SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 679
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६६८) महापुराण (४७-३२ दर्शयन्ती समीपस्थं यावत्सौषगहान्तरम् । इत्युक्त्वानभिलाषं सा ज्ञात्वा तस्य महात्मनः ॥ ३२ तत्रैव विद्यया सौधगेहं निर्माप्य निस्त्रपा । स्थिता तद्राजकन्याभिः सह का कमिनां पा ॥ ३३ एत्यानङ्गपताकास्यास्तं सखीत्थमवोचत । त्वत्पितुर्गुणपालस्य सन्निधाने जिनेशिनः ॥ ३४ । ज्योतिर्वेगा गुरुं प्रीत्या कुबेरधीः समादिशत् । निजजामातरं क्वापि श्रीपालस्वामिनं मम ॥ ३५ स्वयं स्तनितवेगोऽसौ सुतमन्वेषयेदिति । प्रतिपन्नः स तत्प्रोक्तं भवन्तं मैथनस्तव ॥ ३६ आनीतवानिहेत्येतदवबुद्धयात्मना द्विषम् । पति मत्वोत्तरघेणेराशयानलवेगकम् ॥ ३७ स्वयं तदा समालोच्य निवार्य खचराधिपम् । उदीर्यान्वेषणोपायं त्वत्स्नेहाहितचेतसः ॥ ३८ आनीयतां प्रयत्नेन कुमार इति बान्धवाः । आवां प्रियसकाशं ते प्राहिषुस्तदिहागते ॥ ३९ विधुद्वेगावलोक्य त्वामनुरक्ताभवत्वया । न त्याज्येति तदाकर्ण्य संविचिन्त्योचितं वचः ॥ ४० मयोपनयनेऽनाहि व्रतं गुरुभिरपितम् । मुक्त्वा गुरुजनानीतां स्वीकरोमि न चापराम् ॥ ४१ इत्यवोचत्ततस्ताश्च शुङ्गाररसचेष्टितैः । नानाविधैरञ्जयितुं प्रवृत्ता नाशकंस्तदा ॥ ४२ नाही असे तिला आढळून आल्यामुळे तिने तेथेच शुभ्रमहाल विद्येने निर्माण केले व ती निर्लज्ज स्त्री त्या सहा राजकन्याबरोबर तेथे राहिली. बरोबरच आहे की, कामाकुल झालेल्या व्यक्तीना लाज कशी असणार बरे ? ॥ २९-३३ ॥ त्याचवेळी विद्युद्वेगेची सखी अनङ्गपताका ती तेथे आली व ती श्रीपाल कुमाराला असे बोलू लागली- हे कुमार, तुझे पिता जे गुणपाल जिनेश्वर त्यांच्याजवळ दर्शनासाठी तुझी माता कुबेरश्रीही गेलेली आहे व तिने अतिशय प्रेमाने ज्योतिर्वेगेच्या वडिलांना असे सांगितले की, माझा मुलगा श्रीपाल कोठे गेला आहे त्याला हुडकून आणा. तेव्हा ज्योतिर्वेगेच्या वडिलानी आपल्या स्तनितवेग नामक जावयाला असे सांगितले की, माझे स्वामी श्रीपालकुमार कोठे गेले आहेत त्याना आणा. स्तनितवेगाने आपल्या पुत्राला अशनिवेगाला पाठविले व पित्याच्या सांगण्यानेच अशनिवेगाने आपणास येथे आणिले आहे व तो आपला मेहुणा आहे. उत्तरश्रेणीचा राजा अनलवेग श्रीपाल कुमाराचा शत्रु आहे. अशी आशंका मनात धरून तुमच्यावरील स्नेहाने ज्याचे चित्त भरलेले आहे अशा आपल्या सर्व स्नेही बंधुमित्रानी स्वतः विचार करून आपणास हुडकण्याचा उपाय त्यांनी सांगितला व ते म्हणाले की कुमार श्रीपालाला मोठ्या प्रयत्नाने येथे आणावे असे सांगून ते सगळे विद्याधराचा अधिपति अशा अनिलवेगाला अडविण्यासाठी गेले आहेत व आम्हा दोघींना त्यांनी आपणाकडे पाठविले आहे म्हणून आम्ही दोघी आपल्याकडे आल्या आहोत ॥ ३४-३९ ॥ हे कुमार विद्युद्वेगेने तुला पाहिले व तुझ्यावर ती अनुरक्त झाली आहे. त्यास्तव आपण तिचा त्याग करू नये. ते तिचे वचन ( अनङगपताकेचे ) ऐकून व उत्तम विचार करून कुमाराने योग्य असे भाषण केले. " उपनयनाच्यावेळी मला गुरुजनांनी असे व्रत दिले आहे की, त्यांनी आणिलेल्या कन्येचा मी स्वीकार करावा. इतर स्त्रीचा मी स्वीकार करू नये. म्हणून मी इतर स्त्रीचा स्वीकार करणार नाही असे श्रीपालने भाषण केले. यानंतर नानाप्रकारच्या शृंगाररसाच्या चेष्टा करून त्याचे मन अनुरक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यात त्या समर्थ झाल्या नाहीत ॥ ४०-४२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy