SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 87
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ७६) महापुराण (२६-४६ कुण्डोध्न्योऽमृतपिण्डेन घटिता इव निर्मलाः । गोगृष्टयो वनान्तेषु शरच्छ्यि इवाभवन् ॥ ४६ हम्भारवभृतो वत्सानापिप्यन्प्रकृतस्वनान् । पीनापीनाः पयस्विन्यःपयःपीयूषमुत्सुकान् ॥ ४७ क्षीरस्यतो निजान्वत्सान् हुम्भागम्भीर निःस्वनाः । धेनुष्यःपाययन्ति स्म गोपैरपि नियन्त्रिताः॥ प्राप्रिया जलदा जाताःशिखिनामप्रियास्तदा । रिक्ता जलधनापायादहो कष्टा दरिद्रता ॥ ४९ व्यापहासीमिवातेनुगिरयःपुष्पितैर्दुमैः । व्यात्युक्षीमिव तन्वानाः स्फुरनिरसीकरैः॥५० प्रवृद्धवयसो रेजुः कलमा भृशमानताः । परिणामात्प्रपुष्यन्तो जरन्तःपुरुषा इव ॥ ५१ विरेजुरमलाः पुष्पर्मदालिपटलाततैः । इन्द्रनीलकृतान्तयें:सौवर्णैरिव भूषणः ॥ ५२ घनावरणनिर्मुक्ता दधुराशा दृशां मुदम् । नटिका इव नेपथ्यगृहाव्रङ्गमुपागताः ॥ ५३ अमृता कुण्डाप्रमाणे मोठ्या कासा ज्यांच्या आहेत व अतिशय शुभ्र असल्यामुळे जणु या पिण्डांनी ज्या बनविल्या आहेत असे वाटते व ज्या एकदा प्रसत झाल्या आहेत अशा कित्येक गाई शरत्कालच्या लक्ष्मीप्रमाणे वनाच्या मध्यभागी शोभत होत्या ॥ ४६ ॥ ज्यांची कास मोठी आहे व ज्या पुष्कळ दूध देतात अशा गायींनी दूध पिण्याविषयी उत्सुक झालेल्या व हंभा हंभा असा वारंवार शब्द जे करीत आहेत अशा आपल्या वासरांना दूधरूपी अमृत पाजले ॥ ४७ ॥ ज्यांना गवळ्यांनी बांधले आहे व ज्या वारंवार हुंभा हुंभा असा गंभीर शब्द करीत आहेत अशा गायी गवळयांनी प्रतिबंध केला असताही दूध पिण्याची इच्छा करणान्या अशा आपल्या वासरांना अमृतासारखे दूध पाजीत होत्या ।। ४८ ॥ पूर्वी जे मेघ मोरांना प्रिय झाले होते तेच आता जलरूपी धनाचा अभावामुळे मोरांना अप्रिय वाटू लागले. यावरून दरिद्रता ही कष्टदायक आहे हे सिद्ध झालें ॥ ४९ ॥ __वाहणाऱ्या झ-याचे जे वर उडणारे जलबिंदु त्यांनी हे पर्वत जणु एकमेकावर जल फेकीत आहेत काय असे वाटे व फुललेल्या झाडांनी हे पर्वत एकमेकांना पाहून जणु हसत आहेत असे वाटत असे ।। ५० ॥ ज्यांची वाढ होऊन पुष्कळ दिवस झाले होते अशा कलम जातीच्या साळी अतिशय पिकल्या होत्या व पक्वावस्थेस पोहोचल्यामुळे पुष्ट झाल्या होत्या. त्यामुळे त्या वृद्ध पुरुषाप्रमाणे शोभत होत्या ॥ ५१ ॥ असाणा नावाचे वृक्ष उन्मत्त भुंग्यांच्या समूहाने व्याप्त झालेल्या आपल्या पुष्पांनी इन्द्रनीलमणि बसविले आहेत अशा सोन्याच्या अलंकारांनी जणु शोभत आहेत असे वाटत होते ॥ ५२॥ र आलेल्या नटी जशा लोकांच्या नेत्रांना आनंदित करतात तसे मेघांच्या आवरणातून मुक्त झालेल्या दिशानी लोकांच्या नेत्रांना आनंदित केले ॥ ५३ ।। पडद्या Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy