________________
४७-३१२)
महापुराण
शङकादिदोषनिर्मुक्तं भावत्रयविवेचितम् । तेषां जीवादिसप्तानां संशयादिविसर्जनात् ॥३०५॥ याथात्म्येन परिज्ञानं सम्यग्ज्ञानं समादिशेत् । यथा कर्मास्रवो न स्याच्चारित्रं संयमस्तथा ॥ ३०६ निर्जरा कर्मणां येन तेन वृत्तिस्तपो मतम् । चत्वार्येतानि मिश्राणि कषायः स्वर्गहेतवः ॥ ३०७ निष्कषायाणि नाकस्य मोक्षस्य च हितैषिणाम् । चतुष्टयमिदं वम मुक्तेर्दुष्प्रापमङगिभिः ॥ ३०८ मिथ्यात्वमव्रताचारः प्रमादाः सकषायता । योगाः शुभाशुभा जन्तोः कर्मणां बन्धहेतवः ॥ ३०९ मिथ्यात्वं पञ्चषा चाष्टशतधा विरतिर्मता। प्रमादाः पञ्चदश च कषायास्ते चतुर्विधाः ॥३१० योगाः पञ्चदश ज्ञेयाः सम्यग्ज्ञानविलोचनः । समूलोत्तरभेदेन कर्माण्युक्तानि कोविदः ॥ ३११ बन्धश्चतुर्विधो ज्ञेयः प्रकृत्यादिविकल्पतः । कर्माण्युदयसम्प्राप्त्या हेतवः फलबन्धयोः ॥ ३१२
___ त्या जीवादिक सप्ततत्त्वांचे संशय, विपरीतपणा वगैरे दोषानी रहित असे जे यथार्थ ज्ञान होणे त्याला सम्यग्ज्ञान म्हणतात व ज्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी नवीन कर्मांचा प्रवेश-आगमन होणार नाही असे जे जीवांचे वागणे त्याला सम्यकचारित्र किंवा संयम म्हणतात ॥ ३०५-३०६ ।।
ज्याने जीवांचे कर्म झडून जाते व नवीन कर्माचा बंध होत नाही अशा वागण्याला तप म्हणतात. हे सम्यग्दर्शनादिक चार धर्म जोपर्यंत कषायसहित असतात तोपर्यंत स्वर्गाला कारण होतात. जेव्हां हे सम्यग्दर्शनादिक चार धर्म कषायरहित होतात तेव्हां त्यापासून स्वर्गाची व मोक्षाची प्राप्ति होते. यास्तव आपले हित व्हावे असे इच्छिणाऱ्यांनी या चारांचा आश्रय करावा. हे चार धर्म मोक्षाचा मार्ग आहेत व प्राण्यांना यांची प्राप्ति होणे अत्यन्त कठिण आहे ॥ ३०७-३०८ ॥
मिथ्यात्त्व-जीवादितत्वावर श्रद्धा नसणे, व्रतांनी रहित असा आचार-स्वैराचार असणे, प्रमाद-धर्माचरणात आळस असणे-उत्साह नसणे, क्रोधादिकषायांनी युक्त असणे, शुभ व अशुभ अशी मन वचन शरीराची प्रवृत्ति होणे ही प्राण्यांना कर्मबन्धाची कारणे आहेत ।। ३०९ ॥
मिथ्यात्व-अतत्त्वश्रद्धान मिथ्यात्व आहे व त्याचे एकान्तमिथ्यात्व, संशयमिथ्यात्व, विनयमिथ्यात्व, अज्ञानमिथ्यात्व, विपरीतमिथ्यात्व असे पाच भेद आहेत. अविरतीचे १०८ भेद होतात आणि प्रमादाचे पंधरा भेद आहेत. ते असे-विकथा चार, कषाय चार, इन्द्रियें पांच, निद्रा व स्नेह; कषायांचे चार भेद-अनन्तानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संज्वलन. सम्यग्ज्ञानरूपी डोळा ज्यांना आहे अशा लोकांनी योगाचे पंधरा भेद सांगितले आहेत. विद्वानानी मूलभेद व उत्तरभेद अशा रीतीने कर्मांचे वर्णन केले आहे. ज्ञानावरणादि मूलभेद आठ आहेत व उत्तरभेद कर्माचे १४८ सांगितले आहेत ।। ३१०-३११ ॥
बंधाचे चार भेद आहेत ते असे-प्रकृतिबन्ध, स्थितिबन्ध, अनुभागबन्ध व प्रदेशबन्ध हीं ज्ञानावरणादिक कर्मे उदयाला येऊन सुख-दुःखादिक फलें जीवाला देतात व नवीन कर्मे पुनः आत्म्याशी बद्ध होतात ॥ ३१२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org