलावे. यानंतर अर्हज्जाताय नमः हा शब्द घ्यावा ॥३८॥ यानंतर निर्ग्रन्थाय नमः, वीतरागाय नमः ही पदे घेतल्यावर प्रथम महावताय हे पद व नंतर नमः पद घ्यावे अर्थात् महाव्रताय नमः हे पद उच्चारावे ॥ ३९॥ यानंतर त्रिगुप्ताय नमः । महायोगाय नमः । ही पदे उच्चारून नंतर विविधयोगाय नमः हे पद म्हणावे ।। ४० ॥ __यानंतर विविद्धिपद हे नमः या पदाने योजावे अर्थात् विविधर्द्धये नमः असे म्हणावे. यानंतर अङ्ग धरपद प्रथम म्हणावे व नंतर पूर्वधर पद म्हणावे अर्थात् अङ्गधराय, पूर्वधराय अशी पदे क्रमाने बोलावीत ॥ ४१ ॥ यांच्यापुढे क्रमाने नमः शब्द जोडावा व या नमः अव्ययाच्या संबन्धामुळे त्या दोन शब्दाना चतुर्थ्यन्त करून अङ्गधराय नमः, पूर्वधराय नमः असे त्यांचे स्मरण करावे. यानन्तर नमः पदाने गणधराय हे पद जोडावे म्हणजे गणधराय नमः असे वाक्य बोलावे ॥ ४२ ॥ यानंतर परमर्षिभ्यः या शब्दाच्या पुढे नमो नमः हा शब्द योजावा व यानन्तर अनुपमजाताय नमो नमः असे बोलावे म्हणजे परमर्षिभ्यो नमो नमः, परजाताय नमो नमः असे दोन शब्द उच्चारावेत ॥ ४३ ।। यानन्तर सम्बोधनान्त सम्यग्दृष्टि शब्द दोन वेळा म्हणावा. यानन्तर भूपति शब्द व नगरपति शब्द हेही संबोधनवाचक दोनदा योजून मन्त्र जाणणा-याकडून ते दोनदा म्हटले जावेत ॥४४-४५ ।। Page #448 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-५०) महापुराण (४३७ कालश्रमणशब्दं च द्विरुक्त्वामन्त्रणे ततः । स्वाहेति पदमुच्चार्य प्राग्वत्काम्यानि चोद्धरेत् ॥ ४६ सत्यजाताय नमः। अर्हज्जाताय नमः। निग्रन्थाय नमः। वीतरागाय नमः। महावताय नमः। त्रिगुप्ताय नमः। महायोगाय नमः। विविधयोगाय नमः। विविधर्द्धये नमः। अंगधराय नमः। पूर्वधराय नमः। गणधराय नमः । परमर्षिभ्यो नमो नमः । अनुपमजाताय नमो नमः । सम्यग्दृष्टे २ भूपते २ नगरपते २ कालश्रमण २ स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु। अपमृत्युविनाशनं भवतु । समाधिमरणं भवतु । ऋषिमन्त्रः। मुनिमन्त्रोऽयमाम्नातो मुनिभिस्तत्त्वदशिभिः । वक्ष्ये सुरेन्द्रमन्त्रं च यथा स्माहार्षभीश्रुतिः ॥ ४७ प्रथमं सत्यजाताय स्वाहेत्येतत्पदं पठेत् । ततः स्यादर्हज्जाताय स्वाहेत्येतत्परं पदम् ॥ ४८ ततश्च दिव्यजाताय स्वाहेत्येवमुदाहरेत् । ततो दिव्याच्चिर्जाताय स्वाहेत्येतत्पदं पठेत् ॥ ४९ बयाच्च नेमिनाथाय स्वाहेत्येतदनन्तरम् । सौधर्माय पदं चास्मात्स्वाहोक्त्यन्तमनुस्मरेत् ॥ ५० यानन्तर कालश्रमण शब्द देखिल सम्बोधनात्मक दोनवेळा म्हटला जावा व स्वाहा शब्द कालश्रमणशब्दापुढे जोडावा. यानंतर काम्यमंत्र जोडावा. हे सर्व सांगून तो समग्र ऋषिमन्त्र वर दिला आहे त्यातील प्रत्येक मंत्रपदाचा अर्थ क्रमाने असा- सत्यजन्माला धारण करणाऱ्या ऋषीला नमस्कार, अरिहंतजन्मधारक ऋषीस नमस्कार, संपूर्ण परिग्रहरहित ऋषीला नमस्कार, रागद्वेषमोहादि विकाररहित ऋषीला नमस्कार, अहिंसादि महाव्रत धारक ऋषींना नमस्कार, मनोगुप्ति, वचनगुप्ति व कायगुप्ति या तीन गुप्ति धारकास नमस्कार, महायोगधारण करणाऱ्या ध्यानी ऋषीला नमस्कार, आतापनादि योगाना धारण करणाऱ्या ऋषींना नमस्कार, नानाप्रकारच्या ऋद्धिधारकाना नमस्कार, आचारादिक अंगधारी ऋषींना नमस्कार, उत्पाद पूर्वादि चौदा पूर्वांचे ज्ञानधारण करणाऱ्या ऋषीना नमस्कार, गणधराना नमस्कार परमऋषीना वारंवार नमस्कार, ज्याचा जन्म अनुपम - अत्युत्कृष्ट आहे अशा ऋषीला वारंवार नमस्कार, सम्यग्दृष्टे, सम्यग्दृष्टे, भूपते भूपते, कालश्रमण, कालश्रमण स्वाहा हे सम्यग्दृष्टे, हे सम्यग्दृष्टे, हे भूपते, हे भूपते, हे कालश्रमण हे कालश्रमण आपणास मी हवि अर्पण करतो. आपली सेवा केली त्याचे फल अशा सद्गृहस्थत्वादि सहा परमस्थानांची प्राप्ति मला होवो अपमृत्यूचा नाश होवो व समाधिमरण प्राप्त होवो हा ऋषिमन्त्र आहे ॥ ४६ ॥ जीवादितत्त्वाना पाहणाऱ्या मुनीश्वरानी हा मुनिमन्त्र गुरुपरंपरेने सांगितला आहे. आता ऋषभनाथाच्या श्रुतीने जसा सुरेन्द्रमन्त्र सांगितला आहे तसा मी सांगतो ॥ ४७ ।। _प्रथमतः सत्यजाताय स्वाहा हे पद म्हणावे. यानंतर अर्हज्जाताय स्वाहा हे पद म्हणावे ॥ ४८ ॥ याच्यानंतर दिव्यजाताय स्वाहा हे पद म्हणावे. नंतर दिव्याच्चिर्जाताय स्वाहा हे पद बोलावे ॥ ४९ ॥ यानन्तर नेमिनाथाय स्वाहा हे पद बोलून नंतर स्वाहा शब्द ज्याच्या अन्ती आहे असा सौधर्माय शब्द बोलावा अर्थात् सौधर्माय स्वाहा असे वाक्य बोलावे ।। ५० ।। Page #449 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३८) महापुराण (४०-५१ कल्पाधिपतये स्वाहापदं वाच्यमतः परम् । भूयोऽप्यनुचरायादि स्वाहाशब्दमुदीरयेत् ॥५१ ततः परम्परेन्द्राय स्वाहेत्यच्चारयेत्पदम । सम्पठेदहमिन्द्राय स्वाहेत्येतदनन्तरम ॥५२ ततः परमाहताय स्वाहेत्येतत्पदं पठेत् । ततोऽप्यनुपमायेति पदं स्वाहापदान्वितम् ॥ ५३ सम्यग्दृष्टिपदं चास्माद्बोध्यान्तं द्विरुदीरयेत् । तथा कल्पपति चापि दिव्यमूति च सम्पठेत् ॥ ५४ द्विर्वाच्यं वज्रनामेति ततः स्वाहेति संहरेत् । पूर्ववत्काम्यमन्त्रोऽपि पाठ्योऽस्यान्ते त्रिभिः पदैः ॥५५ चूणि- सत्यजाताय स्वाहा । अहंज्जाताय स्वाहा । दिव्यजाताय स्वाहा। दिच्चि ताय स्वाहा । नेमिनाथाय स्वाहा । सौधर्माय स्वाहा । कल्पाधिपतये स्वाहा । अनुचराय स्वाहा । परम्परेन्द्राय स्वाहा। अहमिन्द्राय स्वाहा । परमाहंताय स्वाहा। अनुपमाय स्वाहा । सम्यग्दृष्टे २ कल्पपते २ दिव्यमूर्ते २ वज्रनामन् २ स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु । अपमृत्युविनाशनं भवतु। समाधिमरणं भवतु । सुरेन्द्रमन्त्रः ॥ यानंतर कल्पाधिपाय स्वाहा असे पद बोलून अनुचराय स्वाहा असे पद बोलावे ।।५।। यानन्तर परम्परेन्द्राय स्वाहा हे पद बोलून त्यानन्तर अहमिन्द्राय स्वाहा असे पद म्हणावे ॥ ५२ ॥ ___ यानंतर परमार्हताय स्वाहा हे पद म्हणून तदनन्तर स्वाहा या पदाने युक्त अनुपमाय हे पद म्हणावे अर्थात् अनुपमाय स्वाहा असे पद बोलावे ।। ५३ ॥ यानन्तर अन्तीं संबोधन असलेले सम्यग्दृष्टिपद दोनदा उच्चारावे. यानंतर कल्पपतिपद, दिव्यमतिपद व वज्रनाम हे पद अशी तीन संबोधनाची पदे दोन दोनदा उच्चारावीत व त्या तीनही पदांच्या पुढे स्वाहा हे पद जोडलेच पाहिजे ।। ५४ ।। पूर्वीप्रमाणे काम्यमन्त्र देखिल या सुरेन्द्र मंत्राच्या शेवटी तीन पदानी म्हणावा. अर्थात कल्पपते कल्पपते दिव्यमर्ते. वज्रनामन वज्रनामन् स्वाहा असे म्हणावे. याचा अर्थ- हे सम्यग्दृष्टे हे स्वर्गाच्या अधिपते, हे दिव्यमूर्ति-शरीर धारण करणाऱ्या हे वज्रनामा, मी तुला हवि अर्पण करतो ।। ५५ ।। आता चूर्णीचा अर्थ- १) सत्यजाताय स्वाहा सत्यजन्म ज्याने धारण केला आहे त्याला मी हवि अर्पण करतो २) अर्हज्जाताय स्वाहा- अरिहंत जन्म ज्याने धारण केला आहे' त्याला मी हवि अर्पण करतो ३) दिव्यजाताय स्वाहा- ज्याचा जन्म दिव्य आहे त्याला हवि अर्पण करतो ४) दिव्याचिर्जाताय स्वाहा- दिव्य तेज धारण करून ज्याचा जन्म झाला आहे त्याला मी हवि अर्पण करतो ५) नेमिनाथाय स्वाहा- धर्मचक्राची धारा धारण करणाऱ्या जिनेन्द्राला मी हवि अर्पण करतो ६) सौधर्मेन्द्राय स्वाहा- सौधर्मेन्द्राला मी हवि अर्पण करतो ७) कल्पाधिपतये स्वाहा- स्वर्गाच्या स्वामीला मी हवि अर्पण करतो ८) अनुचराय स्वाहाइन्द्राच्या अनुचराला मी हवि अर्पण करतो ९) परम्परेन्द्राय स्वाहा- परंपरेने होणाऱ्या इन्द्राना 'मी हवि अर्षण करतो १०) अहमिन्द्राय स्वाहा- मी अहमिन्द्राला हवि अर्पण करतो ११) परमार्हताय स्वाहा- अर्हत्प्रभूच्या उत्कृष्ट उपासकाला मी हवि अर्पण करतो १२) अनुपमाय स्वाहा- उपमारहिताला मी हवि अर्पण करतो. यानंतर हे सम्यग्दृष्टे, हे सम्यग्दृष्ट, हे कल्पाधिपते हे कल्पाधिपते, हे दिव्यमूर्ते हे दिव्यमूर्ते हे वज्रनामन् हे वज्रनामन् मी तुला हवि अर्पण करतो. सेवेचे फल अशा सद्गृहस्थत्वादिक सहा परमस्थानांची मला प्राप्ति होवो. अपमृत्यूचा नाश होवो व समाधिमरणाची मला प्राप्ति होवो. याप्रमाणे सुरेन्द्रमंत्राचे वर्णन झाले ।। ५५ ॥ Page #450 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-६२) महापुराण सुरेन्द्रमन्त्र एषः स्यत्सुरेन्द्रस्यानुतर्पणम् । मन्त्रं परमराजादिवक्ष्यामीतो यथाश्रुतम् ॥ ५६ प्रागत्र सत्यजाताय स्वाहेत्येतत्पदं पठेत् । ततः स्यादर्हज्जाताय स्वाहेत्येतत्परं पदम् ॥ ५७ ततश्चानुपमेन्द्राय स्वाहेत्येतत्पदं मतम् । विजयाादिजाताय पदं स्वाहान्तमन्वतः ॥ ५८ ततोऽपि नेमिनाथाय स्वाहेत्येतत्पठेत्पदम् । ततः परमजाताय स्वाहेत्येतदुदाहरेत् ॥ ५९ परमार्हताय स्वाहा पदमस्मात्परं पठेत् । स्वाहान्तानुपमायोक्तिरतो वाच्या द्विजन्मभिः ॥ ६० सम्यग्दृष्टिपदं चास्माद्बोध्यान्तं द्विरुदीरयेत् । उग्रतेजः पदं चैव दिशाञ्जयपदं तथा ॥ ६१ नेम्यादिविजयं चैवं कुर्यात्स्वाहापदोत्तरम् । काम्यमन्त्रं च तं ब्रूयात्प्राग्वदन्ते पदस्त्रिभिः॥ ६२ ज्यात सुरेन्द्राचे तर्पण करावयास सांगितलेले असते त्या मंत्राला सुरेन्द्रमन्त्र म्हणतात त्याचे वर्णन केले. आता मी आगमाला अनुसरून परमराजादिमन्त्र येथे सांगतो ।। ५६ ।। प्रथमतः या परमराजादिमंत्रात सत्यजाताय स्वाहा हे पद सांगितले आहे. तदनन्तर अर्हज्जाताय स्वाहा हे दुसरे पद सांगितले आहे ।। ५७ ।। यानंतर अनुपमेन्द्राय स्वाहा हे पद सांगितले आहे आणि त्यानंतर परमार्जािताय स्वाहा हे पद वणिले आहे ॥ ५८ ॥ त्यानन्तर नेमिनाथाय स्वाहा हे पद म्हणावे. नंतर परमजाताय स्वाहा हे पद बोलावे ॥ ५९ ॥ या पदाच्या पुढे परमार्हताय स्वाहा हे पद बोलून त्यानन्तर ब्राह्मणानी अनुपमाय स्वाहा हे वाक्य उच्चारावे ।। ६० ॥ या पदाच्या पुढे सम्यग्दृष्टे सम्यग्दृष्टे हे पद दोन वेळा उच्चारून उग्रतेजः हे पद व दिशाञ्जय हे पद दोन दोन वेळा उच्चारावे ।। ६१ ॥ यानंतर नेमिविजयाय स्वाहा हे पद दोन वेळा बोलावे व पूर्वीप्रमाणे शेवटी काम्यमन्त्र तीनवेळा म्हणावा ॥ ६२ ॥ यानन्तर चूर्णि-सत्यजाताय स्वाहा । अर्हज्जातायस्वाहा । अनुपमेन्द्राय स्वाहा । विजयाच्चिर्जाताय स्वाहा। नेमिनाथाय स्वाहा। परमजाताय स्वाहा । परमाहताय स्वाहा । अनुपमाय स्वाहा । सम्यग्दृष्टे सम्यग्दृष्टे, उग्रतेजः, उग्रतेजः दिशां जय दिशां जय, नेमिविजय नेमिविजय स्वाहा। सेवाफलं षट्परमस्थानं भवतु । अपमृत्युविनाशनं भवतु । समाधिमरणं भवतु । परमराजादिमन्त्रः । काम्यमन्त्रः । अर्थ- मी सत्यजन्म धारण करणाऱ्याला हवि अर्पण करतो. अरिहन्तपदाला योग्य जन्म धारण करणान्याला हवि अर्पण करतो. मी अनुपम इन्द्राला अर्थात् चक्रवर्तीला हवि अर्पण करतो. मी विजयतेजाने पूर्ण असा जन्म धारण करणाऱ्या चक्रवर्तीला हवि अर्पण करतो. धर्मरूपचक्राला चालविणा-याला हवि अर्पण करतो. उत्कृष्ट जन्म धारण करणान्यास मी हवि अर्पण करतो. मी परमअर्हद्भक्ताला हवि अर्पण अरतो. उपमारहित अशा महापुरुषाला मी हवि Page #451 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४०) महापुराण (४०-७६ मन्त्रः परमराजादिमतोऽयं परमेष्ठिनाम् । परं मन्त्रमितो वक्ष्ये यथाह परमा श्रुतिः ॥ ६३ तत्रादौ सत्यजाताय नमः पदमुदीरयेत् । वाच्यं ततोऽर्हज्जाताय नम इत्युत्तरं पदम् ॥ ६४ ततः परमजाताय नमः पदमुदाहरेत् । परमाहतशब्दं च चतुर्थ्यन्तं नमः परम् ॥ ६५ ततः परमरूपाय नमः परमतेजसे । नम इत्युभयं वाच्यं परमाध्यात्मदर्शिभिः ॥ ६६ परमादिगुणायेति पदं चान्यन्नमोयुतम् । परमस्थानशब्दश्च चतुर्थ्यन्तो नमोन्वितः ॥ ६७ उदाहार्य क्रमं ज्ञात्वा ततः परमयोगिने । नमः परमभाग्याय नम इत्युभयं पदम् ॥ ६८ परमद्धिपदं चान्यच्चतुर्थ्यन्तं नमः परम् । स्यात्परमप्रसादाय नम इत्युत्तरं पदम् ॥ ६९ स्यात्परमकाङक्षिताय नम इत्यत उत्तरम् । स्यात्परमविजयाय नम इत्युतरं वचः ॥७० स्यात्परमविज्ञानाय नमो वाक्तदनन्तरम् । स्यात्परमदर्शनाय नमः पदमतः परम् ॥ ७१ ततः परमवीर्याय पदं चास्मानमः परम् । परमादिसुखायेति पदमस्मादनन्तरम् ॥ ७२ सर्वज्ञाय नमो वाक्यमहते नम इत्यपि । नमोनमः पदं चास्मात्स्यात्परं परमेष्ठिने ॥ ७३ अर्पण करतो. यानंतर हे सम्यग्दृष्टि हे सम्यग्दृष्टि, उग्रतेजाचे धारका, सर्वदिशाना जिंकणारे हे नेमिविजय हे नेमिविजय मी तुम्हाला हवि अर्पण करतो. आपल्या सेवेचे फल मला मिळो अर्थात् सहा परमस्थानांची प्राप्ति होवो. अपमृत्यूचा नाश होऊन मला समाधिमरण प्राप्त होवो. पूर्वी परमराजादि मन्त्र सांगितले आहेत. आता परमेष्ठींचा उत्कृष्ट मन्त्र परमागमाने जसा सांगितला आहे तसा सांगतो ।। ६३ ।। प्रथमतः सत्यजाताय नमः हे पद उच्चारावे. यानंतर अर्हज्जाताय नमः हे पद बोलावे ॥ ६४॥ यानन्तर परमजाताय नमः हे वाक्य बोलावे. तदनन्तर परमार्हताय नमः हे पद बोलावे ॥ ६५ ॥ परमरूपाय नमः । परमतेजसे नमः । असे अध्यात्मस्वरूप जाणणान्यानी म्हणावे ॥६६॥ यानंतर परमगुणाय नमः । परमस्थानाय नमः असे दोन मन्त्र म्हणावेत ॥ ६७ ॥ यांच्यानंतर परमयोगिने नमः परमभाग्याय नमः अशी दोन पदे म्हणावीत ॥ ६८ ।। यानंतर परमर्द्धये नमः आणि परमप्रसादाय नमः अशी दोन पदे उच्चारावीत ॥ ६९ ॥ यानंतर परमकाङक्षिताय नमः आणि परमविजयाय नमः अशी दोन पदें उच्चारावीत ॥ ७० ॥ यानंतर परमविज्ञानाय नमः आणि परमदर्शनाय नमः ही पदें बोलावीत ।। ७१ ।। यानंतर परमवीर्याय नमः, परमसुखाय नमः अशी दोन पदें बोलावीत ।। ७२ ।। यानंतर सर्वज्ञाय नमः, अर्हते नमः अशी दोन पदें बोलावीत, त्यानंतर परमेष्टिने नमो नमः हे पद बोलावे ॥ ७३ ॥ Page #452 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-७६) महापुराण (४४१ परमादिपदान्येव इत्यस्माच्च नमो नमः । सम्यग्दृष्टिपदं चान्ते प्रोच्यान्ते द्विःप्रयुज्यताम् ।। ७४ द्विस्तां त्रिलोकविजयधर्ममूर्तिपदे ततः । धर्मनेमिपदे वाच्यं द्विःस्वाहेति ततः पदम् ॥ ७५ काम्यमन्त्रमतो ब्रूयात्पूर्ववद्विधिवद्विजः । काम्यसिद्धिप्रधाना हि सर्वे मन्त्राः स्मृता बुधैः ॥ ७६ चूणिः-१) सत्यजाताय नमः । २) अर्हज्जाताय नमः । ३) परमजाताय नमः । ४) परमाहताय नमः । ५) परमरूपाय नमः । ६) परमतेजसे नमः । ७) परमगुणाय नमः। ८) परमस्थानाय नमः । ९) परमयोगिने नमः । १०) परमभाग्याय नमः । ११) परमर्द्धये नमः । १२) परमप्रसादाय नमः । १३) परमकांक्षिताय नमः ॥ १४) परमविजयाय नमः । १५) परमविज्ञानाय नमः। १६) परमदर्शनाय नमः । १७) परमवीर्याय नमः । १८) परमसुखाय नमः । १९) सर्वज्ञाय नमः । २०) अर्हते नमः। २१) परमेष्ठिने नमो नमः । २२) परमनेत्रे नमो नमः । सम्यग्दष्टे सम्यग्दष्टे त्रिलोकविजय २ धर्ममूर्ते २ धर्मनेमे २ स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु । अपमृत्युविनाशन भवतु। समाधमरण भवतु। परमाष्ठमन्त्रः। यानंतर परम या आदि पदानंतर नेतृशब्द जोडून त्यानंतर नमो नमः हे पद जोडावे. अर्थात् परमनेत्रे नमो नमः असे म्हणावे. यानंतर सम्यग्दृष्ट सम्यग्दृष्टे, त्रिलोकविजय २ धर्ममूर्ते २ धर्मनेत्रे २ स्वाहा असे म्हणावे. यानंतर काम्यमन्त्र बोलावा. कारण सर्वमंत्र काम्यसिद्धि ज्यात मुख्य आहे असे आहेत असे विद्वानानी सांगितले आहे. आता चूर्णीतील प्रत्येक पदाचा अर्थ याप्रमाणे आहे १) सत्यजाताय नमः- सत्यरूपजन्म धारकाला नमस्कार, २) अर्हज्जाताय नमःअर्हत्पदाला योग्य जन्मधारकास नमस्कार, ३) परमजाताय नमः- उत्तम जन्म धारकाला नमस्कार, ४) परमार्हताय नमः- उत्कृष्ट अर्हद्धर्म-जिनधर्म धारकास नमस्कार, ५) परमरूपाय नमःउत्कृष्ट निर्ग्रन्थरूप धारकास नमस्कार, ६) परमतेजसे नमः- उत्तमतेजाला धारण करणाऱ्यास नमस्कार, ७) परमगुणाय नमः- उत्कृष्ट गुणधारकास नमस्कार, ८) परमस्थानाय नम:उत्कृष्ट मोक्षसुख धारकास नमस्कार, ९) परमयोगिने नमः- उत्कृष्ट योगधारकाला नमस्कार, १०) परमभाग्याय नमः- उत्कृष्ट भाग्यवंताला नमस्कार, ११) परमर्द्धये नमः- उत्तम ऋद्धीच्या धामिकाला नमस्कार, १२) परमप्रसादाय नमः- उत्कृष्ट प्रसन्नता धारण करणान्यास नमस्कार, १३) परमकाङक्षिताय नमः- उत्कृष्ट आत्मानन्दाची इच्छा करणाऱ्या जिनास नमस्कार, १४) परमविजयाय नमः- कर्मरूपी शत्रूवर उत्कृष्ट विजय मिळविणाऱ्यास नमस्कार, १५) परमविज्ञानाय नमः- उत्कृष्ट ज्ञानधारकास नमस्कार, १६) परमदर्शनाय नम:उत्कृष्ट दर्शनधारकास नमस्कार, १७) परमवीर्याय नमः- उत्कृष्ट शक्तिधारकाला नमस्कार, रमसुखाय नयः- परमसूख धारकास नमस्कार, १९) सर्वज्ञाय नमः- जगातील सर्व पदार्थांना जाणणान्या महापुरुषास नमस्कार, २०) अर्हते नम:- अरिहंताला नमस्कार, २१) परमेष्ठिने नमो नमः- परमेष्ठीला वारंवार नमस्कार, २२) परमनेत्रे नमो नम:- उत्कृष्ट नेत्याला- मोक्ष मार्गाकडे नेणाऱ्या अरिहंतास वारंवार नमस्कार, २३) हे सम्यग्दृष्टे २ हे त्रिलोकाला जिंकणा-या २ हे धर्ममर्ते २ व हे धर्मनेते २ हे धर्मप्रवर्तका २ मी तुला हवि अर्पण करतो. मला सेवेचे फल अशा महापरमस्थानाची प्राप्ति होवो, अपमृत्यूचा नाश होवो व समाधिमरण प्राप्त होवो असा या परमेष्ठीमंत्राचा अभिप्राय वर्णिला आहे ॥ ७४-७६ ।। म. ५६ Page #453 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४२) महापुराण (४०-७७ एते तु पीठिकामन्त्राः सप्त ज्ञेया द्विजोत्तमैः । एतः सिद्धार्चनं कुर्यादापानादिक्रियाविधौ ॥ ७७ क्रियामन्त्रास्त एते स्युराधानादिक्रियाविधौ । सूत्रे गणधरोद्धार्ये यान्ति साधनमन्त्रताम् ॥ ७८ सन्ध्यास्वग्नित्रये देवपूजने नित्यकर्मणि । भवन्त्याहुतिमन्त्राश्च त एते विधिसाधिताः ॥७९ सिद्धार्चासन्निधौ मन्त्राञ्जपेदष्टोत्तरं शतम् । गन्धपुष्पाक्षता_विनिवेदनपुरःसरम् ॥ ८० सिद्धविद्यस्ततो मन्त्ररेभिः कर्म समाचरेत् । शुक्लवासाः शुचिर्यज्ञोपवीत्यव्यग्रमानसः ॥ ८१ अयोग्ऽनयः प्रणेयाः स्युः कर्मारम्भे द्विजोत्तमैः । रत्नत्रितयसङ्कल्पादग्नीन्द्रमुकुटोद्भवाः ॥ ८२ तीर्थकृद्गणधच्छेषकेवल्यन्तमहोत्सवे । पूजाङ्गत्वं समासाद्य पवित्रत्वमुपागताः ॥ ८३ कुण्डत्रये प्रणेतव्यास्त्रय एते महाग्नयः । गार्हपत्याहवनीयदक्षिणाग्निप्रसिद्धयः ॥ ८४ अस्मिन्नग्नित्रये पूजा मन्त्रैः कुर्वन्द्विजोत्तमः । आहिताग्निरितिज्ञेयो नित्येज्या यस्य सद्मनि ॥ ८५ हे सात पीठिका मंत्र श्रेष्ठ ब्राह्मणानी जाणावेत व गर्भधानादिक्रियाविधीमध्ये या मंत्रानी सिद्धार्चन करावे. (आहुतिमन्त्र, जातिमन्त्र, निस्तारकमन्त्र, मुनिमंत्र, सुरेन्द्रमन्त्र, परमराजमन्त्र आणि परमेष्ठिमन्त्र ) ।। ७७ ।। गर्भधानादिकक्रियाविधीमध्ये याना क्रियामन्त्र म्हणतात व गणधरानी सांगितलेल्या सूत्रात याना साधनमंत्र म्हणतात ॥ ७८ ।। विधिपूर्वक सिद्ध केलेले हेच मंत्र सन्ध्यांच्यावेळी तीन अग्नीमध्ये देवपूजनरूप नित्य कर्म करीत असता आहुतिमंत्र म्हटले जातात ॥ ७९ ॥ सिद्धप्रतिमेच्या संनिध गन्ध, फुले, अक्षता, अर्घ वगैरे समर्पण करून एकशे आठ वेळा या मंत्रांचा जप करावा ॥ ८० ॥ ज्याला विद्यासिद्धि झाली आहे, ज्याने शुद्धवस्त्र धारण केले आहे, ज्याच्या गळ्यात यज्ञोपवीत आहे व ज्याच्या मनात व्यग्रता नाही अशा द्विजाने या मंत्रानी सर्व क्रिया कराव्यात ॥ ८१ ॥ क्रियांच्या प्रारंभी उत्तम द्विजानी रत्नत्रयाचा संकल्प करून अग्निकुमार देवांच्या इन्द्राच्या मुकुटापासून उत्पन्न झालेल्या तीन अग्नीना संस्कारयुक्त करावे ।। ८२ ।। तीर्थकर, गणधर व शेषकेवली (सामान्यकेवली) यांना मोक्ष प्राप्त झाल्यावर त्यावेळच्या महान् उत्सवप्रसंगी त्यांच्या पूजेला हे अग्नि कारण झाल्यामुळे पवित्र झाले आहेत ॥ ८३ ॥ म्हणून हे तीन महाग्नि तीन कुण्डामध्ये स्थापन करावेत. यांना क्रमाने गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नि या नावानी प्रसिद्धि प्राप्त झाली आहे ॥ ८४ ॥ ज्याच्या घरी या तीन अग्नीमध्ये मंत्राच्याद्वारे नित्य पूजा केली जाते त्याला आहिताग्नि द्विजोत्तम म्हणतात ॥ ८५ ॥ Page #454 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-९५) महापुराण (४४३ हविष्पाके च धूपे च दीपोद्बोधनसंविषौ । वह्नीनां विनियोगः स्यादमीषां नित्यपूजने ॥ ८६ प्रयत्नेनाभिरक्ष्यं स्यादिदमग्नित्रयं गृहे । नैव दातव्यमन्येभ्यस्तेऽन्ये ये स्युरसंस्कृताः ॥ ८७ न स्वतोऽग्नेः पवित्रत्वं देवताभूयमेव वा । कि त्वहद्दिव्यमूर्तीज्यासम्बन्धात्पावनोऽनलः ॥८८ ततः पूजाङ्गतामस्य मत्वार्चन्ति द्विजोत्तमाः । निर्वाणक्षेत्रपूजावत्तत्पूजातो न दूष्यति ।। ८९ व्यवहारनयापेक्षा तस्येष्टा पूज्यता द्विजैः । जनरध्यवहार्योऽयं नयोऽद्यत्वेऽग्रजन्मभिः ॥ ९० साधारणास्त्विमे मन्त्राः सर्वत्रैव क्रियाविधौ । यथासम्भवमुन्नेष्ये विशेषविषयांश्च तान् ॥ ९१ सज्जातिभागी भव सद्गृहभागी भवेति च । पदद्वयमुदीर्यादौ पदानीमान्यतः पठेत् ॥ ९२ आदौ मुनीन्द्रभागीति भवेत्यन्ते पदं वदेत् । सुरेन्द्रभागी परमराज्यभागीति च द्वयम् ॥ ९३ आर्हन्त्यभागी भवेति पदमस्मादनन्तरम् । ततः परमनिर्वाणभागी भव पदं भवेत् ॥ ९४ आधाने मन्त्र एष स्यात्पूर्वमन्त्रपुरःसरः। विनियोगश्च मन्त्राणां यथाम्नायं प्रशितः ॥ ९५ नेहमी जिनपूजन करतेवेळी गार्हपत्य अग्नीचा नैवेद्य शिजविण्याच्या कार्या, धूपक्षेपणाच्या कामी आहवनीय अग्नीचा व दीपक लावण्याच्या कामी दक्षिणाग्नीचा उपयोग होतो ।। ८६ ॥ या तीन अग्नीचे त्या द्विजोत्तमाने उत्तम प्रयत्नाने रक्षण करावे व जे संस्काररहित आहेत त्यांना त्याने हे अग्नि देऊ नयेतच ॥ ८७ ।। या अग्नीला स्वत: पवित्रता नाही. किंवा हे अग्नि देवताही नाहीत पण अर्हन्ताच्या दिव्यमूर्तीच्या सम्बन्धामुळे हे अग्नि पवित्र आहेत ।। ८८ ।। म्हणून या अग्नीला पूजेचे कारण साधन मानून श्रेष्ठ ब्राह्मण निर्वाणक्षेत्राच्या पूजेप्रमाणे याचीही पूजा करतात व ती पूजा दोषयुक्त नाही. जिनेश्वराच्या सहवासाने जी सम्मेदशिखरादि क्षेत्रे पूज्य आहेत तशी जिनेश्वराच्या सहवासाने अग्नीलाही पूज्यता आली आहे म्हणून ही अग्निपूजा दोषयुक्त नाही ॥ ८९ ॥ ___ व्यवहारनयाच्या अपेक्षेने द्विजाकडून या अग्नींची पूज्यता सांगितली आहे. म्हणून जैन ब्राह्मणानी हा नय आज उपयोगात आणावा ॥ ९० ॥ सर्वक्रियामध्ये सामान्यरीतीने हे मन्त्र उपयोगात आणावेत असे आतापर्यन्त सांगितले. पण आता येथून विशेष विषयात कोणत्या मंत्राचा उपयोग करावा हे मी आता सांगतो॥९१ ॥ गर्भाधान क्रियेत प्रथमतः सज्जातिभागी भव, सद्गृहभागी भव अशी दोन पदे प्रथमतः उच्चारून नंतर पुढील पदे याप्रमाणे बोलावीत. यानंतर पुढे मुनीन्द्रभागी भव असे म्हणून शेवटी सुरेन्द्रभागी भव, परमराज्यभागी भव अशी दोन पदे म्हणावेत. यानंतर आर्हन्त्यभागी भव हे पद म्हणन शेवटी परमनिर्वाणभागी भव असे पद म्हणावे. गर्भाधानक्रियेत हा मंत्र पूर्वमंत्रासह सांगितला आहे. आगमाला अनुसरून प्रत्येक क्रियेत या मंत्राचा विनियोग करावा ।। ९२-९५ ॥ Page #455 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४४) महापुराण (४०-९६ चूणिः- सज्जातिभागी भव । सद्गृहभागी भव । मुनीन्द्रभागी भव । सुरेन्द्रभागी भव । परमराज्यभागी भव । आर्हन्त्यभागी भव । परमनिर्वाणभागी भव । गर्भाधानमन्त्रः । (प्रीतिमंत्रः) स्यात्प्रीतिमन्त्रस्त्रैलोक्यनाथो भवपदादिकः । त्रैकाल्यज्ञानी भव त्रिरत्नस्वामी भवेत्ययम् ॥ ९६ चूणिः- त्रैलोक्यनाथो भव । काल्यज्ञानी भव । त्रिरत्नस्वामी भव । (सुप्रीतिमन्त्रः) मन्त्रोऽवतारकल्याणभागी भव पदादिकः । सुप्रीती मन्दरेन्द्राभिषेककल्याणवाक्परः ॥ ९७ भागी भवपदोपेतस्ततोनिष्क्रान्तिवाक्परः । कल्याणमध्यमो भागी भवेत्येतेन योजितः ॥ ९८ ततश्चाहन्त्यकल्याणभागी भवपदान्वितः । ततः परमनिर्वाणकल्याणपदसङ्गतः ॥ ९९ भागी भवपदान्तश्च क्रमाद्वाच्यो मनीषिभिः। धृतिमन्त्रमतो वक्ष्ये प्रोत्या शृणुत भो द्विजाः ॥१०० चूणिः- अवतारकल्याणभागी भव । मन्दरेन्द्राभिषेककल्याणभागी भव। निष्क्रान्तिकल्याणभागी भव । आर्हन्त्यकल्याणभागी भव । परमनिर्वाणकल्याणभागी भव । सुप्रीतिमन्त्रः। . चूणि- १) सज्जातिभागीभव व उत्तमजातीचा हो, २) चांगला गृहस्थ हो, ३) उत्तम मुनीश्वर हो, ४) सुरेन्द्र हो, ५) उत्कृष्ट राजा हो, ६) अरहंत हो व ७) सिद्धपद परमनिर्वाणपदभागी हो. हा गर्भाधानक्रियेचा मंत्र समजावा. ___ तूं तीन लोकांचा प्रभु हो, तूं तीन कालांचा जाणता हो, तू सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान आणि सम्यक्चारित्र यांचा स्वामी हो. त्रैलोक्यनाथो भव। त्रैकाल्यज्ञानी भव। त्रिरत्नस्वामी भव हे प्रीतिक्रियेचे मंत्र आहेत ॥ ९६ ॥ अर्थ- सुप्रीतिक्रियेचे मंत्र- १) अवतारकल्याणभागी भव तू गर्भकल्याणाला प्राप्त करून घेणारा हो, २) तू मन्दरपर्वतावर- मेरुपर्वतावर अभिषेकाच्या कल्याणाला-उत्सवाला प्राप्त हो, ३) तू दीक्षाकल्याणाला प्राप्त हो, ४) तू अर्हतावस्थेच्या कल्याणाला- समवसरणादिकवैभवाला प्राप्त हो, ५) परमनिर्वाण- मोक्षकल्याणाला प्राप्त हो ।। ९७-१०० ॥ यानंतर धृतिक्रियेचे मंत्र मी सांगतो ते प्रीतीने हे द्विजानो आपण ऐका धतिक्रियेचे मंत्र- गर्भाधानक्रियेच्या मन्त्रात भव शब्दाच्या ऐवजी दातृशब्द योजला असतां धृतिक्रियेचे मंत्र होतात. विद्वानानी त्यांचा प्रयोग करावा. याशिवाय यात अन्य काहीं भेद नाही. भावार्थ-सज्जातिदातृभागी भव- उत्तम जातीचा तू दाता हो । सद्गृहिदातृभागी भवसद्गृहस्थता धारण करणारा तू दाता हो । मुनीन्द्रदातृभागी भव- महामुनिपदाला देणारा असा दाता हो। सुरेन्द्रदातृभागी भव- सुरेन्द्रपदाला देणारा असा दाता तू हो। परमराज्यदातृभागी भव- उत्तमराज्य-चक्रवर्तीचे राज्य देणारा दाता तू हो। आर्हन्त्यदातृभागी भव-तू अर्हत्पद देणारा दाता हो आणि परमनिर्वाणदातृभागी भव । उत्कृष्ट मुक्ति देणारा हो। धृतिक्रियेत या मंत्रांचा उपयोग करावा ॥ १०१॥ Page #456 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-१०९) महापुराण तिक्रियामन्त्राः आधानमंत्र एवात्र सर्वत्राहितदातृवाक् । मध्ये यथाक्रमं वाच्यो नान्यो भेदोऽत्र कश्चन ॥ १०१ चूणि:- सज्जातिवातभागी भव । सद्गहिदातभागी भव। मुनीन्द्रदातभागी भव । सुरेन्द्रदातभागी भव । परमराज्यदातृभागी भव । आर्हन्त्यदातृभागी भव । परमनिर्वाणदातृभागी भव । मोदक्रियामन्त्राः मन्त्री मोदक्रियायां च मतोऽयं मुनिसत्तमैः । पूर्व सज्जातिकल्याणभागी भव पदं वदेत् ॥ १०२ ततः सद्गृहकल्याणभागी भव पदं पठेत् । ततो वैवाहकल्याणभागी भव पदं मतम् ॥ १०३ ततो मुनीन्द्रकल्याणभागी भव पदं स्मृतम् । पुनः सुरेन्द्रकल्याणभागी भव पदात्परम् ॥ १०४ मन्दराभिषेककल्याणभागीति च भवेति च । तस्माच्च यौवराज्यादिकल्याणपदसंयुतम् ॥ १०५ भागी भव पदं वाच्यं मन्त्रयोगविशारदः । स्यान्महाराज्यकल्याणभागी भव पदं परम् ॥ १०६ भूयः परमराज्यादिकल्याणोपहितं मतम् । भागी भवेत्यथार्हन्त्यकल्याणेन च योजितम् ॥ १०७ .. चूणिः- १) सज्जातिकल्याणभागी भव । २) सद्गृहिकल्याणभागी भव । ३) वैवाहकल्याण भागी भव । ४) मुनीन्द्रकल्याणभागी भव । ५) सुरेन्द्रकल्याणभागी भव । ६) मन्दराभिषेककल्याणभागी भव । यौवराज्यकल्याणभागी भव । महाराज्यकल्याणभागी भव । परमराज्यकल्याणभागी भव । आर्हन्त्यकल्याणभागी भव । प्रियोद्भवमन्त्राः प्रियोद्भवे च मन्त्रोऽयं सिद्धार्चनपुरःसरम् । दिव्यनेमिविजयाय पदात्परमनेमिवाक् ॥ १०८ विजयायेत्यथार्हन्त्यनेम्यादिविजयाय च । युक्तो मन्त्राक्षररेभिः स्वाहान्तः सम्मतो द्विजैः ॥ १०९ चूणिः- दिव्यनैमिविजयाय स्वाहा । परममिविजयाय स्वाहा । आर्हन्त्यनेमिविजयाय स्वाहा। उत्तम मुनीनी मोदक्रियेत याप्रमाणे मन्त्र मानला आहे- प्रथम सज्जातिकल्याण भागी भव हे पद बोलावे. १) सज्जातीच्या कल्याणाला धारण करणारा तू हो. यानंतर २) सद्गृहिकल्याणभागी भव हे पद म्हणावे. उत्तम गृहस्थाच्या कल्याणाला तू धारण करणारा हो। ३) वैवाहकल्याणभागी भव- विवाहाच्या कल्याणाला प्राप्त करून घेणारा तू हो। ४) यानंतर मुनीन्द्रकल्याणभागी भव हे पद सांगितले आहे- महामुनीन्द्राच्या कल्याणाला तू प्राप्त हो। ५) पुनः सुरेन्द्र कल्याणभागी भव हे पद आहे- तू इन्द्रपदाच्या कल्याणाचा उपभोग घेणारा हो. यानन्तर मन्दराभिषेककल्याणभागी भव हे पद- मेरुपर्वतावर अभिषेककल्याणाला तू प्राप्त हो. या पदानंतर यौवराज्यकल्याणभागी भव- युवराज पदाच्या कल्याणाचा अनुभव घेणारा तू हो। यानन्तर महाराज्यकल्याणभागी भव हे पद तू महाराजाच्या पदाच्या कल्याणाचा उपभोक्ता हो. पुनः परमराज्यादिकल्याण या पदाने युक्त मन्त्र बोलावा अर्थात् परमराज्य कल्याणाला धारण करणारा तू हो. यानन्तर आर्हन्त्यकल्याणभागी भव- अरिहन्तपदाच्या कल्याणाचा उपभोग घेणारा तू हो हा मंत्र बोलावा ।। १०२-१०७ ।। प्रियोद्धवक्रियेमध्ये सिद्धभगवंताची पूजा करून या मन्त्राचा पाठ म्हणावा-दिव्यनेमिविजयाय, परमनेमिविजयाय आणि आर्हन्त्यनेमिविजयाय या मन्त्राक्षरांच्या अन्ती स्वाहा हा शब्दाचा प्रयोग द्विजानी करावा. अर्थात् दिव्यनेमिविजयाय स्वाहा । अर्थात् दिव्यनेमीच्या द्वारे कर्मरूपी शत्रूवर विजय प्राप्त करणान्याला मी हवि अर्पण करतो. परमनेमिविजयाय स्वाहा परमनेमीच्या द्वारे विजय मिळविणान्याला मी हवि अर्पण करतो. आर्हन्त्यनेमिविजयाय स्वाहाअरिहंताची जी अवस्था हीच कोणी चक्रधारा तिच्याद्वारे कर्मरूपी शत्रूवर विजय मिळविणा-या जिनेन्द्र देवाला मी हवि अर्पण करतो. असे तीन मंत्र बोलावेत ॥ १०८-१०९ ।। Page #457 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४६) महापुराण (४०-११० जन्मसंस्कारमन्त्रोऽयमेतेनार्भकमादितः । सिद्धाभिषेकगन्धाम्बुसंसिक्तं शिरसि स्पृशेत् ॥ ११० कुलजातिवयोरूपगुणः शीलप्रजान्वयः । भाग्याविधवतासौम्यमूर्तित्वैः समषिष्ठिता ॥ १११ सम्यग्दृष्टिस्तवाम्बेयमतस्त्वमपि पुत्रक । सप्रीतिमाप्नुहि त्रीणि प्राप्य चक्राण्यनुक्रमात् ॥ ११२ इत्याङ्गानि स्पृशेदस्य प्रायः सारूप्ययोगतः । तत्राधायात्मसङ्कल्पं ततः सूक्तमिदं पठेत् ॥ ११३ अङ्गादङ्गात्सम्भवसि हृदयावपि जायसे । आत्मा वै पुत्रनामासि त्वं जीव शरदः शतम् ॥ ११४ क्षीराज्यममृतं पूतं नाभावावय॑ युक्तितः । घातिञ्जयो भवेत्यस्य हासयेन्नाभिनालकम् ॥ ११५ श्रीदेव्यो जात ते जात क्रियां कुर्वन्त्विति ब्रुवन् । तत्तनुं चूर्णवासेन शनैरुद्वर्त्य यत्नतः ॥ ११६ त्वं मन्दराभिषेकाहॊ भवेति स्नापयेत्ततः । गन्धाम्बुभिश्चिरं जीव्या इत्याशास्याक्षतं क्षिपेत् ॥११७ नश्यात्कर्ममलं कृत्स्नमित्यास्येऽस्यसनासिके । घतमौषधसंसिद्धमावपेन्मात्रया द्विजः ॥ ११८ दिव्यनेमिविजयाय स्वाहा इत्यादिरूपाचा मंत्र हा जन्मसंस्काराचा आहे प्रथमतः सिद्धभगवंताच्या अभिषेकाच्या गन्धोदकाने सिंचन केलेल्या या बालकाच्या मस्तकाला वरील मंत्र म्हणून स्पर्श करावा ॥ ११० ।। व असे म्हणावे- ही तुझी माता कुल, जाति, वय, रूप या गुणानी युक्त आहे व शीलवती आहे, सन्ततीने युक्त व उत्तम वंशात जन्मलेली आहे. भाग्यवती व अवैधव्याने युक्त आहे, सौम्य व शान्तमूर्ति आहे, या गुणानी युक्त व सम्यग्दृष्टि आहे, हे पुत्रा तू देखिल या मातेमुळे अनुक्रमाने तीन चक्रानी- म्हणजे दिव्यचक्र, विजयचक्र आणि परचक्र-उत्कृष्टचक्र यानी आनंदित हो ।। १११-११२ ।। असे म्हणून याच्या अंगाना स्पर्श करावा व आपल्याशी तो सदृश असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या आत्म्याचा सङकल्प करून पुढील हे सूक्त म्हणावे ।। ११३ ॥ हे पुत्रा, तू माझ्या प्रत्येक अंगापासून उत्पन्न झाला आहेस व माझ्या हृदयापासूनही उत्पन्न झाला आहेस म्हणून पुत्रनामक माझा आत्माच आहेस म्हणून तू शेकडो वर्षावधि चिरंजीव हो ॥ ११४ ।। दूध व तूप हेच एक पवित्र अमृत नाभीवर-बेंबीवर सिंचून व हे पुत्रा तू 'घातिं जयो भव' घातिकर्माना जिंकणारा हो असे म्हणून त्याची नाळ युक्तीने न दुखविता कातरावी. हे बालका, श्री वगैरे देवता तुझे जातकर्म करोत असे बोलून त्याच्या सर्वाङ्गावर सुगंधित चूर्ण उटी हळूच जपून लावावी व तू मेरुपर्वतावर अभिषेक करून घेण्यास योग्य हो असे म्हणून सुगंधित पाण्यानी त्याला स्नान घालावे. यानंतर दीर्घकालपर्यन्त जग असा आशीर्वाद देऊन त्याच्यावर अक्षताक्षेपण कराव्यात ॥ ११५-११७ ॥ हे बालका तुझे सर्व कर्ममल नष्ट होवोत असे म्हणून त्या ब्राह्मणाने त्या बालकाच्या तोंडात व नाकात औषधिद्रव्यानी तयार केलेले तूप स्वल्प प्रमाणाने घालावे ॥ ११८ ॥ Page #458 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-१२८) महापुराण (४४७ ततो विश्वेश्वरीस्तन्यभागी भूया इतीरयन् । मातुस्तनमुपामन्त्र्य वदनेऽस्य समासजेत् ॥ ११९ प्राक्पूजां पुण्यदानं च प्रीतिदानपुरःसरम् । विधाय विधिवत्तस्य जातकर्म समापयेत् ॥ १२० जरायुपटलं चास्य नाभिनालसमायुतम् । शुचौ भूमौ निखातायां विक्षिपेन्मत्रमापठन् ॥ १२१ सम्यग्दृष्टिपदे बोध्ये सर्वमातेति चापरम् । वसुन्धरापदं चैव स्वाहान्तं द्विरुदाहरेत् ॥ १२२ मन्त्रेणानेन संमन्व्य भूमौ सोदकमक्षतम् । क्षिप्त्वा गर्भमलं न्यस्तपञ्चरत्नतले क्षिपेत् ॥ १२३ त्वत्पुत्रा इव मत्पुत्रा भूयासुश्चिरजीविनः । इत्युदाहृत्य सस्या तत्क्षेप्तव्यं महीतले ॥ १२४ क्षीरवृक्षोपशाखाभिरुपहृत्य च भूतलम् । स्नाप्या तत्रास्य मातासौ सुखोष्णमन्त्रितैर्जलः॥ १२५ सम्यग्दृष्टिपदं बोध्यविषयं द्विरुदीरयेत् । पदमासन्नभव्येति तद्वद्विश्वेश्वरीत्यपि ॥ १२६ । तत ऊजितपुण्येति जिनमातृपदं तथा । स्वाहान्तो मन्त्र एषः स्यात्तन्मातुः स्नानसंविधौ ॥ १२७ चूणिः:- सम्यग्दृष्टे २ आसन्नभव्ये २ विश्वेश्वरि २ जितपुण्ये २ जिनमातः स्वाहा । यथा जिनाम्बिका पुत्रकल्याणान्यभिपश्यति । तथेयमपि मत्पत्नीत्यास्थयमं विधि भजेत् ॥ १२८ यानन्तर हे बाला तूं विश्वेश्वरीचे-जिनमातेचे स्तनपान करणारा हो 'विश्वेश्वरीस्तन्यभागी भव' हा मंत्र बोलून व मातेचे स्तन मंत्रून या बालकाच्या मुखामध्ये ते द्यावे ॥ ११९ ॥ प्रथमतः जिनपूजा करावी नंतर पुण्य प्राप्त व्हावे म्हणून दान द्यावे व संतोषाने प्रीतिदान करावे. हे विधिपूर्वक दान करून हे जातकर्म समाप्त करावे ॥ १२० ॥ या बालकाचे जरायुपटल- वार व बेंबीची नाळ हे पवित्र अशा खणलेल्या जमिनीत पुढील मंत्र म्हणून पुरावेत. 'हे सम्यग्दृष्टे २ सर्वमातः २ हे वसुन्धरे २ स्वाहा' हा मंत्र म्हणून जरायुपटलादिक पुरावेत. अर्थात् वरील मंत्राने जलसहित अक्षता मंत्रून खड्यात टाकून त्या खड्याच्या तळभागी पंचरत्ने ठेवून तो गर्भमल टाकावा. हे भूमाते तुझ्या पुत्राप्रमाणे-हिमवदादि पर्वताप्रमाणे माझे पुत्र दीर्घकाल जगणारे होवोत असे बोलून धान्योत्पत्तीस योग्य अशा जमिनीत ते गर्भमल टाकावेत ॥ १२१-१२४ ॥ वडपिंपळ वगैरे झाडाच्या लहानढाळयानी जमीन सुशोभित करून त्या ठिकाणी या बालकाच्या मातेला मंत्रित केलेल्या सुखदायक अशा गरम पाण्यानी स्नान घालावे ।। १२५ ॥ त्या बालकाच्या मातेला स्नान घालताना हा मंत्र म्हणावा. हे सम्यग्दर्शन धारण करणारी, आसन्नभव्य असलेली, सर्व जगताची स्वामिनी, उत्कृष्ट पुण्य संचयाने युक्त असलेली, हे जिनमाता तूं आम्हाला पूज्य आदरणीय आहेस. जशी जिनमाता आपल्या जिनस्वरूपी पुत्राचे जन्मादिकल्याण पाहते तशी ही माझी पत्नी देखिल पुत्राची कल्याणे पाहो अशा श्रद्धेने तिला स्नान घालावे ।। १२६-१२८ ॥ Page #459 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४८) महापुराण (४०-१२९ तृतीयेऽहनि चानंतज्ञानदी भवेत्यमम् । आलोकयेत् समुत्क्षिप्य निशि ताराडकितं नभः ॥ १२९ पुण्याहघोषणापूर्व कुर्याद्दानं च शक्तितः। यथायोगं विदध्याच्च सर्वस्याभयघोषणाम् ॥ १३० जातकर्मविधिः सोऽयमाम्नातः पूर्वसूरिभिः । यथायोगमनुष्ठेयः सोऽद्यत्वेऽपि द्विजोत्तमः ॥ १३१ नामकर्मविधाने च मन्त्रोयऽमनुकीय॑ते । सिद्धार्चनविधौ सप्त मन्त्राः प्रागनवणिताः ॥ १३२ ततो दिव्याष्टसहस्रनामभागी भवादिकम् । पदत्रितयमुच्चार्य मन्त्रोऽत्र परिवर्त्यताम् ॥ १३३ चणि:- दिव्याष्टसहस्रनामभागी भव । विजयनामाष्टसहस्रभागी भव । परमनामाष्टसहस्र भागी भव । नामकर्ममन्त्रः। शेषो विधिस्तु निःशेषः प्रागुक्तो नोच्यते पुनः । बहिर्यातक्रियामन्त्रस्ततोऽयमनुगम्यताम् ॥ १३४ तत्रोपनयनिष्क्रान्तिभागी भव पदात्परम् । भवेद्ववाहनिष्क्रान्तिभागी भव पदं ततः ॥ १३५ क्रमान्मुनीन्द्रनिष्क्रान्तिभागी भव पदं वदेत् । ततः सुरेन्द्र निष्क्रान्तिभागी भव पदं स्मृतम् ॥ १३६ __ यानन्तर तिसऱ्या दिवशी त्या बालकाला आपल्या हातात घेऊन रात्री त्याला तारकानी युक्त असे आकाश दाखवावे व तू अनंतज्ञानाला पाहणारा हो 'अनंतज्ञानदी भव' हा मंत्र म्हणावा व त्यादिवशी पुण्याहवाचन करून यथाशक्ति दान करावे व जसे शक्य होईल तशी अभयघोषणा करावी यथाशक्ति अभय द्यावे ।। १२९-१३० ॥ हा जन्मकर्माचा विधि पूर्वाचार्यानी गुरुपरंपरेस अनुसरून सांगितलेला आहे व श्रेष्ठ ब्राह्मणानी आज देखिल तो विधि यथायोग्य करावा ।। १३१॥ नामकर्मविधाने- बालकाचे नाव ठेवणे या कार्यात सिद्धपूजन करून ज्यांचे वर्णन पूर्वी केले आहे ते सात पीठिकामन्त्र येथे म्हटले जातात. त्याचे नन्तर येथे 'दिव्याष्टसहस्रनाम भागी भव' आदिक तीन पदांचे उच्चारण करून त्या मंत्रांचे परिवर्तन करावे. अर्थात् दिव्याष्टसहस्रनामभागी भव- एक हजार आठ दिव्य नावांचा धारक तू हो. 'विजयाष्टसहस्रनामभागी भव- विजयरूप एक हजार आठ नावांचा धारक तूं हो. परमनामाष्टसहस्रभागी भवअतिशय उत्कृष्ट एक हजार आठ नावांचा तू धारक हो असे तीन मंत्र येथे बोलावेत. बाकीचा विधि पूर्वी सांगितला असल्यामुळे तो येथे सांगितला जात नाही. यानंतर बहिर्यानक्रिया मन्त्र पुढे लिहिल्याप्रमाणे जाणावेत ॥ १३२-१३४ ।। या बहिर्यान क्रियेमध्ये उपनयननिष्क्रान्तिभागी भव- यज्ञोपवीत धारण करण्यासाठी बाहेर निघणारा हो. हे पद बोलावे. यानंतर 'वैवाहनिष्क्रान्तिभागी भव' हे पद बोलावे. अर्थात् विवाह करून घेण्यासाठी बाहेर निघणारा हो हा मंत्र म्हणावा ॥ १३५ ।। त्यानंतर क्रमाने मुनीन्द्रनिष्क्रान्तिभागी भव मुनीन्द्रपद प्राप्त करून घेण्यासाठी बाहेर निघणारा हो हे पद बोलावे. त्यानंतर सुरेन्द्रनिष्क्रान्तिभागी भव हे पद सांगितले आहे. सुरेन्द्र पदाच्या प्राप्तिसाठी बाहेर निघणारा हो. हे पद बोलावे ॥ १३६ ॥ Page #460 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-१४०) महापुराण मन्दराभिषेकनिष्क्रान्तिभागी भव पदं ततः । यौवराज्यमहाराज्यपदे भागी भवान्विते ॥ १३७ निष्क्रान्तिपदमध्ये त्वं परमराज्यपदं तथा । आर्हन्त्यराज्यनिष्क्रान्तिभागी भव शिखापदम् ॥ १३८ पदैरेभिरयं मन्त्रस्तद्विद्भिरनुजप्यताम् । प्रागुक्तो विधिरन्यस्तु निषद्यामन्त्र उत्तरः ॥ १३९ चूणिः- उपनयनिष्क्रान्तिभागी भव । वैवाहनिष्क्रान्तिभागी भव । मुनीन्द्र निष्क्रान्तिभागी भव । सुरेन्द्रनिष्क्रान्तिभागी भव । मन्दराभिषेकनिष्क्रान्तिभागी भव । यौवराज्यनिष्क्रान्तिभागी भव । महाराज्यनिष्क्रान्तिभागी भव । परमराज्यनिष्क्रान्तिभागी भव । आर्हन्त्य निष्क्रान्तिभागी भव । बहिर्यानमन्त्रः॥ मिषद्या- दिव्यसिंहासनपदाभागी भव पदं भवेत् । एवं विजयपरमसिंहासनपदद्वयात् ॥ १४० चूणिः- दियसिंहासनभागी भव । विजयसिंहासनभागी भव । परमसिंहासनभागी भव । निषद्यामंत्रः॥ १० अन्नप्राशनक्रिया। यानंतर मन्दराभिषेकनिष्क्रान्तिभागी भव हे पद बोलावे. मेरुपर्वतावर अभिषेकासाठी तू निघणारा हो हे पद म्हणावे. तदनन्तर यौवराज्यनिष्क्रान्तिभागी भव युवराजपदासाठी निघणारा तू हो हा मंत्र बोलावा ।। १३७ ॥ यानंतर महाराज्यपदभागी भव हे पद बोलावे. महाराज्यपदप्राप्तिसाठी निघणारा हो हे पद बोलावे ॥ १३८ । नंतर परमराज्यपदनिष्क्रान्तिभागी भव- चक्रवर्तीचे उत्कृष्ट राज्य मिळविण्याकरिता तू निघणारा हो असे म्हणावे. तदनन्तर आर्हन्त्यराज्यनिष्क्रान्तिभागी भव हे पद म्हणावे अर्थात् अर्हत्पदप्राप्तिसाठी तू निघणारा हो. हा मंत्र विद्वानानी बोलावा. बाकीचा विधि पूर्वी सांगितला आहे. यानन्तर निषद्यामन्त्र आहेत ।। १३८-१३९ ॥ चूर्णि- उपनयनिष्क्रान्तिभागी भव, वैवाहनिष्क्रान्तिभागी भव वगैरे मंत्राचा अर्थ वर दिला असल्यामुळे येथे द्विरुकतिभयाने दिला नाही. जेव्हा बालकाला गादीवर बसवितात तेव्हा केला जाणारा जो संस्कार त्याला निषद्या म्हणतात. या संस्काराचे वेळी दिव्यसिंहासन पदाच्या पुढे भागी भव हे पद जोडावे, याचप्रमाणे विजयसिंहासन पदापुढे व परमसिंहासन पदापुढे भागी भव हे पद जोडावे. म्हणजे क्रमाने दिव्य सिंहासनभागी भव । म्हणजे दिव्यसिंहासनाचा भोक्ता हो। विजयसिंहासनभागी भवचक्रवर्तीच्या विजयाने शोभित सिंहासनावर बसणारा हो आणि परमसिंहासनभागी भवतीर्थंकराच्या उत्कृष्ट सिंहासनावर बसणारा हो असे तीन मंत्र म्हणावेत. यानन्तर अन्नप्राशन क्रियामंत्र याप्रमाणे-॥१४० ॥ म. ५७ Page #461 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५०) महापुराण (४०-१४१ प्राशनेऽपि तथा मन्त्रपदस्त्रिभिरुदाहरेत् । तानि दिब्यविजयाक्षीणामतपदानि वै ॥ १४१ भागी भवपदेनान्ते युक्तेनानुगतानि च । पदैरेभिरयं मन्त्रः प्रयोज्यः प्राशने बुधैः ॥ १४२ चूणिः- दिव्यामृतभागी भव । विजयामृतभागी भव । अक्षीणामृतभागी भव । व्युष्टिः ।। व्युष्टिक्रियाश्रितं मन्त्रमितो वक्ष्ये यथाश्रुतम् । तत्रोपनयनं जन्मवर्षवर्द्धनवाग्युतम् ॥ १४३ भागी भवपदं ज्ञेयमादौ शेषपदाष्टके । वैवाहनिष्ठशब्देन मुनिजन्मपदेन च ॥ १४४ सुरेन्द्रजन्मना मन्दराभिषेकपदेन च । यौवराज्यमहाराज्यपदाभ्यामप्यनुक्रमात् ॥ १४५ परमार्हन्त्यराज्याभ्यां वर्षवर्धनसंयुतम् । भागी भव पदं योज्यं ततो मन्त्रोऽयमुद्भवेत् ॥ १४६ चणिः- उपनयनजन्मवर्षवर्धनभागी भव। वैवाहनिष्ठवर्षवर्धनभागी भव । मुनीन्द्रजन्मवर्षवर्धनभागी भव। सुरेन्द्रजन्मवर्षवर्धनभागी भव । मन्दराभिषेकवर्षवर्धनभागी भव। यौवराज्यवर्षवर्धनभागी भव । महाराज्यवर्षवर्धनभागी भव । परमराज्यवर्षवर्धनभागी भव । आर्हन्त्यराज्यवर्षवर्धनभागी भव । व्युष्टिक्रियामन्त्रः ॥ अन्नप्राशनक्रियेच्या वेळी तीन पदानी मन्त्र म्हणावेत ते असे- दिव्य, विजय व अक्षीण या शब्दापुढे अमृतभागी भव हे शब्द विद्वानांनी जोडावेत म्हणजे दिव्यामृतभागी भवदिव्य अमृत भक्षण करणारा हो। विजयामृतभागी भव- विजयरूपी अमृताचा भोक्ता हो व अक्षीणामृतभागी भव- कधीही न संपणाऱ्या अमृताचे प्राशन करणारा हो अर्थात् मोक्षरूप अमृत भक्षणारा हो. यानंतर व्युष्टिक्रिया संस्काराचे-वाढदिवसाचे मंत्र- ।। १४१ ॥ येथे श्रुतानुसार व्युष्टिक्रिया मंत्र मी सांगतो. प्रथमतः उपनयनजन्मवर्षवर्धन या शब्दाच्या पुढे भागी भव हा शब्द जोडावा म्हणजे १ उपनयनजन्मवर्षवर्धनभागी भव हे वाक्य तयार होते. याचा अर्थ- मौंजीबंधनरूप जन्माचे वर्ष वाढविणारा हो. वैवाहनिष्ठ शब्दाच्या पुढे वर्षवर्धनभागी भव हे पद जोडावे. म्हणजे वैवाहनिष्ठवर्षवर्धनभागी भव हे पद तयार होते. याचा अभिप्राय- विवाहक्रियेच्या वर्षाचा वाढदिवस धारण करणारा हो. मुनिजन्म शब्दाच्या पुढे वर्षवर्धनभागी भव हे पद जोडावे म्हणजे मुनीन्द्रजन्मवर्षवर्धनभागी भव हा मंत्र तयार होतो. याचा अर्थ- मुनीन्द्रपदधारण करणाऱ्या तुला वर्षवृद्धीचा दिवस प्राप्त होवो. यानंतर सुरेन्द्र जन्म याच्यापुढे वर्षवर्धन शब्द व भागी भव हे शब्द जोडावेत. त्यामुळे सुरेन्द्रजन्मवर्षवर्धनभागी भव हा मंत्र सिद्ध होतो. याचा अभिप्राय- देवेन्द्राच्या वर्षाला वाढविणारा दिवस तुला प्राप्त होवो हा आहे. यानंतर मन्दराभिषेक या पदाशी वर्षवर्धनभागी भव हे शब्द जोडावेत म्हणजे मन्दराभिषेकवर्षवर्धनभागी भव हा मंत्र होतो- सुमेरुपर्वतावर होणाऱ्या अभिषेकाची वर्षवृद्धि तुला प्राप्त होवो. यौवराज्य हे पद व महाराज्य हे पद या दोन पदाबरोबर वर्षवर्धनभागी भव हे शब्द क्रमाने जोडावेत म्हणजे यौवराज्यवर्षवर्धनभागी भव हे मंत्रपद तयार होते व महाराज्य वर्षवर्धनभागी भव हे मंत्रपद तयार होते. यांचा क्रमाने अर्थ- युवराजपदाची वर्षवृद्धि करणारा वाढदिवस तुला प्राप्त होवो. महाराज्यपदाची वर्षवृद्धि करणारा वाढदिवस तुला प्राप्त होवो व यानंतर परमराज्यवर्षवर्धनभागी भव आणि आर्हन्त्यराज्यवर्षवर्धनभागी भव हे दोन मंत्र त्याचे अभिप्राय चक्रवर्तीचे राज्याच्या वर्षाचा वाढदिवस तुला प्राप्त होवो व उत्कृष्ट अर्हत्पदाच्या प्राप्तीचा वर्षवर्धनदिवस तुला प्राप्त होवो. या प्रकारे हा वर्षवृद्धिचूणिमंत्र तयार झाला व तो चूर्णीमध्ये दाखविला आहे १४२-१४६ ।। Page #462 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-१५२) महापुराण चौलकर्मचौलकर्मण्यथो मन्त्रः स्याच्चोपनयनादिकम् । मुण्डभागी भवान्तं च पदमादावनुस्मृतम् ॥ १४७ ततो निर्ग्रन्थमुण्डादिभागी भव पदं परम् । ततो निष्क्रान्तिमुण्डादिभागी भव पदं परम् ॥ १४८ स्यात्परमनिस्तारककेशभागी भवेत्यतः । परमेन्द्रपदादिश्च केशभागी भवध्वनिः ॥ १४९ परमार्हन्त्यराज्यादिकेशभागीति वागद्वयम् । भवेत्यन्तपदोपेतं मन्त्रोऽस्मिन्स्याच्छिखापदम् ॥ शिखामेतेन मन्त्रेण स्थापयेद्विधिवद्विजः । ततो मन्त्रोऽयमाम्नातो लिपिसङख्यानसङग्रहे ॥ १५१ चूणिः- उपनयनमण्डभागी भव । निर्ग्रन्थमुण्डभागी भव, परमनिस्तारककेशभागी भव । परमेन्द्र केशभागी भव । परमराज्यकेशभागी भव । आर्हन्त्यराज्यकेशभागी भव । इति चौलक्रियामन्त्रः । शब्दपारभागी भव अर्थपारभागी भव । पदं शब्दार्थसम्बन्धपारभागी भवेत्यपि ॥ १५२ चूणिः- शब्दपारगामी (भागी) भव । अर्थपारगामी (भागी) भव । शब्दार्थपारगामी (भागी) भव (लिपिसङख्यानमन्त्रः) --------------------.................. चौलकर्म- या संस्कारात याप्रमाणे मंत्ररचना आहे- उपनयनशब्द आरंभी आणि मुण्डभागी भव हा शब्द अन्ती असा पहिला मन्त्र आहे म्हणजे १) उपनयनमुण्डभागी भव हा मंत्र आहे- याचा अर्थ उपनयनक्रियेमध्ये मण्डन धारण करणारा तं हो. २) निर्ग्रन्थमण्डभागी भव हा दुसरा मन्त्र आहे- निर्ग्रन्थदीक्षा घेतेवेळी मुण्डन धारण करणारा हो. यानंतर ३) निष्क्रान्तिमुण्डभागी भव हे मंत्रपद आहे. अर्थात् मुनि अवस्थेत केशलोच करणारा हो । १४७-१४८ ॥ यानंतर ४) परमनिस्तारककेशभागी भव- संसारातून तारून नेणाऱ्या आचार्यांच्या केशाना प्राप्त हो हा मंत्र आहे. यानंतर ५) परमेन्द्रकेशभागी भव हा मंत्र आहे. इन्द्रपदाच्या केशाना धारण करणारा हो हा मंत्र आहे ॥ १४९ ।। यानंतर ६) परमराज्यकेशभागी भव उत्कृष्ट राज्यपदधारक चक्रवर्तीच्या केशांना धारण करणारा हो व ७) अर्हन्त्यराज्यकेशभागी भव अरिहन्ताच्या अवस्थेच्या केशाना धारण करणारा हो हा सातवा मंत्र आहे. अशा रीतीच्या चौलमंत्रानी द्विजानी विधिपूर्वक शेंडी धारण करण्याचा संस्कार बालकावर करावा ।। १५० ।। यानंतर लिपिसंख्यानसंग्रह हा संस्कार करावा. याचे मन्त्र १) शब्दपारभागी भवतूं सर्व शब्दांच्या ज्ञानात पारंगत हो २) अर्थपारगामी भव तूं संपूर्ण अर्थाचा ज्ञाता हो आणि शब्दार्थसम्बन्धपारभागी भव शब्द व अर्थ या दोन्हींचा संबन्ध पूर्णपणे जाणणारा हो असे लिपिसंख्यान क्रियेच्या मंत्राचे अर्थ आहेत ॥ १५१-१५२ ॥ Page #463 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५२) महापुराण उपनीतिक्रियामन्त्रं स्मरन्तीमं द्विजोत्तमाः । परमनिस्तारकादिलिङ्गभागी भवेत्यतः ।। १५३ युक्तं परमर्षिलिङ्गेन भागी भव पदं भवेत् । परमेन्द्रादिलिङ्गादिभागी भव पदं परम् ॥ १५४ एवं परमराजादिपरमार्हन्त्यादि च क्रमात् । युक्तं परमनिर्वाणपदेन च शिखापदम् ।। १५५ चूणि:- परमनिस्तारकलिङ्गभागी भव । परमर्षिलिङ्गभागी भव । परमेन्द्र लिङ्गभागी भव । परमराज्यलिङ्गभागी भव । परमार्हन्त्यलिङ्गभागी भव, परमनिर्वाणलिङ्गभागी भव । ( इत्युपनीतिक्रियामन्त्रः ) या उपनीतिसंस्काराचे विशेषवर्णन ( ४०-१५३ मन्त्रेणानेन शिष्यस्य कृत्वा संस्कारमादितः । निर्विकारेण वस्त्रेण कुर्यादेनं सवाससम् ॥ १५६ कौपीनाच्छादनं चैनमन्तर्वासेन कारयेत् । मौञ्जीबन्धमतः कुर्यादनुबद्धत्रिमेखलम् ।। १५७ सूत्रं गणधरैर्दृब्धं व्रतचिह्नं नियोजयेत् । मन्त्रपूतमतो यज्ञोपवीती स्यादसौ द्विजः ॥ १५८ जात्यैव ब्राह्मणः पूर्वमिदानीं व्रतसंस्कृतः । द्विर्जातो द्विज इत्येवं रूढिमास्तिनुते गुणैः ॥ १५९ देयान्यणुव्रतान्यस्मै गुरुसाक्षि यथाविधि । गुणशीलानुगैश्चैनं संस्कुर्याद्व्रतजातकैः ॥ १६० द्विजोत्तम श्रेष्ठ जैनब्राह्मण उपनीतिक्रियेचे मंत्र याप्रमाणे सांगतात- १) परम निस्तारकलिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट गृहस्थाचार्यांच्या चिह्नांना धारण करणारा हो. २) परषिलिङ्गभागी भव- तूं उत्तम ऋषि - आचार्य परमेष्ठीचे पद चिह्न धारण करणारा हो. ३) परमेन्द्रलिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट इन्द्रपदाची चिह्न धारण करणारा हो. ४) परमराज्य - लिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट राज्याची चिह्न धारण करणारा हो. ५) परमार्हन्त्यलिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट अर्हत्पदाची चिह्ने धारण करणारा हो. ६) परमनिर्वाणलिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट मोक्षाच्या चिह्नाना धारण करणारा हो. याप्रमाणे उपनीतिक्रियेच्या मंत्राचा अर्थ आहे ।। १५३ - १५५ ।। वर सांगितलेल्या मंत्रानी प्रथमतः शिष्यावर संस्कार करावा व त्याला निर्विकार अशा वस्त्राने युक्त करावे ।। १५६ ।। या वस्त्राच्या आत लंगोटीचे आच्छादन असावे व त्या लंगोटीवर तीन पदरांचा मुंज गवताने बनविलेला कडदोरा बांधावा ।। १५७ ।। यानंतर गणधरानी वर्णिलेले व मंत्रानी पवित्र झालेले व व्रताचे चिह्न असलेले असे यज्ञोपवीत त्याच्या गळ्यात घालावे. अशा रीतीने तो ब्राह्मण होतो ।। १५८ ।। पूर्वी तो जातीनेच ब्राह्मण होता पण आता तो व्रतानी संस्कृत झाला. त्यामुळे तो गुणानी दोन वेळा उत्पन्न झाला म्हणून द्विज या नावाला तो धारण करतो ।। १५९ ।। अशा या उपनयनसंस्कारयुक्त या ब्राह्मणाला गुरुसाक्षीने अणुव्रते द्यावीत आणि व्रतसमूहानी - गुणव्रते व शीलव्रतानी याला उत्तम संस्कारयुक्त करावे अर्थात् त्याला पाच अणुव्रते, तीन गुणव्रते व चार शिक्षाव्रते देऊन सुसंस्कृत करावे ।। १६० ।। Page #464 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-१६९) महापुराण (४५३ ततोऽतिबालविद्यादीन्नियोगादस्य निदिशेत् । दत्त्वोपासकाध्ययनं नामापि चरणोचितम् ॥ १६१ ततोऽयं कृतसंस्कारः सिद्धार्चनपुरःसरम् । यथाविधानमाचार्यपूजां कुर्यादतः परम् ॥ १६२ तस्मिन्दिने प्रविष्टस्य भिक्षार्थ जातिवेश्मसु । योऽर्थलाभः स देयः स्यादुपाध्यायाय सादरम् ॥१६३ शेषो विधिस्तु प्राक्प्रोक्तस्तमनूनं समाचरेत् । यावत्सोऽधीतविद्यः सन्भजेत्स ब्रह्मचारिताम् ॥ अथातोऽस्य प्रवक्ष्यामि व्रतचर्यामनुक्रमात् । स्याद्यत्रोपासकाध्यायः समासेनानुसंहृतः ॥ १६५ शिरोलिङ्गमुरोलिङ्ग लिङ्ग कटयूरुसंश्रितम् । लिङ्गमस्योपनीतस्य प्राग्निर्णीतं चतुर्विधम् ॥ १६६ तत्तु स्यादसिवृत्त्या वा मष्या कृष्या वणिज्यया। यथास्वं वर्तमानानां सदृष्टीनां द्विजन्मनाम्॥१६७ कुतश्चित्कारणाद्यस्य कुलं सम्प्राप्तदूषणम् । सोऽपि राजादिसम्मत्या शोधयेत्स्वं यदा कुलम् ॥१६८ तदास्योपनयाहत्वं पुत्रपौत्रादिसन्ततौ । न निषिद्धं हि दीक्षार्हे कुले चेदस्य पूर्वजाः ॥ १६९ त्याला उपासकाध्ययन द्यावे म्हणजे श्रावकाचाराचे शिक्षण द्यावे व त्याला चारित्रानुसार नांव देखिल योग्य असे ठेवावे. अतिबालविद्यादिकाची माहिती करून द्यावी ।। १६१ ।। याप्रमाणे ज्याच्यावर सिद्धपूजनपूर्वक संस्कार केले आहेत अशा या उपनीतद्विजबालकाने विधिपूर्वक आचार्यपूजा करावी ।। १६२ ॥ त्यादिवशी भिक्षेसाठी त्या ब्राह्मणबटूने आपल्या जातीच्या घरी जावे व त्या भिक्षेच्या दिवशी जो अर्थलाभ होईल तो उपाध्यायाला आदराने द्यावा ॥ १६३ ॥ बाकीचा जो विधि पूर्वी सांगितला आहे तो सर्व पूर्णपणे आचरणात आणावा व जोपर्यन्त तो विद्याध्ययन करील तोपर्यन्त त्याने ब्रह्मचर्यव्रताचे पालन करावे ॥ १६४ ॥ यानन्तर याच्या वतचर्येचे मी अनुक्रमाने वर्णन करतो. या वर्णनात-व्रतचर्या वर्णनात संक्षेपाने उपासकाध्यायाचा संग्रह केला आहे ॥ १६५ ॥ ___ ज्याची उपनयक्रिया केली गेली आहे अशा याचे चार प्रकारचे लिंग पूर्वी वणिले आहे, ते असे शिरोलिङ्ग- शेंडी ठेवणे, उरोलिङ्ग- यज्ञोपवीत धारण करणे, कटिलिंग- कडदोरा मुंजाचा धारण करणे व ऊरूलिंग- शुभ्रवस्त्र धारण करणे ॥ १६६ ॥ जे शस्त्र धारण करून अजीविका करतात, जे लेखन कलेने उपजीविका करतात, जे शेतकीने उदरनिर्वाह करतात व जे वणिज्येने– व्यापार करून उदरनिर्वाह करतात, असे ते आपणास योग्य अशा वृत्तीने वागणारे सम्यग्दृष्टि लोक आहेत ॥ १६७ ॥ त्यांचे कुल काही कारणामुळे जर दूषित झाले तर त्याने राजा आदिकांची संमति मिळवून आपल्या कुलाची शुद्धि करून घ्यावी ।। १६८ ।। अर्थात् ज्याचे पूर्वज दीक्षा घेण्यास योग्य अशा कुलामध्ये जर जन्मलेले असतील तर याच्या पुत्र, नातू, पणतू आदि सन्ततीच्या परम्परेत उपनयाला योग्यता आहे तिचा निषेध नाही असे समजावे ॥ १६९ ॥ Page #465 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५४) महापुराण (४०-१७० अदीक्षार्हे कुले जाता विद्याशिल्पोपजीविनः । एतेषामुपनीत्यादिसंस्कारो नाभिसंमतः ॥ १७० तेषां स्यादुचितं लिङ्ग स्वयोग्यवतधारिणाम् । एकशाटकधारित्वं संन्यासमरणावधि ॥ १७१ स्यान्निरामिषभोजित्वं कुलस्त्रीसेवनव्रतम् । अनारम्भवधोत्सर्गो ह्यभक्ष्यापेयवर्जनम् ॥ १७२ इति शुद्धितरां वृत्ति व्रतपूतामुपेयिवान् । यो द्विजस्तस्य सम्पूर्णो व्रतचर्याविधिः स्मृतः ॥ १७३ दशाधिकारास्तस्योक्ताः सूत्रेणोपासिकेन हि । तान्यथाक्रममुद्देशमात्रेणानुप्रचक्ष्महे ॥ १७४ तत्रातिबालविद्याद्याः कुलावधिरनन्तरम् । वर्णोतमत्वपात्रत्वे तथा सृष्टयधिकारिता ॥ १७५ व्यवहारेशितान्या स्यादवध्यत्वमदण्डयता । मानार्हता प्रजासम्बन्धान्तरं चेत्यनक्रमात् ॥ १७६ दशाधिकारि वास्तूनि स्युरुपासकसङग्रहे । तानीमानि यथोद्देशं सङक्षेपेण विवृण्महे ॥ १७७ बाल्यात्प्रभृति या विद्या शिक्षोद्योगाद्विजन्मनः । प्रोक्तातिबालविद्येति सा क्रिया द्विजसम्मता ॥ दीक्षा घेण्यास अधिकार नसलेल्या कुलात ज्यांचा जन्म झालेला आहे व जे गाणे, नृत्य करणे अशा विद्या व शिल्प यावर ज्यांची उपजीविका चालते अशाना उपनयनादिक संस्कार करणे हे शास्त्रसंमत नाही ।। १७० ॥ स्वतःला योग्य असे व्रत त्यानी धारण करावे व अशांचे योग्य लिंग असे आहे- म्हणजे त्यांनी संन्यासमरणापर्यन्त एक छाटी धारण करावी ॥ १७१ ।। यज्ञोपवीत धारण करणारे अशा द्विजाने अमुक पदार्थ मला आज जेवावयास मिळावा अशी इच्छा धारण न करता जो शुद्ध पदार्थ मिळेल तो त्याने खावा अर्थात् त्याने आपल्या इच्छेला आळा घालावा. त्याने आपल्या विवाहित स्त्रीमध्येच सन्तुष्ट राहावे. त्याने शेतकी व उद्योग-व्यापार याशिवाय होणाऱ्या हिंसेचा त्याग करावा. अभक्ष्य म्हणजे मांसादिक व अपेय म्हणजे दारू मध वगैरेंचा त्याग करावा. हे मद्यादिक अपेय आहेत त्यांचा आजीवन त्याग करावा ॥ १७२ ।। याप्रमाणे व्रताने पवित्र झालेली अधिक शुद्ध अशी वृत्ति-उपजीविका जो धारण करतो अशा त्या द्विजाचा तो संपूर्ण व्रतचर्याविधि येथे समजावा ।। १७३ ॥ त्या द्विजासाठी येथे दहा अधिकारांचे वर्णन उपासकाचाराच्या सूत्राने सांगितले आहे त्याचे येथे क्रमाने नांवे आम्ही सांगत आहोत ।। १७४ ।। ___ अतिबालविद्या हा पहिला अधिकार, यानंतर २) कुलावधि, ३) वर्णोत्तमत्व, ४) पात्रत्व, ५) सृष्टयधिकार, ६) व्यवहारेशिता, ७) अवध्यत्व, ८) अदण्डयत्व, ९) मानार्हता, १०) प्रजासम्बन्धान्तर असे अनुक्रमाने दहा अधिकार आहेत. अर्थात् त्या दहा अधिकाराचे येथे आम्ही वर्णन करतो ॥ १७५-१७७ ।। ब्राह्मणाला बालपणापासूनच विद्या शिकविण्याचा जो उद्योग -प्रयत्न केला जातो त्याला बालविद्या हे नाव आहे. ही विद्या ब्राह्मणाना अत्यन्त इष्ट आहे ।। १७८ ।। Page #466 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-१८६) महापुराण (४५५ तस्यामसत्यां मूढात्मा हेयादेयानभिज्ञकः । मिथ्याश्रुतं प्रपद्येत द्विजन्मान्यैः प्रतारितः ॥ १७९ बाल्य एव ततोऽभ्यस्येद् द्विजन्मौपासिकों श्रुतिम् । स तया प्राप्तसंस्कारः स्वपरोत्तारको भवेत् ॥ कुलावधिः कुलाचाररक्षणं स्याद्विजन्मनः । तस्मिन्नसत्यसो नष्ट क्रियोऽन्यकुलतां व्रजेत् ॥ १८१ वर्णोत्तमत्त्वं वर्णेषु सर्वेष्वाधिक्यमस्य वै। तेनायं श्लाघ्यतामेति स्वपरोद्धारणक्षमः ॥ १८२ वर्णोत्तमत्वं यद्यस्य न स्यान्न स्यात्प्रकृष्टता । अप्रकृष्टश्च नात्मानं शोधयन्न परानपि ॥ १८३ ततोऽयं शुद्धिकामः सन्सेवेतान्यं कुलिङगिनम् । कुब्रह्म वा ततस्तज्जान्दोषान्प्राप्नोत्यसंशयम् ॥१८४ प्रदानाहत्वमस्येष्टं पात्रत्वं गुणगौरवात् । गुणाधिको हि लोकेऽस्मिन्पूज्यः स्याल्लोकपूजितः ॥ १८५ ततो गुणकृतां स्वस्मिन्पात्रतां दृढ़येद्विजः । तदभावे विमान्यत्वाहियर्तेऽस्य धनं नृपैः ॥ १८६ तो बालविद्या युक्त जर नसेल अर्थात् बालपणी जर ब्राह्मणाने अध्ययन केले नाही तर तो ब्राह्मण मूढ राहील. त्याला त्याज्य व ग्राह्य याचे ज्ञान होणार नाही व अन्यधर्मीयानी फसविल्याने तो मिथ्याज्ञानाचा स्वीकार करून कुमार्गी बनेल ।। १७९ ॥ ___म्हणून बालपणीच ब्राह्मणाने उपासकचाराचे-श्रावकाचाराचे अध्ययन करावे व त्याच्या अध्ययनाने सुसंस्कृत झालेला तो स्वतःचा व इतरांचा उद्धार करण्यास समर्थ होईल ॥ १८० ॥ अशा सुशिक्षित ब्राह्मणापासून आपल्या कुलाच्या आचारांचे रक्षण होते व त्याला कुलावधि म्हणतात व त्या कुलाचाराचे जर रक्षण झाले नाही तर ते सर्व कुलाचार नष्ट होऊन तो ब्राह्मण अन्य कुलाला प्राप्त होईल ।। १८१ ।। सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ होणे हीच याची वर्णोत्तमक्रिया आहे. या वर्णोत्तमपणाने हा प्रशंसनीय होतो आणि स्वतःचा व इतरांचा उद्धार करण्यास समर्थ होतो ॥ १८२ ॥ ___ जर याच्या ठिकाणी वर्णोत्तमपणा राहिला नाही तर याला श्रेष्ठता प्राप्त होणार नाही व हीनावस्थेला प्राप्त झालेला हा आपणास शुद्ध करू शकत नाही व इतराना शुद्ध करू शकणार नाही ।। १८३ ।। __ व स्वतःला शुद्धता प्राप्त व्हावी म्हणून हा अन्यकुलिंगीची किंवा इतर कुदृष्टि ब्राह्मणाची सेवा करील व त्यामुळे त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या दोषाना हा निःसंशय प्राप्त होईल ।। १८४ ॥ __ हा ब्राह्मण गुणानी श्रेष्ठ झाल्यामुळे याच्या ठिकाणी दान घेण्याची योग्यता व पात्रत्वाला हा प्राप्त होतो व जगात जो गुणानी अधिक आहे तोच लोकपूजित अशा लोकाकडून पूज्य होतो ॥ १८५ ॥ म्हणून ब्राह्मणाने आपल्या ठिकाणी गुणामुळे प्राप्त झालेल्या पात्रतेला दृढ करावे व त्या पात्रतेच्या अभावी तो ब्राह्मण जनमान्य होणार नाही व मान्यतेच्या अभावी याचे धन राजे लोकाकडून हरण केले जाईल ।। १८६ ।। Page #467 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५६) महापुराण (४०-१८७ रक्ष्यः सृष्टयधिकारोऽपि द्विजैरुत्तमसृष्टिभिः । असदृष्टिकृतां सृष्टि परिहत्य विदूरतः ॥ १८७ अन्यथासृष्टिवादेन दुर्दष्टेन कुदृष्टयः । लोकं नृपांश्च सम्मोह्य नयन्त्युत्पथगामिताम् ॥ १८८ सृष्टयन्तरमतो दूरमपास्य नयतत्त्ववित् । अनादिक्षत्रियः सृष्टां धर्मसृष्टि प्रभावयेत् ॥ १८९ तीर्थकृद्भिरियं सृष्टा धर्मसृष्टिः सनातनी । तां संश्रितान्नृपानेव सृष्टिहेतून्प्रकाशयेत् ॥ १९० अन्यथान्यकृतां सृष्टि प्रपन्नाः स्युनूपोत्तमाः । ततो नैश्वर्यमेषां स्यात्तत्रस्थाश्च स्युराहताः ॥ १९१ व्यवहारेशितां प्राहुः प्रायश्चित्तादिकर्मणि । स्वतन्त्रता द्विजस्यास्य श्रितस्य परमां श्रुतिम् ॥ १९२ तदभावे स्वमन्यांश्च न शोधयितुमर्हति । अशुद्धः परतः शुद्धिमभीप्सन्न्यक्कृतो भवेत् ॥ १९३ स्यादवध्याधिकारेऽपि स्थिरात्मा द्विजसत्तमः । ब्राह्मणो हि गुणोत्कर्षान्नान्यतो वधमर्हति ॥ १९४ सर्वः प्राणी न हन्तव्यो ब्राह्मणस्तु विशेषतः । गुणोत्कर्षापकर्षाभ्यां वधेऽपि द्वयात्मता मता ॥१९५ ज्यांची सृष्टि-उत्पत्ति उत्तम आहे अशा जैन द्विजानी मिथ्यादृष्टिलोकांच्याद्वारे केलेल्या सृष्टीला दूरूनच त्यागणे योग्य आहे ॥ १८७ ।। जर असे त्यानी केले नाही तर मिथ्यादृष्टि लोक आपल्या दूषित सृष्टिवादाने लोकाना आणि राजाना मोहित करून कुमार्गगामी बनवितील ॥ १८८ ॥ नय व तत्त्वांचे स्वरूप जाणणाऱ्या ब्राह्मणाने मिथ्यादृष्टीच्या अन्य सृष्टीचा दुरूनच त्याग करावा आणि अनादि क्षत्रियांनी उत्पन्न केलेल्या धर्म सृष्टीचीच प्रभावना करावी ॥१८९।। ही तीर्थकरानी रचलेली धर्मसृष्टि सनातन आहे- अनादिकालाची आहे. अशा या धर्म सृष्टीचा आश्रय घेणाऱ्या राजाना या धर्मसृष्टीच्या कारणांचे वर्णन स्पष्ट करून सांगावे ।। १९० ॥ जर ब्राह्मणानी या धर्मसृष्टीचे वर्णन व तिची कारणे स्पष्ट सांगितली नाहीत तर ते राजे अन्य लोकानी केलेल्या धर्मसृष्टीला मानतील व त्यामुळे त्यांचे ऐश्वर्य-प्रभुत्व नाहीसे होईल. ते राजे ब्राह्मणांच्या अधीन होतील व जिनमतानुयायी लोक देखील त्या धर्मसृष्टीला मानतील. त्या धर्माचे अनुयायी होतील ॥ १९१ ॥ परमागमाचा आश्रय करणाऱ्या या ब्राह्मणाचा प्रायश्चित्तादि कार्यामध्ये जो स्वतन्त्रपणा आहे त्यालाच व्यवहारेशिता म्हणतात. असे पूर्वाचार्य म्हणतात ॥ १९२ ॥ व्यवहारेशिता त्याच्या ठिकाणी नसेल तर तो स्वतःला व इतरानाही शुद्ध करण्यास समर्थ होणार नाही व अशुद्ध असा तो ब्राह्मण इतराकडून आपणाला शुद्ध करून घेण्यास इच्छील तर ते त्याचा तिरस्कार करतील ॥ १९३ ॥ ज्याचे मन स्थिर आहे असा हा श्रेष्ठ ब्राह्मण अवघ्याधिकारातही योग्य आहे. कारण याच्या ठिकाणी गुणांचा उत्कर्ष झाला असल्यामुळे तो इतराकडून वध करण्यास योग्य होत नाही ॥ १९४ ॥ ___ सर्व प्राणि मारू नयेत व ब्राह्मण तर विशेष करून अवध्य आहे. गुणांचा उत्कर्ष व गुणांचा अपकर्ष यामुळे वधामध्ये देखील दोन प्रकार उत्पन्न झाले आहेत ॥ १९५ ॥ Page #468 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-२०४) महापुराण करतो तस्मादवध्यतामेव पोषयेद्वामिके जने । धर्मस्य तद्धि माहात्म्यं तत्स्थो यन्नाभिभूयते ॥ १९६ तदभावे च वध्यत्वमयमच्छति सर्वतः । एवं च सति धर्मस्य नश्यत्प्रामाण्यमहताम् ॥ १९७ ततः सर्वप्रयत्नेन रक्ष्यो धर्मः सनातनः। स हि संरक्षितो रक्षां करोति सचराचरे ॥ १९८ स्याददण्डयत्वमप्येवमस्य धर्मे स्थिरात्मनः । धर्मस्थो हि जनोऽज्यस्य दण्डप्रस्थापने प्रभः ॥ १९९ तधर्मस्थीयमाम्नायं भावयन्धर्मदर्शिभिः । अधर्मस्थेषु दण्डस्य प्रणेता धार्मिको नपः ॥ २०० परिहार्य यथा देवगुरुद्रव्यं हितार्थिभिः । ब्रह्मस्वं च तथाभूतं न दण्डाहस्ततो द्विजः ॥ २०१।। युक्त्यानया गुणाधिक्यमात्मन्यारोपयन्वशी । अदण्डयपक्षे स्वात्मानं स्थापयेद्दण्डधारिणाम् ॥ २०२ अधिकारे ह्यसत्यस्मिन्स्याद्दण्डयोऽयं यथेतरः । ततश्च निस्स्वतां प्राप्तो नेहामुत्र च नन्दति ॥२०३ मान्यत्वमस्य सन्धत्ते मानाहत्वं सुभावितम् । गुणाधिको हि मान्यः स्याद्वन्धः पूज्यश्च सत्तमैः ॥२०४ म्हणून धार्मिक जनामध्ये त्याने आपल्या अवध्यतेचे पोषण केले पाहिजे व धर्माचे तर असे माहात्म्य आहे की धर्मतत्पर मनुष्य कोणाकडूनही तिरस्कृत होत नाही ॥ १९६ ॥ ___ अवध्याधिकाराच्या अभावी हा ब्राह्मणसमूह सर्वाकडून वध्य होईल आणि असे झाले असता जिनेन्द्रानी सांगितलेल्या धर्माची प्रमाणता-खरेपणा नष्ट होईल ॥ १९७ ॥ म्हणून सर्व प्रकारच्या प्रयत्नानी हा प्राचीन कालापासून चालत असलेला सत्य धर्म रक्षिला पाहिजे व त्याचे रक्षण केले गेले असता तो सवाचे रक्ष । १९८॥ याचप्रमाणे धर्मात जो अन्तःकरणाने स्थिर राहिला आहे अशा या ब्राह्मणाचे अदण्डयत्व देखिल - अदण्ड्य अधिकारही स्थिर राहील. कारण धर्मात स्थिर राहणारा जो आहे तोच अन्याला दण्ड करण्यास समर्थ होतो ।। १९९ ॥ । जो राजा धार्मिक आहे तो धर्मज्ञान ज्याना आहे त्यांच्याशी धर्मविषयक आगमाचा विचार करतो व अधर्मात प्रवृत्त झालेल्या लोकाना दण्डित करतो व अशा राजाला धार्मिक राजा म्हणतात ॥ २०० ॥ __आपले कल्याण व्हावे असे इच्छिणाऱ्यानी जसे देवद्रव्य व गुरुद्रव्य घेऊ नये तसेच ब्राह्मणाचेही द्रव्य घेऊ नये म्हणून ब्राह्मण दण्डाह-दण्डित करण्यास योग्य नाही ।। २०१॥ अशा युक्तीने जितेन्द्रिय ब्राह्मणाने आपल्या ठिकाणी गुणांचा अधिकपणा स्थापन करावा व दंड करण्याचे सामर्थ्य धारण करणाऱ्या राजांच्या अदण्ड्य पक्षात आपल्याला सिद्ध करावे ॥ २०२॥ __हा अदण्डयाधिकार नसेल तर इतर लोकाप्रमाणे हा ब्राह्मणही दण्डित करण्यास योग्य होईल व त्यामुळे हा निःस्व-दरिद्री होईल व इहपरलोकी सुखी होणार नाही ।। २०३।। __ या ब्राह्मणाने प्राप्त करून घेतलेला जो मान आहे तो याला मान्यपणा आणून देतो व जो गुणानी युक्त आहे तो ब्राह्मण मान्य व वन्द्य होतो व तोच सज्जनानी पूजा करण्यास योग्य होतो ।। २०४॥ म. ५८ Page #469 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५८) महापुराण (४०-२०५ असत्यस्मिन्न मान्यत्वमस्य स्यात्सम्मतर्जनैः । ततश्च स्थानमानादिलाभाभावात्पदच्युतिः ।। २०५ तस्मादयं गुणो यत्नादात्मन्यारोप्यतां द्विजैः । यत्नश्च ज्ञानवृत्तादिसम्पत्तिः सोज्झ्यतां न तैः॥२०६ स्यात्प्रजान्तरसम्बन्धे स्वोन्नतेरपरिच्युतिः । यास्य सोक्ता प्रजासम्बन्धान्तरं नामतो गुणः ॥२०७ यथा कालायसो योगे स्वर्ण याति विवर्णताम् । न तथास्यान्यसम्बन्धे स्वगुणोत्कर्षविप्लवः ॥ २०८ किन्तु प्रजान्तरं स्वेन सम्बद्धं स्वगुणानयम् । प्रापयत्यचिरादेव लोहधातुं यथा रसः ॥ २०९ ततो महानयं धर्मप्रभावोद्योतको गुणः । येनायं स्वगुणरन्यानात्मसात्कर्तुमर्हति ॥ २१० असत्यस्मिन्गुणेऽन्यस्मात्प्राप्नुयात्स्वगुणच्युतिम् । सत्येवं गुणवत्तास्य निष्कृष्येत द्विजन्मनः ॥ २११ अतोऽतिबालविद्यादीन्नियोगान्दशधोदितान् । यथार्हमात्मसात्कुर्वन्द्विजः स्याल्लोकसम्मतः ॥२१२ जर या ब्राह्मणात हा मानार्हत्व गुण नसेल तर मान्य लोकानी हा आदरिला जाणार नाही व त्यामुळे त्याच्या योग्यपदाचा आणि आदरसत्कारादिकांचा लाभ न झाल्यामुळे त्याची आपल्या उच्च स्थानापासून च्युति होईल ॥ २०५ ।।। म्हणून ब्राह्मणानी हा मानाहत्त्व गुण स्वतःच्या ठिकाणी यत्नपूर्वक स्थापन करावा. अर्थात् त्यानी आपले सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र वगैरे गुणसंपदा खूप वाढवावी. या सम्यग्ज्ञानादि गुणसम्पत्तीला यत्न असे नांव आहे म्हणून तो यत्न त्यानी केव्हाही सोडू नये ।। २०६ ।। अन्य धर्माच्या लोकाशी जरी सम्बन्ध आला म्हणजे त्यांच्याशी एकत्र बसणे, विचार करणे वगैरे सम्बन्ध जरी असला तरीही आपल्या ज्ञानादिगुणांच्या उन्नतीपासून तो च्युत होत नाही असा याच्या ठिकाणी प्रजान्तरसंबन्ध हा गुण सांगितला आहे ॥ २०७॥ जसे काळ्या लोखंडाच्या संयोगाने सोने काळसर होते तसे अन्यधर्मीय लोकाशी संबन्ध आल्याने त्याच्या ज्ञानादि गुणांच्या उत्कर्षाचा नाश होत नाही ॥ २०८ ।। पण जसा पारा लोखंडाला लौकरच आपल्या गुणानी युक्त करतो तसे हा ब्राह्मण इतर धर्मीय लोकाना आपल्याशी संबद्ध करून त्यांच्यात आपल्या गुणांची परिणति शीघ्र करतो ।। २०९ ।। यास्तव याच्या ठिकाणी धर्मप्रभाव दाखविणारा हा मोठा गुण आहे व या गुणामुळे हा आपल्या गुणानी इतरधर्मीय लोकाना आपल्यासारखे करतो, आपल्या ताब्यात ठेवण्यास समर्थ होतो ।। २१० ॥ हा गुण जर याच्यात नसेल तर इतरांच्या प्रभावामुळे याच्या सम्यग्ज्ञानादि गुणांचा नाश होईल. असे झाले तर या ब्राह्मणाचीही गुणयुक्तता कमी होईल ।। २११ ।। म्हणून जे अतिबालविद्यादिक दहा गुणाधिकार सांगितले आहेत ते यथायोग्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करून त्या गुणानी युक्त झाला म्हणजे हा द्विज सर्व लोकाकडून मान्यआदरणीय होईल ।। २१२ ॥ Page #470 -------------------------------------------------------------------------- ________________ ४०-२२१) महापुराण (४५९ गुणेष्वेव विशेषोऽन्यो यो वाच्यो बहुविस्तरः । स उपासकसिद्धान्तादधिगम्यः प्रपञ्चतः ॥ २१३ क्रियामन्त्रानुषङ्गेण व्रतचर्याक्रियाविधौ । दशाधिकारा व्याख्याताः सद्वृत्तरादृता द्विजैः ॥ २१४ क्रियामन्त्रास्त्विह ज्ञेया ये पूर्वमनर्वाणताः । सामान्यविषयाः सप्तपीठिकामन्त्ररूढयः ॥ २१५ ते हि साधारणाः सर्वक्रियासु विनियोगिनः । तत उत्सगिकानेतान्मन्त्रान्मन्त्रविदो विदुः ॥ २१६ विशेषविषया मन्त्राः क्रियासूक्तासु दर्शिताः । इतः प्रभुति चाभ्यूह्यास्ते यथाम्नायमग्रजः ॥ २१७ मन्त्रानिमान्यथायोग्यं यः क्रियासु नियोजयेत् । स लोके सम्मति याति युक्ताचारो द्विजोत्तमः॥२१८ क्रिया मन्त्रविहीनास्तु प्रयोक्तणां न सिद्धये । यथा सुकृतसन्नाहाः सेनाध्यक्षा विनायकाः ॥ २१९ ततो विधिममुं सम्यगवगम्य कृतागमैः । विधानेन प्रयोक्तव्याः क्रिया मन्त्रपुरस्कृताः ॥ २२० इत्थं स धर्मविजयी भरताषिराजो। धर्मक्रियासु कृतधीनूपलोकसाक्षि ॥ तान्सुव्रतान्द्रिजवरान्विनियम्य सम्यक् । धर्मप्रियः समसृजत् द्विजलोकसर्गम् ॥ २२१ या अतिबालविद्यादिगुणामध्ये अन्य जो विशेष आहे त्याचे फार विस्ताराने वर्णन करावे लागेल. यास्तव तो विस्तार अधिक स्पष्टरीतीने उपासकाध्ययनसिद्धान्तातून जाणन घ्यावा ।। २१३ ॥ याप्रमाणे क्रियामन्त्राच्या वर्णनाच्या निमित्ताने व्रतचर्या या प्रकरणात त्या दहा अधिकाराचे व्याख्यान केले आहे व सदाचारी ब्राह्मणानी त्याचा आदर केला आहे ॥ २१४ ॥ या क्रियामंत्रांचे पूर्वी वर्णन केले आहे व ते ते मंत्र त्या त्या क्रियेच्या स्वरूप वर्णनात चणिरूपाने दिले आहेत व त्यामध्ये सामान्य विषयांच्या मंत्रात पीठिका मंत्र म्हणतात व ते सामान्यमंत्र सर्व क्रियामध्ये उपयोगी पडतात. म्हणून मंत्रज्ञविद्वान् या मंत्राना औत्सर्गिक मन्त्र म्हणतात ।। २१५-२१६ ॥ विशेष विषय ज्यांचा आहे असे जे मंत्र आहेत ते ते त्या त्या उपनयादिविशेष क्रियामध्ये सांगितले आहेत व ब्राह्मणानी आगमाला अनुसरून त्या मंत्रांचा त्या त्या क्रियामध्ये उपयोग करावा ।। २१७ ॥ जो या मंत्राची यथायोग्य क्रियामध्ये योजना करतो तो ज्याचा आचार योग्य आहे असा व ब्राह्मणात श्रेष्ठ असलेला तो ब्राह्मण लोकात सम्मान पावतो ।। २१८ ।। जसे युद्धासाठी शस्त्रादिक घेऊन तयार असलेले योद्धे विनायक-सेनापतीने रहित असतील तर जयसिद्धीला कारण होत नाहीत. तसे मंत्ररहित अशा क्रिया त्या त्या उपनयादि क्रियांच्या सिद्धीला कारण होत नाहीत ॥ २१९ ॥ यासाठी ज्यानी शास्त्राभ्यास केला आहे अशा ब्राह्मणानी हा विधि चांगला जाणून मंत्रोच्चारपूर्वक विधियुक्त क्रिया कराव्यात ।। २२० ॥ याप्रमाणे ज्याला धर्माच्या साहाय्याने विजय प्राप्त झाला आहे व जो धर्मक्रियामध्ये निपुण आहे अशा धर्मप्रिय त्या भरतचक्रीने जे आपली व्रते उत्तम पाळतात अशा त्या ब्राह्मणाना सर्व राजांच्या समक्ष उत्तम शिक्षण देऊन ब्राह्मणसृष्टीला उत्पन्न केले ॥ २२१ ॥ Page #471 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६०) महापुराण (४०-२२२ इति भरतनरेन्द्रात्प्राप्तसत्कारयोगा। व्रतपरिचयचारूदारवृत्ताः श्रुतार्थाः ॥ जिनवृषभमतानुव्रज्यया पूज्यमानाः । जगति बहुमतास्ते ब्राह्मणाः ख्यातिमीयुः ॥ २२२ वृतस्थानथ तान्विधाय स भवानिक्ष्वाकु चूडामणिः । जैने वर्त्मनि सुस्थितान्द्विजवरान्सम्मानयन्प्रत्यहम् ॥ स्वं मेने कृतिनं मुदा परिगतः स्वां सृष्टिमुच्चैः कृताम् । पश्यन्कः सुकृती कृतार्थपदवी नात्मानमारोपयेत् ॥ २२३ ॥ इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसखग्रहे द्विजोत्पत्तो क्रियामन्त्रानुवर्णनं नाम चत्वारिंशत्तमं पर्व ॥ ४० ॥ याप्रमाणे भरतचक्रवर्तीकडून ज्याना चांगला सत्कार मिळाला आहे, व्रतांच्या अभ्यासामुळे ज्यांचे चारित्र सुंदर-दोषरहित व महत्वाला प्राप्त झाले आहे, ज्यानी आगमाचा अर्थ जाणला आहे व जिनेश्वर वृषभांच्या मताला अनुसरून जे पूजिले जात आहेत असे बहुजनाना मान्य झालेले ते ब्राह्मण जगात प्रख्यात झाले ॥ २२२ ।। यानन्तर इक्ष्वाकुकुलाचा चूडामणि महाराज भरताने त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना गृहस्थाचारात तत्पर केले व जैनमार्गात स्थिर केले आणि दररोज त्यांचा त्याने आदर केला व आनंदित होऊन स्वतःला त्याने कृतकृत्य मानले. बरोबरच आहे की, स्वतःच उत्पन्न केलेल्या आपल्या उत्कृष्ट सृष्टीला पाहणारा कोण पुण्यवान् पुरुष आपणाला कृतार्थ मानीत नाही बरे ? अर्थात् आपल्याकडून झालेल्या उत्कृष्ट कार्यामुळे प्रत्येक व्यक्तीला फार आनंद वाटतो व आपणास ती व्यक्ति कृतकृत्य मानून आनंदित होत असते ॥ २२३ ।। ____ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यविरचित आर्षत्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादामध्ये ब्राह्मणांच्या उत्पत्तिप्रकरणात क्रियामंत्रांचे वर्णन करणारे हे चाळीसावे पर्व समाप्त झाले. Page #472 -------------------------------------------------------------------------- ________________ एकचत्वारिशतमं पर्व । अथ चक्रधरः काले व्यतिक्रान्ते कियत्यपि । स्वप्नान्न्यशामयत्कांश्चिदेकदातदर्शनान् ॥१ तत्स्वप्नदर्शनात् किञ्चिदुरस्त इव चेतसा। प्रबुद्धः सहसा तेषां फलानीति व्यतर्कयत् ॥२ असत्फला इमे स्वप्नाः प्रायेण प्रतिभान्ति माम् । मन्ये दूरफलांश्चैतान्पुराकल्पे फलप्रदान् ॥ ३ कुतश्चिद्भगवत्यद्य प्रतपत्यादिभर्तरि । प्रजानां कथमेवैवंविधोपप्लवसम्भवः ।।४।। ततः कृतयुगस्यास्य व्यतिक्रान्तो कदाचन । फलमेते प्रदास्यन्ति नूनमेनःप्रकर्षतः ॥ ५ युगान्तविप्लवोदस्ति एतेऽनिष्टशंसिनः । स्वप्नाः प्रजाप्रजापालसाधारणफलोदयाः ॥ ६ यद्वच्चन्द्रार्कबिम्बोत्थविक्रियाजनितं फलम् । जगत्साधारणं तद्वत्सदसच्चास्मदीक्षितम् ॥ ७ इतीदमनुमानं नः स्थूलार्थानुप्रचिन्तनम् । सूक्ष्मतत्त्वप्रतीतिस्तु प्रत्यक्षज्ञानगोचरा ॥८ केवलार्कावृते नान्यः संशयध्वान्तभेदकृत् । को हि नाम तमो नैशं हन्यादन्यत्र भास्करात् ॥ ९ यानंतर काही काल निघून गेल्यावर एके वेळी भरतचक्रवर्तीने आश्चर्यकारक पदार्थ ज्यात दिसले अशी काही स्वप्ने पाहिली ॥ १॥ ती स्वप्ने पाहिल्याने त्याचे अन्तःकरण कांहीसे उद्विग्न झाले, खिन्न झाले व तो एकदम जागा झाला व त्यांच्या फलांचा याप्रमाणे विचार करू लागला ॥ २॥ मला वाटते बहुतांशी या स्वप्नांची फले वाईट आहेत, याची फले फार मोठा काल व्यतीत झाल्यावर पुढे मिळणारी आहेत ।। ३ ।। याचप्रमाणे भगवान् आदिप्रभु या भूतलावर अद्यापि तप करीत विहार करीत असता प्रजाजनाना अशा त-हेचे संकट कसे बरे पीडा देऊ शकेल ? ॥ ४ ॥ म्हणून सध्याचे हे पुण्ययुग व्यतीत झाल्यावर कदाचित् अतिशय पातकाच्या उदयाने ही स्वप्ने आपले फळ प्रजाना देतील ।। ५ ।। ही स्वप्ने अनिष्ट फले सुचविणारी असल्यामुळे या कृतयुगाच्या समाप्तीनन्तर प्रजा व प्रजापाल अशा राजाना अर्थात् दोघानाही अनिष्ट फले देणारी आहेत असे वाटते ॥ ६॥ ज्याप्रमाणे चन्द्र व सूर्याच्या बिबामध्ये कांहीं बिघाड झाल्याने त्याचे चांगले व वाईट फल सगळ्या जगाला साधारण मिळते तसे आम्ही पाहिलेल्या स्वप्नांचे फल सर्वाना सारखे मिळेल असे वाटते ॥ ७ ॥ हे आमचे अनुमान स्थूल अर्थाचे चिन्तन करणारे आहे. पण या स्वप्नांच्या सूक्ष्म तत्त्वाचा अनुभव प्रत्यक्षज्ञानाचा विषय आहे ॥ ८ ॥ केवलज्ञानरूपी सूर्याशिवाय इतर ज्ञान या संशयरूपी अंधाराचा नाश करण्याला समर्थ नाही. जगामध्ये सूर्याशिवाय कोण बरे रात्रीचा अंधार नाहीसा करण्यास समर्थ आहे ? ॥ ९ ॥ Page #473 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६२) महापुराण ( ४१-१० तत्त्वावर्शे स्थिते देवे को नामास्मन्मतिभ्रमः । सत्यादर्शे करामर्शात्कः पश्येन्मुख सौष्ठवम् ॥ १० तदत्र भगवद्वक्त्रमडलादर्शदर्शनात् । युक्ता नस्तत्त्वनिर्णीतिः स्वप्नानां शान्तिकर्म च ॥ ११ अपि चास्मदुपज्ञं यद्विजलोकस्य सर्जनम् । गत्वा तदपि विज्ञाप्यं भगवत्पाद सन्निधौ ॥ १२ द्रष्टव्या गुरवो नित्यं प्रष्टव्याश्च हिताहितम् । महेज्यया च यष्टव्याः शिष्टानामिष्टमीदृशम् ॥१३ इत्यात्मगतमालोच्य शय्योत्सङ्गात्पराद्धर्चतः । प्रातस्तरां समुत्थाय कृतप्राभातिक क्रियः ॥ १४ ततः क्षणमिव स्थित्वा महास्थाने नृपैर्वृतः । वन्दनाभक्तये गन्तुमुद्यतोऽभूद्विशाम्पतिः ॥ १५ वृतः परिमितैरेव मौलिबद्धेरनूत्थितैः । प्रतस्थे वन्दनाहेतोविभूत्या परयाऽन्वितः ॥ १६ ततः क्षेपीय एवासौ गत्वा सैन्यैः परिष्कृतः । सम्राट् प्रापत्तमुद्देशं यत्रास्तेस्म जगद्गुरुः ॥ १७ दूरादेव जिनास्थानभूमिं पश्यन्निषीश्वरः । प्रणनाम चलन्मौलिघटिताञ्जलिकुड्मलः ॥ १८ प्रभु आदिभगवंत तत्त्वाचे स्वरूप दाखविण्यास दर्पणाप्रमाणे या भूतलावर विद्यमान आहेत. अशा वेळी आमच्या बुद्धीला हा भ्रम का बरे उत्पन्न व्हावा ? खरा आरसा आपल्यापुढे असता कोणता मनुष्य आपल्या हाताच्या स्पर्शाने आपल्या मुखाचा सुन्दरपणा पाहील बरे ? ॥ १० ॥ म्हणून येथे भगवंताचा मुखरूपी मंगलदायक दर्पण विद्यमान आहे. त्याचे दर्शन आपण घेतले असता स्वप्नांच्या खऱ्या स्वरूपाचा निर्णय होईल व स्वप्नाचे शान्तिकर्मही करता येईल ॥। ११ ॥ याचप्रमाणे आम्ही जी प्रथमतःच ब्राह्मणलोकांची उत्पत्ति केली आहे तिचे देखिल वर्णन भगवंताच्या चरणाजवळ आम्हाला करता येईल ।। १२ । नेहमी गुरुजनाना पाहावे व त्यांना आपले हिताहित विचारावे व त्यांचा मोठा उत्सव करून पूजा करावी हे सज्जनांचे आवडते प्रिय कार्य आहे ॥ १३ ॥ याप्रमाणे भरतचक्रवर्तीने आपल्याशी विचार केला व नन्तर अमूल्य अशा शयनाचा त्याग केला व अगदी सकाळी तो उठला आणि सकाळची स्नानादिक कार्ये त्याने केली ॥ १४ ॥ यानंतर महासभागृहात काही वेळपर्यंन्त भरतचक्री राजानी घेरलेला असा बसला व नंतर वन्दना भक्तीसाठी जाण्यास उद्युक्त झाला ।। १५ ।। आपल्याबरोबरच आसनावरून उठलेल्या काही थोड्या मुकुटबद्ध राजानी घेरलेला तो भरतचक्रेश्वर मोठ्या वैभवानं सहित होऊन आदिभगवंताना वंदन करण्यासाठी निघाला ॥ १६ ॥ यानन्तर लौकरच सेनासहित असा तो सम्राट् भरत अयोध्येहून निघून ज्या ठिकाणी जगद्गुरु आदिनाथ विराजमान होते तेथे जाऊन पोहोचला ।। १७ ।। निधीश्वर भरताने दुरूनच प्रभूचे समवसरण - सभास्थान पाहिले व नम्र अशा मस्तकावर त्याने आपली दोन हाताची ओंजळ कळीच्या आकाराची करून ठेवली आणि त्याने नमस्कार केला ॥ १८ ॥ Page #474 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-२८) महापुराण स तां प्रदक्षिणीकृत्य बहिर्भागे सदोऽवनिम् । प्रविवेश विशामोशः कान्त्वा कक्षाः पृथग्विधाः ॥१९ मानस्तम्भमहाचैत्यद्रुमसिद्धार्थपादपान् । प्रेक्षमाणो व्यतीयाय स्तूपाश्चाचितपूजितान् ॥ २० चतुष्टयों वनश्रेणी ध्वजान्हावलीमपि । तत्र तत्रेक्षमाणोऽसौ तां तां कक्षामलङ्घयत् ॥ २१ प्रतिकक्ष सुरस्त्रीणां गीतैनृत्यैश्च हारिभिः । रज्यमानमनोवृत्तिस्तत्रास्यासीत्परा धृतिः ॥ २२० ततः प्राविक्षदुत्तङ्गगोपुरद्वारवर्त्मना । गणेरध्युषितां भूमि श्रीमण्डपपरिष्कृताम् ॥ २३ त्रिमेखलस्य पीठस्य प्रथमां मेखलामतः । सोऽधिरुह्य परीयाय धर्मचक्राणि पूजयन् ॥ २४ मेखलायां द्वितीयस्यां वरिवस्यन्महाध्वजान् । प्रापद्गन्धकुटी चक्री न्यक्कृतत्रिजगच्छ्यिम् ॥ २५ देवदानवगन्धर्वसिद्धविद्यापरेडितम् । भगवन्तमथालोक्य प्राणमद्भक्तिनिर्भरः ॥ २६ स्तुत्वा स्तुतिभिरीशानमभ्यर्च्यच यथाविधि । निषसाद यथास्थानं धर्मामृतपिपासितः॥ २७ भक्त्या प्रणमतस्तस्य भगवत्पादपङ्कजे । विशुद्धिपरिणामाङ्गमवधिज्ञानमुद्बभौ ॥ २८ समवसरणाच्या बाह्यभागी सभास्थानाला त्याने प्रदक्षिणा घातली व अनेक विभाग ओलांडून त्या प्रजेशभरताने आत प्रवेश केला ।। १९ ॥ मानस्तंभ, महाचैत्यवृक्ष व सिद्धार्थवृक्ष आणि ज्यांची पूजाअर्चा केली आहे अशा स्तूपाना पाहत तो भरतेश्वर पुढे गेला ।। २० ।। अशोकवनादिक चार वनांची पंक्ति, ध्वज आणि प्रासादपंक्ति त्या त्या ठिकाणी पाहत त्यांना उल्लंघून तो पुढे गेला ।। २१ ।। समवसरणाच्या प्रत्येक विभागात देवांगनांचे मनोहर गायन व नृत्य पाहून भरतेशाचे मन त्या गायननृत्यावर अनुरक्त झाले व त्यापासून त्याला मोठा सन्तोष वाटला ॥ २२ ॥ यानन्तर श्रीमण्डपाने शोभत असलेला व बारा गणांचा निवास जेथे आहे अशा सभास्थानी भरतचक्रीने अतिशय उंच अशा वेशीच्या द्वारमार्गांनी प्रवेश केला ॥ २३ ॥ यानंतर ज्याला तीन कट्टे आहेत, अशा पीठाकडे जाऊन पहिल्या कट्टयावर तो चढला. तेथे त्याने धर्मचक्रांचे पूजन करून त्यास प्रदक्षिणा घातल्या ।। २४ ।। यानंतर दुसन्या कट्टयावरील महाध्वजांचे त्याने पूजन केले व त्रैलोक्याच्या शोभेला जिने तिरस्कृत केले आहे अशा गन्धकुटीजवळ तो चक्री पोहोचला ॥ २५ ।। यानंतर देव, दैत्य, गन्धर्व, सिद्ध आणि विद्याधर या सर्वानी ज्याची स्तुति केली आहे अशा भगवन्ताला पाहून भक्तिरसाने पूर्ण भरलेल्या चक्रोने नम्र होऊन नमस्कार केला ॥ २६ ॥ यानंतर भरताने आदि प्रभूची स्तोत्रानी स्तुति केली व विधीला अनुसरून त्याना पूजिले. नंतर धर्मामृत प्राशन करण्याच्या इच्छेने योग्य स्थानी तो बसला ॥ २७ ॥ भक्तीने भगवंताच्या दोन चरणकमलाना नमस्कार करीत असता विशुद्धि परिणाम ज्याला कारण आहेत अशा अवधिज्ञानाने भरत फार शोभू लागला ॥ २८ ॥ Page #475 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६४) महापुराण (४१-२९ पोस्वाथो धर्मपीयूषं परां तृप्तिमवापिवान् । स्वमनोगतमित्युच्चभगवन्तं व्यजिजपत् ॥ २९ मया सृष्टा द्विजन्मानः श्रावकाचारचञ्चवः । त्वद्गीतोपासकाध्यायसूत्रमार्गानुगामिनः ॥ ३० एकाकादशाङ्गानि दत्तान्येभ्यो मया विभो । व्रतचिह्नानि सूत्राणि गुणभूमिविभागतः ॥ ३१ विश्वस्य धर्मसर्गस्य त्वयि साक्षात्प्रणेतरि । स्थिते मयाति बालिश्यादिदमाचरितं विभो ? ॥ ३२ दोषः कोऽत्र गुणःकोऽत्र किमेतत्साम्प्रतं न वा । दोलायमानमिति मे मनः स्थापय निश्चिती ॥३३ अपि चाद्य मया स्वप्ना निशान्ते षोडशेक्षिताः । प्रायोऽनिष्टफलाश्चंते मया देवाभिलक्षिताः ॥३४ यथावृष्टमपन्यस्ये तानिमान्परमेश्वर । यथास्वं तत्फलान्यस्मत्प्रतीतिविषयं नय ॥ ३५ सिंहो मृगेन्द्रपोतश्च तुरगः करिभारभृत् । छागा वृक्षलतागुल्मशुष्कपत्रोपभोगिनः ॥ ३६ शाखामृगा द्विपस्कन्धमारूढाः कौशिकाः खगैः । विहितोपद्रवा ध्वाक्षः प्रमथाश्च प्रमोदिताः॥ ३७ यानंतर धर्मामृताचे प्राशन करून तो अतिशय तृप्त झाला आणि त्याने आपल्या मनातील अभिप्रायाबद्दल गंभीर स्वराने प्रभूला विनविले ॥ २९ ।। हे प्रभो, श्रावकांच्या आचारधर्मात निपुण असे ब्राह्मण मी उत्पन्न केले आहेत व ते आपण सांगितलेण्या उपासकाध्ययनसूत्राच्या मार्गाला अनुसरणारे आहेत ।। ३० ॥ हे प्रभो, मी याना गुणभूमिविभागाला अनुसरून अर्थात् दर्शनप्रतिमा, व्रतप्रतिमा वगैरे प्रतिमा विभागाला अनुसरून एक-दोन-तीन अशा अकरा प्रतिमापर्यन्त व्रतांचे चिह्नस्वरूप अशी यज्ञोपवीते दिली आहेत ।। ३१ ॥ हे स्वामिन्, या सर्व धर्मसृष्टीचे प्रणेते आपण साक्षात् असता मी अतिशय मूर्खपणाने हे कृत्य केले आहे ॥ ३२ ॥ या माझ्या कार्यात दोष कोणता आहे किंवा गुण कोणता आहे अथवा हे माझे कार्य साम्प्रत-योग्य आहे किंवा नाही. याप्रमाणे झोपाळ्याप्रमाणे माझे मन झोके खात आहे. हे प्रभो, त्या माझ्या मनाला निश्चयात स्थिर करा ॥ ३३ ॥ हे प्रभो, आज रात्र संपण्याच्या वेळी- पहाटेच्या समयी सोळा स्वप्ने पाहिली. त्या सर्व स्वप्नांची फले बहुत करून अनिष्ट आहेत असे मला वाटते ॥ ३४ ॥ हे परमेश्वरा, मी ती स्वप्ने जशा क्रमाने पाहिली आहेत तशी मी आपणासमोर वर्णितो. त्याचे जसे फल आहे त्याची तशी प्रतीति मला येईल अशा रीतीने आपण मला त्याचे ज्ञान करून द्यावे ॥ ३५ ॥ सिंह, २) सिंहाचा बच्चा, ३) हत्तीचे ओझे वाहणारा घोडा, ४) झाडे, वेली व झुडपे यांची वाळलेली पाने खाणारे बकरे, ५) हत्तीच्या खांद्यावर बसलेली माकडे, ६) अनेक पक्ष्यानी व कावळयानी ज्यांना उपद्रव केला आहे अशी घुबडे, ७) आनंदित झालेली पिशाचभुते, ८) ज्याचा मध्यभाग शुष्क आहे व ज्याच्या सभोवती मात्र पुष्कळ पाणी पसरले आहे असे तळे, ९) धुळीने मळकट झालेला रत्नसमूह, १०) ज्याची पूजा केली जात आहे असा Page #476 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-४७) महापुराण (४६५ शुष्कमध्यं तडागं च पर्यन्तप्रचुरोदकम् । पांसुषसरितो रत्नराशिः श्वार्घभुहितः ॥ ३८ तारुण्यशाली वृषभः शीतांशुः परिवेषयुक् । मिथोऽङ्गीकृतसाङ्गत्यौ पुङ्गवो सङ्गलच्छ्यिौ ॥ ३९ रविराशावधूरत्नवतंसोऽब्दस्तिरोहितः । संशुष्कस्तरुरच्छायो जीर्णपर्णसमुच्चयः ॥ ४० बोडीतेऽद्ययामिन्यां दृष्टाः स्वप्ना विदांवर । फलविपत्तिपत्ति मे तद्गतां त्वमपाकुरु ॥ ४१ इति तत्फलविज्ञाननिपुणोऽप्यवषित्विषा । सभाजनप्रबोधार्थ पप्रच्छ निधिराट् जिनम् ॥ ४२ तत्प्रश्नावसितावित्थं व्याचष्टे स्म जगदगुरुः । वचनामृतसंसेकैः प्रीणयन्निखिलं सदः ॥ ४३ भगवहिव्यवागर्थशश्रषावहितं तदा । ध्यानोपगमिवाभत्तत्सदश्चित्रगतं न वा ॥४॥ साध वत्स कृतं साध धामिकद्विजप्रजनम । किन्तु दोषानुषङ्गोऽत्र कोऽप्यस्ति स निशम्यताम् ॥४५ आयटमम्भवता सष्टा य एते गहमेधिनः । ते तावचिताचारा यावत्कृतयगस्थितिः ॥ ४॥ ततः कलियुगेऽभ्यणे जातिवादावलेपतः । भ्रष्टाचाराः प्रपत्स्यन्ते सन्मार्गप्रत्यनीकताम् ॥ ४७ अर्घ्य भक्षण करीत असलेला कुत्रा, ११) तारुण्यशाली असा बैल, १२) ज्याचे सभोवती खळे उत्पन्न झाले आहे असा चंद्र, १३) ज्याची शोभा नष्ट झाली आहे असे एकमेकाचे मित्र असलेले दोन बैल, १४) जणु दिशारूपी स्त्रियांच्या रत्नकुंडलासारखा असलेला सूर्य मेघानी आच्छादलेला होता, १५) सावलीने रहित व वाळलेला असा वृक्ष, १६) वाळलेल्या जुन्या पानांचा ढीग. हे जानिजनश्रेष्ठ ! अशी सोळा स्वप्ने मी आज रात्री पाहिली आहेत. त्यांच्या फलाविषयी जो मला संशय वाटत आहे त्याचे आपण निराकरण करा. आपल्या अवधिज्ञानाच्या तेजाने त्या स्वप्नाचे फल जाणण्यास समर्थ अशाही त्या निधीश भरताने सभेत आलेल्या लोकाना समजण्यासाठी श्रीजिनाला स्वप्नांची फले विचारली ।। ३६-४२ ।। याप्रमाणे भरताचे प्रश्न करणे संपल्यावर आपल्या वचनामृताच्या सिंचनाने सगळ्या सभेला आनंदित करणाऱ्या जगद्गुरु आदि प्रभूनी याप्रमाणे वर्णन करावयास सुरुवात केली ॥ ४३ ॥ __ भगवंताच्या दिव्यवाणीचा अर्थ ऐकण्यासाठी एकाग्रचित्त झालेली ती सभा त्यावेळी ध्यानात निमग्न झाल्याप्रमाणे किंवा चित्रात काढल्याप्रमाणे जणु भासली ।। ४४ ।। प्रभु म्हणाले- हे वत्सा, तूं धार्मिक ब्राह्मणांचे पूजन केलेस ही गोष्ट चांगली केली आहेस. परन्तु यात काही दोषांचा सम्बन्ध आहे तो तू ऐक ।। ४५ ॥ हे आयुष्मन्ता, तू जे हे गृहस्थाश्रमी ब्राह्मण उत्पन्न केले आहेस ते जोपर्यन्त कृतयुग आहे तोपर्यन्त योग्य आचारात प्रवृत्त होतील ॥ ४६ ।। यानन्तर म्हणजे जेव्हा कलियुग जवळ येईल त्यावेळी यांच्या ठिकाणी जातिमद उत्पन्न होईल व हे सन्मार्गाचे उलट वागतील व आचारभ्रष्ट होतील ॥ ४७ ॥ म. ५९ Page #477 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४१-४८ तेऽमो जातिमदाविष्टा वयं लोकाधिका इति । पुरा दुरागमैलॊकं मोहयन्ति षनाशया ॥ ४८ सत्कारलाभसंवृद्धगर्वा मिथ्यामदोद्धताः । जनान्प्रतारयिष्यन्ति स्वयमुत्पाद्य दुःश्रुतीः ॥ ४९ त इमे कालपर्यन्ते विक्रियां प्राप्य दुर्दशः । धर्मद्रुहो भविष्यन्ति पापोपहतचेतनाः ॥५० सत्त्वोपघातनिरता मधुमांसाशनप्रियाः। प्रवृत्तिलक्षणं धर्म घोषयिष्यन्त्यषामिकाः ॥ ५१ अहिंसालक्षणं धर्म दूषयित्वा दुराशयाः । चोदनालक्षणं धर्म घोषयिष्यन्त्यमी बत ॥ ५२ पापसूत्रधरा धूर्ताः प्राणिमारणतत्पराः । वय॑द्युगे प्रवस्य॑न्ति सन्मार्गपरिपन्थिनः ॥ ५३ द्विजातिसर्जनं तत्स्यान्नाद्य यद्यपि दोषकृत् । स्याद्दोषबीजमायत्यां कुपाषण्डप्रदर्शनात् ॥ ५४ इति कालान्तरे दोषबीजमप्येतदञ्जसा । नाधना परिहर्तव्यं धर्मसृष्टयनतिक्रमात् ॥ ५५ यथान्नमुपयुक्तं सत्क्वचित्कस्यापि दोषकृत् । तथाप्यपरिहार्य तद्बुधैर्बहुगुणास्थया ॥ ५६ --------................................... जातिगर्वाने मत्त झालेले हे ब्राह्मण आम्ही सर्वापेक्षा श्रेष्ठ आहोत असे समजून कुत्सित आगमाची रचना करून धनाशेने लोकाना मोहयुक्त करतील ॥ ४८ ।। सत्काराच्या लाभामुळे यांच्या ठिकाणी गर्व वाढेल व मिथ्या अभिमानाने उद्धत होतील व स्वतः दुःश्रुति-वेदाची उत्पत्ति करून लोकाना फसवतील ॥ ४९ ॥ ज्यांचे श्रद्धान विपरीत बनले आहे असे हे ब्राह्मण या कृतयुगाच्या शेवटी पापाने ज्यांचे सम्यग्ज्ञान नष्ट झाले आहे असे होऊन अहिंसा धर्माचा द्वेष करतील ॥ ५० ॥ प्राणिहिंसेत तत्पर होतील, दारू, मध व मांसभक्षण यांना आवडेल व अधार्मिक बनून धर्म प्रवृत्तिलक्षण रूप आहे -प्राणिहिंसात्मक आहे अशी घोषणा करतील ॥ ५१ ॥ दुष्टाभिप्राय धारण करणारे हे ब्राह्मण अहिंसालक्षण ज्याचे आहे अशा धर्माला दोषयुक्त ठरवून वेदात सांगितलेल्या धर्माची घोषणा करतील. ही खेदाची गोष्ट होय ।। ५२ ॥ पापाचे समर्थन करणाऱ्या शास्त्राला जाणणारे, प्राण्यांना मारण्यात तत्पर राहणारे व व सन्मार्गाचे शत्रु असे हे धूर्त द्विज पुढे येणाऱ्या कलियुगात प्राणिहिंसात्मक यज्ञाची प्रवृत्ति करतील ॥ ५३ ॥ या ब्राह्मणांची उत्पत्ति जरी आज दोष उत्पन्न करणारी नाही तरी पण ती पुढे येणाऱ्या कलियुगात दोष उत्पन्न करण्यास बीजरूपाची होणार आहे. कारण त्यावेळी ती दुष्ट पाखण्डमताचे प्रदर्शन करील ॥ ५४ ॥ आणि कालान्तरी ही ब्राह्मणसृष्टि निश्चयाने दोषांचे बीजरूप असली तरीही आज या सृष्टीचा परिहार-संहार करू नये कारण आज या सृष्टीने धर्मसृष्टीचे उल्लंघन केले नाही ॥५५॥ ___ जसे अन्न भक्षण केले असता एखादेवेळी एखाद्या व्यक्तीला दोष उत्पन्न करणारे होते. त्याच्या शरीरात दोषविकार उत्पन्न करणारे होते, तरीही ते पुष्कळ गुण उत्पन्न करणारे असल्यामुळे शाहण्यानी त्याचा त्याग करू नये ।। ५६ ॥ Page #478 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-६४) महापुराण (४६७ तथेदमपि मन्तव्यमद्यत्वे गुणवत्तया । पुंसामाशयवैषम्यात्पश्चाद्यद्यपि दोषकृत् ॥ ५७ इदमेवं गतं हन्त यच्च ते स्वप्नदर्शनम् । तदप्येष्यधुगे धर्मस्थितिहासस्य सूचनम् ॥५८ ते च स्वप्ना द्विधाम्नाता स्वस्थास्वस्थात्मगोचराः। समैस्तु धातुभिः स्वस्था विषमैरितरे मताः ॥५९ तथ्याः स्युः स्वस्थसन्दृष्टा मिथ्या स्वप्ना विपर्ययात् । जगत्प्रतीतमेतद्धि विद्धि स्वप्नविमर्शनम् ॥६० स्वप्नानां द्वैतमस्त्यन्यद्दोषदेवसमुद्भवम् । दोषप्रकोपजा मिथ्या तथ्याः स्युर्देवसम्भवाः ॥ ६१ कल्याणाङ्गस्त्वमेकान्ताद्देवताधिष्ठितश्च यत् । न मिथ्या तदिने स्वप्ना फल मेषां निबोध मे ॥ ६२ दृष्टाः स्वप्ने मृगाधीशा ये त्रयोविंशतिप्रमाः । निःसपत्नां विहत्येमां मां क्ष्माभत्कूटमाश्रिताः॥६३ तत्फलं सन्मति मुक्त्वा शेषतीर्थकरोदये । दुर्नयानामनुभूतिख्यापनं लक्ष्यतां स्फुटम् ॥ ६४ __ तसेच ही ब्राह्मणसृष्टि काही पुरुषांची अन्तःकरणे दुष्ट बनल्यामुळे कालान्तरी दोष उत्पन्न करणारी होईल तरीही आज या ब्राह्मणसृष्टीत गुण असल्यामुळे ती चांगली आहे असेच मानले पाहिजे ॥ ५७ ।। हे वत्सा, हे तुझ्या ब्राह्मणसृष्टिसंबंधी कार्याचे विवेचन झाले. आता जे तुला स्वप्नदर्शन झाले ते देखिल येणाऱ्या कलिकाली धर्माच्या स्थितीचा हास होईल याचे सूचक आहे असे समज ।। ५८॥ ती स्वप्ने दोन प्रकारची सांगितली आहेत. स्वस्थ आत्म्याला दिसणारी स्वप्ने व अस्वस्थ आत्म्याला दिसणारी स्वप्ने. वात, पित्त व कफ हे समान सारख्या-प्रमाणाचे असताना दिसणारी स्वप्ने स्वस्थ आत्म्याची जाणावीत व हे धातु समान नसताना कमी जास्त प्रमाणाचे असताना दिसणारी स्वप्ने ती अस्वस्थ आत्म्याची होत ।। ५९ ।। ज्याचे स्वास्थ्य चांगले आहे अशा मनुष्याने पाहिलेली स्वप्ने खरी असतात व अस्वस्थ प्रकृतीच्या मनुष्याने पाहिलेली स्वप्ने खोटी. अशा रीतीचा स्वप्नाचा विचार जगत्प्रसिद्ध आहे असे हे वत्सा तू समज ।। ६० ॥ पुनः स्वप्नाचे आणखी दोन प्रकार आहेत. दोषापासून पडलेली स्वप्ने व देवापासून पडलेली स्वप्ने. जी दोषप्रकोपाने स्वप्ने पडतात ती स्वप्ने खोटी असतात व दैवामुळे उत्पन्न होणारी स्वप्ने खरी असतात ।। ६१ ।। हे वत्सा तुझा देह शुभलक्षणानी युक्त असल्यामुळे तू सर्वथा कल्याणयुक्त देहाचा आहेस व तुझ्या ठिकाणी देवतांचा वास आहे म्हणून. तुला जी स्वप्ने पडली आहेत ती खोटी नाहीत व त्यांचे फल तू मजपासून जाणून घे. अर्थात् त्यांचे फल मी सांगतो ते ऐक ॥ ६२ ।। पहिल्या स्वप्नात तू तेवीस सिंह पाहिले आहेस. ते या विरोधरहित पृथ्वीवर निष्प्रतिबंध विहार करून पर्वताच्या शिखरावर चढलेले तू पाहिलेस त्यांचे फल असे आहेशेवटचे श्रीसन्मति - महावीर तीर्थकराशिवाय बाकीच्या तेवीस तीर्थकरांच्या उत्कर्षकाली दुर्मतांची उत्पत्ति होणार नाही असे तू स्पष्ट समज ॥ ६३-६४ ।। Page #479 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६८) महापुराण (४१-६५ पुनरेकाफिनः सिंहपोतस्यान्वकमगेक्षणात् । भवेयुः सन्मतेस्तीर्थे सानुषङ्गाः कुलिगिनः ॥ ६५ करीन्द्रभारनिर्भग्नपृष्ठस्याश्वस्य वीक्षणात् । कृत्स्नांस्तपोगुणान्वोढुं नालं दुष्षमसाषवः ॥ ६६ मूलोत्तरगुणेष्वात्तसङ्गराः केचनालसाः । भक्ष्यन्ते मूलतः केचित्तेषु यास्यन्ति मन्दताम् ॥ ६७ निर्ध्यानादजयूथस्य शुष्कपत्रोपयोगिनः । यान्त्यसद्वृत्ततां त्यक्तसदाचाराः पुरा नराः ॥ ६८ करीन्द्रकन्धरारूढशाखामृगविलोकनात् । आविक्षत्रान्वयोच्छित्तो क्षमा पास्यन्त्यकुलीनकाः ।। ६९ कारुलूकसम्बाधवर्शनाद्धर्मकाम्यया । मुक्त्वा जैनान्मुनीनन्यमतस्थानन्वियुर्जनाः ॥ ७० प्रनृत्यतां प्रभूतानां भूतानामीक्षणात्प्रजाः । भजेयुर्नामकर्माधय॑न्तरान्देवतास्थया ॥७१ शुष्कमध्यतडागस्य पर्यन्तेम्बुस्थितीक्षणात् । प्रच्युत्यायनिवासात्स्याधर्मः प्रत्यन्तवासिषु ॥ ७२ पुनः एका सिंहाच्या बच्चाच्या मागे हरिण चालले आहेत असे दुसरे स्वप्न तू पाहिलेस त्याचे फल असे- सन्मति-महावीराच्या तीर्थप्रवर्तनकाली परिग्रहधारी अनेक कुलिंगी साधु उत्पन्न होतील ॥ ६५ ।। ___ यानंतर तिसऱ्या स्वप्नात मोठ्या हत्तीच्या ओझ्याने ज्याची पाठ वाकली आहे असा घोडा तू पाहिलास त्याचे फल असे- दुःषमकालातील- पंचमकालातील साधु- तपश्चरणाच्या सर्व गुणाना धारण करण्यास असमर्थ होतील. हे त्या स्वप्नाचे फल आहे ।। ६६ ।। मूलगुण व उत्तरगुणांचे पालन करू अशी प्रतिज्ञा केलेले कित्येक मुनि आळशी होऊन ती प्रतिज्ञाच सगळी मोडून टाकतील व काही मुनि त्यांचे पालन करण्यात मंद होतील ।। ६७ ।। वाळलेली पाने खाणारा बकऱ्यांचा समूह स्वप्नात तू पाहिलास त्याचे फल असेपुढील काली माणसे सदाचाराला त्यागूम दुराचारी होतील ।। ६८ ॥ मोठ्या हत्तीच्या खांद्यावर वानर चढून बसलेले तू स्वप्नात पाहिलेस. त्याचे फल असे- पुढील काली प्राचीन क्षत्रिय वंश नष्ट होऊन जातील व नीचकुलवाले राजे पृथ्वीचे पालन करतील ॥ ६९॥ कावळ्यानी घुबडाला पीडा दिली हे स्वप्नात पाहिलेस. त्याचे फल असे- धर्माच्या इच्छेने जैनमुनीना त्यागून लोक अन्य मतातल्या साधूंचे अनुयायी-भक्त बनतील ।। ७० ।। नाचत असलेल्या पुष्कळ भूताना स्वप्नात पाहिलेस त्याचे फल असे-प्रजा नामस्मरण, पूजनादिकांच्या योगाने व्यन्तराना देव समजून भजतील ।। ७१ ॥ ज्याचा मध्यभाग शुष्क आहे व ज्याच्या सभोवती पाणी पसरले आहे असे तळे पाहिलेस त्याचे फळ असे- आर्य जेथे राहतात तेथून धर्म नाहीसा होऊन म्लेच्छांच्या देशात जाईल ।। ७२ ॥ Page #480 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-८१ ) पांसुषू सररत्नौघनिर्ध्यानादृद्धिमत्तमाः । नैव प्रादुर्भविष्यन्ति मुनयः पञ्चमे युगे ॥ ७३ शुनोऽचितस्य सत्कारैश्चरुभोजनदर्शनात् । गुणवत्पात्रसत्कार माप्स्यन्त्यव्रतिनो द्विजाः ॥ ७४ तरुणस्य वृषस्योच्चैर्नदतो विहृतीक्षणात् । तारुण्य एव श्रामण्ये स्थास्यन्ति न दशान्तरे ॥ ७५ परिवेषोपरक्तस्य श्वेतभानोनिशामनात् । नोत्पत्स्यते तपोभूत्सु समन:पर्ययोऽवधिः ॥ ७६ अन्योन्यं सह सम्भूय वृषयोर्गमनेक्षणात् । वत्र्त्स्यन्ति मुनयः साहचर्यातक विहारिणः ॥ ७७ बनावरणरुद्धस्य दर्शनादंशुमालिनः । केवलार्कोदयः प्रायो न भवेत्पञ्चमे युगे ॥ ७८ पुंसां स्त्रीणां च चारित्रच्युतिः शुष्कद्रुमेक्षणात् । महौषधिरसोच्छेदो जीर्णपर्णावलोकनात् ॥ ७९ स्वप्नानेवं फलानेतान्विद्धि दूरविपाकिणः । नाद्यदोषस्ततः कोऽपि फलमेषां युगान्तरे ॥ ८० इति स्वप्नफलान्यस्मद्बुद्ध्वा वत्स यथातथा । धर्मे मतिं दृढं धत्स्व विश्वविघ्नोपशान्तये ॥ ८१ महापुराण धुळीनी मळकट झालेला रत्नांचा समूह पाहिल्याने पंचमकालात जैनमुनि ज्यांना ऋद्धि प्राप्त झाल्या आहेत असे होणार नाहीत || ७३ ॥ (४६९ पूजिलेल्या कुत्र्याला सत्काराने नैवेद्य खाऊ घालीत आहेत असे स्वप्न पाहिल्याचे फल असे- व्रतांचे पालन न करणारे व्रतरहित असे ब्राह्मण गुणयुक्त अशा उत्तम पात्राच्या सत्काराला प्राप्त होतील अर्थात् अव्रती ब्राह्मण महाव्रती जैनमुनीप्रमाणे आदरिले जातील ॥ ७४ ॥ तरुण असा बैल डरकाळी फोडीत चालत आहे असे पाहिले त्याचे फल असे- लोक तरुणावस्थेतच मुनिव्रताचे आचरण करतील. दुसऱ्या अवस्थेत वृद्धावस्थेत मुनिव्रताचे आचरण करणार नाहीत ।। ७५ ।। ज्याच्या सभोवती खळे पडले आहे असा चंद्र पाहिल्याचे फल असे - तपश्चरणकरण्यात तत्पर असलेल्या मुनीना अवधिज्ञान व मन:पर्ययज्ञान उत्पन्न होणार नाही ।। ७६ ।। दोन बैल एकमेकाबरोबर मिळून जात असलेले स्वप्नात तू पाहिलेस त्याचे फल असेमुनि संघरूपाने विहार करतील. एकटे विहार करणार नाहीत ।। ७७ ।। मेघांच्या आवरणाने आच्छादित झालेला सूर्य पाहिलास त्याचे फल- पंचमयुगात - पंचमकालात प्रायः केवलज्ञान सूर्याचा उदय होणार नाही ।। ७८ ॥ वाळलेले झाड पाहिले त्याचे फल- पुरुष आणि स्त्रिया चारित्रापासून च्युत होतील आणि जीर्ण पाने स्वप्नात दिसली त्याचे फल, महान् वनस्पतीच्या रसांचा नाश होईल ।। ७९ ।। ज्यांच्या फलांचे अनुभव फार दूर कालाने येणार आहेत अशी ही स्वप्ने आहेत असे हे वत्सा तू समज. म्हणून आज या स्वप्नापासून काही दोष उत्पन्न होणार नाही. यांची फले युगान्तरी-पंचमकाली प्राप्त होतील ॥ ८० ॥ याप्रमाणे आमच्यापासून ही स्वप्न फले जाणून हे वत्सा, तू जगाचे विघ्न शान्त व्हावे म्हणून धर्मात आपली बुद्धि दृढपणाने ठेव ।। ८१ ।। Page #481 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७० ) इत्याकर्ण्य गुरोर्वाक्यं स वर्णाश्रमपालकः । सन्देहकर्दमापायात्सुप्रसन्नमधान्मनः ॥ ८२ भूयो भूयः प्रणम्येशं समापृच्छ्य पुनः पुनः । पुनराववृते कृच्छ्रात्स प्रीतो गुर्वनुग्रहात् ॥ ८३ ततः प्रविश्य साकेतपुरमाबद्धतोरणम् । केतुमालाकुलं पौरैः सानन्दमभिवन्दितः ॥ ८४ शान्तिक्रियामतश्च दुःस्वप्नानिष्टशान्तये । जिनाभिषेकसत्पात्रदानाद्यैः पुण्यचेष्टितः ॥ ८५ गोदोहैः प्लाविता धात्री पूजिताश्च महर्षयः । महादानानि दत्तानि प्रीणितः प्रणयी जनः ॥ ८६ निर्मापितास्ततो घण्टा जिनबिम्बैरलङ्कृताः । परार्ध्यरत्न निर्माणाः सम्बद्धा हेमरज्जुभिः ॥ ८७ लम्बिताश्च बहिर्द्वारि ताश्चतुर्विंशतिप्रमाः । राजवेश्ममहाद्वार गोपुरेष्वप्यनुक्रमात् ॥ ८८ या किल विनिर्याति प्रविशत्यप्ययं प्रभुः । तदा मौल्यग्रलग्नाभिरस्य स्थादर्हतां स्मृतिः ॥ ८९ स्मृत्वा ततोऽर्हदर्चानां भक्त्या कृत्वाभिवन्दनाम् । पूजयत्यभिनिष्क्रामन्प्रविशश्च स पुण्यधीः ॥ ९० महापुराण याप्रमाणे जगद्गुरु श्री आदिभगवंताचे वचन ऐकून ब्राह्मण क्षत्रियादि वर्ण व ब्रह्मचर्यादि चार आश्रमांचे रक्षण करणाऱ्या भरतचक्रवर्तीचे मन संशयरूपी चिखल नाहीसा झाल्यामुळे अतिशय प्रसन्न झाले ॥ ८२ ॥ ( ४१-८२ पुनः पुनः प्रभूला नमस्कार करून व पुनः पुनः विचारून गुरूच्या अनुग्रहाने आनंदित झालेला तो चक्रवर्ती मोठ्या कष्टाने परत नगराकडे जाण्यासाठी निघाला ॥ ८३ ॥ यानंतर जेथे जागोजागी तोरणे बांधलेली आहेत, जे अनेक ध्वजापताकानी युक्त आहे अशा साकेतनगरात चक्रीने प्रवेश केला तेव्हा नागरिकानी आनंदाने त्याचा बहुमान केला त्याला नमस्कार केला ॥ ८४ ॥ यानंतर वाईट स्वप्नाच्या अनिष्टांचा उपशम व्हावा म्हणून चक्रीने श्री जिनाभिषेक, सत्पात्राना आहारादि दान देणे वगैरे पुण्य क्रियानी शान्तिक्रिया केली ॥ ८५ ॥ त्या भरतचक्रेशाने गायीच्या दुधानी भूमि भिजविली, प्रोक्षण केले. महाऋषींची पूजा केली. मोठी दाने दिली व प्रेमळ मित्रादिकाना सन्तुष्ट केले ॥ ८६ ॥ यानंतर त्याने जिनबिंबानी युक्त व शोभणाऱ्या, उत्तम अमूल्य रत्नानी बनविलेल्या ज्याना सोन्याच्या साखळ्या बांधल्या आहेत अशा चोवीस घण्टा त्या चक्रीने निर्माण करविल्या. त्या घंटा नगराच्या बाहेरच्या महाद्वारावर व राजवाड्याच्या मोठ्या दरवाज्यावर आणि अनेक वेशीवर अनुक्रमाने बांधल्या ॥। ८७-८८ ॥ जेव्हा जेव्हा हा चक्रवर्ती बाहेर जातो व आत येतो तेव्हा याच्या मुकुटाच्या अग्रभागाला त्यांचा स्पर्श होत असे व त्यावेळी त्याला जिनेश्वराचे स्मरण होत असे ।। ८९ ।। त्यावेळी त्या जिनप्रतिमांचें त्याला स्मरण होई व तो पुण्ययुक्त बुद्धीचा राजा भक्तीने जिन प्रतिमांचे वंदन करीत असे व बाहेर जाताना व प्रवेश करताना त्याचे पूजन करीत असे ॥ ९० ॥ Page #482 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-९१) महापुराण रेजः सूत्रेषु संप्रोता घण्टास्ताः परमेष्ठिनाम् । सदर्थघटिताष्टीका ग्रन्थानामिव पेशलाः ॥ ९१ लोकचूडामणेस्तस्य मौलिलग्ना विरेजिरे । पादच्छाया जिनस्येव घण्टास्ता लोकसम्मताः ॥ ९२ रत्नतोरणविन्यासे स्थापितास्ता निधीशिना । दृष्ट्वाहद्वन्दनाहेतोर्लोकोऽप्यासीत्कृतादरः ॥ ९३ पौरर्जनैरतः स्वेष वेश्मतोरणदामसु । यथाविभवमाबद्धा घण्टास्ताः सपरिच्छवाः ॥९४ आदिराजकृतां सृष्टि प्रजास्ता बहु मेनिरे । प्रत्यगारं यथाद्यापि लक्ष्या वन्दनमालिकाः ॥ ९५ वन्दनाथं कृता माला यतस्ता भरतेशिना । ततो वन्दनमालाख्यां प्राप्य रूढिं गताः क्षितौ ॥ ९६ धर्मशीले महीपाले यान्ति तच्छोलतां प्रजाः । अताच्छील्यमतच्छोले यथा राजा तथा प्रजाः॥९७ तदा कालानुभावेन प्रायो धर्मप्रिया नराः । साधीयः साधुवृत्तेऽस्मिन्स्वामिन्यासन् हिते रताः ॥९८ सुकालश्च सुराजा च समं सन्निहितं द्वयम् । ततो धर्मप्रिया जाताः प्रजास्तद्नुरोधतः ॥ ९९ । सूत्रानी अर्थात् उत्तम सोन्याच्या साखळ्यानी बांधलेल्या त्या अर्हदादिपरमेष्ठींच्या घण्टा अशा उत्तम शोभत असत की जणु त्या उत्तमोत्तम अर्थानी भरलेल्या व सूत्रांच्या-आगम वाक्यांच्या सुंदर टीका आहेत ।। ९१ ॥ लोकाला-जगाला चूडामणीप्रमाणे सुंदर वाटणारा-श्रेष्ठ वाटणारा अशा त्या भरताच्या मुकुटाला स्पर्श करणाऱ्या त्या लोकप्रिय घंटा जिनेश्वराच्या चरणाच्या जणु छाया आहेत अशा शोभत असत ।। ९२ ।। निधिस्वामी अशा भरतेश्वराने जिनेश्वराना वंदन करण्याच्या हेतूने त्या घंटा रत्नाच्या तोरणाच्या रचनेत स्थापन केल्या होत्या. त्या पाहन लोक देखिल त्यांचा आदर करू लागले. अर्थात नागरिक लोक देखिल आपल्या घराच्या तोरणमालामध्ये आपल्या वैभवाला अनसरून जिनप्रतिमेच्या सामग्रीने युक्त अशा त्या घंटा बांधू लागले ॥ ९३-९४ ॥ पहिला राजा जो भरत त्याने केलेली ती सृष्टि ( दरवाजावरील तोरणामध्ये घंटा बांधण्याची पद्धति ) लोकाना फार पसन्त पडली व त्यामुळे प्रत्येक घराच्या दरवाजावर वंदनमाला आढळून येतात ।। ९५ ॥ ज्याअर्थी भरतचक्रीने वंदन करण्यासाठी ( जिनेश्वराचे स्मरण होऊन त्याना नमस्कार करण्याची प्रवृत्ति व्हावी म्हणून ) त्या माला बांधल्या असल्यामुळे त्यांना वंदनमाला हे नांव या पृथ्वीतलावर रूढ झाले ॥ ९६ ।। राजा जर धर्मशील असेल तर प्रजाही तशाच धर्मशील बनतात व तो तसा अर्थात् धर्मशील नसेल तर प्रजाही धर्मशील होत नाहीत कारण जसा राजा असतो प्रजाही तशाच होतात ।। ९७ ॥ त्यावेळी कालाच्या सामर्थ्याने बहुत करून सर्व लोक धर्मप्रियच होते. सदाचारी भरतराजा असल्यामुळे सर्व प्रजाही आपल्या हितकर कार्यात तत्पर होत्या ॥ ९८ ।। . धर्माला अनुकूल असा काल व चांगला राजा हे दोघेही एकत्र जुळले असल्यामुळे त्या दोवाना अनुसरून प्रजा वागू लागली म्हणून तीही धर्मप्रिय झाली ॥ ९९ ।। Page #483 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७२) महापुराण एष धर्मप्रियः सम्राद्धर्मस्थानभिनन्दति । मत्वेति निखिलो लोकस्तदा धर्मे रति व्यषात् ॥ १०० स धर्मविजयी सम्राट् सवृत्तः शुचिजितः । प्रकृतिष्वनुरक्तासु व्यधाद्धर्मक्रियादरम् ॥ १०१ भरतो निरतो धर्मे वयं तदनुजीविनः । इति तद्वत्तमन्वीयु लिबद्धा महीक्षितः॥१०२ सोऽयं स्वाधीनकामार्थश्चक्री चक्रानुभावतः । चरितार्थद्वये तस्मिन्भेजे धर्मेकतानताम् ॥ १०३ वानं पूजां च शीलं च दिने पर्वण्युपोषितम् । धर्मश्चतुर्विधः सोऽयमाम्नातो गहमेधिनाम् ॥१०४ बवो वानमसौ सद्भ्यो मुनिभ्यो विहितादरम् । समेतो नवभिः पुण्यैर्गुणैः सप्तभिरन्वितः ॥ १०५ हा भरतचक्री धर्मावर प्रेम करणारा आहे व तो धर्माचरणात तत्पर असलेल्या लोकांचे अभिनंदन करतो, त्यांचा आदर करतो असे मानून सर्व लोक त्यावेळी धर्मावर प्रेम करू लागले ॥१०० ।। ज्याला धर्माचरणाने जय प्राप्त झाला आहे असा तो सदाचारी, पवित्र आणि उत्कर्षशील भरतराजा आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रधान व प्रजा वगैरेवर त्याच्या धर्माचरणामुळे फार प्रेम करीत असे ।। १०१ ।। भरतमहाराज धर्मात तत्पर आहेत व आम्ही त्यांचे नोकर आहोत म्हणून त्यांच्या चारित्रधर्मांचे अनुसरण करतो असे म्हणून मुकुटबद्ध राजानी त्याच्या चारित्र धर्माचे अनुसरण केले ॥ १०२ ॥ तो हा चक्रवर्ती चक्राच्या प्रभावाने अर्थ व कामपुरुर्षाना आपल्या स्वाधीन ठेवून या दोन पुरुषार्थात तो कृतकृत्य झालेला आहे म्हणून आता त्याने धर्मपुरुषार्थात एकाग्रता धारण केली आहे ॥ १०३ ॥ सत्पात्राना दान देणे, जिनपूजा करणे, व्रतांचे पालन ज्यानी करता येते अशा रीतीचे नियम पाळणे व पर्वतिथीच्या दिवशी उपोषण करणे असा गृहस्थांचा चार प्रकारचा धर्म सांगितला आहे ।। १०४ ॥ हा चक्री नऊ पुण्ये व सात गुणानी युक्त होऊन गुणवान् अशा अनेक मुनीना आदर करून दान देत असे. नऊ पुण्ये- १) प्रतिग्रह- मुनि आले असता त्यांचा आदराने स्वीकार करणे, २) उच्चस्थान- त्यांना उच्चासनावर बसविणे, ३) पादोदक- त्यांचे पाय धुणे, ४) पूजनअष्ट द्रव्यानी पूजा करणे अर्घ देणे, ५) प्रणाम नमस्कार करणे, ६) वचनशुद्धि, ७) मनःशुद्धि, ८) शरीरशुद्धि आणि ९) आहारशुद्धि या नऊ शुद्धि आहेत याना नऊ पुण्ये म्हणतात. १) दात्याचे सात गुण- भक्ति-पात्राच्या गुणावर प्रेम करणे, २) श्रद्धा- सत्पात्राला दिलेल्या दानापासून प्राप्त होणा-या फलावर विश्वास ठेवणे तो श्रद्धा गुण होय, ३) सत्त्व- दात्याचा उदारता गुण, ४) तुष्टि- दान देतेवेळी दात्याला होणारा हर्ष, ५) विज्ञान- पात्राला दान कसे द्यावे याची माहिती असणे, ६) क्षमा- क्रोधाचे कारण उपस्थित झाले तरी शांति धारण करणे, ७) अलुब्धता- दानफलाची इच्छा नसणे हे दात्याचे सात गुण आहेत ॥ १०५ ॥ Page #484 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-११३) महापुराण (४७३ सोऽदाद्विशुद्धमाहारं यथायोगं च भेषजम् । प्राणिभ्योऽभयदानं च दानस्यैतावती गतिः ॥ १०६ जिनेषु भक्तिमातन्वन् तत्पूजायां धर्ति दधौ । पूज्यानां पूजनाल्लोके पूज्यत्वमिति भावयन् ॥१०७ चैत्यचैत्यालयादीनां निर्मापणपुरःसरम् । स चक्रे परमामिज्यां कल्पवृक्षपृथुप्रथाम् ॥ १०८ शीलानुपालने यत्नो मनस्यस्य विभोरभूत् । शीलं हि रक्षितं यत्नादात्मानमनुरक्षति ॥१०९ व्रतानुपालनं शीलं व्रतान्युक्तान्यगारिणाम् । स्थूलहिंसाविरत्यादिलक्षणानि च लक्षणः ॥ ११० सभावनानि तान्येष यथायोगं प्रपालयन् । प्रजानां पालकः सोऽभूद्धौरेयो गृहमेधिनाम् ॥ १११ पर्वोपवासमाध्याय जिनागारे समाहितः । कुर्वन्सामायिकं सोऽधान्मुनिवृत्तं च तत्क्षणम् ॥ ११२ जिनानुस्मरणे तस्य समाधानमुपेयुषः । शैथिल्याद्गात्रबन्धस्य स्रस्तान्याभरणान्यहो ॥ ११३ तो भरतराजा सत्पात्राला शुद्ध निर्दोष सात्विक असे अन्न देत असे. रोगी मुनीना योग्य असे औषधदान देत असे व प्राण्याना अभयदान देत असे. याप्रमाणे दानाचे तीन प्रकार आहेत ।। १०६ ॥ जिनेश्वरामध्ये भक्तीची वृद्धि करणारा तो चक्रवर्ती त्यांची पूजा करून अतिशय सन्तुष्ट होत असे व जे पूजेला योग्य आहेत त्यांचे पूजन केल्याने आपल्यामध्ये पूज्यता येते अशी तो चक्री नेहमी भावना करीत असे ॥ ७ ॥ ___ तो चक्रेश जिनप्रतिमा व जिनमंदिरे वगैरे नवीन तयार करवीत असे आणि कल्पवृक्षाप्रमाणे याचकाना इच्छित पदार्थ जिच्यात देता येतात अशी कल्पद्रुम नांवाची फार मोठी पूजा करीत असे ॥ १०८॥ __ या प्रभूच्या मनात शीलांचे पालन करण्यात प्रयत्न केला जात असे. कारण यत्नाने शीलाचे रक्षण केले असता ते आत्म्याचे रक्षण करते. त्यामुळे आत्म्याचे अधःपतन होत नाही ॥ १०९॥ ___ व्रतांचे पालन ज्या नियमानी होते ज्या आचारानी होते त्याना शील म्हणतात व गृहस्थांची व्रते पूर्वी सांगितली आहेत. अर्थात् स्थूल हिंसा, स्थूल असत्य इत्यादिकापासून विरक्त होणे ही त्यांची लक्षणे आहेत ॥ ११० ॥ भावनानी सहित ती स्थूल अहिंसादि व्रते यथायोग्य पाळणारा प्रजांचा पालक असा तो भरतचक्री गृहस्थामध्ये अग्रगण्य झाला ।। १११ ।। पर्वतिथीच्या दिवशी उपवासाची प्रतिज्ञा करून जिनमंदिरात निश्चल अन्तःकरणाने जेव्हा तो सामायिक करीत असे तेव्हा तो तत्काल मुनिव्रत धारण करीत असे अर्थात् त्यावेळी हिंसादिक पंच पापांचा त्याग पूर्णपणे करून सामायिक करीत असे ॥ ११२ ॥ जेव्हा जिनेश्वराच्या गुणस्मरणात एकाग्रता धारण तो करीत असे तेव्हा त्याचे शरीर शिथिल होऊन सर्व अलंकार गळून पडत असत ॥ ११३ ॥ म. ६० Page #485 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७४) महापुराण (४१-११४ ...... तथापि बहुचिन्तस्य धर्मचिन्ताभवढा । धर्मे हि चिन्तिते सर्व चिन्त्यं स्यादनचिन्तितम् ।। ११४ सस्याखिलाःक्रियारम्भा धर्मचिन्तापुरःसराः । जाता जातमहोदपुण्यपाकोत्थसम्पदः ॥ ११५ प्रातरुन्मीलिताक्षः सन्सन्ध्यारागारुणा दिशः। स मेनेऽहत्पदाम्भोजरागेणेवानुरञ्जिताः ॥ ११६ प्रातरुद्यन्तमुद्भूतनशान्धतमसं रविम् । भगवत्केवलार्कस्य प्रतिबिम्बममस्त सः ॥ ११७ प्रभातमरुतोद्धृतप्रबुद्धकमलाकरान् । हृदि सोऽधाज्जिनालापकलापानिव शीतलान् ॥ ११८ धार्मिकस्यास्य कामार्थचिन्ताभूदानुषङगिकी । तात्पर्य स्वभवद्धर्मे कृत्स्नश्रेयोऽनुबन्धिनि ॥ ११९ प्रातरुत्थाय धर्मस्थैः कृतधर्मानुचिन्तनः । ततोऽर्थकामसम्पत्ति सहामात्यैयरूपयत् ।। १२० । तल्पादुत्थितमात्रोऽसौ सम्पूज्य गुरुदैवतम् । कृतमङ्गलनेपथ्यो धर्मासनमधिष्ठितः॥ १२१ प्रजानां सदसवृत्तचिन्तनः क्षणमास्थितः । तत आयुक्तकान्स्वेषु नियोगेष्वन्वशाद्विभुः ॥ १२२ ___ अनेक चिन्तानी युक्त असलेल्या या चक्रवर्तीची धर्मसंबंधी जी चिन्ता तीच अतिशय दृढ होत असे. बरोबरच आहे की धर्माचा विचार-चिन्तन केले असता चिन्तन करण्यास योग्य अशा सर्व वस्तूंचा विचार केल्यासारखाच होतो ॥ ११४ ।। फार मोठ्या फलसंपदेला देणाऱ्या पुण्यकर्माच्या उदयाने ज्याला अनेक संपत्ति प्राप्त झाल्या आहेत अशा भरतचक्रीच्या सर्व क्रियांचा प्रारम्भ धर्मचिन्तन पूर्वकच होत असे. अर्थात् महाराज भरत सर्व कार्याच्या प्रारंभी धर्माचे चिन्तन करीत असत ।। ११५ ।। प्रातःकाली जेव्हा डोळे उघडून तो चक्री पाहत असे तेव्हा प्रातःकालच्या लाल कान्तीने सर्व दिशा लालभडक झालेल्या दिसत असत. त्यावेळी जणु अरिहंताच्या चरणकमलाच्या कांतीने त्या रंगविल्या आहेत असे त्याला वाटत असे ॥ ११६ ।। प्रातःकाली उगवणारा व रात्रीचा दाट अंधार ज्याने नाहीसा केला आहे असा सूर्य या चक्रवर्तीला भगवंताच्या केवलज्ञानरूपी सूर्याचे हे प्रतिबिंब आहे असे वाटत असे ॥ ११७ ॥ सकाळच्या वाऱ्याने हालविल्यामुळे ज्यातील कमळे प्रफुल्ल झाली आहेत अशा सरोवराना तो चक्रवर्ती जणु आदि जिनेश्वराच्या शीतल भाषणाच्या समूहाप्रमाणे मानीत होता ॥ ११८॥ नेहमी धर्म तत्पर असणाऱ्या या चक्रवर्तीचे अर्थ व काम ह्या दोन पुरुषार्थासंबंधी विचार अप्रधानच असत. पर सत. परन्तु संपूर्ण कल्याणास कारण अशा धर्माचे ठिकाणीच त्याचे विचार नेहमी तत्पर रहात असत ॥ ११९ ।। हा राजा सकाळी उठून धर्मतत्पर लोकाबरोबर प्रथम धर्माचा विचार करीत असे. यानंतर तो अमात्यलोकाबरोबर अर्थ-द्रव्य आणि काम-इंद्रियाना आवडणाऱ्या वस्तु याच्या संपत्तीविषयी विचार करीत असे ॥ १२० ।। __ जेव्हा हा राजा शय्येवरून उठत असे तेव्हा प्रथम देव व गुरु यांचे पूजन करी, नंतर मंगलकारक वेष धारण करून धर्मासनावर बसत असे व प्रजेच्या चांगल्या व वाईट आचरणांचा विचार करीत असे. यात काही वेळ घालविल्यावर जे अधिकारी लोक नेमलेले होते त्याना तो आपआपल्या कामावर जाण्याची आज्ञा करीत असे ॥ १२१-१२२ ॥ Page #486 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-१३०) महापुराण (४७५ नपासनमथाध्यास्य सभासदनमध्यगः । नृपान्सम्भावयामास सेवावसरकाइक्षिणः ॥ १२३ कांश्चिदालोकनः कांश्चिस्मितैराभाषणैः परान् । कांश्चित्सम्मानदानाद्येस्तर्पयामास पार्थिवान् ॥ तत्रोपायनसम्पत्या समायातान्महत्तमान् । वचोहरांश्च संमान्य कृतकार्यान्व्यसर्जयत् ॥ १२५ कलाविदश्च नृत्तादिदर्शनैः समुपस्थितान् । पारितोषिकदानेन महता समतर्पयत् ॥ १२६ ततो विसजितास्थानः प्रोत्थाय नपविष्टरात् । स्वेच्छाविहारमकरोद्विनोदैः सुकुमारकः ॥ १२७ ततो मध्यन्दिनेऽभ्यणे कृतमज्जनसंविधिः । तनुस्थिति स निर्वयं निरविक्षत्प्रसाधनम् ॥ १२८ चामरोपेतताम्बूलवानसंवाहनादिभिः । परिचेरुरुपेत्यैनं परिवाराङ्गन्नाः स्वतः ॥ १२९ ततो भक्तोत्तरास्थाने स्थितः कतिपयैर्नृपः । समं विदग्धमण्डल्या विद्यागोष्ठीरभावयत् ॥ १३० यानन्तर सभागृहाच्या मध्यभागी राजसिंहासनावर चक्रवर्ती बसला व सेवा करण्याचा प्रसंग आपणास केव्हा मिळेल असे इच्छिणाऱ्या राजांचा त्याने आदर केला ॥ १२३ ॥ त्याने कित्येक राजाना पाहण्याने सन्तुष्ट केले, कित्येकाना मंद हास्याने, कित्येकाना थोड्याशा शब्दानी व कित्येकाना सन्मानाने व कित्येकाना दान देण्याने सन्तुष्ट केले ॥ १२४ ।। त्यावेळी काही मोठे लोक सरदार आदिक नजराणे घेऊन आले होते व काही दूतवार्ताहरही आले होते त्यांचा चक्रवर्तीने सन्मान केला आणि ज्यांचे कार्य झाले आहे अशा त्याना त्याने सत्कारून पाठविले ।। १२५ ॥ नृत्य वगैरे कला दाखवून चक्रवर्तीला प्रसन्न करावे या हेतूने आलेल्या कलावंताना हा चक्रवर्ती मोठे बक्षिस देऊन सन्तुष्ट करीत असे ॥ १२६ ।। यानन्तर राजसिंहासनावरून उठून ज्याने सभागृह सोडले आहे असा हा चक्रवर्ती सुकुमार अशा विनोदानी शरीराला त्रास न होईल अशा खेळानी इच्छेप्रमाणे क्रीडा करीत असे ॥ १२७ ॥ मध्याह्न कालाची वेळ जवळ आली असता हा चक्रवर्ती स्नान करीत असे व नंतर तनुस्थिति-देह टिकविण्याचे साधन म्हणजे जेवण करीत असे व ते उरकल्यावर तो आपल्या अंगावर अलंकार धारण करीत असे ॥ १२८ ॥ त्यावेळी परिवाराङ्गना- सेवा करणाऱ्या स्त्रिया या चक्रवर्तीजवळ येऊन चवऱ्या वारणे, तांबूल देणे व संवाहन- पाय चुरणे अशा क्रिया करून सेवा करीत असत ।। १२९ ।। भोजन झाल्यावर बसावयाच्या ठिकाणी हा चक्रवर्ती काही राजाबरोबर बसून विद्वान् लोकाबरोबर ज्ञानाच्या गोष्टींचा विचार करीत असे, चर्चा करीत असे ॥ १३० ।। Page #487 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७६) महापुराण (४१-१३१ तत्र वारविलासिन्यो नपवल्लभिकाश्च तम् । परिवरुपारूढतारुण्यमवकर्कशाः ॥ १३१ तासामालापसंलापपरिहासकथादिभिः । सुखासिकामसौ भेजे भोगाङ्गश्च मुहूर्तकम् ॥ १३२ ततस्तुर्यावशेषेऽह्नि पर्यटन्मणिकुट्टिमे । वीक्षतेस्म परां शोभामभितो राजवेश्मनः ॥ १३३ स नर्मसचिवं कञ्चित्समालम्ब्यांसपीठके । परिकामग्नितश्चेतो रेजे सुरकुमारवत् ॥ १३४ रजन्यामपि यत्कृत्यमुचितं चक्रवर्तिनः । तदाचरन्सुखेनैव त्रियामामत्यवाहयत् ॥ १३५ कदाचिदुचितां वेलां नियोग इति केवलम् । मन्त्रयामास मन्त्रः कृतकार्योऽपि चक्रभृत् ॥ १३६ तन्त्रावापगता चिन्ता नास्यासीद्विजितक्षितेः । तन्त्रचिन्तव नन्वस्य स्वतन्त्रस्येह भारते ॥ १३७ ---------------------- त्याठिकाणी उत्पन्न झालेल्या तारुण्याच्या मदाने ज्यांना उन्मत्तता आली आहे अशा वारविलासिनी आणि प्रियराण्या येऊन त्याला घेरीत असत तेव्हा त्यांची भाषणे व आपसात बोलणे, थट्टामस्करी आदिक भोगांच्या साधनानी हा चक्रवर्ती काही वेळपर्यन्त सुखाने बसत असे ॥ १३१-१३२ ॥ यानंतर दिवसाचा जेव्हा चौथा भाग शेष राहत असे त्यावेळी रत्ने जिच्यात जडविलेली आहेत अशा जमिनीवरून फिरत फिरत आपल्या राजमहालाची सर्व बाजूनी उत्कृष्ट शोभा हा चक्रवर्ती पाहत असे ॥ १३३ ।। तो चक्रवर्ती एखाद्या खुष मस्कऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून जेव्हा इकडे तिकडे विहार करीत असे तेव्हा तो देवकुमाराप्रमाणे शोभत असे ॥ १३४ ॥ रात्रीच्या वेळीही आपल्या चक्रवर्तीपणाला जे कार्य योग्य असेल तेच हा भरतप्रभु करीत असे, अशा रीतीने तो रात्र सुखानेच घालवीत असे ॥ १३५ ॥ तो चक्रधर आपली सर्व राजनीतीची कर्तव्ये योग्य बजावलेली असल्यामुळे जरी कृत कार्य झाला होता तरीही राजनीतीच्या शास्त्रात सांगितलेले असल्यामुळे राजनीतिज्ञ लोकाबरोबर योग्य वेळी राज्यासंबंधी कार्याचा विचार करीत असे ॥ १३६ ॥ याने सर्व पृथ्वीला जिंकले असल्यामुळे या भारतात हा पूर्ण स्वतंत्र झालेला होता. त्यामुळे आपल्या राष्ट्रासंबंधी किंवा इतरांच्या राष्ट्रासंबंधी काहीही चिन्ता करण्याचे कारण नव्हते. पण राजाने काही राज्यासंबंधी विचार केला पाहिजे. या नियमाचे पालन करावे म्हणून तो तद्विषयक विचार करीत असे ॥ १३७ ॥ Page #488 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-१४३) महापुराण (४७७ तेन पाङगुण्यमभ्यस्तमपरिज्ञानहानये । शासतोऽस्याविपक्षां क्ष्मां कृतं सन्ध्यादिचर्चया ॥ १३८ राजविद्याश्चतस्रोऽमः कदाचिच्च कृतक्षणः । व्याचख्यौ राजपुत्रेभ्यः ख्यातये स विचक्षणः ॥१३९ कदाचिन्निधिरत्नानामकरोत्स निरीक्षणम् । भाण्डागारपदे तानि तस्य तन्त्रपदेऽपि च ॥ १४० कदाचिद्धर्मशास्त्रेषु याः स्युविप्रतिपत्तयः । निराचकार ताः कृत्स्नाः ख्यापयन्विश्वविन्मतम् ॥१४१ आप्तोपज्ञेषु तत्त्वेषु कांश्चित्सजातसंशयान । ततोऽपाकृत्य संशीतेस्तत्तत्वं निरणीनयत् ॥ १४२ तथासावर्थशास्त्रेषु कामनीतौ च पुष्कलम् । प्रावीण्यं प्रथयामास यथात्र न परः कृती ॥ १४३ ___ या चक्रवर्तीने संधि, विग्रह वगैरे सहा गुणांचा अभ्यास तद्विषयक ज्ञान आपले नष्ट होऊ नये म्हणून केला. याशिवाय दुसरा कोणता हेतु नव्हता. कारण याला कोणताही शत्रु नव्हता. निःशत्रुक अशी ही पृथ्वी याच्याच शासनाखाली नांदत होती. म्हणून सन्धि विग्रह आदिक सहा गुणांची चर्चा करणे निरुपयोगी होते. संधि- तह करणे, विग्रह- युद्ध करणे. यान काही निमित्त उपस्थित करून शत्रूच्या राज्यात घुसणे. आसन- एके ठिकाणी दबा धरून बसणे. संश्रय- किल्ल्याचा किंवा राजाचा आश्रय घेऊन राहणे, द्वैधीभाव- शत्रूच्या सैन्यात फितुरी करणे. या गुणांचे ज्यात वर्णन केले आहे अशा शास्त्राचा अभ्यास याने केला. त्या गुणाविषयीचे आपले अज्ञान नाहीसे व्हावे हाच हेतु या चक्रवर्तीचा होता. म्हणून मुत्सद्दी लोकाबरोबर हा राजा या गुणांचा विचार करीत असे ॥ १३८ ।। ज्याच्या ठिकाणी उत्साह आहे व जो विद्वान् आहे असा हा राजा राजपुत्रांना या चार राजविद्यांचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांचे निरूपण करीत असे. त्या चार विद्या या- १) न्याय करण्याचे शास्त्र, २) त्रयी- म्हणजे वृद्धि- संपत्ति वाढविणे, क्षय- संपत्ति, नाश आणि स्थानराहण्याचे ठिकाण या तीनांचे वर्णन करणारे शास्त्र त्याला त्रयीविद्या म्हणतात. ३) वार्तादुस-याच्या राज्यातील गुप्त बातमी मिळविण्याचे शास्त्र त्याला वार्ता म्हणतात. ४) दंडनीतिअपराध्यास शिक्षा देण्याचे शास्त्र. या चार शास्त्राना चार राजविद्या म्हणतात. याची माहिती हा चक्रवर्ती राजपुत्रांना सांगत असे ॥ १३९ ।। एकादेवेळी तो चक्रवर्ती आपल्या निधिरत्नांचे अवलोकन करीत असे. काही रत्ने व निधि त्यांच्या भाण्डागारात होती व कांही त्याच्या सैन्यात होती ॥ १४० ॥ केव्हा केव्हा सर्वज्ञ जिनेश्वराचे मत प्रकट करताना धर्मशास्त्रात जे विवाद उत्पन्न होत असत त्या सर्वांचे तो चक्रवर्ती निराकरण करीत असे ॥ १४१॥ श्रीजिनेश्वरानी जी जीवादिक तत्त्वे सांगितली आहेत त्याविषयी कोणाला उत्पन्न झालेल्या संशयाचे तो चक्रवर्ती निराकरण करून त्या जीवादिकतत्त्वांचा निर्णय करीत असे ॥ १४२ ॥ या भरतेशाने अर्थशास्त्रामध्ये व कामनीतीत आपले कौशल्य-चातुर्य दाखविले. ते पाहून याच्यासारखा या शास्त्रात दुसरा कोणी ज्ञानी नाही असे लोकाना वाटले ।। १४३ ॥ Page #489 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७८) महापुराण (४१-१४४ हस्तितन्त्रेऽश्वतन्त्रे च दृष्ट्वा स्वातन्त्र्यमोशितुः । मूलतन्त्रस्य कर्तायमित्यास्था तद्विदामभूत् ॥१४४ आयुर्वेदे स दीर्घायुरायुर्वेदो नु मूर्तिमान् । इति लोको निरारेकं श्लाघते स्म निधीशिनम् ॥ १४५ सोऽधीती पदविद्यानां स कृती वागलङकृतौ । स छन्दसां प्रतिच्छंद इत्यासीत्सम्मतः सताम् ॥१४६ तदुपज्ञं निमित्तानि शाकुनं तदुपक्रमम् । तत्सर्गो ज्योतिषां ज्ञानं तन्मतं तेन तत्त्रयम् ॥ १४७ स निमित्तं निमित्तानां तन्त्रे मन्त्रे च शाकुने । दैवज्ञाने पदं देवमित्यभूत्सम्मतोऽधिकम् ॥ १४८ तत्सम्भूतो समुद्भूतमभूत्युरुषलक्षणम् । उदाहरणमन्यत्र लक्षितं येन तत्तनोः ॥ १४९ अन्येष्वपि कलाशास्त्रसङग्रहेषु कृतागमाः । तमेवादर्शमालोक्य संशयांशाद्वधरंसिषः ॥ १५० येनास्य सहजा प्रज्ञा पूर्वजन्मानुषडगिणी । तेनैषा विश्वविद्यासु जाता परिणतिः पुरा ॥ १५१ इत्थं सर्वेषु शास्त्रेषु कलासु सकलासु च । लोके स सम्मति प्राप्य तद्विधानां मतोऽभवत् ।। १५२ हस्तितंत्र-गजशास्त्र व अश्वपरीक्षाशास्त्र यामध्ये याचा स्वतन्त्रपणा- प्रावीण्य बघून हाच या शास्त्रांचा मूळ कर्ता असावा अशी या शास्त्राच्या जाणत्यांच्या मनात बुद्धि उत्पन्न झाली. हा भरतच या शास्त्रांचा मळकर्ता आहे असे त्याना वाटू लागले ॥ १४४ ॥ आयुर्वेदात-वैद्यशास्त्रात तो दीर्घायुषी भरतराजा मूर्तिमन्त आयुर्वेद आहे अशी शंकारहित होऊन लोक त्या निधीशाची स्तुति करीत असत ॥ १४५ ॥ त्याने व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले आहे, तो शब्दालंकारात कृती-कुशल आहे व तो छन्दःशास्त्राचे प्रतिबिंब आहे. याप्रमाणे तो भरतेश्वर विद्वान् लोकाना मान्य झाला ॥१४६।। निमित्तशास्त्र हे प्रथमतः या भरतराजानेच बनविले आहे व शकुनशास्त्रही त्यानेच प्रथम रचिले आहे व चंद्र, सूर्य, ग्रह नक्षत्रादिकांचे ज्ञानही त्यानेच प्रथम केले आहे. म्हणून ही तीनही शास्त्रे या भरतानेच प्रथम रचिली आहेत असे समजावे ॥ १४७ ॥ तो भरत राजा निमित्तशास्त्राच्या रचनेचे कारण आहे. तसेच तन्त्र, मन्त्र व शकुन शास्त्रात त्याचे मुख्य स्थान आहे आणि दैवज्ञानात- ज्योतिष शास्त्रात तर तो उत्तम देव आहे. याप्रमाणे तो सर्व लोकात अधिक मान्य झाला ॥ १४८ ॥ जेव्हा भरतराजा जन्मला तेव्हाच पुरुषाची सर्व लक्षणे उत्पन्न झाली, म्हणून इतर ठिकाणी या भरताच्या शरीराचेच उदाहरण पाहिले जात होते ॥ १४९ ॥ शास्त्रामध्ये ज्यानी प्रावीण्य मिळविले आहे. असे विद्वान लोक अन्य कलाशास्त्रांच्या संग्रहामध्येही या भरतराजालाच दर्पणासारखा मानून संशयरहित झाले ॥ १५ ॥ __ या भरतेश्वराची स्वाभाविक बुद्धि पूर्व जन्माशी संबन्ध ठेवणारी होती. म्हणून याच्या बुद्धीची परिणति सर्व विद्यामध्ये त्यावेळी प्रकट झाली होती ॥ १५१॥ याप्रमाणे सर्व शास्त्रे व सर्व कलामध्ये तो भरतेश्वर सर्व लोकात संमानाला पावला व त्या त्या विद्यांना जाणणाऱ्याकडून तो संमानिला गेला ।। १५२ ।। Page #490 -------------------------------------------------------------------------- ________________ ४१-१५७) महापुराण (४७९ किमत्र बहुनोक्तोन प्रज्ञापारमितो मनुः । कृत्स्नस्य लोकवृत्तस्य स भेजे सूत्रधारताम् ॥ १५३ राजसिद्धान्ततत्त्वज्ञो धर्मशास्त्रार्थतत्त्ववित् । परिख्यातः कलाजाने सोऽभून्मूनि सुमेधसाम् ॥१५४ इत्यादिराजं तत्सम्राडहो राजर्षिनायकम् । तत्सार्वभौममित्यस्य दिशासूच्छलितं यशः ॥ १५५ इति सकलकलानामेकमोकः स चक्री । कृतमतिभिरजयं सङ्गतं संविषित्सन् ॥ बुधसबसि सदस्यान्बोधयन्विश्वविद्या । व्यवृणुत बुधचक्रीत्युच्छलत्कोतिकेतुः ॥ जिनविहितमनूनं संस्मरन्धर्ममार्गम् । स्वयमधिगततत्त्वो बोधयन्मार्गमन्यान् ॥ १५६ कृतमतिरखिलां मां पालयन्निःसपत्नाम् । चिरमरमन भौगैर्भोगसारीः स सम्राट् ॥ १५७ या भरतेश्वर मनूबद्दल अधिक सांगण्यात काही लाभ नाही. एवढेच आम्ही येथे सांगतो की, बुद्धीच्या दुस-या किना-याला जाऊन पोहोचलेला तो मनु सर्व लोकाचारांचा सूत्रधार होता ॥ १५३ ॥ हा भरतेश्वर राजसिद्धान्ताच्या तत्त्वांचा ज्ञाता होता व धर्मशास्त्राच्या अर्थाचे स्वरूपही तो उत्तम प्रकाराने जाणत होता व सर्व कलांच्या ज्ञानात तो सर्व विद्वानांच्या मस्तकावर विराजमान झाला होता ॥ १५४ ।। काय हो तो आदिराजा ? केवढे त्याचे साम्राज्य ? काय तो श्रेष्ठ राजर्षि ? काय त्याचे सार्वभौमपद ? याप्रमाणे या भरताचे यश सर्व दिशामध्ये पसरलेले होते ॥ १५५ ॥ हा चक्रवर्ती सर्व कलांचे अद्वितीय स्थान होता व चांगल्या कार्यात ज्यांची बुद्धि तत्पर असते अशा सज्जनाबरोबर कधी न संपणारी अशी मित्रता करण्याची इच्छा हा करीत असे व विद्वानांच्या सभेत नेहमी सभासदाना सर्व विद्यांचा उपदेश हा करीत असे. त्यामुळे हा विद्वानांचा चक्रवर्ती म्हणून याचा कीर्तिध्वज उंच फडफडत असे ॥ १५६ ॥ जिनेश्वर आदिभगवंतानी सांगितलेल्या रत्नत्रयधर्ममार्गाच्या उपदेशाचे नेहमी हा चक्रो स्मरण करीत असे. स्वतः जोवादिक तत्त्वांचे स्वरूप जाणून इतर भव्याना त्यांचा आय हा सांगत असे. शत्रुरहित या संपूर्ण भारतपृथ्वीचे हा पालन करीत असे. याप्रमाणे विद्वान अशा या चकवीने ज्यात उत्कृष्ट सार आहे अशा योग्य पदार्थांचा भोग घेत दीर्घकालपर्यन्त राज्यपालन केले. दोर्वका पर्यन्त भोगामध्ये तो रमला ।। १५७ ॥ Page #491 -------------------------------------------------------------------------- ________________ ४८० ) महापुराण लक्ष्मीवाग्वनितासमागमसुखस्यैकाधिपन्यं दधत् । दूरितत्सारोदुर्णयः प्रशमिनीं तेजस्वितामुद्वहन् । न्यायोपार्जित वित्तकामघटनः शस्त्रे च शास्त्रे कृती । राजर्षिः परमोदयो जिनजुषामग्रेसरः सोऽभवन् ॥ १५८ इत्यार्षे भगर्वाज्जनसेनाचार्यप्रणीत त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहे भरतराजस्वप्नदर्शन तत्फलोपवर्णनं नाम एकचत्वारिंशत्तमं पर्व ॥ ४१ ॥ (४१ - १५८ हा चक्री राज्यलक्ष्मी व सरस्वती या दोन स्त्रियांच्या समागमसुखाचा एकटाच अधिकारी होता. याने आपल्या षट्खण्ड पृथ्वीतून दुर्णय - दुःखदायक अन्यायाचा नाश केला होता आणि याने शान्तिदायक तेजस्वीपणा धारण केला होता. न्यायाने अर्थ व काम पुरुषार्थाचे याने संपादन केले होते. हा शस्त्रांत व शास्त्रातही निपुण होता. उत्कृष्ट उदयाला-ऐश्वर्याला धारण करणारा हा राजर्षि जिनसेवा करणाऱ्यांचा पुढारी झाला ।। १५८ ।। याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यविरचित आर्षत्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहात भरतराजाने स्वप्ने पाहिली व त्यांच्या फलाचे वर्णन करणारे ४१ वे पर्व समाप्त झाले. Page #492 -------------------------------------------------------------------------- ________________ द्विचत्वारिंशत्तमं पर्व । मध्येसभमथान्येद्युनिविष्टो हरिविष्टरे । क्षात्रं वृत्तमुपादिक्षत्संहितान्पार्थिवान्प्रति ॥ १ श्रूयतां भो महात्मानः सर्वक्षत्रियपुङ्गवाः । क्षतत्राणे नियुक्ताः स्थ यूयमाद्येन वेषसा ॥२ तत्राणे च नियुक्तानां वृत्तं वः पञ्चधोदितम् । तन्निशम्य यथाम्नायं प्रवर्तध्वं प्रजाहिते ॥ ३ तच्चेदं कुलमत्यात्मप्रजानामनुपालनम् । समञ्जसत्वं चेत्येवमुद्दिष्टं पञ्चभेदभाक् ॥ ४ कुलानुपालनं तत्र कुलाम्नायानुरक्षणम् । कुलोचितसमाचारपरिरक्षणलक्षणम् ॥ ५ क्षत्रियाणां कुलाम्नायः कीदृशश्चेन्निशम्यताम् । आद्येन वेधसा सष्टः सर्गोऽयंक्षत्रपूर्वकः ॥६ स चैष भारतं वर्षमवतीर्णो विवोऽग्रतः । पुरा भवे समाराध्य रत्नत्रितयमूजितम् ॥७ द्विरष्टौ भावनास्तत्र तीर्थकृत्वोपपादिनः । भावयित्वा शुभोदर्का धुलोकाग्रमधिष्ठितः ॥ ८ तेनास्मिन्भारते वर्षे धर्मतीर्थप्रवर्तने । ततः कृतावतारेण क्षात्रसर्गः प्रवर्तितः ॥ ९ यानंतर कोण्या एके दिवशी भरतमहाराज सभेमध्ये सिंहासनावर बसले व त्यांनी त्यावेळी जमलेल्या सर्व राजांना क्षत्रियांच्या आचारांचा उपदेश केला ।। १ ।। ज्यांची मने उदार आहेत अशा हे श्रेष्ठ क्षत्रियानो ऐका, तुम्हाला पहिल्या प्रजापतीने अर्थात् श्रीवृषभजिनेश्वराने दुःखी प्रजेचे रक्षण करण्यासाठी नेमलेले आहे ॥ २ ॥ त्या आदिप्रजापतीने प्रजेच्या रक्षणासाठी तुम्हाला पाच प्रकारचा आचार सांगितला आहे. तो तुम्ही ऐका व शास्त्राला अनुसरून प्रजेच्या हितामध्ये प्रवृत्त व्हा अर्थात् प्रजेच्या कल्याणासाठी झटा ।। ३ ॥ तो तुमचा आचार कुलानुपालन, मत्यनुपालन, आत्मानुपालन, प्रजानुपालन आणि समंजसपणा असा पाच प्रकारचा सांगितला आहे अर्थात् कुलाचे रक्षण करणे, आपल्या बुद्धीचे रक्षण करणे, स्वतःचे रक्षण करणे, प्रजेचे रक्षण करणे व समंजसपणा धारण करणे हा पाच प्रकारचा आचार आहे ॥ ४॥ __ कुलानुपालन म्हणजे कुलाम्नायाचे रक्षण करणे अर्थात् आपल्या कुलाला योग्य असलेल्या सदाचाराचे सर्व प्रकारे रक्षण करणे असे त्याचे स्वरूप आहे ।। ५ ॥ क्षत्रियांचा कुलाम्नाय-कुलाचा आचार कसा आहे असे विचाराल तर तो मी सांगतो ऐका. आद्य ब्रह्मदेवाने अर्थात् वृषभजिनेश्वराने क्षत्रपूर्वकच या सृष्टीची रचना केली आहे. अर्थात् प्रथमतः क्षत्रिय वर्णाचीच त्यानी रचना केली आहे ।। ६॥ या आदिभगवंताने पूर्वभवामध्ये उत्कृष्ट रत्नत्रयाची आराधना केली. याचप्रमाणे पूर्वभवात दर्शनविशुद्धयादिक सोळा भावनांचे चिन्तन केले. त्यामुळे त्याना तीर्थकरकर्माचा बंध झाला. या भावना भावी जन्मात शुभ फळ देणाऱ्या असतात. यानंतर ते स्वर्गलोकात जन्मले. तेथील आयुष्य समाप्त झाल्यावर हे प्रभु तेथून या भारतवर्षात अवतरले. या भारतवर्षात धर्मतीर्थाची प्रवृत्ति करण्यासाठी अवतरलेल्या भगवंतानी क्षत्रियांची सृष्टि केली ।। ७-९॥ म. ६१ Page #493 -------------------------------------------------------------------------- ________________ ४८२) महापुराण (४२-१० तत्कथं कर्मभूमित्वादद्यत्वे द्वितयो प्रजा । कर्तव्या रक्षणीयका प्रजान्या रक्षणोद्यता ॥१० रक्षणाभ्युद्यता येऽत्र क्षत्रियाः स्युस्तदन्वयाः । सोऽन्वयोऽनादिसन्तत्या बीजवृक्षवदिष्यते ॥ ११ विशेषतस्तु तत्सर्गः क्षेत्रकालव्यपेक्षया । तेषां समुचिताचारः प्रजार्थे न्यायवृत्तिता ॥ १२ स तु न्यायोऽनतिक्रान्त्या धर्मस्यार्थसमर्जनम् । रक्षणं वर्धनं चास्य पात्रे च विनियोजनम् ॥ १३ सैषा चतुष्टयी वृत्तिायः सद्धिरुदीरितः । जैनधर्मानुवृत्तिश्च न्यायो लोकोत्तरो मतः ॥ १४ दिव्यमूर्तेस्तदुत्पद्य जिनादुत्पादयज्जिनान् । रत्नत्रयं तु तद्योनिर्नपास्तस्मादयोनिजाः ॥ १५ ततो महान्वयोत्पन्ना नृपा लोकोत्तमा मताः । पथि स्थिताः स्वयं स्थापयन्तः परानपि ॥१६ तैस्तु सर्वप्रयत्नेन कार्य स्वान्वयरक्षणम् । तत्पालनं कथं कार्यमिति चेत्तदनूच्यते ॥ १७ स्वयं महान्वयत्वेन महिम्नि क्षत्रियाः स्थिताः। धर्मास्थया न शेषादि ग्राह्यं तैः परलिङ्गिनाम् ॥१८ तो अशी- आज या भारतामध्ये कर्मभूमि असल्यामुळे येथे दोन प्रकारची प्रजा आहे. एक प्रजा रक्षण करण्यास योग्य आहे व दुसरी प्रजा तिचे रक्षण करणारी आहे. अर्थात् एक प्रजा रक्ष्य आहे व दुसरी प्रजा रक्षक आहे. रक्षण करण्यामध्ये जे उद्युक्त झाले आहेत ते क्षश्रिय होत व त्यांचा जो अन्वय-वंश तो क्षत्रियवंश होय व हा अन्वय-वंश अनादि परंपरेने बीज वक्षाप्रमाणे मानला जातो. जसे बीजापासन वक्ष होतो व त्या वक्षापासून पून: बीज उत्पन्न होते त्याप्रमाणे ही क्षत्रिय परंपरा चालली आहे ।। १०-११।। क्षेत्र व कालाच्या अपेक्षेने त्या क्षत्रियाची विशेष उत्पत्ति सांगितली आहे. अर्थात् भरतक्षेत्र व उत्सर्पिणी व अवसर्पिणी काल यांच्या अपेक्षेने हा विशेष आहे. प्रजेचे न्यायाने रक्षण करणे हा त्यांचा योग्य आचार आहे ॥ १२ ॥ न्यायवृत्तीचे लक्षण असे- धर्माचे उल्लंघन न करता धन मिळविणे, त्याचे रक्षण करणे ते वाढविणे व पात्राचे ठिकाणी दान देणे ॥ १३ ॥ हे वर सांगितलेले जे वागणे, प्रवृत्ति करणे त्याला सज्जन न्याय म्हणतात व जैनधर्माला अनुसरणे हा लोकोत्तर न्याय आहे असे सज्जन म्हणतात ।। १४ ।। दिव्यमूर्ति अशा जिनेश्वरापासून उत्पन्न होऊन पुढेही जिनाना उत्पन्न करणारे जे रत्नत्रय ते या क्षत्रियांचे उत्पादक आहे म्हणून हे क्षत्रियराजे अयोनिज आहेत ।। १५ ।। म्हणून महावंशात उत्पन्न झालेले व स्वतः धर्ममार्गात स्थिर राहून इतरानाही धर्मात स्थापन करणारे हे राजे लोकोत्तम मानले जातात ॥ १६ ॥ या राजानी सर्व प्रयत्नाने आपल्या वंशाचे रक्षण केले पाहिजे. त्यानी स्वतःच्या वंशाचे रक्षण कसे करावे अशा प्रश्नाचे उत्तर याप्रमाणे येथे सांगत आहेत. हे राजे स्वतः महावंशात उत्पन्न झाले असल्यामुळे स्वतः आपल्या मोठेपणात स्थिर आहेत. म्हणून त्यानी अन्य धर्मात श्रद्धा ठेवू नये व अन्यधर्मीय साधूपासून शेषा- अक्षतपुष्पादिक धारण करू नये, ग्रहण करू नये ॥ १७-१८ ।। Page #494 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-२७) महापुराण (४८३ तच्छेषादिग्रहे दोषः कश्चेन्माहात्म्यविच्युतिः । अपाया बहवश्चास्मिन्नतस्तत्परिवर्जनम् ॥ १९ माहात्म्यप्रच्युतिस्तावत्कृत्वान्यस्य शिरोनतिम् । ततः शेषाद्यपादाने स्यान्निकृष्टत्वमात्मनः ॥ २० प्रद्विषन्परपाखण्डी विषपुष्पाणि निक्षिपेत् । यद्यस्य मूनि नन्वेवं स्यादपायो महीपतेः ॥ २१ वशीकरणपुष्पाणि निक्षिपेद्यदि मोहने । ततोऽयं मूढवद्वृत्तिरुपेयादन्यवश्यताम् ॥ २२ तच्छेषाशीर्वचः शान्तिवचनाद्यन्यलिङ्गिनाम् । पार्थिवैः परिहर्तव्यं भवेन्यक्कुलताऽन्यथा ॥ २३ जैनास्तु पार्थिवास्तेषामहत्पादोपसेविनाम् । तच्छेषानुमतिया॑य्या ततः पापक्षयो भवेत् ।। २४ रत्नत्रितयमूर्तित्वादादिक्षत्रियवंशजाः । जिनाः सनाभयोऽमीषामतस्तच्छेषधारणम् ॥ २५ यथाहि कुलपुत्राणां माल्यं गुरुशिरोधृतम् । मान्यमेवं जिनेन्द्राङघ्रिस्पर्शान्माल्यादि भूक्षिताम् ॥२६ कथं मुनिजनादेषां शेषोपादानमित्यपि । नाशङक्यं तत्सजातीयास्ते राजपरमर्षयः ॥ २७ त्यानी दिलेली फुले, अक्षता, प्रसाद वगैरे घेण्यात कोणता दोष आहे असे म्हणाल तर सांगतो. ते घेण्यामुळे आपल्या मोठेपणाचा नाश होतो आणि ते घेण्यात पुष्कळ अनिष्टही उद्भवतात. म्हणून त्यांचा त्याग करावा ॥ १९ ॥ __ इतराना मस्तक नम्र करण्याने प्रथमतः आपला मोठेपणा नाहीसा होतो व नंतर त्यांच्या शेषेचे ग्रहण केले असता आपणास निकृष्टपणा येईल ॥ २० ॥ तो अन्य पाखंडी आपल्याशी द्वेष करून आपल्या मस्तकावर विषारी पुष्पे टाकील व त्याने असे केले तर आपणास ( राजाला ) खचित अपाय होईल ।। २१ ।। तो पाखंडी जर राजावर मोह उत्पन्न करण्यासाठी वशीकरणमंत्रानी मंत्रित झालेली फुले टाकील तर हा राजा मूढाप्रमाणे वागणारा होईल व इतरांच्या वश होईल ॥ २२ ॥ म्हणून अन्यमतीयांच्या शेषा, आशीर्वाद व शान्तिवचन वगैरेचा राजानी त्याग करावा. जर त्यांचा ते स्वीकार करतील तर त्याना नीचकुलोत्पन्नता प्राप्त होईल ॥ २३ ॥ जनराजानी-जिनचरणाची सेवा करणाऱ्या जैनराजानी जिनेश्वराच्या चरणावरची माला, पुष्प, अक्षता घेणे मान्य आहे, न्याय्य आहे व त्यापासून पापाचा क्षय होतो ॥ २४ ॥ . जिन हे सम्यग्दर्शनादि रत्नत्रयाची मूर्ति असल्यामुळे ते आदिक्षत्रिय जे आदिभगवंत त्यांचे वंशज आहेत म्हणून ते ह्या राजाचे एक गोत्रज आहेत. यास्तव त्याची शेषादिक राजानी घ्यावी ॥ २५ ॥ ज्याप्रमाणे उत्तम कुलात उत्पन्न झालेल्या मुलाना त्यांच्या वडिलानी मस्तकावर धारण केलेली माला आदरणीय होते त्याप्रमाणे जिनेश्वराच्या चरणांच्या स्पर्शाने मालादिक आदरणीय होतात. त्यांचा राजानी मस्तकाने स्वीकार करावा ॥ २६ ॥ या राजानी मुनिजनापासून शेषादिक कसे ग्रहण करावेत अशी ही शंका घेऊ नये. कारण ते मुनिजनही राजर्षि, परमर्षि आदिक जिनेश्वराचेच सजातीय आहेत म्हणून त्यांच्या चरणांच्या पुष्पाक्षता मस्तकावर धारण करणे योग्यच आहे ॥ २७ ॥ Page #495 -------------------------------------------------------------------------- ________________ ४८४) महापुराण (४२-२८ अक्षत्रियाश्च वृत्तस्थाः क्षत्रिया एव दीक्षिताः। ततो रत्नत्रयायत्तजन्मना तेऽपि तद्गुणाः ॥ २८ ततः स्थितमिदं जैनान्मतादन्यमतस्थिताः । क्षत्रियाणां न शेषादिप्रदानेऽधिकृता इति ॥ २९ कुलानुपालने यत्नमतः कुर्वन्तु पार्थिवाः । अन्यधान्यः प्रतार्येरन् पुराणाभासदेशनात् ॥ ३० कुलानुपालनं प्रोक्तं वक्ष्ये मत्यनुपालनम् । मतिहिताहितज्ञानमात्रिकामुष्मिकार्ययोः ॥ ३१ तत्पालनं कथं स्याच्चेदविद्यापरिवर्जनात् । मिथ्याज्ञानमविद्या स्यादतत्त्वे तत्त्वभावना ॥ ३२ आप्तोपझं भवेत्तत्त्वमाप्तो दोषावृतिक्षयात् । तस्मात्तन्मतमभ्यस्येन्मनोमलमपासितुम् ॥ ३३ राजविद्यापरिज्ञानादेहिकेर्थे दृढामतिः । धर्मशास्त्रपरिज्ञानान्मतिर्लोकद्वयाश्रिता ॥ ३४ जे क्षत्रिय नाहीत असे जैनसाधु मुनिचारित्र धारण करणारे असल्यामुळे ते देखिल दीक्षा घेतल्यामुळे क्षत्रियच समजावेत. कारण रत्नत्रयाच्या स्वाधीन त्यांचा जन्म असल्यामुळे ते मुनिराज देखिल राजाप्रमाणे क्षत्रियच समजावेत. कारण ते देखिल क्षत्रियाच्या गुणांचे धारक होत ॥ २८ ॥ ___ यामुळे जैनमताहून भिन्न मतात असलेले लोक क्षत्रियाना प्रसाद देणे, शेषा देणे वगैरेमध्ये अधिकारी नाहीत हे सिद्ध झाले ॥ २९ ॥ यास्तव राजानी आपल्या कुलानुपालनाविषयी यत्न करावा. तो जर त्यानी केला नाही तर ते अन्यमतातील लोकाकडून पुराणाभासाच्या उपदेशाने फसविले जातील ॥ ३० ॥ कुलानुपालनाचे हे वर्णन केले. आता मत्यनुपालन मी सांगतो. मति म्हणजे इहलोक व परलोकसंबंधी वस्तुविषयी आपल्याला हितकारक वस्तु कोणती व अहितकारक वस्तु कोणती याचे ज्ञान होणे हे होय ।। ३१ ॥ त्या मतीचे रक्षण कसे होईल ? या प्रश्नाचे उत्तर अविद्येचा त्याग केल्याने मतिपालन होते असे आहे व मिथ्याज्ञानाला अविद्या म्हणतात. अर्थात् कोणतीही वस्तु ज्या स्वरूपाची नाही ती त्या स्वरूपाची आहे असे ज्ञान होणे ती अविद्या होय. जसे अंधारात पडलेली दोरी सर्प आहे असे वाटणे. शरीर आत्मा नाही असे असता त्याविषयी शरीर म्हणजे मी आहे अशी बुद्धि होणे ती अविद्या होय ॥ ३२॥ ___वस्तूचे खरे स्वरूप आप्ताने सांगितले आहे व रागादिक दोष ज्ञानावरणादि कर्मे ही वस्तूचे खरे ज्ञान होऊ देत नाहीत. जेव्हा रागादिक दोष व ज्ञानावरणादि कर्माचा नाश होतो तेव्हा आत्म्यात आप्तपणा येतो. म्हणून अशा आप्ताने सांगितलेल्या मताचा अभ्यास करावा व त्या अभ्यासाने मनाचा मल नाहीसा होतो ॥ ३३ ॥ राजविद्येच्या ज्ञानाने या जगातील वस्तुविषयी खरे ज्ञान होते व दृढ होते. धर्म शास्त्राच्या ज्ञानापासून इहलोक व परलोकाच्या वस्तूंचे ज्ञान होते म्हणून त्या धर्मशास्त्राचे अध्ययन करावे ॥ ३४ ॥ Page #496 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-४३) महापुराण (४८५ क्षत्रियाः स्वार्थमुत्पाद्य येऽभूवन्परमर्षयः । ते महादेवशब्दाभिधेया माहात्म्ययोगतः ॥ ३५ आदिक्षत्रियवृत्तस्थाः पार्थिवा ये महान्वयाः। महत्त्वानुगमात्तेऽपि महादेवप्रथां गताः ॥ ३६ तद्देव्यश्च महादेव्यो महाभिजनयोगतः । महद्भिः परिणीतत्वात्प्रसूतेश्च महात्मनाम् ॥३७ इत्येवमास्थिते पक्षे जैनैरन्यमताश्रयी । यदि कश्चित्प्रतिब्रूयान्मिथ्यात्वोपहताशयः ॥ ३८ वयमेव महादेवा जगन्निस्तारका वयम् । नास्मादाप्तात्परोऽस्त्याप्तो मतं नास्मन्मतान्परम् ॥ ३९ इत्यत्र बमहे नेतत्सारं संसारवारिधेः । यः समुत्तरणोपायः स मार्गो जिनदेष्टितः ॥ ४० आप्तोऽर्हन्वीतदोषत्वात् आप्तंमन्यास्ततोऽपरे । तेषु वागात्मभाग्यातिशयानामविभावनात् ॥ ४१ वागाद्यतिशयोपेतः सार्वः सर्वार्थदगजिनः । स्यादाप्तः परमेष्ठी च परमात्मा सनातनः ॥ ४२ स वागतिशयो ज्ञेयो येनायं विभुरक्रमात् । वचसकेन दिव्येन प्रीणयत्यखिलां सभाम् ॥ ४३ जे क्षत्रिय स्वतःच्या आत्म्याचे स्वरूप जाणून महामुनि झाले, आपल्या माहात्म्यामुळे महादेव या शब्दाने वर्णन करण्यायोग्य आहेत त्यांना महादेव म्हणावे ॥ ३५ ।। जे मोठ्या कुलात उत्पन्न झाले असे राजे आदिक्षत्रिय असे जे भगवान वृषभनाथ त्यानी सांगितलेल्या आचारांचे पालन करीत असतील तर ते देखील मोठेपणाचा संबंध झाल्यामुळे 'महादेव' या नांवाला-प्रसिद्धीला प्राप्त झाले आहेत ॥ ३६ ॥ त्या राजाच्या ज्या स्त्रिया त्या मोठ्या कुलात जन्मल्या असल्याने व मोठ्याशी विवाह झाल्याने व पुढे महापुरुषाना प्रसवणा-या असल्यामुळे त्याना महादेवी समजावे ॥ ३७ ॥ याप्रमाणे जैनानी वरील आपला पक्ष मांडला असता अन्यमताचा आश्रय करणारा कोणी मिथ्यात्वाने-खोट्या ज्ञानाने ज्याचे मन भरले आहे असा होऊन जर असे उलट बोलेल"आम्हीच महादेव आहोत, आम्हीच जगाला तारणारे आहोत व आमच्या आप्ताहून वेगळा कोणी आप्त नाही व आमच्या मताहून निराळे मतही नाही." असे बोलेल त्याला पुढील उत्तर आहे ।। ३८-३९ ।। याविषयी आम्ही असे सांगतो. हे वरील त्याचे विवेचन सारयुक्त नाही. कारण संसारसमुद्रापासून तरून जाण्याचा जो उपाय तो जिनाने सांगितलेला मार्ग होय ॥ ४० ॥ त्या जिनेश्वराला आप्त म्हणतात- अर्हन म्हणतात व क्षुधा तृषादिक दोष नाहीसे झाल्यामुळे त्याला आप्त अर्हन् म्हणावे. या जिनेश्वराहून अन्य देव आप्त नाहीत पण ते आपणास आप्त म्हणतात. पण त्यांच्यात वाणी, आत्मा आणि विशिष्ट ऐश्वर्य यांचा काहीच निश्चय नाही ॥ ४१ ॥ जिनेश्वर वाणी आदिक अतिशयानी सहित आहेत. ते सर्वांचे हित करतात व सर्व पदार्थाना साक्षात् पाहतात. ते परमेष्ठी, परमात्मा, आणि सनातन पूर्वोपासून अविच्छिन्न चालत आलेले आहेत म्हणून ते जिनच आहेत. आप्त आहेत ॥ ४२ ॥ या जिनेश्वराच्या दिव्यवाणीमध्ये असा अतिशय आहे की तो आपल्या दिव्यवाणीने संपूर्ण सभेतील प्राण्याना एकदम आनंदित करतो ।। ४३ ॥ Page #497 -------------------------------------------------------------------------- ________________ ४८६) महापुराण (४२-४४ तथात्मातिशयोऽप्यस्य दोषावरणसंक्षयात् । अनन्तज्ञानदृग्वीर्यसुखातिशयसनिधिः ॥ ४४ प्रातिहार्यमयी भूतिरुद्भतिश्च सभावनः । गणाश्च द्वादशेत्येष स्याद्धाग्यातिशयोऽर्हतः ॥ ४५ वागाद्यतिशयरेभिरन्वितोऽनन्यगोचरैः । भगवान्निष्ठितार्थोऽर्हन्परमेष्ठी जगद्गुरुः ॥ ४६ न च तादृग्विधः कश्चित्पुमानस्ति मतान्तरे । ततोऽन्ययोगव्यावृत्त्या सिद्धमाप्तत्वमर्हति ॥ ४७ इत्याप्तानुमतं क्षात्रमिमं धर्ममनुस्मरन् । मतान्तरादनाप्तीयात्स्वान्वयं विनिवर्तयेत् ॥ ४८ वृत्तादनात्मनीनाद्धीः स्यादेवमनुरक्षिता । तद्रक्षणाच्च संरक्षेत्क्षत्रियः क्षितिमक्षताम् ॥ ४९ उक्तस्यैवार्थतत्वस्य भूयोऽप्याविश्चिकीर्षया। निदर्शनानि त्रीण्यत्र वक्ष्यामस्तान्यनुक्रमात् ॥ ५० व्यक्तये पुरुषार्थस्य स्यात्पूरुषनिदर्शनम् । तथा निगलदृष्टान्तः स संसारिनिदर्शनः ॥ ५१ याचप्रमाणे त्या जिनेश्वराच्या आत्म्यातही अतिशय (माहात्म्य ) उत्पन्न होतो. त्याचे कारण हे की, रागादिकदोष व ज्ञानावरणादिक घातिकर्मे यांचा पूर्ण क्षय झाल्यामुळे अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तशक्ति, अनन्तसुख यांची प्राप्ति होते हा जिनेशाच्या आत्म्यात अतिशय उत्पन्न होतो।। ४४ ॥ ___ याचप्रमाणे अशोकवृक्ष, देवाकडून पुष्प वृष्टि होणे आदिक आठ प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होणे, समवसरणरचना होणे, बारा गण अर्थात् बारा सभा होणे हे सर्व जिनभगवन्ताचे भाग्यातिशय आहेत ॥ ४५ ॥ इतर कोणालाही प्राप्त न होणारे असे दिव्यवाणी वगैरे गुणात अतिशय हे या जिनेश्वराला प्राप्त झालेले असतात म्हणून हे अरहन्त कृतकृत्य झाले आहेत व परमेष्ठी आणि जगाचे गुरु आहेत ।। ४६ ।।। ___अन्य कोणत्याही मतात अरिहंतासारखा पुरुष झाला नाही म्हणून आप्तपणा दुसऱ्या कोणातही संभवत नाही यास्तव अन्य सम्बन्धाची व्यावृत्ति झाल्याने तो आप्तपणा अरहंतामध्येच सिद्ध होतो ॥ ४७ ॥ याप्रमाणे आप्त अर्थात् श्रीजिनेश्वर त्यानी सांगितलेल्या या क्षात्रधर्माचे स्मरण करून क्षत्रियांनी आप्त नसलेल्या अशा पुरुषानी सांगितलेल्या अन्य मतापासून आपल्या वंशाला वेमळे केले पाहिजे ॥ ४८ ॥ ज्यापासून आत्म्याचे हित होत नाही अशा आचरणापासून आपल्या बुद्धीला दूर ठेवून तिचे रक्षण करावे व बुद्धीचे त्याने रक्षण केले म्हणजे तो क्षत्रिय या अखण्ड पृथ्वीचे अखण्ड रक्षण करू शकेल ।। ४९ ॥ वर सांगितलेल्या पदार्थाचे स्वरूप पुनः चांगले स्पष्ट करण्याकरिता येथे आम्ही अनुक्रमाने तीन उदाहरणे सांगतो ॥ ५० ॥ आपला पुरुषार्थ व्यक्त करण्याकरिता पुरुषाचा पहिला दृष्टान्त आहे आणि दुसरा दृष्टान्त निंगलाचा-बेडीचा आहे व तिसरा संसारिजीवाचा आहे ॥ ५१ ।। Page #498 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-६०) महापुराण (४८७ ज्ञेयः पुरुषदृष्टान्तो नाम मुक्तेतरात्मनोः । यनिदर्शनभावेन मुक्त्यमुक्त्योः समर्थनम् ॥ ५२ संसारीन्द्रियविज्ञानदृग्वीर्यसुखचारुताः । तन्वावासौ च निर्वेष्टुं यतते सुखलिप्सया ॥ ५३ मुक्तस्तु न तथा किन्तु गणरुक्तैरतीन्द्रियैः । परं सौख्यं स्वसाद्भुतमनुभुक्ते निरन्तरम् ॥ ५४ तन्द्रियिकविज्ञानः स्वल्पज्ञानतया स्वयम् । परं शास्त्रोपयोगाय श्रयति ज्ञानचिन्तकम् ॥ ५५ तथैन्द्रियकदृकशक्तिरात्मार्वाग्भागदर्शनः । अर्थानां विप्रकृष्टानां भवेत्सन्दर्शनोत्सुकः ॥ ५६ तथैन्द्रियकवीर्यश्च सहायापेक्षयप्सितम् । कार्य धटयितुं वाञ्छेत्स्वयं तत्साधनाक्षमः ॥ ५७ तथेन्द्रियसुखी कामभोगरत्यन्तमुन्मनाः । वाञ्छेत्सुखं पराधीनमिन्द्रियार्थानुतर्षतः ॥ ५८ तथन्द्रियकसौन्दर्यः स्नानमाल्यानुलेपनैः । विभूषणश्च सौन्वयं संस्कर्तुमभिलष्यति ॥ ५९ दोषधातुमलस्थानं देहमैन्द्रियकं वहन् । पुमान्विष्वाणभैषज्यतद्रक्षास्वाकुलो भवेत् ॥ ६० ___ ज्या उदाहरणाने मुक्तात्मा व अमुक्तात्मा म्हणजे बद्ध झालेला आत्मा याच्या मुक्तीचे-मोक्षाचे व बंधाचे समर्थन करता येते त्याला पुरुष-दृष्टान्त म्हणावे ॥ ५२ ।। संसारी पुरुष सुख मिळविण्याच्या इच्छेने इन्द्रियापासून होणारे ज्ञान, इन्द्रियापासून होणारे दर्शन, इन्द्रियाची शक्ति, इन्द्रियाचे सुख, इन्द्रियाचे सौन्दर्य, शरीर आणि घर यांचा अनुभव घेण्यासाठी यत्न करीत असतो ।। ५३ ।।। परंतु मुक्त तसा नसतो. तो ज्याचे वर्णन पूर्वी केले आहे अशा अतीन्द्रिय अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तसुख व अनन्तशक्ति अशा अतीन्द्रिय गुणानी उत्कृष्ट सुख जे स्वतःपासूनच उत्पन्न होते व त्याचा तो निरन्तर अनुभव घेतो ।। ५४ ।। इन्द्रियापासून होणान्या ज्ञानाने युक्त असा मनुष्य स्वतः अल्पज्ञानी असल्यामुळे शास्त्राचे ज्ञान व्हावे म्हणून शास्त्रज्ञान असलेच्या दुसन्या पुरुषाचा आश्रय घेतो ।। ५५ ।। तसेच इन्द्रियाच्या योगाने पदार्थ पाहण्याची शक्ति ज्याला आहे असा मनुष्य पदार्थाचा अलिकडचा भाग पाहतो व अशा त्या मानवाला दूरचे जे पदार्थ आहेत ते पाहावेत अशी उत्सुकता उत्पन्न होते ॥ ५६ ॥ ___ज्याला इन्द्रियासंबंधी सामर्थ्य प्राप्त झाले आहे असा मनुष्य दुस-याच्या सहाय्याची अपेक्षा ठेवतो. कारण स्वतः ते कार्य सिद्ध करण्यास तो समर्थ असत नाही ।। ५७ ॥ ___याचप्रमाणे इन्द्रियापासून उत्पन्न होणान्या सुखाने युक्त असलेला तो मनुष्य काम व भोगासाठी अत्यन्त उत्कंठिन असतो. इन्द्रियानी उपभोगण्याला योग्य अशा पदार्थांची त्याला तहान लागलेलो असते व त्यामुळे तो पराधीन सुखाची इच्छा करतो ।। ५८ ।। तसेच इन्द्रियाच्या सौन्दर्याने युक्त असलेला पुरुष स्नान करणे, पुष्प, मालादिक धारण करणे, अंगाला उटी लावणे व इतर सुवर्णादिकाच्या अलंकारानी आपल्या सौन्दर्यावर तो संस्कार करण्याची अभिलाषा करतो ।। ५९ ।। __ वातपित्तकफादिक दोष, रक्तादिक धातु आणि मलमूत्रादिकांचे स्थान असलेल्या इन्द्रियानी युक्त अशा देहाला धारण करणारा पुरुष अन्न व औषधानी त्या देहाचे रक्षण करण्यात व्याकुळ झालेला असतो ॥ ६० ।। Page #499 -------------------------------------------------------------------------- ________________ ४८८) महापुराण दोषान्पश्यंश्च जात्यादीन्देहार्तस्तज्जिहासया । प्रेक्षाकारी तपः कर्तुं प्रयस्यति यदा तदा ।। ६१ स्वीकुर्वन्द्रियावासं सुखमायुश्च तद्गतम् । आवासान्तरमन्विच्छेत्प्रेक्षमाणः प्रणश्वरम् ॥ ६२ यस्त्वतीन्द्रियविज्ञानदृग्वीर्यसुखसन्ततिः । शरीरावाससौन्दर्यैः स्वात्मभूतैरधिष्ठितः ।। ६३ तस्योक्तदोषसंस्पर्शो भवेन्नैव कदाचन । तद्वानाप्तस्ततो ज्ञेयः स्यादनाप्तस्त्वतद्गुणः ॥ ६४ स्फुटीकरणमस्यैव वाक्यार्थस्याधुनोच्यते । यतो नाविष्कृतं तत्त्वं तत्त्वतो नावबुध्यते ॥ ६५ तद्यथातीन्द्रियज्ञानः शास्त्रार्थं न परं श्रयेत् । शास्तास्वयं त्रिकालज्ञः केवलामललोचनः ॥ ६६ तथातीन्द्रियदृग्नार्थी स्यादपूर्वार्थदर्शने । तेनादृष्टं न वै किञ्चिद्युगपद्विश्वदृश्वना ॥ ६७ क्षायिकानन्तवीर्यश्च नान्यसाचिव्यमीक्षते । कृतकृत्यः स्वयं प्राप्तलोकाग्रशिखरालयः ॥ ६८ अतीन्द्रियसुखोऽप्यात्मा स्याद्भोगैरुत्सुको न वै । भोग्यवस्तुगता चिन्ता जायते नास्य जात्वतः ॥ ६९ वारंवार जन्मणे व मरणे वगैरे दोष पाहून देहामुळे दुःखित झालेला मानव त्या देहाचा त्याग करण्याची जेव्हा इच्छा करतो तेव्हा बुद्धिपूर्वक कार्याचा तो विचार करतो व त्यावेळी तपश्चरण करण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा इन्द्रियापासून होणाऱ्या सुखाला साधन असलेले घर आपले आहे असे तो मानतो. पण त्यातील सुख व आयु नाश पावणारे आहेत असे पाहून दुसऱ्या स्थलाची इच्छा करतो ।। ६१-६२ ॥ (४२-६१ पण ज्याच्या ठिकाणी ज्ञान, दर्शन, वीर्य आणि सुख या गुणांचा समूह अतीन्द्रिय आहे व आत्माच ज्याचे शरीर, गृह व सौन्दर्य आहे, त्याला वर वर्णिलेल्या दोषांचा स्पर्श केव्हाही होत नाही. अतीन्द्रिय अशा विज्ञानादि गुणानी युक्त असलेला तो आत्मा आप्त होय. पण हे गुण ज्याच्या ठिकाणी नाहीत तो आप्त नाही ।। ६३-६४॥ आतां याच वाक्याच्या अर्थाची फोड करून आम्ही वर्णन करतो. कारण जोपर्यन्त स्पष्टपणे न सांगितलेले तत्त्व यथार्थरूपाने जाणले जात नाही ॥ ६५ ॥ ज्याला अतीन्द्रिय ज्ञान झाले आहे तो दुसऱ्यानी सांगितलेल्या शास्त्रार्थाचा मुळीच आश्रय घेत नाही कारण त्याचा केवलज्ञानरूपी डोळा अतिशय निर्मळ असतो. तो त्रिकालातील वस्तूंचे स्वरूप स्वत: जाणत असतो व स्वतः तो शास्त्र असतो शास्त्राची रचना करणारा असतो ॥ ६६ ॥ तसे तो अतीन्द्रिय नेत्राना धारण करणारा शास्त्र पूर्वी न पाहिलेली वस्तु पाहण्यास दुसऱ्याची गरज बाळगीत नाही. कारण तो एकदम सगळे विश्व जाणतो व पाहतो त्याने न पाहिलेले असे कांहीं नाहींच ।। ६७ ।। त्या सर्वज्ञाच्या ठिकाणी क्षायिक अनन्त शक्ति आहे. म्हणून तो दुसऱ्या मदतीची अपेक्षा करीत नाही आणि तो स्वतः लोकाचे अग्रशिरवर असे उत्कृष्ट स्थान प्राप्त करून घेतो ॥ ६८ ॥ हा अतीन्द्रियसुखी आत्मा विषयभोगानी उत्कंठित झालेला नसतो म्हणून याला भोग्यवस्तूची प्राप्ति केव्हा होईल मशी चिन्ता केव्हाही उत्पन्न होत नाही ।। ६९ ।। Page #500 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-७७) महापुराण (४८९ प्राप्तातीन्द्रियसौन्दर्यो नेच्छेत्स्नानादिसक्रियाम् । स्नातको नित्यशुद्धात्मा बहिरन्तर्मलक्षयात् ॥७० अतीन्द्रियात्मदेहश्च नाहारादीनपेक्षते । क्षुद्व्याधिविषशस्त्रादिबाधातीततनुः स वै ॥ ७१ भवेच्च न तपःकामो वीतजातिजरामतिः । नावासान्तरमन्विच्छेदात्मावासे च सुस्थितः ॥ ७२ स एवमखिलर्दोषैर्मुक्तो युक्तोऽखिलैर्गुणैः । परमात्मा परञ्ज्योतिः परमेष्ठीति गीयते ॥ ७३ कामरूपित्वमाप्तस्य लक्षणं चेन्न साम्प्रतम् । सरागः कामरूपी स्यात् अकृतार्थश्च सोऽञ्जसा ॥७४ प्रकृतिस्थेन रूपेण प्राप्तुं यो नालमीप्सितम् । स वैकृतेन रूपेण कामरूपी कथं सुखी ॥ ७५ इति पुरुषनिदर्शनम्।। निगलस्थो यथा नेष्टं गन्तुं देशमलं तराम् । कर्मबन्धनबद्धोऽपि नेष्टं धाम तययात् ॥ ७६ यह बन्धनान्मुक्तः परं स्वातन्त्र्यमृच्छति । कर्मबन्धनमुक्तोऽपि तथोपार्छत्स्वतन्त्रताम् ॥ ७७ याला अतीन्द्रियसौन्दर्य प्राप्त झालेले असते. म्हणन याला स्नान, अलंकार वगैरेची अपेक्षा असत नाही. कारण याच्या बाह्य व अन्तरंग दोन्ही प्रकारच्या मलांचा नाश झाला आहे म्हणून हा नित्य शुद्धात्मा स्नातक झाला आहे ।। ७० ॥ या परमात्म्याचा आत्माच शरीर आहे म्हणून याला आहारादिकांची अपेक्षा नसते. त्याचे शरीर भूक, तहान, रोग, विष, शस्त्रादिकांच्या बाधांच्या पलीकडे गेले आहे. त्याला आहारादिकांची आवश्यकता मुळीच नसते ॥ ७१ ॥ याचप्रमाणे त्याला तप करण्याची आवश्यकता नसते, कारण तो जन्मजरामरणानीं रहित असतो. तो परमात्मा नेहमी आत्मारूपी घरातच उत्तम रीतीने राहिलेला असतो. म्हणून त्याला दुसऱ्या घराची आवश्यकता वाटत नाहीच ।। ७२ ॥ याप्रमाणे संपूर्ण दोषांनी रहित झालेला व सर्व गुणांनी पूर्ण भरलेला असा तो आत्मा परमात्मा, परंज्योति व परमेष्ठी अशा नांवानी वर्णिला जातो॥ ७३ ।। कामरूपित्व- इच्छेला वाटेल तसे रूप घेणे हे आप्ताचे सर्वज्ञाचे लक्षण मानणे योग्य नाही. कारण जो रागयुक्त आहे तो कामरूपी-नानारूपे धारण करतो व तो कृतकृत्य होत नाही ॥ ७४ ॥ जो आपल्या मूळच्या रूपाने आपले इच्छित प्राप्त करून घेण्यास समर्थ नाही तो कामरूपी जीव विकृतरूपाने कसा सुखी होईल ? याप्रमाणे पुरुषदृष्टान्ताचे वर्णन झाले ॥ ७५ ॥ बेड्या ज्याला घातलेल्या आहेत असा मनुष्य जसा इष्टस्थानी जाऊ शकत नाही तसा कर्मबन्धाने जखडलेला जीव आपले इष्टस्थानी-मुक्तिस्थानी जाऊ शकत नाही ॥ ७६ ॥ जसे बन्धनापासून रहित झालेला मनुष्य उत्तम स्वातन्त्र्य मिळवितो तसे कर्मबन्धनापासून सुटलेला जीवही तसाच स्वतन्त्र होतो ॥ ७७ ॥ म. ६२ Page #501 -------------------------------------------------------------------------- ________________ ४९०) महापुराण (४२-७८ निगलस्थो विपाशश्च स एवैकः पुमान्यथा । कर्मबद्धो विमुक्तश्च स एवात्मा मतस्तथा ॥ ७८ इति निगलदर्शनम्। मुक्तेतरात्मनोळक्त्यै द्वयमेतन्निदर्शनम् । तदृढीकरणायेष्टं सत्संसारिनिदर्शनम् ॥ ७९ यत्संसारिणमात्मानमुरीकृत्यान्यतन्त्रताम् । तस्योपदेशे मुक्तस्य स्वातन्त्र्योपनिदर्शनम् ॥ ८० मतः संसारिदृष्टान्तः सोऽयमाप्तीयदर्शने । मुक्तात्मनां भवेदेवं स्वातन्त्र्यं प्रकटीकृतम् ॥ ८१ तद्यथा संसृतौ देही न स्वतन्त्रः कथञ्चन । कर्मबन्धवशीभावाज्जीवत्यन्याश्रितश्च यत् ॥ ८२ ततः परप्रधानत्वमस्यैतत्प्रतिपादितम् । स्याच्चलत्वं च पुंसोऽस्य वेदनासहनादिभिः ॥ ८३ वेदनाव्याकुलीभावश्चलत्वमिति लक्ष्यताम् । क्षयकत्वं च देवादिभवे लब्धद्धिसडक्षयात् ॥ ८४ बाध्यत्वं ताडनानिष्टवचनप्राप्तिरस्य वै । अन्तवच्चास्य विज्ञानमक्षबोषः परिक्षयी ॥ ८५ जसे एकच पुरुष बेड्या ठोकलेला व बन्धनरहितहि होतो तसे तोच आत्मा कर्मबद्ध व विमुक्त-कर्मरहित होतो असे मानले जाते. याप्रमाणे बेडीचा दृष्टान्त दाखविला ॥ ७८ ।। मुक्तजीव व इतर कर्मबद्धजीव यांचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी हे दोन दृष्टान्त सांगितले व यानाच दृढ करण्यासाठी संसारीजीवाचा दृष्टान्त सांगितला आहे ॥ ७९ ॥ संसारीजीवाला उद्देशून जे त्यांच्या परतन्त्रतेचे वर्णन आहे ते परतन्त्रतावर्णन मुक्त जीवाच्या स्वतन्त्रतेचे उदाहरण होते. भावार्थ- संसारीजीवाच्या परतन्त्रतेचे वर्णन करण्याने मुक्तजीवाच्या स्वतन्त्रतेचे वर्णन आपोआप होते. कारण संसारीजीवाच्या परतन्त्रतेचा अभाव होणे म्हणजे मुक्तजीवाची स्वतन्त्रता होय ॥ ८० ॥ तोच हा संसारी जीवाचा दृष्टान्त आप्त-सर्वज्ञ जिनेश्वराच्या दर्शनात-मतांत सांगितला आहे. या दृष्टान्तावरून मुक्तजीवाचे स्वरूप संसारीजीवाच्या स्वरूपाहून वेगळे असल्यामुळे मुक्तांचे स्वातन्त्र्य प्रकट केले जाते ॥ ८१ ॥ ___ या संसारात देहधारी प्राणी- संसारी कोणत्याही प्रकाराने स्वतन्त्र नाही. कारण हा कर्मबंधाच्या अधीन झाला आहे व त्यामुळे तो अन्याश्रित-कर्माश्रित होऊन जगत आहे ।। ८२ ।। म्हणून या संसारीजीवाला कर्माश्रित होऊन-पराश्रित होऊन जगावे लागते असे सांगितले आहे व हा संसारी आत्मा चल आहे कारण याला वेदनादिक सहन कराव्या लागत आहेत. वेदनामुळे चंचलता याच्या ठिकाणी उत्पन्न होते ॥ ८३ ॥ वेदनानी व्याकुळ होणे याला चलत्व म्हटले आहे व या संसारीजीवाच्या ठिकाणी क्षयकत्वही आहे कारण देवादिकांच्या भवात प्राप्त झालेल्या ऋद्धीचा क्षय होत असल्यामुळे याला क्षयकत्वही आहे ।। ८४ ।। ___ या संसारीजीवाला बाध्यत्वहि आहे अर्थात् ठोकला जाणे, अप्रिय भाषण वगैरेनी बाध्यता आहे हे प्रत्यक्ष दिसते व या संसारीजीवाचे ज्ञान-इन्द्रियज्ञान नाशवंतही आहे म्हणून ते अन्तवान् आहे ।। ८५ ।। Page #502 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-९३) महापुराण (४९१ अन्तवदर्शनं चास्य स्यादैन्द्रियकदर्शनम् । वीर्य च तद्विधं तस्य शरीरबलमल्पकम् ॥ ८६ स्यादस्य सुखमप्येवम्प्रायमिन्द्रियगोचरम् । रजस्वलत्वमप्यस्य स्यात्काशः कलङ्कनम् ॥ ८७ भवेत्कर्ममलावेशादत एव मलीमसः । छेद्यत्वं चास्य गात्राणां द्विधाभावेन खण्डनम् ॥८८ मुद्गराधभिघातेन भेद्यत्वं स्याद्विदारणम् । जरावत्वं वयोहानिः प्राणत्यागो मतिर्मता ॥ ८९ प्रमेयत्वं परिच्छिन्नदेहमात्रावरुद्धता । गर्भवासोऽर्भकत्वेन जनन्युदरदुःस्थितिः ॥ ९० अथवा कर्मनोकर्मगर्भेऽस्य परिवर्तनम् । गर्भवासो विलीनत्वं स्याद्देहान्तरसङक्रमः ॥ ९१ क्षभितत्वं च संक्षोभः क्रोषाधाविष्टचेतसः । भवेद्विविधयोगोऽस्य नानायोनिष सङक्रमः ॥ ९२ संसारावास एषोऽस्य चतुर्गतिविवर्तनम् । प्रतिजन्मान्यथाभावो ज्ञानादीनामसिद्धता ॥ ९३ याचे दर्शन- इन्द्रियापासून होणारे दर्शन- वस्तूचे सामान्य अवलोकन तेही अन्तवत्नाशाने युक्त आहे व त्याचे वीर्यही अल्प आहे व नाशवंत आहे ।। ८६ ।। याचप्रमाणे या संसारीजीवाचे इन्द्रियानी अनुभवले जाणारे सुख देखिल इन्द्रिय बलाप्रमाणे अल्प आहे आणि कर्माच्या अंशानी ते मळकट व कलंकित आहे ।। ८७ ॥ म्हणूनच हा आत्मा कर्ममलाच्या आवेशाने मळकट होतो. कर्ममलाने अत्यन्त व्याप्त झाल्याने मळकट होतो. ते त्याचे चैतन्यस्वरूप त्यामुळे दिसेनासे होते. याचप्रमाणे हा आत्मा कर्मानी मळकट झाल्यामुळे याच्या शरीराचे दोन तुकडे करता येत असल्यामुळे याच्या ठिकाणी छेद्यत्वही आहे- तुकडे होण्याची योग्यता आहे ।। ८८ ।। मदगर, तरवार आदिकानी फोडणे हे देखिल याच्या अवयवात आहे यालाच विदारणही म्हणतात आणि जरावत्त्व म्हणजे वयाचा नाश होणे हेही पण आहे व त्यामुळे प्राण त्याग करणे- हा देह सोडून अन्य देह घेण्यासाठी जाणे हेही याच्या ठिकाणी आहे ॥ ८९ ॥ हा संसारी आत्मा प्रमेयत्वाला धारण करीत आहे. अर्थात् काही विशिष्ट लांबी, रुंदी, उंची याला धारण करणारा असा जो देह त्यात हा अडकून पडला आहे व बालक होऊन मातेच्या पोटात दुःखाने राहणे हे अर्थात् गर्भावासही याला प्राप्त झाला आहे. अथवा कर्म आणि नो कर्मरूप गर्भात फिरणे हेही याला प्राप्त होते अर्थात् या आत्म्याला संसारात भ्रमण करावे लागत आहे व हा संसारी आत्मा विलीनत्वधर्माला स्वभावाला धारण करीत आहे अर्थात् दुसऱ्या देहात प्रवेश करणे या स्वभावाला हा धारण करीत आहे ॥९०-९१ ॥ क्रोध, मान, माया, लोभादिक विकारानी युक्त होऊन अन्तःकरणाचा क्षोभ होणे या विकारानी अन्तःकरण भडकणे याला संक्षोभ म्हणतात. हा क्षोभ संसारी जीवात आढळतो व त्यामुळे अनेकप्रकारच्या पशुपक्ष्यादिकयोनीमध्ये तो जन्म घेतो. याला विविधयोग म्हणतात ॥ ९२ ॥ देवगति, मनुष्यगति, पशुगति व नरकगति या चार गतीमध्ये फिरणे याला संसारावास म्हणतात व प्रत्येक जन्मामध्ये ज्ञानादिगुणांची प्राप्ति न होणे याला असिद्धि म्हणतात ॥ ९३ ॥ Page #503 -------------------------------------------------------------------------- ________________ ४९२) महापुराण (४२-९४ सुखासुखं बलाहारौ देहावासौ च देहिनाम् । विवर्तन्ते तथाज्ञानं दृक्शक्ती च रजोजुषाम् ॥ ९४ एवंप्रायास्तु ये भावाः संसारिषु विनश्वराः । मुक्तात्मनां न सन्त्येते भावास्तेषां ह्यनश्वराः ॥ ९५ मुक्तात्मनां भवेद्धावः स्वप्रधानत्वमनिमम् । प्रतिलब्धात्मलाभत्वात्परद्रव्यानपेक्षणम् ॥ ९६ वेदनाभिभवाभावादचलत्वं गभीरता । स्यादक्षयत्वमक्षय्यं क्षायिकातिशयोदयः ॥ ९७ अव्याबाधत्वमस्यष्टं जीवाजीवरबाध्यता। भवेदनन्तज्ञानत्वं विश्वार्थाक्रमबोधनम् ॥ ९८ अनन्तदर्शनत्वं च विश्वतत्त्वाक्रमेक्षणम् । योऽन्यैरप्रतिघातोऽस्य सा मतानन्तवीर्यता ॥ ९९ भोग्येष्वर्थेष्वनौत्सुक्यमनन्तसुखता मता। नीरजस्त्वं भवेदस्य व्यपायः पुण्यपापयोः ॥ १०० ज्ञानावरणादिक कर्माना रज म्हणतात. यानी मलिन झालेल्या संसारीजीवाचे सुखदुःख, बल व आहार, शरीर व घर व ज्ञान आणि दर्शन या सर्व गुणात परिवर्तन होत असते ।। ९४ ॥ अशा रीतीचे संसारीजीवात जे भाव उत्पन्न होतात ते सर्व विनश्वर आहेत. पण मुक्तजीवामध्ये असे विकारी भाव नसतात पण जे मुक्तात्मे आहेत त्यांच्या ठिकाणचे ज्ञानादिगुण अत्यन्त निर्मल आणि ते नित्य असतात-विनाशरहित असतात ॥ ९५ ॥ ___ जे मुक्त जीव आहेत त्यांच्या ठिकाणी मुख्य भाव स्वप्रधानत्व हा आहे. अर्थात् सर्वश्रेष्ठ अशी स्वतन्त्रता आहे व त्याना आपल्या शुद्ध स्वरूपाची प्राप्ति झाल्यामुळे इतर द्रव्याची अपेक्षा राहात नाही. ते स्वस्वरूपात रमत असतात ।। ९६ ॥ त्याना सुखदुःखादिक वेदनेपासून बाधा-त्रास होत नसल्यामुळे या मुक्तात्म्यात अचलत्व अर्थात् गंभीरपणा प्राप्त झालेला असतो व कर्माचा नाश झाल्यामुळे अतिशयांची प्राप्ति झालेली असते व ती अविनाशी अक्षय अशी असते ॥ ९७ ॥ . या मुक्तात्म्याना अव्याबाधत्व प्राप्त झालेले असते. म्हणजे जीव व अजीवापासून याना कोणतीही बाधा होत नाही व याना अनन्तज्ञान प्राप्त झाल्यामुळे जगातील सर्व पदार्थाचे युगपत् ज्ञान यांना होते ।। ९८ ।। पूर्ण वस्तूचे अर्थात् सर्व जीवाजीवादिकतत्त्वांचे एकदम अवलोकन करणे त्यांचे सामान्यधर्माचे युगपत् अवलोकन होणे याला अनन्तदर्शन म्हणतात. हा गुण मुक्तजीवात असतो व या मुक्तजीवात अनन्तवीर्यता हा गुण असतो अर्थात् दुसऱ्याकडून त्यांच्यावर प्रतिघात-अघात होत नाही ही त्यांची अनंतवीर्यता आहे ।। ९९ ॥ भोग्यपदार्थात उत्कंठा नसणे हे मुक्तात्म्याचे अनन्त सुख होय आणि पुण्य व पाप यांचा पूर्ण अभाव होणे त्याला नीरजकता म्हणतात. तो गुण सिद्धांच्या ठिकाणी असतो ॥१०॥ Page #504 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-१०७) महापुराण निर्मलत्वं तु तस्येष्टं बहिरन्तर्मलच्युतिः । स्वभावविमलोऽनादिसिद्धो नास्तीह कश्चन ॥ १०१ योऽस्य जीवधनाकारपरिणामो मलक्षयात् । तदच्छेद्यत्वमाम्नातमभेद्यत्वं च तत्कृतम् ॥ १०२ अक्षरत्वं च मुक्तस्य क्षरणाभावतो मतम् । अप्रमेयत्वमात्मोत्थैर्गुणरुधरमेयता ॥ १०३ बहिरन्तर्मलापायावगर्भमलवासिता । कर्मनोकर्मविश्लेषात्स्यादगौरवलाघवम् ॥ १०४ तादवस्थ्यं गुणेरुद्धरक्षोभ्यत्वमतो भवेत् । अविलीनत्वमात्मीयैर्गुणैरप्यवपृक्तता १०५ प्राग्देहाकारमूतित्वं यदस्याहेयमक्षरम् । साभीष्टा परमा काष्ठा योगरूपत्वमात्मनः ॥ १०६ लोकानवासस्त्रैलोक्यशिखरे शाश्वती स्थितिः । अशेषपुरुषार्थानां निष्ठा परमसिद्धता ॥ १०७ बाह्यमल व अन्तर्मल अर्थात् ज्ञानावरणादि पुद्गलकर्मे व रागद्वेषमोहादिक अन्तर्मल या दोनप्रकारच्या मलापासून रहित मुक्तजीव असतात म्हणून त्यांच्या ठिकाणी निर्मलत्व हा गुण आहे. परन्तु स्वभावाने निर्मल आणि अनादिकालापासून सिद्ध कोणीही नाही ॥ १०१॥ सर्वकर्ममलांचा नाश झाल्यामुळे सिद्ध जीवांच्या प्रदेशांचे जे घनाकार परिणमन होते तेच अच्छेद्यत्व होय व या अच्छेद्यत्वामुळे अभेद्यत्व त्यांच्या ठिकाणी आहे ।। १०२ ॥ मुक्तजीवाचे प्रदेश क्षरण पावत नाहीत, म्हणून त्याच्या ठिकाणी अक्षरत्व आहे व त्याच्या आत्म्यापासून प्रकट झालेले जे अपरिमित उत्कृष्ट गुण त्यांची मोजणी करता येत नाही. म्हणून सिद्धांच्या ठिकाणी अप्रमेयता आहे ।। १०३ ॥ __ बाह्यमल व अन्तरंगमल यांचा नाश झाल्यामुळे त्यांना गर्भवास नाही हे सिद्ध होते व कर्मे आणि नोकर्मे ही दोन्ही त्यांच्या आत्म्यापासून कायमची वेगळी झाली आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी अगुरुलघुता आहे ॥ १०४ ॥ तो आत्मा आपल्या प्रशस्त गुणानी युक्त झाल्यामुळे तीच अवस्था त्याची नेहमी राहते म्हणून तो सिद्धात्मा आक्षोभच असतो व आपल्या गुणापासून तो केव्हाही वेगळा राहत नाही म्हणून अविलीनत्व गुण त्यामध्ये आहे ।। १०५ ॥ सिद्धावस्था प्राप्त होण्यापूर्वी जो शरीराचा आकार होता त्या आकारांत सिद्ध जीवाच्या प्रदेशांची मूर्ति राहते. तो आकार सिद्धात्म्याचा राहतो. तो कधी टाकता येत नाही व तो अक्षर असतो त्याचे कधी विघटन होत नाही. म्हणून तो आकार अक्षर आहे, क्षरण न पावणारा आहे व ही अवस्था याची परमकाष्ठा आहे परमहद्द व हे सिद्धात्म्याचे योगरूप आहे ।। १०६ ॥ त्रैलोक्याच्या शिखरावर सिद्धात्म्याचे नेहमी राहणे असते. हा त्यांचा लोकाग्रवास होय व येथे त्या सिद्धात्म्याच्या सर्व पुरुषार्थांची समाप्ति होते. ही त्यांची परमसिद्धता होय ।। १०७ ॥ Page #505 -------------------------------------------------------------------------- ________________ ४९४) महापुराण (४२-१०८ यः समग्रेर्गुणैरेभिर्जानादिभिरलङकृतः । कि तस्य कृतकृत्यस्य परद्रव्योपसर्पणः ॥ १०८ एष संसारिदृष्टान्तो व्यतिरेकेण साधयेत् । परमात्मानमात्मानं प्रभुमप्रतिशासनम् ॥ १०९ त्रिभिनिदर्शनैरेभिराविष्कृतमहोदयः । स आप्तस्तन्मते धोरराषया मतिरात्मनः ॥ ११० एवं हि क्षत्रियश्रेष्ठो भवेदृष्टपरम्परः । मतान्तरेषु दौःस्थित्यं भावयन्नुपपत्तिभिः ॥ १११ दिगन्तरेभ्यो व्यावं प्रबुद्धां मतिमात्मनः । सन्मार्गे स्थापयन्नेवं कुर्यान्मत्यनुपालनम् ॥ ११२ आत्रिकामत्रिकापायात्परिरक्षणमात्मनः । आत्मानुपालनं नाम तदिदानी विवृण्महे ॥ ११३ आत्रिकापायसंरक्षा सुप्रतीतैव धीमताम् । विषशस्त्राद्यपायानां परिरक्षणलक्षणा ॥ ११४ अत आमुत्रिकापायरक्षाविधिरनूद्यते । तद्रक्षणं च धर्मेण धर्मो ह्यापत्प्रतिक्रिया ॥ ११५ --------- हा सिद्धपरमात्मा संपूर्ण ज्ञानादिकगुणानी भूषित झालेला असतो. म्हणून तो कृतकृत्य झालेला असतो. म्हणून त्याला अन्यद्रव्याची प्राप्ति करून घेण्याने कोणते प्रयोजन सिद्ध करावयाचे असते ? अर्थात कोणतेच प्रयोजन सिद्ध करण्याचे उरले नाही ॥ १०८ ॥ हा संसारीजीवाचा दृष्टान्त व्यतिरेक रूपाने-निषेधरूपाने आहे व हा दृष्टान्त जो प्रभु आहे ज्याच्यावर कोणाचे शासन चालत नाही अशा परमात्मारूप आत्म्याची सिद्धि करून देत आहे ॥ १०९॥ या तीन उदाहरणानी ज्याचा मोठा उत्कृष्टपणा प्रकट केला आहे असा जो आत्मा त्याला आप्त म्हणतात व त्याच्या मतामध्ये विद्वानानी आपली बुद्धि ठेवावी, विश्वास ठेवावा ॥ ११०।। याप्रमाणे ज्याने सर्व परम्परा पाहिली आहे व वरील युक्तीनी अन्यमतातील दुष्टपणाचा तो विचार करतो ।। १११ ॥ तो क्षत्रियश्रेष्ठ विद्वान् आपल्या चतुरबुद्धीला अन्य उपदेशापासून वेगळी करून सन्मार्गात स्थापन करतो व अशा रीतीने आपल्या मतीचे पालन-रक्षण करतो ॥ ११२ ॥ या लोकासंबंधी व परलोकासंबंधी अपायापासून आत्म्याचे रक्षण करणे ते आत्मानुपालन होय व त्याचे आता आम्ही विवेचन करतो ॥ ११३ ।। इहलोकसंबंधी अपायापासून रक्षण करणे हे सर्व विद्वानांना चांगलेच माहीत आहे. विष, शस्त्र, आदिक अपायापासून आपले रक्षण करणे याला आत्म्याचे इहलोकसंबंधी रक्षण करणे म्हणतात व हे रक्षण करणे बुद्धिमान लोकांना परिचित आहेच ।। ११४ ॥ म्हणून परलोकी उत्पन्न होणाऱ्या अपायापासून स्वतःचे रक्षण कसे करून घ्यावे याचा विधि मी आता सांगतो. परलोकी अपायापासून रक्षण धर्माने होते व धर्म ही आपत्ति दूर करण्याचा उपाय आहे ॥ ११५ ॥ Page #506 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-१२३) महापुराण (४९५ धर्मो रक्षत्यपायेभ्यो धर्मोऽभीष्टफलप्रदः । धर्मः श्रेयस्करोऽमत्र धर्मेणेहाभिनन्दथुः ॥ ११६ तस्माद्धर्मंकतानः सन्कुर्यादेष्यत्प्रतिक्रियाम् । एवं हि रक्षितोऽपायात् भवेदात्मा भवान्तरे ॥ ११७ बह्वपायमिदं राज्यं त्याज्यमेव मनस्विनाम् । यत्र पुत्राः ससोदर्या वैरायन्ते निरन्तरम् ॥ ११८ अपि चात्र मनःखेवबहुले का सुखासिका । मनसो निर्वृति सौख्यमुशन्तीह विचक्षणाः ॥ ११९ राज्ये न सुखलेशोऽपि दुरन्ते दुरितावहे । सर्वतः शङ्कमानस्य प्रत्युतात्रासुखं महत् ॥ १२० ततो राज्यमिदं हेयमपथ्यमिव भेषजम् । उपादेयं तु विद्भिस्तपः पथ्यमिवाशनम् ।। १२१ इति प्रागेव निविद्य राज्ये भोगं त्यजेत्सुधीः । तथा त्यक्तुमशक्तोऽन्ते त्यजेद्राज्यपरिच्छदम् ॥१२२ कालज्ञानिभिरादिष्टे निर्णीते स्वयमेव वा । जीवितान्ते तनुत्यागमतिं दध्यादतः सुधीः ॥ १२३ ................................. धर्म हा संकटातून जीवाचे रक्षण करतो व तो आपणास आवडत्या वस्तु देणारा आहे व हा धर्म परलोकी कल्याण करणारा आहे. या धर्मानेच या लोकात आनन्द-सुख प्राप्त होते ॥ ११६ ।। म्हणून धर्माचरणात तत्पर होऊन पुढे येणाऱ्या आपत्तीचा-संकटाचा नाश करावा. याप्रमाणे वागल्याने परलोकात संकटापासून जीवाचे रक्षण होते ॥ ११७ ।। हे राज्य अनेक अपायानी भरलेले असल्यामुळे बुद्धिमंतानी त्यागलेच पाहिजे. कारण या राज्यात पुत्र व भाऊ नेहमी राजाचे वैरी होतात ॥ ११८ ।। व हे राज्य मनाला फार खेद देणारे आहे. म्हणून यात सुखाने राहणे कसे शक्य आहे ? शहाणे लोक मनाला निराकुलता प्राप्त होणे यालाच सुख म्हणतात ॥ ११९ ॥ हे राज्य ज्याचा शेवट वाईट आहे व पाप उत्पन्न करणारा आहे म्हणून यात थोडेसे देखिल सुख नाही. कारण या राज्यात शंका घेणान्याला सर्वापासून नेहमी मोठे असुख-दुःखच आहे ॥ १२० ॥ म्हणून हे राज्य हितकर नसलेल्या औषधाप्रमाणे त्याज्य आहे व पथ्य अशा अन्नाप्रमाणे विद्वानानी तपाचा आश्रय करावा ॥ १२१ ॥ म्हणून आधीच कंटाळून सुज्ञ मानवाने या राज्याचा त्याग करावा व त्याचा त्याग करण्यास असमर्थ असलेल्या सुज्ञाने अन्तसमयी त्या राज्याच्या साधनांचा त्याग करणे हितकर होईल ॥ १२२ ।। कालाचे जाणते अशा ज्योतिषी लोकानी सांगितलेल्या किंवा स्वतः आपल्या बुद्धीने निर्णय घेतलेल्या जीविताच्या अन्तसमयी शरीराचा त्याग करण्याचा सुज्ञराजाने विचार करावा ॥ १२३ ॥ Page #507 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४२-१२४ त्यागो हि परमो धर्मस्त्याग एव परं तपः । त्यागादिह यशोलाभः परत्राभ्युदयो महान् ॥ १२४ मत्वेति तनुमाहारं राज्यं च सपरिच्छदम् । त्यजेदायतने पुण्ये पूजाविधिपुरःसरम् ॥ १२५ गरुसा तथा त्यक्तदेहाहारस्य तस्य वै। परीषहजयायत्ता सिद्धिरिष्टा महात्मनः ॥ १२६ ततो ध्यायेदनप्रेक्षाः कृती जेतुं परीषहान् । विनानुप्रेक्षणश्चित्तसमाधानं हि दुर्लभम् ॥ १२७ प्रागभावितमेवाहं भावयामि न भावितम् । भावयामीति भावेन भावयेत्तत्त्वभावनाम् ॥ १२८ समुत्सृजेदनात्मीयं शरीरादिपरिग्रहम् । आत्मीयं तु स्वसाकुर्याद्रत्नत्रयमनुत्तरम् ॥ १२९ मनोव्याक्षेपरक्षार्थ ध्यायन्निति स धीरधीः । प्राणान्विसर्जयेदन्ते संस्मरन् परमेष्ठिनम् ॥ १३० तथा विसजितप्राणः प्रणिधानपरायणः । शिथिलीकृत्य कर्माणि शुभां गतिमुपाश्नुते ॥ १३१ तस्मिन्नेव भवे शक्तः कृत्वा कर्मपरिक्षयम् । सिद्धिमाप्नोत्यशक्तस्तु त्रिदिवाग्रमवाप्नुयात् ॥ १३२ __ कारण त्याग हाच उत्तम धर्म आहे व त्याग हाच उत्तम तप आहे. जो त्याग करतो त्याला यश व कीर्तीचा लाभ होतो व परलोकी त्याला मोठे ऐश्वर्य प्राप्त होते. त्याचे मोठे कल्याण होते ॥ १२४ ।। ___ असे मानून एखाद्या पवित्र आयतन-जिनालयात किंवा तीर्थक्षेत्री जिनपूजा विधि करून त्या क्षत्रियाने शरीर, आहार व छत्र, चामरादिक उपकरणासहित राज्याचा त्याग करावा ॥ १२५ ॥ गुरूच्या साक्षीने ज्याने देहाचा व आहाराचा त्याग केला आहे अशा त्या महात्म्याला क्षुधा, तहान आदिक बाधावर विजय मिळविल्यामुळे इष्ट सिद्धि होते ॥ १२६ ।। परिषहाना जिंकण्यासाठी त्या संयमी क्षत्रियाने अनित्यादिक बारा भावनांचे चिन्तन करावे व अनुप्रेक्षांच्या चिन्तनावाचून चित्ताची एकाग्रता होणे दुर्लभ आहे ॥ १२७ ।। पूर्वी ज्यांचे मी चिन्तन केले नाही त्यांचे आता मी चिन्तन करतो. पण ज्याचे मी पूर्वी चिन्तन केले आहे त्याचे आता चिन्तन करीत नाही अशा भावनेने तत्त्वभावना चिंतावी ॥१२८॥ शरीर, धन, राज्यादिक हे माझे स्वरूप नाही म्हणून त्यांचा त्याग करावा व सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र यांच्यापेक्षा जगात कोणताही पदार्थ उत्तम नाही असे समजून ते रत्नत्रय प्राप्त करून घ्यावे ।। १२९ ।। मनाची चंचलता नाहीशी करण्याकरिता धैर्ययुक्त बुद्धिधारक मुनिवर्याने याप्रमाणे चिंतन करून परमेष्ठीचे स्मरण करीत प्राण विसर्जन करावे ॥ १३० ।। जो पुरुष ध्यानात तत्पर राहून प्राणत्याग करतो तो आपली कर्मे शिथिल करतो व त्यामुळे शुभ गतीत प्रवेश करतो ।। १३१ ।। जो चरमशरीरी तद्भव मोक्षगामी आहे तो त्याच भवात कर्मांचा पूर्ण क्षय करून सिद्धि प्राप्त करून घेतो व जो असमर्थ आहे, तद्भवमोक्षगामी नाही तो स्वर्गाच्या अग्राची अर्थात् सर्वार्थसिद्धीची प्राप्ति करून घेतो ॥ १३२ ।। Page #508 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-१४१) महापुराण (४९७ ततश्च्युतः परिप्राप्तमानुष्यः परमं तपः । कृत्वान्ते निर्वृति याति निधूताखिलबन्धनः ॥ १३३ क्षत्रियो यस्त्वनात्मजः कुर्यान्नात्मानुपालनम् । विषशस्त्रादिभिस्तस्य दुर्मतिर्धवभाविनी ॥ १३४ दुर्मूतश्च दुरन्तेऽस्मिन्भवावर्ते दुरुत्तरे। पतित्वाऽमुत्र दुःखानां दुर्गतौ भाजनं भवेत् ॥ १३५ ततो मतिमतात्मीयविनिपातानुरक्षणे । विधेयोऽस्मिन्महायत्नो लोकद्वयहितावहे ॥ १३६ कृतात्मरक्षणश्चैव प्रजानामनुपालने । राजा यत्नं प्रकुर्वीत राज्ञां मौलो ह्ययं गुणः ॥ १३७ कथं च पालनीयास्ताः प्रजाश्चेत्तत्प्रपञ्चनम् । पुष्टं गोपालदृष्टान्तमुरीकृत्य विवृण्महे ।। १३८ गोपालको यथा यत्नाद्गाः संरक्षत्यतन्द्रितः । मापालश्च प्रयत्नेन तथा रक्षेतिजाः प्रमाः ॥१३९ तद्यथा यदि गौः कश्चिदपराधी स्वगोकुले । तमङ्गच्छेदनाद्यनदण्डस्तीव्रमयोजयन् ॥ १४० पालयेवनुरूपेण दण्डेनैव नियन्त्रयन् । यथा गोपस्तथा भूपः प्रजाः स्वाः प्रतिपालयेत् ॥ १४१ त्या सर्वार्थसिद्धिस्थानापासून आयुष्यान्ती च्युत होऊन येथे मनुष्यभव प्राप्त करून घेतो व उत्कृष्ट तप करून सर्वकर्मबन्धनापासून तो पूर्णमुक्त होतो व शेवटी तो मोक्षास जातो ।। १३३ ॥ जो क्षत्रिय आत्म्याचे स्वरूप जाणत नाही तो आपल्या आत्म्याचे रक्षण करीत नाही. त्याला विषशस्त्र इत्यादिकानी वाइट मरण निश्चयाने येईल ॥ १३४ ॥ जर हा क्षत्रिय वाईट मरणाने मरेल तर ज्याच्यातून तरून जाणे कठिण आहे व ज्याचा शेवट दुःखदायक आहे, अशा या संसाररूपी भोवऱ्यात पडून परलोकी नरकादि दुःखदायक गतीत दुःखांचे स्थान बनेल ।। १३५ ।। म्हणून बुद्धिमान् क्षत्रियाने इहपरलोको हितकर, सुख देणारे व आत्म्याला नरकादि गतिपासून रक्षिणारे जे हे आत्मानुपालन आहे त्यात मोठा प्रयत्न करावा ॥ १३६ ॥ ज्याने आत्मानुपालन म्हणजे आत्मरक्षण केले आहे त्या राजाने प्रजेचे रक्षण करण्यात प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रजांचे पालन, पोषण करणे हा राजांचा मुख्य गुण आहे ।। १३७ ।। राजाने प्रजांचे रक्षण कसे करावे असा प्रश्न विचाराल तर त्याच्या विस्ताराविषयी आम्ही गोपालाचे अर्थात् गवळयाचे उदाहरण घेऊन स्पष्टीकरण करीत आहोत ॥ १३८ । गवळी जसा आपल्या कार्यात निरलस राहून प्रयत्नाने गोपालन करतो तसे राजाने आपल्या प्रजांचे प्रयत्नाने रक्षण करावे ॥ १३९ ॥ जर एखादा बैल आपल्या गोसमूहात अपराधी झाला तर त्याला तो गवळी त्याचा अवयव तोडणे वगैरे कठोर शिक्षा करीत नाही पण अनुरूप अशी शिक्षा त्याला तो करतो व त्याचे पालन करतो तसे राजानेही आपल्या प्रजेला तीव्र दंड न करता अपराधानुरूप दंड करावा व आपल्या प्रजेचे रक्षण करावे ॥ १४०-१४१ ।। म. ६३ Page #509 -------------------------------------------------------------------------- ________________ ४९८) तीक्ष्णो दण्डो हि नृपतेस्तीव्रमुद्वेजयेत्प्रजाः । ततो विरक्तप्रकृति जहघुरेनममूः प्रजाः ॥ १४२ यथा गोपालको मौलं पशुवगं स्वगोकुले । पोषयन्नेव पुष्टः स्याद्गोपोषं प्राज्यगोधनः ॥ १४३ तथैष नृपतिमालं तन्त्रमात्मीयमेकतः । पोषयन्पुष्टिमाप्नोति स्वे परस्मिश्च मण्डले ।। १४४ पुष्टो मौलेन तन्त्रेण यो हि पार्थिवकुञ्जरः । स जयेत्पृथिवीमेनां सागरान्तामयत्नतः ॥ १४५ प्रभग्नचरणं किञ्चिद्गोद्रव्यं चेत्प्रमादतः । गोपालस्तस्य सन्धानं कुर्याद्बन्धाद्युपक्रमैः ॥ १४६ बद्धाय च तृणाद्यस्मै दत्वा दाढर्ये नियोजयेत् । उपद्रवान्तरेऽप्येवमाशु कुर्यात्प्रतिक्रियाम् ॥ १४७ यथा तथा नरेन्द्रोऽपि स्वबले व्रणितं भटम् । प्रतिकुर्याद्भिषग्वर्या नियोज्यौषघसम्पदा ॥ १४८ दृढीकृतस्य चास्योद्धजीवनादि प्रचिन्तयेत् । सत्येवं भृत्यवर्गोऽस्य शश्वदाप्नोति नन्दथुम् ॥ १४९ यथैव खलु गोपालः सन्ध्यस्थिचलने गवाम् । तदस्थि स्थापयन्प्राग्वत्कुर्याद्योग्यां प्रतिक्रियाम् ॥ १५० तथा नृपोऽपि सङ्ग्रामे भृत्यमुख्ये व्यसौ सति । तत्पदे पुत्रमेवास्य भ्रातरं वा नियोजयेत् ॥ १५१ सति चैवं कृतज्ञोऽयं नृप इत्यनुरक्तताम् । उपैति भृत्यवर्गोऽस्मिन् भवेच्च ध्रुवयोधनः ॥ १५२ महापुराण तीक्ष्ण दंड करणारा राजा प्रजेला फार त्रास देतो व प्रजा त्याच्याविषयी विरक्त होते आणि मग विरक्त झालेली प्रजा राजाचा त्याग करते ।। १४२ ॥ (४२ - १४२ जसा गवळी आपल्या खिल्लारातील मुख्य पशुसमूहाला चांगल्या रीतीने पोसून पुष्ट करतो, ज्याचे गोधन उत्तम आहे व पुष्ट आहे असा तो गवळी ही पुष्ट होतो ।। १४३ ।। तसेच हा राजाही आपल्या मुख्यप्रजेचे आपल्या एका मुख्यराज्याचे पोषण करून आपल्या व इतराच्या राज्यातही पुष्टि - ऐश्वर्याची वृद्धि प्राप्त करून घेतो ।। १४४ ।। जो श्रेष्ठ राजा आपल्या मुख्यसैन्याने पुष्ट होतो तो या समुद्रापर्यन्त पृथ्वीला प्रयत्नावाचून जिंकील ।। १४५ ।। जर त्या गवळयाच्या गायीचा किंवा बैलाचा चुकीने पाय मोडला तर तो पाय बांधणे, त्याला औषध लावणे, त्याला विश्रान्ति देणे इत्यादि कार्यानी त्याचा तो पाय जुळवितो व बांधून टाकलेल्या त्या जनावराला गवत, पेंड वगैरे देऊन पायाला बळकटी येईल अशी योजना करतो. इतर आणखी काही त्याला पीडा झाली तर तो तिचा शीघ्र प्रतीकार करतो. तसाच हा राजा देखिल आपल्या सैन्यातील एखादा शूर सैनिक जखमी झाला तर उत्कृष्ट अशा वैद्याकडून उत्तम औषध देऊन त्याची जखम नाहीशी करतो व जखम नाहीशी करून मजबूत केलेल्या या सैनिकाच्या उत्कृष्ट जीवनादिकाची चिन्ता वाहतो व असे राजाने त्याची व्यवस्था ठेवली म्हणजे राजाचा तो नोकरसमूह देखिल नेहमी आनंदित राहतो ।। १४६-१४९ ।। जसे गवळी त्याच्या गाय वगैरेचे सन्धियुक्त हाड स्थानापासून सरकले असतां ते हाड पूर्वस्थानी बसविण्याचा इलाज करतो, योग्य उपाय योजतो तसे हा राजा देखिल युद्धामध्ये त्याचा मुख्य सैनिक मरण पावला तर त्याच्या मुलाची किंवा भावाची त्याच्या स्थानी योजना करतो व असे राजाने कार्य केले असता हा राजा कृतज्ञ आहे असे वाटून नोकरवर्ग राजावर अनुरक्त होतो व तो युद्धामध्ये निश्चयाने लढणारा होतो ।। १५०-१५२ ।। Page #510 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-१६२) महापुराण यथा खल्वपि गोपालः कृमिदष्टे गवां गणे । तद्योग्यमौषधं दत्वा करोत्यस्य प्रतिक्रियाम् ॥ १५३ तथैव पृथिवीपालो दुविषं स्वानुजीविनम् । विमनस्क विदित्वैनं सौचित्ये संनियोजयेत् ॥ १५४ विरक्तोऽस्यानुजीवी स्यादलब्धोचितजीवनः । प्रभोविमाननाच्चैव तस्माननं विरूक्षयेत् ॥ १५५ तद्दौर्गत्यं व्रणस्थानकृमिसम्भवसन्निभम् । विदित्वा तत्प्रतीकारमाशु कुर्याद्विशांपतिः ॥ १५६ बहुनापि न दत्तेन सौचित्त्यमनजीविनाम् । उचितात्स्वामिसंमानात् यथैषां जायते धृतिः ॥ १५७ गोपालको यथा यूथे स्वे महोक्षं भरक्षमम् । ज्ञात्वास्य नस्यकर्मादि विदध्याद्गात्रपुष्टये ॥ १५८ तथा नृपोऽपि सैन्ये स्वे योद्धारं भटसत्तमम् । ज्ञात्वेनं जोवनं प्राज्यं दत्वा संमानयेत्कृती ॥ १५९ कृतापदानं तद्योग्यः सत्कारैः प्रीणयन्प्रभुः । न मुच्यतेऽनुरक्तैः स्वैरनुजीविभिरन्वहम् ॥ १६० यथा च गोपो गोयूथं कण्टकोपलवजिते । शीतातपादिबाधाभिरुज्झिते चारयन्वने ॥ १६१ पोषयत्यतियत्नेन तथाभूपोऽप्यविप्लवे । देशे स्वानुगतं लोकं स्थापयित्वाभिरक्षयेत् ॥ १६२ जसा तो गवळी गायीना एखादा किडा चावला असता त्या वेदना नाहीशा करण्यासाठी योग्य औषध देऊन वेदनांचा प्रतीकार करतो तसेच हा राजाही आपल्या नोकराची दरिद्रावस्था पाहून व त्याची खिन्नता जाणून त्याचे मन निष्काळजीचे होईल अशी योजना करतो. त्याला समाधानात ठेवतो ॥ १५३-१५४ ।। ज्याला योग्य उपजीविका मिळाली नाही असा तो राजसेवक राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे राजाविषयी विरक्त होईल म्हणून राजाने त्याला प्रेमशून्य करू नये ॥ १५५॥ __ सेवकाचा दरिद्रीपणा हा जनावराच्या व्रणाच्या ठिकाणी कीड उत्पन्न झाल्याप्रमाणे आहे असे जाणून राजाने त्याच्या दरिद्रतेचा शीघ्न प्रतीकार करावा ॥ १५६ ॥ आपल्या प्रभूने नोकरांचा योग्य संमान केल्याने जसा त्याना संतोष वाटतो तसे त्याना पुष्कळ दिल्यानेही त्यांच्या मनाला सन्तोष वाटत नाही ॥ १५७ ॥ __ जसे गवळी आपल्या खिल्लारात ओझे वाहण्याला समर्थ असा मोठा बैल बघून तो शरीराने पुष्ट व्हावा म्हणून त्याच्या नाकात तेल घालणे आदिक कार्य तो करतो ॥ १५८ ॥ तसे राजाने देखिल आपल्या सैन्यात योद्धा असा उत्कृष्ट वीर जाणून त्याला भरपूर जीवनधन द्यावे व त्याचा सत्कार करावा ॥ १५९ ।। ज्यानीं पराक्रम गाजविला आहे अशा नोकराना वीर पुरुषाना त्यांच्या योग्य सत्कारानी संतुष्ट करणारा राजा नेहमी नोकराकडून आदरिला जातो, नोकर त्याच्यावर नेहमी प्रेम करतात व ते त्याचा कधीही त्याग करीत नाहीत ।। १६० ।। जसे गवळी आपल्या गायीबैलांच्या कळपाला ज्या ठिकाणी काटे व दगड यानी रहित व थंडी, ऊन वारा इत्यादिकानी बाधारहित अशा ठिकाणी वनात चारतो व त्यांचे प्रयत्नाने पोषण करतो. तसे राजानेही निरुपद्रवी अशा ठिकाणी आपणास अनुसरणाऱ्या लोकानानोकाराना ठेवून त्यांचे रक्षण करावे ॥ १६१-१६२ ।। Page #511 -------------------------------------------------------------------------- ________________ ५००) महापुराण (४२-१६३ राज्यादिपरिवर्तेऽस्य जनोऽयं पोड्यतेऽन्यथा। चौरर्डमरकैरन्यैरपि प्रत्यन्तनायकः ॥ १६३ प्रसह्य च तथाभूतान्वृत्तिच्छेदेन योजयेत् । कण्टकोद्धरणेनैव प्रजानां क्षेमधारणम् ॥ १६४ यथैव गोपः सञ्जातं वत्सं मात्रा सहानुगम् । दिनमेकमवस्थाप्य ततोऽन्येधुर्दयावधीः ॥ १६५ विधाय चरणे तस्य शमैर्बन्धनसन्निधिम् । नाभिनालं पुनर्गर्भनालेनापास्य यत्नतः ॥ १६६ जन्तुसम्भवशङ्कायां प्रतीकारं विधाय च । क्षीरोपयोगदानाद्यैर्वर्द्धयेत्प्रतिवासरम् ॥ १६७ भूपोऽप्येवमुपासन्नं वृत्तये स्वमुपासितुम् । यथानुरूपं संमानः स्वीकुर्यादनुजीविनम् ॥ १६८ स्वीकृतस्य च तस्योद्घजीवनाविप्रचिन्तया । योगक्षेमं प्रयुञ्जीत कृतक्लेशस्य सादरम् ॥१६९ यथैव खलु गोपालः पशून्क्रेतुं समुद्यतः । क्षीरावलोकनायेस्तान्परीक्ष्य गुणवत्तमान् ॥ १७० योग्य ठिकाणी जर आपल्या सैन्याला राजाने ठेवले नाही तर या राजाच्या राज्याचे परिवर्तन झाले तर आपल्या लोकाना पीडा होण्याचा संभव आहे अथवा चोर, दरोडा घालणारे लोक, म्लेच्छ राजे किंवा आपल्या राज्याच्या जवळ ज्यांचे राज्य आहे अशा राजाकडून पीडा होण्याचा संभव असतो ॥ १६३ ॥ चोर वगैरे लोकावर हल्ला करून त्यांच्या उपजीविकेचा नाश करावा. कारण असले काटे काढून टाकल्यानेच प्रजांचे रक्षण होते, प्रजेचे कल्याण होते ॥ १६४ ।। जसे ज्याचे अन्तःकरण दयाळु आहे असा गवळी आपल्या मातेबरोबर हिंडणाऱ्या वासराला एक दिवस तसेच ठेवून दुसरे दिवशी त्याचा पाय हळूच बांधतो व त्याच्या नाळीबरोबर जी वार असते ती सावधगिरीने काढून टाकतो ।। १६५ ।। त्यात कीड उत्पन्न होईल असे त्याला वाटले तर तो त्याच्यावर इलाज करून त्या वासराला दूध पाजणे व अन्य काही अन्न चारणे वगैरेनी त्याला तो प्रतिदिवशी वाढवितो ।। १६६-१६७ ।। राजाने देखिल उपजीविकेच्या हेतूने आपल्याजवळ आपली सेवा करण्यासाठी आलेल्या नोकरांचा त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांचा संमान करून त्यांचा स्वीकार करावा ॥ १६८ ॥ ज्यांचा स्वीकार केला आहे व आपल्यासाठी जे कष्ट सहन करतात त्यांच्याकरिता उत्तम उपजीविकेचा राजाने विचार करावा व आदराने त्यांचा योगक्षेम चालवावा ॥ १६९ ॥ Page #512 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-१७९) महापुराण (५०१ क्रोणाति शकुनादीनामवधारणतत्परः । कुलपुत्रान्नृपोऽप्येवं क्रीणीयात्सुपरीक्षितान् ॥ १७१ क्रीतांश्च वृत्तिमूल्येन तान्यथावसरं प्रभुः । कृत्येष विनियुञ्जीत भृत्यः साध्यं फलं हि तत् ॥१७२ यथैव प्रतिभूः कश्चिद्गोक्रये प्रतिगृह्यते । बलवान्प्रतिभूस्तद्वद्ग्राह्यो भृत्योपसङग्रहे ॥ १७३ याममात्रावशिष्टायां रात्रावुत्थाय यत्नतः । चारयित्वोचिते देशे गाः प्रभूततृणोदके ॥ १७४ प्रातस्तरामथानीय वत्सपीतावशिष्टकम् । पयो दोग्धि यथा गोपो नवनीतादिलिप्सया ॥ १७५ तथा भूयोऽप्यतन्द्रालुभक्तग्रामेष कारयेत् । कृषि कर्मान्तिकर्बोजप्रदानाधरुपक्रमः ॥ १७६ देशेऽपि कारयेत्कृत्स्ने कृषि सम्यक् कृषीवलैः। धान्यानां संग्रहाथं च न्याय्यमंशं ततो हरेत् ॥१७७ सत्येवं पुष्टतन्त्रः स्याद्भाण्डागारादिसम्पदा । पुष्टो देशश्च तस्यैवं स्याद्धान्यराशितम्भवैः॥ १७८ स्वदेशेऽत्राक्षरम्लेच्छान्प्रजाबाधाविधायिनः । कुलशुद्धिप्रदानाद्यैः स्वसाकुर्यादुपक्रमैः ॥ १७९ जसे गवळी जेव्हा गायी विकत घेण्यास उद्युक्त होतो. तेव्हा त्यांचे दूध काढून पाहतो, त्यांची पुष्टि वगैरे पाहतो याप्रमाणे पाहून परीक्षा करून त्यांच्या गुणांची उत्कृष्टता वगैरे विचारात घेऊन व शकुन वगैरे पाहण्याविषयी तत्पर राहून त्या विकत घेतो. त्याप्रमाणे राजाने उच्चकुलीन मुलाना चांगल्या रीतीने परीक्षा करून विकत घ्यावे. वृत्तिरूपी किंमत देऊन म्हणजे पगार किंवा जमीन वगैरे देऊन विकत घेतलेल्या त्या कुमाराना योग्य समयी त्याना कार्यात योजावे. कारण ते कार्यरूपी फल राजाने सेवकाकडूनच साधावयाचे असते. जसे गायी विकत घेताना एखादा जामीन गवळी घेतो तसे नोकराना ठेवताना चांगला समर्थ जामीन राजाने घ्यावा ॥ १७०-१७३ ॥ ___ एक प्रहररात्र जेव्हा उरलेली असते त्यावेळी गवळी उठून जेथे पुष्कळ पाणी व गवत आहे अशा ठिकाणी गायींना सावधगिरीने तो चारून आणतो व प्रातःकाली वासरू पिऊन राहिलेले दूध लोणी वगैरेच्या इच्छेने काढून घेतो ॥ १७४-१७५ ॥ याचप्रमाणे राजानेही आळस टाकावा व आपल्या ताब्यात घेतलेल्या गावात शेतकऱ्याना बी वगैरे देऊन त्यांच्याकडून शेतकी करवावी ।। १७६ ।। याचप्रमाणे आपल्या सर्व देशात देखिल शेतक-याकडून चांगल्यारीतीने शेतकी करवावी. म्हणजे धान्याचा चांगला साठा होईल व त्यामुळे राजाने शेतकऱ्यापासून योग्य धान्याचा वाटा घ्यावा ॥ १७७ ॥ अशा पद्धतीने जो राजा वागेल त्याच्या भाण्डारादिकात विपुल संपत्ति होईल व त्याचे बल वाढेल. तृप्ति सुख देणाऱ्या त्या धान्यानी त्याचा देशही पुष्ट होईल ॥ १७८ ॥ ____ आपल्या देशात जे कोणी अक्षरम्लेच्छ प्रजेला बाधा देणारे आहेत त्याना कुलशुद्धि देणे वगैरेनी आपल्यासारखे करावे ।। १७९॥ Page #513 -------------------------------------------------------------------------- ________________ ५०२) विक्रियां न भजन्त्येते प्रभुणा कृतसत्क्रियाः । प्रभोरलब्धसम्माना विक्रियन्ते हि तेऽन्वहम् ।। १८० ये केचिच्चाक्षरम्लेच्छाः स्वदेशे प्रचरिष्णवः । तेऽपि कर्षकसामान्यं कर्तव्याः करदा नृपैः ॥ १८१ तान्प्राहुरक्षरम्लेच्छा येsयी वेदोपजीविनः । अधर्माक्षर सम्पातैर्लोकव्यामोहकारिणः ॥ १८२ यतोऽक्षरकृतं गर्वमविद्याबलतस्तके । वहन्त्यतोऽक्षरम्लेच्छाः पापसूत्रोपजीविनः ॥ १८३ म्लेच्छाचारी हि हिंसायां रतिर्मांसाशनेऽपि च । बलात्परस्वहरणं निर्ऋतत्वमिति स्मृतम् ॥ १८४ सोsस्त्यमीषां च यद्वेदशास्त्रार्थमधमद्विजाः । तादृशं बहुमन्यन्ते जातिवादावलेपतः ॥ १८५ प्रजासामान्यतैवैषां मता वा स्यान्निकृष्टता । ततो न मान्यतास्त्येषां द्विजा मान्याः स्युरार्हताः ॥ १८६ वयं निस्तारका देवब्राह्मणा लोकसम्मताः । धान्यभागमतो राज्ञे न दद्म इति चेन्मतम् ॥ १८७ वैशिष्ट्यं किंकृतं शेषवर्णेभ्यो भवतामिह । न जातिमात्रा द्वैशिष्ट्यं जातिभेदाप्रतीतितः ॥ १८८ गुणतोष न वैशिष्ट्यमस्ति वो नामधारकाः । व्रतिनो ब्राह्मणा जैना ये त एव गुणाधिकाः ॥ १८९ निर्व्रता निर्नमस्कारानिर्घुणाः पशुघातिनः । म्लेच्छाचारपरा यूयं न स्थाने धार्मिका द्विजाः ॥ १९० तस्मादनक्षरम्लेच्छा इव तेऽमी महीभुजाम् । प्रजासामान्यधान्यांशदानाद्यैरविशेषिताः ॥ १९१ महापुराण (४२-१८० जे कोणी अक्षरम्लेच्छ-वेदोपजीवि ब्राह्मण आहेत त्यांचा राजाकडून सन्मान झाला म्हणजे ते विकारयुक्त होणार नाहीत पण राजाने त्यांचा सन्मान केला नाही तर नेहमी विकारयुक्त होतील ।। १८० ।। वेदावर उपजीविका करणान्या या ब्राह्मणाना अक्षरम्लेच्छ म्हणतात. ते अधर्माचे प्रतिपादन करणारे, अक्षरांचे अध्ययन करून लोकाना मोहयुक्त करतात ।। १८१ ॥ म्हणून जे कोणी अक्षरम्लेच्छ आपल्या देशात संचार करीत असतील त्याना देखिल शेतकन्याप्रमाणे समजून ते कर देणारे होतील असे करावे ।। १८२ ।। कारण हे वेदाक्षराच्या अभ्यासामुळे गर्व धारण करतात म्हणून पापदायक सूत्रावरवेदावर याची उपजीविका चालते ।। १८३ ।। हिंसा करण्यात प्रेम असणे, मांस भक्षण्यात आसक्ति असणे आणि जबरदस्तीने दुसऱ्याचे धन हरण करणे व धूर्तता - स्वैराचाराने वागणे याला म्लेच्छाचार म्हणतात ।। १८४ ।। वरील श्लोकात सांगितलेला आचार यांचा आहे व तो हे ब्राह्मण आपल्या जातिवादाच्या गर्वामुळे फार चांगला आहे असे मानतात ।। १८५ । म्हणून या ब्राह्मणाना इतर प्रजेप्रमाणे सामान्यताच समजावी किंवा यांना निकृष्ट समजावे. म्हणून हे वेदाचे अध्ययन करणारे ब्राह्मण मान्य नाहीत पण जे जिनमताला मानणारे ब्राह्मण मात्र श्रेष्ठ आहेत ।। १८६ ।। आम्ही सर्वाना संसारसमुद्रातून तारणारे लोकमान्य वेदब्राह्मण आहोत म्हणून आम्ही राजाला धान्याचा भाग देणार नाही असे जर त्यांचे मत असेल तर त्यांना असे विचारावे बाकीच्या क्षत्रियादि वर्णापेक्षा तुमच्यात काय विशेषता आहे हे सांगा. नुसत्या जातीनेच तुमच्यात विशेषता आहे असे म्हणाल तर जातीमध्ये काही विशेषता आढळून येत नाही. Page #514 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-१९८) महापुराण (५०३ किमत्र बहुनीक्तेन जैनान्मुक्त्वा द्विजोत्तमान् । नान्ये मान्या नरेन्द्राणां प्रजासामान्यजीविकाः॥१९२ अन्यच्च गोधनं गोपो व्याघ्रचौराद्युपद्रवात् । यथा रक्षत्यतन्द्रालु पोप्येवं निजाः प्रजाः ॥ १९३ यथा च गोकुलं गोमत्यायाते सन्दिदृक्षया। सोपचारमुपेत्यैनं तोषयेद्धनसम्पदा ॥ १९४ भूपोऽप्येवं बली कश्चित्स्वराष्ट्र गद्यभिद्रवेत् । तदा वृद्धः समालोच्य सन्दध्यात्पणबन्धतः॥ १९५ जनक्षयाय सङग्रामो बह्वपायो दुरुत्तरः । तस्मादुपप्रदानाः संधेयोरिबलाधिकः ॥ १९६ इति गोपालदृष्टान्तमुरीकृत्य नरेश्वरः। प्रजानां पालने यत्नं विदध्वान्नयवर्त्मना ।। १९७ प्रजानुपालनं प्रोक्तं पार्थिवस्य जितात्मनः । समञ्जसत्वमधुना वक्ष्यामस्तद्गुणान्तरम् ॥ १९८ गुणानी देखिल विशिष्टपणा तुमच्यात नाही. कारण तुम्ही नामधारी ब्राह्मण आहात पण जे जैन ब्राह्मण आहेत ते व्रतधारक आहेत त्यामुळे तेच गुणधारक आहेत तुम्ही व्रतरहित आहात. म्हणून नमस्कार करण्यास पात्र नाहीत व पशुघाती असल्यामुळे तुम्ही दुष्ट दयारहित आहात. तुमच्या ठिकाणी म्लेच्छाचार आहे म्हणून तुम्ही चांगले धार्मिक ब्राह्मण नाहीत. म्हणून अनक्षर म्लेच्छाप्रमाणे राजा तुम्हाला अक्षरम्लेच्छ म्हणून मानीत आहेत म्हणून इतर प्रजेप्रमाणे तुम्ही धान्यांश देणे वगैरे गोष्टीनी समान आहात ।। १८७-१९१ ।। आम्ही आता अधिक सांगत नाही. राजाना जैनब्राह्मण हेच श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून मान्य आहेत. दुसरे पशुघातकी ब्राह्मण राजाना मान्य नाहीत ते बाकीच्या प्रजेप्रमाणे पोसण्यास योग्य आहेत ।। १९२ ॥ दुसरे असे येथे सांगावयाचे की, आळसरहित गवळी आपल्या गोधनाचे वाघ, चोर आदिकाच्या उपद्रवापासून रक्षण करतो याप्रमाणे राजाने देखिल निरलस होऊन आपल्या प्रजेचे काळजीने रक्षण करावे ॥ १९३ ।। जसे राजा गोकुळ पाहण्याच्या इच्छेने आला असता गवळी नजराणा वगैरे घेऊन राजाकडे येऊन त्याचे स्वागत करतो व त्याला धनसंपदेने आनंदित करतो ॥ १९४ ॥ तसेच राजा देखिल बलवान् दुसरा राजा आपल्या राष्ट्रावर येईल तर त्यावेळी आपल्या ज्ञानवृद्ध प्रधानादिकाशी विचार करून त्या राजाबरोबर त्याने संधि करावा ॥ १९५ ।। कारण त्या बलवान् राजाबरोबर लढण्यापासून आपल्या लोकांचा नाश होईल व त्या लढाईपासून आपले फार नुकसान होईल व त्या नुकसानीची भरपाई होणार नाही. यास्तव त्या शत्रूला धन वगैरे देऊन संधि करावा ॥ १९६ ।। याप्रमाणे गवळ्याच्या दृष्टान्ताचा स्वीकार करून राजाने नीतीच्या मार्गाने प्रजेचे रक्षण करण्यात नेहमी यत्न करावा ।। १९७ ।। ___ ज्याने आपली इन्द्रिये ताब्यात ठेवली आहेत अशा राजाचे प्रजारक्षणकर्तव्याचे हे वर्णन केले आहे. आता राजाचा समंजसत्व नांवाचा जो दुसरा गुण आहे त्याचे आम्ही वर्णन करतो ॥ १९८॥ Page #515 -------------------------------------------------------------------------- ________________ ५०४) महापुराण (४२-१९९ राजा चित्तं समाधाय यत्कुर्यादुष्टनिग्रहम् । शिष्टानुपालनं चैव तत्सामञ्जस्यमुच्यते ॥ १९९ द्विषन्तमथवा पुत्रं निगृह्वन्निग्रहोचितम् । अपक्षपतितो दुष्टमिष्टं चेच्छन्ननागसम् ॥ २०० मध्यस्थवृत्तिरेवं यः समदर्शी समञ्जसः । समञ्जसत्वसद्भावः प्रजास्वविषमेक्षिता ॥ २०१ गुणेनतेन शिष्टानां पालनं न्यायजीविनाम् । दुष्टानां निग्रहं चैव नृपः कुर्यात्कृतागसाम् ॥ २०२ दुष्टा हिंसादिदोषेषु निरताः पापकारिणः । शिष्टास्तु शान्तिशौचादिगुणधर्मपरा नराः ॥ २०३ इत्थं मनुः सकलचक्रभृदादिराजस्तान्क्षत्रियान्नियमयन्पथि सुप्रणीते । उच्चावचैर्गुरुमतैरुचितैर्वचोभिः शास्ति स्म वृत्तमखिलं पृथिवीश्वराणाम् ॥ २०४ राजाने आपल्या मनाची एकाग्रता करून दुष्टाना शासन करणे व शिष्टांचे पालन करणे याला सामंजस्य म्हणतात ॥ १९९ ॥ जो राजा शासन करण्यास योग्य असा शत्रु अथवा पुत्र असो त्याच्याविषयी मनात पक्षपात न धरता तो अपराधरहित व्हावा अशी मनात इच्छा धरतो व त्याना शिक्षा करतो त्याच्या ठिकाणी समञ्जसत्व हा गुण आहे असे समजावे. शत्रुविषयी मनात निर्दयता धारण करणे व पुत्राविषयी प्रेम धारण करणे याला पक्षपात म्हणतात. असा पक्षपात मनात न ठेवता दोघेही निरपराधी व्हावेत म्हणून त्यांना शासन करतो तो राजा समञ्जस होय ॥ २०० ॥ जो राजा याप्रमाणे मध्यस्थवृत्ति असतो तो राजा समदर्शी किंवा समञ्जस होय. आपल्या प्रजेविषयी म्हणजे आपल्या पुत्र मित्रांना व आपल्या प्रजेला पक्षपात सोडून समानपणाने पाहतो त्याच्या ठिकाणी समंजसगुणाचा सद्भाव आहे असे समजावे. असा हा गुण राजामध्ये असेल तर न्यायाने वागणाऱ्या शिष्टांचे तो पालन करू शकतो व जे अपराधी आहेत अशा दुष्टांचा तो निग्रह करू शकेल ॥ २०१-२०२ ॥ जे दुष्ट लोक हिंसा, चोरी वगैरे दोषात तत्पर असतात व पाप करण्यात तत्पर राहतात, पण जे शिष्ट सज्जन लोक असतात ते क्षमा, निर्लोभपणा वगैरे गुणानी युक्त असतात व धर्मात तत्पर राहतात ।। २०३ ।। याप्रमाणे तो भरतराजा सोळावा मनु होता आणि सकलचक्रवर्ती राजा होता. त्याने सर्व क्षत्रियांना जिनेश्वर वृषभाना मान्य असलेल्या उच्चनीच योग्य भाषणानी सुप्रसिद्ध अशा मार्गात स्थिर केले व सर्व राजांना सर्व सदाचारांचा उपदेश केला. अर्थात् क्षत्रियानी कसे वागावे याचे भरतेश्वराने फार उत्तम विवेचन केले ।। २०४ ॥ Page #516 -------------------------------------------------------------------------- ________________ ४२-२०७) महापुराण (५०५ इत्युचैर्भरतेशिनानुकथितं सर्वोयमुझेश्वराः । क्षात्रं धर्ममनुप्रपद्य मुदिताः स्वां वृत्तिमन्वैयरुः । योगक्षेमपथेषु तेषु सहिताः सर्वे च वर्णाश्रमाः । स्वे स्वे वर्त्मनि सुस्थिताः धृतिमधुर्धर्मोत्सवैः प्रत्यहम् ॥ २०५ जातिक्षत्रियवृत्तमूजिततरं रत्नत्रयाविष्कृतम् । तीर्थक्षत्रियवृत्तमप्यनुजगौ यच्चक्रिणामग्रणीः । तत्सर्व मगधाधिपाय भगवान्वाचस्पतिौतमो । व्याचल्यावखिलार्थतत्त्वविषयां जैनी श्रुति ख्यापयन् ॥ २०६ वन्दारोभरताधिपस्य जगतां भर्तुः क्रमौ वेधसः । स्तस्यानुस्मरतो गुणान्प्रणमतस्तं देवमाद्यं जिनम् । तस्यैवापचितिं सुरासुरगुरोर्भक्त्या मुहुस्तन्वतः। कालोऽनल्पतरः सुखाद्वयतिगतो नित्योत्सवैः सम्भृतः ॥ २०७ याप्रमाणे भरतेश्वराने सर्वांचे हित करणारा क्षत्रियांचा धर्म उत्तम प्रकारे सांगितला व तो ऐकून सर्व राजे आनंदित झाले व आपले कर्तव्य कोणते आहे हे त्यांनी चांगले जाणून घेतले. त्याप्रमाणे ते वागू लागले. नवीन वस्तूची प्राप्ति तो योग व प्राप्त झालेल्या त्या वस्तूचे संरक्षण करणे हा क्षेम यामध्ये प्रवृत्ति करून आपले हित करणाऱ्या सर्व वर्णाच्या व आश्रमाच्या लोकानी आपआपल्या मार्गात तत्परता ठेवली व आपले हित करून घेतले. प्रत्येक दिवशी ते उत्साहाने धर्माचे आचरण करू लागले. त्यामुळे त्याना मोठा संतोष व हर्ष वाटला ॥ २०५ ॥ चक्रवर्तीमध्ये अग्रणी-मुख्य अर्थात् पहिला चक्रवर्ती श्रीभरतेश्वराने रत्नत्रयाचा आविष्कार ज्यापासून होतो अशा रीतीचे जातिक्षत्रिय व तीर्थक्षत्रिय कसे अतिशय ऊर्जित अवस्थेला पोहचतील त्याचे वर्णन केले अर्थात् जातिक्षत्रियांचा आचार व तीर्थक्षत्रियांचा आचार सगळा भरताने सर्व राजांना सांगितला होता. तो सर्व भगवान वाचस्पति गौतमगणधरांनी श्रेणिकराजाला सांगितला. अर्थात् संपूर्ण जीवादिक पदार्थांचे स्वरूप जिचा विषय आहे अशा द्वादशांगरूप जिनवाणीचे वर्णन करून जातिक्षत्रिय व तीर्थक्षत्रियाचे स्वरूप मगधदेशाच्या स्वामीला श्रेणिकाला प्रत्यक्ष जणु बृहस्पति अशा गौतमगणधरानी सांगितले ॥ २०६ ।। जो त्रैलोक्याचा स्वामी आहे. अशा प्रजापति वृषभजिनेश्वराच्या चरणांना वंदन करणारा व त्या आदिप्रभूच्या गुणांचे स्मरण वारंवार करणारा व सुरासुरांचा स्वामी अशा त्या आदिभगवंताचे भक्तीने वारंवार पूजन करणारा अशा या भरतेश्वराचा फार मोठा काळ नित्योत्सवांनी भरलेला असा सुखानी व्यतीत झाला ॥ २०७॥ म. ६४ Page #517 -------------------------------------------------------------------------- ________________ ५०६) महापुराण (४२-२०४ जैनीमिज्यां वितन्वनियतमनुदिनं प्रोणयन्नथिसार्थम् । शश्वद्विश्वम्भरेशरवनितलसन्मौलिभिः सेव्यमानाः । मां कृत्स्नामा पयोधेरपि च हिमवतः पालयनिःसपत्नाम् । रम्यः स्वेच्छाविनोदैनिरविशषिराड्भोगसारं दशाङ्गम् ॥ २०८ इत्यारे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहे भरतराजवर्णाश्रमस्थितिप्रतिपादनं नाम द्विचत्वारिंशत्तमं पर्व समाप्तम् ॥ ४२ ॥ हा भरतचक्रवर्ती नेहमी प्रतिदिवशी जिनेश्वराची पूजा करीत असे आणि याचकसमूहाला नेहमी दान देऊन सन्तुष्ट करीत असे. ज्यांनी भूतलावर आपले किरीट टेकविले आहेत असे राजे लोक या भरताची नेहमी सेवा करीत असत, हिमवान् पर्वतापासून लवण समुद्रापर्यंत निष्कण्टक अशा या पृथ्वीचे भरतेश्वराने नेहमी पालन केले व रम्य मनोहर अशा इच्छानुरूप नाना विनोदानी उत्कृष्ट साररूप अशा दशाङ्गभोगाचा याने दीर्घकाळपर्यन्त उपभोग घेतला ॥ २०८ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत आर्षत्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहामध्ये मराठी भाषेत भरतराजाने वर्णाश्रमधर्माच्या स्थितीचे प्रतिपादन करणारे बेचाळीसावे पर्व समाप्त झाले. Page #518 -------------------------------------------------------------------------- ________________ आद्यखण्ड-समाप्ति. वृषभाय नमोऽशेषस्थितिप्रभवहेतवे । त्रिकालगोचरानन्तप्रमेयाक्रान्तमूर्तये ॥१ नमः सकलकल्याणपथनिर्माणहेतवे । आदिदेवाय संसारसागरोत्तारसेतवे ॥२ जयन्ति जितमृत्यवो विपुलवीर्यभाजो जिनाः । जगत्प्रमदहेतवो विपदमन्दकन्दच्छिदः॥ सुरासुरशिरस्सु संस्फुरितरागरत्नावली-विलम्बिकिरणोत्करारुणितचारुपादद्वयाः ॥३ कृतिमहाकवेर्भगवतः श्रीजिनसेनाचार्यस्येति । धर्मोऽत्र मुक्तिपदमत्र कवित्वमत्र । तीर्थशिनश्चरितमत्र महापुराणे॥ यद्वा कवीन्द्रजिनसेनमुखारविन्दनिर्यद्वचांसि न हरन्ति मनांसि केषाम् ॥ ४ इत्या भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते महापुराणे आद्यं खण्डं समाप्तिमगमत् ॥ ------------...... समाप्तीचे मंगल जे संपूर्ण लोकमर्यादांच्या उत्पत्तीला कारण आहेत, ज्यांची केवलज्ञानरूपी मूर्ति त्रिकालाला विषय होणाऱ्या अनन्त पदार्थानी व्याप्त झाली आहे, जे सर्वजीवांचे कल्याण करणाऱ्या मार्गाच्या निर्माणाला कारण आहेत अर्थात् सर्वजीवांचे कल्याण होण्याचा उपाय ज्यानी सांगितला आहे व जे संसारसमुद्राच्या पलीकडे जाण्यास पुलासारखे आहेत, त्या वृषभ जिनेन्द्राला मी वारंवार नमस्कार करतो ।। १-२ ॥ ज्यांनी मृत्यूला जिंकले आहे, ज्यांनी विपुल वीर्य-अनन्तशक्तीला धारण केले आहे, जे त्रैलोक्याला उत्कृष्ट आनंद प्राप्त करून देण्यास कारण आहेत, जे विपत्तींच्या मोठ्या गड्डयाला मुळासकट उपटून टाकतात, देवांच्या व दैत्यांच्या मस्तकावरील चमकणाऱ्या पद्मरागमण्यांच्या पंक्तीच्या किरणसमूहानी ज्यांचे सुंदर दोन पाय लालभडक झाले आहेत असे जिनेश्वर जगात सदा जयवन्त आहेत ॥ ३ ॥ हे महापुराण महाकवि भगवान् जिनसेनाचार्याची कृति- रचना आहे. या महापुराणात जिनधर्म आहे, अर्थात् जिनधर्माचे निरूपण आहे, यात मोक्षाच्या स्वरूपाचे वर्णन आहे व सुंदर कवित्व आहे. या पुराणात तीर्थेश आदिभगवंताचे चरित्र आहे. म्हणून कवीन्द्र जिनसेनाचार्यांच्या मुखकमलातून निघणारी वचने कोणा विद्वानांची मने हरण करणार नाहीत बरे ? ॥ ४ ॥ याप्रमाणे भगवान् जिनसेनाचार्यविरचित आर्षमहापुराणातील आद्यखण्ड समाप्त झाला Page #519 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिचत्वारिंशत्तमं पर्व | श्रियं तनोतु स श्रीमान्वृषभो वृषभध्वजः । यस्यैकस्य गतेर्मुक्तिमार्गश्चित्रं महानभूत् ॥ १ विक्रमं कर्मचक्रस्य यः शक्रायचितक्रमः । आक्रम्य धर्मचक्रेण चक्रे त्रैलोक्यचक्रिताम् ॥ २ योsस्मिश्चतुर्थकालावी दिनादौ वा दिवाकरः । जगदुद्द्द्योतयामास प्रोद्गच्छद्वाग्गभस्तिभिः ॥ ३ नष्टमष्टादशाम्भोधिकोटीकोटीषु कालयोः । निर्वाणमागं निर्दिश्य येन सिद्धाश्च वद्धिताः ॥ ४ तीर्थकृत्सु स्वतः प्राग्यो नामादानपराभवः । यमस्मिन्नास्पृशन्नासौ स्वसूनुमिव चत्रिषु ॥ ५ येन प्रकाशिते मुक्तेर्मार्गेऽस्मिन्नपरेषु तत् । प्रकाशितप्रकाशोक्तवैयथ्यं तीर्थकृत्स्वभूत् ॥ ६ ज्यांच्या ध्वजावर बैलाचे चिह्न आहे व ज्यांच्या एकट्याच्या जाण्याने मुक्तीचा मार्ग मोठा झाला असे आश्चर्य घडले ते श्रीमान्- अंतरंग लक्ष्मी केवलज्ञानादिक व बहिरंग लक्ष्मी अष्ट प्रातिहार्य, समवसरणादिक या दोन लक्ष्मींचे धारक असे श्रीवृषभ जिनेश्वर सर्वांच्या लक्ष्मीला वाढवोत ॥ १ ॥ ज्यांचे चरण इंद्रांच्याद्वारे पूजिले गेले आहेत व ज्यांनी आपल्या धर्मचक्राच्या द्वारे कर्मचक्राच्या पराक्रमावर आक्रमण केले व त्रैलोक्याच्या चक्रवर्तीपणाला प्राप्त करून घेतले ते आमच्या लक्ष्मीला वृद्धिंगत करोत ॥ २ ॥ जसे दिवसाच्या प्रारंभी सूर्य आपल्यापासून निघणाऱ्या किरणांनी जगाला प्रकाशित करतो तसे चतुर्थ काळाच्या प्रारंभी आपल्या दिव्यध्वनिरूप किरणानी जगाला आदिभगवंतानी प्रकाशमान् केले ॥ ३॥ या आदिभगवंतानी उत्सर्पिणी व अवसर्पिणीच्या आठरा कोटि सागर वर्षेपर्यंत जो मोक्षमार्ग नष्ट झाला होता त्या मोक्षमार्गाला आदिभगवंतांनी दाखविले व त्यानी सिद्धांना वाढविले ॥ ४ ॥ जसे आपला पुत्र भरत चक्रबर्तीमध्ये पहिलाच चक्रवर्ती असल्यामुळे त्याच्या पूर्वी अन्य चक्रवर्तीचे नाम घेतल्यामुळे होणारा जो पराभव त्याचा स्पर्श त्या भरताला झाला नाही कारण त्याच्या पूर्वी दुसरा कोणीही चक्रवर्ती झालेला नव्हता. म्हणून भरताचेच चक्रवर्ती म्हणून प्रथम नांव घेतले जाते तसे तीर्थकरामध्ये आदिभगवंताच्या पूर्वी अन्य कोणी तीर्थंकर न झाल्यामुळे अन्याचे नांव घेतल्यामुळे होणारा जो पराभव तो भगवंताचा कधीही झाला नाही. कारण भगवंत आदिप्रभूचेच प्रथम नाम घेतले जात होते ॥ ५ ॥ प्रभूंनी आदिभगवंतानी हा जो मुक्तीचा मार्ग प्रकाशित केला तो पूर्वी कोणीही प्रकाशित केला नव्हता पण प्रभूनी प्रकाशित केलेल्या मोक्षमार्गाला प्रकाशिताला पुनः प्रकाशित करण्याचे भय राहिले नाही. पण ते अन्य तीर्थकरांनी प्रकाशिताचे पुनः प्रकाशित करण्याचा दोष झाला. अर्थात् आदिभगवान् हेच प्रथमतः उपदेश करून मोक्षाला गेले ॥ ६ ॥ Page #520 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-१३) महापुराण (५०९ युगभारं वहन्नेकश्चिरं धर्मरथं पृथुम् । व्रतशीलगुणापूर्ण चित्रं वर्तयति स्म यः ॥७ तमेकमक्षरं ध्यात्वा व्यक्तमेकमिवाक्षरम् । वक्ष्ये समीक्ष्य लक्ष्याणि तत्पुराणस्य चूलिकाम् ॥ ८ स्वोक्ते प्रयुक्ताः सर्वे नो रसा गुरु भिरेव ते । स्नेहादिह तदुत्सृष्टान्भक्त्या तानुपयुज्महे ॥ ९ रागादीन्दूरतस्त्यक्त्वा शृङ्गारादिरसोक्तिभिः । पुराणकारकाः शुद्धबोधाः शुद्धा मुमुक्षवः ॥ १० निर्मितोऽस्य पुराणस्य सर्वसारो महात्मभिः । तच्छेषे यतमानानां प्रासादस्येव नः श्रमः॥ ११ पुराणे प्रौढशब्दार्थे सत्पत्रफलशालिनि । वचांसि पल्लवानीव कर्णे कुर्वन्तु मे बुधाः ॥ १२ अर्घ गुरुभिरेवास्य पूर्व निष्पादितं परैः । परं निष्पाद्यमानं सच्छन्दोवन्नातिसुन्दरम् ॥ १३ जूवाचा भार-ओझे वाहणारे असे हे एकटेच प्रभु होत. अर्थात् व्रते, शील व मूलगुण आणि उत्तरगुणांनी भरलेल्या धर्मरूपी महारथाला त्यानी दीर्घकाळपर्यंत चालविले. अर्थात् प्रभूचे तीर्थप्रवर्तन फार दीर्घकाळपर्यंत चालल्यानंतर अजितादितीर्थकरांची उत्पत्ति झाली. एकट्या या आदिभगवंतांनी महाधर्मरथाला अतिशय दीर्घकाळपर्यंत चालविले हे आश्चर्य आहे ॥ ७॥ अक्षर-अविनाशी अशा त्या एक अद्वितीय वृषभप्रभूला एका अक्षराप्रमाणे-ॐकाराप्रमाणे मनात चितून त्यांचे मनात ध्यान करून व पूर्वशास्त्रांचे अवलोकन करून महापुराण शास्त्राच्या उत्तरचूलिकेचे कथन मी करतो ॥ ८ ॥ स्वतः रचिलेल्या या महापुराणात आमच्या गुरूंनी सर्व रस उपयोगात आणले आहेतच पण स्नेहाने जे काही रस या पुराणासाठी त्यानी आमच्याकरिता ठेविले आहेत त्याचा आम्ही भक्तीने येथे उपयोग करू ॥ ९ ॥ रागादिक विकारांना दुरूनच त्यागून शृङगारादिक रसांनी युक्त अशा वचनांनी पुराणाची रचना करणारे गुरु शुद्ध ज्ञानाचे धारक व पवित्र आणि मुमुक्षु-मुक्त होण्याची इच्छा करणारे होते ॥ १०॥ त्या महात्म्यानी या पुराणाचा मुख्य उत्कृष्ट भाग रचला आहे. आता त्या पुराणाच्या राहिलेल्या भागाची रचना करण्याचा हा आमचा प्रयास आहे. तो एखाद्या प्रासादाचे उरलेल्या भागाची रचना शेवटास नेणाऱ्याप्रमाणे यात आम्हाला श्रम करावयाचे आहेत ॥ ११ ॥ या पुराणातील शब्द व अर्थ प्रौढ आहेत व हा पुराणवृक्ष उत्तम पाने व फलांनी शोभत आहे. आता यातील माझी वचने ही सुजन बुधांनी कोवळया पालवीप्रमाणे कानावर धारण करावीत अशी माझी विनन्ति आहे ।। १२ ।। __ या पुराणाचा पूर्वार्ध गुरूनीच केलेला आहे व आता पुढचा उत्तरार्ध हा परक्यानी म्हणजे आमच्याकडून रचला जाईल पण तो उत्तम छन्दाप्रमाणे अतिशय सुंदर बनेल असे मला वाटत नाही ॥ १३ ॥ Page #521 -------------------------------------------------------------------------- ________________ ५१० ) ( ४३-१४ इक्षोरिवास्य पूर्वार्द्धमेवाभावि रसावहम् । यथा तथास्तु निष्पत्तिरिति प्रारभ्यते मया ॥ १४ अन्विष्य मयि प्रौढि धर्मोऽयमिति गृह्यताम् । चाटुके स्वादुमिच्छन्ति न भोक्तारस्तु भोजनम् ॥१५ अथवाग्रं भवेदस्य विरसं नेति निश्चयः । धर्माग्रं ननु केनापि नार्दोश विरसं क्वचित् ॥ १६ गुरूणामेव माहात्म्यं यदपि स्वादु मद्वचः । तरूणां हि स्वभावोऽसौ यत्फलं स्वादु जायते ॥ १७ निर्यान्ति हृदयाद्वाचो हृदिमे गुरवः स्थिताः । ते तत्र संस्करिष्यन्ते तन्नमेऽत्र परिश्रमः ॥ १८ इदं शुश्रूषवो भव्याः कथितोऽर्थो जिनेश्वरैः । तस्याभिधायकाः शब्दास्तन्न निन्दात्र वर्तते ॥ १९ दोषान्गुणान्गुणी गृह्णन्गुणान्दोषांस्तु दोषवान् । सदसज्ज्ञानयोश्चित्रमत्र माहात्म्यमीदृशम् ॥ २० महापुराण या पुराणाचा पूर्वार्ध उसाप्रमाणे रसाळ झालाच आहे. पण पुढील भाग कसा तरी होवो असा विचार करून मी त्याची रचना करण्यास प्रारंभ करीत आहे ॥ १४ ॥ माझ्या ठिकाणी प्रौढता आहे किंवा नाही याचा विचार न करता माझ्या ठिकाणी काव्य रचण्याची योग्यता आहे किंवा नाही हे न हुडकता हे धर्मशास्त्र आहे असा विचार करून याचा स्वीकार करा. कारण जेवण घेण्यासाठी आलेले लोक प्रियवचन बोलल्यावरच स्वादिष्ट भोजनाची इच्छा करतात असे नाही. येथे असा अभिप्राय आहे - भोजन करण्यासाठी आलेले लोक प्रिय वचनाची अपेक्षा न करता भोजनावरच विचार करतात तसे धार्मिक जन माझ्या ठिकाणी योग्यतेची अपेक्षा न करता केवळ धर्माचाच त्यानी विचार करावा अर्थात् धर्म समजून याचा आश्रय करावा ॥ १५ ॥ अथवा या पुराणाचा हा शेवटचा भाग विरस होणार नाही असा माझा निश्चय आहे. कारण धर्माचा शेवट कोठेही विरस झाला आहे असे कोणीही पाहिले नाही ॥ १६ ॥ ज्या अर्थी माझे वचन आपणा सर्वांना आवडेल त्याला कारण गुरूचेच माहात्म्य आहे. ज्या अर्थी फळामध्ये गोडी येते तिला कारण झाडाचा स्वभावच आहे ।। १७ ।। माझ्या हृदयातून वाणी बाहेर पडते व माझ्या हृदयात गुरु राहिले आहेत ते तेथें राहून वाणीवर संस्कार करतील म्हणून मला या पुराणरचनेत श्रम वाटणार नाहीत ।। १८ ।। हे पुराण ऐकण्याची भव्यजीव इच्छा करितात व यातील अभिप्राय जिनेश्वरानी सांगितला आहे व त्या अभिप्रायाला प्रकट करणारे शब्द आमच्याकडून योजिले गेले आहेत. म्हणून यात लोक निंदा करतील असे काही नाही असे मला वाटते ।। १९ ।। जो दोषांना गुणरूपाने ग्रहण करतो त्याला गुणी म्हणावे व जो गुणांना दोष मानून त्याना स्वीकारतो त्याला दोषी म्हणावे अर्थात् गुणी लोक दोषाना देखिल गुणरूपाने ग्रहण करतात व दोषी जन गुणानाही दोष समजतात. या जगात चांगले ज्ञान व वाईट ज्ञान यांचे असे विचित्र माहात्म्य आढळून येते ।। २० ।। Page #522 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-२८) महापुराण गुणिनां गुणमादाय गुणी भवतु सज्जनः । असद्दोषसमादानाद्दोषवान्दुर्जनोऽद्भुतम् ॥ २१ सज्जने दुर्जनः कोपं कामं कर्तृमिहार्हति । तद्वैरिणामनाथानां गुणानामाश्रयो यतः ॥ २२ यथा स्वानुगमर्हन्ति सदा स्तोतुं कवीश्वराः । तथा निन्दितुमस्वानुवृत्तं कुकवयोऽपि माम् ॥ २३ कविरेव कवेर्वेत्ति कामं काव्यपरिश्रमम् । वन्ध्या स्तनन्धयोत्पत्तिवेदनामिव नाकविः ॥ २४ गृहाणेहास्ति चेद्दोषं स्वं धनं न निषिध्यते । खलासि प्रार्थितो भूयस्त्वं गुणान्न समाग्रहीः ॥ २५ गुणागुणानभिज्ञेन कृता निन्दाथवा स्तुतिः । जात्यन्धस्येव धृष्टस्य रूपे हासाय केवलम् ॥ २६ । अथवा सोऽनभिज्ञोऽपि निन्दतु स्तोतु वा कृतिम् । विदग्धपरिहासानामन्यथा वास्तु विश्रमः ॥२७ गणयन्ति महान्तः किं क्षुद्रोपद्रवमल्पवत् । दाह्यं तृणाग्निना तूलं पत्युस्तापोऽपि नाम्भसाम् ॥ २८ गुणवान् मनुष्याचे गुण घेऊन मनुष्य गुणी होतो. परंतु नसलेल्या दोषांचे ग्रहण करून मनुष्य दुष्ट बनतो हे आश्चर्य आहे ॥ २१ ॥ ___ या जगात सज्जनावर दुर्जन यथेच्छ कोप करण्यास योग्य आहे. कारण दुर्जनांचे जे वैरी आहेत अशा अनाथ गुणाना सज्जन आश्रय देतो तेव्हा तो सज्जन दुर्जनाच्या कोपाला का पात्र होणार नाही ? ।। २२ ।। __ जसे कवीश्वर-महाकवि आपणास अनुसरणाऱ्याची नेहमी स्तुति करतात तसे आपल्या मागून हा येत नाही म्हणून दुर्जन कवि लोक माझी निंदा करण्यास नेहमी तयार असोत. तात्पर्यउत्तम कवींच्या मार्गावर चालत असल्यामुळे माझी उत्तम कवि जशी स्तुति करतात तसे कुकवींच्या मार्गाचे मी अनुसरण करीत नसल्यामुळे ते माझी निन्दा करतात. करोत बिचारे ॥२३॥ जो कवि आहे त्यालाच काव्य करताना काय परिश्रम होतात हे चांगले समजते पण अकवीला समजत नाही. जसे वांझ स्त्री पुत्र प्रसवण्याच्या वेळी होणान्या दुःखाला जाणत नसते तसे कवीचे श्रम अकवीला समजत नाहीत ।। २४ ।। हे दुष्टा, या माझ्या काव्यकृतीत जर दोष असतील तर ते तुझेच धन आहे, ते घेण्यास मी तुला मनाई करणार नाही पण मी तुझी वारंवार प्रार्थना केली असताही माझ्या गुणाना घेत नाहीस ॥ २५ ॥ गुण व अगुण-दोष यांची ज्याला माहिती नाही त्याने केलेली निंदा किंवा स्तुति ही एखाद्या अविचारी आंधळ्याने रूपाचे वर्णन केल्याप्रमाणे हास्यास्पद होईल ॥ २६ ॥ ____ अथवा तो अज्ञ मनुष्य माझ्या या काव्य कृतीची निन्दा करो अथवा स्तुति करो. जर त्याने असे केले नाही तर विद्वान लोकांना थट्टा करावयाला मग स्थान कोठे मिळेल सांगा बरे ? ॥ २७ ॥ जे मोठे पुरुष असतात ते क्षुद्रानी दिलेली पीडा तुच्छबुद्धीच्या लोकाप्रमाणे आपल्या मनात आणीत नसतात. कापूस हा गवताच्या अग्नीने जळेल पण पाण्याचा फार मोठा साठा असलेला समुद्र त्या अग्नीने तापणार देखील नाही ।। २८ ।। Page #523 -------------------------------------------------------------------------- ________________ ५१२) काष्ठजोsपि दहत्यग्निः काष्ठं तं तु प्रवर्धयेत् । प्रदीपायितमेताभ्यां सदसद्भावभासने ॥ २९ स्तुतिनिन्द कृति श्रुत्वा करोतु गुणदोषयोः । ते तस्य कुरुतः कीर्तिमकर्तुरपि सत्कृतेः ॥ ३० सत्कवेरर्जुनस्येव शराः शब्दास्तु योजिताः । कर्ण दुस्संस्कृतं प्राप्य तुदन्ति हृदयं भृशम् ।। ३१ प्रवृत्तेयं कृतिः कृत्वा गुरून् पूर्व कवीश्वरान् भाविनोऽद्यतनाश्चास्या विदध्युः शुद्धयनुग्रहम् ॥ ३२ मतिर्मे केवलं सूते कृति राज्ञीव तत्सुताम् । धियस्तां वर्तयिष्यन्ति मा गृहीषुः पृथग्जनाः ॥ ३३ इदं बुधा ग्रहिष्यन्ति मा गृहीषुः पृथग्जनाः । किममौल्यानि रत्नानि क्रीणन्त्यकृतपुण्यकाः ॥ ३४ हृदि धर्ममहारत्नमागमाम्भोधिसम्भवम् । कौस्तुभादधिकं मत्वा दधातु पुरुषोत्तमः ॥ ३५ श्रोत्रपात्राञ्जल कृत्वा प्रीत्या धर्मरसायनम् । अजरामरतां प्राप्तुमुपयुङग्ध्वमिदं बुधाः ॥ ३६ महापुराण लाकडापासून उत्पन्न झालेला अग्नि त्या लाकडाला जाळून टाकतो पण ते लाकूड त्या अग्निला वाढवीत असते. लाकूड व अग्नि या दोघानी सुबुद्धि व कुबुद्धि याचा खुलासा करण्यासाठी मोठ्या दिव्याचे काम केले आहे ।। २९ ।। (४३-२९ माझ्या कृतीचे श्रवण करून नंतर तीत असलेल्या गुण व दोषांची स्तुति व निंदा तो दुर्जन खुशाल करो. त्याने केलेली स्तुति व निंदा चांगले कार्य न करणाऱ्या दुर्जनाची देखिल चोहोकडे कीर्ती पसरवितील ॥ ३० ॥ जसे अर्जुनाचे सोडलेले बाण ज्याच्यावर वाईट संस्कार झाले आहेत अशा कर्णाकडे येऊन त्याच्या मनाला फार त्रास देत होते. तसे उत्तम कवीने आपल्या काव्यात योजलेले शब्द दुष्ट लोकांच्या कानाजवळ येऊन त्यांच्या हृदयाला अतिशय पीडा देतात ॥ ३१ ॥ प्राचीन महाकवींना गुरुस्थानी मानून मी माझी काव्यकृति प्रारंभिली आहे. पुढे होणारे व आज विद्यमान असलेले कवि हिला शुद्ध करण्याचा अनुग्रह करतील अशी आशा आहे ||३२|| राणी जशी आपल्या कन्येला फक्त जन्म देते पण दाया त्या कन्येचे पालनपोषण करतात तसे माझ्या बुद्धीने या काव्यकृतीला जन्म दिला आहे व कवीश्वरांच्या बुद्धि दाईप्रमाणे आता तिचे योग्य रक्षण करतील ॥ ३३ ॥ या माझ्या काव्याला विद्वान घेतील व त्याचा आदर करतील. जे दुर्जन आहेत ते याचा स्वीकार करणार नाहीत. बरोबरच आहे की, ज्यानी पुण्य संपादन केले नाही असे लोक अमूल्य रत्ने कशी विकत घेऊ शकतील ॥ ३४ ॥ जसे समुद्रापासून उत्पन्न झालेले कौस्तुभरत्न श्रीपुरुषोत्तम कृष्ण आपल्या हृदयावर धारण करतो तसे हे धर्मरूपी कौस्तुभरत्न आगम- जैनशास्त्ररूपी समुद्रापासून उत्पन्न झाले आहे. व याला श्रेष्ठ पुरुषाने कौस्तुभापेक्षा श्रेष्ठ मानून आपल्या हृदयावर धारण करावे ।। ३५ ।। अहो विद्वज्जनहो आपण कानरूपी पात्र ओंजळीप्रमाणे करा व मोठ्या प्रीतीने हे धर्म रसायन आपण भक्षण करा. हे धर्म रसायन तुम्हाला अजर व अमर करील ।। ३६ । Page #524 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-४२) महापुराण (५१३ नूनं पुण्यं पुराणाब्धेमध्यमध्यासितं मया। तत्सुभाषितरत्नानि सञ्चितानीति निश्चितिः ॥ ३७ सुदूरपारगम्भीरमिति नात्र भयं मम । पुरोगा गुरवः सन्ति प्रष्ठाः सर्वत्र दुर्लभाः ॥ ३८ पुराणस्यास्य संसिद्धिर्नाम्ना स्वेनैव सूचिता । निर्वक्ष्याम्यत्र नो वेति ततो नास्म्यहमाकुलः ॥३९ पुराणं मार्गमासाद्य जिनसेनानुगा ध्रुवम् । भवाब्धेः पारमिच्छन्ति पुराणस्य किमुच्यते ॥ ४० अर्थो मनसि जिह्वाने शब्दः सालकृतिस्तयोः । अतः पुराणसंसिद्धर्नास्ति कालविलम्बनम् ॥४१ आकरेष्विव रत्नानामूहानां नाशये क्षयः । विचित्रालङ्कृतेः कर्तुःर्गत्यं कि कवेः कृतेः ॥ ४२ ........................................ __खरोखर मी या पुराणरूपी समुद्राचा पुण्यकारक असा मध्यभाग प्राप्त करून घेतला आहे म्हणून त्यातील सुभाषितरूपी रत्ने मी गोळा केली आहेत असा माझा निश्चय आहे ।।३७॥ या पुराणाचा किनारा फार दूर गम्भीर आहे तरी पण मला त्याचे भय मुळीच वाटत नाही. कारण पुढे माझे गुरु गेले आहेत व अशा श्रेष्ठ पुरुषाची प्राप्ति होणे सर्वत्र दुर्लभ आहे, गुरु या शास्त्राच्या-महापुराणाच्या परतीरास गेले आहेत तसा मीही जाईन व यात मला भय मुळीच वाटत नाही ।। ३८ ।। या पुराणाची उत्तम अशी सिद्धि याच्या स्वतःच्या नांवानेच 'महापुराण' या नांवानेच सूचित झाली आहे. म्हणून मी याचे उत्तम विवेचन करू शकेन किंवा नाही याविषयी मला कांही आकुलता वाटत नाही ॥ ३९ ॥ भगवज्जिनसेनाचार्यांना अनुसरणारे त्यांचे शिष्य पुराणमार्गाचे-उत्कृष्ट आत्महिताच्या मार्गाचे अवलंबन करून संसारसमुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्याची इच्छा करतात मग या पुराणाच्या शेवटाला ते पोहोचण्याची इच्छा करतीलच याविषयी सांगण्याची काय आवश्यकता आहे ॥ ४० ॥ मनात अर्थ आहे अर्थात् या पुराणाचा सर्व विषय हृदयात आहे व जिभेच्या शेंड्यावर शब्द आहेत आणि अर्थ व शब्द यांचे अलंकार-उपमादिक अर्थालंकार आणि यमक अनुप्रासादिक शब्दालंकार हेही मनात आहेत मग या पुराणाची संसिद्धि होण्यास कालविलंब नाहीच अर्थात् या पुराणाची पूर्णसिद्धि निश्चयाने होईल ।। ४१ ॥ खाणीमध्ये जसे रत्नांचा क्षय असत नाही त्यांचा खूप साठा असतो तसा मनात काव्याच्या विचारांचा अक्षय साठा भरलेला आहे व नाना प्रकारच्या चमत्कारिक अलंकाराची रचना करणाऱ्या या कवीच्या या कृतीला दारिद्रय कोठून प्राप्त होणार आहे ? ।। ४२ ।। म. ६५ Page #525 -------------------------------------------------------------------------- ________________ ५१४) (४३-४३ विचित्र पदविन्यासा रसिका सर्वसुंदरी । कृतिः सालङ्कृतिर्न स्यात्कस्येयं कामसिद्धये ॥ ४३ सञ्चितस्यैनसो हन्त्री नियंत्री चागमिष्यतः । आमन्त्रिणी च पुण्यानां ध्यातव्येयं कृतिः शुभा ॥४४ संस्कृतानां हिते प्रीतिः प्राकृतानां प्रियं प्रियम् । एतद्धितं प्रियं चातः सर्वान्सन्तोषयत्यलम् ॥ ४५ इदं निष्पन्नमेवात्र स्थितमेवायुगान्तरम् । इत्याविर्भावितोत्साहः प्रस्तुते प्रस्तुतां कथाम् ॥ ४६ अथातः श्रेणिकः पीत्वा पुरोः सुचरितामृतम् । आसिस्वादयिषुः शेषं हस्तालग्नमिवोत्सुकः ॥ ४७ समुत्थाय सभामध्ये प्राञ्जलिः प्रणतो मनाक् । पुनविज्ञापयामास गौतमं गणनायकम् ॥ ४८ त्वत्प्रसादाच्छ्तं सम्यक् पुराणं परमं पुरोः । निवृत्तोऽसौ यथास्यान्ते तथाहं चातिनिर्वृतः ॥ ४९ महापुराण विचित्र पदविन्यासा - जी गमतीने पावले टाकीत ठुमकत चालत आहे, जी रसिकशृंगारादिरसानी भरलेली आहे व सर्व अवयवांनी सुंदर आहे व अनेक अलंकारांनी भूषणांनी नटलेली आहे अशी स्त्री कोणा पुरुषाच्या इच्छेची सिद्धि-तृप्ति करीत नाही बरे ? अर्थात् अशी स्त्री जशी पुरुषाला सुखदायक होते तशी ही काव्यकृति देखिल विचित्र पदविन्यासाचमत्कार उत्पन्न करणाऱ्या शब्दाच्या रचनेने युक्त आहे, रसिका शृंगार, वीर, करुणा आदिक रसानी भरली आहे, मनोहर शब्दांच्या रचनेने सर्व सुंदरी आहे व अलंकारांनी भरलेली आहे, उपमादिक अलंकारांनी नटलेली आहे, म्हणून ही कवीची कृति कोणा विद्वानाच्या इच्छेची तृप्ति करणारी नाही बरे ? ॥ ४३ ॥ ही या कवीची शुभकृति संचित झालेल्या पातकांचा नाश करणारी आहे व पुढे उत्पन्न होणाऱ्या पापाला प्रतिबंध करणारी आहे व पुण्याला बोलावणारी आहे. अशा या कवीच्या कृतीचे नेहमी आत्महितेच्छु शहाण्या मनुष्यानी चिन्तन करावे ॥ ४४ ॥ जे विद्येने संस्कृत झाले आहेत अशा लोकांना परिणामी हितकारक अशी वस्तु प्रिय वाटते. जे प्राकृत अज्ञ आहेत त्यांना तत्काल संतोष देणारी वस्तु प्रिय वाटते. हे काव्य विद्वानाना हितकर व अज्ञजनाना प्रिय असे आहे. म्हणून हे काव्य सर्वांना अधिक सन्तुष्ट करणारे आहे ।। ४५ ।। आता हे पुराण तयार झालेच व या जगात हे युगान्तापर्यंत स्थिर राहणारच आहे. याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी उत्साह प्रकट झाला आहे असा मी (भगवद्गुणभद्राचार्य) प्रस्तुत कथा सांगत आहे. ही पीठिका झाली ॥ ४६ ॥ यानंतर श्रेणिक राजा आदिभगवंताचे उत्तम चरित्ररूपी अमृत पिऊन जणु हाताला चिकटलेल्या अमृताप्रमाणे बाकी उरलेली कथा आस्वादण्याची उत्सुकता धारण करता झाला. नंतर तो सभेमध्ये उठून उभा राहिला. थोडे नम्र होऊन त्याने हात जोडले व गणांचा नायक अशा गौतम मुनीशाला त्याने पुनः विनंती केली ।। ४७-४८ ॥ हे महामुने, आपल्या प्रसादामुळे मी आदिभगवंताचे उत्तम पुराण चांगले ऐकले. हे भगवंता जसे, या पुराणाचे शेवटी श्री आदिभगवान् मुक्त होऊन सुखी झाले तसा मीही अत्यन्त सुखी झालो आहे ।। ४९.।। Page #526 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-५७) महापुराण (५१५ किल तस्मिन्जयो नाम तीर्थेऽभूत्पार्थिवाग्रणीः । यस्याद्यापि जितार्कस्य प्रतापः प्रथते क्षितौ ॥५० यस्य दिग्विजये मेघकुमारविजये स्वयम् । वीरपट्टे समुद्धृत्य बबन्ध भरतेश्वरः ॥५१ पुरुस्तीर्थकृतां पूर्वश्चक्रिणां भरतेश्वरः । दानतीर्थकृतां श्रेयान् किलासौ च स्वयंवरे ॥ ५२ अर्ककोतिः पुरोः पौत्रं सङ्गरे कृतसङ्गरः । जित्वा निगलयामास किलकाको स हेलया ॥ ५३ सेनान्तो वृषभः कुम्भो रथान्तो दृढसञ्जकः । धनुरन्तः शतो देवशर्मा भावान्तदेवभाक् ॥ ५४ नन्दनः सोमदत्ताह्वः सूरदत्तो गुणैर्गुरुः । वायुशर्मा यशोबाहुर्देवाग्निश्चाग्निदेववाक् ॥ ५५ अग्निगुप्तोऽथ मित्राग्निहलभृत्स महीधरः । महेन्द्रो वसुदेवश्च ततः पश्चाद्वसुन्धरः ॥ ५६ अचलो मेरुसज्ञश्च ततो मेरुधनाहयः । मेरुभतिर्यशो यज्ञप्रान्तसर्वाभिधानको ॥५७ त्या आदिभगवंताच्या तीर्थात सर्व राजांचा प्रमुख जय नावाचा राजा झाला. त्याने अर्ककीर्तीला ही जिंकले होते. या जयराजाचा पराक्रम आज देखिल या भूतलावर प्रसिद्ध झाला आहे ॥ ५० ॥ दिग्विजयाच्या वेळी जेव्हां जयकुमाराने मेघकुमारदेवाना जिंकले तेव्हां भरतेश्वरानेभरतचक्रीने स्वतः वीरपट्ट काढून या जयकुमाराच्या मस्तकावर बांधला. भगवान् पुरु-वृषभनाथ हे तीर्थंकरामध्ये पहिले, चक्रवर्तीमध्ये भरतराजा पहिला चक्रवर्ती, दानतीर्थकरात पहिला दानतीर्थंकर श्रेयान् राजा, तसा हा जयकुमार स्वयंवर करण्यामध्ये पहिला आहे ॥ ५१-५२ ॥ __ आदिभगवंताचा नातु जो अर्ककीर्ति त्याला जयकुमाराने याला मी युद्धामध्ये बांधीन अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे त्याने एकट्याने लीलेने जिंकून त्याला बांधले. हा जयकुमार आदिभगवंताचा ७१ वा गणधर झाला आहे. आदि भगवंताचे ८४ गणधर होते. त्यांची नावे याप्रमाणे- ।। ५३ ।। १) सेनान्त वृषभ म्हणजे वृषभसेन, २) कुंभ, ३) रथान्तदृढ-दृढरथ, ४) धनुरन्तशतशतधनु, ५) देवशर्मा, ६) भावान्त देव म्हणजे देवभाव, ७) नन्दन, ८) सोमदत्त, ९) गुणानी मोठेपणाला पावलेला सूरदत्त, १०) वायुशर्मा, ११) यशोबाहु, १२) देवाग्नि, १३) अग्निदेव, १४) अग्निगुप्त, १५) मित्राग्नि, १६) हलभृत्, १७) महीधर, १८) महेन्द्र, १९) वसुदेव, २०) वसुन्धर, २१) अचल, २२) मेरु, २३) मेरुधन, २४) मेरुभूति यश आणि यज्ञ हे शब्द ज्याच्या शेवटी आहेत असा सर्व शब्द ज्यांचे नाव आहे असे दोघे म्हणजे २५) सर्वयश, २६) सर्वयज्ञ, २७) सर्वगुप्त, प्रिय शब्द ज्याच्या शेवटी आहे असा सर्व म्हणजे २८) सर्वप्रिय, देव शब्द ज्याच्या शेवटी आहे असा सर्व शब्द म्हणजे २९) सर्वदेव, ३०) सर्वविजय, नंतर विजय आदि असलेला गुप्त म्हणजे ३१) विजयगुप्त, ३२) विजयमित्र, ३३) विजयिल, ३४) अपराजित, ३५) वसुमित्र, ३६) विश्वसेन, सेन अन्ती असलेला साधु म्हणजे ३७) साधुषेण, देव अन्ती असलेला सत्य शब्द म्हणजे ३८) सत्यदेव, ३९) सत्य अन्ती असलेला देव म्हणजे देवसत्य, गुप्त शेवटी आहे असा सत्य शब्द, ४०) सत्यगुप्त, सज्जनात श्रेष्ठ असा ४१) सत्यमित्र, गुणांनी युक्त असा Page #527 -------------------------------------------------------------------------- ________________ ५१६) महापुराण (४३-७० सर्वगुप्तः प्रियप्रान्तसो देवान्तसर्ववाक् । सर्वादिविजयो गुप्तो विजयादिस्ततः परः ॥ ५८ विजयमित्रो विजयिलोऽपराजितसञकः । वसुमित्रः स विश्वादिसेनः सेनान्तसाधुवाक् ॥ ५९ देवान्तसत्यः सत्यान्तदेवो गुप्तान्तसत्यवाक् । सत्यमित्रः सतां ज्येष्ठः सम्मितो निर्मलो गुणैः ॥६० विनीतः संवरो गुप्तो मन्यादिर्मुनिदत्तवाक् । मुनियज्ञो मुनिर्देवप्रान्तो यज्ञान्तगुप्तवाक् ॥ ६१ मित्रयज्ञः स्वयम्भूश्च देवदत्तान्तगौ भगौ। भगादिफल्गुः फल्ग्वन्तगुप्तो मित्रादिफल्गुकः ॥ ६२ प्रजापतिः सर्वसङ्गो वरुणो धनपालकः । मघवानराश्यन्ततेजो महावीरो महारथः ॥ ६३ विशालाक्षो महाबालः शुचिसालस्ततः परः । वज्रश्च वज्रसारश्च चन्द्रचूलसमाह्वयः ॥ ६४ जयो महारसः कच्छमहाकच्छावतुच्छकौ । निमिविनिमिरन्यौ च बलातिबलसञ्जको ॥ ६५ बलान्तभद्रो नन्दी च महाभागी परस्ततः । मित्रान्तनन्दी देवान्तकामोऽनुपमलक्षणः ॥ ६६ चतुभिरधिकाशीतिरिति स्रष्टुर्गणाधिपाः । एते सप्तद्धिसंयुक्ताः सर्वे वेद्यनुवादिनः ॥ ६७ स एवासीद्गृहत्यागादेतेष्वप्युदितोदितः । एकसप्ततिसङख्यानसम्प्राप्तगणनो गणी ॥ ६८ पुराणं तस्य मे ब्रूहि महत्तत्रास्ति कौतुकम् । भव्यचातकवृन्दस्य प्रघणो भगवानिति ॥ ६९ ततः स्वस्य समालक्ष्य गणाधीशादनुग्रहम् । अलञ्चकार स्वस्थानमिङगितज्ञा हि धीषनाः ॥ ७० ४२) निर्मल, ४३) विनीत, ४४) संवर, ४५) मुनि आदि आहे असा गुप्त म्हणजे मुनिगप्त, ४६) मुनिदत्त, ४७) मुनियज्ञ, ४८) देव शब्द शेवटी ज्याच्या आहे असा मुनि म्हणजे मुनिदेव, ४९) यज्ञ अन्ती असलेला गुप्त म्हणजे गुप्तयज्ञ, ५०) मित्रयज्ञ, ५१) स्वयम्भू, देव व दत्त हे शब्द ज्याच्या अन्ती आहेत अशा भग शब्दाचे दोघे म्हणजे ५२) भगदेव, ५३) भगदत्त, भग आदि आहे असा फल्गु म्हणजे ५४) भगफल्गु, ५५) फल्गु अन्ती असलेला गुप्त म्हणजे गुप्तफल्गु ५६) मित्र शब्द आधी असलेला फल्गु म्हणजे मित्रफल्गु, ५७) प्रजापति, ५८) सर्वसंग, ५९) वरुण, ६०) धनपालक, ६१) मघवान्, राशि ज्याच्या शेवटी आहे असा तेज म्हणजे ६२) तेजोराशि, ६३) महावीर, ६४) महारथ, ६५) विशालाक्ष, ६६) महाबाल, ६७) शुचिसाल, ६८) वज्र, ६९) वज्रसार, ७०) चन्द्रचूल, ७१) जय, ७२) महारस, ७३) कच्छ, ७४) महाकच्छ, ७५) निमि, ७६) विनिमि, ७७) बल, ७८) अतिबल, ७९) भद्रबल, ८०) नन्दी, ८१) महाभागी, ८२) नन्दिमित्र, ८३) कामदेव, ८४) अनुपम असे आदिभगवंताचे ८४ गणधर होते. हे सर्व सात ऋद्धीनी युक्त होते व ते सगळे सर्वज्ञासारखे ५४-६७॥ तो जयकुमारच धर वगैरे परिग्रहांचा त्याग केल्यामुळे अत्यन्त उत्कर्षशाली असा गणधर झाला व प्रभु वृषभनाथांच्या सर्व गणधरामध्ये श्रेष्ठ व गुणवान् ७१ वा गणधर झाला. हे महामुने, आपण त्याचे मला चरित्र सांगावे. त्याविषयी मला मोठी उत्कण्ठा आहे. हे प्रभो, आपण भव्य जीवरूपी चातकसमूहाला उत्तम मेघासारखे आहात ॥ ६८-६९ ॥ यानंतर त्या गौतमगणधरापासून आपणावर अनुग्रह होईल हे जाणून राजा श्रेणिकाने आपले स्थान भूषविले. बरोबरच आहे की बुद्धिरूपी धन ज्यांच्याजवळ आहे असे लोक दुसऱ्याचा अभिप्राय तत्काल जाणतात ।। ७० ।। Page #528 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-७७) महापुराण (५१७ यत्प्रष्टुमिष्टमस्माभिः पृष्टं शिष्टं त्वयैव तत्। चेती जिह्वा त्वमस्माकमित्यस्तावीत्सभा च तम् ॥७१ गणी तेनेति सम्पृष्टः प्रवृत्तस्तदनुग्रहे । नाथिनो विमुखान्सन्तः कुर्वते तद्धि तव्रतम् ॥ ७२ श्रुणु श्रेणिक सम्प्रश्नस्त्वयात्रावसरे कृतः । नाराधयन्ति कान्वा ते सन्तोऽवसरवेदिनः ॥ ७३ इह जम्बूमति द्वीपे दक्षिणे भरते महान् । वर्णाश्रमसमाकीर्णो देशोऽस्ति कुरुजाङ्गलः ॥७४ धर्मार्थकाममोक्षाणामेको लोकेऽयमाकरः । भाति स्वर्ग इव स्वर्गे विमानं वामरेशितुः ॥ ७५ हास्तिनाख्यं तत्र विचित्रं सर्वसम्पदा । सम्भवं मृषयद्वार्धी लक्षम्याः कुलगृहायितम् ॥ ७६ पतिःपतिर्वा ताराणामस्य सोमप्रभोऽभवत् । कुर्वन्कुवलयालादं सत्करैः स्वैर्बुधाश्रयः ॥७७ " हे शिष्टा, हे शहाण्या श्रेणिका, जे आम्ही विचारण्याला योग्य होते नेमके तेच तुझ्याकडून विचारले गेले आहे. त्यामुळे तूच आमचे मन व जिह्वा-जीभ झाला आहेस" अशी सभेने त्याची स्तुति केली ।। ७१ ।। याप्रमाणे ज्याना प्रश्न विचारला अशा गौतमगणधरानी त्याच्यावर उपकार करण्याची प्रवृत्ति केली. बरोबरच आहे की सज्जन लोक गरजू लोकाना विमुख करीत नसतात. कारण गरजू लोकांना विमुख न करणे त्यांची इच्छा पूर्ण करणे हे त्यांचे-सज्जनांचे व्रतच असते ॥७२॥ हे श्रेणिकराजा ऐक. तू या योग्यवेळी हा चांगला प्रश्न आम्हाला विचारला आहेस. कारण योग्य वेळ - योग्य प्रसंग जाणणारे सज्जन कोणाला बरे प्रसन्न करीत नाहीत, वश करीत नाहीत बरे ? अर्थात् ते सर्वाना आनंदित करतात. मी तुझ्या या प्रश्नाने आनंदित होऊन तुला मी कुमाराची कथा सांगतो ती तू ऐक ।। ७३ ॥ या जंबूद्वीपात दक्षिणेकडच्या भरतक्षेत्रात क्षत्रियादि चार वर्ण व ब्रह्मचर्यादिक चार आश्रमाचे आचार पाळणारे लोक जेथे नांदत आहेत असा कुरुजाङ्गल नामक देश आहे ॥ ७४ ।। या जंबूद्वीपात हा देश धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची जणु खाण असा आहे. त्यामुळे तो स्वर्गाप्रमाणे किंवा देवाचा स्वामी असलेल्या इन्द्राच्या विमानाप्रमाणे शोभत आहे ।। ७५ ॥ त्या कुरुजाङ्गल देशात. सर्व प्रकारच्या संपत्तीनी लोकांना आश्चर्यचकित करणारे व समुद्रामध्ये लक्ष्मीची उत्पत्ति झाली आहे अशी लोकसमज खोटी आहे असे जणु दाखविणारे व लक्ष्मीचे माहेर घर हेच नगर आहे असे व्यक्त करणारे हे हास्तिनपुर आहे ।। ७६ ॥ नक्षत्रांचा स्वामी असा चन्द्र आपल्या सत्करानी-चांगल्या किरणानी कुवलयांना रात्री विकसणाऱ्या कमलाना आनंद देणारा व बुधाश्रयः बुध नांवाच्या ग्रहाला आश्रय देणारा असतो. त्याप्रमाणे या कुरुजांगल देशाचा पति स्वामी सोमप्रभ नांवाचा राजा होता व तो आपल्या सत्करानी सर्व लोकाना सुख देणाऱ्या करानी सर्व पृथ्वीला आनंदित करीत होता व बुधाश्रय पंडित विद्वान् लोकांना आश्रय देत असे ॥ ७७ ॥ Page #529 -------------------------------------------------------------------------- ________________ ५१८) महापुराण (४३-७८ तस्य लक्ष्मीमनाक्षिप्य वक्षःस्थलनिवासिनी । लक्ष्मीरियं द्वितीयेति प्रेक्ष्या लक्ष्मीवती सती ॥ ७८ तयोर्जयोऽभवत्सूनः प्रज्ञाविक्रमयोरिव । तन्वन्नाजन्मतः कीति लक्ष्मीमिव गुणाजिताम् ॥ ७९ सुताश्चतुर्दर्शास्यान्ये जज्ञिरे विजयादयः । गुणैर्मनून्व्यतिक्रान्ताः सङख्यया सदृशोऽपि ते ॥ ८० प्रवद्धनिजतेजोभिस्तैः पञ्चदशभिर्भृशम् । कान्तः कलाविशेषैर्वा राजराजो रराज सः ॥ ८१ राजाराजप्रभो लक्ष्मीवती देवी प्रियानुजः । श्रेयान न्यायान् जयः पुत्रस्तद्राज्यं पूज्यते न कैः ।।८२ स पुत्रविटपाटोपः सोमकल्पाङध्रिपश्चिरम् । भोग्यः सम्भृतपुण्यानां स्वस्य चाभूत्तदभुतम् ॥ ८३ अथान्यदा जगत्कायभोगबन्धून्विधुप्रभः । अनित्याशुचिदुःखान्यान्मत्वा याथात्म्यवीक्षणः ॥ ८४ विरज्य राज्ये संयोज्य घुर्ये शौर्योजिते जये। अजादार्यवीर्यादिप्राज्यराज्यसमुत्सुकः ॥ ८५ ___त्या राजाला लक्ष्मीचा तिरस्कार न करता त्या राजाच्या वक्षःस्थलावर-हृदयावर राहणारी व अतिशय प्रिय अशी जणु दुसरी लक्ष्मी आहे असे भासणारी प्रेक्ष्या-दर्शनीय-सुंदर अशी लक्ष्मीवती नांवाची राणी होती ।। ७८ ।। बुद्धि व विक्रम-पराक्रम या दोघापासून जसा जय उत्पन्न होतो त्याप्रमाणे या दोघापासून सोमप्रभ राजा व लक्ष्मीवती राणीपासून जय नांवाचा मुलगा झाला. तो सद्गुणानी मिळविलेल्या लक्ष्मीप्रमाणे संपत्तीप्रमाणे जन्मापासूनच कीर्तीला वाढविणारा होता ॥ ७९ ॥ या सोमप्रभ राजाला विजय वगैरे नांवे ज्यांची आहेत असे जयकुमाराशिवाय आणखी चौदा पुत्र होते. हे सगळे संख्येने मनुसारखे असले तरीही त्यांनी आपल्या गुणांनी मनूना उल्लंघिले होते ॥ ८० ॥ ___ अतिशय सुन्दर विशेषकलांनी जसा चन्द्र सुन्दर दिसतो तसा आपल्या तेजाला वाढविणारे अतिशय सुन्दर व विशेष कलांना धारण करणारे अशा पंधरा पुत्रानी तो राजाधिराज सोमप्रभ विशेष शोभत होता ॥ ८१ ।। ज्या राज्याचा राजा सोमप्रभ होता व लक्ष्मीमती राणी होती व धाकटा भाऊ श्रेयान् हा ज्याला प्रिय होता व जयकुमार हा ज्याचा वडिल पुत्र होता असे त्या सोमप्रभ राजाचे राज्य कोणाकडून आदरणीय झाले नव्हते बरे ? ।। ८२ ॥ याप्रमाणे पुत्ररूपी शाखांचा विस्तार धारण करणारा हा सोमप्रभराजारूपी कल्पवृक्ष ज्यांनी पुण्यसंचय धारण केला आहे अशा अन्य पुरुषांना व स्वतः आपणासही भोग्य झाला होता हे आश्चर्य आहे. तात्पर्य- हा सोमप्रभ राजा पुत्रांनी सुखी झाला होता व अन्य सर्व लोक देखील या राजापासून सुखी झाले होते ।। ८३ ।। यानंतर कोणे एकेवेळी पदार्थांचे यथार्थ स्वरूप जाणणारा हा सोमप्रभ राजा हे जग, शरीर, भोगाचे पदार्थ व आप्त नातलग हे सर्व अनित्य, अपवित्र आणि दुःखस्वरूप व आपणापासून भिन्न आहेत असे मानून विरक्त झाला व आपल्या राज्यावर शूर, धुरन्धर अशा जयकुमाराला त्याने बसविले व केव्हाही नाश न पावणारे, अनन्तसुख वीर्यादि गुणानी श्रेष्ठ अशा उत्तम मुक्ति राज्याविषयी तो उत्सुक झाला ।। ८४-८५ ॥ Page #530 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-९५) महापुराण (५१९ अभ्येत्य वृषभाभ्यासं दीक्षित्वा मोक्षमन्वभूत् । श्रेयसा सह नार्पत्यमनुजेन यथा पुरा ॥ ८६ पितुः पदमधिष्ठाय जयोऽतायि महीं महान् । महतोऽनुभवन्भोगान्संविभज्यानुजः सह ॥ ८७ एकवायं विहारार्थ बाह्योद्यानमुपागतः । तत्रासीनं समालोक्य शीलगुप्तमहामुनिम् ॥ ८८ त्रिःपरीत्य नमस्कृत्य नुत्वा भक्तिभरान्वितः। श्रुत्वा धर्म तमापृच्छय प्रीत्या प्रत्याविशत्पुरीम् ॥८९ तस्मिन्वने वसन्नागमिथुनं सह भूभुजा । श्रुत्वा धर्म सुधां मत्वा पपौ प्रीत्या दयारसम् ॥ ९० कदाचित्प्रावृडारम्भे प्रचण्डाशनिताडितः । मृत्वासौ शान्तिमादाय नागो नागामरोऽभवत् ॥ ९१ अन्यधुरिभमारुह्य पुनस्तद्वनमापतत् । नागी श्रुतवती धर्म राजात्रैव सहात्मना ॥ ९२ वीक्ष्य काकोदरेणामा जातकोपो विजातिना । लोलानीलोत्पलेनाहन्दम्पती तौ घिगित्यसो ॥ ९३ पलायमानौ पाषाणः काष्ठोष्ठः पदातयः। आघ्नन्सर्वे न को वात्र दुश्चरित्राय कुप्यति ॥ ९४ पापः स तदवणैर्मत्वा वेदनाकुलधीस्तदा । नाम्नाजायत गडगयां कालीति जलदेवता ॥ ९५ यानंतर तो सोमप्रभ राजा आपल्या श्रेयान् नामक धाकटया भावासह दीक्षा घेऊन मोक्षसुखाचा अनुभव घेऊ लागला. जसे प्रथमतः आपल्या भावासह त्या सोमप्रभाने राज्य सुखाचा अनुभव घेतला तसे तो आता मोक्षामध्ये आपल्या लहान भावासह मुक्तिसुखाचा अनुभव घेऊ लागला ॥ ८६ ।। ___आपल्या पित्याच्या स्थानावर बसून उत्तम भोगोपभोगांच्या पदार्थांची विभागणी करून आपल्या कनिष्ट बंधसह त्यांचा उपभोग जयकमार घेत असे व अशारीतीने त्याने पथ्वीचे पालन केले. एकदा तो क्रीडेकरिता आपल्या नगराच्या बाहेरील बागेत आला. तेथे त्याने शीलगप्तनामक महामनींना पाहिले. अतिशय भक्तीने त्याने त्यांना तीन प्रदक्षिणा घातल्या नमस्कार करून त्यांची त्याने स्तुति केली. व त्यांच्यापासून धर्म ऐकला नंतर प्रेमाने त्यांना विचारून त्याने आपल्या नगरीत प्रवेश केला ॥ ८७-८९ ॥ त्या बागेत राहणारे एक नागाचे जोडपे होते. त्याने देखिल राजाबरोबर धर्म अमृत आहे असे मानून मोठ्या प्रीतीने त्यातील दयारसाचे प्राशन केले. कोणते एकेवेळी पावसाळ्याच्या प्रारंभी भयंकर विजेचा प्रहार त्या नागावर झाला तेव्हा तो शान्ति धारण करून मरण पावला व नागकुमार देव झाला ।। ९०-९१ ॥ दुसरे दिवशी पुन्हा हत्तीवर बसून जयकुमार त्या वनात आला व आपल्या बरोबरच जिने धर्म श्रवण केले होते त्या नागिणीला विजातीय काकोदरसाबरोबर आलेल्या तिला त्याने पाहिले. त्यामुळे राजाला राग आला व या दंपतीला धिक्कार असो असे म्हणून त्याने क्रीडेसाठी हातात घेतलेल्या नीलकमलाने त्या दंपतीस ताडले ।। ९२-९३ ॥ यानंतर पळणाऱ्या त्या जोडप्याला दगड, काठ्या व ढेकळानी सर्व पायदळ सैनिक मारू लागले. बरोबरच आहे की, दुराचान्यावर कोण बरे रागावत नाही ।। ९४ ॥ तो पापी काकोदर साप त्या जखमामुळे होणाऱ्या वेदनानी व्याकुळ बुद्धीचा होऊन मरण पावला व गंगानदीत काली या नावाने जलदेवता झाला ॥ ९५ ॥ Page #531 -------------------------------------------------------------------------- ________________ ५२० ) महापुराण सञ्जातानुशया सापि धृत्वा धर्मं हृदि स्थिरम् । भूत्वा प्रिया स्वनागस्य राज्ञा स्वमृतिमब्रवीत् ॥९६ नागामरोऽपि तां पश्यन्कोपादेवममन्यत । दर्पात्तेनखलेनेषा वराकी हा हता वृथा ॥ ९७ विधवेति विवेदाधीनेदृक्षं मामिमं धवम् । तत्प्राणान्न हरे यावद्भुजङ्गः केन वास्म्यहम् ॥ ९८ इत्यतोऽसौ दिदंस्तं जयं तद्गृहमासदत् । न सहन्ते ननु स्त्रीणां तिर्यञ्चोऽपि पराभवम् ॥ ९९ वासगेहे जयो रात्रौ श्रीमत्याः कौतुकं प्रिये । शृण्वेकं दृष्टमित्याख्यत्तद्भुजङ्गीविचेष्टितम् ॥ १०० आभिजात्यं वयो रूपं विद्यां वृत्तं यशः श्रियम् । विभुत्वं विक्रमं कान्तिमैहिकं पारलौकिकम् ॥ १०१ प्रीतिमप्रीतिमादेयमनादेयं कृपां त्रपाम् । हानिं वृद्धि गुणान्दोषान् गणयन्ति न योषितः ॥ १०२ धर्मः कामश्च सञ्चयो वित्तेनायं तु सत्पथः । क्रीणन्त्यर्थं स्त्रियस्ताभ्यां धिक्तासां वृद्धगृध्नुताम् ॥ वृश्चिकस्य विषं पश्चात्पन्नगस्य विषं पुरः । योषितां दूषितेच्छानां विश्वतो विषमं विषम् ॥ १०४ सत्याभासैर्न तैः स्त्रीणां वञ्चिता ये न धीधनाः । दुःश्रुतीनामिवैताभ्यो मुक्तास्ते मुक्तिवल्लभाः ॥ १०५ (४३-९६ जिला आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप झाला आहे अशी ती नागीण देखिल आपल्या मनात धर्माला स्थिर धारण करून मरण पावली व आपल्या नागाची ती प्रिया झाली. व त्याला तिने राजाने मला ठार मारले असे सांगितले ।। ९६ ।। तिला पाहून त्या नागदेवाने देखिल कोपाने असा विचार केला ' अरेरे त्या दुष्ट राजाने त्या गरीब नागिणीला उन्मत्तपणाने व्यर्थ मारले.' मी हिचा देवजातीचा समर्थ पति असताही त्या मूर्खाने हिला विधवा मानले काय ? बरे मी त्याचे जोपर्यन्त प्राणहरण करणार नाही तोपर्यन्त मी स्वतःला सर्प समजणार नाही ।। ९७-९८ ।। याप्रमाणे विचार करून त्या जयकुमारास दंश करण्याच्या इच्छेने त्याच्या घरी आला. बरोबर आहे की तिर्यंच देखिल आपल्या स्त्रीचा अपमान कोणी केल्यास तो सहन करीत नाहीत ॥ ९९ ॥ तो जयकुमार देखिल रात्री आपल्या शयनगृहात श्रीमती नावाच्या आपल्या स्त्रीला असे म्हणाला हे प्रिये मी एक कौतुकाची गोष्ट पाहिली ती तुला सांगतो ऐक असे म्हणून त्याने त्या नागिणीचे चरित्र तिला सांगितले ।। १०० ।। उत्तम कुल, वय, रूप, विद्या, आचार, यश, सम्पत्ति, प्रभुत्व-अधिकार, पराक्रम, तेज, ऐहिक व पारलौकिक, प्रीति व अप्रीति, संग्राह्य व त्याज्य, दया धर्म आणि काम या दोहोंचा संचय धनाने करावा हा सन्मार्ग आहे पण या स्त्रिया धर्म आणि काम यांच्याद्वारे धनाचा संचय करितात म्हणून त्यांच्या वाढलेल्या या हावरेपणाला धिक्कार असो. विंचवाचे विष मागे असते, सर्पाचे विष पुढे असते. पण ज्यांच्या इच्छामध्ये दुष्टता भरली आहे अशा स्त्रियांच्या सर्व शरीरात विष भरलेले असते ।। १०१-१०४ ॥ वरून सत्य भासणान्या स्त्रियांच्या त्या नम्र वचनानी जे बुद्धिमान फसविले गेले नाहीत, ते त्यांच्यापासून मुक्त झालेले पुरुष मुक्तिलक्ष्मीचे प्रिय होतात ॥ १०५ ॥ Page #532 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-११३) महापुराण (५२१ तासां किमुच्यते कोपः प्रसादोऽपि भयंकरः। हन्त्यधीरान्प्रविश्यान्तरगाधसरितां यथा ॥ १०६ जालकरिन्द्रजालेन वञ्च्या ग्राम्या हि मायया।ताभिः सेन्द्रो गुरुर्वञ्च्यस्तन्मायामातरः स्त्रियः॥१०७ ताः श्रयन्ते गुणा नैव नाशभीत्या यदि श्रिताः। तिष्ठन्ति न चिरं प्रान्ते नश्यन्त्यपि च ते स्थिताः॥ दोषाः किं तन्मयास्तासु दोषाणां कि समद्भवः । तासां दोषेभ्य इत्यत्र न कस्यापि विनिश्चयः ॥१०९ निर्गुणान्गुणिनो मन्तुं गुणिनः खलु निर्गुणान् । नाशकत्परमात्मापि मन्यन्ते ता हि हेलया ॥ ११० मोक्षो गुणमयो नित्यो दोषवत्यः स्त्रियश्चलाः । तासां नेच्छन्ति निर्वाणमत एवाप्तसूक्तिषु ॥१११ लक्ष्मीः सरस्वती कोतिर्मुक्तिस्त्वमिति विश्रुताः। दुर्लभास्तासु वल्लीषु कल्पवल्ल्य इव प्रिये ॥११२ इत्येतच्चाह तच्छ्रुत्वा तं जिघांसुरहिस्तदा। पापिना चिन्तितं पापं मया पापापलापतः ॥ ११३ .................. अगाधनद्यांचे स्वच्छ किंवा गढूळ पाणी भितया मनुष्याला बुडवून मारते तसे त्यांचा कोपच भयंकर असतो असे नाही तर त्यांची प्रसन्नता देखिल भयंकर असते व हे दोन्हीही मनुष्याचा घात करितात ।। १०६ ॥ जे फसविणारे गारुडी असतात ते आपल्या गारुडीविद्येने ग्राम्य-अडाणी लोकांना फसवितात. पण स्त्रियांनी आपल्या मायेने इन्द्रासहित बृहस्पतीलाही फसविले आहे म्हणून स्त्रिया ह्या फसविणाऱ्या मायेच्या माता आहेत ।। १०७ ॥ सद्गुण स्त्रियांचा आश्रय करीत नाहीत. आम्ही कोणाचा आश्रय केला नाही तर नष्ट होऊ या भीतीने जर स्त्रियांचा त्यांनी आश्रय केला तर ते फार वेळ राहत नाहीत व आश्रय घेऊन शेवटी नाश पावतातच ॥ १०८ ॥ काय दोष हे स्त्रीरूपाने उत्पन्न झाले आहेत? किंवा दोष त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाले आहेत? किंवा त्यांची दोषापासून उत्पत्ति झाली आहे ? या विषयी कोणाचाच कांही निर्णय झालेला नाही ॥ १०९ ॥ गुणरहित मनुष्याला गुणी मानणे व गुणयुक्ताला निर्गुण मानणे ही गोष्ट परमेश्वरालाही शक्य नाही. पण स्त्रिया मात्र तसे सहज मानतात ।। ११० ॥ मोक्ष गुणांनी भरलेला आहे व नित्य आहे व स्त्रिया दोषांनी भरलेल्या आणि चंचल आहेत. म्हणून त्यांना सर्वज्ञाच्या आगमात मोक्ष सांगितला नाही ॥ १११ ।। हे प्रिये ! लक्ष्मी, सरस्वती, कीर्ति, मुक्ति आणि तू (श्रीमति राणी) या सर्व प्रसिद्ध स्त्रिया वेलीमध्ये कल्पवल्ली जशी दुर्लभ असते तशा तुम्ही चौघीजणी सर्व स्त्रियात दुर्लभ आहात ॥ ११२ ॥ ___ या प्रकारे जयकुमाराने भाषण केले. व ते ऐकून त्याला मारण्याची इच्छा करणारा नाग मी पाप्याने पापी स्त्रीच्या भाषणावरून ही पाप उत्पन्न करणारी गोष्ट मनात आणिली हे अयोग्य झाले असे चिन्तन करू लागला असे म्हणाला- ॥ ११३ ॥ म.६६ Page #533 -------------------------------------------------------------------------- ________________ ५२२) महापुराण (४३-११४ आर्याणामपि वाग्भूयो विचार्या कार्यवेदिभिः। वायाः किं पुनर्नार्याः कामिनां का विचारणा॥११४ भवेऽस्मिन्नेव भव्योऽयं भविष्यति भवान्तकः । तन्नास्य भयमन्येभ्यो भयमेतद्धयैषिणाम् ॥ ११५ अहं कुतः कुतो धर्मः संसर्गादस्य सोऽप्यभूत् । ममेह मुक्तिपर्यन्तो नान्यत्सत्सङगमाद्धितम् ॥ ११६ इत्यनुध्याय निःकोपः कृतवेदी जयं स्वयम् । रत्नरनयॆः सम्पूज्य स्वप्रपञ्चं निगद्य च ॥११७ मां स्वकार्ये स्मरेत्यक्त्वा स्वावासं प्रत्यसौ गतः। हन्ताजितपुण्यानां भवत्यभ्यदयावहः॥ ११८ स चक्रेण सहाक्रम्य दिक्चक्रं व्यक्तविक्रमः। क्रमान्नियम्य व्यायाम संयमीव शमं श्रितः ॥ ११९ ज्वलत्प्रतापः सौम्योऽपि निर्गुणोऽपि गुणाकरः । सुसर्वाङ्गोऽप्यनङ्गाभः सुखेन स्वपुरे स्थितः ॥१२० जे आर्य आहेत त्यांच्या देखिल भाषणाचा कार्यज्ञ लोकांनी विचार केला पाहिजे. मग जी त्याज्य आहे अशा स्त्रीच्या भाषणाचा विचार केला पाहिजे हे सांगायलाच नको. पण कामी पुरुषाला एवढा विचार कोठून असणार ? ॥ ११४ ॥ हा जयकुमार राजा भव्य आहे व याच भवात तो संसाराचा नाश करून मुक्त होणारा आहे. म्हणून याला इतरापासून भय नाही पण याला भय उत्पन्न करावे अशी इच्छा करणायांना मात्र भय उत्पन्न होईल ॥ ११५ ॥ मी कोठे व धर्म कोठे पण मला याच्या संगतीपासून त्या धर्माची प्राप्ति झाली व हा धर्म निश्चयाने मुक्ति प्राप्त करून देणारा आहे. बरोबर आहे की, सज्जनांच्या संगमापासून हितच होते, अहित केव्हांच होत नाही ॥ ११६ ॥ __ असा विचार करून तो कृतज्ञ नागकुमार कोपरहित झाला व त्याने जयकुमाराचा अमूल्य अशी रत्ने भेट देऊन आदर केला. मी आपणास मारण्यासाठी आलो होतो. ही सर्व हकीकत त्याने त्याला सांगितली आणि तुझ्या एकाद्या कार्याविषयी माझे स्मरण कर असे त्याने त्याला सांगितले. तो आपल्या स्थानी निघून गेला. ज्यांच्याजवळ अत्युत्कृष्ट पुण्य आहे अशांना मारण्यास आलेली व्यक्ति त्यांच्या कल्याणाला कारण होते ॥ ११८-११७ ॥ इकडे जयकुमाराने चक्ररत्न बरोबर घेऊन सर्व दिशांचे त्याने उल्लंघन केले अर्थात् सर्व दिशा त्याने जिंकल्या व आपला पराक्रम त्याने प्रकट केला. यानंतर ते सर्व दिशाचे आक्रमण त्याने बंद केले व संयमीप्रमाणे तो शान्त झाला ॥ ११९ ॥ हा जयकुमार सौम्य असून देखिल जळजळित पराक्रमी होता व निर्गुण असूनही गुणांचा समूह धारण करीत होता. गुणवान् असूनही निर्गुण होता याचा परिहार- तो जयकुमार दिग्विजय करण्यात चक्राला सहायक झाला म्हणून निर्गुण होता पण स्वतः अनेक गुणांचा साठा होता. सुसर्वाङग असूनही तो अनंगाभ होता हे म्हणणे विरुद्ध आहे. पण परिहार असा- त्याची सर्व अंगे सुंदर होती व अनङगाभ-मदनाप्रमाणे सुंदर होता असा तो जयकुमार राजा सुखाने आपल्या नगरात राहिला ॥ १२० ॥ Page #534 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-१२८) अथ देशोऽस्ति विस्तीर्णः काशिस्तत्रैव विश्रुतः । पिण्डीभूता भयात्काललुण्टाकादिव भोगभूः ॥ १२१ तदापि खलु विद्यन्ते कल्पवल्लीपरिष्कृताः । द्रुमाः कल्पद्रुमाभासाश्चित्रास्तत्र क्वचित् क्वचित् ॥ १२२ तत्रैवाभीष्टमावर्ज्य यत्तत्रैवानुभूयते । स तज्जेतेति निःशङ्कं शङ्के स्वर्गापवर्गयोः ॥ १२३ वाराणसी पुरी तत्र जित्वा तामामरों पुरीम् । अमानैस्तद्विमानानि स्वसौधेरिव साहसीत् ॥ १२४ प्राक्समुच्चितदुष्कर्मा न तत्रोत्पत्तुमर्हति । प्रमादादपि तज्जोऽपि स्यात्कि पापी मनस्यपि ।। १२५ एवं भवत्रयश्रेयः सूचनी जिनवर्त्मनि । विनेयान् जिन विद्येव सान्यस्थान्यप्यवीवृतत् ॥ १२६ नाम्नैव कम्पितारातिस्तस्याः पतिरकम्पनः । विनीत इव विद्यायाः स्वाभिप्रेतार्थसम्पदः ॥ १२७ पुरोपार्जितपुण्यस्य वर्द्धने रक्षणे श्रियः । न नीतिः किन्तु कामे च धर्मे चास्योपयोगिनी ॥ १२८ महापुराण त्या भरतक्षेत्रातच विस्तीर्ण व प्रसिद्ध असा काशीदेश आहे. दुष्ट कालरूपी लुटारूच्या भयामुळे एके ठिकाणी गोळा झालेली जणु भोगभूमी आहे असा तो काशीदेश शोभत होता ॥ १२१ ॥ (५२३ त्यावेळीही त्या काशीदेशात कोठे कोठे कल्पलतानी शोभत असलेले व कल्पवृक्षाप्रमाणे भासणारे अनेक प्रकारचे वृक्ष होते ॥ १२२ ॥ आपणास आवडणान्या वस्तूंची त्याच देशात प्राप्ति करून घेऊन त्याच देशात त्या वस्तूंचा उपभोग घेतला जात असल्यामुळे तो देश स्वर्ग आणि मोक्ष या दोघानाही जिंकणारा आहे असे निःसंशय वाटत असे ।। १२३ ।। त्या देशात वाराणसी नांवाची नगरी आहे. तिने अमरांच्या पुरीला- देवनगरीला जिंकले होते व न मोजता येणाऱ्या अशा आपल्या चुनेगच्ची वाड्यानी ती नगरी अमरपुरीच्या विमानांना जणु हसत होती ।। १२४ ॥ ज्याने मागील जन्मात दुष्कर्म पापकर्म संचित केले आहे, असा जीव त्या नगरीत उत्पन्न होण्यास योग्य नसे. जर चुकून पापी मनुष्याचा जन्म झाला तर तो मनात देखील पापकर्म आणीत असेल काय ? ।। १२५ ।। याप्रमाणे भूत, भविष्यत् आणि वर्तमान काल या तीन भवांच्या कल्याणाना सूचित करणारी ती नगरी जिनविद्या जिनवाणीप्रमाणे अन्य जागी राहणाऱ्या शिष्यानाही जिनेश्वरांनी सांगितलेल्या मार्गात प्रवृत्त करीत असे ॥ १२६ ॥ त्या नगरीचा राजा अकम्पन या नांवाचा होता. त्याने केवळ आपल्या नांवानेच शत्रूंना कम्पित केले होते व नम्र असा सुशिक्षित मनुष्य जसा विद्येचा स्वामी होतो तसे हा राजा आपणास आवडणाऱ्या वस्तूंनी भरलेल्या त्या नगरीचा स्वामी होता ।। १२७ ।। या अकंपन राजाची नीति पूर्वजन्मी मिळविलेल्या पुण्याची वाढ करणे आणि संपत्तीचे रक्षण करणे याच कार्यात फक्त उपयोगी पडत असे असे नाही तर काम व धर्मपुरुषार्थ यांच्या मध्येही ती उपयोगी पडत असे ॥ १२८ ॥ Page #535 -------------------------------------------------------------------------- ________________ ५२४) (४३-१२९ नहर्ता केवलं दाता न हन्ता पाति केवलम् । सर्वास्तत्पालयामास स धर्म विजयी प्रजाः ॥ १२९ परमात्म्ये पदे पूज्यो भरतेन यथा पुरुः । गृहाश्रमे तथा सोऽपि सा तस्य कुलवृद्धता ॥ १३० तस्यासीत्सुप्रभादेवी शीतांशोर्वा प्रभा तया । मुमुदे कुमादाबोधं विदधत्सकलाश्रयः ।। १३१ न लक्ष्मीरपि तत्प्रीत्यै सती सा सुप्रजा यथा । सत्फला इव सद्वल्ल्यः पुत्रवत्यः स्त्रियः प्रियाः ॥ तस्यां तन्नाथवंशाग्रगण्यस्येवांशवो रवेः । प्राच्यां दीप्त्याप्तदिक्चक्राः सहस्रमभवत्सुताः ॥ १३३ हेमाङ्गदसुकेतुश्री सुकान्ताद्याह्वयैः स तैः । वेष्टितः संव्यदीपिष्ट शक्रः सामानिकैरिव ।। १३४ हिमवत्पद्ययोर्गङ्गासिन्धू इव ततस्तयोः । सुते सुलोचना लक्ष्मीमती चास्तां सुलक्षणे ।। १३५ सुलोचनासौ बालेव लक्ष्मीः सर्वमनोरमा । कलागुणैरभासिष्ट चन्द्रिकेव प्रवद्धता ॥ १३६ महापुराण तो राजा फक्त प्रजेपासून कर वसूल करीत होता असे नाही तर तिला तो देतही होता. तो प्रजेला केवळ शिक्षाच करीत होता असे नाही तर तिचे रक्षणही करीत होता. - याप्रमाणे धर्माने विजय मिळविणारा तो राजा आपल्या सर्व प्रजांचे पालन करीत असे ॥ १२९ ॥ परमात्मपदात मुक्तिमार्गात श्री आदिभगवंत जसे भरत राजाकडून पूजिले जात असत तसे गृहस्थाश्रमात हा अकंपन राजा भरताकडून पूज्य मानला जात असे. ही त्याची अकम्पनराजाची कुलवृद्धता होती अर्थात् कुलामुळे या राजाला वडीलपणा प्राप्त झाला होता ॥ १३० ॥ चंद्राची जशी प्रभा तशी त्या अकम्पनराजाची सुप्रभा नामक राणी होती व कुमुदाबोध-कमलांना प्रफुल्ल करणारा आणि कलाश्रय सोळा कलांचा आधार अशा चंद्राप्रमाणे कुमुदाबोध - पृथ्वीवर मुदाआनंद व बोघ ज्ञान यांची वृद्धि करणारा तो राजा तिच्यासह सुप्रभा राणीबरोबर आनंद पावत असे ।। १३१ ॥ सुप्रजा - जिला चांगले पुत्र व कन्या झाले आहेत अशी ती सुप्रभा राणी राजाला फार आवडत असे पण लक्ष्मी देखिल त्याला तितकी आवडत नव्हती. ज्यांना चांगली फळे येतात अशा वेली जशा लोकप्रिय होतात तशा पुत्रवती स्त्रिया पतिप्रिय होतात ॥ १३२ ॥ जसे पूर्वदिशेत आपल्या तेजांच्या द्वारे संपूर्ण दिशाना प्रकाशित करणारे किरण सूर्यापासून उत्पन्न होतात तसे त्या सुप्रभाराणीमध्ये नाथवंशाचा अग्रणी अशा अकम्पन राजापासून हजार सुपुत्र उत्पन्न झाले ॥ १३३ ॥ जसा सामानिक देवांनी वेष्टिलेला इन्द्र शोभतो तसा तो अकम्पन राजा हेमाङगद, सुकेतु, श्रीकान्त इत्यादि नांवाच्या पुत्रानी शोभत होता ।। १३४ ॥ हिमवान् पर्वत व पद्मसरोवर या दोघांच्या संबन्धापासून जशा गंगा आणि सिन्धू या दोन नद्या उत्पन्न झाल्या तशा या अकंपन राजा व सुप्रभा राणीला सुलक्षणी अशा सुलोचना व लक्ष्मीमती नांवाच्या दोन कन्या झाल्या ।। १३५ ।। ही सुलोचना कन्या बाललक्ष्मीप्रमाणे सर्व जनांच्या मनाला आनंदित करणारी होती. कलागुणांनी वाढविलेल्या चंद्राच्या कान्तीप्रमाणे सद्गुणानी वृद्धिंगत केलेली अशी अतिशय शोभत होती ।। १३६ ।। Page #536 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-१४२) महापुराण (५२५ सुमत्याख्यामला शुक्लनिशेवावर्द्धयत्कलाः । धात्री शशाङ्करेखायास्तस्याः सातिमनोहरा ॥ १३७ अभद्रागी स्वयं रागस्तत्क्रमाजं समाश्रितः। रागाय कस्य वा न स्यात् स्वोचितस्थानसंधय ॥१३८ नखेन्दुचन्द्रिकातस्याः शश्वत्कुवलयं किल । विश्वमाह्लादयच्चित्रमनुवृत्त्या क्रमाब्जयोः ॥ १३९ रेजुरङगुलयस्तस्याः क्रमयोर्नखरोचिषा । इयन्त इति मद्वेगाः स्मरेणेव निवेशिताः ॥ १४० नताशेषो जयः स्नेहादनंसीते ततस्तयोः । याः श्रीः क्रमाब्जयोस्तस्याः सा किमस्ति सरोरुहे ॥१४१ न स्थूले न कृशे न— न वक्रे न च सङ्कटे । विकटे न च तज्जो शोभान्यवेनयोरसौ ॥ १४२ शुक्लपक्षातील निर्मलरात्र जशी प्रतिपदेच्या चन्द्राच्या रेखेला कलाकलांनी वाढविते तशी सुमति नांवाची दाई या सुलोचना कन्येच्या अति सुन्दर अशा कलांना वाढवित असे ॥ १३७॥ तिच्या चरणकमलाचा ज्याने आश्रय घेतला आहे असा राग (तांबडा वर्ण) तांबडी कान्ति स्वतः रागी-तिच्यावर राग-प्रेम करू लागला. बरोबरच आहे की, स्वतःला योग्य अशा स्थानाचा लाभ तिला झाला आहे अशी कोणती व्यक्ति रागी प्रेमयुक्त होणार नाही बरे ? अर्थात् योग्य आश्रय मिळाला म्हणजे कोणतीही वस्तु सुंदर दिसते ॥ १३८ ॥ . तिच्या नखरूप चन्द्राची कान्ति दोन चरणकमलांना अनुकूल राहून देखिल सम्पूर्ण कुवलयाला-नीलकमलांना अथवा पृथ्वीमण्डलाच्या आनंदाला नेहमी विकसित करीत होती. तात्पर्य- चन्द्राचे चांदणे कमलाला अनुकूल असत नाही ते त्याला मिटविते परन्तु सुलोचनेच्या नखरूपी चन्द्राचे चांदणे तिच्या चरणकमलांना अनुकूल राहूनही कुवलयाला नीलकमलांना विकसित करीत होते हे आश्चर्यकारक होते ।। १३९ ॥ तिच्या दोन पायांच्या नखांच्या कान्तीनी तिच्या पायांची दहा बोटे शोभत होती जणु मदनाने माझे वेग इतके आहेत हे दाखविण्याच्या हेतूने त्यांची स्थापना केली आहे असे वाटते. ( ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला मदनबाधा होते ती दहा प्रकारची होते. त्या दहा बाधा अशा- १) चिन्ता, २) स्त्री-पुरुषांना एकमेकांना पाहण्याची इच्छा, ३) मोठ्याने श्वासोच्छ्वास करणे, ४) ज्वर, ५) अंगात दाह होणे, ६) अरुचि, ७) मूर्छा, ८) उन्मत्तपणा, ९) जगण्याविषयी संशय, १०) मृत्यु, या मदनाच्या दहा अवस्था होत ॥ १४० ॥ ज्याला सर्व नमस्कार करतात असा हा जयकुमारही प्रेमाने तिच्या चरणकमलांना नमस्कार करीत होता. यास्तव तिच्या चरणकमलात जी शोभा होती ती त्या कमलांच्या ठिकाणी असू शकते काय ? अर्थात् असणार नाही ।। १४१ ॥ त्या सुलोचना सतीच्या मांड्या स्थूलही नव्हत्या व कृशही नव्हत्या. त्या सरळही नव्हत्या व वाकड्याही नव्हत्या. त्या एकमेकीला चिकटलेल्याही नव्हत्या व अगदी विलगही पण नव्हत्या. अशा त्या दोन मांड्यांची शोभा कांही वेगळीच होती ।। १४२ ॥ Page #537 -------------------------------------------------------------------------- ________________ ५२६) महापुराण (४३-१४३ काञ्चीस्थानं तदालोच्येवोरू स्थूले सुसङ्गते । कामगर्भगृहद्वारस्तम्भयष्टयाकृती कृते ॥ १४३ वेदिकेव मनोजस्य शिरो वा स्मरदन्तिनः । सानुर्वानङ्गशैलस्य शुशभेऽस्याः कटीतटम् ॥ १४४ कृत्वा कृशं भृशं मध्यं बद्धं भङ्गभयादिव । रज्जुभिस्तिसृभिर्धात्रा बलिभिर्गाढमाबभौ ॥ १४५ नाभिकूपप्रवृत्तास्या रसमार्गसमुद्गता । श्यामा शाद्वलमालेव रोमराजिय॑राजत ॥ १४६ भिन्नी युक्तौ मृदू स्तब्धावृष्णो सन्तापहारिणौ स्तनौ विरुद्धधर्माणौ स्याद्वादस्थितिमूहतुः ॥ १४७ सह वक्षोनिवासिन्या समाश्लिष्य जयः श्रिया। स्वीकृतौ यदि चेत्ताभ्यां वयेते तद्भुजौ कथम् ॥१४८ बीरलक्ष्मीपरिष्वक्तजयदक्षिणबाहुना । स वामेन परिष्वक्तस्तत्कण्ठस्तस्य कोपमा ॥ १४९ निःकूपो पेशलौ श्लक्ष्णौ तत्कपोलो दिलेसतुः । कान्तौ कलभदन्ताभौ जयवक्त्राब्जदर्पणौ ॥ १५० त्या सुलोचनेचे कमरपट्टा घालण्याचे स्थान-कंबर जणु पाहून ब्रह्मदेवाने तिच्या मांड्या पुष्ट एकमेकीस चिकटलेल्या व मदनाच्या घराच्या दरवाजाच्या दोन खांबाच्या आकारासारख्या बनविल्या होत्या ॥ १४३ ।। तिचे कटीतट-ढुंगण जणु मदनाचा बसण्याचा कट्टा किंवा मदनरूपी हत्तीचे जणु मस्तक की काय ? अथवा मदनरूपीपर्वताचा तट आहे की काय असे शोभत होते ॥ १४४ ॥ तिचा मध्यभाग अर्थात् कंबर ती ब्रह्मदेवाने अतिशय कृश अर्थात् बारीक बनविली व ती मोडेल या भयाने जणु पोटावर असलेल्या ज्या त्रिवळ्या हेच जणु जाड दोरखंड त्यांनी ती त्याने बांधली आहेत अशी शोभली ।। १४५ ।। नाभिरूपी विहिरीतून निघालेली अशी या सुलोचनेच्या पोटावरील बारीक रोमपंक्ति अशी सुंदर दिसत होती की जणू ती पाण्याच्या मार्गापासून उगवलेली हिरवीगार व लहान गवताची तृणपंक्ति आहे अशी भासत होती ।। १४६ ।। __या सुलोचनेचे दोन स्तन भिन्न असूनही एकमेकाशी संबद्ध झालेले होते. मोठे असल्यामुळे अन्योन्य मिळालेले होते. मृदुस्पर्शाने युक्त असूनही उन्नत व कठोर दृढ होते व गरम असूनही काम संताप नष्ट करणारे होते. अर्थात् विरुद्ध स्वभाव धारण करणारे असल्यामुळे स्याद्वादाच्या स्थितीला- स्वरूपाला त्यांनी धारण केले होते ॥ १४७ ॥ या सुलोचनेच्या दोनही बाहूंनी वक्षःस्थलावर निवास करणाऱ्या लक्ष्मीला आलिंगन देऊन जयकुमाराला स्वीकारले होते म्हणून त्यांचे वर्णन करणे कवीला कसे शक्य होईल बरे? ॥ १४८ ॥ ___ या सुलोचनेचा कंठ वीरलक्ष्मीने सुशोभित अशा उजव्या व डाव्या हाताने जयकुमाराकडून आलिंगिला गेला असल्यामुळे त्याचे कोणत्या उपमेने वर्णन केले जाईल बरे ? ॥ १४९ ॥ ___या सुलोचनेचे गाल ज्याना खळगी पडत नाही असे सुन्दर, स्निग्ध असे शोभत होते व ते हत्तीच्या दाताप्रमाणे कान्ति युक्त होते व ते जयकुमाराला मुख पाहण्यास दर्पणाप्रमाणे वाटत होते ।। १५० ॥ Page #538 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-१५७) महापुराण बिम्बप्रवालादि नोपमेयमपीष्यते । अधरस्यातिदूरत्वाद्वर्णाकार रसादिभिः ॥ १५१ चिताः सिताः समाः स्निग्धाः वन्ताः कान्ताः प्रभान्विताः । अन्तः करोति तद्वक्त्रं तानेव कथमन्यथा ॥ कुतः कृता समुत्तुङ्गा स्वादमानास्यसौरभम् । मध्येवक्त्रं किमध्यास्ते न सती यदि नासिका ॥१५३ कर्णान्तगामिनी नेत्रे वृद्धे नरशरोपमे । सोमवंशस्य कः क्षेपः पद्मोत्पलजये तयोः ॥ १५४ तत्कर्णावेव कर्णेषु कृतपुण्यौ प्रियाज्ञया । तत्प्रेमालापगीतानां पात्रं प्रागेव तौ यतः ॥ १५५ तद्भूशरासनः कामस्तत्कटाक्षशरावलिः । स्वरूपेणाजितं मत्वा जयं मन्ये व्यजेष्ट सः ॥ १५६ तस्या लालाटिको नैकः कामो वीराग्रणीः स्वयम् । जयोऽपि नोन्नतिः कस्माल्ललाटस्य श्रितश्रियः ॥ (५२७ वडाचा नवीन अंकुर, तोंडले व कोवळे पान वगैरे वस्तु उपमा देण्याला योग्य आहेत तरी ही रंग, आकार आणि गोडी इत्यादिकानी तिचा अधरोष्ठ फारच अधिक असल्यामुळे वरील वस्तूंची उपमा देण्यात उपयुक्तता वाटत नाही ॥ १५१ ॥ ज्यात अन्तर नाही असे व शुभ्र व सम लांबी-रुंदीचे, स्निग्ध-गुळगुळित, सुंदर व प्रभा - कान्तियुक्त चमचमणारे असे तिचे दात होते व असे ते असल्यामुळे तिच्या मुखाने त्यानाच आपल्या आत स्थान दिले. ते तसे नसते तर त्याने त्याना स्थान दिले नसते ।। १५२ ।। मुखातील सुगन्ध अनुभवणारे व उंच असलेले तिचे नाक जर चांगले नसले तर ते तिच्या मुखावर मध्यभागी राहिले नसते ।। १५३ ।। अर्जुनाचे बाण जसे त्याचा शत्रु जो कर्ण तेथपर्यन्त पोहोचतात तसे तिचे नेत्र कर्णान्तगामी - कानापर्यंत पोहोचलेले होते व ते वृद्ध-विशाल होते व त्या तिच्या दोन नेत्रांनी दिनविकासि पद्म-कमलाला व रात्रविकासि उत्पलाला - नीलकमलाला जिंकले होते. म्हणून आता चन्द्रवंशावर कोणता आक्षेप करणे बाकी राहिले होते बरे ? अर्थात् सोमप्रभ वंशात उत्पन्न झालेल्या जयकुमारावर कटाक्ष फेकण्याचे कार्य बाकी राहिले होते ॥ १५४ ॥ या सुलोचनेचेच दोन कान जगातील सर्व कानापेक्षा पुण्यवान् होते. कारण तिचा प्रिय जो जयकुमार त्याच्या आज्ञेने त्याने जी तिच्या सुलोचनेसंबंधी केलेली जी प्रिय भाषणे तो ज्यात गोवलेली आहेत अशी गाणी ऐकण्यास ते पूर्वीच पात्र झालेले, योग्य झालेले होते ॥ १५५ ॥ आपल्या सौन्दर्याने आपण जयकुमाराचा पराभव करू शकलो नाही असे मदनाला वाटले म्हणून सुलोचनेच्या भुवया हेच ज्याचे धनुष्य आहे व तिचे कटाक्ष हेच ज्याची बाणपंक्ति आहे अशा मदनाने त्या जयकुमाराला जिंकले असे वाटते ।। १५६ ॥ तिच्या ललाटाकडे-कपाळाकडे पाहून तिच्या मनातील अभिप्राय ओळखणारा दास-नोकर फक्त एकटा मदनच होता असे नाही तर सर्व वीरपुरुषात श्रेष्ठ असलेला स्वतः जयकुमारही तिचा दास होता. यावरून सौन्दर्याचा आश्रय ज्याने केला आहे अशा तिच्या कपाळाची उन्नतिउंचपणा किंवा विशालपणा का बरे असू नये. अर्थात् तिचे कपाळ विस्तृत होते ।। १५७ ॥ Page #539 -------------------------------------------------------------------------- ________________ ५२८) ( ४३ - १५८ मृदवस्तनवः स्निग्धाः कृष्णास्तस्याः सुकुञ्चिताः । कामिनां केवलं कालबालव्यालाः शिरोरुहाः ॥ भाति तस्याः पुरोभागो भूषितो नयनादिभिः । सुरूप इव पाश्चात्यो बाभाति स्वयमेव सः ॥ १५९. ये तस्यास्तनुनिर्माणे वेधसा साधनीकृताः । अणवस्तृणवच्छेषास्त एव परमाणवः ॥ १६० अतिवृद्धः क्षयासन्नः स्पष्टलक्ष्माहिगोचरः । पूर्णः शेषोऽप्यसम्पूर्णो न तद्ववक्त्रोपमो विषुः ।। १६१ न पश्चान्न पुरा लक्ष्मीर्बोधी पद्मे क्षणे क्षणे । वक्त्यन्यां गृह्णतीं शोभां सा स्याद्वादं तदानने ॥ १६२ चन्द्रे तीव्रकरोत्सना पद्मे शीतकराहता । लक्ष्मीः सान्येव तद्वक्त्रे जयलक्ष्मीकरग्रहात् ॥ १६३ महापुराण तिचे मस्तकावरचे केश मृदु, बारीक, तुळतुळित काळे व कुरळे होते. ते कामी लोकाना केवळ काळया सापाच्या पिलाप्रमाणे वाटत असत. ते पाहून त्याना कामज्वर येत असे ।। १५८ ।। तिच्या शरीराचा पुढचा भाग डोळे, नाक वगैरे अवयानी सुशोभित झाला होता पण पाठीचा भाग एखाद्या सुंदर वस्तुप्रमाणे स्वाभाविकच आपोआप अतिशय शोभत होता ।। १५९ ।। तिच्या शरीराला उत्पन्न करण्यासाठी ब्रह्मदेवाने जे परमाणु साधनरूपाने उपयोगात आणिले तेच परम उत्कृष्ट अणु-सूक्ष्म द्रव्ये या नांवाला धारण करणारे झाले व बाकीचे अणु गवताप्रमाणे तुच्छ होत - निःसार होत ॥ १६० ॥ पूर्ण चन्द्र हा अतिशय वृद्ध भासतो व तो क्षयकाळ ज्याच्याजवळ आला आहे असा भासतो. पूर्ण असताना त्याचा काळा डाग स्पष्ट दिसतो व तो राहूचा विषय होतो व शेष कलांचा चंद्र अपूर्ण असतो म्हणून तो त्या सुलोचनेच्या मुखासारखा नव्हता ।। १६१ ।। जर कमलाची उपमा दिली जाईल तर तीही योग्य नाही. कारण कमलात विकसित होण्यापूर्वी शोभा नसते व विकसित झाल्यानंतर ती राहत नाही. कारण ती शोभा क्षणोक्षणी बदलत असते. परंतु सुलोचनेच्या मुखावरची लक्ष्मी एक विलक्षण शोभा धारण करीत होती. म्हणून ती स्याद्वादाचे रूप प्रकट करीत होती. तात्पर्य तिच्या मुखाची शोभा नेहमी एकरूप राहूनही क्षणोक्षणी विलक्षण शोभा धारण करीत असे. म्हणून कमलाच्या शोभेपेक्षा ती चांगली होती आणि याप्रमाणे स्याद्वादाचे स्वरूप प्रकट करीत होती. स्याद्वाद हा द्रव्यार्थिकनयाने एकरूप असूनही पर्यायार्थिकनयाने नवीन नवीन रूपाला प्रकट करतो त्याप्रमाणे तिच्या मुखाची शोभा द्रव्यार्थिकनयाने एकरूप असूनही प्रतिक्षणी विलक्षण शोभा धारण करून ती अनेक रूपाची होत असे ॥ १६२ ॥ चन्द्राची शोभा सूर्यापासून नष्ट होते व कमलाची शोभा चन्द्रापासून नष्ट होते. परंतु तिच्या मुखाची शोभा जयकुमाराच्या लक्ष्मीचा हस्तग्रहण करण्याने विलक्षणच झाली होती ॥ १६३ ॥ Page #540 -------------------------------------------------------------------------- ________________ (५२९ रात्राविन्दुदिवाम्भोजं क्षयोन्दुग्र्लानि बारिजम् । पूर्णमेव विकास्येव तद्वक्त्रं भात्यर्हानशम् ॥ १६४ लक्ष्मीस्तस्येक्षितुस्तेन वीक्षितस्यापि निश्चिता । कि पद्मे तादृशं येन तद्वक्त्रमुपमीयते ॥ १६५ कुमार्या त्रिजगज्जेता जितः पुष्पशरासनः । स वीरः कः परो लोके यो न जय्योऽग्रतोऽनया ।। १६६ कुमार्यैव जितः कामो बीरः पश्चाज्जयो जितः । स्त्रीसृष्टिः कियती नाम विजयेऽस्याः सह श्रिया ॥ मृगाङकस्य कलङकोऽयं मन्येऽहं कन्ययानया । स्वकान्त्या निर्जितस्याभूद्रोगराजश्च चिन्तया ॥१६८ साधं कुवलयेनेन्दुः सह लक्ष्म्या सरोरुहम् । तद्वक्त्रेण जितं व्यक्तं किमन्यनेह जीयते ॥ १६९ जलाब्जं जलवासेन स्थलाब्जं सूर्यरश्मिभिः । प्राप्तुं तद्वक्त्रजां शोभां मन्येऽद्यापि तपस्यति ॥ १७० ४३-१७०) महापुराण रात्री चंद्र खूप सुंदर दिसतो व दिवसा कमळ फार शोभते. पण चन्द्राला कृष्णपक्षात क्षय असतो व कमल कान्तिहीन होऊन सुकून जाते. परन्तु या सुलोचनेचे मुखकमल रात्रंदिवस पूर्ण आणि विकासयुक्तच असते ।। १६४ ।। सुलोचनेच्या मुखाला जो पाहतो त्याची शोभा वाढत असे व सुलोचनेचे मुख ज्याला पाहत असे त्याची शोभा देखिल निश्चित वाढत असे. पण कमलात काय असा गुण आहे ? म्हणून सुलोचनेच्या मुखाची उपमा कमलाला देता येत नाही ।। १६५ ।। या कुमारीने त्रैलोक्याला जिंकणारा पुष्याचे धनुष्य ज्याचे आहे अशा मदनाला जिंकले होते. तेव्हा आता असा कोणी वीर राहिला आहे ज्याला ही पुढे तारुण्यावस्थेत जिंकील बरे ? अर्थात् आता सर्वं पृथ्वी निर्बीर झाली आहे. सर्वाना तिने जिंकले ॥ १६६ ॥ या सुलोचनेने कुमारी अवस्थेतच मदनाला जिंकले होते व यानंतर हिने तरुणावस्थेत जयकुमारालाही जिंकले होते. मग लक्ष्मीबरोबर सगळ्या स्त्रियांची सृष्टि जिंकण्याला कितीशी उरली होती ? अर्थात् हिने लक्ष्मी आदिक उत्तम स्त्रियानाही जिंकले होते ।। १६७ ।। या कन्येने जेव्हा स्वतःच्या कान्तीने चन्द्राला जिंकले तेव्हा त्याच्या ठिकाणी कलंक उत्पन्न झाला व त्याच्या मनात चिन्ता उत्पन्न होऊन रोगांचा राजा क्षयरोगही त्याला जडला ।। १६८ ॥ या सुलोचनेच्या मुखाने रात्रिविकासी कमलाबरोबर चन्द्राला जिंकले आणि लक्ष्मीसह दिनविकासी कमलाला जिंकले. आता या कुमारीच्या मुखाने जे जिंकले नाही असे दुसरे काय राहिले आहे बरे ? ।। १६९ ।। या सुलोचनेच्या मुखकमलाची शोभा प्राप्त करून घेण्यासाठी जलकमल पाण्यात राहून तपश्चरण अद्यापि करीत आहे व जे जमिनीवरचे कमळ आहे तेही सूर्याच्या किरणाना धारण करून अद्यापि तपश्चरण करीत आहे असे मला वाटते ॥ १७० ॥ म. ६७ Page #541 -------------------------------------------------------------------------- ________________ ५३०) महापुराण (४३-१७१ शनैर्बालेन्दुरेखेव सा कलाभिरवर्द्धत । वृद्धास्तस्याः प्रवृद्धाया विधुभास्पचिनो गुणाः ॥ १७१ इति सम्पूर्णसर्वाङगशोभां शुद्धान्ववायजाम् । स्मरो जयभयाद्वैतां न तवाप्यकरोत्करे ॥ १७२ कारयन्ती जिनेन्द्रा_श्चित्रा मणिमयीबहूः । तासां हिरण्मयान्येव विश्वोपकरणान्यपि ॥ १७३ तत्प्रतिष्ठाभिषेकान्ते महापूजाः प्रकुर्वती । मुहुस्स्तुतिभिरर्थ्याभिः स्तुवती भक्तितोऽर्हतः ॥ १७४ ददती पात्रदानानि मानयन्ती महामुनीन् । शृण्वती धर्ममाकर्ण्य भावयन्ती मुहुर्मुहुः ॥ १७५ आप्तागमपदार्थांश्च प्राप्तसम्यक्त्वशुद्धिका । अथ फाल्गुननन्दीश्वरेऽसौ भक्त्या जिनेशिनाम् ॥१७६ विधायाष्टाह्निकी पूजामभ्यार्चा यथाविधि । कृतोपवासा तन्वडगी शेषान्दातुमुपागता ॥ १७७ नृपं सिंहासनासीनं सोऽप्युत्थाय कृताञ्जलिः । तद्दत्तशेषानादाय निधाय शिरसि स्वयम् ॥ १७८ उपवासपरिश्रान्ता पुत्रिके त्वं प्रयाहि ते । शरणं पारणाकाल इति कन्यां व्यसर्जयत् ॥ १७९ जशी बालचन्द्राची कोर हळूहळु आपल्या कलानी वाढत जाते त्याप्रमाणे ती आपल्या अवयवानी वाढू लागली. वाढलेल्या त्या सुलोचनेचे चन्द्राच्या कान्तीशी स्पर्धा करणारे गुणही वाढले ॥ १७१ ॥ याप्रमाणे तिच्या ठिकाणी सम्पूर्ण अंगाचे सौन्दर्य वाढले. ती निर्मल वंशामध्ये उत्पन्न झालेली होती. ही आपला पराजय करील या भयामुळे मदनाने आपल्या हाती त्याने तिला घेतले नाही. (तरुणी होऊनही तिला मदनबाधा झालेली नव्हती ) ॥ १७२ ॥ ती जिनेश्वराच्या रत्नखचित अनेक प्रतिमा करवीत असे व त्यांची सर्व उपकरणे छत्त्रत्रयादिक सोन्याचे करवीत असे ॥ १७३ ।। त्या जिनप्रतिमांच्या प्रतिष्ठेनंतर महाभिषेकाचे वेळी ती महापूजन करीत असे व वारंवार भक्तीने अर्थानी भरलेल्या स्तुतीनी जिनेश्वराची ती स्तुति करीत असे ॥ १७४ ॥ . ती सत्पात्राना दान देत असे आणि महामुनींचा आदरसत्कार करीत असे व धर्माचे स्वरूप ऐकून वारंवार त्याचे चिन्तन करीत असे ॥ १७५ ॥ सर्वज्ञ जिनेश्वर व त्यानी सांगितलेला आगम व जीवादिक पापपुण्यासह नऊ पदार्थ यांच्यावर तिने श्रद्धान ठेवून निर्मल सम्यग्दर्शन प्राप्त करून घेतले होते. यानन्तर फाल्गुन मासातल्या नन्दीश्वरपर्वात भक्तीने तिने आठ दिवसपर्यन्त नन्दीश्वरव्रताचे पूजन केले. विधिपूर्वक जिनेश्वरांचे पूजन केले व उपवास करून त्या कृशाङ्गीने शेषा देण्यासाठी आपल्या पित्याकडे प्रयाण केले ॥ १७६-१७७॥ तिचा पिता सिंहासनावरून उठला. त्याने हात जोडले व तिने दिलेल्या शेषाना त्याने घेतले व त्या त्याने आपल्या मस्तकावर ठेवल्या ॥ १७८ ॥ व हे पुत्रिके तू उपवासाने थकली आहेस. आता तू घरी जा व पारणे कर असे म्हणून त्याने तिला घरी पाठविले ।। १७९ ॥ Page #542 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-१९१) महापुराण (५३१ तां विलोक्य महीपालो बालामापूर्णयौवनाम् । निविकारां सचिन्तः सन् तस्याः परिणयोत्सवे ॥१८० शुभे श्रुतार्थसिद्धार्थसर्वार्थसुमतिश्रुतीन् । कोष्ठादिमतिभेदान्वा दिने व्याहूय मन्त्रिणः ॥ १८१ वण्वते सर्वभूपालाः कन्यां नः कुलजीवितम् । ब्रूत कस्मै प्रदास्यामो विमृश्यमा सुलोचनाम् ॥ १८२ इत्यप्राक्षीत्तदा प्राह श्रुतार्थः श्रुतसागरः । अत्र सद्वन्धुसम्बन्धो जामातात्र महान्वयः ॥ १८३ सर्वस्वस्थव्ययोऽत्राथ जन्मराज्यफलं चनः । ततः सञ्चिन्त्यमेवैतत्कायं नयविशारदैः ॥ १८४ बन्धवः स्युनपाः सर्वे सम्बन्धश्चक्रवतिना । इक्ष्वाकुवंशवत्पूज्यो भवद्वंशश्च जायते ॥ १८५ कुलरूपवयोविद्यावृत्तश्रीपौरुषादिकम् । यद्वरेषु समन्वेष्यं सर्व तत्तत्र पिण्डितम् ॥ १८६ ततो नास्त्यत्र नश्चच्यं दिगन्तव्याप्तकीर्तये । जितार्कमतये देया कन्यषेत्यर्ककीर्तये ॥ १८७ सिद्धार्थोऽत्राह तत्सर्वमस्तु किञ्च पुराविदः । कनीयसोऽपि सम्बन्धं नेच्छन्ति ज्यायसा सह ॥१८८ ततः प्रतीतभूपालपुत्रा वरगुणान्विताः। प्रभञ्जनो रथवरो बालवज्रायुधाह्वयः ॥ १८९ मेघस्वरो भीमभुजस्तथान्येऽप्युदितोदिताः । कृतिनो बहवःसन्ति तेषु यत्राशयोत्सवः ॥ १९० शिष्टान्पृष्ट्वा च दैवज्ञानिरीक्ष्य शकुनानि च । सहितः समसम्बन्धस्तस्मै कन्येति दीयताम् ॥१९१ जिच्या ठिकाणी पूर्णयौवन उत्पन्न झाले आहे अशा त्या निर्विकार सुलोचना कन्येला पाहून तो अकम्पन राजा तिच्या विवाहोत्सवाची मनात चिन्ता करू लागला ॥ १८० ॥ कोष्ठबुद्धि, बीजबुद्धि आदि महद्धिधारी मुनीप्रमाणे विद्वान अशा श्रुतार्थ, सिद्धार्थ, सर्वार्थ आणि सुमति अशा विद्वान चार मंत्र्याना शुभदिवशी राजाने बोलाविले ।। १८१ ॥ ही आमची सुलोचना कन्या आमच्या कुलाचा जणु प्राण आहे, तिला वरण्याची सर्व राजे इच्छा करतात. हे मंत्र्यानो, आपण ही कोणाला द्यावी याविषयी विचार करून मला सांगा. असे विचारल्यावर ज्ञानसमुद्र असा श्रुतार्थ मन्त्री याप्रमाणे बोलू लागला. या विवाहात चांगल्या व्याह्याशी सम्बन्ध येणार, जावई मोठ्या वंशाचा कुलशीलवान् पाहिजे, आपल्या धनाचा देखिल पुष्कळ खर्च होईल. आपल्या जन्माचे व राज्य प्राप्तीचेही फल आपणास प्राप्त होईल. म्हणून नयनिपुण अशा आपणाकडून या कार्याचा चांगला विचार व्हावा ॥१८२-१८३॥ सर्व राजे आपले बन्धु हितकर्ते होतील व चक्रवर्ती भरताबरोबर या विवाहात सम्बन्ध होईल व त्यामुळे इक्ष्वाकुवंशाप्रमाणे आपला वंश पूज्य होईल. वरामध्ये कुल, रूप, वय, विद्या, सदाचार, सम्पत्ति, पौरुष आदिक ज्या गोष्टी असावयास पाहिजेत त्या सर्व वरात एकत्र झाल्या आहेत. म्हणून येथे काही चिन्ता करण्यासारखे नाही. भरतचक्रवर्तीचा मुलगा अर्ककीर्ति आहे व त्याची कीति सर्व दिशात व्याप्त झाली आहे त्याने सूर्यालाही जिंकले आहे. अशा अर्ककीर्तीला ही कन्या द्यावी असे वाटते. याप्रमाणे श्रुतार्थ मंत्र्याने आपला अभिप्राय सांगितला ॥१८४-१८७॥ येथे सिद्धार्थ मंत्री असे म्हणाला- पूर्वीचे विद्वान् लोक असे म्हणत असत- अल्पयोग्यतेचे धारक लोक महान् योग्यतेच्या लोकाशी विवाह सम्बन्ध इच्छित नाहीत. यास्तव आपल्या माहितीचे जे राजपुत्र वराच्या गुणानी युक्त आहेत जसे प्रभञ्जन, रथबर, बलि, वज्रायुध, मेघस्वर, भीमभुज व अन्यही ज्यांचे ऐश्वर्य वाढत्याप्रमाणाचे आहे असे जे पुण्यवान् राजपुत्र आहेत त्यापैकी, ज्याच्याबरोबर विवाह सुलोचनेचा व्हावा असे आपणास वाटते त्याच्याशी हा विवाहसंबन्ध करावा. याविषयी अनुभवी लोकांचा विचार ऐकावा. ज्योतिषी विद्वानाना विचारावे. शकुने पहावीत व हितकर असा समानसंबन्ध पाहून त्याला आपली कन्या द्यावी ॥ १८८-१९१ ।। Page #543 -------------------------------------------------------------------------- ________________ ५३२) महापुराण (४३-१९२ श्रुत्वा सर्वार्थवित्सवं सर्वार्थः प्रत्युवाच तम् । भूमिगोचरसम्बन्धः स नः प्रागपि विद्यते ॥ १९२ अपूर्वलाभः श्लाघ्यश्च विद्याधरसमाश्रयः । विचार्य तत्र कस्मै चियेयमिति निश्चितम् ॥ १९३ सुमतिस्तं निशम्याथं युक्तानामाहयुक्तवित् । न युक्तं वक्तुमप्येतत्सर्व वैरानुबन्धकृत् ॥ १९४ ।। कि भूमिगोचरेष्वस्या वरो नास्तीति चेतसि । चक्रिणोऽपि भवेत्किञ्चिद्वरस्यं प्रस्तुतश्रुतेः ॥१९५ दृष्टः सम्यगुपायोऽयं मयात्रकोऽविरोषकः । श्रुतः पूर्वपुराणेषु स्वयंवरविधिर्वरः ॥ १९६ संप्रत्यकम्पनोपक्रमं तदस्त्वायुगावधि । पुरुतत्पुत्रवत्सृष्टिख्यातिरस्यापि जायताम् ॥ १९७ दीयतां कृतपुण्याय कस्मैचित्कन्यका स्वयम् । वेधसा विप्रियं नोऽमा माभूद्भभुत्सु केनचित् ॥ १९८ इत्येवमुक्तं तत्सर्वैः सम्मतं सह भभुजा । न हि मत्सरिणः सन्तो न्यायमार्गानसारिणः ॥ १९९ तान्सम्पूज्य विसाभूभूभृत्सत्कार्यतत्परः । स्वयमेव गृहं गत्वा सर्व तत्संविधानकम् ॥ २०० निवेद्य सुप्रभायाश्च दृष्टो हेमाङगदस्य च । वृद्धः कुलमायातैरालोच्य च सनाभिभिः ॥ २०१ अकेषां निसृष्टान्मितार्थानपरानपि । परेषां प्राभूतान्तःस्थपत्रशासनहारिणः ॥ २०२ सदानमानैः सम्पूज्य निवेद्यतत्प्रयोजनम् । समानेतुं महीपालान्सर्वदिक्कं समादिशत् ॥ २०३ हे सिद्धार्थाचे सर्व भाषण ऐकून नंतर सर्वार्थमंत्री असे म्हणाला-हे प्रभो, भूमिगोचरी राजाशी हा विवाहसंबन्ध पूर्वीपासून आहेच पण विद्याधरसम्बंधाचा आश्रय करणे योग्य आहे कारण तो अपूर्वलाभ आहे व प्रशंसनीय आहे म्हणून याचा विचार करावा व विद्याधरापैकी कोणा तरी वराला निश्चित करून या कन्येचे दान आपण करावे ।। १९२-१९३ ॥ यानंतर तेथे बसलेल्या विद्वानांचा अभिप्राय जाणून सुमति मंत्र्याने असे म्हटले. वर जे मंत्र्याने भाषण केले अर्थात् योग्य विद्याधर वराला आपली कन्या द्यावी हे म्हणणे योग्य नाही कारण ते वैराच्या संबंधाला कारण होईल. काय भूमिगोचरी राजामध्ये हिला योग्य वर मिळाला नसता असा प्रश्न चक्रवर्तीला मनात उत्पन्न होऊन त्यालाही हे कार्य आवडले नसते स्याच्या मनात आपणाविषयी विरस अप्रीति उत्पन्न होईल. प्रस्तुत विवाहवार्ता ऐकून चक्रवर्तीचे मनही आपल्याविषयी अप्रीतियुक्त होईल ॥ १९४-१९५ ॥ मी याविषयी एक अविरोधक उत्तम उपाय पाहिला आहे तो मी तुम्हाला सांगतो. पूर्वी पुराणामध्ये स्वयंवरविधि श्रेष्ठ म्हणून ऐकला आहे. आता तो अकम्पन महाराजाकडून चालू केला जावा व तो युगाच्या अन्तापर्यन्त राहो आणि भगवान वृषभनाथ व त्यांचा पुत्र भरत यांच्या सृष्टीची ज्याप्रमाणे पुरुसृष्टि, भरतसृष्टि म्हणून प्रसिद्धि झाली तशी या स्वयंवराची सृष्टिही प्रसिद्ध होवो. म्हणून या कन्येने आपण होऊनच आपले दान एखाद्या पुण्यवान् राजपुत्राला करावे म्हणजे हिचा पति निश्चित करणाऱ्या ब्रह्मदेवाशीही आमचा विरोध होणार नाही व राजसमूहामध्ये देखिल कोणाशी विरोध होणार नाही. याप्रमाणे सुमतिमंत्र्याने भाषण केले व ते राजासह सर्वाना पसन्त पडले. बरोबरच आहे की, न्यायमार्गाला अनुसरणारे जे सज्जन असतात ते मत्सरस्वभावाचे नसतात ॥ १९६-१९९ ॥ अकम्पन राजाने त्या मंत्र्यांचा सत्कार करून त्याना पाठवून दिले. नंतर तो या स्वयंवराच्या सत्कार्यात तत्पर झाला. स्वतः तो घरी गेला व ती सर्व हकीकत त्याने सुप्रभाराणीला व हेमाङ्गदनामक वडील मुलाला त्याने हर्षाने कळ विली व आपल्या कुलक्रमाला Page #544 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-२१३) महापुराण (५३३ ज्ञात्वा तदाशु तद्वन्धविचित्राङगदसञ्जकः । सौधर्मकल्पावागत्य देवोऽवधिबिलोचनः ॥ २०४ अकम्पनमहाराजमालोक्य वयमागताः । सुलोचनायाः पुण्यायाः स्वयंवरमवेक्षितुम् ॥ २०५ इत्युक्त्वोपपुरे योग्यरम्ये राजाभिसम्मतः । ब्रह्मस्थानोत्तरे भागे प्रधीरे वरवास्तुनि ॥ २०६ प्राङमुखं सर्वतोभद्रं मङ्गलद्रव्यसम्भूतम् । विवाहमण्डपोपेतं प्रासादं बहुभूमिकम् ॥ २०७।। चित्रप्रतोलीप्राकारपरिकर्मगृहावृतम् । भास्वरं मणिमर्मभ्यां विधाय विधिवत्सुधीः ॥ २०८ तं परीत्य विशुद्धोरुसुविभक्तमहीतलम् । चतुरस्रं चतुरि शालगोपुरसंयुतम् ॥ २०९ रत्नतोरणसंकीर्णकेतुमालाविलासितम् । हटत्कूटाग्रनिर्भासिभर्मकुम्भाभिशोभितम् ॥ २१० स्थूलनीलोत्पलाबद्धस्फुरद्दीप्तिधरातलम् । विचित्रनेत्रविस्तीर्णवितानातिविराजितम् ॥ २११ भोगोपभोगयोग्योरसर्ववस्तुसमाचितम् । यथास्थानगताशेषरत्नकाञ्चननिमितम् ॥ २१२ मदा निष्पादयामास स्वयंवरमहागृहम् । न साधयन्ति केऽभीष्टं पुंसां शुभविपाकतः ॥ २१३ अनुसरून चालत आलेल्या भाऊबंदजनाशी व वृद्धलोकाशी या कार्याचा त्याने विचार केला. न सांगता अभिप्राय जाणणारे असे सेवक व सांगितलेले तेवढे काम करणारे सेवक यांच्याजवळ नजराण्याच्या पोटी आमंत्रणपत्र-आज्ञापत्र राजाने दिले व अनेकराजाकडे त्यांना राजाने पाठविले. जाताना त्यांचा दानमानाने सत्कार केला व आपले कार्य त्याने त्याना सांगितले व सर्व राजाना आणण्यासाठी त्याने सर्व दिशाना सेवकाना पाठविले ॥ २००-२०३ ।। त्यावेळी विचित्रांगद नांवाचा एक देव जो की या अकम्पनराजाचा मित्र होता. त्याने अवधिज्ञानरूपी नेत्राने ही सर्व हकीकत जाणली व सौधर्मस्वातून तो अकम्पन महाराजाकडे आला व त्याला पाहून त्याने म्हटले की पुण्यवती सुलोचनेच्या स्वयंवराला पाहण्यासाठी मी आलो आहे ॥ २०४-२०५ ॥ असे त्याने म्हटले व राजाने ज्याला संमति दिली आहे अशा त्याने त्या नगराच्या जवळ ब्रह्मस्थानापासून उत्तर दिशेकडे अतिशय शान्त उत्कृष्ट आणि रमणीय ठिकाणी एक सर्वतोभद्र नांवाचा प्रासाद बनविला तो अनेक मजल्यांचा होता. त्याचे मुख पूर्व दिशेकडे होते. हा प्रासाद अनेक मंगलद्रव्यानी भरलेला होता. हा प्रासाद विवाहमंडपाने युक्त होता. हा प्रासाद अनेक वेशीनी युक्त, तट आणि शृंगाराच्या साधनानी भरलेल्या घरानी युक्त होता. हा प्रासाद चमकणाऱ्या रत्नानी व सुवर्णानी बनविला होता. या प्रासादाच्या सभोवती निर्मल मोठे व चारी दिशाना समप्रमाणाने विभागलेले पटांगण होते. ते चौकोन चार द्वारानी युक्त, तट व वेशीनी युक्त होते. रत्नांची तोरणे व ध्वज मालानी शोभत होते. चमकणाऱ्या शिखरावर अतिशय तेजस्वी सुवर्णाचे कलशानी शोभत होते. या पटांगणाची जमीन स्थूल नीलमण्यानी बनविली होती. त्या मण्यांच्या कांतीनी ते पटांगण शोभत होते. याच्या वरचे छत नेत्रजातीच्या वस्त्राच्या चांदण्याने शोभत होते. या स्वयंवरमंडपात सर्व भोगोपभोगाच्या वस्तु होत्या व यातील योग्य अशी स्थाने अनेक रत्ने व सुवर्णानी बनविली होती. याप्रमाणे हे स्वयंवरमहागृह त्या देवाने आनंदाने बनविले होते. बरोबरच आहे की, शुभ कर्माचा उदय असल्यामुळे पुरुषाचे अभीष्ट पदार्थाची सिद्धि कोण बरे करीत नाही ? अर्थात् पुण्याच्या उदयामुळे सर्वाकडून अभीष्ट पदार्थाची सिद्धि होते ॥ २०६-२१३ ॥ Page #545 -------------------------------------------------------------------------- ________________ ५३४) महापुराण (४३-११४ तं निरीक्ष्य क्षितेर्भर्ता लक्ष्मीलीलागृहायितम् । नामात्स्वाङ्गेस सन्तोषात्सन्मित्राकि न जायते॥२१४ अथ प्रादुरभूत्कालः सुरभिर्मत्तमन्मथः । मुदं मदं च सञ्चिन्वन्कामिषु भ्रमरेषु च ॥ २१५ ववो मंदं गजोद्घष्टचन्दनद्रवसारभृत् । एलालवङ्गसंसर्गपडगुलो मलयानिलः ॥ २१६ मलयानिलमाश्लेष्टुं सम्बन्धिनमुपागतम् । लताद्रुमाःसुशाखानां प्रसारणमिवादधुः ॥ २१७ यमसम्बन्धिदिक्त्यागं रविर्भात इवाकरोत् । मदेन कोकिलाः काले कूजन्ति स्म निरङकुशम् ॥२१८ पुष्पमार्तवमाप्ता नः शाखा न स्पृशतेति तान् । अलोन्वासं निषिध्यन्तश्चम्पकाश्चलपल्लवैः॥२१९ वसन्तश्रीवियोगो वा सशोकोऽशोकभूरुहः । सत्पुपष्पल्लवो नाम सार्थतत्सङ्गमावचधात् ॥ २२० ___ लक्ष्मीच्या क्रीडास्थानाप्रमाणे असलेला तो स्वयंवरप्रासाद पाहून तो अकंपन राजा आनंदाने आपल्या अंगात मावला नाही. बरोबरच आहे की चांगल्या मित्रापासून कोणते कार्य होत नाही बरे ? ॥ २१४ ॥ नंतर ज्यात मदन मत्त होतो अशा प्रकारचा आणि कामिजनाना आनंदित करणारा व भुंग्याना मस्ती उत्पन्न करणारा वसन्तऋतूचा काल आला ॥ २१५ ॥ हत्तीनी घासलेल्या चन्दनवृक्षाचा पातळ उत्तम सुगंधित सार धारण करणारा व वेलदोडे, लवंगा यांच्या संसर्गाने जणु पांगळा झालेला असा मलयवात मंद मंद वाहू लागला ॥ २१६ ॥ जसा एखादा संबंधी मनुष्य आला असता त्याला भेटण्यासाठी माणसे आपले हात पसरतात तसे मलयाच्या वान्याला भेटण्यासाठी जणु वेली व वृक्ष आपआपल्या शाखा पसरू लागले ॥ २१७ ॥ सूर्याने जणु भिऊन यमसंबधी दिशेचा- दक्षिणदिशेचा त्याग केला अर्थात् दक्षिणायनाचा त्याग करून उत्तरायणाचा आश्रय घेतला व कोकिल वसंतऋतूमध्ये मदयुक्त होऊन निष्प्रतिबंधक गर्वाने शब्द करू लागले ॥ २१८॥ सोनचाफ्याचे वृक्ष आपल्या हलणाऱ्या पानानी जणु भुंग्याना असे म्हणाले या आमच्या शाखा ऋतुसंबंधी पुष्पाला धारण करीत आहेत जणु ऋतुमती झाल्या आहेत त्याना शिवू नका' असे जणु म्हणू लागले. चाफ्याच्या फुलाला भुंगे स्पर्श करीत नाहीत असा लोकप्रवाद आहे ।। २१९ ॥ अशोकवृक्ष वसन्तलक्ष्मीचा वियोग झाल्यामुळे जणु सशोक झाला होता तो आता वसन्तलक्ष्मीचा संयोग झाल्यामुळे अशोक झाला अर्थात् उत्तम फुलानी व पालवीनी युक्त झाला, शोभू लागला ॥ २२० ॥ Page #546 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-२३९) महापुराण (५३५ मूलस्कन्धानमध्येषु चूताबैरिव मत्सरात् । सुरभीणि प्रसूनानि सुरभिश्च तदा बधे ॥ २२१ आकृष्टदिग्गजालीनि बकुलानि वने वने । हानौ गुणाधिकान्यासंस्तुलितानि कुलोद्गतैः ॥ २२२ क्रीडनासक्तकान्ताभिर्वाध्यमानाः सगीतिभिः। आन्दोलाः स्तम्भसम्भूतैः समाक्रोशनिव स्वनः॥२२३ सुन्दरेष्वपि कुन्देषु मधुपा मन्दतृप्तयः । माधवीमघुपानेन मुदा मधुरमारुवन् ॥ २२४ भवेदन्यत्र कामस्य रूपवत्तादिसाधनम् । कालैकसाधनः सोऽस्मिन्नावनस्पति जम्भते ॥ २२५ नरविद्याधराधीशान्गत्वा तत्कालसाधनात् । दूताः स्वयंवरालापं सांस्तान्समबोधयन ॥ २२६ ततो नानानकध्वानप्रोत्कर्णीकृतदिगद्विपाः । निजाङ्गनाननाम्भोजपरिम्लानिविधायिनः ॥ २२७ वियद्विभतिमाक्रम्य विमानैर्गतमानकैः । सद्यो विद्याधराधीशा द्योतमानदिगाननाः ॥२२८ सुलोचनाभिधाकृष्टिविद्याकृष्टाः समापतन् । कामिनां न पराकृष्टि विद्या मुक्त्वेप्सितस्त्रियः ॥ त्यावेळी सल्लको नांवाचे वृक्षानी आम्रवृक्षादिकाबरोबर जणु ईर्ष्या धारण करून मूलभागी, शाखांच्या अग्रभागी व मध्यभागी सुगंधित पुष्पानी सुगन्धीपणा धारण केला ॥२२१॥ त्यावेळी ज्यानी दिग्गजावरील भुंग्याना आपणाकडे ओढून घेतले आहे असे बकुलवृक्ष उत्तम कुलातील व्यक्तीप्रमाणे हानीचा प्रसंग प्राप्त झाला तरीही गुणानी अधिक श्रेष्ठ बनले. अर्थात् कुलीन माणसे हानीच्या प्रसंगीही आपल्या गुणानी अधिकपणाच धारण करतात तसे या बकुलवृक्षाच्या फुलानी आपला वास चोहोकडे पसरल्यामुळे कमी होत असताही आपला सुवासिकपणा सोडला नाही ॥ २२२ ॥ गाणी गाणाऱ्या व क्रीडा करण्यात दंग झालेल्या तरुण स्त्रियांनी जे पीडित झाले आहेत असे चौपाळे त्यांच्या खांबापासून होणाऱ्या आवाजानी जणु ते आक्रोश करीत आहेत असे वाटत होते ।। २२३ ॥ सुन्दर अशा कुंदांच्या फुलातही ज्याना थोडासा आनंद प्राप्त झाला आहे असे भुंगे मोगऱ्याच्या फुलातील मध पिऊन आनंदाने गुंजारव करू लागले ॥ २२४ ।। अन्य ऋतूमध्ये स्त्रीपुरुषांची सौन्दर्यादिक साधने कामाच्या उत्पत्तीला कारण असतील पण या वसन्तऋतुमध्ये फक्त हा काल एकच साधन कामोत्पत्तीला कारण आहे व वनस्पति पर्यन्त त्यामुळे तो मदन वृद्धिगत होतो-प्रभावक होतो।। २२५ ।। अकम्पनराजाने पाठविलेले ते दूत या भूमीवरचे राजे व विद्याधर राजे यांच्याकडे या वसन्तऋतूच्या साहाय्याने गेले व त्यानी स्वयंवरासंबंधी वृत्तान्त कळविला ॥ २२६ ॥ यानंतर अनेक नगाऱ्यांच्या ध्वनीनी ज्यानी दिग्गजानाही कान वर करावयास लावले आहे आणि आपल्या स्त्रियांच्या मुखकमलाना ज्यानी म्लान केले आहे व प्रमाणरहित अर्थात् असंख्य विमानानी आकाशाची शोभा व्यापून दिशांची मुखे ज्यानी उज्ज्वल केली आहेत असे विद्याधरराजे सुलोचना नामक आकर्षणविद्येने आकर्षिलेले होऊन तत्काल तेथे प्राप्त झाले. कामी पुरुषाना आवडत्या स्त्रियाशिवाय दुसरी आकर्षण विद्या नाही ॥ २२७-२२९ ।। Page #547 -------------------------------------------------------------------------- ________________ ५३६) महापुराण (४३-२३० अभिगम्य नपः क्षिप्रं स्वयमाविष्कृतोत्सवः । चेतः सौलोचनं तान्प्रीतान्प्रावेशयत्परम् ॥ २३० स्वगेहादिषु सम्प्रीत्या समुद्बद्धोत्सवध्वजः । आकम्पनिभिराविष्कृतादरैः परिवारितः॥ २३१ सांशुमर्कमिवोद्यन्तमर्ककीति सहानुजम् । अकम्पननृपोऽभ्येत्य भरतं वानयत्पुरम् ॥ २३२ स्वादरेणव संसिद्धि भाविनीं तस्य सूचयन् । नाथवंशाप्रणीर्मेघस्वरं चानेतुमभ्ययात् ॥ २३३ ततो महीभृतः सर्वे त्रिसमुद्रान्तरस्थिताः । पुरा इव पयोराशि प्रापुः स्फीतीकृतश्रियः॥ २३४ स्वयमर्षपथं गत्वा केषाञ्चित्सर्वसम्पदा । केषाञ्चिद्गमयित्वान्यान्मान्यान्हेमाङ्गवाविकान् ॥२३५ ये ये यथा यया प्राप्ताः पुरी तांस्तास्था तथा। आह्वयन्तीं पताकाभिर्वोच्छ्रिताभिरवीविशत् ॥२३६ तदा तं राजगेहस्थं नरविद्याधराधिपः । वृतं सुलोचनाकार्षीत् पितरं जितचक्रिणम् ॥ २३७ राजा अकम्पनाने स्वतः उत्सव प्रकट केला होता व त्याने जणु सुलोचनेचे अन्तःकरण की काय अशा आपल्या नगरात त्या आनंदित झालेल्या विद्याधरांना शीघ्र नेले ॥ २३० ।। अकम्पनराजाने राजमंदिर वगैरे ठिकाणी अतिशय हर्षाने उंच ध्वज वगैरे उभारलेले होते व हेमांगद वगैरे आपल्या पुत्रानी तो मोठ्या आदराने घेरलेला होता ।। २३१ ।। किरणानी सहित जणु सूर्य अशा आपल्या धाकट्या भावासह आलेल्या अर्ककीर्तीला सामोरे जाऊन भरत चक्रवर्तीप्रमाणे समारंभाने अकंपन राजाने आपल्या नगरात नेले ।। २३२॥ आपण केलेल्या सत्कारानेच त्याची भावी कार्यसिद्धि होईल असे सुचविणारा तो नाथवंशाचा अग्रगण्य असलेला अकम्पन राजा त्या मेघस्वराला नगरात आणण्याकरिता त्याला सामोरे गेला ।। २३३ ।। नंतर जल संपत्तीला वाढविणारे जलप्रवाह जसे समुद्राकडे जातात तसे तीन समुद्राच्या मध्यभागात राहणारे सर्व राजे त्या ठिकाणी आले ॥ २३४ ॥ तो राजा आपल्या सर्व ऐश्वर्यासह कित्येक राजांचे सामोरे अर्ध्या मार्गापर्यन्त गेला. कित्येकांच्या सामोरे त्याने आपल्या हेमांगद वगैरे मानकरी लोकांना पाठविले ।। २३५ ॥ जे जे राजे जसे जसे या पुरीला आले त्यांना त्यांना ही नगरी आपल्या उंच पताकानी जणु बोलावते अशा त्याना अकंपनराजाने नगरीत आणले ।। २३६ ।। त्यावेळी राजवाड्यात असलेल्या व नगराधिप विद्याधराधिपानी युक्त अशा आपल्या पित्याला सुलोचनेने चक्रवर्तीला देखिल ज्याने जिंकले आहे असे केले. म्हणजे सुलोचनेच्या निमित्ताने एकत्र जमलेले सर्व राजे व विद्याधर यांच्या योगाने अकम्पनराजा चक्रवर्तीप्रमाणे भाग्यवान् दिसला ॥ २३७ ।। Page #548 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-२४६) महापुराण (५३७ ....... वाराणसी जितायोध्या स्वनाम्ना तां निराकरोत् । कन्यारत्नात्परं नान्यदित्यत्राहुःप्रभत्यतः ॥२३८ तास्वयंवरशालायामर्ककीर्तिपुरःसरान् । निवेश्य प्रीणयामास कृताभ्यागतसक्रियः ॥ २३९ पुरोपाजितसद्धर्मात्सर्वमेतत्ततः पुरा । धर्म एष समभ्यर्च्य इति सञ्चिन्त्य विद्वरः॥ २४० कृत्वा जैनेश्वरी पूजां दीनानाथवनीपकान् । अनथिनः समाश सर्वत्यागोत्सवोद्यतः ॥ २४१ तां लक्ष्मीमक्षयां मत्वा सफलां चाप्तसन्चयात् । स तदाभूत्क्षितेरेकभोग्यः क्षितिरिवात्मनः ॥२४२ एवं विहिततत्पूजः प्रकृतार्थ प्रचक्रमे । प्रारम्भाः सिद्धिमायान्ति पूज्यपूजापुरःसराः ॥ २४३ आस्फालिता तदा भेरी विवाहोत्सवशंसिनी। व्याप्नोत्प्रमोदः प्राक्चेतः पश्चात्कर्णेषु तद्ध्वनिः॥ पुष्पोपहारिभूभागा नृत्यत्केतुनभस्तला । निजिताब्धिमहातूर्यध्वानाध्मातदिगन्तरा ॥ २४५ विशोधितमहावीथिदेशा प्रोबद्धतोरणा । पुनर्नवसुधाक्षोदधवलीकृतसौधिका ॥ २४६ जिने अयोध्या जिंकली आहे अशी ती वाराणसीनगरी आपल्या नांवाने तिचा तिरस्कार करू लागली म्हणून त्यावेळेपासून लोक कन्यारत्नाहून दुसरे रत्न श्रेष्ठ नाही असे म्हणू लागले ॥ २३८ ।। ___ज्याने आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला आहे अशा त्या अकम्पनराजाने स्वयंवर शाळेत अर्ककीर्ति आदिक राजाना स्थान दिले व तो त्यांच्यावर फार प्रेम करू लागला ॥२३९।। पूर्वी मिळविलेल्या उत्तम धर्माचेच हे फल आहे म्हणून प्रथमतः धर्माचेच पूजन केले पाहिजे असा त्या विद्वच्छेष्ठराजाने मनात विचार केला ।। २४० ॥ ___ आणि त्याने जिनेश्वराची पूजा केली व त्याने दीन अनाथ व याचक लोकाना ते याचना न करतील असे केले व सर्वांचा त्याग करणेरूप उत्सव करण्यास तो उद्युक्त झाला ॥ २४१ ॥ चांगल्या कार्यात् लक्ष्मीचा व्यय करून तो राजा आपली लक्ष्मी अक्षय व सफल झाली असे मानू लागला व जशी पृथ्वी आपली उपभोग्य आहे तसे आपणही सर्व जनांचे उपभोग्य आहोत असे त्याने स्वतःस मानले ॥ २४२ ॥ याप्रमाणे त्याने जिनपूजा करून आपल्या प्रकृतकार्यास प्रारम्भ केला. बरोबरच आहे की, जे पूज्य आहेत त्यांची पूजा केली असता प्रारंभिलेल्या कार्याची सिद्धि होते ॥ २४३ ॥ ज्यावेळी विवाहोत्सवाची प्रशंसा करणारा नगारा वाजू लागला तेव्हां प्रथमतः लोकांचे मन आनन्दाने व्यापले व नंतर नगान्याच्या ध्वनीने लोकांचे कान व्यापले ॥ २४४ ।। त्या नगरीचा भूप्रदेश पुष्पसमूहाने शोभत होता व आकाश नाचणाऱ्या ध्वजानी व्याप्त झाले होते. ज्यानी समुद्राच्या गर्जनेला जिकिले आहे अशा महावाद्यांच्या ध्वनींनी सर्व दिशांचा प्रदेश दुमदुमला होता ॥ २४५ ॥ या नगरीचे मोठे रस्ते स्वच्छ केलेले होते व त्यावर तोरणे बांधलेली होती आणि पुनः नवीन चुना लावून या नगरीतील वाडे शुभ्र केले होते त्यामुळे ती नगरी शोभत होती ॥२४६॥ म. ६८ Page #549 -------------------------------------------------------------------------- ________________ ५३८) महापुराण (४३-२४७ रञ्जिताञ्जनसन्नेत्रा मालाभारिशिरोरुहा । संस्कृतभूलतोपेता सविशेषललाटिका ॥ २४७ मणिकुण्डलभारेण प्रलम्बश्रवणोज्ज्वला । सचित्रकरविन्यस्तपत्रचित्रकपोतिका ॥ २४८ ताम्बूलरससंसर्गाद्विगुणारुणिताधरा । मुक्ताभरणभाभारभासिबन्धुरकण्ठिका ॥ २४९ सच्चन्दनरसस्फारहारवक्षःकुचाञ्चिता । महामणिमयूरवाभाभास्दद्भुजलतातता ॥ २५० रशनारज्जुविभ्राजिसुविशालकटीतटी। मणिनू पुरनिर्घोषभत्सिताब्जक्रमाब्जिका ।। २५१ जितामरपुरीशोभा सौन्दर्यात्सा पुरी तदा । प्रसाधनमयं कायमषिताचिन्त्यवैभवम् ।। २५२ उत्सवो राजगेहस्य नगरेणैव वणितः । अगाधो यदि पर्यन्तो मध्यमब्धौ किमुच्यते ॥ २५३ --------........................................ या नगरीच्या स्त्रियांनी आपल्या डोळ्यात उत्तम अंजन घातले होते. आणि आपल्या मस्तकावरील केशात स्त्रियानी फुलांच्या माळा धारण केल्या होत्या व भुवयांनी व कुंकुमतिलकाने स्त्रियांचा भालप्रदेश शोभत होता. अशा स्त्रियानी या नगरीला फार शोभा प्राप्त झाली होती ।। २४७ ॥ रत्नकुण्डलाच्या ओझ्याने थोडे लांब झालेल्या कानांनी त्या स्त्रिया उज्ज्वल दिसत होत्या. चित्रकाराकडून ज्यांच्या गालावर वेलबुट्टी काढलेली आहे अशा स्त्रियांनी त्या नगराला शोभा आलेली होती ॥ २४८ ॥ त्या नगरीतील स्त्रियांचे ओठ लाल होते पण तांबूल रसाच्या सेवनाने ते दुप्पट लाल झालेले होते. मोत्यांच्या अलंकारांच्या शुभ्र कान्तिसमूहानी त्या नगरस्त्रियांचे गळे फार सुन्दर दिसत होते ॥ २४९ ॥ त्यांनी आपल्या छातीला व स्तनांना उत्तम चन्दनाची उटी लाविली होती व त्यावर शुभ्र हार घातले होते. यामुळे त्यांचे स्तन व छाती फार शुभ्र वाटत असत. इन्द्रनील मण्याच्या किरणकान्तीनी त्यांच्या भुजलता शोभत होत्या ॥ २५० ।। त्यांच्या कंबरेचे विशाल तट कमरपट्टयांच्या सुंदर साखळ्यानी फार शोभत होते. रत्नांच्या पैंजणाच्या आवाजानी त्यांचे दोन पदकमल कमलांची निंदा करीत होते. अर्थात् कमलापेक्षाही त्यांचे दोन पाय अधिक सुंदर होते ।। २५१ ॥ त्या वाराणसीनगरीने आपल्या सौंदर्याने स्वर्गनगरीचे सौंदर्य जिंकले होते. म्हणून त्या नगरीने आपले शरीर सर्वालंकारांनी पूर्ण व अचिंत्यवैभवानी युक्त असे धारण केले होते ॥ २५२ ॥ येथपर्यन्त सुलोचनेच्या विवाहोत्सवाविषयी नगरात केवढा मोठा उत्साह होता याचे वर्णन झाले. त्यावरून राजमंदिराच्या उत्सवाचे वर्णन आपोआपच झाले. समुद्राचा किनारा जर अगाध असेल तर समुद्राच्या मध्यभागाच्या अगाधतेचे वेगळे वर्णन करण्याची आवश्यकता कोठे राहिली ? अर्थात् राजवाड्यात विवाहाचा उत्सव अत्यंत मोठा होता ॥ २५३ ॥ Page #550 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-२६२) महापुराण (५३९ न चित्रं तत्र यच्चित्ती सोत्सवोऽन्तर्बहिश्च तत् । तद्वत्स्वभूषया यस्मात्कुड्याद्यपि विचेतनम् ॥२५४ भोक्तशन्यं न भोगाङ्गन भोक्ता भोगजितः। तत्र सन्निहितोऽनङ्गो लक्ष्मीश्चाविष्कृतोदया॥२५५ पश्य पुण्यस्य माहात्म्यमिहापीति तदुत्सवम् । विलोक्य कृतधर्माणः पुरस्थानबहु मेनिरे ॥ २५६ उदसुन्वन्फलं मत्वा धर्मस्य मुनयोऽपि तत् । धर्माधर्मफलालोकात्स्वभावः स हि तादृशाम् ॥ २५७ कन्यागृहात्तदा कन्यामन्यां वा कमलालयाम् । पुरोभूय पुरन्ध्न्यस्तामीषल्लज्जात्तसाध्वसाम् ॥२५८ विवाहविधिवेदिन्यः कृततत्कालसक्रियाम् । समानीय सदैवज्ञां महातूर्यरवान्विताम् ॥ २५९ सर्वमङ्गलसम्पूर्ण मुक्तालम्बूषभूषिते । चतुःकाञ्चनसुस्तम्भे भूरिरत्नस्फुरत्त्विषि ॥ २६० प्रमोदात्सुप्रभादेशाद्विवाहोत्सवमण्डपे । कलधौतमये पट्टे निवेश्य प्राङमुखीं सुखम् ॥ २६१ कलशेर्मुखविन्यस्तविलसत्पल्लवाधरैः । अभिषिच्य विशुद्धचम्बुपूर्णः स्वर्णमयः शुभैः ॥ २६२ त्या नगरीत ज्याअर्थी भिंत वगैरे चैतन्यरहित वस्तु देखिल सर्व बाजूनी आपल्या अलंकारानी आनंदित झाल्याप्रमाणे दिसत होत्या तर चेतनाधारक सर्व प्राणी आतून व बाहेरूनही आनंदित झाले होते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही ।। २५४ ।। त्या नगरीत कोणतीही भोग्य वस्तु जिचा उपभोग घेणारा कोणी नाही अशी बिलकुल नव्हती व कोणीही भोक्ता भोगवजित असा नव्हताच. कारण तेथे मदन नेहमी सर्वत्र वास करीत होता व लक्ष्मीचाही सर्वत्र खूप प्रकर्षाने उदय झालेला होता ॥ २५५ ।। या जन्मात देखिल पुण्याचे माहात्म्य पाहा असे म्हणून ज्यानी पुण्य मिळविले आहे अशा लोकांनी या नगरातील लोकांचा तो उत्सव पाहून त्यांना बहुमान दिला. त्यांची फार स्तुस्ति केली ।। २५६ ।। . मुनिजन देखिल त्या उत्सवाला धर्माचे फल मानून प्रसन्न झाले होते. हे ठीकच आहे, कारण धर्माचे फळ व अधर्माचे फळ पाहून त्याचे त्याप्रमाणे वर्णन करणे हा त्या लोकाचा तसा स्वभावच बनलेला असतो ।। २५७ ॥ ___ त्यावेळी विवाहाचा कार्यक्रम जाणणाऱ्या सदाचारी स्त्रिया पुढे होऊन कन्यागृहाकडे आल्या व लज्जेमुळे जिच्या मनात थोडेसे भय उत्पन्न झाले आहे व जी जणु दुसरी लक्ष्मी आहे अशी व जिचा त्यावेळी करण्यास योग्य असा सत्कार केला आहे अशा त्या कन्येला कन्यागृहातून बाहेर आणले. तेव्हां मोठमोठी वाद्ये वाजत होती. कन्येबरोबर ज्योतिषी लोकही बरोबर होते ॥ २५८-२५९।। ____ यानंतर तिला विवाहोत्सव मण्डपाकडे सुप्रभाराणीच्या आज्ञेने त्या सुवासिनी स्त्रियांनी आणिले. तो मण्डप सर्व मंगलानी पूर्ण होता. त्याच्या छताला मोत्यांचे घोस बसविले होते. त्या मण्डपाला चार सुवर्णाचे खांब बसविलेले होते. पुष्कळ रत्ने त्यांत जडविलेली असल्यामुळे त्यांची कान्ति पसरली होती. अशा त्या मंडपात सुवर्णाच्या पाट्यावर त्या कन्येला त्या स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करवून बसविले होते. ज्यांच्या मुखावर उत्तम पाने ठेविली आहेत, ज्यात शुद्ध पाणी भरले आहे अशा सोन्याच्या शुभ चार कुंभानी तिला स्नान घातले ॥ २६०-२६२ ।। Page #551 -------------------------------------------------------------------------- ________________ ५४०) महापुराण (४३-२६३ कृतमङ्गलनेपथ्यां नीत्वा नित्यमनोहरम् । पूजयित्वाहतो भक्त्या सर्वकल्याणकारिणः ॥ २६३ सिद्धशेषां समादाय क्षिप्त्वा शिरसि साशिषम् । स्थिताः प्रतीक्ष्य सल्लग्नं तत्रावृत्याहितादरम् ॥ इतो महीशसन्देशान्नरखेचरनायकाः । स्वास्ते प्रसाधितान्कृत्वाप्रसाधनविदस्तदा ॥ २६५ निजोचितासनारूढाः प्ररूढश्रीसमुज्ज्वलाः । चलच्चामरसम्पत्त्या कात्या चामरसन्निभाः ॥२६६ कुमार्या निजितः कामः प्राक्स्वमेवं विकृत्य किम् । समागंस्त पुनर्जेतुमिति शङ्काविधायिनः ॥२६७ कञ्चिदेकं वृणीतेऽसाविति ज्ञात्वाप्यस्यवः । जेतुं सर्वेऽपि तां तस्थुराशा हि महती नृणाम् ॥ २६८ केरलोकठिनोत्तुङ्गकुचकोटिविलङ्घनम् । श्रमापनीतसामर्थ्यात्परिक्षीणपरिक्रमम् ॥ २६९ माद्यन्मलयमातङ्गकटकण्डूविनोदनात् । क्षतचन्दननिष्यन्दसान्द्रसौगन्ध्यबन्धुरम् ॥ २७० ___ यानंतर तिला मंगलवस्त्रे नेसविली व नित्यमनोहर जिनमंदिराकडे नेले. तेथे संपूर्ण कल्याणमय अशा जिनेश्वराचे भक्तीने पूजन केले. तिच्या मस्तकावर आशीर्वादपूर्वक सिद्ध शेषा दिल्या व आदराने कन्येला घेरून मुहूर्ताची वाट पाहत बसल्या ॥ २६३-२६४ ॥ त्यावेळी इकडे अकम्पनराजाचा संदेश आल्यानंतर भूगोचरीराजे व विद्याधर राजे स्वतःला कसे भूषित करावे हे जाणत असल्यामुळे स्वतःला त्यांनी भूषित केले व ते विवाहमण्डपात जाऊन आपणास योग्य अशा आसनावर बसले. उत्पन्न झालेल्या शोभेने ते उज्ज्वल दिसत होते. हालणाऱ्या चामरांच्या संपदेने व कान्तीने ते देवासारखे भासत होते ॥२६५-२६६।। या सुलोचनाकुमारीने मला पूर्वी जिंकले होते पण मी आता तिला जिंकीन असा विचार करून जणु तो काम पुनः तिला जिंकावयाला अनेक राजांच्या रूपाने आला आहे अशी शंका त्या राजानी लोकांच्या मनात उत्पन्न केली ॥ २६७ ।। ही कोणा तरी एका राजाला वरील असे जाणूनही अहंकाराने तिला जिंकण्यासाठी ते सर्व राजे तेथे आले. बरोबरच आहे की, मनुष्यांना फार मोठी आशा असते ॥ २६८॥ केरळ देशातील स्त्रियांच्या कठिण व उन्नतस्तनांच्या अग्रभागाना उल्लंघून येण्याने जो श्रम झाला त्यामुळे सामर्थ्य कमी होऊन ज्यांचे गमन मंद झाले आहे असे व माजलेले जे मलयपर्वतावरील हस्ती त्यांनी गण्डस्थलात उत्पन्न झालेल्या खाजेचे शमन करण्यासाठी मोडलेल्या चन्दनवृक्षापासून निघालेला जो रस त्याच्या दाट सुगंधाने जो मनोहर दिसत आहे; कावेरीनदीत उत्पन्न झालेल्या कमळांच्या भक्षणामुळे आनंदित झालेल्या पक्ष्यानी जी त्या नदीत यथेच्छ क्रीडा केली तेव्हां वर उडालेले जे पाण्याचे स्थूल कण तेच ज्याचे मोत्यांचे भूषण आहे असा, जो विरहरूपी तीक्ष्ण अग्नीला भडकवीत आहे, आणि कोकिळ व भुंगे यांच्या मधुर शब्दांनी जो वाचाल झाला आहे अशा दक्षिण दिशेच्या वाऱ्याला अनुकूल करणारा असा, स्त्रियांच्या मद्याच्या चुळींनी व पैंजणांच्या शब्दानी रमणीय व त्यांच्या डाव्या पायांच्या लाथांनी जो झाडाना देखिल अतिशय कामुक बनवित आहे, आपल्या डाव्या हाताने आपले पुष्पधनुष्य घेऊन व आपल्या उजव्या हाताने आम्रमंजरी घेऊन जो फिरवीत आहे, ज्याने आपल्या वसन्तरूपी सेवकाकडून सर्व फुलेरूपी शस्त्रे आणविली आहेत असा तो मदन सर्व Page #552 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-२८२) महापुराण (५४१ कावेरीवारिजास्वादप्रहृष्टाण्डजनिर्भरक्रीडोच्छलज्जलस्थूलकणमुक्तातिभूषणम् ॥ २७१ दक्षिणानिलमायल्लकात्कटानलदीपनम् । कोकिलालिकलालापर्वाचालमनुकूलयन् ॥ २७२ योषितां मधुगण्डूष पुरारावरञ्जितैः । कुर्वन्वामाघ्रिभिश्चालमहघ्रिपानपि कामुकान् ॥ २७३ कौसुमं धनरादाय वामेनारूढविक्रमः । चूतसूनं करेणोच्चैः परेण परिवर्तयन् ॥ २७४ वसन्तानुचरानीतनिःशेषकुसुमायुधः । जित्वा तदाखिलान्देशानप्यायात्कुसुमायुधः ॥ २७५ तदा पुरात्समागत्य कृती जितपुरन्दरः । समाविर्भूतसाम्राज्यो राज्यचिह्नपुरःसरः ॥ २७६ स्वलक्ष्मीव्याप्तसर्वाशः सुप्रभासहितः पतिः । स्वस्थान्स्वयंवरागारे स्वोचिते स्वजनैर्वृतः ॥ २७७ चित्रं महेन्द्रवत्ताख्यो देवदत्तं रथं पृथुम् । सज्जीकृतं समारोप्य कन्यामायात्तु कञ्चुकी ॥ २७८ समस्तबलसन्दोहं सम्यक्सन्नाह्य सानुजः । हेमाङ्गदो जितानङ्गःप्रीत्यायात्परितो रथम् ॥ २७९ तूर्यध्वानाहतिप्रेङ्कदिक्कन्याकर्णपूरिका । सञ्छन्नच्छत्रनिश्च्छिद्रच्छायाच्छादितभास्करा ॥ २८० लक्ष्मीः पुरीमिवायोध्यां चक्रिदिग्विजयागमे । शालां प्रविश्य राजन्यलोचनाा सुलोचना ॥२८१ सर्वतोभद्रमारुह्य कञ्चुकिप्रेरिता नपान् । न्यषिञ्चल्लोचनर्लोलर्नीलोत्पलदलैरिव ॥ २८२ देशांना जिंकून त्या ठिकाणी आला. अर्थात् सर्व राजांच्या मनात सुलोचनेविषयी इच्छा उत्पन्न झाली ।। २६९-२७५ ॥ त्यावेळी ज्याने इन्द्राला जिंकले आहे, ज्याचे साम्राज्य प्रकट झाले आहे, असा पुण्यवान् आपल्या लक्ष्मीच्या द्वारे ज्याने सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या आहेत असा तो अकम्पन राजा राणी सुप्रभेसहित व आपल्या परिवार जनासह स्वयंवर मण्डपात आला व राज्यचिह्न-छत्र, चामरे या चिह्नांनी युक्त होऊन स्वयोग्यस्थानी विराजमान झाला ।। २७६ ॥ त्यावेळी महेन्द्रदत्त या नांवाच्या कञ्चुकीने देवाने दिलेला आश्चर्यकारक असा मोठा रथ सज्ज केला व त्यात त्याने कन्येला बसविले व तो स्वयंवरमण्डपात आला ॥ २७७-२७८॥ त्याचवेळी ज्याने आपल्या रूपगुणाने कामाला जिंकले आहे असा हेमांगद राजपुत्र आपल्या धाकट्या भावांना बरोबर घेऊन व सुलोचनेच्या रथाला घेऊन निघाला. त्यावेळी त्याने आपले सर्व सैन्यही सज्ज करून आपल्या बरोबर घेतले होते ॥ २७९ ।। त्यावेळी नाना प्रकारच्या वाद्यांच्या शब्दांच्या आघाताने दिक्कन्यांच्या कानातील कर्णपूरनामक आभूषणे हालू लागली. विस्तीर्ण छत्राच्या छिद्ररहित दाट सावलीने जिने सूर्याला आच्छादले आहे, अशा त्या सुलोचनेने चक्रवर्ती भरत दिग्विजय करून परत आला असता त्याच्या राजलक्ष्मीने जसा अयोध्येत प्रवेश केला तसा स्वयंवरमंडपात प्रवेश केला व सर्व राजवृन्दाच्या डोळ्यानी ती पूजिली गेली म्हणजे सर्व राजांनी तिला पाहिले ॥ २८०-२८१ ॥ Page #553 -------------------------------------------------------------------------- ________________ ५४२) महापुराण (४३-२८३ चातका वान्दवृष्टया ते तदृष्ट्या तुष्टिमागमन् । आह्लादः कस्य वा न स्यादीप्सितार्थसमागमे ।। स्वसौभाग्यवशात्सर्वान् साप्यालोक्यातुषत्तराम् । श्लाघ्यं तद्योषितां पुंसां शौयं वा निजितद्विषाम् ॥ ततःकञ्चकिनिर्देशाबाला लीलावलोकितैः । आकृष्य हृदयं तेषां तत्सौधात् समवातरत् ॥ २८५ ततः कञ्चुकिनिर्देशाबाला लीलावलोकितैः । आकृष्य हृदयं तेषां तत्सौधात्समवातरत् ॥ २८६ यस्य यत्र गता स्यादृक्सा तत्रैवेव कोलिता । ते तस्यामवरूढायां खिन्ना वा तदनीक्षकाः ॥ २८७ किडकिणीकृतझडकारारावरम्यं रथं ततः । व्यूढं रूढर्हयैः स्वर्णकर्णचामरशोभिभिः ॥ २८८ उत्पतन्निपतत्केतुबाहुं नीरूपरूपिणाम् । साक्षादपह्नवाह्वाने कुर्वन्तमिव सन्ततम् ॥ २८९ पुनरध्यास्य हृज्जन्मविद्येव हृदयप्रिया । मुक्ताभूषाप्रभामध्ये शारदीव तडिल्लता ॥ २९० ___ यानंतर कंचुकीच्या विनंतीला अनुसरून ती सर्वतोभद्र नांवाच्या प्रासादावर चढून तेथील सिंहासनावर बसली व आपल्या चंचल नीलकमलाच्या पाकळीप्रमाणे असलेल्या डोळ्यांनी तिने सर्व राजांना स्नान घातले अर्थात् पाहिले. जसे मेघाच्या वृष्टीने चातक सन्तुष्ट होतात तसे त्या सुलोचनेने राजाना आपल्या दृष्टीने पाहिल्यामुळे आनंद वाटला. बरोबरच आहे की आपण इच्छिलेला पदार्थ आपल्या दृष्टीत पडल्यावर कोणाला बरे आनंद वाटत नाही ? जसे शत्रूना जिंकणाऱ्या पुरुषांचे शौर्य प्रशंसनीय असते तसे त्या सुलोचनेचे सौभाग्य प्रशंसनीय होते. त्या सौभाग्याने ती त्या सर्व राजांना पाहून अधिक संतुष्ट झाली. यानंतर कंचुकीच्या वचनाला अनुसरून ती सुलोचना सर्वांच्या हृदयाला आपल्या लीलेच्या अवलोकनाने ओढून घेऊन त्या सौधांतील सिंहासनावरून खाली उतरली ।। २८२-२८५ ।। यानंतर कंचुकीच्या सांगण्यावरून ती कन्या आपल्या खेळकर अवलोकनांनी त्या राजांची मनें हरण करून त्या सौधातील सिंहासनावरून खाली उतरली. ।। २८६ ।। ज्या ज्या राजाची दृष्टि या सुलोचनेच्या ज्या ज्या अवयवावर पडली ती तेथेच जणु जखडून बांधण्यासारखी झाली. व जेव्हां ती सिंहासनावरून खाली उतरली तेव्हां ती त्यांना तेथे दिसली नाही म्हणून ते खिन्न झाले ॥ २८७ ॥ यानंतर जी कामदेवाच्या विद्येप्रमाणे सर्वांच्या हृदयाला आवडते, जी मोत्यांच्या अलंकाराच्या क्रान्तीमध्ये शरत्कालाच्या विजेप्रमाणे शोभते, व जिच्यावर पडत असलेल्या मनुष्याच्या दृष्टिदोषाला दुरूनच जे जणु दूर करीत आहेत, असे चन्द्राशी स्पर्धा करणारे व हंसांच्या पंखाप्रमाणे शुभ्र निर्मल असे चामर वारले जात होते, अशी ती सुलोचना रथांत बसून चालली. ज्यांच्या कानाजवळ सोन्याचे चामर शोभत आहेत असे घोडे रथाला जुंपले होते. व तो रथ धुंघराच्या आवाजाने मोठा सुंदर दिसत होता. ते जुंपलेले घोडे त्या रथाला नेत होते. त्यावर असलेला ध्वजस्तंभ खालीवर फडकत होता व तो कुरूप मनुष्याचे निराकरण करून सुरूप मनुष्यांना साक्षात् बोलावित आहे असे वाटत होते ।। २८८-२९० ॥ Page #554 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-२९७) महापुराण (५४३ वीज्यमाना विधुस्पद्धिहसांसामलचामरैः । जनानां दृष्टिदोषान्वा धुन्वद्भिदूंरतो मुहुः ॥ २९१ अवधूतः पुरानङगः संप्रति स्वीकृतोऽनया । प्रयोजनवशात्प्राज्ञैः प्रास्तोऽपि परिगृह्यते ॥ २९२ अस्या ग्रह इवानङ्गः सद्यः सर्वाङ्गसङ्गतः । विकारमकरोत्स्वरं भूयो भ्रूनेत्रवक्त्रजम् ॥ २९३ साङ्गो यद्येतयाद्यैवमेकीभावं व्रजामि किम् । इत्यनङ्गोऽप्यनङ्गत्वं स्वं मन्ये साध्वबुध्यत ॥ २९४ लक्ष्मीः सा सर्वभोग्याभूद्रतिव्यङ्गन केवलम् । जितानङगानिमानेषा न्यक्कृत्य जयमाप्स्यति ॥२९५ करग्रहेण लक्ष्मीवान् स्यान्न वा षारिधिर्भुवः । अस्याः करग्रहो यस्य तस्य लक्ष्मीः करे स्थिता ॥२९६ लावण्यमम्बुधौ पुंसु स्त्रीवस्यामेव सम्भृतम् । यत्प्राप्ताः सरितः सर्वास्तमेतां सर्वपार्थिवाः ॥२९७ ----------------- सुलोचनेने प्रथमतः मदनाचा तिरस्कार केला होता. पण आता तिने त्याचा स्वीकार केला आहे. बरोबरच आहे की शहाणे लोक ज्याचा त्याग केलेला असतो त्याचाही स्वीकार प्रयोजनबश होऊन करीत असतात ।। २९१ ॥ पिशाचा प्रमाणे जणु कामदेवाने तत्काळ हिच्या सर्व अंगांत प्रवेश केला व स्वच्छंदाने हिच्या भुवया, नेत्र व मुख या अवयांत त्याने विकार उत्पन्न केला. ॥ २९२ ।। मी जर सांग- शरीरसहित असतो तर आजच मी हिच्याशी एकरूप कसा झालो असतो मला एकरूप होता आले नसते. म्हणून मदनाने मी अनङग आहे अंगरहित आहे असे असणे हेच उत्तम आहे असे त्याने जाणले ।। २९३ ॥ जी लक्ष्मी ती सर्व भोग्य झाली आहे व रतिही व्यङग-अंगरहित अशा कामाकडून फक्त भोगली जाते. परंतु ही सुलोचना ज्यांनी आपल्या सौंदर्याने मदनाला जिंकले आहे अशा या सर्व राजांना तिरस्कृत करून जयाला - जयकुमाराला प्राप्त करून घेईल ॥ २९४ ॥ करग्रहण करून लक्ष्मीचा हात धरून समुद्र लक्ष्मीवान् होईल किंवा नाही पण या सुलोचनेचा हात ज्याने ग्रहण केला आहे त्याच्या हातांत लक्ष्मी अवश्य राहिली आहे असे समजावे ॥ २९५ ॥ पुरुषामध्ये लावण्य कोणात असेल तर समुद्रांत आहे. व स्त्रियांत लावण्य कोठे असेल तर ते या सुलोचनेत भरलेले आहे. कारण असे नसते तर सर्व नद्या समुद्रालाच का प्राप्त होतात ज्या अर्थी सर्व नद्या समुद्राकडे जातात व ज्या अर्थी सर्व राजे या सुलोचनेकडे आलेले आहेत त्या अर्थी या दोघामध्ये लावण्य आहे. समुद्रामध्ये लावण्य - खारटपणा आहे व सुलोचनेत लावण्य - सौंदर्य आहे ॥ २९६ ॥ __ या सुलोचनेत जे लावण्य आहे ते सर्वाच्या नेत्राकडून प्याले गेले तरी ते अधिक वाढतच आहे. पण लक्ष्मीने त्यागलेला समुद्र त्या लावण्याला सौंदर्याला कसे बरे धारण करू शकेल ? ।। २९७ ॥ Page #555 -------------------------------------------------------------------------- ________________ ५४४) महापुराण (४३-२९८ समस्तनेत्रसम्पीतमप्य स्यावर्षते तराम् । लावण्यमम्बुधिस्त्यक्तः श्रिया वहतु तत्कथम् ॥ २९८ रत्नाकरत्वदुर्गर्वमम्बुधिः श्रयते वृथा। कन्यारत्नमिदं यत्र तयोरेतद्विराजते ॥ २९९ इति स्तुतात्मसौभाग्यभाग्यरूपादिसम्भृता । जनैः स्वयंवरागारमागमद्गोमिनीव सा ॥ ३०० पराभूतिद्विधा सात्र भाविनी केति वा तदा। प्रीतिशोकान्तरे कञ्चिद्रसं राजकमन्वभूत् ॥ ३०१ स्थित्वा महेन्द्रदत्तोऽपि रत्नमालाधरो धुरि । रथं प्रचोदयामास प्रतिविद्यापराधिपान् ॥ ३०२ दक्षिणोत्तरयोः श्रेण्योर्नमेश्च विनमः सुतौ । पतिः सुनमिरेषोऽयमितः सुविनमिः श्रियः ॥ ३०३ अन्येऽमी च खगाम्नाया विद्याविक्रमशालिनः। पति वृणीष्व त्वं चैषु स्वेच्छामेकत्र पूरय ॥ ३०४ इति कञ्चुकिनिर्दिष्ट नामादाय पृथक् पृथक् । कर्णे कृत्यात्ययात्सर्वान्रुचिश्चित्रा हि देहिनाम् ॥३०५ मी रत्नाकर आहे असा वाईट अभिमान समुद्राने व्यर्थ धारण केला आहे. पण हे सुलोचनारूपी कन्यारत्न जेथे जन्मले त्या दोघांना सुप्रभाराणी व अकम्पन राजा या दोघांनाच रत्नाकर आम्ही आहोत म्हणून गर्व बाळगणे हे त्यानाच शोभते समुद्राला नाही ॥ २९९ ।। याप्रमाणे लोकाकडून जिचे सौंदर्य, भाग्य-पुण्य व स्वरूप आदिक स्तविले गेले आहे अशी ती गुणांनी भरलेली सुलोचना कन्या लक्ष्मी प्रमाणे स्वयंवर मण्डपांत आली ॥ ३०० ।। पराभूति परा उत्कृष्ट भूति ऐश्वर्य व पराभूति म्हणजे पराभव प्राप्त होणे अशी पराभूति दोन प्रकारची आहे. त्यापैकी कोणती आम्हाला प्राप्त होईल यांचा विचार करणाऱ्या स्या राजसमूहाला प्रीति व शोक यापैकी कोणता रस उपभोगावा लागेल बरे ? ॥ ३०१ ।। महेन्द्रदत्त नामक कंचुकी हातात रत्नमाला धारण करून रथांत पुढे बसला होता व त्याने तो रथ विद्याधर राजाकडे चालविला ।। ३०२ ।। विजयापर्वतावरील दक्षिणश्रेणी व उत्तरश्रेणी या श्रेणीचे स्वामी जे नमि व विनमि विद्याधराधीश आहेत त्याचे हे दोघे पुत्र सुनमि आणि सुविनमि आहेत. हे दोघे राज्यलक्ष्मीचे अधिपति आहेत ।। ३०३ ॥ याचप्रमाणे हे दुसरे राजे ही विद्याधरवंशपरंपरेंत जन्मले आहेत. विद्या व पराक्रम यांनी हे शोभत आहेत. हे कन्ये तू यापैकी एकाला पति म्हणून वर व आपली इच्छा पूर्ण कर ॥ ३०४ ॥ याप्रमाणे बोलून वेगळे वेगळे एक एक नांव घेऊन त्यांचे वर्णन कंचुकीने केले पण ते वर्णन कानांत ठेवून ती त्या सर्वांना उल्लंघून पुढे गेली, बरोबरच आहे की, प्राण्यांच्या रुचि अनेक प्रकारच्या असतात व आश्चर्यकारक असतात ॥ ३०५ ॥ Page #556 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-३१४) महापुराण (५४५ पश्चात्सर्वानिरीक्ष्यषा कञ्चित्तु विवरिष्यते । तथैवेति खगास्तस्थुः किं वाशा नावलम्बते ॥३०६ पश्चाज्जग्लुर्मुखाब्जानि तद्रथाद्वयकसन्पुरः । रवेरिवोदये राज्ञां संसृतेः स्थितिरीदशी ॥ ३०७ उच्चाद्वादुद्रुवनिम्नमभिभूमि च तद्रथः । कञ्चुकी कथयामास नामभिस्तान्नुपांस्तदा ॥ ३०८ निराकृत्यार्ककीादीन् साजेया जयमागमत् । हित्वा शेषान्द्रमांश्चूतं मधौ मधुकरी यथा ॥३०९ गृहीतप्रग्रहस्तत्र कञ्चुको चित्तवित्तदा । वचो व्यापारयामास जयव्यावर्णनं प्रति ॥ ३१० प्रदीपः स्वकुलस्यायं प्रभुः सोमप्रभात्मजः । श्रीमानुत्साहभेदैर्वा जयोऽयमनुजैर्वृतः ॥ ३११ न रूपमस्य व्यावण्यं तदेतदतिमन्मथम् । स दर्पणोऽर्पणीयः किं करकङ्कणदर्शने ॥ ३१२ जित्वा मेघकुमाराख्यानुत्तरे भरते सुरान् । सिंहनादः कृतोऽनेन जिततन्मेघनिःस्वनः ॥ ३१३ वीरपट्ट प्रबद्धयास्य स्वभुजाभ्यां समद्धतम् । न्यधायि निषिनाथेन हृष्ट्वा मेघस्वराभिधा ॥ ३१४ ही सर्वांना आधी पाहील व नंतर कोणाला तरी ही वरील असा विचार करून ते विद्याधर सर्व थांबले. बरोबरच आहे की, आशा कशावर अवलंबून राहात नाही बरे ? ॥३०६।। पूढे रथ गेला म्हणजे पाठीमागच्या राजांची मुखे म्लान होत व पुढच्या राजांची मुखे विकसित होत असत. जसा सूर्योदय झाल्यावर कमळे विकसित होतात व तो अस्ताला गेला असता मिटतात. संसारातील सर्व प्राण्यांची स्थिति अशी आहे ॥ ३०७ ॥ तिचा तो रथ उंच भूमीवरून खाली भूमीवरच्या प्रदेशाकडे आला अर्थात् भूमिगोचर राजाकडे आला. तेव्हां कंचुकीने त्या त्या राजांची नांवे घेऊन सुलोचनेला त्यांची माहिती दिली ।। ३०८ ॥ जसे भुंगी सगळया झाडाना सोडून वसंतऋतूमध्ये आम्रवृक्षाकडे येते तशी ती अजेय सुलोचना कुमारी अर्ककीर्ति वगैरे राजांना ओलांडून जयकुमाराकडे आली ॥ ३०९ ॥ त्यावेळी कुमारीचे चित्त जाणणाऱ्या त्या कंचुकीने घोड्यांचे लगाम ओढून धरले व जयकुमाराच्या वर्णनास त्याने सुरुवात केली ।। ३१० ॥ हा सोमप्रभ राजाचा मुलगा प्रभुजयकुमार. हा स्वतःच्या कुलाला प्रकाशित करणारा जणु प्रदीप आहे. हा लक्ष्मीसंपन्न राजा उत्साहाचे जणु अनेक भेद अशा आपल्या अनेक धाकट्या भावांनी घेरलेला येथे शोभत आहे ॥ ३११ ॥ याचे सौन्दर्यवर्णन करणे नको, कारण ते मदनाच्या रूपालाही उल्लंघणारे आहे. हातातील कांकण पाहण्यास आरसा घ्यावा लागतो काय ? ॥ ३१२ ॥ उत्तरेकडील भरतक्षेत्रात मेघकुमार नामक देवांना जिंकून त्या देवांच्या कृत्रिम मेघांच्या गर्जनेला जिंकणारा सिंहनाद या जयकुमाराने केला होता ।। ३१३ ॥ ___ त्यावेळी निधिपति भरतेश्वराने आनंदित होऊन आपल्या दोन बाहूंनी उचलून घेतलेला वीरपट्ट याला बांधला आणि 'मेघस्वर' नामक पद याला दिले ।। ३१४ ॥ म.६९ Page #557 -------------------------------------------------------------------------- ________________ ५४६) महापुराण (४३-३१५ आत्मसम्पद्गुणैर्युक्तः समेतश्चाभिगामिकैः । प्रज्ञोत्साहविशेषैश्च ततोऽयमुदितोदितः ॥ ३१५ चित्रं जगत्रयस्यास्य गुणाः संरज्य साम्प्रतम् । व्यावृत्ताः सर्वभावेन तव भावानुरञ्जने ॥ ३१६ अयमेकोऽस्ति दोषोऽस्य चतस्रः सन्ति योषितः । श्रीः कीतिर्वीरलक्ष्मीश्च वाग्देवी चातिवल्लभाः ॥ जितमेघकुमारोऽयमेकः प्राक्त्वज्जयेऽधना । च्यतधैर्य इवालक्ष्ये यत्सहायीकृतः स्मरः ॥ ३१८ बलिनोर्युवयोर्मध्ये वर्तमानो जिगीषतोः । द्वैधीभावं समापन्नः षाड्गुण्यनिपुणः स्मरः ॥ ३१९ कोतिः कुवलयालादी पद्मावादी प्रभास्य हि । सूर्याचन्द्रमसौ तस्मादनेन हतशक्तिकौ ॥ ३२० कोतिर्बहिश्चरा लक्ष्मीरतिवृद्धा सरस्वती । जीर्णेतरापि शान्तेव लक्ष्यते क्षतविद्विषः ॥ ३२१ ज्यांच्या योगाने आत्मस्वरूप असलेली ज्ञानरूपी सम्पत्ति प्राप्त होते अशा गुणांनी हा युक्त आहे व आदर करण्यायोग्य अशा इतर गुणानीही हा युक्त आहे. तसेच बुद्धि आणि उत्साह यांच्या अधिकपणाने हा उत्तरोत्तर उत्कर्षाला पावलेला आहे ॥ ३१५ ॥ या जयकुमाराचे गुण या सगळ्या तीन जगातील जीवांना संतुष्ट करून यावेळी सर्व प्रकारे तुझ्या अन्तःकरणाला अनुरक्त करण्यासाठी परतून आले आहेत. याचे आम्हाला मोठे आश्चर्य वाटते ॥ ३१६ ॥ याच्या ठिकाणी एक दोष आहे तो असा की श्री, कीर्ति, वीरलक्ष्मी आणि वाग्देवी-सरस्वती या अत्यंत प्रिय अशा याला चार पत्नी आहेत ।। ३१७ ।। जेव्हां याने मेधकुमार देवांना जिंकले तेव्हा हा एकटाच होता पण आता तुला जिंकण्यासाठी हा धैर्यरहित झाला आहे म्हणून याने मदनाला आपला सहायक केला आहे ।। ३१८ ।। तुम्ही दोघे बलवान् एकमेकाना जिंकण्याची इच्छा करीत आहात. शत्रूला जिंकण्यासाठी सामदामादि सहा गुणानी चतुर असलेला मदन तुम्हा दोघापैकी कोणाला कोणत्या गुणाने जिंकावे याविषयी संशययुक्त झाला आहे, त्याला काही कळेनासे झाले आहे ।। ३१९ ॥ या जयकुमाराची कीर्ति कुवलयाह्लादी-रात्री विकसणान्या कमलाला आनंदित करणारी आहे व कुवलयाला भूमंडळाला आनंदित करणारी आहे. तसेच याची प्रभा अंगकान्ति पद्म-दिनविकासी कमलाला प्रफुल्ल करणारी आहे व पद्मा-लक्ष्मीला आनंदित करणारी आहे. म्हणून याने सूर्य व चंद्र या दोघांना ही आपल्या या दोन कार्यानी सामर्थ्यरहित केले आहे ।। ३२० ॥ या जयकुमाराची कीर्तिरूपो स्त्री नेहमी बाहेर भटकत असते व लक्ष्मीरूपी पत्नी अतिशय म्हातारी झाली आहे. ज्याने शत्रूचा संहार केला आहे अशा या जयकुमाराची तिसरी पत्नी सरस्वती हीही जीर्ण झाली आहे. अर्थात् वृद्धावस्थेमुळे शिथिल शरीराची बनली आहे. पक्षी परिपक्व झाली आहे. यामुळे या तिधीवर जयकुमाराचे खास प्रेम नाही व चौथी पत्नी वीरलक्ष्मी आहे. जरी ती तरुण आहे व नेहमी त्याच्याजवळ राहते पण ती आता शान्त झाल्यासारखी आहे. शृङगारादिकाकडे तिची प्रवृत्ति नाही. पक्षी क्षमायुक्त शूरवीरता तिची आहे, यामुळे या चौघीवरती या जयकुमाराचे प्रेम नाही ॥ ३२१ ॥ Page #558 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-३२८) महापुराण (५४७ ततस्त्वयि वयोरूपशीलादिगुणभाज्यलम् । प्रीतिलतेव दकपुष्पा प्रवृद्धास्य फलिष्यति ॥ ३२२ युवाभ्यां निजितः कामः सम्प्रत्यभ्यन्तरीकृतः । स वामपजयायाभूदरिविश्रम्भतोऽप्यरिः ॥ ३२३ निष्ठरं जम्भतेऽमुष्मिन्नुभयारिरपि स्मरः । मत्वेव त्वां स्त्रियं भूयो भटेष भटमत्सरः ॥ ३२४ विख्यातविजयः श्रीमान् यानमात्रेण निर्जितः । त्वयायमत एवात्र जयो न्यायागतस्तव ॥ ३२५ प्राध्वंकृत्य गले रत्नमालया दृक्शरेजितम् । जयलक्ष्मीस्तवैवास्तु तत्त्वमेनं करे कुरु ॥ ३२६ इति तस्य वचः श्रुत्वा स्मरषाड्गुण्यवेदिनः । शनैविगलितवीलालोललीलावलोकना ॥ ३२७ तदा जन्मान्तरस्नेहश्चाक्षुषी सुन्दराकृतिः । कुन्दभासा गुणास्तस्य श्रावणाः पुष्पसायकः ॥ ३२८ पण तू वय, रूप, शील आदिक गुणानी अतिशय शोभत आहेस, म्हणून दृष्टिरूपी पुष्पानी लकडलेली व खूप वाढलेली जी याची प्रीतिरूपी लता आहे ती तुझ्यामुळे सफल होईल. या चार सवती तुला असूनही या सवतीपासून होणा-या दुःखांचा तुला तिळमात्रही अनुभव येणार नाही ।। ३२२ ॥ __ तुम्ही दोघांनी ज्या कामदेवाला जिंकन दूर केले होते पण त्यालाच आता तुम्ही आपल्याजवळ केलेले आहे, आपल्या अन्तःकरणात स्थान दिले आहे अथवा त्याला तुम्ही आपले विश्वासपात्र बनविले आहे पण तो तुम्हा दोघांचा पराजयच करील. कारण त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला म्हणून तो मित्र होणार नाही. जो शत्रु आहे तो शत्रूच राहील ॥ ३२३ ॥ जरी हा कामदेव तुम्हा दोघांचा शत्रु आहे तरीही हा या जयकुमारावर आपला अधिक प्रभाव पाडील. कारण तू स्त्री आहेस असे समजून तुझ्यावर आपला प्रभाव पाडणार नाही. कारण शूरावरच शूराचा मत्सर होतो. तात्पर्य तुला स्त्री समजून भित्री मानून तुला हा अधिक दुःखी करणार नाही पण जयकुमारावर हा आपला खूप प्रभाव पाडील ॥ ३२४ ॥ हा लक्ष्मीसंपन्न जयकुमार जरी प्रख्यात विजयशाली आहे तरीही तू केवळ आगमनाने त्याला जिंकले आहेस म्हणून ह्या ठिकाणी हा जय ( जयकुमार - दुसरा अर्थ विजय ) तुला न्यायानेच प्राप्त झाला आहे ।। ३२५ ॥ तू आपल्या नेत्रशरांनी जिंकलेल्या याला रत्नमालेने गळ्याला बांधून आपल्या हातात घे म्हणजे जयलक्ष्मी तुझीच होईल ।। ३२६ ।। मदनाच्या सन्धिविग्रह आदिक सहा गुणाना जाणणाऱ्या कंचुकीचे ते भाषण ऐकून हळु हळु जिची लज्जा कमी होत आहे, जी चंचल व खेळकर दृष्टीने पाहत आहे व जिच्या ठिकाणी पूर्वजन्माचा स्नेह उत्पन्न झाला आहे, जिच्यापुढे जयकुमाराची डोळ्याला सुन्दर वाटणारी मूर्ति उभी आहे. तिने त्याचे कुन्दपुष्पाप्रमाणे शुभ्र गुण ऐकले होते व कामदेव या सर्वानी तिला रथातून खाली उतरविले व तिने कंचुकीच्या हातातून सुन्दर रत्नमाला घेतली Page #559 -------------------------------------------------------------------------- ________________ ५४८) महापुराण (४३-३२९ इत्येभिः स्यन्दनादेषा समत्क्षिप्यावरोपिता । रत्नमालां समादाय कन्या कञ्चुकिनः करात्॥३२९ अबध्नाद्वन्धुरां तस्य कण्ठेऽतिप्रेमनिर्भरा । सावाचकात्समाध्यास्य वक्षो लक्ष्मीरिवापरा ॥ ३३० सहसा सर्वतूर्याणामुदतिष्ठन्महाध्वनिः । श्रावयन्निव विक्कन्याः कन्यासामान्यमुत्सवम् ॥ ३३१ । वक्त्रवारिजवासिन्या नरविद्याधरेशिनाम् । श्रिया जयमुखाम्भोजमाश्रितं वा तदात्यभात् ॥ ३३२ गताशावारयो म्लानमुखाब्जाक्ष्युत्पलश्रियः । खभूचरनृपाः कष्टमासन्शुष्कसरःसमाः ॥ ३३३ अभिमतफलसिद्धचा वर्धमानप्रमोदो। निजदुहितसमेतं द्राक् पुरोधाय पूज्यम् ॥ जयममरतरं वा कल्पवल्लीसनाथं । नगरमविशदुच्चै थवंशाधिनाथः ॥ ३३४ आद्योऽयं महिते स्वयंवरविधौ । यद्भाग्यसौभाग्यभाक् । यस्माद्राज्यखगेन्द्रवक्त्रवनजश्रीवारयोषितः ॥ मालाम्लानगुणा यतोऽस्य शरणे मन्दारमालायते । तत्कल्पावधि वीघ्रमस्य विपुलं विश्वं यशो व्यश्नुते ॥ ३३५ व अतिशय प्रेमविवश होऊन तिने त्याच्या गळ्यात ती माला बांधली. त्यावेळी बी माला जयकुमाराच्या वक्षःस्थलावर जणु दुसऱ्या लक्ष्मीप्रमाणे बसून शोभली ॥ ३२७-३३० ॥ जेव्हां जयकुमाराच्या गळ्यात सुलोचनेने रत्नमाला घातली त्यावेळी एकदम सर्व वाद्यांचा मोठा ध्वनि उत्पन्न झाला व तो सर्व दिक्कन्याना सुलोचनाकन्येचा हा अवर्णनीय असामान्य उत्सव कळवीत आहे असे वाटले ।। ३३१॥ भूमिगोचरी राजे व विद्याधर राजे यांच्या मुखकमलांत निवास करणान्या शोभेने जयकुमाराच्या मुखाचा आश्रय जणू घेतला असे जयकुमाराचे मुखकमल अतिशय शोभू लागले ॥ ३३२ ॥ ज्यांचे आशारूपी पाणी वाळून गेले आहे व त्यामुळे ज्यांच्या मुखकमलाची व नेत्र कमलांची शोभा म्लान झाली आहे असे ते भूपति व विद्याधरपति वाळलेल्या सरोवराप्रमाणे कष्टी झाले - दुःखी झाले ॥ ३३३ ॥ आपल्या इष्टकार्याची सिद्धि झाल्यामुळे ज्याचा आनन्द वाढला आहे व जो नाथवंशाचा स्वामी आहे अशा अकम्पपनराजाने कल्पलतेने सहित असा जणु कल्पवृक्ष अशा आपल्या कन्येने युक्त असलेल्या जयकुमाराला पुढे करून उत्कृष्ट अशा आपल्या नगरात त्वरेने प्रवेश केला ।। ३३४ ॥ या प्रशंसनीय स्वयंवराच्या विधीमध्ये पुण्योदयाने प्राप्त झालेल्या सौभाग्याला धारण करणारा हा जयकुमार पहिलाच आहे, भूमिगोचरी राजे व विद्याधरराजे यांच्या मुखकमलाची जी शोभा हीच कोणी वाराङ्गना स्त्री तिने युक्त झाला. सुलोचनेने जिचे गुण प्रफुल्ल आहेत अशी जी माला याच्या गळ्यात घातली ती याच्या घरी मन्दारकल्पवृक्षाप्रमाणे झाली. अशा या जयकुमाराचे विपुल व शुभ्र यश कल्पान्तकालापर्यन्त सगळ्या विश्वाला व्याप्त करील ।। ३३५ ॥ Page #560 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-३३८) महापुराण भास्वत्प्रभाप्रसरणप्रतिबुद्धपद्मः । प्राप्तोदयः प्रतिविधाय परप्रभावम् । बन्धुप्रजाकुमुदबन्धु रचिन्त्य कान्तिर्भातिस्म भानुशशिनोविजयी जयोऽयम् ॥ ३३६ प्रियदुहितरमेनां नाथवंशाम्बरेन्दोरयमनुनयति स्म स्पष्टसौभाग्यलक्ष्मीः । ज्वलितमहसमन्यां वीरलक्ष्मीं च कीर्तिम् । कथयति नयनीतिप्रातिभज्ञानमुच्चैः ॥ ३३७ एतत्पुण्यमयं सुरूप महिमा सौभाग्यलक्ष्मीरियम् । जातोऽस्मिञ्जनकः स योऽस्य जनिका सेवास्य या सुप्रजा ॥ पूज्योऽयं जगदेकमङ्गलमणिश्चूलामणिः श्रीभृतामित्युक्तिर्जयभाक्जयं प्रतिजनजतोत्सवैर्जल्पिता ॥ ३३८ (५४९ आपल्या दैदीप्यमान कान्तीच्या प्रसाराने ज्याने पद्मांचा - दिनविकासी कमलांचा व पद्मचा- लक्ष्मीचा विकास केला आहे, असा उदयाला प्राप्त होऊन ज्याने परभाव - नक्षत्राच्या व पर शत्रूंच्या प्रभावाचे सामर्थ्याचा नाश केला आहे, जो आपले बन्धु-भाऊ वगैरे व प्रजाजन हेच कोणी कुमुद - रात्रिविकासी कमळे त्याना प्रफुल्ल करणारा, त्याना हर्ष देणारा, ज्याची कान्ति अचिन्त्य आहे, अपार आहे असा हा जयकुमार सूर्य व चन्द्र या दोघांचाही पराभव करून विजयी झाला आहे, शोभत आहे ।। ३३६ ॥ ज्याची सौभाग्यरूपी लक्ष्मी अतिशय स्पष्ट उदयाला आली आहे अशा या जयकुमाराने नाथवंशरूपी आकाशाला प्रकाशित करण्यास जो चन्द्र आहे अशा अकम्पनराजाच्या प्रिय कन्येशी-सुलोचनेशी आपला विवाह करून घेतला आहे व हे ठीकच झाले कारण प्रतिभाशाली मनुष्याचे ज्ञान लोकाना असेच सांगते की अतिशय चमकणाऱ्या प्रतापाला धारण करणाऱ्या पुरुषासच अपूर्व वीरलक्ष्मी व कीर्ति प्राप्त होत असते ।। ३३७ ।। त्यावेळी ज्याना आनन्द वाटला अशा लोकानी जयकुमाराला जो विजय प्राप्त झाला - त्याविषयी असे उद्गार काढले - या जगात हेच पुण्य आहे व हीच उत्तमरूपाची महिमा आहे व हीच पुण्यलक्ष्मी आहे. ज्याच्या पोटी हा जन्मला तोच खरोखर श्रेष्ठ पिता होय व जिने याला जन्म दिला तीच खरोखर जिची संतति उत्तम निपजली अशी माता होय. अर्थात् या चांगल्या पुत्राची माता ती झाली असे आम्ही म्हणतो व हाच लक्ष्मीवान् पुरुषामध्ये चूडामणि जन्मला व जगाचे कल्याण करणारा हाच एक अपूर्व रत्न आहे व हाच जयकुमार सर्वाना पूज्य आहे. अशी त्या जयकुमाराचा उत्कर्ष दाखविणारी वाणी ज्याना अत्यंत हर्ष झाला अशा त्या लोकानी जयकुमाराबद्दल उच्चारली ।। ३३८ ।। Page #561 -------------------------------------------------------------------------- ________________ ४३-३३९) महापुराण कुवलयपरिबोधं सन्दधानः समन्तात् । सततविततदीप्तिः सुप्रतिष्ठः प्रसन्नः। परिणतनिजशौर्येणार्कमाक्रम्य दिक्षु । प्रथितपृथुलकोा वर्धमानो जयः स्तात् ॥ ३३९ इति समुपगताश्रीः सर्वकल्याणभाजम् । जिनपतिमतभाक्त्वात्पुण्यभाजं जयं तम् । तदुरुकृपमुपाध्वं हे बुधाःश्रद्दधानाः । परमजिनपदाब्जद्वन्द्वमद्वन्द्ववृत्त्या ॥ ३४० इत्याचे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे सुलोचनास्वयंवरमालारोपणकल्याणं नाम त्रिचत्वारिंशत्तमं पर्व। ___ चोहीकडे कुवलयांना-कमलाना व भूमंडलाना विकसित करणारा, समृद्ध करणारा, ज्याची कान्ति सतत पसरली आहे, ज्याची प्रतिष्ठा निर्दोष आहे व जो नेहमी प्रसन्न आहे, ज्याने वाढलेल्या आपल्या शौर्याने सूर्यावरही आक्रमण केले आहे, जो सर्व दिशात पसरलेल्या मोठया कीर्तीने उत्तरोत्तर उत्कर्षवान् झाला आहे असा तो जयकुमार दीर्घकाल नांदो ॥३३९ ।। जिनेश्वराच्या मताला दृढ धारण केल्यामुळे जो पुण्यवान् झाला आहे व सर्व कल्याणांना पात्र झाला आहे अशा या जयकुमाराला याप्रमाणे लक्ष्मीची प्राप्ति झाली म्हणून जिनमतावर श्रद्धान करणान्या हे विद्वज्जनहो, तुम्ही निःसंशय अन्तःकरणाच्या प्रवृत्तीने ज्याची महादया आहे अशा श्रीजिनेश्वराच्या चरणकमलाला शरण जा ॥ ३४० ।। याप्रमाणे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीत अर्षत्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहाच्या मराठी अनुवादांत सुलोचनेने स्वयंवरमाला जयकुमाराच्या गळ्यात घातली या कल्याणकारक कथेचे वर्णन करणारे हे त्रेचाळिसावे पर्व समाप्त झाले. Page #562 -------------------------------------------------------------------------- ________________ चतुश्चत्वारिंशत्तमं पर्व । अथ दुर्मषंणो नाम दुष्टस्तस्यासहिष्णुकः । सर्वानुद्दीपयन्पापी सोऽर्ककीर्त्यनुजीवकः ॥ १ अकम्पनः खलु क्षुद्रो वृथैश्वर्यमदोद्धतः । मृषा युष्मान्समाहूय श्लापमानः स्वसम्पदम् ॥ २ पूर्वमेव समालोक्य मालामासञ्जयज्जये । पराभूति विधित्सुर्वः स्थायिनीमायुगान्तरम् ॥ ३ इति अवाणः सप्प्राप्य सवीडं चक्रिणः सुतम् । इह षट्खण्डरत्नानां स्वामिनौ त्वं पिता च ते ॥४ रत्नं रत्नेषु कन्यैव तत्राप्येषैव कन्यका । तत्त्वां स्वगृहमानीय दौष्टयं पश्यास्य दुर्मतेः॥५ जयो नामात्र कस्तस्मै दत्तवान्मृत्युचोदितः । तेनागतोऽस्मि दौर्वृत्यं तदेतत्सोढुमक्षमः ॥ ६ प्रकृतोऽपि न सोढव्यः प्राकृतैरपि कि पुनः । त्वादृशैः स्त्रीसमुद्भूतो मानभङ्गो मनस्विभिः ॥ ७ तदा दिश दिशाम्यस्मै पदं वैवस्वतास्पदम् । दिशाम्यादेशमात्रेण समालां तेऽपि कन्यकाम् ॥८ ................. यानंतर जयकुमाराला सुलोचनेने वरल्यानन्तर पुढील वृत्त घडले- अर्ककीतीचा दुर्मर्षण नांवाचा एक दुष्ट व जयकुमाराचा उत्कर्ष न सहन करणारा पापी नोकर होता. त्याने सर्व राजाना भडकावले ॥ १ ॥ हा अकम्पन राजा क्षुद्रविचाराचा आहे व ऐश्वर्याच्या गर्वाने उद्धत बनला आहे. आपल्या संपत्तीची प्रशंसा करून तुम्हाला व्यर्थ ही त्याने बोलाविले आहे ॥ २॥ तुम्हा सर्वांचा दुसऱ्या युगापर्यन्त अपमान व्हावा असा त्याने प्रथमच विचार ठरविला होता व पूर्वीच विचार करून सुलोचनेकडून जयकुमाराच्या गळ्यात त्याने माला घालविण्याचा बेत केला होता ॥ ३ ॥ असे बोलून लज्जित झालेल्या चक्रवर्तीच्या मुलाकडे तो आला व त्यास म्हणाला की, हे अर्ककीर्ते तूं आणि तुझे वडील असे आपण दोघे येथे षट्खंडातील असलेल्या सर्व रत्नांचे स्वामी आहात ॥ ४ ॥ रत्नामध्ये कन्या ही रत्न व त्यातही ही सुलोचना कन्याच रत्न आहे. पण हे प्रभो, आपणास घरी बोलावन ही कन्या आपणास त्याने दिली नाही. हा याच्या दुर्मतीचाही दुष्टपणा पाहावा ॥ ५ ॥ __ या जयकुमाराची काय योग्यता आहे ? तो एक क्षुल्लक मनुष्य आहे पण मृत्यूने ज्याला प्रेरिले आहे अशा या अकम्पनाने त्याला आपली मुलगी दिली आहे. त्याचा हा दुष्टपणा मला सहन झाला नाही म्हणून मी आपणाकडे आलो आहे ॥ ६ ॥ जर क्षद्र लोक लहानसा देखिल मानभङ्ग सहन करीत नाहीत तर तुमच्यासारख्या स्वाभिमान्यानी हा स्त्रीपासून उत्पन्न झालेला मानभङ्ग कसा सहन करावा ? ॥ ७ ॥ म्हणून हे प्रभो, मला आपण आज्ञा द्या, मी आपल्या फक्त आज्ञेनेच या अकम्पन राजाला वैवस्वताचे स्थान - यमाचे स्थान दाखवितो व मालेसहित ही कन्या आपल्यासाठी मी देऊ शकेन ॥ ८॥ Page #563 -------------------------------------------------------------------------- ________________ ५५२) महापुराण इत्यसाध्वी ऋधं भर्तुः स्ववाचैवासृजत्खलः । सदसत्कार्यनिवृत्तौ शक्तिः सदसतोः क्षमा ॥९ तद्वचःपवनप्रौढक्रोधधूमध्वजारुणः । भ्रमद्विकोचनाङ्गारः क्रुधाग्निसुरसन्निभः ॥ १० उज्जगार ज्वलत्स्थूलविस्फुलिङ्गोपमा गिरः । अर्ककोतिद्विषोऽशेषान्दिधक्षुरिव वाचया ॥ ११ मामधिक्षिप्य कन्येयं येन दत्ता दुरात्मना । तेन प्रागेव मूढेन दत्तः स्वस्मै जलाञ्जलिः ॥ १२ अतिक्रान्ते रथे तस्मिन्प्रोत्थितः क्रोधपावकः । तदैव किन्तु कोदाह्य इत्यजानन्नहं स्थितः ॥ १३ नाम्नातिसन्धितो मूढो मन्यते स्वमकम्पनम् । वृद्ध मयि न वेत्तीति कम्पते सधराधरा ॥ १४ मत्खड्गवारिधाराभिरास्तां तावदगोचरः। संहरत्यखिलाशत्रून्बलवेलैव हेलया ॥ १५ प्ररूढशुष्कनाथेन्दुदुवंशविपुलाटवी । मत्क्रोधप्रस्फुरद्वह्निभस्मितास्मिन्न रोक्ष्यति ॥ १६ याप्रमाणे या दुष्टाने आपल्या भाषणानेच स्वामीच्या मनात- अर्ककीर्तीच्या मनात अयोग्य असा क्रोध उत्पन्न केला. बरोबरच आहे की, चांगले व वाईट कार्य करण्यासाठी सज्जन व दुर्जनामध्ये शक्ति समर्थ असते ॥ ९॥ त्या दुष्ट दुर्मर्षणाच्या भाषणरूप वाऱ्याने अतिशय वाढलेल्या क्रोधरूपी अग्नीने जो लालबुंद झाला आहे व ज्याचे नेत्ररूपी निखारे फिरत आहेत व जो क्रोधामुळे अग्निकुमारासारखा दिसत आहे व आपल्या वाणीने सर्व शत्रूना जणु जाळण्याची इच्छा करीत आहे असा तो अर्ककीति-भरतेश्वरपुत्र जळजळित अग्नीच्या मोठ्या ठिणग्यांची ज्याला उपमा आहे असे भाषण करू लागला ।। १०-११ ।। माझा अपमान करून ज्या दुष्टाने ( अकम्पनराजाने) ही कन्या त्या कुमाराला दिली त्या मुर्खाने पूर्वीच स्वतःला जलाञ्जलि ( मरणानंतर उत्तरक्रियेत पाण्याची ओंजळ ) अर्पण केली आहे ॥ १२॥ तो रथ जेव्हा मला ओलांडून पुढे गेला तेव्हाच माझ्या ठिकाणी क्रोधाग्नि उत्पन्न झाला परन्तु याच्याद्वारे कोणाला जाळावयाचे हे न समजल्याने मी स्वस्थ बसलो आहे ॥ १३ ॥ अकम्पन या नांवाने हा मूर्ख राजा फसवला गेला आहे व स्वतः मी अकम्पन-भयाने न कापणारा असे समजत आहे. परंतु मी रागावलो असता पर्वतासहित असलेली ही धरा-पृथ्वीही कंपित होते हे हा मूर्ख राजा समजत नाही ॥ १४ ।। माझ्या तरवाररूपी पाण्याच्या धारेचा हा राजा विषय होणे दूरच राहो. पण माझी सेनारूपी पाण्याची लाटच सगळ्या शत्रूचा अनायासे नाश करून टाकील ॥ १५ ॥ वाढलेले जे नाथवंश व चन्द्रवंश (सोमप्रभराजाचा वंश) हेच जणु दुष्ट वेळूचे वाळलेले मोठे जंगल ते माझ्या क्रोधाच्या चमकणान्या अग्नीने जळून भस्म होईल व पुनः ते कधीही उगवणार नाही ॥ १६ ॥ Page #564 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-२४) महापुराण (५५३ वीरपट्टस्तदा सोढो भवो भर्तुर्भयान्मया । कथमद्य सहे मालां सर्वसौभाग्यलोपिनीम् ॥ १७ सद्यशः कुसुमम्लानमालेवास्त्वायुगावधि । जयलक्ष्म्या सहायैतां हरेयं जयवक्षसः॥ १८ जलदान्पेलवाञ्जित्वा मरुन्मात्रविलायिनः । अद्य पश्यामि दृप्तस्य जयस्य जयमाहवे ॥ १९ इति निभिन्नमर्यादा कार्याकार्यविमढधीः । अनिवार्यो विनिजित्य कालान्तजलधिध्वनिम । अनलस्यानिलो वास्य साहाय्यमगमंस्तदा । केऽपि पापक्रियारम्भे सुलभाः सामवायिकाः ॥ २१ तदा सर्वोपधाशुद्धो मन्त्री जनपवादिभिः । अनवद्यमति म लक्षितो मन्त्रिलक्षणः ॥ २२ धर्म्यमर्थ्य यशःसारं ससौष्ठवमनिष्ठुरम् । सुविचार्य वचो न्याय्यं पथ्यं प्रोक्तुं प्रचक्रमे ॥ २३ मही व्योम शशी सूर्यः सरिदीशोऽनिलोऽनलः । त्वं त्वपिता घनाःकालो जगत् क्षेमविधायिनः ॥२४ पूर्वी पृथ्वीचे स्वामी अशा माझ्या पित्याच्या भयाने मी या जयकुमाराला बांधलेला वीरपट्ट सहन केला पण माझ्या सर्वसौभाग्याचा नाश करणारी ही माला आज मी कशी सहन करू शकेन बरे ? ॥ १७ ॥ फुलांच्या टवटवीत मालेप्रमाणे माझे हे यश युगाच्या शेवटापर्यन्त राहो. आज मी या जयकुमाराच्या वक्षःस्थानापासून त्याच्या जयलक्ष्मीबरोबर या मालेचे हरण करतो ॥ १८ ॥ केवळ वाऱ्यानेही वितळून जाणाऱ्या या कोमल मेघाना जिंकून हा जयकुमार गर्विष्ठ झाला आहे, आज मी युद्धात याचा कसा जय होतो ते पाहतो ॥ १९ ॥ तो अर्ककीति ज्याने मर्यादा सोडली आहे असा झाला, कार्य व अकार्य कोणते याचा निर्णय करण्यास त्याची बुद्धि असमर्थ झाली व त्याचे निवारण करणे अशक्य झाले. त्याने कल्पान्तकालाच्या समुद्राच्या ध्वनीला आपल्या गंभीरस्वराने जिंकले ।। २० ।। अग्नीला जसा वारा सहाय करतो तसे त्याला कित्येक राजानी साहाय्य केले. बरोबरच आहे की, वाईट कार्य करण्याला साहाय्य करणारे कोणीही सहज मिळतात ।। २१ ॥ त्यावेळी धर्म, अर्थ, काम आदि पुरुषार्थाचे शुद्ध सेवन करणारा अर्थात् धार्मिक न्याय्य आचरण करणारा, उत्तम देशात जन्मलेला, राजमान्य व लोकमान्य व मंत्र्याच्या लक्षणानी युक्त, अनवद्यमति या नांवाचा मंत्री अर्ककीर्तीकडे आला व त्याने याप्रमाणे उपदेश केला ॥ २२ ॥ __ त्याचे भाषण धर्मानुकूल, अर्थपूर्ण, कीर्तीचे सारभूत, उत्तम, कठोरतारहित, निष्ठुरतारहित, न्यायाला-नीतीला अनुसरणारे, पथ्य असे होते. अर्थात् वरील गुणानी युक्त असे भाषण करावयाला त्याने सुरुवात केली ॥ २३ ॥ हे युवराज, पृथ्वी, आकाश, चंद्र, सूर्य, नद्यांचा पति- समुद्र, वायु, अग्नि, तू व तुझा पिता भरतचक्री, मेघ, काल हे सर्व पदार्थ जगाचे हित-कल्याण करणारे आहेत ॥ २४ ॥ म. ७० Page #565 -------------------------------------------------------------------------- ________________ ५५४) महापुराण (४४-२५ विपर्यासे विपर्येति भवतामनुवर्तनात् । वर्तते सृष्टिरेषा हि व्यक्तं युष्मासु तिष्ठते ॥ २५ गुणाः क्षमादयः सर्वे ध्यस्तास्तेषु क्षमादिषु । समस्तास्ते जगवृद्धौ चक्रिणि त्वयि च स्थिताः ॥२६ च्यवन्ते स्वस्थितेः काले क्वचित्तेऽपि क्षमादयः। न स कालोऽस्ति यः कर्ता प्रच्युतेर्युवयोः स्थितेः॥२७ सृष्टिः पितामहेनेयं सृष्टतां तत्समपिताम् । पाति सम्राट् पिता तेद्य तस्यास्त्वमनुपालकः ॥ २८ देवमानुषबाधाभ्यः क्षतिः कस्यापि या क्षितौ । ममैवेयमिति स्मृत्वा समाधेया त्वयैव सा ॥ २९ क्षतात्रायत इत्यासीत्क्षत्रोऽयं भरतेश्वरः । सुतस्तस्यौरसो ज्येष्ठः क्षत्रियस्त्वं तदादिमः ॥ ३० त्वत्तो न्यायाः प्रवर्तन्ते नूतना ये पुरातनाः । तेऽपि त्वत्पालिता एव भवन्त्यत्र पुरातनाः ॥ ३१ सनातनोऽस्ति मार्गोऽयं श्रुतिस्मृतिषु भाषितः । विवाहविषिभेदेषु वरिष्ठो हि स्वयंवरः ॥ ३२ यदि स्यात्सर्वसम्प्रार्थ्या कन्यका पुण्यभाजनम् । अविरोधो व्यधाय्यत्र देवायत्तो विषिर्बुधः ॥ ३३ हे युवराज, तुमच्यात विपर्यास-बिघाड झाला म्हणजे या सृष्टीतही बिघाड होतो. सुम्ही अनुकूल वागू लागलात म्हणजे ही सृष्टि सुस्थितीत राहते. कारण ही तुमच्यावर अवलम्बून आहे ॥ २५ ॥ पृथ्वी, आकाश, चंद्र, सूर्य इत्यादिकामध्ये क्षमादिकगुण निरनिराळे रूपाने राहिले आहेत. म्हणजे एकेक ठिकाणी एकेक गुण राहिला आहे. पण या जगाचे कल्याणाकरिता ते क्षमादिक सगळे गुण तुझा पिता आणि तुझ्या ठिकाणी राहिले आहेत ॥ २६ ।। एखादेवेळी ते क्षमादिक गुणही आपल्या स्थितीपासून भ्रष्ट होतात परंतु तो काल यावेळी नाही जो की तुम्हा दोघांच्या स्थितीचा नाश करणारा होईल. यास्तव आपण क्षमादिक गुण सोडू नयेत ॥ २७ ॥ हे युवराज, तुझ्या आजोबानी या सृष्टीची रचना केली आहे व ती त्यानी तुझ्या पित्याला दिली आहे. आज तुझा पिता सम्राट् आहे व तो तिचे पालन करीत आहे. यानन्तर तू तिचा रक्षणकर्ता होशील ।। २८ ।। या पृथ्वीवर जर देवापासून किंवा मनुष्यापासून बाधा होऊन कोणाचे नुकसान झाले तर ते माझेच झाले असे समजून त्याचा प्रतीकार केला पाहिजे ॥२९॥ हा भरतराजा प्रजेचे क्षतात्-संकटापासून त्रायते रक्षण करतो म्हणून तो क्षत्र आहे व तू त्याचा औरस व ज्येष्ठ पुत्र आहेस. म्हणून तू पहिला क्षत्रिय आहेस ।। ३० ।। हे युवराज, तुझ्यापासूनच हे नवीन न्याय चालू होणार आहेत आणि जे प्राचीन न्यायनीतिमार्ग आहेत ते सर्व तू राखलेस तर ते पुरातन म्हणून- प्राचीन म्हणून राहतील ॥ ३१ ॥ विवाहविधीचे जे भेद आहेत त्यात स्वयंवर हा विवाहभेद सर्वश्रेष्ठ आहे आणि तो आगमात व स्मृतीमथ्ये सांगितला आहे म्हणून हा सनातन आहे ॥ ३२ ।। . जर एखाद्या पुण्यपात्र कन्येला सर्व इच्छू लागले तर विद्वान् लोकानी त्यावेळी विरोध दूर करण्याकरिता केवळ भाग्याधीन हा स्वयंवरविधि मानला आहे ॥ ३३ ॥ Page #566 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-४१) महापुराण (५५५ मध्येमहाकुलीनेष कञ्चिदेकं समीप्सितम् । सलक्ष्मीकमलक्ष्मीकं गुणिनं गुणदुर्गतम् ॥ ३४ विरूपं रूपिणं चापि वृणीतेऽसौविषेर्वशात् । न तत्र मत्सरः कार्यः शेषैायोऽयमीदृशः ॥ ३५ लङध्यते यदि केनापि न्यायो रक्ष्यस्त्वयैव सः । नेदं तवोचितं क्वापि पाता स्यात्परिपन्थकः ॥३६ भवत्कुलाचलस्योभौ नाथसोमान्वयौ पुरा । मेरोनिषधनीलौ वा सत्पक्षौ पुरुणा कृतौ ॥३७ सकलक्षत्रियज्येष्ठः पूज्योयं राजराजवत् । अकम्पनमहाराजो राजेव ज्योतिषां गणः ॥ ३८ निविशेषं पुरोरेनं मन्यते भरतेश्वरः । पूज्यातिलङ्घनं प्राहुरुभयत्राशुभावहम् ॥ ३९ पश्य तादृश एवात्र सोमवंशोऽपि कथ्यते । धर्मतीथं भवद्वंशाहानतीथं ततो यतः ॥ ४० . पुरःसरणमात्रेण श्लाघ्यं चक्रं विशां विभोः । प्रायो दुःसाध्यसंसिद्धौ श्लाघते जयमेव सः ॥ ४१ .......................................... ती स्वयंवरकन्या महाकुलीन घराण्यात उत्पन्न झालेल्या सधनाला किंवा निर्धनाला जो तिला पसंत वाटला त्याला वरील. तो पसंत पडलेला वर गुणी किंवा गुणरहित, विरूप किंवा सुरूप-सुंदर अशा त्या व्यक्तीला कर्मवंश होऊन वरील, त्यावेळी बाकीच्या लोकानी मत्सर करू नये. असा हा न्याय आहे ।। ३४-३५ ॥ जर कोणी या नीतीचे उल्लंघन करील तर त्यावेळी या न्यायाचे रक्षण हे युवराजा तू केले पाहिजे. म्हणून यावेळी विरोध करणे तुला योग्य नाही. कारण तू न्यायाचा रक्षक आहेस, तू त्याचा शत्रू होऊ नकोस ॥ ३६ ॥ ___ ज्याप्रमाणे मेरुपर्वताला निषध व नील हे दोन पर्वत पक्ष आहेत- सहायक आहेत त्याप्रमाणे तुझ्या कुलरूपी पर्वताला नाथवंश व सोमवंश हे दोन वंश आदिभगवंतानी पक्षसहायक बनविले आहेत ।। ३७ ॥ जसे नक्षत्र तारका आदिकानी चंद्र हा पूज्य मानला आहे तसा हा अकम्पन महाराजा राजराजभरताप्रमाणे पूज्य आहे कारण हा भरताप्रमाणे सर्व क्षत्रियात ज्येष्ठ व पूज्य आहे ॥ ३८ ॥ तुझा पिता भरत या अकम्पनराजाला आदिभगवंतापेक्षा निराळेपणा मानीत नाही. म्हणून पूज्य व्यक्तीचा अतिक्रम-अपमान करणे, त्याना पूज्य न मानणे हे इहपरलोकी अकल्याण करणारे होते ॥ ३९ ॥ ___ याचप्रमाणे सोमवंश देखिल तसाच तितक्याच योग्यतेचा आहे असे सांगितले जाते. तुमच्या वंशातून धर्मतीर्थाची उत्पत्ति झाली तशी या सोमवंशापासून दानतीर्थाची उत्पत्ति झाली आहे ॥ ४० ॥ राजांचा प्रभु अशा भरतेश्वराचे हे चक्ररत्न पुढे गमन करण्याने मात्र प्रशंसनीय मानले जात आहे. पण दुःसाध्य कार्य सिद्ध करण्याच्या कामी भरतमहाराज हे जयकुमारालाच प्रायः प्रशंसनीय समजतात ॥ ४१ ॥ Page #567 -------------------------------------------------------------------------- ________________ ५५६) महापुराण (४४-४२ एतस्य दिग्जये सर्वदृष्टमेवेह पौरुषम् । अनेन यः कृतः प्रेषः स्मर्तव्यो ननु स त्वया ॥ ४२ ज्ञात्वा सम्भाव्यशौर्योऽपि स मान्यो भर्तृभिर्भटः। दृष्टसारः स्वसाध्यर्थे साषितार्थः किमुच्यते॥४३ विना चक्राद्विना रत्न ग्येयं श्रीस्त्वया तदा । जयात्ते मानुषी सिद्धिर्दैवी पुण्योदयाद्यथा ॥ ४४ तृणकल्पोऽपि संवाह्यस्तव नीतिरिर्य कथम् । नाथेन्दुवंशावुच्छेद्यौ लक्ष्म्याः साक्षाद्भुजायितौ ॥४५ बन्धभृत्यक्षयाभूयस्तुभ्यं चयपि कुप्यति । अधर्मश्चायुगस्थायी त्वया स्यात्सम्प्रवर्तितः ॥ ४६ परदाराभिमर्शस्य प्राथम्यं मा वृथा कृथाः । अवश्यमाहृताप्येषा न कन्या ते भविष्यसि ॥ ४७ सप्रतापं यशःस्थास्नु जयस्य स्यादहर्यथा । तव रात्रिरिवाकीतिः स्थायिन्यत्र मलीमसा ॥ ४८ सर्वमेतन्ममैवेति मा मंस्थाः साधनं युधः । बहवोऽप्यत्र भूपालाः सन्ति तत्पक्षपातिनः ॥ ४९ दिग्जयाच्या वेळी या जयकुमाराचे सर्वांनी पौरुष-पराक्रम पाहिलेच आहेत. त्यावेळी या जयकुमाराने जी सैन्यरचना केली व जो पराक्रम केला त्याची आठवण हे युवराजा तू ठेवणे योग्य आहे ॥ ४२ ॥ __ ज्या भटाबद्दल हा शूर होईल असे राजाला वाटते त्याला देखिल राजाने मान दिला पाहिजे. मग ज्याचा पराक्रम सामर्थ्य पाहिले गेले आहे, स्वसाध्य पदार्थात ज्याचा पराक्रम पाहिला गेला आहे, ज्याने कठिण कार्य सिद्ध करून दिले आहे त्याच्याबद्दल तर काही बोलणे नकोच, त्याचा आदर केलाच पाहिजे ॥ ४३ ॥ ही लक्ष्मी त्यावेळी तुला चक्ररत्न, निधि आणि रत्नाशिवाय उपभोग घेण्याला योग्य होईल. ज्याप्रमाणे देवापासून होणारी तुझी इष्टसिद्धि तुझ्या पुण्योदयामुळे आहे त्याप्रमाणे मनुष्यापासून होणारी तुझी इष्टसिद्धि या जयकुमारापासून होणारी आहे ।। ४४ ।। गवतासारखा तुच्छ जीव देखील रक्षिला पाहिजे अशी नीति आहे. असे असता जे लक्ष्मीचे साक्षात् बाहुसारखे आहेत असे जे नाथवंश व चन्द्रवंश याना तू च्छेदून टाकण्यास योग्य समजत आहेस ही तुझी असली कशी विलक्षण नीति आहे ? ॥ ४५ ॥ कल्याणकारी अशा बंधु व नोकरांचा क्षय झाल्यामुळे चक्रवर्ती देखिल तुझ्यावर रागावेल आणि युगाच्या अन्तापर्यन्त तू हा अधर्ममार्ग चालू केला आहेस असे होईल ॥ ४६ ॥ परस्त्रीची अभिलाषा करण्याच्या कार्यात तू प्रथम क्रम मिळविण्याचा यत्न करू नकोस व या कन्येचे जरी तू हरण केलेस तरी ती तुझी होणार नाही ॥ ४७ ॥ पराक्रमाने युक्त व टिकावू असे जयकुमाराचे यश दिवसासारखे उज्ज्वल आहे व तुझी अकोति जी रात्रीप्रमाणे मळकट आहे ती मात्र चिरकाल टिकणारी होईल ॥ ४८ ॥ हे सर्व मलाच युद्धाचे साधन होतील असे समजू नकोस कारण येथे आलेले पुष्कळसे राजे जयकुमाराच्या पक्षाचे आहेत ।। ४९ ।। Page #568 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-५८) महापुराण (५५७ पुरुषार्थत्रयं पुम्भिर्दुष्प्रापं तत्त्वयाजितम् । न्यायमार्ग समुल्लजच्य वृथा तत्कि विनाशयः॥५० अकम्पनस्य सेनेशो जयः प्रागिव चक्रिणः । वीरलक्षम्यास्तुलारोहं मुधा स्वं किं विषास्यसि ।। ५१ नन न्यायेन बन्धोस्ते बन्धुपुत्री समागता । उत्सवे का पराभूतिरक्षमात्र पराभवः ॥ ५२ कन्यारत्नानि सन्त्येव बहून्यन्यानि भूभुजाम् । इह तानि सरत्नानि सर्वाण्यद्यानयामि ते ॥ ५३ इति नीतिलतावृद्धिविधाय्यपि वचःपयः । व्यधात्तच्चेतसः क्षोभं तप्ततैलस्य वा भृशम् ॥ ५४ सर्वमेतत्समाकर्ण्य बुद्धि कर्मानुसारिणीम् । स्पष्टयन्निव दुर्बुद्धिरिति प्रत्याह भारतीम् ॥ ५५ अस्ति स्वयंवरः पन्थाः परिणीतौ चिरन्तनः। पितामहकृतो मान्यो वयोज्येष्ठस्त्वकम्पनः ॥ ५६ किन्तु सोऽयं जयस्नेहात्तस्योत्कर्ष चिकीर्षुकः । स्वसुतायाश्च सौभाग्यप्रतीति प्रविधित्सुकः ॥५७ सर्वभूपालसन्दोहसमाविर्भावितोदयात् । स्वयं चक्रीयितुं चैव व्यधत्त कपटं शठः ॥ ५८ पुरुषानी मिळविण्यास कठिण असे धर्म, अर्थ व काम हे तीन पुरुषार्थ तू मिळविले आहेस व नीतिमार्गाचे उल्लंघन करून तू त्यांचा व्यर्थ का बरे नाश करीत आहेस? ॥ ५० ॥ हा जयकुमार पूर्वी भरतचक्रीचा सेनापति होता. आता तो अकम्पनराजाचा सेनापति झाला आहे. हे युवराज तू व्यर्थच वीरलक्ष्मीला तुलेवर आरोहण करावयास लावीत आहेस, अर्थात् या युद्धात तुला जय मिळणे शक्य नाही ॥५१॥ तुझे हित करणाऱ्या बंधूची म्हणजे अकम्पनराजाची कन्या तुझे ज्याने हित केले त्या जयकुमाराला या उत्सवात न्यायाने प्राप्त झाली आहे. यामुळे तुझा पराभव किंवा अपमान झाला कोठे? आता तूं जयकुमाराविषयी मत्सर करीत आहेस हा मात्र तुझा पराभव आहे ।। ५२ ।। इतर राजांच्याही पुष्कळ कन्यारत्ने आहेत येथे त्यांना रत्नांच्या नजराण्यासह आणतो त्यांचा तू स्वीकार कर ॥ ५३ ॥ याप्रमाणे नीतिलतेला वाढविणारे असेही त्याचे वचनरूपी जल तापलेले तेल ज्याने क्षोभ उत्पन्न करते तसे अर्ककीर्तीच्या मनाला त्याने अधिक क्षुब्ध केले ॥ ५४ ॥ हे सर्व मंत्र्याचे भाषण ऐकून बुद्धि ही पूर्वकर्माला अनुसरून उत्पन्न होते हे जणु स्पष्ट करणारा तो दुर्बुद्धि अर्ककीर्ति याप्रमाणे बोलू लागला ॥ ५५ ।। विवाहाकरिता माझ्या आजोबानी श्रीवृषभजिनेश्वरानी सांगितलेला स्वयंवर नांवाचा भेद प्राचीनकालापासून चालत आला आहे व हा अकम्पनराजाही वयाने वडील आहे हेहि मला मान्य आहे ॥ ५६ ॥ परन्तु हा अकम्पनराजा- जयकुमारावरील स्नेहामुळे त्याचा उत्कर्ष करण्याची इच्छा करीत आहे व आपल्या कन्येच्या सौभाग्याची प्रसिद्धि करावी अशी इच्छा करीत आहे व सर्व राजांचा समूह आपण एकत्र केला म्हणजे आपला उत्कर्ष वाढेल व आपण चक्रवर्ती होऊ असा या धर्त अकम्पनाने विचार केला व अशा रीतीने त्याने कपट केले आहे ।। ५७-५८ ॥ Page #569 -------------------------------------------------------------------------- ________________ ५५८) ( ४४-५९ प्राक् समर्थितमन्त्रेण प्रदायास्मै स्वचेतसा । कृतसङ्केतया माला सुतयारोपिता मृषा ॥ ५९ युगादौ कुलवृद्धेन मायेयं सम्प्रवर्तिता । मयाद्य यद्युपेक्षेत कल्पान्ते नैव वार्यते ॥ ६० न चक्रिणोऽपि कोपाय स्यादन्यायनिषेधनम् । प्रवर्तयत्यसौ दण्डं मय्यप्यन्यायवर्त्मनि ॥ ६१ जयोऽप्येनं समुत्सिक्तस्तत्पट्टेन च मालया । प्रतिस्वं लब्धरन्धो मां करोत्यारम्भकं पुरा ॥ ६२ समूलतुलमुच्छिद्य सर्वद्विषममुं युधि । अनुरागं जनिष्यामि राजन्यानां मयि स्थिरम् ॥ ६३ द्विधा भवतु वा मा वा बलं तेन किभाशुगाः । मालां प्रत्यानयिष्यन्ति जयवक्षो विभिद्य मे ॥ ६४ नाहं सुलोचनार्थ्यस्मि मत्सरी मच्छरैरयम् । परासुरधुनैव स्यात्कि मे विधवया तया ॥ ६५ दुराचारनिषेधेन त्रयं धर्मादि वर्धते । कारणे सति कार्यस्य कि हानिर्दृश्यते क्वचित् ॥ ६६ महापुराण या अकंपनाने पूर्वीच आपला विचार ठरवून ठेवला व आपल्या मनाने ह्या जयकुमाराला आपली कन्या द्यावी असा संकेत केला व मुलीकडून त्याच्या गळ्यात माळ त्याने घातली आहे असा हा लुच्चा आहे ।। ५९ ।। युगाच्या आरंभी ही माया कुलवृद्ध अशा अकम्पनाकडून चालवली गेली आहे व जर यावेळी उपेक्षा केली तर ती कल्पान्तींही नाहीशी केली जाणार नाही ॥ ६० ॥ यास्तव मी या अन्यायाचा नाश करीन व चक्रवर्ती देखिल माझ्या या कार्याने रागावणार नाही. पण मी जर अन्यायाच्या मार्गात प्रवृत्त झालो तर हा चक्रवर्ती माझ्यावरही दण्ड लादतो, मला देखील शिक्षा करतो ॥ ६१ ॥ भरतचक्रीने याच्या कपाळावर वीरपट्ट बांधल्यामुळे आणि सुलोचनेने याच्या गळयात माळा घातली म्हणून हा जयकुमार देखिल उन्मत्त झाला आहे व अशा रीतीची संधि मिळाल्यामुळे माझ्यावर देखिल हा कपटप्रयोग करीत आहे ।। ६२ ।। म्हणून सर्वांचा द्वेषी बनलेल्या याचा मी युद्धात मुळापासून नाश करून टाकणारा आहे व राजे लोकांचे माझ्यावर स्थिर प्रेम मी उत्पन्न करीन ॥ ६३ ॥ अशा वेळी सैन्य हे कांही त्या बाजूला व कांही माझ्या बाजूला होवो अथवा न होवो, माझे बाण त्या जयकुमाराचे वक्षस्थल फोडून ती माला परत आणून देतील ॥ ६४ ॥ मला त्या सुलोचनेची इच्छा नाही पण हा जयकुमार माझ्याविषयी मत्सर धारण करीत असल्यामुळे आताच लौकर माझ्या बाणानी मरण पावेल व अशा रीतीने विधवा बनलेल्या त्या सुलोचनेविषयी मला कांही करावयाचे नाही अर्थात् तिला मी आपलीशी करणार नाही ॥ ६५ ॥ तेव्हा अशा रीतीचा दुराचार मी नाहीसा करीन. त्यामुळे धर्म व कामपुरुषार्थ याची वाढ होईल. कारण कारणे सगळी मिळाल्यावर कोठे तरी कार्याचा नाश झाला आहे असे कोठेही आढळून येत नाही ॥ ६६ ॥ Page #570 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-७४) महापुराण (५५९ व्ययो मे विक्रमस्यास्तां शरस्याप्यत्र न व्ययः । वषे प्रत्युत धर्मः स्यादुष्टस्यांहः कुतो भवेत् ॥६७ कोतिविख्यातकीर्तेर्मे नार्ककीर्तेविनंक्ष्यति । अकोतिरनिवार्या स्यादग्यायस्यानिषेधनात् ॥ ६८ तस्य मे यशसः कोर्तेर्भवद्भिर्ययुदाहृतम् । भवेत्तत्सत्यसंवादि शीतकोऽस्म्यत्र यद्यहम् ॥ ६९ यूयमाध्वं ततस्तूष्णीमुष्णकोऽहमिदं प्रति । धर्नामर्थ्य यशस्यं च मा निषेधि हितैषिभिः ॥७० एवं मन्त्रिणमुल्लडघ्य कुधीर्वादुम्रहाहितः । सेनापति समाहूय प्रत्यासन्नपराभवः ॥ ७१ कथयित्वा महीशानां सर्वेषां रणनिश्चयम् । भेरीमास्फालयामास जगत्त्रयभयप्रदाम् ॥ ७२ अनुभेरिरवं सद्यः प्रत्यावासं महीभुजाम् । नटद्भटभुजास्फोटचटुलारावनिष्ठुरः ॥ ७३ करिकण्ठस्फुटोद्घोषघण्टाटङ्कारभैरवः । जितकण्ठीरवारावहयहेषाबिभीषणः ॥ ७४ ----------- ......... __ या कार्यात पराक्रमाचा ध्यय - नाश तर व्हावयाचा नाही पण बाणांचाही होणार नाही आणि दुष्टांचा नाश करण्यात पाप कोठून होईल ? उलट धर्मच होईल ॥ ६७ ॥ ज्याची कीर्ति प्रसिद्ध आहे असा जो मी अर्ककीति आहे त्या माझ्या कीर्तीचा नाश बिलकुल व्हावयाचा नाही. उलट मी अन्यायाचा निषेध केला नाही तर अकीति होईल व तिचे निवारण मात्र करता यावयाचे नाही ॥ ६८ ॥ तुम्ही माझ्या कीर्तीचा नाश होईल व जयकुमाराची कीर्ति वाढेल याविषयी जे वर्णन केले त्याविषयी माझे म्हणणे असे आहे- जर मी या कार्याविषयी शीतल-थंड बसून राहीन तर तुमचे म्हणणे खरे होईल ।। ६९ ।। यास्तव तुम्ही स्वस्थ बसा. या कार्याबद्दल मी अतिशय सन्तप्त झालो आहे. कल्याण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकानी धर्माला अविरुद्धकार्य सिद्ध करून देणारे व यश वाढविणारे जे कार्य असते त्यात कधीही अडथळा आणू नये ॥ ७० ॥ याप्रमाणे तो कुबुद्धीचा अर्ककीति दुष्टपिशाचाने झपाटल्यासारखा झाला. त्याने मंत्र्याच्या वचनाला मानले नाही. ज्याची पराजय होण्याची वेळ जवळ आली आहे अशा त्याने मंत्र्याला जवळ बोलावले व सर्व राजाना युद्ध करण्याचा निश्चय कळविला आणि त्रैलोक्याला भीति उत्पन्न करणारा नगारा त्याने वाजविला ॥ ७१-७२ ॥ नगान्यांच्या शब्दाला अनुसरून राजाच्या प्रत्येक निवासाच्या स्थानी आनंदाने नाचणाऱ्या शूर पुरुषानी आपल्या बाहूंचे एकमेकावर ताडन केले अर्थात् त्यांनी आपले दंड थोपटले त्यामुळे जो तीव्र आवाज उत्पन्न झाला व नगाऱ्याच्या शब्दात त्यामुळे निष्ठुरता उत्पन्न झाली ॥ ७३ ।। हत्तीच्या कंठातून उत्पन्न होणारी गर्जना व घंटाचा टंकार यामुळे तो आवाज भीति उत्पन्न करणारा वाटला. याचप्रमाणे सिंहाच्या गर्जनेला जिंकणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळण्यानी नगाऱ्याच्या शब्दात भयानकपणा अधिकच उत्पन्न झाला ॥ ७४ ।। Page #571 -------------------------------------------------------------------------- ________________ ५६०) महापुराण चलद्धरिखुरोद्धट्टकठोरध्वाननिर्भरः । पदातिपद्धतिप्रोद्यभूरिभूरवभीवहः ॥ ७५ स्पन्दरस्यन्दनचक्रोत्थ पृथुचीत्कारभीकरः । धनुः सज्जीक्रिया सक्त गुणास्फालनकर्कशः ॥ ७६ प्रतिध्वनित दिग्भित्तिस्सर्वानकभयानकः । बलकोलाहलः कालमिवाह्नातुं समुद्यतः ॥ ७७ शिक्षिता बलिनः शूराः शूरारूढाः सकेतवः । गजाः समन्तात्सन्नाह्या प्राक्चेलुर चलोपमाः ॥ ७८ तुरङ्गमास्तरङ्गाभाः सङग्रामाब्धेः सवर्मकाः । अनुदन्ति नदन्तोऽयान् विक्रामन्तः समन्ततः ॥ ७९ सचक्रं धेहि संयोज्य सधुरं प्राजवाजिनः । इति सम्भ्रमिणोऽपप्तन् रथास्तदनु सध्वजाः ॥ ८० चण्डाः कोदण्डकुन्तासिप्रासचक्रादिभीकराः । यान्ति स्मानुरथं क्रुद्धा रुद्धविषकाः पदातयः ॥ ८१ मजं गजस्तदोद्घटच वाहो वाहं रथं रथः । पदातयश्च पादातं सम्भ्रमान्निर्ययुर्युधे ॥ ८२ (४४-७५ त्यावेळी चालणाऱ्या घोड्यांच्या टापांचा जमीनीवर आघात होऊन उत्पन्न झालेल्या कठोर ध्वनीनी तो नगाऱ्यांचा ध्वनि खूप मोठा झाला व पायदळ सैन्याच्या पायांच्या आघातानी उत्पन्न झालेले जमीनीचे शब्द त्यानी तो आवाज अधिक भीति उत्पन्न करणारा भासला ।। ७५ ।। चालणाऱ्या रथाच्या चाकापासून निघालेला जो मोठा करकर शब्द त्यानी नगाऱ्याच्या शब्दात अधिकच भीषणपणा उत्पन्न झाला. वीर पुरुषानी आपली धनुष्ये सज्ज केली तेव्हा त्यांच्या दोरीचा जो झणत्कार त्याने तो नगाऱ्यांचा ध्वनि फार कर्कश वाटू लागला ॥ ७६ ॥ दिशारूपी भिंतीना प्रतिध्वनि युक्त करणारे जे अनेक प्रकारच्या नगाऱ्यांचे आवाज त्यानी भयंकर वाटणारा, त्यात सैन्यांचा कोलाहल मिसळल्यामुळे जणु हा मोठा शब्द यमाला आव्हान देत आहे असा भास उत्पन्न झाला ।। ७७ ।। त्यावेळी शिकविलेले, बळकट, शूर व ज्यांच्यावर पुरुष बसलेले आहेत असे ध्वजयुक्त व युद्धासाठी तयार झालेले आणि पर्वतासारखे मोठे असे हत्ती प्रथमतः चालू लागले ॥ ७८ ॥ युद्धरूपी समुद्राच्या जणु लाटाप्रमाणे भासणारे व कवचाने सहित असे ते घोडे हत्तींच्या मागून खिंकाळत चोहीकडून जात होते ।। ७९ ।। चक्रसहित आणि जूनेसहित अशा रथाला घोडे जुंप व त्याना प्रेरणा कर. अशा रीतीने त्वरा करून सज्ज केलेले ध्वजसहित रथ त्या मागून चालू लागले ॥ ८० ॥ धनुष्ये, भाले, तरवारी, कटचार, पट्टा, चक्र वगैरे शस्त्रामुळे भयंकर वाटणारे, ज्यानी सर्व दिशा व्यापल्या आहेत असे पायदळ स्थाना अनुसरून जात होते ॥ ८१ ॥ त्यावेळी हत्ती हत्तीला, घोडा घोडयाला, रथ रथाला व पायदळ पायदळाला घासून गडबडीने युद्धाकरिता निघाले ॥ ८२ ॥ Page #572 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-९३) महापुराण (५६१ आरूढानेकपानेकभूपालपरिवारितः । भेरोनिष्ठुरनिर्घोषभीषिताशेषदिगद्विपः ॥ ८३ चक्रध्वजं समुत्थाप्य सम्यगाविष्कृतोन्नतिः । गजं विजयघोषाख्यमारुह्याद्रिवरोत्तमम् ॥ ८४ अर्ककोतिर्वहिर्भास्ववस्युद्यतभटावृतः । ज्योतिः कुलाचलैर्किश्चचालाभ्यचलाधिपम् ॥ ८५ किंवदन्ती विदित्वैतां भूयोभूत्वाकुलाकुलः । स्वालोचितं च कर्तव्यं विधिना क्रियतेऽन्यथा ॥८६ इति स्वसचिवैः सार्धमालोच्य च जयादिभिः। प्रत्यर्ककीय॑थादिक्षतं सम्प्राप्य सत्वरम् ॥ ८७ कुमार तव कि युक्तमेवं सीमातिलजनम् । प्रसीद प्रलयो दूरं तन्माकार्षोर्मषागमम् ।। ८८ इति सामादिभिः स्वोक्तैरशान्तमवगम्य तम् । प्रत्येत्य तत्तथा सर्वमाश्ववाजीगमन्नुपम् ॥ ८९ काशीराजस्तदाकर्ण्य विषादलिताशयः। महामोहाहितो वासीददुष्कार्ये को न मुह्यति ॥ ९० अत्र चिन्त्यं न वः किञ्चिन्यायस्तेनैव लडषितः । तिष्ठते हैव संरक्ष्य सुनियुक्ताः सुलोचनाम् ॥९१ इदानीमेव दुर्वृत्तं शृङ्खलालिङ्गनोत्सुकम् । शाखामृगमिवानेष्ये बद्ध्वा दारातिताथिनम् ॥ ९२ इत्यदीर्य जयो मेधकुमारविजयाजिताम् । मेघघोषाभिधां भेरी प्रष्ठेनास्फालयद्रुषा ॥ ९३ हत्तीवर बसलेले अनेक राजे अर्ककीर्तीच्या सभोवती होते. नगाऱ्यांच्या कठोर आवाजानी सर्व दिग्गजांना अर्ककीर्तीने घाबरे केले होते. मेरुपर्वताप्रमाणे श्रेष्ठ उत्तम अशा हत्तीवर चढून तो बसला होता. त्याने चक्रध्वज उंच उभा केला होता व त्यामुळे त्याने आपली उन्नति प्रकट केलेली होती. चमकणाऱ्या तरवारी ज्यांच्या हातात आहेत अशा वीरानी तो अर्ककीर्ति घेरलेला होता. जसा तेजस्वी सूर्य कुलाचलानी घेरलेल्या मेरुपर्वताकडे जातो तसा हा अर्ककीर्तिकुमार पृथ्वीपति अकम्पनराजाकडे निघाला ।। ८३-८५ ।। ही वार्ता ऐकून अकम्पनराजा पुनः अतिशय आकुल झाला " उत्तम विचाराने ठरविलेले कार्य दैव वेगळेच करून टाकते" असा आपल्या प्रधानमंडळीबरोबर व जयकुमार आदिकाबरोबर विचार करून अर्ककीर्तीकडे अकंपनराजाने सत्वर दूत पाठविला ।। ८६-८७ ॥ __तो दूत अर्ककीर्तीजवळ येऊन असे म्हणाला- "हे कुमारा, याप्रमाणे सीमेचे उल्लंघन करणे हे तुला योग्य वाटते कां ? हे कुमारा, प्रसन्न हो अद्यापि प्रलय फार दूर आहे म्हणून तू त्या आगमाला खोटे ठरवू नकोस ? याप्रमाणे सामादिकांच्या भाषणानी त्याला शान्त करण्याचा प्रयत्न केला पण तो अशान्तच झाला हे पाहून तो दूत परत आला व त्याने ही सर्व हकीकत शीघ्र अकम्पन राजाला कळविली ॥ ८८-८९॥ काशीच्या अकम्पन राजाने ती ऐकली. त्याच्या मनात विषाद-खेद उत्पन्न झाला. त्याचे मन अस्थिर झाले. जणु तो महामोहाने - मूर्छने युक्त झाला की काय असा दिसला. बरोबरच आहे की, वाईट कार्य पाहून कोणाला बरे दुःख वाटत नाही, खिन्नता वाटत नाही ? ।। ९० ।। . त्यावेळी जयकुमाराने याप्रमाणे भाषण केले- अहो काशीराज, आपण याविषयी काही चिन्ता करू नका. न्यायाचे उल्लंघन त्या अर्ककीर्तीकडूनच झाले आहे. आपण येथेच राहून सुलोचनेचे संरक्षण करा. मी आताच साखळीला आलिंगन करण्यात उत्सुक झालेल्या माकडाप्रमाणे त्या दुराचारी व परस्त्रीची अविचाराने अभिलाषा करणाऱ्या अर्ककीर्तीला बांधून आणतो असे जयकुमार बोलला व त्याने मेघकुमारदेवाना जिंकून त्याच्यापासून मिळविलेला मेघघोष नांवाचा नगारा आघाडीच्या मुख्य अधिकाऱ्याकडून वाजविला ॥ ९१-९३ ।। म. ७१ Page #573 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-९४ द्रोणादिप्रक्षयारम्भघनाघनघनध्वनिम् । तद्ध्वनिर्व्याप निर्जित्य विभिद्य हृदयं द्विषाम् ॥ ९४ तद्रवाकर्णनाद्धूणितार्णवप्रतिमे बले । अतिमालोत्सवोऽत्रासीदुत्सवो विजये यथा ।। ९५ तदोन्निकटप्रान्तप्रक्षरत्मदपायिनः । स्वमदनेव मातङ्गाः प्रोत्तुङ्गाः प्रोन्मदिष्णवः ।। ९६ सुस्वनन्तः खनन्तः खं वाजिनो वायुरंहसः । कृतोत्साहा रणोत्सहाद्रेजुस्तेजस्विता हि सा ॥ ९७ रथाः प्रागिव पर्यस्ताः पूर्णसर्वायुधा युधः । महावाहसमायुक्ताः प्रनृत्यकेतुबाहवः ॥ ९८ योषितोऽप्यभटायन्त पाटवात्संयुगं प्रति । तथा प्रतिबलं तत्र भूयांसो वा पदातयः ॥ ९९ वर्धमानो ध्वनिस्तुर्ये रणरङ्गे भविष्यतः । वीरलक्ष्मीप्रनृत्तस्य प्रोद्ययौ गुणयत्रिव ॥ १०० वनान्वयं वयः शिक्षालक्षणंर्वीक्ष्य विग्रहम् । सुधर्माणं सुवर्माणं कामवन्तं क्षरन्मदम् ॥ १०१ सामजं विजयार्द्धाख्यं विजयार्द्धमिवापरम् । बहुशो दृष्टसङ्ग्रामं गजध्वजविराजितम् ॥ १०२ अधिष्ठाय जयः सर्वसाधनेन सहानुजः । निर्जगाम युगप्रान्तकाललीलां विलङ्घयन् ॥ १०३ ५६२) महापुराण त्या नगाऱ्यांच्या शब्दाने द्रोण, काल, पुष्करावर्त वगैरे जे प्रलयकालचे मेघ त्यांची वृष्टि होण्याच्या वेळी होणारा जो गडगडाट त्यालाही जिंकले होते आणि त्याने शत्रूंची हृदये विदीर्ण केली ॥ ९४ ॥ त्या नगान्याचा आवाज ऐकून खवळलेल्या समुद्राप्रमाणे क्षुब्ध झालेल्या सैन्यता शत्रूला जिंकण्याने जसा आनन्द होता तसा आनंद झाला व सुलोचनेने जकुमाराच्या गळयात माला घातली त्यावेळी जो आनंद झाला होता त्याहीपेक्षा अधिक आनन्द यावेळी सैन्यात झाला ।। ९५ । त्यावेळी फुटलेल्या गण्डस्थलाच्या जवळच्या प्रदेशातून वाहणारे मदजल पिणारे असे अतिशय उंच हत्ती स्वतःच्याच मदानेच अतिशय उन्मत्त झाले ।। ९६ ।। याचप्रमाणे मधुर खिंकाळणारे आणि आकाशाला वर टापा करून जणु खणणारे, वायुप्रमाणे वेग ज्यांचा आहे असे उत्साही घोडे रणाच्या उत्साहामुळे फार शोभू लागले. बरोबरच आहे की त्यांचा उत्साह म्हणजे त्याची तेजस्विताच होय ।। ९७ ।। सर्व आयुधानी पूर्ण भरलेले, ज्याना मोठे घोडे जुंपलेले आहेत असे, ज्यांचे ध्वजरूपी बाहु नृत्य करीत आहेत असे रथ ज्याप्रमाणे मेघकुमारांना जिंकताना सर्व बाजूनी घेरून राहिले होते तसे आता यावेळी सर्व बाजूनी घेरून राहिले ।। ९८ ।। युद्ध करण्याचे नैपुण्य असल्यामुळे स्त्रिया देखिल वीर बनल्या होत्या. या जयकुमाराच्या सैन्यविभागात पुष्कळ पायदळ मोठे शूर होते ।। ९९ ।। युद्धरूपी रंगभूमीवर होणारे जे वीरलक्ष्मीचे नृत्य त्याला जणु वृद्धिंगत करणारा असा वाद्यांनी ध्वनि बाहेर येत होता ।। १०० ॥ यानंतर वनात उत्पन्न झालेला, वय, शिक्षण व चांगली लक्षणे धारण करणारा देह ज्याचा आहे असा, चांगल्या स्वभावाचा व उत्तम देहाचा, धारण करणारा इच्छानुकूल वागणारा, ज्याचा मद् गळत आहे, विजयार्धपर्वताप्रमाणे अतिशय उंच व शुभ्र ज्याचे विजयार्ध हे नांवही आहे, ज्याने अनेक युद्धे पाहिली आहेत असा, गजाच्या ध्वजाने जो शोभत आहे असा, अशा त्या विजयार्ध नामक हत्तीवर बसून जयकुमार सर्व सैन्यासह व आपल्या सर्वभावासह निघाला त्यावेळी युगान्त कालाच्या लीलेला जिंकणारा असा शोभत होता ।। १०१-१०३ ।। Page #574 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-११२) महापुराण कुर्वन्ती शान्तिपूजां त्वं तिष्ठ मात्रेति सादरम् । प्रवेश्य चैत्यधामाग्र्चं सुतां नित्यमनोहरम् ॥ १०४ समग्रबलसम्पत्त्या चचाल चलयन्निलाम् । अकम्प्रः कम्पितारातिः माकम्पनिरकम्पनः ॥ १०५ सुकेतुः सूर्यमित्राख्यः श्रीधरो जयवर्मणा । देवकोतिर्जयं जग्मुरिति भूपाः सुसाधनाः ॥ १०६ इमे मुकुटबद्धेषु पञ्च विख्यातकीर्तयः । परे च शूरा नाथेन्दुवंशगृह्याः समाययुः ॥ १०७ मेघप्रभश्च चण्डातिप्रभाव्याप्तवियत्तलः । विद्याबलोद्धतः सार्धमर्के विद्याधरैरगात् ॥ १०८ बलं विभज्य भूभागे विशाले सकलं समे । प्रकृत्य मकरव्यूह विरोधिबलघस्मरः ॥ १०९ उच्चजिता घनिर्यनिर्घोषभीषणम् । जितमेघस्वरो गजेन्रेजे मेघस्वरस्तदा ॥ ११० चक्रव्यूहविभक्त्यात्मभूरिसाधननध्यगः । अर्ककीर्तिश्च भाति स्म परिवेषाहितार्कवत् ॥ १११ क्रुद्धाः खे खेचराधीशाः सुनमिप्रमुखाः पृथक् । गरुडव्यूहमापाद्य तस्थुश्चक्रिसुताज्ञया ॥ ११२ बाळे सुलोचने, तू आपल्या आईबरोबर आदराने शान्तिपूजा करीत बस असे म्हणून तिला नित्यमनोहर नांवाच्या श्रेष्ठ जिनमंदिरात अकम्पन राजाने पाठविले आणि स्वतः अकंप राहून ज्याने शत्रूना थरथर कंपित केले आहे असा अकम्पनराजा आपल्या पुत्राला घेऊन लढाईला निघाला, आपल्या संपूर्ण सैन्याने पृथ्वीला कंपित करीत रणभूमीकडे निघाला ।। १०४-१०५ ॥ सुकेतु, सूर्यमित्र, श्रीधर, जयवर्मा आणि देवकीति हे राजे आपले उत्तम सैन्य घेऊन जयकुमाराकडे गेले. हे पाच राजे मुकुटबद्ध राजामध्ये प्रख्यात कीर्तीचे धारक होते आणि इतर अनेक शूर राजे देखिल नाथवंश व चंद्रवंशाचा पक्ष धरून लढण्यास आले ॥१०६-१०७।। आपल्या भयंकर तरवारीच्या कान्तीने ज्याने आकाशाचा तळभाग व्यापला आहे व जो विद्यांच्या सामर्थ्याने उद्धत आहे, असा मेघप्रभ नामक विद्याधरराजा सर्व विद्याधरराजापैकी निम्मे विद्याधर राजे घेऊन जयकुमाराकडे आला ॥ १०८ ॥ विरोधी राजांच्या सैन्याचा फन्ना उडविणारा, उत्कृष्ट वाद्यसमूहापासून निघणाऱ्या आवाजाप्रमाणे भयंकर गर्जना करणारा व ज्याने मेघांचा गडगडाट जिंकला आहे अशा जयकुमाराने विशाल व सपाट अशा जमिनीवर आपल्या सैन्याची विभागणी केली व मकर व्यूहाची-मगराच्या आकृतीप्रमाणे सैन्यरचना केली ॥ १०९-११० ॥ इकडे अर्ककीर्तीने आपल्या पुष्कळ सैन्याची चक्राप्रमाणे रचना केली व त्या चक्रव्यूहाच्या मध्यभागी तो ज्याच्या सभोवती खळे निर्माण झाले आहे अशा सूर्याप्रमाणे शोभू लागला आणि चक्रवर्तीचा पुत्र अशा अर्ककीर्तीच्या आज्ञेने जे सुनमि वगैरे विद्याधरराजे प्रमुख आहेत त्यानी आकाशात गरुडव्यूहाची रचना केली व त्या रचनेत ते वेगवेगळे राहिले ।। १११-११२ ॥ Page #575 -------------------------------------------------------------------------- ________________ ५६४) महापुराण (४४-११३ अष्टचन्द्राः खगाः ख्याताश्चक्रिणः परितः सुतम् । शरीररक्षकत्वेन भेजुर्विद्यामदोद्धताः ॥ ११३ अकालप्रलयारम्भजम्भिताम्भोदजितम् । निजित्य तूर्ण तूर्याणि दध्वनः सेनयोः समम् ॥ ११४ धानुष्कर्मार्गणः मार्गः समरस्य पुरःसरः । प्रवर्तयितुमारेभे घोरघोषैः सवल्गितम् ॥ ११५ सङग्रामनाटकारम्भसूत्रधारा धनुर्धराः । रणरङ्ग विशन्तिस्य गर्जत्तूर्यपूरःसरम् ॥ ११६ आबध्यस्थानकं पूर्व रणरङ्ग धनुर्धरैः । पुष्पाञ्जलिरिव व्यस्तो मुक्तः शितशरोत्करः ॥ ११७ तीक्ष्णा मण्यिभिघ्नन्तः पूर्व कलहकारिणः । पश्वात्प्रवेशिनः पश्चात्खलकल्पा धनुर्भूतः ॥ ११८ उभयोः पार्श्वयोबैदवा बाणधीकृतवल्गनाः । धन्विनः खेचराकारारेजराजौ जितश्रमाः ॥ ११९ भरतचक्रवर्तीच्या मुलाच्या-अर्ककीर्तीच्या सभोवती विद्यामदाने उद्धत्त झालेले प्रसिद्ध असे अष्टचन्द्र विद्याधर शरीररक्षक म्हणून उभे राहिले. अंगरक्षक म्हणून त्याची सेवा करू लागले ॥ ११३ ॥ अकाली प्रलय करण्याकरिता वाढलेल्या मेघाच्या गर्जनेला जिंकून दोन्ही सैन्यातील वाद्ये एकदम त्वरेने वाजू लागली ।। ११४ ॥ युद्धाच्या पुढे असलेले - पुढे पुढे जाणारे व भयंकर गर्जना करणारे अशा धनुर्धारी वीरानी आपल्या बाणांच्या द्वारे उसळी मारून पुढील मार्ग तयार केला. अर्थात् धनुर्धारी योद्धयानी बाणवृष्टि करून पुढील गर्दी हटविली आणि आपला पुढे सरकण्याचा रस्ता मोकळा केला ॥ ११५ ॥ युद्धरूपी नाटकाला आरंभिणारे जणु सूत्रधार अशा धनुर्धारी वीरानी गर्जना करणाऱ्या वाद्यांना पुढे करून युद्धाच्या रंगभूमीवर प्रवेश केला ।। ११६ ॥ धनुर्धारी पुरुष उभे राहण्याच्या पद्धतीप्रमाणे उभे राहिले रणरूपी रंगभूमीवर जो तीक्ष्ण बाणांचा समूह सोडला तो जणु पुष्पांजलीप्रमाणे चोहीकडे पसरला ॥ ११७ ॥ धनुष्यावर जोडलेले बाण नेहमी दुष्टाप्रमाणे वाटत होते. कारण दुष्ट माणसे तीक्ष्ण स्वभावाचे असतात तसे हे बाणही तीक्ष्ण - खूरधारेचे होते. दुष्ट जसे लोकांच्या मर्माला विद्ध करतात तसे हे तीक्ष्ण बाणही मर्मभेदन करीत होते. जसे दुष्ट लोक तंटा करतात तसे हे बाण देखील कलह करतात, क्रोधयुक्त करतात. जसे दुष्ट प्रथमतः मधुरवचन बोलून नंतर मनात घुसतात तसे हे बाणही सूं सूं असा शब्द करीत हृदयात घुसतात म्हणून धनुर्धारी खलकल्प-दुर्जनाप्रमाणे आहेत ॥ ११८ ॥ आपल्या पाठीच्या दोन्ही बाजूला बाणांचे भाते बांधून जे उड्या मारीत आहेत व ज्यानी परिश्रमाला जिंकले आहे असे धनुर्धारी लोक, त्या युद्धात पक्ष्याप्रमाणे शोभत होते ॥ ११९ ॥ Page #576 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-१२४) महापुराण (५६५ ऋजुत्वादूरदर्शित्वात्सद्यः कार्यप्रसाधनात् । शास्त्रमार्गानुसारित्वाच्छराः सुसचिवैः समाः ॥ १२० ऋव्यास्रपायिनः पत्रवाहिनी दूरपातिनः । लक्ष्येषूड्डीय तीक्ष्णास्याः खगाः पेतुः खगोपमाः ॥ १२१ धर्मेण गुणयुक्तेन प्रेरिता हृदयं गता । शूरान्शुद्धिरिवानषीदगति पत्रिपरम्परा ॥ १२२ पुंसां संस्पर्शमात्रेण हृद्गता रक्तवाहिनी । क्षिप्रं न्यमीलयनेत्रे वेश्येव विशिखावली ॥ १२३ त्यक्त्वेशं खेचरातातिवृष्टो गृध्रतमस्ततौ । परोऽन्विष्य शरावल्या जारयेव वशीकृतः ॥ १२४ ते बाण उत्तम मन्त्र्याप्रमाणे होते. उत्तम मंत्री ऋजु-सरळ मायाचाररहित तसे ते बाणही ऋजु सरळ होते. मंत्री दूरदर्शी असतात अर्थात् भावीकालाच्या गोष्टीना चांगले जाणतात तसे ते बाण दूरदर्शी- दूर जाऊन लक्ष्य भेदन करीत असत. मंत्री तत्काल शीघ्र कार्यसिद्धि करतात तसे बाणही दूर जाऊन शत्रुभेदन करतात. जसे मंत्री राजनीतीच्या शास्त्राला अनुसरून वागतात तसे ते बाण देखिल धनुर्विद्येला अनुसरून होते ॥ १२० ॥ मांस आणि रक्त पिणारे, (अर्थात् ज्याच्या अग्रभागाला रक्त व मांस लागले आहे असे, पंखाना धारण करणारे, बाणाच्या शेवटाला पक्षाचे पंख लावतात) जे दूर जाऊन पडतात, ज्यांची तोंडे तीक्ष्ण आहेत असे, खग-बाण खगोपम- पक्ष्याप्रमाणे उडून आपल्या लक्ष्यावर पडत असत ॥ १२१ ॥ जे गुणवान् अशा धर्माने युक्त आहेत, सर्वज्ञाने सांगितलेल्या धर्माने युक्त आहेत. दुसरा अर्थ- गुणयुक्त -दोरीने युक्त अशा धर्मेण -धनुष्याने सहित आहेत व त्या धनुष्याने ज्याना प्रेरणा केली आहे म्हणजे धनुष्यापासून सुटलेले व हृदयंगता-मनात शिरलेला दुसरा अर्थ वक्षःस्थलात घातलेली अशी पत्रिपरंपरा-बाणाची पंक्ति शूराना शुद्धीप्रमाणे स्वर्गास नेती झाली. युद्धातून पळून न जाता जो लढतो तो स्वर्गास जातो अर्थात् आपल्या शुद्ध परिणामानी मरण पावलेला वीरपुरुष स्वर्ग मिळवितो ॥ १२२ ॥ नुसता स्पर्श झाल्याबरोबर पुरुषांच्या (शत्रूच्या) हृद्गता हृदयतात - मनात दुसरा अर्थ उरात-छातीत शिरलेली व रक्तवाहिनी-प्रेम दाखविणारी दुसरा अर्थ रक्ताला वाहविणारी अशी ती बाणांची पंक्ति वेश्येप्रमाणे त्वरेने डोळे मिटावयास लावीत होती. वेश्या आपल्या स्पर्शाने होणाऱ्या आनन्दाने त्वरेने पुरुषाला डोळे मिटावयास लावते व ही बाणपंक्ति हृदयात शिरूम योद्धयाचे रक्त वाहविते व त्याला डोळे मिटावयास लावते अर्थात् बाणपंक्ति शिरून वीर मरण पावत होते ॥ १२३ ।। विद्याधरांच्या रक्तांची अतिशय वृष्टि होत असतां, जणु जारिणी स्त्रीप्रमाणे असलेल्या बाणपंक्तीने आपल्या स्वामीचा-पतीचा त्याग करून (जो बाण सोडतो तो त्या बाणपंक्तीचा स्वामी होय ) परपुरुष - जार दुसरा अर्थ शत्रु ) त्याला हुडकून वश केले. अर्थात् त्याला निश्चेष्ट केले ॥ १२४ ॥ Page #577 -------------------------------------------------------------------------- ________________ ५६६) महापुराण (४४-१२५ प्रगुणा मुष्टिसंवाह्या दूरं दृष्टयनुवर्तिनः । गत्वेष्टं साधयन्ति स्म सद्भत्या इव सायकाः ॥ १२५ प्रयोज्याभिमुखं तीक्ष्णान्बाणान्परशरान्प्रति । तत्रैव पातयन्ति स्म धानुष्काः सा हि घोषियाम्॥१२६ जाताश्चापधताः केचिदन्योन्यशरखण्डने । व्यापृताः श्लाषिताः पूर्व रणे किञ्चित्करोपमाः॥१२७ हस्त्यश्वरथपत्योघमुद्भिद्यास्पष्टलक्ष्यवत् । शरा:पेतुः स्वसम्पातमेवास्ता दृढमुष्टिभिः ॥ १२८ पूर्व विहितसन्धानाः स्थित्वा किञ्चिच्छरासने। यानमध्यास्य मध्यस्था द्वैधीभावमुपागताः ॥ १२९ विग्रहे हतशक्तित्वादगत्या शत्रुसंश्रयाः । बाणा गुणितषाड्गुण्या इव सिद्धि प्रपेदिरे ॥ १३० प्रगुण- चांगल्या धनुष्याच्या दोरीवर जोडलेले, मुष्टिसंवाह्य- मुठीत धरता येणारे व दृष्टयानुवर्ती ज्याच्यावर आपण दृष्टि लावली असेल तेथे जाणारे, असे बाण प्रगुण-गुणवान् मुष्टिसंवाह्य- मालकाने मुठी भरून दिलेल्या अन्नावर निर्वाह करणारे आणि दृष्टयनुवर्ती मालकाच्या नजरेकडे पाहून वागणारे अशा सद्गुणी सेवकाप्रमाणे दूरच्या प्रदेशात जाऊन आपल्या मालकाचे इच्छित कार्य ( शत्रूचा नाश करणे ) साधीत होते ।। १२५ ॥ धनुर्धारी वीर आपल्यासमोर असलेल्या शत्रूवर तीक्ष्ण बाण सोडीत असत आणि स्याचे बाण तेथेच पाडीत असत. हे योग्यच आहे कारण शत्रूची अशीच बुद्धि असावी लागते ।। १२६ ॥ ___ धनुष्याच्या दोरीवर जोडलेले व एकमेकांचे बाण तोडण्यामध्ये उपयोगात आणलेले आणि ते सोडण्याच्या पूर्वी ज्यांची प्रशंसा केली आहे असे ते बाण युद्धात सेवकाप्रमाणे आपले कार्य बजावित होते ॥ १२७ ।। ज्यांच्या मुठी बळकट आहेत अशा वीरपुरुषानी सोडलेले बाण वेगामुळे ज्यांचे लक्ष्य स्पष्ट दिसत नाही असे बाण हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ सैन्य यांच्या समूहाला भेदून म्हणजे यापैकी कशातही शिरून ते आपल्या पडावयाच्या योग्य लांबीवरच पडत असत. भावार्थ- त्या बाणात वेग इतका होता की मध्ये आलेल्या हत्ती वगैरेना विद्ध करून देखिल आपल्या वेगाना अनुसरून योग्य अशा अन्तरावर ते जाऊन पडत असत ॥ १२८ ॥ सन्धि, विग्रह आदिक सहा गुणानी राजे जसे स्वकार्य सिद्ध करतात तसे ते बाण देखिल संधि आदिक सहा गुणाना धारण करून सिद्धीला प्राप्त झाले होते. जसे राजे प्रथम सन्धि करतात तसे ते बाणही धनुष्याच्या दोरीशी प्रथम सन्धि करतात - संबंध करतात. जसे राजे आपल्या परिस्थितीला अनुसरून काही कालपर्यन्त स्वस्थ राहतात तसे ते बाण काही कालपर्यन्त धनुष्याच्या दोरीवर स्वस्थ राहतात. जसे राजे युद्धासाठी आपल्या स्थानातून प्रयाण करतात तसे ते बाण धनुष्याच्या दोरीपासून प्रयाण करतात. जसे राजे लोक मध्यस्थ बनून द्वैधीभाव धारण करतात अर्थात् भेदनीतीच्या द्वारे शत्रूमध्ये फूट पाडतात तसे हे बाण शत्रूवर पडून मध्यस्थ होतात अर्थात् शत्रूच्या शरीरात घुसतात व द्वैधीभावाला प्राप्त होतात. शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करतात व राजे जसे शत्रूचे युद्ध करण्याचे सामर्थ्य संपले असे जाणून त्याला वश करतात तसे हे बाण देखिल शत्रूला वश करीत होते ॥ १२९-१३० ॥ Page #578 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-१३७) महापुराण (५६७ धारा वीररसस्येव रेजे रक्तस्य कस्यचित् । पतन्ती सततं धैर्यादाश्वनत्पाटिताशुगम् ॥ १३१ सायकोद्धिन्नमालोक्य कान्तस्य हृदयं प्रिया। परासुरासीच्चित्तेऽस्य वदन्तीवात्मनः स्थितिम्॥१३२ छिन्नदण्डैः फलैः कश्चित्सर्वाङ्गीणैर्भटाग्रणीः । कोलितासुरिवाकम्प्रस्तथैव युयुधे चिरम् ॥ १३३ विलोक्य विलयज्वालिज्वालालोलशिखोपमैः । शिलीमुखैर्बलं छिन्नं स्वं विपक्षधनुर्धरैः ॥ १३४ गृहीत्वा वज्रकाण्डाख्यं सज्जीकृत्य शरासनम् । स्वयं योध्दं समारब्ध सक्रोधः सानुजो जयः ॥१३५ कर्णाभ्यर्णीकृतास्तस्य गुणयुक्ताः सुयोजिताः । पत्रेलघुसमुत्थानाः कालक्षेपाविधायिनः ॥ १३६ मार्गे प्रगुणसञ्चाराः प्रविश्य हृदयं द्विषाम् । कृच्छार्थ साधयन्ति स्म निसृष्टार्थसमाः शराः॥१३७ धैर्याने एका वीराने आपल्या शरीरातून बाण उपटून बाहेर काढला त्यावेळी त्या बाणाच्या पाठोपाठ त्याच्या शरीरातून रक्ताची धारा बाहेर आली व ती त्याच्या वीररसाची धारा जणु आहे अशी शोभली ।। १३१ ॥ बाणाने आपल्या पतीचे हृदय फुटले हे पाहून त्याची प्रिय पत्नी त्याच्या अन्तःकरणात आपली स्थिति होती- आपण तेथे राहत होतो असे जणु बोलणारी ती प्राणरहित झाली।।१३२॥ ज्यांचे दांडे तुटले आहेत व जे सर्व शरीरात घुसले आहेत अशा बाणांच्या टोकानी ज्याचे सर्वांग विद्ध झाले आहे असा कोणी योद्धा जणु त्या बाणाच्या टोकानी त्याचे प्राण त्या शरीराला खिळयानी ठोकून बद्ध केल्याप्रमाणे बरेच वेळ तो योद्धा निश्चल होऊन युद्ध करीत राहिला ॥ १३३ ।। शत्रूच्या धनुर्धारी योद्धयानी प्रलयकालाच्या जळत असलेल्या अग्नीच्या प्रकाशमान चंचल ज्वालाप्रमाणे असलेल्या बाणानी आपले सैन्य छिन्नभिन्न केले आहे हे पाहून जयकुमाराने आपल्या धाकट्या भावाना बरोबर घेऊन व आपले वज्रकाण्ड नांवाचे धनुष्य सज्ज करून क्रोधाने स्वतः लढण्यास सुरुवात केली ॥ १३४-१३५ ॥ ___त्यावेळी जयकुमारचे बाण नि:सृष्टार्थ- उत्तम दूताप्रमाणे दिसत होते. कारण उत्तम II कानाजवळ राहतात अर्थात त्यांच्या कानामध्ये अभिप्राय सांगतात. तसे बाण देखिल जयकुमाराच्या कानाजवळ राहत होते. अर्थात् कानापर्यन्त बाण ओढले जाऊन जयकुमार त्याना सोडीत होता. जसे उत्तम दूत गुण अर्थात् रहस्यमय गोष्टीचे रक्षण करतात तसेच त्याचे बाण देखिल गुणाने दोरीने युक्त होते. जशी उत्तम दूताची योजना चांगल्या त-हेने केली जाते तशी बाणाची योजनाही उत्तम केली जाते. जसे उत्तम दूत पत्र घेऊन शीघ्र उठून उभा राहतो तसे बाण देखिल आपल्या पंखानी शीघ्रशीघ्र वेगाने जात होते. जसा उत्तम दूत दीर्घकाल दवडीत नाहीत तसे बाण देखिल आपल्या पंखानी जल्दी वेगाने शत्रूवर जाऊन पडत होते. जसे उत्तम दूत मार्गाने सरळ जातात तसे बाण देखिल सरळ जात होते. जसे उत्तम दूत शत्रूच्या हृदयात प्रवेश करून आपल्या राजाचे कठिणातही कठिण अशा कार्याची सिद्धि करून देतात. तसे उत्तम बाण देखिल शत्रूच्या हृदयात घुसून कठिणात कठिण अशा कार्याची सिद्धि करून देतात ।। १३६-१३७॥ Page #579 -------------------------------------------------------------------------- ________________ ५६८) महापुराण (४४-१३८ पत्रवन्तः प्रतापोग्राः समग्रा विग्रहे व्रताः । अज्ञातपातिनश्चक्रुः कूटयुद्धं शिलीमुखाः ॥ १३८ प्रस्फुरद्भिः फलोपेतैः सुप्रमाणः सुकल्पितः । विरोधोद्भाविना विश्वगोचरैविजयावहैः ॥ १३९ वादिनेव जयेनोच्चः कीति क्षिप्रं जिघृक्षणा । प्रतिपक्षः प्रतिक्षिप्तः शस्त्रैः शास्त्रैजिगीषुणा ॥१४० खगाः खगान्प्रति प्रास्ताः प्रोद्भिद्य गगनं गताः । निवर्तन्ते न यावत्ते ते भियेवापतन्मृताः॥ १४१ सुतीक्ष्णा वीक्षणाभीलाः प्रज्वलन्तः समन्ततः। मूर्चस्वशनिववत्पेतुः खाद्विमुक्ताः खगैः शराः ॥१४२ शरसङ्घातसञ्छन्नानगृध्रपक्षान्धकारितान् । अदृष्टमुद्गराघातान्नभोगा नभसोध्यधुः ॥ १४३ चण्डरकाण्डमृत्युश्च काण्डरापाद्यतादिमे । युगेऽस्मिन्किकिमस्तांशुभासिभि शुभं भवेत् ॥ १४४ अथवा ते बाण कपटयुद्ध करीत आहेत असे वाटत होते. जसे कपटयुद्ध करणारे वीर पत्रवन्त अर्थात् रथ, घोडा इत्यादिकानी सहित आणि प्रतापाने उग्र असतात त्याप्रमाणे ते बाण देखिल पत्रवन्त पंखाने सहित व अधिक तेजस्वीपणाने उग्र दिसत होते. जसे कपट युद्ध करणारे वीर शीघ्र आक्रमण करतात तसे हे बाण शीघ्र शत्रूवर जाऊन पडत होते. शत्रूला न समजेल अशा रीतीने जाऊन त्याच्यावर पडत होते. म्हणून ते बाण जणु कपट युद्धच करीत आहेत की काय असे वाटू लागले ॥ १३८ । ___ जसे विजय मिळवून उत्तम कीर्तीची प्राप्ति करून घेणारा व जिंकण्याची इच्छा करणारा वादी स्फुरण पावणारी म्हणजे उत्तम अध्ययन झाले असल्यामुळे त्वरित आठवणारी, प्रतिवादीचा पराभव करणे या फलाने युक्त, ज्यातील प्रमाणे अबाधित आहेत अशी, योग्य प्रसंगी योजलेली, ज्यात संपूर्ण विश्व विषय होत आहे अशी व विजयप्राप्ति करून देणारी जी शास्त्रे त्याच्या योगाने शीघ्र कीर्ति मिळविण्याची इच्छा करणाऱ्या वादी पुरुषाने ज्याप्रमाणे प्रतिवादीच्या पक्षाला खंडित करून दूर फेकून द्यावे त्याप्रमाणे प्रस्फुरणारी, चमकणारी, तीक्ष्णाग्रानी युक्त, ज्यांची लांबी रुंदी वगैरे प्रमाणयुक्त आहे अशी व योग्यप्रकारे योजलेली, चोहोकडे प्रवेश करणारी आणि विजयाची प्राप्ति करून देणारी अशी जी शस्त्रे त्यांच्यायोगे निर्मल कीर्ति मिळविण्याची व शत्रूला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या जयकुमाराने शत्रूची बाजू त्वरेने मागे सारली. अर्थात् आपल्या तीक्ष्ण बाणानी शत्रूस हटविले ॥ १३९-१४०॥ विद्याधरावर सोडलेले आणि आकाशात गेलेले ते बाण विद्याधरांच्या शरीराना भेदून परत आले नाहीत तोंच ते विद्याधर जणु भीतीने मरून खाली पडले. जे विद्याधरानी बाण सोडले ते अतिशय तीक्ष्ण होते व पाहण्याला भयंकर आणि सर्व बाजूनी पेटणारे होते. आकाशातून सोडलेले ते बाण लोकांच्या मस्तकावर वज्राप्रमाणे पडले. त्या विद्याधरानी आकाशातून भूमीवरील वीराना बाणांच्या समूहाने आच्छादिले. तेव्हा ते वीर गिधाडांच्या पंखानी अंध:कारमय झाले व त्यांना मुद्गराचे आघात आपल्यावर पडत आहेत हेही दिसेना. अशी परिस्थिति विद्याधरानी भूमीवरील वीरांची केली ॥ १४१-१४३ ।। ___ या प्रथमयुगात प्रखर अशा बाणानी अकाली अनेक वीरांचा मृत्यु उत्पन्न केला. बरोबरच आहे की, ज्यानी सूर्याचे तेजही कमी केले आहे अशा पुरुषाच्या द्वारे काय काय होणार नाही बरे ? सर्व काही होईल ॥ १४४ ।। Page #580 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-१५२) दूरपाताय नो किन्तु दृढपाताय खेचरैः । खगाः कर्णान्तमाकृष्य मुक्ता हन्युद्विपादिकान् ।। १४५ अधोमुखाः खगैर्मुक्ता रक्तपानात्पलाशनात् । पृषत्काः सांहसो वेयुर्नरकं वावनेरधः ॥ १४६ भूमिष्ठनिष्ठुरं क्षिप्ता द्विष्टानुत्कृष्य यष्टयः । ययुर्दूरं दिवं द्वतीदेशीया दिव्ययोषिताम् ॥ १४७ चक्रिणश्चक्रमेकान्तं न ततः कस्यचित्क्षतिः । चक्रेशकालचक्राभर्बहवस्तत्र जघ्निरे ॥ १४८ समवेगैः समं मुक्तैः शरैः खेचरभूचरैः । व्योम्न्यन्योन्यमुखालग्नः स्थितं कतिपयक्षणान् ॥ १४९ खभूचरशरंश्च्छते खे परस्पररोधिभिः । अन्योन्यावीक्षणे तेषामभूद्रणनिषेधनम् ॥ १५० स्वास्त्रैः शस्त्रैर्नभोगानां शरैश्चाबाधितं भृशम् । स्वसैन्यं वीक्ष्य खोत्क्षिप्त वीक्षणोप्राशुशुक्षणिः ॥ १५१ सद्यः संहारसङक्रुद्धसमवतसमो जयः । प्रारब्ध योद्धुं वज्रेण वज्रकाण्डेन वज्रिवत् ।। १५२ महापुराण बाण दूर जावेत म्हणून नव्हे तर त्यांचा जबर आघात व्हावा म्हणून विद्याधरानी कानापर्यन्त ते बाण ओढून सोडले तेव्हा त्यानी हत्ती वगैरेना ठार मारले ।। १४५ ।। (५६९ जेव्हा विद्याधरानी खाली ज्यांची तोंडे आहेत असे बाण सोडले तेव्हा ते रक्त प्याल्याने व मांस खाण्याने जणु पापी झालेले या पृथ्वीच्या खाली जणु नरकात गेले की काय असे वाटले ।। १४६॥ जमिनीवरच्या वीरानी जोराने धनुष्यांच्या दोरी ओढून फेकलेल्या बाणयष्टि जणु बाणकाठ्या देवांगनांच्या दासीप्रमाणे वर स्वर्गात गेल्या की काय अशा दिसल्या ।। १४७ ॥ चक्रवर्तीचे चक्र ते चक्रवर्तीनेच सोडले पाहिजे असे एकान्तस्वरूपी होते म्हणून त्याच्यापासून कोणाचा नाश होत नाही, पण त्यावेळी संहारकालाप्रमाणे भासणारी जी अनेक चक्रे त्यानी शत्रुसैन्यातले पुष्कळ हत्ती, घोडे वगैरे सैन्य मारले ।। १४८ ॥ भूमीवरील वीरानी व आकाशातील विद्याधरानी एकदम सोडलेले समवेगाचे बाण आकाशात एकमेकाच्या मुखाला लागून थोडा वेळपर्यन्त ते तेथे राहिले ।। १४९ ।। विद्याधर व भूगोचरी अशा बाणानी आकाशात एकमेकाना अडविले. त्यामुळे एकमेकांचे दर्शन न झाल्यामुळे युद्ध बंद पडू लागले ।। १५० ।। आपली आणि शत्रूंची शस्त्रे विद्याधरांचे बाण यानी आपले सैन्य अतिशय पीडिले गेले असे पाहून जयकुमाराने आपले डोळेरूपी उग्र अग्नि वर करून पाहिले व तत्काल संहार करण्यासाठी रागावलेल्या यमाप्रमाणे जयकुमाराने इन्द्र जसा वज्राने लढतो तसे आपल्या वज्रकाण्ड नांवाच्या धनुष्याने युद्धास प्रारंभ केला ।। १५१-१५२ ।। म. ७२ Page #581 -------------------------------------------------------------------------- ________________ ५७०) महापुराण (४४-१५३ निजिताशनिनिर्घोषजयज्याधोषभीलुकाः । चापसायकचेतांसि प्राक्षिपन्सह शत्रवः ॥ १५३ चापमाकर्णमाकृष्य ज्यानिवेशितसायकः । लघुसन्धानमोक्षः सोऽवक्ष्यविध्यन्निव क्षणम् ॥ १५४ न मध्ये न शरीरेष दृष्टास्तद्योजिताः शराः। दृष्टास्ते केवलं भूमौ सवणाः पतिताः परे ॥ १५५ निमीलयन्तश्च©षि ज्वलयन्तः शिलीमुखाः । मुखानि ककुभां वः खादुल्कालीव भीषणाः ॥ १५६ तिर्यग्गोष्फणपाषाणरदृष्ट्वाज्यजिराबहिः । पतितान्खचरानूचुः सतनून्स्वर्गतान् जडाः ॥ १५७ शरसंग्णविद्याधुन्मुकुटेभ्योऽगलन्सुरैः । मणयो गुणगृार्वा जयस्योपायनीकृताः ॥ १५८ पतन्मृतखगान्वीतप्रियाभिः स्वाधवारिणा । वारिदानमिवाचर्य कृपामासादितो जयः ॥ १५९ अन्तकः समवर्तीति तद्वार्तव न चेत्तथा । कथं चक्रिसुतस्यैव बले प्रेताधिपो भवेत् ॥ १६० ज्याने वज्राचा कडकडाट जिंकला आहे अशा जयकुमाराच्या धनुष्याच्या दोरीच्या टंकारापासून भ्यालेल्या शत्रूनी आपल्या हातात असलेल्या धनुष्यांचा व बाणांचा त्याग केला व अन्तःकरणाचाही त्याग केला. अर्थात् धनुष्य, बाण जसे त्यांच्या हातातून भयाने गळून पडले तसे त्यांचे मनही भीतीने घाबरले ॥ १५३ ॥ धनुष्य कानापर्यन्त ओढून दोरीला ज्याने बाण लावला आहे व वाण लावणे आणि सोडणे या क्रिया जो फार त्वरेने करीत आहे असा जयकुमार जणु बाण सोडीतच नाही असा क्षणपर्यन्त लोकांना दिसला ॥ १५४ ॥ या जयकुमाराने सोडलेले बाणा मध्ये लोकाना दिसत नव्हते व शरीरात घुसलेले पण दिसत नव्हते. शत्रु मात्र जखमी होऊन जमीनीवर पडलेले दिसत होते ॥ १५५ ॥ पाहणाऱ्यांच्या डोळ्याना दिपविणारे व सर्व दिशांची मुखे प्रकाशित करणारे अशा जयकुमाराच्या तेजस्वी बाणानी आकाशातून पडणाऱ्या ताऱ्याप्रमाणे दिशाना व्यापून टाकले ॥१५६॥ गोफणीपासून तिरपे दगड सुटत असल्यामुळे युद्धाच्या अंगणातून बाहेर पडलेल्या विद्याधराना युद्धभूमीत न पाहिल्यामुळे ते सदेह स्वर्गाला गेले असे मूढलोक बोलू लागले ॥ १५७ ॥ बाणानी जखमी झालेल्या विद्याधरांच्या मुकुटातून जे मणि गळले ते जणु गुणग्राहक देवानी जयकुमाराला भेट म्हणून दिल्याप्रमाणे शोभले ॥ १५८ ॥ आकाशातून खाली जमीनीवर पडून मरण पावलेल्या विद्याधरांना अनुसरणा-या त्यांच्या स्त्रियांनी स्वतःच्या अश्रुजलानी जणु जलदान करून जयकुमाराच्या मनात त्यानी दया उत्पन्न केली ॥ १५९ ॥ अन्तक- यम हा समवर्ती - समदृष्टीने वागणारा आहे असे जे म्हटले जाते ती वार्तागप्पा आहे, ती जर गप्पा नसती तर चक्रवर्तीच्या सुताच्या- अर्ककोर्तीच्या बलांत-सेनेमध्येच प्रेतांचा राजा का झाला असता ? अर्थात् अर्ककीर्तीच्या सेनेचे लोकच का अधिक मरण पावले असते ? ॥ १६० ॥ Page #582 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-१६८) महापुराण (५७१ वषं विधाय न्यायेन जयेनान्यायवर्तिनाम् । यमस्तीक्ष्णोऽप्यभूधर्मस्तत्र दिव्यानलोपमः ॥ १६१ तावद्धेषितनिर्घोषैर्भोषयन्तो द्विषो हयाः । बलमाश्वासयन्तः स्वं स्वीचऋश्चाक्रिसूनवः ॥ १६२ प्रासान्प्रस्फुरतस्तीक्ष्णानभीक्ष्णं वाहवाहिनः । आवर्तयन्तः सम्प्रापन यमस्येवाग्रगा भटाः ॥ १६३ जयोऽपि स्वयमारुह्य जयी जयतुरङ्गमम् । ऋद्धः प्रासान्समुद्धृत्य योद्धमश्वीयमादिशत् ॥ १६४ अभूत्प्रहतगम्भीरभम्भादिध्वनिभीषणः । बलार्णवश्चलस्थूलकल्लोल इव वाजिभिः ॥ १६५ असिसङ्घट्टनिष्ठातविस्फुलिङ्गो रणेऽनलः । भीषणे शरसङ्घाते व्यदीपिष्ट पराचिते ॥ १६६ वाजिनः प्राक्कशाघातावधावन्नभिनायकम् । नियन्ते न सहन्ते हि परिभूति सतेजसः ॥ १६७ स्थिताः पश्चिमपादाभ्यां बद्धामर्षाः परस्परम् । पति केचिदिवावन्तो युद्धचन्ते स्म चिरं हयाः॥ ...........-- जयकुमाराच्या द्वारे अन्यायाने वागणाऱ्या लोकांचा न्यायाने वध करवून यमराज जरी तीक्ष्ण होता तरीही त्यावेळी तो दिव्य अग्निप्रमाणे धर्मरूप झाला. तात्पर्य हे की, दिव्य अग्नि जो न्यायाने वागतो त्याला जाळीत नाही पण अन्यायी लोकांना तो जाळून टाकतो तसे यम हा न्यायाने वागणान्या जयराजाला धर्मस्वरूप झाला व अन्यायी चक्रवर्तीसुत अर्क कीर्तीच्या अपेक्षेने यम हा दिव्यानलस्वरूप-नाशक झाला ॥ १६१ ॥ त्यावेळी आपल्या खिंकाळण्याच्या शब्दानी शत्रूना भय दाखविणारे आणि स्वबलाला, अर्ककीर्तीच्या सैन्याला धैर्ययुक्त करणारे घोड्यांचे सैन्य तेथे आले ॥ १६२ ॥ जणु यमाचे मुख्य भट-वीरपुरुष असे घोडेस्वार आपल्या सभोवती तीक्ष्ण व चमकणारे असे भाले अथवा पट्टे फिरवित तेथे आले ।। १६३ ।। त्यावेळी विजयी जयकुमार देखील आपल्या जयशाली घोड्यावर स्वतः आरोहण करून तेथे क्रुद्ध होऊन आला आणि आपल्या घोडेस्वारांना भाले किंवा पट्टे धारण करून अर्ककीर्तीच्या घोडेस्वाराबरोबर लढण्याची त्यांना त्याने आज्ञा दिली ॥ १६४ ॥ त्यावेळी वाजविलेले नगारे शंख वगैरेंच्या ध्वनींनी-गर्जनानी भीषण-भयंकर असा सेनासमुद्र घोड्यांनी जणु मोठ्या लाटानी हालणाऱ्या समुद्राप्रमाणे फार खवळला ॥ १६५ ॥ त्या युद्धात रणभूमीवर जो बाणांचा भयंकर समूह पडला होता. त्यावर तरवारीच्या समूहांचे घर्षण होऊन त्यापासून ठिणग्या ओकणारा असा अग्नि प्रज्वलित झाला होता ॥१६६।। ते घोडे चाबकाचा फटका बसण्याच्या पूर्वीच शत्रुसैन्यातील मुख्य वीरावर धावून गेले. कारण जे तेजस्वी असतात ते मरण पत्करतील पण पराभव - अपमान सहन करणार नाहीत ।। १६७ ॥ एकमेकाविषयी ज्याना क्रोध उत्पन्न झाला आहे असे घोडे आपल्या मागील पायावर उभे राहिले व आपल्या मालकांचे जणु रक्षण करीत आहेत असे ते पुष्कळ वेळपर्यंत लढले ॥१६८॥ Page #583 -------------------------------------------------------------------------- ________________ ५७२) महापुराण (४४-१६९ समुद्धृतास्त्रसम्पृक्तलसल्लोलासिपत्रकः । नभस्तरभा यस्तवापल्लवितो यथा ॥ १६९ पतितान्यसिनिर्घातात्सुदूरं स्वामिनां क्वचित् । शून्यासनाः शिरांस्युच्चरन्वेष्टुं वाभ्रमन्हयाः॥ पशन विशङ्गान्मत्वाश्वान् कृपया कोऽपि नावधीत्। ते च दन्तकरैरेव ऋद्धाः प्राघ्नन् परस्परम् ॥१७१ बंशमात्रावशिष्टाङ्गमण्डलाश्चिरं क्रुधा । लोहदण्डरिवाखण्ड/रा युयघिरे धुरि ॥ १७२ शिरःप्रहरणेनान्योऽपश्यन्नान्ध्यं प्रकुर्वता । सर्वरोगसिराविद्धो बुवा पश्चादयुद्ध सः ॥ १७३ हयान्प्रतिष्कशीकृत्य धनुस्तकपिशीर्षकम् । अयुध्यत पुनः सुष्ठु तदा द्विगुणयन्त्रणम् ॥ १७४ जयोऽयात्साऽनुजस्तावदाविष्कृत्य यमाकृतिम् । कण्ठीरवमिवारुह्य हयमस्युद्यतः क्रुधा ॥ १७५ वाहयन्तं तमालोक्य कल्पान्तज्वालिभीषणमा विवेश विद्विडश्वाली वेलेव स्वबलाम्बधिम ॥१७६ चिरात्पर्यायमासाद्य प्रनृत्यत्केतवो रथाः । जविभिर्वाजिभिव्यूढाः प्राधावन्विद्विषं प्रति ॥ १७७ त्यावेळी वर उसळलेली व रक्ताने रंगलेली जी तरवाररूपी चंचल पाने त्यांनी आकाशरूपी वृक्ष असा शोभू लागला की जणु त्याच्यावर पुनः पालवी फुटली आहे ॥ १६९ ॥ ___ तरवारीच्या मोठ्या प्रहाराने घोडेस्वारांची मस्तके तुटून कोठे तरी पडल्यामुळे घोडे स्वारांनी रहित झाले. शून्यासन असे ते घोडे मालकांची मस्तके जणु हुडकण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागले ।। १७० ।। हे घोडे म्हणजे शिंगानी रहित पशु आहेत असे समजून दयेने कोणी योद्धयाने त्यांना मारले नाही. पण क्रुद्ध होऊन आपल्या दातांनी व पायानी एकमेकाना त्यानी मारले ॥ १७१।। त्या युद्धात कित्येक योद्धे रागावून जणु अखण्ड लोखंडाच्या काठीप्रमाणे असलेले व ज्यांच्यापासून तरवारी निघून गेल्या आहेत अशा वेळूच्या काठ्यांनी दीर्घकालपर्यन्त धैर्याने लढले ॥ १७२॥ मस्तकावर जोराचा आघात झाल्यामुळे ज्याला आंधळेपणा प्राप्त झाला आहे असा कोणी योद्धा गळ्याच्या पाठीमागचा भाग आपल्या हस्तस्पर्शाने शाबूत आहे असे जाणून रागाने लढला ।। १७३ ॥ त्यावेळी कोणी योद्धा घोड्यांचे साहाय्य घेऊन व कपिशीर्षक नांवाचे धनुष्य घेऊन चांगल्यारीतीने दुप्पट युद्ध करू लागला ॥ १७४ ॥ जयकुमार आपल्या सर्व धाकट्या भावासह तरवार उगारून व सिंहासारख्या घोड्यावर बसून क्रोधाने यमासारखी आकृति धारण करून निघाला ॥ १७५ ॥ घोड्यावर स्वार झालेल्या व कल्पान्तकालाच्या अग्नीप्रमाणे भयंकर अशा जयकुमाराला पाहून शत्रूच्या घोड्यांची पंक्ति तरङगाप्रमाणे आपल्या सेनारूपी समुद्रात घुसली ॥ १७६ ।। ज्यांच्यावरील पताका नृत्य करीत आहेत व ज्यांना वेगवान घोडे जुंपले आहेत असे रथ पुष्कळ वेळाने आपली पाळी आली ती प्राप्त करून शत्रूवर धावू लागले ।। १७७ ।। Page #584 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-१८६) महापुराण (५७३ निःशेषहेतिपूर्णेषु रथेषु रथनायकाः । तुलां जगर्जुरारुह्य पाञ्जरैः कुञ्जरारिभिः ॥ १७८ चक्रसङघट्टसम्पिष्टशवासृङमांसकर्दमे । रथकड्याश्चरन्ति स्म तत्राब्धी मन्दपोतवत् ।। १७९ कुन्तासिप्रासचक्रादिसङ्कीर्ण वणितक्रमाः । अक्रामन् कृच्छ्रकृच्छेण रणे रथतुरङ्गमाः ॥ १८० तदा सन्नद्धसंयुक्तसर्वायुषभतं रथम् । सङक्रम्य वृषभं वार्कः समारूढपराक्रमः ॥ १८१ । पुरो ज्वलत्समत्सर्पच्छरतीक्ष्णांशुसन्ततिः । शत्रुसन्तमसं भिन्दन बालार्कमजयज्जयः ॥ १८२ मण्डलानसमुत्सृष्टदुष्टात्रः शस्त्रकर्मवित् । जयो भिषजमन्वीयः शत्रुशल्यं समुखरन् ।। १८३ ध्वजस्योपरि धूमो वा तेनाकृष्टो नु सायकः । पपात तापमापाद्य सूचयनशुभं द्विषाम् ॥ १८४ ध्वजदण्डान्समाखण्डय विद्विषो वीतपौरुषान् । कुर्वन्सर्वान्स निवंशान्सोमवंशध्वजायते ॥ १८५ विच्छिन्नकेतवः केचित्क्षणं तस्थुम॒ता इव । प्राणन प्राणिनः किंतु मानप्राणा हि मानिनः ॥ १८६ संपूर्णशस्त्रांनी भरलेल्या रथात रथी वीर बसून पिंजऱ्यात असलेल्या हत्तीच्या वऱ्याप्रमाणे-सिंहाप्रमाणे गर्जना करू लागले ॥ १७८ ।। चाकांच्या घर्षणाने चूर्ण झालेल्या प्रेतांच्या रक्तांच्या व मांसांच्या चिखलाने भरलेल्या त्या रणाङ्गणात ते रथांचे समूह समुद्रात फिरणाऱ्या लहान नावाप्रमाणे फिरू लागले ॥ १७९॥ भाले, तरवारी, पट्टे, चक्र यांनी भरलेल्या त्या रणांगणात ज्यांच्या पायांना जखमा झाल्या आहेत असे रथाचे घोडे मोठ्या कष्टाने चालत होते ॥ १८० ॥ त्यावेळी तयार केलेला, जोडलेला व सर्व शस्त्रांनी भरलेला अशा रथात जसा वृषभ राशीवर सूर्य आरोहण करतो तसे जयकुमाराने आरोहण केले. ज्याचा पराक्रम वृद्धिंगत झाला आहे व पुढच्या बाजूला चमकणारे व वर पसरत आहेत तीव्र किरणसमूह ज्यांचे असे बाणसमूह ज्याच्याजवळ आहेत अशा जयकुमाराने शत्रूरूपी अंधाराच्या समुदायाचे भेदन करून बालसूर्याला जिंकले ॥ १८१-१८२ ॥ आपल्या तरवारीने ज्याने दुष्टांचे-शत्रूचे रक्त बाहेर काढले आहे, जो शस्त्रक्रिया चांगली जाणत आहे व शत्रुरूपी शल्य काढून टाकणारा तो जयकुमार शस्त्रवैद्यासारखा भासत होता ॥ १८३ ॥ त्या जयकुमाराने धनुष्याच्या दोरीवर लावून ओढलेला बाण शत्रूना संताप उत्पन्न करणारा व त्यांचे अशुभ सुचविणारा जणु धूमकेतु असा होऊन त्यांच्या ध्वजावर पडला ॥१८४॥ शत्रूच्या ध्वजदंडाना तोडून शत्रूना पौरुषरहित करणारा व निवंश करणारा अथवा वंश-वेळूच्या काठ्या नाहीतशा करणारा, असा तो जयकुमार सोमवंशाच्या ध्वजाप्रमाणे शोभत आहे ॥ १८५ ।। ज्यांचे ध्वज छिन्नभिन्न केले आहेत असे कित्येक शत्रु क्षणपर्यन्त मेल्याप्रमाणे उभे राहिले. बरोबरच आहे को फक्त प्राणानेच-प्राणांच्या सद्भावानेच प्राणी मानले जातात असे नाही परन्तु मान हाच प्राण्यांचा प्राण आहे ॥ १८६ ॥ Page #585 -------------------------------------------------------------------------- ________________ ५७४) महापुराण (४४-१८७ प्रज्वलन्तं जयन्तं ते जयं तं सोदुमक्षमाः । सह सर्वेऽपि सम्पेतुरभ्यग्नि शलभा इव ॥१८७ सन्नद्धस्यन्दनाश्चण्डास्तदा हेमाङ्गदादयः । कोदण्डास्फालनाध्वाननिरुद्धहरितः क्रमात् ॥ १८८ वह्निवृष्टि वा बाणवृष्टि प्रतिद्विषः । यावत्ते लक्ष्यतां नेयुस्तावदाविष्कृतोद्यमाः ॥ १८९ मिरुध्यानन्तसेनादिशरजालं रणार्णवे । स्यन्दनाश्चोदयामासुः पोतान्या वातरंहसः ॥१९० बलद्वयास्त्रसङघट्टसमुत्पन्नाशुशक्षणिम् । पेतुर्वाहाः परं तेजस्तेजस्वी सहते कथम् ॥ १९१ अन्योन्यं खण्डयन्ति स्म तेषां शस्त्राणि तद्रणे । नैकमप्यपरान्प्राप चित्रमस्त्रेषु कौशलम् ॥ १९२ न मृता वणिता नैव न जयो न पराजयः । युद्धमानेष्वहो तेषु नाहवोऽप्याहवायते ॥ १९३ मुद्धवाप्येवं चिरं शेकुर्न जेतुं ते परस्परम् । जयः सेनाद्वये तस्मिन्जयावन्येन दुर्लभः ॥ १९४ चोहीकडे चमकणारा व सर्वत्र जय मिळविणाऱ्या त्या जयकुमाराला अर्थात् त्याच्या पराक्रमाला सहन न करणारे ते वीर जसे अग्नीवर पतंग आक्रमण करतात तसे त्याच्यावर चालून आले ॥ १८७ ॥ ज्यांनी आपले रथ सज्ज केले आहेत व धनुष्यांच्या दोरीच्या टंकारानी ज्यांनी सर्व दिशा शब्दमय केल्या आहेत अशा प्रचंड हेमाङ्गदादि वीरांनी क्रमाने प्रत्येक शत्रूवर अग्निवृष्टीप्रमाणे बाणवृष्टि केली व जोपर्यन्त ते आपल्या दृष्टीच्या मार्गातून वेगळे झाले नाहीत तोपर्यन्त आपला प्रयत्न-उद्योग चालू केला ॥ १८८-१८९ ।। त्या वीरांनी अनन्तसेन वगैरे राजांच्या बाणसमूहाला अडवून रणसमुद्रात वायुप्रमाणे वेग ज्यांचा आहे अशा रथाना नावेप्रमाणे पळविले ॥ १९० ॥ दोन्ही बाजूंच्या सैन्यांच्या शस्त्रांच्या संघर्षाने उत्पन्न झालेल्या अग्नीवर घोड्यानी आक्रमण केले. बरोबरच आहे की, जे तेजस्वी असतात ते दुसऱ्याच्या तेजाला कसे बरे सहन करतील ? मुळीच सहन करणार नाहीत ॥ १९१॥ त्या युद्धात दोन्ही बाजूंच्या वीराकडून एकमेकाच्या शस्त्रांचे छेदन केले जात होते. एक देखील शस्त्र कोणाच्या अंगाला लागले नाही. कारण त्या वीराचे अस्त्रशस्त्रादिकाविषयीचे कौशल्य आश्चर्यकारक होते ॥ १९२ ॥ त्या युद्धात कोणी मेले नाहीत व कोणी जखमी झाले नाहीत. कोणाला जय मिळाला नाही व कोणाचा पराजय झाला नाही. ते वीर लढत असता ते युद्ध युद्धाप्रमाणे वाटले नाही ॥ १९३ ॥ याप्रमाणे बराच कालपर्यंत ते वीर लढून देखील एकमेकांना जिंकण्यास समर्थ झाले नाहीत. त्या दोन्ही सैन्यामध्ये जयकुमाराशिवाय इतरांना जय मिळणे दुर्लभ झाले ॥ १९४ ॥ Page #586 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-२०३) महापुराण (५७५ अन्तर्हासो जयस्सर्व तत्तवालोक्य लीलया। शरैः संच्छादयामास सैन्यं पुत्रस्य च क्रियाः ॥ १९५ निष्पन्दीभूतमालोक्य चक्रिसूनुः स्वसाधनम् । रक्तोपलदलच्छायामुच्छिद्य नयनत्विषा ॥ १९६ जयः परस्य नो मेऽद्य जयो जयमहं रणे। विध्वस्य भुवने शुद्धमाकल्पं स्थापये यशः॥ १९७ विदधाम्यद्य नाथेन्दुप्रसरवंशवर्धनम् । जयलक्ष्मीर्वशीकृत्य विधेयान्मेऽधुना सुखम् ॥ १९८ ब्रुवन्स कल्पनादुष्टमिति स्वानिष्टसूचनम् । द्विपं प्रचोदयामास क्रुधे वा जयमात्मनः ॥ १९९ प्रतिवातसमुद्भूतपश्चागतपताकिकाः । मन्दमन्दं कृणद्घण्टाः कुण्ठितस्वबलोत्सवाः ॥ २०० संशुष्यदाननिष्यन्दकटदीनाननश्रियः । निर्वाणालातनिर्भासनिःशेषास्त्रभरक्षमाः ॥ २०१ आषोरणः कृतोत्साहैः कृच्छुकृच्छ्रण चोदिताः। आक्रन्दमिव कुर्वन्तः कुण्ठितः कण्ठजितैः ॥२०२ भीतभीतायुषोऽन्यश्च चिह्नरशुभसूचिभिः । गजा गतजवाश्चेलुरचला इव जङ्गमाः ॥ २०३ हे सर्व पाहून जयकुमार मनात हसला व त्याने चक्रवर्तीच्या पुत्राचे सैन्य आपल्या बाणांनी आच्छादून टाकले ॥ १९५ ॥ आपले सैन्य हालचालीने रहित झाले आहे असे अर्ककीर्तीने पाहिले. तेव्हा त्याने आपल्या डोळ्यांच्या कान्तीने तांबड्या कमलाच्या पाकळीची कान्ति नष्ट केली अर्थात् त्याचे डोळे फारच लालबुंद झाले व तो असे म्हणाला आज दुसऱ्याचा जय होणार नाही. आज माझा जय होणार आहे. मी आज रणामध्ये जय मिळवीन. आज जयकुमाराचा युद्धामध्ये नाश करून या जगामध्ये कल्पान्तापर्यन्त माझे निर्मल यश स्थापीन. आज नाथवंश व सोमवंशचंद्रवंश याचा प्रसार मी छाटून टाकणार आहे. जयलक्ष्मी मला वश करून मला सुखी करील असे अर्ककीर्ती बोलला. त्याचे हे भाषण कल्पनेने दुष्ट व त्याचेच अनिष्ट सूचित करणारे होते. याप्रमाणे बोलून क्रोधाने जणु आपला पराजय असा हत्ती त्याने युद्धात प्रेरिला ।। १९६-१९९॥ तोंडासमोर येणाऱ्या वाऱ्याने उडविल्यामुळे ज्यांच्यावरील पताका मागे जाऊ लागल्या आहेत, ज्यांच्या गळ्यातील घंटा मंदमंद आवाज करीत आहेत, ज्यांची शक्ति व उत्साह हे कमी झाले आहेत, मद पाझरणे शुष्क झाल्यामुळे ज्यांच्या गंडस्थल व मुखाची शोभा दीन झाली आहे, विझलेल्या अग्निचक्राप्रमाणे निस्तेज झाल्यामुळे जे शस्त्रास्त्राचे ओझे वाहण्यास असमर्थ झाले आहेत, उत्साहाला उत्पन्न करणान्या महांतानी मोठ्या कष्टाने ज्याना प्रेरित केले आहे, कुंठित झालेल्या कंठातील गर्जनेमुळे जे जणु रडत आहेत की काय? जे युद्धापासून जणु भ्याले आहेत अशा अशुभ सूचक चिह्नांनी वेगरहित झालेले जणु चालणारे पर्वत असे हत्ती चालू लागले ॥ २००-२०३ ॥ मंद जातीचे हत्ती अधिक मंद चालू लागले आणि मृगजातीचे हत्ती युद्धभीतीने मंद चालू लागले व भद्र जातीचे हत्ती काही कारण नसता मंद चालू लागले. हे याप्रसंगी अशुभ सूचक झाले ॥ २०४ ॥ Page #587 -------------------------------------------------------------------------- ________________ ५७६) मन्दमन्दं प्रकृत्यैव मन्दा युद्धभयान्मृगाः । जग्मुनिर्हेतुकं भद्रास्तवत्राशुभसूचनम् ॥ २०४ विजिगीषविपुण्यस्य वृथा प्रणिधयो यथा । तथार्ककीर्तियन्तॄणां ते गजेषु नियोजिताः ॥ २०५ लङ्घयत्रयोदप्त्या पारिभद्रोद्गमच्छविम् । प्रकटभ्रुकुटीबन्धसन्धानितशरासनः ॥ २०६ रिपुं कुपितभोगीन्द्रस्फटाटोपो भयङ्करः । कुर्वन्विलोकनातप्ततीव्रनाराचगोचरम् ॥ २०७ गिरीन्द्र शिखराकारमारुह्य हरिविक्रमः । गजेन्द्रं विजयार्धाख्यं गर्जन्मेघस्वरस्तवा ॥ २०८ अनुकूलानिलोत्क्षिप्तपुरःसर्पद्ध्वजांशुकैः । क्रान्त द्विपारिविक्रान्तविख्यातारुढयोधनैः ॥ २०९ प्रस्फुरच्छस्त्र सङ्घातदीप्तिदीपित दिङ्मुखैः । धूतदुन्दुभिसद्ध्वानबृहद्वंहितभीषणः ।। २१० घण्टामधुरनिर्घोषनिभिन्नभुवनत्रयेः । सद्यः समुत्सरद्द पैरपि सिंहान् जिगीषुभिः ॥ २११ प्रापद्युद्धोत्सुकः सार्धं गर्जवजयसूचिभिः । क्षयवेलानिलोद्धूतसिन्धुवेलां विलङ्घयन् ॥ २१२ महापुराण जो जिंकण्याची इच्छा करीत आहे पण पुण्यरहित आहे अशा राजाचे दूत अथवा मनोरथ व्यर्थ होतात तसे अर्ककीर्तीच्या महातांनी हत्तीविषयी केलेले मनोरथ व्यर्थ झाले ॥ २०५ ॥ (४४ - २०४ ज्याने आपल्या दोन नेत्रांच्या डोळयांच्या कान्तीने निंबाच्या कोवळया पानाच्या लाल कान्तीला जिंकले होते आणि स्पष्ट दिसणाऱ्या ज्या भुवया त्याच्या रचनेप्रमाणे ज्याचे धनुष्य आहे ॥ २०६ ॥ रागावलेला जो सर्पराज त्याच्या शरीराचा जो विस्तार त्याप्रमाणे ज्याचा देह दिसत आहे व त्यामुळे जो भयंकर वाटत आहे, आपल्या शत्रूला दृष्टिरूपी तप्त व तीव्र बाणांचा विषय बनविणारा, मेरुपर्वताच्या शिखराच्या आकाराचा जो विजयार्ध नांवाचा गजेन्द्र त्याच्यावर ज्याने आरोहण केले आहे, सिंहाप्रमाणे ज्याचा पराक्रम आहे आणि गर्जना करणारा असा जयकुमार शत्रूच्या सैन्यावर चालून गेला ॥। २०७-२०८ ।। अनुकूल वाऱ्याने वर उडविलेले आणि पुढे पसरणाऱ्या ध्वजांच्या वस्त्रानी जे शोभत आहेत, आक्रमण करणाऱ्या सिंहाप्रमाणे शूर व विख्यात असे योद्धे त्यांच्यावर बसले आहेत, चमकणा-या शस्त्रसमूहाच्या कांतीने ज्यांनी दिशांची मुखे उज्ज्वल केली आहेत, ताडन केलेल्या नगान्यांचा जो गंभीर प्रशस्त आवाज त्याप्रमाणे मोठ्या गर्जनेने जे भयंकर दिसत आहेत, घंटांच्या मधुर आवाजानी ज्यांनी त्रैलोक्य व्याप्त केलें आहे, तत्काल वाढणारा जो ताजा दर्प त्याने सिंहांनाही जिंकणारे व विजयाला सुचविणारे अशा हत्तीसह तो जयकुमार युद्धाला उत्सुक होऊन तेथे रणभूमीवर प्राप्त झाला. त्यावेळी प्रलयकालाच्या वाऱ्याने खवळलेल्या समुद्राच्या लाटा आपल्या उसळीने जणु उल्लंघित आहे असा तो शोभला ।। २०९ - २१२ ॥ Page #588 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-२२०) महापुराण महाहास्तिकविस्तारस्थूलनीलबलाहकः । समन्तात्सम्पतच्छङकु समूह सहसानकः ॥ २१३ प्रोत्खाता सिलता विद्युत्समुल्लासितभासुरः । नानानक महाध्वानगम्भीरघनगर्जितः ॥ २१४ नवलोहितपुराम्बुनिरुद्धधरणीतलः । नितान्तनिष्ठुरापात मुद्गराशनिसन्ततिः ॥ २१५ चलत्सितपताकालि बलाकाच्छादिताम्बरः । सग्रामः प्रावृषो लक्ष्मीमशेषामपुषत्तदा ॥ २१६ सुचिरं सर्वसन्दोहसंवृत्तसमराङ्गणे । सेनयोः सर्वशस्त्राणां व्यत्ययो बहुशोऽभवत् ॥ २१७ निरुद्धमूर्ध्वगृध्रौघैर्मध्यमुद्यध्वजांशुकैः । सेनाद्वयविनिर्मुक्तः शस्त्रैर्धात्री च सा तदा ।। २१८ जयलक्ष्मी नवोढायाः सपत्नीमिच्छता नवाम् । तदार्ककीर्तिमुद्दिश्य जयेनाचोद्यत द्विपः ॥ २१९ अष्टचन्द्राः पुरोभूय भूयः प्राग्दृष्टशक्तयः । क्षपकं वांहसां भेदा न्यरुन्धस्तं निनङ्क्षवः ॥ २२० (५७७ मोठ्या हत्तींच्या समूहांचा जो विस्तार हाच कोणी स्थूल व निळा मेघ ज्यात पसरला आहे, चोहीकडून होणारी जी बाणवृष्टि तीच ज्यात मोराप्रमाणे भासत आहे, म्यानातून बाहेर काढलेल्या ज्या तरवारी याच जणु विजा त्यांच्या चमकण्याने जो भयंकर दिसत आहे, अनेक नगायांचा जो आवाज हीच गंभीर मेघांची गर्जना ज्यात आहे, ताज्या रक्ताचा जो प्रवाह हेच कोणी पाणी त्याने या भूतलाला व्यापले आहे, अतिशय कठिण आघात ज्यांचा आहे असे जे मुद्गर हेच कोणी वज्रपात जेथे आहेत, चंचल अशा पांढऱ्या पताकांचा समूह जणु जो बगळ्यांचा समूह त्याने जेथे आकाश व्यापले आहे, अशा रीतीचे युद्ध हीच कोणी पावसाळ्याची मोठी शोभा ती त्यावेळी वृद्धिंगत झाली ।। २१३-२१६ ॥ पुष्कळ कालपर्यन्त संपूर्ण समुदायाने चालविलेल्या त्या युद्धात दोन्ही बाजूच्या सैन्याच्या सर्वशस्त्रांचा पुष्कळ नाश झाला ।। २१७ ।। त्यावेळी वरचा अर्थात् आकाशाचा प्रदेश गिधाडांच्या समूहानी व्यापला होता. मधला प्रदेश वर उडणाऱ्या ध्वजांच्या पताकानी व्यापला होता आणि हा जमिनीचा भाग दोन्ही सैन्यांच्या गळून पडलेल्या शस्त्रांनी व्यापलेला होता ।। २१८ ॥ जयलक्ष्मीला नुकतेच जिला वरले आहे अशा सुलोचनेची नवीन सवत करण्याची इच्छा करणाऱ्या जयकुमाराने अर्ककीर्तीला उद्देशून आपला हत्ती त्याच्या बाजूकडे चालविला ॥ २१९ ॥ जसे कर्मांचे भेद क्षपकश्रेणीवर आरोहण करणाऱ्या मुनिवर्याला अडवितात तसे ज्यांचे सामर्थ्य पूर्वी पाहिले आहे असे अष्टचन्द्र नामक विद्याधर पुनः जयकुमाराचा नाश करावा अशी इच्छा मनात धारण करून त्याच्यापुढे आले ॥ २२० ॥ म. ७३ Page #589 -------------------------------------------------------------------------- ________________ ५७८) महापुराण (४४-२२१ जयोऽपि सुचिरात्प्राप्तप्रतिपक्षो व्यदीप्यलम् । लब्ध्वेव रन्धनं वह्निरुत्साहाग्निसखोच्छ्रितः ॥२२१ तदोभयबलख्यातगजादिशिखरस्थिताः । योद्धमारेभिरे राजराजसिंहाः परस्परम् ॥ २२२ अन्योन्यरदनोद्धिन्नौ तत्र कौचिद्वयसू गजौ । चिरं परस्पराधारावास्थातां यमलाद्विवत् ॥ २२३ समन्ततः शरैश्च्छन्ना रेजुराजौ गजाधिपाः । क्षुद्रवेणुगणाकीर्णसञ्चलगिरिसन्निभाः॥ २२४ दानिनो मानिनस्तुङ्गाः कामवन्तोऽन्तकोपमाः। महान्तः सर्वसत्वेभ्यो न युध्यन्ते कथं गजाः ॥२२५ मृगैर्मगैरिवापातमात्रभग्नर्भयाद्विपः । स्वसैन्यमेव संक्षुण्णं षिक् स्थौल्यं भीतचेतसाम् ॥ २२६ निःशक्तीन शक्तिभिः शक्ताः शक्तांश्चक्रुरशक्तकान् । शक्तियुक्तानशक्तांश्च निःशक्तीन विधिगूनताम् ॥ २२७ जसा वायुमित्रामुळे भडकलेला अग्नि पुष्कळसे जळण मिळाल्यामुळे उत्साहाने वाढतो तसे पुष्कळ वेळाने प्रतिपक्षाची गाठ पडल्यामुळे अतिशय उत्साहाने फार चमकू लागला ॥२२१॥ नंतर दोन्ही सैन्यात प्रसिद्ध असलेले आणि हत्तीरूपी पर्वतशिखरावर विराजमान झालेले असे अनेक राजेरूपी सिंह एकमेकाबरोबर लढण्यास उद्युक्त झाले ॥ २२२ ॥ त्यावेळी एकमेकांच्या दातांनी विदीर्ण झालेले कोणी दोन हत्ती मरण पावले व एकमेकाशी मिळून गेलेल्या दोन यमक पर्वताप्रमाणे एकमेकांच्या आधाराने उभे राहिले होते ॥ २२३ ॥ ___ त्या युद्धभूमीत सर्व बाजूनी बाणानी ज्यांचे अंग भरून गेले आहे असे श्रेष्ठ हत्ती लहानशा वेळूच्या समूहानी व्याप्त झालेल्या व हालत असलेल्या पर्वताप्रमाणे शोभू लागले ॥ २२४ ।। जे दानी आहेत, ज्यांच्यापासून मदजल गळत आहे, जे मानी आहेत व उंच आहेत, जे कामवन्त म्हणजे मालकाच्या इच्छेला अनुसरून वागत आहेत व जे यमासारखे दिसतात व सर्व प्राण्यापेक्षा जे मोठे आहेत असे भद्र जातीचे हत्ती का बरे युद्ध करणार नाहीत अर्थात् ते अवश्य युद्ध करतातच ।। २२५ ॥ मृग जातीचे हत्ती हरिणाप्रमाणे शत्रूचा हल्ला झाल्याबरोबर भीतीने पळत सुटले व त्यानी स्वतःचेच सैन्य चिरडून टाकले. यास्तव ज्यांची अंतःकरणे भयग्रस्त आहेत अशांच्या मोठेपणाला धिक्कार असो ।। २२६ ।। शक्तिशाली-सामर्थ्यवान् योद्धे, शक्तिनामक शस्त्राच्या साहाय्याने ज्यांच्याजवळ शक्तिनामक शस्त्र नाही अशा समर्थ योद्धयांना शक्तिरहित करीत होते व ज्यांच्याजवळ शक्तिनामक शस्त्र आहे, पण जे असमर्थ आहेत, दुबळे आहेत त्यानाही त्यांचे ते शस्त्र त्यांच्यापासून हिसकावून त्यानी असमर्थ केले. बरोबरच आहे की, ऊनताही धिक्काराला पात्र आहे दुर्बलताही धिक्काराला योग्य आहे ।। २२७ ।। Page #590 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-२३५) महापुराण (५७९ शस्त्रनिभिन्न सर्वाङ्गा निमीलितविलोचनाः। सम्यक् संहृतसंरम्भाः सम्भावितपराक्रमाः ॥२२८ बुद्धव बद्धपल्यङ्कास्त्यक्तसर्वपरिच्छदाः । समत्याक्षुरसूञ्छूरा निधाय हृदयेऽर्हतः ॥ २२९ कस्य चित्क्रोधसंहारः स्मृतिश्च परमेष्ठिनि। निष्ठायामायुषोऽत्रासीदभ्यासात्कि न साध्यते ॥२३० हृदि नाराचनिभिन्ना वक्त्रास्रवदसप्लवाः । शिवाकृष्टान्त्रतन्त्रान्ताः पर्यन्तव्यस्तपत्कराः ॥ २३१ गद्धपक्षानिलोच्छिन्नमूर्छाः सम्प्राप्तसंज्ञकाः । समाधाय हि ते शुद्धां श्रद्धां शूरगति गताः ॥ २३२ छिन्नश्चक्रेण शूराणां शिरोऽम्भोजैविकाशिभिः। रणरङ्गोऽन्वितो वाभात् नृत्य जयजयश्रियः ॥२३३ स्वामिसन्मानदानादिमहोपकृतिनिर्भराः । प्राप्याधमर्णतां प्राणः सेवां सम्पाद्य सेवकाः ॥ २३४ स्वप्राणध्ययसन्तुष्टैस्तद्भूभृद्भिः स्वभूभृतः । लब्धपूजाविधायान्ये धन्या नैर्ऋण्यमागमन् ॥ २३५ __ शस्त्रांनी ज्यांचे सर्वांग-सर्व अवयव विदीर्ण झाले आहेत, ज्यानी आपले डोळे मिटविले आहेत, ज्यानी युद्धाचे कार्य उत्तमरीतीने बंद ठेवले आहे, ज्यानी अनेक शौर्याची कामे केली आहेत, ज्यानी आपल्या मनाने पल्यङकासन घातले आहे व मनाने ज्यानी परिग्रहत्याग केला आहे अशा शूर पुरुषानी आपल्या मनात अरिहन्ताला स्थापन करून प्राणाला शान्तपणाने त्यागले आहे ॥ २२८-२२९ ।। एका योद्धयाच्या आयुष्याच्या समाप्तीच्या वेळी त्याने क्रोधाचा त्याग केला व आपल्या हृदयात तो परमेष्ठीचे स्मरण करू लागला. त्याला अभ्यासाने हे साध्य करता आले ॥२३०॥ ___ जे छातीत बाणाने फार विदीर्ण झाले आहेत व ज्यांच्या मुखातून रक्ताच्या गुळण्या बाहेर पडत आहेत व कोल्ह्यानी ज्यांची आंतडी बाहेर काढली आहेत, ज्यांचे हातपाय अस्ताव्यस्त पडले आहेत असे काही वीर गिधाडांच्या पंखानी मूर्छा नाहीशी झाल्यामुळे सावध झाले व त्यावेळी ते अन्तःकरणात शुद्ध निर्मल अशी अर्हच्छद्धा धारण करून शूरगतीला पावलेस्वर्गाला गेले ॥ २३१-२३२ ।। शूर योद्धयांची विकसित झालेली मुखकमले चक्रनामक शस्त्राने तुटून रणरंगभूमीवर पडली तेव्हां ती जयकुमाराच्या जयलक्ष्मीच्या नृत्याकरिता जणु तयार केल्याप्रमाणे शोभू लागली ॥ २३३ ।। आपल्या मालकाने आपला सन्मान केला, आपल्याला धनदान दिले वगैरे मोठा उपकार केला त्यामुळे आपण त्याचे ऋणी झालो आहोत, तेव्हां आपण आपल्या प्राणानी मालकाची सेवा केली पाहिजे असा विचार करून सेवकानी युद्धात प्राणदान देऊन सेवा केली व त्यात सन्तोष मानला व मालकाच्या ऋणातून ते मोकळे झाले आणि कित्येक धन्यसेवक शत्रूना मारून कृतार्थ झाले. तात्पर्य असे की, कित्येक नोकर लढत लढत मरण पावले व कित्येक सेवक शत्रला मारून कृतार्थ झाले ॥ २३४-२३५ ॥ Page #591 -------------------------------------------------------------------------- ________________ ५८०) महापुराण (४४-२३६ जयमुक्ता द्रुतं पेतुरविमुक्तजयाः शराः । अष्टचन्द्रान्प्रति प्रोच्चैः प्रदीप्त्योल्कोपमाः समम् ॥ २३६ जयप्रहितशस्त्राली तैनिषिद्धा च विद्यया । ज्वलन्ती परितश्चद्रान् परिवेषाकृतिर्बभौ ॥ २३७ विश्वविद्याधराधीशमादिराजात्मजस्तदा । द्विषो निःशेषयाङ्गतानित्याह सुनर्मि रुषा ॥ २३८ सोऽपि सर्वैः खगैः साधं निधूतारातिविक्रमः । वह्निवृष्टिमिवाकाशे ववर्ष शरसन्ततिम् ॥ २३९ भीकराः किङ्कराकारा रुवन्तो रुद्धदिङमुखाः । कांस्कान् श्रृणाम नेतीव सुतीक्ष्णाः शरवोऽपतन् । मेघप्रभो जयादेशादिभेन्द्रं वा मृगाधिपः । आक्रम्य विक्रमी शस्त्रररौत्सीत्तं विहायसि ॥ २४१ तमोग्निगजमेघादिविद्याः सुनमियोजिताः । तुच्छीकृत्य स चिच्छेद सहसा भास्करादिभिः ॥ २४२ जयपुण्योदयात्सद्यो विजिग्ये खचराधिपम् । सग्रामेऽनुगुणे देवे क्षोदिमा बंहिमेति न ॥ २४३ ___ ज्यानी जयश्रीला सोडले नाही असे जयकुमाराने सोडलेले बाण आपल्या कान्तीनी अग्निचक्राप्रमाणे भासत होते व अष्टचन्द्रनामक विद्याधरराजावर एकदम व शीघ्र जाऊन ते त्यांच्यावर पडले ॥ २३६ ॥ जयकुमाराने सोडलेल्या शस्त्रपंक्तीला त्या अष्टचन्द्रविद्याधरांनी आपल्या विद्येच्या द्वारे रोखून धरले तेव्हां ती उज्ज्वल शस्त्रपंक्ति अष्टचन्द्रविद्याधरांच्या सभोवती, परिवेषाकाराने खळयाच्या रूपाने शोभू लागली ।। २३७ ।। त्यावेळी सगळ्या विद्याधरांचा स्वामी अशा नमिविद्याधराला आदिराजाने जो भरतचक्रवर्ती त्याच्या मुलाने म्हणजे अर्ककीर्ति राजाने रागाने या सगळ्या शत्रूचा संहार कर असे म्हटले ।। २३८ ॥ ज्याने शत्रूचा पराक्रम हाणून पाडला आहे अशा त्या सुनमि विद्याधर राजाने त्या सर्व विद्याधरांना बरोबर घेऊन आकाशातून अग्नीच्या वृष्टीप्रमाणे बाणांची वृष्टि केली ॥२३९।। ज्यानी सर्व दिशा व्यापल्या आहेत, जे अतिशय तीक्ष्ण, वेगामुळे सू सू शब्द करणारे, नोकराप्रमाणे आपली कामगिरी बजावणारे भयंकर बाण, आम्ही शत्रूकडील लोकांना कोणाकोणाला बरे न मारावे अर्थात् सर्वानाच मारले पाहिजे असे म्हणूनच की काय शत्रूच्या सैन्यावर पडू लागले ॥ २४० ॥ जसा सिंह गजेन्द्रावर आक्रमण करतो, तसे पराक्रमी मेघप्रभ राजाने जयकुमाराच्या आज्ञेने शस्त्रानी आक्रमण करून सुनमीला आकाशात पुढे येण्यास प्रतिबंध केला ॥ २४१ ।। ___ अंधार, अग्नि, गज, मेघ आदिक विद्यांचा सुनमीने शत्रुसैन्यावर प्रयोग केला पण सूर्य वगैरे विद्यांच्या द्वारे तो प्रयोग मेघप्रभाने निष्फल केला व सुनमियोजित विद्यांचा मेघप्रभाने नाश केला ॥ २४२ ।। जयकुमाराच्या पुण्योदयाने मेवप्रभाने तत्काल सुनमि विद्याधराला युद्धात जिंकले. बरोबरच आहे की, दैव अनुकूल असले म्हणजे क्षुद्रपणा व मोठेपणा यांचा काही उपयोग होत नाही ॥ २४३ ॥ Page #592 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-२५२) महापुराण (५४१ प्रवृद्धप्रावृडाररम्भसम्भताम्भोधरावलिम् । विलङध्यानेकपानीकं कौमारं जयमारुणत् ॥ २४४ जयोऽप्यभिमुखीकृत्य विजयाद्धं गजाधिपम् । धीरोद्धतं रुषाप्राप्तं धीरोदात्तोऽब्रवीविदम् ॥ २४५ न्यायमार्गाः प्रवर्त्यन्ते सम्यक सर्वेऽपि चक्रिणा । तेषामेभिर्दुराचारः कृतस्त्वं परिपन्थिकः ॥ २४६ बद्धिमांस्त्वं तवाहार्यबुद्धित्वमपि दूषणम् । कुमार नीयसे पापस्तृतीयं तद्विहितम् ॥ २४७ अन्तःकोपोऽप्ययं पापमहानुत्थापितो वथा । सर्वतन्त्रक्षयो भर्तुः सहसा येन तादृशः॥ २४८ आहवः परिहार्योऽयं मामाद्य भवता सह । अकीतिश्चावयोरस्मिन्नाकल्पस्थायिनी ध्रुवम् ॥२४९ चक्री सुतेषु राज्यस्य योग्यं त्वामेव मन्यते । स्यात्तस्यापि मनःपीडा न वेत्यन्यायवर्तनात् ॥ २५० द्रोग्धुयायस्य भूभर्तुस्तव चैतांस्ततः क्षणात् । दुष्टान्सखेचरान्सन्बिद्धवाद्य भवतोऽपये ॥ २५१ नागमारुह्य तिष्ठात्र काष्ठान्तं प्रार्थितो मया । अन्यायो हि पराभूतिर्न तत्त्यागो महीयसः॥२५२ वर्षाऋतूच्या आरंभी पाण्याने तुडुंब भरलेले व खूप वाढलेले असे जे मेघ त्याप्रमाणे असलेल्या हत्तींच्या सेनेला उल्लंघून कुमार अर्ककीर्तीच्या सैन्याने जयकुमाराला रोखले ॥२४४ ॥ ____ जयकुमाराने देखील आपला विजयाई नामक हत्ती अर्ककीर्तीच्या पुढे उभा केला व धीर आणि उदात्त पण रागावलेल्या कुमाराला धीरोदात्त असा जयकुमार याप्रमाणे बोलला ॥ २४५ ।। चक्रवर्तीने सर्व न्यायमार्ग चांगल्यात-हेने चालू केले आहेत. पण या दुराचरणी लोकांनी तुला त्या न्यायमार्गांचा शत्रु बनविले आहे ।। २४६ ॥ हे कुमार? तू बुद्धिमान आहेस पण तुझ्याठिकाणी आहार्यबुद्धित्व होणे दोष आहे. अर्थात् दुसऱ्यांनी सांगितलेले अनसरून त्याप्रमाणे करणे हा दोष तुझ्याठिकाणी आहे आणि पापी लोकाकडून तू नेला जात आहेस हा तिसरा दोष तुझ्या ठिकाणी आहे. अर्थात् पापी लोकांच्या सल्ल्याने तू वागतोस ।। २४७ ।। या दुष्ट लोकांनी तुझ्या मनात विनाकारण फार मोठा क्रोध उत्पन्न केला आहे व त्यामुळे भरतमहाराजांच्या सर्व सैन्याचा नाश होण्याचा प्रसंग प्राप्त झाला आहे ॥२४८ ॥ ___ माझे तुझ्याशी जे युद्ध चालू आहे ते आजच बन्द करण्यायोग्य आहे. कारण या युद्धाने तुझी आणि माझी कल्पान्तकालापर्यन्त टिकणारी अपकीर्ति अवश्य होईल ॥ २४९ ।। चक्री भरताला पुष्कळ मुले आहेत पण तो तुलाच राज्ययोग्य मानीत आहे या तुझ्या अन्यायाच्या वागणुकीने त्याच्या मनाला पीडा होणार नाही काय? ॥ २५० ॥ भरत महाराजांच्या न्यायमार्गाशी द्रोह करणाऱ्या या तुझ्या दुष्ट लोकाना विद्याधरासह बांधून मी तुझ्या स्वाधीन एका क्षणात करीन ।। २५१ ॥ __मी तुझी प्रार्थना करतो की थोडा वेळपर्यन्त तू या हत्तीवर चढून बैस. महापुरुषानी अन्याय करणे हाच त्यांचा पराभव आहे. अन्यायाचा त्याग करणे हा पराभव नाही ।। २५२॥ Page #593 -------------------------------------------------------------------------- ________________ ५८२) महापुराण (४४-२५३ कुमार समरे हानिस्तवैव महती मया। हन्त्यात्मानमनुन्मत्तः कः स तीक्ष्णासिना स्वयम् ॥ २५३ अभव्य इव सद्धर्ममपकर्पोत्यदीरितम् । आघातयितुमारेभे गजेन स गजाधिपम् ॥ २५४ तदा जयोऽप्यतिक्रुद्धो गजयुद्धविशारदः । नवभिविजयार्द्धन दन्तघातरघातयत् ॥ २५५ नवापि कुपितेभेन्द्रनवदन्ताहतिक्षताः । अष्टचन्द्रार्ककीर्तीनां प्रपेतुर्हन्तदन्तिनः ॥ २५६ चक्रिसूनोः पुनः सेना परितोऽयात्रुयुत्सया। तदा तदायुरिक्षवहः क्षयमपद्यत ॥ २५७ सोढमर्कः खलस्तेजो जयस्याशक्नुवन्निव । जयन् जयोद्गमच्छायां संहृताशेषदीधितिः ॥२५८ शररिवोरारक्तैविमुक्तः खचरान्प्रति । जयी यैः स्वाङ्गसल्लग्नः क्षरत्क्षतजरञ्जितैः ॥ २५९ गतप्रतापः ऋरात्मा सर्वनेत्राप्रियस्तदा । पपात कातरीभूय करालम्बितभूधरः ॥ २६० हे कुमारा, माझ्याकडून तुझ्या सैन्याची मोठी हानि होईल. कोण बरे सावधान मनुष्य तीक्ष्ण तरवारीने आपलाच घात करून घेईल बरे? ॥ २५३ ॥ अभव्य जीव जसे उत्तम धर्माचे श्रवण करीत नाही तसे जयकुमाराचे हे भाषण अर्ककीर्तीने ऐकले नाही आणि आपल्या हत्तीच्या द्वारे जयकुमाराच्या उत्तम हत्तीवर प्रहार करावयास त्याने सुरुवात केली ॥ २५४ ।। त्यावेळी गजयुद्धनिपुणजयकुमार- देखील फार रागावला व त्याने आपल्या विजया नामक हत्तीच्या द्वारे दातांच्या नऊ प्रहारानी अर्ककीर्ती आणि अष्टचन्द्र विद्याधरांच्या नऊ हत्तीना घायाळ करविले ॥ २५५ ॥ जयकुमाराच्या रागावलेल्या विजयार्ध नामक श्रेष्ठ हत्तीच्या नऊ नऊ दातांच्या आघातानी अर्ककीर्ती व अष्टचन्द्र विद्याधरांचे नऊ हत्ती देखील अरेरे घायाळ होऊन जमिनीवर पडले ॥ २५६ ॥ त्यावेळी चक्रवर्तीपुत्राची अर्ककीर्तीची सेना सर्व बाजूनी लढण्याच्या इच्छेने धावत आली व त्यावेळी जणु त्या सेनेचे रक्षण करणारे आयुष्यच की काय असा दिवस नाश पावला, अस्ताला गेला ।। २५७ ।। ___ जयकुमाराचे तेज जणु सहन करण्यास असमर्थ झालेला, जास्वंदीच्या फुलाची जी लाल कान्ति तिला जिंकणारा, ज्याने आपले सर्व किरण आवरून घेतले आहेत असा आपल्या लाल किरणानी सूर्य असा भासतो की, जणु जयकुमाराने विद्याधरावर जे बाण सोडले होते ते सगळेच विद्याधराच्या निघणाऱ्या रक्ताने अनुरंजित होऊन याच्या ( सूर्याच्या) शरीरात जाऊन जणु संलग्न झाले आहेत असा ज्याचा प्रताप- सन्ताप देणे व पराक्रम नाहीसा झाला आहे असा, ज्याचे स्वरूप क्रूर उग्र आहे असा जो सर्वांच्या नेत्राना अप्रिय झाला आहे असा दुष्ट सूर्य भिऊन आपल्या करानी-किरणानी पर्वताला धरून खाली पडला, अस्ताला गेला ॥ २५८-२६० ।। Page #594 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-२६६) महापुराण (५८३ अर्ककोतिस्वकीति वा मत्वा रोषेण भास्करः। अस्तं जयजयस्यायात् कुर्वन्कालविलम्बनम् ॥ २६१ स्फुटालोकोऽपि सवृत्तोऽप्यगादस्तमहर्पतिः । आश्रित्य वारुणी रक्तः को न गच्छत्यधोगतिम् ॥२६२ उदये वधितच्छायो व्याप्य विश्वं प्रतापवान् । दिनेनेनोऽप्यनश्यत्कस्तिष्ठेत्तीवकरः परः॥ २६३ इनं स्वच्छानि विच्छायं तापहारीणि वा भृशम् । द्रष्टुं सरांस्यनिच्छन्ति कजाक्षीणि शुचा व्यधुः॥ जयनिस्त्रिशनिस्त्रिशनिपातपतितान्खगान । प्राविशन्निजनीडानि वीक्षितुं विक्षमाः खगाः॥ २६५ स प्रतापः प्रभा सास्य सा हि सर्वेकपूज्यता। पातः प्रत्यहमर्कस्याप्यतयः कर्कशो विधिः ॥२६६ सूर्याने अर्ककीर्तीला आपल्या कीर्तीप्रमाणे मानले व रागाने त्याने जयकुमाराच्या जयप्राप्तीला काही काळपर्यन्त विलम्ब केला आणि नंतर अस्ताला गेला ॥ २६१ ।। दिवसाचा स्वामी असा हा सूर्य स्पष्ट-स्वच्छ प्रकाशाचा आहे व निर्मल ज्ञानाचा धारक आहे. तसेच तो सद्वृत्त-सदाचाराने युक्त व गोल आहे पण त्याने वारुणीचा-मद्याचा व दुसरा अर्थ पश्चिमदिशेचा आश्रय केला व तो रक्त-आसक्त झाला व रक्त - लाल झाला. त्यामुळे तो अधोगतीला-अस्ताला गेला. मद्यासक्त झालेला मनुष्य जसा अधोगतीला जातो तसा तो सूर्य पश्चिम दिशेचा-हीन दिशेचा आश्रय केल्यामुळे अधोगतीला-अस्ताला गेला ॥२६२॥ सूर्य उदयाला आल्यावर त्याची कान्ति वाढत जाते व सगळ्या जगाला व्यापून तो प्रतापवान् संताप देणारा होतो. पण तो कसे एका दिवसात नाश पावतो? कारण तीव्रकर:तीव्र किरणांचा, प्रखर किरणांचा असूनही नाश पावला. तसा राजा देखील प्रथमतः ऐश्वर्य व कान्तिसंपन्न होतो व आपला पराक्रम सर्वत्र तो पसरतो पण जेव्हां तो तीव्रकर- प्रजेपासून अधिक कर लादून धन उकळतो तेव्हां तो सूर्याप्रमाणे कसा अधिक काल टिकू शकेल ?॥२६३ ।। ___ सन्ताप नाहीसा करणारी अशी स्वच्छ सरोवरे अतिशय कान्तिरहित झालेल्या सूर्याला पाहण्यास इच्छित नव्हती म्हणून त्यानी शोकाने आपले कमलरूपी डोळे मिटून घेतले ।। २६४ ।। जयकुमाराच्या तीक्ष्ण खड्गाच्या प्रहारानी पडलेल्या विद्याधरांना पाहण्यास असमर्थ झालेले खग-पक्षी त्यावेळी आपल्या घरट्यात शिरले ॥ २६५ ।। सूर्याचा तो अपूर्व प्रताप व त्याची अपूर्व- असाधारण कान्ति व त्याच्याविषयी असलेली सर्वांची आदरबुद्धि, हे सर्व गुण असूनही दररोज त्याचे पतन अवश्य होतेच. यावरून देव फार अतळ आणि कर्कश आहे, निष्ठुर आहे असे म्हणावे लागते ॥ २६६ ॥ Page #595 -------------------------------------------------------------------------- ________________ ५८४) महापुराण (४४-२६७ कोयोपमानतां यातो यातोऽर्कश्चेददृश्यताम् । उपमेयस्य का वार्तेत्यवादीद्विदुषां गणः ॥ २६७ दुनिरीक्ष्यः करस्तीक्ष्णः सन्तप्तनिजमण्डलः । अलं कुवलयध्वंसी दुःसुतो दुर्मतिस्तुतः ॥ २६८ निःसहायो निरालम्बोऽप्यसोढा परतेजसाम् । सिंहराशिश्चलः क्रूरः सहसोच्छित्य मूर्षगः ॥ २६९ ---- ............................... कीर्तीमुळे उपमानपणाला सूर्य प्राप्त झाला तरीही जर तो अदृश्यपणाला प्राप्त झाला तर उपमेयाचे वर्णन कशास करावयाचे असे विद्वान् लोक म्हणाले. तात्पर्य- जे उपमान असते त्याच्यात अधिक गुण असतात व जे उपमेय असते त्याच्यात कमी गुण असतात असा काव्यशास्त्राचा नियम आहे. येथे चक्रवर्ती भरताच्या पुत्राचे नांव अर्ककीर्ति आहे. सूर्याप्रमाणे ज्याची कीर्ति आहे असा तो अर्ककीर्ती असा शब्दार्थ होतो. यात उपमान सूर्य आहे व उपमेय चक्रवर्तिपुत्र आहे. गुणाने अधिक असलेल्या उपमानभूत सूर्याचा जर नाश होतो तर उपमेयाचीगुणानी कमी असलेल्या अर्ककीर्तीची काय कथा ? अर्थात त्याचा नाश होईलच असा या श्लोकाचा अभिप्राय आहे ।। २६७ ॥ या वरील चार श्लोकात सूर्याची आणि दुष्ट राजाची तुलना केली असल्यामुळे प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ होतात. त्यात पहिला अर्थ सूर्याकडे लावावा व दुसरा अर्थ दुष्ट राजाकडे लावावा. जो सूर्य करानी-किरणानी तीक्ष्ण आहे म्हणन तो दुनिरीक्ष्यः त्याच्याकडे पाहणे शक्य होत नाही. सूर्याचे मण्डल नेहमी तापलेले असते. तो सूर्य नेहमी कुवलयध्वंसी- पांढऱ्या कमलांचा नाश करणारा असतो. तो सूर्य दुःसुतः- दुष्ट अशा शनिनामक पुत्राने सहित आहे व दुर्मतिस्तुतः- ज्यांची मति-ज्ञान कुमार्गाला लावणारे आहे अशा लोकाकडून सूर्य स्तविला जात आहे व दुसरा अर्थ असा आहे दुष्ट राजा करैः तीक्ष्ण:- प्रजेवर अनेक प्रकारचे कर लादून तीक्ष्णः दुःखदायक होतो. तो कठोर असल्यामुळे त्याचेकडे बघणे लोकाना शक्य होत नाही. तो दुष्ट राजा सन्तप्तनिजमण्डल:- ज्याचे मांडलिक राजे त्याच्याविषयी सन्तप्त झालेले असतात व तो राजा कुवलयध्वंसी- कुवलयाचा-पृथ्वीमण्डलाचा नाशक होतो व तो दुःसुतः- मातेने कष्ट भोगून त्याला जन्म दिलेला असतो आणि तो राजा ज्यांची बुद्धि अनीतिवर्धक आहे अशा लोकाकडून स्तविला जातो ।। २६८ ।। सूर्य निःसहायः- कोणाचा आश्रय घेत नाही व निरालम्बः- आधाररहित असतो आणि परतेजसां असोढा- दुसऱ्या चन्द्र, नक्षत्रादिकांचे तेजाला तो सहन करीत नाही, दुसऱ्याच्या तेजांचा तो घात करतो तो सिंहराशीवर असतो, चल चंचल व क्रूर असतो व उदय पावून मध्याह्नकाली मस्तकावर चढतो व दुष्ट राजा सिंहराशीवर जन्मलेला असतो म्हणून तो चंचल व क्रूर आणि सर्वांच्या डोक्यावर बसलेला असतो ।। २६९ ॥ Page #596 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-२७५) पापरोगी परप्रेर्यो रविविषममार्गगः । रक्तरुक् सकलद्वेषी वर्धिताशोऽक्रमाग्रगः ।। २७० सता बुधेन मित्रेण गुरुणाप्यस्तमाश्रयन् । बहुदोषो भिषग्वर्यैर्दुश्चिकित्स्य इवातुरः ॥ २७१ तदा बलद्वयामात्याः श्रित्वा बद्धरुषौ नृपौ । इत्यधम्यं निशायुद्धमनुबद्ध्य न्यषेधयन् ॥ २७२ ताभ्यां तत्रैव सा रात्रिर्नेतुमिष्टा रणाङ्गणे । भटतीव्रव्रणासह्यवेदनारावभीषणे ।। २७३ प्रतीची येन जायेऽहमगिलत्त महस्करम् । इति सन्ध्याच्छलेनाहस्तत्र कोपमिवागतम् ।। २७४ लज्जे सम्पर्कमर्केण कर्तुं लोचनगोचरे । इयं वेलेति वा सन्ध्याप्यन्वगादात्तविग्रहा ।। २७५ महापुराण सूर्य पापरोगी कुष्टरोगाने पीडित असतो. जेव्हां त्याला शनि नांवाचा मुलगा झाला तेव्हां त्याने सूर्याकडे पाहिले व त्यामुळे त्याला कुष्टरोग झाला. सूर्य परप्रेर्य- अरुण नांवाचा सारथी जिकडे नेईल तिकडे जातो, तो विषममार्गग: - आकाशात तिरकस मार्गाने जातो. सूर्य रक्तरुक्— रक्तपित्त या रोगाने युक्त आहे, सकलद्वेषी - कलानी सहित अशा चन्द्राचा तो द्वेष करतो. तो सूर्य वर्धिताशः - पश्चिम दिशेला वाढविणारा आहे, अक्रमग:- ज्याला पाय नाहीत असा अरुण सारथी त्याने सहित तो असतो व दुष्ट राजाही पापरोगी दुष्ट लोकरूपी रोगाने युक्त असतो. परप्रेर्य - दुष्ट सचिवादिक सांगतील तसे वागणारा, विषममार्गाने जाणारा, रक्तरुग्दुसऱ्याच्या रक्ताची रुचि ज्याला आहे असा व सर्वांचा द्वेष करणारा, वर्धिताशः - ज्याची हाव वाढली आहे असा व अक्रमगः -नीतिक्रमाने न वागणारा असा दुष्ट राजा असतो ॥ २७० ॥ (५८५. उत्तमबुध जो उत्तम मित्राप्रमाणे आहे व उत्तमबृहस्पति- गुरुग्रह यांच्याबरोबर सूर्य अस्ताला गेला. ज्याच्या ठिकाणी वातादिक पुष्कळ दोष उत्पन्न झाले आहेत असा रोगी उत्कृष्ट वैद्याकडून देखील चिकित्सा करण्यायोग्य जसा राहात नाही तसा हा अर्ककीर्ती उत्तम विद्वान् असे मित्र व बृहस्पतीप्रमाणे आदरणीय गुरु यानी युक्त असूनही या युद्धात पराजित झाला ॥। २७१ ॥ त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या बाजूचे प्रधान रागावलेल्या दोन्ही राजाकडे आले व त्यान रात्री युद्ध करणे हे धर्माच्या दृष्टीने निषिद्ध आहे असा नियम करून बंद ठेवले. तेव्हां तीव्र जखमानी असह्य वेदना होऊन वीराच्या आक्रोशानी भयंकर वाटणाऱ्या त्या रणांगणात दोन्ही बाजूच्या राजानी ती रात्र तेथेच घालवावी असे ठरविले ।। २७२-२७३ ।। ज्याच्यामुळे मी उत्पन्न झालो त्या सूर्याला या पश्चिम दिशेने गिळून टाकले म्हणून सन्ध्येच्या मिषाने दिवस जणु तिच्यावर रागावला ॥। २७४ ।। सर्वं लोकांच्या डोळ्याना दिसेल अशा प्रदेशात सूर्याशी सम्पर्क करण्यास मला लाज वाटते असे मानून जणु जिने शरीर धारण केले आहे अशी सन्ध्यावेला देखील सूर्याला अनुसरून निघून गेली ।। २७५ ।। म. ७७ Page #597 -------------------------------------------------------------------------- ________________ ५८६) (४४-२७६ आयादहः पुरस्कृत्य मामर्को रात्रिगामिना । तेन पश्चात्कृतेतीव शोकात्सन्ध्या व्यलीयत ॥ २७६ तमः सर्व तदा व्यापत्क्वचिल्लीनं गुहादिषु । शत्रुशेषं न कुर्वन्ति तत एव विचक्षणाः ॥ २७७ अवकाशं प्रकाशस्य यथात्मानमधात्पुरा । तथैव तमसः पश्चाद्धिङमहत्त्वं विहायसः ॥ २७८ तमोबलात्प्रदीपादिप्रकाशाः प्रदिदीपिरे । जिनेनेव विनेनेन कलौ कष्टं फुलिङ्गिनः ॥ २७९ तमोविमोहितं विश्वं प्रबोधयितुमुद्धृतः । विषिनेव सुधाकुम्भो दौर्वर्णो विधुरुद्ययौ ।। २८० चन्द्रमाः करनालीभिरपिबद्बहुलं तमः । वृद्धकासं क्षयं हन्तुं धूमपानमिवाचरन् ॥ २८१ निःशेषं नाशकद्धन्तुं ध्वान्तं हरिणलाञ्छनः । अशुद्धमण्डलो हन्यानिष्प्रतापः कथं रिपून् ॥ २८२ विधुं तत्करसंस्पर्शाद्भृशमा सन्विकासिभिः । सरस्यो ह्लादयन्त्यो वा मुदा कुमुदलोचनैः ॥ २८३ महापुराण हा सूर्य दिवसाला पुढे करून माझ्याकडे आला. पण रात्रीकडे जाणाऱ्या त्याने मला मागे टाकले म्हणून जणु सन्ध्या शोकाने नाहीशी झाली ।। २७६ । सूर्य अस्ताला गेल्यावर कोठे गुहा वगैरे ठिकाणी दडून बसलेल्या अंधाराने सर्व आकाश व्यापून टाकले म्हणून जे शहाणे असतात ते शत्रूचा कांहीही अंश बाकी ठेवीत नाहीत ॥ २७७॥ आकाशाने जसे प्रकाशाला आपले स्थान दिले होते तसे त्याने आता आपल्या ठिकाणी अंधाराला आश्रय दिला आहे. यास्तव या आकाशाच्या मोठेपणाला धिक्कार असो ॥। २७८ ॥ या कलिकालात जिनेश्वराच्या अभावी अनेक कुलिंगीसाधूंचा प्रसार झाला तसे सूर्याच्या अभावी अंधकारामुळे अनेक दिवे-दिवट्या यांचे प्रकाश पसरू लागले ।। २७९ ।।] अंधकाराने मूढ झालेल्या जगाला जागृत करण्यासाठी जणु ब्रह्मदेवाने हा चांदीचा अमृतकुंभ उंच उचलून धरला आहे असा हा चंद्र उदयाला आला ॥। २८० ।। ज्यात खोकला वाढला आहे अशा आपल्या क्षयरोगाचा नाश करण्यासाठी जणु हा चंद्र आपल्या किरणरूपी नळीच्या द्वारे पुष्कळ अंधाररूपी धूम्राचे पान करीत आहे असे वाटते ।। २८१ ॥ हरिणाचे चिह्न धारण करणारा हा चन्द्र संपूर्ण अंधाराचा नाश करण्यास समर्थ झाला नाही व हे योग्यच आहे. कारण ज्याचे मण्डल ( मांडलिक राजे व दुसरा अर्थ वर्तुळाकार अशुद्ध अन्तःकरणात द्वेष करणारे, दुसरा अर्थ काळे ) आहे व जो निष्प्रताप ( पराक्रमरहित दुसरा अर्थ प्रखर तेजरहित ) आहे तो शत्रूंचा नाश कसा बरे करू शकेल ? ।। २८२ ।। तळयामध्ये चन्द्राच्या किरणस्पर्शानी रात्र - विकासी कमळे अतिशय विकसित झाली होती. जणु ती तळी त्या आपल्या विकसित झालेल्या कमलरूपी नेत्रानी चंद्राला आनंदित करीत आहेत असे वाटते ।। २८३ ।। Page #598 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-२९१) महापुराण (५८७ उत्थितः पिटकोऽस्माकं विधर्गण्डस्य वोपरि।का जीविकेति निविण्णाः प्रायः प्रोषितयोषितः॥२८४ लब्धचन्द्रबलस्योच्चैः स्मरस्य परितोषिणः । अट्टहासे इवाशेषं सान्द्रश्चन्द्रातपोऽतत ॥ २८५ रूढो रागाडकुरश्चित्ते प्रम्लानो भानुभानुभिः। तदा चन्द्रिकया प्राज्यवृष्टयेवावर्द्धताङ्गिनाम् ॥२८६ खण्डितानां तथा तापो नाभूद्भास्कररश्मिभिः । यथांशुभिस्तुषारांशोविचित्रा द्रव्यशक्तयः ॥ २८७ खण्डनादेव कान्तानां ज्वलितो मदनानलः । जाज्वलीत्ययमेतेनेत्यत्यजन्मषु काश्चन ॥ २८८ वृथाभिमानविध्वंसि नापरं मधुना विना । कलहान्तरिताः काश्चित्सखीभिरतिपायिताः ॥ २८९ प्रेम नः कृत्रिमं नेतत्किमनेनेति काश्चन । दूरादेवात्यजस्निग्धाः श्राविका वासवादिकम् ॥ २९० । मधु द्विगुणितं स्वादु पीतं कान्तकरापितम् । कान्ताभिः कामदुर्वारमातंगमदवर्धनम् ॥ २९१ __ज्याना पतिवियोग झाला आहे अशा स्त्रिया चन्द्राला पाहून म्हणाल्या की हा चन्द्र जणु आमच्या गालावर मोठा फोड उत्पन्न झाला आहे. आता आम्ही कसच्या जगतो म्हणून त्या खिन्न झाल्या ॥ २८४ ।। मला जणु चन्द्रापासून सामर्थ्य प्राप्त झाले अशा विचाराने मदनाला फार आनंद वाटला. अशा त्या मदनाचा जणु अट्टाहासच असे चन्द्राचे दाट चान्दणे-चन्द्राचा दाट प्रकाश चोहीकडे पसरला ॥ २८५ ॥ जो प्रेमाङकुर सूर्याच्या किरणानी म्लान झाला होता तो रात्री जणु उत्कृष्ट जलवृष्टीप्रमाणे असलेल्या चन्द्राच्या प्रकाशाने पुनः प्राण्यांच्या मनात वाढला, टवटवीत झाला ।। २८६ ॥ ज्यांचा पतीनी मानभंग केला आहे अशा स्त्रियांचा मदनाग्नि- ताप सूर्याच्या किरणानी तीव्र झाला नाही पण चन्द्राच्या किरणानी तो फार वाढला. यावरून द्रव्याच्या शक्ति विचित्र आहेत हे सिद्ध होते ।। २८७ ॥ आपल्या पतीने मानभंग केल्यामुळे मदनाग्नि प्रज्वलित झालेला आहे. तो मद्य प्राशनामुळे जास्ती भडकेल म्हणून जणु काही स्त्रियानी मद्याचा त्याग केला ॥ २८८॥ ___ या दारूशिवाय हा व्यर्थ अभिमान रुसवा नाहीसा होणार नाही म्हणून ज्याना कलहाने पतिवियोग झाला आहे अशा स्त्रियाना त्यांच्या मैत्रिणीनी खूप दारू पाजली ।। २८९॥ आमचे पतीवरचे प्रेम कृत्रिम नाही मग या मद्याची काय आवश्यकता आहे म्हणून काही स्नेहयुक्त श्राविकानी मद्यादिक मादक पदार्थाचा दुरूनच त्याग केला ॥ २९० ॥ कित्येक तरुण स्त्रियानी प्रियपतीने आपल्या हाताने दिलेले व कामरूपी अनावर झालेल्या हत्तीची मस्ती वाढविणारे मधुर मद्य दुप्पट प्राशन केले ॥ २९१ ॥ Page #599 -------------------------------------------------------------------------- ________________ ५८८) महापुराण (४४-२९२ इत्याविर्भावितानङ्गरसास्ताः प्रियसङ्गमात् । प्रीति वाग्गोचरातीतां स्वीचऋर्वक्रवीक्षणाः॥ २९२ तत्र काचित्प्रियं वीक्ष्य कथाशेषं द्विषच्छरैः । स्वयं कामशरैरक्षताङ्गो चित्रमभूयसुः ॥२९३ क्षतैरनुपलक्ष्याङ्गं वीक्ष्य कान्तमजानती । परा परासुतां प्रापज्ज्ञात्वात्मविहितवणः ॥ २९४ मया निवारितोऽप्याया वीरलक्ष्मीप्रियः प्रियः । तत्कठोरवणरेवं जातोऽसीत्यमतापरा ॥ २९५ मां निवार्य सहायान्ती कीति स्वीकर्तुमागमः । निर्मलेति विपर्यस्तो जानन्नपि बहिश्चरीम् ॥२९६ स्थिता तत्रैव सा कीतिः किं वदन्ति नरोऽन्तरम् । इति सासूयमुक्त्वान्या प्रायासी प्रियपद्धितम् ॥ न कि निवारिताप्यायां त्वया साधं विचेतना। सन्निधौ मे किमेवं त्वां नयन्ति गणिकाधमाः ॥२९८ अस्तु किं यातमद्यापि तत्र त्वां न हराणि किम्। विलप्येवं कलालापा काचित्कान्तानुगाभवत् ॥ २९९ याप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी कामरस उत्पन्न झाला आहे व ज्या वक्रकटाक्ष फेकून पतीकडे पाहात आहेत अशा त्या तरुणस्त्रियानी पतीच्या सहवासापासून शब्दानी न सांगता येणान्या सुखाचा उपभोग घेतला ।। २९२ ।। त्या रणभूमीत कोणी एक स्त्री शत्रूच्या बाणानी आपल्या पतीची फक्त कथाच उरली आहे असे पाहून स्वतः मदनाच्या बाणानी जिचे शरीर जखमी झाले नाही अशी असताही ती आपोआप प्राणरहित झाली, मरण पावली हे आश्चर्य आहे ।। २९३ ॥ अनेक जखमानी ज्यांचे शरीर ओळखता येत नाही अशा आपल्या पतीला पाहून आपणच केलेल्या नख आणि दात यांच्या जखमानी हा मरण पावला आहे असे जाणून दुसरी 'एक स्त्री प्राणरहित झाली ॥ २९४ ॥ हे प्रिय, तुला वीरलक्ष्मी प्रिय असल्यामुळे मी निवारण केले असताही तू गेलास पण तिच्या कठोर व्रणानी तुझी अशी परिस्थिति झाली असे म्हणून ती स्त्री मरण पावली ॥२९५॥ हे प्रिय, मी तुझ्याबरोबर येण्यासाठी निघाले असता मला निवारण करून कीर्ति स्त्रीचा स्वीकार करण्यास तू निघून गेलास व ती बाहेर फिरणारी आहे असे जाणूनही ती निर्मल आहे, निर्दोष आहे असा तुला भ्रम झाला व तू तिचा स्वीकार करण्यास गेलास पण ती तेथेच राहिली. काय पुरुष आपल्या हृदयातले सांगतात? याप्रमाणे ईयेने बोलून ती आपल्या पतीच्या मार्गाला अनुसरली अर्थात् तो परलोकी गेला असल्याने तिनेही त्याचीच वाट स्वीकारली ।। २९६-२९७ ॥ हे प्रिय, आपण तरी नको म्हटले तरी मी आपणाबरोबर येणार नाही काय? दीन खिन्न होऊनही मी आपणाबरोबर येईनच व मी जवळ असताना हे प्रिय तुला या नीच वेश्या ओढून नेत आहेत काय? असो, अद्यापि कांही बिघडले नाही. मी तेथे येऊन तुला त्यांच्यापासून तुझे हरण करून परत आणणार नाही काय? अवश्य आणीन. याप्रमाणे विलाप करून मधुर स्वरांची कोणी स्त्री आपल्या पतीच्या मागून गेली ।। २९८-२९९ ॥ Page #600 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-३०७) महापुराण (५८९ शरनिभिन्नसर्वाङ्गः कीलितासुरिवापरः । कान्तागमं प्रतीक्ष्यास्त लोचनस्थितजीवितः ॥ ३०० कोपदष्टविमुक्तोष्ठं कान्ते वालोक्य कामिनी । वीरलक्षम्या कृतासूया क्षणकोपासुमत्यजत् ॥३०१ हृदि निभिन्ननाराचो मत्वा कान्तां हृदि स्थिताम् । हा मृतेयं वराकोति सद्यः प्राणान्व्यसर्जयत् ॥ शस्त्रसंभिन्न सर्वाङ्गमन्तको नेतुमागतः । कान्ताचिन्तापरं कंतुस्तद्धस्तावहृतापरम् ॥ ३०३ कण्ठेनालिङ्गितः प्रेमशोकाभ्यां प्रियया परः। ध्यात्वा तां त्यक्तदेहोऽगानिर्वाणं सवणस्तया ॥३०४ श्वः स्वर्गे कि किमत्रव सन्मो नौ न संशयः । तत्र त्वं बहकान्तोद्य रमेऽन्येत्याह सवणम् ॥३०५ अत्र वामन बासोस्तु किं तया चिन्तयावयोः। वियोगः क्वापि नास्तीति कान्तां कान्तमतर्पयत् ।। सवतो वोरलक्ष्मी च कीति चैहि चिरायुषा । हन्तु मामेव कामोऽयमिति कान्तावदQषा ॥ ३०७ ___ बाणानी ज्याचे सर्व शरीर विदीर्ण झाले आहे व त्या बाणानी जणु त्याचे प्राण जखडल्यासारखे झाले आहेत असा कोणी वीर आपल्या डोळ्यात प्राण धारण करून आपल्या पत्नीच्या येण्याची वाट पाहात राहिला होता ।। ३०० ॥ ज्याने आपला ओठ कोपाने चावून सोडला आहे अशा आपल्या पतीला पाहून जिला थोडा वेळ राग आला आहे अशा कोण्या स्त्रीने वीरलक्ष्मीबरोबर द्वेष करून प्राण त्यागले ॥ ३०१ ॥ ज्याच्या छातीत बाण घुसला आहे असा कोणी वीर आपल्या हृदयात आहे असे समजून ती बिचारी मरण पावली असे समजून त्या वीराने तत्काल प्राण सोडले ।। ३०२ ।। शस्त्रानी ज्याचे सर्व अंग भिन्न-विदीर्ण झाले आहे अशा कोणी वीराला यम नेण्यासाठी आला पण आपल्या पत्नीचे मनात चिन्तन करीत होता म्हणून त्यावेळी मदन तिथे आला व त्याने त्याच्या हातातून त्या वीराला सोडविले ॥ ३०३ ॥ प्रेम आणि शोक यासह एका प्रियेने आपल्या पतीला कंठालिंगन केले होते. त्या जखमी वीराने तिचे चिन्तन करीत देह त्यागला व तिच्यासह स्वर्गाला गेला ।। ३०४ ॥ हे प्रिय जीवितेश्वरा, उद्या स्वर्गात काय आपला संगम होईल ? हे संशययुक्त आहे. म्हणून आपणा दोघांचा येथेच संगम होवो व यात काही संशय नाही. स्वर्गात पुष्कळ स्त्रियानी तू युक्त होशील म्हणून व्रणयुक्त अशा तुझ्याबरोबर मी रमेन असे एक स्त्री आपल्या पतीला बोलली ॥ ३०५ ॥ या लोकी राहणे असो किंवा परलोकी राहणे असो त्या चिन्तेशी आमचे काय प्रयोजन आहे ? तुझा आणि माझा कोठेही वियोग होणार नाही असे बोलून कोण्या स्त्रीने आपल्या पतीला संतुष्ट केले ॥ ३०६ ॥ हे प्रिय, आपण व्रतधारी आहात. आपण वीरलक्ष्मीला आणि कीर्तीला मिळवा पण मी दीर्घायुषी असल्याने मला मदन मारो असे कोणी स्त्री रागाने आपल्या पतीला म्हणाली ॥३०७॥ Page #601 -------------------------------------------------------------------------- ________________ ५९०) महापुराण (४४-३१५ जयस्य विजयः प्राणस्तवैवैतद्विनिश्चितम् । सवतावद्य यास्यावो दिवमित्यब्रवीत्परा ॥ ३०८ शराः पौष्पास्तव त्वं च संयुक्तेष्वतिशीतलः । तत्र विज्ञातसारोऽसि पुरुषेभ्यो भयं तव ॥ ३०९ आयसाः सायकाः काम त्वमप्यस्माकमन्तकः । इति काम समुद्दिश्य खण्डिताः स्वगतं जगः ॥३१० सा रात्रिरिति संल्लापैः प्रेमप्राणेरनीयत । तावत्सन्ध्यागता रागात्राक्षसीवेक्षितुं रणम् ॥ ३११ प्रभातानककोटीनां निःस्वनः सेनयोः समम् । आक्रामति स्म दिक्चक्रमक्रमेणोच्चरंस्तदा ॥ ३१२ प्रतीच्यापि युतश्चन्द्रो मयैवोदेति भास्करः । इति स्नेहादिव प्राची प्रागभादुक्याद्रवेः॥ ३१३ सरसां कमलाक्षिभ्यः प्रबुद्धानां तदा मुदा । निर्ययो स्वार्थमादाय निद्रव भ्रमरावली ॥ ३१४ गतायां स्वेन सडकोचं पद्मिन्यां स्वोदये रविः । लक्ष्मी निजकरणोच्चविदधे सा हि मित्रता ॥ ३१५. हे प्रिय, या जयकुमाराला तुझ्या प्राणानीच विजय मिळणार आहे हे निश्चित आहे. म्हणून व्रतधारण करणारे आपण दोघेही स्वर्गाला जाऊ असे एका स्त्रीने आपल्या पतीला सांगितले ॥ ३०८ ॥ हे मदना, तुझे बाण फुलांचे आहेत व तू संयुक्त असलेल्या स्त्री पुरुषाविषयी अगदीच थंड आहेस. यास्तव त्या स्त्री-पुरुषाविषयी तुझे बल किती आहे हे आम्ही ओळखले आहे व तू पुरुषाना भितोस कारण त्यांचे बाण लोखंडाचे असतात. पण तू आम्हाला मात्र यम आहेस असे कामाला उद्देशून खंडित-स्त्रिया. (पतीने ज्यांचा अपमान केला आहे ) मनात म्हणाल्या ॥ ३०९-३१०॥ प्रेम हेच ज्यांचा प्राण आहे अशा स्त्री-पुरुषानी या प्रकारच्या भाषणानी ती रात्र घालविली. यानन्तर सन्ध्यावेळा झाली व सर्वत्र लाल रंग पसरला आणि राक्षसीप्रमाणे संध्याही रण पाहण्यासाठी आली ॥ ३११ ॥ त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्यात प्रातःकाली कोटयवधि नगाऱ्यांच्या शब्दानी एकदम सर्व दिशामंडलाला व्यापून टाकले ॥ ३१२ ॥ जरी चंद्र पश्चिम दिशेशी युक्त आहे तरीही सूर्य माझ्याशी युक्त राहूनच उदय पावतो म्हणून सूर्योदयाच्या पूर्वीच पूर्वदिशा जणु स्नेहामुळे फार शोभू लागली ॥ ३१३ ॥ ___ त्यावेळी जणु जागे झालेल्या सरोवराच्या कमलरूपी डोळ्यापासून जणु निद्रेसारखी असलेली भुग्यांची पंक्ति आपला स्वार्थ म्हणजे मकरंद घेऊन बाहेर पडली ।। ३१४ ॥ आपल्या अस्तामुळे म्लान झालेल्या पद्मिनीच्या ठिकाणी सूर्य उगवल्यानंतर आपल्या करानी-किरणानी दु. अ, हातानी लक्ष्मीला-शोभेला दु. अ. संपत्तीला त्याने ठेवले हे योग्यच झाले. यालाच मित्रपणा म्हणतात ॥ ३१५ ॥ Page #602 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-३२३) महापुराण (५९१ रक्तः करैः समाश्लिष्य सन्ध्यां सद्यो व्यरज्यत । वदन्निव रवि गान्पर्यन्तविरसान्स्फुटम् ॥ ३१६ पर्यष्वजोत्पुरता स्वां सन्ध्यामिति सेय॑या। रवि रक्तमपि स्थित्यै प्राच्यक्षमत न क्षणम्॥३१७ शयित्वा वीरशय्यायां निशां नीत्वा नियामिनः । स्नात्वा सन्तपिताशेषदीनानाथवनीपकाः ॥३१८ अञ्चित्वा विधिना स्तुत्वा जिनेन्द्रांस्त्रिजगन्नतान् । अतिष्ठन्नायकाः सर्वे परिच्छिद्य रणोन्मुखाः ॥ अरिजयाख्यमारुह्य रथं श्वेताश्वयोजितम् । गृहीत्वा वज्रकाण्डं च वत्तं यच्चक्रिणा पुरा ॥३२० बन्दिमागधवृन्देन वन्द्यमानाङ्कमालिकः । गजध्वजं समुत्थाप्य जयलक्ष्मीसमुत्सुकः ॥ ३२१ जयो ज्यास्फालनं कुर्वन्कृतान्तविकृताकृतिः। द्विपानां भीषणस्तस्थौ दिशामप्याहरन्मदम् ॥ ३२२ उपोदयायशस्कीतिरकोतिश्च्युतच्छविः । कारागारमिवाध्यास्य स्यन्दनं मन्दवाजिनम् ॥ ३२३ रक्त -प्रेम करणारा-दु. अ. रक्तवर्णयुक्त असा सूर्य आपल्या किरणानी सन्ध्येला आलिंगून जणु हे भोगाचे पदार्थ शेवटी खरोखर विरस असतात असे जणु बोलणारा तो तत्काल विरक्त झाला ॥ ३१६ ॥ ह्या सूर्याने आल्याबरोबर आधी संध्येला आलिंगन दिले म्हणून जणु ईयेने पूर्वदिशेने आसक्त असलेल्या अशाही त्याला आपल्याजवळ क्षणपर्यन्तही राहू दिले नाही ॥ ३१७ ।। ___ व्रतपालनात तत्पर अशा वीरपुरुषांनी ती सर्व रात्र वीरशय्येवर घालविली. नंतर त्यानी स्नान केले दीन, अनाथ अशा याचकाना त्यानी दान देऊन संतुष्ट केले. योग्य विधीने त्रैलोक्य ज्याच्या चरणी नम्र झाले आहे अशा जिनेश्वराची त्यानी विधीपूर्वक पूजा व स्तुति केली. नंतर ते सर्व श्रेष्ठ वीरनायक आपल्या सैन्याची विभागणी करून युद्धासाठी सज्ज झाले ॥ ३१८-३१९ ।। यानंतर ज्याला पांढरे घोडे जोडले आहेत अशा अरिञ्जय नामक रथावर जयकुमार बसला व पूर्वीच चक्रवर्तीने दिलेले वज्रकाण्ड नांवाचे धनुष्य त्याने घेतले. भाट व मागध-स्तुति पाठक यांच्या समूहाकडून ज्याच्या पराक्रमादिगुणांचे वर्णन केले गेले असा तो जयकुमार जयलक्ष्मी मिळविण्याविषयी उत्सुक झालेला होता व त्याची आकृति यमाप्रमाणे भयंकर झालेली होती. तेव्हा त्याने आपल्या हातातील धनष्याच्या दोरीचा टंकार केला तेव्हा त्या भयंकर टंकाराने आठ दिशांच्या मुख्य गजांच्या मदाचा-मस्तीचाही नाश झाला ॥ ३२०-३२२॥ ज्याच्या अपकीर्तीचा उदयकाल जवळ आला आहे व त्यामुळे ज्याची देहकान्ति नाहीशी झाली आहे, असा अर्ककीर्तिकुमार ज्याचे घोडे मंद गमन करीत आहेत व जो तुरुंगाप्रमाणे वाटत आहे अशा रथात बसला. नष्ट झालेल्या चन्द्राप्रमाणे निस्तेज दिसणा-या अष्ट चन्द्रविद्याधर राजे ज्याचे मित्र आहेत असा तो अर्ककीर्ति भावी अनिष्ट सुचविणा-या धूमकेतुप्रमाणे दिसणारे चक्रचिह्नाने युक्त अशा ध्वजाने युक्त होता. उलट वाहणा-या वान्यामुळे ज्यांचा वेग बंद झाला आहे व देवतांचा घात करण्यास कारण अशा बाणानी जो दिवसाच्या मध्यभागी आलेल्या सूर्याप्रमाणे भासत असलेल्या जयकुमारावर प्रहार करीत आहे असा अर्ककोति युद्धाला निघाला. दुष्ट कर्माने ज्याला पुढे ढकलले आहे असा तो अर्ककोति Page #603 -------------------------------------------------------------------------- ________________ ५९२) महापुराण (४४-३२४ अष्टचन्द्रान्सखोकुर्वन् नष्टचन्द्रोपमायुधः । सोत्पातकेतुसङ्काशचक्रकेतूपलक्षितः ॥ ३२४ प्रत्यायातमहावातविहतस्वजवैः शरैः । विध्यन्मध्यन्दिनाकं वा सुमनःक्षतहेतुभिः ॥ ३२५ जयं शत्रुदुरालोकं ज्वलत्तेजोमयं स्मयात् । कलभो वागमद्वारि प्रेरितः खलकर्मणा ॥ ३२६ जयोऽपि शरसन्तानघनीकृतघनाधनः । सहार्ककोतिमर्केण कुर्वन्विनिहतप्रभम् ॥ ३२७ प्रतीयायान्तरे छिन्दरिपुप्रहितसायकान् । शराश्चास्य पुरो धावन्नध्नस्येवोदयेऽशवः ॥ ३२८ अच्छेत्सीच्छस्त्रमस्त्राणि वैजयन्ती च दुर्जयः । जयोऽर्ककीर्तेरौद्धत्यं विहत्य विनिनीषया ॥३२९ अष्टचन्द्रास्तदाभ्येत्य विद्याबलविजृम्भणात् । न्यषेधयञ्जय स्येषूनम्भोदा वा रवेः करान् ॥ ३३० भुजबल्यादयोऽभ्येयोद्धं हेमाङ्गदं धा । सानुज सिंहसङ्घातं सिंहसङ्घ इवापरः ॥ ३३१ सानजोऽनन्तसेनोऽपि प्राप मेघस्वरानुजान् । आङ्गकेयो यूथा यथः कलिङ्ग-जमतङ्गजान् ॥ ३३२ अन्येऽप्यन्यांश्च भूपाला भूपालान्कोपितास्तदा । अभिपेतुः कुलाद्रीन्वा सञ्चलन्तः कुलाद्रयः ॥३३३ हत्तीचा बच्चा जसा त्यालाच पकडण्यासाठी केलेल्या खळग्याकडे जातो त्याप्रमाणे युद्धाला निघाला ॥ ३२३-३२६॥ वाणांच्या वृष्टीने ज्याने मेघालाही घट्ट केले आहे अर्थात् जयकुमाराने बाणवृष्टि करून आकाशात मेघाचे जण छत बनविले व सूर्यासह अर्ककीर्तीला त्याने कांतिरहित केले ।। ३२७ ॥ व शत्रने सोडलेल्या बाणाना मध्येच अन्तराळामध्ये जयकुमाराने तोडले व अशा रीतीने जयकुमाराने शत्रूवर हल्ला केला व सूर्याचे किरण जसे उदयाचे वेळी पुढे जातात तसे या जयकुमाराचे बाण पुढे जात असत अर्थात् याच्या बाणाना शत्रू मध्येच तोडून टाकीत नसे ॥ ३२८॥ ___ ज्याला जिंकणे कठिण आहे अशा जयकुमाराने अर्ककीर्तीचा उद्धतपणा नाहीसा करून त्याच्या ठिकाणी पराजय उत्पन्न करण्याच्या इच्छेने त्याचे शस्त्र, त्याची अस्त्रे व त्याच्या ध्वजालाही तोडून टाकले ॥ ३२९ ॥ जसे मेघ सूर्याच्या किरणाना अच्छादतात तसे अष्टचंद्र विद्याधर तेथे येऊन त्यानी विद्येच्या बलाला वाढवून जयकुमाराच्या बाणाना प्रतिबंध केला ॥ ३३० ॥ जसे एक सिंहांचा समूह दुसऱ्या सिंहसमुहावर हल्ला करतो तसे अर्ककीर्तीच्या भुजबलि वगैरे भावानी आपल्या धाकट्या भावासह असलेल्या हेमांगदावर लढण्यासाठी क्रोधाने चाल केली, आक्रमण केले ॥ ३३१ ॥ जसे अंगदेशाचे हत्ती कलिंगदेशाच्या हत्तीवर चाल करून जातात तसे आपल्या धाकट्या भावाना बरोबर घेऊन अनन्तसेनाने मेघस्वराच्या-जयकुमाराच्या भावावर हल्ला केला. त्यावेळी जसे चालणारे कुलपर्वत दुसऱ्या कुलपर्वतावर चालून जातात तसे इतर राजे देखिल आपले प्रतिपक्षी असलेल्या राजावर क्रोधाने धावून गेले ॥ ३३२-३३३ ॥ Page #604 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-३४१) महापुराण (५९३ नास्त्येषामोदशी शक्तिविद्येयमिति विद्यया । जयो युद्धाय सन्नद्धस्तदा मित्रभुजङ्गमः ॥ ३३४ विदित्वा विष्टराकम्पाज्जयं सम्प्राप्य सादरः। नागपाशं शरं चालचन्द्रं दत्वा ययावसौ ॥ ३३५ तं सहस्रसहस्रांशुस्फुरवंशुप्रभास्वरम् । कौरवः शरमादाय वज्रकाण्डे प्रयोजयन् ॥ ३३६ हत एव सुतोभर्तुर्भुवोऽनेनेति सम्भ्रमम् । नरविद्याधराधोशा महान्तमुदपादयन् ॥ ३३७ रयान्नव तथा दुष्टानष्टचन्द्रान्ससारथीन् । स शरो भस्मयामास शस्त्राणि च यथाशनिः ॥ ३३८ छिन्नदन्तकरो दन्तीवान्तको वा हतायुधः। भग्नमानः कुमारोऽस्थाद्धिक्कष्टं चेष्टितं विधेः॥३३९ इति दन्तग्रहं वीरं गजं वा पादपाशकः । अपायुवेरुपाय विधिज्ञस्तमजीग्रहत् ॥ ३४० तच्छौयं यत्पराभूतेः प्राक् प्राप्तपरिभूतिभिः। यत्पश्चात्साहसं घाष्टर्यात् स द्वितीयः पराभवः॥३४१ ____ माझ्या पक्षाच्या लोकात याना जिंकण्याचे असे सामर्थ्यही नाही व अशी विद्याही नाही. यास्तव या अर्ककीर्त्यादिकाना विद्येच्या द्वारेच जिंकावे असा विचार जयकुमाराने केला व त्या अर्ककीर्त्यादिकाबरोबर स्वतः लढण्यास तयार झाला. त्यावेळी त्याचा मित्र असलेल्या नागकुमाराने आसनकम्पनाने हे जाणले व तो जयकुमाराकडे आदराने प्राप्त झाला-आला व त्याने जयकुमाराला नागपाश दिला व अर्धचन्द्र नांवाचा बाण दिला. यानंतर तो स्वस्थानी गेला ॥ ३३४-३३५ ॥ हजारो सूर्याच्या चमकणाऱ्या किरणाप्रमाणे कान्तिसंपन्न असा बाण कौरवाने-कुरुवंशी जयकुमाराने आपल्या वज्रकाण्ड नामक धनुष्याला जोडला ॥ ३३६ ॥ त्यावेळी या बाणाने षट्खण्डपृथ्वीचा स्वामी अशा भरताचा पुत्र मरणारच असे जाणून भूमिगोचरीराजे व विद्याधरराजे यांच्यात मोठा क्षोभ उत्पन्न झाला ॥ ३३७ ॥ ___जशी वीज पडली असता पर्वतादिक नष्ट होतात तसे त्या बाणाने नऊ रथ, दुष्ट असे आठ चन्द्रनामक विद्याधर व त्याचे सर्व सारथी व सर्व शस्त्रे याना भस्म करून टाकले ।। ३३८ ॥ ज्याचे दात व सोंड तुटले आहेत अशा हत्तीप्रमाणे किंवा ज्याचे शस्त्र नष्ट झाले आहे अशा यमाप्रमाणे अर्ककीर्ति मानरहित झाला. अरेरे दुःख देणाऱ्या दुर्दैवाच्या कृतीला धिक्कार असो ॥ ३३९ ॥ जसे शस्त्ररहित पण उपाय जाणणारे लोक पायांच्या फाशानी हत्तीच्या दाताना बांधून वीरहत्तीना पकडतात त्याप्रमाणे उपाय जाणणान्या जयकुमाराने अर्ककीर्तीला पकडले ॥३४०।। पराभव प्राप्त होण्यापूर्वी लढण्याला शौर्य म्हणतात. पण पराभव ज्याचा झाला आहे अशा लोकानी पुनः निर्लज्जपणाने जे साहस करणे तो दुसरा पराभव होय ॥ ३४१ ॥ म. ७८ Page #605 -------------------------------------------------------------------------- ________________ ५९४) महापुराण (४४-३४२ सोऽन्वयः स पिता तादृक् पदं सा सैन्यसंहतिः । तस्याप्यासीदवस्थेयमन्मार्गः कं न पीडयेत् ॥३४२ वीरपट्टेन बद्धोऽयं चक्रिणानेन तत्सुतः । व्रणपट्टपदं नीतः पश्य कार्यविपर्ययम् ॥ ३४३ पतत्पतङ्गसङ्काशमर्ककीर्तिमनायुधम् । स्वरथे स्थापयित्वोच्चरारुह्यानेकपं स्वयम् ॥ ३४४ विपक्षखगभूपालान्नागपाशेन पाशिवत् । निष्पन्दं निजितारातिय॑मंसीसिहविक्रमान् ॥ ३४५ इति सौलोचने युद्धे समिद्धे शमिते तदा । पपात पञ्चभूजेभ्यो वृष्टिः सुमनसां दिवः ॥ ३४६ जयश्रीजयस्वामितनूजविजयाजिता । नोत्सेकायेति नास्यैनं अपैव प्रत्युताश्रयत् ॥ ३४७ जयनास्थानसंग्रामजयायातेति लज्जया । दूरीकृतेति तत्कोतिदिगन्तमगमत्तदा ॥ ३४८ अकम्पनमहीशस्य यूथेशं वा वनद्विपः । भूपैः संथमितैः सार्धमर्ककोति समर्प्य सः ॥ ३४९ तो प्रसिद्ध व उच्च असा इक्ष्वाकुवंश, षट्खण्डाचा स्वामी असा भरतचक्रवर्ती ज्याचा पिता, स्वतःला प्राप्त झालेले युवराजपद व अवर्णनीय सामर्थ्यशाली अशी सेना, हे ज्याचे आहेत अशा या अर्ककीर्तीची अशी दुरवस्था झाली. यावरून हे सिद्ध होते की वाईट मार्ग कोणाला बरे पीडा देत नाही ।। ३४२ ॥ या भरतचक्रवर्तीने जयकुमाराला वीरपट्ट बांधला होता. पण या जयकुमाराने त्याच्या पुत्राला व्रणपट्ट बांधला, हे राजा श्रेणिका हा कार्यविपर्यास पाहा ॥ ३४३ ॥ ज्याच्या हातात शस्त्र राहिले नाही, ज्याची अवस्था अस्ताला जात असलेल्या सूर्यासारखी तेजोहीन झाली आहे, अशा अर्ककीर्तीला जयकुमाराने आपल्या रथात आणून ठेवले व आपण एका उंच हत्तीवर बसला ॥ ३४४ ॥ __ ज्याने शत्रूला जिंकले आहे अशा या जयकुमाराने सिंहाप्रमाणे पराक्रमी असलेल्या शत्रुपक्षीय राजाना नागपाशाने हालता येणार नाही असे जखडून बांधले ।। ३४५ ॥ याप्रमाणे सुलोचनेमुळे पेटलेले हे युद्ध जेव्हां शांत झाले त्यावेळी मंदार, पारिजात, नमेरु, संतान व हरिचन्दन या पाच प्रकारच्या कल्पवृक्षांच्या फुलांची स्वर्गातून वृष्टि झाली ।। ३४६ ।। जिंकण्याला कठिण अशा भरतचक्रवर्तीच्या पुत्रावर विजय मिळविल्यामुळे प्राप्त झालेली ही जयलक्ष्मी जयकुमाराला गर्वाला कारण झाली नाही. पण उलट ती लज्जेला कारण झाली ।। ३४७ ॥ . अयोग्यसमयी युद्ध केल्यामुळे प्राप्त झाली म्हणून जणु लज्जेने दूर केलेली या जयकुमाराची र्कीति त्यावेळी दिगन्तरी गेली ॥ ३४८ ।। जसा एखादा मुख्यकळपाचा नायक हत्ती त्याच्या इतर हत्तीसह एखाद्याच्या स्वाधीन केला जातो तसा नागपाशानी बांधलेल्या इतर राजासह अर्ककीर्तीला जयकुमाराने अकम्पन राजाच्या स्वाधीन केले ॥ ३४९ ।। Page #606 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-३५७) महापुराण विजयार्द्धमहागन्धसिन्धुरस्कन्धसन्धृतः । निर्भत्सितोदयक्ष्माभन्मर्षस्थब्रध्नमण्डलः ॥ ३५० रणभूमि समालोक्य समन्ताद्बहुविस्मयः । मृतानां प्रेतसंस्कारं जीवतां जीविकाक्रियाम् ॥ ३५१ कारयित्वा पुरीं सर्वसम्मदाविष्कृतोदयाम् । प्राविशत्प्रकटेश्वर्यः सहमेघप्रभादिभिः॥ ३५२ अकम्पनोऽप्यनुप्राप्य वृतैरन्तःसमाकुलः । राजकण्ठीरवैर्धाम राजपुत्रशतैः पुरम् ॥ ३५३ सरक्षान्धृतभूपालान्कुमारं च नियोगिभिः । आश्वास्याश्वासकुशलर्यथास्थानमवापयत् ॥ ३५४ विचिन्त्य विश्वविघ्नानां विनाशोऽर्हत्प्रसादतः । इति वन्दितुमाजग्मुः सर्वे नित्यमनोहरम् ॥ ३५५ दूरादेवावरुह्यात्मवाहेभ्यः शान्तचेतसः । परीत्यार्थ्याभिरागत्य तुष्टुवस्तुतिभिजिनान् ॥ ३५६ जयोऽपि जगदीशानमित्याप्तविजयोदयः । अस्तावीदस्तकर्माणं भक्तिनिर्भरचेतसा ॥ ३५७ विजया नांवाच्या महान्मत्त हत्तीच्या खांद्यावर ज्याने आरोहण केले आहे व उदय पर्वताच्या मस्तकावर-शिखरावर विराजमान झालेल्या सूर्याला आपल्या शोभेने ज्याने तिरस्कृत केले आहे अशा जयकुमाराने सर्व बाजूनी रणभूमीचे निरीक्षण केले त्यामुळे त्याला मोठे आश्चर्य वाटले, त्याने तेथे मेलेल्यांच्या प्रेतांचा संस्कार करविला व जे जिवंत होते त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था त्याने करविली. यानंतर सर्वांना आनंद झाल्यामुळे जिचा उत्कर्ष झाला आहे अशा त्या नगरीत ज्यांचे ऐश्वर्य प्रकट झाले आहे अशा जयकुमाराने मेघप्रभादिक आपल्या आप्तजनासह प्रवेश केला ।। ३५०-३५२ ॥ त्यावेळी शेकडो राजपुत्रांनी व शेकडो राजसिंहांनी (श्रेष्ठ राजांनी) वेष्टित असा अकम्पन राजाही नगरात प्रवेश करून आपल्या राजवाड्यात आला व ज्यांच्या रक्षणाकरिता ज्यांची नेमणूक केलेली आहे अशा लोकांच्याद्वारे नागपाशाने पकडलेल्या राजांचा व अर्ककीर्ति कुमाराचा खेद त्याने दूर करविला व त्यांना योग्यस्थानी पाठविले ॥ ३५३-३५४ ॥ अरिहंताच्या प्रसादाने सर्व विघ्नांचा नाश होतो असा विचार करून ते सगळे अकम्पनादि राजे नित्यमनोहर नामक जिनमन्दिरात अर्हत्प्रभूला वन्दन करण्यासाठी आले ॥ ३५५ ॥ ज्यांची मने शान्त आहेत असे ते राजे दुरूनच आपल्या वाहनावरून खाली उतरले.. त्यानी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या व उत्तम अर्थानी भरलेल्या स्तुतीनी त्यानी जिनेश्वराना स्तविले ॥ ३५६ ॥ ___ ज्याला विजय व उत्कर्ष प्राप्त झाला आहे अशा जयकुमाराने देखिल सर्वकर्मांचा ज्याने नाश केला आहे अशा जगत्प्रभु जिनेश्वराची भक्तीने भरलेल्या अन्तःकरणाने स्तुति केली ती अशी-। ३५७ ॥ Page #607 -------------------------------------------------------------------------- ________________ ५९६) महापुराण (४४-३५० शमिताखिलविघ्नसंस्तवस्त्वयि तुच्छोऽप्यपयात्यतुच्छताम् ।। शुचिशक्तिपुटेऽम्ब सन्धृतं नन मुक्ताफलतां प्रपद्यते ॥ ३५८ षटयन्ति न विघ्नकोटयो निकट त्वत्क्रमयोनिवासिनाम् ॥ पटवोऽपि फलं दवाग्निभिर्भयमस्त्यम्बुषिमध्यवर्तिनाम् ॥ ३५९ हृदये त्वयि सन्निषापिते रिपवः केपि भयं विषित्सवः॥ अमृताशिषु सत्सु सन्ततं विषभेदार्पितविप्लवः कुतः ॥ ३६० उपयान्ति समस्तसम्पदो विपदो विच्यतिमाप्नुवन्त्यलम् ॥ वृषभं वृषमार्गदेशिनम् अषकेतुद्विषमाप्नुषां सताम् ॥ ३६१ इत्थं भवन्तमतिभक्तिपथं निनीषोः प्रागेव बन्धकलयः प्रलयं व्रजन्ति ॥ पश्चादनश्वरमयाचितमप्यवश्यं सम्पत्स्यतेऽस्य विलसद्गुणभद्रभद्रम् ॥ ३६२ हे जिनेश्वरा, आपण सर्व प्रकारच्या विघ्नांना शान्त करणारे आहात. आपल्या गुणांचे स्तवन आम्ही अतिशय अल्प जरी केले तरी ते फार महत्वाला प्राप्त होते. निर्मल अशा शिंपल्याच्या जोडीमध्ये असलेले पाणी ते मोत्याच्या स्वरूपाला प्राप्त होते अर्थात् त्यातले पाणी मोती बनते. अर्थात् आपल्या गुणाचे स्तवन अल्प असले तरी ते महापुण्याला कारण होते ॥३५८॥ हे जिनदेवा, आपल्या दोन पायाजवळ जे राहतात त्यांच्यावर कोट्यवधि विघ्ने आली तरीही ती फल देण्यास समर्थ होत नाहीत. याला उदाहरण असे- जे समुद्राच्या मध्यभागी राहतात त्याना जंगलाच्या अग्नीचे भय असते काय ? ॥ ३५९ ॥ हे प्रभो, आपल्या हृदयामध्ये जेव्हा भक्त आपणास स्थापन करतो तेव्हा कोणीही शत्रु त्याला भययुक्त करू शकत नाही. जे नेहमी अमृतभक्षणच करतात त्याना विषभेदापासून भय कसे उत्पन्न होईल ? ॥ ३६० ॥ जिनधर्माच्या मार्गाचा उपदेश करणारे व जे मदनाचे शत्रु आहेत अशा आदिभगवंताचा आश्रय करणान्या भक्ताना सर्व संपत्ति प्राप्त होतात व सर्व विपत्ति पूर्ण नष्ट होतात ॥ ३६१॥ शोभत असलेल्या गुणानी भक्ताचे कल्याण करणाऱ्या हे जिनराजा, याप्रमाणे आपणास अतिशय भक्तीच्या मार्गात जो घेऊन जाण्याची इच्छा करीत आहे त्याचे कर्मबन्धाचे सगळे दोष प्रथमच नष्ट होतात व यानन्तर कधीही नाश न पावणारे व याचना न करताही मोक्षरूपी कल्याण त्याला अवश्य प्राप्त होईल ।। ३६२ ॥ Page #608 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४-३६६) महापुराण (५९७ परिणतपरितापात्स्वेदधारी विलक्षो । विगलितविभुभावो विह्वलीभूतचेताः॥ अषित विधिविधानं चिन्तयंश्चक्रिसूविरहविषुरवृत्ति वीरलक्ष्मीवियोगे ॥ ३६३ येषामयं जितसुरः समरे सहायस्तानप्यहं कृतरतिः समुपासयामि ॥ धुर्योऽयमेव यदि कात्र विलम्बनेति । मत्वेव मंक्षु समियाय जयं जयश्रीः ॥ ३६४ स बहुतरमराजत्प्रोच्छ्रिताञशत्रुपांसून् । द्रुतमिति शमयित्वा वृष्टिभिः सायकानाम् ।। उपगतहरिभूमिः प्राप्य भूरिप्रतापम् । दिनकर इव कन्यासम्प्रयोगाभिलाषी ॥ ३६५ सौभाग्येन यदा स्ववक्षसि पता मालातदैवापरम् । वीरो वोध्रमवार्यवीर्यविभवी विभ्रश्य विश्वद्विषः ॥ वीरश्रीविहितं दधौ स शिरसाऽम्लानं यशःशेखरम् । लक्ष्मीवान्विदधाति साहससखः किं वा न पुण्योदये ॥ ३६६ या अर्ककीर्तीला पुष्कळ पश्चात्ताप झाल्यामुळे त्यांच्या अंगात घाम उत्पन्न झाला. तो मनात खिन्न झाला. आपला प्रभुपणा गळून गेला म्हणून त्याचे मन फार विह्वल झाले, दुःखी झाले. देवाचे कार्य कसे विलक्षण-दुःखदायक आहे याचा तो विचार करू लागला. वीरलक्ष्मीचा वियोग झाल्यामुळे तिच्या विरहाने त्याची मनोवृत्ति दुःखित झाली ॥ ३६३ ॥ ज्याने देवानाही जिंकले आहे असा हा जयकुमार ज्या लोकाना युद्धात सहायक झाला त्यांची देखिल मी सेवा करिते. त्यांच्यावर प्रेम करून त्यांची मी सेवा करिते. मग हाच जयकुमार त्या लोकात जर पुढारी आहे तर मी वेळ का लावावा ? विलम्ब का करावा असा जणु विचार करून जयश्री शीघ्र जयकुमाराकडे गेली ।। ३६४ ॥ ____ अधिक शोभत असलेली व उडत असलेली जी शत्रुरूपी धूळ तिला बाणांच्या वृष्टीने या जयकुमाराने शीघ्र शमविली. ज्याने पुष्कळ प्रताप दाखवून सिंहाचे स्थान-सिंहरांशि प्राप्त करून घेतली आहे व आता सूर्याप्रमाणे कन्या जी सुलोचना तिच्या समागमाची इच्छा करणारा झाला आहे ॥ ३६५ ।। __ जेव्हा याने आपल्या उत्कृष्ट भाग्याने आपल्या वक्षःस्थलावर माला धारण केली त्यावेळी ज्याच्या शक्तीचे वैभव कोणालाही नाहीसे करता येत नाही, अशा या वीर जयकुमाराने सर्व शत्रूना नष्ट केले व वीरश्रीने रचलेला अतिशय शुभ्र असा टवटवीत यशरूपी तुरा आपल्या मस्तकाने धारण केला. ज्याला साहसरूपी मित्र प्राप्त झाला आहे असा लक्ष्मीवान् पुरुष पुण्याचा उदय झाला असता कोणते बरे असाध्य कार्य करणार नाही ? ।। ३६६ Page #609 -------------------------------------------------------------------------- ________________ ५९८ ) (४४-३६७ जयोऽयात्सोऽयश्च प्रभवति गुणेभ्यो गुणगणः । सदाचारात्सोऽपि श्रुतविहितवृत्तिः श्रुतमपि ॥ प्रणीतं सर्वज्ञैर्विदितसकलास्ते खलु जिना - स्ततस्तान्विद्वान्सं श्रयतु जयमिच्छञ्जय इव ॥ ३६७ इत्यार्षे त्रिषष्टिलक्षणमहापुराणसङ्ग्रहे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते जयविजयवर्णनं नाम चतुश्चत्वारिंशत्तमं पर्व समाप्तिमगमत् ॥ महापुराण जय हा पुण्योदयापासून जीवाला प्राप्त होतो. ते पुण्य सद्गुणापासून उत्पन्न होते व तो सद्गुणांचा समूह सदाचाराने प्राप्त होतो. तो सदाचार शास्त्रात ज्याचे वर्णन केले आहे असा असावा व ते शास्त्र देखिल सर्वज्ञजिनेश्वराने रचलेले असावे अर्थात् जिनेश्वर सर्ववस्तु समूहाला जाणणारे असतात. म्हणून जयाची इच्छा करणान्या जयकुमाराप्रमाणे विद्वानाने त्या जिनेश्वराचा आश्रय घ्यावा || ३६७ ॥ याप्रमाणे भगवद्गुणभद्राचार्यानी रचलेल्या आर्षत्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहात जय --- कुमाराला विजय प्राप्त झाला याचे वर्णन करणारे चव्वेचाळीसावे पर्व समाप्त झाले. Page #610 -------------------------------------------------------------------------- ________________ पञ्चचत्वारिंशत्तमं पर्व । अथ मेघस्वरो गत्वा प्रथमानपराक्रमः । मथितारातिदुर्गवः पृथु स्वावासमास्थितः ॥१ स्वयं च सञ्चिताघानि हन्तुं स्तुत्वा जिनेशिनः । अकम्पनमहाराजः समालोक्य सुलोचनाम् ॥ २ कृताहारपरित्यागनियोगामा युधस्तदा । सुप्रभाकृतपर्युष्टि कायोत्सर्गेण सुस्थिताम् ॥ ३ सर्वशान्तिकरी ध्याति ध्यायन्ती स्थिरचेतसा । धामैकाग्चनिष्पन्दां जिनेन्द्राभिमुखीं मुदा ॥४ समभ्यर्च्य समाश्वास्य प्रशस्य बहुशो गुणान् । भवन्माहात्म्यतः पुत्रि शान्तं सर्वममङ्गलम् ॥५ प्रतिध्वस्तानि पापानि नियाममुपसंहर । इत्युत्क्षिप्तकरामुक्त्वा पुरस्कृत्य सुतां सुतैः॥६ हृष्टः सुप्रभया चामा राजगेहं प्रविश्य सः । याहि पुत्रि निजागारं विसज्येति सुलोचनाम् ॥ ७ अन्यथा चिन्तितं कार्य देवेन कृतमन्यथा । इति कर्तव्यतामूढः सुश्रुतादिभिरिद्धधीः ॥८ औत्पत्तिक्यादिधीभेदैर्वालोच्य सचिवोत्तमैः । विद्याधरधराधीशान्विपाशीकृत्य कृत्यवित् ॥९ ___ यानंतर ज्याचा पराक्रम चोहीकडे प्रसिद्ध आहे, ज्याने शत्रूच्या दुष्टगर्वाचा नाश केला आहे असा मेघस्वर-जयकुमार तेथून निधून आपल्या राहण्याच्या विशालस्थानी राहिला ॥ १॥ इकडे अकम्पन महाराज स्वतः जिनमंदिरात गेले व त्यानी स्वतः संचित केलेल्या पापांचा नाश करण्यासाठी जिनेश्वराची स्तुति केली. त्यानी तेथे युद्ध संपेपर्यन्त मी आहारांचा त्याग करीन असा नियम घेतलेल्या सुलोचनेला पाहिले. तिला सुप्रभाराणी जिनपूजादि कार्यात मदत करीत होती. सुलोचनेने शरीरावरचे ममत्व त्यागून कायोत्सर्ग धारण केला होता. म्हणजे ती स्वस्थचित्ताने जिनेश्वराकडे मुख करून बसली होती. आपल्या स्थिर मनाने सर्वत्र शान्ति होवो असे ध्यान करीत होती. आपल्या मनाला तिने एकाग्र केले होते ते तिचे मन धर्म्य-दया क्षमादि गुणांच्या चिंतनात लीन झाले होते. आनंदाने तिला सत्कारून तिचे समाधान करून त्यानी तिच्या पुष्कळ गुणांची प्रशंसा केली. ते म्हणाले 'मुली, तुझ्या माहात्म्याने सर्व अमंगल शान्त झाले आहे. सर्व पापें नष्ट झाली आहेत, आता तू आपला नियम सोड' तेव्हा तिने आपले हात वर केले. याप्रमाणे तिला बोलून व तिला पुढे करून आनन्दित झालेल्या अकम्पनराजाने आपल्या मुलासह व सुप्रभाराणीसह राजवाड्यात प्रवेश केला व आपल्या मुलीला त्यानी आपल्या मंदिरात पाठविले ॥२-६ ॥ जे कार्य जसे करावयाचे आम्ही ठरविले होते पण दैवाने ते वेगळेच केले अर्थात् बिघडविले त्यामुळे काय करावे हे सुचेनासे झालेल्या बुद्धिमान् अकम्पनराजाने जन्म, व्रत, नियम, औषध आणि तप इत्यादिकांच्या द्वारे ज्यानी ज्ञान मिळविले आहे अशा सुश्रुत आदिक उत्तम सचिवाबरोबर विचार करून योग्य कार्य जाणणा-या राजाने अकम्पनाने-विद्याधर राजे आणि भूगोचरी राजे याना नागपाशातून मुक्त केले ॥ ७-९॥ Page #611 -------------------------------------------------------------------------- ________________ ६००) महापुराण (४५-१० विश्वानाश्वास्य तद्योग्यः सामसाररुदीरितैः । सम्यग्विहितसत्कारः स्नानवस्त्रासनादिभिः ॥ १० कुमार, वंशौ युष्माभिविहितो वधितौ च नः । तरुविषमयोऽप्येति यतोऽभून्न ततः क्षयम् ॥ ११ पुत्रबन्धपदातीनामपराधशतान्यपि । क्षमन्ते हि महात्मानस्तद्धि तेषां विभूषणम् ॥ १२ भवेद्दवादपि स्वामिन्यपराधविधायिनाम् । आकल्पमयशः पापं चानुबन्धनिबन्धनम् ॥ १३ अपराधः कृतोऽस्माभिरेकोऽयमविवेकिभिः । वयं वो बन्धभत्यास्तत्कुमार क्षन्तुमर्हसि ॥ १४ एषाकीतिरघं चैतत्प्रसादात्ते प्रशाम्यति । शापानुग्रहयोः शक्तस्त्वं विशुद्धि विधेहि नः ॥ १५ अर्कणालोकनारोधि हन्यते जगतस्तमः । अस्माकं स भवानर्कस्तस्मादन्तस्तमो हरेत् ॥ १६ प्रातिकूल्यं तवास्मासु स्तन्यस्येव स्तनन्धये । अस्मज्जन्मान्तरादृष्टपरिपाकविशेषतः॥ १७ यानंतर सर्व राजाना शांतीच्या समतारसाने भरलेल्या अशा भाषणानी त्याने प्रसन्न केले व स्नान, वस्त्र, आसन वगैरेनी त्यांचा योग्य आदर केला ॥ १० ॥ हे कुमारा, आमचे वंश-नाथवंश व सोमवंश हे तुम्हीच केले आहेत व वाढविले आहेत. विषबृक्ष देखिल जेथून जन्मतो तेथूनच त्याचा नाश होत नाही ॥ ११ ॥ जे महापुरुष असतात ते आपला पुत्र, बंधु आणि आपल्या पायदळ सैन्याने केलेल्या शेकडो अपराधांची देखिल क्षमा करतात व तशी क्षमा करणे हे त्यांचे विशिष्ट भूषण आहे ॥ १२ ॥ आपल्या स्वामीविषयी अपराध करणाऱ्या लोकांचे त्या अपराधामुळे झालेले अपयश व पाप हे कल्पान्तपर्यन्त राहणारे असतात ।। १३ ।। . हे कुमारा, आम्हा अविवेकी जनाकडून हा एक अपराध घडला आहे. हे कुमारा आम्ही तुमच्या बन्धु व सेवकवर्गापैकी आहोत असे समजून आम्हाला तू क्षमा करावीस ॥ १४ ॥ हे कुमारा ही आमची अकीर्ति आणि हे आमचे पाप तुझ्या प्रसन्नतेने शान्त होईल, नाश पावेल. तू आम्हाला शिक्षा करणे व अनुग्रह करणे या दोन्ही विषयी समर्थ आहेस म्हणून तू या दोषातून आमची शुद्धता कर, मुक्तता कर ।। १५ ।। - सूर्याच्या द्वारे पाहण्यास प्रतिबन्ध करणारा जगातील अंधार नाहीसा केला जातो तसा हे कुमार, तू आम्हाला सूर्यासारखा आहेस म्हणून आमच्या मनातला हा अज्ञानरूप अंधार नाहीसा कर ॥ १६ ॥ आमच्या पूर्व जन्माच्या दुर्दैवाच्या उदयविशेषामुळे तुझा आमच्याविषयी विरोध उत्पन्न झाला आहे तो जणु पुत्राला मातेच्या दुधाच्या विरोधासारखा आहे. जसे मातेच्या दुधावाचून मूल जगू शकत नाही तसे हे कुमार आपणाशी आम्ही विरोध केला तर आमचे जगणे शक्यच नाही ॥ १७ ॥ Page #612 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-२५) महापुराण विश्वविश्वम्भराह्लादी यदि क्षिपति वारिदः । कदाप्यशनिमेकस्मिस्तत्तस्यैवाशुभोदयः ॥ १८ हयेनेव दुरारोहाज्जयेनेहासि पातितः। स ते प्रेष्यः किमत्रास्ति वैमनस्यस्य कारणम् ॥ १९ सुलोचनेति का वार्ता सर्वस्वं नस्तवैव तत् । निषिद्धश्चेत्त्वया पूर्व क्रियते कि स्वयंवरः ॥ २० लक्ष्मीवती गहाणेमामक्षमालापराभिषाम् । निर्मलां वा यशोमालां कि ते पाषाणमालया ॥२१ आहारस्य यथा तेऽद्य विकारोऽयं विना त्वया। जीविकास्ति किमस्माकं प्रसीदतु विभो भवान् ॥२२ यद्वयं भिन्नमर्यादे त्वय्यवर्येऽम्बुधाविव । तत्तेऽवशिष्टाः पुण्येन भवत्प्रेषणकारिणः ॥ २३ त्वं वह्निनेव केनापि पापिना विश्वजीवनः । उष्णीकृतोऽसि प्रत्यस्मान शीतीभव हि वारि वा ॥२४ न चेदिमान्सुतान्दारान्प्रतिग्राहय पालय । मम तावाश्रयो यामि पुरूणां पादपादपो ॥ २५ सगळ्या जगाला आनन्दित करणारा मेघ जर केव्हा तरी एखाद्या व्यक्तीवर विद्युत्पात करील तर त्या व्यक्तीच्या ठिकाणीच अशुभ कर्माचा उदय आहे असे समजणे योग्य आहे ॥ १८ ॥ ज्याच्यावर चढून बसणे कठिण आहे अशा घोड्याप्रमाणे जयकुमाराकडून हे कुमारा तू पाडला गेला आहेस पण तो जयकुमार तर तुझा नोकरच आहे, यास्तव येथे वैराचे कारणच कांही नाही ।। १९ ।।। __सुलोचनेची गोष्ट बाजूला राहू दे. हे कुमारा, आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे कुमारा जर तू आमच्या कार्याविषयी आधीच निषेध व्यक्त केला असता तर आम्ही हे स्वयंवर कशाला केले असते ।। २० ॥ हे कुमार, जिथे अक्षमाला हे दुसरे नांव आहे अशा लक्ष्मीवतीचा जी जणु दुसरी निर्मल अशी यशोमालेसारखी आहे तिचा स्वीकार कर. त्या पाषाणाच्या या मालेशी तुला काय करावयाचे आहे ॥ २१ ॥ हे कुमार, आहाराचा विकार-बिघडलेले अन्न खाण्याने जसे जगणे नष्ट होते तसे तुझ्यात विकार झाल्यामुळे आमचे जीवन कसे टिकेल ते नष्ट होईल. म्हणून हे कुमारा, तू आमच्यावर प्रसन्न हो ॥ २२ ।।। __ ज्याचे निवारण करणे शक्य नाही अशा समुद्राप्रमाणे तू आपली मर्यादा त्यागली असताही तुझी आज्ञा मान्य करून त्याप्रमाणे वागणारे आम्ही तुझ्या पुण्यानेच फक्त जगत आहोत ॥ २३ ॥ सर्वांच्या जगण्याला हे कुमार तू पाण्याप्रमाणे कारण आहेस पण कोणी तरी पाप्याने तुला उष्ण केले आहे. यास्तव तो उष्णपणा सोडून दे व आमच्यासाठी तू पाण्याप्रमाणे शीतल हो म्हणजे आम्ही जगू ॥ २४ ॥ जर तू शीत-शान्त होणार नाहीस तर माझ्या या मुलाना व पत्नीला स्वीकारून त्यांचा सांभाळ कर म्हणजे मी सर्वाना आश्रय देणा-या आदिभगवंताच्या पायरूपी दोन वृक्षाकडे जातो ॥ २५ ॥ म. ७९ Page #613 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४५-२६ इति प्रसाद्य सन्तोष्य समारोप्य गजाधिपम् । अर्ककीति पुरोधाय वृतं भूचरखेचरः ।। २६ शान्तिपूजां विधायाष्टौ दिनानि विविद्धिकाम् । महाभिषेकपर्यन्तां सर्वपापोपशान्तये ॥ २७ जयमानीय संघाय सन्धानविधिवित्तदा । नितरां प्रीतिमुत्पाद्य कृत्वैकोभावमक्षरम् ॥ २८ अक्षमालां महाभूत्या दत्त्वा सर्वार्थसम्पदा । सम्पूज्य गमयित्वनमनुगम्य यथोचितम् ॥ २९ तथेतरांश्च सम्मान्य नरविद्याधराधिपान । सद्यो विसर्जयामास सद्रत्नगजवाजिभिः॥३० ते स्वदुर्णयलज्जास्तवैराः स्वं स्वमगुः पुरम् । सा धोर्दैवापराधस्य प्रतिको हि याऽचिरात् ॥ ३१ तदा पूर्वोदितो देवः समागत्य सुसम्पदा । सुलोचनाविवाहोरुकल्याणं समपादयत् ॥ ३२ मेधप्रभसुकेत्वादिसत्सहायान्सहानुजान् । जयोऽप्यगमयत्सर्वान्सन्ताबहुप्रियः ॥ ३३ याप्रमाणे मधुरभाषणाने अर्ककीर्तीला अकम्पन राजाने प्रसन्न करून सन्तुष्ट केले. भूमिगोचरी राजे व विद्याधरराजांनी वेष्टित अशा त्याला मोठ्या हत्तीवर बसविले व पुढे करून तो नित्यमनोहर जिनमंदिरात गेला. तेथे सर्व पापांची शान्ति व्हावी म्हणून नानावैभव सम्पन्न अशी आठ दिवसपर्यन्त शान्तिपूजा त्याने केली व शेवटच्या दिवशी महाभिषेक केला ॥ २६-२७॥ ___ यानंतर सलोखा कसा करावा याचे ज्याला चांगले ज्ञान आहे अशा या राजाने जयकुमाराला आणवून दोघामध्ये सलोखा उत्पन्न केला, दोघात अतिशय प्रेम उत्पन्न केले. दोघांत नाश न पावणारी अशी एकता उत्पन्न केली. अर्ककीर्तीला राजाने आपली कन्या अक्षमाला महावैभवाने धनसम्पदेसह दिली. असा त्याने त्याचा आदर केला. यानन्तर त्याने त्याला आपल्या नगराकडे (अयोध्येकडे) पाठविले व आपणही स्वतः यथायोग्य पोचवावयास गेला. याचप्रमाणे इतर राजे व विद्याधर राजांचाही त्याने उत्कृष्ट रत्ने, हत्ती, घोडे देऊन सन्मान केला व त्याने त्यांना पाठविले ॥ २८-३० ।। आपण केलेल्या दुर्नीतीमुळे ज्यांना लाज उत्पन्न झाली व त्यामुळे ज्यांनी वैर त्यागले आहे अशा त्या राजानी आपआपल्या नगराकडे प्रयाण केले. बरोबरच आहे की दुर्दैवाने उत्पन्न झालेल्या अपराधांचे जी लौकरच क्षालन करिते तिलाच बुद्धि म्हणावे ॥ ३१ ॥ त्यावेळी पूर्वी ज्याचे कथन केले आहे असा चित्राङगद देव पुष्कळ सम्पत्तीसह आला व त्याने सुलोचनेचा विवाहरूपी मोठा उत्सव केला व विधिपूर्वक त्याची त्याने समाप्ति केली ॥ ३२॥ ज्याला पुष्कळ आवडते मित्र आहेत अशा जयकुमाराने मेघप्रभ, सुकेतु वगैरे उत्तम सहायक मित्रांना अनेकधनादिक पदार्थांनी संतुष्ट करून आपआपल्या गांवी पाठविले व आपल्या सर्व धाकटया भावांनाही नाना वस्तु देऊन सन्तुष्ट करून पाठवून दिले ॥ ३३ ॥ Page #614 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-४२) महापुराण (६०३ नाथवंशाग्रणीश्चामा जामात्रालोच्य सत्वरम् । सुधीः स्वगृहसाराणि बद्ध्वा रत्नान्युपायनम् ॥३४ विदितप्रस्तुतार्थोऽसि यथासो नः प्रसीदति । तथा कुविति चक्रेशं सुमुखाख्यमजीगमत् ॥ ३५ आशु गत्वा निवेद्यासौ दृष्ट्वेशं धरणी तनुम् । क्षिप्त्वा प्रणम्य दत्वा च प्राभृतं निभृताञ्जलिः॥३६ देवस्यानुचरो देव प्रणम्याकम्पनो भयात् । देवं विज्ञापयत्येवं प्रसादं कुरु तच्छृणु ॥ ३७ सुलोचनेति नः कन्यासारस्त्वविहितश्रिये । स्वयंवरविधानेन सम्प्रादायि जयाय सा ॥ ३८ तत्रागत्य कुमारोऽपि प्राक्सर्वमनुमत्य तत् । विद्याधरधराधीशैः सुप्रसन्नैः सह स्थितः ॥ ३९ पश्चात्कोऽपि ग्रहः क्रूरः स्थित्वा सह शुभग्रहम् । खलो बलाद्यथा स्मभ्यं वृथा कोपयति स्म तम् ॥४०. विज्ञातमेव देवेन सबं तत्संविधानकम् । चारचक्षुश्च वेत्त्येतरिक पुनः सावधिर्भवान् ॥ ४१ कुमारो हि कुमारोऽसौ नापराषोऽस्ति कश्चन । तत्र तस्य सदोषाः स्मो वयमेव प्रमादिनः ॥४२ ___ नाथवंशाचा स्वामी अशा अकम्पन राजाने त्यावेळी आपला जावई जो जयकुमार त्याच्या बरोबर शीघ्र विचार केला. व त्याने सुमुख नामक सेवकाला बोलावले. त्याला आपल्या घरातील उत्तम रत्ने चक्रवर्तीला नजराणा म्हणून अर्पण कर म्हणून दिली व तू विद्वान आहेस. सध्या घडलेला प्रसंग तुला चांगला माहित आहे तेव्हा तो प्रसंग चक्रवर्तीला कळव व जेणे करून तो आम्हावर प्रसन्न राहील अशा रीतीने हे कार्य सिद्ध कर म्हणून त्याला चक्रवर्तीकडे पाठविले ॥ ३४-३५ ।। तो सुमुख शीघ्र चक्रवर्तीकडे गेला. त्याला आपली हकीकत सांगितली. चक्रवर्तीला पाहिल्यावर त्याने जमीनीवर आपला देह टाकून त्याला साष्टांग नमस्कार केला. व दिलेला नजराणा प्रभु पुढे ठेविला. आपले दोन हात जोडून प्रभु भरतेशाला असे म्हणाला. हे प्रभो आपले सेवक असे अकम्पन महाराज आपणास नमस्कार करून भीतीने आपणास याप्रमाणे निवेदन करीत आहेत आपण त्यांच्यावर प्रसन्न व्हा व त्यांचे निवेदन ऐका ॥ ३६-३७ ।। हे प्रभो, सुलोचना नांवाचे आमचे कन्यारत्न आपण ज्याला लक्ष्मीसंपन्न केले आहे अशा जयकुमाराला आम्ही स्वयंवरविधीने दिले आहे ॥ ३८ ॥ त्या स्वयंवरप्रसंगी कुमार अर्ककीर्तिही आला. त्याला ते सर्व मान्य वाटले. प्रसन्न असे विद्याधर राजे व भूमिगोचरी राजे यांच्यासह येऊन तो स्वयंवरमंडपात बसला. नंतर एकादा दुष्टग्रह शुभ ग्रहाबरोबर राहून त्याला दुष्ट बनवितो तसे कोणी दुष्टाने आमच्याबद्दल कुमाराच्या मनांत व्यर्थ व मुद्दाम कोप उत्पन्न केला ॥ ३९-४० ॥ हे प्रभो यानंतर तेथे जो प्रसंग घडला तो आपण जाणलाच असेल. कारण हेर हे ज्याचे डोळे आहेत असा देखील हे जाणत आहे मग आपण तर अवधिज्ञानी आहात. अर्थात् आपणास अवधिज्ञानाने सर्व समजले असेलच ॥ ४१ ।। हा कुमार तर कुमारच- बालकच आहे. त्याचा कांही अपराध नाही. याविषयी चूक आमच्याकडून घडली असल्यामुळे आम्हीच दोषी आहोत ॥ ४२ ॥ Page #615 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४५-४३ तस्मै कन्यां गहाणेति नास्माभिः सा समपिता। आराधकस्य दोषोऽसौ यत्प्रकुप्यन्ति देवताः ॥४३ मयैव विहिताः सम्यक्वद्धिता बन्धवोऽपि नः । स्निग्धाश्च कथमेतेषां विदधामि विनिग्रहम् ।।४४ इत्येतद्देव मा संस्थाः स्यात्सदोषो यदि त्वया। कुमारोऽपि निगृह्येत न्यायोऽयं त्वदुपक्रमः ॥ ४५ तदादिश विधेयोऽत्र को दण्डस्त्रिविधेऽपि नः । किं वधः किं परिक्लेशः किं वार्थहरणं प्रभो ॥४६ तदादिश विधानेन नितरां कृतिनो वयम् । इहामुत्र च तद्देव यथार्थमनुशाधि नः ॥ ४७ इति प्रश्रयिणी वाणी निगद्य हृदयप्रियाम् । सुमुखो राजराजस्य व्यरंसीत्करसंज्ञया ॥ ४८ सतां वांसि चेतांसि हरन्त्यपि हि रक्षसाम् । किं पुनः सामसाराणि तादृशां समतादृशाम् ॥ ४९ इहैहीति प्रसन्नोक्त्या प्रफुल्लवदनाम्बुजः । उपसिंहासनं चक्री निसृष्टार्थं निवेश्य तम् ॥ ५० -----------........ हे कुमार या कन्येचा तू स्वीकार कर असे म्हणून आम्ही त्यास ती कन्या दिली नाही. देवता ज्या अर्थी रागावतात त्या अर्थी तो आराधकाचाच दोष आहे ।। ४३ ।। ___ माझे या लोकावर प्रेम आहे, हे माझे बन्धु आहेत, यांना मीच वाढविले आहे तेव्हा मी यांना कशी शिक्षा करू असा विचार हे प्रभो आपण करू नका. कारण कुमार देखिल जर अपराधी असेल तर त्यालाही आपण शिक्षा कराल. या न्यायाची उत्पत्ति आपणापासूनच झाली आहे ॥ ४४ ॥ ___ यास्तव हे प्रभो, आपण तीन प्रकारच्या दण्डापैकी कोणता दंड आम्हाला करणार आहा त्याची आज्ञा करा. काय वध करणार आहा? अथवा आम्हाला क्लेश देणार आहात 'किंवा आमचे धन हरण करणार आहात ? ॥ ४५ ॥ ___ यास्तव आपण आम्हाला आज्ञा करा तिचे आम्ही पालन करून इहलोकी व परलोकी अत्यन्त कृतकृत्य होऊ. म्हणून आम्हाला योग्य शिक्षा सांगा ॥ ४६-४७ ।। याप्रमाणे राजाधिराज भरताच्या हृदयाला आवडणारे नम्रतायुक्त भाषण सुमुखाने केले व राजेश्वराच्या हाताच्या खुणेने त्याने आपले भाषण पुरेसे केले ॥ ४८ ॥ _ सलोखा करणे हा ज्यांचा मुख्य उद्देश आहे अशी सज्जनांची भाषणे जर राक्षसांच्याही अन्तःकरणाला हरण करितात तर मग चक्रवर्तीसारख्या समदृष्टि पुरुषांच्या अन्तःकरणांचे ती हरण करणार नाहीत काय? ।। ४९ ॥ वरील प्रसन्न भाषण ऐकून ज्याचे मुखकमल प्रफुल्ल झाले आहे अशा त्या चक्रवर्तीने इकडे ये असे सर्व हकीकत ज्याने कळविली आहे अशा दूताला म्हटले व आपल्या सिंहासनाजवळ बसवून घेतले ।। ५० ॥ Page #616 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-५९) महापुराण (६०५ अकम्पनैः किमित्येवमुदीर्य प्रहितो भवान् । गुरुभ्यो निर्विशेषास्ते सर्वज्येष्ठाश्च संप्रति ॥५१ गहाश्रमे त एवास्तैिरेवाहं च बन्धमान् । निषेद्धारः प्रवृत्तस्य ममाप्यन्यायवर्त्मनि ॥ ५२ पुरवो मोक्षमार्गस्य गुरवो दानसन्ततेः । श्रेयांश्च चक्रिणां वृत्तयेथेहास्म्यहमग्रणीः ।। ५३ तथा स्वयंवरस्येमे नाभूवन्यद्यकम्पनाः । कः प्रवर्तयितान्योऽस्य मार्गस्यैष सनातनः ॥ ५४ मार्गाश्चिरन्तनान्येऽत्र भोगभूमितिरोहितान् । कुर्वन्ति नूतनान्सन्तः सद्धिः पूज्यास्त एव हि ॥५५ न चक्रेण न रत्नश्च शेषेर्न निधिभिस्तथा । बलेन न षडङ्गन नापि पुत्रर्मथा च न ॥ ५६ तदेतत्सार्वभौमत्वं जयेनकेन केवलम् । सर्वत्र शौर्यकार्येषु तेनैव विजयो मम ॥ ५७ म्लेच्छराजान्विनिजित्य नाभिशेले यशोमयम् । मन्नाम स्थापितं तेन किमत्रान्येन केनचित् ॥ ५८ अर्ककोतिरकोतिर्मे कीर्तनीयामकोतिषु । आशशाङ्कमिहाकार्षीन्मषोमाषमलीमसाम् ॥ ५९ काय अकम्पन महाराजांनी असे असे बोल म्हणून तुला पाठविले आहे काय ? ते तर आम्हाला गुरु सारखेच विशिष्ट आहेत व ते यावेळी सर्वांत वडील आहेत. या गृहाश्रमात तेच आम्हाला पूजनीय आहेत व त्यांच्यामुळेच मी स्वतःला बंधुयुक्त समजतो. तेच माझे खरे हितकर्ते आहेत व मी देखिल अन्यायमार्गात प्रवृत्त झालो तर माझा देखिल ते निषेध करतील अशी त्यांची मी योग्यता समजतो ॥ ५१-५२ ॥ हे सुमुखा, भगवान् आदिनाथ हे मोक्षमार्गाचे गुरु आहेत. हे मोक्षमार्गाचे आद्यप्रवर्तक आहेत. आणि श्रेयान् महाराजा हे आहारदानाच्या परंपरेचे गुरु- आद्यप्रवर्तक आहेत व चक्रवर्तीच्या आचारांचा मी मुख्य गुरु आहे. त्याप्रमाणे स्वयंवरविधीचे हे अकंपनमहाराज आद्य प्रवर्तक गुरु आहेत. जर अकम्पन महाराज नसते तर या स्वयंवरमार्गाची प्रवृत्ति करणारा दुसरा कोण झाला असता बरे ? हा मार्ग सनातन आहे ॥ ५३-५४ ॥ पूर्वी भोगभूमीच्या काली जे प्राचीन मार्ग लुप्त झाले होते त्यांना जे सज्जन पुनः नवीन चालू करतात ते सत्पुरुष सज्जनांनी पूजेला योग्य होतात ।। ५५ ।। प्रसिद्ध असा हा चक्रवर्तीपणा जो मला प्राप्त झाला आहे तो चक्राने किंवा बाकीच्या खङगादिरत्नांनी किंवा निधीनी तसेच सहा प्रकारच्या सैन्यांनी, किंवा माझ्या मुलांच्या साहाय्याने अथवा माझ्या प्रयत्नाने मिळाला नाही पण फक्त एकटया जयकुमारानेच मिळालेला आहे. सगळ्या शौर्याच्या कार्यात मला जयकुमारामुळेच विजयलाभ झाला आहे ॥ ५६-५७ ।। म्लेंच्छराजांना जिंकून नाभिपर्वतावर कीर्तियुक्त असे माझे नाव त्यानेच स्थापिले आहे. इतराने कोणी यात काही केले आहे काय ? ॥ ५८ ।। या अर्ककीर्तीने अपकीतियुक्त लोकामध्ये वर्णन करण्याला योग्य व काळी शाई व उडीदाप्रमाणे मळकट अशी माझी अकीर्ति चन्द्र राहील तोपर्यन्त राहील अशी स्थिर केली आहे ॥ ५९॥ Page #617 -------------------------------------------------------------------------- ________________ ६०६) महापुराण अमुनान्यायवत्मैव प्रावर्तीति न केवलम् । इह स्वयं च दण्डयानां प्रथमः परिकल्पितः ॥ ६० अभूदयशसो रूपं मत्प्रदीपादिवाञ्जनम् । नार्ककोतिरसौ स्पष्टमयशःकोतिरेव हि ॥ ६१ जय एव मदादेशादीदृशोऽन्यायतिनः । समीकुर्यात्ततस्तेन मसाधुदषितोयुधि ॥ ६२ सदोषो यदि निग्राह्यो ज्येष्ठपुत्रोऽपि भूभुजा । इति मार्गमहं तस्मिन्नद्य वर्तयितुं स्थितः ॥ ६३ अक्षमाला किल प्रत्ता तस्मै कन्यावलेपिने । भवद्भिरविचार्यंतद्विरूपकमनुष्ठितम् ॥ ६४ पुरस्कृत्येह तामेतां नीतः सोऽपि प्रतीक्ष्यताम् । सकलङ्केति किं मूतिः परिहर्तुभवेद्विषोः ॥ ६५ अपेक्षितः सदोषोऽपि स्वपुत्रश्चक्रवर्तिना । इतीदमयशः स्थायि व्यधायि तदकम्पनैः ॥ ६६ इति सन्तोष्य विश्वेशः सौमुख्यं सुमुखं नयन् । हित्वा ज्येष्ठं तुजं तोकमकरोन्न्यायमौरसम् ॥ ६७ ...................... या अर्ककीर्तीने केवळ अन्यायमार्ग चालू केला आहे असे नाही तर ज्यांना शिक्षा करणे योग्य आहे अशा अपराधी लोकांत ह्याने स्वतःला पहिला क्रमांक प्राप्त करून घेतला आहे ॥ ६० ॥ जसे दिव्यापासून काजळ उत्पन्न होते तसे हा माझ्यापासून अयशरूपाने उत्पन्न झाला आहे. हा अर्ककीति नव्हे तर हा स्पष्ट अयशःकीर्तिच आहे ॥ ६१ ।। माझ्या आज्ञेला अनुसरून जयकुमारच अशा रीतीने अन्यायाने वागणा-या लोकांना दंडित करू शकतो व त्याने युद्धात या अर्ककी तिला चांगलेच हैराण केले आहे ।। ६२ ।। राजाने आपला वडील मुलगा जर सदोष असेल अपराधी असेल तर त्यालाही दंड करावा अशा रीतीच्या नीतिमार्गाला रूढ करण्यास मी आज सिद्ध झालो आहे ।। ६३ ॥ ___ या उन्मत्ताला तुम्ही अक्षमाला कन्या दिली हे कार्य विचार न करिता केले आहे. हे कार्य अगदी विरुद्ध तुम्ही केले आहे. ॥ ६४ ।। या कन्येला पुढे करून या अर्ककीर्तीला तुम्ही आदरणीय केले आहे. बरोबरच आहे की, चन्द्राचा देह सकलङक काळया डागाने सहित आहे म्हणून काय त्याला त्यागणे योग्य होईल काय ? ।। ६५ ॥ चक्रवर्तीने आपला पुत्र दोषी असूनही त्याची अपेक्षा केली अशा रीतीची माझी अकीर्ति मात्र अकम्पनमहाराजांनी नेहमी टिकणारी केली ॥ ६६ ।। याप्रमाणे जगत्पति भरताने त्या सुमुखदूताला सन्तुष्ट करून प्रसन्नमुख केले व आपल्या ज्येष्ठपुत्राचा त्याग करून भरतेश्वराने न्यायालाच आपला औरस पुत्र मानले ।। ६७ ।। Page #618 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-७६) महापुराण सुमुखस्तद्दयाभारमिव वोढुं तदा क्षमः । सजथोऽकम्पनो देव देवस्य नमति क्रमौ ॥ ६८ लब्धप्रसाद इत्युक्त्वा क्षिप्त्वाङ्गानि प्रणम्य तम् । विकसद्वदनाम्भोजः समुत्थाय कृताञ्जलिः ॥ ६९ इत एवोन्मुखौ तौ त्वत्प्रतीच्छन्तौ मदागतिम् । आस्थातां चातको वृष्टि प्रावृषो वादिवार्मुचः ॥७० इति विज्ञाप्य चक्रेशात्कृतानुज्ञः कृतत्वरः । सम्प्राप्याकम्पनं नत्वा सजयं विहितादरम् ॥ ७१ गोभिः प्रकाश्य रक्तस्य प्रसादं चक्रवर्तिनः । रवेर्वा वासरारम्भस्तद्वक्त्राब्जं व्यकासयत् ॥ ७२ साधुवादः सदानैश्च सम्मानैस्तौ च सदा । आनिन्यतुरतिप्रीति कृतज्ञा हि महीभृतः ॥ ७३ इत्यतर्योदयावाप्तिविभासितशुभोदयः । अनूषिवान् जयः श्रीमान् सुखेन श्वाशुरं कुलम् ॥ ७४ सुलोचनामुखाम्भोजषट्पदायितलोचनः । अनङ्गानणुबाणैक तूणीरायितविग्रहः ॥ ७५ तथा प्रवृत्ते सङ्ग्रामे सायकंरक्षतः क्षतः । पेलवैः कुसुमैरेभिविचित्रा विधिवृत्तयः ॥ ७६ (६०७ त्यावेळी चक्रवर्तीचे ते दयेचे ओझे वाहण्यास असमर्थ झालेला तो सुमुख चक्रवर्तीला असे म्हणाला हे प्रभो आपला प्रसाद ज्यांना मिळाला आहे असे जयकुमारासह अकम्पन महाराज आपल्या राजाधिराजांच्या दोन चरणांना वंदन करीत आहेत असे म्हणून आपले सर्व शरीर त्याने जमिनीवर टाकले अर्थात् चक्रवर्तीला साष्टाङ्ग नमस्कार केला. नन्तर ज्याचे मुखकमल प्रफुल्ल झाले आहे असा तो उठला व त्याने दोन हात जोडले. व असे म्हणाला हे प्रभो, दोन चातक पक्षी वर्षाकालाच्या पहिल्या मेघाच्या जलवृष्टीची उत्कंठेने वाट पाहतात तसे ते जयकुमार व अकम्पन महाराज हे दोघे माझ्याकडेच तोंड करून आपणापासून हा केव्हा येईल म्हणून माझी वाट पाहत आहेत. अशी विनंति चक्रवर्तीला त्याने केली तेव्हा चक्रवर्तीने त्याला अनुज्ञा दिली. यानन्तर तो त्वरेने जयकुमारसहित अकम्पन राजाकडे आला व त्याने आदराने त्याना नमस्कार केला. व दिवसाचा प्रारंभ जसे सूर्याच्या किरणानी कमलांना प्रफुल्लित करितो तसे त्या सुमुखाने प्रेमळ चक्रवर्तीची प्रसन्नता आपल्या भाषणानी प्रकट केली व त्या दोघांच्या मुखकमलांना त्याने प्रफुल्ल केले ।। ६८-७२ ।। त्यावेळी जयकुमार व अकम्पन राजा या दोघांनी त्या दूताची फार प्रशंसा केली. त्याला पुष्कळ दान दिले व त्याचा चांगला संमान केला. त्यामुळे त्याच्या मनांत फार प्रेम उत्पन्न झाले. हे सर्व योग्यच आहे कारण राजे हे कृतज्ञ असतात ॥ ७३ ॥ याप्रमाणे अत अशा उत्कर्षाची प्राप्ति होऊन ज्याचा शुभोदय प्रकट झाला आहे असा तो श्रीसंपन्न जयकुमार आपल्या सासऱ्याच्या घरी सुखाने राहिला ॥ ७४ ॥ सुलोचनेच्या मुखरूपीकमलावर ज्याचे डोळे भुंग्याप्रमाणे झाले आहेत व मदनाच्या मोठ्या बाणाना ज्याचे शरीर अद्वितीय भात्याप्रमाणे बनले आहे. अशा जयकुमाराचे शरीर खऱ्या युद्धात बाणानीं जखमी झाले नाही. पण आता मदनाच्या नाजुक पुष्परूपी बाणानी तो जखमी झाला. यावरून देवाची प्रवृत्ति मोठी विचित्र आहे असे म्हणावे लागते ।। ७५-७६ ।। Page #619 -------------------------------------------------------------------------- ________________ ६०८) महापुराण (४५-७७ अस्मितां सस्मितां कुर्वन्नहसन्ती सहासिकाम् । सभयां निर्भयां बालामाकुलां तामनाकुलाम् ॥ ७७ अनालपन्तीमालाप्य लोकमानो विलोकिनीम् । अस्पृशन्ती समास्पृश्य व्यधाद्वीडाविलोपनम् ॥७८ कृतो भवान्तराबद्धतत्स्नेहबलशालिना । सुलोचनायाः कौरव्यः कामं कामेन कामुकः ॥ ७९ सुलोचनासुमनोवृत्ती रागामृतकरोधुरा । क्रमाच्चबाल वेलेव कामनाममहाम्बुधेः ॥ ८० मुकुले वा मुखे चक्रे विकासोऽस्याः क्रमात्पदम् । आक्रान्तशूर्पकारातिग्रहानक्षरसूचनः ॥८१ सखीमुखानि संवीक्ष्य जञ्जपित्वा दिशामसौ । स्वैरं हसितुमारब्ध गहीतमदनग्रहा ॥ ८२ सितासितशितालोलकटाक्षेक्षणतोमरैः । जयं तदा जिताननं कृत्वानङ्गप्रतिष्कशम् ॥८३ ससाध्वसा सलज्जा सा विव्याध विविषेर्मनाक । अनालोकनवेलायामतिसन्धित्सव तम् ॥ ८४ न भुजङ्गेन सन्दष्टा नापि संसेवितासवा । न भ्रमेण समाक्रान्ता तथापि स्विद्यति स्म सा ॥ ८५ हा जयकुमार मंदहास्याने युक्त नसलेल्या सुलोचनेला मंदस्मितयुक्त करीत असे. मोठ्याने न हसणाऱ्या तिला त्याने मोठ्याने हसणारी बनविले. भयभीत अशा तिला त्याने निर्भय केले व घाबरलेल्या तिला त्याने निर्भय केले. न बोलणान्या तिला त्याने बोलावयास लावले. मर्यादेने आपल्याकडे ( जयकुमाराकडे ) न पाहणाऱ्या तिला त्याने पाहावयास लाविले व स्पर्श न करणाऱ्या तिला त्याने स्वतःला स्पर्श करावयास लाविले. अशा रीतीने जयकुमाराने तिला लज्जारहित केले ॥ ७७-७८ ।। पूर्वभवात बांधलेल्या सुलोचनेच्या स्नेहाच्या सामर्थ्याने शोभणाऱ्या अशा या काम देवाने जयकुमाराला अतिशय कामुक बनविले ।। ७९ ।। प्रेमरूपी चन्द्राच्या उदयाने वर उसळलेली आणि मदन नांवाच्या मोठ्या समुद्राची जणु मोठी लाट अशी सुलोचनेची मनोवृत्ति क्रमाने उंच उंच उसळत चालली ॥ ८० ॥ कमलाच्या कळीप्रमाणे असलेल्या या सुलोचनेच्या मुखावर तिच्या अंगात चोहीकडे फिरणाऱ्या मदनरूपी पिशाचाने न बोलता प्रफुल्लपणा उत्पन्न केला. अर्थात् हिच्या मुखावर मदनाची कांति झळकू लागली ॥ ८१ ॥ जिने मदनरूपी पिशाच आपल्या अंगात धारण केला आहे अशी ही सुलोचना मैत्रिणींची तोंडे पाहून व दिशांची मुखे पाहून काही तरी बडबड करून यथेच्छ हसत असे ।। ८२ ।। भीतीने युक्त व लज्जायुक्त अशा त्या सुलोचनेने तो जयकुमार आपल्याकडे पाहत नाही अशा वेळी ज्याने आपल्या सौन्दर्याने मदनाला जिंकले आहे अशा त्याच्यावर मदनाला साहायक करून शुभ्र व कृष्ण असे व किंचित् तीक्ष्ण आणि चंचल अशा कटाक्षानी पाहणे हेच कोणी तोमर नांवाच्या अनेक प्रकारच्या आयुधानी थोडेसे प्रहार केले ॥ ८३-८४ ॥ ती सुलोचना जिला सर्पाने दंश केलेला आहे अशी नव्हती, किंवा तिने मद्य प्राशिले नव्हते, किंवा जिला भ्रम-वेडसरपणा उत्पन्न झाला आहे अशीही पण नव्हती, तथापि ती आपल्या पतीकडे पाहत असता घामेजून जात असे ।। ८५ ।। Page #620 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-९२) महापुराण (६०९ स्खलन्ति स्म कलालापाश्चकम्पे हृदयं भृशम् । चलान्यालोकितान्यासन्नवशेवात्मनश्च सा ॥८६ प्रक्षालितेव लज्जागात्सुदत्याः स्वेदवारिभिः । वागिन्धनैर्व्यदीपिष्ट विचित्रश्चित्तजोऽनलः ॥ ८७ तावत्रपा भयं तावत्तावत्कृत्यविचारणा । तावदेव धृतिर्यावज्जम्भते न स्मरज्वरः ॥ ८८ विषयीकृत्यसर्वेषामिन्द्रियाणां परस्परम् । परामवापतुः प्रीति दम्पती तौ पथक् पृथक् ॥ ८९ अत्यासङ्गा-क्रमग्राहिकरणैस्तावपितौ । अनिन्दतामशेषेककरणाकारिणं विधिम् ॥ ९० अन्योन्यविषयं सौख्यं त्यक्त्वाशेषान्यगोचरम् । स्तोकेन सुखमप्राप्तं प्रापतुः परमात्मनः ॥ ९१ सम्प्राप्तभावपर्यन्तो विदतुर्न स्वयं च तौ । मुक्त्वैकं शं सहैवोद्यत्स्वक्रियोद्रेकसम्भवम् ॥ ९२ तिच्या तोंडातले मधुर शब्द बाहेर पडत असता अडखळत असत व तिचे हृदय अतिशय कंपित होत असे व कटाक्ष चंचल होत असत. जणु ती स्वतःच्या स्वाधीन नसल्यासारखी झाली होती ॥ ८६ ।। सुन्दर जिचे दात आहेत अशा त्या सुलोचनेची लज्जा तिच्या घामाच्या पाण्यानी जणु धुतली अशी होऊन निघून गेली व तिच्या मनातला विचित्र मदनाग्नि जयकुमाराच्या भाषणरूपी लाकडानी विशेष रितीने भडकू लागला ।। ८७ ।। जोपर्यन्त कामज्वर वाढलेला नाही तोपर्यन्त लज्जा, भय व कर्तव्याचा विचार मनात उत्पन्न होतो व धैर्यही तोपर्यन्तच असते ।। ८८ ॥ ते जोडपे एकमेकाना आपापल्या सर्व विषयांचे विषय करून निरनिराळे प्रकाराचे उत्कृष्ट सुख भोगीत होते ॥ ८९ ।। अत्यासक्तीमुळे-विषयभोगात अतिशय आसक्ति उत्पन्न झाल्यामुळे क्रमाने विषय ग्रहण करणान्या इन्द्रियानी जे सुख त्यांना मिळाले त्यात त्याना तृप्ति वाटली नाही, सन्तोष वाटला नाही. म्हणून त्यांनी ज्याने सर्व सुखे एकदम भोगता येतील असे एक इन्द्रिय ब्रह्मदेवाने बनविले नाही म्हणून त्या जयकुमार व सुलोचना या जोडप्याने ब्रह्मदेवाची निन्दा केली ॥ ९० ॥ त्या दोघांनी सर्वसाधारण लोकाना मिळणारे परस्पराचे सुख त्यागले व जे क्षुद्र लोकांना प्राप्त करून घेणे शक्य नव्हते असे आत्म्याचे उत्तम सुख त्यानी प्राप्त करून घेतले ॥ ९१ ॥ मनात उत्पन्न झालेल्या कामविकाराच्या शेवटच्या अवस्थेला जे प्राप्त झाले आहेत असे ते दोघे स्त्रीपुरुषांनी समानसमयी चाललेल्या क्रियांच्या आधिक्याने उत्पन्न झालेल्या सुखाशिवाय दुसरे काहीच जाणले नाही ।। ९२ ॥ म.८० Page #621 -------------------------------------------------------------------------- ________________ ६१०) महापुराण (४५-९३ रतावसाने निःशक्त्योर्गाढौत्सुक्यात्प्रपश्यतोः । तयोरन्योन्यमाभातां नेत्रयोरिव पुत्रिके ॥ ९३ अवापि च तया प्रीतिस्तस्मात्तेन च या ततः । तयोरन्योऽन्यमेवासीदुपमानोपमेयता ॥ ९४ भुक्तमात्मम्भरित्वेन यत्सुखं परमात्मना । ततोऽप्यधिकमासीद्वा संविभागेऽपि तत्तयोः ॥ ९५ इत्यन्योन्यसमुद्भूतप्रीतिस्फीतामृताम्भसि । कामाम्भोधौ निमग्नौ तौ स्वरं चिक्रीडतुश्चिरम् ॥९६ तदा स्वमन्त्रिप्रहितगढपत्रार्थचोदितः । जयो निगमिषस्तूर्ण स्वं स्थानीयं धियो वशः ॥ ९७ भवद्धिर्भावितश्वयं मां मदीया दिदक्षवः । इति माम समभ्येत्य प्रस्थानार्थमबबुधत् ॥ ९८ तबुद्ध्वा नाथवंशेशः किञ्चिदासीत्ससम्भ्रमः । जये जिगमिषो स्वस्मान्न स्यात्कस्याकुलं मनः ॥ संभोगक्रीडेच्या समाप्तीच्या वेळी शक्तिरहित झालेले व अतिशय तीव्र उत्सुकतेमुळे एकमेकाकडे पाहणारे ते दोघे एकमेकांच्या डोळ्यातील बाहुल्याप्रमाणे एकमेकाना दिसले ॥१३॥ त्या जयकुमारापासून सुलोचनेने जी प्रीति व सुख मिळविले व तिच्यापासून त्याने जे सुख मिळविले त्या दोन्ही सुखांचा उपमानउपमेयपणा एकमेकावर अवलंबून होता अर्थात् सुलोचनेचे सुख जयकुमाराच्या सुखासारखे होते व जयकुमाराचे सुख सुलोचनेच्या सुखासारखे होते. असा भाव येथे जाणावा ॥ ९४ ॥ परमात्मा जिनेश्वराने सर्वाचे स्वामी होऊन जे सुख भोगले त्यापेक्षाही सुलोचना जयकुमार या जोडप्याने भोगलेले सुख जरी दोघाची विभागणी त्या सुखामध्ये झाली होती तरीही ते परमात्म्याच्या सुखापेक्षा अधिक होते. तेथे त्यानी पुष्कळ सुख भोगले हा अभिप्राय समजावा. अतिशयोक्तीने हे वर्णन कविने केले आहे. वास्तविकसर्वज्ञ जिनेश्वराचे अतीन्द्रिय सुख यापेक्षा अनन्तपटीने अधिक आहे ।। ९५ ।। याप्रमाणे एकमेकापासून उत्पन्न झालेले प्रीतिरूपी विपुल अमृतासारखे पाणी ज्यात भरले आहे अशा कामसमुद्रात बुडालेल्या त्या दोघानी स्वच्छंदाने दीर्घकालपर्यन्त क्रीडा केली ॥ ९६ ॥ त्यावेळी आपल्या मन्त्र्याने पाठविलेल्या गुप्तपत्रातील अभिप्रायाने ज्याला प्रेरणा केली आहे, असा तो जयकुमार प्रधानाच्या बुद्धीच्या वश होऊन आपल्या राजधानीला शीघ्र जाण्याची इच्छा करू लागला. तो मामाकडे (अकम्पन सासऱ्याकडे) आला व म्हणाला अहो मामा आपण माझे ऐश्वर्य प्रकट केले आहे. मला आता माझी प्रजा वगैरे लोक पाहण्याची इच्छा करीत आहेत. असे म्हणून आपल्या प्रस्थानाचा अभिप्राय त्याने कळविला ॥ ९७-९८ ।। ते जाणून नाथवंशीय राजा अकम्पन थोडासा घाबरल्यासारखा झाला. बरोबरच आहे की, जय अर्थात् शत्रूला जिंकल्यामुळे प्राप्त झालेला जय जर आपल्यापासून निघून जाऊ लागला तर कोणाचे मन व्याकुल होणार नाही बरे? तात्पर्य जयकुमार हा शत्रूला जिंकून मिळविलेल्या जयाप्रमाणे अकम्पन राजाला प्रिय वाटत होता ।। ९९ ॥ Page #622 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-१०८) महापुराण विचार्य कार्यपर्यायं तथास्त्वित्याह तं नृपः । स्नेहानुवर्तिनी नैति दीपिका वा धियं सुधीः ॥ १०० प्रादात्प्रागेव सर्वस्वं तस्मै दत्तसुलोचनः । तथापि लौकिकाचारं परिपालयितुं प्रभुः ॥ १०१ वत्त्वा कोशादि सर्वस्वं स्वीकृत्य प्रोतिमात्मनः । अनुगम्य स्वयं दूरं शुभेऽहनि वधूवरम् ॥ १०२ कथं कथमपि त्यक्त्वा स सजानिर्जनाग्रणीः । व्यावर्तत ततः शोको तुग्वियोगो हि दुःसहः ॥ १०३ विजयाद्धं समारुह्य जयोऽपि ससुलोचनः । आरूढसामजः सर्वैः स्वानुजैविजयादिभिः ॥ १०४ हेमाङ्गदकुमारेण सानुजेन च सोत्सवः । प्रवर्तयन्कथाः पथ्याः परिहासमनोहराः ॥ १०५ वृतः शशीव नक्षत्रैरनुगङ्ग ययौ शनैः । इला सञ्चालयन्प्राग्वा श्रीमान्स जयसाधनः ॥ १०६ स्कन्धावारं यथास्थानं पारेगङ्गन्यवीविशत् । वीक्ष्य कक्षपुटत्वेन प्रशास्ता शास्त्रवित्तदा ॥ १०७ हटत्पटकुटीकोटिनिकटाटोपनिर्गमः । बभासे शिबिरावासः स्वर्गावास इवापरः ।। १०८ त्या अकम्पनराजाने पुढील कार्याचा विचार केला व बरे आहे असे त्याने त्यास उत्तर दिले. चांगला बुद्धिमान् मनुष्य स्नेहाला-तेलाला अनुसरणाऱ्या दिवटीप्रमाणे स्नेहाला प्रेमाला अनुसरणाऱ्या बुद्धीचा अवलंब करीत नाही. अर्थात् विवेकयुक्त बुद्धीचा स्वीकार करून तो वागतो ।। १०० ॥ ज्याने सुलोचनेला अर्पण केले आहे अशा त्या अकम्पनराजाने जरी पूर्वीच आपले सर्वस्व दिले होते तरीही लौकिक आचार पाळण्यासाठी कोशादिक सर्वस्व देऊन त्याने प्रीतीचा स्वीकार केला होता. एके शुभदिवशी तो त्या वधूवरास काही मार्गापर्यन्त दूर अनुसरला व नंतर जनाचा पुढारी असा अकम्पन राजा कसे तरी त्यांचा त्याग करून कष्टाने शोकयक्त होऊन आपल्या पत्नीसह तेथून परतला. बरोबरच आहे की, आपल्या अपत्याचा वियोग सोसणे कठिण असते ॥ १०१-१०३ ॥ विजयार्द्धनामक हत्तीवर जयकुमार सुलोचनेसहित बसला व त्याचे सगळे विजयादिक भाऊ देखिल निरनिराळ्या हत्तीवर आरूढ झाले. यानन्तर मोठ्या आनंदाने थट्टेने मनोहर व हितकर अशा गोष्टी आपल्या भावासह व हेमाङ्गदकुमाराबरोबर बोलत त्याने प्रयाण केले. आपल्या जयशाली सैन्याच्याद्वारे जणु पृथ्वीला हालवित आहे असा तो लक्ष्मीवान् कान्तियुक्त जयकुमार नक्षत्रानी घेरलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होता व त्याने हळुहळु गंगानदीच्या किना-यावर आगमन केले ।। १०४-१०६ ॥ शास्त्रोक्त व उत्तम हुकमत चालविणारा अशा त्या जयकुमाराने गवताने आच्छादित अशा जमिनीवर गंगेच्या किनाऱ्यावर आपल्या सेनेचे तंबू ठोकले अर्थात् तेथे मुक्काम केला. चमकणाऱ्या वस्त्रांचे जे कोटयवधि तम्बू त्यांच्या समोरून जाण्या येण्याचा मार्ग बनविला होता अशा रीतीचा तो सैन्याचा निवास जणु दुसरा स्वर्गावास आहे असा शोभ लागला ॥ १०७-१०८ ॥ Page #623 -------------------------------------------------------------------------- ________________ ६१२) ( ४५ - १०९ तं प्राप्य सिन्धुरं रुद्ध्वा स राजद्वारि राजकम् । विसर्ज्योच्चैः प्रविश्यान्तरवतीर्थ निषाद्य तम् ॥१०९ राजा सुलोचनां चावरोप्य स्वभुजलम्बिनीम् । निविश्य स्वोचिते स्थाने मृदुशय्यातले सुखम् ॥ ११० तत्कालोचितवृत्तज्ञः प्रियां सन्तर्पयन्प्रियैः । स्नानभोजन वाग्वाद्यगीतनृत्यविनोदनः ॥ १११ नीत्वा रात्रि सुखं तत्र प्रत्याय्य प्रत्ययं स्थितेः । तां निवेश्य समाश्वास्य हेमाङगदपुरःसरान् ॥ ११२ नियोज्य स्वानुजान्सर्वान्सम्यक्कटकरक्षणे । आप्तैः कतिपयैरेव प्रत्ययोध्यमियाय सः ।। ११३ अर्ककीत्र्यादिभिः प्रष्ठैः प्रत्यागत्य प्रतीक्षितः । सस्नेहं सादरं भूयः कुमारेणालपन्पुरीम् ॥ ११४ सानुरागां स्वयं रागात्प्राविशद्वा विशाम्पतिः । न पूजयन्ति के वान्ये पुरुषं राजपूजितम् ।। ११५ इन्द्रो वेभाद्बहिर्द्वाराज्जिनस्योत्तीर्य भूपतेः । सभागेहं समासाद्य मणिकुट्टिमभूतलम् ॥ ११६ मध्ये स्फुरद्रत्नखचितस्तम्भसंभृते । विचित्रनेत्र विन्यस्तस द्वितानविराजिते ॥ ११७ मणिमुक्ताफलप्रोतलम्बलम्बूषभूषणे । परार्घ्यरत्नभाजालजटिले रत्नमण्डपे ॥ ११८ विधुं ज्योतिर्गणेनेव राजकेन विराजितम् । स्वकीर्तिनिर्मलैर्वीज्यमानं चमरजन्मभिः ॥ ११९ वेष्टितं वेन्द्रधनुषा नानाभरणरोचिषा । रोचिषेव कृताकारं पूज्यं पुण्यैश्चतुविधैः ॥ १२० महापुराण आपल्या छावणीत आल्यानंतर आपल्या तंबूच्या द्वाराजवळ कुमाराने हत्तीला थांबविले. आपल्या बरोबर असलेल्या राजसमूहाला त्याने निरोप दिला व आत प्रवेश करून हत्तीला त्याने बसविले. आपण खाली उतरल्यावर आपल्या बाहूच्या आधाराने सुलोचनेला त्याने खाली उतरविले. यानंतर स्वयोग्य अशा स्थानी मृदुगादीवर तो सुखाने बसला ।। १०९ - ११० ॥ कोणत्या वेळी कसे वागावे हे ज्याला चांगले समजते अशा त्या कुमाराने स्नान, भोजन, मधुर बोलणे, वाद्य वादन, गीत, नृत्य इत्यादिक प्रियेला आवडणाऱ्या कार्यांनी तिला ( सुलोचनेला ) सन्तुष्ट केले. त्याने ती रात्र तेथे सुखाने घालविली. येथे मुक्काम करण्याचे काय कारण आहे हे त्याने आपल्या प्रियेला पटवून दिले आणि हेमांगद वगैरे तिच्या भावांना व आपल्या बंधूना आपल्या सैन्याचे चांगले रक्षण करण्यासाठी नेमून आपल्या कांही हितकर्त्या -लोकाना बरोबर घेऊन तो अयोध्येला गेला ।। १११ - ११३ ॥ त्यावेळी अकीर्ति आदिक श्रेष्ठ व्यक्तीनी येऊन त्याचा सत्कार केला व स्नेहाने आणि आदराने कुमाराबरोबर बोलत त्यानी नगरीत प्रवेश केला. जेथील लोक आपल्यावर प्रेम करीत आहेत अशा त्या नगरीत त्याने प्रेमाने प्रवेश केला. बरोबरच आहे की जे राजमान्य लोक आहेत त्यांचा कोण बरे आदर करीत नाहीत ? सर्वच अशांचा आदर करतात ।। ११४-११५ ॥ जसे इन्द्र या जिनेश्वराच्या समवसरणाजवळ आल्यानंतर हत्तीवरून उतरतो तसे भरतेश्वराच्या सभागृहाजवळ आल्यावर जयकुमार हत्तीवरून उतरला व जेथे रत्नजडित जमीन तयार केली आहे अशा सभागृहात आला - त्या सभागृहाच्या मध्यभागी आला. त्या सभागृहाचे खांब चमकणाऱ्या रत्नानी फार शोभत होते आणि नाना प्रकारच्या चित्रविचित्ररेशमी वस्त्राच्या छताने तो मण्डप शोभत होता. रत्ने व मोत्ये ज्यात ओवली आहेत, अशा लांब खाली लोंबणाऱ्या झालरीनी त्याची शोभा खुललेली होती. तो मण्डप अमूल्य रत्नांच्या कांतिसमूहाने Page #624 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-१२८) महापुराण तुङ्गसिंहासनासीनं भास्वन्तं वोदयाद्रिगम् । राजराज समालोक्य बहुशो भक्तिनिर्भरः ॥ १२१ स वा प्रणम्य तीर्थशं स्पृष्ट्वाष्टाङ्गर्धरातलम् । करं प्रसार्य सम्भाव्य राजवासन्नमासनम् ॥ १२२ निजहस्तेन निर्दिष्टं दृष्टयालङ्कृत्य तुष्टवान् । व्यभासिष्ट सभामध्ये स तदान्येन तेजसा ॥१२३ प्रसन्नवदनेन्दूद्यदाह्लादिवचनांशुभिः । वधः किमिति नानीता तां द्रष्टुं वयमुत्सुकाः ॥ १२४ वयं किमिति नाहूतास्त्वद्विवाहोत्सवे नवे । आकम्पनैरिदं युक्तं सनाभिभ्यो बहिष्कृताः ॥ १२५ नन्वहं त्वपितृस्थाने मां पुरस्कृत्य कन्यका । त्वयासौ परिणेतव्या त्वं तद्विस्मृतवानसि ॥ १२६ इत्यकृत्रिमसामोक्त्या तपितश्चक्रवर्तिना। तदा विभावयन्भक्ति स्ववक्त्रं मणिकुट्टिमे ॥ १२७ नत्वापश्यत्प्रमादीव प्रतिगृह्य प्रभोर्दयाम् । जयः प्राञ्जलिरुत्थाय राजराजं व्यजिज्ञपत् ॥ १२८ झगमगत होता. अशा मण्डपाच्या मध्यभागी उंच सिंहासनावर उदयपर्वतावर विराजमान झालेल्या सूर्याप्रमाणे भरतचक्री विराजमान झाला होता. जसा चंद्र आपल्या ज्योतिर्गणाने शोभतो तसा भरत राजा राजसमूहाने शोभत होता. स्वतःच्या निर्मल कीर्तीप्रमाणे शुभ्र चामरानी तो वारला जात होता. नाना अलंकारांच्या कांतीनी युक्त झाल्यामुळे इन्द्रधनुष्यानी वेष्टित झालेल्या सूर्याप्रमाणे शोभत होता. जणु भरतेश्वराचे शरीर कान्तिमय आहे असे वाटत होते. शुभ आयु, शुभ नामकर्म, शुभ-उच्चगोत्र आणि सात वेदनीय या चार पुण्यप्रकृतीनी चक्रवर्ती भरत पूजिला गेला होता. सर्व राजांचा राजा अशा भरताला पाहून जयकुमाराच्या मनात फार भक्ति-आदर उत्पन्न झाली. त्याने तीर्थंकराप्रमाणे चक्रवर्तीला साष्टांग नमस्कार केला. भरतेश्वराने हात पसरून त्याचा सन्मान केला व आपल्या जवळचे आसन त्याने आपल्या हाताने दाखविले. ते आसन दृष्टीने पाहून जयकुमाराने सुशोभित केले व मनात फार खुश झाला. जेव्हां तो सभेत आसनावर बसला तेव्हा तो अपूर्व तेजाने झळकू लागला ॥ ११६-१२३ ।। प्रसन्नमुखचंद्रापासून निघालेल्या आह्लादक वचनकिरणानी सर्वाना आनंदित करणारे भरत महाराजा म्हणाले की हे कुमारा तू आपली पत्नी का बरे आणली नाहीस? आम्ही तिला पाहण्यास फार उत्सुक झालो आहोत ॥ १२४ ।। __ या नवीन त-हेच्या विवाहोत्सवात आम्हाला का बरे बोलावले नाही. अकम्पन महाराजानी हे योग्य केले का? आम्हाला त्यानी आपल्या बंधुवर्गातून वेगळे केले आहे काय? ॥ १२५ ॥ हे कुमारा, मी तुला तुझ्या वडिलासारखा आहे. मला पुढे करून तू त्या कन्यकेशी विवाह करणे योग्य झाले असते पण ते तू विसरलास ।। १२६ ॥ याप्रमाणे स्वाभाविक शांत वचन बोलून चक्रवर्तीने जयकुमाराला आनन्दित केले. त्यावेळी चक्रवर्तीविषयी आपली भक्ति प्रकट करून एखाद्या अपराधी मनुष्याप्रमाणे नम्र होऊन कुमाराने आपले मुख रत्ननिर्मित जमिनीत पाहिले. या नंतर भरतेश्वराची दया-कृपा त्याने मिळविलो व हात जोडून तो उठला व राजेश्वर चक्रवर्तीला याप्रमाणे त्याने विनन्ती केली ॥ १२७-१२८ ॥ Page #625 -------------------------------------------------------------------------- ________________ ६१४) महापुराण (४५-१२९ काशीदेशेशिना देवदेवस्याजाविधायिना । विवाहविधिभेदेषु प्रागप्यस्ति स्वयंवरः ॥ १२९ इति सर्वैः समालोच्य सचिवैः शास्त्रवेदिभिः । कल्याणं तत्समारब्धं देवेन कृतमन्यथा ॥ १३० शान्तं तत्त्वत्प्रसादेन मन्मूलोच्छेदकारणम् । रणं शरणमायात इत्येष भवतः क्रमौ ॥ १३१ सुरखेचरभूपालास्त्वत्पदाम्भोरुहालिनः । चक्रेणाक्रान्तदिक्चक्रकिकरास्तत्र कोऽस्म्यहम् ॥ १३२ देवेनानन्यसामान्यमाननां मम कुर्वता । ऋणीकृतः क्ववानण्यं भवान्तरशतेष्वपि ॥ १३३ नायेन्दुवंशसंरोही पुरुणा विहितौ त्वया । वद्धितौ पालितौ स्थापितौ च यावद्धरातलम् ॥ १३४ इति प्रथयिणी वाणीं श्रुत्वा तस्य निधीश्वरः । तुष्टया सम्पूज्य पूजाविद्वस्त्राभरणवाहनः॥ १३५ दत्वा सुलोचनायै च तद्योग्यं विससर्ज तम् । महीं प्रियामिवालिङग्य तं प्रणम्य ययौ जयः ॥१३६ सम्पत्सम्पन्नपुण्यानामनुबध्नाति सम्पदम् । पौरैर्वनीपकानीकैः स्तूयमानस्वसाहसः ॥ १३७ हे प्रभो, आपली आज्ञा मान्य करणाऱ्या काशीदेशाधिपति अकम्पनमहाराजानी विवाहाचे जे भेद आहेत त्यापैकी स्वयंवर हा एक भेद आहे व तो पूर्वीपासून रूढ आहे असे जाणून व शास्त्रज्ञ सर्व सचिवाबरोबर त्याचा चांगला विचार करून ते मंगलकृत्य करावयाचे ठरविले व आरंभिले पण देवाने त्यात बिघाड उत्पन्न केला. माझा मुळासकट नाश करण्यास कारण असलेले तें युद्ध हे प्रभो आपल्या कृपेने शान्त झाले म्हणून मी हा आपल्या चरणाना शरण आलो आहे ॥ १२९-१३१ ॥ हे प्रभो आपण चक्ररत्नाच्या साहाय्याने दहाही दिशांचे वलय जिंकले आहे. हे प्रभो देव, विद्याधर व राजे हे सर्व आपल्या चरणकमलावर भ्रमरासारखे लीन होऊन आपले नोकर बनले आहेत. त्यात मी कोण आहे ? मी एक नगण्य आहे, तुच्छ मनुष्य आहे ॥ १३२ ।। हे प्रभो आपण माझा असामान्य आदर केला आहे. प्रभूनी मला असे ऋणी केले आहे की, ते शेकडो जन्मात देखिल कोठे बरे फिटेल ? ॥ १३३ ॥ हे प्रभो आदिभगवंतानी नाथवंश व इन्दुवंश-चंद्रवंश याचे रोप लाविले व आपण ते वाढविले, रक्षिले, व जोपर्यन्त हे पृथ्वीतल आहे तोपर्यन्त राहण्यासारखे बळकट केले आहेत ॥ १३४ ॥ याप्रमाणे जयकुमाराची ती नम्रवाणी ऐकून आदरविधि जाणणारे निधिपति भरत महाराज सन्तुष्ट झाले व त्यांनी त्या जयकुमाराचा वस्त्र, अलंकार व वाहने देऊन सत्कार केला. सुलोचनेलाही तिला योग्य अशी वस्त्रे अलंकारादिक चक्रेश्वराने दिले. अशा रीतीने जयकुमाराला त्यांनी निरोप दिला ॥ १३५-१३६ ॥ जणु प्रियेप्रमाणे असलेल्या पृथ्वीला आलिंगून व भरतेशाला वन्दन करून जयकुमार तेथून निघाला. बरोबरच आहे की, जे पुण्यसम्पन्न आहेत, विशाल पुण्यवन्त आहेत, लक्ष्मी त्यांच्या संपत्तीला वाढविण्यास कारण होते ॥ १३७ ॥ Page #626 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-१४५) महापुराण पुराद्गजं समारुह्य निष्क्रम्येप्सुमनःप्रियाम् । सद्यो गङ्गां समासन्नः स्वमनोवेगचोदितः ॥ १३८ शुष्कभूरुहशाखाग्ने सम्मुखीभूय भास्वतः । रुवन्तं ध्वाङक्षमालोक्य कान्तायाश्चिन्तयन्भयम् ॥१३९ मूच्छितः प्रेमसद्भावात्तादृशो षिक् सुखं रतेः । समाश्वास्य तदोपायः सुखमास्ते सुलोचना ॥१४० जलाभयं भवेत्किञ्चिदस्माकं शकुनादितः । इत्युदोर्येगितज्ञेन शकुनझेन सान्त्वितः॥ १४१ सुरदेवस्य तद्वाक्यं कृत्वा प्राणावलम्बनम् । व्रजन्स सत्वरं मोहादतीर्थेऽचोदयद्गजम् ॥ १४२ हेयोपेयविवेकः कः कामिनां मुग्धचेतसाम् । उत्पुष्करं स्फुरद्दन्तं प्रोद्यत्तत्प्रतिमानकम् ॥ १४३ तरन्तं मकराकारं मध्येह्नदमिभाधिपम् । देवी कालोति पूर्वोक्ता सरय्वाः सङ्गमेऽग्रहीत् ॥ १४४ नक्राकृत्या स्वदेशस्थः क्षुद्रोऽपि महतां बली । दृष्ट्वा गजं निमज्जन्तं प्रत्यागत्य तटे स्थिताः ॥१४५ त्यावेळी, नागरिक लोक व याचकांचा समूह जयकुमाराच्या साहसाची स्तुति करू लागले. यानन्तर जयकुमार अयोध्या शहरातून हत्तीवर बसून निघाला व आपल्या आवडत्या स्त्रीला पाहण्यास तो उत्कंठित झाला. आपल्या मनोवेगाने प्रेरिला गेलेला तो जयकुमार लौकरच गंगानदी जवळ येऊन पोचला ।। १३८ ।। __ सुकलेल्या झाडाच्या एका फांदीच्या अग्रभागी एक कावळा सूर्याकडे तोंड करून रडत असलेला जयकुमाराने पाहिला व त्याला आपल्या प्रियेला कांहीं भीति आहे असे वाटले. तो जरी धैर्यशाली होता तरीही सुलोचनेवरील प्रेमाने तो मूच्छित झाला. येथे आचार्य म्हणतात. अशा प्रेमापासून उत्पन्न होणाऱ्या सुखाला धिक्कार असो. त्यावेळी उपायांनी त्याची मूर्छा दूर करून त्याला सावध केले व सुलोचना सुखात आहे असे सांगितले ।। १३९-१४० ॥ त्यावेळी एका शकुन जाणत्या शहाण्याने सांगितले की, आम्हाला पाण्यापासून थोडेसे भय उत्पन्न होईल असे या शकुनावरून वाटते. असे म्हणून जयकुमाराचे हृद्गत जाणणाऱ्या त्या शकूनज्ञाने जयकुमाराला शान्त केले. सुरदेवाचे शकनज्ञाचे ते वाक्य जयकुमाराला प्राण टिकण्याला आधारभत वाटले व त्याने तेथन शीघ्र प्रयाण केले व जेथे जाण्या-येण्याची रहदारी नाही अशा ठिकाणी हत्तीला त्याने प्रेरिले ।। १४१-१४२ ।।। ज्यांची अन्तःकरणे विवेकशून्य झाली आहेत अशा कामी लोकाना टाकाऊ कोणते व ग्राह्य कोणते याचा विवेक-विचार कसा असू शकेल ? ज्याने आपल्या सोंडेचा अग्रभाग वय आकाशात उंच केला आहे व ज्याचे दात चमकत आहेत आणि ज्याच्या तोंडाचा भाग थोडासा वर दिसत आहे, त्यामुळे जो तरंगत असलेल्या सुसरीच्या आकाराप्रमाणे भासत आहे असा तो मोठा हत्ती त्या गंगानदीच्या डोहात जेथे सरयू नदीचा गंगेशी संगम झाला आहे, तेथे (जिचे पूर्वी वर्णन केलेले आहे) अशा कालीदेवीने सुसरीचे रूप धारण करून पकडले. बरोबरच आहे की, आपल्या स्थानी राहणारा क्षुद्र प्राणी देखिल मोठ्यानाही जबरदस्त होतो, हत्ती बुडत आहे असे पाहून तटावर असलेले हेमांगदादिक राजकुमार डोहाजवळ येऊन त्यानी त्वरेने डोहात प्रवेश केला. सुलोचनेने देखिल त्याना पाहिले व ती मनात पंचनमस्कारमंत्राचे स्मरण करू लागली ॥ १४३-१४५ ।। Page #627 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४५-१४६ ससम्भ्रमं सहापेतु-हवं हेमाङ्गदादयः । सुलोचनापि तान्वीक्ष्य कृतपञ्चनमस्कृतिः ॥ १४६ मन्त्रमूर्तीन्समाधाय हृदये भक्तितोऽहंतः। उपसर्गापसर्गान्तं त्यक्ताहारशरीरिका ॥ १४७ प्राविशद्बहुभिः साधं गङ्घा गङ्गेव देवता । गङ्गापातप्रतिष्ठानगङ्गाकूटाधिदेवता ॥ १४८ विबुद्धचासनकम्पेन कृतज्ञागत्य सत्वरम् । तानानयत्तटे सर्वान्सन्तयं खलकालिकाम् ॥ १४९ स्वयमागत्य के नात्र रक्षन्ति कृतपुण्यकान् । गङ्गातटे विकृत्याशु भवन सर्वसम्पदा ॥ १५० मणिपीठे समास्थाप्य पूजयित्वा सुलोचनाम् । तव दत्तनमस्काराज्जज्ञे गङ्गाधिदेवता ॥ १५१ त्वत्प्रसादादिदं सर्वमवरुद्धामरेशिनः । तयेत्युक्ते जयोऽप्येतरिकमित्याह सुलोचनाम् ॥ १५२ उपविन्ध्याद्रि विख्यातो विन्ध्यपुर्यामभूद्विभुः । विन्ध्यकेतुः प्रिया तस्य प्रियङगुश्रीस्तयोः सुता॥१५३ विन्ध्यश्रीस्तां पिता तस्याः शिक्षितुं सकलान्गुणान् । मया सह मयि स्नेहान्महीशस्य समर्पयत् ॥१५४ आपल्या हृदयात मन्त्ररूपी पंचपरमेष्ठींना भक्तीने ठेविले व उपसर्ग समाप्त होईपर्यन्त तिने आहाराचा त्याग केला व शरीरावरील मोह सोडला व गंगादेवता जशी गंगेत प्रवेश करिते तसा तिने अनेक लोकासह प्रवेश केला. ( कालीदेवतेने हत्तीला मगराचे रूप धारण करून डोहात का ओढले ? या प्रश्नाचे उत्तर असे- एके वेळी एक सीण आपल्या पूर्व सर्पाला सोडून दुसऱ्या सर्पाबरोबर जात असताना जयकुमाराने पाहिले. त्याने तिचा व त्याचा धिक्कार केला व त्याच वेळी जयकुमाराच्या सेवकांनी तिला मारले व ती मरण पाऊन या डोहात कालीनामक देवता झाली. तिने मागील वैर स्मरून या हत्तीला डोहात ओढले ) ॥१४६-१४७।। गंगानदी जेथून पडते अशा शिखरावर राहणारी अर्थात् गंगाकुटावर राहणारी गंगा नांवाची देवता ती आपल्या आसनकम्पाने जाणून तेथे आली. ती कृतज्ञ होती. जयकुमाराने केलेले उपकार तिने जाणले व ती तेथे लौकर आली. तिने त्या दुष्ट कालिकेची खूप खरडपट्टी केली आणि त्या सर्वाना तिने तटावर आणले. बरोबरच आहे की, ज्यानी पुण्य केले आहे त्यांचे कोण बरे रक्षण करीत नाहीत ? तिने गंगातटावर आपल्या विक्रिया शक्तीने सर्वसंपत्तीने परिपूर्ण असा प्रासाद बनविला व तेथे तिने रत्नसिंहासनावर सुलोचनेला बसविले व तिची पूजा केली व ती सुलोचनेला म्हणाली अहो सुलोचनाबाई तुम्ही जो मला पंचनमस्कारमन्त्र दिला होता त्यामुळे मी गंगानामक मुख्यदेवी झाल्ये आहे. मी इंद्राची राणी झाल्ये आहे हे सर्व तुझ्या कृपेने घडून आले आहे. अशी त्या देवतेने हकीकत सांगितल्यावर जयकुमाराने सुलोचनेला हे काय आहे याचा खुलासा कर असा प्रश्न केला. तेव्हा तिने याप्रमाणे सांगितले ।। १४८-१५२॥ विन्ध्यपर्वताजवळ विन्ध्यपुरीनामक नगरीत विन्ध्यकेतुनामक प्रसिद्ध राजा राज्य करीत आहे. त्याच्या प्रियेचे नांव प्रियङगुश्री होते व या राजाराणीला विन्ध्यश्रीनामक कन्या झाली ॥ १५३ ॥ आपली विन्ध्यश्री कन्या सर्व गुणांचे शिक्षण घेऊन चांगली गुणवती व्हावी असे त्याला वाटत होते म्हणून तिच्यासह माझ्या पित्याकडे आला व त्याने माझ्यासह गुणाचे शिक्षण घ्यावे म्हणून माझ्यावरील प्रेमाने तिला त्याने माझ्या पित्याला अर्पण केले ॥ १५४ ॥ Page #628 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-१६५) महापुराण (६१७ ................... वसन्ततिलकोद्याने क्रीडन्ती सैकदा दिवा । दष्टा तत्र मया दत्तनमस्कारपदान्यलम् ॥ १५५ भावयन्ती मृतात्रेयं भूत्वायान्स्नेहिनी मयि । इत्यववीदतौ सोऽपि ज्ञात्वा सन्तुष्टचेतसा ॥ १५६ तत्कालोचितसामोक्त्या गडगादेवी विसर्म्य ताम् । सबलाकं प्रकुर्वन्तं खंचलत्केतुमालया ॥ १५७ स्वावासं सम्प्रविश्योच्चैः सप्रियः सह बन्धुभिः। सस्नेहं राजराजोक्त्वामुत्क्वातत्प्रहितं स्वयम् ॥१५८ पृथक् पृथक् प्रदायाति मुदमासाद्य वल्लभाम्।नीत्वा तत्रैव तां रात्रि प्रातरुत्थाय भानुवत् ॥१५९ विषातुमनुरक्तानां भुक्तिमुधोतिताखिलः । अनुगडगं प्रयान्प्रेम्णा कमिन्याः कुरुवल्लभः ॥ १६० कमनीयैरतिप्रीतिमालापरतनोत्तराम् । जाह्नबी दर्शितावर्तनाभिः कूलनितम्बिका ॥ १६१ चटुलोज्ज्वलपाठीनलोचना रमणोन्मुखी । तरङगबाहुभिगाढमालिङगनसमुत्सुका ॥ १६२ स्वभावसुभगा दृष्टहृदया स्वच्छतागुणात् । तटद्वयवनोत्फुल्लसुमनोमालभारिणी ॥ १६३ अभिवृद्धरसावेगं सन्धर्तुमसहा द्रुतम् । पश्य कान्ते प्रियं याति स्वानुरूपं पयोनिधिम् ॥ १६४ रतेः कामाद्विना नेच्छा न नीचेषतमस्पृहा । सङगमे तन्मयी जाता प्रेम नामेवृशं मतम् ॥ १६५ ती एके दिवशी दिवसा वसन्ततिलक नामक बगीचात खेळत असता एक सर्प तिला चावला, त्यावेळी मी तिला पंचपरमेष्ठिमन्त्र सांगितला. तिने अतिशय भक्तीने त्या मंत्राचे चिन्तन केले व ती मरण पावली आणि ती तेथे गंगादेवता झाली. माझ्यावरील स्नेहामुळे येथे आली. याप्रमाणे सुलोचनेने सांगितल्यावर जयकुमाराच्या मनाला फार आनंद वाटला ॥ १५५-१५६ ॥ त्यावेळी त्या प्रसंगाला योग्य असे जयकुमाराने मधुर भाषण केले व त्याने तिला निरोप दिला. चंचल अशा ध्वजमालेने सर्व आकाश जणु बगळयानी युक्त करणारा असा तो जयकुमार आपल्या पत्नीसह व आपल्या सर्व हितका मित्र-बान्धवासह आपल्या निवासस्थानी आला. सर्व राजांच्या अधिपतीने अर्थात् भरतेश्वराने स्नेहपूर्वक जे भाषण केले होते ते त्याने सर्वाना सांगितले आणि त्याने वस्त्रालंकारादिक दिले होते ते वेगळे वेगळे देऊन त्याने आपल्या पत्नीला-सुलोचनेला अतिशय आनन्दित केले व ती रात्र त्याने त्याच ठिकाणी घालविली व आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे उदरपोषणासाठी ज्याने सर्व विश्व प्रकाशित केले आहे अशा सूर्याप्रमाणे तत्काळी उठून तो कुरुवल्लभ जयकुमार आपल्या पत्नीसह गंगेच्या किनाऱ्याला अनुसरून प्रयाण करून तिला त्याने अत्यन्त सन्तुष्ट केले ॥ १५७-१६० ॥ __ पाण्यात उत्पन्न होणारे भोवरे हेच जणु बेंबी, तिला ही गंगानदी दाखवित आहे. दोन्ही किनारे हेच जणु ढुंगण आहे. चंचल व चमकणारे असे जे मासे हेच जिचे डोळे आहेत, अशी ही नदी क्रीडा करण्यास उत्सुक झाली आहे आणि आपल्या तरंगरूपी बाहुनी गाढ आलिंगन देण्यास उत्सुक झाली आहे. ही स्वभावाने सुन्दर आहे व स्वच्छतागुण धारण करीत असल्यामुळे हिचे हृदय सर्वाना स्पष्ट दिसत आहे. आपल्या दोन्ही किनाऱ्यावरील वनात प्रफुल्ल झालेल्या पुष्पांच्या माला ही धारण करीत आहे. जिचा रस-प्रेम व पाणी यांच्या वेगाला धारण करण्यास-आटोक्यात ठेवण्यास ही असमर्थ झाली आहे. अशी गंगानदी आपणास अनुरूप अशा म.८१ Page #629 -------------------------------------------------------------------------- ________________ ६१८) महापुराण (४५-१६६ साफल्यमेतया नित्यमेति लावण्यमम्बधेः । उत्पत्तिर्भूभृतां पत्युर्षरण्यां वधिता सती ॥ १६६ वाषिरेव पतिस्तस्मादेषाभूत्पापनाशिनी। धवला धार्मिकर्मान्या सतीनामुपमानताम् ॥ १६७ गता कवीश्वरः सर्वैः स्तूयते देवतेति च । गुणिनश्चेन्न के कान्वा संस्तुवन्ति गुणप्रियाः ॥ १६८ इति गङगागतः श्रव्यैरन्यैश्चातिमनोहरैः । ततः कतिपयरेव प्रयाणः कुरुजांगलम् ॥ १६९ प्राप्य तद्वर्णनाव्याजान्मोदयन्काशिपात्मजाम् । आप्तजानपदानीतफलपुष्पादिभिश्च सः ॥ १७० विकसन्नीलनीरेजसरोजातिविराजितैः । प्रत्येत्येव प्रपश्यन्ती सरोनेत्रर्वधूवरम् ॥ १७१ समुद्राकडे हे प्रिये, ही चालली आहे. बरोबरच आहे की, तिला आपला पति जो काम त्याच्या शिवाय दुसऱ्याची इच्छा व्हावयाची नाही. ज्या उत्तम असतात अशा स्त्रियांच्या ठिकाणी नीचपुरुषाविषयी इच्छा कशी असेल ? ही गंगानदी समुद्राचा संगम झाल्याबरोबर तन्मय झाली आहे. हे प्रिये, प्रेम म्हणून जे असते ते असे असले म्हणजेच ते खरे प्रेम होय ॥ १६१-१६५ ॥ ___ या समुद्राचे लावण्य-सौंदर्य-दुसरा अर्थ खारटपणा हा हिच्या सौंदर्याने सफल होत आहे. या गंगानदीचा जन्म पर्वतांचा राजा जो हिमालय त्याच्यापासून झाला आहे व ही सती या पृथ्वीवर वाढली आहे. समुद्र हाच हिचा पति असल्यामुळे ही पापांचा नाश करणारी आहे. ही धवला-शुभ्र, निर्दोष असल्यामुळे धार्मिक लोकाना मान्य आहे व सर्वपतिव्रता स्त्रियाना उपमा देण्यास योग्य झालेली आहे व सर्व कवीश्वर हिची देवता म्हणून स्तुति करतात. ज्या अर्थी गंगानदीच्या संबंधाने मनोहर व श्राव्य-ऐकण्यास योग्य अशा अन्य कित्येक शब्दानी ते कवीश्वर हिची स्तुति करतात ती योग्यच आहे. गुणप्रिय लोक जर गुणिलोकांची स्तुति न करतील तर ते कोणाची स्तुति करतील ? याप्रमाणे जयकुमाराने गंगानदीचे मनोहर श्राव्य शब्दानी वर्णन केले व नंतर काही मुक्कामानीच आपल्या कुरुजांगल नामक देशात येऊन पोचला ॥ १६६-१६९ ॥ आपल्या देशात आल्यावर त्याच्या वर्णनाच्या निमित्ताने सुलोचनेला जयकुमाराने आनन्दयुक्त केले आणि आप्त व देशातील लोकानी आणलेल्या फळे, फूले आदिकानी त्याने तिला रमविले ॥ १७०।। विकसणारी कमळे व तांबडी कमळे यांनी सुशोभित दिसणा-या कमलरूप नेत्रानी पुढे येऊन ती नगरी जणु त्या वधुवराना पाहत आहे असे वाटत होते ॥ १७१ ॥ Page #630 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-१८१) महापुराण सवप्रजघनाभोगां वापीकूपोरुनाभिकाम् । परीतजातरूपोच्चप्राकारकटिसूत्रिकाम् ॥ १७२ अलडकृतमहावीथीविलसद्बाहुवल्लरीम् । सौधोत्तुङगकुचां भास्वद्गोपुराननशोभिनीम् ॥ १७३ कुडकुमागुरुकर्पूरकर्दमादितगात्रिकाम् । नानाप्रसवसन्दृब्धमालाधम्मिल्लधारिणोस् ॥ १७४ तोरणाबद्धरत्नादिमालालङकृतविग्रहाम् । आह्वयन्तीमिवोधिः पतत्केत्वग्रहस्तकः ॥ १७५ द्वारासंवृतिविश्रम्भनेत्रां वासान्तरुत्सुकाम् । पुरोहितः पुरन्ध्रीभिर्मन्त्रिभिनैश्यविश्रुतः ॥ १७६ दत्त शेषः पुरः स्थित्यासाशीर्वादैः समुत्सुकैः । तूर्यमङ्गलनिर्घोषः पुरन्दर इवापरः ॥ १७७ सुलोचनामिवान्यां स्वां प्रविश्य नगरी जयः । आवसत्कान्तया साधं नगर्या हृदयं मुदा ॥ १७८ राजगेहं महानन्दविधायि विविद्धिभिः । तिथ्यादिपञ्चभिः शुद्धः शुद्धे लग्ने महोत्सवे ॥ १७९ सर्वसन्तोषणं कृत्वा जिनपूजापुरःसरम् । विश्वमङ्गलसम्पत्त्या स्वोचितासनसुस्थिताम् ॥ १८० हेमाङगदादिसानिध्ये राजा जातमहोदयः। सुलोचनां महादेवी पट्टबन्धं व्यपान्मुदा ॥ १८१ उत्तम जो धूलिसाल हाच जिचा ओटीचा विस्तृत प्रदेश आहे अशी, लांबट विहिरी व आड हेच जिची विस्तृत बेंबी आहे अशी, सभोवती असलेला जो सोन्याचा उंच तट तोच जिचा कंबरपट्टा आहे, सुंदर रचनायुक्त अशा ज्या अनेक गल्ली त्याच जणु जिचे हात आहेत अशी, मोठे जे वाडे हेच जिचे उंच स्तन आहेत अशी, सुशोभित जी वेस तीच जणु मुख त्याने शोभणारी केशर, अगुरु व कापूर यांच्या उटीने जणु जिचे शरीर ओलसर दिसत आहे, अनेक प्रकारच्या पुष्पमालारूपी केशपाश जिने धारण केला आहे अशी, तोरणाला बांधलेल्या ज्या रत्नांच्या व मोत्यांच्या माळा त्यानी जी सुंदर दिसत आहे, वर व खाली फडफडणाऱ्या पताकांचे अग्रभाग हेच जणु हात त्यानी जणु जी बोलावित आहे, उघडलेले जे दरवाजे हेच जिचे जणु विश्वास उत्पन्न करणारे नेत्र आहेत अशी जिच्या प्रत्येक घरात उत्सव चालला आहे अशी ही नगरी जणु दुसरी सुलोचना आहे अशी दिसत होती. अशा नगरीतले पुरोहित, सौभाग्यवती स्त्रिया, मन्त्रिगण व प्रसिद्ध असे वैश्य हे जयकुमाराचे दर्शनासाठी व त्याला आशीर्वाद देण्यासाठी उत्कण्ठित झाले होते. त्यांचा आशीर्वाद घेणारा हा जयकुमार जणु दुसरा इन्द्र आहे असा भासला. अतिशय आनन्द देणाऱ्या व नानाप्रकारच्या ऋद्धीनी सहित अशा त्या नगरीत-हस्तिनापुरात नानाप्रकारच्या वाद्यांच्या मंगलघोषासहित जयकुमाराने सुलोचनेसह प्रवेश केला व नगरीचे जणु हृदय अशा राजभवनात प्रिया सुलोचनेबरोबर मोठ्या आनंदाने निवास केला ।। १७२-१७८ ॥ तिथि, वार, नक्षत्र, योग, करण यानी शुद्ध असलेल्या शुभमुहूर्तावर मोठा उत्सव करून जयकुमाराने प्रथमतः सर्वमंगल वस्तूनी जिनेश्वराची पूजा केली. नंतर आपल्या योग्य आसनावर बसलेल्या सुलोचनेला तिचे हेमांगदादि भाऊ समक्ष असताना ज्याचा मोठा उत्कर्ष झाला आहे अशा जयकुमाराने महादेवीचे पट्टबंधपद अर्पण केले. अर्थात् पट्टराणीला योग्य असा अलंकार तिच्या मस्तकावर बांधला. बरोबरच आहे की ज्यानी पुण्यसंचय केला आहे अशा स्त्रियावर पतीचे एवढे प्रेम असतेच ।। १७९-१८१ ।। Page #631 -------------------------------------------------------------------------- ________________ “६२०) महापुराण (४५-१८२ स्त्रीष सञ्चितपुण्यासु पत्युरेतावती रतिः । हेमाङगदं ससोदर्यमुपचर्य स सम्भ्रमम् ॥ १८२ पुरोभूय स्वयं सर्वैर्भाग्यः प्राघूर्णकोचितैः । नृत्यगीतसुखालापर्बारणारोहणादिभिः ॥ १८३ वनवापीसर:क्रीडाकन्दुकादिविनोदनः । अहानि स्थापयित्वैवं सुखेन कतिचित्कृती ॥ १८४ तदीप्सितगजाश्वास्त्रगणिकाभूषणादिकम् । प्रदाय परिवारं च तोषयित्वा यथोचितम् ॥ १८५ चतुर्विषेन कोशेन तत्पुरीं तमजीगमत् । सुखप्रयाणः सम्प्राप्य दृष्ट्वा भूपं ससुप्रभम् ॥ १८६ प्रणम्याह्लादयन्नस्थात् स वधूवरवार्तया । सुखं काले गलत्येवमकम्पनमहीपतिः ॥ १८७ तवा सञ्चिन्तयामास विरक्तः कामभोगयोः । अहो मया प्रमत्तेन विषयान्धेन नेक्षिता ॥ १८८ कष्टं शरीरसंसारभोगनि:स्सारता चिरम् । आदावशुच्युपादानमशुच्यवयवात्मकम् ॥ १८९ विश्वाशुचिकरं पापं दुःखं दुश्चेष्टितालयम् । निरन्तरत्रवोत्कोथनवद्वारशरीरकम् ॥ १९० हेमांगदादि जे त्याचे मेहुणे होते स्वतः त्यांच्या पुढे होऊन जयकुमाराने त्यांचा चांगला आदर केला. अर्थात् पाहुण्याना योग्य अशा सर्वभोग्य वस्तुनी त्याने संतुष्ट केले. नृत्य, गीत, मधुर, सुखदायक भाषण, हत्तीवर बसून विहार करणे, वनविहार करणे, लांबट विहीर, सरोवर, यात क्रीडा करणे, चेण्डू वगैरेनी खेळणे इत्यादिकानी त्याने त्याना आनंदित केले. अशा रीतीने सेवा करून काही दिवस त्या कुशल जयकुमाराने आपल्या घरी सुखाने ठेविले. यानंतर त्याने त्याना इच्छित असे हत्ती, घोडे, अस्त्रे, गणिका-दासी, वस्त्रालङकार आदिक दिले. त्यांच्या परिवार लोकानाही यथायोग्य सन्तुष्ट केले आणि बरोबर चार प्रकारचा कोश दिला अर्थात् (रत्ने, सोने, चांदी, नाणी) व त्यांच्या नगरीला पाठवून दिले ॥ १८२-१८५ ॥ हेमांगदादिकुमार सुखाने काही मुक्काम करून सुप्रभाराणीसह असलेल्या राजा अकम्पनाकडे आले आणि त्यानी त्याना नमस्कार करून वधू-सुलोचना व वर-जयकुमार यांची सर्व कुशल वार्ता सांगून आनन्दित केले ।। १८६ ।। याप्रमाणे सुखाने काल जात असता अकम्पन महाराजाना काम व भोग यामध्ये अर्थात् पंचेन्द्रियाच्या सुखाविषयी विरक्ति उत्पन्न झाली व त्यानी याप्रमाणे विचार केला ॥ १८७ ॥ अरेरे मी पंचेन्द्रियांच्या विषयात आंधळा बनलो, विचारशून्य बनलो आणि दीर्घकालपर्यन्त शरीर, संसार व भोगांचे पदार्थ यातील निःसारपणाला जाणले नाही. ही खेद करण्याची गोष्ट मजकडून घडली ॥ १८८ ॥ हे शरीर अपवित्र-घाण अशा शुक्र व शोणित या कारणापासून उत्पन्न झाले आहे व हे शरीर अपवित्र अवयवानी बनले आहे व सर्व पदार्थाना अपवित्र करणारे आहे. पाप उत्पन्न करणारे आहे आणि दुःखे व पापरूपी क्रियांचे स्थान आहे ।। १८९ ॥ ज्याच्या नवद्वारांतून नेहमी दुर्गंध वाहत आहे असे हे शरीर किड्यांच्या समुदायाने भरलेले, चितेतील राख व विष्ठा यांनी युक्त होणारे व नाश पावणारे आहे ॥ १९० ॥ Page #632 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-१९७) महापुराण (६२१ कृमिपुञ्जचिताभस्मविष्ठानिष्टं विनश्वरम् । तवध्युष्य जडो जन्तुस्तप्तः पञ्चेन्द्रियाग्निभिः ॥१९१ विश्वेन्षनः फुलिङ्गीव भूयोऽयात् कुत्सितां गतिम् । साशाखानिः किलात्रैव यत्र विश्वमणूपमम् ॥ तां पुपूर्षः किलाग्राहं धनः सख्यानिवन्धनः । यदादाय भवेज्जन्मी, यन्मुक्त्वा मुक्तिभागयम् ॥ तद्याथात्म्यमिति ज्ञात्वा कथं पुष्णाति धीधनः । हा हतोऽसि चिरं जन्तो मोहेनाद्यापि ते यतः॥ नास्ति कायाशुचिज्ञानं तत्त्यागश्चातिदुर्लभः । दुःखी सुखी सुखी दुःखी दुःखी दुःख्येव केवलम् ॥१९५ धन्यधन्योऽधनो धन्यो निर्धनो निर्धनः सदा । एवंविषैस्त्रिभिर्जन्तुरीप्सितानीप्सितंश्चिरम् ॥ १९६ चतुर्थ भडगमप्राप्य बम्भ्रमीति भवाणवे । यां वष्टघयमसौ वष्टि परं वष्टि स चापराम् ॥ १९७ हा अज्ञानी जीव अशा शरीरात राहून ज्याचे सर्व विषय हीच लाकडे आहेत अशा पंचेन्द्रियरूपी अग्नीनी संतप्त झालेला आहे व कुलिङ्गी-पंचाग्नि तपश्चरण करणाऱ्या साधूप्रमाणे पुनः हीनगतीस प्राप्त झाला आहे ॥ १९१ ।। आशारूपी खाण या देहातील आत्म्यात आहे व त्या खाणीमध्ये हे विश्व अणुप्रमाणे भासते. ती आशाखाण भरून टाकण्यासाठी मी आज कांही संख्येने युक्त अशा घनाने ती खाण भरून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थात् खाण केव्हाही भरणे शक्य नाही ॥ १९२॥ हा जीव ज्याचे ग्रहण केल्यामुळे जन्मी होतो. म्हणजे पुनः पुनः जन्म धारण करतो पण त्याचे ग्रहण करणे सोडून दिले म्हणजे हा आत्मा मुक्त होतो पण शरीर हेच जीवाचे खरे स्वरूप आहे असे समजून हा ज्ञानधनी आत्मा त्याचेच कसे बरे पोषण करीत आहे ? जोपर्यन्त हा आत्मा शरीर ग्रहण करीत राहील तोपर्यन्त याला जन्म धारण करून संसारात फिरावे लागणारच ॥ १९३ ॥ हे जीवा, तूं मोहाफडून फार दीर्घकालापासून वारंवार मारला जात आहेस व या मोहामुळे तुला या शरीराच्या अपवित्रपणाचे अद्यापि ज्ञान होत नाही व यामुळे त्याचा व मोहाचा त्याग होणे ही अतिशय कठिण वस्तु बनली आहे ॥ १९४ ॥ जो प्राणी दुःखी असून पुनः सुखी होईल. जो सुखी आहे तो दुःखी होईल व एकादा प्राणी दुःखी असून पुनः पुनः दुःखी होईल. तसेच कोणी धनी-श्रीमंत तो निर्धन होईल. जो निर्धन आहे तो श्रीमन्त होईल पण एकादा मनुष्य निर्धन असून सदा निर्धनच राहील. या इष्ट व अनिष्ट अशा तीन प्रकारच्या कल्पना आहेत पण चौथी कल्पना जो सुखी आहे तो सुखीच राहील ही कल्पना प्राप्त न झाल्यामुळे हा जीव या संसारसागरात वारंवार फिरत आहे ।। १९५-१९६ ॥ हा पुरुष ज्या स्त्रीची इच्छा करतो ती स्त्री त्याच्याहून वेगळ्याच पुरुषाची इच्छा करते. पण तो पुरुषही आणखी दुसन्या स्त्रीची इच्छा करितो व ती स्त्रीही आणखी इतराची इच्छा करिते ही अशी इच्छापरम्परा खरोखर कष्टदायक आणि अनिष्ट आहे ॥ १९७ ॥ Page #633 -------------------------------------------------------------------------- ________________ ६२२) महापुराण (४५-१९८ सापि वष्टयपरं कष्टमनिष्टेष्टपरम्परा । यदिष्टं तदनिष्टं स्याद्यदनिष्टं तविष्यते ॥ १९८ इहेष्टानिष्टयोरिष्टा नियमेन नहि स्थितिः । स सा सा तत्तदेवैषा सा स स्यात्सोऽपि तत्पुनः ॥ तत्स स्यात्तत्तदेवात्र चक्रके वक्रसङक्रमः। अन्तमस्य विधास्यामि चिन्तयित्वा जिनोदितम् ॥ सन्ततं जन्मकान्तारभ्रान्तौ भीतोऽहमन्तकात् ॥ २०० भोगोऽयं भोगिनो भोगो भोगिनो भोगिनामकृत् । तावन्मात्रोऽपि नास्माकं भोगो भोगेष्विति ध्रुवम्॥ भुज्यते यः स भोगः स्याद्भुक्तिर्वाभोग इष्यते । तद्वयं नरकेऽप्यस्ति तस्माद्भोगेषु का रतिः॥२०२ जी वस्तु आपणास प्रिय वाटते ती अप्रियही होते व जे अप्रिय असते ते प्रियही होते. यास्तव या जगात प्रिय अप्रिय यांची नियमाने एकच अवस्था असते असे नाही ।। १९८ ॥ जो स-पुरुष आहे तो सा-स्त्री होईल. अन्यभवी त्याला स्त्रीपणा प्राप्त होईल व जी स्त्री आहे ती अन्यजन्मी नपुंसक होईल व तो नपुंसकही स्त्री होईल. ती स्त्री पुरुष होईल. तो पुरुष पुनः ते- नपुंसक होईल व जो नपुंसक आहे तो अन्य जन्मीही पुनः नपुंसक होईल. याप्रमाणे या संसारचक्रात वक्रगति आहे असे याचे स्वरूप आहे ।। १९९ ।। यास्तव श्रीजिनेश्वराच्या उपदेशाचा विचार करून मी ( अकंपन राजा ) या संसारचक्राचा नाश करीन कारण की मी नेहमी जन्म घेणेरूप जंगलात म्रमण करण्याच्या कार्यात अन्तकापासून-मृत्युपासून फार भ्यालो आहे ।। २०० ।।। ज्याचा एक वेळ अनुभव घेता येतो त्या अन्नादि पदार्थाला भोग म्हणतात पण हे भोगअन्नादि पदार्थ भोगिनः सर्पाच्या भोग:- शरीराप्रमाणे आहेत. अर्थात हे अन्नादिपदार्थ सर्प शरीराप्रमाणे प्राणहारक आहेत. हे भोग ज्याच्याजवळ आहेत त्याला भोगी म्हणतात. अर्थात् हे भोग ज्याच्याजवळ आहेत त्याला भोगि या नांवाने युक्त करतात. परंतु खरे पाहिले असता हे भोग आमचे म्हणजे जीवांचे नाहीत. जीव व हे भोग पदार्थ एकमेकापासून सर्वथा वेगळे आहेत. जीवाचे भोग हे स्वरूप नाही. यास्तव भोग भोगामध्येच निश्चितपणे राहणार आहेत. आत्म्याशी त्यांचा काही संबंध नाही ॥ २०१॥ ज्याचा भोग घेतला जातो त्याला भोग म्हणतात. अर्थात् विषयाला भोग म्हणतात. किंवा उपभोग घेणे त्यालाही भोग म्हणतात. हे दोन्हीही (विषय व उपभोग घेणे ) नरकातही असतात म्हणून भोगामध्ये रति-प्रेम करणे आसक्त होणे हे कशाला ? भोगामध्ये आसक्ति ठेवणे हे नरकदुःखाची प्राप्ति करून घेण्यास कारण आहेत. यास्तव भोगामध्ये केव्हाही रति करू नये ॥ २०२ ॥ Page #634 -------------------------------------------------------------------------- ________________ (६२३ ४५-२११) भोगास्तृष्णाग्निसंवृद्ध दीपनीयौषधोपमाः । एभिः प्रवृद्धतृष्णाग्नेः शान्त्यै चिन्त्यमिहापरम् ॥२०३ इत्यतो न सुधीः सद्यो वान्ततृष्णाविषो भृशम् । हेमाङ्गदं समाहूय पूज्यपूजापुरःसरम् ॥ २०४ अभिषिच्य चलां मत्वा बद्ध्वा पट्टेन वाचलम् । लक्ष्मीं समयं गत्वोच्चैरभ्यासं वृषभेशितुः ॥ २०५ प्रव्रज्य बहुभिः सार्धं मूर्धन्यः स ससुप्रभः । क्रमाच्छ्रेणीं समारुह्य कैवल्यमुदपादयत् ॥ २०६ अथ जन्मान्तरायात महास्नेहातिनिर्भरः । सुलोचनाननानन्दनेन्दुबिम्बात्सुतां सुषाम् ॥ २०७ उन्मीलनीलनीरेजराजिभिर्लोचनैः पिबन् । पूरयन् श्रोत्रपात्राभ्यां तद्गीर्गीतरसायनम् ॥ २०८ हरन्करिकराकारकरालिङ्गनसङ्गतः । तद्गात्रकूपिकान्तःस्थं रसं स्पर्शनवेदिनम् ॥ २०९ तद्विम्बाधरसम्भावितामृतास्वादनोत्सुकः । तद्वक्त्रवारिजामोदान्मोदमानोऽनिशं भृशम् ॥ २१० अत्रैव न पुनर्वेति मम वामासमागमः । स सुलोचनया स्वानि चक्षुरादीन्यतर्पयत् ॥ २११ महापुराण एखादे औषध उदरातील अग्नि वाढविण्यास कारण असते. तसे हे भोग लोभरूप अग्नीला वाढविण्यास कारण आहेत. या भोगानी तृष्णारूपी अग्नि वाढतो. तेव्हा त्या अग्नीच्या शमनाकरिता येथे दुसन्या एखाद्या औषधाच्या उपयोगाचा विचार केला पाहिजे. भोगाच्या उपभोगाने भोगाची इच्छा शमत नाही ती उलट वाढतेच म्हणून त्या इच्छेचे शमन करण्यासाठी भोग भोगणे हा उपाय नाही. याहून वेगळाच उपाय हुडकला पाहिजे ॥ २०३ ॥ अशा रीतीचा विचार करून त्या सुबुद्धीच्या अकम्पनराजाने सगळे तृष्णाविष पूर्ण ओकून टाकले आणि त्याने आपल्या हेमाङ्गद पुत्राला बोलाविले. प्रथमतः पूज्य जिनेश्वराची पूजा केली व नंतर हेमाङ्गदाचा राज्याभिषेक केला आणि चंचललक्ष्मीला पट्टाने बांधून निश्चल केले. या रीतीने त्याला राजाने राज्यलक्ष्मी अर्पण केली व नंतर तो वृषभजिनेश्वराजवळ गेला व अनेकराजासह आपल्या सुप्रभाराणीसह त्याने दीक्षा घेतली. क्रमाने क्षपक श्रेणीच्या गुणस्थानावर आरोहण करून मोहादि चार घातिकर्माचा नाश केला व तो केवलज्ञानी झाला ।। २०४-२०६ ॥ पूर्वजन्मापासून चालत आलेली जी मोठी प्रीति तिने हा जयकुमार अतिशय भरलेला होता. सुलोचनेचा मुखरूपी जो आनन्ददायक चन्द्र त्यापासून निघालेली जी सुधा म्हणजे जे अमृत ते विकसित होणाऱ्या नीलकमलपंक्तिसारख्या डोळ्यानी तो प्राशन करीत असे व आपल्या दोन कानरूपी पात्रानी तिचे भाषण व तिचे गायनरूपी जे रसायन ते भरून घेणारा, हत्तीच्या सोंडेप्रमाणे ज्यांचा आकार आहे अशा हातानी सुलोचनेच्या शरीराला आलिंगून त्या शरीररूपी कूपिकेंत असलेल्या रसाला तो स्पर्शनाने जाणत असे ।। २०७ - २०९ ॥ तिच्या तोंडल्याप्रमाणे असलेल्या अधरातील अमृताचे आस्वादन करण्यात तो उत्सुक होता. तिच्या मुखरूपी कमलाच्या सुगन्धाने नेहमी अतिशय आनन्दित होणारा, याच भवात मला स्त्रीचा समागम होईल पुढे होणार नाही म्हणून जणु त्या सुलोचनेच्या द्वारे आपल्या डोळे, क वगैरे पाचही इन्द्रियाना त्याने तृप्त केले ।। २१०-२११ ।। Page #635 -------------------------------------------------------------------------- ________________ ६२४) महापुराण (४५-२१२ प्रमाणकालभावेभ्यो यद्रतेः समता तयोः । ततः सम्भोगशङगारावारापारान्तगौ हि तो ॥ २१२ अतिपरिणतरत्या लोपितालेपनादिः । स सकलकरणानां गोचरीभूय तस्याः ॥ हितपरविषयाणां सापि तस्यैवमेतौ । समरतिकृतसाराण्यन्वभूतां सुखानि ॥ २१३ मनसि मनसिजस्यावापि सौख्यं न ताभ्याम् । पृथगनुगतभावः संगताभ्यां नितान्तम् ॥ करणमुखसुखैस्तैस्तन्मनः प्रीतिमापत् । भवति परमुखं च क्वापि सौख्यं सुतप्त्यै ॥ २१४ शिशिरसुरभिमन्दोच्छवासजैः स्वः समीरैः । मदुमधुरवचोभिः स्वादनीयप्रदेशः ॥ ललिततनुलताभ्यां मार्दवैकाकराभ्याम् । अखिलमनयतां तो सौख्यमात्मेन्द्रियाणि ॥ २१५ अवयवाचे प्रमाण, काल व भाव यामुळे या दोघांच्या रतिसुखात समता होती. म्हणून ते दोघे संभोगशृंगाराच्या समुद्राच्या अन्तापर्यन्त पोहोचलेले होते ।। २१२ ॥ अतिशय वृद्धि पावलेल्या रतिमुळे अंगाला लावलेल्या चन्दनाची उटी, याचप्रमाणे पुष्पमाला धारण करणे वगैरे बंद पडले. त्यामुळे तो जयकुमार तिच्या सर्व इन्द्रियांचा विषय बनला व ती सुलोचना देखिल जयकुमाराचे हित करणाऱ्या सर्व विषयात तत्पर होती. याप्रमाणे हे दोघे समान प्रेम करणे हाच सारभाग ज्यात आहे अशा सुखांचा अनुभव घेऊ लागले ॥ २१३ ॥ दोघांच्या अन्तःकरणात उत्पन्न झालेल्या वेगवेगळया परिणामानी त्यानी- त्या दोघानीही अन्तःकरणात मदनाचे सुख-कामसुख बिलकुल अनुभवले नाही. कारण एकमेकांची इन्द्रिये हीच ज्याची द्वारे आहेत अशा प्रकारच्या सुखानीच त्यांचे मन सन्तुष्ट होत होते. बरोबर आहे की दुसऱ्यांच्या द्वारे मिळणारे सुख काय कोठे तरी अतिशय तृप्तीला कारण होत असते काय ? ॥ २१४ ॥ शीतल, सुगन्धित आणि मंद अशा श्वासापासून उत्पन्न होणाऱ्या वायूनी नम्र आणि गोड अशा भाषणानी, रुचि घेण्याला योग्य अशा अधरोष्ठ वगैरे अवयवानी व मृदुपणाची जणु खाण अशी जी एकमेकांची शरीरे, यांच्या द्वारे त्या दोघानी, आपल्या इन्द्रियाना व आत्म्याला सर्व प्रकारची सुखे दिली ॥ २१५ ॥ ज्यानी कमलातील उत्कृष्ट सुगन्धाला हरण करून आणले आहे, जे नेहमी रति सुखाला कारण आहेत, खिडकीच्या मार्गाने वाहणारे, आवडत्या नोकराप्रमाणे असलेले मृदु व अधिक थंड अशा वाऱ्यानी त्या दोघानी संभोगक्रीडेच्या समाप्तीमुळे उत्पन्न झालेला घाम सुकल्यामुळे उत्पन्न झालेल्या सुखाला त्यानी भोगले ॥ २१६ ॥ Page #636 -------------------------------------------------------------------------- ________________ ४५-२१९) महापुराण हृतसर सिजसारैरिष्टचेटीयमानैः । सततरतनिमित्तैर्जालमार्गप्रवृत्तेः ॥ मृदुशिशिरतरैः सम्प्रापतुस्तौ समीरैः । सुरतविरतिजात स्वेदविच्छेद सौख्यम् ॥ २१६ तां तस्य वृत्तिरनुवर्तयति स्म तस्याश्चैनं तदेव रतितृप्तिनिमित्तमासीत् । प्रेमापदत्र निजभावमचिन्त्यमन्त्यसातोदयश्च भवभूतिफलं तदेव ॥ २१७ कामोऽगमत्सुरतवृत्तिषु तस्य शिष्यभावं सुधीरिति रतिश्च सुलोचनायाः । को गर्वमुद्वहति चेन्न वृथाभिमानी । स्वेष्टार्थसिद्धिविषयेषु गुणाधिकेषु ॥ २१८ एवं सुखानि तनुजान्यनुभूय तौ च । नैवेयतुश्चिररतेऽप्यभिलाष कोटिम् ॥ furrष्टमिष्ट विपयोत्यसुखं सुखाय । तद्वीत विश्वविषयाय वृथा यतध्वम् ॥ २१९ इत्यार्षे त्रिषष्टिलक्षण महापुराणसग्रहे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते जय-सुलोचना सुखानुभवव्यावर्णनं नाम पञ्चचत्वारिंशत्तमं पर्व समाप्तम् । त्या कुमाराची मनोवृत्ति तिचे अनुसरण करीत होती आणि तिची मनोवृत्ति कुमाराच्या मनोवृत्तीला अनुसरत होती. तेच त्यांच्या प्रेमाच्या तृप्तीचे स्थान झालेले होते. येथे प्रेम हे अज्ञेय - ज्याला जाणणे शक्य नाही अशा आपल्या स्वरूपाला प्राप्त झाले आणि प्रेमाच्या अगदी शेवटच्या सुखाचा उदय झाला व सुखाची उत्पत्ति होणे हेच जन्म व ऐश्वर्य यांचे फल आहे ॥ २१७ ।। ( ६२५ मदन हा चांगल्या बुद्धीचा असल्यामुळे सुरतक्रीडेच्या प्रवृत्तीत जयकुमाराचा शिष्य झाला आणि रति ही या सुलोचनेची शिष्या झाली होती. आपल्या इष्टपदार्थांची प्राप्ति होण्याच्या कामी ज्याचे गुण अधिक आहेत अशा मनुष्याविषयी कोण गर्व धारण करणार नाही बरे ? ।। २१८ ॥ याप्रमाणे अन्योन्य शारीरिक सुखाचा अनुभव घेणारे ते दोघे पुष्कळ दिवस सुरतसुखाचा अनुभव घेऊन देखिल इच्छेच्या समाप्तीला प्राप्त झाले नाहीत. अर्थात् त्यांची संभोगेच्छा अतृप्तच राहिली. म्हणून आवडत्या विषयापासून उत्पन्न होणान्या सुखाला धिक्कार असो. कारण ते अतृप्तीच उत्पन्न करते. म्हणून हे विद्वजनानो ज्यातील सर्व विषय नष्ट झाले आहेत अशा आत्मसुखासाठीच यत्न करा ।। २१९ ।। म. ८२ याप्रमाणे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीत या आर्षत्रिष्टिलक्षण महापुराणसंग्रहामध्यें जयकुमार आणि सुलोचना यांच्या सुखानुभवाचे विशेष वर्णन करणारे हे पंचेचाळीसावे पर्व समाप्त झाले. Page #637 -------------------------------------------------------------------------- ________________ षट्चत्त्वारिंशत्तमं पर्व । जयः प्रासादमध्यास्य दन्तावलगतो मुदा । यदृच्छयान्यदालोक्य गच्छन्तौ खगदम्पती ॥१ हा मे प्रभावतीत्येतदालपन्नतिविह्वलः । रतिमेवाहितः सद्यः सहायीकृत्य मूर्छया ॥२ । तथा पारावतद्वन्द्वं तत्रैवालोक्य कामिनी। हा मे रतिवरेत्युक्त्वा सापि मूर्छामुपागता ॥ ३ वक्षचेटीजनक्षिप्रकृतशीतक्रियाक्रमात् । सद्यः कुमुदिनीवाप प्रबोधं शीतदीषितेः ॥ ४ हिमचन्दनसम्मिश्रवारिभिर्मन्दमारुतः । सोऽप्यमूर्टो दिशः पश्यन्मन्दमन्दं तनुत्रपः॥५ यूयं सर्वेऽपि सायन्तनाम्भोजानुकृताननाः । किमेतदिति तत्सवं जानानोऽपि स नागरः ॥६ अनेकानुनयोपायर्गोत्रस्खलनदुःखिताम् । सुलोचनां समाश्वास्य स्मरञ्जन्मान्तरप्रियाम् ॥७ आकारसंतिं कृत्वा तामेवालापयस्थितः । वञ्चनाचञ्चवः सर्वे प्रायः कान्तासु कामिनः ॥ तयोर्जन्मान्तरात्मीयवृत्तान्तस्मृत्यनन्तरम् । स्वर्गादनुगतो बोधस्तृतीयो व्यक्तिमीयिवान् ॥ ९ कोणी एके वेळी जयकुमार आपल्या प्रासादात बसून आनन्दाने गच्चीवर गेला. तेथे स्वच्छन्दाने जाणाऱ्या पक्ष्याच्या जोडप्याला पाहून 'अरेरे हे माझ्या प्रभावती' असे बोलून तो अगदी व्याकुळ झाला ब त्याचवेळी मूर्छने त्याला साहाय्य केले व त्याला आनंदित केले अर्थात् मूर्छमुळे त्याला दुःखाची जाणीव झाली नाही ॥ १-२॥ याचप्रमाणे तेथेच पारव्यांची जोडी पाहून जयकुमाराची स्त्री सुलोचना 'हे माझ्या रतिवरा' असे बोलून तीही मूच्छित झाली ॥ ३ ॥ चतुर अशा दासीनी शीघ्र इलाज केल्यामुळे जशी चन्द्राच्या उदयाने कमलिनी तत्काल फुलते तशी सुलोचना तत्काल शुद्धीवर आली ।। ४ ।। कापूर व चंदनाने मिश्रित केलेल्या पाण्याने व मन्द अशा वाऱ्याने जयकुमार देखिल मूर्छारहित झाला. तो सर्व दिशाकडे पाहू लागला व हळु हळु त्याची लज्जा कमी झाली ॥५॥ __चतुर व सर्व जाणणारा असूनही त्या जयकुमाराने 'तुम्ही सर्व लोक सायंकाळच्या कमलाप्रमाणे म्लान मुखाचे का दिसता ? हे काय आहे ? ' असे त्याने विचारले ।। ६ ।। ___याचप्रमाणे नांवाची चूक झाल्यामुळे अर्थात् सुलोचना नांवाचा उच्चार करण्याच्या ऐवजी प्रभावती असे म्हटल्यामुळे दुःखी झालेल्या सुलोचनेचे त्यानी समाधान केले. मी पूर्वजन्मीच्या पत्नीचे स्मरण केले व अनेक अनुनय विनय आदिक उपायानी तिला समजावून सांगितले. आपला बिघडलेला चेहरा दाबून तिलाच बोलावीत बसला. यात आश्चर्य काय ? कारण कामी लोक प्रायः आपल्या प्रियेला फसविण्याच्या कामात निपुण असतात ।। ७-८ ॥ त्या दोघाना पूर्व जन्माच्या आपल्या वृत्तान्ताच्या स्मरणानन्तर स्वर्गात असताना जे अवधिज्ञान त्याना होते ते यावेळी त्याना व्यक्त झाले ॥ ९ ॥ Page #638 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-१९) ( ६२७ तद्विलोक्य सपत्न्योऽस्याः श्रीमती सशिवङ्करा । पराश्च मत्सरोद्रेकादित्यन्योऽन्यं तदाब्रुवन् ॥ १० स्त्रीषु मायेति या वार्ता सत्या तामद्यकुर्वती । पतिमूर्च्छा स्वमूर्च्छायाः प्रत्ययीकृत्य मायया ॥ ११ पश्य कृत्रिम मूर्च्छात्तभावनाव्यक्तसंवृतिः । सततान्तस्थितप्रौढप्रेमप्रेरित चेतना ॥ १२ कन्याव्रतविलोपात्तगोत्रस्खलनदूषिता । पति रतिवरेत्युक्त्वायान्मूच्छ कुलदूषिणी ।। १३ इयं शीलवतीत्येवं निस्स्वनन्वर्णयत्ययम् । प्रायो रक्तस्य दोषोऽपि गुणवत्प्रतिभासते ॥ १४ प्रभावतीति सम्मृा कितवः कोपिनोमिमाम् । प्रतिसादयिषुः शोकं तत्प्रीत्या विदधाति नः ॥ १५ एनान् सर्वांस्तदालापान् जयोऽवधिविलोचनः । विदित्वा सस्मितं पश्यन्प्रियायाः स्मेरमाननम् ॥१६ कान्ते, जन्मान्तरावाप्तं विश्वं वृत्तान्तमावयोः । व्यावर्ण्यमां सभां तुष्टिकौतुकापहृतां कुरु ॥ १७ इति प्राचोदयत्सापि प्रिया तद्भाववेदिनी । कथां कथयितुं कृत्स्नां प्राक्रस्त कलभाषिणी ॥ १८ इह जम्बूमतिद्वीपे विदेहे प्राचि पुष्कलावती । विषयमध्यस्था नगरी पुण्डरीकिणी ॥। १९ महापुराण सुलोचनेने पारव्याचे जोडपे पाहिले व हे रतिवरा असे म्हणून ती मूच्छित झाली. हे पाहून श्रीमति, शिवंकरा आणि इतरही तिच्या सवतींच्या मनात मत्सर उत्पन्न झाला व त्यामुळे आपसात त्या असे बोलू लागल्या ।। १० । स्त्रियामध्ये कपट असते असे जे म्हणणे आहे ते सत्य आहे असे आज हिने दाखविले. आपणास मूर्च्छा येण्यास पतीची मूर्च्छा कारण आहे असे हिने मायेने दाखविले. कपटाने आणलेल्या मूर्च्छने तिने आपला अभिप्राय स्पष्टपणे झाकला. पण मनात असलेले जे प्रौढ प्रेम त्यामुळे तिची चेतना जागृत झाली व कन्याव्रताचा विलोप केल्यामुळे तिच्या मुखातून गोत्रस्खलन झाले. अर्थात् दुसन्या पतीच्या नामोच्चरणाने ही दूषित झाली आहे. आपल्या कुलाला दूषित करणा-या या सुलोचनेने आपल्या पहिल्या पतीला रतिवरा असे बोलून ही बनावटी मूर्च्छला प्राप्त झाली. पण हा आमचा पति जयकुमार ही शीलवती आहे असे म्हणून हिचे वर्णन करीत आहे. बरोबरच आहे अनुरक्त झालेल्या व्यक्तीला दोष देखिल गुणाप्रमाणेच वाटत असतो ।। ११-१४ ॥ प्रभावती हे प्रभावती असे म्हणून व मूच्छित होऊन या रागीट स्त्रीला प्रसन्न करण्याच्या इच्छेने हा धूर्त राजा तिच्यावरील प्रीतीने आम्हाला दुःखी करीत आहे ।। १५ ।। ज्याला अवधिज्ञानरूपी डोळा आहे अशा जयकुमाराने सुलोचनेच्या सवतींची ही भाषणे जाणली व हसत हसत त्याने आपल्या पत्नीचे हास्ययुक्त प्रफुल्लित मुखाकडे पाहिले ॥ १६ ॥ व तो म्हणाला, 'हे कान्ते आपल्या दोघांचे पूर्वजन्मी झालेले सर्व वृत्त तू विस्ताराने सांग आणि या सभेला आनंद व आश्चर्य उत्पन्न कर ' ।। १७ ।। असे बोलून त्याने तिला कथा सांगण्यास प्रेरित केले. आपल्या पतीचा अभिप्राय जाणणारी व मधुर भाषण करणारी अशा सुलोचनेने संपूर्ण कथा सांगण्यास सुरुवात केली ॥ १८॥ या जंबूद्वीपातील पूर्वविदेहक्षेत्रात पुष्कलावती नामक देशाच्या मध्यभागी पुण्डरीकणी नावाचे नगर आहे ॥ १९ ॥ Page #639 -------------------------------------------------------------------------- ________________ ६२८) महापुराण (४६-२६ तत्राभवत्प्रजापालः प्रजा राजा प्रपालयन् । फलं धर्मार्थकामानां स्वीकृत्य कृतिनां वरः ॥ २० कुबेरमित्रस्तस्यासीद्राजश्रेष्ठी प्रतिष्ठितः । द्वात्रिंशद्धनवत्याद्या भार्यास्तस्य मनःप्रियाः ॥२१ गहे तस्य समुत्तुङगे नानाभवनवेष्टिते । वसन्रतिवरो नाम्ना धीमान्पारावतोत्तमः ॥ २२ कदाचिद्राजगेहागतेन वैश्येशिना स्वयम् । स्नेहेन सस्मितालापः स्वहस्तेन समुद्धृतः ॥ २३ कदाचित्कामिनीकान्तकराब्जापितशर्करा । सम्मिश्रितान्सुशालीयतण्डुलानभिभक्षयन् ॥ २४ कदाचिच्छेष्ठिनोद्दिष्टहेतुदृष्टान्तपूर्वकम् । अहिंसालक्षणं धर्म भावयन्प्राणिने हितम् ॥ २५ कदाचिद्भवनायातयतिपादसरोजजम् । रेणुजालं निराकुर्वन्पक्षाभ्यां प्रत्युपागतः ॥ २६ - त्या नगरात पुण्यवंतात श्रेष्ठ, प्रजांचे रक्षण करणारा, धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांचे पालन करून त्यांच्या फलांचा उपभोग घेणारा असा प्रजापाल नांवाचा राजा होता ॥ २० ॥ या राजाच्या श्रेष्ठीचे नांव कुबेरमित्र असे होते. तो लोकात प्रतिष्ठावान् होता आणि त्याला धनवती आदिक बत्तीस पत्नी होत्या. त्या सर्व त्याच्या मनाला अतिशय आवडत होत्या ॥ २१ ॥ या श्रेष्ठीचा वाडा मोठा व उंच होता व अनेक घरांनी वेष्टित असा होता. या श्रेष्ठीच्या घरात रतिवर नांवाचा बुद्धिमान् आणि उत्तम असा एक पारवा राहात होता ॥२२॥ कोणे एकेवेळी तो सर्व व्यापा-यांचा स्वामी राजश्रेष्ठी राजवाड्यातून आपल्या घरी येऊन व प्रेमळपणाने व हसत मधुर भाषण करून त्या पारव्याला तो वारंवार आपल्या हातात घेत असे ॥ २३ ॥ केव्हा केव्हा तो पारवा सुंदर स्त्रियानी आपल्या करकमलानी दिलेले शर्करामिश्रित उत्तम तांदूळ भक्षण करीत असे ॥ २४ ॥ केव्हा केव्हा श्रेष्ठी हेतु व दृष्टान्तपूर्वक अहिंसा लक्षणयुक्त अशा धर्माचा उपदेश करीत असे व तो धर्म प्राण्याचे हित करतो अशी भावना, असे चिन्तन हा पारवा मनात करीत असे ।। २५ ॥ केव्हा केव्हा श्रेठीच्या वाड्यात आलेल्या यतीच्या चरणकमलावरील धूळ हा पारवा येऊन आपल्या दोन पंखानी नाहीशी करीत असे ।। २६ ।। Page #640 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-३५) महापुराण (६२९ स कदाचिद्गतिः का स्यात्पापापापात्मनामिति । कुतूहलेन पृष्टः सन् जनस्तुण्डेन निर्दिशन् ॥ २७ अधोभागमथोवं च मौनीवागमपारगः । क्षयोपशममाहात्म्यात्तियंचोऽपि विवेकिनः ॥ २८ क्रीडन्नानाप्रकारेण कान्तया रतिषेणया। सार्धमेव चिरं तत्र सुखं कालमजीगमत् ॥ २९ असौ रतिवरः कान्तस्त्वमहं सा तव प्रिया । रतिषणा भवावर्ते जन्तुः कि कि न जायते ॥ ३० सुतः कुबेरमित्रस्य धनवत्याश्च पुण्यवान् । जातः कुबेरकान्ताख्यः कुबेरो वापरः सुधीः ॥ ३१ द्वितीय इव तस्यासीत प्राणः सोनुचराग्रणीः । प्रियसेनाह्वयो बाल्यादारभ्य कृतसङगतिः ।। ३२ आजन्मनः कुमारस्य कामधेनुरनुत्तमा । मनोऽभिलषितं दुग्धे समस्तसुखसाधनम् ॥ ३३ क्षेत्रं निष्पादयत्येकं गन्धशालीमनारतम् । इर्नमृतदेशीयानन्यत्स्थूलांस्तनुत्वचः ॥ ३४ स्वयं मनोहरं वीणा दध्वनीति निरन्तरम् । तत्स्नानसमये सर्वरोगस्वेदमलापहम् ॥ ३५ या रतिवर पारव्याला एखादे वेळी 'हे रतिवरा, जे पापी लोक आहेत व जे अपापपुण्यवान् लोक आहेत त्याना कोणती गति प्राप्त होते' असे कौतुकाने लोकानी विचारले असता तो आपले तोंड खाली आणि वर करून क्रमाने उत्तर देत असे. जसा एखादा आगमाच्या दुसन्या किना-याला गेलेला मौनव्रती आपले तोंड खाली व वर करून उत्तर देतो तसे हा पारवा उत्तर देत असे. पापी लोकाना मरणोत्तर अधोगति-नरकगति होते व निष्पाप लोकाना उर्ध्वगति गति प्राप्त होते. बरोबरच आहे की, ज्ञानावरणकर्माच्या क्षयोपशमाने पशपक्षी देखिल विवेकी होतात ।। २७-२८॥ आपल्या रतिषणाकान्तेबरोबर अनेक प्रकारच्या क्रीडा करणारा तो रतिवर दीर्घकालपर्यन्त सुखाने राहिला ।। २९ ॥ येथे सुलोचना जयकुमाराला म्हणते की तो रतिवर म्हणजे आपण माझे पति होता व मी रतिषेणा आपली प्रियपत्नी होते. या संसाराच्या भोवऱ्यात प्राण्याला कोणकोणती अवस्था प्राप्त होत नाही बरे ? ॥ ३० ॥ या कुबेरमित्र व धनवती श्रेष्ठीला एक पुण्यवान् कुबेरकान्त नांवाचा पुत्र झाला व तो सुबुद्धिमान् जणु दुसरा कुबेर आहे असे वाटत असे ।। ३१ ।। या कुबेरकांताचा जणु दुसरा प्राणच असा व बालपणापासून जो त्याच्याबरोबर राहत असे असा प्रियसेन नांवाचा सर्वमित्रामध्ये श्रेष्ठ असा मित्र होता ।। ३२ ॥ या कुबेरकान्ताची त्याच्या जन्मापासून त्याच्याजवळ राहणारी एक अनुपम उत्तम कामधेनु होती, तो त्याच्या मनाने इच्छिलेले सर्व सुखसाधक पदार्थ देत असे ।। ३३ ।। या कुबेरकान्ताचे एक शेत होते व ते नेहमी सुगन्धित अशा साळी पिकवीत असे आणि दुसरे शेत ज्यांचो साल पातळ आहे व जे स्थूल आणि अमृताप्रमाणे ज्यांचा रस आहे असे ऊस नेहमी पिकवीत असे ।। ३४ ।। Page #641 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४६-४४ सुगन्धिसलिलं गाडगं गम्भीरं मधुरं ध्वनन् । अम्भोधरो नभोभागादासन्नादवमुञ्चति ॥३६ कल्पद्रुमद्वयं वस्त्रभूषणानि प्रयच्छति । अन्नपानं ददात्यन्यदयं कल्पमहीरुहोः ॥ ३७ एवमन्यच्च भोगाङगमशेषं देवनिमितम् । शश्वन्निविशतस्तस्य पूर्ण प्राथमिकं वयः ॥ ३८ तीक्ष्य पितरावेष किमेकामभिलाषुकः । कि बह्वीरिति चित्तेन सन्दिहानौ समाफुलौ ॥ ३९ प्रियसेनं समाहूय तत्प्रश्चात्तन्मनोगतम् । अवादीधरतां मैत्री सैव या त्वेकचितता ॥ ४० ततः समुद्रदत्ताख्यो धनवत्या सहाभवत् । स्वसा कुबेरमित्रस्य तन्नामैवैतयोः सुता ॥ ४१ प्रियवत्ताह्वया तस्याश्चेटिका रतिकारिणी । कन्यकास्तां विधायादि द्वात्रिशत्सुन्दराकृतीः ॥ ४२ श्रेष्ठी कदाचिदुद्याने यक्षपूजाविधौ सुधीः । सुपरीक्ष्य निमित्तेन प्रियदत्तां गुणान्विताम् ॥ ४३ अवधार्यास्य पुत्रस्य पञ्चताराबलान्विते । दिने महाविभूत्यैनां कल्याणविधिनाग्रहीत् ॥ ४४ एक वीणा नेहमी मनोहर असे शब्द करीत असे. कुबेरकान्ताच्या स्नानाच्या वेळी गंभीर व मधुर शब्द-गर्जना करणारा मेघ जवळच्या आकाश भागापासून सर्व रोग, घाम व मल दूर करणारे आणि सुगन्धी असे गंगेचे पाणी सोडीत असे ।। ३५-३६ ॥ दोन कल्पवृक्ष वस्त्रे आणि अलंकार देत असत आणि दुसरी कल्पवृक्षाची जोडी अन्न प पाणी देत असे ॥ ३७॥ याप्रमाणे देवांनी उत्पन्न केलेली सगळी भोगांची साधने नेहमी उपभोगणाऱ्या या कुबेरकान्ताचे प्राथमिक वय-बालपणाचे वय संपले ।। ३८ ।। कुबेरकान्ताचे बालवय संपून जेव्हा तो तरुण झाला तेव्हा त्याचे माता-पिता एकाच पत्नीची अभिलाषा याला आहे का अनेक पत्नींची याला अभिलाषा आहे अशा संशयाने व्याकुळ झाले आणि त्यानी त्याच्या प्रियमित्राला प्रियसेनाला बोलावून घेतले व त्याने आपल्या कुबेरकान्त मित्राला प्रश्न करून त्याचे मनोगत काढून घेतले. बरोबरच आहे की दोघांचे मन एक असणे यालाच मित्रता म्हटले आहे ॥ ३९-४० ।। ___ या नंतर धनवती जी कुबेरमित्राची पत्नी तिच्याबरोबर उत्पन्न झालेला अर्थात् धनवतीचा भाऊ समुद्रदत्त नांवाचा होता व त्याच्याशी कुबेरमित्राच्या बहिणीचा विवाह झाला होता. तिचे नांव कुबेरमित्रा होते. या दोघांच्या कन्येचे नांव प्रियदत्ता असे होते. हिच्या दासीचे नांव रतिकारिणी होते. या समुद्रदत्ताला प्रियदत्ता वगैरे बत्तीस मुली होत्या. त्या सर्व सुंदर होत्या ॥४१-४२ ।। तो उत्तम बुद्धिमान कुबेरमित्र एके वेळी बगीचात यक्षाची पूजा करण्याच्या वेळी काही उत्तम शकुनादिनिमित्ताने उत्तम परीक्षण' करून प्रियदत्तेला ही कुबेरकान्ताची पत्नी होण्याला १टोप- चांगली मुलगी कोणती याची परीक्षा करण्याचा प्रकार असा .. कांही निमित्ताने मुलींना आपल्या घरी जेवायला बोलवावे. त्या आल्या असता त्यांच्या पुढे नाना प्रकारच्या पक्वान्नानी भरलेले एक एक ताट ठेवावे व एखाद्या ताटात कोणास समजू न देता एक रत्न घालावे. ते रत्न ज्या मुलीच्या पात्रात सापडेल ती मुलगी विवाहयोग्य समजावी. Page #642 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-५५) महापुराण (६३१ तन्निमित्तपरीक्षायामवलोकितुमागते । सुते गुणवती राज्ञो यशस्वत्यभिधा परा ॥ ४५ भाजनं भक्ष्यसंपूर्णमदत्तवति मातुले । स्वाभ्यां लज्जाभरानम्रवदने जातनिविदे ॥ ४६ अमितानन्तमत्यापिकाभ्यसे संयमे परम् । आददाते स्म यात्येवं काले तस्मिन्महीपतौ ॥ ४७ लोकपालाय दत्तात्मलक्ष्मी संयममागते । शीलगुप्तगुरोः पावें शिवङ्करवनान्तरे ॥ ४८ देव्यः कनकमालाद्याः परे चोपाययुस्तपः । दुर्गमं च वजन्त्यल्पाः प्रभुर्यदिपुरःसरः ॥ ४९ लोकपालोऽपि सम्प्राप्तराज्यश्रीविश्रुतोदयः । कुबेरमित्रबुद्धयैव धरित्री प्रत्यपालयत् ॥ ५० मन्त्री व फल्गुमत्यारव्यो बालोऽसत्यवचःप्रियः । सवयस्कोनृपस्याज्ञः प्रकृत्या चपलः खलः ॥ ५१ तत्समीपे नृपेणामा यद्वा तद्वा सुखागतम् । शङ्कमानो वचो वक्तुं श्रेष्टयपायं विचिन्त्य सः ॥ ५२ स्वीकृत्यं शयनाध्यक्षं सामदानस्त्वया निशि । देवतावत्तिरोभूय राजन् पितसमं गुरुम् ॥ ५३ विनयाद्विच्युतं राजष्ठिनं तव सन्निधौ। विधाय सर्वदा मास्थाः कार्यकाले स हृयताम् ॥ ५४ इति वक्तव्यमित्याख्यत् सोऽपि सर्व तथा करोत् । अर्थाथिभिरकर्तव्यं न लोके नाम किञ्चन ।। योग्य आहे असे ठरविले व पाच-तान्यांनी युक्त अशा शुभ दिवशी ( सूर्य, चंद्र, गुरू, शुक्र व मंगळ या पाच तान्यांच्या बलाने सहित ) मोठ्या वैभवाने कल्याणकारक विधीने त्या प्रियदत्तेचा आपल्या पुत्रासाठी स्वीकार केला ॥ ४३-४४ ॥ त्या निमित्ताच्या परीक्षेच्या वेळी राजाच्या दोन मुली गुणवती व यशस्वती याही पाहण्यासाठी आल्या होत्या. पण त्यांच्या मामाने त्यांना पक्वान्नाने भरलेले ताट दिले नाही म्हणून त्या दोघींनी लज्जेने खाली तोंडे केली. त्या दोघींना वैराग्य उत्पन्न झाले ॥ ४५-४६ ।। ___ त्या दोघी अमितमति व अनन्तमति या दोन आयिकाकडे गेल्या आणि त्यांच्याजवळ त्या दोघीनी उत्तम संयम धारण केला. याप्रमाणे काही काल गेल्यावर प्रजापाल राजाने आपल्या लोकपालनामक पुत्राला आपली राज्यलक्ष्मी दिली व शिवंकरवनात शीलगुप्त गुरूच्या जवळ त्याने संयम धारण केला. त्यावेळी कनकमाला वगैरे राण्यानीही व इतर लोकानीही तप धारण केले. बरोबरच आहे की जर एखादी समर्थ व्यक्ति पुढे चालू लागली तर अल्पशक्तिधारक देखिल दुर्गम मार्गात जाण्यास समर्थ होतात ॥ ४७-४९ ।। ___ ज्याला राज्यलक्ष्मी प्राप्त झाली आहे व ज्याचा उत्कर्ष सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे असा लोकपाल राजा देखिल कुबेरमित्र श्रेष्ठीच्या बुद्धीला अनुसरून पृथ्वीचे रक्षण करू लागला. खोटे बोलणे ज्याला आवडते, ज्याचे वय राजाच्या बरोबरीचे आहे, जो अज्ञानी मूर्ख व स्वभावतः चंचल आहे व दुष्ट आहे असा फल्गुमति या नांवाचा एक मुलगा राजाच्या प्रधानासारखा होता. श्रेष्ठी ज्यावेळी राजाजवळ असे तेव्हा राजाबरोबर यद्वातद्वा जे तोंडात येईल ते बोलण्यास हा फल्गुमति भीत असे म्हणून श्रेष्ठीला राजापासून कसे दूर करावे याचा तो विचार करू लागला. त्याने शयनगृहाच्या मुख्य अधिका-याला काही समजावून व कांही धन देऊन वश केले व त्याला सांगितले की आज रात्री देवतेप्रमाणे गुप्त होऊन राजाला असे बोल- हे राजा, हा राजश्रेष्ठी नम्रतेपासून च्युत झाला आहे, तो तुझ्या पित्याप्रमाणे आहे व गुरुप्रमाणे आहे. नेहमी त्याला Page #643 -------------------------------------------------------------------------- ________________ ६३२) महापुराण (४६-६३ भुत्वा तद्वचनं राजा सभीराहूय मातुलम् । नागन्तव्यमनाहूतैरित्यनालोच्य सोऽब्रवीत् ॥ ५६ पश्चाद्विषविपाकिन्यः प्रागनालोचितोक्तयः । श्रेष्ठी तद्वचनात्सद्यः सोद्वेगं स्वगृहं ययौ ॥ ५७ राजा कदाचित्प्रावाजीद्धटया ललिताख्यया। विहाराथं वनं तत्र वाप्यामालोक्य विस्मयात् ॥५८ सटशुष्काङघ्रिपासन्नशाखाग्रस्थः परिस्फुरन् । परायो वायसानीतःपद्मरागमणिप्रभाम् ॥ ५९ मणि मत्वा प्रविश्यान्त षु केनाप्यलम्भ्यसौ। भ्रान्त्या प्रवर्तमानानां कुतः क्लेशाद्विना फलम् ॥६० चिरं निरीक्ष्य निविण्णाः सर्वे ते परमागमन् । बुद्धिर्नाग्रेसरी यस्य न निर्बन्धः फलत्यसौ ॥ ६१ कदाचिदभपतिः श्रष्ठिसुतया रक्तचित्तया। वसुमत्या विभावर्यामात्मसौभाग्यसूचिना ॥ ६२ क्रमेण कुङकुमाईण ललाटे स्फुटमडकितः । कान्ताः किं किं न कुर्वन्ति स्वभागपतिते नरे॥ आपल्याजवळ घेऊन बसत जाऊ नकोस, कार्याच्या वेळी त्याला बोलावीत जा. त्यानेही ते सर्व मान्य केले व तसे त्याने देवतेप्रमाणे अदृश्य होऊन बोलून दाखविले. यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही व द्रव्यलोभी मनुष्याने न करण्यासारखे जगात काहीच नाही ।। ५०-५५ ॥ अदश्यव्यवतीचे ते भाषण ऐकन राजा भ्याला व त्याने आपल्या मामाला बोलावन असे सांगितले- अहो मामा, आपण न बोलावता येऊ नये. हे राजाने विचार न करता भाषण केले ॥ ५६ ॥ पूर्वी न विचार करता जे भाषण केले जाते ते मागावून विषाप्रमाणे वाईट परिणाम करणारे होते. राजाच्या या भाषणाने श्रेष्ठी खिन्न होऊन तत्काल आपल्या घरी गेला ॥ ५७ ॥ कोणे एके वेळी राजा ललितघट नामक हत्तीवर बसून विहार करण्यासाठी वनात गेला आणि तेथे त्याने विहिरीत पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. विहिरीच्या तटावर एक वाळलेले झाड होते व त्याच्या फांदीच्या अग्रभागात चमकणारा अमूल्य पद्मरागमणि होता. तो तेथे एका कावळ्याने आणला होता. त्या मण्याच्या प्रभेला मणि समजून लोकानी विहिरीत प्रवेश केला पण कोणीही मिळवू शकला नाही. भ्रान्तीने प्रवृत्त झालेल्या लोकाना क्लेशाशिवाय दुसरे कोणते फल प्राप्त होणार ? ॥ ५८-६० ॥ पुष्कळ वेळपर्यन्त मण्याचा शोध करून ते सर्व लोक थकले व नगराकडे आले. बरोबरच आहे की, ज्या प्रयत्नाला बुद्धीचा पाठिंबा मिळत नाही तो प्रयत्न सफल होत नाही ॥ ६१ ।। जिचे मन राजावर अनुरक्त झाले अशा श्रेष्ठीच्या व सुमतिनामक मुलीने कोणे एके वेळी रात्री वापल्या सौभाग्याला सुचविणारा व केशराने ओला झालेला अशा आपल्या पायाने राजाच्या कपाळावर स्पष्ट छाप उमटविला, चिह्न उमटविले. हे बरोबरच आहे की पुरुष आपल्या आधीन झाला असता स्त्रिया काय काय करीत नाहीत बरे ।। ६२-६३ ॥ Page #644 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-७२) महापुराण (६३३ पट्टबन्धात्परं मत्वा तत्क्रमाहूमहीपतिः। प्रातरास्थानमध्यास्य मन्त्र्यादी नित्यबुबुधत् ॥ ६४ ललाटे यदि केनापि राजा पादेन ताडितः । कर्तव्यं तस्य किं वाच्यं ततो मन्त्र्यवीविदम् ॥ ६५ पट्टात् ललाटो नान्येन स्पृश्यः स यदि ताडितः । पादेन केनचिद्वध्यः स प्राणान्तमिति स्फुटम्॥६६ तदाकावधूयनं स्मितेनाहूय मातुलम् । नृपोऽप्राक्षीत्स चाहैतत्प्रस्तुतं प्रस्तुतार्थवित् ॥ ६७ तस्य पूजा विधातव्या सर्वालङ्कारसम्पदा । इति तद्वचनात्तुष्ट्वा मणिवार्ता न्यवेदयत् ॥ ६८ मणिर्न जलमध्येऽस्ति तटस्थतरुसंश्रितः । प्रभा वाप्यामिति प्राह तद्विचिन्त्य वणिग्वरः ॥ ६९ तदा कुबेरमित्रस्य प्रज्ञामज्ञानमात्मनः । दौष्ट्यं च मन्त्रिणो ज्ञात्वा पश्चात्तापान्महीपतिः ॥ ७० पश्यधूतरहं मूढो वञ्चितोऽस्मीति सर्वदा । श्रेष्ठिनं प्राप्तसन्मानं प्रत्यासन्नं व्यधात्सुधीः ॥७१ तन्त्रावापमहाभारं ततः प्रभृति भूपतिः । तस्मिन्नारोप्य निर्व्यग्रः स धर्म काममन्वभूत् ॥ ७२ तिच्या पायाचे चिह्न पट्टबन्धनापेक्षाही उत्कृष्ट भूषण मानून सकाळी सभेमध्ये बसून मन्त्री वगैरेना त्याने असे विचारले- जर कोण्या व्यक्तीने आपल्या पायाने राजाच्या कपाळावर आघात केला तर त्या व्यक्तीला काय करावे हे सांगा? हे ऐकून फल्गुमति मन्त्री म्हणाला महाराज, पट्टाशिवाय राजाच्या कपाळाला कोणी स्पर्श करू नये आणि जर कोणी व्यक्तीने पायाने राजाच्या कपाळावर ताडन केले तर त्याचे प्राण जाईपर्यन्त त्याला शिक्षा करावी व हे अगदी स्पष्ट आहे ।। ६४-६६ ।। _ हे ऐकून राजाने हसून त्याचा तिरस्कार केला व त्याने आपल्या मामाला बोलाविले व त्याला वरीलप्रमाणे विचारले. तेव्हां वास्तविक अभिप्राय जाणणाऱ्या श्रेष्ठीने योग्य उत्तर दिले. तो म्हणाला, हे राजन्, ज्याने लाथ मारली आहे त्याचा सर्व प्रकारच्या अलंकारांनी आदर करावा. या श्रेष्ठीच्या वचनाने राजा आनंदित झाला व त्याने मण्याची हकीकत सांगितली. तेव्हां श्रेष्ठीने असे सांगितले. तो मणि पाण्यामध्ये नाही. तो विहिरीच्या तटावरील झाडावर आहे आणि त्याची प्रभा-कान्ति विहिरीमध्ये पडली आहे असा विचार करून श्रेष्ठीने उत्तर दिले. तेव्हां कुबेरमित्राची बुद्धिमत्ता व आपले अज्ञान व मंत्र्याचा दुष्टपणा जाणून राजाला पश्चात्ताप झाला व तो म्हणाला, 'पाहा मला मूढाला या धूर्तानी फसविले आहे. असे म्हणून त्या श्रेष्ठीचा त्या सुबुद्धियुक्त राजाने सन्मान केला व नेहमी त्याला आपल्या जवळ ठेविले ॥ ६७-७१ ।। __त्या दिवसापासून आपल्या राज्याचे रक्षण करणे व इतर राष्ट्राशी आपला कोणता संबंध आहे या विषयीच्या विचाराचा भार राजाने आपल्या मामावर सोपविला व आपण धर्म आणि काम याचा अनुभव घेत राहिला ।। ७२ ।। म. ८३ Page #645 -------------------------------------------------------------------------- ________________ ६३४) कदाचित्कान्तया दृष्टपलितो निजमूर्धनि । श्रेष्ठी तां सत्यमद्य त्वं धर्मपत्नीत्यभिष्टुवन् ॥ ७३ हृष्ट्वा विमोच्य राजानं वरधर्मगुरोस्तपः । सार्धं समुद्रदत्ताद्येरादाय सुरभूधरे ॥ ७४ तावुभौ ब्रह्मलोकान्तेऽभूतां लौकान्तिको सुरौ । किं न साध्यं यथाकाल परिस्थित्या मनीषिभिः ॥७५ अन्येद्युः प्रियदत्तास दत्वा दानं मुनीशिने । भक्त्या विपुलमत्याख्यचारणाय यथोचितम् ॥ ७६ सम्प्राप्य नवधा पुण्यं तपसः सन्निधिर्मम । किमस्तीत्यब्रवीद्वचक्तविनया मुनिपुङ्गवम् ॥ ७७ पुत्रलाभार्थि तच्चित्तं विदित्वावषिलोचनः । वामेतरकरे धीमान्स्पष्टमङ्गुलिपञ्चकम् ॥ ७८ कनिष्ठ वामहस्तेऽसौ समदर्शयत् । पुत्रान्कालान्तरे पञ्च सापैकामात्मजामपि ॥ ७९ ते कदाचिज्जगत्पालचक्रेशस्य सुते समम् । अमितानन्तमत्याख्ये गुणिन्यौ गुणभूषणे ॥ ८० प्रजापालतनूजाभ्यां यशस्वत्या तपोभृता । गुणवत्या च सम्प्राप्ते पुरं तत्परर्माद्धिकम् ॥ ८१ राजा सान्तःपुरः श्रेष्ठी चानयोनिकटे चिरम् । श्रुत्वा सद्धर्मसद्भावं दानाद्युद्योगमाययौ ॥ ८२ महापुराण कोणे एके वेळी श्रेष्ठीच्या पत्नीने त्याच्या डोक्यात उत्पन्न झालेला पांढरा केस दाखविला. तो पाहून तू खरोखर माझी धर्मपत्नी आहेस म्हणून त्याने तिची स्तुति केली. यानंतर आनंदित होऊन त्याने राजापासून आपणास सोडवून घेतले. वरधर्म नामक गुरूजवळ जाऊन समुद्रदत्त वगैरे अनेक श्रेष्ठीसह सुरगिरीपर्वतावर त्याने दीक्षा घेतली आणि ते दोघे कुबेरमित्र च समुद्रदत्त ब्रह्मस्वर्गाच्या अन्तिमपटलात लौकान्तिक देव झाले. बरोबरच आहे की, कालपरिस्थितीला अनुसरून वागण्याने बुद्धिमान् लोकाकडून काय बरे साध्य केले जात नाही ॥ ७३-७५ ॥ ( ४६-७३ एके दिवशी ह्या प्रियदत्तेने ( कुबेरकांताची पत्नी आणि कुबेरमित्राची सून ) विपुलमतिनामक चारणमुनींना भक्तीने दान दिले. यथायोग्य नवधा पुण्य प्राप्त करून घेतले व आपला विनय व्यक्त करून माझी तपश्चरणाची स्थिति जवळ आली आहे काय असे त्या श्रेष्ठमुनीला तिने विचारले ।। ७६-७७ ।। पण अवधिज्ञाननेत्रधारी मुनीश्वरांनी तिचे मन पुत्रलाभाची इच्छा करीत आहे हे ओळखले व आपल्या उजव्या हाताची पाच बोटे व डाव्या हाताची करंगळी त्यानी दाखविली. त्याप्रमाणे तिला कांही काल गेल्यानंतर पाच पुत्र झाले आणि त्यानंतर एक कन्याही तिला झाली ।। ७८-७९ ॥ कोणे एके वेळी गुण हेच अलंकार धारण करणारे व सद्गुणी अशा दोन अमितमति व अनन्तमति नामक जगत्पालचक्रवर्तीच्या दोन मुली व संयमपालन करणाऱ्या अर्थात् तपश्चरण करणाऱ्या यशस्वती व गुणवती या प्रजापतिराजाच्या दोन मुली यांच्यासह त्या उत्कृष्ट ऐश्वर्ययुक्त नगरात आल्या. त्यावेळी अंतःपुरासह राजा कुबेरकांत व श्रेष्ठी यांच्या दर्शनास गेले व तेथे त्यानी दीर्घकालपर्यन्त उत्तम जिनधर्माचे स्वरूप ऐकले आणि सत्पात्राला दान देणे व जिनपूजा करणे संयम पाळणे इत्यादिक कार्यात ते प्रवृत्त झाले ॥। ८०-८२ ।। Page #646 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-९०) महापुराण (६३५ कदाचिच्छेष्टिनो गेहं जङ्घाचारणयोर्युगम् । प्राविशद्धक्तितोऽस्थापयतां तौ दम्पती मुदा ॥ ८३ तदृष्टिमात्रविज्ञातप्राग्भवं तत्पदाम्बुजम् । कपोतमिथुनं पक्षः परिस्पृश्याभिनम्य तत् ॥ ८४ गलितान्योन्यसम्प्रीति बभूवालोक्य तन्मुनी । जातसंसारनिर्वेगौ निर्गत्यापगतौ गृहात् ॥ ८५ प्रियदत्तेङगित तदवगम्यान्यदा तु ताम् । रतिषणामपृच्छत्ते नाम प्राग्जन्मनीति किम् ॥ ८६ सा तुण्डेनालिखन्नाम रतिवेगेति वीक्ष्य तत् । ममैषा पूर्वभार्येति कपोतः प्रीतिमीयिवान् ॥ ८७ तया रतिवरः पृष्टः स्वनाम प्रियदत्तया। सुकान्ताख्योऽहमित्येषोऽप्यक्षराण्यलिखद्भुवि ॥ ८८ तनिरीक्ष्य ममैवायं पतिरित्यभिलाषका । रतिषेणाप्यगात्तेन सङ्गमं विध्यनुग्रहात् ॥ ८९ तत्सभावतिनामेतत् श्रुत्वा प्रीतिरभूदलम् । पुनः शुश्रूषवश्चासन्कथाशेषं सकौतुकाः ॥ ९० .......... कोणे एके वेळी कुबेरकान्त श्रेष्ठीच्या घरी जंघाचरण ऋद्धिधारक मुनींची जोडी आली त्यावेळी त्या श्रेष्ठी व श्रेष्ठीनीनी त्याना भक्तीने उत्तम आसनावर बसविले. त्याना पाहिल्याबरोबर त्यांना पूर्वजन्माचे ज्ञान झाले आहे अशा पारव्यांचे युगलाने जोडीने आनंदाने आपल्या पंखांनी त्यांच्या पायाना स्पर्श केला व नमस्कार केला. त्यावेळी रतिवर व रतिषणा त्या कबूतराच्या जोडीचे जे एकमेकावर प्रेम होते ते गळून गेले. हे पाहून त्याना संसारापासून वैराग्य उत्पन्न झाले आहे असे ते दोघे मुनी त्या घरातून निघून गेले ॥ ८३-८५ ॥ एके वेळी मनातील अभिप्राय जाणणाऱ्या प्रियदत्तेने त्या रतिषणेला पूर्वजन्मी तुझे काय नांव होते असे विचारले. तेव्हा त्या कबूतरीने आपल्या तोंडाने रतिवेगा असे नांव लिहिले. ते पाहून माझी ही पूर्वजन्माची पत्नी आहे असे जाणून तो कबूतर फार आनंदित झाला ॥ ८६-८७ ॥ यानन्तर प्रियदत्तेने रतिवराला तुझे पूर्वजन्मी काय नांव होते ते सांग असे विचारले व त्याने मी पूर्वजन्मी 'सुकान्त' या नांवाचा होतो अशी अक्षरे त्याने जमिनीवर लिहिली ॥ ८८॥ __ ते पाहून हा सुकान्त माझा पूर्वजन्मी पति होता असे पाहून त्याच्याविषयी इच्छा करणाऱ्या रतिषेणेचा देखिल दैवाच्या अनुग्रहाने त्याच्याशी संगम झाला ॥ ८९ ॥ त्या सभेत असलेल्या लोकांना हे वृत्त ऐकून फार प्रेम उत्पन्न झाले व उरलेली कथा ऐकण्याचे त्यांच्या मनात कौतुक उत्पन्न झाले ॥ ९० ॥ Page #647 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४६-९१ अन्यच्चाकणतं दृष्टमावाभ्यां यदि चेत्त्वया । ज्ञायते तच्च वक्तव्यमित्युक्तवति कौरवे ॥ ९१ निजवागमृताम्भोभिः सिञ्चन्ती तां सभां शुभाम् । सुलोचनाब्रवीत्सम्यग्ज्ञायते श्रूयतामिति ॥ ९२ तदा मुनेर्गृहाद्भिक्षां त्यक्त्वा गमनकारणम् । अज्ञात्वा भूपतेः प्रश्नादाहामितमतिः श्रुतम् ॥ ९३ विषयेऽस्मिन्खगक्ष्माभृत्प्रत्यासन्नं वनं महत् । अस्ति धान्यकमालाख्यं तदभ्यर्णे पुरं परम् ॥ ९४ शोभानगरमस्येशः प्रजापालमहीपतिः । देवश्रीस्तस्य देव्यासीत्सुखदा श्रीरिवापरा ॥ ९५ शक्तिषेणोऽस्य सामन्तस्तस्याभूत्प्रीतिदायिनी । अटवीश्रीस्तयोः सत्यदेवः सूनुरिमे समम् ॥ ९६ सर्वेऽप्यासन्नभव्यत्वादस्मत्पादसमाश्रयात् । श्रुत्वा धर्मं नृपेणामा समापन्मद्यमांसयोः ॥ ९७ त्यागं पर्वोपवासं च शक्तिषेणोऽपि भक्तिमान् । मुनिवेलात्यये भुक्तिमग्रहीत्स गृहिव्रतम् ॥ ९८ तत्पत्नी शुक्लपक्षादिदिनेऽष्टम्यामथापरे । पक्षे पञ्चसमास्त्यागमाहारस्य समग्रहीत् ॥ ९९ अनुप्रवृद्धकल्याणनामधेयमुपोषितम् । सत्यदेवश्च साधूनां स्तवनं प्रत्यपद्यत ॥ १०० ६३६) आणखीही जे आपण दोघांनी ऐकले व पाहिले ते जर तू जाणत असशील तर ते सांग असे जयकुमाराने सुलोचनेला म्हटले. तेव्हा आपल्या वचनरूपी अमृतजलानी त्या शुभसभेवर सिंचन करणाऱ्या सुलोचनेने म्हटले की मला चांगले माहीत आहे व ते आपण ऐका. त्यावेळी भिक्षा न घेता मुनि घरातून निघून जाण्याचे काय कारण घडले हे आम्हाला समजले नाही असा तो ऐकून राजानें प्रश्न केला. अमितमति आर्थिकेने त्या चारणर्षीपासून ऐकलेले याप्रमाणे सांगितले. या पुष्कलावतीदेशात विजयार्धपर्वताच्या जवळ धान्यकमाल नांवाचे मोठे वन आहे व त्या वनाजवळ एक उत्तम नगर आहे त्याचे शोभानगर असे नांव आहे. प्रजापाल नांवाचा राजा या नगराचा स्वामी आहे. त्याच्या राणीचे देवश्री असे नांव आहे व ती लक्ष्मीप्रमाणे राजाला सुख देत असे ।। ९१-९५ ।। या प्रजापाल राजाचा शक्तिषेण नांवाचा मांडलिक राजा होता. या शक्तिषेणाला आनंदित करणारी अटवीश्री नांवाची पत्नी होती. या दोघांना सत्यदेव नांवाचा मुलगा झाला. हे सगळे आसन्नभव्य असल्यामुळे आमच्या चरणाचा आश्रय घेऊन प्रजापाल राजाबरोबर या सर्वानी धर्माचे स्वरूप ऐकले. मद्यमांसाचा त्यांनी त्याग केला व पर्वदिवशी उपवास करण्याचे व्रत घेतले. शक्तिषेण भक्तिमान् असल्यामुळे त्याने मुनीची आहाराची वेळ टळून गेल्यावर भोजन करीन असे गृहस्थव्रत घेतले. त्याच्या पत्नीने शुक्लपक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी व अष्टमी दिवशी आणि कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेच्या व अष्टमीच्या दिवशी पाच वर्षेपर्यन्त आहाराचा त्याग करीन असे व्रत घेतले व सत्यदेवाने साधूंची स्तुति करण्याचे व्रत घेतले ।। ९६-१०० ॥ Page #648 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-११०) इत्यभूवन्नमी श्रद्धाविहीनव्रतभूषणाः । स मृणालवतीं नेतुं कदाचिदटवीश्रियम् ॥ १०१ पित्रोः पुरीं प्रवृत्तः सन् शक्तिषेणः ससैन्यकः । वने धान्यकमालाख्ये प्राप्य सर्पसरोवरम् ॥ १०२ निविष्टवानिदं चान्यत्प्रकृतं तत्र कथ्यते । पतिर्मृणालवत्याख्यनगर्या धरणीपतिः ॥ १०३ सुकेतुस्तत्र वैश्येशस्तनुजो रतिवर्मणः । भवदेवोऽभवत्तस्य विपुण्यः कनकश्रियाम् ॥ १०४ तत्रैव दुहिता जाता श्रीदत्तस्थातिवल्लभा । विमलादिश्रिया ख्याता रतिवेगाख्यया सती ॥ १०५ सुकान्तोऽशोक वे वेष्ट जिनदत्तासुतोऽजनि । भवदेवस्य दुर्वृत्त्या दुर्मुखाख्योऽप्यजायत ।। १०६ स एष द्रव्यमावयं रतिवेगां जिघृक्षुकः । वाणिज्यार्थं गतस्तस्मान्नायात इति सा तदा ॥ १०७ मातापितृभ्यां प्रादायि सुकान्ताय सुतेजसे । देशान्तरात्समागत्य तद्वार्ताश्रवणाद्भृशम् ॥ १०८ दुर्मुखे कुपिते भीत्वा तदानीं तद्वधूवरम् । व्रजित्वा शक्तिषेणस्य शरणं समुपागतम् ।। १०९ तदुर्मुखोऽपि निर्बन्धादनुगत्य वधूवरम् । शक्तिषेणभयाद्वद्धवैरो निववृते ततः ॥ ११० महापुराण (६३७ याप्रमाणे हे सगळे श्रद्धा अविहीन - श्रद्धेने सहित व्रतभूषणानी शोभणारे झाले. तो शक्तिषेण आपल्या अटवीश्री नामक पत्नीला तिच्या आईबापाकडे नेण्यासाठी मृणालवती नगरीकडे आपल्या सैन्यासह निघाला होता. धान्यकमाल नामक वनात सर्पसरोवरावर त्याने मुक्काम केला ।। १०१-१०२ ॥ येथे या कथेला अनुसरून असलेला वृत्तांत सुलोचनेने सांगितला तो असा-या मृणालवती नगरीचा राजा धरणीपति हा आहे. या नगरीत सुकेतु नांवाचा व्यापारी होता. त्याच्या पित्याचे नांव रतिवर्मा होते. सुकेतु व्यापाऱ्याच्या पत्नीचे नांव कनकश्री होते व या दोघाना पुण्यरहित असा भवदेवनामक पुत्र झाला ।। १०३ - १०४ ॥ त्याच नगरात श्रीदत्त वैश्य राहात होता. त्याला अतिशय आवडती विमलश्री नांवाची पत्नी होती व या दोघाना रतिवेगा या नांवाची सद्गुणी कन्या झाली ।। १०५ ।। अशोकदेवाची पत्नी जिनदत्ता या उभयाना सुकान्त नांवाचा मुलगा झाला. भवदेवाला दुराचरणामुळे दुर्मुख हे नांवही प्राप्त झाले होते. भवदेव उर्फ दुर्मुखाने आपण द्रव्य मिळवून रतिवेला ग्रहण करावे असा विचार केला व तो व्यापार करण्यासाठी परदेशी गेला व तेथून जेव्हां तो आला नाही तेव्हां रतिवेगेच्या मातापित्यानी तेजस्वी सुकान्ताला ती दिली. अर्थात् सुकान्ताबरोबर तिचा विवाह झाला. तो दुर्मुख देशान्तराहून आला तेव्हां त्याला ती वार्ता ऐकल्यामुळे अतिशय क्रोध आला. तो अतिशय रागावल्यामुळे ते जोडपे भ्याले व ते शक्तिषेणाकडे जाऊन त्याच्या रक्षणाखाली राहिले. तो दुर्मुखदेखील हट्टाने त्या वधूवराच्या पाठीमागे लागला. त्याने त्यांच्याशी दृढवैर बांधले पण शक्तिषेणाच्या भयामुळे तो तेथून पुनः परतला ।। १०६-११० ॥ Page #649 -------------------------------------------------------------------------- ________________ ६३८) महापुराण (४६-१११ तकस्मै वियच्चारणद्वन्द्वाय समीयुषे । शक्तिषेणो ददावन्नं पाथेयं परजन्मनः ॥ १११ तत्रैवागत्य सार्थेशो निविष्टो बहुभिः सह । विभुमेरुकदत्ताख्यः श्रेष्ठी भार्यास्य धारिणी ॥ ११२ मन्त्रिणस्तस्य भूतार्थः शकुनिः सबृहस्पतिः । धन्वन्तरिश्च चत्वारः सर्वे शास्त्रविशारदाः ॥ ११३ एभिः परिवृतः श्रेष्ठी हीनाङ्गकञ्चिवागतम् । समीक्ष्यैनं कुतो हेतोर्जातोऽयमिति तान् जगौ ॥११४ शकुनिः शकुनाद्दुष्टाद्ग्रहात्पापाबृहस्पतिः । धन्वन्तरिस्त्रिदोषेभ्यो जन्मनीति समादिशत् ॥ ११५ भूतार्थस्त्वस्तु तत्सर्व कर्म हिंसाद्यपाजितम् । प्रधानकारणं तेन होनाङग इति सूक्तवान् ॥ ११६ शक्तिषणमहीपालप्रतिपन्नसुतः पिता। सत्यदेवस्य दृष्ट्वास्मिस्तमन्विष्यन्यदृच्छया ॥ ११७ तदा कृत्वा महदुःखं सभ्यराकर्ण्यतामिदम् । च्युतं पयोऽतिपाकेन भाजनात्तण्डुलानपि ॥ ११८ भक्ष्यमाणान्कपोताद्यैः पश्यंस्तूष्णीमयं स्थितः । क्रोधान्मातुः कनीयस्या भर्त्सनावागतोऽसहः ॥११९ तेथे एका आकाशगमनऋद्धिधारी चारणमुनीच्या जोडीला शक्तिषेणाने परलोकी शिदोरीसारखे उपयोगी पडणारे आहारदान दिले ॥ १११ ॥ तेथेच अनेक व्यापाऱ्यांचा स्वामी व मोठा धनिक असा मेरुकदत्त नांवाचा व्यापारी आपल्या धारिणी नामक पत्नीबरोबर व पुष्कळ लोकाबरोबर येऊन राहिला होता ।। ११२ ॥ या मेरुकदत्ताचे भूतार्थ, शकुनि, बृहस्पति व धन्वन्तरि असे चार मन्त्री सर्व शास्त्रात अतिशय चतुर असे होते. या चौघानी युक्त असलेल्या मेरुकदत्तश्रेष्ठीने एका हीनाङ्ग व्यक्तीला जी तेथे आली होती तिला पाहिले व हा मनुष्य कोणत्या कारणामुळे असा झाला आहे असे त्याने त्याना विचारले ॥ ११३-११४ ॥ जन्मवेळी अशुभ शकुनामुळे हा हीनाङ्ग झाला आहे असे शकुनीने उत्तर दिले व बृहस्पतीने पापग्रहामुळे हा हीनाङ्ग झाला असे म्हटले आणि धन्वन्तरीने वात, पित्त व कफ या त्रिदोषाच्या विकाराने असा झाला असे म्हटले ॥ ११५ ॥ जो भूतार्थ नामक मन्त्री होता त्याने पूर्वजन्मी हिंसादिक कार्य करून जे अशुभ कर्म याने उपाजिले आहे त्याच्या उदयाने हा हीनाङ्ग झाला आहे. ते हिंसादिक पापकर्म प्रधानकारण आहे असे योग्य भाषण केले ॥ ११६ ॥ शक्तिषेण राजाने ज्याला आपला मुलगा मानले होते अशा सत्यदेवाचा पिता सत्यक त्याला हुडकीत या अरण्यात आला व त्याला पाहून अतिशय दुःख व्यक्त करून हे सभ्यजन हो आपण ऐका असे म्हणून तो असे बोलला- भगोण्यातले पाणी अतिशय तापून ते उतू येऊन बाहेर पडू लागले व त्याबरोबर आतील तांदूळ बाहेर पडत असलेले कबूतर वगैरे पक्षी जमून ते खाऊ लागले. पण हा मात्र पाहात स्वस्थ बसला. त्यावेळी त्याच्या आईची धाकटी बहीण रागावली व तिने त्याची निंदा केली. ती याला सहन न झाल्याने हा येथे आला आहे ।। ११७-११९ ॥ Page #650 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-१२८) महापुराण (६३९ अधस्ताद्ववनविवरं घ्राणस्येति तदप्ययं । क्षमते नेति सर्वेषां तवकर्मण्यतां ब्रुवन् ॥ १२० गन्तुं सहात्मना तस्यानभिलाषाद्विषण्णवान् । परस्मिन्नपि भूयासं भवे ते स्नेहगोचरः॥ १२१ इति कृत्वा निदानं स द्रव्यसंयममाश्रितः । प्रपेदे लोकपालत्वं तद्गतस्नेहमोहितः ॥ १२२ कदाचिच्छुक्लपक्षस्य दिनादौ भार्यया सह । कृतोपवासया शक्तिषणो भक्तिपुरःसरः ॥ १२३ मुनिभ्यां दत्तदानेन पंचाश्चर्यमवाप्तवान् । दृष्ट्वा तच्छ्रेष्ठिधारिण्यावावयोरन्यजन्मनि ॥ १२४ एतावपत्ये भूयास्तां निदानं कुरुतामिति । मन्त्रिणस्तस्य चत्वारोऽप्यस्तसर्वपरिग्रहाः ॥ १२५ तपो विधाय कालान्ते समापन्लोकपालताम् । वधूवरं च दानानुमोदपुण्यमवाप्तवत् ॥ १२६ तवाकर्ण्य महीशस्य देवी वसुमती तदा । स्वजन्मान्तरसम्बोधमूर्छानन्तरबोषिता ॥ १२७ अहं पूर्वोक्तदेवश्रीस्त्वत्प्रसादादिमां श्रियम् । प्राप्ता तदातनो राजा वद क्वाद्य प्रवर्तते ॥ १२८ तुझ्या नाकाच्या खाली तोंडाचे बीळ आहे हे देखील म्हणणे याला सहन होत नाही. असे बोलून त्याच्या कार्य करण्यातील असमर्थतेचे त्याने वर्णन केले ॥ १२० ॥ __ माझ्याबरोबर चल म्हणून पित्याने म्हटले पण त्याला जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तो पिता खिन्न झाला व पुढच्या जन्मी मी तुझ्या स्नेहाला पात्र होईन असे म्हणून त्याने निदान बांधले व द्रव्यसंयम स्वीकारून तो मुनि झाला व मरण पावून स्वर्गात लोकपाल जातीचा देव झाला ॥ १२१-१२२ ॥ कोणे एकेवेळी शुक्लपक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी शक्तिषेणाच्या स्त्रीने भक्तिपूर्वक उपवास धारण केला ।। १२३ ॥ त्याने दोन मुनीना आहारदान दिले. त्यामुळे पंचाश्चर्याना तो प्राप्त झाला. हे पाहून मेरुदत्त व त्याची स्त्री धारिणी या दोघानी पुढील जन्मी हे दोघे शक्तिषेण व त्याची स्त्री आपली अपत्ये व्हावीत असे निदान केले. या मेरुदत्ताच्या चौघा मंत्र्यानीही परिग्रहांचा त्याग केला व त्यानी तपश्चरण केले आणि शेवटी ते लोकपालदेव झाले. याचप्रमाणे सुकान्त व रतिषणा या दोघा वधूवरानीही दानानुमोदनाने पुण्य प्राप्त करून घेतले ॥ १२४-१२६ ।। ते सर्व ऐकून लोकपाल राजाच्या राणीला-वसुमतीला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले व ती मूच्छित झाली. सावध झाल्यावर ती म्हणाली, 'मी पूर्वजन्मी शोभानगरीच्या राजा प्रजापालाची राणी होते. माझे नांव देवश्री असे होते व अहो अमितमति आर्यिकाबाई आपल्या प्रसादामुळे मी या वैभवाला प्राप्त झाले आहे. माझे पूर्वजन्माचे पति महाराज प्रजापाल आज कोठे आहेत हे आपण सांगा ?' ।। १२७-१२८ ।। Page #651 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४०) महापुराण (४६-१२९ इति तस्याः परिप्रश्ने स प्रजापालभूपतिः । लोकपालोऽयमित्युक्ते प्रियदत्ता स्वपूर्वजम् ॥ १२९ जन्मावबुद्धय वन्दित्वा साटवीश्रीरियं त्वहम् । शक्तिषणो मम प्रेयानसौ क्वाध प्रवर्तते ॥ १३० इति पृष्टावदच्छक्तिषणस्तेऽयं मनोरमः । कुबेरदयितः सत्यदेवोऽभूत्तनुजस्तव ॥ १३१ देवभूयं गताः श्रेष्ठिसचिवास्त्वत्पते शम् । आरभ्य जन्मनः स्नेहात्परिचर्या प्रकुर्वते ॥ १३२ कुबेरदयितस्यापि पिता प्राच्यः स सत्यकः। पाता गत्यन्तरस्थाश्च पुण्यात् स्निह्यन्ति देहिनः॥१३३ भवदेवेन निर्दग्धं द्विजावेतौ वधूवरम् । सार्थेशो धारिणी चेह पत्युस्ते पितराविमौ ॥ १३४ इत्युक्त्वा सेदमप्याह खगाचलसमीपगे। वसन्तौ चारणावद्रौ मुनी मलयकाञ्चने ॥ १३५ पूर्व वननिवेशे तौ भिक्षार्थ समुपागती । तव पुत्रसमुत्पतिमुपदिश्य गतौ ततः ॥ १३६ . अन्येधुर्वसुधारादिहेतुभूतौ कपोतकौ । दृष्ट्वा सकरुणौ भिक्षामनादाय वनं गतौ ॥ १३७ गुर्वोर्गुरुत्वं युवयोरुपयातौ तयोरिदम् । उपदेशात्समाकर्ण्य सर्वमुक्तं यथाक्रमम् ॥ १३८ ___ याप्रमाणे वसुमतीने प्रश्न केल्यानंतर अमितमति आर्यिकेने सांगितले की हा लोकपालच पूर्वजन्मी प्रजापाल राजा होता. एवढे सांगितले तोच प्रियदत्तेलाही आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली. तिने अमितमति आयिकेला वंदन केले. शक्तिषेण राजाची मीच अटवीश्री नामक पत्नी आहे पण तो शक्तिषेण राजा आज कोठे आहे ? हा प्रश्न विचारल्यानंतर अमितमति आर्यिकाबाईनी म्हटले की, तूझा हा कुबेरकान्त पतीच पूर्व जन्मीचा शक्तिषेण आहे व हा कुबेरदयितच पूर्वजन्मीचा सत्यदेव आहे व तो तुझा मुलगा झाला आहे. श्रेष्ठी मेरुदत्ताचे जे भूतार्थ वगैरे चार मन्त्री होते ते स्वर्गात देव झाले आहेत व पूर्वजन्माच्या स्नेहामुळे तुझ्या पतीची प्रेमाने अतिशय सेवा करीत आहेत ॥ १२९-१३२ ।। कुबेरदयित श्रेष्ठीचा पूर्व जन्मीचा पिता सत्यक तो या जन्मी कुबेरकान्ताचा रक्षक झाला आहे. भिन्नगतीतील जीवही पुण्यामुळे प्राण्यांचे रक्षण करतात. त्यांच्यावर प्रेम करतात ॥ १३३ ॥ __ भवदेवाने जाळलेले जे दंपती रतिवेगा आणि सुकान्त ते हे पक्षी झालेले आहेत व मेरुदत्त श्रेष्ठी व धारिणी हे दोघे पतिपत्नी तुझ्या पतीचे मातापिता झालेले आहेत ।। १३४ ।। याप्रमाणे सांगून तिने- अमितमति आर्यिकेने हेही सांगितले. विजयार्ध पर्वताच्या जवळ असलेल्या मलयकांचन नामक पर्वतावर राहणारे ते दोन चारणमुनि जेव्हा पूर्वजन्मी शक्तिषेण राजा सर्पसरोवरावर मुक्कामाला होता त्यावेळी भिक्षेसाठी आले होते व तुला त्यानी पाच पुत्र व एक कन्या होईल असे सांगून ते नंतर तेथून गेले. सुवर्णादिवृष्टीला कारणभूत असे ते मुनि पुनः आले होते पण कबूतर व कबूतरीला पाहून त्यांना दया उत्पन्न झाली आणि त्यानी भिक्षा न घेता ते वनात निघून गेले व तेच तुझ्या पित्याचे व तुझ्या पतीचे गुरु होत. त्यांच्याच उपदेशाने मी हे सर्व ऐकले आणि क्रमाने मी सर्व सांगितले आहे ॥ १३५-१३८ ।। Page #652 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-१४८) महापुराण (६४१ इति तेऽमितमत्युक्तकथावगमतत्पराः । स्वरूपं संसृतेः सम्यक् मुहुर्मुहुरभावयन् ॥ १३९ एवं प्रयाति कालेऽसौ प्रियदत्ता प्रसङ्गतः। यशस्वतोगुणवत्यौ युवाभ्यां केन हेतुना ॥ १४० इयं दीक्षा गृहीतेति पप्रच्छोत्पन्नकौतुका । ते च तत्कारणं स्पष्टं यथावत्तमवोचताम् ॥ १४१ ततो धनवती दीक्षा गणिन्याः सन्निधौ ययौ। माता कुबेरसेना च तयोराथिकयोर्द्वयोः ॥ १४२ तावन्येयुः कपोतौ च ग्रामान्तरमुपाश्रितो। तण्डलाधुपयोगाय समतिप्रचोदितौ ॥ १४३ भवदेवचरेणानुबद्धवैरेण पापिना । दृष्टमात्रोत्थपापेन मारितौ पुरुदंशसा ॥ १४४ तद्राष्ट्रवजयार्षस्य दक्षिणश्रेणिमाश्रिते । गान्धारविषयोशीरवत्याख्यनगरेऽधिपः ॥ १४५ आदित्यगतिरस्यासीन्महादेवी शशिप्रभा । तयोहिरण्यवर्माख्यः सुतो रतिवरोऽभवत् ॥ १४६ तस्मिन्नेवोत्तरश्रेण्यां गौरीविषयविश्रुते । पुरे भोगपुरे वायुरथो विद्याधराधिपः ॥१४७ तस्य स्वयम्प्रभादेव्यां रतिषणा प्रभावती । बभूव जैनधर्माशोऽप्यभ्युद्धरति देहिनः ॥ १४८ याप्रमाणे अमितमति आर्येने सांगितलेली कथा जाणण्यात जे तत्पर झाले होते त्या सर्वानी वारंवार संसाराच्या स्वरूपाचा चांगला विचार केला ।। १३९ ॥ याप्रमाणे काही काल लोटल्यावर एके वेळी प्रियदत्तेने प्रसंग पाहून यशस्वती व गुणवती या दोन आर्यिकाना तुम्ही दीक्षा कोणत्या कारणाने घेतली मला याविषयी कौतुक वाटत आहे असे जेव्हा विचारले तेव्हा त्यानी दीक्षेचे कारण जसे घडले होते ते स्पष्ट करून सांगितले ।। १४०-१४१ ॥ यानन्तर कुबेरमित्राच्या पत्नीने-धनवतीने आर्यिकासंघाची स्वामिनी अशा अमितमती आर्यिकेजवळ दीक्षा धारण केली व त्या दोन आर्यिकांची माता अशा कुबेरसेनेने देखिल आपल्या मुलीजवळ दीक्षा घेतली ।। १४२ ॥ कोणे एके दिवशी यमाने ज्याना प्रेरिले आहे अशी ती दोन कबूतरें तान्दुळ वगैरे खाण्यासाठी दुसऱ्या गावाला गेलीं ॥ १४३ ।।। तेव्हा पूर्वजन्मापासून ज्याच्या ठिकाणी वैर उत्पन्न झाले होते व जो पूर्वजन्मी भवदेव होता व या जन्मी जो मांजर होऊन जन्मला अशा त्या पापी मांजराला त्याना पाहिल्याबरोबर पापाची भावना उत्पन्न झाली व त्याने त्या दोघाना ठार मारले ॥ १४४ ।। त्याच पुष्कलावती देशातील विजयाईपर्वताच्या दक्षिणश्रेणीमध्ये गांधार नामक देशातील उशीरवती नामक नगरात आदित्यगति नांवाचा विद्याधर राजा राज्य करित होता. त्याच्या महादेवीचे-महाराणीचे नांव शशिप्रभा असे होते. या उभयताना तो रतिवर कबूतर हिरण्यवर्म नावाचा मुलगा झाला व याच विजयाध पर्वताच्या उत्तरश्रेणीत गौरीनामक देशात प्रसिद्ध असे भोगपुर नामक नगर होते व तेथे वायुरथ नामक विद्याधरांचा स्वामी-राजा राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नांव स्वयम्प्रभादेवी असे होते. तिच्या ठिकाणी ही रतिषणा प्रभावती नामक कन्या झाली. बरोबरच आहे की, जैनधर्माचा अंश देखिल प्राण्यांचा उद्धार करतो ॥ १४५-१४८ ॥ म. ८४ Page #653 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४२) महापुराण (४६-१४९ माता पितापि या यश्च सुकान्तरतिवेगयोः । जन्मन्यस्मिन्किलाभूतां चित्रं तावेव संसृतिः॥ १४९ हा मे प्रभावतीत्याह जयश्चेत्ससुलोचनः । रूपादिवर्णनं तस्याः किं पुनः क्रियते पृथक् ॥ १५० यौवनेन समाक्रान्तां कन्यां दष्ट्वा प्रभावतीम् । कस्मै देयेयमित्याह खगेशो मन्त्रिणस्ततः ॥ १५१ शशिप्रभा स्वसा देव्या भ्रातादित्यगतिस्तथा। परे च खचराधीशाः प्रीत्यायाचन्त कन्यकाम् ॥१५२ ततः स्वयंवरो युक्तो विरोधस्तन्न केनचित् । इत्यभाषन्त निश्चित्य तद्भूपोऽप्यभ्युपागमत् ॥१५३ ततः सर्वेऽपि तद्वार्ताकर्णनादागमन्वराः । कमप्येतेषु सा कन्या नाग्रहीद्रत्नमालया ॥ १५४ मातापितृभ्यां तदृष्ट्वा सम्पृष्टा प्रियकारिणी । यो जवेद्गतियुद्धे मां मालां संयोजयाम्यहम् ॥१५५ कण्ठे तस्येति वक्त्येषा प्रागित्याह सखी तयोः । श्रुत्वा तत्तद्दिने सर्वानुचितोक्त्या व्यसर्जयत् ॥१५६ __ सुकान्त आणि रतिवेगा यांच्या या भवातील जी माता व जो पिता तेच माता-पिता या जन्मातही झाले. यावरून संसार फार आश्चर्यकारक आहे असे म्हणावयास हरकत नाही. (सुकान्ताचे पिता अशोकदेव व माता जिनदत्ता तेच या भवात आदित्यगति व शशिप्रभा झाले व रतिवेगेचे माता-पिता विमलश्री आणि श्रीदत्त होते ते या भवात स्वयंप्रभा आणि वायुरथ झाले) ॥ १४९ ॥ सुलोचनेने सहित असा जयकुमार "हे माझ्या प्रभावती" असे म्हणाला त्या अर्थी त्या प्रभावतीच्या रूपादिसौंदर्याचे वर्णन वेगळे करण्याची पुनः काय आवश्यकता आहे ? ॥ १५० ।। जेव्हा प्रभावती यौवनाने मुसमुसली त्यावेळी ही कोणाला द्यावी असे विद्याधरेशाने मन्त्र्याना विचारले ।। १५१ ॥ त्यानन्तर मन्त्र्यानी म्हटले की हे प्रभो शशिप्रभा आपली बहिण आहे व आदित्यगति आपल्या पट्टराणीचा भाऊ आहे. हे व इतरही विद्याधरराजे प्रीतीने कन्येची याचना करीत आहेत. म्हणून आपण स्वयंवर करणे योग्य आहे व त्यामध्ये कोणाशी विरोध उत्पन्न होणार नाही असा मंत्र्यानी निश्चय करून सांगितले व राजानेही त्यांचे म्हणणे मान्य केले ॥ १५२-१५३ ॥ यानंतर स्वयंवराची वार्ता ऐकून सर्व वर आले पण त्यापैकी कन्येने रत्नमाला गळ्यात घालून कोणाचाही स्वीकार केला नाही ॥ १५४ ॥ ते पाहून माता-पित्यानी तिच्या प्रियकारिणी नामक मैत्रिणीला विचारिले. तेव्हा जो मला गतियुद्धात जिंकील त्याच्या गळ्यात मी माला घालीन असे ही पूर्वी आमच्याजवळ बोलली आहे असे त्या सखीने त्या दोघाना सांगितले. ते ऐकून राजाने त्याचदिवशी सर्व राजपुत्राना योग्य भाषण करून पाठवून दिले ॥ १५५-१५६ ।। Page #654 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-१६५) महापुराण (६४३ अन्येयुः खचराधीशो घोषयित्वा स्वयंवरम् । सिद्धकूटाख्यचैत्यालयस्य मालां पुरः स्थिताम् ॥ १५७ जपातयन्महामेरोस्त्रिः परीत्य महीतलम् । अस्पृष्टां खेचराः केचितां ग्रहीतुमनीश्वराः ॥ १५८ त्रपां गताः समादाय प्रभावत्या विनिजिताः । समो ननु न मृत्युश्च मानभङ्गन मानिनाम् ॥ १५९ ततो हिरण्यवर्मायाद्गतियुद्धविशारदः । मालामासञ्जयामास तत्कण्ठे तेन निजिता ॥ १६० तयोर्जन्मान्तरस्नेहसमृद्धसुखसम्पदा । काले गच्छति कस्मिश्चित्कपोतद्वयदर्शनात् ॥ १६१ ज्ञातप्राग्भवसम्बन्धा सुविरक्ता प्रभावती । स्थिता शोकाकुलकैव चिन्तयन्ती किमप्यसौ ॥ १६२ हिरण्यवर्मणा ज्ञातजन्मना लिखितं स्फुटम् । पट्टकं प्रियकारिण्या हस्ते समवलोक्य ताम् ॥ १६३ क्व लब्धमिदमित्याख्यत्प्राह सापि प्रियेण ते । लिखितं चेटकस्तस्य सुकान्तो मे समर्पयत् । १६४ इति तद्वचनं श्रुत्वा स्वयमप्यात्मवृत्तकम् । प्राक्तनं पट्टके तस्य लिखित्वासौ करे ददौ ॥ १६५ मग दुसऱ्या दिवशी वायुरथविद्याधराधीशाने स्वयंवराची घोषणा करताना असे सांगितले- "एक माला सिद्धकूट चैत्यालयाच्या पुढे सोडली जाईल. जो कोणी विद्याधर ती माला सोडल्यानंतर महामेरुपर्वताला तीन प्रदक्षिणा देऊन प्रभावतीच्या आधी ती माला जमिनीवर पडण्याच्या पूर्वी ग्रहण करील तो प्रभावतीचा पति होईल. ही घोषणा ऐकून पुष्कळ विद्याधरानी प्रयत्न केला पण ती माला ग्रहण करण्यास ते असमर्थ झाले. पण प्रभावतीने ती माला घेऊन त्या विद्याधराना जिंकले तेव्हा त्याना फार लाज वाटली. जे अभिमानी असतात ते मृत्यूला देखिल मानभंगाच्या बरोबरीचा मानीत नाहीत. मानभंग होणे मृत्यूपेक्षा देखिल अतिशय दुःखाचे मानतात ॥ १५७-१५९ ॥ यानन्तर गतियुद्धात प्रवीण असलेला हिरण्यवर्मा आला व त्याने तिला- प्रभावतीला जिंकले तेव्हा तिने त्याच्या गळ्यात माला घातली ॥ १६० ॥ त्या दोघाच्या पूर्वजन्माच्या स्नेहसम्बन्धामुळे वृद्धिंगत झालेल्या सौख्याच्या सम्पदेने काल जात असता कोणे एके वेळी दोन कबूतरे तिला दिसली ।। १६१ ।।। त्याना पाहून पूर्वभवाच्या संबंधाचे ज्ञान प्रभावतीला झाले. ती अतिशय विरक्त झाली व एकटीच मनात काही तरी चिन्तन करीत शोकाने व्याकुळ होऊन बसली ॥ १६२ ॥ ज्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले आहे अशा त्या हिरण्यवर्माने एक पट्टक लिहिला. तो प्रियकारिणीच्या हातामध्ये असलेला प्रभावतीने पाहिला व तुला हा कोठे मिळाला असे विचारले तेव्हा तिनेही असे सांगितले-हे प्रभावती, तुझ्या पतीने हा लिहिला आहे व त्याने तो सुकान्त नामक नोकराला दिला व त्याने तो मला दिला आहे. हे तिचे भाषण ऐकून त्या प्रभावतीनेही त्या पट्टकात स्वतःचे वृत्त नमूद केले-लिहिले व ते तिच्या हातात दिले ॥ १६३-१६५ ॥ Page #655 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४४) (४६-१६६ तद्विलोक्य कुमारोऽभूत्प्रभावत्यां प्रसक्तषीः । सापि तस्मिंस्तयोः प्रीतिः प्राक्तन्यद्विगुणाभवत् ॥ १६६ सम्भूय बान्धवाः सर्वे कल्याणाभिषवं तयोः । अकुर्वशिव कल्याणं द्वितीयं ते चिकीर्षवः ॥ १६७ दशम्यां सिद्धकूटाग्रे स्नानपूजाविधौ क्वचित् । हिरण्यवर्मणा वीक्ष्य परमावधिचारणः ॥ १६८ प्रभावत्या च पृष्टोऽसौ स्वपूर्वभववृत्तकम् । अभाषत सुनिश्चैवमनुग्रहषिया तयोः ॥ १६९ तृतीयजन्मनीतोऽत्र सम्भूतौ वणिजां कुले । रतिवेगा सुकान्तश्च प्राक्मृणालवतीपुरे ॥ १७० भर्तृभार्यादिसम्बन्धं सम्प्राप्यारिभयाद्गतौ । कृत्वानुमोदनं शक्तिषेणदाने सपुण्यकौ ।। १७१ पारापतभवे चाप्य धर्म जातौ युवामिति । विधाय पितरौ वैश्यजन्मनोर्याविहापि तौ ।। १७२ तृतीयजन्मनो युष्मद्गुरवोऽहं च सङ्गताः । रतिषेणगुरोः पार्श्वे गृहीतप्रोषधाश्चिरम् ॥ १७३ महापुराण तो पट्टक बघून हिरण्यवर्मकुमार प्रभावतीवर अधिक आसक्त झाला व ती प्रभावती देखिल त्याच्यावर आसक्त झाली. यामुळे त्यांचे प्रेम एकमेकावर दुप्पट वाढले ।। १६६ ।। सर्व बन्धुगण जमून त्या दोघांचे जणु दुसरे कल्याण करण्याची इच्छा करीत आहेत अशा रीतीने त्या दोघाना त्यानी कल्याणस्नान घातले ॥ १६७ ॥ कोणे एके वेळी दशमी तिथीचे दिवशी सिद्धकूट जिनमंदिरात जिनेश्वराचा स्नान-अभिषेक पूजाविधि होत असता हिरण्यवर्माने परमावधिज्ञानयुक्त चारणमुनींना पाहिले व प्रभावतीनेही पाहिले. नंतर त्यानी त्याना आपले पूर्वभवाचे वृत्त विचारले. त्या दोघावर अनुग्रह करण्याच्या बुद्धीने त्यानी ते याप्रमाणे सांगितले ।। १६८ - १६९ ।। या जन्मापासून मागच्या तिसऱ्या भवात तुम्ही मृणालवती नगरात वैश्य कुलात सुकांत व रतिवेगा होऊन जन्मला होता. त्या भवात तुम्ही पति-पत्नी सम्बन्धाला प्राप्त झालेले होता व शत्रुभयामुळे तुम्ही मृणालवती नगरातून निघून शक्तिषेणाच्या आश्रयाला गेला. तेथे तुम्ही मुनिदानात अनुमोदन देऊन पुण्यवान् झाला. यानंतर कबूतर व कबूतरीच्या भवात तुम्ही दोघे धर्म धारण करून येथे विद्याधर व विद्याधरी झालेले आहात. वैश्यजन्मात जे तुमचे मातापिता होते तेच या जन्मातही धर्मधारण करून तुम्हा दोघांचे माता-पिता झाले आहेत. तिसन्या जन्मात तुमचे माता-पिता व मी एकत्र येऊन रतिषेणगुरूंच्या जवळ प्रोषधव्रत घेतले होते व त्याचे आम्ही दीर्घकालपर्यन्त पालन केले. जिनमंदिरात आम्ही नाना उपकरणानी नेहमी जिनपूजा केली व त्यामुळे आम्ही येथे विद्याधरराजे झालो आहोत ।। १७०-१७४ ।। मी पूर्वभवी भवदेवाचा पिता रतिवर्मा नांवाचा होतो व आता श्रीवर्मनांवाचा विद्याधर राजा झालो. पुढे मी मुनिसंयम धारण केला. माझी बुद्धि निर्मल झाली व त्यामुळे मी चारण ऋद्धिधारक व अवधिज्ञानी झालो आहे. हे मुनींचे भाषण ऐकून हिरण्यवर्म व प्रभावतीला अत्यंत प्रसन्नता प्राप्त झाली ।। १७५-१७६ ।। Page #656 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-१८५) (६४५ जिनेन्द्रभवने भवस्था नानोपकरणैः सदा । विधाय पूजां समजायामहीह खगाधिपाः ॥ १७४ पिताहं भवदेवस्य रतिवर्माभिधस्तदा । भूत्वा श्रीवर्मनामातः संयमं प्राप्य शुद्धधीः ॥ १७५ चारणत्वं तृतीयं च ज्ञानं प्राप्तमिहेत्यदः । श्रुत्वा मुनिवचः प्रीतिमापद्येतां तरां च तौ ॥ १७६ एवं सुखेन यात्येषां काले वायुरथः पृथुम् । विशरारुं समालोक्य स्तनयित्नुं प्रतिक्षणम् ॥ १७७ विश्वं विनश्वरं पश्यन् शश्वच्छाश्वतिकों मतिम् । जनः करोति सर्वत्र दुस्तरं किमिदं तमः ॥ १७८ इति याथात्म्यमासाद्य दत्वा राज्यं विरज्य सः । मनोरथाय नैःसङग्यं प्रपित्सुरभवत्तदा ।। १७९ आदित्य गतिमभ्येत्य प्रीत्या सर्वेऽपि बान्धवाः । प्रभावतीसुता देया भवतेयं रतिप्रभा ॥ १८० मनोरथस्य पुत्राय कन्या चित्ररथाय सा । इत्याहुः सोऽप्यनुज्ञाय कृत्वा बन्धुविसर्जनम् ॥ १८१ हिरण्यवर्मणः सर्वखगराज्याभिषेचनम् । विधाय बहुभिः सार्धं सम्प्राप्य मुनिपुङ्गवम् ॥ १८२ संयमं प्रतिपन्नः स सहवायुरथः स्वयम् । तपो द्वादशधा प्रोक्तं यथाविधि समाचरत् ॥ १८३ इत्युक्त्वा रतिवेगाहं रतिषेणा प्रभावती । चाहमेवेति सभ्यानां निजगाद सुलोचना ॥ १८४ तदाकर्ण्य जयोऽप्याह पतिस्तासामहं क्रमात् । जाये स्म तत्र तत्रेति विश्वविस्मयकृद्वचः ॥ १८५ महापुराण याप्रमाणे या सर्वांचा काल सुखाने चालला होता. त्यावेळी वायुरथ राजाने मोठा पण प्रतिक्षणी कमी कमी होत चाललेला मेघ पाहिला व हे विश्व नाशवन्त आहे असे पाहूनही सर्व - पदार्थात सर्व लोक हे कायमचे नित्य आहेत अशी बुद्धि करतात. यावरून सर्वांच्या अन्तःकरणात दुस्तर दाट अज्ञान पसरले आहे असा विचार केला. याप्रमाणे जगाचे खरे स्वरूप समजून व मनोरथ नामक आपल्या पुत्राला राज्य देऊन पूर्ण निःसंगपणाला प्राप्त करून घेण्याची इच्छा करू लागला ।। १७७ - १७९ ।। त्यावेळी सगळे आप्त नातलग आदित्यगति राजाकडे आले व त्याला म्हणाले की, आपण प्रेमाने मनोरथाच्या चित्ररथ नामक पुत्राला प्रभावतीची कन्या रतिप्रभा द्यावी. त्याने देखिल त्यांचे म्हणणे मान्य केले व त्या सर्व बांधवांचे विसर्जन केले ॥ १८० त्यावेळी हिरण्यवर्माला सर्व विद्याधरांचा राजा म्हणून अभिषेक केला व नंतर पुष्कळ लोकासह तो वायुरथ श्रेष्ठ मुनीकडे आला व त्याने स्वतः संयम धारण केला व बारा प्रकारचे तप विधीला अनुसरून तो करू लागला ॥ १८१-१८३ ॥ याप्रमाणे सुलोचनेने पूर्वभववृत्त सांगून रतिवेगा, रतिषेणा व प्रभावती मीच आहे असे सर्व सभेत आलेल्या लोकाना सांगितले ।। १८४ ।। . ते ऐकून जयकुमार देखिल या रतिवेगादिक तिघींचा मीच क्रमाने पति झालो होतो • असे त्या सभेत सर्वाना आश्चर्यकारक वृत्त बोलला ।। १८५ ।। Page #657 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४६) महापुराण (४६-१८२ पुनः प्रियां जयः प्राह प्रकृतं किञ्चिदस्त्यतः । अवशिष्टं तदप्युच्चस्त्वया कान्ते निगद्यताम् ॥१८६ इति पत्युः परिप्रश्नाद्दशनज्योत्स्नया सभाम् । मूर्तिः कुमद्वतीं वेन्दोविकाशमुपनीय ताम् ॥ १८७ सातवीदिति तद्वृत्तं स्वपुण्यपरिपाकजम् । सुखं राज्यसमुद्भूतं यथेष्टमपि निविशन् ॥ १८८ परेयुः कान्तया साधं स्वेच्छया विहरन्वनम् । सरो धान्यकमालाख्यं वीक्ष्यादित्यगतेः सुतः ॥१८९ स्वप्राच्यभवसम्बन्धं प्रत्यक्षमिव लक्षयन् । काललब्धिबलाल्लब्धनिर्वेदो विदुषां वरः ॥ १९० भङगुरः सङ्गमः सर्वोऽप्यङगिनामभिवाञ्छितः । कि नाम सुखमत्रेदमल्पसङ्कल्पसम्भवम् ॥ १९१ आयुर्वायुचलं कायो हेय एवामयालयः । साम्राज्यं भुज्यते लोलैर्बालिशैर्बहुदोषलम् ॥ १९२ अदूरपारः कायोऽयमसारो दुरितशयः । तादात्म्यमात्मनोऽनेन धिगेनमशुचिप्रियम् ॥ १९३ देहवासो भयं नास्य यानमस्मान्महद्भयम् । देहिनः किल मार्गस्य विपर्यासोऽत्र निर्वृतेः ॥ १९४ नीरूपोऽयं स्वरूपेण रूपी देहैररूपता । निर्वाणाप्तिरतो हेयो देह एव यथा तथा ॥ १९५ पुनः हे कान्ते, प्रस्तुतकथेचा काही भाग अद्यापि सांगावयाचा राहिला आहे तो देखिल सगळा सांग असे जयकमाराने तिला म्हटल्यावर चन्द्राची मति जशी कमलिनीला आपल्या चांदण्याने प्रफल्ल करते तशी आपल्या दन्तकान्तीच्या चांदण्याने सुलोचनेने त्या सभारूपी कमलिनीला विकसित करून पुढे सांगितल्याप्रमाणे ते वृत्त सांगितले. ती म्हणाली- आदित्यगतीचा पुत्र अशा हिरण्यवर्माने आपल्या पुण्याच्या उदयाने प्राप्त झालेले राज्याचे सुख यथेष्ट भोगले व पुनः एके दिवशी आपल्या कान्तेसह स्वेच्छेने वनात विहार करीत धान्यकमाल नामक वनात गेला. तेथे त्याला आपल्या पूर्वीच्या भवाचा संबन्ध साक्षात् अनुभवत आहोत असे वाटले व काललब्धीच्या सामर्थ्याने त्याला वैराग्य उत्पन्न झाले. विद्वच्छ्रेष्ठ अशा हिरण्यवर्माने प्राण्यानी इच्छिलेले सर्व स्त्री-पुत्र, धनादिक पदार्थांचे संयोग नाशवन्त आहेत. यात अल्प अशा संकल्पाने उत्पन्न झालेले हे सुख काय स्वरूपाचे आहे ? अर्थात् नाशवंत आहे ॥ १८६-१९१ ॥ आयष्य वान्याप्रमाणे चंचल आहे व हा काय- म्हणजे हे शरीर रोगाचे घर आहे व त्याज्य आहे व हे साम्राज्य लुब्ध झालेल्या अज्ञानी लोकाकडून भोगले जाते व हे अनेक दोषानी भरले आहे. हे शरीर ज्याचा किनारा जवळ आला आहे असे आहे अर्थात् लौकरच नाश पावणारे आहे व पापांची खाण आहे व साररहित आहे. पण आमच्या आत्म्याला हे अगदी आपणाशी एकरूप राहावे असे वाटत असते. अपवित्र पदार्थ ज्यास प्रिय आहेत अशा या आत्म्याला धिक्कार असो. या आत्म्याला अशा देहात राहत असता बिलकुल भय वाटत नाही. पण यातून निघून जाणे मात्र याला फार भयाचे वाटते. या आत्म्याला जो सुखाचा मार्ग नाही तो सुखाचा मार्ग आहे असा विपर्यास उत्पन्न झाला आहे ।। १९२-१९४ ॥ हा आत्मा स्वरूपानी रूप- स्पर्श, गंध, रस, रूप आदिकानी रहित आहे पण कार्मण, तेजस, औदारिकादिदेहानी हा रूपी बनला आहे साकार बनला आहे व याला मोक्षप्राप्ति झाली म्हणजे हा अरूप- निराकार, स्पर्शादिकानी रहित व ज्ञानदर्शनसम्पन्न बनतो. म्हणून या आत्म्याने देहाचा त्याग केला पाहिजे ॥ १९५ ।। Page #658 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-२०२) बन्धः सर्वोऽपि सम्बन्धो भोगो रोगो रिपुर्वपुः । दीर्घमायासयत्यायुस्तृष्णाग्नेरिन्धनं धनम् ॥ १९६ आदौ जन्म जरारोगा मध्येऽन्तेऽप्यन्तकः खलः । इति चक्रकसम्भ्रान्तिर्जन्तोर्मध्ये भवार्णवम् ॥ १९७ भोगिनो भोगवद्भोगा भोगा नाम न भोग्यकाः । एवं भावयतो भोगान्भूयोऽभूवन्भयावहाः ॥१९८ निषेव्यमाणा विषया विषमा विषसंनिभाः । देदीप्यन्ते बुभुक्षाभिर्दोपनीयैरिवौषधैः ॥ १९९ न तृप्तिरेभिरित्येष एव दोषो न पोषकाः । तृषश्च विषवल्लर्याः संसृतेश्चावलम्बनम् ॥ २०० वनितातनु सम्भूत कामाग्निस्नेहदीपनैः । कामिनं भस्मसाद्भावमनीत्वा न निवर्तते ॥ २०१ जन्तोर्भागेषु भोगान्ते सर्वत्र विरतिर्ध्रुवा । स्थैर्ये तस्याः प्रयत्नोऽस्य क्रियाशेषो मनीषिणः ॥ २०२ महापुराण (६४७ स्त्री-पुत्रादिकांचा जेवढा सम्बन्ध आहे तो सगळाच आत्म्याला प्रतिक्षणी कर्मबन्ध होण्यास कारण आहे. पंचेन्द्रियांचे भोगोपभोगाचे पदार्थ हे संसाररोगाला उत्पन्न करणारे आहेत व हे शरीर जीवाचा शत्रु आहे व दीर्घ आयुष्य आत्म्याला त्रास देते आणि हे धन तृष्णारूपी अग्नि प्रदीप्त करण्यास लाकडाप्रमाणे आहे ।। १९६ ॥ या प्राण्याला प्रथम जन्म प्राप्त होतो. त्यानन्तर मध्यदशेंत वृद्धावस्था आणि रोग प्राप्त होतात व अन्ती हा दुष्ट यम याला पीडा देतो. याप्रमाणे या संसारसमुद्रात चक्राप्रमाणे फिरावे लागत आहे ।। १९७ ।। हे भोगाचे पदार्थ भोगी - सर्पाच्या भोगवत् - शरीराप्रमाणे भयानक असल्यामुळे भोगण्यास योग्य नाहीत. याप्रमाणे वारंवार भावना करणाऱ्या आत्म्याला हे भोग मोठे भयंकर वाटतात ।। ९९८ ॥ हे सेविले जाणारे विषय विषाप्रमाणे विषम-सन्ताप देणारे आहेत. जसे दीपन करणा-या औषधानी जठराग्नि प्रदीप्त होतो तसे हे विषय भोग उपभोगांच्या इच्छा वाढल्यामुळे अधिकच पेट घेतात. वारंवार हे भोगाचे पदार्थ मिळावेत अशी इच्छा उत्पन्न होते ।। १९९ ॥ या विषयांच्या सेवनाने तृप्ति होत नाही एवढाच दोष यात आहे असे नाही तर हे तृष्णेला - आशेला पोषक आहेत. याचप्रमाणे संसाररूप जी विषवेल आहे तिला हे विषय आश्रयस्थान आहेत ॥ २०० ॥ स्त्री ही शरीरात उत्पन्न झालेल्या मदनाग्नीला स्नेह-प्रेमरूपी तेलाने वाढवून कामी पुरुषाला भस्म केल्यावाचून राहत नाही ॥ २०१ ।। या जीवाला विषयांचा भोग घेतल्यानन्तर त्या भोगाविषयीं सर्वत्र विरक्तपणा उत्पन्न होतो. तो विरक्तपणा स्थिर राहावा म्हणून विद्वान् लोकांच्या स्वाध्याय, ध्यानादिक क्रिया असतात ॥ २०२ ॥ Page #659 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४८) महापुराण (४६-२०३ प्रापितोऽप्यसकृददुःखं भोगस्तानेव याचते । धत्तेऽवताडितोऽप्याघ्री मात्रास्या एवं बालकः ॥२०३ भध्रुवत्वं गुणं मन्ये भोगायुःकायसम्पदाम् । ध्रुवेष्वेषु कुतो मुक्तिविना मुक्तेः कुतः सुखम् ॥२०४ वित्रम्भजननः पूर्व पश्चात्प्राणार्थहारिभिः । पारिपन्थिकसङ्काविषयः कस्य नापदः ॥ २०५ तदुःखस्यैव माहात्म्यं स्यात्सुखं विषयश्च यत् । यत्कारवेल्लकं स्वादु प्राभवं ननु तत्क्षुधः ॥२०६ सङ्कल्पसुखसन्तोषाद्विमुखश्चात्मजात्सुखात् । गुजाग्नितापसन्तुष्टशाखामृगसमो जनः ॥ २०७ सदास्ति निर्जरा नासौ मुक्त्यै बन्धच्युतेविना । तच्च्युतिश्च हतेर्बन्धहेतोस्तत्तद्धतौ यते ॥ २०८ केन मोक्षः कथं जीव्यं कुतः सौख्यं क्व वा मतिः । परिग्रहमहाग्राहगहीतस्य भवार्णवे॥ २०९ कि भव्यः किमभव्योऽयमिति संशेरते बुधाः । ज्ञात्वाप्यनित्यतां लक्ष्मीकटाक्षशरशायिते ॥ २१० या पंचेन्द्रियांच्या विषयभोगांनी या जीवाला वारंवार दुःख दिले आहे. तथापि हा जीव पुनः पुनः त्यांचीच याचना करतो. जसे बालकाला मातेने लाथ मारली तर तो बालक त्या लाथेलाच-पायालाच पकडतो । २०३ ।। भोग, आयु, शरीर आणि संपत्ति यांच्यामध्ये अध्रुवपणा-अस्थिरपणा हा गुणच आहे असे मला वाटते. जर हे पदार्थ नित्य असते तर मुक्तिलाभ कोणालाच झाला नसता व मुक्ति प्राप्त झाली नाही तर, मुक्तीचे खरे सुख कोणालाच मिळाले नसते ॥ २०४ ॥ प्रथम विश्वास उत्पन्न करणारे व नन्तर प्राण आणि धन हरण करणारे शत्रुसारखे असलेल्या या विषयांनी कोणाला बरे दुःखें प्राप्त होणार नाहीत ॥ २०५ ॥ मनुष्याला विषयसेवनाने सुख वाटते. ते तसे वाटणे हे दुःखाचे माहात्म्य सामर्थ्य समजावे. कारण कारले जे गोड लागते ते खरोखर भुकेचेच सामर्थ्य आहे ।। २०६ ।। केवल संकल्पिलेल्या सुखाने आनंदित होऊन आत्मस्वरूपापासून उत्पन्न होणाऱ्या सुखापासून पराङमुख झालेला हा जीव तांबड्या गुंजांना अग्नि समजून त्याच्या तापाने उष्णतेने सन्तुष्ट होणा-या माकडाप्रमाणे समजावा ।। २०७ ॥ ___ कर्मांची नेहमी निर्जरा होते पण ती निर्जरा मोक्षाला कारण नाही. कारण ती निर्जरा बन्धाने रहित नाही. बन्धाची जी मिथ्यात्वादिक कारणे आहेत ती नष्ट जोपर्यन्त झाली नाहीत. तोपर्यन्त कर्मबन्ध होत राहणारच. बन्धाची कारणे नष्ट झाली म्हणजे बन्ध नाहीसा होतो व कर्मबन्धरहित निर्जरा ही मुक्तिलाभाला कारण होते. म्हणून मी बन्धाच्या कारणांचा घात करण्यात प्रयत्न करीन ।। २०८॥ __ या संसारसमुद्रात बाह्य आणि अन्तरंग परिग्रहरूपी सुसरीने पकडलेल्या या जीवाला मोक्ष कसा मिळावा अर्थात् परिग्रहरूपीसुसरीपासून त्याची कशी सुटका व्हावी? त्याने कसे जगावे ? त्याला सुख कशापासून होईल ? व त्याने आपली बुद्धि कशात बरे ठेवावी ॥ २०९ ।। __या जगाची अनित्यता जाणून देखिल किंवा लक्ष्मीच्या कटाक्षरूपी बाणावर झोपलेल्या जीवाच्या ठिकाणी हा भव्य आहे ? किंवा अभव्य आहे अशी विद्वान् लोक शंका घेतात ॥२१०॥ Page #660 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-२१०) महापुराण (६४९ अथं कायमः कान्तावततीततिवेष्टितः । जरित्वा जन्मकान्तारे कालाग्निग्रासमाप्स्यति ॥ २११ यदि धर्मकणादित्थं निदानविषदूषितात् । सुखं धर्मामृताम्भोधिमज्जनेन किमुच्यते ॥ २१२ अबोधद्वेषरागात्मा संसारस्तद्विपर्ययः । मोक्षश्चेद्वीक्षितो विद्भिः कः क्षेपो मोक्षसाधने ॥ २१३ यदि देशादिसाकल्ये न तपस्तत्पुनः कुतः । मध्यर्णवं यतो वेगात्कराग्रच्युतरत्नवत् ॥ २१४ आत्मन् स्वं परमात्मानमात्मन्यात्मानमात्मना । हित्वा दुरात्मतामात्मनीनेऽध्वनि चरन्कुरु ॥२१५ इति सञ्चिन्तयन्गत्वा पुरं परमतत्त्ववित् । सुवर्णवर्मणे राज्यं साभिषेकं वितीर्य सः ॥ २१६ अवतीर्य महीं प्राप्य श्रीपुरं श्रीनिकेतनम् । दीक्षां जैनेश्वरी प्राप श्रीपालगुरुसन्निधौ ॥ २१७ परिग्रहग्रहान्मुक्तो दीक्षित्वा स तपोंशुभिः । हिरण्यवर्मधर्माशुनिर्मलो व्यधुतत्तराम् ॥ २१८ स्त्रीरूपी वेलीने वेष्टित झालेला हा शरीररूपी वृक्ष संसाररूपी अरण्यात जीर्ण होऊन यमरूपी अग्नीचा घास होणार आहे ।। २११ ॥ निदानरूपी विषाने दूषित अशा धर्मकणाने जर याप्रमाणे सुख मिळते तर धर्मामृतसमुद्रात स्नान करण्याने सुख होईलच या विषयी सांगणे नकोच. ( कुबेरमित्रवैश्याने मुनीना जेव्हा दान दिले त्यावेळी या कबूतरांच्या जोडीने त्या दानाला अनुमोदन दिले व या कबूतराच्या जोडीने आकाशातून जात असलेल्या विद्याधराचे विमान पाहिले व आम्हाला विद्याधर कुळात जन्म मिळावा असे निदान केले असा कथासंबंध येथे समजावा.) ॥ २१२॥ ___ अज्ञान, द्वेष, राग इत्यादि दुर्भावांनी हा संसार भरला आहे आणि मोक्ष, केवलज्ञान, निर्मोहना व वीतरागता यानी युक्त आहे. असे विद्वानांनी पाहिले आहे तर त्या मोक्षाची प्राप्ति करून घेण्यामध्ये विद्वानांनी का विलंब करावा ? ॥ २१३ ।। जर द्रव्य, क्षेत्र, काल व भाव ही सामग्री पूर्ण प्राप्त झाली असता तप करावयाचे नाही तर मग ते पुनः केव्हां करणार? जसे समुद्रातून वेगाने जात असता हातातून रत्न गळून पडले असता ते पुनः प्राप्त होणे शक्य नसते. तसे ही देशादिसामग्री मिळाली असताना जर तप केले नाही तर पुनः ही सामग्री मिळणार नाही असा विचार करून तप करावे ॥ २१४ ॥ यासाठी हे आत्म्या, तूं आपली दुष्ट आत्मरूपता सोडून दे आणि आपल्या आत्म्याच्याद्वारे आपल्याच आत्म्यात परमात्मस्वरूपी आपल्या आत्म्याचा स्वीकार कर ॥ २१५ ।। या प्रकारे विचार करणारा तत्त्व जाणणारा तो हिरण्यवर्म आपल्या नगरात आला व त्याने आपल्या सुवर्णवर्म पुत्राला राज्याभिषेक करून राज्य दिले ॥ २१६ ।। यानंतर तो विजयाध पर्वतावरून खाली पृथ्वीवर लक्ष्मीचे जणु घर अशा श्रीपुरनगरात आला. तेथे त्याने श्रीपालगुरूंच्या जवळ जिनेश्वराची दीक्षा घेतली. परिग्रहरूप पिशाचापासून मुक्त होऊन ज्याने दीक्षा धारण केली आहे असा तो हिरण्यवर्मारूपी निर्मलसूर्य तपरूपी किरणानी अतिशय चमकू लागला ॥ २१७-२१८ ।। म. ८५ Page #661 -------------------------------------------------------------------------- ________________ ६५०) महापुराण (४६-२१९ प्रभावती च तन्मात्रा गुणवत्यास्तपोऽगमत् । कुतश्चन्द्रमसं मुक्त्वा चन्द्रिकायाः स्थितिः पथक् ॥ सद्वत्तस्तपसा दीप्रो दिगम्बरविभूषणः । निस्सङ्गो व्योमगाम्येकविहारी विश्ववन्दितः ॥ २२० नित्योदयो बुधाधीशो विश्वदृश्वा विरोचनः । स कदाचित्समागच्छन्मोदयन् पुण्डरी किणीम् ॥२२१ सुप्रभाचन्द्रलेखेव सह तत्र प्रभावती । गुणवत्या समागस्त सङ्गतिः स्याद्यदृच्छया ॥ २२२ गुणवत्यादिका दृष्ट्वा नत्वोक्ताः प्रियदत्तया । कुतोऽसौ गणिनीत्याख्यत्स्वर्गतेति प्रभावती ॥२२३ तच्छरुत्वा नेत्रभता नौ सैवेति शुचमागता। कुतः प्रीतिस्तयेत्युक्ता साब्रवीप्रियदत्तया ॥ २२४ न स्मरिष्यसि कि पारावतद्वन्द्वं भवद्गृहे । तत्राहं रतिषेणेति तच्छ्रुत्वा विस्मितावदत् ॥ २२५ प्रभावतीने ही आपल्या पतीच्या मातेसह-शशिप्रभासासूसह गुणवती आर्यिकेजवळ दीक्षा घेतली. बरोबरच आहे की, चन्द्राला सोडून त्याची चन्द्रिका ज्योत्स्ना-प्रभावती कशी वेगळी राहू शकेल बरे ? ॥ २१९ ।। ते हिरण्यवर्मा मुनिराज सूर्याप्रमाणे दिसत होते. सूर्य सद्वृत्त-पूर्णगोल असतो. हे मुनिराजही सद्वृत्त उत्तम आचारयुक्त होते. तपश्चरणाने दीप्र-उज्ज्वल-तेजस्वी होते. सूर्य आपल्या उष्णतेने तेजस्वी असतो. सूर्य दिशा व आकाशाला भूषणस्वरूप असतो व हे मुनिराज दिशारूपी वस्त्रांच्या भूषणानी युक्त होते. सूर्य आकाशात कोणाशी संबंध ठेवीत नाही हे मुनिवर्यही निःसङ्ग-परिग्रहममत्वरहित होते. सूर्य आकाशातून गमन करणारा व हे मुनिराज व्योमगामी तपोऋद्धीने आकाशातून विहार करणारे व एकविहारी होते. सूर्य विश्वमान्य असतो, हे मुनि विश्ववंदित होते. सूर्य दररोज उदयाला येतो, हे मुनि दररोज आचरणात उदयउत्कर्षयुक्त होते. सूर्य बुध वगैरे ग्रहांचा स्वामी असतो व हे मुनि बुधाधीश- सर्व विद्वानांचे प्रभु होते. सूर्य विश्वदृश्वा सर्व जगातील पदार्थाना प्रकाशित करतो, हे मुनिराज विश्वदृश्वासर्व विश्वाला जाणत होते ॥ २२० । असे हे मुनिराज कोणे एकेवेळी लोकाना आनंदित करीत पुण्डरीकिणी नगरीला आले. चन्द्राची कोर जशी प्रभायुक्त असते तशी प्रभावती आर्यिका देखिल गुणवती आयिकेबरोबर साहजिक रीतीने त्याच नगरीला आली ।। २२१-२२२ ।। गुणवती वगैरे आर्यिकाना पाहून व त्याना वन्दन करून प्रियदत्तेने त्याना विचारले की, ती अमितमति आर्यिका कोठे आहे ? तेव्हा गुणवती आयिकेने सांगितले की, ती स्वर्गवासिनी झाली आहे. हे ऐकून ती प्रभावती आर्यिका म्हणाली की, ती तर आम्हा दोघाना डोळयासारखी होती म्हणून ती शोकयुक्त झाली. तेव्हा प्रियदत्तेने विचारले की, तिच्याशी तुमची प्रीति कशी ? त्यावेळी प्रभावती म्हणाली की, तुमच्या घरी दोन कबूतरांची जोडी होती हे तुम्हाला आठवत नाही काय ? त्यापैकी मी रतिषेणा नामक कबुतरी होते ती आता मी प्रभावती झाल्ये आहे. ते ऐकून ती प्रियदत्ता आश्चर्ययुक्त होऊन असे बोलली ॥ २२३-२२५ ॥ Page #662 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-२३८) महापुराण (६५१ क्वासौ रतिवरोऽद्येति सोऽपि विद्याधराधिपः । हिरण्यवर्मा कर्मारेतिरत्रेति साब्रवीत् ॥ २२६ प्रियदत्तापि तं गत्वा वन्दित्वैत्य महामुनिम् । प्रभावतीपरिप्रश्नात्पत्युरित्याह वृत्तकम् ॥ २२७ विजयाद्धगिरेरस्य गान्धारनगरादिह । विहर्तुं रतिषणोऽमा गान्धार्या प्रिययागमत् ॥ २२८ गान्धारी सर्पदष्टाहमिति तत्र मृषा स्थिता । मन्त्रौषधीः प्रयोज्यास्याः श्रेष्ठी विद्याधरश्च सः ॥२२९ मायया नास्मि शान्तेति तद्वाक्यात्खेदमागते । आहर्तुं स्वपतौ याते वनं शक्तिमदौषधम् ॥ २३० गान्धारी बन्धकीभावमुपेत्य स्मरविक्रियाम् । दर्शवन्ती निरीक्ष्याह वणिग्वर्यो दृढव्रतः ॥ २३१ अहं वर्षधरो वेत्सि न कि मामित्युपायवित् । व्यधाद्विरक्तचित्तां तां तदेव हि धियः फलम् ॥२३२ तदानीमागते पत्यो स्वे स्वास्थ्यमहमागता । पूर्वोषधप्रयोगेणेत्युक्त्वागात्सपतिःपुरम् ॥ २३३ दयितान्तकुबेराख्यो मित्रान्तश्च कुबेरवाक् । परः कुबेरदत्तश्च कुबेरश्चान्त्यदेववाक् ॥ २३४ कुबेरादिप्रियश्चान्यः पञ्चैते सञ्चितश्रुताः । कलाकौशलमापन्नाः सम्पन्ननवयौवनाः ॥ २३५ एतैः स्वसूनुभिः सार्धमारुह्य शिबिकां वनम् । धृत्वा कुबेरश्रीगर्भ मां विहाँ समागताम् ॥ २३६ दृष्ट्वा कदाचिद्गान्धारी पृथक्पृष्टवती पुमान् । त्वच्छ्रेष्ठी नेति तत्सत्यमत नेत्यन्ववादिशम् ॥२३७ तत्सत्यमेव मत्तोऽन्यां प्रत्यसो न पुमानिति । तदाकर्ण्य विरज्यासौ सपतिः संयमं श्रिता ॥ २३८ तो रतिवर आता कोठे आहे असे विचारल्यावर प्रभावती म्हणाली की, तो देखिल विद्याधराचा स्वामी हिरण्यवर्मा झाला आहे व कर्मशत्रूचा नाश करणारा तो येथेच आहे असे प्रभावती बोलली ॥ २२६ ।। तेव्हा प्रियदत्ता देखिल त्याच्याकडे गेली व तिने त्या महामुनीला वन्दन केले व परत आली तेव्हा प्रभावतीच्या प्रश्नामुळे तिने आपल्या पतीचे याप्रमाणे वृत्त सांगितले ॥ २२७ ।। या विजयार्ध पर्वताच्या गांधारनगरातून येथे क्रीडा करण्यासाठी रतिषेण आपल्या प्रिय गांधारीसह आला असे प्रियदत्तेने सांगितले. गांधारी मला सर्प चावला असे खोटे सांगून तेथेच बसली तेव्हा रतिषेण व श्रेष्ठी हे हिच्यावर मन्त्र व औषधीचा प्रयोग करू लागले. परन्तु तिने कपटाने मला कांही शान्तता वाटत नाही असे सांगितले तेव्हा तो रतिषणविद्याधर मनात खिन्न झाला व तो सामर्थ्ययुक्त औषध आणण्यासाठी गेला. यानन्तर ती गांधारी वेश्येप्रमाणे कामविकाराचे प्रदर्शन करू लागली. ते पाहून आपल्या शीलपालनात दृढ असलेला वैश्यश्रेष्ठ कुबेरकान्त योग्य उपाय मनात योजून तिला म्हणाला की, मी वर्षधर आहे अर्थात् नपुंसक आहे हे तू जाणत नाहीस काय ? असे म्हणून त्याने तिला विरक्त बनविले, तिला या दुर्व्यसनापासून विरक्त केले. हेच बुद्धीचे फल होय ॥ २२८-२३२ ॥ त्यावेळी तिचा पति आल्यानंतर आता मी स्वस्थ झाल्ये आहे. पूर्वीच्या औषध प्रयोगाने मला बरे वाटत आहे असे बोलून ती आपल्या पतिसह नगरीत आली ॥ २३३ ।। __प्रियदत्तेला पाच पुत्र होते. त्यांची नांवे क्रमाने अशी- कुबेरदयित, कुबेरमित्र, कुबेरदत्त, कुबेरदेव, कुबेरप्रिय. हे पाच पुत्र सर्व शास्त्रांचे अध्ययन केलेले होते. अनेक प्रकारच्या कलामध्ये ते कुशल होते व त्यांनी नवतारुण्यात प्रवेश केला होता. या आपल्या सर्व Page #663 -------------------------------------------------------------------------- ________________ ६५२) महापुराण (४६-२३९ पुनस्तत्रागता दृष्टा वीक्षेयं केन हेतुना । तवेति सा मया पृष्ठा प्रप्रणम्य प्रियोक्तिभिः ॥ २३९ श्रेष्ठ्येव ते तपोहेतुरिति प्रत्यब्रवीदसौ । निगूढं तद्वचः श्रेष्ठी श्रुत्वागत्य पुरः स्थितः ॥ २४० मामजैषीत्सखासौ मे क्वायेति परिपृष्टवान् । सोऽपि मत्कारणेनैव गृहीत्वेहागतस्तपः ॥ २४१ इति तद्वचनाच्छ्रेष्ठी नपश्चाभ्येत्य तं मुनिम् । वन्दित्वा धर्ममापृच्छय काललब्ध्या महीपतिः॥२४२ गुणपालाय तद्राज्यं दत्वा संयममाददौ । निकटे रतिषणस्य विद्यापरमुनीशिनः ।। २४३ पंचमं स्वपदे सुनुं नियोज्यान्यः सहात्मजः । ययौ श्रेष्ठी च तत्रैव दीक्षां मोक्षाभिलाषुकः ॥ २४४ तथोक्त्वा कान्तवृत्तान्तं सा समुत्पन्नसंविदा । विरज्य गृहसंवासात्कुबेराविधियं सती ॥ २४५ गणपालाय दत्वा स्वां सुतां गुणवतीं श्रिता । प्रभावत्युपदेशेन प्रियवत्ताप्यदीक्षत ॥ २४६ पुत्रासह उत्तम शिबिकेमध्ये बसून मी प्रियदत्ता वनाकडे चालले होते व कुबेरश्रीचा गर्भ माझ्या पोटात होता. अशी मी वनात आल्यानंतर मला गांधारीने पाहिले व तिने मला निराळे नेऊन असे विचारले- तुझा श्रेष्ठी जो तुझा पति आहे तो पुरुष आहे किंवा नाही. कारण मी पुरुष नाही असे तो म्हणाला होता. ते त्याचे म्हणणे खरे की खोटे सांग? तेव्हा मी तिला म्हणाले ते सत्य आहे. माझ्याहून अन्य स्त्रीच्या ठिकाणी तो पुरुष नाही. ते ऐकून ती गांधारी विरक्त झाली व आपल्या पतीसह तिने संयमाचा आश्रय केला ॥ २३४-२३८ ।। पुनः त्या ठिकाणी आलेल्या तिला मी पाहिले. तिला मी नमस्कार केला व मधुर भाषणानी 'तुला ही दीक्षा कोणत्या कारणाने प्राप्त झाली, असे विचारले. तिने मला म्हटले की, तुझा श्रेष्ठीच-पतीच कारण आहे असे ती मला म्हणाली. ते तिचे भाषण गप्तपणाने ऐकन श्रेष्ठी (कबेरकान्त) पढे येऊन उभे राहिले व त्यानी तिला विचारले की, ज्याने मला असा माझा मित्र आज कोठे आहे ? तेव्हा तिने श्रेष्ठीला सांगितले की, माझ्या कारणानेच तुझ्या मित्राने तप धारण केले आहे व तोही येथे आला आहे. हे तिचे वचन ऐकून राजा व श्रेष्ठी त्या मुनीकडे आले व त्या मुनीला त्यानी वन्दन करून धर्माचे स्वरूप विचारले. काललब्धि आल्यामुळे लोकपालराजाने गुणपालाला ते राज्य दिले व विद्याधर मुनीश अशा रतिषणाच्या जवळ त्याने दीक्षा धारण केली ।। २३९-२४३ ।। कुबेरकान्त श्रेष्ठीने आपल्या पाचव्या मुलाला (कुबेरप्रियाला) आपल्या राजश्रेष्ठीपदावर स्थापिले आणि बाकीच्या पुत्रासह तो त्याच गुरुजवळ-रतिषेणाजवळ गेला व मोक्षाभिलाषेने त्यानी दीक्षा घेतली ।। २४४ ।। याप्रमाणे श्रेष्ठिनीने आपल्या पतीची हकीकत सांगितली व तिने ही उत्पन्न झालेल्या आत्मज्ञानाने वैराग्य धारण केले. तिने आपली मुलगी कुबेरश्री ही गुणपालाला दिली. त्याच्याशी तिचा विवाह केला. घरात राहण्यापासून तिला विरक्तता उत्पन्न झाली. प्रभावतीच्या उपदेशाने गुणवतीआयिकेचा तिने आश्रय घेतला व तिच्याजवळ तिने (प्रियदत्तेने ) दीक्षा घेतली ॥ २४५-२४६ ॥ Page #664 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-२५९) महापुराण (६५३ मुनि हिरण्यवर्माणं कदाचित्प्रेतभूतले। दिनानि सप्त सङ्गीर्य प्रतिमायोगधारिणम् ॥ २४७ वन्दित्वा नागराः सर्वे तत्पूर्वभवसङ्कथाम् । कुर्वाणाः पुरमागच्छन्विद्युच्चोरोऽप्युदीरितात् ॥ २४८ चेटक्याः प्रियवत्तायास्तन्मुनेः प्राक्तनं भवम् । विदित्वा तद्गतक्रोधात्तदोत्पन्न विभङ्गकः ॥ २४९ मुनि पृथकप्रदेशस्थं प्रतिमायोगमास्थितम् । प्रभावती च संयोज्य चितिकायां दुराशयः ॥ २५० एकस्यामेव निक्षिप्याषाक्षीवघजिघृक्षया । सोढ्वा तदुपसर्ग तौ विशुद्धपरिणामतः ॥ २५१ स्वर्ग समुदपद्येतां क्षमया कि न जायते । सुवर्णवर्मा तज्ज्ञात्वा विद्युच्चोरस्य विग्रहम् ॥ २५२ करिष्यामीति कोपेन पापिनः सङ्गरं व्यधात् । विदित्वावविबोधेन तत्तौ स्वर्गनिवासिनी ॥ २५३ प्राप्य संयमिरूपेण सुतं धर्मकथादिभिः । तत्त्वं श्रद्धाप्य तं कोपादपास्य कृपया हि तौ ॥ २५४ दिव्यं रूपं समादाय निगद्य निजवृत्तकम् । प्रदायाभरणं तस्मै पराध्यं स्वपदं गतौ ॥ २५५ कदाचिद्वत्सविषये सुसीमानगरे मुनेः । शिवघोषस्य कैवल्यमुदपाद्यस्तघातिनः ॥ २५६ शक्रप्रिये शची मेनका च नत्वा जिनेश्वरम् । समाश्रित्य सुराधीशं स्थिते प्रश्नात्सुरेशितुः ॥ २५७ अत्रैव सप्तमेऽह्नि प्राक्समात्तश्रावकवते । नाम्ना पुष्पवती सान्या प्रथमा पुष्पपालिता ॥ २५८ कुसुमावचयासक्ते वने साग्निहेतुना। मृते देव्यावजायेतामित्याहासौ स्म तीर्थकृत् ॥ २५९ ___ कोणे एके वेळी हिरण्यवर्म मुनींनी सात दिवसाची प्रतिज्ञा करून प्रतिमायोग धारण केला. त्याना वन्दन करून सर्व नागरिक लोक त्यांच्या पूर्वभवाची कथा बोलत नगरात आले. त्यावेळी प्रियदत्तेच्या दासीच्या भाषणावरून विद्युच्चोरालाही त्या मुनीच्या पूर्वभवाचे वृत्त समजले. त्यामुळे त्या मुनीविषयी क्रोध उत्पन्न होऊन त्याला विभङ्ग अवधिज्ञान-मिथ्या अवधिज्ञान उत्पन्न झाले. अगदी वेगळ्या जागी प्रतिमायोग धारण केलेल्या मुनीला व प्रभावती आर्यिकेला दुष्ट अभिप्राय ज्याचा आहे अशा त्या चोराने एकाच चितेवर एकत्र संयुक्त करून पापकर्माचा संचय करून घेण्यासाठी जाळले. पण त्या मुनि आर्यिकानी विशुद्ध परिणामानी तो उपसर्ग सहन केला व ते स्वर्गात उत्पन्न झाले. बरोबर आहे की क्षमेने काय बरे प्राप्त होत नाही. सुवर्णवर्माला हे सर्व समजले. पापी विधुच्चोराला मी शिक्षा करीन अशी त्याने प्रतिज्ञा केली. ही गोष्ट अवधिज्ञानाने त्या स्वर्गवासी देवाना समजली व ते मुनि व आयिकेच्या रूपाने आले. दयायक्त अशा त्यानी धर्मकथा आदिकांच्या द्वारे त्याच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न केली. त्याचा कोप त्यानी दूर केला. यानन्तर त्यानी दिव्यरूप धारण करून व आपले सर्व वृत्त त्यानी सांगितले व सुवर्णवर्माला उत्कृष्ट अमूल्य अलंकर देऊन ते आपल्या स्थानी गेले ॥२४७-२५५।। कोणे एकेवेळी वत्सदेशात सुसीमानामक नगरात ज्यानी ज्ञानावरण, दर्शनावरण, मोह व अन्तराय या चार घातिकर्मांचा नाश केला आहे अशा शिवघोष मुनींना केवलज्ञान उत्पन्न झाले ॥ २५६ ॥ त्यावेळी इन्द्राला आवडणान्या शची व मेनकानामक दोन देवी जिनेश्वर शिवघोषांना वन्दन करून इन्द्राजवळ जाऊन उभ्या राहिल्या. तेव्हा इन्द्राने प्रभूना प्रश्न विचारला व प्रभूनी असे सांगितले- येथेच सातव्या दिवसापूर्वी पुष्पपालिता आणि दुसरी पुष्पवती या दोघीनी श्रावकाची व्रते घेतली होती व वनात त्या पुष्पे गोळा करण्याच्या कार्यात एकाग्रचित्त झाल्या होत्या. त्यावेळी त्या साप आणि अग्नि या कारणानी मरण पावल्या व त्या दोघी देवी झाल्या आहेत असे शिवघोष तीर्थंकरानी सांगितले ॥ २५७-२५९ ॥ Page #665 -------------------------------------------------------------------------- ________________ ६५४) महापुराण (४६-२६० प्रभावतीचरी देवी श्रुत्वा देवश्च तत्पतिः । स्वपूर्वभवसम्बन्धं तत्रागातां सभावनेः ॥ २६० निजान्यजन्मसौख्यानुभूतदेशानिजेच्छया। आलोकयन्तौ तत्सर्पसरोवणसमीपगौ ॥ २६१ सहसार्थेन भीमाख्यं साधुं दृष्ट्वा समागतम् । विनयेनाभिवन्धनं धर्म तौ समपृच्छताम् ॥ २६२ मुनिस्तद्वचनं श्रुत्वा नाहं धर्मोपदेशने । सर्वागमार्थविकार्येऽसमर्थो नवसंयतः ॥ २६३ प्ररूपयिष्यते किञ्चित्स युष्मदनुरोधतः । मया तथापि श्रोतव्यं यथाशक्त्यवधानवत् ॥२ ६४ इति सम्यक्त्वसत्पात्रदानादिश्रावकाश्रयम् । यमादियतिसम्बन्धं मागं गतिचतुष्टयम् ॥ २६५ तद्धेतुफलपर्यन्तं भुक्तिमुक्तिनिबन्धनम् । जीवादिद्रव्यतत्त्वं च यथावत्प्रत्यपादयत् ॥ २६६ ततश्रुत्वा पुनरप्याभ्यां भवता केन हेतुना । प्रव्रज्येत्यनयुक्तोऽसौ वक्तुं प्रकान्तवान्मुनिः ॥ २६७ विदेहे पुष्कलावत्यां नगरी पुण्डरीकिणी । तत्राहं भीमनामासं स्वपापाद्दुर्गते कुले ॥ २६८ अन्येार्यतिमासाद्य किञ्चित्कालादिलब्धितः । श्रुत्वा धर्म ततो लेभे गृहिमूलगुणाष्टकम् ।। २६९ त्याच वेळी पूर्वी प्रभावती असलेली देवी आणि तिचा पति असलेला देव यानीही त्या जिनेश्वरापासून स्वतःच्या पूर्वभवाचा सम्बन्ध ऐकला व नंतर ते दोघे समवसरणातून त्या ठिकाणी आले जेथे त्यांनी आपल्या अन्य जन्मात-पूर्वजन्मात सौख्याचा अनुभव घेतला होता. अर्थात् सर्पसरोवराच्या जवळ वनात ते दोघे आले. तेथे व्यापारी लोकांच्या समूहाबरोबर आलेल्या भीम नामक साधूला त्यानी पाहिले व विनयाने त्या दोघानी त्याना वन्दन केले आणि धर्माचे स्वरूप त्यानी त्याला विचारले. मुनीनी त्यांचे वचन ऐकले व ते म्हणाले सर्वागमातील जीवादिपदार्थाच्या स्वरूपाचा मी जाणता नाही. म्हणून धर्मोपदेश करण्याच्या कार्यात मी असमर्थ आहे व नवीन यति झालो आहे. पण तुम्ही मला आग्रह केला आहे यास्तव मी माझ्या शक्तीला अनुसरून सांगतो. तुम्ही लक्ष देऊन ऐकावे. असे म्हणून सम्यक्त्व, सत्पात्रदान, आदिक श्रावकसंबंधी धर्म आणि आजन्म पाळण्याचे महाव्रतादि मुनिसम्बंधी मार्ग, मनुष्यादिक चार गति, त्यांची कारणे व त्यांची फले यांचे त्यांनी यथार्थ वर्णन केले. स्वर्गादि सुखभोग व मुक्तीची कारणे यांचे त्यानी वर्णन केले व जीवादिद्रव्यांचे जसे स्वरूप आहे तसे त्यानी सांगितले ॥ २६०-२६६ ॥ तो त्या मुनीचा उपदेश ऐकल्यानन्तर पुनः आम्ही दोघानी आपण कोणत्या कारणाने दीक्षा घेतली असा प्रश्न त्याना केला तेव्हा ते मुनि याप्रमाणे सांगू लागले ॥ २६७ ।। विदेहक्षेत्रातील पुण्डरीकिणी नगरीत माझ्या पूर्व पापामुळे दरिद्री कुलात जन्म झाला. माझे भीम असे नांव आहे ।। २६८ ।।। एके दिवशी माझ्या काही काललब्धीमुळे मी यति जैनसाधूकडे गेलो. त्यांचा धर्मोपदेश ऐकला व त्यांच्यापासून गृहस्थाच्या आठ मूलगुणांचा स्वीकार केला ॥ २६९ ॥ Page #666 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-२७७) महापुराण (६५५ तज्ज्ञात्वा मत्पिता पुत्र किमेभिर्दुष्करर्वथा । दारिन्यकर्दमालिप्तदेहानां निष्फलैरिह ॥ २७० वतान्येतानि दास्यामस्तस्मै स्वर्लोककाङक्षिणे । ऐहिकं फलमिच्छामो भवेद्येनेह जीविका ॥ २७१ व्रतं दत्तवतः स्थानं तस्य मे दर्शयेत्यसो । मामवादीद्गृहीत्वैनमाव्रजन्नहमन्तरे ॥ २७२ वज्रकेतोर्महावीथ्यां देवतागृहकुक्कुटम् । भास्वकिरणसंशोष्यमाणधान्योपयोगिनम् ॥ २७३ पुंसो हतवतो दण्डं जिनदेवापितं धनम् । लोभादपन्हुवानस्य धनदेवस्य दुर्मतेः॥ २७४ रसनोत्पाटनं हारमनमर्घणिनिर्मितम् । श्रेष्ठिनः प्राप्य चौर्येण गणिकार्य समर्पणात् ॥ २७५ रतिपिङ्गलसञ्जस्य शूले तलवरार्पणात् । निशि मातुः कनीयस्याः कामनिर्लुप्तसंविदः ॥ २७६ पुत्र्या गेहं गतस्याङ्गच्छेदनं पुररक्षिणः । क्षेत्रलोभानिजे ज्येष्ठे मृते दण्डहते सति ॥ २७७ माझ्या पित्याला मी आठ मूलगुण धारण केले आहेत हे समजले तेव्हा मला ते म्हणाले हे पुत्रा, ही व्रते पाळणे मोठे कठिण आहे व ही व्रते व्यर्थ आहेत. दारिद्र्याच्या चिखलाने आपला देह भरला आहे व ही व्रतें निष्फळ आहेत. या लोकी यांचे फल मिळत नाही ॥२७०।। ही व्रते स्वर्गलोकाची ज्याला इच्छा आहे त्याला आपण ही व्रतें देऊ या व ज्याने इहलोकी आमची उपजीविका चालेल असे ऐहिक फल आपणास पाहिजे आहे ते आपण घेऊ या ॥ २७१ ॥ ___ ज्याने हे व्रत तुला दिले आहे त्याचे ठिकाण मला दाखव असे माझे वडील मला म्हणाले व तेव्हा मी वडिलाना घेऊन मुनीकडे जाण्यास निघालो असता वाटेत पुढे वर्णिल्याप्रमाणे गोष्टी घडल्या त्या अशा- ॥ २७२ ॥ __ मोठ्या मार्गात मी असे पाहिले- सूर्याच्या किरणानी वाळणारे धान्य एका देवळातील एक कोंबडा येऊन खात होता. वज्रकेतुनामक मनुष्याने त्याला ठार मारले. तेव्हा त्याला लोक दण्ड करीत आहेत असे वडिलानी मला सांगितले ॥ २७३ ॥ श्रीजिनदेवाने अर्पण केलेले धन लोभाने छपविणारा व ज्याची बुद्धि दुष्ट झाली आहे अशा धनदेवाची जीभ उपडली जात आहे असे दृश्य पिता-पुत्रानी पाहिले ॥ २७४ ।। पुढे जात असता, आणखी एक दृश्य त्यानी पाहिले- एका श्रेष्ठीचा अमूल्यरत्नानी बनविलेला हार चोरीने मिळवून तो रतिपिङ्गलनामक मनुष्याने एका वेश्येला दिला त्यामुळे त्याला पकडून तलवर- कोतवालाने त्याला सुळावर चढविले होते हे दृश्य त्यानी पाहिले ॥ २७५ ॥ यानंतर पुढे जात असता ज्याची कामवेदनेने विवेक बुद्धि नष्ट झाली आहे व त्यामुळे आपल्या धाकट्या सावत्र मातेच्या मुलीच्या घरी जो गेला होता अशा फौजदाराचे अंग तोडणे हे दृश्य दिसले ।। २७६ ॥ शेताच्या लोभाने आपल्या वडील भावाला काठीने ठोकून ज्याने मारले आहे व लोल (लोभी) ज्याचे सार्थक नांव आहे अशा मनुष्याला देशातून हाकालून देत असता जो शोक चालला होता हे दृष्य त्या पिता-पुत्रानी पाहिले ।। २७७ ।। Page #667 -------------------------------------------------------------------------- ________________ ६५६) महापुराण लोलस्यान्वर्थसञ्ज्ञस्य विलापं देशनिर्गमे । द्यूते सागरदत्तेन प्रभूते निर्जिते धने ॥ २७८ दातुं समुद्रदत्तस्य निःशक्तेरातपे क्रुधा । परिवद्धित दुर्गन्ध घूमान्तर्वर्तिन श्श्चिरम् ॥ २७९ निरोधमभयोद्धोषणायामानन्ददेशनात् । अङ्गकस्य नृपोरभ्रघातिनः करखण्डनम् ॥ २८० आनन्दराजपुत्रस्य तद्भुक्त्यावस्कराशनम् । मद्यविक्रयणे बालं कञ्चिदाभरेणच्छया ।। २८१ हत्वा भूमौ विनिक्षिप्तवत्यास्तत्संविधानकम् । प्रकाशितवति स्वात्मजे शुण्डायाश्च निग्रहम् ॥२८२ पापान्येतानि कर्माणि पश्यहिंसादिदोषतः । अत्रामुत्र च पापस्य परिपाकं दुरुत्तरम् ॥ २८३ अवधार्यानभिप्रेतव्रतत्यागोद्भवाद्भयात् । रोषमोषमृषायोषा हिंसाश्लेषादिदूषिताः ॥ २८४ नात्रैव किन्त्वमुत्रापि ततश्चित्रवधोचिताः । अस्माकमपि दौर्गत्यं प्राक्तनात्पापकर्मणः ॥ २८५ इदं तस्मात्समुच्चेयं पुण्यं सच्चेष्ठितैः पुरु । इति तं मोचयित्वाग्रहीषं दीक्षां मुमुक्षया ॥ २८६ सद्यो गुरुप्रसादेन सर्वशास्त्राब्धिपारगः । विशुद्धमतिरन्येद्युः समीपे सर्ववेदिनः || २८७ मदुष्टपूर्वजन्मानि समश्रौषं यथाश्रुतम् । कथायिष्याम्यहं तानि कर्तुं वा कौतुकं महत् ॥ २८८ (४६-२७८ यानन्तर पुढे जात असता जे दृश्य दिसले ते हे- जुगारात सागरदत्ताने पुष्कळसे धन जिंकले व ते देण्यास असमर्थं झालेल्या समुद्रदत्ताला उन्हात पुष्कळ दुर्गन्ध घूर जेथे वाढलेला आहे अशा ठिकाणी दीर्घकालपर्यन्त कोंडून ठेवणे व आनंद राजाने अभयाची घोषणा केली असताही त्याला न सोडणे हे पाहिले ।। २७८-२७९ ।। यानन्तर अङ्गकनक मनुष्याने राजाचा मेंढा मारला म्हणून त्याचा हात तोडला व आनन्दराजाच्या पुत्राने तो मेंढा खाल्ला म्हणून त्याला विष्ठा खावयास लावणे ।। २८० ।। मद्य विकत घेण्याकरिता दागिन्याच्या इच्छेने कोण्या एका मुलाला मारून जमिनीमध्ये तिने पुरून टाकले व ते तिचे कृत्य तिच्या मुलाने जेव्हा प्रकट केले तेव्हा त्या मद्य पिणा-या स्त्रीला पकडले व तिला शिक्षा केली हे दृश्य पिता-पुत्रानी पाहिले ॥ २८१-२८२ ।। हिंसादि दोषामुळे ही कार्ये पापरूप आहेत आणि इह परलोकी पापाचा उदय अतिशय दुःखदायक असतो. संसारापासून उत्पन्न होणाऱ्या भयामुळे मी व्रताचा त्याग इच्छिला नाही. क्रोध, चोरी, खोटे भाषण, परस्त्रीसेवन व हिंसा यांच्या आलिंगनानी लोक दूषित झाले आहेत. अशाना अवयव तोडणे, बंधन इत्यादिक दुःखे येथेच भोगावी लागतात असे नाही तर परलोकी नरकादिगतीमध्येही नाना प्रकारच्या वधादिक दुःखाना ते योग्य होतात असा मी निश्चय केला आणि आम्हाला देखील पूर्वजन्माच्या पाप कर्मामुळे दारिद्र्य प्राप्त झाले आहे म्हणून चांगल्या शुभाचरणानी मोठे पुण्य सम्पादन केले पाहिजे असा विचार करून मी पित्यापासून माझी सोडवणूक करून घेतली आणि मोक्षाच्या इच्छेने मी जिनदीक्षा घेतली ।। २८३-२८६ ॥ तत्काल गुरूची कृपा झाल्यामुळे मी संपूर्ण शास्त्ररूपी समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याला पोहोचलो आहे आणि माझी बुद्धि निर्मळ झाली आहे. यानंतर एके दिवशी सर्वज्ञ केवलीच्या जवळ गेलो व त्यांच्यापासून मी दुष्ट अशा माझ्या पूर्वजन्माचे वर्णन ऐकले. मी ते माझ्या जन्माचे वर्णन जसे ऐकले तसे आपल्याला कौतुक वाटावे म्हणून सांगणार आहे ।। २८७ - २८८ ॥ Page #668 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-२९८) महापुराण (६५७ इहैव पुष्कलावत्यां विषये पुण्डरीकिणीम् । परिपालयति प्रोत्या वसुपालमहीभजि ॥ २८९ विद्युद्वेगाह्वयं चौरमवष्टभ्य करस्थितम् । धनं स्वीकृत्य शेषं च भवता दीयतामिति ॥ २९० आरक्षिणो निगलीयर्दत्तं विमतये धनम् । इत्यब्रवीत्स सोऽप्याह गहीतं न मयेति तत् ॥२९१ विमतेरेव तद्गेहे दृष्ट्वोपायेन केनचित् । दण्डकारणिकैः प्रोक्तं कांस्यपात्रीत्रयोन्मितम् ॥ २९२ शकृतो भक्षणं मल्लैस्त्रिशन्मष्टयभिताडनम् । सर्वस्वहरणं चैतत्रयं जीवितवाञ्छया ॥ २९३ स सर्वमनुभूयायात् प्राणान्ते नारकी गतिम् । विद्युच्चोरस्त्वया हन्यतामित्यारक्षको नृपात् ॥ २९४ लब्धादेशोऽप्यहं हन्मि नैनं हिंसादिवर्जनम् । प्रतिज्ञातं मया साधोरित्याज्ञां नाकरोदसौ ॥ २९५ गृहीतोत्कोच इत्येष चोरारक्षकयोर्नृपः । शृङ्खलाबन्धनं रुष्ट्वा कारयामास निघृणम् ॥ २९६ त्वयाहं हेतुना केन हतो नेत्यनुयुक्तवान् । प्रतुष्यारक्षकं चौरः सोऽप्येवं प्रत्यपादयत् ॥ २९७ एतत्पुरममष्यैव राज्ञः पितरि रक्षति । गुणपाले महाश्रेष्ठी कुबेरप्रियसंज्ञया ॥ २९८ ___ या विदेहक्षेत्रातील पुष्कलावतीदेशात पुण्डरीकिणी नगराचे वसुपालराजा प्रेमाने पालन करीत असता शिपायानी विद्युद्वेग नांवाच्या चोराला पकडले व त्याच्या हातातले धन त्यानी काढून घेतले व बाकीचे धन तू दे असे त्याला ते म्हणाले ।। २८९-२९० ॥ तेव्हा विद्यद्वेगाने सांगितले की, मी ते धन विमतिनामक मनुष्याला दिले आहे. पण विमति म्हणाला की, मी ते धन घेतले नाही ॥ २९१ ॥ परंतु काही उपाय शिपायानी केले तेव्हा ते धन त्याच्या घरात आढळून आले. त्यावेळी दण्ड करणाऱ्या न्यायाधीशानी त्या विमतीला म्हटले की, तुला जर जगण्याची इच्छा असेल तर काशाच्या तीन बुट्ट्या भरून विष्ठा खावी, पहिलवानाच्या तीस बुक्क्या खाव्यात व सर्व द्रव्य द्यावे, त्या तीनही दंडाना अनुभवून तो मरण पावला व नरकगतीत जन्मला ।। २९२-२९३ ॥ _ विद्युच्चोराला तू मारून टाक अशी राजाने आरक्षकाला-तळवराला आज्ञा केली तरीही राजाकडून ज्याला आज्ञा झाली आहे असाही मी या चोराला मारणार नाही कारण मी एका साधूपासून हिंसादिक कार्य करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आहे. त्या प्रतिज्ञेचे रक्षण करण्यासाठी त्याने चोराला मारले नाही ॥ २९४-२९५ ॥ याने लाच घेतली आहे असे राजाने मानले व त्याने त्या चोराला आणि त्या तळवराला रागावून निर्दयपणाने बेड्यांनी बांधून टाकले. त्यावेळी चोराने तळवरावर सन्तुष्ट होऊन विचारले की, कोणत्या कारणाने तू मला मारले नाहीस ते सांग, असे म्हटल्यावर तो तळवर याप्रमाणे सांगू लागला ॥ २९६-२९७ ॥ ___ याच राजाचे पिता ज्यांचे नाव गुणपाल होते ते या नगराचे रक्षण करीत होते. त्यावेळी कुबेरप्रिय नामक एक श्रेष्ठी होते ॥ २९८ ।। म.८६ Page #669 -------------------------------------------------------------------------- ________________ ६५८) महापुराण (४६-२९९ अत्रैव नाटकाचार्यतनुजा नाटयमालिका । आस्थिायिकायां भावेन स्थायिना नत्यबुद्रसम् ॥ २९९ तदालोक्य महीपालो बहुविस्मयमागमत् । गणिकोत्पलमालाख्यत् किमत्राश्चर्यमीश्वर ॥ ३०० श्रेष्ठिनश्च मिथोऽन्येयुः प्रतिमायोगधारिणः । सोपवासस्य पूज्यस्य गत्वा चालयितुं मनः ॥ ३०१ नाशकं तदिहाश्चर्यमित्याख्यद्भभुजापि सा । गुणप्रिये वृणीष्वेति प्रोक्ता शोलाभिरक्षणम् ॥३०२ अभीष्टं मम देहीति तद्दत्तं व्रतमग्रहीत् । अन्यदा तद्गृहं सर्वरक्षिताख्यः समागमत् ॥ ३०३ रात्रौ तलवरो दृष्ट्वा तं बाह्याद्येति तेन तत् । प्रतिपादनवेलायामेवायान्मन्त्रिणः सुतः॥ ३०४ नपतेमैथुनो नाम्ना पथधीस्तं निरीक्ष्य सा । मञ्जूषायां विनिक्षिप्य गणिका सर्वरक्षितम् ॥ ३०५ त्वया मदीयाभरणं सत्यवत्यै समर्पितम् । त्वद्धगिन्य तदानेयमित्याह नपमैथुनम् ॥ ३०६ सोऽपि प्राक् प्रतिपाद्येतद्वतग्रहणसंश्रुतेः । प्रातिकूल्यमनागीया॑वान् द्वितीयदिने पुनः ॥ ३०७ साक्षिणं परिकल्प्यनं मञ्जूषास्थं महीपतेः । सन्निधौ याचितो वित्तमसावुत्पलमालया ॥ ३०८ न गृहीतं मयेत्यस्मिन्मिथ्यावादिनि भूभुजा । पृष्टा सत्यवती तस्य पुरस्तान्यक्षिपद्धनम् ॥ ३०९ मैथुनाय नृपःक्रुद्ध्वा खलोऽयं हन्यतामिति । आज्ञापयत्पदातीन्स्वान्युक्तं तन्न्यायवर्तिनः ॥ ३१० याच नगरात एका नाटकाचार्याची-नृत्य शिकविणाऱ्याची नाटयमालिका नांवाची मुलगी राजसभेत रतिआदिक स्थायीभावानी युक्त व पाहणान्यांच्या मनात रस उत्पन्न होईल असे नृत्य करू लागली ॥ २९९ ॥ ते नृत्य पाहून राजा फार आश्चर्यचकित झाला. पण उत्पलमाला म्हणाली की हे प्रभो, याच्यात काही आश्चर्य नाही ॥ ३०० ।। एके वेळी एकान्ती प्रतिमायोग धारण करणाऱ्या, उपवास ज्याने स्वीकारलेला आहे, अशा पूज्य श्रेष्ठीचे मन चंचल करण्यासाठी मी गेल्ये होत्ये, पण मी त्याचे मन चंचल करण्यास समर्थ झाले नाही हे मात्र आश्चर्यकारक आहे असे गणिकेने सांगितले ते ऐकून राजा तिला म्हणाला- गुण जिला आवडतात अशी तूं काय वर मागतेस तो माग मी तुला देईन. तेव्हा ती म्हणाली शीलाचे रक्षण करणे हे मला आवडते ते मला द्या. तेव्हा राजाने ते तिला दिले. एके वेळी सर्वरक्षित नांवाचा कोतवाल तिच्या घरी रात्री आला तेव्हा ती त्याला म्हणाली ॥३०१-३०३।। आज मी बाहेर बसल्ये आहे, ऋतुमती झाल्ये आहे असे ती सांगत असताच मन्त्रि पुत्रही तेथे आला. तो राजाचा मेहुणा होता. त्याचे पृथुश्री असे नांव होते. तो आला त्यावेळी त्या गणिकेने सर्व रक्षिताला एका पेटीमध्ये झाकून ठेविले. त्या पृथुश्रीला पाहून ती गणिका म्हणाली, हे पृथुश्री तूं माझा दागिना तुझ्या सत्यवती नामक बहिणीला दिला आहे तो मला परत आणून दे असे त्या राजाच्या मेहुण्याला म्हणाली. त्या पृथुश्रीने प्रथम तिचे म्हणणे मान्य केले पण तिने शीलवत ग्रहण केले आहे हे ऐकल्यामुळे मनात तिच्याविषयी इर्ष्यालु झाला व प्रतिकूल झाला ।। ३०४-३०७ ॥ तेव्हा सर्वरक्षिताला तिने साक्षीदार केले व दुसरे दिवशी राजाकडे जाऊन पृथुश्रीला ती आपले धन मागू लागली. तेव्हा मी हिचे धन घेतले नाही असे त्याने खोटे सांगितले. तेव्हा Page #670 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-३१८) पठन्मुनीन्द्र सद्धर्मशास्त्र संश्रवणाद्भुतम् । अन्येद्युः प्राक्तनं जन्म विदित्वा शममागते ।। ३११ यागहस्तिनि मांसस्य पिण्डादानमनिच्छति । तद्वीक्ष्योपायविच्छ्र ेष्ठी विबुद्ध्यानेकपेङगितम् ॥ ३१२ सपर्गुडपयो मिश्रशाल्योदनसमर्पितम् । पिण्डं प्रायोजयत्सोऽपि द्विरदस्तमुपाहरत् ॥ ३१३ तवा तुष्ट्वा महीनाथो वृणुष्वेष्टं तवेति तम् । प्राह पश्चाद्गृहीष्यामीत्यभ्युपेत्य स्थितः स नतम् ॥ ३१४ सचिवस्य सुतं दृष्ट्वा नीयमानं शुचा नृपात् । वरमादाय तद्घातात् दुर्वृत्तं तं व्यमोचयत् ।। ३१५ श्रेष्ठिनैव निकारोऽयं ममाकारीत्यमंस्त सः । पापिनामुपकारोऽपि स भुजङ्गपयायते ॥ ३१६ अन्येद्युर्मैथुनो राज्ञः स्वेच्छया विहरन्वने । खेचरान्मुद्रिका मापत्कामरूपविधायिनीम् ॥ ३१७ कराङगुलौ विनिक्षिप्य तां वसोः स्वकनीयसः । सङ्कल्प्य श्रेष्ठिनो रूपं सत्यवत्या निकेतनम् ॥ ३१८ महापुराण राजाने सत्यवतीला याविषयी विचारले असता तिने ते धन राजापुढे आणून ठेविले. तेव्हा राजा त्या पृथुश्री मेहुण्यावर रागावला. या दुष्टाला मारून टाका असे त्याने आपल्या पायदळाला सांगितले. तेव्हा न्यायाने वागणाऱ्या राजाचे हे कृत्य योग्यच होय ।। ३०८-३१० ॥ (६५९ एके वेळी एक मुनीश्वर सद्धर्मशास्त्राचे पठन करीत असता राजाच्या मुख्य हत्तीच्या कानी त्या शास्त्राचे पठन पडले त्यामुळे शीघ्र त्याला पूर्वजन्माचे स्वरूप समजले, आपण मागील जन्मी कोण होतो याचे स्मरण त्याला झाले व तो शान्त वृत्तीचा बनला व मांसाच्या पिण्डाचा आहार करू नये असे त्याला वाटू लागले. हे पाहून उपाय जाणणान्या त्या श्रेष्ठीने हत्तीच्या मनातील अभिप्राय ओळखला आणि तूप, गूळ, दूध यांनी मिश्र असे तांदळाच्या भाताचे गोळे त्याला खावयास दिले. हा आहार त्याला दररोज देण्यात येऊ लागला व तो हत्ती तोच आहार घेऊ लागला. त्यामुळे राजा श्रेष्ठीवर प्रसन्न झाला व जे तुला आवडते ते माग असे श्रेष्ठीला म्हणाला. तेव्हा पुढे मागेन असे श्रेष्ठीने राजाला म्हटले व तो श्रेष्ठी स्वस्थ बसला ।। ३११-३१४ ॥ याचवेळी त्या पृथुश्री नांवाच्या प्रधानपुत्राला मारण्यासाठी नेत असता पाहून श्रेष्ठीला खेद वाटला आणि त्याने राजापासून पूर्वीचा वर मागून घेतला व त्या दुराचारी प्रधान पुत्राचा वधापासून बचाव केला ।। ३१५ ।। माझा तिरस्कार या श्रेष्ठीनेच केला असे मंत्रिपुत्राने मानले. बरोबरच आहे की पाप्यावर दुष्टावर उपकार केला तरीही तो सर्पाला पाजलेल्या दुधासारखा होतो ।। ३१६ ॥ एके दिवशी मंत्रिपुत्र वनात विहार करीत असता त्याला एका विद्याधरापासून इच्छितरूप बनविणारी आंगठी प्राप्त झाली ।। ३१७ ।। त्या मंत्रिपुत्राने आपल्या धाकट्या वसु नांवाच्या भावाच्या बोटात अंगठी घातली आणि श्रेष्ठीच्या रूपाचा संकल्प करून त्याला त्याने सत्यवतीच्या घरी पाठविले व तो पापी मंत्रिपुत्र व स्वतः राजाकडे जाऊन बसला. ज्याने श्रेष्ठीचे रूप धारण केले आहे अशा वसूला राजाने श्रेष्ठी मानले व त्याला पाहून हा श्रेष्ठी अवेळी का आला असे राजा बोलला. तेव्हा हा श्रेष्ठी अविचारी आहे व पापी आहे व हा सत्यवतीकडे आला आहे. हा मदनाग्नीने सन्तप्त Page #671 -------------------------------------------------------------------------- ________________ ६६०) महापुराण (४६-३१९ प्रवेश्य पापधी राजसमीपं स्वयमास्थितः । वसुं गृहीतष्ठिस्वरूपं वीक्ष्य महीपतिः॥३१९ श्रेष्ठी किमर्थमायातोऽकाल इत्यवदत्तदा । अनात्मज्ञोऽयमायातःपापी सत्यवतीं प्रति ॥ ३२० मदनानलसंतप्त इति मैथुनिकोऽब्रवीत् । तद्वाक्यादपरीक्ष्येव तमेवाह प्रहन्यताम् ॥ ३२१ श्रेष्ठी त्वयति श्रेष्ठी च तस्मिन्नेव दिने निशि । स्वगृहे प्रतिमायोगधारको भावयन् स्थितः ॥ ३२२ पृथुधीस्तमवष्टभ्य गृहीत्वा घोषयन् जने । अपराधमसन्तं च नीत्वा प्रेतमहीतलम् ॥ ३२३ आरक्षककरे हन्तुमर्पयामास पापभाक् । सोऽपि राजनिदेशोऽयमित्यहन्नसिना दृढम् ॥ ३२४ तस्य वक्षःस्थले तत्र प्रहारो मणिहारताम् । प्राप शीलवतो भक्तस्याहत्परमदैवते ॥ ३२५ दण्डनादपरीक्ष्यास्य महोत्पातः पुरेऽजनि । क्षयःस येन सर्वेषां किं नादुष्टवधाद्भवेत् ॥ ३२६ नरेशो नागराश्चतदालोच्य भयविह्वलाः । तमेव शरणं गन्तुं श्मशानाभिमुखं ययुः ॥ ३२७ तदोपसर्गनिर्णाशे विस्मयानाकवासिनः । शीलप्रभावं व्यावर्ण्य वणिग्वर्यमपूजयन् ॥ ३२८ अपरीक्षितकार्याणामस्माकं क्षन्तुमर्हसि । इति तेषु भयत्रस्तमानसेष नृपादिषु ॥ ३२९ अस्मदजितदुष्कर्मपरिपाकादभूदिदम् । विषादस्तत्र कर्तव्यो न भवद्भिरिति ध्रुवम् ॥ ३३० वैमनस्यं निरस्यैषां श्रेष्ठी प्रष्ठः क्षमावताम् । सर्वैः पुरस्कृतः पूज्यो विभूत्या प्राविशत्पुरीम् ॥३३१ झाला आहे असे मंत्रिपुत्र पृथुश्रीने राजाला सांगितले. त्याच्या त्या भाषणाचा विचार न करताच राजाने याला तूच मारून टाक असे पृथुश्रीला सांगितले. पण श्रेष्ठी त्या दिवशी रात्री आपल्या घरी प्रतिमायोग धारण करून आत्मचिन्तनात स्थिर झाला होता. राजाची आज्ञा मिळाल्यावर त्या पृथुश्रीने त्याला चांगले बांधले व लोकामध्ये त्याच्या नसलेल्या अपराधाची त्याने घोषणा केली व त्याने त्याला श्मशान भूमीवर नेले व त्या पापी पृथुश्रीने त्या श्रेष्ठीला मारण्यासाठी तळवराच्या आधीन केले. त्याने देखिल राजाची आज्ञा आहे असे समजून त्याच्यावर तरवारीचा दढप्रहार केला ॥ ३१८-३२४ ॥ अर्हत्परमेष्ठी हेच परम उत्कृष्ट दैवत आहे असे समजून त्यांच्या ठिकाणी उत्तम भक्ति करणारा व शीलसंपन्न अशा त्या श्रेष्ठीच्या छातीवर तलवारीने तळवराने केलेला प्रहार रत्नहार बनला. या श्रेष्ठीला विचार न करिता शिक्षा केल्यामुळे नगरात मोठा उत्पात झाला की, ज्याने सर्वाचा नाश होण्याची पाळी आली. बरोबरच आहे की, जो दुष्ट नाही अशाचा वध करण्यापासून कोणता अनर्थ होणार नाही बरे ? या कठिण प्रसंगाचा विचार करून नागरिक लोक आणि राजा ह्या भीतीने व्याकुळ झाले व त्या श्रेष्ठीलाच शरण जाण्यासाठी श्मशानाकडे गेले. त्यावेळी उपसर्गाचा नाश झाला. स्वर्गीय देव आश्चर्ययुक्त होऊन वैश्यश्रेष्ठ श्रेष्ठीच्या शीलाच्या प्रभावाचे वर्णन करून त्याची त्यानी पूजा केली ।। ३२५-३२८ ॥ राजा व प्रधान वगैरे लोकांचे मन भीतीने त्रस्त झाले होते. आम्ही काही विचार न करून हे अकार्य केले आहे. यास्तव हे श्रेष्ठिन्, आपण आम्हाला क्षमा करावी. त्यावेळी श्रेष्ठी स्याना म्हणाले, आम्ही जे पूर्वजन्मी अशुभ कर्म प्राप्त करून घेतले आहे त्याचा हा उदय आहे. याविषयी आपण बिलकूल खिन्न होऊ नका. क्षमा धारण करणा-या लोकात त श्रेष्ठ असलेल्या श्रेष्ठीने त्याच्या मनातील खेद याप्रमाणे बोलन दूर केला. सर्वानी ज्याला पुढे केले आहे अशा पूज्य श्रेष्ठीने वैभवाने नगरात प्रवेश केला. याप्रमाणे काल जात असता श्रेष्ठीची कन्या जी वारिषेणा तिचा आपल्या वसुपाल पुत्राबरोबर राजाने वैभवाने विवाह केला ।। ३२९-३३१ ॥ Page #672 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-३४२) महापुराण एवं प्रयाति कालेऽस्य वारिषेणां सुतां नपः । वसुपालाय पुत्राय स्वस्यादत्त विभूतिमान् ॥ ३३२ अथान्येयुः सभामध्ये पष्टवान्वेष्ठिनं नपः । विरुद्धं कि न वान्योन्यं धर्मादीति चतुष्टयम् ॥ ३३३ परस्परानुकूलास्ते सम्यग्दृष्टिषु साधुषु । न मिथ्यादृक्ष्विति प्राह श्रेष्ठी धर्मादितत्त्ववित् ।। ३३४ इति तद्वचनाद्राजा तुष्टोऽभीष्टं त्वयोच्यतम् । दास्यामीत्याह सोऽप्याख्यज्जातिमत्युक्षयाविति॥३३५ न मया तवयं साध्यमिति प्रत्याह भूपतिः। मां मुञ्ज साधयामीति तमवोचद्वणिग्वरः ॥ ३३६ तदाकर्ण्य गृहत्यागमहं च सह तेऽधुना । करोमि किन्तु मे पुत्रा बालका इति चिन्तयन् ॥ ३३७ सद्यो भिन्नाण्डकोदभतान्मक्षिकादानतत्परान । क्षधापीडाहतान्वीक्ष्य सहसा गहकोकिलान ॥ ३३८ सर्वेऽपि जीवनोपायं जानते जन्तवस्तराम् । स्वेषां विनोपदेशेन तत्कि मे बालचिन्तया ॥ ३३९ इत्यसौ वसुपालाय दत्वा राज्यं यथाविधि । विधाय यौवराज्यं च श्रीपालस्य सपट्टकम् ॥ ३४० गुणपालमहाराजः स कुबेरप्रियोऽग्रहीत् । बहुभिर्भूभुजैः सार्ध तपो यतिवरं श्रितः ॥ ३४१ श्रेष्ठयहिंसाफलालोकान्मयाप्यग्राहि तद्वतम् । तस्मात्त्वं न हतोऽसीति ततस्तुष्टाव सोऽपि तम् ॥ यानन्तर एके दिवशी सभेत राजाने धर्मादि चार पुरुषार्थ एकमेकाबरोबर विरुद्ध आहेत किंवा नाहीत असे श्रेष्ठीला विचारले. श्रेष्ठी म्हणाले जे सम्यग्दृष्टि साधु आहेत त्याच्या ठिकाणी हे धर्मादिक एकमेकाना अनुकूल आहेत पण मिथ्यादृष्टि जनामध्ये ते अन्योन्यानुकूल नाहीत असे धर्माचे स्वरूप जाणणाऱ्या श्रेष्ठीने सांगितले. हे श्रेष्ठिवचन ऐकून राजा आनन्दित झाला व श्रेष्ठीला म्हणाला आपणास जे इष्ट आहे ते मागा मी ते देईन. श्रेष्ठी म्हणाले मला जन्ममरणाचा क्षय हवा आहे. राजा म्हणाला जन्ममरणाच्या क्षयाची मला प्राप्ति झाली नाही. मी त्याचा क्षय आपणास कसा देऊ शकेन ? असे राजा म्हणाला. यानन्तर बरे मला परवानगी द्या मी जन्ममरणाचा क्षय साधू शकतो असे श्रेष्ठी बोलले ॥ ३३२-३३६ ॥ श्रेष्ठीचे भाषण ऐकन राजा म्हणाला मी तुमच्याबरोबर गृहत्याग केला असता पण माझे पुत्र अद्यापि बालक आहेत. असा राजा विचार करीत असता त्यावेळी अंडे फोडन त्यातून पालीची पिल्ले बाहेर पडली आणि भुकेने पीडित होऊन त्यांनी माश्या पकडावयास सुरुवात केली. हे पाहून राजा म्हणाला सर्व प्राणी जगण्याचा उपाय उत्तम रीतीने जाणतात व त्या विषयाच्या उपदेशाची त्यांना आवश्यकता नसते. म्हणून मी बालकांची चिन्ता करणे आवश्यक समजत नाही. याप्रमाणे गुणपालमहाराजाने विचार केला आणि त्याने वसुपालाला विधीला अनुसरून राज्य दिले व श्रीपालाला पट्टबंधनाने युक्त असे युवराजपद दिले. कुबेरप्रिय श्रेष्ठी व अनेक राजे यांच्यासह गुणपालमहाराजानी एका श्रेष्ठ मुनीचा आश्रय घेऊन तपाचा स्वीकार केला ॥ ३३७-३४१ ।। __ श्रेष्ठीच्या अहिंसावताचे फल पाहून मीही ते अहिंसाव्रत ग्रहण केले. म्हणून मी तुला ठार मारले नाही. हे त्या तळवराचे भाषण ऐकून तो विद्युच्चोर देखिल त्याची स्तुति करू लागला ।। ३४२॥ Page #673 -------------------------------------------------------------------------- ________________ ६६२) महापुराण (४६-३४३ इत्युक्त्वा सोऽब्रवीदेवं प्राक्मणालवतीपुरे । भूत्वा त्वं भवदेवाख्यो रतिवेगसुकान्तयोः ॥ ३४३ बद्धवरो निहन्ता भूः पारावतभवेऽप्यनु । मार्जारः सन्मृति गत्वा पुनः खचरजन्मनि ॥ ३४४ विद्यच्चोरत्वमासाद्य सोपसर्गा मति व्यषाः । तत्पापान्नरके दुःखमनुभूयागतस्ततः ॥ ३४५ अत्रेत्याखिलवेद्युक्तं व्यक्तवाग्विसरः स्फुटम् । व्यधात्सुधीः स्ववृत्तान्तं भीमसाधुः सुधाशिनोः ॥३४६ त्रिः प्राक्त्वन्मारितावावामिति शुद्धित्रयान्वितौ । जातसद्धर्मसद्भावाभिवन्द्य मुनि गतौ ॥३४७ इति व्याहृत्य हेमाङ्गदानुजेदं च साब्रवीत् । भीमः साधुः पुरे पुण्डरीकिण्यां धातिघातनात् ॥३४८ रम्ये शिवङ्करोद्याने पञ्चमज्ञानपूजितः । तस्थिवांस्तं समागत्य चतस्त्रो देवयोषितः ॥ ३४९ वन्दित्वा धर्ममाकर्ण्य पापादस्मत्पतिर्मतः । त्रिलोकेश वदास्माकं पतिः कोऽन्यो भविष्यति ॥ ३५० इत्यपृच्छन्नसौ चाह पुरेऽस्मिन्नेव भोजकः । सुरदेवाह्वयस्तस्य वसुषेणा वसुन्धरा ॥ ३५१ धारिणी पथिवी चेति चतस्रो योषितः प्रियाः। श्रीमती वीतशोकारव्या विमला सवसन्तिका॥३५२ चतस्रश्चेटिकास्तासामन्येद्युस्ता वनान्तरे । सर्वा यतिवराभ्यासे धर्म दानादिनाददुः ॥ ३५३ याप्रमाणे बोलून ते भीममुनि आपल्या समोर बसलेल्या त्या दोन देवदेवीना पुनः असे म्हणाले, सर्वज्ञ देवानी मला स्पष्ट अक्षरानी असे सांगितले- तूं मृणालवती नगरात प्रथमभवी भवदेव नांवाचा वैश्य झाला होतास त्यावेळी रतिवेग आणि सुकान्त याच्याविषयी मनात वैर धारण करून त्यांना मारलेस. नन्तर ते दोघे कबूतर व कबूतरी झाले आणि तूं मांजर झालास. त्यांना तूं मारलेस पण उत्तम मरणाने मरण पावून ते दोघे विद्याधर-विद्याधरी झाले. तूं त्यानंतर विद्यच्चोर झालास आणि त्याना उपसर्ग करून मारून टाकलेस. त्या पापामुळे तूं नरकामध्ये जन्मून तेथील दुःख भोगलेस. याप्रमाणे मला सर्वज्ञानी सांगितले असे म्हणून त्या भीमसाधूने आपला सगळा वृत्तान्त त्या दोन देवदेवीना स्पष्ट सांगितला. यानन्तर त्या देवदेवीनी भीमसाधूला असे म्हटले, हे साधो आम्हा दोघाना पूर्वजन्मी तीनवेळा मारलेस पण आम्ही तीनही वेळी मन, वचन व शरीराच्या शुद्धीनी युक्तच राहिलो. त्या शुद्धीमुळे आमच्या ठिकाणी सद्धर्माचीच भावना राहिली असे त्या उभय देवदेवीनी सांगितले आणि ते त्या मुनीला वन्दन करून स्वर्गास गेले ॥ ३४३-३४७ ।। याप्रमाणे बोलून हेमाङ्गदाची धाकटी बहीण सुलोचना पुनः असे बोलली. त्या भीमसाधूला पुण्डरीकिणी नगरीत घातिकर्माचा घात केल्यामुळे सुंदर शिवङ्कर नामक बगीचात पांचवे ज्ञानकेवलज्ञान झाले. त्यामुळे तो देवपूजित झाला. त्या बगीचात ते भीमसाधु बसले असता तेथे चार देवस्त्रिया आल्या, त्यांनी त्या भीम मुनीश्वराला वन्दन करून धर्म ऐकला व त्या त्याना म्हणाल्या- हे त्रिलोकेशा पापाने आमचा पति मरण पावला. आता आमचा दुसरा कोण बरे पति होणार आहे ते सांगा. असे त्यानी विचारले तेव्हा भीममुनी असे म्हणाले, याच नगरात सुरदेव नांवाचा राजा होता त्याला चार प्रिय स्त्रिया होत्या. त्यांची नांवे- वसुषेणा, वसुन्धरा, धारिणी आणि पृथ्वी याचप्रमाणे त्यांच्या चार दासी- श्रीमती, वीतशोका, विमला व वसन्तिका या सर्वजणीनी एके दिवशी त्या वनात एकायतीश्वराजवळ दान, पूजा आदिकरूपाचा धर्म धारण केला ॥ ३४८-३५३ ।। Page #674 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६-३६५) महापुराण तत्फलेनाच्युते कल्पे प्रतीन्द्रस्य प्रियाः क्रमात् । रतिषेणा सुसीमाख्या मुख्यान्या च सुखावती ॥३५४ सुभगेति च देव्यस्ता यूयं ताश्चेटिकाः पुनः । चित्रषणा क्रमाच्चित्रवेगा धनवती सती ॥ ३५५ धनश्रीरित्यजायन्त वनदेवेषु कन्यकाः । सुरदेवोऽप्यभून्मृत्वा पिङ्गलः पुररक्षकः ॥ ३५६ ।। स तत्र निजदोषेण प्रापन्निगलबन्धनम् । मातुस्तत्सुरदेवस्य प्राप्तायां राजसूनुताम् ॥ ३५७ श्रीपालाख्यकुमारस्य ग्रहणे बन्धमोक्षणे । सर्वेषां पिङ्गलाख्योऽपि मुक्तः संन्यस्य सम्प्रति ॥ ३५८ भूत्वाच्युतविमानेऽसाविहागत्य भविष्यति । स्वामी युष्मकमित्येतत् तच्चेतोहरणं तदा ॥ ३५९ परमार्थं कृतं तेन तथागत्य मुनेर्वचः । पृष्ट्वानुकन्यकाश्चनामात्मनो भाविनं पतिम् ॥ ३६० पूर्वोक्तपिङ्गलाख्यस्य सूनुर्नाम्नातिपिङ्गलः । सोऽपि संन्यस्य युष्माकं रतिदायी भविष्यति ॥३६१ इति तत्प्रोक्तमाकर्ण्य गत्वा तत्पूजनाविधौ । तासां निरीक्षणात्कामसम्मोहं प्रकृतं महत् ॥ ३६२ रतिकूलाभिधानस्य संविधानं मुनेः श्रुतम् । तत्पितुर्मणिनागादिदत्तस्य प्रकृतं तथा ॥ ३६३ सुकेतोश्चाखिले तस्मिन्सत्यभूते मुनीश्वरम् । ताः सर्वाः परितोषेण गताः समभिवन्द्य तम् ॥ ३६४ आवामपि तदा वन्दनाय यत्र गताविदम् । श्रुत्वा दृष्ट्वागतौ प्रीतिपरीतहृदयौ दिवम् ॥ ३६५ ............ ___त्या दानादिपुण्याच्या फलाने अच्युत स्वर्गात त्या प्रतीन्द्राच्या क्रमाने रतिषणा, सुसीमा, सुखावती आणि सुभगा अशा मुख्य देवी झाल्या आणि त्याच दासी क्रमाने चित्रषणा, चित्रवेगा, धनवती आणि धनश्री या वनदेवाच्या ठिकाणी दासी देवता झाल्या व सुरदेव नांवाचा राजा मरून पिंगल नांवाचा नगररक्षक झाला व त्या ठिकाणी आपल्या दोषामुळे कैद्याच्या अवस्थेला प्राप्त झाला सुरदेवाची माता राजाची कन्या झाली आहे ॥ ३५४-३५७ ॥ व ती श्रीपालकुमाराबरोर विवाहित झाली आहे. विवाहाच्या वेळी सर्व कैद्यांना बन्धनातून मुक्त केले व त्यावेळी पिंगलालाही मुक्त केले. त्याच्या बेड्या काढून टाकल्या. आता संन्यास घेऊन तो अच्युत स्वर्गात उत्पन्न होऊन तुमचा तो स्वामी होईल. इकडे मुनिराज असे मधुर भाषण करीत असता तिकडे पिंगलाने संन्यास धारण केला व तो अच्युत स्वर्गात उत्पन्न झाला व तेथून येऊन त्याने मुनिराजाचे वचन खरे केले. त्यावेळी चार व्यन्तरकन्या आल्या व त्यांनी सर्वज्ञाला आपल्या भावी पतिविषयी प्रश्न विचारला ॥ ३५८-३६० ॥ मुनिराज म्हणाले, पूर्वी ज्याचे वर्णन केले होते त्या पिंगल कोतवालाला अतिपिंगल नांवाचा मुलगा आहे. तो संन्यास धारण करून तुम्हाला आनंददायक पति होईल ॥ ३६१ ।।। भीमकेवलीचे हे वचन ऐकून त्या व्यन्तरकन्या येऊन अतिपिंगलाची त्यांनी पूजा केली. त्याला पाहून त्या देवींचा कामविकार अधिक वाढला. त्या देवतानी रतिकूल नामक मुनीचे चरित्र ऐकले व त्यांचा पिता जो मणिनागदत्त त्याचेही चरित्र त्यांनी ऐकिले व सुकेतुचे चरित्रही ऐकले व हे सर्व सत्य असे सिद्ध झाल्यावर त्या मुनीश्वराला त्या सर्वांनी संतोषाने वन्दन केले व त्या निघून गेल्या ॥ ३६२-३६४ ॥ त्यावेळी आम्ही दोघेही वंदनेसाठी तेथे गेलो होतो व आम्ही हे सर्व तेथे ऐकले व पाहिले आणि आम्ही दोघे प्रेमाने भरलेल्या हृदयाचे झालो व तेथून स्वर्गात गेलो ।। ३६५ ।। Page #675 -------------------------------------------------------------------------- ________________ ६६४) महापुराण (४६-३६६ इत्यात्मीयभवावलीमनुगतैर्मान्यैर्मनोरञ्जनः । स्पष्टैस्खरलितैः कलैरविरलैख्याकुलर्जल्पितैः ॥ आत्मोपात्तशुभाशुभोदयवशोद्भूतोच्चनीचस्थितिम् । संसर्पदशनांशुभूषितसभासभ्यानसावभ्यधात् ॥ ३६६ श्रुत्वा तां हृदय प्रियोक्तिमतुषत्कान्तो रतान्ते यथा। संसच्च व्यकसत्तरां शरदि वा लक्ष्मीः सरःसंश्रया ॥ कान्तानां वदनेन्दुकान्तिरगलत्तद्वाग्दिनेशोद्गतेः। अस्थाने कृतमत्सरोऽसुखकरस्त्याज्यस्ततोऽसौ बुधैः ॥ ३६७ कान्तोऽभूद्रतिवेगया वणिगसौ पूर्व सुकान्तस्तनः। सञ्जातो रतिषेणया रतिवरो गेहे कपोतो विशाम् ॥ वत्यन्तप्रभयाभवत्खगपतिवर्मा हिरण्यादिवाक। देवः कल्पगतो मया सह महादेव्याजनीड्यो भवान् ॥ ३६८ सकलमविकलं तत्सप्रपञ्च रमण्या। मुखकमलरसावतं श्रोत्रपात्रे निधाय ॥ तदुदितमपरं च श्रोतुकामो जयोऽभूत् । न रसिकदयितोक्तैः कामुकास्तृप्नुवन्ति ॥ ३६९ इत्याचे त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते जयसुलोचना ___ भवान्तरवर्णनं नाम षट्चत्वारिंशत्तमं पर्व समाप्तम् ॥ ४६ चोहीकडे पसरणाऱ्या दातांच्या किरणांनी जिने सभेला भूषविले आहे अशा या सुलोचनेने स्वतः ग्रहण केलेल्या शुभाशुभकर्माच्या उदयाच्या आधीन झालेली जी आपली उच्च व नीच अवस्था तिने युक्त जी आपली अनेक जन्मांची पंक्ति ती सर्व सभ्यांना मान्य, मनोरञ्जक, स्पष्ट अखण्ड, मधुर व व्याकुलतारहित अशा भाषणानी सांगितली ।। ३६६ ॥ __ तिचा पति जयकुमार जसा संभोगाच्या शेवटी आनंदित होत असे तसा तिचे हृदयाला आवडणारे असे भाषण ऐकून आनन्दित झाला. शरदृतुमध्ये सरोवराचा आश्रय घेतलेली लक्ष्मी जशी शोभते तशी ती सभा अधिक विकसित झाली, आनंदित झाली. पण सुलोचनेच्या वचनरूप सूर्याचा उदय झाल्यामुळे तिच्या सवतीच्या मुखचन्द्राची कान्ति गळून गेली व हे योग्यच झाले कारण अस्थानी केलेला मत्सर हा दुःखदायक असतो तो विद्वानानी त्यागावा ॥ ३६७ ॥ सुलोचना जयकुमाराला म्हणते- स्तुत्य असे आपण पूर्वी सुकान्त नांवाचा वैश्य होता व त्यावेळी आपण रतिवेगेशी विवाह होऊन तिचे कान्त पति झालात. यानन्तर आपण श्रेष्ठीच्या घरी रतिषणेसह रतिवर नांवाचा कबूतर झाला. यानन्तर प्रभावतीबरोबर हिरण्यवर्मा नामक विद्याधर पति झालात. नंतर महादेवी अशा माझ्याबरोबर स्वर्गात देव झालात ।। ३६८ ॥ मुखकमलातील रसाने भरलेला अविकल- दोषरहित असा सुलोचनेचा सविस्तर सर्व भाषणसमूह जयकुमाराने आपल्या कर्णरूपी पात्रात ठेवला व सुलोचनेचे इतर भाषणही ऐकण्याची इच्छा त्याला झाली. बरोबरच आहे की, रसिक अशा स्त्रीने केलेल्या भाषणानी कामुकजन तृप्त होत नाहीत. नेहमी त्याना रसिक स्त्रीचे भाषण ऐकावे असेच वाटत असते ॥ ३६९ ॥ ___ भगवद्गुणभद्राचार्यांनी रचलेल्या आर्ष त्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहांतील जयकुमार व सुलोचना यांच्या भवान्तरांचे वर्णन करणारे हे शेहेचाळीसावें पर्व समाप्त झाले. Page #676 -------------------------------------------------------------------------- ________________ सप्तचत्वारिंशत्तमं पर्व । कान्ते तत्रान्यदप्यस्ति प्रस्तुतं स्मर्यते त्वया । श्रीपालचक्रिसम्बन्धमित्यप्राक्षीत्स तां पुनः ॥१ बाढं स्मरामि सौभाग्यभागिनस्तस्य वृत्तकम् । यथैवाद्येक्षितं वेति सा प्रवक्तुं प्रचक्रमे ॥२ जम्बूद्वीपे विदेहेऽस्मिन् पूर्वस्मिन्पुण्डरीकिणी । नगरी नगरीवासौ वासवस्यातिविश्रुता ॥३ श्रीपालवसुपालारव्यौ सूर्याचन्द्रमसौ च तौ। जित्वा महीं सहैवावतः स्मेव नयविक्रमौ ॥४ जननी वसुपालस्य कुबेरश्रीदिनेऽन्यदा । वनपाले समागत्य केवलावगमोऽभवत् ॥५ गुणपालमुनीशोऽस्मत्पतेः सुरगिराविति । निवेदितवति क्रान्त्वा पुरः सप्तपदान्तरम् ॥६ प्रणम्य वनपालाय दत्वासो पारितोषिकम् । पौराः सपर्यया सर्वेऽप्यायेयुरिति घोषणाम् ॥ ७ विधाय प्राकस्वयं प्राप्य भगवन्तमवन्दत । श्रीपालवसुपालौ च ततोऽनु समुदौ गतौ ॥८ प्रमदाख्यं वनं प्राप्य सद्रुमै रम्यमन्तरे। प्राग्जगत्पालचक्रेशो यस्मिन्यग्रोधपादपे ॥९ देवताप्रतिमालक्ष्ये स्थित्वा जग्राह संयमम् । तस्याधस्तात्समीक्ष्येक्ष्यं प्रवृत्तं वृत्तमादरात् ॥ १० हे प्रिये, तू जे आतापर्यन्त सांगितले आहेस त्यात अवश्य जे सांगण्यासारखे आहे त्याची आठवण तुला होत आहे काय ? अर्थात् श्रीपाल चक्रवर्तीच्या सम्बंधाचे स्मरण तुला होते काय असे सुलोचनेला जयकुमारने पुनः विचारले. तेव्हां ती म्हणाली, उत्तम भाग्यवंत असलेल्या त्या श्रीपालाचे वृत्त मला चांगले आठवत आहे. मी जणु त्याचे चरित्र आज पाहात आहे असे मला वाटते. असे म्हणून ते तिने सांगावयास प्रारंभिले ।। १-२॥ । __या जंबूद्वीपातील पूर्व विदेहक्षेत्रात पुण्डरीकिणी नांवाचे नगर इंद्राच्या नगराप्रमाणे प्रसिद्ध आहे. या नगरांत जणू सूर्य-चंद्र असे श्रीपाल व वसुपाल हे दोन राजे राहत होते व ते पृथ्वीला जिंकून तिचे दोघेही रक्षण करीत होते व ते जणु नय व पराक्रम आहेत असे लोकाना वाटत होते ॥ ३-४ ॥ ___ एके दिवशी वसुपालाची माता जी कुबेरश्री तिच्याकडे वनपाल आला व तो आमचे स्वामी श्रीगुणपाल मुनीश्वरांना सुरगिरिपर्वतावर केवलज्ञान झाले आहे असे म्हणाला, तेव्हां कुबेरश्री आसनावरून उठून सात पावले पुढे गेली व गुणपालमुनीश्वराना तिने परोक्ष नमस्कार केला. त्या वनपालाला तिने त्या आनंदाप्रीत्यर्थ बक्षिस दिले व सर्व नगरवासीलोकांनी पूजनसामग्रीसह यावे अशी दौंडी नगरात तिने देवविली व स्वतः भगवन्ताकडे जाऊन तिने त्यांना वंदिले व श्रीपाल व वसुपाल हे दोघेही आनंदाने तिच्या मागून गेले ॥ ५-८॥ श्रीपाल व वसुपाल मार्गामध्ये उत्तम वृक्षांनी सुन्दर अशा प्रमदनामक वनात ते पोहोचले. तेथे देवतांच्या प्रतिमांनी युक्त अशा वडाच्या झाडाखाली जगत्पाल चक्रवर्तीने पूर्वी संयम धारण केला होता तेथे ते दोघे येऊन पोहोचले. त्या वडाच्या झाडाखाली पाहण्याला योग्य असे नृत्य चालू होते व हे दोघेजण आदराने ते नृत्य पाहू लागले ।। ९-१० ।। म. ८७ Page #677 -------------------------------------------------------------------------- ________________ ६६६) महापुराण (४७-११ तयोः कुमारः श्रीपालः पुरुषो नर्तयत्ययम् । अस्तु स्त्रीवेषधार्यत्र स्त्री चेत्पुंरूपधारिणी ॥११ स्यादेवं स्त्री प्रनृत्यन्ती नृत्तं युक्तमिदं भवेत् । इत्याह तद्वचः श्रुत्वा नटी मूर्छामुपागता ॥ १२ उपायः प्रतिबोध्यनां तदा प्रश्रयपूर्वकम् । इति विज्ञापयामास काचित्तं भाविचक्रिणम् ॥ १३ सुरम्यविषये श्रीपुराधिपः श्रीधराह्वयः । तद्देवी श्रीमती तस्याः सुता जयवतीत्यभूत् ॥ १४ तज्जातौ चक्रिणो देवी भाविनीत्यादिशन्त्विदः । अभिज्ञानं च तस्यैतत् नटनटयोविवेत्ति यः ॥१५ भेदं स चक्रवर्तीति तत्परीक्षितुमागता । पुण्यात् दृष्टस्त्वमस्माभिनिधिकल्पो यदृच्छया ॥ १६ अहं प्रियरतिर्नाम्ना सुतेयं मम नर्तकी । ज्ञेया मदनदेगाख्या पुरुषाकारबारिणी ॥ १७ नटोऽयं वासवो नाम ख्यातः स्त्रीवेषधारकः। तच्छुत्वा नृपतिस्तुष्ट्वा तां सन्तर्प्य यथोचितम् ॥१८ गुरुं वन्दितुमात्मीयं गच्छन्सुरगिरि ततः । अश्वं केनचिदानीतमारुह्यासक्तचेतसा ॥ १९ अधावयदसौ किञ्चिदन्तरं धरणीतले । गत्वा गगनमारुह्य व्यक्तीकृतखगाकृतिः ॥ २० त्यावेळी श्रीपालकुमाराने म्हटले की, येथे हा स्त्रीचा वेष धारण करून पुरुष नृत्य करीत आहे व ही स्त्री पुरुषाचा वेष धारण करून नृत्य करीत आहे. स्त्री जर स्त्रीचे रूप धारण करून नृत्य करील तर हे नृत्य योग्य झाले असते. हे श्रीपालाचे भाषण ऐकून नटी मूच्छित झाली ॥ ११-१२॥ तेव्हा काही उपायानी तिला सावध केले. त्यावेळी कोणी एक स्त्री त्या भावी चक्रवर्तीला विनयाने असे म्हणाली. सुरम्य देशात श्रीपुरनगराचा राजा श्रीधर आहे. त्याच्या राणीचे नांव श्रीमती आहे. श्रीधर व श्रीमती या दोघाना कन्या जयवती या नांवाची झाली. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा निमित्त जाणणाऱ्या विद्वान लोकानी ही चक्रवर्तीची पट्टराणी होईल असे सांगितले. त्याविषयी त्यानी ही खूण सांगितली. जो नट व नटीचा भेद जाणील तो चक्रवर्ती होईल. तेव्हा त्याची परीक्षा करण्यासाठी आम्ही लोक आलो आहोत. पुण्योदयाने, हे कुमार आपण निधीसारखे आमच्या दृष्टीला अकल्पित रीतीने दिसले आहात ॥ १३-१६ ॥ मी प्रियरति या नांवाची आहे आणि ही माझी पुरुषाकार धारण करणारी नर्तकी कन्या मदनवेगा नांवाची आहे व स्त्रीवेष धारण करून नृत्य करणाऱ्या या नटाचे वासव नाम आहे. हे ऐकून राजाने प्रसन्न होऊन त्या नर्तकीला योग्य असे पारितोषिक देऊन सन्तुष्ट केले ॥ १७-१८॥ यानंतर आपल्या पित्याला वन्दन करण्यासाठी तो श्रीपाल सुरगिरि नामक पर्वताकडे निघाला. त्यावेळी कोणीतरी घोडा घेऊन आला व त्यावर आसक्तचित्त होऊन तो बसला व त्याला तो पळवू लागला. तो घोडा कांही अन्तरपर्यन्त जमीनीवरून धावला व नंतर त्याने विद्याधराचे रूप प्रकट केले आणि तो आकाशात त्याला घेऊन गेला ॥ १९-२० ।। Page #678 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-३१) महापुराण न्यग्रोधपादपाधःस्थप्रतिमावासिना भृशम् । देवेन तजितो भीत्वाश निवेगोऽमुचत्खगः ॥ २१ कुमारं पर्णलध्वाख्यविद्यया स्वनियुक्तया । रत्नावर्तगिरेर्मूनि स्थितं तं सन्ति भाविनः ॥ २२ बहवोऽप्यस्य लम्भा इत्यगृहीत्वा निवृत्तवान् । देवः सरसि कस्मिश्चित्स्नानादिविधिना श्रमम् ॥ मार्गजं स्थितमुद्धूय तमेकस्मात्सुधागृहात् । आगत्य राजपुत्रोऽयमिति ज्ञात्वा यथोचितम् ॥ २४ दृष्ट्वा षड्राजकन्यास्ताः स्ववृत्तान्तं न्यवेदयन् । स्वगोत्रकुलनामादि निर्दिश्य खचरेशिना ॥ २५ बलादशनिवेगेन वयमस्मिन्निवेशिताः । इति तत्प्रोक्तमाकर्ण्य कुमारस्यानुकम्पिनः ॥ २६ निजागमन वृत्तान्तकथनावसरे परा । विद्युद्वेगाभिधा विद्याधरी तत्र समागता ॥ २७ पापिनाशनिवेगेन हन्तुमेनं प्रयोजिता । समीक्ष्य मदनक्रान्ताभू च्चित्राश्चित्तवृत्तयः ॥ २८ नुस्तनितवेगस्य राज्ञो राजपुरेशिनः । खगेशोऽशनिवेगाख्यो ज्योतिर्वेगाख्य मातृकः ॥ २९ स्वमत्र तेन सौहार्दादानीतः स ममाग्रजः । विद्युद्वेगाह्वयाहं च प्रेषिता ते स मैथुनः ॥ ३० रत्नागिरि याहि स्थितस्तत्रेति सादरम् । भवत्समीपं प्राप्तवमिति रक्तविचेष्टितम् ।। ३१ ( ६६७ वडाच्या झाडाखाली असलेल्या प्रतिमेत राहणारा देव त्यावेळी प्रकट होऊन अशनिवेगावर अतिशय रागावला. त्यामुळे तो विद्याधर भ्याला व त्याला - श्रीपालाला त्याने स्वतः योजलेल्या पर्णलघ्वी ( पानाप्रमाणे हलके करणारी) विद्येने रत्नावर्त गिरिनामक पर्वताच्या शिखरावर सोडले. त्या पर्वतावर या कुमाराला पुष्कळ लाभ होणार आहेत असे जाणून त्या देवाने त्याला बरोबर न घेता तेथेच सोडले व तो निघून गेला. यानन्तर त्या श्रीपालाने कोण्या एका सरोवरामध्ये स्नानादिकार्य केले व मार्गात उत्पन्न झालेले श्रम त्याने नाहीसे केले ।। २१-२३ ॥ यानंतर स्वस्थ बसलेल्या त्या श्रीपालाकडे एका शुभ्रमहालातून सहा राजकन्या आल्या व हा राजपुत्र आहे असे ओळखून व योग्य आदराने त्याला पाहून त्यानी आपले गोत्र, कुल, नाव वगैरे सांगितले व आम्हाला जबरदस्तीने अशनिवेगविद्याधराने येथे आणून ठेविले आहे अशी स्वतःची हकीकत त्यानी त्याला सांगितली. ती ऐकून त्या कुमाराला दया उत्पन्न झाली ।। २४-२५ ॥ स्वतःचे येणे येथे कसे झाले हे वृत्त तो सांगत आहे अशावेळी विद्युद्वेगा नांवाची एक विद्याधरी तेथे आली. त्या पापी अशनिवेगाने या कुमाराला मारून टाकण्यासाठी तिला पाठविले होते. पण या कुमाराला पाहून ती कामविकाराने ग्रस्त झाली. जीवाच्या चित्ताचे विचार आश्चर्यकारक असतात असे येथे म्हणावयास हरकत नाही ।। २६-२८ ।। राजपुर नगराचा राजा स्तनितवेग व राणी ज्योतिर्वेगा यांच्या पुत्राचे नांव अशनिवेग हा विद्याधरांचा राजा - स्वामी आहे. हे श्रीपाला त्याने तुला येथे स्नेहामुळे आणिले आहे व तो अशनिवेग माझा वडील भाऊ आहे व हे कुमारा माझे नांव विद्युद्वेगा आहे व त्याने तुझ्याकडे मला पाठविले आहे व तो तुझा मेहुणा आहे. अर्थात् तू माझ्याशी विवाह करावा असा अभिप्राय तिने व्यक्त केला. मला माझ्या भावाने रत्नावर्त गिरीवर जा व तो तुला तेथे भेटेल म्हणून मी येथे आदराने तुझ्याकडे आले आहे. असे म्हणून तिने प्रेमाचे हावभाव केले व जवळच असलेल्या शुभ्रमंदिरात जाऊ असे त्याला ती म्हणाली. पण आपल्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा Page #679 -------------------------------------------------------------------------- ________________ ६६८) महापुराण (४७-३२ दर्शयन्ती समीपस्थं यावत्सौषगहान्तरम् । इत्युक्त्वानभिलाषं सा ज्ञात्वा तस्य महात्मनः ॥ ३२ तत्रैव विद्यया सौधगेहं निर्माप्य निस्त्रपा । स्थिता तद्राजकन्याभिः सह का कमिनां पा ॥ ३३ एत्यानङ्गपताकास्यास्तं सखीत्थमवोचत । त्वत्पितुर्गुणपालस्य सन्निधाने जिनेशिनः ॥ ३४ । ज्योतिर्वेगा गुरुं प्रीत्या कुबेरधीः समादिशत् । निजजामातरं क्वापि श्रीपालस्वामिनं मम ॥ ३५ स्वयं स्तनितवेगोऽसौ सुतमन्वेषयेदिति । प्रतिपन्नः स तत्प्रोक्तं भवन्तं मैथनस्तव ॥ ३६ आनीतवानिहेत्येतदवबुद्धयात्मना द्विषम् । पति मत्वोत्तरघेणेराशयानलवेगकम् ॥ ३७ स्वयं तदा समालोच्य निवार्य खचराधिपम् । उदीर्यान्वेषणोपायं त्वत्स्नेहाहितचेतसः ॥ ३८ आनीयतां प्रयत्नेन कुमार इति बान्धवाः । आवां प्रियसकाशं ते प्राहिषुस्तदिहागते ॥ ३९ विधुद्वेगावलोक्य त्वामनुरक्ताभवत्वया । न त्याज्येति तदाकर्ण्य संविचिन्त्योचितं वचः ॥ ४० मयोपनयनेऽनाहि व्रतं गुरुभिरपितम् । मुक्त्वा गुरुजनानीतां स्वीकरोमि न चापराम् ॥ ४१ इत्यवोचत्ततस्ताश्च शुङ्गाररसचेष्टितैः । नानाविधैरञ्जयितुं प्रवृत्ता नाशकंस्तदा ॥ ४२ नाही असे तिला आढळून आल्यामुळे तिने तेथेच शुभ्रमहाल विद्येने निर्माण केले व ती निर्लज्ज स्त्री त्या सहा राजकन्याबरोबर तेथे राहिली. बरोबरच आहे की, कामाकुल झालेल्या व्यक्तीना लाज कशी असणार बरे ? ॥ २९-३३ ॥ त्याचवेळी विद्युद्वेगेची सखी अनङ्गपताका ती तेथे आली व ती श्रीपाल कुमाराला असे बोलू लागली- हे कुमार, तुझे पिता जे गुणपाल जिनेश्वर त्यांच्याजवळ दर्शनासाठी तुझी माता कुबेरश्रीही गेलेली आहे व तिने अतिशय प्रेमाने ज्योतिर्वेगेच्या वडिलांना असे सांगितले की, माझा मुलगा श्रीपाल कोठे गेला आहे त्याला हुडकून आणा. तेव्हा ज्योतिर्वेगेच्या वडिलानी आपल्या स्तनितवेग नामक जावयाला असे सांगितले की, माझे स्वामी श्रीपालकुमार कोठे गेले आहेत त्याना आणा. स्तनितवेगाने आपल्या पुत्राला अशनिवेगाला पाठविले व पित्याच्या सांगण्यानेच अशनिवेगाने आपणास येथे आणिले आहे व तो आपला मेहुणा आहे. उत्तरश्रेणीचा राजा अनलवेग श्रीपाल कुमाराचा शत्रु आहे. अशी आशंका मनात धरून तुमच्यावरील स्नेहाने ज्याचे चित्त भरलेले आहे अशा आपल्या सर्व स्नेही बंधुमित्रानी स्वतः विचार करून आपणास हुडकण्याचा उपाय त्यांनी सांगितला व ते म्हणाले की कुमार श्रीपालाला मोठ्या प्रयत्नाने येथे आणावे असे सांगून ते सगळे विद्याधराचा अधिपति अशा अनिलवेगाला अडविण्यासाठी गेले आहेत व आम्हा दोघींना त्यांनी आपणाकडे पाठविले आहे म्हणून आम्ही दोघी आपल्याकडे आल्या आहोत ॥ ३४-३९ ॥ हे कुमार विद्युद्वेगेने तुला पाहिले व तुझ्यावर ती अनुरक्त झाली आहे. त्यास्तव आपण तिचा त्याग करू नये. ते तिचे वचन ( अनङगपताकेचे ) ऐकून व उत्तम विचार करून कुमाराने योग्य असे भाषण केले. " उपनयनाच्यावेळी मला गुरुजनांनी असे व्रत दिले आहे की, त्यांनी आणिलेल्या कन्येचा मी स्वीकार करावा. इतर स्त्रीचा मी स्वीकार करू नये. म्हणून मी इतर स्त्रीचा स्वीकार करणार नाही असे श्रीपालने भाषण केले. यानंतर नानाप्रकारच्या शृंगाररसाच्या चेष्टा करून त्याचे मन अनुरक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यात त्या समर्थ झाल्या नाहीत ॥ ४०-४२ ॥ Page #680 -------------------------------------------------------------------------- ________________ (६६९ ४७-५३) विद्युद्वेगा ततोऽगच्छत्स्वमातृपितृसन्निधौ । पिधाय द्वारमारोप्य सौधाग्रं प्राणवल्लभम् ॥ ४३ तावानेतुं कुमारोऽपि सुप्तवान् रक्तकम्बलम् । प्रावृत्य तं समालोक्य भेरुण्डः पिशितोच्चयम् ॥ ४४ मत्वा नीत्वा द्विजः सिद्धकूटाग्रे खादितुं स्थितः । चलन्तं वीक्ष्य सोऽत्याक्षीत्स तेषां जातिजो गुणः ॥ ४५ ततोऽवतीर्य श्रीपालः स्नात्वा सरसि भक्तिमान् । सुपुष्पाणि सुगन्धीनि समादाय जिनालयम् ॥४६ परीत्य स्तोतुमारेभे विवृत्तं द्वास्तदा स्वयम् । तन्निरीक्ष्य प्रसन्नः सन्नभ्यर्च्य जिनपुङ्गवान् ॥ ४७ अभिवन्द्य यथाकामं विधिवत्तत्र सुस्थितः । तमभ्येत्य खगः कश्चित्समुद्धृत्य नभःपथे ॥ ४८ गच्छन्मनोरमे राष्ट्रे शिवङ्करपुरेशिनः । नृपस्यानिलवेगस्य कान्ता कान्तवतीत्यभूत् ॥ ४९ तयोः सुतां भोगवतीमाकाशस्फटिकालये । मृदुशय्यातले सुप्तां का कुमारीयमित्यसौ ॥ ५० अपृच्छत्सोऽब्रवीदेषा भुजङ्गो विषमेति च । तदुक्ते स कुधा कृत्वा कन्या पितृसमीपगम् ॥ ५१ तमस्मत्कन्यकामेष भुजङ्गीति खलोऽब्रवीत् । इत्युवाच ततः कुद्ध्वा दुष्टो निक्षिप्यतामयम् ॥ ५२ दुर्बरोस्तपोभारधारियोग्ये घने वने । इत्यभ्यधान्नृपस्तस्य वचनानुगमादसौ ॥ ५३ महापुराण यानंतर त्या कुमाराला गच्चीवर बसविले व द्वार बन्द करून विद्युद्वेगा आपल्या माता-पित्यांना आणण्यासाठी त्यांच्याकडे गेली. कुमार देखिल गच्चीवर तांबडे कंबळ ( शाल ) पांघरून झोपला. त्याला भेरुण्डपक्षाने पाहिले. हा मांसाचा ढीग आहे असे त्याला वाटले. त्याने त्याला सिद्धकूटाच्या शिखरावर नेले व त्याने खाण्याचा विचार केला पण तो हलत आहे असे पाहून त्याने त्याचा त्याग केला. हा त्या पक्षाचा जातिगुण आहे. स्वाभाविक गुण आहे ।। ४३-४५ । यानंतर त्या सिद्धकूटाच्या शिखरावरून तो श्रीपाल खाली उतरला. त्याने सरोवरात स्नान केले. भक्तियुक्त अशा त्याने सुगन्धित फुले घेतली व जिनमंदिराला प्रदक्षिणा देऊन त्याने जिनेश्वराची स्तुति प्रारंभिली. त्यावेळी जिनमंदिराचे द्वार आपोआप उघडे झाले. ते पाहून श्रीपालाने प्रसन्न होऊन यथाविधि जिनश्रेष्ठांची पूजा करून वंदना केली आणि तेथे तो स्वस्थ बसला. त्यावेळी कोणी एक विद्याधर त्याच्याकडे आला व त्याला उचलून आकाशात नेले. तेथून मनोरम नांवाच्या राष्ट्रात शिवकर नामक नगरात आले. त्या नगराचा राजा अनिलवेग होता. त्याच्या राणीचे नांव कान्तवती होते. या दोघाना जी कन्या झाली तिचे नांव भोगवती होते ।। ४६-४९ ।। ती आकाशस्फटिकानी बांधविलेल्या घरामध्ये मऊ शय्येवर झोपली होती. त्या विद्याधराने ही कुमारी कोण आहे सांग असे कुमाराला विचारले. तेव्हां ही भयंकर नागीण आहे असे कुमाराने उत्तर दिले. ते ऐकून त्या विद्याधराने कुमाराला त्या कन्येच्या पित्याकडे, राजाकडे नेले व त्याला त्याने सांगितले कीं, ह्या दुष्टाने आपल्या मुलीला ही नागीण आहे असे म्हटले आहे. त्यानंतर तो राजा रागावला व दुर्धर आणि मोठ्या तपाचा भार धारण करणान्या तपस्व्यांना योग्य अशा वनात याला टाका असे म्हणाला. राजाच्या वचनाला अनुसरून त्या विद्याधराने विजयार्द्धपर्वताच्या उत्तर श्रेणीवरील मनोहर नामक नगराच्या जवळ असलेल्या Page #681 -------------------------------------------------------------------------- ________________ ६७०) महापुराण विजयार्द्धात्तरश्रेणीमनोहरपुरान्तिके । श्मशाने शीतवैताली विद्यया तं शुभाकृतिम् ॥ ५४ कृत्वा व्यत्यक्षिपत्पापी जरतीरूपधारिणम् । तत्रास्पृश्यकुले जाता कापि जामातरं स्वयम् ॥ ५५ स्वं ग्राममृगरूपेण स्वसुताचरणद्वये । समन्ताल्लुठितं कृत्वा तां प्रसाद्य भृशं ततः ॥ ५६ तं पुरातनरूपेण समवस्थापयत्खला । तद्विलोक्य कुमारोऽसौ खगाः स्वाभिमताकृतिम् ॥ ५७ विनिवर्तयितुं शक्ता इत्याशङ्क्य विचिन्तयन् । यमाग्रयायिसङ्काशैःकाशप्रसव हासिभिः ॥ ५८ शिरोरुहैर्जराम्भोधितरङ्गाभतनुत्वचा । समेतमात्मनो रूपं दृष्ट्वा दुष्टविभावितम् ।। ५९ लज्जाशोकाभिभूतः सन् मङ्क्षु गच्छंस्ततः परम् । तत्र भोगवती भ्रातुर्हरिकेतोः सुसिद्धया ॥ ६० विद्यया शवरूपेण सद्यः प्रार्थितया करे । कुमारस्य समुद्रम्य निर्वान्तमविचारयन् ॥ ६१ उद्घृत्येदं विशङ्कस्त्वं पिबेत्युक्तं प्रपीतवान् । तं दृष्ट्वा हरिकेतुस्त्वां सर्वव्याधिविनाशिनी ॥ ६२ विद्या श्रति सम्प्रीतः प्रयुज्य वचनं गतः । ततः स्वरूपमापन्नः कुमारो वटभूरुहः ॥ ६३ गच्छन् स्थितमधोभागे दृष्ट्वा कञ्चिन्नभश्चरम् । प्रदेशः कोऽयमित्येवम पृच्छत्सोऽब्रवीदिदम् ॥६४ (४७-५४ श्मशानात श्रीपालाला नेले. व तेथे शीतवैतालीविद्येच्या द्वारे त्या श्रीपालाला त्या पापी विद्याधराने म्हातारीचे रूप धारण करणारा बनविले व त्याला श्मशानात टाकून दिले. त्याच श्मशानात अस्पृश्याच्या कुलात उत्पन्न झालेल्या कोणी विद्याधरीने आपल्या जावयाला कुत्रा बनविले व आपल्या मुलीच्या दोन पायावर त्याला लोळण घ्यावयास लाविले व अशा रीतीने तिने आपल्या मुलीला अतिशय प्रसन्न केले ।। ५०-५६ ।। त्या दुष्टेने पुनः त्याला पूर्वरूपात आणून ठेवले. हे श्रीपालाने पाहिले व त्याला हे विद्याधर आपली शरीराची आकृति इतर प्राण्याच्या रूपात बदलू शकतात अशी शंका त्याला आली. विचार करीत असताना त्याने आपल्या रूपाकडे पाहिले व आपण यमाच्या पुढे बळी जाणाऱ्या प्राण्याप्रमाणे झालो आहोत असे त्याला वाटले. आपले सर्व केस काशपुष्पाना हसणारे अर्थात् अतिशय पांढरे झाले आहेत असे त्याला दिसून आले. वृद्धावस्थारूपी समुद्राच्या तरंगाच्या कान्तीप्रमाणे आपल्या शरीराची कातडी बनली आहे असे आपले रूप पाहून त्या दुष्ट विद्याधराने हे आपले रूप बनविले आहे असे त्याला कळून चुकले ।। ५७-५९ ।। तो लज्जा आणि शोक यानी पीडित झाला. तेथून तो पुढे शीघ्र जाण्यासाठी निघाला. तेथे भोगवतीचा भाऊ हरिकेतु भेटला. त्याला एक विद्या सिद्ध झाली होती. त्याने तिला विनंती केली. तेव्हां विद्येने प्रेताचे रूप धारण केले व त्या कुमाराच्या हातावर वान्ती केली व विचार न करता ती वान्ती पी असे तिने सांगितले. कुमाराने ती वान्ती पिऊन टाकली. यानंतर हरिकेतु कुमाराला असे म्हणाला- सर्व व्याधींचा नाश करणाऱ्या या विद्येने तुझा आश्रय केला आहे. असे प्रीतीने बोलून तो तेथून निघून गेला. यानंतर कुमाराला आपले स्वरूप प्राप्त झाले व तो एका वडाच्या झाडाखाली आला. तेथे एक विद्याधर बसला होता. त्याला पाहून हा प्रदेश कोणता आहे असे कुमाराने विचारले. त्यावेळी तो विद्याधर त्याला असे बोलला ॥। ६०-६४ ॥ Page #682 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-७५) महापुराण खगाद्रेः पूर्वदिग्भागे नीलाद्रेरपि पश्चिमे । सुसीमाख्योऽक्तिदेशोऽत्र महानगरमप्यदः ॥ ६५ तद्भूतवनमेतत्त्वं सम्यक् चित्तेऽवधारय । अस्मिन्नेताः शिलाः सप्त परस्परघृताः कृताः ॥ ६६ येनासौ चक्रवर्तित्वं प्राप्तेत्यादेश ईदृशः । इति तद्वचनादेव तास्तथा कृतवांस्तदा ॥ ६७ दृष्ट्वा तत्साहसं वक्तुं सोऽगमन्नगरेशितुः । कुमारोऽपि विनिर्गत्य ततो निविण्णचेतसा ॥ ६८ काञ्चिज्जरावतीं कुत्स्यशरीरां कस्यचित्तरोः । अधःस्थितामधोभागे विषयं पुष्कलावतीम् ॥ ६९ वद प्रयाति कापन्था इत्यप्राक्षीप्रियंवदः । विनागमनमार्गेण प्रयातुं नैव शक्यते ॥७० स गव्यूतिशतोत्सेधविजयार्धगिरेरपि । परस्मिन्नित्यसावाह तदाकर्ण्य नृपात्मजः ॥ ७१ ब्रूहि तत्प्रापणोपायमिति तां प्रत्यभाषत । इह जम्बूमति द्वीपे विषयो वत्सकावती ॥ ७२ तत्खेचरगिरौ राजपुरे खेचरचक्रिणः । देवी धरणिकम्पस्य सुप्रभावा प्रभाकरी ॥ ७३ तयोरहं तनूजास्मि विख्याताख्या सुखावती । त्रिप्रकारोरुविद्यानां पारगान्येरागताम् ॥ ७४ विषये वत्सकावत्यां विजयाप्रमहीतले । अकम्पनसुतां पिप्पलाख्यां प्राणसमां सखीम् ॥ ७५ "-.--.-...-... या विजयार्द्धपर्वताच्या पूर्वदिशेच्या विभागात व नीलपर्वताच्या पश्चिमदिशेकडे सुसीमा नांवाचा देश आहे व त्यात हे महानगर आहे व त्या नगराचे हे भूतवन आहे असे मनात दृढ करून ठेव. या भूतवनात या सात शिला पडल्या आहेत. त्या एकीवर दुसरी, दुसरीवर तिसरी अशा क्रमाने जो ठेवील त्याला चक्रवर्तित्व प्राप्त होईल अशी सर्वज्ञदेवाची आज्ञा आहे. हे त्याचे वचन ऐकून या कुमाराने त्या शिला क्रमाने एकीवर दुसरी अशारीतीने स्थापिल्या ॥ ६५-६७ ।। त्या कुमाराचे हे साहस पाहून तो विद्याधर महानगराच्या राजाला हे वृत्त सांगण्यास गेला व कुमारही खिन्नमनाने तेथून निघाला. एका झाडाच्या खाली जिचे शरीर कुरूप आहे व जी म्हातारी आहे अशी एक स्त्री बसली होती. तिला प्रिय भाषण करणाऱ्या कुमाराने असे विचारले- पुष्कलावती देशाकडे कोणता मार्ग जातो सांग. कारण जाण्याच्या मार्गावाचून जाणे, प्रवास करणे शक्य नसते. तेव्हा ती स्त्री म्हणाली, तो मार्ग दोनशे कोस उंच अशा विजयार्धपर्वताच्या पलीकडे आहे. ते तिचे भाषण ऐकून कुमार पुनः म्हणाला, तेथे पोहचण्याचा उपाय कोणता तो सांग. तेव्हा ती सांगू लागली, "या जंबूद्वीपामध्ये वत्सकावती नांवाचा देश आहे. त्यातील विजयार्धपर्वतावर राजपुरशहरात विद्याधरचक्रवर्ती धरणिकम्पाची पट्टराणी जणु चन्द्राची चन्द्रिका आहे अशी सुन्दर प्रभावती नांवाची आहे ॥ ६८-७३ ॥ ___ त्या दोघांची मी कन्या आहे. सुखावती नांवाने मी प्रसिद्ध आहे. जातिविद्या, कुलविद्या आणि सिद्धविद्या अशा ज्या मोठ्या तीन विद्या त्या मला पूर्ण अवगत झाल्या आहेत. एके दिवशी मी वत्सकावती देशातील विजया पर्वताच्या पृथ्वीतलावर अकम्पनराजाची कन्या जिचे पिप्पला असे नांव आहे तिच्याकडे मी गेले होते. ती माझी प्राणाप्रमाणे आवडती मैत्रीण आहे ॥ ७४-७५ ॥ Page #683 -------------------------------------------------------------------------- ________________ ६७२) महापुराण (४७-७६ ममाभिवीक्षितुं तत्र चित्रमालोक्य कम्बलम् । कथयायं कुतस्त्यस्ते तन्वीति प्रश्नतो मम ॥ ७६ जगाद सापि मामेष प्रापादेशवशादिति । कम्बलप्राप्तितस्तद्वन्तं समाध्याय विह्वलाम् ॥ ७७ एतां तस्याः सखीकृत्वा समन्वेष्टुं समागता । काञ्चनाख्यपुरानाम्ना मदनादिवती तदा ॥ ७८ दृष्ट्वा तत्कम्बलस्यान्ते निबद्धां रत्नमुद्रिकाम् । तत्र श्रीपालनामाक्षराणि चादेशसंस्मृतेः ॥ ७९ अकायसायकोद्भिन्नहृदयाभूदहं ततः । कथं वैद्याधरं लोकमिमं श्रीपालनामभत् ॥ ८० समागतः स इत्येतन्निश्चेतुं पुण्डरीकिणीम् । उपगत्य जिनागारे वन्दित्वा समुपस्थिता ॥ ८१ त्वत्प्रवासकथां सर्वां तव मातुः प्रजल्पनात् । विदित्वा विस्तरेण त्वामानेष्यामीति निश्चयात् ॥८२ आगच्छन्ती भवद्वार्ता विद्युद्वेगामुखोद्गताम् । अवगत्य त्वया सार्द्ध योजयिष्यामि ते प्रियम् ॥ ८३ न विवाहो विधातव्य इत्याश्वास्य भवत्प्रियाम् । विनिर्गत्य ततोऽभ्येत्य सिद्धकूटजिनालयम् ॥ ८४ अभिवन्द्यागतास्म्येहि मयामा पुण्डरीकिणीम् । मातरं भ्रातां चान्यां स्त्वबन्धुंश्च समीक्षितुम् ॥ ८५ यदीच्छास्ति तवेत्याह सा तच्छुत्वा पुनः कुतः । त्वमेव जरती जातेत्यब्रवीत्स सुखावतीम् ॥८६ कुमारवचनाकर्णनेन वार्धक्यमागतम् । भवतश्च न किं वेत्सीत्यपहस्य तयोदितम् ॥ ८७ मी तेथे एक विचित्र कम्बल (शाल ) पाहिले व हे विचित्र कम्बल हे कृशाङ्गी तुला कोठून बरे मिळाले मला सांग असा प्रश्न मी केला ॥ ७६ ॥ तेव्हा ती देखिल मला असे म्हणाली. मला माझ्या आज्ञेनेच हे कम्बल मिळाले आहे. पण याची प्राप्ति झाल्यापासून ज्याचे ते कंबळ आहे त्याचे चिन्तन करणारी ती माझी सखी व्याकुळ झाली आहे असे तिच्या मैत्रिणीने ऐकले, तेव्हा तिची सखी मदनावती कांचनपुराहून तिला पाहण्यासाठी आली ।। ७७-७८ ।। त्या कंबलाच्या पदराला रत्नाची आंगठी बांधलेली आहे हे मला दिसले आणि तिच्यावर श्रीपालाच्या नांवाची अक्षरे दिसली व मला गुरूच्या आज्ञेचे स्मरण झाले व ज्याला शरीर नाही अशा मदनाच्या बाणानी त्यावेळी माझे हृदय विद्ध झाले ॥ ७९ ॥ व हा श्रीपाल नामधारक पुरुष या विद्याधराच्या देशात कसा आला याचा निश्चय करण्याकरिता मी पुण्डरीकिणी नगरात जाऊन जिनमंदिरात तेथे जिनेश्वरास वंदन केल्यानंतर तेथे थोडा वेळ मी बसल्ये. यानंतर हे श्रीपाला तुझ्या मातेने तुझ्या प्रवासाची सर्व कथा तिने मला सांगितली. ती विस्ताराने जाणून घेऊन तिला आणीन असा निश्चय मी केला. त्या निश्चयाला अनुसरून मी येत होते मार्गात मला विद्युद्वेगेच्या मुखातून आपली सर्व कथा ऐकावयास मिळाली. मी प्रियकराबरोबर तुझी भेट करवीन. तू विवाह करू नकोस असे आपल्या भावी प्रियेला मी विश्वास देऊन समाधान केले. त्यानंतर मी तेथून निघून सिद्धकूट जिनमंदिरात आल्ये व जिनवंदन करून मी आल्ये व त्याला म्हणाले की, माता, भाऊ आणि इतर बंधुजनाना भेटण्याची तुमची इच्छा असेल तर पुण्डरीकिणीपुरीकडे चला. हे सर्व ऐकून मी सुखावतीला विचारिले की, तू इतकी म्हातारी कशी झालीस ? हे कुमाराचे वचन ऐकून मी म्हणाले की, आपणासही तो म्हातारपणा आलेला आहे हे आपण जाणत नाही काय ? असे थट्टा करून ती म्हणाली ॥ ८०-८७ ॥ Page #684 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-१००) महापुराण (६७३ जराभिभूतमालोक्य स्वशरीरमिदं त्वया । कृतमेवंविधं केन हेतुनेत्यनुयुक्तवान् ॥ ८८ तच्छ्रुत्वा साब्रवीदेवं पिप्पलेत्याख्ययोदिता । मदनादिवती या च मैथुनौ विश्रुतौ तयोः ॥ ८९ बलवान्धमवेगाख्यस्तादग्धरिवरोऽपि च । तद्धयात्त्वां तिरोधाय पुरं प्रापयितं मया ॥ ९० मायारूपद्वयं विद्याप्रभावात्प्रकटीकृतम् । कुमार मत्करस्थामृतास्वादफलभक्षणात् ॥ ९१ विगतक्षच्छमः शीघ्र मामारुह्य पूरं प्रति । व्रजेति सोऽपि तच्छरुत्वा स्त्रियो रूपममामकम ॥ ९२ न स्पशामि कथं चाहमारोहामि पुरा गुरोः । सन्निधावाददामोदृग्व्रतमित्यब्रवीदिदम् ॥ ९३ सा तदाकर्ण्य सञ्चिन्त्य कि जातमिति विद्यया । गृहीत्वा पुरुषाकारमुद्वहन्ती तमित्वरी ॥ ९४ वन्दित्वा सिद्धकूटाख्यं तत्र विश्रान्तये स्थिता । तस्मिन्नेव दिने भोगवती शशिनमात्मनः॥ ९५ प्रविश्य भवनं कान्त्या कलाभिश्चाभिवद्धितम् । विवर्तमानमालोक्य स्वप्नेऽमाङ्गल्यशान्तये ॥९६ तत्सिद्धकूटपूजार्थं कान्ता कान्तवती सती । रत्नवेगासुवेगामितमती रतिकान्तया ॥ ९७ सहिता चित्तवेगाख्या पिप्पला मदनावती । विद्युद्वेगा तथैवान्यास्ताभिः सा परिवारिता ॥ ९८ समागत्य महाभक्त्या परीत्य जिनमन्दिरम् । यथाविधि प्रणम्येशं सम्पूज्य स्तोतुमुद्यता ॥ ९९ ताश्च तासां तदा व्याकुलीभावमपि चेतसः। तस्मिन् शिवकुमारस्य वक्रताक्रान्तमाननम् ॥१०० आपले शरीर म्हातारपणाने कान्तिरहित झालेले आहे हे श्रीपालाने पाहिले व माझे हे शरीर असे करण्यात तुझा हेतु काय आहे असे त्याने तिला विचारले. तो प्रश्न ऐकून तिने असे उत्तर दिले- ज्या पिप्पलेचा व मदनावतीचा मागे उल्लेख केला आहे त्या दोघींचे जे दोन मेहुणे आहेत ते अतिशय बलवान् आहेत. त्यांची नांवे धूमवेग आणि हरिवर अशी आहेत. त्यांच्या भीतीने तुम्हाला गुप्त करून त्या नगराकडे तुम्हाला नेण्यासाठी विद्येच्या प्रभावाने मी दोन रूपे प्रकट केली आहेत. हे कुमारा, आपण माझ्या हातातील अमृताप्रमाणे स्वाद असलेले हे फल खा म्हणजे आपणास भुकेपासून बाधा-थकवा येणार नाही आणि माझ्यावर आरोहण करा म्हणजे आपणास शीघ्र नगराकडे जाता येईल. हे तिचे भाषण ऐकून कुमार म्हणाला जी स्त्री माझी नाही त्या स्त्रीला मी स्पर्शही करणार नाही मग तिच्यावर आरोहण कसे करीन ? पूर्वी मी गुरूच्या जवळ अशारीतीचे व्रत घेतले आहे. असा त्याने आपल्या व्रताचा खुलासा केला ।। ८८-९३॥ तिने त्याचे भाषण ऐकले व कांही हरकत नाही असा विचार करून तिने विद्येच्या र धारण केला व त्या कुमाराला आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. सिद्धकट जिनमंदिरात येऊन तिने तेथे जिनवंदना केली व तेथे तिने विसावा घेतला. त्याच दिवशी भोगवतीने कान्तीने व कलानी वद्धिंगत झालेला चन्द्र आपल्या घरात प्रवेश करून तो पुनः तेथून परत जात आहे असे स्वप्न पाहिले. तेव्हा त्यापासून होणाऱ्या अमांगल्याचा परिहार व्हावा म्हणून सिद्धकूटाचे पूजन करावे असे तिने ठरविले व सुन्दर अशी कान्तवती, रत्नवेगा, सुवेगा, अमितमति, रतिकान्ता, चित्तवेगा, पिप्पला, मदनावती, विद्युद्वेगा व अन्यही पुष्कळ मैत्रिणीसह भोगवती सिद्धकूटाचे पूजन महाभक्तीने करण्यासाठी आली. तिने जिनमन्दिराला प्रदक्षिणा घातल्या, विधीला अनुसरून जिनेश्वराला नमस्कार केला, पूजन केले व स्तुति करण्यास उद्युक्त झाली ॥ ९४-१०० ॥ म. ८८ Page #685 -------------------------------------------------------------------------- ________________ ६७४) आदिष्ट सन्निधानेन विलोक्य प्रकृतिं गतम् । सुखावती तदुद्देशादपनीय कुमारकम् ॥ १०१ स्थानेऽन्यस्मिन्व्यधादेनं तत्राप्यम्बुनि मुद्रया । स्वरूपं कामरूपिण्या प्रेक्षमाणं यदृच्छया ।। १०२ दृष्ट्वा हरिवरस्तस्मान्नीत्वा कोपात्स पापभाक् । निचिक्षेप महाकालगुहायां विहितायकम् ॥ १०३ वसंस्तत्र महाकालस्तं गृहीतुमुपागतः । तस्य पुण्यप्रभावेन सोऽप्यकिञ्चित्करो गतः ॥ १०४ तत्र शय्यातले सुप्त्वा शुचौ मृदुनि विस्तृते । परेद्युनिर्गतं तस्याः सुप्रयुक्तैः परीक्षितुम् ॥ १०५ आदिष्टपुरुषं भृत्यैर्ज्ञात्वाभ्येत्य निवेदितम् । गृहीत्वा स्थविराकारं कोपपावकदीपितः ॥ १०६ तं वीक्ष्य धूमवेगाख्यः खगश्चन्द्रपुराद्बहिः । श्मशानमध्ये पाषाणनिशातविविधायुधैः ।। १०७ न्यगृह्णात्तानि चास्यासन् पतन्ति कुसुमानि वा । परोऽपि खेचरस्तत्र नरेशोऽतिबलाह्वयः ॥ १०८ स्वदेव्यां चित्रसेनायां भृत्ये दुष्टतरे सति । तं निहत्यादहत्तस्मिन्धूमवेगो निघाय तम् ॥ १०९ कुमारं चागमत्तत्र महौषधजशक्तितः । निराकृतज्वलद्वह्निशक्तिस्तस्मात्स निर्गतः ॥ ११० महापुराण ( ४७-१०१ त्यावेळी त्यांच्या अन्तःकरणाचा व्याकुलपणा व्यक्त होत होता. त्याच जिनमंदिरात शिवकुमार नामक राजपुत्र उभा होता व त्याचे तोंड वाकडे झाले होते. पण श्रीपालकुमाराचे तेथे आगमन झाल्यामुळे त्याच्या सान्निध्याने त्याचे तोंड सरळ झाले. त्यावेळी सुखावतीने त्या स्थानापासून त्या मुलाला अन्यस्थानी नेले ॥ १०१ ॥ कामरूपिणीमुद्रेच्या द्वारे आपले रूप तो श्रीपाल पाण्यामध्ये बघत असता तेथे हरिवराला तो दिसला. कोपाने तप्त होऊन पापी अशा त्याने पुण्ययुक्त अशा त्याला महाकाल नामक गुहेत टाकले ॥ १०२ ॥ त्या गुहेत राहणारा महाकाल त्याला पकडण्यासाठी आला पण त्याच्या पुण्यप्रभावाने तो त्याला मारण्यास असमर्थ होऊन तेथून तो निघून गेला ॥ १०३ ॥ त्या गुहेत स्वच्छ, मऊ व विस्तृत अशा शय्येवर झोपून दुसरे दिवशी तो तेथून बाहेर पडला. जरी त्या श्रीपालाला वृद्धाचे रूप प्राप्त झाले होते तरी त्याला ओळखण्यासाठी त्याची परीक्षा करण्यासाठी ठेवलेल्या नोकरानी येऊन त्याला ओळखले व त्याविषयी त्यानी धूमवेगला निवेदन केले. तेव्हा तो धूमवेग कोपरूपी अग्नीने प्रज्वलित झाला आणि चन्द्रपुराच्या बाहेर श्मशानात पाषाणावर घासून ज्याना धार दिली आहे अशा अनेक तीक्ष्ण आयुधानी त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण ती आयुधे याच्यावर फुलासारखी पडली. त्या आयुधापासून त्याला तिळमात्रही इजा झाली नाही. या कथेशी सम्बन्ध असलेली दुसरी कथा येथे अशी आहे - अतिबल नांवाचा दुसरा एक विद्याधरराजा होता. त्याच्या राणीचे नांव चित्रसेना होते. तिच्याविषयी एका नोकराने काही दुष्टपणा केला होता. त्यामुळे त्याला राजाने ठार मारून त्याला जाळले. तेव्हा धूमवेगाने त्याच्या चितेवर श्रीपाल कुमाराला ठेवले व आपण तेथून निघून गेला पण तेथे महौषधीच्या सामर्थ्याने त्या अग्नीचे सामर्थ्य नष्ट झाले आणि तो तेथून निघून गेला ।। १०४-११० ।। Page #686 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-१२२) महापुराण (६७५ हतानुचरभार्यास्य काचिन्निरपराधकः । हतो नृपेण मद्भुर्तेत्यस्य शुद्धिप्रकाशिनी ॥ १११ तत्कुमारस्य संस्पर्शानिःशक्ति सा हुताशनम् । विदित्वा प्राविशदृष्ट्वा कुमारस्तां सकौतुकः ॥ अभेद्यमपि वज्रेण स्त्रीणां मायाविनिर्मितम् । कवचं दिविजेशा च नीरन्ध्रमिति निर्भयः ॥ ११३ स्थितस्तत्र स्मरन्नेवं सुता तन्नगरेशिनः । राज्ञो विमलसेनस्य वत्यन्तकमलाह्वया ॥ ११४ कामग्रहाहिता तस्यास्तद्ग्रहापजिहीर्षया । जने समुदिते सद्यः कुमारस्तमपाहरत् ॥ ११५ सत्योऽभूत्प्राक्तनादेश इति तस्मै महीपतिः । तुष्ट्वा तां कन्यकां दित्सुस्तस्यानिच्छां विबुध्य सः॥ अभ्यणं बन्धुवर्गस्य नेयोऽयं भवता द्रुतम् । यत्नेनेत्यात्मजं स्वस्य वरसेनं समादिशत् ॥ ११७ नीत्वा सोऽपि कुमारं तं विमलाविपुरो बहिः । वने तृष्णोपसन्तप्तं स्थापयित्वा गतोऽम्बुने ॥ ११८ तदा सुखावती कुब्जा भूत्वा कुसुममालया। परिस्पृश्य तृषां नीत्वा कन्यकां तं चकार सा ॥ ११९ धूमवेगो हरिवरश्चैतां वीक्ष्याभिलाषिणी । अभूतां बद्धमात्सयों तस्याः स्वीकरणं प्रति ॥ १२० द्वेषवन्तौ तदालोक्य युवयोविग्रहो वृथा। पतिर्भवत्वसावस्या यमेषाभिलषिष्यति ॥ १२१ इति बन्धुजनार्यमाणो वैराद्विरेमतुः । स्त्रीहेतोः कस्य वा न स्यात्प्रीतिघातः परस्परम् ॥ १२२ राजाने ज्या नोकराला मारले होते त्याच्या पत्नीने आपला पति निरपराध होता म्हणून त्याची शुद्धि प्रकट करावी असा हेतु मनात धरला व कुमाराच्या स्पर्शाने शक्तिरहित अग्नि झाला आहे असे तिने जाणले व त्या अग्नीत तिने प्रवेश केला. हे दृश्य कुमाराने कौतुकाने पाहिले ॥ १११-११२ ॥ स्त्रियांच्या मायेने निर्माण केलेले, कपटरूपी कवच देवांचा स्वामी अशा इन्द्राकडूनही फोडता येणार नाही कारण त्याला कोठे छिद्रच नाही असा विचार करीत तो तेथे निर्भयपणाने राहिला ॥ ११३ ॥ इकडे त्या नगराच्या राजाविमलसेनाची कमलावती नांवाची मुलगी होती. तिला कामरूपपिशाचाची बाधा होती व त्या पिशाचाला दूर करण्यासाठी लोक जमले होते व त्यावेळी कुमार तेथे गेला व त्याने त्या पिशाचाला काढून टाकले. त्यामुळे पूर्वी सांगितलेला निमित्तज्ञान्याचा आदेश सत्य झाला. तेव्हा विमलसेन राजा आनंदित होऊन आपली मुलगी त्या कुमाराला देण्यास तयार झाला पण कुमाराची तिचा स्वीकार करण्याची इच्छा नाही हे यावर त्याने त्या कुमाराचे जे बन्धवर्ग आहेत त्यांच्याकडे त्याला यत्नाने पाठविण्यास त्याने आपल्या वरसेन नामक पुत्राला आज्ञा दिली ॥ ११४-११७ ॥ वरसेनाने त्या कुमाराला विमलपुराच्या बाहेर एका वनात नेले. तेथे कुमाराला फार तहान लागली. त्या वनात त्याने कुमाराला बसविले व स्वतः पाण्यासाठी गेला. त्यावेळी सुखावती कुबडी होऊन तेथे आली. पुष्पाच्या मालेने त्याला स्पर्श करून तिने त्याला तहानेने रहित केले आणि त्याला कन्या बनविले ॥ ११८-११९ ॥ तेथे धूमवेग व हरिवर यांनी त्या कन्येला पाहिले व त्यांच्या मनात तिची अभिलाषा उत्पन्न झाली. एकमेकात तिला ग्रहण करण्यासाठी मत्सर उत्पन्न झाला. ते द्वेषी होऊन एकमेकाशी लढण्यास उद्युक्त झाले. तुमचे हे लढणे व्यर्थ आहे. ज्याला ही कन्या इच्छील तो तिचा पति होवो असे बंधुजन म्हणाले. तेव्हा ते युद्धापासून परावृत्त झाले, बरोबरच आहे की, स्त्रीमुळे एकमेकात कोणाच्या बरे प्रीतीचा नाश होत नाही ? ॥ १२०-१२२ ।। Page #687 -------------------------------------------------------------------------- ________________ ६७६) महापुराण (४७-१२३ कन्याकृत्यैव गत्वातः कान्तया स सुकान्तया । रतिकान्ताख्यया कान्तवत्या च सहितः पुनः ॥१२३ स्थितः प्राक्तनरूपेण काचित्तं वीक्ष्य लज्जिता । रति समागमत्काचिन्नकभावा हि योषितः ॥ १२४ प्रसुप्तवन्तं तं तत्र प्रत्यूषे च सुखावती । यत्नेनोद्धृत्य गच्छन्ती तेनोन्मीलितचक्षुषा ॥ १२५ विहाय मामिहैकाकिनं त्वं क्व प्रस्थितेति सा । पृष्टा न क्वापि याताहं त्वत्समीपगता सदा ॥ १२६ आदिष्टो वनितारत्नलाभो नैवात्र ते भयम् । इत्यन्तहितरूपाद्य स्वरूपेण समागमः ॥ १२७ इत्याह तद्वचः श्रुत्वा प्रमुचैत्य खगाचले। पुरं दक्षिणभागस्थं गजादि तत्समीपगम् ॥ १२८ कञ्चिद्गजपति स्तम्भमुन्मूल्यारूढदर्पकम् । द्वात्रिंशदुक्तको डाभिः क्रीडित्वा वशमानयत् ॥ १२९ ततः समुदिते चण्डदोधितौ निजिताद्गजात् । कुमारागमनं पौरा बुद्ध्वा सन्तुष्टचेतसः ।। १३० प्रतिकेतनमुबद्धचलत्केतुपताकिकाः । प्रत्युद्गममकुर्वस्ते तत्पुण्योदयचोदिताः ॥ १३१ ततो नभस्यसौ गच्छन्कञ्चिद्धयपुरे हयम् । स्थितं प्रदक्षिणीकृत्य स्वं पश्यन्नात्तविस्मयः ॥ १३२ .................... यानंतर कन्येच्या आकृतीनेच पुढेही सुखावतीने त्याला तेथे नेले, जेथे कान्ता, सुकान्ता, रतिकान्ता आणि कान्तवती या कन्या होत्या. तेथे तो पुनः पूर्वरूपाचा पुरुषरूपाचा बनला. त्या रूपात त्याला पाहून कोणी स्त्री लज्जित झाली व कोण्या स्त्रीत प्रेम उत्पन्न झाले व हे असे अनेक भाव उत्पन्न होणे साहजिक आहे. कारण स्त्रियामध्ये अनेक भाव उत्पन्न होतात ॥१२३-१२४॥ श्रीपाल रात्री तेथेच झोपला व सकाळी सुखावती त्याला यत्नाने उचलून नेत असता त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले व मला एकट्याला येथे सोडून तू कोठे गेले होतीस असे त्याने तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली मी तुला सोडून कोठेच गेल्ये नव्हते. नेहमी मी तुझ्याजवळच बसल्ये होते ।। १२५-१२६ ।। हे कुमारा, येथे तुला स्त्रीरत्नाचा लाभ होणार आहे म्हणून येथे तुला भय नाही. म्हणन मी माझे रूप गप्त केले होते व आता मी स्वरूप धारण केले आहे असे ती सुखावती बोलली. ते तिचे भाषण ऐकन तो आनंदित झाला. यानंतर ते विजयार्द्धपर्वतावर दक्षिणभागी जवळ असलेल्या गजपुराजवळ आले ।। १२७-१२८ ॥ ज्याने बांधण्याचा खांब उपटला आहे व जो मदाने उन्मत्त झाला आहे अशा एका मोठ्या हत्तीला बत्तीस प्रकारच्या क्रीडानी खेळवून त्या कुमाराने वश केले ॥ १२९ ॥ यानंतर सूर्योदय झाला. ज्याला जिंकले आहे अशा हत्तीवर बसून कुमाराचे आगमन झाले आहे असे जाणून नगरवासी लोकाना फार आनंद वाटला. त्यानी आपआपल्या घरी ज्यांच्या पताका, वान्याने उडत आहेत असे ध्वज उभारले होते व कुमाराच्या पुण्योदयाने प्रेरित होऊन त्यानी त्याचे स्वागत केले ।। १३०-१३१ ॥ यानंतर आकाशातून जात जात तो कुमार हयपुर नगराला आला. तेथे एक घोडा कुमाराला प्रदक्षिणा घालून त्याच्याजवळ उभा राहिला. त्याला पाहून कुमाराला आश्चर्य वाटले ॥ १३२ ॥ Page #688 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-१४१) (६७७ तत्रापि विदितादेशैर्नागरैः प्राप्तपूजनः । पुनस्ततोऽपि निष्क्रम्य समागच्छन्निजेच्छया ॥ १३३ चतुर्जनपदाभ्यन्तरस्थसीममहाचले । जने महति सम्भूय स्थिते केनापि हेतुना ॥ १३४ कस्यचित्कोशतः खड्गं कस्मिश्चिदपि यत्नतः । सत्यशक्ते समुत्खातुं तं समुद्गीयं हेलया ॥ १३५ कुमारः प्राहरद्वंशस्तम्बं सम्भृतवंशकम् । तदालोक्य जनः सर्वः प्रमोदादादरं व्यधात् ॥ १३६ तत्र कश्चित्समागत्य मूकः समुपविष्टवान् । प्रप्रणम्यकुमारं तं जयशब्दपुरःसरम् ।। १३७ १ कुणिश्च कश्चिवङगुल्या प्रसारितकराङगुलिः । अञ्जल मुकुलीकृत्य समीपे समुपस्थितः ॥ १३८ यो मणिपाकाय समुद्युक्तस्तदा मुदा । तेषां पाके व्यलोकिष्ट कुमारं विनयेन सः ॥ १३९ प्रागुक्त करवालेशः पुरेऽभूद्विजयाह्वये । सोऽस्य सेनापतिर्भावी भविष्यच्चक्रवर्तिनः ॥ १४० तत्पुरे वरकीर्तीष्टकीर्तिमत्यात्मजापने । खड्गोत्पाटनमादेशस्तस्य श्रीपाल चक्रिणः ॥ १४१ महापुराण तेथेही ज्यानीं नैमित्तिकाचा आदेश जाणला आहे अशा नागरिकानी त्याचा आदर केला. पुनः तेथूनही आपल्या इच्छेला अनुसरून तो निघाला. पुढे जात जात चार देशाच्या मध्यसीमेमध्ये एक मोठा पर्वत होता तेथे तो आला. त्या ठिकाणी काही कारणाने फार लोक एकत्र येऊन उभे राहिले होते. तेथे कोणी तरी कोणाच्या म्यानातून खड्ग बाहेर काढण्याचा यत्न करीत होता. पण यत्न करूनही कोशातून तो खड्ग काढू शकला नाही. पण या कुमाराने त्या कोशातून तो खङ्ग सहज काढला व ज्यात पुष्कळ वेळू एकत्र वाढले होते अशा वेळूच्या खांबावर कुमाराने खड्गाचा प्रहार केला तेव्हा सर्व लोकानी ते त्याचे कृत्य पाहून अतिशय आनंदाने त्याचा आदर केला ।। १३३-१३६ ।। तेथे त्यावेळी कोणी मुका मनुष्य आला. त्याने जय शब्द उच्चारून कुमाराला नमस्कार केला व तो जवळ बसला ॥ १३७ ॥ कोणी एका बोटाने थोटा असलेला मनुष्य आला त्याने आपल्या हाताची बोटे पसरून नंतर कळीप्रमाणे आपले दोन हात जोडले व तो श्रीपालाच्या पुढे बसला ।। १३८ ।। एक मनुष्य हिरे शिजविण्याकरिता उद्युक्त झाला व ते हिरे जेव्हा शिजले तेव्हा आनंदाने व विनयाने त्याने कुमाराला पाहिले ।। १३९ ।। पूर्वी ज्याचा उल्लेख केला आहे असा खड्गाचा मालक जो विजयनामक नगरात होता. तो भविष्यच्चक्रवर्तीचा श्रीपालाचा भावी सेनापति होय ॥ १४० ॥ त्याच विजयपुर नगराचा राजा जो वरकीर्ति व राणी कीर्तिमती या दोघाना एक कन्या होती. तिच्या वराविषयी निमित्तज्ञान्यानी असे सांगितले होते की, हिचा वर श्रीपाल चक्रवर्ती होईल व याला ओळखण्याचे चिह्न असे की, तो म्यानातून तरवार उपसून बाहेर काढील ॥ १४१ ॥ Page #689 -------------------------------------------------------------------------- ________________ ६७८) महापुराण (४७-१४२ मूकः श्रेयःपुरे जातस्तस्य भावी पुरोहितः । शिवसेनमहीपालः श्रीमांस्तनगरेश्वरः ॥ १४२ बीतशोकाया तस्य तनुजा वनजेक्षणा । मूकभाषणमादेशः कुमारस्य तदायने ॥ १४३ कुणिः शिल्पपुरोत्पन्नः स्थपतिस्तस्य भाव्यसौ । नाम्ना नरपतिस्तत्पुरेशो नरपतेः सुता ॥ १४४ रत्यादिविमला साद्धं तयेतस्य समागमः । अडागुलिप्रसरादेशात्स्मरव्ययदया चिरम् ॥ १४५ स वज्रमणिपाक्यस्य प्रधानपुरुषो भवेत् । तस्य धान्यपुरे जातिविशालस्तत्पुराधिपः ॥ १४६ सुता विमलसेनास्य श्रीपालस्य तदाप्तये । आदेशस्तस्य तद्वज्रमणिपाको महौजसः ॥ १४७ इत्यादेशानरं ज्ञात्वा सर्वे स्वं स्वं पुरं ययुः । तदा कुमारमूढ़वायानभोभागे सुखावती ॥ १४८ धूमवेगो विलोक्यनं विद्विषो भीषणारवः । अभितय॑ स्थितो रुद्ध्वा खे खेटकयुतासिभृत् ॥ १४९ तदा पूर्वोदितार्चायां देवता यास्य पालिका । सा विद्याधररूपेण समुपेत्य सुखावतीम् ॥ १५० मुक्त्वा कुमारमभ्येत्य विभीविद्याधराधमम् । नियुध्य विजयस्वेति निजगाद निराकुलम् ॥ १५१ सापि मुक्त्वा कुमारं तं धूमवेगं रणाङ्गणे । चिरं युद्ध्वा स्वविद्याभिधरौत्सोच्छौर्यशालिनी ॥१५२ जो श्रेयःपुर नगरात मुका जन्मलेला आहे तो या श्रीपालाचा भावी पुरोहित आहे व त्याच श्रेयःपुर नगराचा स्वामी राजा शिवसेनाची कन्या जिचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत अशी वीतशोका कन्या या श्रीपालाची पत्नी होईल ।। १४२ ।।। __ ज्याची अंगुलि वाकडी आहे असा हा मनुष्य शिल्पपुर नगरात उत्पन्न झालेला होता व हा श्रीपालाचा भावी स्थपतिरत्न-सुतार आहे. शिल्पपुराचा राजा जो नरपति त्याची जी रतिविमला नामक कन्या तिच्याबरोबर याचा समागम होईल आणि तिला पाहण्याने याची बोटे सरळ होतील व त्याच्याबरोबर कामक्रीडा करणा-या हिचा चिरकाल समागम राहील असे निमित्तज्ञान्यानी सांगितले आहे ।। १४३-१४५ ।। ज्याने हिरे शिजवून त्यांचे भस्म केले होते तो मनुष्य या श्रीपालाचा प्रधापुनरुषसचिव-मंत्री होणारा आहे व धान्यपुर नगरात याचा जन्म झाला आहे. या धान्यपुराचा राजा विशाल नांवाचा आहे व या राजाच्या कन्येचे नांव विमलसेना असे आहे व ती या श्रीपालाची पत्नी होईल. ज्याच्या येण्याने हिन्यांचा पाक-भस्म होईल असा आदेश निमित्तज्ञान्यानी दिला आहे त्या तेजस्वी राजाची-श्रीपालाची ही पत्नी होईल ।। १४६-१४७ ॥ याप्रमाणे निमित्तज्ञान्याच्या आदेशाला अनुसरून त्या पुरुषाला-श्रीपालाला ओळखून ते सगळे आपआपल्या नगराला गेले तेव्हा सुखावती कुमाराला आपल्या खांद्यावर घेऊन आकाशात गेली ॥ १४८ ॥ ___ त्यावेळी धूमवेग शत्रूने त्याला पाहिले व भयंकर गर्जना करून त्याने त्याचा तिरस्कार केला आणि हातात ढाल व तरवार घेऊन त्या कुमाराला आडवून युद्धासाठी उभा राहिला. त्यावेळी पूर्वी जिचे वर्णन केले आहे अशा प्रतिमेमध्ये या श्रीपालाचे रक्षण करणारी जी देवता होती ती विद्याधररूपाने प्रकट झाली व सुखावतीला सोडून त्या कुमाराजवळ आली व भयरहित होऊन या विद्याधराबरोबर युद्ध करून विजयी हो असे सुखावतीला म्हणाली. कुमारही निराकुल-निर्भय होता. त्यावेळी सुखावतीने कुमाराला सोडून दिले व शौर्याने शोभणाऱ्या अशा तिने दीर्घकालपर्यन्त धूमवेगाबरोबर विद्यांच्या साहाय्याने लढून त्याला अडवून ठेविले ॥ १४९-१५२ ।। Page #690 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-१६३) महापुराण - (६७९ कुमारोऽपि समीपस्थशिलायां धरणीधरे । शनैः समापतत्तस्य देवश्रीजननी पुरा ॥ १५३ यक्षीभूता तदागत्य संस्पृशन्ती करेण तं । अपास्यास्य श्रमं मंक्षु कुमारं प्रविश ह्रदम् ॥ १५४ जगादैनमिति श्रुत्वा सोऽपि विश्वस्य तद्वचः। प्रविश्य तं शिलास्तम्भस्योपरि स्थितवान्निशि ॥१५५ कुर्वन्पञ्चनमस्कारपदानां परिवर्तनम् । प्रभाते तदुदग्भागे जिनेन्द्रप्रतिबिम्बकम् ॥ १५६ विलोक्य कृतपुष्पादिसम्पूजननमस्क्रियः । सहस्रपत्रमम्भोज चक्ररत्नं सकूर्मकम् ॥ १५७ आतपत्रं सहस्रोरुफणं च फणिनां पतिम् । दण्डरत्नं समण्डूकं नकं चूडामणि तथा ॥ १५८ चर्मरत्नं स्फुरद्रक्तवृश्चिकं काकिणीमणिम् । ईक्षाञ्चक्रे स पुण्यात्मा तत्र यक्ष्युपदेशतः ॥ १५९ तदा मुदितचित्तः सन् छत्रमुद्यम्य दण्डभृत् । प्रद्योतमानरत्नोपानको यक्षीसमर्पितः ॥ १६० सर्वरत्नमर्यदिव्यभूषाभेदैविभूषितः । निर्जगाम गुहातोऽसौ तदैवेत्य सुखावती ॥ १६१ धूमवेगं विनिजित्य प्रतिपद्वा हिमद्युतिम् । वृद्ध्यै कुमारमापन्ना सफलासिलतान्विता ॥ १६२) एतया सह गत्वातः सम्प्राप्य सुरभूघरम् । गुणपालजिनाधीशसभामण्डलमाप्तवान् ॥ १६३ ___ तो कुमार देखिल त्या पर्वतावर जी जवळच शिला होती तिच्यावर हळूहळू येऊन पडला. त्यावेळी त्याची जी मागच्या जन्मी माता होती ती यक्षी झाली होती. ती तेव्हा त्याच्याकडे आली व आपल्या हातानी त्याच्या अंगाला उत्तम स्पर्श करून त्याचे श्रम तिने दूर केले व ती त्याला हे कुमार तू शीघ्र या डोहात प्रवेश कर असे म्हणाली. ते तिचे बोलणे ऐकून व त्यावर विश्वास ठेवून त्याने त्या डोहात प्रवेश केला. यानंतर तो रात्री त्या शिलास्तंभावर बसून राहिला व त्याने रात्री सतत पंचनमस्काराचे परिवर्तन केले. प्रातःकाली उत्तर दिशेकडे जिनेश्वराचे प्रतिबिम्ब पाहून त्याचे त्याने पुष्पादिकानी पूजन केले व वन्दन केले. यानंतर पुण्यात्मा अशा त्या श्रीपाल कुमाराने यक्षीच्या उपदेशाने सहस्रपत्रानी-पाकळयानी युक्त असे कमल चक्ररूप होत आहे असे पाहिले. कासवाने सहित असे छत्र, ज्याला हजार मोठ्या फणा आहेत असा नागेन्द्र. बेड़काने सहित असे दण्डरत्न व सुसरीने शोभणारें चूडामणिरत्न चमकणाऱ्या लाल विंचवाने सहित असे चर्मरत्न व काकिणी रत्न ही रत्ने पाहिली ॥ १५३-१५९ ॥ त्यावेळी श्रीपालाला आनन्द वाटला. त्याने छत्र उघडून मस्तकावर धारण केले. हातात दण्ड धारण केला. यक्षीने दिलेली सर्व प्रकारच्या रत्नानी बनविलेली भूषणे धारण करून तो फार सुंदर दिसू लागला. अशा रीतीने तो गुहेतून बाहेर पडला. त्याचवेळी सुखावतीही धूमवेगाला जिंकून तेथे आली. जशी प्रतिपदा चन्द्राची वाढ करण्याकरिता चन्द्राचा आश्रय करिते. तशी सुंदर तरवारीने युक्त अशी सुखावती श्रीपालाच्या वैभवाची वृद्धि करण्यासाठी त्याच्याकडे आली. या सुखावतीबरोबर तो सुरगिरि पर्वतावर आला आणि गुणपालजिनेश्वराच्या समवसरणात येऊन पोहोचला ॥ १६०-१६३ ॥ Page #691 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८०) महापुराण (४७-१६४ तत्र तं सुचिरं स्तुत्वा मनोवाक्कायशुद्धिभाक् । मातरं भ्रातरं चोचितोपचारो विलोक्य तौ ॥ १६४ तदाशीर्वादसन्तुष्टः संविष्टो मातृसन्निधौ । सुखावतीप्रभावेण युष्मदन्तिकमाप्तवान् ॥ १६५ क्षेमेणेति तयोरने प्राशंसत्तां नृपात्मजः । सतां स सहजो भावोयत्स्तुवन्त्युपकारिणः ॥ १६६ वसुपालमहीपालप्रश्नाद्भगवतोदितैः । स्थित्वा विद्याधरश्रेण्यां बहुलम्भात्समापिवान् ॥ १६७ ततः सप्त दिनैरेव सुखेन प्राविशत्पुरम् । सञ्चितोजित पुण्यानां भवेदापच्च सम्पदे ।। १६८ वसुपाल कुमारस्य वारिषेणादिभिः समम् । कन्याभिरभवत्कल्याणविधिविविधद्धिकः ॥ १६९ स श्रीपाल कुमारश्च जयवत्यादिभिः कृती । तदा चतुरशीतोष्टकन्यकाभिरलङ्कृतः ।। १७० सूर्याचन्द्रमसौ वा तौ स्वप्रभाव्याप्त दिक्तटौ । पालयन्तौ धराचक्रं चिरं निविशतः स्म शम् ॥ जयावत्यां समुत्पन्नो गुणपालो गुणोज्ज्वलः । श्रीपालस्यायुधागारे चक्रं च समजायत ॥ १७२ तेथे गुणपाल जिनेश्वराची बरेच कालपर्यन्त त्याने स्तुति केली. मन, वचन व शरीराच्या शुद्धीला धारण करून हे प्रभूचे स्तवन त्याने केले. आपल्या मातेला व भावाला पाहून त्यांचा त्याने योग्य आदर केला. त्यांच्या आशीर्वादाने संतुष्ट होऊन तो मातेजवळ बसला आणि सुखावतीच्या प्रभावाने मी आपणाकडे क्षेमाने आलो असे त्याने त्याना सांगितले. बरोबरच आहे की, उपकार करणाऱ्याची सज्जन स्तुति करतात तो त्यांचा जन्मजात गुण आहे ।। १६४-१६६ ॥ वसुपाल महाराजाच्या प्रश्नाचे उत्तरात जे काही भगवंतानी सांगितले होते त्याला अनुसरून त्या श्रीपालाने विद्याधराच्या श्रेणीत राहून पुष्कळ लाभ प्राप्त करून घेतले व सात दिवसानीच सुखाने त्याने आपल्या नगरीत प्रवेश केला. ज्यानी पूर्वजन्मी फार मोठे पुण्य संचित केले आहे त्याना आपत्ति संपत्तिरूपाच्या होतात. अर्थात् या सर्व आपत्ती संपत्तीरूपच बनल्या ।। १६७ - १६८ ।। वसुपाल कुमाराचा वारिषेणा वगैरे अनेक राजकन्याबरोबर मोठ्या व अनेक प्रकारच्या वैभवाने युक्त असा विवाह झाला ।। १६९ ।। तो श्रीपालकुमार देखिल जयावती आदिक चौ-याऐंशी आवडत्या कन्याबरोबर विवाहित झाला व त्यामुळे तो शोभू लागला ।। १७० ।। सूर्य व चन्द्र जसे आपल्या कान्तीनी सर्व दिशांच्या तटाना व्यापून टाकतात, तसे आपल्या कान्तीने ज्यानी सर्व दिशाना व्यापून टाकिले आहे अशा त्या दोन राजानी दीर्घकालपर्यन्त पृथ्वीचे रक्षण केले व त्यानी सुखांचा अनुभव घेतला ।। १७१ ।। श्रीपाल राजापासून जयावती राणीला गुणानी उज्ज्वल असा गुणपालनामक पुत्र झाला व श्रीपालाच्या आयुधशाळेत चक्ररत्न उत्पन्न झाले || १७२ ।। Page #692 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-१८४) महापुराण (६८१ स सर्वाश्चक्रवर्युक्तभोगाननुभवन् भृशम् । शकलीलां व्यलम्बिष्ट लक्ष्मीलक्षितविग्रहः ॥ १७३ अभूज्जयवतीभ्रातुस्तनुजा जयवर्मणः । जयसेनाह्वया कान्त्या सा सेनेव विजित्वरी ॥ १७४ मनोवेगोऽशनिवरः शिवाख्योऽशनिवेगवाक् । हरिकेतुः परे चोच्चः क्षमाभुजः खगनायकाः॥ १७५ जयसेनाख्यमुख्याभिस्तेषां तुग्भिः सहाभवत् । विवाहो गुणपालस्य स ताभिः प्राप्तसम्मदः॥१७६ कदाचित्काललब्ध्यादिचोदिताभ्यर्ण निर्वृतिः। विलोकयन्नभोभागमकस्मादधकारितम् ॥ १७७ चन्द्रग्रहणमालोक्य धिगेतस्यापि चेवियम् । अवस्था संसृतौ पापनस्तस्यान्यस्य का गतिः ।। १७८ इति निविद्य सञ्जातजातिस्मृतिरुदारधीः । स्वपूर्वभवसम्बन्धं प्रत्यक्षमिव संस्मरन् ॥ १७९ पुष्कराद्धेऽपरे भागे विदेहे पद्मकाह्वये । विषये विश्रुते कान्तपुराधीशोऽयमीश्वरः ॥ १८० रथान्तकनकस्तस्य वल्लभा कनकप्रभा। तयोर्भूत्वा प्रभापास्तभास्करः कनकप्रमः॥ १८१ तस्मिन्नन्येद्यरुद्याने दण्टा सण मत्प्रिया। विद्यत्प्रभाहृया तस्या वियोगेन विषण्णवान् ॥ १८२ साधं समाधिगप्तस्य समीपे संयम परम् । सम्प्राप्तवानतिस्निग्धैः पितमातसनाभिभिः॥ १८३ तत्र सम्यक्त्वशुद्धयाविषोडशप्रत्ययान्भृशम् । भावयित्वा भवस्यान्ते जयन्ताख्यविमानजः॥१८४ __ राज्यलक्ष्मीने ज्याच्या देहाला आलिंगिले आहे अशा त्या श्रीपालाने चक्रवर्तीला सांगितलेल्या सर्व भोगांचा पुष्कळ अनुभव घेतला व इन्द्राच्या लीलेचा त्याने आश्रय घेतला ॥ १७३ ॥ ___जयावतीचा भाऊ जो जयवर्मा त्याला जयसेना नांवाची कन्या होती व ती सेनेप्रमाणे सर्वांना जिंकणारी होती ॥ १७४ ।। मनोवेग, अशनिवर, शिव, अशनिवेग, हरिकेतु व इतरही राजे आणि विद्याधरांचे अधिपति, यांच्या कन्याशी गुणपालाचा विवाह झाला व या सर्व कन्यामध्ये जयसेना ही मुख्य होती. या सर्वविवाहित राजकन्यानी गुणपालाला फार आनंद वाटला ।। १७५-१७६ ॥ कोणे एके वेळी ज्याचे मोक्षाला जाणे अतिशय जवळ आले आहे अशा गुणपालाने काललब्ध्यादिकानी प्रेरित होऊन अकस्मात् अन्धकाराने युक्त झालेल्या आकाशाला पाहिले व चन्द्राला ग्रहण लागले आहे असे त्याला दिसले. त्यावेळी अशा या चन्द्राची देखिल अशी अवस्था आहे तर या संसारात पापग्रस्त झालेल्या जीवाची काय दुर्दशा होत असेल ? अशा विचारानी तो गुणपाल संसारापासून भ्याला. त्या महाबुद्धिवन्ताला त्यावेळी जातिस्मरण झाले व त्याला पूर्वभवाचे स्मरण प्रत्यक्षाप्रमाणे झाले ।। १७७-१७९ ॥ पुष्करार्द्धद्वीपाच्या दुसऱ्या भागातील विदेहक्षेत्रात पद्मक नामक प्रसिद्ध देश आहे व त्यातील कान्तपुरामध्ये कनकरथ नामक राजा होता व त्याची पत्नी कनकप्रभा होती. त्या उभयताना ज्याने आपल्या प्रभेने सूर्याला जिंकले आहे असा कनकप्रभ नामक पुत्र झाला. एके दिवशी हा उद्यानात गेला असता विद्युत्प्रभानामक त्याच्या पत्नीला सर्प चावला व त्यामुळे हा अतिशय खिन्न झाला. त्यावेळी अत्यंत प्रेमळ असे माता-पिता व भाऊबंद यांच्यासह समाधि गुप्त मुनीश्वराजवळ अतिशय उत्कृष्ट संयम त्याने धारण केला. त्याने सम्यक्त्वशुद्धि, विनयसंपन्नता आदिक सोळाकारणांच्या उत्कृष्ट भावना भावल्या व त्या जन्माच्या शेवटी जयन्त नामक विमानात तो देव झाला ।। १८०-१८४ ।। म. ८९ Page #693 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८२) महापुराण (४७-१८५ प्रान्ते ततोऽहमागत्य जातोऽत्रवमिति स्फुटम् । समुद्रदत्तेनादित्यगतिर्वायुरथाह्वयः ॥ १८५ श्रेष्ठी कुबेरकान्तश्च लौकान्तिकपदं गताः । बोधितस्तैः समागत्य गुणपालः प्रबुद्धवान् ॥ १८६ मोहपाशं समुच्छिद्य तप्तवांश्च तपस्ततः । घातिकर्माणि निर्मूल्य सयोगिपदमागभूत् ॥ १८७ यशःपालः सुखावत्यास्तनूजस्तेन संयमम् । गृहीत्वा सह तस्यैव गणभृत्प्रयमोऽभवत् ॥ १८८ राजराजस्तदा भूरिविभूत्याभ्येत्य तं मुदा । श्रीपालः पूजयित्वा तु श्रुत्वा धर्म वयात्मकम् ॥ १८९ ततः स्वभवसम्बन्धमप्राक्षीत्प्रश्रयाश्रयः । भगवांश्चेत्युवाचेतिकुरुराजं सुलोचना ॥ १९० निवेदितवती पृष्टा सृष्टवाक्सौष्ठवान्विता । विदेहे पुण्डरीकिण्यां यशःपालो महीपतिः ॥ १९१ तत्र सर्वसमृद्धाख्यो वणिक तस्य मन:प्रिया । धनञ्जयानुजातासौ धनश्रीनिवद्धिनी ॥ १९२ तयोस्तुक्सर्वदयितः श्रेष्ठी तद्भगिनी सती । सज्ञया सर्वदयिता श्रेष्ठिनश्चित्तवल्लभे ॥ १९३ सुता सागरसेनस्य जयसेनासमाह्वया । धनञ्जयवशीशस्य जयदत्ताभिषा परा ॥ १९४ तेथील आयुष्य समाप्त झाल्यावर मी येथे जन्मलो आहे. आपल्या दोघांचा पुत्र झालो आहे. त्यावेळी समुद्रदत्ताबरोबर आदित्यगति, वायुरथ व कुबेरकान्त यानी लौकान्तिकदेवाचे पद धारण केले होते. त्यानी येऊन गुणपालाला उपदेश केला. त्यामुळे तो गुणपाल जागा झाला अर्थात् संसारापासून विरक्त झाला. त्याने मोहपाशाचा नाश केला व तपश्चरण केले. घातिकर्माचा नाश करून सयोगिगुणस्थानाचे पद प्राप्त करून घेतले ॥ १८५-१८७ ॥ सुखावतीच्या यशःपाल नामक मुलाने गुणपालाबरोबर संयम धारण केला व त्याचाच तो पहिला गणधर झाला ॥ १८८ ॥ __सर्व राजांचा राजा श्रीपाल त्यावेळी मोठ्या वैभवाने आणि आनंदाने गुणपाल केवलीकडे आला. त्याने त्यांची पूजा केली व सर्वजीवावर दया करणाऱ्या धर्माचे स्वरूप ऐकिले ।। १८९ ॥ यानन्तर विनययुक्त होऊन त्याने आपल्या जन्माचा संबंध केवलीना विचारला तेव्हां भगवंतानी याप्रमाणे सांगितले असे कुरुराज जयकुमाराला सुलोचना बोलली ॥ १९० ॥ नंतर जयकुमाराने तिला प्रश्न केल्यावर जिची वाणी फार सुंदर व मधुर आहे अशी सुलोचना असे सांगू लागली. विदेहक्षेत्रातील पुंडरीकिणी नगरीत यशःपाल नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याच नगरात सर्वसमृद्ध नांवाचा व्यापारी राहत होता. त्याच्या मनाला आवडणारी व धनवृद्धि करणारी धनश्री त्याची पत्नी होती. ती धनंजयाची धाकटी बहिण होती. या दोघाना- सर्वसमृद्ध आणि धनश्री यांना सर्वदयित नांवाचा मुलगा झाला व त्याच्या बहिणीचे नांव सर्वदयिता हे होते. या सर्वदयिताच्या मनाला आवडणाऱ्या दोन पत्नी होत्या एकीचे नांव जयसेना होते व ती सागरसेनश्रेष्ठीची कन्या होती व धनंजयश्रेष्ठीची कन्या जयदत्ता अशा दोन स्त्रिया या सर्वदयिताला होत्या ॥ १९१-१९४ ॥ Page #694 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-२०५) देवीरनुजा श्रेष्ठपितुस्तस्यां तनूद्भवौ । जातौ सागरसेनस्य सागरो दत्तवाक्परः ॥ १९५ ततः समुद्रदत्तश्च सह सागरदत्तया । सुतौ सागरसेनानुजायां जातमहोदधौ ॥ १९६ जातौ सागरसेनायां दत्तो वैश्रवणादिवाक् । दत्ता वैश्रणादिश्च दायादः श्रेष्ठिनः स तु ॥ १९७ भार्या सागरदत्तस्य दत्ता वैश्रवणादिका । सती समुद्रदत्तस्य सा सर्वदयिता प्रिया ॥। १९८ सा वैश्रवणदत्तेष्टा दत्तान्ता सागराह्वया । तेषां सुखसुखेनैव काले गच्छति सन्ततम् ॥ १९९ यशः पालमहीपालमावर्जितमहाधनः । वणिग्धनञ्जयोऽन्येद्युः सद्रत्नैर्दर्शनीकृतैः ॥ २०० व्यलोकष्ट स भूपोऽपि तस्मे सन्मानपूर्वकम् । प्रीत्या घनं हिरण्यादि प्रभूतमवितोचितम् ॥ २०१ विलोक्य तं वणिक्पुत्राः सर्वेऽपि धनमजितुम् । ग्रामे पुरोपकण्ठस्थे सम्भूय निविवेशिरे ॥ २०२ तन्निवेशादथान्येद्युः स समुद्रादिदत्तकः । रात्रौ स्वगृहमागत्य भार्यासम्पर्कपूर्वकम् ॥ २०३ केनाप्यविदितो रात्रावेव सार्थमुपागतः । काले गर्भं विदित्वास्याः पापो दुश्चरितोऽभवत् ॥ २०४ इति सागरदत्ताख्यस्तया भर्त्तृसमागमं । बोधितोऽप्यपरीक्ष्यासौ स्वगेहात्तामपाकरोत् ॥ २०५ महापुराण (६८३ सर्वदयित श्रेष्ठीचा पिता जो सर्वसमृद्ध श्रेष्ठी त्याच्या धाकट्या बहिणीचे नांव देवश्री होते. तिच्या ठिकाणी सागरसेनाला सागरदत्त व समुद्रदत्त असे दोन पुत्र व सागरदत्ता नांवाची कन्या असे तिघे जन्मले. सागरसेनाची धाकटी बहीण जी सागरसेना तिच्या ठिकाणी ज्यांचा मोठा उत्कर्ष झाला आहे असे दोन पुत्र झाले ।। १९५-१९६ ॥ सागरसेनेच्या ठिकाणी वैश्रवणदत्त हा पुत्र व वैश्रवणदत्ता ही कन्या झाली. हा वैश्रवणदत्त सर्वदयितश्रेष्ठीचा गोत्रज भाऊबंध होता. सागरदत्ताच्या पत्नीचे नांव वैश्रवणदत्ता असे होते व समुद्रदत्ताची भार्या पतिव्रता सर्वदयिता ही होती. सागरदत्ता ही वैश्रवणदत्ताची प्रिय भार्या होती. या सर्वांचा काल सर्वदा अतिशय सुखाने जात असे ।। १९७ - १९९ ॥ ज्याने पुष्कळ धन मिळविले आहे असा धनंजय व्यापारी एके दिवशी यशः पाल राजाकडे आला व त्याने राजाला उत्तम रत्ने भेट म्हणून दिली व राजाचे दर्शन घेतले. राजाने देखिल सन्मानपूर्वक प्रीतीने सुवर्णादिक योग्य धन धनंजयाला दिले ।। २०० - २०१ ॥ हा राजाने त्याचा सन्मान केलेला पाहून बाकीचे वैश्यपुत्र धन मिळविण्यासाठी नगराच्या जवळ असलेल्या ठिकाणी एकत्र जमून गेले ॥ २०२ ॥ त्या गावच्या मुक्कामांतून एके दिवशी समुद्रदत्त हा रात्री आपल्या घरी आला व त्याने आपल्या पत्नीशी संभोग करून कोणाला न समजेल अशा रीतीने पुनः आपल्या मंडळीत गेला. कालान्तराने तिचा गर्भ वाढू लागला हे जाणून हिचे हे पापरूप दुश्चरण केलें असे सागरदत्ताला वाटले. तेव्हा पतिसमागमाने मला गर्भ राहिला आहे असे तिने सांगितले तरीही त्याविषयी त्याने विचार केला नाही व त्याने तिला आपल्या घरातून बाहेर काढले ।। २०३–२०५ ।। Page #695 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८४) ( ४७ - २०६ ततः श्रेष्ठिगृहं याता तेनापि त्वं दुराचरः । नास्मद्गृहं समागच्छेत्यज्ञानात्सा निवारिता ॥ २०६ समीपवर्तिन्येकस्मिन्केतने विहितस्थितिः । नवमासावषो पुत्रमलब्धानल्पपुण्यकम् ॥ २०७ तद्विदित्वा कुलस्यैष समुत्पन्नः पराभवः । यत्र क्वचन नीत्वेनं निक्षिपेत्यनुजीविकः ॥ २०८ प्रत्येयः श्रेष्ठिना प्रोक्त; श्रेष्ठिमित्रस्य बुद्धिमान् । श्मशाने साषितुं विद्यामागतस्य रवयायिनः ॥ २०९ बालं समर्पयामास विचित्रो दुरितोदयः । खगोऽसौ जयधामाख्यो जयभामास्य वल्लभा ॥ २१० तौ भोगपुरवास्तव्य जितशत्रुसमाह्वयम् । कृत्वावर्षयतां पुत्रमिव मत्वौरसं मुदा ॥ २११ तदा पुत्रवियोगेन सा सर्वदयिताचिरात् । स्त्रीवेदनंदनान्मृत्वा सम्प्रापज्जन्म पौरुषम् ॥ २१२ ततः समुद्रदत्तोऽपि सार्थेनामा समागतः । श्रुत्वा स्वभार्यावृतान्तं निन्दित्वा भ्रातरं निजम् ॥२१३ श्रेष्ठिनेऽनपराधाया गृहवेशनिवारणात् । अकुप्यन्नितरां कृत्यं कः सहेताविचारितम् ॥ २१४ ज्येष्ठे न्यायागतं योग्ये मयि स्थितवति स्वयम् । श्रेष्ठित्वमयमध्यास्त इति श्रेष्ठिनि कोपवान् ॥ २१५ महापुराण या नंतर ती सर्वदायिताच्या घरी गेली. पण त्यानेही तूं दुराचरण केलेस म्हणून तू आमच्या घरी येऊ नकोस असे म्हणून त्याने अज्ञानपणाने तिचे निवारण केले. अर्थात् तिला त्याने घरात घेतले नाही ॥ २०६ ॥ तेव्हां तिने एका जवळच्या घरात निवास केला. नऊ महिन्याचा अवधि समाप्त झाल्यावर तिला विपुल पुण्यधारक पुत्र प्राप्त झाला ॥ २०७ ॥ ते जाणून हा पुत्र आपल्या कुलाला कलंक उत्पन्न झाला असे श्रेष्ठीने मानले व त्यानें आपल्या नोकराला याला कोठे तरी नेऊन ठेवून दे असे सांगितले. तेव्हां त्या बुद्धिमान् नोकराने श्मशानात एक श्रेष्ठीचा मित्र विद्याधर विद्यासाध्य करण्यासाठी आला होता. त्याला तो बालक त्याने अर्पण केला. पापाचा उदय विचित्र आहे. ज्याला तो मुलगा दिला त्या विद्याधराचे नांव जयधाम असे होते व त्याच्या पत्नीचे नाव जयभामा असे होते. त्यांनी त्या मुलाला आपला जणु औरस पुत्र आहे असे समजून आनंदाने वाढविले ।। २०८-२११ ।। त्यावेळी ती सर्वदयिता पुत्राच्या वियोगाने लौकरच मरण पावली. तिने स्त्रीवेदाची निंदा केल्यामुळे मरण पावून पुरुष होऊन जन्मली ॥ २१२ ॥ या नन्तर तो समुद्रदत्त देखिल आपल्या व्यापान्यांच्या समूहासह आपल्या घरी आला. त्याला आपल्या पत्नीची सर्व हकीकत समजली. तेव्हां त्याने आपल्या भावाची निंदा केली. आपली पत्नी अपराधी नसताही श्रेष्ठीने आपल्या घरात तिला येऊ दिले नाही म्हणून तो श्रेष्ठीवर अतिशय रागावला. बरोबरच आहे कीं, अविचाराचे कृत्य कोणाला बरे सहन होते ? ।। २१३ - २१४॥ मी ज्येष्ठ भाऊ व श्रेष्ठिपदाला मी योग्य असता व मी जिवंत असता तूं श्रेष्ठीच्या पदावर आरूढ झाला आहेस असे बोलून तो समुद्रदत्त श्रेष्ठीवर रागावला ॥। २१५ ।। Page #696 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-२२६) महापुराण (६०५ स वैश्रवणदत्तोऽपि स ससागरदत्तकः । साधं समुद्रदत्तेन मात्सर्याच्छेष्ठिनःस्थिताः ॥ २१६ दुस्सहे तपसि श्रेयो मत्सरोऽपि क्वचिन्नृणाम् । अन्येजितशत्रु तं दृष्ट्वा श्रेष्ठी कुतो भवान् ॥२१७ समुद्रवत्तसारूप्यं वत्संसदमागतः । इति पप्रच्छ सोऽप्यात्मागमनक्रममब्रवीत् ॥ २१८ मान्यो मदागिनेयोऽयमिति तस्तसंस्थिताम् । मुद्रिका वीक्ष्य निश्चित्य निःपरीक्षकतां निजाम् ॥ मैथुनस्य च संस्मृत्य तस्मै सर्वश्रियं सुताम् । धनं श्रेष्ठिपदं चासो दत्वा निविण्णमानसः ॥ २२० जयधामा जयभामा जयसेना तथा परा। जयदत्ताभिधाना च परा सागरदत्तिका ॥ २२१ सा वैश्रवणवत्ता च परे चोत्पन्नबोधकाः । सञ्जातास्तैः सह श्रेष्ठी संयम प्रत्यपद्यत ॥ २२२ मुनि रतिवरं प्राप्य चिरं विहितसंयमाः। एते सर्वेऽपि कालान्ते स्वर्गलोकं समागमन् ॥ २२३ प्रान्ते स्वर्गादिहागत्य जयधामा तदातनः । वसुपालोऽत्र सजातो जयभामाप्यजायत ॥ २२४ जयवत्यात्तसौन्दयों जयसेनाजनिष्ट सा । पिप्पली जयदत्ता तु वत्यन्तमदनाभवत् ॥ २२५ विद्युद्वेगाभवद्वेश्रवणवत्ता कलाखिला । जाता सागरदत्तापि स्वर्गादेत्य सुखावती ॥ २२६ तो वैश्रवणदत्त व सागरदत्त आणि समुद्रदत्त हे सगळे सर्वदयित श्रेष्ठीवर मत्सरभाव धारण करून दुःसह अशा तपांत तत्पर झाले. बरोबरच आहे की कोठे कोठे मत्सर देखिल मनुष्याला श्रेयस्कर होतो. एके वेळी जितशत्रूला श्रेष्ठीने आपल्या सभेत आलेला पाहिले तो समुद्रदत्ताशी अगदी समान दिसत होता व आपण कोठून आला असे त्याने त्याला विचारिले. तेव्हा त्याने आपल्या येण्याचा क्रम सांगितला ।। २१६-२१०॥ हा मनुष्य इतर कोणी नाही तर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे असे सर्वदयित श्रेष्ठीच्या ध्यानात आले व त्याच्या हातातील आंगठी पाहून तर त्याचा निश्चय झाला व आपणाला परीक्षा करता आली नाही असे त्याने ठरविले. त्याला आपल्या. मेहुण्याचेही स्मरण झाले व त्याने त्याला आपली सर्वश्री नांवाची कन्या दिली व आपले धन व श्रेष्ठीपदही दिले व तो स्वतः संसारविरक्त झाला ।। २१९-२२० ॥ जयधामा, जयभामा, जयसेना व जयदत्ता आणि सागरदत्ता, तथा वैश्रवणदत्ता व इतर- ज्याना आत्मबोध झाला आहे असे जे इतर सज्जन लोक त्यांच्यासह श्रेष्ठीने संयमाचा स्वीकार केला ॥ २२१-२२२ ॥ ___ या सर्वांनी रतिवर नामक मुनिराजाजवळ जाऊन संयम धारण केला व त्याचे त्यांनी दीर्घकालपर्यन्त पालन केले व ते सगळे आयुष्यान्ती स्वर्गलोकात जन्मले ।। २२३ ।। स्वर्गातील आयुष्य समाप्त झाल्यावर जयधामा विद्याधर येथे वसुपाल राजा झाला व जी जयधामा त्याची स्त्री होती ती या जन्मी अतिशय सुन्दर अशी जयवती झाली. जी मागील जन्मी जयसेना होती ती या जन्मी पिप्पली झाली व जी जयदत्ता होती ती या जन्मी मदनवती झाली. जी मागील जन्मी वैश्रवणदत्ता होती ती या जन्मी विद्युद्वेगा झाली व जी पूर्वजन्मी सागरदत्ता होती ती स्वर्गातून येऊन येथे या जन्मी सुखावती झाली आहे ॥ २२४-२२६ ॥ Page #697 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८६) (४७-२२७ तदा सागरदत्ताख्यः स्वर्गलोकात्समागतः । पुत्रो हरिवरो जातः स पुरूरवसः प्रियः ॥ २२७ समुद्रदत्तो ज्वलनवेगस्याजनि विश्रुतः । तनुजो धूमवेगाख्यो विद्याविहितपौरुषः ॥ २२८ स वैश्रवणदत्तोऽपि भूतोऽत्राशनिवेगकः । श्रेष्ठी स सर्वदयितः श्रीपालस्त्वमिहाभवः ।। २२९ त्वं जामातुनिराकृत्या सनाभिभ्यो वियोजितः । तदात्वद्वेषिणोऽस्मश्च तव द्वेषिण एव ते ।। २३० तदा प्रियास्तवात्रापि सञ्जाता नितरां प्रियाः । अहिंसयाभंकस्यासीद् बन्धुभिस्तव सङ्गमः ॥२३१ तत्तपःफलतो जातं चक्रित्वं सकलक्षितेः । सर्वसङ्ग परित्यागान्मङ्क्षु मोक्षं गमिष्यसि ॥ २३२ अथोदीरिततीर्थेशवचनाकर्णनेन ते । सर्वे परस्पर द्वेषाद्विरमन्ति स्म विस्मयात् ॥ २३३ जन्म रोगजरामृत्यू न्निहन्तुं सन्ततानुगान् । संनिधाय धियं धन्योऽवात्सीद्धर्मामृतं ततः ॥ २३४ महापुराण पूर्वी जो सागरदत्त होता तो स्वर्गाहून येऊन आता पुरूरवस राजाचा प्रिय पुत्र हरिवर झाला आहे ।। २२७ ॥ जो पूर्वभवात समुद्रदत्त होता आता ज्वलनवेग नामक राजाचा पराक्रम करणारा धूमवेग नामक पुत्र झाला आहे व त्याने आपल्या विद्यांच्या द्वारे आपला पराक्रम दाखविला आहे ।। २२८ ।। तो वैश्रवणदत्त देखिल आता अशानिवेग झाला आहे आणि जो पूर्वजन्मी सर्वदयित श्रेष्ठी होता तो आता श्रीपाल झाला आहे ॥ २२९ ॥ श्रीपाला तू पूर्वजन्मी आपल्या भाचाला जितशत्रूला आपल्या मातेपासून वेगळे केले होतेस म्हणून जे तुझे भाऊबंद आहेत त्यांच्यापासून तूं वियोजित केला गेला होतास. जे मागच्या जन्मात तुझे द्वेषी होते ते याजन्मीही तुझे द्वेषीच झाले आहेत व जे मागच्या जन्मी तुझे प्रिय होते ते या जन्मीही तुला अतिशय आवडते झाले आहेत व तूं त्या बालकाची हिंसा केली नव्हतीस म्हणून आता तुझा तुझ्या आप्त नातलगाशी संगम झाला आहे ।। २३०-२३१ ।। मागच्या जन्मी जे तप केले होते त्याच्या फलामुळे तुला सर्व पृथ्वीचे स्वामित्व मिळाले आहे व सर्व परिग्रहांच्या त्यागामुळे शीघ्र तुला मोक्षाची प्राप्ति होईल ।। २३२ ।। याप्रमाणे तीर्थंकरापासून प्रकट झालेल्या वचनाच्या श्रवणात त्या सर्वानी आश्चर्यचकित होऊन परस्पराविषयीच्या द्वेषाचा त्याग केला ॥ २३३ ॥ नेहमी प्राण्याना अनुसरणारे असे जे जन्म, रोग व मृत्यु त्यांना नष्ट करण्यासाठी बुद्धीला स्थिर करून त्या धन्य श्रीपालाने त्या तीर्थंकरापासून मिळालेले धर्मामृताचे प्राशन केले ।। २३४ ॥ Page #698 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-२४१) घिगिदं चसाम्राज्यं कुलालस्येव जीवितम् । भुक्तिश्चक्रं परिभ्राम्य मृदुत्पन्नफलाप्तितः ॥ २३५ आयुर्वायुरयं मेघो भोगो भङ्गी हि सङ्गमः । वपुः पापस्य दुष्पात्रं विद्युल्लोला विभूतयः ॥ २३६ मार्गविभ्रंशहेतुत्वात् यौवनं गहनं वनम् । या रतिविषयेष्वेषा गवेषयति साऽरतिम् ॥ २३७ सर्वमेतत्सुखाय स्याद्यावन्मतिविपर्ययः । प्रगुणायां मतौ सत्यां किं तत्त्याज्यमतः परम् ॥ २३८ चित्तद्रुमस्य चेवृद्धिरभिलाषविषाङ्कुरैः । कथं दुःखफलानि स्युःसम्भोगविटपेषु न ।। २३९ भुक्त भोगो दशाङ्गोऽपि यथेष्टं सुचिरं मया । मात्रामात्रेऽपि नात्रासीस्तृप्तिस्तृष्णाविघातिनी ॥२४० अस्तु वस्तु समस्तं च सङ्कल्पविषयीकृतम् । इष्टमेव तथाप्यस्मान्नास्ति व्यस्तापिनिर्वृतिः ॥ २४१ महापुराण (६८७ हे चक्रवर्तीचे साम्राज्य जणु कुंभाराच्या जीवनाप्रमाणे आहे. कुंभार जसे आपले चाक फिरवून मातीपासून बनविलेले घागर वगैरे पदार्थ ते विकून आपली उपजीविका करितो तसे हा चक्रवर्ती देखिल चक्र फिरवून दिग्विजय करून मातीपासून म्हणजे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या भोगोपभोगाच्या पदार्थानी आपले जीवन जगतो म्हणून या चक्रवर्तीच्या साम्राज्याला धिक्कार असो ।। २३५ ।। हे आयुष्य वान्यासारखे आहे, चंचल आहे. भोग मेघासारखे आहेत. तेही नाशवंत आहेत. संगम- स्त्री पुत्रादिकांचा सहवास हा भंगी म्हणजे नाशवंत आहे व वपु - म्हणजे शरीर हे दुष्पात्र आहे म्हणजे घाणेरडे भांडे आहे व विभूतयः - संपत्ती विजेप्रमाणे चंचल आहेत ॥ २३६॥ हे तारुण्य दाट जंगलाप्रमाणे आहे. कारण जंगल जसे रस्ता चुकण्याला कारण होते तसे हे तारुण्य जीवाला सदाचाराच्या मार्गापासून भ्रष्ट करिते व जी पंचेन्द्रियाना आवडणाऱ्या पदार्थात रति प्रेम आहे ते प्रेम पुढे अरतीला अप्रीतीला हुडकते अर्थात् अप्रीतीला उत्पन्न करिते. तेच तेच पदार्थ भोगणे कंटाळवाणे होते ॥ २३७ ॥ हे सर्व राज्यादिक पदार्थ सुखदायक वाटतात पण ते केव्हा ? व कोठपर्यन्त ? तर याचे उत्तर असे आहे - जोपर्यंन्त आपली बुद्धि भ्रान्त आहे तोपर्यन्त. पण बुद्धि जेव्हा भ्रमरहित होते तेव्हा या पदार्थापेक्षा त्याज्य पदार्थ जगात दुसरा कोणताच नाही असे वाटू लागते ॥ २३८ ॥ या मनरूपी वृक्षाची जी वाढ झाली आहे ती नाना प्रकारच्या इच्छारूप विषाङकुरानी झाली आहे. यास्तव यांच्या भोगरूपी डहाळ्या दुःखरूपी फलांनी कां बरे लकडणार नाहीत ? ।। २३९ ॥ मी दहा प्रकारचे भोग दीर्घकालपर्यन्त यथेष्ट भोगले आहेत तथापि तृष्णेचा नाश करणारी तृप्ति मला तिळभरही प्राप्त णाली नाही. अतिशय अल्पकालातही मला तृप्तीचा अनुभव आला नाही ॥ २४० ॥ ज्या ज्या वस्तु मला प्राप्त व्हाव्यात म्हणून मनात मी संकल्प केला होता त्या त्या इष्ट वस्तु मला प्राप्त झाल्या तरी पण त्यापासून मला थोडासा देखिल संतोष प्राप्त झाला नाही ।। २४१ ।। Page #699 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८८) (४७-२४२ किल स्त्रीभ्यः सुखावाप्तिः पौरुषं किमतः परम् । दैन्यमात्मनि सम्भाव्यं सौख्यं स्यां परमः पुमान् ॥ इति श्रीपालचक्रेशः सन्त्यजन्वक्रतां धियः । अक्रमेणाखिलं त्यक्तुं सचक्रं मतिमातनोत् ॥ २४३ ततः सुखावतीपुत्रं वरपालाभिधानकम् । कृताभिषेकमारोप्य समुत्तुङ्गं निजासनम् ।। २४४ जयवत्यादिभिः स्वाभिर्देवीभिर्धरणीश्वरैः । वसुपालादिभिश्चामा संयमं प्रत्यपद्यत ।। २४५ स बाह्यमन्तरङ्गं च तपस्तप्त्वा यथाविधि । क्षपकश्रेणिमारुह्य मासेन हतमोहकः ॥ २४६ यथाख्यातमवाप्योरुचारित्रं निष्कषायकम् । ध्यायन्द्वितीयशुक्लेन वीचाररहितात्मना ॥ २४७ घातिकर्मत्रयं हत्वा सम्प्राप्तनवकेवलः । स योगस्थानमाक्रम्य वियोगो वीतकल्मषः ॥ २४८ शरीर त्रितया पायादाविष्कृतगुणोत्करः । अनन्तं शान्तमप्राप्तमवाप्तः सुखमुत्तमम् ॥ २४९ तस्य राश्यश्च ताः सर्वा विधाय विविधं तपः । स्वर्गलोके स्वयोग्योरुविमानेष्वभवन्सुराः ॥ २५० महापुराण स्त्रियापासून सुखाची प्राप्ति करून घेणे याला पौरुष म्हणावयाचे तर ते पौरुष नसून फार मोठी दीनताच आहे यास्तव आपल्या आत्म्यातच खन्या सुखाचा निश्चय करणारा तोच पुरुष होय व अशा पुरुषत्वाचा मी स्वामी होऊ शकेन ।। २४२ ॥ याप्रमाणे श्रीपालचक्रवर्तीने चिन्तन करून आपल्या बुद्धीतील वक्रता काढून टाकली व आपल्या चक्ररत्नासह सर्वराज्याचा एकदम त्याग करण्याकडे त्याने आपल्या बुद्धीला लाविले || २४३ ॥ यानंतर श्रीपाल राजाने सुखावतीच्या नरपाल नामक पुत्राला राज्याभिषेक करून अतिशय उंच अशा आपल्या आसनावर बसविले ।। २४४ ॥ यानन्तर जयवती आदिक आपल्या राण्या आणि वसुपालादिक अनेक राजे यांच्यासह श्रीपाल चक्रवर्तीने मुनिसंयमाचा स्वीकार केला ।। २४५ ।। त्या श्रीपाल मुनीश्वराने एक महिनापर्यन्त विधिपूर्वक बाह्यतप व अभ्यन्तरतप केले.. यानन्तर क्षपकश्रेणीवर आरोहण करून सर्व मोहनीय कर्म नष्ट केले. त्यामुळे कषायरहित असे यथाख्यातचारित्र प्राप्त झाले. विचाररहित दुसऱ्या शुक्लध्यानाने ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अन्तराय या तीन घातिकर्माचा नाश केला व त्यामुळे त्याला नऊ केवललब्धींची प्राप्ति झाली. ( अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तदान लाभ- भोग-उपभोग-वीर्य, क्षायिकसम्यक्त्व क्षायिक चारित्र ) यानंतर तेरावे सयोगकेवली गुणस्थानानन्तर योगरहित अशा चौदाव्या अयोगकेवली गुणस्थानात ते आले. यामुळे अघातिकर्मे नाम, गोत्र, वेदनीय व आयु या चार अघातिकर्माचा नाश केला. औदारिकशरीर, कार्मणशरीर व तैजसशरीर या तीन शरीरांचा नाश झाल्यामुळे सर्व आत्म्याच्या गुणांचा समूह प्राप्त झाला व अन्तरहित अविनाशी उत्तम व शान्त असे पूर्वी न प्राप्त झालेले सुख त्यास प्राप्त झाले ।। २४६-२४९ ॥ या श्रीपालचक्रीच्या सर्व राण्यानी नाना प्रकारचे तप केले व त्या स्वर्गलोकातील स्वतःला योग्य अशा मोठ्या विमानात देव झाल्या ।। २५० ।। Page #700 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-२५८) महापुराण (६८९ आवां चाकर्ण्य तं नत्वा गत्वा नाकं यथोचितम् । अनुभूय सुखं प्रान्ते शेषपुण्यविशेषतः ॥ २५१ इहागताविति व्यक्तं व्याजहार सुलोचना । जयोऽपि स्वप्रियाप्रज्ञाप्रभावादतुषत्तदा ॥ २५२ तवा सदस्सदः सर्वे प्रतीयुस्तदुदाहृतम् । कःप्रत्येति न दुष्टश्चेत्सद्भिनिगदितं वचः । २५३ एवं सुखेन साम्राज्यभोगसारं निरन्तरम् । भुञ्जानौ रञ्जितान्योऽन्यौ कालं गमयतः स्म तौ ॥२५४ तदाखगभवावाप्तप्रज्ञप्तिप्रमुखाः श्रिताः । विद्यास्तां च महीशं च सम्प्रीत्या वद्धितश्रियः ॥ २५५ तबलात्कान्तया साधं विहर्तुं सुरगोचरान् । वाञ्छन्देशानिजं राज्यं नियोज्य विजयेऽनुजे ॥२५६ यथेष्टं सप्रियो विद्यावाहनः सरितां पतिम् । कुलशैलानदीरम्यवनानि विविधान्यपि ॥ २५७ विहरनन्यदा मेघस्वरः कैलासशैलजे । वने सुलोचनाभ्यर्णादसौ किञ्चिदपासरत् ॥ २५८ ---------......... आम्ही दोघानी (सुलोचना व जयकुमार यांच्या पूर्वभवातील जीवांनी-देवांनी ) ते सर्व ऐकले व गुणपालतीर्थकराना वंदन करून आम्ही दोघे स्वर्गात गेलो. तेथे आम्ही योग्य अशा सुखाचा अनुभव घेतला व आयुष्याच्या शेवटी उरलेल्या पुण्यविशेषाने येथे जन्मलो असे सुलोचनेने स्पष्ट वर्णिले. त्यावेळी आपल्या प्रियेच्या बुद्धिप्रभावामुळे जयकुमार देखिल आनंदित झाला ॥ २५१-२५२ ।। तेव्हा सभेतील सर्व सभ्यांना ते सुलोचनेचे भाषण पटले. जर मनुष्य दुष्टवृत्तीचा नसेल तर सज्जनांनी सांगितलेले वचन कोण बरे विश्वास ठेवून मान्य करणार नाही? ॥२५३।। __ याप्रमाणे साम्राज्याचा व सारभूतभोगांचा निरन्तर अनुभव घेणारे व एकमेकांच्या मनाचे रंजन करणारे ते जोडपे आपला काल सुखाने व्यतीत करू लागले. त्यावेळी विद्याधराच्या भवात प्राप्त करून घेतलेल्या प्रज्ञप्ति वगैरे मुख्य विद्यानी सुलोचनेचा व जयकुमाराचा प्रेमाने आश्रय घेतला व त्यानी त्यांचे ऐश्वर्य वाढविले ॥ २५४-२५५ ।। त्या विद्येच्या सामर्थ्याने आपल्या स्त्रीसह विहार करण्यासाठी देवांचे निवास असलेल्या ठिकाणी जाण्याची इच्छा करणाऱ्या जयकुमाराने आपले राज्य आपला धाकटा भाऊ जो विजय त्याच्यावर सोपविले ॥ २५६ ।। विद्या हे वाहन ज्याचे आहे असा तो जयकुमार आपल्या प्रियेसह समुद्र, कुलपर्वत, नद्या व रम्य अनेक वने याठिकाणी यथेच्छ विहार करीत कोणे एकेवेळी कैलासपर्वताच्या वनात आला व आपल्या प्रियपत्नीपासून काही अन्तरावर जाऊन बसला ॥ २५७-२५८ ।। म.९० Page #701 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४७-२५९ अमरेन्द्र सभामध्ये शीलमाहात्म्यशंसनम् । जयस्य तत्प्रियायाश्च प्रकुर्वति कदाचन ॥ २५९ श्रुत्वा तदादिमे कल्पे रविप्रभविमानजः । श्रीशा रविप्रभाख्येन तच्छीलान्वेषणं प्रति ॥ २६० प्रेषिता काञ्चना नाम देवी प्राप्य जयं सुधीः । क्षेत्रेऽस्मिन्भारते खेचरानेरुत्तरदिक्तटे ॥ २६१ मनोहराख्य विषये राजा रत्नपुराधिपः । अभूत्पिङ्गलगान्धारः सुखदा तस्य सुप्रभा ॥ २६२ तयोविद्युत्प्रभा पुत्री नमेर्भार्या यदृच्छया । त्वां नन्दने महामेरौ क्रीडन्तं वीक्ष्य सोत्सुका ॥ २६३ तदाप्रभृति मच्चित्तेऽभवस्त्वं लिखिताकृतिः । त्वत्समागममेवाहं ध्यायन्ती दैवयोगतः ॥ २६४ दृष्टवत्यस्मि कान्तास्मिन्निगं सोढुमक्षमा । इत्यपास्तोपकण्ठत्वात्स्वकीयान्स्मरविह्वला ॥ २६५ स्वानुरागं जये व्यक्तमकरोद्विकृतेक्षणा । तदुष्टचेष्टितं दृष्ट्वा मा मंस्थाः पापमीदृशं ॥ २६६ सोदर्या त्वं ममादायि मयामुनिवराव्रतम् । पराङ्गनाङ्गसंसर्गसुखं मे विषभक्षणम् ॥ २६७ महीशेनेति सम्प्रोक्ता मिथ्या सा कोपवेपिनी । उपात्तराक्षसीवेषा तं समुद्धृत्य गत्वरी ॥ २६८ पुष्पावचयसंसक्तनृपकान्ताभितजिता । भीत्वा तच्छोलमाहात्म्यात्काञ्चनाऽदृश्यतां गता ॥ २६९ त्यावेळी देवेन्द्र सभेमध्ये जयकुमार व त्याची प्रिया जी सुलोचना या उभयांचे शीलाचे महत्त्व वर्णन करीत असता ते सौधर्मस्वर्गातील रविप्रभविमानाचा स्वामी अशा रविप्रभदेवाने ऐकले व जयकुमाराच्या शीलाचे परीक्षण करण्यासाठी कांचनमाला नांवाची देवी पाठविली, ती जयकुमाराकडे आली. तेव्हा ती त्याला याप्रमाणे आपला वृत्तान्त सांगू लागली. या भरतक्षेत्रात विजयार्धपर्वताच्या उत्तरदिशेच्या तटावर मनोहर नामक देशात रत्नपुर नगराचा अधिपति पिंगलगांधार नांवाचा राजा होता. त्याच्या सखदायक राणीचे नां चा राजा होता. त्याच्या सुखदायक राणीचे नांव सुप्रभा असे होते. या उभयताना विद्युत्प्रभा नामक कन्या झाली. ती नमिविद्याधराची पत्नी. एके वेळी महामेरुपर्वतावरील नंदनवनात हे जयकुमारा! क्रीडा करीत असता तुला मी पाहिले तेव्हापासून तुझ्याविषयी मी उत्कंठित झाल्ये आहे. तेव्हापासून तुझी आकृति माझ्या मनामध्ये कोरल्याप्रमाणे लिहिली गेली आहे व तुझ्या समागमाचे मी ध्यान करीत आहे. आज तुला मी दैवयोगाने पाहिले आहे. मी आता मदनाचा वेग सहन करण्यास असमर्थ झाल्ये आहे. मी माझ्यापासून इतर लोकाना दूर केले आहे. मी कामवेदनेने पीडित झाल्ये आहे असे म्हणून ती त्याला वाकड्या नजरेने पाहू लागली व आपला अनुराग जयकुमारावर तिने व्यक्त केला. तिची ती दूषित चेष्टा पाहून जयकुमार म्हणाला तू असला पापी विचार मनात आणू नकोस. तू माझी बहिण आहेस. मी मुनिवर्यापासून व्रत घेतले आहे. परस्त्रीच्या अंगापासून होणारे सुख म्हणजे मी विषभक्षणाप्रमाणे समजतो. याप्रमाणे राजा जयकुमाराने जेव्हा असे भाषण केले तेव्हा ती खोटया रागाने थर थर कापू लागली. तिने राक्षसीचा वेष घेतला व त्याला उचलून ती वेगाने निघाली. परंतु पुष्पे वेचण्यात तत्पर झालेल्या सुलोचनेने जेव्हा तिची खरडपट्टी केली तेव्हा तिच्या शीलमाहात्म्यामुळे ती कांचनदेवी भ्याली व ती अदृश्य झालो ।। २५९-२६१ ॥ Page #702 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-२७८) महापुराण (६९१ अबिभ्यद्देवता चैवं शीलवत्याः परे न के । ज्ञात्वा तच्छीलमाहात्म्यं गत्वा स्वस्वामिनं प्रति ॥२७० प्राशंसत्सा तयोस्तादृडमाहात्म्यं सोऽपि विस्मयात् । रविप्रभः समागत्य तावुभौ तद्गुणप्रियः ॥२७१ स्ववृत्तान्तं समाख्याय युवाभ्यां क्षम्यतामिति । पूजयित्वा महारत्न कलोकं समीयिवान् ॥ २७२ तया चिरं विहृत्यात्तसम्प्रीतिः कान्तया समम् । निवृत्य पुरमागत्य सुखसारं समन्वभूत् ॥ २७३ अथान्यदा समुत्पन्नबोधिर्मेघस्वराधिपः । तीर्थाधिनाथमासाद्य वन्दित्वानन्दभाजनम् ॥ २७४ कृत्वा धर्मपरिप्रश्नं श्रुत्वा तस्माद्यथोचितम् । आक्षेपण्यादिकाः कृत्वा कथा बन्धोदयादिकाः॥२७५ कर्मनिर्मुक्तसम्प्राप्यशर्मसारप्रबुद्धधीः । शिवङ्करमहादेव्यास्तनुजो जनताप्रियः ॥ २७६ अवार्योऽनन्तवीर्याख्यः शत्रुभिः शस्त्रशास्त्रवित् । आकुमारं यशस्तस्य शौर्य शत्रुजयावधि ॥ २७७ त्यागः सर्वाथिसन्ती सत्यं स्वप्नेऽप्यविप्लुतम् । विधायाभिषवं तस्मै प्रदायात्मीयसम्पदम् ॥ २७८ शीलवती स्त्रियांना पाहून देव देखिल भितात मग इतर कोण बरे भययुक्त होणार नाहीत ।। २७० ॥ जयकुमार व सुलोचना यांच्या शीलाचे माहात्म्य जाणून ती देवता आपल्या स्वामीकडे गेली व तिने त्या दोघांच्या शीलाच्या अपूर्व माहात्म्याची प्रशंसा केली. तो देखिल आश्चर्यचकित झाला. यानंतर रविप्रभ तेथे आला. तो सद्गुणावर प्रेम करणारा होता. त्याने आपली सर्व हकीकत सांगितली व आपण दोघांनी क्षमा करावी असे बोलला आणि अमूल्यरत्नांनी त्यांची त्याने पूजा केली व स्वर्गाकडे निघून गेला ।। २७१-२७२ ।। या नंतर पुष्कळ विहार करून प्रेमळ असा तो जयकुमार आपल्या स्त्रीसह आपल्या नगराकडे परतला. नगरात येऊन उत्कृष्ट सुखाचा अनुभव घेऊ लागला ॥ २७३ ।। या नंतर कोणे एके वेळी या जयकुमाराला आत्मज्ञान उत्पन्न झाले व तो रत्नत्रयांचे उत्कृष्ट स्वामी असलेल्या आदिभगवंताकडे आला व अनन्त आनन्दांचे पात्र अशा त्यांना त्याने वन्दन करून त्यांना धर्माविषयी प्रश्न विचारला. यथायोग्य उत्तर प्रभूपासून त्याने ऐकले. या नंतर त्याने प्रभूपासून आक्षेपणी आदिक कथा व कर्माचे बन्ध, उदय, सत्त्व आदिकांचे स्वरूप समजून घेतले. जीत आपल्या मताचे-स्याद्वादादिकांचे स्वरूप वणिले आहे ती आक्षेपणी कथा, जीत परमतांचे खंडन केले आहे ती विक्षेपणी कथा, धर्म व धर्माचे फलाविषयी मनात प्रेम उत्पन्न करणारी कथा संवेजनी कथा होय व संसारापासून विरक्ति उत्पन्न करणारी निर्वेजनी कथा अशा चार कथांचे स्वरूप त्याने जाणून घेतले. यामुळे त्याच्या मनात कर्मापासून पूर्ण मोकळे झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या उत्कृष्ट सुखाचे स्वरूप जाणून घेण्याची बुद्धि उत्पन्न झाली ॥ २७४-२७५ ॥ यानंतर जयकुमाराने शिवंकरा महाराणीच्या अनन्तवीर्य नामक मुलाला त्याचा राज्याभिषेक करून राज्य दिले. हा नूतन राजा शस्त्रे व शास्त्रांचा जाणता होता व लोकप्रिय होता. शत्रु त्यांचे निवारण करण्यास असमर्थ होते व त्याची कीर्ति लहानपणापासूनच सर्वत्र पसरली होती. त्याचा पराक्रम शत्रूवर पूर्ण जय मिळेपर्यन्त होता व तो आपल्या धनदानाने सर्व याचकांची तृप्ति करीत असे. त्याचा सत्यवादीपणा स्वप्नात देखिल भ्रष्ट झालेला नव्हता ॥ २७६-२७८ ।। Page #703 -------------------------------------------------------------------------- ________________ ६९२) पदं परं परिप्राप्तुमव्यग्रमभिलाषुकः । विसर्जितसगोत्रादिविनिर्जितनिजे न्द्रियः ॥ २७९ वितजितमहामोहः समजतशुभात्रवः । विजयेन जयन्तेन सज्जयन्तेन सानुजेः ॥ २८० अन्यैश्च निश्चितत्यागैः रागद्वेषाविदूषितैः । रविकीर्ती रविजयोरिदमोऽरिजयाह्वयः ।। २८१ सुजयश्च सुकान्तश्च सप्तमश्चाजितञ्जयः । महाजयोऽतिवीर्यश्च वरञ्जयसमाह्वयः ।। २८२ रविवीर्यस्तथान्ये च तनूजाश्चक्रवर्तिनः । तैश्च सार्धं सुनिविष्णैश्चरमाङगो विशुद्धिभाक् ॥ २८३ एष पात्रविशेषस्ते संबोढुं शासनं महत् । इति विश्वमहीशेन देवदेवस्य सोऽर्पितः ॥ २८४ कृतग्रन्थपरित्यागः प्राप्तग्रन्थार्थसङग्रहः । प्रकृष्टं संयमं प्राप्य सिद्धसप्तद्धर्वाद्धितः ॥ २८५ चतुर्ज्ञानामलज्योतिर्हताततमनस्तमाः । अभूद्गणधरो भर्तुरेकसप्ततिपूरकः ॥ २८६ सुलोचनाप्यसंहार्यशोका पतिवियोगतः । गलिता कल्पवल्लीव प्रम्लानामरभूरुहात् ॥ २८७ महापुराण ( ४७-२७९ यानंतर परमपद - उत्कृष्ट मुक्तिपदाची प्राप्ति एकाग्रतेने करून घेण्याची इच्छा जयकुमाराने मनात धारण केली. त्याने आपल्या गोत्रजांचा व मित्रादिकांचा त्याग केला. आपली सर्व इन्द्रिये त्याने जिंकली व महामोहाला त्याने हाकालून दिले आणि शुभ-पुण्यरूप परिणामानी शुभ अशा कर्मास्रवाला मिळविले. ज्यानी परिग्रहांचा त्याग करण्याचा निश्चय केला आहे, ज्यांचे मन रागद्वेषानी दूषित झाले नाही असे विजय, जयन्त आणि संजयन्त असे आपले भाऊ आणि इतर घर्मबंधु, तसेच रविकीर्ति, रविजय, अरिंदम, अरिञ्जय, सुजय, सुकान्त, अजितञ्जय, महाजय, अतिवीर्य, वरञ्जय, रविवीर्य असे चक्रवर्तीचे विरक्त झालेले पुत्र या सर्वासह हा तद्भव मोक्षगामी आणि निर्मल परिणाम धारण करणारा जयकुमार आदिप्रभुकडे गेला ।। २७९-२८३ ।। त्यावेळी हे प्रभो, देवांचे देव अशा आपले महान् धर्मशासन धारण करण्यासाठी हा पात्रविशेष आपणास अर्पण केला आहे असे चक्रवर्ती भरताने प्रभूला म्हणून जयकुमाराला त्याने अर्पण केले ॥ २८४ ॥ त्यावेळी जयकुमाराने सर्व ग्रंथांचा बाह्याभ्यन्तर परिग्रहांचा त्याग केला व ग्रंथांच्या अर्थांचा संग्रह केला. अर्थात् जिनशास्त्रांच्या अर्थांचे जीवादिक सप्ततत्त्वांचे व नवपदार्थाचे ज्ञानाचा खूप संग्रह प्राप्त करून घेतला. उत्कृष्ट संयमाला प्राप्त करून हे जयकुमारमुनि सिद्ध झालेल्या सातऋद्धीनी वृद्धिंगत झाले. यानी मति, श्रुत, अवधि आणि मन:पर्यय या चार ज्ञानांच्या निर्मल प्रकाशांनी अन्तःकरणातील विस्तृत अज्ञानरूपी अंधार पूर्ण नष्ट केला व ते आदि भगवंताचे एकाहत्तरावे गणधर झाले ।। २८५-२८६ ॥ सुलोचनेला पतीच्या वियोगाने निवारण न करता येईल असा शोक झाला व ती कल्पवृक्षापासून गळून खाली पडलेल्या कल्पलते प्रमाणे सुकून गेली ॥ २८७ ॥ Page #704 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-२९५) महापुराण शमिता चक्रवर्तीष्टकान्तयाशु सुभद्रया । ब्राह्मोसमीपे प्रव्रज्य भाविसिद्धिश्चिरं तपः ॥ २८८ कृत्वा विमाने सानुत्तरेऽभूत्कल्पेऽच्युतेऽमरः । आदितीर्थाधिनाथोऽपि मोक्षमार्ग प्रवर्तयन् ॥ २८९), चतुरुत्तरयाशीत्या विविद्धिविभूषितः । चिरं वृषभसेनादिगणेशैः परिवेष्टितः ॥ २९० खपञ्चसप्तवाराशिमितपूर्वधरान्वितः। खपञ्चैकचतुर्मयशिक्षकर्मुनिभिर्वृतः ॥ २९१ तृतीयज्ञानसन्नेत्रैः सहस्रनवभिर्युतः । केवलावगमविशतिसहस्रः समन्वितः ॥ २९२ खद्वयर्तुखपक्षोरुविक्रिद्धिविद्धितः । खपञ्चसप्तपक्षकमिततूर्यविदन्वितः ॥ २९३ तावद्धिर्वादिभिर्वन्द्यो निरस्तपरवादिभिः । चतुरष्टखवार्यष्टमितैः सर्वैश्च पिण्डितैः ॥ २९४ संयमस्थानसम्प्राप्तसम्पद्भिस्सद्भिरचितः । खचतुष्केन्द्रियान्युक्तपूज्यबाहम्यायिकादिभिः॥२९५ त्यावेळी चक्रवर्तीची आवडती राणी असलेल्या सुभद्रेने तिचा शोक शान्त केला. तेव्हां तिने ब्राह्मी आबिकेजवळ दीक्षा घेतली. जिला पुढील कांही भवांनी मुक्ति प्राप्त होईल अशा तिने दीर्घ कालपर्यन्त तपश्चरण केले ॥ २८८ ।। ___ यानंतर ती अच्युतकल्पातील अनुत्तरविमानात देव झाली. श्रीआदितीर्थंकरांनी देखिल मोक्षमार्गाचे प्रवर्तन चालू केले ॥ २८९ ॥ नाना प्रकारच्या ऋद्धीनी विभूषित अशा वृषभसेनादि चौयाऐंशी गणधरानी आदि भगवान् दीर्घकालपर्यन्त वेष्टित होऊन विहरत होते ॥ २९० ।। ___ चार हजार सातशे पन्नास (४७५०) मुनि चौदा पूर्वाचे ज्ञाते होते. त्यांनी आदि प्रभु युक्त होते आणि चार हजार एकशे पन्नास (४१५०) शिक्षकमुनीनी प्रभु वेष्टित होते. अवधिज्ञानरूपी नेत्राचे धारक अशा नऊ हजार मुनींनी प्रभु युक्त होते व वीस हजार केवलज्ञानी मुनींनी सहित प्रभु विहरत होते ।। २९१-२९२ ॥ वीस हजार सहाशे विक्रियद्धि धारक मुनींनी प्रभु शोभत होते व बारा हजार सातशे पन्नास मनःपर्ययज्ञानी मुनिवर्यानी प्रभू वेढले होते ॥ २९३ ॥ ___ ज्यांनी परवाद्यांचे खण्डन केले आहे अशा १२७५० वादीमुनींनी प्रभुयुक्त होते ॥ २९४ ॥ सर्व मुनिसंख्या चौयाऐंशी हजार चौन्याऐंशी होती. हे सर्वमुनि संयम तपरूपी संपत्तींनी युक्त व सत्पुरुषांनी वन्द्य होते. अशा मुनींनी प्रभु पूजित झाले. तीन लक्ष पन्नास हजार अशा पूज्य ब्राह्मी वगैरे आर्यिकांनी ज्यांच्या गुणांचा उत्कर्ष स्तविला आहे असे प्रभु शोभत होते ।। २९५ ॥ दृढव्रतनामक श्रावक ज्यात मुख्य आहे अशा तीन लाख श्रावकांनी प्रभूचा आश्रय घेतला होता. सुव्रताश्राविका ज्यात मुख्य आहे अशा पाच लाख श्राविकांनी प्रभु स्तविले जात असत. तसेच भवनवासी, व्यंतर, ज्योतिष्क आणि कल्पवासी देवदेवी प्रभूच्या चरणांची स्तुति करीत असत ।। २९६-२९७ ।। Page #705 -------------------------------------------------------------------------- ________________ ६९४) महापुराण आर्यिकाभिरभिष्ट्रयमाननानागुणोदयः । दृढव्रतादिभिर्लक्ष त्रयोक्तैः श्रावकैः श्रितः ॥ २९६ श्राविकाभिः स्तुतः पञ्चलक्षाभिः सुव्रतादिभिः । भावनादिचतुर्भेददेवदेवीडितक्रमः ॥ २९७ चतुष्पदादिभिस्तिर्यग्जातिभिश्चाभिषेकितः । चतुस्त्रिंशदतीशेष विशेषैर्लक्षितोदयः ॥ २९८ ॥ आत्मोपाधिविशिष्टावबोधदृक्सुखवीर्यसत् । देहसौन्दर्यवान्स्वोक्त सप्तकस्थानसङ्गतः ॥ २९९ प्रातिहार्यष्टकोद्दिष्टनष्टघातिचतुष्टयः । वृषभाद्यन्वितार्थाष्टसहस्राह्वयभाषितः ॥ ३०० विकासित विनेयाम्बुजाव लिर्वचनांशुभिः । संवृताञ्जलिपङ के जमुकुलेनाखिलेशिना ॥ ३०१ भरतेन समभ्यर्च्य पृष्टो धर्ममभाषत । ध्रियते धारयत्युच्चैविनेयान्कुगतेस्ततः ॥ ३०२ धर्म इत्युच्यते सद्भिश्चतुर्भेदं समाश्रितः । सम्यग्दृक्ज्ञानचारित्रतपोरूपः कृपापरः ॥ ३०३ जीवादिसप्तके तत्त्वे श्रद्धानं यत्स्वतोऽञ्जसा । परप्रणयनाद्वा तत्सम्यग्दर्शनमुच्यते ॥ ३०४ (४७-२९६ चार पाय ज्याना आहेत व पंख ज्यांना आहेत असे जे तिर्यंचजातीचे पशु आणि पक्षी त्यानी प्रभु सेविले गेले. प्रभूंच्या ठिकाणी जे चौतीस अतिशय प्रकट झालेले होते त्यांनी त्यांचे ऐश्वर्य प्रकट झाले होते ।। २९८ ॥ भगवंताना आत्म्यापासूनच विशिष्ट ज्ञान म्हणजे केवलज्ञान, केवलदर्शन, अनन्तसुख व अनन्तवीर्य हे गुण प्राप्त झालेले होते आणि ते देहसौन्दर्यानें शोभत होते. सज्जाति, सद्गृहस्थत्व, आदिक सात परमस्थानें ज्यांचे वर्णन त्यानीच केले होते ते त्या सप्तस्थानांनी युक्त होते ।। २९९ ॥ अशोकवृक्ष, देवनगारे वाजणे, पुष्पवृष्टि होणे वगैरे आठ प्रातिहार्यानी प्रभु युक्त होते पण त्यानी ज्ञानावरणादिक चार घातिकर्मांचा नाश केला होता व वृषभादिक एक हजार नांवानी प्रभू इन्द्रादिकाकडून वर्णिले गेले आहेत. आपल्या वचनकिरणानी ज्यांनी भव्यरूपी कमलांना प्रफुल्लित केले होते अशा प्रभूला षट्खंडपृथ्वीतील सर्व राजांचे प्रभु अशा भरताने आपली ओंजळरूपी कमळकळीच्याद्वारे वन्दन केले व त्यांचें पूजन करून धर्माचे स्वरूप विचारले. तेव्हां भगवान असे म्हणाले ।। ३००-३०१ ॥ जो भव्यजनाना कुगतिपासून उच्च स्थानी ठेवतो, स्थापन करतो त्याला धर्म असे म्हणतात. तो धर्म सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान, सम्यक्चारित्र व सम्यक्तप असा चार प्रकारचा आहे व तो दयेनें पूर्ण भरलेला आहे ।। ३०२-३०३ ।। जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष या सात तत्त्वावर आपण होऊन परमार्थ रीतीने खरी श्रद्धा ठेवणे किंवा गुरू, शास्त्र यांच्या उपदेशाने श्रद्धान ठेवणें यास सम्यग्दर्शन म्हणतात. ते शंका वगैरे दोषांनी रहित आहे व ते सम्यग्दर्शन तीन भावांनी सहित आहे. अर्थात् औपशमिक सम्यग्दर्शन, क्षायिक सम्यग्दर्शन आणि क्षायोपशमिक सम्यग्दर्शन असे तीन प्रकारचे आहे. अनन्तानुबन्धी, क्रोध, मान, माया व लोभ तसेच मिथ्यात्त्व, सम्यक्त्व आणि सम्यङमिथ्यात्त्व या सात कर्मप्रकृतींचा पूर्ण नाश झाला म्हणजे क्षायिक सम्यग्दर्शन होते व या सात कर्मप्रकृति आत्म्याच्या ठिकाणी उदयाला न येता उपशम पावल्यामुळे जे सम्यग्दर्शन होते ते उपशम सम्यग्दर्शन होय व अनन्तानुबंधी क्रोध मानादिक चार प्रकृति व मिथ्यात्व प्रकृति आणि सम्यङमिथ्यात्व प्रकृतींचा उदय न होता सम्यवत्त्वप्रकृतीचा उदय होऊन चल, मलिन व अगाढ अशी जी जीवादिक तत्त्वावर श्रद्धा होणें तिला क्षायोपशमिक सम्यक्त्त्व म्हणतात ।। ३०४ ।। Page #706 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-३१२) महापुराण शङकादिदोषनिर्मुक्तं भावत्रयविवेचितम् । तेषां जीवादिसप्तानां संशयादिविसर्जनात् ॥३०५॥ याथात्म्येन परिज्ञानं सम्यग्ज्ञानं समादिशेत् । यथा कर्मास्रवो न स्याच्चारित्रं संयमस्तथा ॥ ३०६ निर्जरा कर्मणां येन तेन वृत्तिस्तपो मतम् । चत्वार्येतानि मिश्राणि कषायः स्वर्गहेतवः ॥ ३०७ निष्कषायाणि नाकस्य मोक्षस्य च हितैषिणाम् । चतुष्टयमिदं वम मुक्तेर्दुष्प्रापमङगिभिः ॥ ३०८ मिथ्यात्वमव्रताचारः प्रमादाः सकषायता । योगाः शुभाशुभा जन्तोः कर्मणां बन्धहेतवः ॥ ३०९ मिथ्यात्वं पञ्चषा चाष्टशतधा विरतिर्मता। प्रमादाः पञ्चदश च कषायास्ते चतुर्विधाः ॥३१० योगाः पञ्चदश ज्ञेयाः सम्यग्ज्ञानविलोचनः । समूलोत्तरभेदेन कर्माण्युक्तानि कोविदः ॥ ३११ बन्धश्चतुर्विधो ज्ञेयः प्रकृत्यादिविकल्पतः । कर्माण्युदयसम्प्राप्त्या हेतवः फलबन्धयोः ॥ ३१२ ___ त्या जीवादिक सप्ततत्त्वांचे संशय, विपरीतपणा वगैरे दोषानी रहित असे जे यथार्थ ज्ञान होणे त्याला सम्यग्ज्ञान म्हणतात व ज्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी नवीन कर्मांचा प्रवेश-आगमन होणार नाही असे जे जीवांचे वागणे त्याला सम्यकचारित्र किंवा संयम म्हणतात ॥ ३०५-३०६ ।। ज्याने जीवांचे कर्म झडून जाते व नवीन कर्माचा बंध होत नाही अशा वागण्याला तप म्हणतात. हे सम्यग्दर्शनादिक चार धर्म जोपर्यंत कषायसहित असतात तोपर्यंत स्वर्गाला कारण होतात. जेव्हां हे सम्यग्दर्शनादिक चार धर्म कषायरहित होतात तेव्हां त्यापासून स्वर्गाची व मोक्षाची प्राप्ति होते. यास्तव आपले हित व्हावे असे इच्छिणाऱ्यांनी या चारांचा आश्रय करावा. हे चार धर्म मोक्षाचा मार्ग आहेत व प्राण्यांना यांची प्राप्ति होणे अत्यन्त कठिण आहे ॥ ३०७-३०८ ॥ मिथ्यात्त्व-जीवादितत्वावर श्रद्धा नसणे, व्रतांनी रहित असा आचार-स्वैराचार असणे, प्रमाद-धर्माचरणात आळस असणे-उत्साह नसणे, क्रोधादिकषायांनी युक्त असणे, शुभ व अशुभ अशी मन वचन शरीराची प्रवृत्ति होणे ही प्राण्यांना कर्मबन्धाची कारणे आहेत ।। ३०९ ॥ मिथ्यात्व-अतत्त्वश्रद्धान मिथ्यात्व आहे व त्याचे एकान्तमिथ्यात्व, संशयमिथ्यात्व, विनयमिथ्यात्व, अज्ञानमिथ्यात्व, विपरीतमिथ्यात्व असे पाच भेद आहेत. अविरतीचे १०८ भेद होतात आणि प्रमादाचे पंधरा भेद आहेत. ते असे-विकथा चार, कषाय चार, इन्द्रियें पांच, निद्रा व स्नेह; कषायांचे चार भेद-अनन्तानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संज्वलन. सम्यग्ज्ञानरूपी डोळा ज्यांना आहे अशा लोकांनी योगाचे पंधरा भेद सांगितले आहेत. विद्वानानी मूलभेद व उत्तरभेद अशा रीतीने कर्मांचे वर्णन केले आहे. ज्ञानावरणादि मूलभेद आठ आहेत व उत्तरभेद कर्माचे १४८ सांगितले आहेत ।। ३१०-३११ ॥ बंधाचे चार भेद आहेत ते असे-प्रकृतिबन्ध, स्थितिबन्ध, अनुभागबन्ध व प्रदेशबन्ध हीं ज्ञानावरणादिक कर्मे उदयाला येऊन सुख-दुःखादिक फलें जीवाला देतात व नवीन कर्मे पुनः आत्म्याशी बद्ध होतात ॥ ३१२ ।। Page #707 -------------------------------------------------------------------------- ________________ महापुराण (४७-३१३ तयूयं संसृतेर्हेतुं परित्यज्य गृहाश्रमम् । दोषदुःखजरामृत्युं पापप्राय भयावहम् ॥ ३१३ भक्तिमन्तः समासन्नविनेया विदितागमाः । गुप्त्यादिषड्विधं सम्यगनुगत्य यथोचितम् ॥ ३१४ प्रोक्तोपेक्षादिभेदेषु वीतरागादिकेषु च । पुलाकादिप्रकारेषु व्यपेतागारकेषु च ॥ ३१५ प्रमत्तादिगुणस्थानविशेषेषु च सुस्थिताः । निश्चयव्यवहारोक्तमुपाध्वं मोक्षमुत्तमम् ॥ ३१६ तथा गृहाश्रमस्थाश्च सम्यग्दर्शनपूर्वकम् । दानशीलोपवासाहदादिपूजोपलक्षिताः ॥३१७॥ आधिकादशोपासकवताः सुशुभाशयाः। सम्प्राप्तपरमस्थानसप्तकाः सन्तु धीषनाः ॥३१८॥ इति तत्तत्वसन्दर्भगर्भवाग्विभवाद्विभोः । ससभो भरताधीशः सर्वमेवममन्यत ॥ ३१९ त्रिज्ञाननेत्रसम्यक्त्वशुद्धिभाग्देशसंयतः । स्रष्टारमभिवन्द्यायाकलासानगरोत्तमम् ॥ ३२० जगत्रितयनाथोऽपि धर्मक्षेत्रेष्वनारतम् । उप्त्वा सद्धर्मबीजानि न्यषिञ्चद्धर्मवृष्टिभिः ॥ ३२१ म्हणून तुम्ही संसारभ्रमण करण्यास कारण असलेल्या गृहाश्रमाचा त्याग करा. कारण हा दोषांनी भरलेला आहे, दुःखें, वृद्धावस्था व मरण याने युक्त आहे. पापाने भरलेला आणि भय उत्पन्न करणारा आहे ॥ ३१३ ॥ तुम्ही भक्तियुक्त अन्तःकरणाचे आहात, निकटभव्य आहात व जिनशास्त्राची माहिती तुम्हाला झाली आहे. तुम्ही ३ गुप्ति, ५ समिति, १० धर्म, १२ अनुप्रेक्षा, क्षुधादि बावीस परीषहांना जिंकणे, व सामायिकादि पाच प्रकारचे चारित्र पाळणे या गुप्त्यादि सहांचे यथायोग्य पालन करा ॥ ३१४ ॥ पूर्वी सांगितलेले जे उपेक्षादिभेदानी युक्त, वीतरागादिक भेदांनी युक्त, ज्यानी गृहत्याग केलेला आहे असे जे पुलाकादि मुनींचे प्रकार आहेत व जे प्रमत्तविरतादि मुनींच्या गुणस्थानात उत्तम रीतीने स्थिर झाले आहेत अशा मुनिवर्यानी निश्चयमोक्ष व व्यवहार मोक्षाची आराधना करावी ॥ ३१५-३१६ ॥ तसेच जे गृहाश्रमात आहेत त्यांनी सम्यग्दर्शनपूर्वक दानशील, उपवास व अरिहंतादिक पूजेमध्ये तत्पर राहावे. ते दर्शनप्रतिमादिक अकरा प्रतिमांचे धारक होऊन उत्तम शुभ परिणामांचे धारक होवोत व ते बुद्धिमान् श्रावक सज्जाति, सद्गृहस्थत्व वगैरे सात परमस्थानांचे धारक होवोत ॥ ३१७-३१८॥ ___ याप्रमाणे जीवादिक तत्त्वांची रचना जीमध्ये भरली आहे अशा त्या प्रभूच्या वाणीच्या सामर्थ्याने भरतेश्वराने सर्व सभेसह प्रभूचा उपदेश पूर्ण मान्य केला ॥ ३१९ ॥ मति, श्रुत आणि अवधि ज्ञानरूपी तीन नेत्रांचा धारक व सम्यकत्वशुद्धीला धारण करणारा, देशसंयमी अशा भरताने आदिब्रह्मा अशा भगवंताला नमस्कार केला व कैलासावरून आपल्या नगराकडे आला ।। ३२० ॥ ___ त्रैलोक्यनाथ आदिभगवंतानी सर्व धर्मक्षेत्रात जिनधर्मरूपी बीजांची निरन्तर पेरणी केली व धर्मकथनरूपी जल वारंवार शिंपडले ।। ३२१ ॥ Page #708 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-३३१) महापुराण सतां सत्फलसम्प्राप्त्यै विहरन्स्वगणैः समम् । चतुर्दशदिनोपेतसहस्राब्दोनपूर्वकम् ॥ ३२२ लक्ष कैलासमासाद्य श्रीसिद्धशिखरान्तरे । पोर्णमासीदिने पौषे निरिच्छः समुपाविशत् ॥ ३२३ तदा भरतराजेन्द्रो महामन्दरभूधरम् । आप्राग्भारं व्यलोकिष्ट स्वप्ने दैर्येण संस्थितम् ॥ ३२४ तदैव युवराजोऽपि स्वर्गादेत्य महौषधि । द्रुमं छित्वा नृणां जन्मरोगं स्वर्यान्तमैक्षत ॥ ३२५ कल्पद्रुममभीष्टार्थ दत्वा नृभ्यो निरन्तरम् । गृहेट् निशामयामास स्वर्गप्राप्तिसमुद्यतम् ॥ ३२६ रत्नद्वीपं जिघाभ्यो नानारत्नकदम्बकम् । प्रादायाभ्रगमोधुक्तमद्राक्षीत्सचिवानिमः ॥ ३२७ वज्रपञ्जरमुद्भिद्य कैलासं गजवैरिणम् । उल्लङघयितुमुद्यन्तं सेनापतिरवक्षत ॥ ३२८ आलुलोके बुधोऽनन्तवीर्यः श्रीमानजयात्मजः । यान्तं त्रैलोक्यमाभास्य सतारं तारकेश्वरम् ॥३२९ यशस्वतीसुनन्दाभ्यां साद्धं शक्रमनःप्रियाः। शोचन्तीश्चिरमद्राक्षीत्सुभद्रा स्वप्नगोचराः ॥३३० ___सज्जनाना धर्मफलांची प्राप्ति व्हावी म्हणून आपल्या सर्वद्वादशगणासह प्रभूनी विहार केला. तो त्यांचा विहार हजार वर्षे व चौदा दिवस ज्यात कमी आहेत अशा एक लक्ष पूर्व वर्षेपर्यन्त झाला. यानन्तर ते कैलास पर्वतावर श्रीशिखर व सिद्धशिखर याच्या मध्यभागी आले आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी निरिच्छ असे होत्साते विराजमान झाले ।। ३२२-३२३ ॥ त्यावेळी महामेरुपर्वत अतिदीर्घ होऊन प्राग्भारपृथ्वीपर्यन्त जाऊन भिडला आहे असे स्वप्नामध्ये भरतराजेन्द्राने पाहिले ॥ ३२४ ॥ त्याच वेळी युवराजाने अर्थात् अर्ककीर्तीने देखिल एक महौषधिवृक्ष मनुष्यांच्या जन्मरोगांचा नाश करून तो स्वर्गाला जात आहे असे पाहिले ॥ ३२५ ॥ त्याच दिवशी गृहपतिने स्वप्नात असे पाहिले- एका कल्पवृक्षाने मनुष्याना त्यांचे इच्छित पदार्थ निरन्तर दिले आणि तो स्वर्गात जाण्यास उद्युक्त झाला ॥ ३२६ ॥ मुख्यप्रधानाने स्वप्नात असे पाहिले-एक रत्नद्वीप रत्ने ग्रहण करण्याची इच्छा असलेल्या लोकाना अनेक रत्नांचा समूह देऊन आकाशात जाण्यासाठी उद्युक्त झाले आहे ॥ ३२७ ॥ वज्रमय पिंजरा फोडून व कैलासपर्वताला उल्लंघून हत्तींचा शत्रु अर्थात सिंह वर जाण्याकरिता उद्युक्त झाला आहे असे सेनापतीने स्वप्नात पाहिले ॥ ३२८ ॥ लक्ष्मीसंपन्न व विद्वान जयकुमारपुत्र अनन्तर्वार्याने त्रैलोक्याला प्रकाशित करून जाणाऱ्या तारकासहित चन्द्राला स्वप्नात पाहिले ।। ३२९ ॥ इन्द्राच्या मनाला आवडणा-या अशा स्त्रिया यशस्वती व सुनन्दा यांच्यासह शोक करीत आहेत असे सुभद्रेने- भरतेश्वराच्या स्त्रीरत्नाने स्वप्नात पाहिले ॥ ३३० ॥ म. ९१ Page #709 -------------------------------------------------------------------------- ________________ ६९८) महापुराण (४७-३३१ वाराणसीपतिश्चित्राङ्गदोऽप्यालोकनाकुलः । खमुत्पतन्तं भास्वन्तं प्रकाश्य धरणीतलम् ॥ ३३१ एवं विलोकितस्वप्ना राजराजपुरःसराः । पुरोधसं फलं तेषामपृच्छन्नयमोदये ॥ ३३२ कर्माणि हत्वा निर्मूलं मुनिभिर्बहुभिः समम् । पुरोः सर्वेऽपि शंसन्ति स्वप्नाः स्वर्गाग्रगामिताम् ॥३३३ इति स्वप्नफलं तेषां भाषमाणे पुरोहिते । तदैवानन्दनामैत्य भर्तुः स्थितिमवेदयत् ॥ ३३४ ध्वनी भगवता दिव्ये संहृते मुकुलीभवत् । कराम्बुजा सभा जाता पूष्णीव सरसोत्यसौ ॥ ३३५ तदाकर्णनमात्रेण सत्वरः सर्वसङ्गतः। चक्रवर्ती तमभ्येत्य त्रिः परीत्य कृतस्तुतिः ॥ ३३६ महामहमहापूजां भक्त्या निवर्तयन्स्वयम् । चतुर्दशदिनान्येवं भगवन्तमसेवत ॥ ३३७ माघकृष्णचतुर्दश्यां भगवान्भास्करोदये । मुहूर्तेऽभिजिति प्राप्तपल्यङको मुनिभिः समम् ॥ ३३८ प्रादिङमुखस्तृतीयेन शुक्लध्यानेन रुद्धवान् । योगत्रितपमन्येन ध्यानेनाघातिकर्मणाम् ॥ ३३९ पञ्चहस्वस्वरोच्चारणप्रमाणेन संक्षयम् । कालेन विदधत्प्रान्तगुणस्थानमधिष्ठितः ॥ ३४० वाराणसी नगराचा राजा चित्रांगदाने सर्व भूतलाला प्रकाशित करून आकाशात गमन करणान्या सूर्याला स्वप्नात पाहिले ॥ ३३१ ॥ ___ याप्रमाणे ज्यानी स्वप्ने पाहिली त्या सगळ्यानी भरतचक्रवर्तीसह पुरोहिताला त्याची फले सूर्योदयाच्या वेळी विचारली ।। ३३२ ॥ __ कर्मांचा नाश करून अनेक मुनीबरोबर भगवान पुरुदेव- आदिजिनेश्वर स्वर्गाच्या अग्रभागावर अर्थात् मोक्षाला जाणार आहेत असे ही सर्व स्वप्ने सांगत आहेत असे पुरोहित सांगत असता त्याचवेळी आनंदनामक एक मनुष्य तेथे आला व त्याने आदिभगवंताच्या स्थितींचे वर्णन केले ॥ ३३३-३३४ ।। भगवंतानी आपला दिव्यध्वनि जेव्हां बंद केला त्यावेळी सूर्य अस्ताला जात असता जशी कमळे मिटतात तशी जिची हस्तरूपी कमळे मिटली आहेत अशी ती सर्व सभा झाली ॥ ३३५ ॥ ते प्रभूचे वृत्त ऐकल्याबरोबर भरत चक्रवर्ती सर्वांना बरोबर घेऊन आदि भगवंता जवळ आला व त्याने प्रभूना तीन प्रदक्षिणा घातल्या व त्यांची त्याने स्तुति केली. यानंतर चक्रवर्तीने भक्तीने स्वतः महामहपूजा केली व चौदा दिवसपर्यन्त याप्रमाणे त्याने भगवंताची सेवा केलो ।। ३३६-३३७ ।। माघकृष्ण चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अभिजित् मुहूर्तावर भगवंतानी अनेक मुनीबरोबर पल्यंकासनाने बसून व पूर्वेकडे तोंड करून तिस-या शुक्लध्यानाने मन, वचन व शरीराची प्रवृत्ति बंद केली आणि चौथ्या शुक्लध्यानाने अघातिकर्माचा क्षय केला. नाम, गोत्र, आयु व वेदनीय कर्माचा नाश केला. हे चौथे शुक्लध्यान अ इ उ ऋ ल या पांच -हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो तितक्या काळाचे असते. अर्थात एवढ्या कालप्रमाणाच्या या ध्यानाने प्रभु शेवटच्या गुणस्थानात-अयोगकेवली गुणस्थानात स्थिर झाले ।। ३३८-३४० ।। Page #710 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-३५०) महापुराण (६९९ शरीरत्रितयापाये प्राप्य सिद्धस्वपर्ययम् । निजाष्टगुणसम्पूर्णः क्षणाप्ततनुवातकः ॥ ३४१। नित्यो निरञ्जनः किञ्चिदूनो देहादमूर्तिभाक् । स्थितः स्वसुखसाद्भूतः पश्यन्विश्वमनारतम् ॥३४२ तवागत्य सुराः सर्वे प्रान्तपूजाचिकीर्षया । पवित्रं परमं मोक्षसाधनं शुचि निर्मलम् ॥ ३४३ शरीरं भर्तुरस्येति परायशिविकार्पितम् । अग्नीन्द्ररत्नभाभासिप्रोत्तुङगमुकुटोद्भुवा ॥ ३४४ चन्दनागुरुकर्पूरपारीकाश्मीरजादिभिः । धृतक्षीरादिभिश्चाप्तवृद्धिना हुतभोजिना ॥ ३४५ जगद्गृहस्य सौगन्ध्यं सम्पाद्याभूतपूर्वकम् । तदाकारोपमर्देन पर्यायान्तरमानयन् ॥ ३४६ अभ्यचिताग्निकुण्डस्य गन्धपुष्पादिभिस्तथा । तस्य दक्षिणभागेऽभूद्गणभत्संस्क्रियानलः ॥ ३४७ तस्यापरस्मिन्दिग्भागे शेषकेवलिकायगः । एवं वह्नित्रयं भूमाववस्थाप्यामरेश्वराः ॥ ३४८ ततो भस्म समादाय पञ्चकल्याणभागिनः । वयं चैवं भवामेति स्वललाटे भुजद्वये ॥ ३४९ कण्ठे हृदयदेशे च तेन संस्पृश्य भक्तितः । तत्पवित्रतमं मत्वा धर्मरागरसाहिताः ॥ ३५० या ध्यानाच्या प्रभावाने औदारिक, तैजस व कार्मण या तीन शरीरांचा नाश झाला व प्रभूला सिद्धपर्याय प्राप्त झाला. त्याना अनन्तज्ञानादि आठ पूर्ण सिद्धपर्यायाची प्राप्ति झाली व ते तत्काळ तनुवातवलयात पोचले- ते प्रभु नित्य, कर्ममलरहित, पूर्वदेहापेक्षा थोडेसे कमी आकाराचे अमर्त अशा स्वरूपाचे बनले व सगळ्या जगाला सतत पाहणारे व आत्मसुखात पूर्ण गढून गेले ।। ३४१-३४२ ॥ त्यावेळी आदि भगवंताच्या मोक्षकल्याणाची पूजा करण्याच्या इच्छेने सर्वदेव आले. भगवंताचे शरीर अतिशय पवित्र व मोक्षप्राप्तीचे अतिशय निर्मल शुद्ध साधन आहे असे मानून अतिशय उत्कृष्ट पालखीत ठेविले. यानंतर चंदन, अगरु, कापराच्या वड्या आणि केशर वगैरे सुगंधितवस्तूंनी व तूप, दूध वगैरेनी ज्याला वाढविले आहे, अग्निकुमार इन्द्रांच्या रत्नकान्तीनी चमकणा-या उंच मुकुटातून जो उत्पन्न झाला आहे अशा अग्नीच्या द्वारे जगतरूपी घराला अभूतपूर्व अशा सुगन्धाने सुगंधित करून प्रभूच्या शरीराचा पूर्वीचा आकार नाहीसा करून दुसरा पर्याय देवानी केला अर्थात् त्या शरीराला त्यानी भस्मरूप केले ॥ ३४३-३४६ ॥ गन्ध, पुष्प आदिकांनी ज्याची पूजा केली आहे अशा त्या अग्निकुण्डाच्या दक्षिणभागी गणधरांच्या शरीरावर संस्कार करण्याचा अग्नि होता व त्याच्या डाव्या बाजूला सामान्यकेवलीच्या शरीरावर संस्कार करण्याचा अग्नि होता. याप्रमाणे इन्द्रानी या तीन अग्नींची स्थापना केली होती॥ ३४७-३४८ ॥ आम्हीही प्रभूप्रमाणे पंचकल्याण प्राप्त करून घेणारे होऊ अशा अभिप्रायाने त्या कुण्डातून त्यानी- इन्द्रादिदेवानी भस्म घेतले व ते त्यानी आपल्या कपाळावर, दोन बाहूवर, गळयावर व हृदयावर भक्तीने लाविले. ते भस्म त्यानी अतिशय पवित्र मानले आणि एकत्र जमून त्यानी आनन्दनृत्य केले ॥ ३४९-३५० ।। Page #711 -------------------------------------------------------------------------- ________________ ७००) महापुराण (४७-३५१ तोषात्सम्पादयामासुः सम्भूयानन्दनाटकम् । सप्तमोपासकाद्यास्ते सर्वेऽपि ब्रह्मचारिणः ॥ ३५१ गार्हपत्याभिधं परमाहवनीयनामकम् । दक्षिणाग्नि ततो न्यस्य सन्ध्यासु तिसषु स्वयम् ॥ ३५२ तच्छिखित्रयसान्निध्ये चक्रमातपवारणम् । जिनेन्द्रप्रतिमाश्चावस्थाप्य मन्त्रपुरस्सरम् ॥ ३५३ तास्त्रिकालं समभ्यर्च्य गृहस्थैविहितादराः । भवतातिथयो यूयमित्याचरव्युरुपासकान् ॥ ३५४ स्नेहादिष्टवियोगोत्थः प्रदीप्तः शोकपावकः । तदा प्रबुद्धमप्यस्य चेतोऽधाक्षीदधीशितुः॥ ३५५ गणी वृषभसेनाख्यस्तच्छोकापनिनीषया । प्राक्रस्त वक्तुं सर्वेषां स्वेषां व्यक्तां भवावलिम् ॥३५६ जयवर्मा भवे पूर्वे द्वितीयेऽभन्महाबलः। ततीये ललिताडाख्यो वनजङ्गचतुर्थके ॥ ३५७ पञ्चमे भोगभूजोऽभूत् षष्ठेऽयं श्रीधरोऽमरः । सप्तमे सुविधिः क्ष्माभृदष्टमेऽच्युतनायकः ॥ ३५८ नवमे वज्रनाभीशो दशमेऽनत्तरान्त्यजः । ततोवतीर्य सर्वेन्द्रवन्दितो वृषभोऽभवत् ॥ ३५९ धनश्रीरादिमे जन्मन्यतो निर्णामिका ततः। स्वयम्प्रभा ततस्तस्माच्छीमत्यार्या ततोऽभवत् ॥३६० स्वयम्प्रभः सुरस्तस्मादस्मादपि च केशवः । ततः प्रतीन्द्रस्तस्माच्च धनदत्तोऽहमिन्द्रताम् ॥ ३६१ गतस्ततस्ततः श्रेयान दानतीर्थस्य नायकः । आश्चर्यपञ्चकस्यापि प्रथमोऽभत्प्रवर्तकः ॥३६२ सातव्या ब्रह्मचर्य प्रतिमेचे घारक अशा ब्रह्मचारी श्रावकापासून आरंभत्यागी, परिग्रहत्यागी, अनुमतित्यागी आणि उद्दिष्टाहारत्यागी अशा पांच प्रतिमाधारक श्रावकांनी तीनही संध्यासमयी प्रथम गार्हपत्य, नंतर आहवनीय आणि तिसरा दक्षिणाग्नि असे तीन अग्निक्रमाने स्थापावेत व या तीन अग्नीच्या जवळ चक्र, छत्र आणि जिनप्रतिमांची स्थापना करावी व त्यांची नित्त्य तीन वेळा आदराने गहस्थानी पूजा करावी. त्यामळे तुम्ही गहस्थांचे आदरणीय अतिथि व्हाल. असा उपदेश केला गेला ।। ३५१-३५४ ।। त्यावेळी जरी भरतेश्वराचे मन अतिशय प्रबुद्ध होते तथापि स्नेहाने इष्ट वियोगापासून तो प्रदीप्त असा शोकरूपी अग्नि प्रकट झाला व त्यामुळे त्यांचे मन दाहयुक्त झाले ।। ३५५ ।। त्यावेळी भरतेशाचा शोक नाहीसा करण्याच्या इच्छेने सर्वांची भवावलि वृषभसेन गणधरानी स्पष्ट सांगण्यास प्रारंभ केला ॥ ३५६ ॥ पहिल्या भवात जयवर्मा राजपुत्र, दुसऱ्या भवात महाबल विद्याधर राजा, तिसऱ्या जन्मात ललितांगदेव, या नंतर चौथ्या भवी वज्रजंघ राजा, पांचव्या भवात भोगभूमिज, सहाव्यात श्रीधरदेव, सातवा जन्म सुविधिराजाचा, आठव्या जन्मी अच्युतेन्द्र, नवव्या भवात वज्रनाभिराजा, दहाव्या जन्मात सर्वार्थसिद्धिअनुत्तरात अहमिन्द्र. तेथून अवतरून सर्व इन्द्रानी वन्दित वृषभजिनेश्वर झाले. याप्रमाणे आदिभगवंताचे अकरा भवांचे वर्णन आहे ।। ३५७-३५९ ॥ दानतीर्थ नामक श्रेयांसराजाचे पूर्वभव वर्णन-पहिल्या जन्मात धनश्री, या नंतर दुसरा जन्म निर्णामिकेचा, तिसऱ्या जन्मी स्वयंप्रभादेवी, तदनंतर चौथ्या जन्मात श्रीमतीवज्रजंघराजाची पत्नी, पांचव्या जन्मी भोगभूमीत आर्या, साहव्या जन्मी ऐशान स्वर्गात स्वयम्प्रभ देव, सातव्या जन्मी केशवनामक राजपुत्र, आठव्या जन्मी प्रतीन्द्र, नवव्या जन्मात धनदत्तश्रेष्ठी, दहाव्या जन्मी अहमिन्द्र व अकराव्या जन्मात दानतीर्थाचा प्रथम नायक व आश्चर्यपंचकाचाही पहिला प्रवर्तक श्रेयांस राजा झाला ॥ ३६०-३६२ ॥ Page #712 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-३६९) महापुराण अतिगृद्धः मुरा पश्चान्नारकोऽनुचमूरकः । दिवाकरप्रभोदेवस्तथा मतिवराह्वयः ॥ ३६३ ततोऽहमिन्द्रस्तस्माच्च सुबाहुर हमिन्द्रताम् । प्राप्य त्वं भरतो जातः षट्खण्डाखण्डपालकः ॥ ३६४ आद्यः सेनापतिः पश्चादार्यस्तस्मात्प्रभङ्करः । ततोऽकम्पनभूपालः कल्पातीतस्ततस्ततः ॥ ३६५ महाबाहुस्ततश्चाभूदहमिन्द्रस्ततश्च्युतः । एष बाहुबली जातो जातापूर्वमहोदयः ॥ ३६६ मन्त्री प्राग्भोगभूजोऽनुसुरोऽनु कनकप्रभः । आनन्दोऽन्वहमिन्द्रोऽनु तत : पीठाह्वयस्ततः । अहमिन्द्रोऽग्रियोऽभूव महमद्य गणाधिपः ॥ ३६७ पुरोहितस्ततश्चार्थी बभूवास्मात्प्रभञ्जनः । धनमित्रस्ततस्तस्मादहमिन्द्रस्ततश्च्युतः । महापीठोऽहमिन्द्रोऽस्मादनन्तविजयोऽभवत् ॥ ३६८ उग्रसेनचमूरोऽतो भोगभूमिसमुद्भवः । ततश्चित्राङ्गदस्तस्माद्वरदत्तः सुरो जयः ।। ३६९ भरतचक्रीचे भवांतर वर्णन याप्रमाणे पहिल्या भवात अतिगृद्धनामक राजा, यानंतर दुसन्या जन्मी नारकी, तिसन्या जन्मात वाघ, चौथ्या जन्मात दिवाकरप्रभनामक देव, तदनन्तर मतिवर नामक वज्रजंघाचा मंत्री, यानंतर सहाव्या भवात अहमिन्द्र, सातव्या भवात सुबाहुराजा, आठव्या भवात अहमिन्द्र व नवव्या भवात षट्खण्ड भरतक्षेत्राचा अखण्डपालक भरतचक्रवर्ती झाला ।। ३६३-३६४ ॥ ( ७०१ बाहुबलीभववर्णन - पहिल्या भवात सेनापति, दुसरा भव भोगभूमिज आर्य, तिसरा भव प्रभङकरनामक देव, चौथ्या भवात अकम्पन राजा, पाचव्या भवात अहमिन्द्र, साहव्या भवात महाबाहुराजा, सातव्या भवात पुनः अहमिन्द्र, आठव्या भवात बाहुबली झाला. या भवात त्याचा अभूतपूर्व उत्कर्ष झाला ।। ३६५-३६६॥ वृषभसेन गणधराचे भववर्णन - पहिल्या भवात मंत्री, दुसऱ्या भवात भोगभूमींत आर्य, तिसऱ्या भवात कनकप्रभदेव, चौथ्या भवात आनन्द पुरोहित, पाचव्या भवात अहमिन्द्र, साहव्या भवात पीठनामक राजा, सातव्या भवात अहमिन्द्र व आठव्या भवात आदिभगवंताचा वृषभसेन नामक मी प्रथम गणेश्वर झालो आहे || ३६७ ।। अनन्तविजयाची भवावली - पहिल्या भवात पुरोहित, दुसन्या जन्मी भोगभूमीत आर्य, तिसन्या भवी प्रभञ्जननामक देव, चौथ्या भवी धनमित्रश्रेष्ठी, पाचव्या भवात अहमिन्द्र, सहाव्या भवात महापीठ नामक राजा, यानंतर सातवा भव अहमिन्द्राचा आणि आठवा भव अनन्तविजय आदिप्रभूचा गणधर झाला ।। ३६८-३६९ ॥ Page #713 -------------------------------------------------------------------------- ________________ ७०२) महापुराण (४७-३७० ततो गत्वाहमिन्द्रोऽभूत्तस्माच्चागत्य भूतलम् । महासेनोऽभवत्कर्ममहासेनाजयोजितः ॥ ३७० हरिवाहननामाद्यो वराहार्यस्ततोऽभवत् । मणिकुण्डल्यतस्तस्मावरसेनः सुरोत्तमः ॥ ३७१ ततोऽस्माद्विजयस्तस्मादहमिन्द्रो दिवश्च्युतः । अजनिष्ट विशिष्टेष्टः श्रीषेणः सेवितः श्रिया ॥३७२ नागदत्तस्ततो वानरार्योऽस्माच्च मनोहरः । देवश्चित्राङगदस्तस्मादभूत्सामानिकः सुरः ॥ ३७३ ततश्च्यतो जयन्तोऽभूदहमिन्द्रस्ततस्ततः । महीतले समासाद्य गुणसेनोऽभवद्गणी ॥ ३७४ लोलुपो नकुलार्योऽस्मादेतस्मात्स मनोरथः । ततोऽपि शान्तमदनस्ततः सामानिकामरः ॥ ३७५ राजा पराजितस्तस्मादहमिन्द्रस्ततोऽजनि । ततो ममानुजो जातो जयसेनोऽयमूजितः ॥ ३७६ इत्यस्मिन्भवसङ्कटे भवभूतः स्वेष्टरनिष्टैस्तथा । संयोगः सहसा वियोगचरमः सर्वस्य नन्वीदृशम् ॥ त्वं जानन्नपिकि विषण्णहृदयो विश्लिष्टकर्माष्टको । निर्वाणं भगवानवापदतुलं तोषे विषादः कुतः॥ पहिल्या भवात उग्रसेनवैश्य, दुसऱ्या भवात वाघ, तिसऱ्या भवात भोगभूमीत आर्य चौथ्या भवात चित्रांगदनामक देव नंतर पाचव्या भवात वरदत्त नामक राजपुत्र, साहव्या भवात जयनामक देव झाला. आठव्या भवात अहमिन्द्र होऊन नवव्या भवात कर्मरूपी महासैन्याला जिंकून ऊर्जितावस्थेला पोहोचलेला. महासेन आदिभगवंताचा गणधर झाला ॥ ३७०-३७१ ॥ पहिल्या भवात हरिवाहन राजपुत्र, दुसऱ्या भवात सूकर, नंतर तिसन्या भवात भोगभूमीत आर्य, चौथ्या भवात मणिकुण्डली नामक देव, पाचव्या भवात वरसेन राजपुत्र, सहाव्या भवात उत्तमदेव झाला. यानंतर विजयनामक राजपुत्र तदनन्तर अहमिन्द्र. तेथून च्युत झाल्यावर विशिष्ट व इष्ट-प्रिय श्रीषेण राजा झाला ।। ३७३ ।। पहिल्या भवात नागदत्त वैश्य, यानन्तर वानर नंतर तिसऱ्या भवांत भोगभूमीत आर्य, चौथ्या भवात मनोहर नामकदेव, पाचव्या भवात चित्रांगद नामक राजा, साहव्या भवात सामानिक सुर-देव. सातव्या भवात जयन्त नामक राजपुत्र, आठव्या भवात अहमिन्द्र देव, नवव्या भवात गुणसेन नामक गणधर झाला ।। ३७४-३७५ ।। जो पूर्वी लोलुपनामक दुकानदार होता यानंतर जो मुंगुस होऊन जन्मला होता. नंतर तिस-या भवात जो भोगभूमीत आर्य झाला. यानंतर चौथ्या भवात मनोरथ नामक देव झाला. पाचव्या भवात तो शान्तमदननामक राजपुत्र झाला. तदनन्तर साहव्या भवात स्वर्गात सामानिक देव झाला, तेथून चवून सातव्या भवात अपराजित नामक राजा झाला. आठव्या भवात अहमिन्द्र झाला व नवव्या भवात माझा जयसेननामक ऐश्वर्यशाली धाकटा भाऊ झाला ॥ ३७६-३७७ ॥ Page #714 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-३८१) महापुराण (७०३ कथमपि चरमाडागासङगमाच्छुद्धबुद्धेः । सकलमलविलोपापावितात्मस्वरूपाः ॥ निरुपमसुखसारं चक्रवतिस्तदीयं । पदमचिरतरेण प्राप्नमो नाप्यमन्यैः ॥ ३७८ भवतु सुहृदां मृत्यौ-शोकः शुभाशुभकर्मभिः । भवति हि स चेत्तेषामस्मिन्पुनर्जननावहः ॥ विनिहतभवे प्रायें तस्मिन्स्वयं समुपागते । कथमयमहो धीमान्कुर्याच्छुचं यदि नो रिपुः ॥ ३७९ अष्टापि दुष्टरिपवोऽस्य समूलतूलम् । नष्टा गुणैर्गुरुभिरष्टभिरेष जुष्टः॥ किं नष्टमत्र निधिनाथ जहीहि मोहम् । सन्धेहि शोकविजयाय धियं विशुद्धाम् ॥ ३८० देहच्युतौ यदि गुरोर्गुरुशोचसि त्वम् । तं भस्मसात्कृतिमवाप्य विवृद्धरागाः ॥ प्राग्जन्मनोऽपि परिकर्मकृतोऽस्य कस्मादानन्दनृत्तमधिकं विदधुर्घनाथाः ॥ ३८१ श्रीवृषभसेन गणधर भरताला पुनः असे म्हणाले- हे भरता, या संसाररूपी संकटात या संसारी प्राण्याला इष्टपदार्थाशी व अनिष्ट पदार्थाशी अकस्मात् संयोग होतो व वियोग होतो पण शेवटी वियोगच आहे व सर्व संसारीजीवाला हा नियम लागू पडतो. हे तू सर्व जाणत असूनही कां बरे मनात खिन्नता धारण केली आहेस ? भगवंतानी ज्ञानावरणादिक आठही कर्माचा नाश केला व अनुपम अशा मोक्षसुखाला त्यानी मिळविले आहे. ही आनन्दाची गोष्ट घडली आहे मग तू यात विषाद का मानीत आहेस ? ॥ ३७८ ॥ हे भरतेश्वरा, आपण देखिल सगळे शेवटचे शरीर धारण करणारे आहोत. आपणाला निर्मल बुद्धीची- केवलज्ञानाची प्राप्ति होणार आहे व संपूर्ण कर्ममल नाहीसा होऊन आपणास आत्म्याचे स्वरूप श्रीजिनेन्द्राच्या संगतीमुळे प्राप्त होणार आहे. हे चक्रवतिन्, भगवंताला जे उपमारहित सुखाचे सार प्राप्त झाले आहे ते फार लौकरच आपणासही प्राप्त होणार आहे व हे सुख मंदलोकाना-मूर्खाना प्राप्त होणार नाही ।। ३७९ ॥ हे भरता, आपले जे मित्र असतात त्यांचे मरण झाले असता शोक होणे साहजिक आहे. कारण त्यांचा तो मृत्यु शुभाशुभ कर्मानो झालेला असतो व पुनः या संसारात त्याना तो मृत्यु कारण होतो म्हणून त्याबद्दल शोक करणे योग्य आहे पण जो मृत्य संसाराचा नाश करणारा असतो अशा मत्यची अर्थात मोक्षाची आपणास प्राप्ति व्हावी म्हणून नेहमी आपण प्रार्थना केली पाहिजे. असा मृत्यु प्राप्त झाला आहे तो त्याना आपण होऊन प्राप्त झाला आहे म्हणून तू बुद्धिमान् आहेस. का शोक करितोस ? अशा उत्सवाच्या प्रसंगी शोक करणे योग्य नाही. जो शत्रु असतो त्याला आपल्या शत्रूला चांगले मरण आलेले सहन होत नाही. आपल्या शत्रूचा उत्कर्ष सहन होत नाही. यास्तव पिताजीना मोक्ष प्राप्त झाल्यामुळे तू शोक करू नकोस. तू हर्ष मान ।। ३८० ।। हे निधिनाथा भरता, या आदिभगवंताचे आठही ज्ञानावरणादि दुष्ट शत्रु मुळापासून पूर्ण नष्ट झाले आहेत आणि हे प्रभु अनन्तज्ञानादिक जे आठ महागुण त्यानी आता नेहमीच युक्त झाले आहेत. यास्तव त्यांचे यात काहीही नुकसान झाले नाही म्हणून तू मोह सोडून दे व शोकावर विजय मिळविण्यासाठी आपल्याशी निर्मल बुद्धीला जोड ॥ ३८१ ॥ Page #715 -------------------------------------------------------------------------- ________________ ७०४) महापुराण (४७-३८२ देहच्युतौ यदि गुरोर्गुरुशोचसि त्वम् । तं भस्मासात्कृतिमवाप्य विवृद्धरागाः ॥ प्राग्जन्मनोऽपि परिकर्मकृतोऽस्य कस्मादानन्दनृत्तमधिकं विदधुवुनाथाः ॥ ३८२ . नेक्षे विश्वदृशं शृणोमि न वचो दिव्यं तदघ्रिद्वये। नम्रस्तनखभाविभासिमुकुटं कर्तुं लभे नाना। तस्मात्स्नेहवशोऽस्म्यहं बहुतरं शोकीति चेदस्त्विदम् । किन्तु भ्रान्तिरियं व्यतीतविषयप्राप्त्यै भवत्प्रार्थना ॥ ३८३ विज्ञानधक् त्रिभुवनैकगुरुर्गुरुस्ते । स्नेहेन मोहविहितेन विनाशयः किम् ॥ स्वोदात्ततां शतमखस्य न लज्जसे किम् । तस्मात्तव प्रथममुक्तिगति न वेत्सि ॥ ३८४ इष्टं कि किमनिष्टमत्र वितथं सङ्कल्प्य जन्तुर्जडः । किञ्चिद्वेष्टयपि वष्टि किञ्चिदनयोः कुर्यादपि व्यत्ययम् ॥ तेननोऽनुगतिस्ततो भववने भव्योऽप्यभव्योपमो । भ्राम्यत्येव कुमार्गवृत्तिरघनो वातङ्कभीर्दुःखितः ॥ ३८५ आदिभगवंताचा देह नष्ट झाला म्हणून तू फार शोक करीत आहेस तर हे देव त्या प्रभूच्या देहाला भस्म करून कां बरे अधिक रागभावयुक्त आनंदयुक्त होत आहेत बरे ? हे स्वर्गाचे अधिपति इन्द्र जन्माच्या पूर्वीपासून अर्थात् प्रभु मातेच्या गर्भात आल्यापसून त्यांची सेवा करीत होते व प्रभु मुक्त झाल्यावर का बरे अधिक उत्साहाने आनन्द नृत्य करीत आहेत? या सर्व प्रकारावरून हे भरता तू शोक करणे योग्य आहे असे वाटत नाही ॥ ३८२ ।।। आता मला जगाला पाहणारे सर्वज्ञ आदिभगवान् दिसत नाहीत व त्यांचा दिव्य उपदेशही आता ऐकावयास मिळत नाही. आता त्यांच्या दोन चरणावर नम्र होऊन त्यांच्या नखाच्या कान्तीनी आता मी माझा मुकुट शोभायुक्त करण्यास असमर्थ आहे. म्हणून मी त्यांच्या स्नेहाला वश होऊन मी फार शोकयक्त झालो आहे असे म्हणशील तर हे असो. परंतु ही भ्रान्ति आहे कारण जो विषय नष्ट झाला आहे त्याची प्राप्ति व्हावी म्हणून इच्छिणे हे व्यर्थ आहे ।। ३८३ ॥ हे राजन्, तुझे पिताजी त्रिकालज्ञानी असल्यामुळे त्रैलोक्याचे ते गुरु होते व तुही मति, श्रत व अवधि या तीन ज्ञानाचा धारक आहेस. असे असता मोहोदयाने उत्पन्न झालेल्या स्नेहाने आपला उत्तमपणा का नष्ट करीत आहेस ? इन्द्राचा मोठेपणा पाहून तुला लाज वाटत नाही काय ? सौधर्मेन्द्रापेक्षाही तू श्रेष्ठ आहेस कारण त्याच्या आधी तू प्रथम मुक्त होणार आहेस. इन्द्र जेव्हा मनुष्य जन्म धारण करील तेव्हा तो मुक्त होईल पण याच भवात मुक्त होणार आहेस म्हणून तू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस ।। ३८४ ।। जो मर्ख प्राणी आहे तो हितकारक कोणती वस्त आहे व अहितकर कोणती यात खोटा संकल्प करून एखाद्या वस्तूचा द्वेष करितो व एखाद्या वस्तूची अभिलाषा करितो किंवा या इष्टानिष्ट वस्तुमध्ये विपरीत कल्पना देखिल करितो अर्थात इष्ट वस्तूला अनिष्ट वस्तु मानतो व अनिष्टाला इष्ट मानतो त्यामुळे तो भव्य असूनही अभव्याप्रमाणे मिथ्या श्रद्धादिकानी युक्त होतो त्यामुळे त्याची पापाची परंपरा चालू राहते म्हणून अभव्याप्रमाणे दुःखी, निर्धन व कुमार्गात प्रवृत्ति करणारा होतो ॥ ३८५ ।। Page #716 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-३९१) महापुराण (७०५ भव्यस्यापि भवोऽभवद्भगवतः कालादिलब्धेविना । कालोऽनादिरचिन्त्यदुःखनिचितो घिग्धिस्थिति संसृतेः ।। इत्येतद्विदुषात्र शोच्यमथवा नेतच्च यद्देहिनाम् । भव्यत्वं बहुषा महोशसहजा वस्तुस्थितिस्तादृशी ॥ ३८६ गतानि सम्बन्धशतानि जन्तोः । अनन्तकालं परिवर्तनेन ॥ नावैहि कि त्वं हि विबुद्धविश्वो वृथव मुह्येः किमिहेतरो वा ॥ ३८७ कर्मभिःकृतमस्यापि न स्थास्नु त्रिजगत्पतेः । शरीरादि ततस्त्याज्यं मन्वते तन्मनीषिणः ॥ प्रागक्षिगोचरः संप्रत्येष चेतसि वर्तते । भगवांस्तत्र कः शोकः पश्यैनं तत्र सर्वदा ॥ ३८९ इति मनसि यथार्थ चिन्तयन्शोकर्वाह्न। शमय विमलबोधाम्भोभिरित्याबभाषे॥ गणभूदय स चक्री दावदग्धो महीध्रो । नवजलदजलैर्वा तद्वचोभिः प्रशान्तः ॥ ३९० चिन्तां व्यपास्य गुरुशोककृतां गणेशमानम्य नम्रमुकुटो निकटात्मबोषिः। निन्दनितान्तविसरां निजभोगतृष्णां मोक्षोत्सुकः स्वनगरं व्यविशद्विभूत्या ॥ ३९१ भगवान् भव्यच होते पण त्याना देखिल जोपर्यन्त काललब्धीची प्राप्ति झाली नाही तोपर्यन्त संसारात फिरावे लागले आहे. हा काल अनादि आहे व अचिन्त्य अशा दःखांनी भरलेला आहे. म्हणून या संसाराच्या स्थितीला वारंवार धिक्कार असो हे सर्व जाणून विद्वानाने शोक करणे योग्य आहे किंवा नाहीही. कारण हे राजन् या जगात प्राण्याचे भव्यत्व नाना प्रकारचे आहे. म्हणून वस्तुस्थिति स्वाभाविक म्हणजे नानाप्रकारची आहे ।। ३८६ ॥ हे भरता, हा प्राणी अनन्तकालापासून संसारात फिरत आहे व याचे शेकडो संबंध होऊन गेले आहेत. हे भरता, सगळ्या जगाला जाणणा-या तुजकडून हे जाणले गेले नाही काय? हे भरता तू अज्ञानिजनाप्रमाणे व्यर्थ का मोह पावत आहेस ? हे भरता, त्रैलोक्याचे स्वामी असलेल्या या आदिभगवंताचे देखिल शरीरादिक कर्मानी नित्य टिकणारे बनविले नाहीत. म्हणून हाणे लोक या शरीरादिकाना त्याज्य मानतात ।। ३८७-३८८ ।। हे श्रीआदिप्रभु पूर्वी डोळ्यांचा विषय होते पण आता ते अन्तःकरणात आहेत. म्हणून त्याविषयी शोक का करावा ? हे भरता तू त्याना नेहमी आपल्या मनात पाहा ॥३८९।। हे भरतेशा याप्रमाणे मनात यथार्थ विचार करून तु आपल्या निर्मल ज्ञानरूपी जलाने शोकरूपी अग्नीला शान्त कर. असे वृषभसेन गणधर चक्रेशाला म्हणाले, यानंतर जसा वनाग्नीने दग्ध झालेला पर्वत नवीन मेघाच्या पाण्यानी शान्त होतो तसे वृषभसेनगणधराच्या वचनानी भरतचक्री शान्त झाला ।। ३९० ॥ ज्याला आत्मज्ञान लौकरच होईल अशा त्या भरतेश्वराने आपल्या पित्याविषयींची शोकचिन्ता मनातून काढून टाकली आणि ज्याचा मुकुट नम्र झाला आहे अशा त्या भरतेशाने वृषभसेन गणधराना नमस्कार केला. जी अतिशय वृद्धिंगत झाली आहे अशा आपल्या विषयोपभोगाच्या इच्छेची निन्दा करणारा मोक्षोत्सुक झालेला असा तो भरत आपल्या सर्व ऐश्वर्यासह नगरात प्रविष्ट झाला ॥ ३९१ ।। मा. ९२ Page #717 -------------------------------------------------------------------------- ________________ ७०६) महापुराण (४७-३९२ अथ कदाचिदसौ वदनाम्बुजे समभिवीक्ष्य समुज्ज्वलदर्पणे। पलितमैक्षत दूतमिवागतं परमसौख्यपदात्पुरुसन्निधेः ॥ ३९२ आलोक्य तं गलितमोहरसः स्वराज्यं मत्वा जरत्तृणमिवोद्गतबोधिरुद्यन् । आदातुमात्महितमात्मजमर्ककीति लक्ष्म्या स्वया स्वयमयोजयजितेच्छः ॥ ३९३ . विदितसकलतत्वः सोऽपवर्गस्य मार्ग जिगमिषुरपसत्त्वैर्दुर्गमं निष्प्रयासम् । यमसमितिसमग्रं संयम शम्बलं वादित विदितसमर्थाः किं परं प्रार्थयन्ते ॥ ३९४ मनःपर्ययज्ञानमप्यस्य सद्यः समुत्पन्नवत्केवलं चानु तस्मात् ॥ तदैवाभवद्भव्यता तादृशी सा। विचित्राङगिनां निर्वृतेः प्राप्तिरत्र ॥ ३९५ स्वदेशोद्भवैरेव सम्पूजितोऽसौ । सुरेन्द्रादिभिः साम्प्रतं वन्द्यमानः॥ त्रिलोकाधिनाथोऽभवतिक न साध्यम् । तपो दुष्करं चेत्समादातुमीशः ॥ ३९६ एके वेळी भरतेश्वराने अतिशय उज्ज्वल अशा दर्पणात आपले मुखकमल पाहिले. त्यावेळी त्यावर वृद्धावस्थेचा जणु दूत उत्तम सौख्याचे स्थान आहे अशा आदिभगवंतांच्या जवळ आपणास जणु बोलावण्यासाठी आला आहे असा जरेमुळे आलेला पांढरेपणा पाहिला ॥३९२॥ तो पांढरेपणा पाहून भरताचा मोहरस सगळा गळून गेला. त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले. त्याने आपले स्वराज्य जीर्ण गवताप्रमाणे तुच्छ मानले. आत्महित ग्रहण करण्यासाठी तो उद्युक्त झाला व ज्याची इच्छा उत्कृष्ट आहे अशा त्या भरताने आपल्या राज्यलक्ष्मीबरोबर अर्ककीर्तिला जोडले ।। ३९३ ।। ज्याला सर्व तत्त्वांचे स्वरूप समजले आहे अशा ह्या चक्रवर्तीने धैर्यरहित लोक ज्यातून जाण्यास असमर्थ आहेत अशा मोक्षमार्गात प्रथासावाचून जाण्याची इच्छा धरली. महाव्रते, ईर्यासमित्यादिक समिति यांनी युक्त अशी संयमरूपी शिदोरी त्याने आपल्या बरोबर घेतली. बरोबरच आहे की, ज्याना परमार्थाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. ते लोक इतराची प्रार्थना करीत नसतात. अर्थात् भरतेश्वराने स्वतःच दीक्षा घेतली ।। ३९४ ॥ तत्काळ भरतेशमुनीना मनःपर्ययज्ञान उत्पन्न झाले. त्याच्या पाठोपाठ केवलज्ञानही उत्पन्न झाले. त्याचवेळी त्याला अपूर्व अशी भव्यता प्राप्त झाली व हे योग्यच आहे की, प्राण्याना मोक्षाची प्राप्ति मोठ्या विचित्रतेने होते ॥ ३९५ ॥ हा भरतचक्री पूर्वी फक्त आपल्या देशातल्या राजेलोकाकडूनच पूजिला जात होता पण आता इन्द्रादिकांच्याद्वारे देखील पूजनीय झाला, वंदनीय झाला ; एवढेच नाही तर तो भरतयतीश्वर त्रैलोक्याचा नाथ देखिल झाला आहे. हे बरोबरच आहे की, जे कठिण तपश्चरण करण्यास समर्थ असतात त्याना कोणती वस्तु साध्य होत नाही बरे ? अर्थात् त्याना सर्व वस्तु साध्य होतात ।। ३९६ ॥ Page #718 -------------------------------------------------------------------------- ________________ ४७-४००) महापुराण (७०७ परिचितयतिहंसो धर्मवष्टि निषिञ्चन् । नास कृतनिवेशो निर्मलस्तुङ्गवत्तिः॥ फलमविकलमय्यं भव्यसस्येषु कुर्वन् । व्यहरदखिलदेशान् शारदो वा स मेषः ॥ ३९७ विहृत्य सुचिरं विनेयजनतोपकृत्स्वायुषो । मुहूर्तपरिमास्थितौ विहितसक्रियो विच्युतौ ॥ तनुत्रितयबन्धनस्य गुणसारमूर्तिः स्फुरन् । जगत्रयशिखामणिः सुखनिधिः स्वधाम्नि स्थितः॥३९८ सर्वेऽपि ते वृषभसेनमुनीशमुख्याः । सख्यं गताः सकलजन्तुषु शान्तचित्ताः॥ कालक्रमेण यमशीलगुणाभिपूर्णाः । निर्वाणमापुरमितं गुणिनो गणीन्द्राः ॥ ३९९ यो नेतेव पृथु जघान दुरिताराति चतुःसाधनो । येनाप्तं कनकाश्मनेव विमलं रूपं स्वभाभास्वरम् ॥ आभेजुश्चरणौ सरोजजयिनौ यस्यालिनो वामरास्तं त्रैलोक्यगुरुं पुरुं श्रितवतां श्रेयांसि वः स क्रियात्॥ ___ संयम पाळणारे यतिरूपी हंस ज्याच्या परिचयाचे आहेत, जो धर्मवृष्टि करून आकाशात निवास करीत आहे, जो निर्मल आणि उत्तम स्वभावाचा अर्थात् उच्चस्थानी विराजमान आहे, भव्यरूपी साळीमध्ये मोक्षरूपी पूर्ण व उत्तम फल उत्पन्न करणारा, असा भरतकेवलीजिन शरत्कालच्या मेघाप्रमाणे सर्व देशात विहार करीत असे ॥ ३९७ ॥ दीर्घ कालपर्यंत विहार करून भव्य शिष्यावर उपकार करणाऱ्या त्या भरतकेवलीने जेव्हां अन्तर्मुहूर्त आयुष्य बाकी उरले तेव्हां योगनिरोध केला. त्यामुळे औदारिक, तेजस व कार्मण या तीन शरीरांचे बंधन नाहीसे झाले. सम्यक्त्वादि गुणांचा सार हेच ज्याचे शरीर आहे असा प्रकाशमान, त्रैलोक्याचा चूडामणि व सुखांचा साठा होऊन तो मुक्तिस्थानी विराजमान झाला ।। ३९८ ॥ सर्व प्राणिसमूहात ज्यांची मित्रता आहे व जे शांतचित्ताचे आहेत, वृषभसेन गणधर ज्यात श्रेष्ठ आहेत असे ते सगळे गुणयुक्त श्रेष्ठ गणधर कालक्रमाने महाव्रते, अठरा हजार शील, वगैरे गुणानी सर्वथा पूर्ण झाले व ज्याला अन्त नाही अशा मोक्षाला प्राप्त झाले ।। ३९९॥ ज्यानी सम्यग्दर्शनाराधना, सम्यग्ज्ञानाराधना, सम्यक्चरित्राराधना आणि सम्यक्तपआराधना या चार आराधनारूपी सैन्य घेऊन सेनापतीप्रमाणे महान् पापरूपी शत्रूला ठार मारले. सुवर्णपाषाण, अग्नि आदिक अनेक साधनानी आपले मलिनस्वरूप टाकून शुद्ध व चमकणारे स्वरूप धारण करितो तसे ज्यानी शुद्ध व केवलज्ञानस्वरूप मिळविले आहे. कमळाच्या शोभेला जिंकणारे ज्याचे चरण भुंग्याप्रमाणे सर्व देव आदराने सेवितात. जे त्रैलोक्याचे गुरु आहेत, अशा आदिभगवंतांचा आश्रय घेणान्या म्हणजे त्यानी उपदेशिलेल्या मार्गाने वागणाऱ्या अशा तुम्हा भक्तांची ते सर्व प्रकाराची कल्याणे करोत ॥ ४०० ॥ Page #719 -------------------------------------------------------------------------- ________________ ७०८) महापुराण योऽभूत्पञ्चदशो विभुः कुलघृतां तीर्थेशिनां चाग्रिमः । वृष्टो येन मनुष्यजीवनविधिर्मुक्तेश्च मार्गो महान् ॥ बोधो रोधविमुक्तवृत्तिरखिलो यस्योदयाद्यन्तिमः । स श्रीमान् जनकोsखिलावनिपतेराद्यः स दद्याच्छ्रियम् ॥ ४०१ साक्षात्कृत प्रथित सप्तपदार्थसार्थः । सद्धर्मतीर्थपथपालनमूल हेतुः ॥ भव्यात्मनां भवभूतां स्वपदार्थसिद्धि मिक्ष्वाकु वंशवृषभो वृषभो विदध्यात् ॥ ४०२ यो नाभेस्तनयोऽपि विश्वविदुषां पूज्यः स्वयम्भूरिति । त्यक्ताशेषपरिग्रहोऽपि सुधियां स्वामीति यः शब्द्यते ॥ मध्यस्थोऽपि विनेयसत्त्वसमितेरेवोपकारी मतो । निर्दानोऽपि बुधैरुपास्यचरणो यः सोऽस्तु वः शान्तये ॥ ४०३ ( ४७-४०१ इत्यार्षे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे प्रथमतीर्थंकरचक्रधरपुराणे सप्तचत्वारिंशत्तमं पर्व परिसमाप्तम् ॥ ४७ ॥ श्रीमदभगवान् हे कुलकरामध्ये १५ वे कुलकर झाले आणि सर्व तीर्थंकरात पहिले तीर्थंकर झाले. यानी मनुष्यांच्या जीवनाचे उपाय पाहिले व लोकाना सांगितले आणि मुक्तीचा महान् मार्ग लोकाना सांगितला. ज्ञानावरणादिकर्मांच्या नाशाने प्रतिबंधरहित असे या प्रभूला शेवटचे ज्ञान - केवलज्ञान उत्पन्न झाले व हे आदिभगवान् सर्व राजांचा स्वामी जो भरत त्याचे लक्ष्मीसंपन्न जनक -पिता होते. ते तुम्हा सर्वांना लक्ष्मीप्रदान करोत ॥। ४०१ ॥ ज्यानी जीवादिक सात पदार्थांचा समूह आपल्या केवलज्ञानाने पाहिला आहे, आत्मकल्याणाचा जो उत्तम जिनधर्मरूपी तीर्थ-मार्ग त्याचे रक्षण करण्यास जे मूलकारण आहेत, भव्य अशा संसारी जीवांना आत्मा व परपुद्गलादिक तत्वे याची सिद्धि करून देणारे जे सम्यग्ज्ञान त्याच्या सिद्धीला त्यानी प्राप्त करून दिले आहे. ते इक्ष्वाकुवंशात श्रेष्ठ असलेले श्रीवृषभनाथ भव्याना परमार्थसिद्धि करून देवोत ॥ ४०२ ॥ जे नाभिराजाचे पुत्र असूनही स्वयम्भू आहेत अर्थात् स्वतःच उत्पन्न झाले आहेत व जगातील सर्व विद्वानाना पूज्य आहेत, प्रभूनी सर्व परिग्रहांचा त्याग केला होता तरीही जे उत्तम बुद्धिवंताचे स्वामी म्हणून म्हटले जात असत, मध्यस्थ- रागद्वेषरहित असूनही जे भव्य शिष्यसमूहावर उपकार करणारे मानले जात असत व दान देणारे नसूनही विद्वान लोक त्यांच्या चरणाची उपासना करीत असत ते आदिभगवान् तुमच्या शान्तिसुखाला कारण होवोत ॥। ४०३ ।। याप्रमाणे भगवद्गुणभद्राचार्यांनी रचलेल्या आर्षत्रिषष्टिलक्षण श्रीमहापुराण संग्रहाच्या मराठी भाषानुवादांतील प्रथम तीर्थंकर श्रीवृषभनाथ आणि प्रथम चक्रवर्ती श्रीभरत यांचे वर्णन करणारे हें सत्तेचाळीसावें पर्व समाप्त झाले. Page #720 -------------------------------------------------------------------------- _