SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 553
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५४२) महापुराण (४३-२८३ चातका वान्दवृष्टया ते तदृष्ट्या तुष्टिमागमन् । आह्लादः कस्य वा न स्यादीप्सितार्थसमागमे ।। स्वसौभाग्यवशात्सर्वान् साप्यालोक्यातुषत्तराम् । श्लाघ्यं तद्योषितां पुंसां शौयं वा निजितद्विषाम् ॥ ततःकञ्चकिनिर्देशाबाला लीलावलोकितैः । आकृष्य हृदयं तेषां तत्सौधात् समवातरत् ॥ २८५ ततः कञ्चुकिनिर्देशाबाला लीलावलोकितैः । आकृष्य हृदयं तेषां तत्सौधात्समवातरत् ॥ २८६ यस्य यत्र गता स्यादृक्सा तत्रैवेव कोलिता । ते तस्यामवरूढायां खिन्ना वा तदनीक्षकाः ॥ २८७ किडकिणीकृतझडकारारावरम्यं रथं ततः । व्यूढं रूढर्हयैः स्वर्णकर्णचामरशोभिभिः ॥ २८८ उत्पतन्निपतत्केतुबाहुं नीरूपरूपिणाम् । साक्षादपह्नवाह्वाने कुर्वन्तमिव सन्ततम् ॥ २८९ पुनरध्यास्य हृज्जन्मविद्येव हृदयप्रिया । मुक्ताभूषाप्रभामध्ये शारदीव तडिल्लता ॥ २९० ___ यानंतर कंचुकीच्या विनंतीला अनुसरून ती सर्वतोभद्र नांवाच्या प्रासादावर चढून तेथील सिंहासनावर बसली व आपल्या चंचल नीलकमलाच्या पाकळीप्रमाणे असलेल्या डोळ्यांनी तिने सर्व राजांना स्नान घातले अर्थात् पाहिले. जसे मेघाच्या वृष्टीने चातक सन्तुष्ट होतात तसे त्या सुलोचनेने राजाना आपल्या दृष्टीने पाहिल्यामुळे आनंद वाटला. बरोबरच आहे की आपण इच्छिलेला पदार्थ आपल्या दृष्टीत पडल्यावर कोणाला बरे आनंद वाटत नाही ? जसे शत्रूना जिंकणाऱ्या पुरुषांचे शौर्य प्रशंसनीय असते तसे त्या सुलोचनेचे सौभाग्य प्रशंसनीय होते. त्या सौभाग्याने ती त्या सर्व राजांना पाहून अधिक संतुष्ट झाली. यानंतर कंचुकीच्या वचनाला अनुसरून ती सुलोचना सर्वांच्या हृदयाला आपल्या लीलेच्या अवलोकनाने ओढून घेऊन त्या सौधांतील सिंहासनावरून खाली उतरली ।। २८२-२८५ ।। यानंतर कंचुकीच्या सांगण्यावरून ती कन्या आपल्या खेळकर अवलोकनांनी त्या राजांची मनें हरण करून त्या सौधातील सिंहासनावरून खाली उतरली. ।। २८६ ।। ज्या ज्या राजाची दृष्टि या सुलोचनेच्या ज्या ज्या अवयवावर पडली ती तेथेच जणु जखडून बांधण्यासारखी झाली. व जेव्हां ती सिंहासनावरून खाली उतरली तेव्हां ती त्यांना तेथे दिसली नाही म्हणून ते खिन्न झाले ॥ २८७ ॥ यानंतर जी कामदेवाच्या विद्येप्रमाणे सर्वांच्या हृदयाला आवडते, जी मोत्यांच्या अलंकाराच्या क्रान्तीमध्ये शरत्कालाच्या विजेप्रमाणे शोभते, व जिच्यावर पडत असलेल्या मनुष्याच्या दृष्टिदोषाला दुरूनच जे जणु दूर करीत आहेत, असे चन्द्राशी स्पर्धा करणारे व हंसांच्या पंखाप्रमाणे शुभ्र निर्मल असे चामर वारले जात होते, अशी ती सुलोचना रथांत बसून चालली. ज्यांच्या कानाजवळ सोन्याचे चामर शोभत आहेत असे घोडे रथाला जुंपले होते. व तो रथ धुंघराच्या आवाजाने मोठा सुंदर दिसत होता. ते जुंपलेले घोडे त्या रथाला नेत होते. त्यावर असलेला ध्वजस्तंभ खालीवर फडकत होता व तो कुरूप मनुष्याचे निराकरण करून सुरूप मनुष्यांना साक्षात् बोलावित आहे असे वाटत होते ।। २८८-२९० ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy