________________
२२० )
(३२-१४८
चरमाङ्गधरो धीरो धौरेयश्चक्रधारिणाम् । परिक्रान्तं धराचक्रं जिष्णुना येन दिग्जये ॥ १४८ यस्याष्टादशकोटयोऽश्वा जलस्थलविलङ्घिनः । लक्षाश्चतुरशीतिश्च मदेभा जयसाधने ॥ १४९ यस्य दिग्विजये विष्वग्बलरेणुभिरुत्थितैः । सदिङ्मुखं स्वमारुद्धं कपोतगलकर्बुरैः ॥ १५० प्रसाधितदिशो यस्य यशः शशिकलामलम् । सुरैरसकृदुद्गीतं कुलक्षोणी प्रकुक्षिषु ॥ १५१ दिग्जये यस्य सैन्यानि विश्रान्तान्यधिदिक्तटम् । चक्रानुभ्रान्तितान्तानि क्रान्त्वा हेमवतीस्स्थलीः ॥ नप्ता श्रीनाभिराजस्य पुत्रः श्रीवृषभेशिनः । षट्खण्डमण्डितामेनां यः स्म शास्त्यखिलां महीम् ॥१५३ मत्वा गत्वरीं लक्ष्मीं जित्वरः सर्वभूभृताम् । जगद्विसृत्वरों कीर्तिमतिष्ठिपदिहाचले ॥ १५४ इति प्रशस्तिमात्मीयां व्यलिखत्स्वयमक्षरः । प्रसूनप्रकरैर्मुक्तैर्नृपोऽवचकिरेऽमरैः ॥ १५५ · तत्रोच्चैरुच्चरध्वाना मन्द्रदुन्दुभयोऽध्वनन् । दिवि देवा जयेत्याशीश्शतान्युच्चैरघोषयन् ॥ १५६
महापुराण
जो शेवटचे शरीर धारण करीत आहे अर्थात् याच जन्मात जो मुक्त होणारा आहे, जो धीर आणि सर्व चक्रवर्तीमध्ये पहिला श्रेष्ठ चक्रवर्ती आहे. अशा त्या भरताने दिग्विजयाच्या वेळी जय मिळवून हे संपूर्ण भूतल व्याप्त केले आहे जिंकले आहे. जल, पाणी व स्थल-भूमि या दोहोंचे उल्लंघन करणारे अशा अठरा कोटि अश्वांचा जो स्वामी आहे व जय मिळवून देण्याचे - साधन असलेले चौऱ्याऐंशी लक्ष मदन्मत्त हत्तींचा जो अधिपति आहे ।। १४८-१४९ ।।
ज्याच्या दिग्विजयाच्या वेळी चोहीकडे वर उडालेल्या पारव्यांच्या गळयाप्रमाणे धुरकट अशा सैन्याच्या वर उडालेल्या धुळीनी सर्व दिशांची मुखे व आकाश व्यापले होते ।। १५० ।।
ज्याने सर्व दिशा जिंकल्या आहेत व चन्द्रकलेप्रमाणे निर्मल ज्याचे यश कुलपर्वत जे विजयार्ध व हिमवान् यांच्या गुहामध्ये देवाकडून नेहमी गायिले गेले आहे ।। १५१ ।।
दिग्विजयाच्या वेळी चक्राच्या मागून सतत जाणाऱ्या ज्याच्या सैन्यानी दमल्यामुळे हिमवान् पर्वताची भूमि उल्लंघून दिशांच्या अन्तिम तटावर खूप विश्रान्ति घेतली ।। १५२ ।।
जो श्रीनाभिराजाचा नातु आहे व जो श्रीवृषभ जिनेश्वराचा पुत्र आहे. अशा या भरतचक्रीने षट्खण्डानी भूषित या सर्व भरतभूमीचे पालन केले आहे ॥। १५३ ।।
ज्याने सर्व राजाना जिंकले आहे अशा या भरतचक्रीनें सर्व लक्ष्मी नाशवंत आहे असे जाणून या वृषभपर्वतावर सर्व जगात पसरलेल्या प्रसिद्ध झालेल्या आपल्या कीर्तीला स्थापिले, स्थिर केले ।। १५४ ॥
याप्रमाणे भरतचक्रीने आपली कीर्ति स्वतः आपल्या हातानी लिहिली तेव्हा देवानी त्याच्यावर केलेल्या पुष्पांच्या वृष्टीने तो व्याप्त झाला. अर्थात् देवानी त्याच्यावर पुष्पवृष्टि करून आपला आनंद व्यक्त केला ।। १५५ ।।
त्या पर्वतावर मोठा शब्द करणारे गंभीर नगारे त्यावेळी वाजू लागले आणि आकाशात हे भरताधिपते तुझा विजय असो असे देवानी त्याला शेकडो आशीर्वाद दिले ।। १५६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org