________________
महापुराण
(४२-१२४
त्यागो हि परमो धर्मस्त्याग एव परं तपः । त्यागादिह यशोलाभः परत्राभ्युदयो महान् ॥ १२४ मत्वेति तनुमाहारं राज्यं च सपरिच्छदम् । त्यजेदायतने पुण्ये पूजाविधिपुरःसरम् ॥ १२५ गरुसा तथा त्यक्तदेहाहारस्य तस्य वै। परीषहजयायत्ता सिद्धिरिष्टा महात्मनः ॥ १२६ ततो ध्यायेदनप्रेक्षाः कृती जेतुं परीषहान् । विनानुप्रेक्षणश्चित्तसमाधानं हि दुर्लभम् ॥ १२७ प्रागभावितमेवाहं भावयामि न भावितम् । भावयामीति भावेन भावयेत्तत्त्वभावनाम् ॥ १२८ समुत्सृजेदनात्मीयं शरीरादिपरिग्रहम् । आत्मीयं तु स्वसाकुर्याद्रत्नत्रयमनुत्तरम् ॥ १२९ मनोव्याक्षेपरक्षार्थ ध्यायन्निति स धीरधीः । प्राणान्विसर्जयेदन्ते संस्मरन् परमेष्ठिनम् ॥ १३० तथा विसजितप्राणः प्रणिधानपरायणः । शिथिलीकृत्य कर्माणि शुभां गतिमुपाश्नुते ॥ १३१ तस्मिन्नेव भवे शक्तः कृत्वा कर्मपरिक्षयम् । सिद्धिमाप्नोत्यशक्तस्तु त्रिदिवाग्रमवाप्नुयात् ॥ १३२
__ कारण त्याग हाच उत्तम धर्म आहे व त्याग हाच उत्तम तप आहे. जो त्याग करतो त्याला यश व कीर्तीचा लाभ होतो व परलोकी त्याला मोठे ऐश्वर्य प्राप्त होते. त्याचे मोठे कल्याण होते ॥ १२४ ।।
___ असे मानून एखाद्या पवित्र आयतन-जिनालयात किंवा तीर्थक्षेत्री जिनपूजा विधि करून त्या क्षत्रियाने शरीर, आहार व छत्र, चामरादिक उपकरणासहित राज्याचा त्याग करावा ॥ १२५ ॥
गुरूच्या साक्षीने ज्याने देहाचा व आहाराचा त्याग केला आहे अशा त्या महात्म्याला क्षुधा, तहान आदिक बाधावर विजय मिळविल्यामुळे इष्ट सिद्धि होते ॥ १२६ ।।
परिषहाना जिंकण्यासाठी त्या संयमी क्षत्रियाने अनित्यादिक बारा भावनांचे चिन्तन करावे व अनुप्रेक्षांच्या चिन्तनावाचून चित्ताची एकाग्रता होणे दुर्लभ आहे ॥ १२७ ।।
पूर्वी ज्यांचे मी चिन्तन केले नाही त्यांचे आता मी चिन्तन करतो. पण ज्याचे मी पूर्वी चिन्तन केले आहे त्याचे आता चिन्तन करीत नाही अशा भावनेने तत्त्वभावना चिंतावी ॥१२८॥
शरीर, धन, राज्यादिक हे माझे स्वरूप नाही म्हणून त्यांचा त्याग करावा व सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र यांच्यापेक्षा जगात कोणताही पदार्थ उत्तम नाही असे समजून ते रत्नत्रय प्राप्त करून घ्यावे ।। १२९ ।।
मनाची चंचलता नाहीशी करण्याकरिता धैर्ययुक्त बुद्धिधारक मुनिवर्याने याप्रमाणे चिंतन करून परमेष्ठीचे स्मरण करीत प्राण विसर्जन करावे ॥ १३० ।।
जो पुरुष ध्यानात तत्पर राहून प्राणत्याग करतो तो आपली कर्मे शिथिल करतो व त्यामुळे शुभ गतीत प्रवेश करतो ।। १३१ ।।
जो चरमशरीरी तद्भव मोक्षगामी आहे तो त्याच भवात कर्मांचा पूर्ण क्षय करून सिद्धि प्राप्त करून घेतो व जो असमर्थ आहे, तद्भवमोक्षगामी नाही तो स्वर्गाच्या अग्राची अर्थात् सर्वार्थसिद्धीची प्राप्ति करून घेतो ॥ १३२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org