SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 85
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ७४) महापुराण (२६-३१ तनुभूतपयोवेणीनद्यः परिकृशा दधुः । वियुक्ता घनकालेन विरहिण्य इवाङ्गनाः ॥ ३१ अनुद्धता गभीरत्वं भेजुः स्वच्छजलांशुकाः । सरिस्त्रियो घनापायाद्वैधव्यमिव संश्रिताः ॥३२ विगङ्गना घनापायप्रकाशीभूतमूर्तयः । व्यापहासीमिवातेनुः प्रसन्ना हंसमण्डनात् ॥ ३३ कूजितःकलहंसानां निजिता इव तत्यजुः । केकायितानि शिखिनः सर्वः कालबलाबली ॥ ३४ ज्योत्स्नादुकूलवसना लसन्नक्षत्रमालिका । बन्धुजीवाधरा रेजे निर्मला शरदङ्गाना ॥ ३५ ज्योत्स्ना कीति मिवातन्वन्विधुर्गगनमण्डले । शरल्लक्ष्मी समासाद्य सुराजेवायुतत्तराम् ॥ ३६ बन्धुजीवेषु विन्यस्तरागा बाणकृतद्युतिः । हंसीसखीवृता रेजे नवोढेव शरवधः ॥ ३७ वर्षाकालाशी ज्यांचा वियोग झाला आहे व म्हणून ज्या कृश झाल्या आहेत अशा नद्यांनी विरहिणी स्त्रियाप्रमाणे स्वल्पजलप्रवाहरूपी वेणीला धारण केले ॥ ३१ ।। वर्षाकालाचा नाश झाल्यामुळे जणु विधवा झाल्या अशा नद्या याच कोणी वर्षाकालाच्या स्त्रिया, स्वच्छ पाणी हेच शुभ्र वस्त्र ते त्यांनी धारण केले व उद्धतपणा त्यागून त्या शान्त झाल्या. तात्पर्य हे की, नद्यांच्या लाटा खळबळाट वगैरे बंद झाला व पाणी शान्तपणे वाहू लागले ।। ३२ ।। मेधांचे आवरण दूर झाल्यामुळे ज्यांचे स्वरूप स्पष्ट दिसत आहे अशा दिशारूपी स्त्रिया हंसरूपी अलंकार धारण करून प्रसन्न झाल्या व जणु त्या हसु लागल्या ।। ३३ ।। कलहंसाच्या मधुर शब्दांनी जणु जिंकले गेलेल्या अशा मोरांनी आपल्या केकाध्वनीचा त्याग केला व हे योग्यच झाले. कारण जगात सर्व प्राणी कालाच्या सामर्थ्याने बलवान् होतात असे आढळून येते ॥ ३४ ।। स्वच्छ चांदणे हेच जिनें रेशमी वस्त्र धारण केले आहे, चमकणाऱ्या नक्षत्रांची माला जिने कंठात धारण केली आहे व दुपारची पुष्पेरूपी लाल ओठ जिचे आहेत व जी अतिशय निर्मल आहे अशी शरत्स्त्री फारच शोभत आहे ॥ ३५ ॥ आकाशात आपल्या प्रकाशरूपी कीर्तीला खूप पसरणारा असा चन्द्र शरल्लक्ष्मीला मिळवून उत्तम राजाप्रमाणे फार शोभू लागला ।। ३६ ।। जसे नवविवाहित स्त्री आपले भाऊ वगैरे आप्त नातलगावर प्रेम करते, तसे ही शरत् । स्त्री बन्धुजीव अर्थात् दुपारच्या फुलावर राग प्रेम करते अर्थात् लालपणा धारण करते. नवविवाहित स्त्री बाणजातीच्या फुलांनी कान्तियुक्त दिसते तशी ही शरदङ्गना बाणनामक फुलांनी फार खुलून दिसत आहे. नवविवाहतास्त्री जशी मैत्रीणींनी घेरलेली शोभते तशी ही शरदङ्गना हंसीरूपी मैत्रिणीनी घेरलेली शोभू लागली ।। ३७ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy