________________
८८)
महापुराण
(२६-१४३
किन्नराणां कलक्वाणः सगानरुपवीणितः । सेव्यपर्यन्तभूभागलतामण्डपमण्डनाम् ॥ १४३ हारिभिः किन्नरोद्गीतैराहूता हरिणाङ्गनाः । दधती तीरकच्छेषु प्रसारितगलद्गलाः ॥ १४४ हौःससारसारावैः पुलिनैदिव्ययोषिताम् । नितम्बानि सकाञ्चीनि हसन्तीमिव विस्तृतः ॥१४५ चतुर्दशभिरन्वीतां सहस्ररब्धियोषिताम् । सध्रीचीनामिवोद्वीचिबाहूनां परिरम्भणे ॥ १४६ इत्याविष्कृतसंशोभा जान्हवीमैक्षत प्रभुः । हिमवगिरिणाम्भोधेःप्रहितामिव कण्ठिकाम् ॥ १४७
मालिनीवृत्त शरदुपहितकान्ति प्रान्तकान्तारराजीविरचितपरिधानां सैकतारोहरम्याम् । युवतिमिव गभीरावर्तनाभि प्रपश्यन् प्रमदमतुलमूहे क्षमापतिः स्वःस्रवन्तीम् ॥ १४८ सरसिजमकरन्दोद्गन्धिराधूतरोधोद्गमकिसलयमन्दान्दोलनादूढमान्द्यः । असकृदमरसिन्धोराधुनानस्तरङ्गान् अहृतनृपवधूनामध्वखेदं समीरः ॥ १४९
.............
किन्नरदेवांचे मधुरशब्द व गाण्याला अनुसरून वीणावादन यांनी युक्त जो किनान्याचा भूभाग त्यावरील लतामण्डपानी गंगानदी फार सुंदर वाटत होती ॥ १४३ ।।
किन्नरांच्या मनोहर अशा गाण्यानी बोलावल्या गेलेल्या हरिणी तटाच्या प्रदेशावर आपला गळा पसरून व ढिला करून बसल्या होत्या. अशा हरिणीना धारण करणारी ती मंगानदी शोभत होती ।। १४४ ।।
ज्यावर सारसपक्षी मनोहर शब्द करीत आहेत अशा आपल्या विस्तृत वाळवंटानी ही गंगानदी कमरपट्टयानी युक्त अशा दिव्यांगनाच्या ढुंगणाना जणु हसत आहे असे प्रेक्षकाना वाटत असे ।। १४५ ।।
ज्यानी आलिंगन करण्यासाठी आपले उसळलेल्या तरंगरूपी बाहूना वर केले आहे अशा मैत्रिणीसारख्या ज्या चौदा हजार सहाय्यक नद्या त्यांनी ती गंगानदी शोभत होती ।।१४६।।
याप्रमाणे जिने आपली शोभा प्रकट केली आहे अशा त्या गंगानदीला भरतेश्वराने पाहिले. हिमवान् पर्वताने जणु लवणसमुद्राला ही गंगानदीरूपी कंठी पाठविली आहे अशा तिला भरतराजाने पाहिले ।। १४७ ।।
जिच्या ठिकाणी शरदऋतूने उज्ज्वल कान्ति उत्पन्न केली आहे, जिच्या दोन्ही तटावर असलेली जी वनपंक्ति तीच जिचे नेसण्याचे वस्त्र आहे, वाळवंटरूपी नितम्बाने जी सुंदर दिसते, जिच्यातील गंभीर जे भोवरे हीच जिची खोल बेंबी आहे, अशा स्वर्गनदीला- गंगानदीला स्त्रीप्रमाणे पाहणाऱ्या पृथ्वीपति भरताला अतुल- अतिशय आनंद वाटला ।। १४८ ॥
कमलातील मकरन्दाने सुगंधित झालेला व किनाऱ्यावरील वनाची कोवळी पाने मंदपणाने हालवित असल्यामुळे ज्याने मंदपणा धारण केला आहे घ वारंवार गंगानदीच्या तरङ्गांना जो हालवीत आहे, अशा त्या वान्याने राजस्त्रियांच्या मार्गश्रमाला दूर केले ॥१४९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org