________________
१९२)
चक्रिणोऽवसरः कोऽस्य योऽस्माभिः साध्यतेऽल्पकैः । भक्तिरेषा तु नः काले प्रभोर्यदनुसर्पणम् ॥ ७७प्रभोरवसरः सार्यः प्रसायं नो यशोधनम् । विरोधि बलमुत्सायं सन्धायं पुरुषव्रतम् ॥ ७८ द्रष्टव्या विविधा देशा लब्धव्याश्च जयाशिषः । इत्युदाचक्रिरेऽन्योन्यं भटाः श्लाघ्यंरुदाहृतः ॥ ७९. गिरिदुर्गोऽयमुल्लङ्घ्यो महत्यः सरितोऽन्तरा । इत्यपायेक्षिणः केचिदयानं बहुमेनिरे ॥ ८० इति नानाविधैर्भावैः सञ्जत्पश्च लघुत्थिताः । प्रस्थिताः सैनिकाः प्रापन्सेश्वराः शिबिरं प्रभोः ॥ ८१ प्रचेलुः सर्वसामग्र्या भूपाः सम्भूतकोष्ठिकाः । प्रभोश्चिरं जयोद्योगमाकलय्या हिमाचलम् ॥ ८२ भट्टेल कुटिकैः कैश्चिद्धता लालाटिकैः परैः । नृपाः पश्चात्कृतानीका विभोनिकटमाययुः ॥ ८३ समन्तादिति सामन्तैरापतद्भिः ससाधनः । समिद्धशासनश्चक्री समेत्य जयकारितः ॥ ८४
महापुराण
( ३१-७७
या चक्रवर्ती भरतराजाचे असे कोणते कार्य आहे की ज्याचे आम्हा क्षुद्र लोकाना स्मरण होईल. अर्थात् या चक्रवर्तीचे कार्य आमच्याकडून केले जाणे शक्यच नाही पण त्याचे आम्ही स्मरणही करू शकणार नाही. तरी देखिल आम्ही याच्या पाठीमागून जात आहोत याला कारण आमच्या मनात चक्रवर्तीविषयी भक्ति आहे. श्रद्धा आहे म्हणून आम्ही त्याला अनुसरत आहोत ॥ ७७ ॥
आम्ही प्रभूचे कार्य सिद्ध केले पाहिजे व आम्ही आपले यशरूपी धन चोहोकडे पसरले पाहिजे, शत्रूचे सैन्य दूर हटविले पाहिजे आणि पुरुषार्थ धारण केला पाहिजे ॥ ७८ ॥
अनेक देश पाहावेत व विजयाचे अनेक आशीर्वाद मिळविले पाहिजेत. याप्रमाणे प्रशंसनीय उदाहरणे देऊन योद्धे एकमेकाशी गोष्टी करीत होते ॥ ७९ ॥
हा चढण्याला अतिशय कठिण पर्वत उल्लंघून जावे लागेल व मध्येच अनेक मोठ्या नद्या आहेत. त्या पार कराव्या लागतील. याप्रमाणे अनेक विघ्ने व बाधा उत्पन्न होतील म्हणून पुढे न जाणेच बरे आहे. असे कित्येकानी मानले होते ॥ ८० ॥
याप्रमाणे अनेक प्रकारच्या विचारानी व नानाप्रकारच्या उत्तम भाषणानी शीघ्र उठलेल्या लोकानी, सैनिकानी प्रस्थान केले व आपल्या स्वामीसह चकवर्तीच्या शिबिरामध्ये प्रवेश केला ।। ८१ ॥
त्यावेळी भरतेश्वराचा हिमवान् पर्वतापर्यन्त दिग्विजय करण्याचा उद्योग पुष्कळ वेळानी पार पडेल असे समजून राजे लोकानी धान्यानी आपले कोठे सर्व प्रकारच्या सामग्रीने भरले व ते निघाले ॥ ८२ ॥
Jain Education International
ज्यांच्या हातात काठ्या आहेत अशा योध्याबरोबर व ललाटाना - कपाळाना पाहणाऱ्या उत्तम सेवकासमवेत अनेक राजे आपल्या सेनेला पाठीमागे सोडून भरतेशाजवळ आले ।। ८३ ।। अनेक सामन्त राजे आपआपल्या सेनेसहित सर्व बाजूनी आले व चक्रवर्तीजवळ येऊन त्यानी ज्याची आज्ञा सर्वत्र दैदिप्यमान झाली आहे अशा त्या चक्रवर्तीचा जयजयकार केला ॥८४॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org