SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 314
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३५-१७३) महापुराण (३०३ घृतरक्तांशुका सन्ध्यामनुयान्ती दिनाधिपम् । बहुमेने सती लोकः कृतानुमरणामिव ।। १६६ चक्रवाकी धृतोत्कण्ठमनुयान्ती कृतस्वनाम् । विजहावेव चक्राङ्को नियति को नु लंघयेत् ॥ १६७ रवेः किमपराधोऽयं कालस्य नियतेः किम् । रथाङ्गमिथुनान्यासन्वियुक्तानि यतो मिथः ॥ १६८ घनं तमो विनार्केण व्यानशे निखिला दिशः । विना तेजस्विना प्रायस्तमो रुन्धेनुसन्ततम् ॥ १६९ तमोऽवगुण्ठिता रेजे रजनी तारकातता । विनीलवसना भास्वन्मौक्तिकेवाभिसारिका ॥ १७० ततान्धतमसे लोके जनरुन्मीलितेक्षणः । नादृश्यत पुरः किञ्चिन्मिथ्यात्वेनेव दूषितैः ॥ १७१ प्रसह्य तमसा रुखो लोकोऽन्ताकुलीभवन् । दृष्टिवैफल्यदृष्टर्नु बहुमेने शयालुताम् ॥ १७२ दीपिका रचिता रेजः प्रतिवेश्म स्फुरत्त्विषः । घनान्धतमसोद्भदे प्रक्लुप्ता इव सूचिकाः ॥ १७३ लाल किरणरूपी वस्त्र जिने धारण केले आहे व जी दिवसांचा अधिपति जो सूर्य त्यांच्या पाठीमागून जात आहे अशा सन्ध्येस जिने पतीच्या मरणानंतर स्वतः मरणाचा स्वीकार केला आहे. अशा सतीप्रमाणे लोकानी फार चांगले मानले ॥ १६६ ॥ ___ अतिशय उत्कण्ठेने जी आपल्या पाठीमागे येत आहे व जी शब्द करीत आहे अशा चक्रवाकीला चक्रवाकपक्षाने सोडून दिलेच. बरोबरच आहे की निश्चयाने अवश्य प्राप्त होणारे दुर्दैवाला कोण बरे उल्लंघू शकेल ? ॥ १६७ ॥ ज्याअर्थी ही चक्रवाक पक्ष्यांची जोडपी आपसात वियुक्त होतात यात सूर्याचा अपराध मानावा, का कालाचा अपराध मानावा किंवा नियतीचाच अपराध आहे असे मानावे ? ॥ १६८॥ त्यावेळी सूर्याच्या नसण्यामुळे दाट अंधाराने सर्व दिशा पूर्ण व्याप्त झाल्या. हे बरोबरच आहे कारण जेव्हा तेजस्वी पदार्थाचा अभाव होतो तेव्हा बहुत करून अंधार नेहमी सर्व आकाशाला व्यापून टाकतोच ।। १६९॥ ___अंधाराने सर्व बाजूनी व्याप्त झालेली व जिच्यात तारका चमकत आहेत अशी रात्र, जिने काळे वस्त्र आपल्या सभोवती धारण केले आहे व जिने मोत्याचे चमकणारे अलंकार धारण केले आहेत अशा अभिसारिकेप्रमाणे (प्रिय पुरुषाच्या समागमाकरिता ठरलेल्या ठिकाणी स्वतः जाणान्या स्त्रीप्रमाणे ) शोभू लागली ॥ १७० ॥ जसे मिथ्यादर्शनाने दूषित झालेल्या लोकाना पदार्थाच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होत नाही तसे सर्व पृथ्वी गाढ अंधकाराने व्याप्त झाल्यामुळे लोकानी आपले डोळे मोठे करून पाहिले तरीही त्यांना पुढे काही दिसेना ।। १७१ ॥ लोकाना बलात्काराने गाढ अंधाराने घेरले त्यामुळे ते मनात फार व्याकुळ झाले व आपली दृष्टि यावेळी विफल झाली आहे यास्तव आता आपण झोप घेणेच चांगले आहे असे ते समजू लागले ॥ १७२ ॥ । प्रत्येक घरात ज्यांची कान्ति पसरत आहे असे दिवे लावले गेले व ते दाट अंधाराला फोडण्यासाठी तयार केलेल्या सुयाप्रमाणे वाटू लागले ॥ १७३ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy