SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 144
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २८-१८२) महापुराण मालिनीवृत्त अयमनियतवेलो रुद्धरोधोन्तरालै । रनिलबलविलोलभूरिकल्लोलजालैः ॥ तटवनभिहन्ति व्यक्तमस्मै प्ररुष्यन्मम किल बहिरस्मान्नास्ति वृत्तिर्मुधेति ॥ १७८ अविगणितमहत्त्वा यूयमस्मान्स्वपादै-रभिहथ । किमलङध्यं वो वृथा तौंग्यमेतत् ॥ वयमिव किमलडध्याः किं गभीराः इतीत्थं । परिवदति विरावजूनमब्धिः कुलाद्रीन् ॥ १७९ प्रहर्षिणीवृत्तम् अत्रायं भुजगशिशुबिलाभिशङ्को । व्यात्तास्यं तिमिमभिधावति प्रहृष्टः ॥ तं सोऽपि स्वगलबिलावलग्नस्वान्त्रस्था विहितदयो निजेगिलोति ॥ १८० दोधकवृत्तम्-एष महामणिरश्मिविकोणं तोयमनुष्य धृतामिषशङ्कः ॥ मीनगणोऽनुसरन् सहसास्भावह्निधिया पुनरप्यपयाति ॥ १८१ लोलतरङ्गविलोलितदृष्टिर्वृद्धतरोऽसुमतिः सुमतं नः॥ ही रथमेष तिमिङ्गिलशङ्की, पश्यति पश्य तिमिस्तिमिताक्षः ॥ १८२ भरती व ओहोटी यांनी चंचल झालेला हा समुद्र या वनाच्या बाहेर माझे जाणे होत नाही म्हणून या वनावर प्रकट रीतीने क्रोध करून आपल्या किनाऱ्यावर असलेल्या वनाला वायूच्या वेगाने अतिशय चंचल करीत आहे व पृथ्वी आणि आकाशाच्या मध्यभागाला रोकणान्या अनेक लहरींच्या समूहानी त्या वनाला व्यर्थच ताडन करीत आहे ॥ १७८ ॥ हा समुद्र आपल्या मोठ्या गर्जनानी कुलपर्वताना जणु असे म्हणत आहे ' हे पर्वतानो तुम्ही आमचे महत्त्व ध्यानात न घेता आम्हाला पायानी लाथा मारीत आहात. तुम्हाला ओलांडून जाणे शक्य आहे. तुमचा हा उंचपणा व्यर्थ आहे. आमच्याप्रमाणे तुम्ही अलङ्गम्य आहा काय ? गंभीर तरी आहा काय ?' असे म्हणून जणु गर्जनानी त्यांची निंदा करीत आहे असे वाटते ॥ १७९ ॥ या ठिकाणी हा सर्पाचा बालक हे बीळ आहे असे समजून आनंदित होऊन ज्याने आपले तोंड उघडले आहे अशा माशाकडे धावत आहे व तो मासाही हा स्वतःच्या गळ्याच्या मध्यभागातले स्वतःचे आतडे आहे असे समजून दया न करता त्याला गिळून टाकीत आहे ॥१८०।। __ महामण्यांच्या-पद्मरागमण्यांच्या किरणानी व्याप्त झालेल्या या समुद्राच्या पाण्याला पाहून हे मांस आहे असे समजणारा हा माशांचा समूह त्याच्याजवळ जातो पण हा अग्नि आहे असे समजून पुनः त्यापासून एकदम दूर परतत आहे ॥ १८१ ॥ हे देवा इकडे आपण पहा, चंचल तरंगानी ज्याची दृष्टि चंचल झाली आहे व जो अतिशय म्हातारा झाला आहे असा हा मासा या रथाला, माशांना खाणारा हा मोठा मासा आहे असे समजून निश्चल दृष्टीने रथाकडे पाहत आहे असे आम्हाला वाटते व हा मासा मोठा मूर्ख आहे असे मनाला वाटते ।। १८२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy