SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 225
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २१४) महापुराण (३२-९७ समुच्चरज्जयध्वानमुखरः स सुरैः समम् । प्रभुं सभाजयामास सोपचारं सुरोत्तमः ॥ ९७ अभिषिच्य च राजेन्द्रं राजवद्विधिना ददौ । गोशीर्षचन्दनं सोऽस्मै सममौषधिमालया ॥ ९८ त्वद्भुक्तिवासिनो देव दूरानमितमौलयः । देवास्त्वामामनन्त्येते त्वत्प्रसादाभिकांक्षिणः ॥ ९९ धेहि देव ततोऽस्मासु प्रसादतरलां दृशम् । स्वामिप्रसादलाभो हि वृत्तिलाभोऽनजीविनाम् ॥१०० निदेशरुचितश्चास्मान्सम्भावयितुमर्हसि । वृत्तिलाभादपि प्रायस्तल्लाभः किडफरैर्मतः ॥ १०१ मानयन्निति तद्वाक्यं स तानमरसत्तमान् । व्यसर्जयत्स्वसात्कृत्य यथास्वं कृतमाननात् ॥ १०२ हिमवज्जयशंसोनि मङ्गलान्यस्य किन्नराः । जगुस्तत्कुञ्जदेशेषु स्वैरमारब्धमूर्च्छनाः ॥ १०३ असकृत्किन्नरस्त्रीणामातन्वानाः स्तनावृतीः । सरोवीचिभिदो मन्दमावस्तद्वनानिलाः ॥१०४ स्थलाब्जिनीवनाद्विष्वक्किरन् किञ्जल्कजं रजः। हिमो हिमाद्रिकुञ्जभ्यस्तं सिषेवे समीरणः ॥१०५ आपल्या सर्व देवासह भरतेशाचा जयजयकार करण्यात ज्याचे मुख तत्पर झाले आहे अशा त्या श्रेष्ठ हिमवान् नावाच्या देवाने सर्व आदराच्या प्रकारानी प्रभु भरताची सेवा केली ॥ ९७ ॥ त्या हिमवान् देवाने राजाचा अभिषेक करण्याच्या विधीने राजेन्द्र भरताचा अभिषेक केला व वनपुष्पमालेसह भरतेशाला गोशीर्षचन्दन दिले ।। ९८ ॥ हे देवा, आपल्या प्रसादाची अभिलाषा करणारे आम्ही दूरूनच आपली मस्तके नम्र केली आहेत. हे देवा, आम्ही तुझ्या भोग्यप्रदेशात राहत आहोत ॥ ९९ ॥ ___ हे देवा, आम्हावर आपण कृपेने चंचल अशी दृष्टि फेका कारण मालकाची नोकराविषयी जी संतोषवृत्ति असते ती नोकरांना आपल्याला वेतन मिळण्यासारखी वाटते ।। १०० ॥ हे प्रभो, आम्हाला योग्य आज्ञा करून आपण आमच्यावर अनुग्रह करावा कारण की उपजीविकेच्या लाभापेक्षाही मालकाची कार्य करण्यासाठी आज्ञा मिळणे फार महत्त्वाचे असते असे नोकराना वाटत असते ॥ १०१॥ याप्रमाणे त्या हिमवान् देवाचे भाषण मान्य करणाऱ्या भरतराजाने त्या सर्व उत्तम देवांचा सत्कार केला व त्याना आपल्या आधीन करून त्याना पाठवून दिले ॥ १०२॥ त्यावेळी आपल्या इच्छेप्रमाणे स्वरामध्ये चढ व उतार करणारे किन्नरदेव तेथील लतागृहांच्या प्रदेशात भरतप्रभूने हिमवान् देवाला जिंकले या विषयाचे मंगलगीत गाऊ लागले ॥ १०३ ॥ . त्यावेळी तेथे वारंवार किन्नरस्त्रियांना आपल्या स्तनावरील वस्त्राना वारंवार आच्छादित करविणारे व सरोवराच्या तरंगाना वेगळे वेगळे करणारे असे लागले ॥ १०४॥ स्थलकमलिनींच्या वनापासून चोहोकडे केसरांचा पराग पसरणारा, हिमपर्वताच्या लतागृहातून बाहेर वाहणारा थंड वारा महाराज भरताची सेवा करू लागला ॥ १०५ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy