SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 81
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ षड्विंशतितम पर्व अथ चक्रधरः पूजां चक्रस्य विधिवद्वयधात् । सुतोत्पत्तिमपि श्रीमानभ्यनन्दवनुक्रमात् ॥१ ना दरिद्रीजनः कश्चिद्विभोस्तस्मिन्महोत्सवे । दारिद्रयमथिलाभे तु जातं विश्वाशितं भवे ॥२ चतुष्केषु च रथ्यासु पुरस्यान्तर्बहिः पुरम् । पुजीकृतानि रत्नानि तदाथिभ्यो ददौ नपः ॥३ अभिचारक्रियेवासीच्चक्रपूजास्य विद्विषाम् । जगतः शान्तिकर्मेव जातकर्माप्यभूत्तदा ॥४ ततोऽस्य दिग्जयोद्योगसमये शरदापतत् । जयलक्ष्मीरिवामुष्य प्रसन्ना विमलाम्बरा ॥ ५ अलका इव संरेजुरस्या मधुकरवजाः । सप्तच्छदप्रसूनोत्थरजोभूषितविग्रहाः ॥६ प्रसन्नमभवत्तीयं सरसां सरितामपि । कवीनामिव सत्काव्यं जनानां चित्तरञ्जनम् ॥७ सिवच्छदावली रेजे सम्पतन्ती समन्ततः । स्थूलमुक्तावलीबद्धकण्ठिकेव शरछियः॥८ सरोजलमभूत्कान्तं सरोजरजसा ततम् । सुवर्णरजसार्णिमिव कुट्टिमभूतलम् ॥ ९ __ यानन्तर चक्रवर्ती भरताने चक्राची विधिपूर्वक पूजा केली. लक्ष्मीसम्पन्न या भरताने नंतर आपल्याला पुत्र झाल्याबद्दल आनन्दही प्रकट केला ॥१॥ भरताने चक्रप्राप्ति व पुत्रजन्म झाला म्हणून जो महोत्सव केला त्यात याचकाच्या लाभात दारिद्रय उत्पन्न झाले अर्थात् याचकांना भरतापासून पुष्कळ धनप्राप्ति झाल्यामुळे कोणी याचक राहिलाच नाही. सर्व जन अतिशय तृप्त झाले ॥२॥ भरतराजाने नगराच्या अनेक चौकात, रस्त्यावर, नगराच्या आत व नगराच्या बाहेर रत्नांचे ढीग करून ठेवले व ते त्याने याचकाना दिले ॥ ३॥ ___ भरताने जी चक्रपूजा केली ती शबूंना जणु जारण - मारणाप्रमाणे वाटली व पुत्र जन्माचे जे जातकर्म केले ते जगताला शान्ति देणारे कार्य झाले ॥ ४ ॥ यानन्तर दिग्विजय करण्यासाठी जी तयारी केली त्यावेळी शरदऋतूचे आगमन झाले. तेव्हां जय लक्ष्मीप्रमाणे शरल्लक्ष्मी प्रसन्न व निर्मल आकाशाने युक्त झाली. अर्थात् स्वच्छ वस्त्राला धारण करणारी व निर्मल दिसणारी अशी या राजाची जयश्रीच की काय असे वाटले. म्हणजे तेव्हां शरदऋतूला प्रारंभ झाला ॥५॥ त्यावेळी सात्त्विणीच्या फुलातील परागांनी शोभत असलेले भुंग्याचे समूह शरल्लक्ष्मीच्या कुरळ्या केशाप्रमाणे शोभू लागले ।। ६ ॥ त्यावेळी कवीचे उत्तम काव्य जसे लोकांच्या मनाला रमविते तसे सरोवरांचे व नद्यांचे पाणी प्रसन्न झाले ॥ ७॥ जलाशयावर पाणी पिण्यासाठी चोहोकडून येणारा शुभ्रवर्णाचा हंसांचा समूह मोठमोठ्या मोत्यांनी गुंफलेला शरल्लक्ष्मीच्या गळ्यातील जणु हारच असा शोभू लागला ॥८॥ कमलातील परागांनी व्याप्त झालेले सरोवराचे पाणी सोन्याची धूळ ज्यावर पसरली आहे अशा घट्ट तयार केलेल्या जमिनीप्रमाणे सुंदर दिसू लागले ॥ ९॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy