________________
२४-१७२)
महापुराण
अमुष्य जलमुत्पतद्गमनमेतदालक्ष्यते । शशाडूकरकोमलच्छविभिराततं शीकरैः ॥ प्रहासमिव दिग्वधूपरिचयाय विष्वग्दधत् । तितांसदिव चात्मनः प्रतिदिशं यशोभागशः ॥ १७० क्वचित्स्फुटितशुक्तिमौक्तिकततं सतारं नभो । जयत्यलिमलीमसं मकरमीनराशिश्रितम् ।। क्वचित्सलिलमस्य भोगिकुलसंकुलं सून्नतम् । नरेन्द्रकुलमुत्तमस्थिति जिगीषतीवोद्भटम् ॥ १७१ इतो विशति गाङ्गमम्बु शरदम्बुदाच्छच्छवि । जुतं हिमवतोऽमतश्च सुरसं पयः सैन्धवम् ॥ तथापि न जलागमेन धृतिरस्य पोपूर्यते । ध्रुवं न जलसंग्रहैरिह जलाशयो प्रायति ॥ १७२
किनाऱ्यावर येऊन मोठ्याने जयजयकार करीत आहे. वाऱ्याने हालणारे पाणीरूपी नगारे वाजवीत आहे, असा हा समुद्र आपणास निरंतर आनंद देवो ।। १६९ ।।
चंद्राच्या किरणसमूहाप्रमाणे कोमल कान्ति ज्यांची आहे अशा तुषारकणानी भरलेले या समुद्राचे वर उसळणारे पाणी दिशारूपी वधूंचा आपल्याशी परिचय व्हावा म्हणून जणु हास्य करीत आहे असे भासत आहे व हे प्रभो, आपले यश प्रत्येक दिशेला विभागरूपाने पसरविण्याची इच्छा करीत आहे असे आम्हास वाटत आहे ।। १७० ।।
या समुद्राच्या पाण्याने फुटलेल्या शिंपल्यातून निघालेल्या मोत्यांच्या समूहानी कोठे कोठे तारकानीसहित अशा आकाशाला जिकले होते व कोठे कोठे या समुद्राचे पाणी मकर व मौन अर्थात् मगर व मासे यांच्या समूहाने भरलेले असल्यामुळे भुंग्याप्रमाणे काळसर झाले होते व मकरराशि आणि मीनराशि यांनी युक्त अशा आकाशाच्या शोभेला ते जिकीत होते. कोठे कोठे या समुद्राचे पाणी राजांच्या कुलाला जिंकण्याची इच्छा करीत आहे कारण राजांचे कूल भोगी लोकांच्या समहाने भूषित असते व या समुद्राचे जलप्रदेश देखिल कोठे कोठे भोगि-सर्पाच्या समूहाने भूषित होते. राजांचे कुल सून्नत-अतिशय उच्च असते तसे या समुद्राचे पाणी देखिल कोठे उन्नत-अतिशय उंच वाढून उसळत होते. जसे राजाचे कुल उत्तम स्थितिमर्यादेने सहित असते, तसे या समुद्राचे पाणी उत्तम स्थितीने-सीमेने युक्त होते अर्थात् आपली मर्यादा ते उल्लंधित नव्हते. जसे राजकुल उद्भट उत्कृष्ट योद्धयानी सहित असते तसे ह्या समुद्राचे पाणी कोठे कोठे उद्भट-अतिशय प्रबल झाले होते ॥ १७१ ॥
इकडे हिमवान् पर्वतापासून निघालेले व शरदऋतूच्या मेघाप्रमाणे शुभ्रकान्ति ज्याची आहे असे गंगानदीचे पाणी या समुद्रात प्रवेश करीत आहे व या बाजूने सिंधुनदीचे सुरस-गोड पाणी प्रवेश करीत आहे, तथापि या पाण्यांच्या आगमनानेही जलाशयाची-समुद्राची तृप्ति होत नाही, याची हाव कमी होत नाही. हे योग्यच आहे की, जलशय-जे पाण्याचे साठे व पक्षी जड बुद्धि असतात त्याना कितीही ( जलसंग्रह-पाण्याचा संग्रह व मूखांचा संग्रह ) झाला तरी तृप्ति होत नाही. भावार्थ-जसे जडाशय-मूर्ख मनुष्य जडसंग्रह-मूर्ख मनुष्याच्या संग्रहाने तृप्त होत नाही. तसे जलाशय पाण्यानी भरलेला समुद्र अथवा तळे जलसंग्रहाने-पाण्यांचा संग्रह करण्याने सन्तुष्ट होत नाही ।। १७२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org