________________
३२-१६४)
महापुराण
(२२१
स्वर्घनीसोकरासारवाहिनो गन्धगाहिनः । मन्दं विचेरुराधमातसान्द्रमन्दारनन्दनाः॥ १५७ न केवलं शिलाभित्तावस्य नामाक्षरावली। लिखितानेन चान्द्रेऽपि बिम्बे तल्लाञ्छनच्छलात् ॥१५८ लिखितं साक्षिणो भुक्तिरित्यस्तीहापि शासने । लिखितं सोऽचलो भुक्तिदिग्जये साक्षिणोऽमराः ॥ अहो महानुभावोऽयं चक्री दिक्चक्रनिर्जये । येनाकान्तं महीचक्रमानवसतित्रिकात् ॥ १६० खचरादिरलङध्योऽपि हेलया लङ्गितोऽमुना । कीर्तिः स्थलाब्जिनीवास्य रूढा हैमाचलस्थले ॥१६१ इति दृष्टावदानं तं तुष्टुवु किनायकाः । दिष्टया स्म वर्धयन्त्येनं साङ्गनाश्च नभश्चराः ॥ १६२ भूयः प्रोत्साहितो देवर्जयोद्योगमनूनयन् । गङ्गापातमभीयाय व्याहूत इव तत्स्वनः ॥ १६३ गलद्गङ्गाम्बुनिष्ठयूताः शीकरा मदशीकरः । सम्मुमूर्छनृपेभानां व्यात्युक्षी वा तितांसवः ॥ १६४
त्यावेळी गंगानदीच्या जलबिन्दूंची वृष्टि करणारे आणि मंदार व नन्दनवनाची दाट वृक्षपंक्ति ज्यानी हालविली आहे असे सुगंधित वायु मन्दमन्द वाहू लागले ॥ १५७ ॥
या भरतपति भरताने फक्त आपल्या नावाची अक्षरपंक्ति त्या शिलांच्या भिंतीवरच लिहिली असे नाही तर ती चन्द्राच्या बिंबातही त्याच्या कलंकाच्या मिषाने-निमित्ताने लिहिली आहे, अर्थात् जो चन्द्रात काळा डाग दिसतो तो त्याचे लांछन नाही तर भरताने खोदलेला जणु शिलालेख आहे ॥ १५८ ॥
कोणत्याही शासनपत्रात लिखित-लेख, साक्षीदार व उपभोग या तिघांचा उल्लेख असतो तसा तो या शिलालेखातही आहे. येथे वृषभगिरि हा लिखित आहे. दिग्विजयामुळे उपभोग सिद्ध होतो आणि देव साक्षीदार आहेत म्हणून हे तीनही येथे आहेत ॥ १५९ ॥
हा भरतचक्री अतिशय पराक्रमी आहे, कारण याने सर्व दिशाना जिंकण्याच्या प्रसंगी पूर्वसमुद्र, दक्षिणसमुद्र, व पश्चिमसमुद्रापर्यन्त सर्व भरतक्षेत्र पूर्ण व्यापले ॥ १६० ।।
हा विजयाध पर्वत ओलांडण्यास अशक्य होता तरीही या भरतेशाने तो ओलांडला व यामुळे याची कीर्ति स्थलकमलिनीप्रमाणे हिमवान् पर्वतावरील प्रदेशावर चढली आहे ॥ १६१॥
याप्रमाणे ज्याचा पराक्रम दिसला आहे अशा त्या भरतेशाची स्वर्गीय श्रेष्ठ देवानी स्तुति केली व आपल्या स्त्रियासह विद्याधरही हा अपूर्व भाग्यवान् आहे असे म्हणून त्याच्या उत्कर्षाची प्रशंसा करू लागले ॥ १६२ ॥
देवानी पुनः भरताला उत्साह युक्त केले म्हणून त्याने आपला जयोद्योग न संपविता जेथे गंगा पर्वतावरून खाली पडते अशा प्रदेशात तिच्या मोठ्या ध्वनीने जणु बोलाविला गेलेला तो भरतराजा त्या गंगाप्रपातासमोर गेला ॥ १६३ ॥
वरून पडणा-या गंगेच्या पाण्याचे उडणारे बारीक कण ते राजांच्या हत्तीच्या मदजल कणाशी असे मिळून गेले की जणु ते एकमेकावर पाणी फेकून जलक्रीडा करीत आहेत असे वाटले ।। १६४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org