SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 143
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १३२) महापुराण (२८-१७३ वसंततिलक व्याप्योदरं चलकुलाचलसन्निकाशाः । पुत्रा इवास्य तिमयः पयसा प्रपुष्टाः ॥ कल्लोलकाश्च परिमारहिताः समन्तादन्योन्यघट्टनपराः सममाविशन्ति ॥ १७३ आपो धनं धृतरसाः सरितोऽस्य दाराः । पुत्रायिता जलचराः सिकताश्च रत्नम् ॥ इत्थं विभूतिलवदुर्ललितोऽपि चित्रम् । धत्ते महोदधिरिति प्रथिमानमेषः ॥ १७४ निःश्वासधूममलिनाः फणमण्डलान्तः- सुव्यक्तरत्नरुचयः परिती भ्रमन्तः । व्यायच्छमाननतवो रुषितरकस्मादत्रोल्मुकश्रियममी दधते फणीन्द्राः ॥ १७५ पादैरयं जलनिधिः शिशिरैरपीन्दोरास्पृश्यमानसलिलः सहसा खमुद्यन् ॥ रोषादिवोच्छलति मुक्तगभीररावो वेलाच्छलेन न महान् सहतेऽभिभूतिम् ।। १७६ नाकोकसां प्रतरसां सहकामिनीभिः । आक्रीडनानि समनोहरकाननानि ॥ द्वीपस्थलानि रुचिराणि सहस्रशोऽस्मिन् । सन्त्यन्तरीपमिव दुर्गनिवेशनानि ॥ १७७ हे प्रभो, या समुद्राच्या पोटात चोहीकडे पसरून राहिलेले आणि हलणाऱ्या कुलपर्वताप्रमाणे जे दिसतात व या समुद्राच्या पाण्याने पुष्ट झालेले जणु या समुद्राचे पुत्र असे हे मोठे मासे व ज्यांच्या मोठेपणाचे परिमाण करता येत नाही असे या समुद्राचे कल्लोळ-तरङ्ग हे दोघे एकमेकावर आघात करीत राहतात व समुद्रात एकदम प्रवेश करतात ।। १७३ ॥ हे राजेन्द्रा, पाणी हे या समुद्राचे धन आहे. ज्यांनी खूप पाणी धारण केले आहे अशा अथवा शंगार किंवा स्नेह धारण करणा-या या नद्या या समुद्राच्या स्त्रिया आहेत. मगर, मत्स्य आदि जलचरप्राणी हेच याचे पुत्र आहेत व वाळू हीच रत्ने आहेत. याप्रमाणे थोड्याशा ऐश्वर्याने देखिल उन्मत्त झालेला हा समुद्र महोदधि' या नावाने सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे हे मोठे आश्चर्यकारक आहे ।। १७४ ।। श्वासोच्छ्वासाच्या धुराने मळकट झालेले, फणांच्या गोलाकारात असलेल्या रत्नांच्या व्यक्त कान्तीनी शोभणारे व गोलाकार सभोवती फिरणारे, ज्यांची शरीरे लांबट-दीर्घ आहेत व अकस्मात् रागावण्याने या समुद्रात ते फणीन्द्र कोलीत फिरविल्याने जो शोभा दिसते तसल्या शोभेला ते धारण करीत आहेत ।। १७५ ॥॥ हे प्रभो, हा समुद्र चंद्राच्या थंड अशाही पादांनी-पायांनी-दुसरा अर्थ किरणानी याच्या पाण्याला स्पर्श केला असता एकदम आकाशात उसळी घेऊन रागाने मोठी गर्जना करीत आहे व लाटांच्या मिषाने चंद्राकडे धाव घेत आहे. बरोबरच आहे की, जो मोठा असतो तो इतराने केलेला पराभव-अपमान सहन करीत नाही ।। १७६ ॥ या समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्या देवांगनाबरोबर मोठ्या वेगाने येणान्या स्वर्गातील देवांची हजारो क्रीडास्थळे आहेत. हजारो मनोहर वने आहेत आणि हजारो सुंदर द्वीप आहेत व ते सर्व जणु या समुद्रात किल्ले बांधले आहेत असे दिसतात ॥ १७७ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy