SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 484
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४१-११३) महापुराण (४७३ सोऽदाद्विशुद्धमाहारं यथायोगं च भेषजम् । प्राणिभ्योऽभयदानं च दानस्यैतावती गतिः ॥ १०६ जिनेषु भक्तिमातन्वन् तत्पूजायां धर्ति दधौ । पूज्यानां पूजनाल्लोके पूज्यत्वमिति भावयन् ॥१०७ चैत्यचैत्यालयादीनां निर्मापणपुरःसरम् । स चक्रे परमामिज्यां कल्पवृक्षपृथुप्रथाम् ॥ १०८ शीलानुपालने यत्नो मनस्यस्य विभोरभूत् । शीलं हि रक्षितं यत्नादात्मानमनुरक्षति ॥१०९ व्रतानुपालनं शीलं व्रतान्युक्तान्यगारिणाम् । स्थूलहिंसाविरत्यादिलक्षणानि च लक्षणः ॥ ११० सभावनानि तान्येष यथायोगं प्रपालयन् । प्रजानां पालकः सोऽभूद्धौरेयो गृहमेधिनाम् ॥ १११ पर्वोपवासमाध्याय जिनागारे समाहितः । कुर्वन्सामायिकं सोऽधान्मुनिवृत्तं च तत्क्षणम् ॥ ११२ जिनानुस्मरणे तस्य समाधानमुपेयुषः । शैथिल्याद्गात्रबन्धस्य स्रस्तान्याभरणान्यहो ॥ ११३ तो भरतराजा सत्पात्राला शुद्ध निर्दोष सात्विक असे अन्न देत असे. रोगी मुनीना योग्य असे औषधदान देत असे व प्राण्याना अभयदान देत असे. याप्रमाणे दानाचे तीन प्रकार आहेत ।। १०६ ॥ जिनेश्वरामध्ये भक्तीची वृद्धि करणारा तो चक्रवर्ती त्यांची पूजा करून अतिशय सन्तुष्ट होत असे व जे पूजेला योग्य आहेत त्यांचे पूजन केल्याने आपल्यामध्ये पूज्यता येते अशी तो चक्री नेहमी भावना करीत असे ॥ ७ ॥ ___ तो चक्रेश जिनप्रतिमा व जिनमंदिरे वगैरे नवीन तयार करवीत असे आणि कल्पवृक्षाप्रमाणे याचकाना इच्छित पदार्थ जिच्यात देता येतात अशी कल्पद्रुम नांवाची फार मोठी पूजा करीत असे ॥ १०८॥ __ या प्रभूच्या मनात शीलांचे पालन करण्यात प्रयत्न केला जात असे. कारण यत्नाने शीलाचे रक्षण केले असता ते आत्म्याचे रक्षण करते. त्यामुळे आत्म्याचे अधःपतन होत नाही ॥ १०९॥ ___ व्रतांचे पालन ज्या नियमानी होते ज्या आचारानी होते त्याना शील म्हणतात व गृहस्थांची व्रते पूर्वी सांगितली आहेत. अर्थात् स्थूल हिंसा, स्थूल असत्य इत्यादिकापासून विरक्त होणे ही त्यांची लक्षणे आहेत ॥ ११० ॥ भावनानी सहित ती स्थूल अहिंसादि व्रते यथायोग्य पाळणारा प्रजांचा पालक असा तो भरतचक्री गृहस्थामध्ये अग्रगण्य झाला ।। १११ ।। पर्वतिथीच्या दिवशी उपवासाची प्रतिज्ञा करून जिनमंदिरात निश्चल अन्तःकरणाने जेव्हा तो सामायिक करीत असे तेव्हा तो तत्काल मुनिव्रत धारण करीत असे अर्थात् त्यावेळी हिंसादिक पंच पापांचा त्याग पूर्णपणे करून सामायिक करीत असे ॥ ११२ ॥ जेव्हा जिनेश्वराच्या गुणस्मरणात एकाग्रता धारण तो करीत असे तेव्हा त्याचे शरीर शिथिल होऊन सर्व अलंकार गळून पडत असत ॥ ११३ ॥ म. ६० Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy