________________
महापुराण
(४५-१४६
ससम्भ्रमं सहापेतु-हवं हेमाङ्गदादयः । सुलोचनापि तान्वीक्ष्य कृतपञ्चनमस्कृतिः ॥ १४६ मन्त्रमूर्तीन्समाधाय हृदये भक्तितोऽहंतः। उपसर्गापसर्गान्तं त्यक्ताहारशरीरिका ॥ १४७ प्राविशद्बहुभिः साधं गङ्घा गङ्गेव देवता । गङ्गापातप्रतिष्ठानगङ्गाकूटाधिदेवता ॥ १४८ विबुद्धचासनकम्पेन कृतज्ञागत्य सत्वरम् । तानानयत्तटे सर्वान्सन्तयं खलकालिकाम् ॥ १४९ स्वयमागत्य के नात्र रक्षन्ति कृतपुण्यकान् । गङ्गातटे विकृत्याशु भवन सर्वसम्पदा ॥ १५० मणिपीठे समास्थाप्य पूजयित्वा सुलोचनाम् । तव दत्तनमस्काराज्जज्ञे गङ्गाधिदेवता ॥ १५१ त्वत्प्रसादादिदं सर्वमवरुद्धामरेशिनः । तयेत्युक्ते जयोऽप्येतरिकमित्याह सुलोचनाम् ॥ १५२ उपविन्ध्याद्रि विख्यातो विन्ध्यपुर्यामभूद्विभुः । विन्ध्यकेतुः प्रिया तस्य प्रियङगुश्रीस्तयोः सुता॥१५३ विन्ध्यश्रीस्तां पिता तस्याः शिक्षितुं सकलान्गुणान् । मया सह मयि स्नेहान्महीशस्य समर्पयत् ॥१५४
आपल्या हृदयात मन्त्ररूपी पंचपरमेष्ठींना भक्तीने ठेविले व उपसर्ग समाप्त होईपर्यन्त तिने आहाराचा त्याग केला व शरीरावरील मोह सोडला व गंगादेवता जशी गंगेत प्रवेश करिते तसा तिने अनेक लोकासह प्रवेश केला. ( कालीदेवतेने हत्तीला मगराचे रूप धारण करून डोहात का ओढले ? या प्रश्नाचे उत्तर असे- एके वेळी एक सीण आपल्या पूर्व सर्पाला सोडून दुसऱ्या सर्पाबरोबर जात असताना जयकुमाराने पाहिले. त्याने तिचा व त्याचा धिक्कार केला व त्याच वेळी जयकुमाराच्या सेवकांनी तिला मारले व ती मरण पाऊन या डोहात कालीनामक देवता झाली. तिने मागील वैर स्मरून या हत्तीला डोहात ओढले ) ॥१४६-१४७।।
गंगानदी जेथून पडते अशा शिखरावर राहणारी अर्थात् गंगाकुटावर राहणारी गंगा नांवाची देवता ती आपल्या आसनकम्पाने जाणून तेथे आली. ती कृतज्ञ होती. जयकुमाराने केलेले उपकार तिने जाणले व ती तेथे लौकर आली. तिने त्या दुष्ट कालिकेची खूप खरडपट्टी केली आणि त्या सर्वाना तिने तटावर आणले. बरोबरच आहे की, ज्यानी पुण्य केले आहे त्यांचे कोण बरे रक्षण करीत नाहीत ? तिने गंगातटावर आपल्या विक्रिया शक्तीने सर्वसंपत्तीने परिपूर्ण असा प्रासाद बनविला व तेथे तिने रत्नसिंहासनावर सुलोचनेला बसविले व तिची पूजा केली व ती सुलोचनेला म्हणाली अहो सुलोचनाबाई तुम्ही जो मला पंचनमस्कारमन्त्र दिला होता त्यामुळे मी गंगानामक मुख्यदेवी झाल्ये आहे. मी इंद्राची राणी झाल्ये आहे हे सर्व तुझ्या कृपेने घडून आले आहे. अशी त्या देवतेने हकीकत सांगितल्यावर जयकुमाराने सुलोचनेला हे काय आहे याचा खुलासा कर असा प्रश्न केला. तेव्हा तिने याप्रमाणे सांगितले ।। १४८-१५२॥
विन्ध्यपर्वताजवळ विन्ध्यपुरीनामक नगरीत विन्ध्यकेतुनामक प्रसिद्ध राजा राज्य करीत आहे. त्याच्या प्रियेचे नांव प्रियङगुश्री होते व या राजाराणीला विन्ध्यश्रीनामक कन्या झाली ॥ १५३ ॥
आपली विन्ध्यश्री कन्या सर्व गुणांचे शिक्षण घेऊन चांगली गुणवती व्हावी असे त्याला वाटत होते म्हणून तिच्यासह माझ्या पित्याकडे आला व त्याने माझ्यासह गुणाचे शिक्षण घ्यावे म्हणून माझ्यावरील प्रेमाने तिला त्याने माझ्या पित्याला अर्पण केले ॥ १५४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org