SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 91
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ८०) महापुराण (२६-८० अनशनर्जनर्मुक्ता विरेजःपुरवीथयः । कल्लोलरिव वेलोत्थर्महाब्धेस्तीरभूमयः॥८० पुराङ्गनाभिरुन्मुक्ताः सुमनोऽञ्जलयोऽपतन् । सौधवातायनस्थाभिर्दृष्टिपातैःसमं प्रभो ॥ ८१ जयेश बिजयिन् विश्व विजयस्व दिशो दश । पुण्याशिषां शतरित्थं पौराःप्रभुमपूजयन् ॥ ८२ सम्राट् पश्यन्नयोध्यायाःपराम्भूति तदातनीम् । शनैःप्रतोली सम्प्रापद्रत्नतोरणभासुराम् ॥ ८३ पुरोबहिःपुरःपश्चात् समञ्च विभुनामुना । ददृशे दृष्टिपर्यन्तमसङख्यमिव तलम् ॥ ८४ जगतःप्रसवागारादिव तस्मात्पुराबलम् । निरियाय निरुच्छवासं शनैरारुद्धगोपुरम् ॥ ८५ किमिदं प्रलयक्षोभात्क्षुभितं वारिधेर्जलम् । किमुत त्रिजगत्सर्गः प्रत्यग्रोऽयं विजृम्भते ॥ ८६ इत्याशडक्य नभोभाग्भिः सूरैः साश्चर्यमीक्षितम् । प्रससार बलं विष्वक्पुरानिय चक्रिषः ॥ ८७ ततः प्राची दिशं जेतुं कृतोद्योगो विशाम्पतिः। प्रययौ प्राङमुखो भूत्वा चक्ररत्नमनुव्रजन् ॥८८ चक्रमस्य ज्वलद्ध्योम्नि प्रयाति स्म पुरो विभोः। सुरैः परिवृतं विष्वक् भास्वबिम्बप्रभास्वरम्॥८९ जेव्हा नगरातील रस्ते हळू हळू सैन्यांनी रहित झाले तेव्हां ते लाटा येण्याचे बंद झाल्यानंतर महासागराचे तीरप्रदेश जसे शोभतात तसे शोभू लागले ।। ८० ॥ मोठमोठ्या वाड्याच्या खिडक्यात बसलेल्या अशा नगरस्त्रियानी आपल्या नजरा बरोबर पुष्पांच्या ओंजळी भरतराजावर फेकल्या ।। ८१ ।। 'हे विजयशाली राजा तूं जगाला जिंक, दहा दिशांना तूं जिंक' याप्रमाणे नागरिक लोकांनी शेकडो कल्याणदायक आशीर्वादांनी भरतराजाचा आदर केला ।। ८२ ।। ___त्यावेळी सम्राट भरत अयोध्येचे ते उत्कृष्ट वैभव पाहत पाहात सावकाश रत्नांच्या तोरणानी चमकणान्या वेशीजवळ आला ॥ ८३ ।। भरतराजाने नगराच्या बाहेर प्रयाण केल्यावर आपल्यापुढे, आपल्यामागे व आपल्याबरोबर दृष्टि जेथपर्यन्त पोहोचते तेथपर्यन्त पाहिले तेव्हां आपले सैन्य जणु असंख्य आहे असे त्याला दिसले ॥ ८४ ।। वेशीत दाटी झाल्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्यासही ज्यास कष्ट वाटत होते असे ते सैन्य जगाचे जणु उत्पत्तिस्थान अशा त्या नगरातून हळूहळू बाहेर निघू लागले ॥ ८५-८६।। प्रलयकालचा क्षोभ झाल्यामुळे जणु क्षुब्ध झालेले हे समुद्राचे पाणी आहे काय ? किंवा जगत्त्रयाची ही नवीन उत्पत्ति होऊन ती वाढत आहे काय ? असा मनात संशय घेऊन आकाशात आलेल्या देवांनी ज्याला आश्चर्यचकित होऊन पाहिले आहे असे ते चक्रवर्ती भरताचे सैन्य नगरातून बाहेर निघून चोहोकडे पसरले ।। ८७ ।। यानंतर पूर्व दिशेला जिंकण्यासाठी ज्याने उद्योग केला आहे, चक्ररत्नाला अनुसरून व पूर्व दिशेकडे ज्याने मुख केले आहे अशा भरतराजाने पूर्व दिशेकडे प्रयाण केले ॥ ८८ ।। देवांनी वेढलेले व चोहीकडे सूर्यबिंबाप्रमाणे प्रकाशयुक्त असे ज्वालायुक्त चक्ररत्न या भरताच्यापुढे आकाशातून प्रयाण करीत होते ।। ८९ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy