SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 247
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २३६) महापुराण (३३-७३ समेत्यावसरावेक्षास्तिष्ठन्त्यस्मिन्सुरासुराः । इति तज्जैनिरुक्तं तत्सरणं समवादिकम् ॥ ७३ आखण्डलधनुर्लेखामखण्डपरिमण्डलाम् । जनयन्तं निजोद्योत लीसालमवासवत् ॥ ७४ हेमस्तम्भाविन्यस्तं रत्नतोरणभास्वरम् । धूलीसालमतीत्यासौ मानस्तम्भमपूजयत् ॥ ७५ मानस्तम्भस्य पर्यन्तसरसीः ससरोरुहाः । जनीरिव श्रुतीः स्वच्छशीतलापो ददर्श सः ॥ ७६ धूलीसालपरिक्षेपस्यान्तर्भागे समन्ततः । वीथ्यन्तरेषु सोऽपश्यद्देवावासोचिता भुवः ॥ ७७ अतीत्य परतः किञ्चिद्ददर्श जलखातिकाम् । सुप्रसन्नामगाधां च मनोवृत्तिं सतामिव ॥ ७८ वल्लीवनं ततोऽद्राक्षीनानापुष्पलताततम् । पुष्पासवरसामत्तभ्रमभ्रमरसङकुलम् ॥ ७९ । ततः किञ्चित्पुरो गच्छन्सालमाद्यं व्यलोकत । निषधाद्रितटस्पद्धिवपुषं रत्नभाजषम् ॥ ८० सुरदौबारिकारक्ष्यतत्प्रतोलीतलाश्रितान् । सोऽपश्यन्मङ्गलद्रव्यभेदास्तत्राष्टधास्थितान् ॥ ८१ ____ स्वर्गीय देव आणि भवनत्रिकांतले असुरदेव हे जेथे येऊन जिनेश्वराच्या दर्शनाच्यावेळेची बाट पाहत राहतात अशा जिनेन्द्राच्या सभास्थानाला तज्ज्ञ लोकानी समवरसरण म्हटले आहे ।। ७३ ॥ यानंतर भरतराजा आपल्या प्रभेने अखण्ड व गोलाकार रूपाची इन्द्रधनुष्याची शोभा उत्पन्न करणान्या धूलीसालनामक पहिल्या तटाजवळ आला ॥ ७४ ॥ सुवर्णाच्या खांबांच्या अग्रभागावर लावलेल्या रत्नांच्या तोरणानी चकाकणाऱ्या धूलीसालाला उल्लंघून भरतेश्वराने मानस्तम्भाचे पूजन केले ॥ ७५ ॥ मानस्तम्भाच्या सभोवती थंडपाण्यानी भरलेली व कमलानी सहित अशी सरोवरे जी जिनेश्वरानी सांगितलेल्या वाणीप्रमाणे वाटत होती ती भरतेशाने पाहिली ।। ७६ ।। धूलीसालाच्या घेऱ्याच्या आतील भागात चोहीकडे जे मार्ग होते त्याच्यामध्ये ज्या देवाना राहण्यास योग्य अशा भूमि आहेत त्याना भरतेशाने पाहिले ।। ७७ ।। याच्यापुढे थोडेसे गेल्यानंतर भरतेशाने सत्पुरुषांच्या मनाप्रमाणे अतिशय प्रसन्न व अगाध जलखातिका-खंदक पाहिला ।। ७८ ॥ यानंतर अनेक प्रकारच्या पुष्पांनी गजबजलेल्या वेलींनी विस्तृत व पुष्पातील मकरन्द प्राशनाने मत्त झालेल्या भ्रमरानी व्याप्त अशा वल्लीवनाला भरतेशाने पाहिले ।। ७९ ॥ यानंतर थोडेसे पुढे जाऊन भरतेशाने पहिला तट पाहिला, तो निषधपर्वताच्या तटाशी स्पर्धा करणारा व रत्नांच्या कान्तीनी चमकत होता ।। ८० ॥ यानंतर द्वारपालाचे काम करणाऱ्या देवानी रक्षिलेल्या वेशीच्या तळमजल्याच्या आश्रयाने असलेल्या आठ प्रकारच्यां मंगल द्रव्याना चक्रवर्तीने पाहिले ॥ ८१ । Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy