SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 141
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १३० ) महापुराण युष्मत्पादरजःस्पर्शाद्वाधिरेव न केवलम् । पूता वयमपि श्रीमंस्त्वत्पादाम्बुजसेवया ॥। १६१ रत्नान्यमून्यनर्धाणि स्वर्गेऽप्यसुलभानि च । अधो निषीनामाधातुं सोपयोगानि सन्तु ते ॥ १६२ हारोऽयमतिरोचिष्णुरवारा हैरशुक्तिजः । अवेणुद्विपसम्भूतैर्दृब्धो मुक्ताफलैर्युजः ॥ १६३ तव वक्षःस्थलाश्लेषादुपेयादुपहारताम् । स्फुरती कुण्डले चेमे कर्णसङ्गात्पवित्रताम् ॥ १६४ इत्यस्मै कुण्डले दिव्ये हारं च विततार सः । त्रैलोक्यसार सन्दोहमिवैकध्यमुपागतम् ॥ १६५ रत्नेश्चाभ्यर्च्य रत्नेशं मागधः प्रीतमानसः । प्रभोरवाप्तसत्कारस्तन्मतात्समयात्पदम् ॥ १६६ अथ तत्रस्थ एवाधि सान्तद्वीपं विलोकयन् । प्रभुविसिस्मिये किञ्चित् बह्वाश्चर्यो हि वारिधिः ॥ ततः कुतूहलाद्वाद्धि पश्यन्तं धूर्गतः पतिम् । तमित्युवाच दन्तांशु सुमनोमञ्जरीं किरन् ॥ १६८ (२८-१६१ पृथ्वीवृत्तम् भयं जलधिरुच्छलत्तरलवीचिबाहूद्धृत । स्फुरन्मणिगणार्चनो ध्वनदसङ्ख्य शङ्खाकुलः ॥ तवार्धमिव संविधित्सुरनुवेलमुच्चैर्नदन् । मरुद्धृतजलानको दिशतु शश्वदानन्दथुम् ॥ १६९ हे लक्ष्मीसंपन्न प्रभो, आपल्या पायाच्या धुळीच्या स्पर्शाने केवल समुद्रच पवित्र झाला असे नाही तर आम्ही देखिल आपल्या चरणकमलाच्या सेवेने पवित्र झालो आहोत ।। १६१ ।। हे प्रभो, ही अत्युत्तम व अमूल्य रत्ने स्वर्गात देखिल सुलभ नाहीत. ही रत्ने afrain खाली ठेवण्यास आपणास उपयोगी पडतील म्हणून ही आपणाजवळ असोत ॥ १६२॥ हे प्रभो, वराह, शिप, वेळू व हत्ती यांच्यापासून उत्पन्न न झालेल्या व स्वर्गात उत्पन्न झालेल्या अशा मोत्यांनी गुंफलेला हा हार अत्यंत कान्तिसम्पन्न आहे व आपल्या वक्षःस्थलावर लोळण्याने उपहार होईल. या नजराण्याचा आपण स्वीकार करावा. तसेच ही चमकणारी रत्नकुण्डले आपल्या कानाच्या संसर्गाने पवित्र होवोत असे म्हणून मागध देवाने दिव्य कुण्डले व हार चक्रवर्तीला अर्पण केला. त्रैलोक्यातील सार वस्तूचा जणु समूह असे हे हार व कुण्डले शोभत होती. ही भरतचक्रीला मगधदेवाने दिली ।। १६३-१६५ ॥ याशिवाय चौदा रत्नांचा स्वामी अशा त्या भरताची मागघदेवाने प्रीतियुक्त अन्तःकरणाने पुष्कळ रत्नांनी पूजा केली, आदर केला. यानंतर प्रभु भरतापासून मागघदेवाचा सत्कार झाला व तो देव चक्रवर्तीच्या संमतीने आपल्या स्थानी निघून गेला ।। १६६ ।। यानंतर तेथेच अन्तद्वीपासह समुद्राला भरतेश पाहत असता त्याला थोडेसे आश्चर्य वाटले. बरोबरच आहे कीं तो लवणसागर पुष्कळ आश्चर्यांचे स्थानच होता ।। १६७ ।। यानंतर भरत प्रभु कौतुकाने समुद्राला पाहात आहे असे पाहून रथाच्या धुरेवर बसलेला सारथी दातांच्या किरणरूपी मंजरीना बाहेर पसरून याप्रमाणे बोलू लागला ।। १६८ ।। हे प्रभो, वर उसळणा-या चंचल तरङ्गरूपी बाहूंनी या समुद्राने आपले पूजन करण्यासाठी चमकणारी रत्नसमूहरूपी सामग्री धारण केली आहे व आपल्या सत्कारासाठी असंख्य शंख वाजविण्यात दंग झाला आहे व आपणास जगु अ करण्याचा इच्छेने Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy