SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 246
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३३-७२) महापुराण इति शंसति तस्याद्रेः परां शोभां पुरोधसि । शंसाद्भूत इवानन्दं परं प्राप परन्तपः ॥ ६५ किञ्चिच्चान्तरमुल्लङ्घ्य प्रसन्नेनान्तरात्मना । प्रत्यासन्नजिनास्थानं विदामास विदांवरः ॥ ६६ निपतत्पुष्पवर्षेण दुन्दुभीनां च निःस्वनैः । विदाम्बभूव लोकेशमभ्यासकृतसन्निधिम् ॥ ६७ सुमनोवृष्टिरापतदापूरितनभोऽङ्गणा । पवनस्तमभीयायप्रत्युद्यन्निव पावनः ॥ ६८ मन्दारकुसुमोद्गन्धिरान्दोलितलतावनः । विरजीकृत भूलोकः समं शीतैरपां कणैः ॥ ६९ शुश्रुवे ध्वनिरामन्द्रो दुन्दुभीनां नभोऽङ्गणे । श्रुतः केकिभिरुग्रीवर्धनस्त नितशकिभिः ॥ ७० गुल्फदघ्नप्र सू नौघसम्मर्दमृदुना पथा । तमद्विशेषमश्रान्तः प्रययौ स नृपाप्रणीः ॥ ७१ ततोऽधिरुह्य तं शैलमपश्यत्सोऽस्य मूर्धनि । प्रागुक्तवर्णनोपेतं जनमास्थानमण्डलम् ॥ ७२ ( २३५ याप्रमाणे पुरोहित त्या कैलास ( अष्टापद ) पर्वताचे उत्कृष्ट सौन्दर्य वर्णित असता शत्रूना सन्ताप देणारा भरतेश जणु सुखात आकण्ठ बुडल्याप्रमाणे अतिशय आनन्दित झाला ।। ६५ ॥ त्या पर्वतावर कांही अन्तर भरतेशाला उल्लंघावे लागले. यानंतर विद्वच्छ्रेष्ठ त्या भरतेशाला आदिप्रभूचे समवसरण जवळच आले आहे असे आढळून आले. त्याला फार प्रसन्नता वाटली ।। ६६ । आकाशातून पुष्पवृष्टि होत होती व नगाऱ्यांचा आवाज ऐकू येत होता व त्यावरून आदिभगवंत आता जवळच आहेत हे त्याने ओळखले ।। ६७ ॥ मंदारपुष्पांचा सुगंध धारण करणारा व ज्याने लतावने हालविली आहेत असा पवित्र वायु उभा राहून जणु भरतेशाचे स्वागत करण्यासाठी त्याच्याकडे आला ।। ६८ ।। जिने सर्व आकाशाचे अंगण व्यापले आहे अशी पुष्पवृष्टि त्या पर्वतावर होऊ लागली व तिच्याबरोबरच ज्यानी भूतल धुळीनी रहित केले आहे असे थंड पाण्याचे कणही पडू लागले अर्थात् पुष्पवृष्टि व जलकणवृष्टिही होऊ लागली ।। ६९ ।। त्यावेळी आकाशात होत असलेला नगाऱ्यांचा गंभीर स्वर ऐकू येऊ लागला आणि मेघांच्या गडगडाटाची शंका ज्याना आली आहे अशा मोरानी आपल्या माना उंच करून तो गंभीर ध्वनि ऐकला ॥ ७० ॥ घोट्यापर्यन्त पसरलेल्या फुलांच्या समूहांनीं अत्यन्त मृदुल झाला आहे अशा मार्गाने न थकता पर्वताच्या उरलेल्या भागापर्यन्त राजश्रेष्ठ भरताने गमन केले ॥ ७१ ॥ Jain Education International - यानंतर त्या पर्वतावर चढून त्याच्या शिखरावर पूर्वी ज्याचे वर्णन केले आहे असे आदिभगवंताचे आस्थानमण्डल - समवसरण भरतेश्वराने पाहिले ॥ ७२ ॥ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy