________________
४३-१३)
महापुराण
(५०९
युगभारं वहन्नेकश्चिरं धर्मरथं पृथुम् । व्रतशीलगुणापूर्ण चित्रं वर्तयति स्म यः ॥७ तमेकमक्षरं ध्यात्वा व्यक्तमेकमिवाक्षरम् । वक्ष्ये समीक्ष्य लक्ष्याणि तत्पुराणस्य चूलिकाम् ॥ ८ स्वोक्ते प्रयुक्ताः सर्वे नो रसा गुरु भिरेव ते । स्नेहादिह तदुत्सृष्टान्भक्त्या तानुपयुज्महे ॥ ९ रागादीन्दूरतस्त्यक्त्वा शृङ्गारादिरसोक्तिभिः । पुराणकारकाः शुद्धबोधाः शुद्धा मुमुक्षवः ॥ १० निर्मितोऽस्य पुराणस्य सर्वसारो महात्मभिः । तच्छेषे यतमानानां प्रासादस्येव नः श्रमः॥ ११ पुराणे प्रौढशब्दार्थे सत्पत्रफलशालिनि । वचांसि पल्लवानीव कर्णे कुर्वन्तु मे बुधाः ॥ १२ अर्घ गुरुभिरेवास्य पूर्व निष्पादितं परैः । परं निष्पाद्यमानं सच्छन्दोवन्नातिसुन्दरम् ॥ १३
जूवाचा भार-ओझे वाहणारे असे हे एकटेच प्रभु होत. अर्थात् व्रते, शील व मूलगुण आणि उत्तरगुणांनी भरलेल्या धर्मरूपी महारथाला त्यानी दीर्घकाळपर्यंत चालविले. अर्थात् प्रभूचे तीर्थप्रवर्तन फार दीर्घकाळपर्यंत चालल्यानंतर अजितादितीर्थकरांची उत्पत्ति झाली. एकट्या या आदिभगवंतांनी महाधर्मरथाला अतिशय दीर्घकाळपर्यंत चालविले हे आश्चर्य आहे ॥ ७॥
अक्षर-अविनाशी अशा त्या एक अद्वितीय वृषभप्रभूला एका अक्षराप्रमाणे-ॐकाराप्रमाणे मनात चितून त्यांचे मनात ध्यान करून व पूर्वशास्त्रांचे अवलोकन करून महापुराण शास्त्राच्या उत्तरचूलिकेचे कथन मी करतो ॥ ८ ॥
स्वतः रचिलेल्या या महापुराणात आमच्या गुरूंनी सर्व रस उपयोगात आणले आहेतच पण स्नेहाने जे काही रस या पुराणासाठी त्यानी आमच्याकरिता ठेविले आहेत त्याचा आम्ही भक्तीने येथे उपयोग करू ॥ ९ ॥
रागादिक विकारांना दुरूनच त्यागून शृङगारादिक रसांनी युक्त अशा वचनांनी पुराणाची रचना करणारे गुरु शुद्ध ज्ञानाचे धारक व पवित्र आणि मुमुक्षु-मुक्त होण्याची इच्छा करणारे होते ॥ १०॥
त्या महात्म्यानी या पुराणाचा मुख्य उत्कृष्ट भाग रचला आहे. आता त्या पुराणाच्या राहिलेल्या भागाची रचना करण्याचा हा आमचा प्रयास आहे. तो एखाद्या प्रासादाचे उरलेल्या भागाची रचना शेवटास नेणाऱ्याप्रमाणे यात आम्हाला श्रम करावयाचे आहेत ॥ ११ ॥
या पुराणातील शब्द व अर्थ प्रौढ आहेत व हा पुराणवृक्ष उत्तम पाने व फलांनी शोभत आहे. आता यातील माझी वचने ही सुजन बुधांनी कोवळया पालवीप्रमाणे कानावर धारण करावीत अशी माझी विनन्ति आहे ।। १२ ।।
__ या पुराणाचा पूर्वार्ध गुरूनीच केलेला आहे व आता पुढचा उत्तरार्ध हा परक्यानी म्हणजे आमच्याकडून रचला जाईल पण तो उत्तम छन्दाप्रमाणे अतिशय सुंदर बनेल असे मला वाटत नाही ॥ १३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org