________________
४२-१४१)
महापुराण
(४९७
ततश्च्युतः परिप्राप्तमानुष्यः परमं तपः । कृत्वान्ते निर्वृति याति निधूताखिलबन्धनः ॥ १३३ क्षत्रियो यस्त्वनात्मजः कुर्यान्नात्मानुपालनम् । विषशस्त्रादिभिस्तस्य दुर्मतिर्धवभाविनी ॥ १३४ दुर्मूतश्च दुरन्तेऽस्मिन्भवावर्ते दुरुत्तरे। पतित्वाऽमुत्र दुःखानां दुर्गतौ भाजनं भवेत् ॥ १३५ ततो मतिमतात्मीयविनिपातानुरक्षणे । विधेयोऽस्मिन्महायत्नो लोकद्वयहितावहे ॥ १३६ कृतात्मरक्षणश्चैव प्रजानामनुपालने । राजा यत्नं प्रकुर्वीत राज्ञां मौलो ह्ययं गुणः ॥ १३७ कथं च पालनीयास्ताः प्रजाश्चेत्तत्प्रपञ्चनम् । पुष्टं गोपालदृष्टान्तमुरीकृत्य विवृण्महे ।। १३८ गोपालको यथा यत्नाद्गाः संरक्षत्यतन्द्रितः । मापालश्च प्रयत्नेन तथा रक्षेतिजाः प्रमाः ॥१३९ तद्यथा यदि गौः कश्चिदपराधी स्वगोकुले । तमङ्गच्छेदनाद्यनदण्डस्तीव्रमयोजयन् ॥ १४० पालयेवनुरूपेण दण्डेनैव नियन्त्रयन् । यथा गोपस्तथा भूपः प्रजाः स्वाः प्रतिपालयेत् ॥ १४१
त्या सर्वार्थसिद्धिस्थानापासून आयुष्यान्ती च्युत होऊन येथे मनुष्यभव प्राप्त करून घेतो व उत्कृष्ट तप करून सर्वकर्मबन्धनापासून तो पूर्णमुक्त होतो व शेवटी तो मोक्षास जातो ।। १३३ ॥
जो क्षत्रिय आत्म्याचे स्वरूप जाणत नाही तो आपल्या आत्म्याचे रक्षण करीत नाही. त्याला विषशस्त्र इत्यादिकानी वाइट मरण निश्चयाने येईल ॥ १३४ ॥
जर हा क्षत्रिय वाईट मरणाने मरेल तर ज्याच्यातून तरून जाणे कठिण आहे व ज्याचा शेवट दुःखदायक आहे, अशा या संसाररूपी भोवऱ्यात पडून परलोकी नरकादि दुःखदायक गतीत दुःखांचे स्थान बनेल ।। १३५ ।।
म्हणून बुद्धिमान् क्षत्रियाने इहपरलोको हितकर, सुख देणारे व आत्म्याला नरकादि गतिपासून रक्षिणारे जे हे आत्मानुपालन आहे त्यात मोठा प्रयत्न करावा ॥ १३६ ॥
ज्याने आत्मानुपालन म्हणजे आत्मरक्षण केले आहे त्या राजाने प्रजेचे रक्षण करण्यात प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रजांचे पालन, पोषण करणे हा राजांचा मुख्य गुण आहे ।। १३७ ।।
राजाने प्रजांचे रक्षण कसे करावे असा प्रश्न विचाराल तर त्याच्या विस्ताराविषयी आम्ही गोपालाचे अर्थात् गवळयाचे उदाहरण घेऊन स्पष्टीकरण करीत आहोत ॥ १३८ ।
गवळी जसा आपल्या कार्यात निरलस राहून प्रयत्नाने गोपालन करतो तसे राजाने आपल्या प्रजांचे प्रयत्नाने रक्षण करावे ॥ १३९ ॥
जर एखादा बैल आपल्या गोसमूहात अपराधी झाला तर त्याला तो गवळी त्याचा अवयव तोडणे वगैरे कठोर शिक्षा करीत नाही पण अनुरूप अशी शिक्षा त्याला तो करतो व त्याचे पालन करतो तसे राजानेही आपल्या प्रजेला तीव्र दंड न करता अपराधानुरूप दंड करावा व आपल्या प्रजेचे रक्षण करावे ॥ १४०-१४१ ।।
म. ६३
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org