SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 191
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १८०) महापुराण (३०-११० जलस्थलपथान्विष्वगारुध्य जयसाधनैः । प्रत्यन्तपालभूपालानजयत्तच्चमूपतिः ॥ ११० विलड्डध्य विविधान्देशानरण्यानीः सरिगिरीन् । तत्र तत्र प्रभोराज्ञां सेनानीराश्वशुश्रुवत् ॥१११ प्राच्यानिव स भूपालान्प्रतीच्यानप्यनुक्रमात् । श्रावयन्हृततन्मानधनःप्रायात्पराम्बुधिम् ॥११२ वेलासरित्करान्वाधिरतिदूरं प्रसारयन् । नूनं प्रत्यग्रहीदेनं नानारत्नार्थमुद्वहन् ॥ ११३ शर्पोन्मेयानि रत्नानि वार्द्धरिभ्यप्रशंसिभिः। यानपात्रमहामानरुन्मेयान्यत्र तानि यत् ॥ ११४ नाम्नेव लवणाम्भोषिरित्युदन्वान्लघुकृतः । रत्नाकरोऽयमित्यूचर्बहुमेने तदा नृपः ॥ ११५ पतन्यत्र पतङ्गोऽपि तेजसा याति मन्दताम् । दिदीपे तत्र तेजोऽस्य प्रतीच्याञ्जयतो नपान् ॥११६ धारयश्चक्ररत्नस्य पारयः सङ्गरोदधेः । द्विषामुद्वैजयस्तीवं स तिग्मांशुरिवाद्युतत् ॥ ११७ अनुवाद्धितटं गत्वा सिन्धुद्वारे न्यवेशयत् । स्कंधावारं स लक्ष्मीवानक्षोभ्यं स्वमिवाशयम् ॥ ११८ भरताच्या सेनापतीने आपल्या विजयी सैन्याच्याद्वारे, चारी बाजूनी जलमार्ग व स्थलमार्ग रोकले व पर्वताच्या टेकड्यावर असलेल्या देशांच्या राजाना जिंकिले ॥ ११० ।। अनेक देश, मोठमोठी अरण्ये, नद्या, पर्वत या सर्वांना उल्लंघून त्या त्या ठिकाणी राजे लोकाना प्रभु भरताची आज्ञा सेनापतीने कळविली ॥ १११ ।। पूर्वी पूर्वदिशेकडील राजांना भरतेशाची आज्ञा सेनापतीने कळविली होती तशी आता त्याने अनुक्रमाने पश्चिमेकडच्या राजांनाही त्यांचे मानधन-अभिमानरूपी धन हरण करून ती प्रभूची आज्ञा शीघ्र कळविली ॥ ११२ ।। __ तीरावरील नद्यारूपी हात ज्याने अतिशय दूरपर्यन्त पसरले आहेत व नाना रत्नरूपी पूजाद्रव्ये ज्याने आपल्याजवळ घेतली आहेत असा समुद्र या भरतप्रभूचा त्यांनी जणु सत्कार केला आहे असा शोभला ।। ११३ ॥ समुद्राच्या श्रीमंतीची प्रशंसा करणाऱ्या लोकानी समुद्राजवळ सुपाने मोजण्याइतकी रत्ने आहेत असे म्हटले पण त्यामुळे समुद्र मोठा धनिक आहे असे मुळीच होत नाही पण या भरतेशाजवळ अनेक गाड्यांनी मोजता येतील इतकी रत्ने आहेत ॥ ११४ ॥ ___ या समुद्राला लवणसमुद्र हे नांव देऊन हलका बनविले आहे पण हा फार मोठा रत्नांचा साठा आहे असे समजून राजांनी त्यावेळी त्याचा मोठा आदर केला ।। ११५ ॥ ___ ज्या पश्चिमदिशेकडे जाणारा सूर्य देखिल तेजाने मंद होतो त्या पश्चिम दिशेतल्या राजांना जिंकणान्या या भरतप्रभूचे तेज अतिशय चमकू लागले ॥ ११६ ॥ चक्ररत्नाला ज्याने धारण केले आहे, जो युद्धरूपी समुद्राला तरून पलिकडे गेला आहे व शāना तीव्रपणाने ज्याने भययुक्त केले आहे असा तो चक्रीभरत तीक्ष्ण किरणांच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसू लागला ।। ११७ ॥ __ लक्ष्मीपति त्या भरतराजाने समुद्राच्या किना-यावर जाऊन कधीही न भिणारे अशा स्वतःच्या मनाप्रमाणे निर्भय अशा आपल्या सैन्याला सिन्धुनदीच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवले, तेथे सैन्याचा मुकाम झाला ।। ११८॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy