________________
५१० )
( ४३-१४
इक्षोरिवास्य पूर्वार्द्धमेवाभावि रसावहम् । यथा तथास्तु निष्पत्तिरिति प्रारभ्यते मया ॥ १४ अन्विष्य मयि प्रौढि धर्मोऽयमिति गृह्यताम् । चाटुके स्वादुमिच्छन्ति न भोक्तारस्तु भोजनम् ॥१५ अथवाग्रं भवेदस्य विरसं नेति निश्चयः । धर्माग्रं ननु केनापि नार्दोश विरसं क्वचित् ॥ १६ गुरूणामेव माहात्म्यं यदपि स्वादु मद्वचः । तरूणां हि स्वभावोऽसौ यत्फलं स्वादु जायते ॥ १७ निर्यान्ति हृदयाद्वाचो हृदिमे गुरवः स्थिताः । ते तत्र संस्करिष्यन्ते तन्नमेऽत्र परिश्रमः ॥ १८ इदं शुश्रूषवो भव्याः कथितोऽर्थो जिनेश्वरैः । तस्याभिधायकाः शब्दास्तन्न निन्दात्र वर्तते ॥ १९ दोषान्गुणान्गुणी गृह्णन्गुणान्दोषांस्तु दोषवान् । सदसज्ज्ञानयोश्चित्रमत्र माहात्म्यमीदृशम् ॥ २०
महापुराण
या पुराणाचा पूर्वार्ध उसाप्रमाणे रसाळ झालाच आहे. पण पुढील भाग कसा तरी होवो असा विचार करून मी त्याची रचना करण्यास प्रारंभ करीत आहे ॥ १४ ॥
माझ्या ठिकाणी प्रौढता आहे किंवा नाही याचा विचार न करता माझ्या ठिकाणी काव्य रचण्याची योग्यता आहे किंवा नाही हे न हुडकता हे धर्मशास्त्र आहे असा विचार करून याचा स्वीकार करा. कारण जेवण घेण्यासाठी आलेले लोक प्रियवचन बोलल्यावरच स्वादिष्ट भोजनाची इच्छा करतात असे नाही. येथे असा अभिप्राय आहे - भोजन करण्यासाठी आलेले लोक प्रिय वचनाची अपेक्षा न करता भोजनावरच विचार करतात तसे धार्मिक जन माझ्या ठिकाणी योग्यतेची अपेक्षा न करता केवळ धर्माचाच त्यानी विचार करावा अर्थात् धर्म समजून याचा आश्रय करावा ॥ १५ ॥
अथवा या पुराणाचा हा शेवटचा भाग विरस होणार नाही असा माझा निश्चय आहे. कारण धर्माचा शेवट कोठेही विरस झाला आहे असे कोणीही पाहिले नाही ॥ १६ ॥
ज्या अर्थी माझे वचन आपणा सर्वांना आवडेल त्याला कारण गुरूचेच माहात्म्य आहे. ज्या अर्थी फळामध्ये गोडी येते तिला कारण झाडाचा स्वभावच आहे ।। १७ ।।
माझ्या हृदयातून वाणी बाहेर पडते व माझ्या हृदयात गुरु राहिले आहेत ते तेथें राहून वाणीवर संस्कार करतील म्हणून मला या पुराणरचनेत श्रम वाटणार नाहीत ।। १८ ।।
हे पुराण ऐकण्याची भव्यजीव इच्छा करितात व यातील अभिप्राय जिनेश्वरानी सांगितला आहे व त्या अभिप्रायाला प्रकट करणारे शब्द आमच्याकडून योजिले गेले आहेत. म्हणून यात लोक निंदा करतील असे काही नाही असे मला वाटते ।। १९ ।।
जो दोषांना गुणरूपाने ग्रहण करतो त्याला गुणी म्हणावे व जो गुणांना दोष मानून त्याना स्वीकारतो त्याला दोषी म्हणावे अर्थात् गुणी लोक दोषाना देखिल गुणरूपाने ग्रहण करतात व दोषी जन गुणानाही दोष समजतात. या जगात चांगले ज्ञान व वाईट ज्ञान यांचे असे विचित्र माहात्म्य आढळून येते ।। २० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org