________________
६४०)
महापुराण
(४६-१२९
इति तस्याः परिप्रश्ने स प्रजापालभूपतिः । लोकपालोऽयमित्युक्ते प्रियदत्ता स्वपूर्वजम् ॥ १२९ जन्मावबुद्धय वन्दित्वा साटवीश्रीरियं त्वहम् । शक्तिषणो मम प्रेयानसौ क्वाध प्रवर्तते ॥ १३० इति पृष्टावदच्छक्तिषणस्तेऽयं मनोरमः । कुबेरदयितः सत्यदेवोऽभूत्तनुजस्तव ॥ १३१ देवभूयं गताः श्रेष्ठिसचिवास्त्वत्पते शम् । आरभ्य जन्मनः स्नेहात्परिचर्या प्रकुर्वते ॥ १३२ कुबेरदयितस्यापि पिता प्राच्यः स सत्यकः। पाता गत्यन्तरस्थाश्च पुण्यात् स्निह्यन्ति देहिनः॥१३३ भवदेवेन निर्दग्धं द्विजावेतौ वधूवरम् । सार्थेशो धारिणी चेह पत्युस्ते पितराविमौ ॥ १३४ इत्युक्त्वा सेदमप्याह खगाचलसमीपगे। वसन्तौ चारणावद्रौ मुनी मलयकाञ्चने ॥ १३५ पूर्व वननिवेशे तौ भिक्षार्थ समुपागती । तव पुत्रसमुत्पतिमुपदिश्य गतौ ततः ॥ १३६ . अन्येधुर्वसुधारादिहेतुभूतौ कपोतकौ । दृष्ट्वा सकरुणौ भिक्षामनादाय वनं गतौ ॥ १३७ गुर्वोर्गुरुत्वं युवयोरुपयातौ तयोरिदम् । उपदेशात्समाकर्ण्य सर्वमुक्तं यथाक्रमम् ॥ १३८
___ याप्रमाणे वसुमतीने प्रश्न केल्यानंतर अमितमति आर्यिकेने सांगितले की हा लोकपालच पूर्वजन्मी प्रजापाल राजा होता. एवढे सांगितले तोच प्रियदत्तेलाही आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली. तिने अमितमति आयिकेला वंदन केले. शक्तिषेण राजाची मीच अटवीश्री नामक पत्नी आहे पण तो शक्तिषेण राजा आज कोठे आहे ? हा प्रश्न विचारल्यानंतर अमितमति आर्यिकाबाईनी म्हटले की, तूझा हा कुबेरकान्त पतीच पूर्व जन्मीचा शक्तिषेण आहे व हा कुबेरदयितच पूर्वजन्मीचा सत्यदेव आहे व तो तुझा मुलगा झाला आहे. श्रेष्ठी मेरुदत्ताचे जे भूतार्थ वगैरे चार मन्त्री होते ते स्वर्गात देव झाले आहेत व पूर्वजन्माच्या स्नेहामुळे तुझ्या पतीची प्रेमाने अतिशय सेवा करीत आहेत ॥ १२९-१३२ ।।
कुबेरदयित श्रेष्ठीचा पूर्व जन्मीचा पिता सत्यक तो या जन्मी कुबेरकान्ताचा रक्षक झाला आहे. भिन्नगतीतील जीवही पुण्यामुळे प्राण्यांचे रक्षण करतात. त्यांच्यावर प्रेम करतात ॥ १३३ ॥
__ भवदेवाने जाळलेले जे दंपती रतिवेगा आणि सुकान्त ते हे पक्षी झालेले आहेत व मेरुदत्त श्रेष्ठी व धारिणी हे दोघे पतिपत्नी तुझ्या पतीचे मातापिता झालेले आहेत ।। १३४ ।।
याप्रमाणे सांगून तिने- अमितमति आर्यिकेने हेही सांगितले. विजयार्ध पर्वताच्या जवळ असलेल्या मलयकांचन नामक पर्वतावर राहणारे ते दोन चारणमुनि जेव्हा पूर्वजन्मी शक्तिषेण राजा सर्पसरोवरावर मुक्कामाला होता त्यावेळी भिक्षेसाठी आले होते व तुला त्यानी पाच पुत्र व एक कन्या होईल असे सांगून ते नंतर तेथून गेले. सुवर्णादिवृष्टीला कारणभूत असे ते मुनि पुनः आले होते पण कबूतर व कबूतरीला पाहून त्यांना दया उत्पन्न झाली आणि त्यानी भिक्षा न घेता ते वनात निघून गेले व तेच तुझ्या पित्याचे व तुझ्या पतीचे गुरु होत. त्यांच्याच उपदेशाने मी हे सर्व ऐकले आणि क्रमाने मी सर्व सांगितले आहे ॥ १३५-१३८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org