SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 509
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४९८) तीक्ष्णो दण्डो हि नृपतेस्तीव्रमुद्वेजयेत्प्रजाः । ततो विरक्तप्रकृति जहघुरेनममूः प्रजाः ॥ १४२ यथा गोपालको मौलं पशुवगं स्वगोकुले । पोषयन्नेव पुष्टः स्याद्गोपोषं प्राज्यगोधनः ॥ १४३ तथैष नृपतिमालं तन्त्रमात्मीयमेकतः । पोषयन्पुष्टिमाप्नोति स्वे परस्मिश्च मण्डले ।। १४४ पुष्टो मौलेन तन्त्रेण यो हि पार्थिवकुञ्जरः । स जयेत्पृथिवीमेनां सागरान्तामयत्नतः ॥ १४५ प्रभग्नचरणं किञ्चिद्गोद्रव्यं चेत्प्रमादतः । गोपालस्तस्य सन्धानं कुर्याद्बन्धाद्युपक्रमैः ॥ १४६ बद्धाय च तृणाद्यस्मै दत्वा दाढर्ये नियोजयेत् । उपद्रवान्तरेऽप्येवमाशु कुर्यात्प्रतिक्रियाम् ॥ १४७ यथा तथा नरेन्द्रोऽपि स्वबले व्रणितं भटम् । प्रतिकुर्याद्भिषग्वर्या नियोज्यौषघसम्पदा ॥ १४८ दृढीकृतस्य चास्योद्धजीवनादि प्रचिन्तयेत् । सत्येवं भृत्यवर्गोऽस्य शश्वदाप्नोति नन्दथुम् ॥ १४९ यथैव खलु गोपालः सन्ध्यस्थिचलने गवाम् । तदस्थि स्थापयन्प्राग्वत्कुर्याद्योग्यां प्रतिक्रियाम् ॥ १५० तथा नृपोऽपि सङ्ग्रामे भृत्यमुख्ये व्यसौ सति । तत्पदे पुत्रमेवास्य भ्रातरं वा नियोजयेत् ॥ १५१ सति चैवं कृतज्ञोऽयं नृप इत्यनुरक्तताम् । उपैति भृत्यवर्गोऽस्मिन् भवेच्च ध्रुवयोधनः ॥ १५२ महापुराण तीक्ष्ण दंड करणारा राजा प्रजेला फार त्रास देतो व प्रजा त्याच्याविषयी विरक्त होते आणि मग विरक्त झालेली प्रजा राजाचा त्याग करते ।। १४२ ॥ (४२ - १४२ जसा गवळी आपल्या खिल्लारातील मुख्य पशुसमूहाला चांगल्या रीतीने पोसून पुष्ट करतो, ज्याचे गोधन उत्तम आहे व पुष्ट आहे असा तो गवळी ही पुष्ट होतो ।। १४३ ।। तसेच हा राजाही आपल्या मुख्यप्रजेचे आपल्या एका मुख्यराज्याचे पोषण करून आपल्या व इतराच्या राज्यातही पुष्टि - ऐश्वर्याची वृद्धि प्राप्त करून घेतो ।। १४४ ।। जो श्रेष्ठ राजा आपल्या मुख्यसैन्याने पुष्ट होतो तो या समुद्रापर्यन्त पृथ्वीला प्रयत्नावाचून जिंकील ।। १४५ ।। जर त्या गवळयाच्या गायीचा किंवा बैलाचा चुकीने पाय मोडला तर तो पाय बांधणे, त्याला औषध लावणे, त्याला विश्रान्ति देणे इत्यादि कार्यानी त्याचा तो पाय जुळवितो व बांधून टाकलेल्या त्या जनावराला गवत, पेंड वगैरे देऊन पायाला बळकटी येईल अशी योजना करतो. इतर आणखी काही त्याला पीडा झाली तर तो तिचा शीघ्र प्रतीकार करतो. तसाच हा राजा देखिल आपल्या सैन्यातील एखादा शूर सैनिक जखमी झाला तर उत्कृष्ट अशा वैद्याकडून उत्तम औषध देऊन त्याची जखम नाहीशी करतो व जखम नाहीशी करून मजबूत केलेल्या या सैनिकाच्या उत्कृष्ट जीवनादिकाची चिन्ता वाहतो व असे राजाने त्याची व्यवस्था ठेवली म्हणजे राजाचा तो नोकरसमूह देखिल नेहमी आनंदित राहतो ।। १४६-१४९ ।। Jain Education International जसे गवळी त्याच्या गाय वगैरेचे सन्धियुक्त हाड स्थानापासून सरकले असतां ते हाड पूर्वस्थानी बसविण्याचा इलाज करतो, योग्य उपाय योजतो तसे हा राजा देखिल युद्धामध्ये त्याचा मुख्य सैनिक मरण पावला तर त्याच्या मुलाची किंवा भावाची त्याच्या स्थानी योजना करतो व असे राजाने कार्य केले असता हा राजा कृतज्ञ आहे असे वाटून नोकरवर्ग राजावर अनुरक्त होतो व तो युद्धामध्ये निश्चयाने लढणारा होतो ।। १५०-१५२ ।। For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy