SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 233
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २२२) महापुराण (३२-१६५ पतद्गङ्गाजलावर्तपरिवद्धितकौतुकः । प्रत्यग्राहि स तत्पाते गङ्गादेव्या धृतार्घया ॥ १६५ सिंहासने निवेश्यन प्राङमुखं सुखशीतलैः । साऽभ्यषिञ्चज्जलैङ्गिः शशाङककरहासिभिः॥१६६ कृतमङ्गलसङ्गीतनान्दीतूर्यरवाकुलम् । निर्वयं मज्जनं जिष्णुर्भेजे मण्डनमप्यतः ॥ १६७ अथास्मै व्यतरत्प्रांशुरत्नांशस्थगिताम्बरम् । सेन्द्रचापमिवाद्रीन्द्रशिखरं हरिविष्टरम् ॥ १६८ चिरं वर्द्धस्व वद्धिष्णो जीवतानन्दताद्भवान् । इत्यनन्तरमाशास्य तिरोऽभूत्सा विसजिता ॥१६९ अनुगङ्गातटं सैन्यरावजन्विषयाधिपः । सिषेवे पवमानश्च गंगाम्बुकणवाहिभिः ॥ १७० गङ्गातटवनोपान्तनिवेशेषु विशाम्पतिम् । सुखयामासुरन्वीयमायाता वनमारुताः ॥ १७१ वने वनचरस्त्रीणामुदस्यन्नलकावलीः । मुहुस्स्वलन्कलापेषु नृत्यद्वनशिखण्डिनाम् ॥ १७२ विलोलितालिराधुन्वन्नुत्फुल्ला वनवल्लरीः । गिरिनिर्झरसंश्लेषशिशिरो मरुदाववौ ॥ १७३ खाली पडणाऱ्या गंगानदीच्या पाण्याचे भोवरे पाहून ज्याचे कौतुक वाढले आहे अशा भरताला त्या गंगापातस्थानी गंगादेवीने अर्घ्य देऊन त्याचा सत्कार केला ।। १६५ ॥ गंगादेवीने पूर्वेकडे मुख ज्याने केले आहे अशा या भरतप्रभूला सिंहासनावर बसवून चन्द्राच्या किरणाना हंसणाऱ्या अशा सुखदायक शीत-थंड गंगेच्या पाण्यानी स्नान घातले।। १६६ ॥ ज्यात मंगल गायन गायिले गेले व जे मंगल वाद्यांच्या शब्दानी युक्त आहे असे स्नान आटोपून त्या विजयी भरतराजाने त्या गंगा देवीपासून अलंकाराचाही स्वीकार केला ।। १६७ ।। यानंतर वर पसरणाऱ्या रत्नकिरणानी ज्याने आकाशाला व्यापिले आहे व जे इन्द्र धनुष्यानी युक्त मेरुपर्वताचे शिखर आहे असे भासते असे सिंहासन गंगा देवीने या भरतेशाला दिले आणि यानंतर तिने "वृद्धि पावणाऱ्या हे राजा तू दीर्घ कालपर्यन्त ऐश्वर्यादिकानी वृद्धिंगत हो. तू दीर्घकाल जग आणि दीर्घकालपर्यन्त तुझ्या आनंदाची वृद्धि होवो" अशा रीतीने तिने भरतेशाला आशीर्वाद दिले आणि भरतेशाने तिला जाण्याची परवानगी दिल्यावर ती निघून गेली ।। १६८-१६९ ॥ .. यानंतर गंगा नदीच्या किनाऱ्याला अनुसरून सैन्यासह भरतेश्वर प्रयाण करीत असता अनेक देशाच्या राजानी व गंगेच्या जलकणाना वाहणाऱ्या वायूनी त्याची सेवा केली ॥ १७० ।। . गंगेच्या तटावर जेथे जेथे त्याचा मुक्काम होत असे तेथे तेथे त्याच्या मागून वाहणाऱ्या वाऱ्यानी त्याला सुखविले ॥ १७१॥ . त्या वनात वनचर-भिल्लादिकांच्या स्त्रियांच्या केशसमूहाला वर उडविणारा, नाचणाऱ्या वनमयूरांच्या पिसाऱ्यात वारंवार अडखळणारा, भुंग्याना चंचल करणारा, पुष्पित अशावनलताना हालविणारा व पर्वताच्या झऱ्याबरोबर संबंध झाल्यामुळे थंड झालेला असा वारा वाहू लागला ॥ १७२-१७३ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy