SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 151
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १४०) महापुराण (२८-२०९ शार्दूलविक्रीडित तत्रोखोषितमङ्गलैजयजयेत्यानन्दितो बन्दिभिः । गत्त्वान्तःशिबिरं नपालयमहाद्वारं समासादयन् ॥ अन्तर्वेशिकलोकवारवनितादत्ताक्षताशासनः। प्राविक्षनिजकेतनं निधिपतिर्वातोल्लसत्केतनम् ॥ २०९ वसन्ततिलक देवोऽयमक्षततनुर्विजिताब्धिरागात् । ते यूयमानयतसाक्षतविद्धशेषाः ॥ माशाध्वमाध्यमिह सम्मुखमेत्य तुर्णमित्युत्थितः कलकलः कटके तदाभूत् ॥ २१० जीवेति नन्दतु भवानिति वद्धिषीष्ट । देवेति निर्जय रिपूनिति गां जयेति ॥ त्वं स्ताच्चिरायुरिति कामितमाप्नुहोति पुण्याशिषां शतमलम्भि तदा स वृद्धः ॥ २११ जीयादरीनिह भवानिति निजितारिदेव प्रशाषि वसुधामिति सिद्धरत्नः । त्वं जीवताच्चिरमिति प्रथमश्चिरायुरायोजि मंगलधिया पुनरुक्तवाक्यः ॥ २१२ देवोऽयमम्बुधिमगाधमलङध्यपार-मुल्लङघ्य लब्धविजयः पुनरप्युपायात् ॥ त्या ठिकाणी मंगलगीताचे पठन करणान्या स्तुति-पाठकानी जयजयकार करून ज्याला आनंदविले आहे अशा भरतचक्रीने छावणीच्या आत प्रवेश केला व तो राजवाड्याच्या महाद्वारात आला. त्यावेळी त्या ठिकाणी अन्तःपुरातील लोकानी व वेश्याजनानी मंगलाक्षतापूर्वक भाशीर्वाद दिला. यानंतर ज्यावर वान्याने ध्वज फडकत आहेत अशा आपल्या राजवड्यात राजाकरिता उभारलेल्या तंबूत त्याने प्रवेश केला ॥ २०९ ।। ज्याने समुद्राला जिंकले आहे व ज्याच्या देहाला कोठेही जखम झाली नाही असा हा भरतप्रभु आला आहे. यास्तव तुम्ही सर्व अक्षतासह सिद्धशेषा अरिहंताच्या चरणी अपिलेले पुष्पादिक शेषा हे पदार्थ घेऊन या व भरतप्रभूला आशीर्वाद द्या व शीघ्र त्याच्या संमुख बसा. याप्रमाणे सैन्याच्या निवासस्थानी तेव्हा जिकडे तिकडे कलकलाट सुरू झाला ।। २१० ॥ त्यावेळी हे राजा तूं दीर्घकाल जग, प्रभो तुला ऐश्वर्यसमृद्धि प्राप्त होवो. हे ईशा तुला धनधान्यसमृद्धि प्राप्त होवो. हे देव, तूं शत्रूना जिंकून विजयी हो व पृथ्वीला जिक, हे स्वामिन् तूं दीर्घायुषी हो व तुला सर्व इष्टपदार्थांची प्राप्ति होवो. याप्रमाणे वृद्धांनी भरतेशाला शेकडो पुण्यमय आशीर्वाद दिले ।। २११ ।। ज्याने शत्रूना जिंकले आहे अशा हे राजा तूं शत्रूना जिक. हे प्रभो, तुला चक्रदण्डादिक रत्ने प्राप्त झाली आहेत. म्हणून तूं सर्व पृथ्वीचे पालन कर. हे ईशा, तू पहिला चक्रवर्ती आहेस. तू चिरायु हो. अशा पुनरुक्त वचनानी किती एक लोकानी अनेक मंगल आशीर्वाद दिले ॥२१२॥ हा लवणसमुद्र अगाध आहे. याच्या परतीराचे उल्लंघन करता येत नाही. परंतु या भरतप्रभूनी त्याला उल्लंघून त्यावर विजय मिळविला आहे. पुण्यच सारथि ज्याचा आहे असा Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy