SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 28
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २५- १०६ ) युगादिपुरुषो ब्रह्मा पञ्चब्रह्ममयः शिवः । परः परतरः सूक्ष्मः परमेष्ठी सनातनः ॥ १०५ स्वयंज्योतिरजोऽजन्मा ब्रह्मयोनिरयोनिजः । मोहारिविजयी जेता धर्मचक्री दयाध्वजः ॥ १०६ लोकत्रयपति ।। ४१ ।। जगत्पति- त्रैलोक्याचे स्वामी || ४२ || अनन्तजित् - ज्याला अन्त नाही अशा संसाराला प्रभूंनी जिंकले म्हणून अनन्तजित् अथवा अनन्त - अलोकाकाशाला जित्-प्रभूनी जिंकले -केवलज्ञानाने ज्यानी अलोकाकाशाच्या पाराला जिंकले अथवा अनन्त-विष्णूला व शेषनागाला प्रभूनी जिंकले म्हणून ते अनन्तजित्. मोक्षाला अनन्त म्हणतात. त्याला प्रभूनी जिंकले, त्याची प्राप्ति करून घेतली ।। ४३ ।। अचिन्त्यात्मा - वचन आणि मनाला प्रभूचे स्वरूप-आत्मा विषय होत नाही. म्हणून ते अचिन्त्यस्वरूपाचे आहेत ॥ ४४ ॥ भव्यबन्धु - भव्यरत्नत्रयाला योग्य असलेल्या जीवावर बंधु-उपकार करणारे प्रभु आहेत ।। ४५ ।। अबन्धन - प्रभूना कर्मबंधन नसल्यामुळे ते अबन्धन आहेत. अथवा मोह, ज्ञानावरण दर्शनावरण, आणि अन्तराय या कर्मबंधनांनी रहित प्रभु अबन्धन आहेत ।। ४६ ।। महापुराण युगादिपुरुष - युगाच्या आरंभी असलेला पुरुष ।। ४७ ।। ब्रह्मा - केवलज्ञानादिक गुण ज्याच्या ठिकाणी पूर्ण वाढले आहेत असा ॥ ४८ ॥ पञ्चब्रह्ममय - मति, श्रुत, अवधि, मन:पर्यय व केवलज्ञान या पाच ज्ञानानी परिपूर्ण असलेला. केवलज्ञानात मत्यादिक चार ज्ञाने अन्तर्भूत करून पंचब्रह्ममय भगवान् आहेत. अथवा अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय व साघु या पंचपरमेष्ठींच्या गुणानी युक्त असल्यामुळे आदिभगवान् पंचब्रह्ममय आहेत ।। ४९ ।। शिव- परमानन्दाचे स्थान अशा मोक्षात निवास करणारा ॥ ५० ॥ पर- जो लोकाना रक्षितो, गुणानी पूर्ण करतो व मुक्तिपदात स्थापन करितो तो पर होय ॥ ५१ ॥ परतर- पर असे जे सिद्ध परमेष्ठी त्यापेक्षाही धर्माचा उपदेश देण्याने श्रेष्ठ असलेला ।। ५२ ।। सूक्ष्म- ज्याचे स्वरूप केवलज्ञानाने जाणता येते असा ।। ५३ ।। परमेष्ठी - इन्द्र, धरणेन्द्रादिकांना वन्द्य अशा पदात असणारा ॥ ५४ ॥ सनातन - नेहमी आपल्या शुद्धस्वरूपात विराजमान झालेला ।। ५५ । Jain Education International ( १७ स्वयंज्योति - भगवंताचा आत्माच चक्षुः नेत्र स्वरूपाचा आहे. सर्व पदार्थाना प्रकाशित करतो म्हणून तो सूर्य स्वरूपाचा आहे ।। ५६ ।। अज - चतुर्गतीमध्ये आता तो उत्पन्न होणार नाही म्हणून अज आहे ॥ ५७ ॥ अजन्मा - ज्याचा आता गर्भात कधीही वास होणार नाही ।। ५८ ।। ब्रह्मयोनि - भगवान् ब्रह्माचे म्हणजे तपाचे, ज्ञानाचे आत्म्याचे, चारित्राचे व मोक्षाचे उत्पत्तिस्थान आहेत. म्हणून त्याना ब्रह्मयोनि म्हणतात ।। ५९ ।। अयोनिज - भगवान् पंचम गतिरूप मोक्षात उत्पन्न होतात व ती पंचमगति आत्म्याचे अत्यंत शुद्ध स्वरूप आहे. म्हणून ते अयोनिज होत ॥ ६० ।। मोहारि - मोहनीयकर्माचा भगवान् शत्रु आहेत. म्हणून त्याना मोहारि हे नांव आहे ।। ६१ ।। विजयी - भगवंतानीं मोहादिकर्माना जिंकून विशिष्ट जय मिळविला व त्या विजयाने त्यानी मुक्तिपुरीत प्रवेश केला ।। ६२ ।। जेता - सर्वापेक्षा उत्कर्षाने अधिक असणे हा प्रभूंचा स्वभावच आहे. म्हणून ते यथार्थ जेता आहेत ।। ६३ ।। धर्मचक्री - जेव्हां म. ३ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy