SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 86
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २६-४५) महापुराण (७५ स्वयं घौतमभाव व्योम स्वयं प्रक्षालितः शशी । स्वयं प्रसादिता नद्यः स्वयंसम्माजिता दिशः ॥ ३८ शरल्लक्ष्मीमुखालोकदर्पणे शशिमण्डले । प्रजादृशो बृति भेजुरसंमृष्टसमुज्ज्वले ॥ ३९ वनराजीस्ततामौदाः कुसुमाभरणोज्ज्वलाः । मधुव्रता भवन्तिस्म कृतकोलाहलस्वनाः ॥ ४० तन्व्यो वनलता रेजुर्विकासिकुसुमस्मिताः । सालका इव गन्धान्धविलोला लिकुलाकुलाः ॥ ४१ दर्पोद्धुराःखुरोत्खात भुवस्ता स्त्रीकृतेक्षणाः । वृषाः प्रतिवृषालोककुपिताः प्रतिसस्वनुः ॥ ४२ अपाकिरन्त शृङ्गाग्रैर्वृषभा षीरनिःस्वनाः । वनस्थलीं स्थलाम्भोजमृणालशकलाचिताम् ॥ ४३ वृषाः ककुदसंलग्नमृदः कुमुदपाण्डुराः । व्यक्ताङ्कस्य मृगाङ्कस्य लक्ष्मीमबिभरुस्तदा ॥ ४४ क्षीरप्लवमयीं कृत्स्नामातन्वाना वनस्थलीम् । प्रस्नुवाना वनान्तेषु प्रसस्रुर्गोमतल्लिकाः ॥ ४५ त्यावेळी आकाश स्वतः धुतल्याप्रमाणे निर्मल झाले, चन्द्र स्वतः पाण्याने धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाला. नद्या आपण होऊनच निर्मल झाल्या व दिशा स्वतःच न झाडताही स्वच्छ झाल्या ।। ३८ । चन्द्राचे मण्डळ शरद्ऋतृची जी लक्ष्मी तिचे मुख पाहण्यास दर्पणाप्रमाणे झाले. प्रजांचे नेत्र पुसल्यावाचून अतिशय उज्ज्वल झालेल्या चन्द्राच्या ठिकाणी अतिशय प्रेमयुक्त झाले || ३९॥ शरत्कालाचे आगमन झाले असता वनपंक्ति ज्यांचा सुगंध पसरला आहे अशा झाल्या व पुष्परूपी अलंकारांनी त्या उज्ज्वल-सुंदर दिसू लागल्या आणि भुंगे वारंवार गुंजारव करू लागले || ४० ॥ कृश पण सुंदर अशा लता विकसित झालेली फुले हेच ज्याचे मंद हास्य आहे अशा शोभू लागल्या आणि सुगन्धाने अतिशय घुन्द झालेल्या चंचल भुंग्यानी व्याप्त झाल्यामुळे त्या सुन्दर केशांनी युक्त असल्याप्रमाणे शोभू लागल्या ॥ ४१ ॥ त्या शरदऋतूच्या काली बैल उन्मत्त झाले. आपल्या पायाच्या अग्रभागांनी जमीन उकरू लागले. त्यांचे डोळे लाल झाले व आपल्या विरुद्ध दुसन्या बैलाला पाहून ते रागावून डरकाळी फोडू लागले ।। ४२ ।। ज्यांचे शब्द गंभीर आहेत असे ते बैल आपल्या शिंगांच्या अग्रभागांनी भूकमलांच्या आतील तन्तूनी व्यापलेल्या वनातील भूमीला उकरू लागले ॥ ४३ ॥ त्या शरऋतुसमयी ज्यांच्या वशिंडाला माती लागली आहे व जे कमलाप्रमाणे शुभ्र आहेत असे बैल ज्यातील निळे लांछन स्पष्ट दिसत आहे, अशा चन्द्राच्या शोभेला धारण करू लागले ।। ४४ ।। ज्यांच्या स्तनातून दूध आपोआप गळत असल्यामुळे ज्या सर्व वनप्रदेशांना दुधाच्या प्रवाहाने युक्त करीत आहेत अशा पुष्कळ उत्तम गाई त्या प्रदेशात इकडे तिकडे जाऊ लागल्या 1184 11 Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy