SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 485
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४७४) महापुराण (४१-११४ ...... तथापि बहुचिन्तस्य धर्मचिन्ताभवढा । धर्मे हि चिन्तिते सर्व चिन्त्यं स्यादनचिन्तितम् ।। ११४ सस्याखिलाःक्रियारम्भा धर्मचिन्तापुरःसराः । जाता जातमहोदपुण्यपाकोत्थसम्पदः ॥ ११५ प्रातरुन्मीलिताक्षः सन्सन्ध्यारागारुणा दिशः। स मेनेऽहत्पदाम्भोजरागेणेवानुरञ्जिताः ॥ ११६ प्रातरुद्यन्तमुद्भूतनशान्धतमसं रविम् । भगवत्केवलार्कस्य प्रतिबिम्बममस्त सः ॥ ११७ प्रभातमरुतोद्धृतप्रबुद्धकमलाकरान् । हृदि सोऽधाज्जिनालापकलापानिव शीतलान् ॥ ११८ धार्मिकस्यास्य कामार्थचिन्ताभूदानुषङगिकी । तात्पर्य स्वभवद्धर्मे कृत्स्नश्रेयोऽनुबन्धिनि ॥ ११९ प्रातरुत्थाय धर्मस्थैः कृतधर्मानुचिन्तनः । ततोऽर्थकामसम्पत्ति सहामात्यैयरूपयत् ।। १२० । तल्पादुत्थितमात्रोऽसौ सम्पूज्य गुरुदैवतम् । कृतमङ्गलनेपथ्यो धर्मासनमधिष्ठितः॥ १२१ प्रजानां सदसवृत्तचिन्तनः क्षणमास्थितः । तत आयुक्तकान्स्वेषु नियोगेष्वन्वशाद्विभुः ॥ १२२ ___ अनेक चिन्तानी युक्त असलेल्या या चक्रवर्तीची धर्मसंबंधी जी चिन्ता तीच अतिशय दृढ होत असे. बरोबरच आहे की धर्माचा विचार-चिन्तन केले असता चिन्तन करण्यास योग्य अशा सर्व वस्तूंचा विचार केल्यासारखाच होतो ॥ ११४ ।। फार मोठ्या फलसंपदेला देणाऱ्या पुण्यकर्माच्या उदयाने ज्याला अनेक संपत्ति प्राप्त झाल्या आहेत अशा भरतचक्रीच्या सर्व क्रियांचा प्रारम्भ धर्मचिन्तन पूर्वकच होत असे. अर्थात् महाराज भरत सर्व कार्याच्या प्रारंभी धर्माचे चिन्तन करीत असत ।। ११५ ।। प्रातःकाली जेव्हा डोळे उघडून तो चक्री पाहत असे तेव्हा प्रातःकालच्या लाल कान्तीने सर्व दिशा लालभडक झालेल्या दिसत असत. त्यावेळी जणु अरिहंताच्या चरणकमलाच्या कांतीने त्या रंगविल्या आहेत असे त्याला वाटत असे ॥ ११६ ।। प्रातःकाली उगवणारा व रात्रीचा दाट अंधार ज्याने नाहीसा केला आहे असा सूर्य या चक्रवर्तीला भगवंताच्या केवलज्ञानरूपी सूर्याचे हे प्रतिबिंब आहे असे वाटत असे ॥ ११७ ॥ सकाळच्या वाऱ्याने हालविल्यामुळे ज्यातील कमळे प्रफुल्ल झाली आहेत अशा सरोवराना तो चक्रवर्ती जणु आदि जिनेश्वराच्या शीतल भाषणाच्या समूहाप्रमाणे मानीत होता ॥ ११८॥ नेहमी धर्म तत्पर असणाऱ्या या चक्रवर्तीचे अर्थ व काम ह्या दोन पुरुषार्थासंबंधी विचार अप्रधानच असत. पर सत. परन्तु संपूर्ण कल्याणास कारण अशा धर्माचे ठिकाणीच त्याचे विचार नेहमी तत्पर रहात असत ॥ ११९ ।। हा राजा सकाळी उठून धर्मतत्पर लोकाबरोबर प्रथम धर्माचा विचार करीत असे. यानंतर तो अमात्यलोकाबरोबर अर्थ-द्रव्य आणि काम-इंद्रियाना आवडणाऱ्या वस्तु याच्या संपत्तीविषयी विचार करीत असे ॥ १२० ।। __ जेव्हा हा राजा शय्येवरून उठत असे तेव्हा प्रथम देव व गुरु यांचे पूजन करी, नंतर मंगलकारक वेष धारण करून धर्मासनावर बसत असे व प्रजेच्या चांगल्या व वाईट आचरणांचा विचार करीत असे. यात काही वेळ घालविल्यावर जे अधिकारी लोक नेमलेले होते त्याना तो आपआपल्या कामावर जाण्याची आज्ञा करीत असे ॥ १२१-१२२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy