SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 211
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २०० ) महापुराण ( ३१ - १४६ आरूढो जगतीमद्रेर्व्यूढोरस्को महाभुजः । षड्भिर्मासैः प्रशान्तोष्मं सोऽध्यवात्सीद्गुहामुखम् ।। १४६ तत्रासीनश्च संशोध्य ब्रह्नपायं गृहोदरम् । कृतरक्षाविधिः सम्यक् प्रत्यायाच्छिबिरं प्रभोः ॥ १४७ अथ सम्मुखमागत्य सानीकैर्नृपसत्तमः । प्रत्यगृह्यत सेनानीः सजयानकनिःस्वनम् ॥ १४८ विभक्ततोरणामुच्चैः प्रचलत्केतुमालिकाम् । महावीथीमतिक्रम्य प्राविक्षत्स नृपालयम् ।। १४९ तुरङ्गमवराद्दूरात्कृतावतरणः कृती । प्रभर्नृपासनस्थस्य प्रापदास्थानमण्डपम् ॥ १५० दूरानतचलन्भौलिसम्बद्धकरकुड्मलः । प्रणनाम प्रभुं सभ्यैर्वोक्ष्यमाणः स विस्मितः ।। १५१ मुखरैजयकारेण म्लेच्छराजः ससाध्वसम् । प्रणेमे प्रभुरभ्येत्य ललाटस्पृष्टभूतलैः ॥ १५२ तदुपाहुतरत्नाद्यैरर्घ्ययनुपढौकितः । नामादेशं च तानस्मै प्रभवेऽसौ न्यवेदयत् ॥ १५३ ज्याचे वक्षःस्थल छाती पुष्ट आहे, ज्याचे दोन बाहु पुष्ट आहेत असा तो सेनापति या पर्वताच्या वेदिकेवर आरूढ झाला व सहा महिन्यानी जिची उष्णता नाहीशी झाली आहे अशा गुहेच्या मुखाजवळ त्याने मुक्काम केला ।। १४६ ॥ जिचा मध्यभाग अनेक अपायकारक वस्तूनी प्राण्यानी भरलेला आहे अशा त्या गुहेला त्याने स्वच्छ करविले आणि उत्तम रीतीने संरक्षण करण्यासाठी त्याने तेथे लोकांची नियुक्ति केली. यानंतर ती पुनः भरतप्रभूकडे आला ॥ १४७ ॥ यानंतर अनेक श्रेष्ठ राजे आपले सैन्य घेऊन स्वागत करण्यासाठी आले व जयसूचक नगाऱ्यांच्या ध्वनीनी त्याचा त्यानी आदर केला ।। १४८ ॥ ज्याच्यावर अनेक तोरणे शोभत आहेत व ज्याच्यावर पताकांच्या पंक्ति फडफडत आहेत, असा मोठा राजमार्ग सेनापतीने उल्लंघिला व त्याने राजवाड्यात प्रवेश केला ॥ १४९ ॥ दुरूनच आपल्या उत्तम घोड्यावरून उतरलेला कार्यकुशल सेनापति राजसिंहासनावर बसलेल्या भरतेशाच्या सभामंडपात आला ।। १५० ।। दूरूनच नम्र व चंचल झालेल्या मस्तकावर ज्याने आपली हातरूपी कमलकळी जोडली आहे व ज्याला विस्मित झालेले सभ्य पाहत आहेत अशा त्या जयकुमार सेनापतीने प्रभूला नमस्कार केला ।। १५१ ।। त्यावेळी जयजयकाराच्या ध्वनीनी ज्यांची तोंडे वाचाळ झाली आहेत, ज्यानी आपल्या कपाळानी भूमीला स्पर्श केला आहे असे म्लेच्छराजे भीतभीत प्रभुजवळ आले व त्यानी त्याला नमस्कार केला ॥। १५२ ।। त्या म्लेच्छराजाने नजराणा म्हणून पुढे आणिलेले रत्नादिक वस्तु प्रभू पुढे ठेविले व नामादिकांचा उच्चार करून त्या म्लेच्छराजांचा परिचय त्या सेनापतीने भरत प्रभूला करून दिला ।। १५३ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy