SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 150
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २८-२०८) महापुराण मालिनी अथ रथपरिवृत्त्यै सारथौ कृच्छकृच्छात विषमवलनभुग्नग्रोवमश्वानुनुत्सौ । पवति मरुति मन्दं वीचिवेगोपशान्तेः शिबिरमभि निधीनामीशिता संप्रतस्थे ॥ २०४ कथमपि रथचक्रं सारयित्वाम्बुरुद्धं । प्रवहणकृतकोपान्वाजिनोऽनुप्रसाध ॥ रथमधिजलमब्धौ चोदयामास सूतो। जलधिरपि नपानुव्रज्ययेवोच्चचाल ॥ २०५ अयमयमुदभारो वारिराशेर्वरूथम् । स्थगयति रथवेगादेष भिन्नोमिरब्धिः । इति किल तटसद्भिस्तर्यमाणो रथोऽयम् । जवनतुरगकृष्टः प्राप पारेसमुद्रम् ॥ २०६ तरङ्गात्यस्तोऽयं समघटितसर्वाङ्गघटनो । रथः क्षेमात्प्राप्तो रथचरणहेतिश्च कुशली ॥ तुरङ्गा घौताङ्गा जलधिसलिलरक्षतखुरा । महत्पुण्यं जिष्णोरिति किल जजल्पुस्तटजुषः ॥ २०७ नपैर्गङ्गाद्वारे प्रणतिमणिमौपितकरः । रस्तात्सद्वद्याः सजयजयघोषरधिकृतः ॥ बहिरं सैन्ययुगपदसकृद्घोषितजयः । विभुर्दृष्टः प्रापत्स्वशिबिरबहिस्तोरणभुवम् ॥ २०८ मग रथ फिरविण्याकरिता सारथ्याने मोठ्या कष्टाने व जोराने काडण्या खेचून घोड्यांच्या माना वळविल्या व घोडयाना चालण्याविषयी प्रेरणा केली. वायु मंद वाहू लागला व लाटांचा वेग शान्त झाला व तो निधिपति भरतराजा आपल्या छावणीकडे निघाला ।। २०४ ।। यानंतर पाण्यात जखडलेले रथाचे चाक कसे तरी प्रयासाने वर काढ़न व फार वेळ रथ ओढल्यामुळे त्रासलेल्या घोड्यांना सारथ्याने त्यांच्या अंगावर हात फिरवून प्रसन्न केले व त्याने समुद्रात पाण्यातूनच रथ चालविला. त्यावेळी समुद्रही राजास पोचविण्याकरिता की काय त्याला अनुसरून चालू लागला. अर्थात् आघाताने समुद्राचे पाणी पुढे पुढे चालू लागले ।।२०५।। हा पाण्याचा मोठा प्रवाह या रथाच्या टपावरून जाणार, या समुद्राच्या लाटा रथाच्या वेगाने फुटल्या, याप्रमाणे तीरावर असलेले लोक ज्याच्याविषयी तर्क करीत आहेत असा हा रथ वेगवान् घोड्यानी ओढल्यामुळे समुद्राच्या तीरावर आला ।। २०६॥ ज्याच्या सर्व अवयवांची रचना एकसारखी सुंदर आहे असा हा रथ तरंगांना उल्लंघन निर्विघ्न सुखाने तीरावर आला आहे व चक्रायुधाला धारण करणारा हा भरतपतिही कुशल आहे. समुद्राच्या पाण्यानी ज्यांचे अंग धुतले आहे असे हे घोडे ज्यांच्या खुराना काही इजा झाली नाही असे सुरक्षित आले आहेत. यावरून या विजयशाली चक्रवर्तीचे महापुण्यच या सर्व क्षेमाला कारण आहे असे तटावरील लोक बोलू लागले ।। २०७॥ गंगाद्वारावर व त्याच्या वेदीवर रक्षणाकरिता नेमलेले जे अनेक राजे होते त्यानी नम्र केलेल्या आपल्या रत्नम कुटावर आपले दोन हात जोडन जयघोषपूर्वक प्रभु भरताला नमस्कार करून प्रेमाने पाहिले व गंगाद्वाराच्या बाहेर जे सैन्य होते त्याने एकदम जयघोष करून भरतप्रभूला पाहिले. असा हा भरतप्रभु आपल्या छावणीच्या बाहेरील तोरणयुंक्त प्रदेशात आला ।। २०८ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy