SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 167
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १५६) महापुराण (२९-१०९ सप्रेयसीभिराबद्धप्रणयराश्रिता नृपः । कल्पपादपजां लक्ष्मी व्यक्तमूहुर्वनद्रुमाः ॥ १०९ कपयः कपिकच्छूनामुद्धन्वानाः फलच्छटाः । सैनिकानाकुलांश्च निविष्टान्वीरुधामधः ॥ ११० सरः परिसरेष्वासन्प्रभोराश्वीयमन्दुराः । सुन्दराः स्वरमाहार्येर्बाष्पच्छेद्यैस्तृणाङकुरैः ॥ १११ अवतारितपर्याणमुखभाण्डाद्युपस्कराः । स्फुरत्प्रोथैर्मुरवैरश्वाः क्षमा जविविवृत्सवः ॥ ११२ सान्द्रपद्मरजः कीर्ण सरसामन्तिकस्थले । मन्दं दुधुवुरङ्गानि वाहाः कृतनिवर्तनाः ॥ ११३ विबभावम्बरे कजरजः पुजोऽनिलोद्भुतः । अयं तु रचितोऽश्वानामिवोच्चैः पटमण्डपः ॥११४ रजस्वलां महीं दृष्ट्वा जुगुप्सव इवोत्थिताः । द्रुतं विविशुरम्भांसि सरसीनां महाहयाः ॥ ११५ वारि वारिजकिञ्जल्कततमश्वा विगाहिताः । धौतमप्यङ्गरागस्वं भेजुरम्भोजरेणुभिः ॥ ११६ अतिशय प्रेमळ अशा आपल्या आवडत्या स्त्रियासह अनेक राजे ज्यांच्या मुळाशी बसले आहेत असे त्या वनातील वृक्ष व्यक्तपणे कल्पवृक्षाच्या शोभेला पावले. अर्थात त्यांनी कल्पवृक्षाची शोभा धारण केली ॥ १०९ ।। कुहरीच्या वेलीच्या शेंगा हलविणाऱ्या वानरानी त्या वेलीच्या खाली बसलेल्या सैनिकाना अगदी व्याकुळ केले ॥ ११० ॥ आपल्या इच्छेप्रमाणे खाता येतील व तोंडाच्या वाफेने देखील तुटतील अशा कोवळ्या गवतांच्या अंकुरानी सुंदरी दिसणाऱ्या भरताचे घोडे बांधण्याच्या पागा त्या सरोवराच्या भोवती तयार केल्या होत्या ।। १११ ।। पाठीवरील खोगीर व तोंडातील लगाम वगैरे सामान ज्यांचे उतरले आहे अशा त्या घोड्याना जेव्हा लोळण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांचे वरचे ओठ फुरफुरू लागले व ते जमिनीचा वास घेऊ लागले ।। ११२ ॥ कमलांच्या आतील दाट परागानी सरोवराचा जवळचा भू-प्रदेश व्याप्त झाला होता. अशा त्या भूमीवर लोळलेल्या घोड्यानी हळुहळू आपली अंगे झाडली ।। ११३ ॥ ... कमलांच्या परांगांचा समूह जेव्हा वाऱ्यानी आकाशात उडून पसरला तेव्हा जणु तो घोड्याना राहण्याकरिता उंच वस्त्रांचा मंडप बनविला आहे, असा शोभला ।। ११४ ॥ धुळीनी मलिन झालेली पृथ्वी जणु विटाळशी झालेली आहे असे पाहून तिच्याविषयी जणु ज्याना किळस आलेली आहे असे मोठे घोडे शीघ्र तळ्यांच्या पाण्यात शिरले. जणु शुद्ध होण्यासाठी शिरले ॥ ११५ ॥ कमलांच्या परागांनी व्याप्त झालेल्या पाण्यात स्नान केलेल्या त्या घोड्यांच्या अंगाला पूर्वी लावलेला सुगन्धी लेप धुवून गेला होता तरीही कमलांच्या परागानी जणु तो पूर्वीचा लेप पुनः त्यानी धारण केला आहे असे दिसू लागले ॥ ११६ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy