________________
६८)
महापुराण
इन्थं चराचरगुरुर्जगदुज्जिहीर्षुः । संसारखञ्जन निमग्नमभग्नवृत्तिः ॥ - देवासुरैरनुगतो विजहार पृथ्वीं । हेमान्जगर्भविनिवेशितपादपद्मः ।। २८५ तीव्राजव जव दवानलदह्यमानमाह्लादयन्भुवनकाननमस्ततापः ॥ धर्मामृताम्बुपृषतैः परिषिच्य देवो रेजे घनागम इवोदितदिव्यनादः ॥ २८६ ॥ काशीमवन्ति कुरुकोसलसुह्मपुण्ड्रान् । चेद्यंगवङ्गमगधान्ध्रक लिङगमद्रान् ॥ पाञ्चालमालवदशार्णविदर्भदेशान् । सन्मार्गदेशनपरो विजहार धीरः ॥ २८७ ॥ देवः प्रशान्तचरितः शनकैविहृत्य । देशान्बहूनिति विबोधितभव्यसत्त्वः ॥ भेजे जगत्त्रयविवीध्रमुच्चैः कैलासमात्मयशसोऽनुकृति दधानम् ॥ २८८ तस्याग्रे सुरनिर्मिते सुरुचिरे श्रीमत्सभामण्ड पूर्वोक्ताखिलवर्णनापरिगते स्वर्गश्रियं तन्वति ॥
श्रीमान् द्वादशभिर्गणैः परिवृतो भक्त्यानतैः सादरैः । आसामास विभुजिनः प्रविलसत्सत्प्रातिहार्याष्टकः ।। २८९
( २५-२८५
संसाररूपी मोठ्या गारीत-मोठ्या खोल खड्यात बुडालेल्या जगाला वर काढण्याची इच्छा करणारे व त्या कार्यात अखंड प्रवृत्त झालेले, देव व असुर ज्यांना अनुसरत आहेत व जे सोन्याच्या कमलांच्या मध्यभागी पाऊले टाकून चालतात, जे चर अचर जीवांचे गुरु आहेत असे आदिभगवंत धर्मोपदेश देत पृथ्वीवर विहार करू लागले ।। २८५ ॥
तीव्र असा जो संसाररूपी वनाग्नि त्यामध्ये जळत असलेल्या या जगरूपी अरण्याला पाहून त्याला दिव्य वाणीरूपी गर्जना करणारे व धर्मामृतजलाच्या वृष्टीने त्याला सिंचित करणारे प्रभु पावसाळयाप्रमाणे शोभले ।। २८६ ॥
सन्मार्ग असलेल्या जिनधर्माचा उपदेश देण्यासाठी वीर आदिभगवंतांनी काशी, अवन्ति, कुरु, कोसल, सुह्म, चेदि, अंग, वङ्ग, मगध, आन्ध्र, कलिङ्ग, भद्र, पांचाल, मालव, दशार्ण, विदर्भ आदि अनेक देशात विहार केला ।। २८७ ।।
ज्यानी भव्यप्राण्याना उपदेश दिला आहे, ज्याची वृत्ति शान्त आहे व जे त्रैलोक्यगुरु आहेत अशा प्रभूनी हळु हळु अनेक देशात विहार केला. यानन्तर जगत्त्रयाचे गुरु असे भगवान् चन्द्राप्रमाणे निर्मल अशा आपल्या शुभ्र यशाचे अनुकरण करणाऱ्या कैलासपर्वताला प्राप्त झाले ॥ २८८ ॥
त्या कैलासाच्या शिखरावर देवानी अतिशय सुंदर, पूर्वी वर्णिलेल्या सर्व वर्णनांनी युक्त व स्वर्गांची शोभा धारण करणारा असा समवसरणसभामंडप रचला व भक्तीने नम्र, आदरयुक्त अशा बारा गणानी श्रीमान् आदिभगवान् वेष्टित होऊन विराजमान झाले, त्यावेळी प्रभु उत्तम आठ प्रातिहार्यांनी शोभत होते ॥ २८९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org