________________
३८-१५६)
महापुराण
(३८५
सोऽनुरूपं ततो लब्ध्वा सूनुमात्मभरक्षमम् । तत्रारोपितगार्हस्थ्यः सन्प्रशान्तिमतः श्रयेत् ॥ १४८ विषयेष्वनभिष्वङ्गो नित्यस्वाध्यायशीलता । नानाविधोपवासैश्च वृत्तिरिष्टा प्रशान्तता ॥ १४९
। इति प्रशान्तिः । २१ ततः कृतार्थमात्मानं मन्यमानो गृहाश्रमे । यदोद्यतो गृहत्यागे तदास्यैष क्रियाविधिः ॥ १५० सिद्धार्थतां पुरस्कृत्य सर्वानाहूय सम्मतान् । तत्साक्षिसूनवे सर्व निवेद्यातो गृहं त्यजेत् ॥ १५१ कुलक्रमस्त्वया तात सम्पाल्योऽस्मत्परोक्षतः। विधाकृतं च नो द्रव्यं त्वयेत्थं विनियोज्यताम् ॥१५२ एकोऽशो धर्मकार्येऽतो द्वितीयः स्वगृहव्यये । तृतीयः संविभागाय भवेत्त्वत्सहजन्मनाम् ॥ १५३ पुन्यश्च संविभागार्हाः समं पुत्रैः समांशकः । त्वं तु भूत्वा कुलज्येष्ठः सन्तति नोऽनुपालय ॥१५४ श्रुतवृत्तक्रियामन्त्रविषिज्ञस्त्वमतन्द्रितः । प्रपालय कुलाम्नायं गुरुं देवांश्च पूजयन् ॥ १५५ इत्येवमनुशिष्य स्वं ज्येष्ठं सूनुमनाकुलः । ततो दीक्षां समादातुं द्विजः स्वं गृहमुत्सृजेत् ॥ १५६
इति गृहत्यागः । २२
यानन्तर आपल्याला अनुरूप व आपला संसारभार उचलण्यास समर्थ असा मुलगा झाल्यावर तो गृहस्थाचार्य त्याच्यावर आपला गृहस्थपणा टाकतो व आपण प्रशान्तिक्रियेचा आश्रय घेतो. तेव्हा त्यावेळी त्याच्या आत्म्यात विषयाविषयी अनासक्ति उत्पन्न होते. नेहमी जिनागमाचा स्वाध्याय तो करतो आणि अनेक प्रकारचे व्रतोपवास तो करतो. अशा अवस्थेला तो प्राप्त झाला म्हणजे त्याची ही २१ वी प्रशान्ति क्रिया होय ॥ १४८-१४९ ॥
जेव्हां तो गृहस्थाचार्य आपणास गृहस्थाश्रमात कृतकृत्यता प्राप्त झाली असे मानतो तेव्हां तो घराचा त्याग करण्यात उद्युक्त होतो. त्यावेळी हा क्रियाविधि करावा. गृहस्थाश्रमात राहण्याची आपली इच्छा पूर्ण झाली असा विचार करून आपणास मान्य असतील अशा लोकाना बोलावून त्यांच्या साक्षीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास सर्व सोपवतो व स्वतः नंतर गृहत्याग करतो. तो आपल्या ज्येष्ठ पुत्रास असे म्हणतो, हे पुत्रा 'तू आमच्या कुलात ज्येष्ठ होऊन, माझ्या परोक्ष माझ्या सन्ततीचे रक्षण कर. मी द्रव्याचे तीन विभाग केले आहेत त्याचा पुढीलप्रमाणे विनियोग कर- एक अंश धर्मकार्यात खर्च कर. दुसरा अंश घर कार्यात तू खर्च कर. तू तिसरा विभाग तुझ्या बंधूसह वाटून घे व तुझ्या बहिणी ज्या आहेत त्यांनाही तू आपल्या भावाबरोबरच समान धनविभाग दे. याप्रमाणे तू आमच्या कुलातील ज्येष्ठ पुत्र आहेस यास्तव माझ्या या सर्व सन्ततीचे पालन कर. हे पुत्रा, तू शास्त्र, वृत्त-सदाचार, क्रिया, मंत्र विधि या कार्यात आलस्य सोडून यांचे पालन कर. आपल्या कुलाचाराचे पालन करून गुरु आणि जिनदेवादिकांचे पूजन करीत जा, याप्रमाणे आपल्या ज्येष्ठ पुत्राला शान्त रीतीने उपदेश करावा. यानन्तर त्याने मुनिदीक्षा घेण्यासाठी घराचा त्याग करावा ॥ १५०-१५६ ॥ म. ४९
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org