________________
४४)
महापुराण
(२५-१६९
अजितोजितकामारिरमितोऽमितशासनः । जितक्रोधो जितामित्रो जितक्लेशो जितान्तकः ॥ १६९ जिनेन्द्रः परमानन्दो मुनीन्द्रो दुन्दुभिस्वनः । महेन्द्रवन्धो योगीन्द्रो यतीन्द्रो नाभिनन्दनः ॥ १७० नाभेयो नाभिजोऽजातः सुव्रतो मनुरुत्तमः । अभेद्योऽनत्ययोऽनाश्वानधिकोऽधिगुरुः सुगीः ॥ १७१
अजित- कामक्रोधादि शāनी न जिंकलेले ।। ९॥ जितकामारि- कामशत्रूला ज्यांनी जिंकले आहे असे प्रभु ॥ १० ॥ अमित- ज्यांचे परिमाण करता येत नाही असे प्रभु अमित आहेत ॥ ११॥ अमितशासन- प्रभूचे मत अगणित आहे विशाल आहे ॥ १२ ॥ जितक्रोधक्रोधाला जिंकल्यामुळे प्रभु क्रोधरहित झाले ।। १३ ।। जितामित्र- प्रभूनी शत्रूना जिंकले. अर्थात् ते सर्व प्रिय झाले ॥ १४ ॥ जितक्लेश- दुःखांना जिंकले म्हणून प्रभु अनन्तसुखी झाले ॥ १५ ॥ जितान्तक- प्रभुंनी यमाला जिकले व ते मृत्युरहित झाले ।। १६ ।।
जिनेन्द्र- कर्मरूपी शāना ज्यांनी जिंकले त्यांना जिन म्हणतात. त्यांचे प्रभु इन्द्र-स्वामी आहेत ।। १७ ॥ परमानन्द- परम-उत्कृष्ट आनन्द अनन्तसुख ज्यांना प्राप्त झाले आहे असे प्रभु परमानन्द होत ॥ १८।। मुनीन्द्र- मुनींचे-प्रत्यक्ष ज्ञानी जे अवधि, मनःपर्याय व केवलज्ञानी साधु त्यांचे प्रभु इन्द्र-स्वामी आहेत ॥ १९ ॥ दुन्दुभिस्वन- जयनगान्याप्रमाणे प्रभुंचा दिव्यध्वनि असल्यामुळे त्याना दुन्दुभिस्वन हे नाव आहे ॥ २०॥ महेन्द्रवन्ध- प्रभुंना देवेंद्र वन्दन करतात म्हणून ते महेन्द्रवन्ध आहेत ॥ २१॥ योगीन्द्र-प्रभु योगी-ध्यानीमुनींचे स्वामी आहेत ।। २२ ॥ यतीन्द्र- निष्कषाय-कषायरहित अशा साधूंचे प्रभु स्वामी आहेत ॥ २३ ॥ नाभिनन्दन- भगवान् आदिनाथ नाभिराजाला आनंद देणारे पुत्र आहेत ॥ २४ ॥ नाभेय- नाभिराजाचे अपत्य भगवान् आदिजिन आहेत ॥ २५ ।। नाभिज- चौदावे कुलकर अशा नाभिराजापासून उत्पन्न झाले म्हणून नाभिज होत ॥ २६ ॥ अजात- द्रव्याथिकनयाने प्रभु जन्मरहित म्हणून अजात आहेत ॥ २७ ॥ सुव्रत- अहिंसादि पाच महाव्रते व रात्रिभोजन त्याग हे सहावे अणुव्रत ही ज्यांची उत्तम व्रते आहेत असे प्रभु सुव्रत आहेत ।। २८॥ मनु- जीवादितत्त्वांचा निर्दोष विचार करणारे प्रभु मनु होत ॥ २९ ॥ उत्तम- प्रभु उत्तम उत्कृष्ट आहेत ।। ३०॥ अभेद्य- कोणाकडून प्रभु भेदले जात नाहीत म्हणून अभेद्य ॥ ३१॥ अनत्यय- अत्यय-विनाश ज्यांचा नाही असे प्रभु अनत्ययअविनाशी आहेत ॥ ३२ ॥ अनाश्वान्- केवलज्ञान झाल्यावर प्रभुनी आहार घेतला नाही म्हणून ते अनाश्वान् आहेत. अथवा जुगार खेळणारे व चोर यांच्यावर विश्वास न ठेवणारा, नित्य अशा मोक्षमार्गात तत्पर राहणारा व सर्व प्राणिमात्र ज्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याला अनाश्वान् म्हणतात व या लक्षणाने युक्त प्रभु अनाश्वान् आहेत ॥ ३३ ॥ अधिक- अधि-उत्कृष्ट-कः आत्मा भगवंताचा आत्मा उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना अधिक म्हणतात ॥ ३४ ॥ अधिगुरु- प्रभु श्रेष्ठ गुरु आहेत ॥३५।। सुगी- अतिशय उत्तम वाणी दिव्यध्वनि युक्त प्रभूना सुगी: म्हणतात ॥३६।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org